Mall Premyuddh - 19 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 19

मल्ल प्रेमयुद्ध


क्रांती आल्यानंतर रूममध्ये बसून उगीचच बॅगमधले कपडे इकडे तिकडे करत होती. रत्ना आणि चिनू तिची होणारी घालमेल बघत होत्या.
"वहिनी काय हो खरच मस्त हाय ती स्वप्नाली. सुंदर दिसती आणि शिक्षण पण किती झालय! लट्टू हाय बर दाजींच्या माग... अजून पण तिला वाटतय दाजी तायडीला सोडून तिच्या बर लग्न करतील." चिनू अन रत्ना तिच्याकडे तिरक्या नजरेन बघत होत्या.
"व्हय ना आणि मला वाटतय तेजश्री ताईच्या पण मनात स्वप्नाली त्यांची जाव असावी असं वाटतं... न्हाय का चिनू त्या दोघी कितीवेळ गप्पा मारत होत्या. इकडं आल्यापासन तेजुवहिनी आपल्याबर बोलायच्या पण कमीच झाल्यात." क्रांतिने बॅगची चैन जोरात लावली. न कळत तिच्या डोळ्यात पाणी आलं व्हत.
"व्हय मी प्रत्यक्ष ऐकलं वहिनी तेजुवहिनी ह्या दोघांच्या नात्याविषयी स्वप्नालीला सांगताना. मला जरा पण पटत न्हाय पण मला आत्ता बोलायचं न्हाय त्यांच्याशी की तुम्ही अस का वागलात." चिनू बोलली तशी क्रांतीने बॅग जोरात आपटली अन गच्चीवर निघून गेली.
"चिनू वातावरण गरम झालंय आपण शांत न करता वीरला शांत करायला पाठवायला पाहिजे." रत्ना
"एकदम बेस्ट आयडिया... गरम वातावरणात प्रेम फुलणार अन तायडीला कळणार पण न्हाय की ती दाजींच्या प्रेमात पडली." चिनू
"खरंच ही तर सुरुवात झाली क्रांतीच्या प्रेमाच्या पहिल्या पर्वाची अन ते ही आठवड्याभरातच... ही चांगली गोष्ट हाय... थांब मी संतुला फोन करून वीरला वरती जायला पाठवते." लगेचच रत्नाने संतुला सांगूंन वीरला गच्चीवर जायला सांगितले.


"दाजी राग आलाय मंजी प्रेमाची सुरुवात झाली म्हणायची. जा आता तुमची परीक्षा..." संतू
वीरला आता दम धरवत नव्हता रात्रीचे साडेअकरा वाजले होते. वीर गच्चीवर गेला. त्याने क्रांतीकडे पाहिले क्रांती गच्चीत नारळांच्या झाडांकडे बघत उभी राहिली होती. नकळत डोळे पुसत होती. वीर तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला हे सुद्धा तिच्या लक्षात आले नाही.

" काय झालं???" वीरने विचारले तसे क्रांती दचकली.
"तुमी इथं?" क्रांतीने पटकन डोळे पुसल.
"मी पण सहज आलो होतो आणि तुमी इथं दिसला." वीर
"खोटं... तुम्हाला रत्नाने सांगितलं... हो ना..." क्रांती
वीर हसला... "नाई हो... मला कुणी सांगितलं न्हाय मीच आलो...बर ते जाऊ द्या तुम्हाला रडायला काय झालं ते सांगा आधी..." वीर
"मी कुठं रडती... अजिबात नाई..." क्रांतीने तोंड फिरवले.

"व्हय बरं ठीक हाय पर एक सांगू... मला स्वप्नाली विषयी कधीच प्रेम नव्हतं आणि आणि आत्ता ही नाही. पण तीच मात्र हाय... तीन तुम्हाला काय बी सांगूंदेत त्यावर तुम्ही कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर हाय... माझं आयुष्य तुम्ही हाय रहाल शेवटपर्यंत... आणि राहिला प्रश्न मगाचचा... मी तिच्याबरोबर बीच वर काय बोलत होतो. तिला मी हेच समजावत व्हतो... बाकी काय न्हाय." वीरने सगळं सांगून टाकलं.
"मग एवढं चिटकून???" क्रांती रागात बोलली आणि निघायला लागली. तेवढ्यात रांगड्या हाताने वीर ने तिचा हात पकडला.
"असं तर यांचा राग आला. अहो क्रांती तुम्ही हे न्हाय बघितलं की मी तिच्या जवळ नव्हतो ती माझ्या जवळ आली व्हती." क्रांती वीरकडे न बघता तशीच उभी राहिली होती.
"हो बरं... निघते मी... हात सोडा..." वीरने क्रांतीचा हात सोडला.
"कुणी माझ्या जवळ आलं म्हणून तुम्हाला वाईट वाटलं??? डोळ्यात पाणी आलं??? का?? तुमचं तर माझ्यावर प्रेम नाय ना???" वीरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे क्रांतीकडे नव्हती.
"काहीही म्हणा क्रांती... "क्रांतिवीर" हे नाव कधीही वेगळे व्हाणार न्हाय... हा माझा शब्द हाय..." क्रांती काहीच बोलली नाही. निघणार तोच तिला स्वप्नाली दिसली. क्रांती तशीच निघाली. स्वप्नाली तिला ऐकू जेल एवढ्या जोरात म्हणाली.
"वीर एवढ्या रात्री तू मला इथं का बोलावलस... तू माझ्या रूममध्ये आला असतास तरी चालल असत..." क्रांतीच्या कानावर तीच बोलणं पडलं ती तडक तिकडून गेली.
"स्वप्ना का अस वागतीस...? चुकीचं वागतीस तू...? मी कधीच तुझा व्हाणार न्हाय..." वीर स्वप्नालीला बोलून निघून गेला. स्वप्नालीच्या चेहऱ्यावर जिंकल्याच स्मितहास्य होत.
"क्रांती...क्रांती... थांबा..." वीर तिच्या मागे गेला. क्रांती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती रूममध्ये गेली अन दरवाजा लावून घेतला. त्याने पकडलेला तिचा हात... तिला कसंस झालं होतं. स्वप्नाली दिसल्यावर एका क्षणात ती सगळं विसरून गेली. तिला काय करावे समजत नव्हते. चिनू गाढ झोपली होती. रत्ना मात्र क्रांतीची वाट बघत जागी होती.
"काय झालं...?" रत्नाने विचारले.
"वीर आले होते...मी गच्चीवर गेल्यावर... अन..." क्रांती बोलायची थांबली.
"अन... काय?? बोलला तुम्ही...?"
"स्वप्नाली अन ते भेटायला आले होते मी उगच गेले..."
""काय???" रत्ना जवळजवळ ओरडली.
"जाऊदे... मला पण इंटरेस्ट नाय या लग्नात त्या दोघांचे झालं तर दोघे खुश होतील." क्रांती.
"कायपण काय बोलतोस ग..?हे वीरने न्हाय हे ठरवून स्वप्नालीन केलय." रत्ना
"एवढ्या रात्री मी वरती असलं तिला कस म्हाइत... ते दोघे भेटणार व्हते अन मी तिथे गेले चुकलंच माझं..." क्रांती
"क्रांती वीरला तिथं मी पाठवलं व्हत... तिथं स्वप्नालीचा काहीच संबंध नव्हता. तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ती तिथं पोहचली मंजी नक्की ती तुमच्या दोघांवर लक्ष ठेवून हाय. तिने मनाशी पक्क ठरवलंय तुमास्नी वेगळं करायचं..." रत्ना म्हणाली
"व्हय मला वीरने तेच सांगितलं पण माझी ना नाही उलट हे लग्न मोडलं तर..." कृतीच्या ह्या वाक्यांने मात्र रत्ना संतापली होती.
"तू मंद हायस का ग...? त्याच्या अत्याची मुलगी एवढी त्यांना आवडत असती तर त्यांनी लग्न नसत केलं. तिला सोडून तुझ्या मग का लागलं हायत. एवढं इचार करता येत न्हाय का? जाऊदे तुला न्हाय लग्न करायचं ना मी सांगते त्याना हे लग्न मोडा." रत्नाने चिडून तोंडावर घेऊन झोपून गेली. क्रांतीला काय करावं काहीच सुचत नव्हते विचार करत ती सुद्धा झोपून गेली.

सकाळ झाली. सगळ्यांच्या आधी उठून क्रांतीने अंघोळ केली. शेजारी असलेले मंदिर तिने रात्री येताना पाहिले होते. तिने आत्यांना सांगितले आणि ती मंदिरात गेली. सकाळचे सहा वाजले होते. सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. मंदिराच्या पायाशी असलेल्या दुकानामधून क्रांतीने नारळ आणि फुलांचे ताट घेतले. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिने पूजा थाळी पुजारांकडे दिली. मनोभावे नमस्कार केला.आणि शांत हात जोडून देवापुढे बसली.
इकडे चिनूला जग आली तिने आजूबाजूला पाहिले. क्रांतीला रुमभर शोधले.
"तायडे... तायडे..." सगळीकडे हाका मारत शोधत होती.
रत्नाला तिच्या आवाजाने जाग आली.
"काय झालं ग?" रत्ना
"वहिनी तायडी कुठंच न्हाय... सगळीकडं शोधलं.." चिनू
रत्ना ताडकन झोपेतून उठून बसली.कालचा प्रकार तिच्या डोळ्यासमोरन गेला. "चिनू तू खाली बघ आत्यांना इचार मी संतुला सांगून आले." रत्ना उठली आणि संतुला बघायला गेली.
संतू रूममध्ये आरामात झोपला होता.
"संतू... संतू उठ क्रांती कुठंच दिसना..." हे ऐकून संतुच्या आधी वीर उठला.
"मंजी कुठं गेली?" वीर
"म्हाइत नाई सगलोकड शोधलं चिनू खाली गेली शोधायलाबपन ती कुठंच न्हाय." रत्ना
वीर पटकन उठला आणि खाली गेला पाठोपाठ संतू गेला. चिनू वरती येतच व्हती.
"दाजी आत्या घरात न्हाईत अन बाकी कोणाला म्हाइत नाही तायडी ला अन कोणी भायर जाताना न्हाय पाहिलं." चिनू
"संतू तू यष्टी स्टँड वर बघ मी दुसऱ्या बाजूला बघतो.
संतू अन वीर भायर पडले. संतू यष्टी स्टँडला पोहचला सगळीकडे क्रांतीला बघितले तिथल्या लोकांना विचारले पण क्रांतीविषयी कोणीच माहिती दिली न्हाय तो बघत बघत परत घरी जायला निघाला.
वीर सगळीकडे क्रांतीला शोधत होता.बीचवरसुद्धा जाऊन आला. हताश होऊन घराकडे निघत असताना त्याला आठवले. रात्री जवा क्रांतीकडे मी बघत होतो तेव्हा तीच लक्ष या देवळाकड व्हत. त्याला वाटलं म्हणून तो देवळाकड वळला एक एक पायरी चढत तो गणपतीचं नाव घेत होता. लक्षात आले की अंघोळ केली न्हाय. तो पायऱ्या चढून देवळाच्या दरवाजापाशी थांबला. पाठमोऱ्या आकृतीकड बघून त्याच्या लक्षात आले की क्रांती इथेच हाय. त्याच्या जिवंत जीव आला.

संतू रत्नाला सांगत होता."रत्ना सगळीकडं बघितलं कुठंच न्हाय ग क्रांती..." "संतू रडवेला झाला होता. तेवढ्यात आत्या आल्या.
"काय झालं???" आत्या
"क्रांतीला बघितलं का आत्या???" संतू
"आर ती सकाळी मला सांगून गणपतीच्या देवळात गेली." संतुच्या जिवंत जीव आला नि तडक तो देवळाकड धावला. त्यापाठोपाठ रत्ना गेली.


डोकं शांत झाल्यावर क्रांती उठली. पुन्हा गणपतीला नमस्कार केला. पुजारी काकांच्या पाय पडली. काकांनी तिला आशीर्वाद आणि प्रसाद दिला. ती निघायला लागली तोच दरवाजामधी वीर दिसला. ती पुन्हा थबकली.
"तुम्ही...?" क्रांती
"अस न सांगता का आला?" वीर
"आत्यांना सांगितलं व्हत.." क्रांती पायऱ्या उतरत बोलत होती.
"आत्या घरात नव्हती सगळे घाबरलो होतो." वीर
"मी लहान न्हाय... आणि अस न सांगता कुठे बाहेरही जाणार न्हाय..." क्रांती.
"अजून राग गेला न्हाय..?" वीर
"आम्ही कोण तुमच्यावर रागावणारे... तशे तुमच्यावर रागावणारे बरेच हायत..." क्रांती शांत उत्तर देत होती.
" बरं जरा बसाल?" वीर म्हणाला. क्रांती एक बाजूला बसली. तिच्या शेजारी वीर बसला.तेवढ्यात रत्ना अन संतू पोहचले. त्यांनी लांबूनच त्या दोघांकडे पाहिले.

"प्लिज अस नका रागवू... एवढ्या लांब मी तुम्हाला आणले अन वेगळंच होऊन बसलय." वीरने तिचा हात हातात घेतला.
संतू आणि रत्ना त्यांच्याकडे बघून तिथूनच निघून गेले.

"माझं आयुष्य तुमी हाय क्रांती... अन तुमाला इथं राहायचं नसलं तरी आपण आजच परत जाऊ...." वीरने क्रांतीच्या डोळ्यात बघितलं.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत

( क्रांतीला स्वप्नालीचा डाव कळेल का? वीर क्रांतीला जवळ करण्यात यशस्वी होईल? तेजश्री काय मदत करेल स्वप्नालीला?
रत्ना अन चिनू आता स्वप्नालीबद्दल काय विचार करतील? नक्की वाचा पुढच्या भागात... तुमची भाग्या...)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED