विक्याचं प्रेम Geeta Gajanan Garud द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विक्याचं प्रेम

विक्याचं प्रेम


©®गीता गरुड.

काय यार विक्या फोनबिन नाय तुझा. असतोस कुठं हल्ली? दोस्तांची याद करत जा अमवासेपुर्णिमेला.

बस काय भावा. तुम्ही तर दिलात अहात माझ्या. तुमची आठवण कशाला काढली पायजेल!

दिलात आमी?

मंग

नाय म्हंजे भेट तू मला हाटेलात. जरा नाश्ता करु. आज मी तुला ट्रीट देतो चल.

बरं. येतो दोन तासात येतो. तळ्याजवळच्या हॉटेलजवळ येऊन थांब तू.

(विकी सगळं आवरुन दिप्याला भेटायला निघतो. दिप्या येऊन थांबलेलाच असतो. दोघंजणं हॉटेलात शिरतात नि जरा मागच्याच बेंचवर बुडं टेकवतात. दोघांच्या आवडीचा मिसळपाव येतो.)

हायबीय केल्यावर दोघं मिसळपाव खाऊ लागतात.

काय मंग..दिप्या विचारतो.

कुठं काय?..विक्या

तू काय मांजर हायस व्हय?😼

म्हंजे?🙄

मांजर डोळं ढापून दूध पितं तसं तू राणे सरांच्या पोरीबरुबर.💕

तुला कोण बोललं?☹️

"आरं मर्दा सांगाय कशाला पायजे..अशा बातम्या काय लपून र्हात्यात व्हय. गावभर पसारलय..तू नि ती शर्मिली का फर्मिली दोगं सिनमाला जाता त्ये."💏

"आनि काय बोलत्यात लोकं? लोकांचं काय आयकू नगं?"

"आरं फुकनिच्या..लेका विक्या..टाळी येका हातानं वाजत न्हाय. लोकांना सूत गावल्याबिगर लोकं स्वर्ग गाठत नायत. हे बग फोटू. ही तुज्यापाठी गाडीवर तुला चिटकून कोन हडळ बसलीय व्हय रं?"😱

आता मात्र विक्या संतापला.

दिप्या, शर्मिलीला कायबी बोललेलं मी खपवून घेनार न्हाय. सांगून ठिवतूय.😡

का रं आता का? दिप्यानं विचारलं.

माझं लई पिरेम हाय तिच्यावर. आमी आणाभाका घितल्यात पिरतीच्या. लगीन करनार हाऊत आमी.👨‍❤️‍👨

घरी ठौक हाय का? दिप्याने विचारलं.

माझी माय म्हंती,"कायबी कर तिकडं. गाढवीनीशी केलंस तरी इचाराया येत नाय मी तुला..पन शर्मिली घरात सांगाय घाबरती. त्यो राणे सर ठौक हाय नं तुला कसला तापट हाय त्यो."

"मंग कशापायी त्या शर्मिलीच्या नादी लागतुयास..सोड नाद तिचा." दिप्या समजावतो.

"दिप्या..दिप्या या कटाची शपथ घिऊन सांगतो. आमचं पिरेम अमर है."👩‍❤️‍👩

"खरं?"

"गळ्याशपथ" विकी गळ्याला हात लावून म्हणतो.

"विक्या लका तुझं त्ये अमर पिरेम प्रायव्हेट रुममधनं भायर पडतय बघ. जिन्याकडे बघ जरा.(जिन्यात शर्मिली नि तिचा हात हातात धरुन पैलवान राजन खाली उतरत असतात.)👫

शर्मिलीला राजनसोबत बघून विकी थरथर कापू लागतो. तो राजनचं काहीच करु शकणार नाही हे त्याला ठाऊक असतं.

"यार दिप्या" विक्या रडवेल्या आवाजात म्हणतो.😭

"बघ की रताळ्या अमर पिरेम बघ तुझं. कसं हाटेलानी उंडारतय. किती पैकं घालवलंस हिच्यावर?"

"धा बारा हजार." विकी खालच्या आवाजात उत्तरतो.😦

"आरं भेंड्या आमाला सिंगल चाय पाजायची तर पैसा सुटत नै तुझ्या हातातनं नि त्या गुलछडीवर. दिऊ का येक ठिऊन." दिप्या त्याच्या गालावर मारण्याची एक्शन करतो.

"दिप्या यार, मला कायबी म्हन पन तिला कायबी म्हणू नगं. माझं पयलं पिरेम हाय ती."😥

"झक मार तिकडं. मिसळीत घाल तुझं पिरेम. आयबापाला स़ाभाळायचं टाकून पोरीवर पैसे उधळायलास.

"मंग काय क्रु मी आता. त्या राजनच्या तंगडीएवढाबी नाय जीव माझा."😓

"मंग सोड तिचा नाद. नैतर करटीत जीव दि तीन डोळ्याच्या. मी चलतु आता."

"ये आरं मितरा.दिप्या..पिरेमभंग झालाय माजा. तुला कायबी वाटत नाय का मित्राबद्दल. काय क्रु मी.." विक्या रडायला लागतो.😥

"हे घे ढेकून मारायचं ओषध. वत पान्यात नि टाक पिऊन." दिप्या म्हणतो.

"आरं दिप्या.."

"पी की मर्दा. पिरेम अमर हाय नं तुमचं. दोन म्हयने घरात पगार दित नायस पिरेमापाय. आता पिरेमासाठी ओषध पी नि हो लका गार येकदाचा. मी चार खांद्याची यवस्था करतो तवर."

"संपलं पिरेम संपलं या क्षणाला. तुकडा पाडला त्या पिरेमाचा." विक्या पावाचा तुकडा तोडत म्हणतो. नि वेटरने परत आणून दिलेली कटाची वाटी तोंडाला लावतो.

इतक्यात विकीच्या फोनवर मेसेज. दिप्या फोन उचलतो नि वाचतो.

हाय पिल्लू..कुठैस..शर्मिली

पिलू गेलंय हगाया. येती का धुआया..दिप्या टाइपतो.

व्हॉट😡😡..शर्मिली.

--समाप्त