भेटली तू पुन्हा... - भाग 17 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भेटली तू पुन्हा... - भाग 17








आदि अन्वीचा हात हातात घेऊन जुन्या आठवणीमध्ये हरवला होता.


साहिलने सर्वांना तिचे फोटो जे आदिने सकाळी बिचवर घेतले होते ते सर्वांना दाखवले.

"काय आदि तू ही या झमेल्यात पडत आहेस, प्रेमापासून लांबच राहा" यश बोलला.

"होय संन्यासी बाबा,तू एक प्रेमपूजाऱ्याला पूजा करू नको अस कस सांगू शकतो" विशाल व राहुल एकदमच बोलले.


आपल्या फ्रेंड्स सोबत बोलून आदिने त्या मुलीशी दुसऱ्या दिवशी बोलायचे असे ठरवले व झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही सकाळी तो लवकर उठून बिच वर गेला व तिला शोधू लागला पण त्याला ती कुठेच दिसली नाही.

खूप उशिरापर्यंत वाट पाहून तो रिसोर्टला परत आला. त्याला अस उदास पाहून राहुल त्याच्या जवळ आला.

"काय झाले? अस का मूड ऑफ बनवून आला आहे, झाली ना भेट"

"नाही, ती गेली" आदि उसासा सोडत बोलला.

"क्या! मगर क्यू चली गऐ" जित ही उठून बसला.

"आता का म्हणजे मी काय सांगू" आदि म्हणाला.

"दिलं छोटा मत कर, तेरी नशीब मैं अगर ओ होगी तो तुम्हे फिरसे मिलाएगी ऐ जिंदगी"

"होप सो..."

"तू रिसेप्शन वर चौकशी केली का?" साहिल बोलला.

" हो तिथर ही चौकशी केली पण ते म्हणतात की आमच्या कस्टमर बद्दल आम्ही अस सांगू शकत नाही" तो उदासपणे बोलला.

"जो होता हें ओ अच्छे के लिए ही होता हें मेरे भाई" यश झोपेतून उठत बोलला.



********


अन्वीला जाग आली तसा आदि वास्तवात आला. ती डोळे किलकिले करून त्याला पाहू लागली.


"अनु बर वाटतं ना आता?" आदि तिच्या केसातून हात फिरवत प्रेमाने बोलाल.


तिने फक्त हो म्हणून मान हलवली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

"थांब मी आई ना बोलावतो"


अस म्हणून तो उठत होताच की तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवले.

" काय झाले अनु? काही हवं आहे का?" तो तिच्या जवळ बसत बोलला.

तशी ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे पडून राहिली.

"बर वाटत नाहीये का अजून ही तुला, डॉक्टरांना बोलवू का मी?"

"नको, तुम्ही जवळ बस फक्त बाकी काही नको मला"


"बर मी इथेच आहे, कुठे ही जाणार नाही"


खूपवेळ दोघेही शांत बसून एकमेकांचा श्वास अनुभवत होते. अन्वीचे डोळे भरून आले होते त्यामुळे डोळ्यातील पाणी आदिच्या कपड्यांवर पडले. तस तो चमकला की का ही रडत आहे.


त्यांने तिला दूर केले व उठवून बसवले. तिचा चेहरा ओंजळीत घेत तो बोलला," कांस्य झाले अनु भीती वाटतेय का कशाची?"

तीने नाही मध्ये मान हलवली. ती नाही जरी म्हणत असली तरी तिच्याकडे पाहून लगेच समजत होत की ती घाबरली आहे.

"मग काय झाले सांगिशील का मला "

"ते मला स्वप्न पडले" ती घाबरत बोलली.

"कसलं?"

"ते मी कारने कुठे तरी निघाले होते आणि माझी कार दरीत कोसळली आणि गाडीला आग लागली" ती थोडी घाबरून रडत बोलली.

तिचे बोलणे ऐकून आदि चमकला, कारण ती जयला स्वप्न म्हणत होती ते खरच तिच्या बाबतीत घडलं होत. आता त्याला तिची जास्तच काळजी वाटू लागली होती.



*********


"हॅलो बॉस, मी जगू"

"बोल" रुद्रचा रूक्ष आवाज आला.

"ते मॅडम महाबळेश्वर मधे पाहण्यात आल्या होत्या माझ्या माणसाला" जगू बोलला.

" मग वाट कशाची पाहताय तिला उचलून आना माझ्या समोर लवकर" रूद्र थोडा उत्सुक होत पण रागानेच बोलला.

" हो बॉस दोन दिवसात मॅडम तुमच्या समोर असतील" जगू अस बोलून कॉल कट करतो.

रुद्र आपल्या ऑफिसमध्ये खुर्चीत बसून हसत होता. त्याला अस हसताना पाहून त्याची पीए कम गिर्लफ्रेंड त्याला विचारू लागली.

" काय झालं ? का हसतो आहेस?"

" आता सगळी प्रॉपर्टी माझी होणार आता कोणी मध्ये येणार नाही ना काका ना त्यांची लाडकी लेक"रुद्र अस बोलून हसू लागला.

तशी ती त्याच्या मांडीवर येऊन बसली व एक हात माने मागून खांद्यावर टाकुन बसली. चेहऱ्यावरून बोट फिरवत ती प्रेमाने बोलू लागली.

" फक्त तुझी , मी कोणी नाही का तुझी हा..."

" तू तर आहेसच ना माझी मी माझं सगळं तुझंच झालं ना"

" मग ठीक आहे" अस म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली.


हे सगळं शरद बाहेरून ऐकत होता.
मॅडम सापडल्या म्हणत आहेत म्हणजे मायराचा पत्ता यांना मिळाला अस वाटत आहे.

साहेबांना कळवलं पाहिजे अस म्हणून त्याने खिशातून मोबाईल काढत होताच की रुद्र तिथे आला.

"शरद, तू? इथे? काय करतोय?"

" ते....ते... मी ...फाईल..."

त्याला अस घाबरलेले पाहून रुद्र त्याच्याकडे हसत बघतो.

" फाईल द्यायची होती तर सरळ द्यायची आणि निघून जायचं ना डिटेक्टिव्ह होण्याची गरज नव्हती"


आता शरद पुरताच घाबरला होता.

"तुला इतका घाम का येतो आहे ते ही एसी मध्ये"

" ते...ते... माझी बीपीची गोळी विसरली खायची" तो उसन अवसान आणून हसत बोलला.

" हो का मग जा गोळी खा, आणि पुन्हा जर जासुस बनायचा प्रयत्न केला ना मग मीच देईन तुला गोळी" रुद्र रागाने पण शांतपणे बोलला व हसला.

" हो बॉस" अस म्हणून शरद तिथून निघून गेला.


तो बाहेर गेला व पुन्हा कॉल करण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला व डायल केला व बोलू लागला.

तो बोलत होताच की कोणी तरी मागून त्याच्या हातातील मोबाईल काढून घेतला. तो रागाने मागे कोण आहे हे पाहण्यासाठी वळला तर त्याचे तोंडचे पाणीच पळाले.

कारण समोर रुद्र उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य दिसत होते. फोन वर हॅलो हॅलो म्हणण्याचे आवाज येत होते.



रुद्रने खिशातून गन काढली व डायरेक्ट त्याच्या कपाळावर गन ठेवली. तस तो जास्तच घाबरला.

" बॉस बॉस, मला माफ करा मी खप वर्ष्यापासून तुमच्याकडे कामाला आहे...." तो हात जोडून बोलू लागला.

तोच जून बोलत होताच की गन फायरचा आवाज परिसरात घुमला. शरद निपचित पडला.


"पाशा..."

" येस बॉस"

"आता या मोबाईल वरून जो नंबर डायल केला होता तो चेक कर कोणाचा आहे? कुठला आहे? सगळी इन्फो मला हवी संध्याकाळ पर्यंत"


" येस बॉस ; ओके बॉस"






******




काही दिवसांनी व्हॅलेंटाईन डे असल्याने आदि अन्वीला घेऊन कँडल लाईट डिनर ला गेला.


कॉर्नरचा टेबल बुक करून त्याने तिच्यासाठी खूप सारी अरेंजमेंट केली होती. दोघे ही खूप खुश होते.


एकमेकांच्या हातात हात घालून लव्ह बर्डस बोलत बसले होते की एक बुलट काचेतून आत आली व अन्वीच्या केसाजवळून जाऊन भिंतीत लागली.


ती खूपच घाबरली, आदीला ही काही समजले नाही त्याने ज्या दिशेने बुलट आली त्या दिशेला पाहिले तर एक शूटर तिथे त्याला दिसला.



दोघे ही टेबल खाली वाकून बाहेर बघत होते. बाकी कस्टमर्स ही घाबरून टेबल खाली लपले होते.



आदि हळूहळू दरवाज्याकडे जाऊ लागला.

"आदि डोन्ट,प्लिझ" अन्वी घाबरून रडवेल्या सुरात बोलली.

"काही होणार नाहीये तिथेच थांब मी आलोच"

अस म्हणून आदी तिथून बाहेर निघून गेला. अनु ही तिथून उठली व अश्या ठिकाणी थांबली जिथुन तिला बाहेरच दिलेस.

आदि बाहेर गेला तसा गोळीबार सुरू झाला. आदीनेही पायाजवळ ठेवलेली आपली गन काढली व भिंती आड जाऊन गोळी बार करू लागला. सात आठ जण होते ते.



साहिल ही आता तिथे आला होता तसेच मोरे ही तिथे गोळीबार करताना दिसत होता. अन्वीला समोरच हे सर दृश्य पाहून काहीच समजत नव्हते.


आदि जो एक बँकेत सिए चे काम करयो त्याच्याकडे गन कशी काय आली? साहिल ही इथे आहे तयचय ही हातात गन दिसते; आणि मोरे... मोरे तर स्कूलमध्ये पिऊन च काम करतो तो ही इथे असा....?


ती चक्रावली होती या सगळ्या घटनेने. ती शॉक होऊन समोरच नजरा पाहत होती.


काही वेळात गोळ्या संपताच आदि त्या गुंडांच्या अंगावर धावून गेला व त्यांच्या सोबत फाईट करू लागला. खूप उशिरापर्यंत फाईट केल्यानंतर ते गुंड काही जखमी होऊन तर काही गोळी लागून खाली कोसळलेले दिसत होते.


सगळं शांत होताच आदिने खिश्यातील रुमाल हातावर बांधला. एव्हाना साहिल व मोरे त्याच्या जवळ आलेले.

"कोणी पाठवलं यांना काही समजलं?"

"हो रुद्र..." साहिल बोलला.

"काय? पण हे कसं शक्य आहे आपण तर तिला मृत ठरवलं होतं, ना मग त्याला कसे समजले?" आदि शॉक होऊन विचारत होता.


"गोखलेचा कारणामा..." मोरे बोलला.

"म्हणजे ? मी नाही समजलो"

"ते अस आहे ना सर, गोखले हॉस्पिटलमधून घरी येत होता तर त्याला वाटत रुद्र ची माणस भेटली. बोलत बोलता समजलं की ते कोण मायरला शोधायला आलेत. मग त्या माणसाने फोटो काढून त्याला दाखवला आणि बदल घेण्यासाठी गोखलेने मॅडमांचा पत्ता सांगून रिकामा झाला"


"आता कुठे आहे तो...?"


"माझ्या रूमवर ठेवलं आहे त्याला, तुमची भेटी साठी आतुर आहे तो खूप" मोरे मस्करी करत हसला.

"शटअप मोरे, प्रकरण सिरियस अशे आणि यावेळी कुठे मस्करी करता" आदि म्हणाला.


"हो सॉरी तुमची डेट होती आज पण यांनी पाणी ओतलं त्यावर" मोरे हसू दाबत बोलला.

साहिल ही ओठ दाबून हसत होता कारण मोरे आज खूपच बोलत होता पण आदिचा मूड ठीक नव्हता. आदिचा मूड ठीक नसताना त्याला सहज जरी काही बोलले तरी तो चिडतो आणि हा तर अस म्हणून साहिल हसत होता.

"बेटा, तू तो गयो अभी" अस मनातच म्हणत साहिल ओठ दाबून हसत होता.

"तुला खूप हसू येत आहे ना" आदि साहिल कडे पाहून बोलला.

तस साहिल तोंडावर हात ठेवून शांत झाला.

"मोरे तुम्ही..." आदि बोलतच होता की मागून अन्वीचा आवाज आला म्हणून तो शांत झाला.


"हु आर यु?" अन्वी थोडी रागाने व सवंशायाने विचारत होती.

वातावरण गरम झालेलं पाहून साहिलने मोरेला इशारा केला व तिथून निघून गेले.

"का...काय विचारतेस तू शोना मी आदि तुझा आदि" आदी हसत तिला जवळ घेत बोलत होता.

तिने रागाने त्याला दूर केले व बोलली," खोटं साफ खोटं"

"अरे बाबा खरच मी जो आहे तो तुला माहीत आहे असाच आहे"

" घे माझी शपथ आणि सांग की तू कोण आहेस?"

आता मात्र आदि शांत झाला. ती रागाने त्याला पाहत होती. डोळे तर सतत वाहत होतेच. तो खाली मान घालून उभा होता तर ती त्याला एकटक बघत होती.

पण दोघेही शांतच होते.