चंपा
"हा हा क्यू नहीं… जा वो उसके घर ही गया होगा केसेभी करके चंपा चाहीये।"
"जी..." चाचा बंड्या निघायला लागणार इतक्यात
"रुक पाटील मुझे फोन करने वाला हे। उसका पता पाटील देगा हमे.. "
पाटील चा फोन आला चाचाने अड्रेस घेतला आणि स्वतः बंड्यासोबत बाहेर पडला.
"चाचा तुम कायको आता में जाके देखता तुम तकलीफ मत लो।"
बंड्याने कॉटर मधला शेवटचा एक मोठा घोट एक दणक्यात संपवला.
"बंड्या मेरा खुदपे भरोसा नही तुझपे क्या भरोसा करू… गाडी स्टार्ट कर ... आज तो साली मिलेगी ही मिलेगी और आज रात पहिले मैं..." चाचा मनापासून जोरात हसला.
चाचाचे हसू बघून बंड्याला राग अनावर होत होता. काहीही न बोलता त्याने गाडी स्टार्ट केली… मनाशी त्याचे विचार सुरू होते. "क्या करू अभि इसको इधरही खतम करू या चंपा को इस के हवाले करू? चंपा मेरे पास तो नहीं आ सकती। लेकिन मै इस चाचा के हात चंपा को नही लगने दूंगा| चाचा को तो में अभि खतम करूंगा लेकीन ये पाटील पिछे पिछे कभी भी आ सकता हें।"
"चंपा आपल्याला पटकन निघायला पाहिजे. तुला शोधायला ते ऑफिस पर्यंत पोहचले घरापर्यंत सहज पोहचतील." बाहेर विजांचा कडकडाड सुरू होता...पाऊस केंव्हाही धो धो कोसळेल अशी परिस्थिती होती.
"अश्या अवस्थेत कसे बाहेर पडणार आपण…? किती लागलय तुम्हाला?" चंपा काळजीने बोलली.
"मला काहीही झालेले नाही तू नको काळजी करू.. आत्ता बाहेर पडणे जास्त गरजेचं आहे. आपण सकाळ व्हायची वाट नाही पाहू शकत."
"ठीक आहे." रामने गाडी स्टार्ट केली चंपा त्याच्या जवळच्या सीट वर बसली. जोराचा वारा वाहत होता.
"कुठे जायचे?" चंपाने प्रामाणिक प्रश्न विचारला.
"आधी मी देशमुख साहेबांना प्रोसेस कुठपर्यंत आली ते विचारतो...मग ठरवूयात."
"मला वाटत तुम्ही सिद्धार्थ सरांना फोन करून कळवायला हव."
"सगळ सोडून आपल्याच मागे येइल तो... आपल्याला जमेल तसे करुयात अगदीच गरज पडली तर मी बोलेन सिद्धार्थ किंवा काकासोबत." रामने गाडी जोरात घेतली.
बंड्याला वाटत होते की रस्ता चुकवता आला तर बर होईल चंपा बाहेर पडली तर बरं नाहीतर अवघड होऊन बसेल.
"ये रास्ता बराबर हे ना?" चाचा बोलला तसे बंड्या भानावर आला.
"हा चाचा बराबर हें पांच मिनीट मे पोहचेंगे।" बंड्याने त्याच्या मानेचा घाम एक हाताने पुसला आणि गाडी एका गेट जवळ थांबली.
"चल… "
चाचा तावातावाने गाडीच्या बाहेर आला. बंड्या त्याच्या पाठोपाठ उतरला गाडीचा दरवाजा लावला आणि गेटकडे पाहीले गेटला कुलूप पाहून चाचाने गेटवर एक लाथ मारली .
"साली लोंडे के साथ इधारसेभी भाग गयी। चाचा कोठे पे जा तू मे देखता उसे।"
"नही अब मे चूप नही बैठेगा।" चाचाचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. चाचाने खिशातून मोबाईल काढला.
"देशमुख सून… एक पेटी भेजता मेरा काम होना चाहीये| बंड्या अब तू चल साली ने बहुत भगया अब उसकी बारी...देशमुख को एकही पेटी बस हें।"
बंड्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं होतं. "चंपा को चाचा नही छोडेगा। मुझेही कुछ तो करना पडेगा। राम का नंबर हे मेरे पास इसें कोठी पे छोडेगा और उसे बचाने के लीये निकलूनगा।"
राम तुफान पावसात गाडी चालवत होता. चंपा खिडकीच्या बाहेर मुसळधार पाऊस बघत होती. राम एक हाताने ड्राइव्ह करत होता तर दुसऱ्या हाताने देशमुख साहेबांना फोन लावत होता.
"हॅलो हा देशमुख साहेब... आपलं काल बोलणं झालं होतं. होय मी आत्ता बाहेर पडलोय तिला घेऊन. हायवेला टच...ओके मी इथेच थांबू …?"
रामने गाडी बाजूला घेतली.
"हॅलो चाचा देख 'तेरी कॅश मुझतक पोहची भी नही और पता मिल गया इस जगह पोहच दोनो हायवे पे मिलेंगे. "
चाचा उठला आणि तडक गाडी काढून निघाला बंड्याने त्याच्या मागोमाग गाडी काढली आणि त्याच्या पुढे निघाला.
रामला अननोन नंबर वरून फोन आला.
"चंपा… हा नंबर ओळखीचा आहे?"
चंपाने रामच्या हातातला फोन घेतला आणि दचकली.
"बंड्या... हा बंड्याचा नंबर आहे...ह्याला कोणी दिला नंबर?"
"घे बघ काय म्हणतोय... तसेही आपण खूप लांब आलो आहोत आणि देशमुख साहेबानी थांबायला सांगितले म्हंटल्यावर काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल डोन्ट वरी… फक्त फोन स्पीकरवर ठेव."
चंपाने फोन घेतला…आणि स्पीकरवर ठेवला … रामने रेकॉर्डिंग ऑन केले.
"हॅलो…"
"चंपा मे बंड्या बात कर रहा हूं। सून फोन कट मत कर। देख चाचा तुझे नही छोडेगा तू किधर हे बता ने तुझे भागने के लिये मदत करूंगा।वो उसने देशमुख को एक पेटी दिया हे कैसे भी तेरा पता निकाल लेंगे।"
रामला घाम सुटला म्हणजे म्हणून त्याने आपल्याला इथे थांबायला सांगितले.
रामने चंपाच्या हातातून फोन घेतला.
"देख बंड्या हम अभी हायवे पे हैं। मे अभि यहा से निकलता हूं । नहीतो.." तेवढ्यात दोनचार गाड्या त्याला त्याच्या दिशेने येताना दिसल्या बंड्या वो लोग यहा पोहचे. बंड्याने गाडी स्पीड ने घेतली.
राम गाडी स्टार्ट करत होता मात्र गाडी सुरूचहोत नव्हती तोपर्यंत 10- 12 जणांचा घेराव गाडीला पडला. दणकन गाडीच्या काचेवर रॉड पडला आणि खळकन आवाज आला. चंपा खूप घाबरली. राम गाडीतून बाहेर आला.
"साले हमे उल्लू बनाके हमारी लडकी को उठाके लाता…" चाचा पानाची पिचकारी मारली भर पावसात छत्रीखाली उभं राहून चाचा ने त्याच्या लोकांना खुणावले. तसे रामवर सगळे धावून गेले...राम एका एकाला बाजूला सारत होता. राम एवढया लोकांना एकटा झेलत होता हे पाहून चाचाची बोलती बंद झाली.
"सालेमे बहुत दम हें। उस चंपा को बाहेर निकालो।"
तिचे नाव घेतल्यावर राम आणखीच चवताळून गेला एक एकाला हानून पाडत होता. पावसाने आणखीच जोर धरला होता. चंपाला हे सगळं बघून भयानक वाटत होते राम आपल्यासाठी का करतोय ?
"प्रेम…? होय आणखी काय?"तेवढ्यात खाडकन गाडीचा दरवाजा उघडला चंपाला चाचाने बाहेर ओढली.
"साली हराम जादी भागती हें। इतना ड्रामा…"
चंपाला त्याने पुढे ढकलले.
"देख इस मजनू के सामने 'तेरी क्या हालत करता हूं।"
रामलाही सगळ्यांनी मारून मारून बेहाल केले होते. चाचाने तिच्या दंडावरचा ड्रेस फाडला आणि किळस यावी असा हसला.एवढ्या धो धो पावसातही त्याचा हसण्याचा आवाज घुमत होता. रामला कसेसे होत होते त्याच्या डोक्यातून रक्त येत होते अर्धवट शुद्धीत असला तरी चंपा त्याला दिसत होती चंपाच्या ड्रेस फाडला तसा राम बेंबीच्या देठापासून ओरडला.
"चाचा उसे हात मत लगा नही तो..."
"देख तेरा मजनू कैसे फडफडा रहा हे| अभि तो शुरवात हे… बाबू…" चाचा रामकडे गेला आणि सनकन त्याच्या कानाखाली मारली.
"साले … कोठे की लडकी को भगाता… एक दिन क्या वहा दिनमें पाच बार भी आता ना तो भी तुझे यही लडकी देता...हमारी लडकी उठाके तुने बहोत गलती की..." चाचाने आणखी एक गुद्दा त्याच्या पोटात मारला तसा पुन्हा राम कळवळला. चंपा चाचाच्या पायाच्या इथे आली.
"चाचा उसे छोडो मे आती तुम्हारे साथ."
"साली भागती, हरामी आंटी की हरामी औलाद." चाचाने पाय झटकला तशी ती बाजूला पडली.
गरजवेळी आपला पावलोपावली
वापर करून घेणारे भेटतात,
परंतु आपल्याला गरज असते,
तेंव्हा बोटावर मोजण्याइतके ही
लोक जवळ नसतात.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत