भेटली तू पुन्हा... - भाग 15 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 15











संध्याकाळी आदित्य व साहिल अन्वीच्या घरी तिला भेटायला गेले. घरात अजून ही शांतता होती. हे जाणवताच आदिला काळजी वाटू लागली की, अन्वीची तब्बेत अजून ठीक नाही का?, आई कुठे गेली?


आत येताच त्याने आईला आवाज दिला.

"आई..!"


एक-दोनदा आवाज दिल्यानंतर आईने आतून आवाज दिला.

"ये.. ये..आदि, मी देव घरात आहे"


आईचा आतून आवाज येताच आदि देवघराकडे गेला. साहिल ही त्याच्या मागे मागे निघाला.

"आई, बाबा आले नाहीत का अजून?"


आई हातातील जपमाळ डोळ्यांना लावून बाजूला ठेवत बोलली," येतीलच इतक्यात"


आई उठून मागे फिरली आणि समोर साहिलला पाहून खुश झाली.


"अरे! साहिल बेटा कसा आहेस? खूप दिवसांनी आठवण झाली आईची"


"आठवण तर रोजच येते पण ड्युटी फस्ट नियम आहे आमच्या लिडरचा मग काय बोलणार" साहिल नाटकीपणे दु:खी होत बोलला.


आई काळजीने विचारू लागली,"हो का? खूप त्रास देतो का तुला आदित्य?"



"हो ना, कुठे जायचे म्हणलं तर नाहीच म्हणतो हा, आता लास्ट विक मध्ये मला तुमच्या हातचे कटलेट्स खायचे होते म्हणून म्हणलं चल आईला भेटून येऊ तर चक्क नाही म्हणाला मला हा"


साहिल नाटकीपणे बोलत होता. आदित्या त्याला लुक देत बघू लागला.


"बघा, बघा आई आता ही कसा रागाने पाहतो आहे माझ्याकडे"


"का रे आदित्य ? अस का करतो बिचारा चांगला मुलगा आहे"


"हो खूपच चांगला आहे"



"बर चला चहा करते या बसा इथे" अस म्हणत आई त्याना हॉल मध्ये घेऊन आली.



"आई अनु कशी आहे?" आदित्यच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.



"ठीक आहे आता, झोपली आहे "



"मी जाऊन येतो तिच्याकडे"


आदित्या म्हणाला व आईच न ऐकताच थोडं पळतच अनुच्या बेडरूम कडे गेला.


"अरे आदि ऐक तर..."


"आई तो आता थांबायचा नाही; चला आपण चहा बनवू"


साहिल बोलताच आई हसली व म्हणाली,"हो चल चल"



आदित्या अन्वीच्या रूममध्ये आला. ती अजून ही गाढ झोपलेली होती. आदि हळूच जाऊन तिच्या जवळ बसला. तिचा हात हातात घेऊन तो तिच्या शांत व निरागस, चेहऱ्याकडे पाहू लागला.


तिला अस शांत झोपलेलं पाहून त्याचे डोळे डबडबले. एका दिवसात तिच्या चेहऱ्यावरची चमक, आनंद हरवलं होत. पार सुकून गेल्यासारखी दिसत होती ती.


तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला. औषधांच्या प्रभावामुळे तिला जाग आली नाही. आदि तिच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता भूतकाळात हरवला.



*********


भूतकाळ...



"हेय! लेट्स गो गाईझ..."


आदिच्या कानावर गोड आवाज पडला. मागे वळून तो त्या आवाजाला शोधू लागला. पण कोणीही त्याला तिथे दिसले नाही.


तो पुढे निघाला होताच की साहिलचा आवाज त्याच्या कानावर पडला," हेय! आदि कम, सामान आत ठेवू मग जाऊ बिचवर"



आदि व त्याचे मित्र फिरायला आले होते. नुकतेच ते रिसॉर्टवर पोहचले होते. गाडीतून उतरून तो आजूबाजूचा परिसर पाहण्यात मग्न होता की एका मुलीचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला.



साहिलने सांगितल्या प्रमाणे आदि तो आवाज सोडून बॅग घेऊन आत निघाला. त्यांचा ग्रुप सहाजनांचा होता. अजून दोघे उद्या येणार होते. त्याच काही महत्वाचे काम असल्याने त्यांना आज येणे जमले नाही.

सगळे मस्ती करत निघाले. एकमेकांची टर काढत, एकमेकांची खेचत ते रूममध्ये पोहचले.



साहिल आदिचा सर्वात जवळचा होता. आदिला शांत पाहून त्याला शंका आली.


"काय झाले रे? इतका शांत का आहेस?"



"काही नाही, ते प्रवासामुळे थोडं..."


"ओहह! मग फ्रेश हो थोडा वेळ रेस्ट घे तोवर आम्ही जेवणाची सोय बघून येतो" साहिल बॅग मधून काही तरी काढत बोलला.



रूममध्ये येताच आदी बेडवर पडला व हुंकारला,"हम्मम"



रूम एकच होती पण मोठी होती. आठ जण राहू शकतील इतकी मोठी. बाजूला सर्वत्र काचा होत्या व सर्वत्र पडदे लावलेले होते. पडदा बाजूला करताच बाहेरचा नजारा दिसायचा.


दुपारीची वेळ आणि मे चा महिना असल्याने उन्ह तळपत होतं. उन्हामुळे सारीकडे शुकशुकाट पसरला होता. शांतता असल्याने समुद्राच्या लाटांचा आवाज रिसॉर्ट मध्ये ही येत होता.


विशालने खिडकी ओपन केली. त्या सरशी उन्हाच्या गरम झळा रूममध्ये आल्या. वारा जणू सुट्टीवर गेला होता. यशने उठून फॅन लावले व सगळे दंगा मस्ती करत बसले.


साहिल व यश जाऊन जेवणाची ऑर्डर देऊन आले.


सगळे फ्रेश झाले. तासाभरातच जेवण तयार असल्याचं एका मुलाने सांगून गेला.



साहिल आदीला उठवत बोलला," आदि... आदि... उठ फ्रेश हो जेवायला जाऊ"


त्याला चांगलीच झोप लागली होती. साहिलच्या आवाजाने तो उठला.


अळसावलेल्या आवाजातच तो बोलला," तुम्ही चला पुढे मी आलोच"


तसे सारे जण बाहेर गेले.


"तुला इथलीच एखादी मुलगी शोधू आपण" साहिल विशालला चिडवत बोलला.


"चालेल मला" तो ही दात दाखवत बोलला.



"याला वेडी जरी मुलगी दिली तरी हा खूषच होणार" यश त्याच्या डोक्यात टपली मारत बोलला.



"हो, मासे खायला मिळाले, बिचवर फिरायला मिळाले तर बस आणखी काय हवं" विशाल हसत बोलत होता.



आदि ही फ्रेश होऊन त्यांना जॉईन झाला. सर्वजण बसून हसत गप्पा करत जेवण करत होते. जेवण होताच सर्वजण जवळच्या स्वीमिंग टॅंक जवळ बसून गप्पा मारू लागले.



दिवस थोडा पुढे सरकला तसे ऊन थोडं कमी झाले. त्यामुळे सगळेच समुद्र किनारी जायचा प्लॅन करतात. रिसॉर्ट पासून काहीच अंतरावर समुद्र किनारा होता.


सगळे गप्पा करत निघाले होतेच की विशालला आठवले की कॅमेरा आणायला आपण विसरलो. तसा तो कॅमेरा घेऊन येतो असे सांगून पुन्हा रूमकडे निघाला.





दिवस मावळतीला निघाला असल्याने बिचवरचा नजारा खूप सुंदर दिसत होता. समुद्राच्या फेसलेल्या लाटा, लाटांचा आवाज, आणि समोर सूर्य आपला रंग बदलतानाचे दृश्य पाहून मन हरवून जात होते.



दूरवर पसरलेला समुद्र नजरेत मावत नव्हता. लांब कुठे तरी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटी नजरेला पडत होत्या. काही अंतरावर एका बाजूस आपले पाय जमिनीत खोलवर खंबीरपणे रूतवून डोंगर उभे असताना दिसत होते.



सूर्याचा केशरी रंग समुद्राने प्राशन केल्यासारखे भासत होते. सगळे समुद्रात खेळायला गेले. खूप उशिरापर्यंत पाण्यात त्यांची मस्ती सुरू होती. सारेजण पूर्णपणे भिजले होते.


सूर्याची ड्युटी संपली तसा चंद्र ड्युटीवर येताना दिसत होता. आकाशातील लाल, केशरी, पिवळ्या रंगाची जागा आता काळ्या रंगाने घेतली होती. पौर्णिमा दोन दिवसांवर असल्याने चंद्र आपली ड्युटी चोक बजावताना दिसत होता. सोबतीला टपोर चांदणे आसमंतात आपली उपस्थिती दर्शवत होते.


खूप उशिरापर्यंत मजा मस्ती करून, खूप सारे फोटो काढून ते पुन्हा रिसोर्टकडे निघाले.

चालत असतानाच विशाल म्हणाला,"खूप मजा आली भावांनो..."


यश ही उत्साहाने बोलला,"हो ना.."


साहिलला विशालची मजा घ्यायची अस वाटून तो म्हणाला,"हो ना ... हा विश्या तर मरमेडच(जलपरी) दिसत होता. कसे पोझ देत होता फोटो साठी..."


त्याच ऐकून सगळेच हसू लागले.


विशाल ही साहिलला चिडवत बोलला,"आणि तू कोण बे.. जलपरा का?"


मधेच यश त्याच बोलणं करेक्ट करत म्हणाला, "एक्सक्युज मी तो जलपरा नाही मरमेन असतो..."

विशाल नाटकीपणे हात जोडुन यश समोर थोडा झुकत बोलला,"आली... आली... आपली चालती बोलती डिक्शनरी आली, मरमेन जरी असला तरी त्याला मराठीत जलपराचं म्हणत असतील ना.."


तसा यश त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला,"हो बालका तू ज्या बोलताना छोट्या छोट्या चूका करतो ना त्या सुधारण्यासाठीच माझा जन्म झाला आहे...."


"पण अजून थोडा वेळ आपण थांबायला हवं होतं यार"
साहिल बोलला.


विशाल मुदामहून साहिलला चिडवत बोलला,"हो नेक्स्ट टाईम तू शिखाला सोबत घेऊन ये म्हणजे मस्त एन्जॉय करता येईल तुम्हाला..."


शिखा साहिलला ट्रेनिंगच्या वेळी भेटली होती. तिला पहिल्यांदा पाहताच साहिलला ती आवडली. पण तिचा ऑलरेडी बॉयफ्रेंड होता.

हे माहित असताना ही विशाल त्याची खेचत होता.


साहिल ही आपल्यावर फरक पडला नाही हे दाखवत बोलला,"हो कॉल करून सांगतो तिला की मस्त जागा आहे तू तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन ये एकदिवस नक्की"


तो कितीही नॉर्मल दाखवत असला तरी त्याला झालेला त्रास सर्वांनाच जाणवत होता. तिघे ही त्याच्यवर हसू लागले.


बोलत ते सारे रिसॉर्टमध्ये पोहचले. यश फ्रेश होण्यासाठी गेला. त्यामुळे तिघे बेडवर बसून बोलत होते.


विशाल साहिलला उद्देशून बोलला,"मग तू कधी लग्न करतोय..."


साहिल मनातून दुखावला होता,"मी लग्न करणार नाही "


विशाल हसत बोलला,"का? त्या शिखासाठी"


साहिल विशालच्या डोळ्यात पाहत बोलला,"तस काही नाही, आणि ती आहे खुश तिच्या लाईफ मध्ये तर मी का स्वतःला त्रास करून घेऊ"


विशाल उसासा सोडत बोलला,"हो ते ही आहे म्हणा"


साहिल हसत विशालाच्या पाठीत मारत बोलला,"बाय द वे, तुझं काय साल्या एकीवर तर फिक्स राहा ना, का असच आयुष्यभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणार आहेस?"

विशाल हसत बोलला,"अपना तो फंडा ही यही हे बॉस, जो पसंद आ जाए ओ अपनी"

आदि जो इतका वेळ शांत बसला होता तो बोलला" आशाने, आयुष्यात एकटाच राहशील नेहमी"

विशाल त्याला बघत हसत बोलला," बोलले ... प्रेमपूजारी बोलले"


साहिल ही हसू लागला. त्याला हसताना पाहून आदिने त्याला लुक दिला.

" त्याला लुक देऊ नको ,तू माझ्याशी बोल... मग कधी होणार आहे आगमन तुमच्या ड्रीमगर्लचे आपल्या आयुष्यात"

" लवकरच..." आदी कोड्यात बोलवा तसा बोलला.

साहिलला थोडा अंदाज आला.

त्यामुळे साहिल उत्सुकतेने तयचय जवळ जाऊन बसत बोलला," कोण आहे ती? इथे आहे का? मला ही दाखव ना"


आदिला साहिलच बोलणं ऐकून जाणवलं की त्याला अंदाज आला आहे म्हणून तो पटकन बोलला,"मी अस कधी म्हणालो, मी फक्त लवकरच अस म्हणालो"

साहिल त्याच्या जवळ अजून सरकून बसत बोलला,
"मला माहित आहे बाबा आदिदास कधी असच काही बोलत नाहीत"

यश बाथरूम मधून केस पुसत बाहेर येत बोलला," हो, हे मला ही पटत"

विशाल त्याला बघत बोलू लागला,"साल्या तू काय दरवाज्याला कान लावून बसला होता का बे..."


यश दात दाखवत बोलला," नाही फक्त आदिचं बोलणं ऐकू आलं म्हणून बोललो"



आदि विषय बदलत बोलला," साहिल तू पटकन जाऊन शॉवर घे आणि चेंज कर नाही तर तुला त्रास होईल."


साहिल लगेच टॉवेल घेत बोलला," हो आलोच"



तेव्हाच शेजारच्या रूममध्ये काही मुलींची मस्ती सुरू होती. हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. आदीने कान टवकारले.

सकाळी जो आवाज कानावर पडला तो पुन्हा ऐकू येतो का हे तो पाहू लागला.

यश त्याला अस पाहून म्हणाला,"काय भावा, आता काय भिंतीमध्ये शिरतो की काय?"


विशाल तर तसाच झोपून ही गेला. सगळे फ्रेश झाले तसे विशालला उठवू लागले. पण तो काही केल्या उठत नव्हता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला.

पण तरी ही तो उठत नाहीये हे पाहून यश म्हणाला," माय बेबी कॅल्लिंग"

हे शब्द कानावर पडताच तो पटकन उठून बसला व मोबाईल कानाला लावला. आता सगळे तोंड दाबून हसू लागले व शांत बसून त्याच बोलणं ऐकू लागले.


"हाय बेबी"


"....." समोरून कशी तरी बोलणं झालं.


"नाही बेबी आताच तासाभरापुर्वीच पोहचलो आहे आणि थकलो होतो म्हणून आलो तस झोपी गेलो"


"........."



"नो बेबी, मी का तुला इग्नोर करेन...? आय लव्ह यु ना बेबी"


"......."


"मिस् यु बेबी"


"ओके बाय, लव्ह यु सो मच बेबी"


"..........."


"ओके बाय.."



यश त्याला एकटक पाहत होता. तर आदि व साहिल त्यांना पाहून एकमेकांना टाळी देत हसू लागले.


"आता आला आहे बाबू माझा हा.." साहिल मागून बोलला.


विशाल पुन्हा बेडवर आडवा होत बोलला,"काय करायचं यार मग, अस नसत सांगितल तर चिडली असती मग रडारड, रुसवा फुगवा"


यश त्याला पाहून बोलला,"बघ हे असे हाल होतात प्रेमात त्यामुळे या झंझटीपासून लांबच राहिलेलं बर असत"

आदि विचारात हरवल्यासारखा बोलला,"रुसवा, फुगवा काढण्यात मजाच वेगळी असते."


विशाल त्याला अस बोलताना पाहून म्हणाला," बघ किती अनुभव असल्यासारखा बोलत आहे " आणि हसू लागला.


साहिल ही हसत बोलला,"मग उगीच त्याच नावं प्रेमपूजारी ठेवलेलं नाही"


आदि हसत बोलला,"आपला कसला ग्रुप आहे रे हा... एकाला प्रेम म्हणजे संकट वाटत म्हणून तो प्रेमपासून पळतो, तर दुसरा आधीच बॉयफ्रेंड असलेल्या मुलीच्या प्रेमात आहे, ती आपल्याला मिळणार नाही हे माहीत असताना ही तिच्यावरच प्रेम जपतो आहे, आणि आपला हा नमुना, प्ले बॉय सारखे महिन्याला गर्लफ्रेंड बदलतो, आणि ते दोन नमुने तर वेगळेच आहेत..."


तसा यश थोडा ओरडलाच," आणि तुझं काय भावा..?, तू एक आहेस की, मुली स्वतःहून समोरून तुला प्रपोज करतात पण तुला तर तुझी ड्रीमगर्ल प्यारी आहे. माझं ऐक तू ही या फंद्यात पडूच नको ना..."



विशाल बोलला,"हो का... तू उद्या उठून संन्यास घेशील म्हणून का आम्ही ही भगवी कपडे घालून तुझ्या मागे मागे यावं का बे?"


यश साहिलला बाजूला करत त्याच्या शेजारी बसत आवेशाने बोलला,"काय हरकत आहे, डोक्याला शॉट लावून घेण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात राहिलेलं काय वाईट आहे ना"



आता विशाल हात बांधून त्याच्या समोर जाऊन उभा होता.

विशाल खोडकरपणे बोलला,"काय निसर्ग?? निसर्गाचे खूप सारे खेळ आहेत ते ही खेळलेच पाहिजेत ना, निसर्गाच्या विरोधात जाऊन मी काहीही करत नाहीये, सो चिल ड्युड"


साहिल मधेच बोलला व हसू लागला,"हो ... माहीत आहे ना मला तुझ्या मंजूची दासता..."

विशाल आपली बाजू मांडत बोलला,"ये ती वेडी होती रे तिने वेळेवर मला सांगितलेच नाही तर मी काय करणार होतो ना..."


खूप उशिरापर्यंत त्यांची चर्चा सुरूच होती. नऊ वाजले तसे त्यांना भुकेची जाणीव झाली.


विशाल घड्याळात बघत बोलला,"बास ... या गोष्टीने काही आपलं पोट भरणार नाहीये, तर आता चला जेवायला जाऊ"


यश बोलला,"हो चला, तू काय सुधारणार नाही मग काय उपयोग आहे या वादाचा"


सगळे जेवण्यासाठी बाहेर गेले. रिसॉर्ट मध्ये रूमपासून काही अंतरावरच स्वीमिंग टॅन्कजवळ डायनिंग ची सोय होती. सगळे त्या बाजूला जाऊ लागले.

विशाल आणि यश चे अजून ही त्याच गोष्टीवर मतभेद सुरू होते.


त्याना इग्नोर करून आदि म्हणाला,"साहिल चल आत जाऊन पानं बाहेर लावण्यास सांगून येऊ"


"हो चल" साहिल ही बोलला व मागे फिरला.


ते दोघे बोलत आत जात होते की आदिला कोणा मुलीचा धक्का लागला.


तशी ती मूलगी मागे न बघता जाता जाताच "सॉरी" म्हणून गेली.


आदि ही बोलण्यात गुंतला हसल्याने तो ही तिला न पाहता," इट्स ओके" म्हणाला व आत गेला.


पण थोड्याच वेळात त्याला तो आवाज आठवला तो आवाज तोच होता ज्याचा तो सकाळी पाठलाग करत होता. तो धावतच बाहेर आला पण तिथे कोणी ही नव्हते.


एक हात कमरेवर तर दुसऱ्या हात केसातून फिरवत तो निराश स्वरात म्हणाला,"डॅमिट, पुन्हा मी तिला पाहू शकलो नाही...कोण आहे ती? मला एकदा तिला पाहायचं आहे?"



******


पुढे काय होईल? ती अन्वीच आहे का दुसरी कोणी? आदि तिला पाहू शकेल का? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचा.


भाग कसा वाटला नक्की सांगा.

धन्यवाद!

वाचत रहा...खुश रहा...🤗