प्रेम म्हणजे नेमके असत तरी काय....???
खूप दिवसांनी लिहावस वाटलं म्हणून सुरुवात केली....
अनामिका वाचून मला आज फोन आला....unkown नंबर होता....
नाव न विचारता डायरेक्ट तुम्ही कृष्णा गवारे बोलता का ?
मी हो म्हंटल.... तस समोरून हसण्याचा आवाज आला....
लेख वाचून मला फोन केला असावा...
तुम्ही छान लिहिता....मला तुम्ही लिहिलेला लेख खूप आवडला म्हणून टिप्पणी केली.....
मला देखील चांगले वाटले...चला फोन करून सुध्दा कोणी सांगू शकत म्हणून थोड बर वाटलं....
पण पुढचा प्रश्न ऐकून थोडा शॉक झालो....
मी उत्तर देताच समोरून फोन बंद झाला....
विचारलं तुमचं लग्न झालं का ?
मी म्हंटले हो झालय.....
त्यानंतर फोन बंद.....
असो ....
काहीतरी विचार केला असेल म्हणून आला असेल फोन....
शांत बसलो आणि अचानक लिहायला एक विषय मिळाला.
प्रेम म्हणजे नेमक असत तरी काय ?
मित्रांनो सार जग या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे...
वेगवेगळे दाखले देत लोक आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात.
प्रेम करणे चुकीचे नाही पण कुठल्या आणि कोणावर करावे हे महत्वाचे...
आता तुम्ही म्हणाल अस का बोलतो तू....
प्रेम काय विचार करून होत का....
प्रेमाला जात, धर्म, वय , लहान , मोठे, गरीब, श्रीमंत , अंतर अशा कुठल्याही सीमा नसतात.
पण न विचार करता प्रेम हे सुध्दा क्षणिक सुख देऊन आयुष्यभर दुःख देत राहत हे ही तेवढेच खरे....
कारण मित्रांनो प्रेम म्हणजे फक्त एकमेकांना बघताच आवडलो आणि प्रेम झाल अस होत नाही, खरचं प्रेमाचा अर्थ काय आहे हे समजून घ्या.
प्रेमात पडल्यावर अशा कुठल्याच गोष्टीचा विचार मनात येत नाही....
कारण प्रेम हे आंधळे आणि बहिरे पण असत. मित्रांनो एखादी प्रेमकथा असलेला चित्रपट पाहिला की लगेच आपण त्या पात्र मध्ये स्वतः ला ठेऊन विचार करायला सुरुवात करतो. पण मित्रांनो आपण फक्त त्यांचं फक्त प्रेम बघतो, त्यांना झालेला त्रास मात्र आपण इग्नोर करतो. कारण त्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटतात.
पण तस नाही, प्रेमाच्या दोन्ही बाजू समजून घेतल्या तर ना प्रेम असफल होईल , ना ही चुकीचे विचार मनात येतील...
मित्रांनो प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते, आपल्या मुलांचे चांगले व्हावे, आयुष्यात आनंदी आणि सुखी व्हावे, म्हणून ते सतत धडपड करत असतात, आणि त्यातच तुम्हाला अस वाटत की आई बाबा , बहीण किंवा भाऊ आपल्याकडे लक्ष देत नाही, मग आपण शोधत असतो असा मित्र किंवा मैत्रीण जो आपल्यासोबत बोलेल, वेळ घालवेल. आणि यातच कुणी मिळाले की आपल्याला अस वाटत की हा/ ही आपली किती काळजी घेतो/घेते.
आणि यातच सुरुवात होते प्रेमाचा अंकुर फुटण्याची....
हो आता हा अंकुर फुटायला वय नसत....
कारण जर घरच्यांकडे मुलांना द्यायला वेळ नसेल तर मुले हा वेळ इतरांकडे शोधत असतात.
त्यामुळे मुलांना योग्य वयापर्यंत तरी योग्य वेळ द्या जेणे करून कमी वयामध्ये होणारे प्रेम आणि ते झाल्यावर उद्भवणाऱ्या समस्या या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रमाणे हाताळता येतील.
यात मुलांची काहीची चूक नसते, वय व वयानुसार शरीरात होणारे बदल आणि वाटणारे आकर्षण या गोष्टी त्यांच्याकडून नकळत होत असतात.
त्यामुळे त्यांच्या सोबत आपले असणारे नाते व बोलणे या गोष्टींना आपण नियंत्रित करू शकू.
मग आता प्रेम केव्हा करावे....?
जेव्हा आपल्या असे वाटते की आपण स्वतः एखाद्या व्यक्तीची जबाबदारी, काळजी घेऊ शकतो तेव्हा प्रेमाचा विचार करायला काही हरकत नाही....
मग आता याचा अर्थ असा नाही की प्रेम करायचं नाही.
प्रेम करा पण त्याला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.
लग्न हा प्रेमाचा शेवट आहे असे काही जण म्हणतात....
पण खर सांगू हा तुमच्या प्रवासाचा पहिला स्टॉप आहे, त्यानंतर असणारी जर्नी खूप सुंदर असते,
त्यात जबाबदारी, काळजी, प्रेम, राग, भांडणे, रुसवा , फुगवा खूप काही गोष्टी असतात.
तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रेमाचा अर्थ समजायला सुरुवात होते.
प्रेम झाल्यावर पहिलं टार्गेट असत आपलं लग्न कस करता येईल, घरचे तयार होतील का? काय प्रॉब्लेम येईल ?
पण मित्रांनो लग्न ही पहिली पायरी आहे....
त्यामुळे पूर्ण भविष्य अंधारात ठेवून पहिली पायरी चढू नका.....
अगोदर भविष्यात त्या प्रेमाला आपण प्रामाणिक पणे जगवू, हाताळू शकतो का हा विचार करून....
काळजीपूर्वक पहिली पायरी चढण्याचा प्रयत्न करा...
लेखक
कृष्णा गवारे
9371455400