अंकिलेश - एक प्रेमकथा - 20 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 20

२०

@ अंकिता

एखाद्या हिंदी सिनेमात आधी काॅमेडी दाखवतात मग अचानक सीन बदली होऊन रडारड सुरू होते.. तसेच काहीसे त्या दिवशी झाले!

दिल्ली दरबारातली ती माझी रिझल्टची पार्टी. त्यात अख्खिबरोबरची संडे दुपार. आम्ही चार पाच तास बरोबर होतो. वुई वेअर हॅपी. अख्खि वाॅज ॲट हिज बेस्ट .. म्हणजे त्याच्या काॅमेडी कमेंटस्, ड्राॅप अ वर्ड ॲंड ही कॅन स्टार्ट अ साँग.. वगैरे. आय वाॅज आॅन द टाॅप आॅफ द वर्ल्ड! तसे आमचे फाॅर्मल प्रपोझ वगैरे झाले नव्हते पण त्या षण्मुखानंदातील नाटकासारखे व्हावे की नाही? न बोलता गोष्टी कळाव्यात की नाही? व्हाय डू वुई नीड टू पुट एव्हरीथिंग इन वर्डस? काही असो, आय केम बॅक हॅपिली. ममी पपा अजून परत आले नव्हते. सो माय गोइंग आऊट वाॅजन्ट रेकाॅर्डेड! ममा अस्थानांकडे जाणार म्हटली तेव्हा आय हॅड अ डाऊट.. परत तो केतनचा विषय तर नाही येणार? इज पपा'स माइंड अगेन वर्किंग ओव्हरटाइम? एनिथिंग इज पाॅसिबल. पण त्याचवेळी मला विदाऊट मच क्वेश्चनिंग जायला मिळणार म्हणून आय वाॅज थ्यँकफूल टू अस्थानाज! आधीच रिझल्ट त्यात अख्खिबरोबर वेळ घालवायला मिळाला त्यामुळे आज मैं उपर आसमां नीचे असली अवस्था! अख्खि ड्राइव्हस मी क्रेझी! मी गात होते मनातल्या मनात.. एव्हरी नाइट इन माय ड्रीम्स.. आय सी यू.. आय फिल यू.. दॅट इज हाऊ आय नो यू गो आॅन..

आजूबाजूला स्वप्नांची दुनिया असेल नि स्वप्नातच राहण्याची सवय झाली असेल तर कधी ना कधी सत्यात यावेच लागते.. आणि जेवढी ती स्वप्ने रम्य असतील तितका तो धक्का जोरदारच असतो. अगदी आजकालची व्हर्च्युअल रिॲलिटीही व्हर्च्युअलच असते! जगावे ॲक्च्युअल रिॲलिटीतच लागते. आकाशात तरंगणारे विमान जमिनीवर उतरवावे लागतेच. तसेच झाले.. दुपारपर्यंत आकाशातले उंच उडणारे विमान संध्याकाळी धाडकन जमिनीवर धडकले. अपघात अटळ होताच. तो झाला.. थ्यांक्स टू माय पपा..

घरी आले तेव्हा मी एकटीच होते. संध्याकाळी ममा आली परत. पपा हाॅस्पिटलात राउंडला गेले. माझ्याकडे पाहून ममाचा चेहरा थोडा सिरियस झाला..

"व्हाॅट्स द मॅटर माॅम.. जस्ट चिल.."

मी तिचे नाक ओढत म्हणाले.

"बिहेव युवर एज अंकिता.. यु आर ग्रोन अप. विशीतली मुलगी.."

"कमाॅन ममा, एज इज जस्ट अ नंबर! वीस काय नि बावीस काय! अँड यस्टरडे आय वाॅज जस्ट अ डे यंगर! काल तू नाही म्हणालीस, बिहेव युवर एज?"

मम्मी डेफिनेटली लुक्ड डिस्ट्रेस्ड. काहीतरी आहे नि दॅट्स अबाऊट मी.. अँड अस्थानांकडून आल्यावर आहे म्हणजे समथिंग अबाऊट मॅरेज. बट व्हाय शुड ममा बी सो अपसेट?

"हे बघ, उद्या लग्न होऊन सासरी जाशील तिथे अशीच वागशील?"

"उद्या? टुमाॅरो?"

"टेक इट सिरियसली.."

माझा मूड आज खूपच चांगला होता. मी सिरियस फेस करून बसले..

"लिसन अंकिता. केअरफुली. तुझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.. आणि आन्सर माय क्वेश्चन्स करेक्टली. टाळाटाळी नि उडवाउडवी नको.."

"व्हाॅट्स द उडवाउडवी?"

"डोन्ट अव्हाॅईड आन्सर्स. लक्षात ठेव युवर पेरेंटस आर आॅलवेज युवर वेल विशर्स. आणि युवर ममा इज आॅलवेज बाय युवर साईड.."

"ममा.. व्हाय आर यू सो सिरीयस?"

"सिरीयस नाही तर काय? युवर पपा विल सुन फिक्स अप युवर मॅरेज.. अस्थानाज सन.."

"काय?"

"म्हणून म्हटले बी सिरियस.."

"बट माॅम आय डोन्ट वाँट धिस मॅरेज बिझिनेस नाऊ.."

"हे बघ, तुला माहिती नाही मला काय काय माहिती आहे ते.. तुला लग्न आता करायला कोणीच सांगणार नाही. फक्त एंगेजमेंट करायला सांगतील. मग?"

"पण ममा.."

"हे बघ, मला त्या केईएममधल्या मुलाबद्दल नीट काय ते सांग.."

"तसं काही नाही ममा.."

"हे बघ, तू आता सांगशील, दॅट्स द लास्ट वर्ड फाॅर मी. नाही म्हणतेस तर ठीक. मग केतन शुड बी अ गुड आॅप्शन.."

"ममा तसं नाही.. पण.."

"पण काय?"

"आज नाही.. उद्या असू शकते ना?"

"काय?"

"काही नाही.. पण नो केतन अस्थाना. म्हणजे तो चांगला आहे, बट वन डझन्ट मॅरी एव्हरी गुड बाॅय वन कम्स अक्राॅस!"

"सी आय नो धिज थिंग्स.. सांगू? अखिलेश साळवी. वय वीस, सन आॅफ अ मिल वर्कर, आई गृहिणी पण लोणची वगैरे बनवून विकते, लोअर परेलमध्ये वन रूम किचन.. माणसं खूप चांगली, सज्जन पण लोअर मिडल क्लास. अखिलेश खूप हुशार आणि मेहनती. सरस्वती विद्या मंदीर शाळेतून दहावीत पहिला. मेरीटवर जीएसमेडिकलला ॲडमिशन.. तू त्याला भेटलीस त्यानंतर दर रविवारी तुम्ही सायकलिंगच्या निमित्ताने भेटता.. ही इज अ व्हेरी गुड बाॅय.. तो तुला आवडतो म्हणून तू गाडी वापरणे सोडून दिलेय. आजवर कधी नव्हे ती तू फक्त बसने ट्रॅव्हल करतेस.. दॅट्स युवर प्रिपरेशन फाॅर फ्युचर.."

माझा आ वासला होता. ममा नोज सो मेनी थिंग्स? आणि कधीपासून?

"अजून सांगू? खोटं आहे यातलं काही तर सांग.."

"नाही ममा.."

"हे बघ दे आर नाॅट रिअली पुअर.. लोअर मिडलक्लास. बट युवर डॅडी विल नेव्हर ॲग्री.."

"ममा.. बट.." मी रडवेली झालेले.

"हे बघ, अंकिता.. मुलीला नवरा चांगला हवा. पपा'ज फिलिंग्स आर नाॅट राँग.."

"मम्मी तू पण.."

"पुढे ऐक.. पण आयॅम आॅन माय डाॅटर्स साईड, आॅलवेज. मी सुरेन्द्रशी भांडेन. काहीही करेन.. रिमेंबर आय ॲम विथ यू. पण कदाचित तुझ्या डॅडींसमोर बोलताना मी वेगळे काही बोलेन. दॅट इज अ स्ट्रॅटेजी. पपांना थोडे गाफील ठेवावेच लागेल. नाहीतर ही कॅन डू एनिथिंग टू ब्रेक युवर अलायन्स विथ अखिलेश.. त्यामुळे मी सध्या पपांच्या साइडने बोलेन. बट रिमेंबर. स्ट्रॅटेजी.."

"सिमिलर टू व्हाॅट यू अप्लाइड फाॅर मी?"

"यस, बेटा, आय हॅड टू. तुझ्यासाठी मला करावेच लागले. मला तुझ्या चाॅइसवर विश्वास आहे. ही दुनिया खूप चांगल्या लोकांनी भरलेली आहे. पण प्राॅब्लेम कुठे होतो ना, कोण चांगले कोण वाईट आपल्याला ठरवणे कठीण पडते. नव्वद टक्के चांगले लोक दहा टक्के वाईट लोकांमुळे सफर होतात.. तेव्हा मला साळवींची माहिती काढावीच लागली. त्यात गरीबी नि श्रीमंती डझन्ट मॅटर फाॅर मी. माणूस आतून चांगला असेल तर तो खरा श्रीमंत. अखिलेश मला ही आवडलाय. आवडतो. कुठे पाहिलाय त्याला विचारशील तर काॅलेजमागच्या ग्राउंडमध्ये, सायकलिंगला जातेस तू तिकडे.. षण्मुखानंदच्या नाटकाला आलेले मी नि आपल्या काॅलेजच्या नाटकालाही.. धिस बाॅय इज प्राॅमिसींग. फक्त सुरेन्द्रला तेवढेच पुरेसे ठरणार नाही. बट आय ॲम विथ यू. लकीली युवर डॅडी इज नाॅट हिअर नाऊ. म्हणून तुला सांगून ठेवते.. यू नीड टू बी केअरफुल. मनाविरूद्ध, सगळे विसरून यू कान्ट बी हॅपी विथ एनीबडी एल्स. आणि वुई फिमेल्स माइंड्स आर सच, धिज मेन कान्ट अडरस्टँड. त्यांच्या मोटिव्ह्सवर अविश्वास नाही पण तरीही आपले निर्णय आपल्याला आपल्या हृदयावर विसंबूनच घ्यावे लागतात.."

ममा बोलत होती. मला क्षणाक्षणाला टेन्शन येत होते. टू स्टँड अगेंस्ट डॅडी इज डिफिकल्ट. बट माय माॅम इज ग्रेट. तिचे हार्ट माझ्यासाठीच धडकते हे खरेच.. पण तिने इतकी माहिती कशी काय काढली असेल? आणि इतके सारे माहिती असूनही ती गप्प का राहिली असेल?

 

रात्री पपा घरी आले. मी थोडीसी चोरट्यासारखी होते.. उगाच काही बोलायला लागायला नको. व्हाॅट बेस्ट दॅन स्टडीज फाॅर दिस? मेडिकलच्या अभ्यासाला तसा अंत नाहीच. त्यामुळे कोणीच मी खूप अभ्यास करतेय म्हणू शकणार नाही! रात्री पपा नि मम्मी बोलत बसलेले.. मला ऐकू येत होते, ममा ती स्ट्रॅटेजी फाॅलो करत होती..

"सुरेन्द्र, केतन चांगला आहे. मला आवडला. घरदार चांगलेय.. मी अंकिताला बोललेय.."

"मग? तिला आवडेलच तो.."

"आवडेल.. पण असं एकाएकी कुणी मुलीला सांगतं का.. बाई तो दिसतोय ना तो तुझा नवरा. आवडला ना तुला? घाल माळ! थोडा वेळ द्यावा लागतो. तरूण मुलं आहेत. गिव्ह देम टाइम. बाकी मी तिला सगळे समजावून सांगितलंच आहे.."

"चांगलं केलंस. मला ठाऊक आहे तू हे नीट करशीलच. एकदा अंकिता योग्य जागी गेली की आपली चिंता मिटली.."

"खरंय. योग्य जागीच पडायला हवी मुलगी.. अजून आईबापांस काय हवे असते? आपल्या वेळी नाही, माझ्या आईने केवढे सांभाळून घेतलेले?"

ममा रियल स्ट्रॅटेजिस्ट असणार. तिच्या बोलण्यात योग्य जागी शब्द महत्वाचा.. मग आपल्यावेळची आठवण करून देणं! एक्झॅक्टली हिस्टरी रिपिटिंग इटसेल्फ. ममा वाॅज वेल आॅफ. पपा'स फॅमिली बिकेम पुअर फाॅलोइंग हेवी लाॅसेस इन बिझिनेस. त्यांच्यापैकी फक्त पपाच शिकले. डाॅक्टर झाले. एका जिद्दीने ही बिकेम रिच. एक होतं, पपांनी कधी चुकीची प्रॅक्टिस केली नाही. सन्मार्गाने पैसा कमावला. अजूनही ही इज अर्निंग. ही इज प्राउड आॅफ ओन अचिव्हमेंट्स. राइटली सो.. फक्त ड्युरिंग आॅल धिस ही हॅज बिकम अ बिट बीटर अबाऊट पाॅव्हर्टी! अँड नो अमाउंट आॅफ रिझनिंग कॅन कन्व्हिन्स हिम!

रात्री एकटीच बसलेले.. मला एकाएकी रडू फुटलं. अख्खिची आठवण आली. आय बॅडली वाँटेड हिम बाय माय साइड.. वाटलं आताच उठून त्याच्याकडे जावं. त्याला सगळं सांगितलं की बरं वाटेल. अजून तर पपांना त्याच्याबद्दल काही ठाऊक नाहीये. पुढे काय? कसे होणार? एकदा आम्ही असेच बसने चाललेलो, तेव्हा कुठला तरी मोर्चा चाललेला.. त्यातला हा नारा आठवला.. 'संघर्ष हमारा नारा है..' म्हटले, अंकिता, बी रेडी. संघर्षास तयार हो.. शेवटी प्रेमाची किंमत द्यावी लागणारच.. एकीकडे अख्खिची आठवण.. दुसरीकडे आय विल इन्व्हेरिएबली एन्ड अप हर्टिंग माय पपा.. दोन्हींमुळे मला एकाच वेळी रडू यायला लागलं. वाटलं उद्याच केईएम मध्ये जाऊन अख्खिला अख्खाच्या अख्खा हलवावे.. नि काय ते एकदाचे विचारून टाकावे..

बट आय कुडन्ट डू मच. पुढचे दोन तीन दिवस प्रॅक्टिकल्स नि महत्वाची लेक्चर्स होती. आणि काही झालं तरी नो काँप्रोमाइज विथ स्टडीज.. रडता रडता कधीतरी मी झोपले. उठले तेव्हा ममा वाॅज स्लिपिंग नेक्स्ट टू मी. मी लहान मुलीसारखी तिला चिटकून परत झोपी गेले.