अंकिलेश - एक प्रेमकथा - 23 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 23

२३

@ डाॅ.अरूणा गावस्कर

माझी अंकिता घरी आली तेव्हा मी खूप आनंदात होते. मुग्धाचा फोन आला.. अंकिता केव्हा न केव्हा केईएम मध्ये अखिलेशला भेटायला जाणार हा माझा अंदाज खराच होता. मुग्धाला सांगूनच ठेवलेलं तसं. तसा सगळ्यांचा ट्रॅक ठेवणं कठीण पण त्या दिवशी क्रिकेटची मॅच, तिथे अंकिता येण्याची शक्यता आहे म्हणून जास्त लक्ष ठेव म्हटलेलं. आणि मुग्धाला ती ग्राउंडवर पहिल्याच लायनीत सापडली! आणि मॅच नंतर अखिलेशने तिला अंगठी घालून सर्वांसमोर केलेले प्रपोझ! त्याआधी अंकिता किती रडलेली वगैरे वृत्तांत नंतर मला अखिलेशने सांगितलाच.. नंतर म्हणजे..

मुग्धाला सांगून मी अखिलेशला घरी भेटायला बोलावले. सुरेंद्रची काॅन्फरन्स होती, त्यामुळे तो नसल्याने सर्व लायनी क्लियर होत्या! आदल्या रात्री अंकिताशी गप्पा झाल्या. शी वाॅज आॅन क्लाऊड नाईन! म्हटले, बाई एकूण सारे सोपे नाही. बॅकग्राउंड्स वेगळ्या असल्या की मुलींना ॲडजस्ट करायला सोपे नसते. पण मनाची तयारी असेल तर सारे काही होऊ शकते.. तशी अंकिता तयारी करत होतीच. म्हणजे गाडी वापरणे जवळजवळ बंद झालेलं. बसने प्रवास. कित्येक दिवसांपासून एसी लावणे बंद. ती बोलली नव्हती मला, पण मी ते नोटीस केलेलंच. आधी अर्धा तास जरी एसी शिवाय रहायला लागलं तर कुडकुड करणारी अंकिता आता स्वत:च एसी शिवाय राहतेय. हल्ली तिचे कपडे खरेदी करणे अगदीच कमी झालेले. तशी ती मनाची तयारी करतेय म्हणावं तर मला तीच म्हणाली,"ममा मनाची तयारी आधीच झालीय. आता फक्त वरवरचे डिटेल्स ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतेय.." पण पपांचं तिला फार टेन्शन. पपांची लाडकी एकुलती एक, काही नाही तरी सुरेन्द्रला ती दुखावणारच होती.. तिला समजावले ही,"बेटा एकदा तू सुखासमाधानात दिसलीस की पपाला तरी दुसरे काय हवे असणार? त्याने केलेले कष्ट नि पाहिलेले दिवस तुला दिसू नयेत एवढीच मागणी आहे त्याची. थोडा टोकाचा विचार करतोय तो.. पण शेवटी तो तुझ्या आनंदाच्या आड येणार नाही.."

"म्हणजे? पपा विल ॲग्री?"

"तू नीट ऐकलं नाहीस.. 'शेवटी' पपा ऐकणार.. त्याआधी.. ही विल नाॅट लिव्ह एनी स्टोन अनटर्नड्.."

अखिलेश मला आवडला. चांगला आहे मुलगा. गोरापान. उंच. वेल बिहेव्ड. आणि अर्थातच हुशार ही. अंकिता तशी सावळी. गोरी बायको हवी च्या जमान्यात गोऱ्या मुलाने तशी अपेक्षा करणे खरेतर चूक म्हणू नये. पण पुढे एकदा तोच म्हणालेला, दिसणं आपल्या हाती नाही, असणं हाती आहे. वरलिया रंगा भुलण्याची भूल का करावी? हे खूप नंतरचे.. पण तोच म्हणालेला.

अखिलेशला सर्जरी करायचेय पोस्ट ग्रॅज्युएशन. नंतर काहीतरी सुपर स्पेशलायझेशन.

"सर्जिकल ब्रांचेसमध्ये प्रायव्हेट मध्ये सेटल होणं कठीण. एवढा सेट अप तो ही मुंबईत.. अशक्य! माय ड्रीम इज टू बी इन केईएम सर्जरी.."

"पण टेल मी समथिंग.. हंड्रेड अँड वन वेज टू प्रपोझ टू द गर्ल.. हे पुस्तक वाचलंयस तू?"

मी कशाबद्दल बोलतेय हे समजूनही न समजल्यासारखा तो बावचळला..

"नाही मॅडम.. म्हणजे मला असं पुस्तक आहे हे ठाऊक नाही.."

"नो, वन मोअर नीडस टू बी ॲडेड इन द लिस्ट.. नंबर हंड्रेड अँट टू!"

यावर तो चक्क लाजला..

"ते होय..! पण त्यासाठी अंकिताच जबाबदार आहे. शी ब्लॅकमेल्ड मी.."

"अखिलेश.. तू.. आय विल किल यू.."

"नो.. डोन्ट टेक इट पर्सनली. आय डिड दॅट टू सेव्ह ह्युमॅनिटी.. सेव्ह द ग्रेट जीएसमेडिकल अँड केईएम हाॅस्पिटल.. आय डिड ग्रेट सर्व्हिस टू मॅनकाइंड.. इतकी की आता मी डाॅक्टर नाही झालो तरी चालेल.."

"दॅट्स अ रिडल.. अंकिता हे कशाबद्दल आहे?"

"ममा त्याची ही सवयच आहे.. तो मूळ टाॅपिकच्या आधी इतका इंट्रो देतो.. त्याच्या नाटकात पण तो असली नाटकं करतो.. बाय द वे ममा, ही राईट्स.. पण फक्त मराथीतच.."

"दॅट्स ग्रेट.. पण व्हाॅट अबाऊट दॅट सेव्हिंग ह्युम्यानिटी.."

"मॅडम, अंकिता हॅड अ क्रायसिस.. म्हणजे शी क्राइड सो मच दॅट डे.. मला वाटलं आता त्या पाण्यात आमचं काॅलेज वाहून जाणार. समहाऊ आय नीडेड टू सेव्ह इट.. सो आय सॅक्रिफाइस्ड मायसेल्फ.."

अंकिता खोट्या गुश्श्याने नि खरेतर कौतुकाने त्याच्याकडे बघत होती. अखिलेशला अशा कथा रचायची सवय आहे.. ही राइट्स वेल. म्हणजे नंतर मी त्याची एक दोन नाटकं वाचली, त्याला दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला अचूक येतं.. तो म्हणतो, एकदा एवढं आलं की रायटिंग इज व्हेरी इझी!

"व्हाॅट अबाऊट युवर पेरेंट्स.. त्यांना मान्य होईल?"

"मॅडम, माझी आई खूपच साधी आहे. तिला मुलींची हौस. पण झालो मी! अगदी लहानपणी मला ती फ्राॅकबिक घालायची. तिला घरी आयती मुलगी मिळाली तर ती माझ्याकडे बघायचे सोडून देईल.. आणि बाबांचं काय? त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच मला जास्त काळजीने वागायला लागतं. उगाच चूक होऊन त्यांचा विश्वास नको गमवायला.. खरंतर मला उलट अंकिताचीच काळजी.. आमचं घर लहान, खाण्यापिण्याची चिंता नाही पण कधी मनात आलं म्हणून उठून खर्च करू नाही शकत. लक्झरीज आर नाॅट पाॅसिबल. मी तिला खूप आधीपासून सांगितलंय हे.. नि पुढे पण मी काही वेल्दी डाॅक्टर होईन असं नाही.. पण अंकिता ऐकत नाही.. त्यात परत त्या दिवशी अश्रुपात.."

एकूण आय वाॅज हॅपी फाॅर माय गर्ल. इट्स नाॅट इझी टू गेट अ गुड मॅच!

 

*****

@ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर

असं म्हणतात, व्हेन लाइफ गिव्हस यू लेमन्स, मेक अ लेमोनेड! पण कसले लेमन नि कसले काय! आय टेल यू व्हेन लाइफ गिव्हस यू जर्कस्.. यू बिकम जर्की! रियालिटी इज, मोअर दॅन लेमन्स लाईफ गिव्हस् यू जर्कस! पंचावन्न वर्षांत मी हे खूप वेळा अनुभवलंय. कधी जोर का धक्का जोरसे लागतो तर कधी जोर का धक्का धीरेसे. पण धक्का लागतोच.. असा की आपण संसार सागरात गटांगळ्या खातोय की काय वाटायला लागतं. माझे गुरूजी असले काही प्रवचनात म्हणत असतात.. असो. तर झालेय कसे ना.. त्याआधी धक्का लागण्याआधीची कंडिशन माहिती हवी. म्हणजे पोस्ट धक्का किती खोलवर गटांगळ्या खाव्या लागल्या ते माहिती व्हावे!

डाॅ.अस्थानांकडून आलो तेव्हा मी खुशीत होतो. केतन इज अ गुड बाॅय. अमेरिकेत जाईल. डाॅक्टर म्हणूनही मोठा होईल. वुई हॅड स्टार्टेड करियर फ्राॅम अ स्क्रॅच. आता पोरांना त्याच्यावर भरारी घेऊ देत. माझी प्रॅक्टिस एवढी की मला इकडे तिकडे बघायला फुरसत नाही. तरीही दोन गोष्टी मी कधीच टाळल्या नाहीत, एक अंडरग्रॅड्युएट नि पोस्ट ग्रॅड्युएटना शिकवणे.. आणि दुसरे, नेव्हर एव्हर डू अनएथिकल प्रॅक्टिस. आय वाँट मनी, बट ॲब्सोल्यूटली राईट वे! माझ्या पोरीसमोर मला कधी मी चुकीचे काही केले याची फिलिंग यायला नको. टीचिंग इज इन माय ब्लड. पोरांना शिकवताना वन बिकम्स यंगर. आणि जेवढे शिकवत जाऊ आपल्यालाही नवीन कळत जातं. मेडिकल फिल्ड इज सो व्हास्ट.. आणि इतके डेव्हलपिंग.. त्याच्याशी जोडून घेणे.. इट्स अ स्ट्रेस पण इट्स अ पार्ट आॅफ बिइंग अ मेडिकल प्रॅक्टिशनर. उगाच नाही मेडिकल प्रोफेशनल्स डाय ॲट मच यंगर एज दॅन अदर्स.

एनी वे.. टू टेल अबाऊट अस्थानाज.. मला आधी वाटलेलं अरूणाला हे आवडत नाही की काय. ती शांत होती.. पण घरी आल्यावर म्हणाली की तिला ही केतन पसंत आहे.. अंकिताचं काय? लहान आहे नि माझ्या शब्दाबाहेर थोडीच आहे ती? आय वाॅज पार्टली रिलिव्हड. म्हणजे डाॅ. अस्थाना हॅड प्रिन्सिपली ॲग्रीड. केतनचा फक्त होकार.. त्याच्या एक्झाम नंतर. समजू शकत होतो मी. फायनल एक्झाम आॅफ एमबीबीएस.. इट्स नाॅट अ जोक. सो लेट हिम टेक हिज ओन टाइम..

अँड टाइम ही डिडन्ट टेक मच! त्यानंतर थोडेच दिवस झाले असतील. डेली नऊ वाजता मी हाॅस्पिटल कँपसमध्ये पोहोचतो. नऊ ते एक आमचा आॅनररी लोकांचा टाइम. पहिले स्टाफ रूम.. मग वाॅर्ड. गेल्या पंचवीस वर्षात यात बदल नाही. मी गाडी पार्किंग करतो त्याच्या बाजूला एक कट्टा आहे. लागोपाठ तीन दिवस तिथे कोण दिसावे? आजवर कधी न पाहिलेले दृश्य.. ते ही माझ्या डोळ्यांसमोर. त्या कट्ट्यावर केतन होता.. त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर! हातात हात घालून दोघे बसलेले. आपल्याच दुनियेत मग्न. एकाएकी मला ते गाणं आठवलं, मेरा सुंदर सपना बीत गया! जसं काही माझाच हार्ट ब्रेक झालेला. आता टर्म संपल्यावर डाॅक्टर अस्थाना काय सांगणार? आणि काहीही सांगितले तरी मी त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार? एक पत्ता कटाप.. भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात तसे झाले.. आता काय? प्लॅन बी? की सी? कदाचित ई.. एफ.. जी पण?

मला नंतर अंकिताचा राग ही आला. मी दोघांना इंट्रोड्यूस करून दिलेलं त्यालाच सहा आठ महिने होऊन गेले.. हिने काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला नको? पण धिस इजन्ट राईट. मीच तेव्हा ते सगळं फिक्स करून ठेवायला हवं होतं? चांगली मुलं पटकन बुक होतात.. आपल्यालाच लक्ष ठेवून रहायला लागतं. आता कोणाला शोधू मी? विचार चक्र सुरू ठेवायला हवे. आणि माहितीतला मुलगा नि कुटुंब असलं की एक सिक्युरिटी राहते. पोटची पोरगी कोणाला द्यायची म्हणजे काय सोपे काम आहे की काय?

काही दिवसातच मला डाॅक्टर बेर्डेंची आठवण झाली.. नाही, नायदर वाॅज ही अ कँडिडेट, नाॅर डिड ही हॅव अ सन. आमच्या मेडिकल असोसिएशन मध्ये ते मॅरेज ब्युरो चालवतात.. एक्स्ल्युझिवली फाॅर मेंबर्स! त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी झालेला त्रास पाहून त्यांनी ही सर्व्हिस सुरू केलेली.. तिकडे लवकरात लवकर एनरोल करणे.. अरूणाला सांगावे लागेल..