Mall Premyuddh - 17 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 17

मल्ल प्रेमयुद्ध

आत्याचा टुमदार बंगला आतून वेल फर्निचर होता पण नारळाची झाडं, समुद्राच्या पाण्याचा आवाजामुळे कोकणचा वारा चांगलाच लागत होता. आत्याने मुलींची सोय वरच्या मजल्यावर केली होती आणि मुलांची सोय आत्याचा मुलगा ऋषीच्या रूममध्ये वरच्या मजल्यावर केली होती. ऋषी बोलका, स्मार्ट आणि बडबडा... वीर आणि संग्रामचा लाडका असतो. त्याच्या रूममध्ये आरामात आठ दहा लोक झोपतील एवढी मोठी खोली होती. आत्याने सगळ्यासाठी पुरणपोळीचा बेत केला होता. तेजश्री काही मदत हवी का म्हणून विचारायला गेली पण आत्या नोकरांना सूचना देत त्यांच्याकडून सगळं करून घेत होत्या.
"का ग बाळा काय पाहिजे का तुला?" आत्याने प्रेमाने तेजश्रीला विचारले.
"न्हाई आत्या तुमाला काही मदत पाहिजे का? म्हणून विचारायला आले." तेजश्री
"मदत कसली मीच काय करत न्हाय, अग करणारी लोक कामाला हायत आपल्याकडं...झालंय आता पान वाढत्याल मग आपण जेवायला बसू." आत्या म्हणाली तेवढ्यात आत्याची मोठी मुलगी स्वप्नाली आली.
"आई झालं ??"

"हो झालं बाळा... बसून घ्या तुम्ही ..." आत्या
"स्वप्नाली कॉलेज नसलं झालं ना ग सुरू..." तेजश्रीने स्वप्नालीला विचारले.
"ताई ऑनलाईन चालू आहे. कॉलेज होईल आता चालू. ये आपण बाहेर गप्पा मारत बसू." स्वप्नाली म्हणाली बाहेर जाऊन डायनिंग टेबल वर बसल्या.
"ताई एक विचारू?" स्वप्नाली
"अग आल्यापासून तू बोलली न्हाईस मला वाईट वाटल अन आता विचारतीस काय?" तेजश्री
"ताई जेव्हापासून समजलं मला की वीरचं लग्न ठरलं तेव्हापासून मला कळत नाही की अस का झालं सगळ्यांना माहीत होतं की मला वीर आवडतो अगदी लहानपणापासून... जसजशी मोठी झाले तसा मी इतर कोणाचा विचार केलाच नव्हता. वीरशिवाय आयुष्यात कोणी दुसरा असेल हा विचार मनाला शिवला नाही आणि हे मलाच काय आपल्या सगळ्या नातेवाईकांना माहीत होते. मग वीरने असा निर्णय का घेतला असेल? माझा विचार आला नसेल का त्याच्या मनामध्ये? तुमचे लग्न झालं तेव्हासुद्धा सगळे आपल्याला जावा म्हणून चिडवत होते." स्वप्नाली बोलत होती.
"हे बघ हे आम्हाला समजलं न्हाय अस न्हाय पण भाऊजीनी असा निर्णय का घेतला हे आम्हालापण समजलं न्हाय. तुला काय वाटत यावर चर्चा नसलं झाली का? पण आबांना वाटलं जस त्याच्या मनात आहे ते होऊदे. शेवटी आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय हाय... तेजश्री
"मी खरंतर आईला हट्ट करून तुम्हाला इकडे बोलवायला लावले कारण मला वीरसोबत बोलायचं आहे." स्वप्नाली
"तुला जर वीर सोबत बोलायचं होत तर मग तू क्रांतीला का बोलावुन घेतलेस?" तेजश्री
"खर सांगू का? माझ्यापेक्षा हुशार कोण आहे जी वीरला एवढी आवडली की त्याच्या मनात माझा विचार डोकावला सुद्धा नाही." स्वप्नाली
"स्वप्नाली भाऊजीना तुझ्याविषयी कधी काही वाटत होतं का? हा मला प्रश्न व्हता.कारण सगळे त्यांना चिडवायचे तुझ्या नावाने पण त्याच्या चेहऱ्यावर कधी काही लवलेश नव्हता प्रेमाचा किंवा तुझं नाव घेतल्यावर हसन नाही की काही विषय ताणला न्हाई. घरातल्यांना वाटत होतं तू वीरची बायको म्हणून यावस तस तर आबांची इच्छा होती. पण भाऊजीनी एकच रट लावली होती लग्न केलं तर क्रांती बरोबर करिन. पण खरं सांगू क्रांतीला हे लग्न न्हाय करायचं " तेजश्री
"का??? तिला लग्न नाही करायचं ते सुद्धा वीर बरोबर? वीर बरोबर??? ठीक आहे म्हणजे मका एक चान्स आहे. ताई मी प्रयत्न करेन." स्वप्नाली
"उपयोग व्हईल अस वाटत न्हाय पण कर प्रयत्न कारण दोन महिने हायत अजून लग्नाला या दोन महिन्यात क्रांतीला भाऊजीनबद्दल के वाटलं न्हाय तर भाऊजी लग्न मोडणार हायत." तेजश्री सगळं सांगून बसली. चिनूने सगळं ऐकलं व्हत. तिला वाईट याच वाटत होतं की तेजश्रीताईने सगळं का सांगितलं हिला...
"हे तायडीला सांगून उपयोग न्हाय तिला काय फरक पडल आस वाटत न्हाय त्यापेक्षा हे संतू अन रत्नाला सांगायला पाहिजे." चिनू वरती गेली. तिने संतुला बोलावून त्यांच्या रूममध्ये नेलं. क्रांतीला जेवायला बाहेर पाठवलं.
"दादा मला तुमच्या दोघांशी बोलयचंय." चिनूने संतू आणि रत्नाला ऐकलेला प्रकार सांगितला. त्यांचा विश्वास बसत नव्हता.
"मी दाजींकडे जातो त्यांना विचारतो हे सगळं काय हाय?" संतुला राग आला व्हता.
"नको संतू... थोडा इचार करू..." रत्ना
"तायडीला सांगायचं?" चिनू
"नको... थांब ती सरळ जाईल अन वीर ला सांगल की, माझं काही बी म्हणणं न्हाय तुम्ही करा स्वप्नाली बरोबर लग्न अन निघून जाईल गावात. समोरच्याला काय वाटलं ह्याचा विचारसुद्धा करणार न्हाय. " रत्ना
"हम्म ते पण खरंच हाय" संतू विचार करत खाली बसला
" आपण जसं चालतय तस चालू देऊ... कारण वीरला जर स्वप्नाली बरोबरच लग्न करायचं असत तर त्यांनी हट्ट का धरला असता की त्यांना क्रांती बरोबरच लग्न करायचंय कारण त्यांचं प्रेम हाय क्रांतीवर. वीर जवळ जर स्वप्नालीन जवळीक वाढवायचा प्रयत्न केला नाहीतर ती प्रयत्न करणार 100℅... तवा क्रांतीला प्रेमाची जाणीव व्हईल."रत्ना
"पण वहिनी तिला न्हाय करायच लग्न दाजीबरोबर मग तिला जाणीव कशी व्हईल." चिनू
"जर ती आधीपासूनच ह्या लग्नाला तयार न्हाय तर तिच्या हातात आयत आगळ मिळल अन ती सगळ्यांना वीर अन स्वप्नाली बद्दल सांगून हे लग्न मोडलं." संतू
"हे बघ जर वीरचं स्वप्नाळीवर प्रेम असलं तर मोडू दे लग्न आपण त्यांच्याबरोबर असणार त्यामुळे वीर कसा वागतोय त्यावरून आपल्या लक्षात येईल की त्याला स्वप्नाली आवडते का त्यावरून ठरवू की काय करायचं पण जर वीरचं क्रांतीवर प्रेम असलं तर तिला वीरच्या प्रेमाची जाणीव व्हायलाच पाहिजेत." रत्ना म्हणाली. ह्या दोघांना रत्नांचे म्हणणे पटले.

सगळे हॉल मध्ये बसले होते. जेवण झाली. रात्री बीच वर जायची मज्जा ऋषी सगळ्यांना सांगत होता. मग संग्राम म्हणाला आपण जाऊन येऊ सगळे तासाभरात... सगळ्यांच आयडिया2 आवडली. सगळे पटापट निघाले. क्रांतीला पटले नसले तरी बाकीच्यांच्या उत्साहापुढे काही बोलली नाही.
तेजश्री आणि संग्राम हातात हात घालून लांब समुद्रकिनारी बसले होते. रत्ना, संतू पाण्यात चालत चालत किनाऱ्यावर फिरत होते. चिनू स्वप्ना आणि ऋषीसोबत गप्पा मारत बसली होती. वीर अपेक्षेने क्रांतीकडे बघत होता मात्र क्रांती मुद्दाम वीरकडे दुर्लक्ष करत होती. वारा क्रांतीच्या भुरभुरणार्या केसांसोबत खेळत होता. लाटांचा रात्रीच्या शांततेत जोरात आवाज येत होता. पौर्णिमेच्या दात्री चंद्र पाण्यात जसाच्या तसा दिसत होता. फक्त पाण्यातला चंद्र लाटांबरोबर खेळत होता अगदी बेधुंद.. आणि आकाशातला चंद्र शांत होता. जणू पाण्याची आणि पाण्यातला चंद्राची गंमत तो काही न बोलता बघत होता. समुद्रात लांब क्रूझ दिलेत होत्या लांबून अगदी मिणमिणत्या लाईट दिसत होत्या. वारा वाहत होता तसा नारळाची सुपारीची झाड जोरजोरात डोलत होती. लाटा पुढे पुढे येत होत्या. अगदी थोडी लोक तिथं होती. तासाभराने ह्या समुद्राच्या जोडीला कोणी नसेल. समुद्रात असणाऱ्या बोटींशिवाय....
स्वप्नालीच्या लक्षात आल्यानंतर स्वप्नालीने वीरचा हात पकडला.
"वीर चल आपण चक्कर मारून येऊ."
"न्हाय बसू इथंच चांगल वाटतय."
"अहो वीर चला पाण्यात। चालायला मस्त वाटत" जवळजवळ ओढत वीरला स्वप्नालीने नेलच. क्रांतीने एकदा बघितलं अन पुन्हा तिच्या विचारात ती हरवून गेली. चिनू ऋषीबरोबर गप्पा मारत असली तरी तीच लगश वीर आणि स्वप्नालीकड होत.

"वीर ... क्रांती जास्त बोलत नाही का? अस जाणवलं मला." स्वप्नाली वीरचा हात काही सोडत नव्हती.
"गावाकडच्या मुली लाजतात ना.." वीर हात सोडवायचा प्रयत्न करत होता.
"अच्छा पण आता पण येताना तिला काहीच वाटले नाही की तुम्ही दोघे एकत्र आला नाही." स्वप्नाली
"थोडं लाजते..." वीरने द्यायचे म्हणून उत्तर दिले.
"बर मग मला का फसवलं???" स्वप्नालीचा प्रश्न एकूण वीर जागेवर थांबला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.

(वीरला प्रश्नाचे उत्तर द्यायचे की नाही हा प्रश्न पडला आहे. स्वप्नाली एवढं करून थांबेल की आणखी काही डोक्यात असेल तिच्या? पण मग क्रांतीला काहीच वाटले नाही तर हे तिघे काय करतील? लग्न मोडेल???? वाचा पुढील भागात..
तुमचीच भाग्या)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED