गुंजन - भाग ३० Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग ३०

भाग ३०.

गुंजन आणि वेद आपल्या मुंबईतील त्यांच्या बंगल्यात पोहचतात. आतमध्ये बंगल्यात ते जायच्या आधी वेदची आई गुंजनला ओवाळते आणि मग घरात घेते.

"गुंजन, खूप छान वाटल आम्हाला तुमचं यश पाहून. तुमचा डान्स पण चांगला होता", वेदची आई आनंदात म्हणाली. आईला पाहून गुंजन थोडीशी भावुक होते आणि त्यांना मिठी मारते. तिच्या अश्या अचानक वागण्याने त्या गोंधळून वेदकडे पाहतात. वेद डोळ्यांनीच त्यांना शांत राहायला सांगतो. तश्या त्या भानावर येऊन गुंजनच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात.

"तुम्हाला माहित नाही आई, पण तुमच्या तोंडून कौतुक ऐकून एक वेगळीच फिलिंग वाटली. कारण माझ्या घरात कधीच माझं अस कौतुक झाले नव्हते. लहानणापासूनच मी मुलगी आहे ना म्हणून माझा तिरस्कार करण्यात आला आणि आज त्या तिरस्काराने तुमच्या घरात आले. पण खर सांगू आई पहिल्या दिवशी मी जेव्हा आले ना घरात? तेव्हा मला काहीच समजत नव्हत. त्यावेळी वेदनी मला सांभाळून घेतल. त्यांनी जर माझ्या कलेबद्दल लोकांना सांगितलं नसत ना? तर आज मी पुन्हा एकदा मागे पडले असते. लग्न जेव्हा झालं ना, त्या होमातच मी माझ्या स्वप्नांना जाळून टाकले होते. पण वेदनी मला पुन्हा त्या दिशेला नेले. त्यांनी जे काही केले ना माझ्यासाठी त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. वेळोवेळी मी जेव्हा घाबरून जात असायचे , तेव्हा तेच माझं मनोबल वाढवून मला वर आणत असायचे. आज सगळ माझं जे माझ्याकडे आहे ना त्याचे हक्कदार देखील तेच आहेत. आई , तुम्ही ना खूप चांगल्या मुलाला जन्म दिला आहे. असा मुलगा मी माझ्या आयुष्यात पाहिला नव्हता. मला माझ्या घरातल्या लोकांच्या वागण्यामुळे मुलांचा राग येत असायचा. पण वेदने तो माझा गैरसमज दूर केला आहे. सर्वच मुल एकसारखे नसतात. काही यांच्या सारखे पण असतात. थँक्यू, आई अश्या माझ्या जीवनसाथीला जन्म देण्यासाठी!!", गुंजन बाजूला होऊन मनात असलेलं सगळ काही आज वेद बद्दलचे त्याच्या आईकडे बोलत होती. वेद तर तिचे सगळे बोलणे ऐकून तिला पाहायला लागतो. कारण आज पहिल्यांदा ती त्याच्या संबंधी एवढ भरभरून बोलत होती. ते सुद्धा त्याच्याच आईकडे!!


"गुंजन, माझा मुलगा हिरा असला तरीही त्याने तुझ्यासारखा हिरा शोधून आणला माझ्यासाठी. याबद्दल मी त्याला थँक्यू म्हणेल", वेदची आई तिचं ऐकून हसून म्हणाली. वेदबद्दलचे गुंजनच्या मनात असलेले विचार ऐकून त्या समाधानी तर झाल्या होत्या. वर त्यांनी गुंजनच देखील कौतुक केलं होत. वेद जरीही चांगला असला ? तरीही सद्या गुंजन देखील तेवढीच त्याची भागीदार होती. तिचे वागणे, संस्कार , स्वभाव पाहून वेदची आई तिच्यावर खूष होती.



संसार त्या दोघांचा होता. त्यामुळे त्या दोघांना सारखंच पाहत असायचे. गुंजन आणि वेदच प्रेम त्यांचे विचार त्यांना माहीत असल्याने त्या तिचं कौतुक करतात.


"आजपासून मी तुझी आई आहे. स्वतः ला एकट कधीच समजायचं नाही. कळल का?", वेदची आई हसूनच म्हणाली.


"हो. तुम्ही दोघे आहात माझ्यासोबत, मग मी स्वतःला कधीच एकट समजणार नाही!!",गुंजन त्यांना हसून प्रतिउत्तर देत म्हणाली.


"बर आता नातीचे तोंड कधी दाखवणार आहात दोघे? अजून वेळ घेणार आहात?", वेदची आई मस्करी करत विचारते. त्यांच्या या बोलण्याने गुंजन लाजते.


"आई मी फ्रेश व्हायला निघते हा", गुंजन लाजतच म्हणते आणि आईच बोलण ऐकायच्या आधीच तिथून पळत जाऊन आपली रूम गाठते. वेदची आई तिला हसून पाहते आणि आपल्या कामाला निघून जाते. वेद ते बोलण ऐकून आपल्या केसांवर एक हात फिरवतो. तो तसाच पायऱ्या चढून आपल्या रूम मध्ये जातो.


रूम मध्ये येऊन तो कबर्ड मध्ये आपल सामान लाजत लावणाऱ्या गुंजनला पाहतो. हळूच मागूनच तिला मिठीत घेतो. तशी गुंजन शांत खाली मान घालून स्थिर उभी राहते.


"गुंजन, आपल्याला बाळ वगैरे नको हा", वेद तिच्या केसांच्या बटा मागे सारत म्हणाला. पण त्याच ते बोलण ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे लाजणे गायब होते. ती पटकन त्याचा हात बाजूला काढून मागे फिरते.


"वेदऽऽऽ काहीही काय बोलत आहात तुम्ही?",गुंजन काहीशी स्वतः ला सावरत विचारते.पण तिच्या डोळ्यातून पाणी येतेच शेवटी बाहेर.


"अरे, बाबा तुला त्रास होणार ना नऊ महिने म्हणून नको म्हणालो मी. एवढ काय त्यात रडण्यासारखं असत? ", वेद तिच्याजवळ येत तिचे अश्रू पुसत म्हणाला.


"वेद, तुम्ही मला घाबरवत असतात नुसते. काहीपण काय बोलतात अहो तुम्ही? माझं मातृत्व हिरावून घेण्याच पुन्हा बोलायचं नाही हा. मी माझ्या आई बनण्याची भरपूर स्वप्न पाहिली आहे. मला आता माझी फॅमिली पूर्ण करायची आहे. त्यासाठी छोटस बाळ हवे आहे. एक सांगू का वेद? आईपणामुळे त्रास होत नाही काही. कारण जरीही थोडासा त्रास झाला ना तरीही आपल बाळ आपल्या पोटात आहे. या विचाराने मन समाधानी होत. आता तुम्ही बघा आपल्या अस कधी कोणी लाथ मारली. तर आपण रागावतो. पण जेव्हा आपल बाळ पोटात असताना हालचाल करून असल काही करत असल ना की आपण आनंदी होतो. हे सगळ सुख अनेक फिलिंग वेगळी असते वेद. तुम्ही ना उगाच काहीही बोलत जाऊ नका!!मला माझं बाळ हवे आहे!!",गुंजन त्याला समजावत म्हणाली.



वेदच आणि तिच्या बाळाचे तिने स्वप्न पाहिले असल्याने ती त्याला तस म्हणाली. त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम काहीच नव्हता. तरीही वेद तिला त्रास होऊ नये या विचाराने बोलत होता. हेच सध्या तिला पटत नव्हते. कोणत्याही आईला तिच्या मुलांचास त्रास होत नाही. हे तिच्या बोलण्यातून त्याला समजत होते. जे बाळ अजून नव्हते! त्या बाळा बद्दल ती त्याला एवढ बोलत होती. वेद मात्र आता तिचे बोलणे ऐकून हसतो. ती त्याला अस हसताना पाहून डोळे बारीक करून त्याला पाहायला लागते.


"वेड लागले आहे का तुम्हाला?",गुंजन विचारते.



"वेड नाही लागले मला. तुझं बोलणे ऐकून हसू आले. गुंजन किती ते बोलली तू मला बाळासाठी? खूपच घाई लागली ना तुला? चल आता मी फ्री आहे. ", वेद मिश्किलपणे हसतच म्हणाला. गुंजन त्याचं अस बोलण ऐकून कपाळावर हात मारून घेते. वेद पटकन तिला स्वतः च्या दोन्ही हातात उचलून घेतो आणि अलगद पणे तिला बेडवर ठेवतो. तशी ती लाजून नकारार्थी मान हलवते. पण आज मनातून तिला ते सगळ काही वेद कडून हवे होते. हे तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळून चुकते. त्यामुळे तो हसूनच तिच्याजवळ जाऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला आपलस करतो. काहीवेळात त्या दोघांच्या कपड्यांचे अडसर दूर होते आणि दोघे त्यांच्या प्रेमाच्या जगात हरवून जातात. वेद तिच्या सर्वांगावर स्वतःचा हक्क गाजवत असतो. ती देखील त्याला प्रतिसाद देते. तिचा प्रतिसाद पाहून तो खूष होऊन तिला आणखीन प्रेम करायला लागतो.



"गुंजनऽऽ, वेदऽऽ जेवायला वाढले आहे तुम्हाला येता ना तुम्ही दोघे जेवायला?", वेदची आई ओरडुन दरवाजावर येत म्हणाली. त्यांचा असा आवाज ऐकून गुंजन पटकन घाबरून वेदच्या ओठांना चावते.

"आहऽऽ गुंजन", वेद कळवळून ओरडतो. तशी ती पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते.


"आलो आई.",गुंजन ओरडुन म्हणाली. तशी वेदची आई तिचा आवाज ऐकून मान हलवून तिथून निघून जातात. गुंजन पटकन वेद च्या तोंडावरचा हात बाजूला काढते.


"सॉरी सॉरी. आई आल्या ना म्हणून घाबरून झालं. नेक्स्ट टाईम अस काहीच करणार नाही.", गुंजन अस बोलून वेदच्या ओठांवर ओठ टेकवून छोटासा किस करून त्याच्या पासून दूर होते. ती बाजूचाच वेदचा शर्ट अंगावर चढवून बाथरूमला निघून जाते. वेद तसाच शर्टलेस बेडवर पडून तिला पाहत राहतो.


आज त्याला गुंजनने खूप काही दिलं होत. त्यामुळे तो तिला काही बोलत नाही. ज्या गुंजनला पाहून त्याच्या मनात इच्छा जाग्या होत असायच्या? त्या आज तिने त्याच्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे तो शांत राहतो. ती बाहेर येताच तो तिला पाहून आतमध्ये बाथरूम मध्ये निघून जातो. गुंजन देखील स्वतःला नीट करून हसूनच खाली निघून जाते.


क्रमशः
__________________