what is true books and stories free download online pdf in Marathi

वेळ ही वेळाच महत्व देते...

What is true...???

मुलगा/मुलगी अभ्यास करत नाही , अभ्यास करून घ्या - शाळा सांगणार

तुमचा मुलगा/मुलगी ढ आहे, त्याच लक्ष नसत, त्याला तुम्ही फोर्स करून का होईना अभ्यास करून घ्या. - शाळा सांगणार

आम्ही शिकवतो पण तो करतच नाही - शाळा सांगणार

रिपोर्ट कार्ड आणायला जाताने आम्ही काहीतरी अपराध केला आहे अशी भावना निर्माण होणारे - पालक

तुमचा मुलगा कसा आहे हे माहिती असून खूप जास्त expectations ठेवणारे - पालक

पाहिजे ती शाळा निवडू पण study करुन घेण्यासाठी फक्त क्लासेस वर depend असणारे - पालक

शाळेला सुट्टी मिळाली की आनंद...

क्लास ला सुट्टी मिळाली की दुःख...

शाळेची fees वेळेत भरू...

पण क्लास ची fees देताने दिवसाचा हिशोब मागू....

सुट्टीचे पैसे कमी करू...पण syllabus माञ पूर्णच करून घेऊ...

Open day च्या दिवशी शाळेचे शिक्षक सांगणार तुमचा मुलगा / मुलगी अभ्यासात खूप ढ आहे त्याकडे लक्ष द्या ...

पण आम्ही शाळेत का टाकले?

चांगली शाळा येवढे पैसे भरून का निवडली ?

ह्या गोष्टीचा विचार मात्र होत नाही. शिक्षकांना आमच्या पाल्याला का येत नाही ...

तुम्ही त्याला का समजून सांगत नाही....हे विचारायची हिम्मत मात्र पालक दाखवू शकत नाही, हे मात्र आपल दुर्दैव....

फक्त शाळा बदलून किंवा क्लास बदलून फरक पडेल का ?

याच उत्तर हे प्रत्येकाने स्वतः शोधले तर नक्की बरे पडेल....


आजची शिक्षण पद्धती बघितली तर एक गोष्ट नक्की समजेल प्रत्येकजण मार्क च्या मागे धावतो आहे....

पण खरच जे मार्क मिळतात ते आपल्या मुलाचे आहे का ?

की फक्त रट्टा मारून मिळालेले आहेत ते फक्त तपासा....

कारण आमची शाळा चांगली, आमचे शिक्षक उत्तम हे दाखवण्यासाठी रिझल्ट चांगला लावत नाही ना ?

याचा विचार कुणी केला का ?

शाळा ही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आहे की फक्त आपले पाल्य किती परफेक्ट रट्टा मारू शकतात हे तपासण्याचे मीटर आहे, हे एकदा समजून घ्या....


मुलांना अपयश पचविण्याची खरचं शक्ती आहे का ?

कारण एखाद्या गोष्टीची सवयच नसेल आणि तेच अनुभवायला मिळाले तर ते सहन करणे ही खूप अवघड असते.

मित्रांनो एक लक्षात ठेवा....

जगण्यापेक्षा पेक्षा मरणे सद्याच्या युगात खूप सोपे झाले आहे.

त्यामुळे काही गोष्टींची मुलांना सवय लावा ....अपयश पचविण्याची सवय लावा...

प्रत्येकाची आकलन शक्ती, समज ही त्याच्या बौद्धिक पातळीवर अवलंबून असते.

त्यामुळे आमच्या शेजारच्या मुलाने पहिला नंबर किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आणले म्हणुन, स्वतःच्या मुलांना टोमणे मारू नका....

वर्ग हे तुमच्या मुलांची बौद्धिक पातळी विकसित करण्यासाठी असते.

त्यामुळे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतोय हे बघणे महत्वाचे...

नोकरी करायची म्हणून मुलांना शिकवत असाल तर....आत्ताच नोकरीचे हाल काय चालू आहेत हे सर्वजन बघत आहात....

त्यामुळे मुलांना अस तयार करा की

ते पाहिजे त्या क्षेत्रामध्ये स्वतः ला उभे करू शकतील...

पाया मजबूत असेल तर हवी तेवढी इमारत बांधता येते....हे आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी आधीच सांगून ठेवले आहेत.

त्यामुळे मुलावर किती प्रेशर द्यायचा याचा विचार मात्र करण्याची गरज आहे.

Divert होण्यासाठी सध्या खूप गोष्टी आहेत ...त्यामुळे आपली मुले नेमक काय करताय,

संगत त्यांची चांगली आहे का ?

मित्र कसे आहेत ?

हे बघणे ही तेवढेच महत्वाचे असेल.

एका ठराविक वयानंतर मुले व पालक याचे communication कमी होते, ते होऊ नये याची काळजी पालकांनी घेणे महत्वाचे आहे.

कारण जेवढं बोलणं कमी तेवढं मुल divert किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याचा धोका जास्त निर्माण होतो....

हे वाचत असताने काही गोष्टी साध्य पालकांना चुकीच्या देखील वाटेल परंतु...मी स्वतः अश्या मुलांना बाहेर काढण्याचा
प्रयत्न केला आहे....काही सावरली ...तर काही वाया गेली.
आणि काही देवाघरी गेली...
त्यामुळे मित्रांनो काही गोष्टी ह्या वेळेतच केलेल्या बऱ्या....
कारण वेळ हातातून निघून गेली की पच्छाताप करून काही होत नाही....
त्यामुळे वेळेला महत्व द्या...
काही दिवसांनी वेळ तुम्हाला महत्व देईल.


लेखक

कृष्णा गवारे

पुणे

९३७१४५५४००

इतर रसदार पर्याय