काय नाते आपले? - 8 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काय नाते आपले? - 8

सगळे घाईने हॉस्पिटल मध्ये आले होते , मिताली च्या डोक्याला इतकं लागलं होत आणि आता तिला ते दुखत हि होत.....
.मिताली एकटीच दुसऱ्या बेंच वर जाऊन बसली होती......तिला मनोमन वाईट वाटले होते....की कोणी आपल्याकडे लक्षच दिले नाही , आपल्याला लागलय तर साधी विचार पूस करावी......पण नाही...

....आधीच काल रात्री पासून खालं नाही...,...तिला आजी बद्दल येवढं वाईट वाटत नवत कारण ती सारखी तिला काहीनाकाही बोलयचीच...मिताली ल तिने येवढं केलं तरी कोणीच काही बोललं नाही तू बरी आहेस ना वैगेरे......

तोच तिथे एक नर्स आली आणि तिने मिताली ला आपल्या जोडीला यायला सांगितलं.....

मिताली हि गेली कारण दुखत तर खूप होत, आणि त्रास हि खूप होत होता.....

आणि तेवढ्यात ot मध्ये हिरवा बल्ब बंद झाला आणि डॉक्टर बाहेर आले...


त्यांनी अभि च्या बाबांना सांगितलं.. " sorry त्यांना आम्ही नाही वाचवू शकलो... "

सगळे तर एकदम शॉक च झाले.. अचानक आजी अशी कशी सोडून गेली....

अभि , बाबा आणि रुचिता तिघेही रडत होते , तोच तिथून तनुजा तिथून धावत आली.....

तनुजा " अभि अरे...हे कधी झालं आणि तु आम्हाला कळवलं हि नाही..... " तनुजा डोळ्यात पाणी आणत म्हणाली...

तनुजा बाबाजवळ गेली आणि त्यांना सावरू लागली..रुचिता पन रडत होती........

" आई बाबा अहो सावरा स्वतः ला , आजी आपल्यात नाहि आता.... " तनुजा...

तनुजा त्या तिघांना हि समजावत होती , तिला फक्त त्यांचं मन जिंकण्याचा चान्स हवा होता... त्यासाठी तिचा इतका खटापोट चालू होता..

कधी काळी साधी सोज्वळ असणारी तनुजा आता एका व्हिलन प्रमाणे वागत चाली होती...

सगळी प्रोसेस करत सगळे घरि आले..बाबांनी नातेवाईकांना पणं आता बातमी दिली होती...
म्हणून ताबडतोब जितक्या लवकर येता येईल तितक्या लवकर नातेवाईक आले होते....

मैंद न्हायच होत , घरात सगळे होते.........फक्त मिताली सोडून, तिची तर कोणाला आठवण च न्हवती.....

अभिजित च्या घरी येऊन तनुजा च सर्व पाहत होती , मिताली चे आई बाबा पन आले होते....

सगळी कडे नुसती रडारड चालू होती , अभिजित एकदम शांत होता...
पुढील 5 दिवस तो येणार नाही असा मेल त्याने ऑफिस ला केला....

थोड्यावेळ्याने मिताली घरी आली , इतक्या जणांना पाहून ती जरा गांगरूनच गेली...
ती घरात येताच सर्वांचे लक्ष तिच्या जवळ गेलं...

तिने नाईट सूट घातला होता , हातात एक दोन हिरव्या बांगड्या होत्या पन गळ्यात मंगळसूत्र न्हवत... हे थोडं बाकीच्यांना खटकल....

लग्न कोणत्या परिस्तिथित झालं आहे हे सगळ्यांना ठाऊक होत पन तरीही.....

तिच्या डोक्याला पट्टी होती...हे सगळ्यांनी पाहून न पा
हिल्यासारखं केल...
जे पाहुणे आले होते त्यानी तिची विचार पूस केली हे तिला बर वाटल....

तिचे डोळे रडून सुजले होते हे पाहून बाकीच्यांना तरी असच वाटलं कि आजी गेली म्हणून रडत असेल....

अभिजित ने तर एकदाही मान वर करून तिला पाहिलं नाही......

मिताली चे आई बाबा हि गेले होते..... आता रात्र पन बरीच झाली होती.....

घर रिलेटिव्हस ने भरून गेल होत..!! त्यामुळे काम हि खूप होत.... तनुजा या सगळ्यात मात्र पुढे होती...

ती हवी तशी मदत रुचिता ला करत होती.. पन डोकं जास्तच दुखल्याने मिताली रूम मध्येच राहिली....

पन या सगळ्यामुळे आलेल्या बऱ्याच जणांमध्ये मिताली बद्दल चर्चा सुरुवात झाल्या होत्या..
दुसऱ्या दिवशी मिताली उठल्यावर रुचिता ने मिताली आणी अभि ला एकमेकांन सोबत रहायला सांगितलं.....

" माहीत आहे तुम्ही दोघ हे लग्न मान्य करत नाहि पन प्लिझ..... उगाच माझ्या घरा मध्येच माझ्याच मुलांवरती चर्चा झालेल्या मला आवडणार नाही... काही दिवसांचाच प्रश्न आहे हा...." रुचिता...

नाईलाजाने दोघ हि तयार झाले.... रुचिता ने तीच सामान अभि च्या रूम मध्ये शिफ्ट केल....

आणि मिताली ला आज साडी न्हेसायला सांगितली , गळ्यात तिला मंगळसूत्र हि घालायला सांगितलं.....

आणि खालरी निघून गेली...

बाथरूम मधून मिताली बाहेर आली , डोक्याला टॉवेल बांधल होत केस धुतल्यामुळे.....
डोक्यावरची ओली जखम अजून हि तशीच होती , साधी कॉटन ची सादी मिताली ने न्हेसली होती , त्यावर छोटं मंगळसूत्र...

सुंदर दिसत होती ती साडि मध्ये...

मिताली आरशा समोर उभी राहून डोक्याला ड्रेसिंग करत होती , तोच रूम मध्ये अभिजित आला...

त्याला पाहून ती आधी जरा घाबरलीच पन नंतर तिला लक्षात आलं कि आपण त्याच्याच खोलीत आहोत...

तो काहीही न बोलता आपले कपडे घेऊन बाथरूम मध्ये निघून गेला....

मिताली पन तीच आवरून खालती आली...आणि रुचिता ला मदत करू लागली...
ती काल पासून पाहत होती तनुजा इथून गेलीच न्हवती.... " असो आपल्याला काय करायचं आहे..?? "

मिताली ने सगळ्यांना चहा नाश्ता सर्व्ह केला आणि किचन मध्ये प्लेट ठेवून रूम मध्ये जातं होती तर..

तनुजा अभिजित च्या खूपच जवळ होती , तिने त्याच्या गालावर दोन्ही हात ठेवले होते...अभिजित चे हात तिच्या कंबरेवर होते....

ते पाहून तिच्या भुवयाच उंचावल्या.. ती मनातंच म्हणू लागली " इतकंच प्रेम आहे तर मला का डिवोर्स देत नाही... " ती तोंड वाकडं करतच मनात म्हणाली.....

तोच अभिजित च लक्ष मिताली कडे गेलं जी कधी पासून त्या दोघांना पाहत उभी होती..
तिला बघताच अभि पटकन तनुजा पासून दूर झाला..तनुजा ने पाठी वळून पाहिलं आणि ती लगेच मिताली जवळ गेली...

" मितु आम्ही फक्त बोलत होतो , मी त्याला फक्त समजावते होती बाकी काही नाही....आणि...
तनुजा बोलत होती पन मिताली ला ऐकण्यात रस न्हवता ती तशीच त्या दोघांना क्रॉस करत निघून गेली पुढे.....

तिला मुळात जेलेसी न्हवती ना कसला राग.... 😌 तो दिवस असाच कामात गेला तिचा परवा पेपर होताच त्यामुळे तिला अभ्यासाला टाईम मिळाला नाही म्हणून ती रूम मध्ये येऊन बसली....

दिवस भर काम करून ती पन थकून गेली होती , हातात पुस्तकं घ्यायला पन तिला कंटाळा आला होता.....

मिताली तशीच वाचत वाचत झोपी गेली... पुस्तक पोटावर होत आणि ती तशीच भिंतीला टेकून बसल्या जागीच झोपून गेली होती.....!!

अभिजित रूम मध्ये आला आणि तिला झोपलेल पाहून तो थोड्यावेळ तिला पाहतच राहिला.....

आज साडी न्हेसली होती तिने...... दिसत तर सुंदर होती पन चेहऱ्यावरती मुळीच तेज न्हवत... सुकलेला चेहरा , आणि डोक्याला जखम झाल्याने चेहरा थोडा लाल झाला होता.....!!

अभिजित ने तिच्या पोटावरच पुस्तक काढायला हात लावला तोच ती पटकन जागी झाली....
आणि त्याला पटकन ढकलून दिल........

" हे हे तुम्ही माझ्या जवळ येऊन काय करत होता...?? " मिताली......

" मला हौस नाही आहे तुझ्या जवळ यायची समजलं ना , हे पुस्तकं उचलत होतो मी.... बस " अभी...

" ते मीही उचल असत.... 🙂 हा माझ्याजवळ याल च का तुम्ही तर तनुजा च्या जवळ जाल ना...... " मिताली... तोंड वाकडं करत म्हणाली.....

" तोंड सांभाळून म्हणायचं समजलं ना....?? " अभि...

" मगाशी काय चालू होत मग..?? इतकंच प्रेम उतू जातं ना मग मला डिवोर्स का नाही देत माझी तरी सुटका होईल मग...." मिताली पन चिडून म्हणाली...

" ठीक आहे निघून जा इथून... नाही आली तरी आम्हाला काहीच फरक नाही पडत समजलं ना..... तुझी वाट पाहायला पन कोणी नाही तुझं..," अभि.....

असं म्हणत त्याने तिचे बॅग मधले कपडे खालती फेकून दिले... मिताली ला खुप राग आला.. मिताली ने तिचा मोबाईल घेतला आणि चालू पडली....

खालती हॉल मध्ये आई बाबा बसले होते आणि त्यांच्या बरोबर अजून बरेच रिलेटिव्ह होते...
ती तशीच त्यांच्याकडे न बघता दरवाजा ओपन करुन निघून गेली.......


पाहुणे होते म्हणून रुचिता ला तिथून हलता नाही आलं...


.
.
.
.
.
मिताली ला जाऊन आता बराच वेळ झाला होता...7 वाजता जी गेली ते आता 10 वाजत आले होते..ती अजून आली न्हवती.......

रुचिता थोड्यावेळ्याने अभिजित च्या रूम मध्ये गेली तर तो लॅपटॉप घेऊन काम करत होता.....

रुचिता : अभि मिताली कुठे आहे??

अभि : माहीत नाही मला.....असेल बघ तिच्या रूम मध्ये...

रुचिता : अभि मी विचारतेय मिताली कुठे गेली आहे..?? ती घरात नाही.....तुम्ही दोघ पून्हा भांडले का...?

अभि : ह्म्म्म....

रुचिता : अभी ती 7 वाजता जी बाहेर गेली ते 10 वाजत आलेत जे ती अजून आली नाही......

अभिजित ची लॅपटॉप वर असलेली नजर आई वर गेली.. त्या चिंतेत होत्याच पन आता त्याला पन थोडी तिची काळजी वाटली.......

खरंच ती कुठे गेली असेल..........???


अभि ने लॅपटॉप बंद केला आणि आपल्या बाईक ची चावी घेत निघाला......

अभि जेव्हा पार्किंग प्लॉट मध्ये आला आणि समोर जे दृश्य होत ते पाहून त्याचे डोळे रागाने लाल झाले....

समोर....मिताली राहुल च्या मिठीत होती आणि त्याचे हात तिच्या पाठीवर होते...........!!


थोड्यावेळ्याने........


मिताली ने दरवाज्या बाजूची बेल वाजवली... तस थोड्यावेळ्यात अभिजित ने दरवाजा ओपन केला......

मिताली आत येणार तोच अभिजित ने तिला दारातच थांबवलं आणि तीच सामान तिच्या समोर घराबाहेर फेकुन दिल....

अभिजित : जा तु मुक्त आहेस आता...... तुला आजपासून या घरात राहायची मुळीच गरज नाही.... आणि मुद्दाम घरा बाहेर पडून बॉयफ्रेंड ला भेटायची तर मुळीच गरज नाही.... आता तु आझाद आहेस या पिंजऱ्यातून या बंधनातून......

आणि हो हे मंगळसूत्र पन घालायची गरज नाही असं म्हणत त्याने ते जोरात तिच्या गळ्यातून खेचून घेतलं इतकं कि ते पार तुटूनच गेलं......

मिताली तशीच गळ्याला हात लावून बसली......

आई बाबा पन काही यावेळेस अभि ला बोलस्ट न्हवते ती कितीही चुकत असली तरी ते बाजू घ्यायचे... पन यावेळेस कोणी पुढे नाही आलं........

" आई बाबा मी केल काय नक्की?? पन " मिताली....

" हे तु आम्हाला विचारूच नकोस.... तु या घरात थांबायच नाही इतकंच.... " अभि.. असं म्हणत त्याने हात धरून तिला घराबाहेर काढले ते पन तिच्या सामाना सकट..........



क्रमशः...