दुःखाची सवय vinayak parab द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुःखाची सवय

टायटल वाचूनच समजतंय परत एकदा विनायक च रडगाणं चालू 😂प्राची तर वाचणारच नाही मेबी.
असं विचित्र टायटल ची खाज भागत नाही माझी त्यात माझी काय चूक. काल खरतर सुखाचा परमोच दिवस होता. सुरुवात होती सदम्याने कारण वाढदिवसाच्या दिवशी काही ना काही त्रास हा होतोच मला त्यात भर पडलेली 27 एप्रिल ला माझी चूक नसताना ओरडलेल्या बॉस ची. उगाच 28 एप्रिल वाईट जाऊ नये म्हणून मंगळवारी सुट्टी साठी विचारून ठेवलं. मागच्या वर्षीचा वाढदिवस पण दगदगीमुळे आजारात लोळून गेला होता. पण हा वाढदिवस सगळ्यांना अपवाद ठरला. शीतल (माझी बालमैत्रीण ) आणि मी ग्रॅण्ट रोड च्या मेरवान ला गेलो आधीसारखी स्वस्ताई आणि चव तिथे राहिली नाही हे जाणवलं उरलेला दिवस उन्हात तडफडत जाऊ नये म्हणून शशांक परब ला विचारून आर मॉल ला गेलो तो बोललेला खूप मोठा आहे फिरून नाही होत. सुरुवातीलाच एक इलेक्ट्रिक जिना होता तिथे एक साधारण 1.5-2 वर्षाची मुलगी जिन्याजवळ वरती जाणाऱ्या आईकडे एकटक बघत उभी होती. तिचा क्युट चेहरा पाहून पांघळलो दुसरा तिसरा विचार न करता मी तिचा एक हात धरून दुसरा हात शीतल ला धरायला सांगून तिला उचलून इलेक्ट्रिक जिन्यावर ठेवलं तिची आई आम्हा दोघांकडे बघत होती नंतर परिस्थिती डोक्यात येऊ लागली कि किती धोकादायक होत ते सगळं जस तिची आई तिच्याशी वागत होती तिच्या आईने नंतर फालतू कारण दिल कि ती ऐकत नव्हती जिन्यावर यायला म्हणून सोडल तिला खाली. मला आणि शीतल ला आपापल्या आया आठवल्या आम्हा दोघांनाही आईने धपाटा घातला असता वेळ प्रसंगी माझी मान मागून पकडून किंवा एका हाताने उचलून जिन्यावर ठेवलंच असत असं नक्कीच सोडल नसतं कडक असतील स्वभावाने पण माँ आखिर माँ होती हे आणि समोर त्याच माँ ला अपवाद दिसत होता दिवसभर तो विचित्र प्रसंग डोक्यात ठाण मांडून बसलेला काय झालं असेल त्या मुलीच घरी नकोशी झाली असेल का नंतर देकॅथलॉन ला गेलो तिथे सुंदर स्वस्त महागड्या सायकल बघितल्या तिथं पण तेच विचार चालू. पुस्तकांच्या दुकानात जवळपास तासभर काढला.पंजाब ग्रील मध्ये जेवलो शीतल ला असल्या हायफाय ची सवय नव्हती ती दबून गेली. उगाच हळू आवाजात बोलण वैगरे असं वागत होती तिथल्या वातावरणाने. मला प्रथमेश मुळे निदान तोंड ओळख होती. असल्या हॉटेल मध्ये घरच्या टीशर्ट हाफ चड्डीवर जेवलेला माणूस मी 😂. I don't give a shit about ethics and manners. त्यानंन्तर मॉल मधेच इथे तिथे भटकून निघालो मॉल च्या दारावर आलो शीतल ने पिवळा गुलाब हातात दिला. अक्षरशः सुखाची वीज अंगावर कोसळली असा भास झाला. सेम त्या थानोस वर थॉर ने स्ट्रॉम ब्रेकर फेकलेली तसा फील झाला पण सुखदायक. माझ्यातल्या मेलेल्या निरपेक्ष प्रेमाच्या भावना जागृत झाल्या. हाही एक साधनेचा प्रकार असतो हे मला हल्ली समजलेलं समोरचा आपल्यावर प्रेम करत नसला तरी आपण कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता फक्त प्रेमाने त्या व्यक्तीशी समाजाशी राष्ट्राशी विश्वाशी वागण ही उच्च कोटीची साधनाच आहे.माझे आनंदाश्रू रोखू शकलो नाही. मला साधना करताना चंदन आणि गुलाब अगरबत्ती लावून कर असं सांगितलंय चंदन दत्त महाराजांना आवडतो तेच कलियुगाचे तारणहार म्हणून चंदन. पण गुलाबाचं कारण काय मला सापडत नव्हतं. एक वेगळं पुस्तकं वाचलं त्यात होत गुलाबाचा सुगंध हा आपल्या आत्म्याचा सुगंध असतो हे एक कारण सापडलं तरी मनाची शांती झाली नव्हती. शीतल ने दिलेल्या गुलाबाने आणि मी ते खोलवर हुंगल्याने मला जाणवलं का गुलाब. आजच्या हुकअप फकअप च्या जमान्यात सुद्धा तुम्ही जे जगाला देता ते तुम्हाला अनेकपटीन परत मिळत हा निसर्ग नियम कार्यान्वित होताना दिसला. तिने गुलाब दिला त्या क्षणाला मला माझ्या जीवनातली सगळी घडून गेलेली दुःख, जीवनात मिळालेले नकार,
झालेली फसवणूक सगळं एका क्षणात झरकन नजरेसमोरून गेल. लहानपनापासुन सतत झालेली अवहेलना अपमान सोसलेल दुःख प्रेमासाठी मिळालेले नकार यामुळे स्वभाव असा बनला कि हे सुख वगरे सगळं खोटं हे मुळात आपल्यासाठी बनलंच नाहीये ही फक्त पडवळची मक्तेदारी आपण आपली एक किडनी आणि थोडंफार वाट्याला येतंय ते उष्ट खरकटं जगणं कुढत जगत राहायचं किंवा आपल्या पेक्षा जास्त दुःखी लोकांकडे बघायचं आणि आपण समाधानी आनंदी आहोत असं मनात म्हणून पुढे व्हायचं. दुसऱ्याला जमलं तर हसवायचं. त्यात भर पडली 7वीत वाचलेल्या अध्यात्मिक पुस्तकांची संत साहित्याची. जग मोहमाया वगरे आहे टाईप भाष्य. मला स्वतः ला त्यामुळे दुःख च खरं सुख खोटं असं काही गणित डोक्यात बसलेल. त्यामुळेच डीजेला नाचून पण आत पोकळ पणा जाणवायचा. त्यामुळेच स्वाभिमानाच्या कितीही चिंध्या झाल्या तरी प्रणालीशी बोलायचो.त्यामुळेच प्रियांकाने भांभीड शी सेटिंग लावली तरी मी माघार घेतली.कारण माशेलकर चा नकार च माझ्या जगत राहण्याच इंधन बनलेलं. मला नाडी ज्योतिशाने पण सांगितलेलं माझं नक्षत्र शनीच आहे त्यामुळेच मला दुःख आवडत त्याला कवटाळून बसायला बर वाटतं.पण या गृहीतकाला सुद्धा तडा जायचाच होता त्यासाठीच जीवनात गोराई आलं सायकल आली एम एस सी आलं उत्तन आलं मानोरी आलं चेना नदी असंनस धरण कामन किला आला लोहापे आलं झोमॅटो गोल्ड आलं शीतल आली थोडा पैसा कमावू लागलो ते पण मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग कॉलिंग वगरे झाल्यावर कोडींग असं सगळं करत करत आता तर कार मुळे स्टेशनं पासून दूरचे किल्लेही खुणावू लागले माझी थोडीफार सॅडीझम पासून सुटका झाली माझा प्रत्येक वाढदिवस थोड्या फार फरकाने का होईना वाईटच जातो कधी कधी रडवतो यावेळी सुद्धा रडवलं पण चांगल्या अर्थाने