अंकिलेश - एक प्रेमकथा - 25 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 25

२५

@ अखिलेश

उस प्रपोझलकी आवाज बहुत दिनोंतक गुंजती रही कँपस मे! त्या' प्रपोझल नंतर मी काॅलेजातला जणू हीरो झालो. मला अशा प्रसिद्धी झोताची सवय तर नव्हतीच, आवड तर मुळीच नव्हती. आजही नाही. इकडे मुलं दिलका हाल कसा सांगावा याबद्दल डोकेफोड करत असताना मी असे काही रोमँटिक करावे.. काॅलेजातली पोरं वेअर इंप्रेस्ड! दोन चार पोरांनी तर मी कन्सल्टिंग प्रपोझालाॅजिस्ट असल्यासारखे मला नवनवीन पद्धती सुचवण्याबद्दल विचारले! मी त्यांना काय सांगणार होतो? मी त्या दिवशी जे केले.. खरेतर माझ्याकडून त्या दिवशी जे झाले.. ते न ठरवता अगदी स्पर आॅफ द मोमेंट झालेले. अंकिताला त्या दिवशी दिलेले प्राॅमिस.. आणि तिला त्या टेन्शनमधून बाहेर काढायला काहीतरी असेच करायला हवे होते! ते आपोआप झाले. नंतर मला अंकिताने केतन अस्थाना बरोबरची ती हकिकत सांगितली.. त्याने बसल्या बसल्या त्याच्या मैत्रिणीला कसे प्रपोझ केले त्याची!

खूप दिवसांनी पुढे मी एकदा अंकिताला म्हटलेले,"आय हॅव ॲन आयडिया! आपल्याकडे लोक पेपर प्रेझेंट करतात ना.. तसा आपण पेपर लिहूयात.."

"कशावर?"

"जगात इतकी असंख्य लव्ह मॅरेजेस होत असतात.. ती काय प्रपोझ केल्या शिवाय?"

"मग?"

"अगं मागणी तरच पुरवठा!"

"नाऊ व्हाॅट डझ धिज मीन?"

"मागणी म्हणजे प्रपोझल डियर! ते राहू देत.. पण मला वाटतं एकदा सर्व 'मेथड्स युझ्ड टू प्रपोझ'चा डेटा गोळा करावा.."

"गुड आयडिया!"

"आणि वुई विल प्रेझेंट द डेटा.. इन जर्नल आॅफ लव्हाॅलाॅजी!"

"तुला दुसरे काही काम नाही वाटतं.."

"आहे.. दुसरा स्टडी.. कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस बिटविन सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल प्रपोझिंग! मग त्यात व्हेरिएबल्स.. प्रोफाइल्स आॅफ गर्ल अँड अ बाॅय.. पिरियड आॅफ कोर्टशीप, वे आॅफ प्रपोझल अँड डिस्पोझल .."

"चुप रे.."

"चुप काय! अगं पेपर प्रेझेंट नि पब्लिश केला तर त्याचे एक्स्ट्रा क्रेडिट मिळतेय.."

"थ्यांक्स.. पण तुझ्यामुळे मी नायराईट केईएममध्ये फेमस झालीय!"

हे खरंच होते! अंकिता गावस्कर वाॅज लाइक अ हीराॅईन इन केईएम! त्यानंतर आमच्या काॅलेजात एक लेक्चर सिरीज सुरू झाली. मॅरॅथाॅन क्लिनिक्स बाय डाॅ.केतन शहा! ओरिजिनल ग्रांट मेडिकल स्टुडंट. पोस्ट ग्रॅड, मेडिसीनची लेक्चर्स घ्यायचा, आठवड्यात एकदा किंवा दोनदा.. बारा तास सलग! अंकिता त्या लेक्चर्सना यायची तर सगळी आमची दोस्त मंडळी तिला माझ्याजवळ जागा करून द्यायची. थर्ड इयरच्या अभ्यासामुळे आम्हाला तसा वेळ कमीच मिळायचा, त्यामुळे ही लेक्चर्स उपयोगी पडायची. बारा तास एकत्र! त्यातही अंकिता माझ्यासाठी काहीतरी डबा घेऊन यायची. तिची ही सवयच आहे तेव्हापासूनची. कधीच 'खाऊ' न घेता ती कुठे जात नाही!

कैलास आणि कंपूला तर त्या दिवसानंतर एकच विषय होता.. अखिलेश'स प्रपोझल! त्यांना मी म्हणालो ही,"बाबांनो, रिलॅक्स, माझ्याहून तुम्ही लोकं जास्त एक्सायटेड दिसताय.. पण एक लक्षात घ्या.. हे सारे आॅपरेशन झाल्यावर शेवटी घालायच्या टाक्यांसारखे आहे!"

"आॅपरेशन? आॅपरेशन प्रपोझल?"

"नो. समजा, देअर इज अ पेशंट विथ अपेंडिसायटीस. त्याचे पोट उघडून अपेंडिक्स उडवले.. सगळे काही ठीक ठाक केले.. शेवटी राहते काय?"

"राहिल कसे? अपेंडिक्स उडवशील की! अपेंडिक्स इज अ सर्जन्स फ्रेंड! ते पाहून हात शिवशिवले नाहीत तर त्या सर्जनची डिग्री काढून घेतात म्हणे!"

"नो. मी सांगतोय ते हे आहे, की शेवटी ते पोटाचे लेयर्स शिवल्याशिवाय आॅपरेशन कम्प्लिट होत नाही!"

"म्हणजे?"

"वाघाचे पंजे! अरे, मला माहितीय अंकिता नाही म्हणणार नाहीये.. एखादे पत्र शेवटी सही केल्यावरच पूर्ण होते.. पण वरचा मजकूर नसेल तर पत्रास अर्थ काय उरतो? तेव्हा मजकूर लिहून झालेला.. शेवटी फक्त सही बाकी होती. ती केली.. ओन्ली आफ्टर आय प्रपोझ धिस आॅपरेशन इन ओव्हर!"

"व्हाॅट अ सर्जन्स लाॅजिक!"

पण हे खोटं नव्हतं. पुढे तुम्ही खुशाल एकमेकांना टेकन फाॅर ग्रांटेड सारखे वागा, पण ही फाॅर्मल परमिशन कान्ट बी टेकन फाॅर ग्रांटेड! किंबहुना पुढे एकमेकांना गृहित धरण्यासाठी ह्या एका परमिशनची गरज आहेच! माझ्या प्रपोझल नाटकाची नवी आवृत्ती यायलाच हवी!

ती मॅरॅथाॅन लेक्चर्स सुरू झाली नि आमचे सायकलिंग बंद झाले. एकतर आठवड्यात दोनदा भेट व्हायचीच आणि अभ्यासाच्या बोज्याखाली सकाळी तीन चार तास रविवारी मिळणार कसे? पुढे रविवारी आम्ही नऊ ते चार आमच्या लायब्ररीत बसायला लागलो. भेट तर व्हायचीच.. पण डोक्यात मात्र अभ्यासाचेच विचार जास्त असायचे. चारला लायब्ररी बंद झाली की अंकिताला बसमधून घरी सोडता सोडता थोड्या गप्पा व्हायच्या.

एकदा ती म्हणालेली,"मी पण सर्जरी करू? नाॅट मेनी गर्ल्स इन सर्जरी!"

"तुला जे आवडेल ते! माझे नक्की आहे.."

"मी नाहीतर फार्म्याकाॅलाॅजी करते. लाइक ममा.."

"व्हाॅटेव्हर फॅसिनेट्स यू!"

पुढे अंकिताने फार्म्याकमध्येच पीजी केले.. अलीकडे म्हणाली,"आपण दोघेही क्लिनिकल ब्रांचमध्ये असतो तर घराकडे कोण बघणार? मला आवडायचे फार्म्याकाॅलाॅजी.. काॅलेजमधले टीचिंग.. आणि नो इमर्जन्सीज.." आज मी इमर्जन्सीसाठी गेलो की रात्रभर घरी परतत नाही. अंकिताच घरचा शो सांभाळते. किती दूरदृष्टीने तिने सगळे ॲडजस्ट केले असेल?

थर्ड इयरच्या दुसऱ्या टर्मनंतर पुस्तकातून डोके बाहेर काढायलाही वेळ नसे. पण फर्स्ट टर्म मध्ये आमची आजोबा डोंगराची हाईक आठवते. रात्रभरची.

हाईकची नोटीस लागली तेव्हा मी आधीच स्वप्न पाहात होतो.. अंकिता नि मी आजोबाचा डोंगर चढतोय! पण ही नाजुक बाला अशा टफ गोष्टींसाठी राजी होईल. किंवा तिच्या घरून परवानगी मिळेल.. आणि आमच्या काॅलेजच्या ट्रेकला दुसऱ्या काॅलेजातून कुणी येऊ शकेल? शेवटचा प्रश्न सोपा होता. तो चटदिशी सुटला. अंकिताला म्हटले,"रामासाठी सीता चौदा वर्षे वनवासात जायला तयार झाली.. तू एक डोंगर चढू नाही शकणार?"

अंकिता हुशार, म्हणाली,"एक तर त्या आधी सीता आणि राम, दोघांचं लग्न झालेलं. सेकंडली.. सीता वाॅज ओके बिकाॅज इट वाॅज फाॅर राम.. व्हाॅट अबाऊट मी?"

थोडक्यात आम्ही आता चांगलेच एकमेकांना ओळखू लागले होतो.. अंकिता चक्क माझी टांग खेचायला लागली होती! मला वाटतं मुलीच्या आयुष्यातल्या ह्या फेजेस असतात.. ॲडमायर.. ॲडोर.. फाइंड फाॅल्टस्.. क्रिटिसाईझ.. म्हणजे तिला कोणी आवडायला लागला की तो मिळेपर्यंत त्याला ॲडोर करायचे, स्वप्न पहायची.. तो मिळाला की त्याचे गुणगान करावे.. न थकता. इतके की त्याचे दोष दिसू नयेत.. हळू हळू ते गुण आणि दोषांचे मिश्रण दिसायला लागावेत.. नि मग गर्लफ्रेंडची बायको झाली की त्याचे दोषच फक्त दिसावेत.. गुणांबद्दल बोलणे टाळावे! मुलीची प्रेयसी नि प्रेयसीची बायको होणे ह्यात मुली किती बदलत जात असतील! तर, शेवटी अंकिता तयार झालीच. खरेतर तिला यायचे असणार.. पण थोडा भाव खाल्ला तर माझ्याकडून तिची मनधरणी होणार.. त्याचेच कदाचित तिला अप्रूप असावे!

त्या ट्रेकवर आम्ही हातात हात घालून चाललो. खूप गप्पा मारल्या. पुढच्या आयुष्याची स्वप्ने रंगवली.. तिला ठाऊक होते की डाॅ.गावस्कर इज गोईंग टू बी अंगेस्ट द मॅरेज. त्यांना दुखवायच्या कल्पनेनेही ती दु:खी होत होती..

"ही हॅज गाॅन टू देल्ही. एक्सर्नल एक्झामिनर. म्हणून मी येऊ शकले. अदरवाईज..मुश्किल."

ती म्हणालेली.

"आणि थ्यांक्स टू युवर मम्मी.. मॅडमनी परवानगी दिली नसती तर? बट आय ॲश्युअर्ड हर.. आय विल टेक केअर आॅफ यू! म्हटले तू दमलीस तर तिला कडेवर घेऊन येईन.. तुला ट्रेन मध्ये चढवेन.."

"वा रे! ॲज इफ आयॅम अ स्माॅल गर्ल! पण खरंच, मी कित्येक वर्षांनी आज ट्रेननी आलेय.."

"इंडियन रेल्वेचे आता दिवस सुधारणार! बेस्ट बस इज आॅलरेडी इन प्राॅफिट.. बिकाॅझ आॅफ यू.."

"नो! ती तुझ्यामुळे! मी काही कारणाने येते बसने, तू तर काही कारण नसताना उगाच टू अँड फ्रो जात येत असतो.."

"काही कारण नसताना? मॅडम, द कारण इज हिअर, सिटींग नेक्स्ट टू मी!"

आजोबाच्या डोंगरावर एके ठिकाणी रात्री आम्ही थांबलो होतो.. दहा लोकं आम्ही.. अंकिताने तिकडे शेकोटीवर शिजवलेली खिचडी.. सगळ्यांनी बोटे चाखून खाल्लेली. मोठमोठ्या डाॅक्टरची मुलं अगदी भाव खात असतात. जन्मापासून जणू डाॅक्टरकी अंगात भिनल्यासारखे वागतात.. स्वत:ला स्पेशल समजतात.. त्यांच्यापासून सर्वसामान्य मुलं अंतर ठेवूनच असतात. या सर्वांना छेद देणारी अंकिता आमच्या ग्रुपमध्ये पाॅप्युलर झाली तर नवल नव्हते. मी एकदा तिला म्हटले ही,"तुला माहितीय, वुई आर आॅल लो बर्थ वेट बेबीस! वुई म्हणजे तू नाहीस पण.." लो बर्थ वेट म्हणजे आमच्या सारखी साधारण मुले, ज्यांच्याकडे न काँटॅक्ट्स आहेत, ना आमचे आईवडील श्रीमंत आहेत!

थर्ड टर्म आली नि सारेच बदलले.. आता त्यापेक्षा आजोबाच्या डोंगरावर चढणे सोपे.. फायनल म्हणजे सह्याद्रीतला सुळका चढायचा होता. आम्ही दिवस रात्र पुस्तकात तोंडे घालून. रात्री बेरात्री वाॅर्डातली साइड रूम क्लिनिक्स.. चहा पीत, डोळे चोळत मारलेल्या नाइट्स.. जीव तोडून केलेला अभ्यास.. आजूबाजूला काही दिसेल तर! अंकिता वाॅज कुल! तिचा अभ्यास नेहमी तयार असायचा. तिचे विषयाचे ग्रास्पिंगच तसे असणार. मला ती मधून मधून डिफिकल्ट भाग झटपट शिकवून टाकायची, म्हणजे वाचण्यात जास्त वेळ जाऊ नये. प्रॅक्टिकल्स, खास करून मेडिसीन प्रॅक्टिकल्स तिचा हातखंडा होता, शेवटी वन आॅफ द बेस्ट टीचर्स, डाॅ.गावस्करांची मुलगी ती! फायनल परीक्षा झाली.. मेडिसीनला एक्झामिनर म्हणून कोण यावे? तर गावस्कर सर! ही वाॅज व्हेरी काइंड. अंकिताला म्हटले नंतर तर म्हणाली,"बरं झालं ही डझन्ट नो यू.. नाहीतर.."

"नाहीतर काय?"

"काय? अरे ह्या मोठ्या डाॅक्टरांचे इगो मोठे असतात.. त्यांना तू नको असशील तर यू कॅन बी फेल्ड! फक्त मला वाटतं डॅडी विल नेव्हर डू धिस. पण कुणी सांगावं?"

काही असो, माय एक्झाम वाॅज ओके. परीक्षा तर संपली नि आमची पुढची लढाई सुरू झाली!