अंकिलेश - एक प्रेमकथा - 12 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 12

१२

@ अंकिता

त्या नाटकाचे नाटक मस्त झाले. नाटक ही चांगलेच असावे बहुतेक. म्हणजे मी फक्त अख्खिबद्दलच्या विचारात होते. नाटकाचे नावच होते तसे.. प्यार किए जा! तशी मी तेव्हा होते वीसेक वर्षांची. तर ह्याला इनफॅच्युएशन म्हणता आले असते का? पण नाही. त्यानंतर एवढे काही झाले. आणि वुई आर टुगेदर, गोईंग स्ट्राँग स्टिल.. म्हणजे ते तात्पुरते आकर्षण कसे असेल? आज कालच्या पोरापोरींत चट पेअरिंग पट ब्रेक अप होतो म्हणे.. त्याबद्दल खरेच आय फिल पिटी.. पुअर थिंग. म्हणजे त्यांना कंप्यानियनशिपचा अर्थच कळलेला नाही बहुतेक. आफ्टर फ्यू इयर्स आॅफ मॅरेज आय कॅन से धिस.. धिज पेअर्स आर लाइक अ जिगसाॅ पझल. पण आपल्या तुकड्याचा शेप प्रिडिफाइन्ड नसावा. वन नीडस् टू ॲडजस्ट ॲज पर अदर्स पीस. म्हणजेच मग युनिफाॅर्म शेप बनतो.. मॅरीड लाईफचे पझल सोडवायचे तर बोथ हॅव टू किप चेंजिंग ॲज पर अदर्स रिक्वायरमेंट. मी एकदा सिरियसली म्हणाले अख्खिला असं तर तो म्हणाला,अमीबा असतो ना तसा? कीप चेंजिंग शेप! पण हे खरंय. वन हॅज टू चेंज अँड ॲडजस्ट. दोघांनीही. इट्स अ म्युच्युअल अंडरस्टँडिग. एनी वे. हे खूप नंतरचे आणि अ बीट सिरीयस. पण माझी ही सवयच आहे. एकातून एक विषय निघतात नि आय फरगेट द मेन सबजेक्ट.

तर, त्या दिवसात मी अख्खिला विसरले नाही एकही दिवस. अभ्यास, परीक्षा, प्रॅक्टिकल्स, वाॅर्डस नि इमर्जन्सीज अटेंड करणे सांभाळून ही इंटरकाॅलेजिएट लव्ह स्टोरी! ते ही ह्याच्या सारख्या बरोबर! हा मला नाही वाटत मी पुढे गेले नसते तर कधी माझ्यामागे आला असता! अगदी हिंट दिली त्या दिवशी.. 'समवन लाइक्स यू' नि 'काही जणांना जवळचं दिसत नाही' .. तरी ह्याने तसे दुर्लक्ष केलेले. पण आज सांगतेय मी, ही इज अ जेम. तेव्हा पण तेच वाटायचे मला. आणि अजून माझे मत बदलले नाहीए! आता जेम म्हटले की अख्खि म्हणेल, नाव नको बदलूस माझे.. वाॅट? माय नेम इज नाॅट जेम्स! आयॅम नाॅट जेम्स वाॅट! ही इज फनी. दॅट सेन्स आॅफ ह्यूमर! बट आय टेल्यू, तेव्हा फनी वाटायचा तो, आता ना ही गेट्स आॅन नर्व्हस् समटाइम्स, रादर मोस्ट आॅफ द टाइम्स! वाॅट डिस्कव्हर्ड स्टीम इंजिन.. आणि नाऊ अ डेज अख्खि वेस्टस् सो मच स्टीम.. तोंडाची वाफ दवडणे म्हणतात काहीतरी तसे. सी, हाऊ ही हॅज चेंज्ड नाऊ!

सो गेटिंग बॅक टू द सायकल! नाटक संपवून अख्खि गेला.. दुसऱ्या दिवशी सायकल चालवायला ग्राउंडवर येण्याचे आमंत्रण देऊन! मला तेव्हाही वाटलेलं, ही डिड दॅट इंटेशनली. नंतर त्याने सांगितले ही. पुअर फेलो.. त्याच्याकडे चालवायला सायकलच नव्हती. ते ग्राउंड नि ती सायकल फक्त मला भेटण्यासाठी एक एक्सक्यूझ होती. ती सायकल त्याने कुठून पैदा केली होती कोणास ठाऊक.. पण नंतर मला त्याच्या त्या मैदानात दर रविवारी सायकल चालवण्याचे कौतुक वाटले. खूप नंतर मला अख्खिने ही ग्राउंडवर भेटण्याची ग्राउंड रियालिटी सांगितली.. तोवर वुई वेअर आॅलरेडी कमिटेड.. पण तेव्हा एका झटक्यात त्याने परत परत भेटावे कसे ह्याचा प्राॅब्लेमच साॅल्व्ह करून टाकलेला! शेवटी व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे आऊट हेच खरे!

पण माझ्याकडे मात्र सायकल होती. मोठ्या हौशेने घेतलेली. अर्थात गेल्या वर्षभर चालवली नव्हती. अडगळीत पडलेली. आता काय? टायरमध्ये हवा नसणार. मी घरी आले नि कामाला लागले. ममा घरी नव्हती म्हणून येणारे प्रश्न आपोआप अव्हाॅइड झाले. सायकलवाला जवळच आहे त्याच्याकडून सायकलीची डागडुजी करून घेतली. सायकल परत ठेवून घरी आले. रात्री ममा ला म्हटले,"आय थिंक, आय हॅव पुट आॅन सम वेट.."

"तू? वेट.. लेट मी सी व्हेअर!" ममा म्हणाली. "एकटीच जाणार की कोणी आहे बरोबर?"

"कुठे?"

"सायकलिंग.."

"तुला कुणी सांगितले?"

"तुला पाहिले मी. सायकल रिपेअर करून घेताना. इतके मोटिव्हेशन असेल तर वजन वाढण्याची काय बिशाद?"

मी गप राहिले खरी, पण पुढे ममाच म्हणाली,"कोण कोण येणारे? की एकटीच?"

"बघते कोण येणारे का? सगळ्या जणी लेझी बम्स आहेत. बट आय मे गो अलोन."

"यू कॅन काॅल इव्हन इंटरकाॅलेजिएट फ्रेंड्स! इकडचे नाही आले तर काय झाले?"

ममा वाॅज टाॅकिंग विथ अ स्ट्रेट फेस. बट आय न्यू, काहीतरी गडबड आहेच. बट आय डिसायडेड टू कीप क्वाएट..

इंटरकाॅलेजिएट फ्रेंडस? ममा'ज स्पाईंग डिपार्टमेंट इज वर्किंग ओव्हरटाइम? इतका कोइन्सिडन्स कसा काय होऊ शकतो? पुढे कदाचित फक्त गुगली म्हणून म्हणाली असणार..

"बाकी कोणी येवो न येवो.. तुझे पपा नक्की येणार तुझ्याबरोबर! ही वोन्ट लिव्ह हीज डाॅटर अलोन! ते ही रविवारी!"

पपा रविवारी सकाळी दहाच्या आत उठत नाहीत. ते कसले येताहेत? पण नुसत्या त्या कल्पनेनेच मला घाम सुटला.. सावरत मी म्हणाले,"अगं मंजू नाहीतर कल्पना कोणीतरी नक्की येतील. उगाच पपांची झोपमोड सकाळी सकाळी कशाला? ही गेट्स सो टायर्ड थ्रू द वीक."

मी बोलताना हळूच ममाकडे पाहात होते. ती बहुधा हळूच हसत होती. तिला माझी गोष्ट माहिती पडलीय की काय?

पुढे मात्र काही झाले नाही. पपा हाॅस्पिटलातून उशीरा आले, तोवर मी झोपून गेलेले. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सहाच्या ठोक्याला उठून सायकल घेऊन मी ग्राउंडकडे तिला पळवली. आज कित्येक वर्षांनी मी सायकल चालवत होते.. मला आठवले, लहानपणी सायकल शिकताना मी कितीतरी नखरे केलेले. सायकलीवरून एकदा पडले तर मी तिचा धसकाच घेतला असावा. पपांनी मागे लागून मला शिकायला लावले. नंतर फर्स्ट इयर रिझल्ट नंतर मला ही बक्षिस मिळालेली.. ती ही माझी आवडती 'हीरो' सायकलच! जणू तिच्यावर बसल्याने मला माझा हीरो भेटणार होता!

पण खरेच भेटला तो! अख्खि सायकलवर टांग टाकत ग्राउंडवर पोहोचलेला, माझ्या आधीच. मी जय्यत तयारीनिशी गेलेले. म्हणजे नुसते पाणीच नव्हे तर दोन बाटल्यांत लिंबू पाणीही घेऊन आलेले मी. ते मी ममाच्या नकळत बनवून ठेवलेले.

"किती छान आहे नाही हवा?" अख्खिचं ओपनिंग स्टेटमेंट!

हा काय हवापाण्याच्या गप्पा मारायला आलाय?

"हो ना!"

"मला लवकर उठायची सवय आहे. रविवार सकाळी एक तास सायकलिंग. मग घरी जाऊन अंघोळ.. मग.."

अख्खिला माझ्याशी काय बोलावच कळत नसावं. मला तरी कुठे काय सुचत होतं. अर्धा तास झाला असावा.. मी म्हटले,"लेट्स टेक अ ब्रेक!"

एका झाडाखाली आम्ही थांबलो.. लिंबूपाण्याची एक बाटली त्याला देत म्हणाले,"घे.."

त्याला ते अपेक्षित नसणार. मी अख्खिसाठी बनवलेली पहिली डिश! आता बाटलीत भरलेल्या लिक्विडला डिश कसे म्हणणार? नाहीतर रेसिपी म्हणावे का? साध्या लिंबूपाण्याला रेसिपी म्हणणे म्हणजे जरा अतीच होतंय. तसं मला कुकिंग चांगलं येतं. आणि आवडतं पण. पण लेमनवाॅटर हा काही स्पेशालिटी म्हणावा असा पदार्थ नाही! अख्खि मात्र ते लिंबूपाणी जास्तच चवीने प्याला.

"मस्त आहे!"

"कोण?"

"कोण काय? हे लिंबू पाणी.."

"ते होय? पण तू पाणी पण आणत नाहीस?"

"आणतो.. म्हणजे पहिल्यांदाच आलो ना तर लक्षात नाही राहिले.."

"पण तू तर दर रविवारी येतोस ना.."

"अगं नाही, मी म्हणालो, मी नेहमी आणतो पण पहिल्यांदाच माझ्या लक्षात नाही राहिले.. आणि हे लिंबूपाणी मस्तय हां. इन्स्टंट एनर्जी.. आता मी अगदी झिप झॅप झूम.. किती फास्ट जातो बघ.. आणि कुणी विचारले तर सांगेन मी.. लिंबूपाणी इज द सिक्रेट आॅफ माय एनर्जी!"

"अवर एनर्जी म्हण! मी पण प्यायलेय ना हे.. लेमनवाॅटर!"

लेमनवाॅटरची असेल, नाहीतर अख्खि बरोबरच्या सायकलिंग मुळे मिळालेली असेल, नवीन एनर्जी घेऊन मी परत आले. आता एव्हरी संडे हा सायकलिंग रिचार्ज! अख्खि इज ग्रेट! व्हाॅट ॲन आयडिया! अर्थात ही त्याने मला भेटण्यासाठी केलेली आयडिया आहे ते तेव्हा कुठे मला माहिती होतं?