भेटली तू पुन्हा... - भाग 12 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 12

 
"बिन कामाचे आहात सगळे तुम्ही, एक मुलीला शोधता येत नाहीये तुम्हाला" रुद्र आपल्या माणसानंवर रागवत होता.
 
 
"बॉस....पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ पाहून झालं पण मॅडम भेटल्या नाहीत" एक जण घाबरतच बोलला.
 
 
 
"तू रे! तू कुठे कुठे शोधलं?" रुद्र चा असिस्टंट दुसऱ्या व्यक्ती ला विचारू लागला.
 
 
 
"आंध्रप्रदेश, तामिळनाडू...."
 
 
 
ज्यांना जी जी राज्य वाटून दिली होती ते ते सांगत होते.
 
 
 
 
कोणालाच रुद्र ची बहीण भेटली नव्हती.
 
 
 
शरद आपला नाकावरचा चष्मा वरती सरकवत सार काही पाहत व ऐकत होता.
 
 
"साल्यानो, तुम्हाला मी याचे पैसे देतो का हा..."
रुद्र त्या माणसाचा कॉलर पडकून रागाने बोलत होता.
 
 
 
 
"सॉरी बॉस , पण आता एकच ठिकाण राहील आहे"
 
 
 
"कोणतं?"
 
 
 
"महाबळेश्वर..."
 
 
 
 
"तिथे तर खूप थंडी असते ना" शरद गडबडीने पुढे येऊन बोलला.
 
 
 
"हो ! पण पूर्ण भारत भर फिरलो तरी मॅडम सापडत नाहीत म्हणल्यावर "
 
 
 
"मग महाबळेश्वर च कशा वरून , हिमाचल प्रदेश कुल्लू मनाली असे भरपूर ठिकाण आहे जिथे तुम्ही पाहिले नाही" शरद पुन्हा मध्ये बोलला.
 
 
"होय! आम्हीं बॉसना हेच सांगणार होतो"
 
 
 
तसा रुद्र विचारात पडला. त्याला विचार करताना पाहून शरद मनातून थोडा घाबरला.
 
 
 
 
"बॉस, मॅडम कधीच थंडी असलेल्या ठिकाणी नाहीत जाणार" शरद कसबस स्वतःला सावरून बोलला.
 
 
 
 
"हो माहीत आहे मला" रुद्र रागानेच ओरडला.
 
 
 
 
"पण गेली कुठे ती? आख्या भारतात शोधून झालं , एक वर्ष झालं माझी माणसं तिला शोधत आहेत अगदी डोळ्यात तेल घालून तरी ती सापडत नाही म्हणजे कुठे गेली कुठे ती हां..." रुद्र आता शरद च्या कॉलर ला पकडून बोलला.
 
 
 
 
"ते.....ते... मला कस माहीत बॉस" शरद थोडं खोकतच बोलला.
 
 
 
 
"माहीत नाही ना, हुं..... मग तोंड बंद ठेवायचं समजलं" रुद्रने त्याचा कॉलर रागाने सोडला, तसा तो कोलमडला .
 
 
 
 
"सॉरी बॉस" म्हणत तो पुन्हा उठून उभा राहिला.
 
 
 
 
"बॉस मुबंई...." एक जण जोरात जवळजवळ ओरडलाच.
 
 
 
"हो, मुंबई गर्दी असली तरी तिथे थंडी नाहीये"
 
 
 
 
"ओके बॉस चार दिवसांत तुम्हाला हवी असणारी व्यक्ती मिळून जाईल" ग्रुपचा लीडर बोलला.
 
 
 
 
"असच झालं पाहिजे, नाही तर आय विल किल ऑल ऑफ यु गॉट इट"
 
 
 
 
"येस बॉस"
 
 
सगळे तिथून निघून गेले. शरद स्वतःला सावरत तिथून बाहेर निघाला होता की मागून रुद्राचा कठोर आवाज त्याच्या कानांवर पडला.
 
 
 
 
" शरद तू या पासून लांबच राहा, समजले का?"
 
 
 
 
 
तस शरद मागे फिरून रुद्र कडे पाहू लागला. रुद्रच्या डोळ्यातून राग ओसंडून वाहत असल्याचा भास झाला.
 
 
" ये...स बॉस" इतकंच बोलून शरद तिथून निघून गेला.
 
 
 
*********
 
 
 
 
" अनु, उद्या पासून पुन्हा तुझं स्कूल आणि माझी ड्युटी सुरू होईल"
 
 
अन्वी आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून, त्याच्या हाताला विळखा घालून बसली होती.
 
 
 
 
" हो ना"
 
 
 
" माझा दिवस कसा जाईल उद्या पासून " आदित्य हताशपणे बोलला.
 
 
 
 
" माझ्यासाठी ही हे सोपं आहे का? "अन्वी त्याच्या खांद्यावर डोकं घासत बोलली.
 
 
"तू रोज येते ना सायकलिंग करायला आता ही"
 
 
 
" हो, पण दुसऱ्या रोडवर" ती पप्पी फेस करून बोलली.
 
 
 
"ओके, देन मी येत जाईन सोबतच जाऊ रोज" आदित्य बोलला.
 
 
"ओके" अन्वी खुश होऊन आदित्यला मिठी मारून बोलली.
 
 
 
**********
 
 
 
"हॅलो! हा बोल"
 
 
 
"ते मुंबईत येत आहेत"
 
 
 
"कधी?"
 
 
 
"आजच"
 
 
 
"ओके, आणखी काही"
 
 
 
" हो, थंडीच्या ठिकाणी ही ते पाहणार आहेत"
 
 
 
"असं"
 
 
 
"तुम्ही त्यांना सावध करा"
 
 
 
"ते मी बघतो, आणखी काही माहिती मिळाली का?"
 
 
 
 
"नाही, पण मालक ठीक आहेत ना"
 
 
"हो, प्रगती दिसते आहे प्रकृती स्थिर आहे"
 
 
"म्हणजे ते चालू बोलू शकतात का?"
 
 
 
 
"अजून तरी नाही, अजून महिना भर जाईल असे म्हणालेत डॉक्टर आता थोडी बोटांची हालचाल दिसली होती."
 
 
 
 
" बर काळजी घ्या , पुन्हा करतो मी कॉल"
 
 
"बर"
 
 
 
 
 
*********
 
 
 
 
 
अन्वी व आदित्य आता रोज सकाळी एकत्रच सायकलिंग करायला जाऊ लागले. स्कुल मध्ये ही अन्वी नेहमी कॉल वर असायची.
 
 
 
रोज चॅटिंग, कॉलिंग सुरू होत. नेहमी शांत दिसणारी अन्वी आता नेहमी हसताना दिसत होती. स्टाफ मध्ये सगळेच तिला या बद्दल विचारू लागले होते. पण ती काही नाही असेच म्हणून विषय टाळत होती.
 
 
 
आदीत्याचे ही हाल असेच होते. साहिल समजून गेला होता की त्याची सुट्टी सत्कारणी लागली. तो ही त्याला चिडवू लागला.
 
 
रूममध्ये असताना जर अन्वीचा कॉल आला तर मुदाम साहिल काही तरी मागे बोलायचा ज्यामुळे आदिला के बोलावे ते समजायचे नाही.
 
 
 
अडीटीचा मोबाईल वाजला की साहिल कुठे ही असला तेही तिथूनच ओरडायचा
 
"अन्वी वहिनी कॅल्लिंग"
 
 
त्याच्या या चिडवण्याने आदित्य व अन्वी अजूनच जवळ येत होते. अजूनच एकमेकांच्या प्रेमात पडत होते.
 
 
 
आई बाबा ही त्या दोघांना अस खुश पाहून आनंदी होत होते.
 
 
 
 
 
गोखले सरांना ही अन्वी मध्ये झालेला बदल दिसतं होता. ती नेहमी कॉल वर कोणाशी तरी बोलत आहे हे त्यांना समजताच त्यांना तिचा राग येऊ लागला.
 
 
एक दिवस स्कुल मधून घरी निघताना वाटेतच गोखले सरांनी अन्वी ला अडवलं.
 
 
"अन्वी थांब"
 
 
"काय काम होत का सर?" ती थोडी घुशात बोलली.
 
 
"हो "
 
 
"उद्या स्कुल मधे बोलू, मला लेट होतो आहे" असं म्हणून ती पुढे निघाली.
 
 
तिचे असे आपल्याला दुर्लक्ष करणे त्यांना पटले नाही. त्याना तिचा खूपच राग आला. व रागातच त्यांनी तिचा हात पकडला.
 
 
गोखलेने अस अचानक हात पकडल्याने ती थोडी गोंधळली व मनातून थोडी घाबरली ही.
 
 
"हे.... हे काय करताय तुम्ही सर, सोडा माझा हात" ती थोडी कचरतच मनातून घाबरून बोलली.
 
 
"सोडू, नाही सोडणार तू फक्त माझी आहेस बाकी कोणाची नाही"
 
 
"हात सोडा माझा"
 
"कोणाशी बोलतेस फोन वर रोज हं..... तुला काय वाटतं मला समजत नाही त्या बँक वल्यावर जीव आला काय तुझा "
 
 
"सर तुम्ही मला हर्ट करताय सोडा मला" ती आपला हात सोडवून घेण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होती.
 
पण सरांची पकड इतकी मजबूत होती की तिला तिचा हात सोडवून घेता येत नव्हता.
 
 
"तू फक्त माझी आहेस फक्त माझी समजलं तुला"
 
गोखले सर तिचा फिरवून पाठीमागे दाबत तिला आपल्याकडे ओढून तिच्या कानांत बोलले.
 
 
यामुळे ती अजूनच घाबरली. तिच्या घश्यातून शब्दही बाहेर पडत नव्हते.
 
 
गोखले सर तिच्या गालांवर आपले ओठ टेकवणारच होते की एक पंच येऊन त्याच्या तोंडावर पडला.
 
 
तसे सर गांगरले. आता नेमकं काय झालं हे त्यांना समजलेच नाही. ते एक पंच मुळे मागे कोलमडून पडले.
 
अन्वी ही पुढे जाऊन धडपडली. आता ती ही समोर काय होत आहे हे पाहू लागली.
 
 
 
"मोरे तू.....तुझ्या तर मी ना आता"
 
गोखले सर समोर मोरे शिपाई ला पाहून दात ओठ खात त्याच्या अंगावर धावून गेले.
 
 
गोखले त्याला मारणार की मोरे त्यांचा हात हवेतच पकडला व दुसऱ्या हाताने त्यांच्या पोटात मारले. तसे गोखले कळवळून मागे झाले.
 
 
मोरे रागाने पुन्हा गोखले सरांच्या अंगावर गेला व त्यांना मारु लागला. हे पाहून अन्वी मनातून खूपच घाबरली होती.
 
 
 
इतक्यात तिचा मोबाईल वाजला. आदित्य चा कॉल होता. तिने स्वतःला कसबस सावरून कॉल घेतला व घाबरतच सगळं काही सांगितले.
 
 
 
काही वेळातच आदित्य ही तिथे आला. सोबत साहिल ही होताच. मोरे अजून ही गोखले सरांना मारतच होता.
 
 
आदित्यला येताना पाहून तो शांत झाला. अन्वी आदित्यला पाहून त्याच्याकडे पळत गेली. ती जाऊन त्याला बिलगली व रडू लागली. आदित्य तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
 
 
 
 
साहिल गोखले सरांच्या समोर जाऊन उभा राहिला.
साहिल व आदित्य ला तिथे पाहून गोखले मनातून बिथरला. काय करावे काय बोलावे त्याला काहीच समजत नव्हते.
 
 
"काय झाले गोखले सर?" साहिल गोखले सरांची कॉलर पकडून बोलला.
 
 
"को....ण....तू... म....म....ला.....जाऊदे" गोखले सर उसन अवसान आणून बोलले.
 
 
 
"हो , जाऊ देणारच आहे तुम्हला आम्ही त्या आधी थोडा प्रसाद हा मिळालाच पाहिजे नाही का मोरे?" साहिल कुत्सित हसत बोलला.
 
 
"आदि बोल काय करू याच" साहिलने आदिकडे पाहून विचारले.
 
 
"जे तुला योग्य वाटेल ते कर, फक्त इतकं लक्षात असुदे की त्याने माझ्या अन्वी वर हात टाकायचा प्रयत्न केला आहे" आदि कडक आवाजात बोलला.
 
"ओके,बॉस" मोरे ही एकदम बोलून गेला.
 
 
"साहिल मी अन्वी ला घेऊन जातो आहे, तू मला नंतर येऊन भेट" आदि साहिल व नंतर मोरे वर नजर टाकून बोलला.
 
 
 
आदित्य अन्वीला आपल्या सोबत घेऊन गेला. ते दोघे जाताच साहिल व मोरे दोघे ही गोखले सरांना बेदम मारले. इतकं की गोखले सर तिथेच बेशुद्ध होऊन पडले होते.
 
 
त्याला अस पाहून साहिलने मोरेला। सरांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सांगितले व स्वतः तिथून निघून रूमवर गेला.