मॅनेजरशीप - भाग ५ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग ५

मॅनेजरशीप भाग ५

भाग ४  वरुन पुढे वाचा .........

 

ऑफिस मध्ये आल्यावर मधुकर वर्षभरातले जे रीजेक्शन रिपोर्टस होते, ते आणि टाइम ऑफिस मधून आलेले ड्यूटि चार्टस, घेऊन बसला होता. सातपुते आल्यावर त्यांना सांगितलं की जे ट्रक मध्ये मटेरियल भरल्या गेलं होतं, त्यांच्या डेट्स काय आहेत ते त्यांच्या markings वरुन  काढा. त्या हिट्स  कोणच्या शिफ्ट मध्ये टॅप झाल्या आहेत ते आणि शिफ्ट मध्ये सर्व डिपार्टमेंट चे कोण कोण लोक होते त्यांची लिस्ट काढा आणि झाल्यावर लगेच घेऊन या. आणि हो सगळ्यांचे केमिकल अनॅलिसिस पण घेऊन या. दीड तासानंतर सातपुते सगळे डिटेल्स घेऊन आले.

“बराच वेळ लागला ?” – मधुकर.

“हो साहेब नीट रचून ठेवायला वेळ लागला. पुन्हा reference लागला तर चटकन मिळावा म्हणून व्यवस्थित लावून ठेवलं.” – सातपुते. 

“छान. आता मला सांगा जे ingots ट्रक मध्ये होते ते सर्व high speed steel चे होते ?” – मधुकर.

“हो साहेब.” – सातपुते. 

“ते का रीजेक्ट झाले ?” – मधुकर.

“Tungsten आणि molybdenum प्रमाणा पेक्षा खूपच जास्त होतं. क्लायंट ने दिलेल्या रेंज च्या बाहेर होतं म्हणून रीजेक्ट करावे लागले.” – सातपुते. 

“ओके आता मला हे सांगा की या हिट्स वर कोण melter होते.” – मधुकर.

“ठाकूर दोन हिट्स वर, ओझा तीन हिट्स वर आणि थॉमस तीन हिट्स वर.” -सातपुते

“आत्ता ड्यूटि वर कोण आहे ?” – मधुकर.

“थॉमस” – सातपुते.

“बोलवा त्याला.” – मधुकर. 

निरोप आला की हीट टॅप होते आहे म्हणून सगळं आटोपल्यावर येतो.

 

“साहेब थॉमस, ठाकूर आणि ओझा, तिघेही अत्यंत कर्तव्य दक्ष इंजीनियर आहेत. त्यांच्या शिफ्ट मध्ये इतक्या साऱ्या  हिट्स ऑफ गेल्या हे नवल आहे. मी प्रत्येकाशी या बाबतीत बोललो आहे. त्यांनी जे डिटेल्स दिलेत त्यावरून त्यांचा काही दोष दिसत नाहीये.” – सातपुते. 

“Additions इतक्या जास्त प्रमाणात कशा केल्या गेल्या हे विचारलं ?” – मधुकर.

“होय साहेब त्यांनी जे आकडे सांगितले ते बरोबरच आहेत आणि मी स्टोअर च्या रजिस्टर वरून चेक केलं साहेब. सगळं बरोबर दिसतंय.” – सातपुते. 

“तरीही हिट्स ऑफ गेल्यात ? रीजेक्शन करावं लागलं ?” – मधुकरनी आश्चर्याने विचारलं. 

“होय साहेब.” – सातपुते. 

तासा भराने थॉमस आला. माधुकरने त्याला बसायला सांगितलं.

“थॉमस, माझ्या समोर हे तीन हिट्स चे डिटेल्स पडले आहेत. हे सर्व प्रॉडक्शन प्रमाणा बाहेर additions केल्या म्हणून रीजेक्ट झालं आहे. या सर्व हिट्स वर melter तू होतास. Can you explain why this has happened?” – मधुकर.

“साहेब, additions किती करायच्या याचे प्रमाण ठरलेले आहे. आणि त्या नुसारच केल्या गेलं आहे. तरीही हिट्स कशा ऑफ गेल्यात ही कळत नाही साहेब.” – थॉमस.

“मटेरियल चं वजन कोणी केलं त्या दिवशी ?” – मधुकर.

“साहेब, एका मागोमाग तीन हिट्स चा प्रोग्रॅम होता  आणि ते ही सेकंड, आणि नाइट शिफ्ट मध्ये. त्यामुळे ज्या, ज्या मटेरियलच अॅडिशन करायचं होतं ते ते सर्व वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून हीट नंबर आणि वजन लिहून, प्लॅटफॉर्म वर, दिवसाच आणून ठेवलं होतं.” – थॉमस. 

“मी विचारलं की वजन कोणी केलं ?” – मधुकर.

“माहीत नाही साहेब कारण स्टोअर च्या माणसानेच आणून ठेवलं होतं.”- थॉमस

“त्या माणसाला बोलवा.” – मधुकर.

थॉमस गेला आणि त्या माणसाला, भानाजी ला  घेऊन आला.

“भानाजी, या तारखेला तू जे मटेरियल थॉमस साहेबांना नेऊन दिलं त्याचं वजन तू केलं  होतास का ?” – मधुकर.

“नाही साहेब, वजन करायचं काम बर्डे साहेबच करतात. पण त्या दिवशी चक्रवर्ती साहेब तिथे होते आणि त्यांनी आधी सहज कांटा चेक केला आणि म्हणाले की काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी कांटा उघडून तो ठीक केला साहेब, काय ते मला माहीत नाही. मग बर्डे साहेबांनी वजन करून मटेरियल पाठवलं.” – भानाजी. 

“चक्रवर्ती नेहमीच कांटा चेक करतो का ?” – मधुकर.

“बरेच वेळा करतात.” – भानाजी. 

‘या घटनेनंतर केंव्हा हात लावला ?” – मधुकर.

‘सामान दिल्यानंतर लगेचच ते म्हणाले की त्यांचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी पुन्हा कांटा उघडला.” – भानाजी. 

“सातपुते, थॉमस तुमच्या लक्षात आलं का काय प्रकार आहे ते ? आधी कांटा बिघडवायचा मग वजन करून मटेरियल पाठवायचं मग पुन्हा कांटा पूर्ववत करून ठेवायचा. कोणाला काही कळण्याचा मार्गच नाही. Clean job.” मधुकर म्हणाला.

ते दोघही आ वासून पहात होते. त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला होता. त्यांनी अस काही असेल यांचा विचारच केला नव्हता.

मधुकर नी थॉमस आणि भानाजीला जायला सांगितलं. ते गेल्यावर मधुकर सातपूत्यांना म्हणाला.

“आपल्याला चक्रवर्ती आणि बरड्यांच्या विरुद्ध केस बिल्ड अप करायची आहे. थॉमस आणि भानाजी ची साक्ष अगदी तारिखवार नोंदवून घ्या. ती उपयोगी पडेल. तुमच्या लक्षात आलच असेल की या अगोदार जेवढ्या हिट्स रीजेक्ट झाल्या त्याच्यामागे कोणाचा हात आहे ते. आता उलगडा झाला. आणखी एक गोष्ट, कांटा एकदा प्रमाणित केल्यावर त्याला उघडता येत नाही. दुरुस्ती करायची असेल तर त्यानंतर पुन्हा प्रमाणित करून घ्यावा लागतो. बरड्यांनी ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. या गोष्टीची नोंद करा. हा गुन्हा आहे. या दोघांनी अजून काय काय गुण उधळले आहेत यांचा शोध घ्या आणि ते पुरावे पण गोळा करा. या दोघांना आता पुन्हा कंपनी त एन्ट्री नाही. पण हे काम चुपचाप करा, जरूर पडल्यास वेणूगोपाल आणि फिरके साहेबांना मदतीला घ्या. पण एक लक्षात ठेवा  तुम्ही ही माहिती गोळा करता आहात यांची गंधवार्ता सुद्धा कोणाला लागता कामा नये.”

सातपुते गेल्यावर माधुकरने पुन्हा सगळ्या शीट्स चाळायला सुरवात केली. आणि त्यांच्या लक्षात आलं की ब्रेक ड्रम बद्दल आपण सातपूत्यांशी काहीच बोललो

नाही. तोच मग उठून सातपूत्यांच्या केबिन मध्ये गेला.

“सातपुते, आपलं  ब्रेक ड्रम बद्दल बोलायचं  राहिलं. त्यांची पण काय कहाणी आहे ते बघायला हव. चला आपण मटेरियल बघू.” ते दोघंही यार्ड मध्ये जिथे मटेरियल ठेवलं होतं तिथे पोचले. संध्याकाळ होत आली होती आणि प्रकाश अंधुक झाला होता. माधुकरने मटेरियल पाहिलं आणि विचारलं की

“ब्रेक ड्रम्स कुठे आहेत. ?”

“हे काय साहेब तुमच्या समोर रचलेले आहेत.” – सातपुते. 

“हे ब्रेक ड्रम्स आहेत ? हे एवढे मोठे ? कोणच्या गाडीचे आहेत ?” – मधुकर.

“८०  टनर डंपर चे आहेत अस म्हणाले.” – सातपुते.

“कोण म्हणालं अस ?” – मधुकर.

“सुशील बाबू.” – सातपुते. 

मधुकर ने एक ड्रम काढायला सांगितलं आणि वर्कशॉप मध्ये जिथे भरपूर उजेड होता तिथे ठेवायला सांगितलं. जवळून निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात सार काही आलं. तो म्हणाला चला आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलू. केबिन मध्ये गेल्यावर मधुकर म्हणाला की

“सातपुते, तुम्हालाही असच वाटत की हे ब्रेक ड्रम्स आहेत म्हणून ?”

“नाही साहेब. मला जरा संशय आला तेंव्हा मी जरा माहिती गोळा केली आणि माझ्या अंदाजा प्रमाणे हे windmill चे hub आहेत. पण या टाइप च्या windmills आपल्या देशात अजून तरी बसवत नाहीत. या प्रकारच्या mini windmills युरोप आणि लॅटिन अमेरिकेत चालतात.” – सातपुते म्हणाले. 

“म्हणजे जो आपला क्लायंट आहे त्यांची ही एक्सपोर्ट ऑर्डर आहे आणि तो आपल्याला खूपच कमी रेट देऊन मूर्ख बनवतो आहे.” – मधुकर. 

“होय साहेब, आहे खरं तसं.” – सातपुते. 

“सातपुते एवढं सगळं माहीत असून तुम्ही काहीच अॅक्शन घेतली नाही ? कंपनी चं नुकसान होऊ दिलत ?” – मधुकरला आता राग आला होता.

“मी काय करणार साहेब, माझा फक्त अंदाजच होता, त्या आधारा वर सुशील बाबूंशी कोण वैर घेणार ?” – सातपुते.

“किरीट साहेबांना माहीत आहे ?” – मधुकर.

“नाही साहेब.” – सातपुते. 

“बरं हे dimensional रीजेक्शनस झालेत ते ordinary scrap च्या रेट ने चालले होते अस का ? कोणाला पाठवता हे स्क्रॅप ?” – मधुकर.

“या बद्दल फक्त बर्डे आणि सुशील बाबूच तुम्हाला सांगू शकतील.” – सातपुते.

“एवढी secrecy ?” – आता आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी माधुकरची होती.

“होय साहेब.” – सातपुते.

ठीक आहे जा तुम्ही मी बघतो काय ते. सुशील बाबू तुम्हाला फोन करण्याची शक्यता आहे पण याची वाच्यता करू नका.

होय साहेब.

सातपुते गेल्यावर थॉमस आला.

“साहेब एक सांगायचं होतं.”

“काय ?” – मधुकर.

“साहेब, तुम्ही विक्रमसिंग ला ऑपरेशन मधून ट्रान्सफर केलत, आणि आम्हाला एक सुपरवायझर कमी पडतोय. आम्हाला weekly off पण घेता ये नाहीये. काही तरी करा साहेब.” – थॉमस. 

“डोन्ट वरी मला यांची कल्पना आहे. मी नवीन सुपरवायझर साठी जाहिरात दिली आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांचे इंटरव्ह्यु होतील आणि तुम्हाला नवीन माणूस मिळेल. तो पर्यन्त जरा कळ काढा. आणि एक आज आपल्याला जे काही कळलं ते तुमच्या पर्यन्तच ठेवा. कोणांशीच अगदी ठाकूर आणि ओजाशीही बोलू नका. योग्य वेळी ते सर्वांना कळेलच. पण सध्या मौन पाळा. Promise me.” – मधुकर.

“होय साहेब, नाही बोलणार. I promise.” – थॉमस.  

घरी जायला थोडा उशीरच झाला होता. दाराबाहेर जेवणाचा डबा येऊन पडला होता. वॉश घेऊन फ्रेश झाल्यावर त्यानी जेवण गरम करायला घेतलं, जेवण झाल्यावर गॅलरीत आरामात बसला होता पण  सकाळपासूनचा घटनाक्रम डोळ्यांसामोरून हलायला तयार नव्हता.  किरीट साहेबांना फोन करावा का ?त्यांना यांची माहिती द्यायला पाहिजे. आत्ता केला तर चालेल का? तो विचार करत होता. घड्याळात पाहिलं ,साडे नऊ वाजले होते रात्रीचे, तसा फार उशीर झाला नव्हता. त्यांनी फोन उचलला आणि किरीट साहेबांचा नंबर फिरवला.

क्रमश:..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com