अंकिलेश - एक प्रेमकथा - 3 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 3

@ अंकिता

माझा प्लॅन मला वाटलं होतं फसला. म्हणजे सकाळ सकाळी मी केईम हाॅस्पिटलला निघाले तेव्हा वाटलं होतं, अख्खि वुड बी वेटिंग फाॅर मी. विथ द ट्राॅफी. इतका व्यवस्थित विचार करून आय हॅड लेफ्ट इट बिहाइंड. पण नाही. त्या हाॅलमध्ये ट्राॅफी नव्हतीच नि अख्खाच्या अख्खा अख्खिही गायब होता. कोणाला विचारावे? इकडे तिकडे भटकून मी परत गाडीत बसले. हाॅस्पिटलात गाडी घालायला नि अख्खि समोर दिसायला एकच गाठ पडली. आय टेल्यू, म्हटले, एक्स्पेक्ट न अनेक्स्पेक्टेड! अख्खि आमच्या काॅलेजात यायला देअर कुडंट बी एनी अदर रिझन दॅन द ट्राॅफी! खरंतर नो अदर रिझन दॅन मी! माझी हाक गेली तसा अख्खि दचकला. एकाएकी थांबलाच. आवाज कुठून येतोय त्याला कळेना. माझ्याकडे लक्ष गेलं तसा त्याचा हात बॅगेत गेला. ट्राॅफी बाहेर आली. आता ती हँड ओव्हर करून हा निघून जातो की काय? मी गाडीतून बाहेर पडले.

"ही ट्राॅफी काल विसरून गेलीस?" त्याने विचारले. 'मुद्दाम' हा शब्द गाळून म्हणाले, "हो ना! थ्यांक्स!"

"इट्स ओ.के."

ह्याला एवढेच बोलता येतं की काय? घाईघाईत मी म्हणाले,

"हाऊ अबाऊट काॅफी फाॅर धिस ट्राॅफी?"

त्याची अपेक्षा नसावी.

"ट्रीट फ्राॅम मी! चल.." मी म्हणाले नि

त्याला जास्त आॅप्शन्स नि टाइम न देता कँपसबाहेरच्या हाॅटेलाकडे निघाले. कँटिनमध्ये पपांच्या नजरेस पडले तर आली शामत! बेटर बी सेफ.

हाॅटेलच्या एसीमध्येही अख्खि घामेजला झाला होता. बहुधा कुण्या मुलीबरोबर फर्स्ट टाइम आला असणार. पण तेवढेच नव्हते. ही टोल्ड मी लेटर, बिल भरायची पाळी आली तर..? दोन चार दिवस उपाशी रहावे लागेल!

बट दॅट वाॅज नाॅट टू बी! 'ट्रीट फ्राॅम मी,' आय हॅड आॅलरेडी सेड. पण ही वाॅजन्ट शुअर. मला इंप्रेस करायला वेदर ही शुड आॅफर टू पे द बिल! एकूण त्याची तशी लोअर मिडलक्लास हालत माझ्या नंतर लक्षात आली. इकडे मी, बाॅर्न विथ ए सिल्व्हर कसला, गोल्डन स्पून. आणि हा, दोन काॅफींसाठी हिशेब करणारा. समथिंग लाइक बाॅर्न विथ अ प्लास्टिक स्पून! बट दॅट वाॅज इममटेरियल. मला तो जसाच्या तसा आवडला होता. हिंदीत होनहार शब्द आहे ना तसा वाटला मला तो.

"कशी काय तू तुझी प्राईझ्ड ट्राॅफी विसरलीस?"

कशी काय? त्या शिवाय हा इकडे आला असता? किंवा आय वुड हॅव गाॅन? जस्ट टू सी यू अगेन डियर.. हे मी मनातल्या मनात बोलले.

"द्याट मॅच यार! इन दॅट एक्सायटमेंट जस्ट फरगाॅट!"

मी धडधडीत खोटं सांगितले त्याला.

"उगाच तुला इथवर यावं लागलं.."

मी त्याच्या काॅलेजला गेलेले हे न सांगता मी म्हणाले,

"एनी वे! काॅफी फाॅर दिस ट्राॅफी! काॅफी छान असते इकडची!"

अख्खि वाॅजन्ट टाॅकिंग मच. तो खरंच फक्त ट्राॅफी द्यायला आलाय की मला भेटायला? एवढा सिन्सियर असेल तो की फक्त यासाठी येईल? की ही आॅल्सो लाइक्स मी?

आम्ही बाहेर पडलो तर समोरच पपांची गाडी उभी होती. ती लगेच निघूनही गेली. पपांनी पाहिले तर नसेल? ह्यालाच चोराच्या मनात चांदणं तर म्हणत नसतील? ममा वापरते ही सेईंग मध्ये मध्ये. म्हणजे अदरवाईज आयॅम आॅलवेज अमंग्स्ट माय फ्रेंडस.. तेव्हा पपांना काही वाटत नाही. आणि आज अख्खिबरोबर आहे म्हणून?

धिस लव्ह मेक्स यू थिंक फनीली. म्हणजे जस्ट सी, मला अख्खिला सांगायचे काही वेगळेच होते, बोलत मी काही वेगळेच होते. मला आजवर वाटायचे, व्हेन आय लाइक समबडी डियरली, आय वुड जस्ट ॲप्रोच ॲंड टेल हिम! अगदी डायरेक्टली, आय लव्ह यू म्हणून. त्यात व्हाय बीट अरांउंड द बुश? बट नो! आय जस्ट कुडन्ट! शब्द तोंडावर येतात पण बाहेर पडत नाहीत. आय मीन समथिंग ॲंड से समथिंग एल्स? त्याला पाहून माझे हार्ट धडधडावे नि सगळे शब्द विसरून जायला व्हावेत? आजवर असे कधी झाले नाही. धिस फिलिंग इज डिफरंट! मध्ये कुठल्यातरी हिंदी सिनेमाला आमची गँग गेलेली, त्यात असाच डायलाॅग होता, ये प्यार नहीं तो क्या है दोस्त.. थोडक्यात आय ॲम इन लव्ह. अँड माय प्रिन्स इज हिअर. घोड्यावर बसून नसेल पण आलाय तो लाल बस मध्ये बसून..

पण बसून कसला? त्याची बस येताना पाहून अख्खि जस्ट स्टार्टेड रनिंग. कसाबसा बसला लोंबकळत होता. पाठी वळून त्याने हात केला. पण शेवटी निघताना परत कधी भेटणार हे देखील विचारू शकले नाही मी. दोझ डेज मोबाईल्स वेअर नाॅट काॅमन. रादर दे वेअरंट फाॅर काॅमन पीपल. माझ्याकडे होता मोबाईल पण आय वाॅज शुअर, अख्खि डिडंट हॅव इट. ज्या पद्धतीने तो बोलत होता.. लुक्स टू बी फ्राॅम ॲन ॲव्हरेज फॅमिली. पपा मानतील? एवढ्या मोठ्या डाॅक्टरची एकुलती एक डाॅटर गेटिंग मॅरीड टू अ काॅमनर? मानोत न मानोत, आय हॅव गिव्हन माय हार्ट. अँड फाॅर दॅट मॅटर, इटस् अ मॅटर आॅफ हार्ट, व्हेअर अदर थिंग्स डोन्ट मॅटर! आणि ते एक गाणं आहे ना, त्यासारखं मी म्हणेन.. पापा डोन्ट प्रीच!

*****

@ अखिलेश

नायर हाॅस्पिटलची माझी व्हिजिट म्हणजे न घडलेल्या प्रेमकहाणीचा 'द एंड' जवळ आणणारी होती. त्या काॅफी हाऊसमध्ये आम्ही बसलो काय.. एअर कंडिशण्ड जागा. इथे घुसण्यासाठीही मला महिनाभर पैसे वाचवावे लागतील. अंकिताची स्वत:ची गाडी.. डाॅ.गावस्करांसारखे मोठे डाॅक्टर.. त्यांची ही मुलगी.. मुद्दामच मी बस मागे धावत लोंबकळत परत आलो. तिला कळावे आधीच, बाई, तुझं माझं काही जमण्यातलं नाही. उगाच नंतर पश्चात्ताप. आता कुणी म्हणेल पश्चात्ताप हा पश्चातच होतो.. तेव्हा ही परत द्विरूक्ती कशाला? असो. इथेही द्विरूक्ती? पण एक झाले ते खरे, ही कथा इथेच संपवावी. विरक्ती आली म्हणा!

पण त्या आधी, अंकिताने काॅफीसाठी विचारले तेव्हा नाही म्हटले तरी मी थ्रिल झालो होतो. काय बोलावे कळत नव्हते. एखाद्या पहिल्याच नजरेत आवडलेल्या मुलीबरोबर, ते ही अशा हाॅटेलात बसायची ही पहिलीच वेळ. का कुणास ठाऊक अंकिता काहीतरी विचारात असावी नि बोलायचे ते बोलत नसावी असेच वाटत होते. मी कसाबसा हो ला हो करत होतो. इकड तिकडच्या गप्पा झाल्या. फर्स्ट इयरला मी कसा फेल होता होता वाचलो ते उगाच सांगून झाले. म्हटले, हिला पटावे बाई गं.. हा नाद सोड सोड. खरेतर मी हिच्या मागोमाग आलो नसतो तर बरे झाले असते. पण ते वयच तसे असते त्याला काय करणार?

अंकिता तशी बिनधास्त वाटली. बड्या घरची बेटी. पण तशी तोरा वगैरे दाखवत नव्हती. म्हणजे बडे घर की पण बिगडी हुई नसावी. हुशार ही असणार. फर्स्ट इयरला दोन विषयांत टाॅप म्हणजे खायचे काम नाही. अर्थात बाकीच्यांनी हे म्हणजे 'बडे बाप ने लगाया होगा पुल' असेच म्हटले असणार. काही असो, मला तरी ती इंप्रेसिव्ह वाटलेली. म्हणजे छान तर ती होतीच, हुशार ही आणि स्वभावाने चांगली. तिचं मराठी तसं यथातथाच होतं. पण एखादी व्यक्ती फक्त भाषेसाठी थोडीच नावडू शकते? शेवटी भाषा संवादासाठी आहे, विसंवादासाठी थोडीच? तर आय वाॅज इंप्रेस्ड. अंकिता मला आवडली म्हणत नाही मी.. कारण तोवर मी मनाने पूर्ण विड्राॅ होऊन प्रेमकथेचा दी एंड करून टाकला होता. यापुढे ती मला परत भेटण्याचा नाहीतरी प्रश्न नव्हताच. एक ख्वाब सा देखा था हमने म्हणत मेरी आंखे खुल गई म्हणावे नि उगाच प्रेमभंगाच्या जखमा कुरवाळत कशाला बसावे? सेकंड इयर पॅथाॅलाॅजीत भले ही वुंड हिलिंगची मेकॅनिझम शिकवत असोत.. हार्ट ब्रेकची ही मेकॅनिझम कुठे शिकवली जाते?

माझ्यात हे उपजत शहाणपण आधीपासूनच आहे. आईने शिकवलेलं. गरीबीची जाणीव असेल तरी न्यूनगंड नाही. मान वर करून रहा पण नसती स्वप्ने कशाला पहा? थोडक्यात मेरा सुंदर सपना बीत गया.. सपना टूटनेसे अच्छा है वह बीत ही जाए. म्हणजे उगाच त्या तुटण्या फुटण्याच्या जखमा उरावर बाळगत फिरायला नको.

काॅलेजात परतलो. आज काॅलेज वीकचा शेवटचा दिवस. मन कशात लागेना. शहाणपणाने ही वन डे मॅच सारखी प्रेमकथा संपवली पण मनातून अंकिता इतक्या सहज कशी जाणार होती? चोवीस तासांत दुनिया इधर की उधर नि परत उधर की इधर यावी? पण मीच मला समजावले, टाइम इज द बेस्ट हीलर. हळूहळू विसरेन तिला. त्यावेळी पुढे काय होणार आहे हे माहिती असायला मी जगद्गुरू भास्कराचार्य पंडित थोडीच होतो? आता हे नवीन कोण? सांगेन नंतर. पण चोवीस तासांत हे असे सारे घडले!