मल्ल प्रेमयुद्ध - भाग 18 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 18

मल्ल प्रेमयुद्ध

"वीर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे..." स्वप्नालीच्या डोळ्यात राग, अश्रू एकवटले होते.

"हे बघ आपल्याला चिडवत होते हे जरी खरं असलं तरी माझ्या मनात तुझ्या विषयी काही नव्हतं स्वप्ना..." वीर मनापासून स्वप्नालीला सांगत होता.

" तुला माहिती आहे का सगळे मला स्वप्नाली म्हणतात, तू जेंव्हा मला स्वप्नाली म्हणायचास तेंव्हा मला वाटायचं की तू चिडलायस की काय माझ्यावर... आणि स्वप्ना म्हणायचास तेंव्हा वाटायचे की, हा एकटा मला स्वप्ना म्हणतो म्हणजे काहीतरी नक्की खास आहे ह्याच्या मनात..." स्वप्नाली
"मला स्वप्नाली हे सगळं नाव घ्यायचा कंटाळा यायचा म्हणून मी तुला स्वप्ना म्हणायचो..." वीर मनात जे होत ते बोलला पण स्वप्नाली त्याच्याकडे रागात बघायला लागली.
"मंजी मला स्वप्ना म्हणायला आवडायचं..." वीर कसनुस हसला.
"जाऊदे... मी स्वप्नामधून जागी तरी झाले की तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं मीच मूर्ख होते, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलाचा विचारसुद्धा डोक्यात आला नाही. का दुसऱ्या कोणत्या मुलाकडे पाहिले." स्वप्नाली
"स्वप्ना तू नको करुस आता इथून पुढे माझा विचार ... दुसरा चांगला मुलगा बघ आणि लग्न कर तसाही तुझ्यापेक्षा माझं शिक्षण कमी... तुला चांगला नोकरी करणारा मुलगा मिळलं... पैलवानांच काय गुढग्यात मेंदू... आपलं पटलं असत अस मला न्हाय वाटत." वीर पुन्हा मागे फिरला. स्वप्नालीन पकडलेला हात अलगत सोडला आणि क्रांती उभी होती त्या दिशेने चालू लागला. स्वप्नालीला राग आला. "तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात मी सुंदर आहे, शिकलेली आहे मग हा तिच्या मागे का करतोय.. बर ती भाव सुद्धा देत नाही अन लायकी पण नाही तेवढी..." स्वप्नाली



संग्रामला जुने दिवस आठवले. त्याने घट्ट तेजश्रीचा हात होता.
" तुला आठवत आपण पहिल्यांदा अत्याकडं आलो होतो." संग्राम
"ते दिवस कस विसरीन मी... माझ्या आयुष्याच्या महत्वाचे दिवस होत ते कितीतरी रात्र मी त्या आठवणींवर एकटीने घालवल्या. रडायची रात्र रात्र पण त्या आठवणी आल्या की डोळ्यातलं पाणी पुसून हसायची. तो संग्राम मला भेटेल ह्या आशेवर... अन बघा भेटला." तेजश्री
" माफ कर ग मला तेजु? पण सांगू मी मायाकड जात असलो तरी चुकीच कधीच वागलो न्हाय... तुझ्याशी गद्दारी न्हाय केली मी कधी." संग्राम
"पण किती वाईट होत ते सहवास तुम्ही कल्पना पण न्हाय करू शकणार मला काय वाटायचं तुम्ही तिच्याकड गेल्यावर..." तेजश्री
"तेजु बाकी काय उद्देश न्हवता माझा मन रमायच गाणी, नाच बघून दुःख इसरायला व्हायचं... पैसा उधळला की ती माझ्या एकट्यासाठी नाचायची. प्यायचो न तिथंच पडून झोपून जायचो.संग्राम शांत झाला तेजुच्या डोळ्यात पाणी आलेले बघून त्याने तिला जवळ घेतले. "तुझ्या डोळ्यात पाणी येईल असं काहीच न्हाय करणार आता... पण... तेजु अजून रिपोर्ट आलं न्हाईत...माझ्यात काही प्रोब्लेम असला तर मला सोडून..." संग्राम अर्धवट बोलला तसे तेजुने त्याच्या तोंडावर हात ठेवला.
"जायचं असत तर तवाच सोडून गेले असते जवा रात्ररात्र जागून रडत काढल्या. अन असला प्रॉब्लेम तर त्यावर उपाय असालच ना... मी अशी न्हाय सोडून जाणार एवढ्या कारणावरून पण आज मला या समुद्राच्या साक्षीने वचन द्या. की तुम्ही कधीच परत तिच्याकड जाणार न्हाय." तेजु
"दिल वचन..." संग्रामला तेजु घट्ट बिलगली.
"आठवत आत्याने आपल्या हनिमूनसाठी किती तयारी केली व्हती. सगळे त्यांच्या दुसऱ्या घरी राहायला गेले होते. आणि आपण एवढ्या मोठ्या बंगल्यात दोघच..." तेजु
"हो आणि किती सजवला व्हता बंगला आत्याने... बापरे आपण बाहेरन येऊपर्यंत आत्याने सगळी तयारी करून ठेवली व्हती. खरतर आत्याने लय केलं आपल्यासाठी..." संग्राम
"संग्राम स्वप्नाली नाराज हाय व लै." तेजश्री।
"हम्मम असणार ... तिचा लै जीव वीर वर... पण आता काय बी उपयोग न्हाय तो त्याच्या शब्दसमोर कोणाचा टिकाव न्हाय लागू देणार." संग्राम
"अजून दोन महीन हाय व्हाईल कायतरी आपण मदत करू स्वप्नालीला..." तेजश्री
"का...? कशाला आपण वीरच्या मनाविरुद्ध न्हाय वागू शकणार." संग्राम
"आत्यांसाठी... करू एकदा प्रयत्न..."
संग्रामला काय बोलावे सुचत नव्हते त्याने तेजश्रीला काही उत्तम दिल न्हाई.


"संतू मला ना भारी वाटतय... माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा हा समुद्र बघितला. न्हायतर ओढ्या शिवाय आमच्या गावात काय बी न्हाय..." रत्ना
"मी आलो व्हतो एकदा मित्रांबर तवाच न्हायतर मी तरी कशाला येतूय..." संतू
"भारी वाटतयं ना संतू... मोकळं आकाश अन लांब समुद्र जिथपर्यंत बघावं तिथपर्यंत पाणीच पाणी... आणि रात्र , तो चंद्र... मला घरी जायची इच्छा व्हत न्हाय बघ." रत्नाचा उत्साह उफाळून आला होता. संतुन तिला अलगत स्वतःकडे खेचले आणि मिठीत घट्ट घेतले.
"संतू काय करताय??? हे अस नको कुणी बघेल. "रत्नाच्या अंगात शिरशिरी आली. संतू आजपर्यंत असा कधी वागला नव्हता. त्याच हे अस अनपेक्षित जवळ घेणं तिला काही कळत नव्हते तो शांत होता. त्याने रत्नाला तसेच मिठीत अजून घेतले. त्याचा उष्ण श्वास तिला सहन होवोत न्हवता. ती शांत झाली. बराच वेळानंतर संतुन अलगत तिला बाजूला केले. रत्ना लाल झाली होते. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि हसू दोन्ही होते.
रत्नाने पटकन विषय बदलला.
"मला स्वप्नाली कॅग्या मनात काहीतरी हाय असं वाटतंय." ।रत्ना
"असुदे आपण करू काहीतरी... चल आता निघू..." दोघे सगळे थांबले त्या ठिकाणी गेले.


वीरला बघून क्रांतीने नजर फिरवली. तिला राग आला होता हे स्पष्ट सांगत नसली तरी बाकी सगळ्यांना समजलं होते. "मग दाजी आम्हाला तुमचं एक सिक्रेट समजलं बर..." संतू
"काय???"
"स्वप्नाली न तूमच..." चिनू पटकन म्हणाली.
"गप ग फक्त चिडवत होत्र आमचं अस कायच नव्हतं व्हय ना स्वप्नाली...?" वीर क्रांतीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होता.
"माझं होत अन अजून आहे..."स्वप्नाली म्हणाली तसे सगळे एकमेकांकडे बघायला लागले. स्वप्नाली मुद्दाम क्रांतीसमोर बोलली होती.
क्रांती काहीही प्रतिउत्तर देत नसली तरी तिला वाईट वाटले होते सगळे घराच्या दिशेने चालायला लागले. स्वप्नाली वीरला काही सोडत नव्हती. आणि ऋषी चिनूला...😊



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत

( स्वप्नालीने नक्की प्लॅन केलाय... पण तिच्यांप्लॅन मध्ये संग्राम अन तेजश्री सहभागी होतील? ऋषी अन चिनूने काय असेल? रत्ना, संतू अबी चिनू।काय प्लॅन करतील? क्रांती जलीश फील करतीये का ? सुरुवात तर झालीये..." नक्की कळेल नेक्स्ट भागात... तुमचीच भाग्या)