अनामिका Prof. Krishna Gaware द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनामिका

अनामिका

ये अरे ऐकना, मला तुला काही सांगायचं आहे, ऐकशील का ?
नाही ऐकायच मला काही
तुझ,
तू नको बोलूस माझ्याशी,
मला नाही भेटायच तुला पुन्हा कधीच !

अस काहीतरी हळूवार चाललेले संभाषण कानावर आल,
तस मी मागे वळून पाहिले
एका सुंदर जोड़प्याचा तो आवाज होता.
मी ही थोड़ा कान टवकारून ऐकन्याचा प्रयत्न करु लागलो,

पण नीट्स ऐकू येत नव्हतं .

थोड्याच वेळात गाडी पुढच्या स्टैंड वर थांबली आणि तो खाली उतरला,
त्याच ते बोलण मात्र अर्धवट राहील अस वाटल !

आणि ती पाणवलेले डोळे पुसत ...
तो जात असलेली वाट बघत होती.

मग का कुणास ठावुक मला तिच्याशी बोलावस वाटल,
पण एक मुलगी अचानक ओळख नसलेल्या व्यक्ति बरोबर कशी बोलणार म्हणून मी ही शांत झालो.
आणि आमचा प्रवास सुरु झाला,
तिच्या शेजारी कुणी बसलेले नव्हते,
म्हणून मी मुद्दाम तिच्या शेजारी जाऊन बसलो,
प्रवास खुप दूर चा होता,

त्यामुळे थोडस बोलाव म्हणून सहज विचारल,
पुण्याला शिकायल आहे वाटत ?

तिने माझ्याकडे पाहिले आणि काही उत्तर न देताच डोळे मोठे करुन...
पुन्हा शांतपणे खिड़कीतुन दिसत असलेल्या पळणाऱ्या झाडाकड़े पाहून विचार करु लागली...

माझा पोपट झाला हे मला समजल आणि मी गुपचुप हेडफोन कानात टाकून गाणे ऐकू लागलो.

या भयानक शांततेची मला सवय होतीच म्हणा.
लग्न झालेल ना म्हणून!

अचानक तिच्या फुसफुसन्याचा आवाज आला.
मी पुन्हा तिच्या कड़े पाहिले ,

तेवढ्यात तिने माझ्याकड़े पाहिले,
तसा मी माझी नजर खिड़कीच्या बाहेर फेकली आणि वेळ मारून नेली.

आता बोलाव की नाही या संभ्रमात मी होतो, तेवढ्यात तीच म्हणाली, second year ला आहे , engineering करतीय पुण्यात,
मला काही सूचलच नाही कारण मी विचारलेल्या प्रश्नांच उत्तर तीने एवढ्या वेळा नंतर दिल होत,
मी पण गोंधळलेल्या स्थिति मधे उच्चारलो...
हो का ? छान ...!
उत्तर दिल म्हणून मस्त पण वाटल,

म्हणजे आपण बोलू शकतो हिच्या सोबत अस वाटल.
Engineering म्हंटल्यावर मला पण बोलायला topic मिळाला होता,
तुम्ही विचार करू नका , सांगतो गेली आठ वर्षे मी यांना च Maths शिकवतोय,

त्यामुळे यांची condition कशी असते चांगल माहिती होत.
Maths-I, II होत का रे तुला FE ला ?

तस तिने कुतुहलाने माझ्याकडे पाहिले आणि लगेच म्हणाली होत की ...पण तुला कस माहिती engineering च ?
लगेच नाही पण शांत राहून म्हणालो...
आहे माझे मित्र काही engineering ला त्यामुळे, काही नाही येत त्यांने fail झालेले M-II मधे...

तशी ती ही म्हणाली माझा पण राहिला होता,
पण second attempt मधे निघाला.
म्हंटल अरे regular study केला की होत की सगळ,
तेवढ्यात ती पटकन म्हंटली आता तू नको उपदेश देऊ कॉलेज च्यां शिक्षकांसारख !

मी शांत झालो आणि मनात विचार केला बर झाला हिला नाही सांगितलं मीच engineering college ला शिकवतो ते.
नाहीतर शिव्याच सुरु केल्या असत्या हिने.

विषय तसा वाढत होता आणि आम्ही फ्रेंड्स असल्यासारख बोलायला लागलो.
हिम्मत वाढली तशी मी तिला विचारल
एक गोष्ट विचारायची होती ...विचारु का ?
तस तिने होकार दिला ...बोलण्याचा हो ...!

मी म्हंटल ,
अरे मी तर या बसमधे पुण्यापासून आहे,
तुझ्या सोबत एक मुलगा होता तो कोण ?

तुझा classmate का ?

ती लगेच शांत झाली,
मला वाटल झाल आता संपले सगळे...

मी sorry म्हंटलो आणि शांत बसलो.

तो boyfriend आहे माझा,
तिने उत्तर दिल.
तसा मी tension मधून बाहेर आलो आणि म्हंटल....छान आहे,
एकाच कॉलेज ला का मग ?

ती:-
हो, एकाच class मधे आहोत,
पण तो कॉलेज सोडतोय,
त्याला नाही शिकता येणार पुढे आता, एवढे बोलून ती हळू हळू रडायला लागली.

मी हळूच विचारल का रे ?
काय problem आहे ?

तिने माझ्याकडे पाहिले आणि शांत झाली.
मी पण शांत झालो
विचार केला की फक्त अर्धा तास पण नसेल झालेला भेटून , ही कशी सांगणार आपल्याला काही...

तसा मी म्हंटलो काही हरकत नाही,
मी असच विचारल.
तस तीने उत्तर दिल ...तस नाही काही.
तो चांगला आहे खुप,
पण त्याची परिस्थिति नाही, आणि त्याला अवघड जात खुप ,
घरच्या लोकांच्या खुप अपेक्षा आहेत त्याच्याकडून.
मी म्हंटल मग problem काय आहे ?

तशी तिने बोलायला सूरुवात केली...

अरे आमची ओळख FE ला झालेली, पेपर च्या वेळी, maths-I चा पेपर होता, आणि माझ एडमिशन late होत त्यामुळे अगोदरचे unit नव्हते झालेले माझे,
माहिती नाही पण का कुणास ठावुक ,
मला वाटल त्याला ते माहिती होत, म्हणून त्याने मला मदत केलेली.
तेव्हा पासूनच आम्ही बोलायला लागलो.

मी मधेच म्हटलो...
म्हंटल बघ उगाच लोक maths ला शिव्या घालतात !
तस तिने माझ्याकडे बघून वेगळा च look दिला...

असो...

तीच बोलण चालूच होत...
आमचं FE छान गेल... दोघे ही 'O grade' ने पास झालो.
म्हंटल मग आता काय problem झाला college सोडण्या इतका ?

अरे त्याचे वडील expire झाले दोन महिन्यापूर्वी !
तशी ती गप्प झाली.

मला थोडा वेळ काही न बोलनच योग्य वाटल.
थोड़ा time गेल्यानंतर विचारल , अरे त्याची घरची परिस्थिति चांगली नाही का ?

तिने लगेच उत्तर दिल ...
आहे पण फॅमिली problem आहे त्यामुळे तो नाही करणार कॉलेज complete.

तस मी म्हटल अरे पण जर शिक्षण complete केल तर त्याला आणि घरी ...दोघांना पण आधार होईल की !
तस ती लगेच म्हणाली हो ना... मी पण त्याला तेच समजून सांगत होती पण तो ऐकत नाही काहीच...

म्हणून मी रडत होते.

अच्छा....मी reaction दिली आणि तिच्याकड़े पाहत राहिलो.

तस तिने माझ्याकडे पाहुन विचारल ,
अस काय बघतो माझ्याकडे.
मी हसलो आणि दूसरी कड़े पाहिले.

तीने परत विचारल ... अरे सांग ना ... का हसलास...

काही नाही रे...
प्रेम अस असत व्हय...म्हणून हसलो...

अरे इथे मी कुठल्या परिस्थिति मधे आहे,
आणि तू हसतोस काय ?
काय करू सांगा ना मला !

मी म्हटलो आपण भेटलो केव्हा ?
ती : दोन तास झाले असेल, का ?
मी: मग मी तुला काय सांगू,
आणि तू किंवा तो माझ का म्हणून ऐकनार ?

तस नाही रे तुझ्या कड़े बघून वाटल तू करशील काही मदत मला ..म्हणून म्हंटले, नसेल सांगायचं तर नको सांगू

आणि ती रागाने फुगुन बसली.

मी म्हंटल अर्रर्र... हां तर वैतागच झाला की राव...

म्हंटल अरे तस नाही आत्ताची पीढ़ी थोड़ी आघाव आहे म्हणून म्हंटल.

तस ती फटकण बोलली...
तू कुठल्या पिढीतला आहे मग ?

मी हसलो आणि बोलायला सूरुवात केली.

अरे ऐक...
प्रेम कर काही हरकत नाही कारण
ते ही योग्य वयातच व्हायला पाहिजे...
पण...

पण काय ? .....बोल की ?
तुझ खरच त्याच्यावर प्रेम आहे का ?

तस ती म्हणाली म्हणजे काय ?
आहेच ...
आणि त्याच ?

हो त्याच पण आहे.

बर ठीक तो का जातोय कॉलेज सोडून ?
Family problem मुळे,
मग ठीक झाल्यावर येईल की पुन्हा.

पण तुझ्या आयुष्यात ....
college लाच सोबत पाहिजे अस तर काही नाही ना.

तस ती म्हणाली
हो पण...
तो नाही आला तर...
आणि तो मला विसरला तर ...
तो माझ्या सोबत पण नसणार...
मी एकटिच असणार ना कॉलेज मधे ....?

तीने प्रश्न विचारून मलाच वेड केल.

तस तिला म्हंटल ...
बाई कॉलेज ला एडमिशन घेतल तेव्हा काय गैंग घेऊन आलेली का ?

तस ती शांत झाली आणि म्हणाली नाही...पण...?

तस मी तिला म्हंटल अरे थांब ... ब्रेक तर लाव...

मी काय सांगतो ते नीट ऐक...
जर ऐकनार असेल तर सांगतो....
नाहीतर राहील...

नाही बोल तू... ऐकते मी...

तुझ प्रेम आहे, त्याच पण प्रेम आहे मग भीती कसली... दूर होण्याची...

अरे जर मन जुळतात एवढ्या लवकर तर मग एकमेकांवर विश्वास देखील असू द्या की.

जगातील प्रत्येक नात हे विश्वासावर चालत ,
आणि हो जर विश्वास नसेल तर कुठलही नात असू द्या फार काळ नाही टिकू शकत...
त्यामुळे प्रेमात विश्वास महत्वाचा....
तो असेल तर दोन काय पुढचे दहा वर्ष जरी थांब म्हंटल तरी थांबता आल पाहिजे...

एवढं बोले पर्यन्त ती एकटक माझ्याकडे पाहत होती....

मी शांत झाल्यावर ती काही बोलेल म्हणून मी शांत राहून तिच्या बोलण्याची वाट पाहू लागलो...

तस ती म्हणाली...बोल ना अजुन....

छान वाटत....

मी जेवढा serious होऊन सांगत होतो
तेवढच लक्ष देऊन ती ऐकत होती...

मी म्हंटलो झाल माझ बोलून...
तस ती म्हणाली...

तू काय lecturer आहेस का रे ?

किती पकवतोस!

माझा सगळा पोपट झाला आणि मी शांत बसलो...

तस ती हसायला लागली आणि लगेच म्हणाली,

अरे गमंत केली तुझी....
खर आहे तू जे म्हणाला ते...
मी फक्त माझा च विचार केला
त्याचा नाही.
आणि घरी गेल्यावर मीही घरी सांगणार होते , मला नाही करायचं college,
पण तुझ्यामुळे माझ्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला...

एका हसऱ्या चेहऱ्याने ती बोलत होती...

अरे पण मी तुला विचारलच नाही तुझ नाव काय ? आणि पुण्यात काय करतोस ते .

मी हसत म्हणालो तू तरी तुझ नाव कुठ सांगितलं.

तशी ती म्हणाली,
जाऊदे ना कशाला उगाच नाव विचारून ओळख वाढवायची.

एक दिवसाची मैत्रीण समज ,
तस मी ही म्हंटलो, चांगल आहे.

मला पण एक दिवसाचा मित्र समझ...
फुकटचा सल्ला देणारा....पण कामाचा... बरोबर ना ?....

यावर आम्ही दोघेही हसायला लागलो...

आणि आमचा तो प्रवास तिथेच संपला.

मित्रांनो
रडत रडत प्रवास सुरु झालेला असेल तरी शेवट मात्र हसत हसत व्हावा हीच ईच्छा...
दुसऱ्याला हसवण्याचे निम्मित मात्र आपण व्हावे...

आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येऊ नये...
आलेच तर हसवण्याची पण ताकत तुमच्यात असू द्या...

लेखक
कृष्णा गवारे
9371455400
पुणे