अंकिलेश - एक प्रेमकथा - 33 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 33

३३

@ अंकिता

दॅट पॅच चेंज्ड एव्हरीथिंग फाॅर मी ओव्हरनाईट. इमॅजिन, पूर्ण स्कीन अशी डिसकलर्ड होणार. वेगवेगळ्या रंगांचे डाग, हातावर तोंडावर.. फाॅर अ यंग गर्ल इमॅजिन द सायकाॅलाॅजिकल ट्राॅमा. अँड आय वाॅज टू गेट मॅरीड..

तो डाग येण्याच्या आदल्याच दिवशी, इट वाॅज माय बर्थ डे. म्हणजे सेलिब्रेशन टाइम. शिवाजी पार्कात फिरणं, मग जिप्सीत पिझ्झा नि शिवाजी मंदिरात नाटक! इट वाॅज अ मराथी ड्रामा. नाव आठवत नाही. द लेडी डेव्हलप्स लेप्रसी. लेप्रसीला इतका स्टिग्मा आहे; शी गेट्स ॲबँडन्ड. तिचे स्वत:चे नातेवाईक तिला ॲक्सेप्ट करत नाहीत. अगदी हर ओन हजबंड. लेप्रसी काही तसा मोठा आजारच नाही. वेळेवर इलाज केला तर पूर्ण बरा होणारा. आपण जे हाताची बोटं वगैरे गेलेले लोक पाहतो, दॅट्स ड्यू टू निग्लेक्ट. अँड इट्स नाॅट दॅट काँटॅजियस आयदर. मग तो स्टिग्मा कुठून आला? आय हॅड रेड समव्हेअर, ट्रान्सपोर्ट मध्ये लेपर्स साठी वेगळे रूल्स आहेत म्हणे. म्हणजे एक पूर्ण बरा होणारा आजार, त्याच्या पेशंट्सना असे ट्रीट केलं जातं? त्या नाटकानंतर आम्ही गप्पा मारत बसलेलो.

मी म्हटले ही,"आय डोन्ट थिंक असे काही होऊ शकते.."

त्यावर अख्खि म्हणाला,"कम आऊट आॅफ युवर आयव्हरी टाॅवर अँड सी द रियालिटी. हे असंच होतं. खूप कमी वेळा असं होत नाही. अनजस्टिफाएबल. पण सोसायटीला कोण समजवणार?"

"बट द लेडी'ज लाईफ इज गाॅन.. फाॅर नो रिझन.."

"हुं. ओन्ली वे आऊट.. एज्युकेटिंग. अवेअरनेस वाढवायला हवा."

"डू यू थिंक दॅटस् इनफ?"

"नाही म्हणजे लोकांना आजाराचं स्वरूप कळलं तर ते अशा लोकांना सहज ॲक्सेप्ट करतीलच असं नाही. पण कुठून तरी सुरूवात व्हायलाच हवी."

"व्हाॅट अबाऊट माइंडसेट आॅफ द पीपल?"

"एव्हरी थिंग रेस्ट्स आॅन दॅट. बघ ना, जेव्हा जास्तीत जास्त सपोर्ट हवा असतो, तेव्हाच तुम्ही आपल्याच माणसाला सोडून देताय? एंपथी हवी.. मग सिंपथी. त्या ऐवजी काय? ॲबंडन?"

"यस. इट्स द एंपथी व्हिच विल चेंज द पिक्चर. नाॅट ओन्ली द नाॅलेज. ह्युमन्स शुड बिकम मोअर ह्युमेन.."

"परफेक्ट. वेल सेड! तू सायकियाट्री का नाही केलंस?"

"ओह गाॅड. टफ. मला माझं फार्म्याकाॅलाॅजीच बरं! पण तुला सांगते ना, जेव्हा सिच्युएशन बिघडते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होते."

"ग्रेट. एक म्हण आहे, असतील शिते तेव्हा जमतील भुते.. म्हणजे तुझ्याकडे लोकांना द्यायला काही आहे तोवर सगळे तुझ्याकडे पाहतील.. अँड ॲज सून ॲज यू आर आॅफ नो युझ.. यू विल बी लोनली. त्यावेळी मग तुझे खरे कोण नि कोण नाही हे समजून येईल. गरजेच्या वेळी मदत नाही केली तर वन कान्ट बिकम अ गुड ह्युमन बिइंग.."

आय टेल यू, धिस वाॅज जस्ट अ डे प्रायर. म्हणजे आदल्या दिवशीच्या बर्थडे सेलिब्रशन नंतर हा उपटलेला डाग. अखिलेशला मी ओळखत होते त्याप्रमाणे ही वुड नाॅट लिव्ह मी जस्ट फाॅर धिस व्हिटिलिगो. खरंतर कुठल्याच कारणासाठी तो सोडणार नाही. त्याने शब्द दिला म्हणजे दिला.. त्या दिवशीच तो म्हणालेला,"अवर्स इज अ ब्युटीफुल रिलेशन डिअर. दो जिस्म मगर एक जान हैं हम.. आजवर गाण्यात ती एक कवी कल्पना वाटायची. पण आता? खरंच वाटतं ते. समवन युवर ओन. स्पेशल ॲंड सगळ्यात महत्वाचे, तुझ्यासाठीच त्याचं हार्ट बीट होतंय.."

"हाऊ रोमँटिक..

"रोमँटिक.. हुं. पार्टली. धिस शुड बी रियालिटी. ॲंड नाॅट अ फँटसी."

"तू इंग्लिश गाणी ऐकतोस?"

"नाही. कळत नाही काही.."

"पण हे ऐक.. कळेल तुला..

देअर इज ओन्ली वन विश आॅन माय माइंड

व्हेन धिस डे इज थ्रू आय होप दॅट आय विल फाइंड

दॅट टुमाॅरो विल बी जस्ट द सेम फाॅर यू अँड मी

आॅल आय नीड विल बी माईन इफ यू आर हिअर.."

"वाॅव! इतकं इंग्रजी कळतं मला..

असं कितीतरी वेळ आम्ही बोलत बसलेलो. तसा अख्खि रोमँटिक खरा. पण तो ॲज अ ह्युमन म्हणून जास्त विचार करणारा. रॅशनल इरॅशनल नि खरे खोटे यात लगेच फरक करणारा. ड्यूटी फर्स्ट म्हणत आपले काम करणारा. आता अख्खि काय करेल? माझे कोडाचे डाग पाहून त्याची रिॲक्शन काय असेल? अर्थातच, इफ आय नो हिम वेल, त्याला फरक नाही पडणार. आणि त्याच्या घरचे? मी कित्येकदा ऐकलंय, ही इज सो फेअर.. मी अशी, डार्कर साइड. उलट असतं तर कुणी काही बोललं नसतं. ब्राइड शुड बी फेअर.. ते ठीक. आयॅम अ बिट डार्क.. त्याबद्दल मी अख्खिला एकदा बोलले ही होते.. तो काय म्हणावा?

"स्कीन कलर वरून माणूस जज करणं म्हणजे वन डझन्ट नो हाऊ टू जज पीपल. आणि हे फेअर स्कीनचं फॅड इज व्हाॅट ब्रिटीशर्स गेव्ह अस. ती लीगसी सोडून गेलेत ते. आणि आपली मेंटल स्लेव्हरी अशी, आपण ते सोडायला तयार नाही.."

"पण तुला मिळाली असती ना गोरी मुलगी?"

"हो ना! पण ती तू नसतीस.. तर काय फायदा?"

"पण तरीही.."

"ॲक्युअली इट मॅटर्स अ लिटल. कलर आॅफ द स्कीन ॲज अ ब्युटी पॅरामिटर इज हायली ओव्हररेटेड. आणि आपणच ते होऊ दिलंय. हेल्दी बाॅडी अँड हेल्दी माइंड, हेच सर्वात महत्वाचे. माणूस स्वत:ला घडवतो कसा हे महत्वाचे. ज्या गोष्टी त्याच्या हातात नाहीत त्यावर त्याची किंमत करणे.. इललाॅजिकल. तुला सांगतो आपले देव ही काळे नि निळे.. कृष्णासारखा कृष्ण.. श्याम! कृष्णवर्णीय. काली माता ही आपली. त्यांचे कौतुक. पण तरीही आपल्याला हवे इथे ते फेअर ॲंड लव्हली क्रिमच. या लोकांनी चुकीच्या कल्पना डोक्यात भरून दिल्यात. जाहिरात नि सिनेमा नाटकवाल्यांनी त्यात अजून खतपाणी घातलेय. द नाॅन फेअर गर्ल गेट्स डिप्रेस्ड.. दॅटस नाॅट फेअर! गाॅड नोज व्हेन वन विल कम आऊट आॅफ आॅल धिज थिंग्स.."

"हुं.."

"आणि खरं तर आपल्या लोकांनी या कल्पनांची गुलामगिरी पत्करलीय. आणि त्यातच आनंद आहे त्यांना."

अखिलेश बोलतो ते ऐकत रहावेसे वाटते. अख्खिचे वाचन खूप. मराठीतली मोठमोठी पुस्तके वाचलेली त्याने. तसे मी ही वाचायचे शाळेत असताना. पण तसं अख्खिसारखं वेड नव्हतं मला. अख्खि म्हणतो, वेगवेगळी पुस्तकं वाचली की आपली विचार करण्याची पद्धत सुधारते. मॅच्युरिटी येते. ॲंड वन बिकम्स मोअर ओपन माइंडेड. असेलही. मी त्याला म्हणाले ही,"वन आॅफ अस हॅज दॅट ना, मग बस आहे!"

त्यावर तो म्हणालेला,"बट यू आर इक्वली सो.. नाहीतर डबल डेकरच्या वरच्या मजल्यावर ओपन खिडकीसमोर माझ्याबरोबरबसली असतीस का आपली स्वत:ची एसी गाडी सोडून?"

तरीही विचार करता करता वाटले ते एकच, कितीही अखिलेश असं बोलत असला तरी मी त्याच्यावर प्रेम करत असेन तर आय शुड थिंक फाॅर हिम ॲज वेल. तो त्याच्या त्या विचारांशी प्रामाणिक राहून माझ्याबरोबर राहिलही, पण पूर्ण आयुष्य तो काढेल अशा विद्रुप दिसणाऱ्या माझ्याबरोबर? कवी नि लेखक लोक प्रियकराच्या तोंडी प्रेयसीचे वर्णन टाकतात, मुख चंद्रमा वगैरे. आपल्या सर्व हिराॅइन्स प्रथम लुक्सवरूनच सिनेमात पोहोचतात. लव्ह ॲट फर्स्ट साइट मध्ये इजन्ट दॅट द ओन्ली फॅक्टर? असं सारं असताना, शुड आय विड्राॅ मायसेल्फ? खरंतर व्हाय शुडन्ट आय विड्राॅ मायसेल्फ? मी पूर्ण आयुष्य काढेनही एकटीने, गेले काही वर्ष आणि त्याच्या मेमरीज आर इनफ.. लेट माय लव्ह हॅव अ हॅपियर लाईफ.. माझे पांढरे डाग तोवर बऱ्यापैकी वाढले होते. थोडक्यात इज वाॅज बाउंड टू स्प्रेड. इट वाॅज बाउंड टू डिस्टाॅर्ट माय लुक्स.. इट वाॅज बाउंड टू बी लाइक ॲन आय सोअर.. आणि पुअर अखिलेश विल बेअर विथ मी थ्रू हिज लाइफ. नि तो असा आहे, बोलणार ही नाही. फाॅर हिम, इट विल बी डुइंग हिज ड्यूटी..

विचार करून शेवटी आय केम टू द कनक्ल्युजन.. आय शुड टेक द लीड.. आमच्या लव्हस्टोरीला डेव्हलप करायला मीच तो घेतलेला. आता विड्राॅ करायला ही मीच केले पाहिजे ते.. त्यानंतर तो पहिलाच दिवस.. मी मोठ्या मुश्किलीने अख्खिशी बोललेच नाही. इट वाॅज हीज इमर्जन्सी डे त्यामुळे ही वुडन्ट हॅव टाइम टू रियलाईज.. तोवर मला प्रॅक्टिस करायला हवी. स्वत:शीच म्हटले, अंकिता, लाइफ हॅज थ्रोन अ चॅलेंज ॲट यू. ओन्ली वे आऊट इज फाइट इट आऊट. आजवर कधी प्रे न करणारी मी.. आय क्राइड विथ द फोल्डेड हँडस ॲंड प्रेड, ओ लाॅर्ड, लेट माय अखिलेश बी हॅपी इन हिज लाईफ..