गुंजन - भाग २९ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग २९

भाग २९.



"गुंजनऽऽऽ", वेद अस बोलून तिला उचलून आत घेतो. आता त्याला देखील काळजी लागली होती. तो आणून बेडवर ठेवतो आणि लगेच डॉक्टरला कॉल करतो.


काही वेळातच डॉक्टर रात्रीचे वेद गुंजनच्या हॉटेल रूमवर पोहचतात आणि गुंजनला चेक करायला लागतात.

"कुछ ज्यादा नहीं हुआ है सर। मॅडमने आज ज्यादा प्रॅक्टिस की है ना इसलिये उन्हे चक्कर आये है।"डॉक्टर गुंजनला चेक करत म्हणाले. यावर वेद काहीही न बोलता शांत राहतो. डॉक्टर गुंजनला योग्य ते उपचार देतात आणि गोळ्या वगैरे देऊन निघुन जातात. ते गेल्यावर वेद गुंजन जवळ बसतो. तो थोडस झुकून तिच्या गालावर फिरवतो.



"खूप त्रास झालं ना आता माझ्यामुळे? सॉरी सोना. बट आतापासून जास्त त्रास तुला सहन नाही करावा लागणार. आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. आपण दोघे एकत्र राहू. लवकर बरी हो!!", वेद तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या बोलण्याने ती हळूच डोळे खोलून त्याला पाहते.


"काहीही त्रास वगैरे नाही झाला वेद. उलट मला एक नवीन ओळख तुम्ही दिली आहे. आता मी या स्पर्धेत उतरली नसती ना? ते यश पाहायला मला मिळणार नसते. त्यामुळे स्वतःला काही बोलू नका. तुम्ही बेस्ट आहात माझ्यासाठी नेहमी. हे लक्षात ठेवा.",गुंजन हळू आवाजात त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून वेदच्या चेहऱ्यावर त्याच्याही नकळत हसू येते.


"आता काही वेळापूर्वी तुम्ही चक्कर येऊन पडला होतात ना? आता लगेच सुरू पण झाली बडबड करायला? आज मात्र तुझी मी सगळी बडबड ऐकत बसणार आहे. कारण तुम्ही आज माझं मन खुश केलं आहे मिसेस. वेद", वेद तिला व्यवस्थित उठवत म्हणाला. तो सावकाश पणे उठवून गुंजनला व्यवस्थित बसवतो.


"आता बोल काय म्हणत होती ते हां? ", वेद विचारतो.


"काहीच नाही बोलणार आता मी तुम्हाला. तुम्ही माझे ना बेस्ट बेस्ट नवरा आहात. आय लव्ह यू वेद!!", गुंजन ओरडुन म्हणाली. ती लाजून पटकन त्याला मिठी मारते.



"आय लव्ह यू टू गुंजन. मला सांग आजचा डान्स कसा सुचला तुला? अस काहीतरी मराठी आणि आपल्या राज्याचा इतिहास मांडायला?", वेद तिला बाजूला करत विचारतो. तशी गुंजन यावर हसते.


"वेद, आजच्या पिढीला आपले राज्य कधी स्वतंत्र झाले हे माहीत नाही? आपल्या राज्याचा इतिहास मांडल्या मुळे त्यांच्या निदान थोड तरी लक्षात राहील अस मला वाटत. सोबतच आपले महाराज यांची गोष्टच निराळी आहे. मी ना लहानपणापासून अभिमान बाळगते महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्याचा. महाराजांच्या भूमीत जन्मायला देखील भाग्य लागते!! तर त्यांनी दिलेच आहे आपल्याला मग त्याचा थोडस कर्ज फेडले. ", गुंजन एकदम डोळ्यात वेगळे असे तेज ठेवत म्हणाली.


"ओह माझी राणी ती खूप आवडलं तुमचं हे नवीन हां!! आता यानंतर काय करणार आहात बर तुम्ही? ते पण सांगा मला?", वेद हसूनच तिला जवळ घेत विचारतो.


"आता जर ठरवलं ते करायचे. मुलींसाठी चांगली डान्स अकादमी खोलायची. त्यात फक्त ५० रुपये घेऊन शिकवायचे. कितीतरी गुंजन घडवायच्या आहेत मला. ", गुंजन म्हणाली.


"फक्त ५० रुपये?", वेद विचारतो.


"हो,५० रुपये. हे रुपये डोनेशन बॉक्स मध्ये जाणार आहेत. त्यातून हार्ट सर्जरी मुलांना मदत केली जाईल. कधी कधी सर्जरीसाठी पैसे नसतात पालकांकडे म्हणून निष्पाप जीव जातात. त्यामुळे हे पैसे त्यांना द्यायचे.", गुंजन वेदला समजावत म्हणाली. आता तिचे बोलणे ऐकुन वेद तिला पाहत राहतो. ती किती इतरांचा विचार करायची हे तिच्या अश्या बोलण्याने त्याला कळाले. गुंजन कधीच अस पैसे घेऊन कोणाला शिकवणार नव्हती! हे तो जाणून होता. पण तिचे ५० रुपये बद्दल ऐकून थोडासा तो विचारात पडला. पण आता मात्र तिचे वेगळे असे विचार मात्र जाणून घेऊन त्याला समाधान मिळते. खूप पैसा होता त्यांच्याकडे. त्यामुळे अस पैसे घेऊन आपली कला शिकवायला तिला आवडत नव्हते. या कारणाने तिने असा निर्णय घेतला. दोघे नंतर बोलून आपल फ्रेश होऊन बॅग भरायला घेतात. जेवण वगैरे मागवून खाऊन मस्त झोपून देखील जातात.




दुसऱ्या दिवशी सगळीकडे गुंजनचीच बातमी टिव्हीवर झळकली जाते. तिचे काही रिपोर्टर दिल्लीचे मुलाखत घेतात आणि आपल्या आपल्या चॅनल वर प्रसिद्ध करायला लागतात. ती पूर्ण श्रेय डान्सचे वेदला देते. वेद देखील तिच्या बोलण्याने सगळ काही पुन्हा तिलाच देत राहतो. कारण त्याने फक्त एक सपोर्ट केला होता. पण तिने मेहनत घेतली होती. जे तिला अशक्य कधीकाळी वाटत होते ना? ते तिने शक्य करून दाखवले होते. दोघेही संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबईला रवाना होतात. आता दिल्ली फक्त गुंजनच्या आठवणीत राहणार होती!!

दिल्ली या शहराने तिला नवीन ओळख दिली होती. तिला बिनधास्त बनवलं होते. राहणीमान तिचे बऱ्याच प्रमाणात सुधारले होते. अस असले तरीही संस्कार मात्र बदलले नव्हते तिचे!! ते आज ही तसेच होते. त्यामुळेच ती आज एवढी मोठी विनर ठरली तरीही तिच्यात अहंकार निर्माण झाला नव्हता.



मुंबई एअरपोर्टवर तिचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत तिचे फॅन्स करतात. ढोल ताशा वाजवून तिच्या गळ्यात पुष्पहार घालून तिला अभिनंदन केले जाते. काही मुली तर तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हात पुढे करत असतात. तर काहीजण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गोंधळ करतात. गुंजन सिक्युरिटीला न बोलावता तिच्या फॅन्सला फोटो आणि ऑटोग्राफ गोंधळ न करता देत असते. वेदचा आणि तिचा फोटो देखील ट्रॉफी सोबत काढला जातो. सगळ्या फॅन्सच्या इच्छा पूर्ण करून ते एअरपोर्टच्या बाहेर चार तासाने पडतात. या फॅन्स मुळे ती वर आली होती. हे ती जाणून असल्याने, त्यांच्यासोबत हडतुडची वागणूक ती करत नाही. गुंजनच्या या वागण्याने फॅन्स देखील तिचं कौतुक करायला लागतात.


"गुंजन थकली नाहीस ना? काहीवेळातच घरी पोहचू आपण ", वेद गाडीचा तिच्यासाठी दरवाजा खोलत म्हणाला.



"नाही हो!! उलट तर मी रिफ्रेश झाली आहे फॅन्स पाहून. आता या ही वेळेला मला खूप आनंद होत आहे. बिचारे फॅन्स कधीपासून इथे उभे होते काय माहिती? म्हणून मला त्यांना नाराज करायला जमल नाही. सॉरी आपल्याला माझ्यामुळे उशीर झाला.", गुंजन आत बसतच म्हणाली.


"इट्स ओके वाईफी.", वेद गाडीत बसत म्हणाला. ते दोघे गाडीत बसताच ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो आणि त्यांना तिथून घेऊन जातो.


गुंजन आता स्वतःशीच हसून त्या मुंबईचा गाडीत बसून नजारा पाहायला लागते. आता ती एक मोठी व्यक्ती बनली होती!!याची तिला तो झगमगाट पाहून जाणीव होत असते. वेद तिला अस पाहताना पाहून तिचा हात हातात घेतो.



"आता पुन्हा एकदा नवीन सुरुवात आपल्या नात्याची करुया? याच मुंबईत आधी आणल होत तेव्हा तू पाहिलं देखील नव्हत मला. आपल नातच वेगळ्या प्रकारे जुळले असल्याने बहुतेक. पण आता नवीन सुरुवात करुया अस मला वाटत. देशील साथ तुझ्या वेदला?", वेद हळू आवाजात विचारतो. त्याचं बोलणं ऐकून ती वळते आणि त्याच्या हातावर हात ठेवून हसून मान हलवते. तिचा होकार मिळताच वेद आतून आनंदी होतो. गुंजन देखील त्याच्या साथीने समाधानी होते.



क्रमशः
_________________