निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ७ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ७

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ७


मागील भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला राजेश कडे घेऊन जातो.राजेश त्याला बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रिये बद्दल काय सांगतो ते या भागात बघू



" राजेश आम्ही पण बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. मला त्याची सगळी प्रोसीजर सांग."


" पंकज पूर्वी बाळ दत्तक देणा-या ज्या संस्था होत्या त्या संस्थेतून बाळ दत्तक घेता येत असे पण आता तसं नाही होत."


" म्हणजे ?" पंकज ने विचारलं.


" आता 'कारा' ची साईट आहे त्यावर आपण आपलं नाव रजीस्टर करावं लागतं."


" हे कारा काय आहे?"


"कारा यांचा फूल फाॅर्म आहे सेंट्रल ॲडाॅप्शन रिसोर्स ॲथाॅरिटी "


" इथे रजिस्टर केल्या नंतर काय करावं लागतं?"


"कारा वर रजीस्टर केल्यावर तुम्ही ज्या राज्यात रास्ता आणि ज्या राज्यातील ज्या गावामध्ये रहात असाल तिथे जी लोकल संस्था बाळ दत्तक देण्याचं काम करत असेल तिचं नाव लिहून शकतो."

"मग त्या संस्थेतून आपल्याला बाळ दत्तक येत का?"


"नाही.या स़स्था बाळ दत्तक देत नाहीत त्या संस्था फक्त दत्तक प्रक्रियेसाठी जे कागदपत्र लागतात ते तुमच्याकडून घेते नंतर या दत्तक प्रक्रियेमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते सोडवते तसंच नियमित तुमचा फाॅलो अप घेते. ही सगळी माहिती या संस्था कारा कडे जमा करते. त्यानंतर कारा तुम्हाला हवं असणारं बाळ मुलगा/ मुलगी जेव्हा त्यांच्या नजरेस येईल तेव्हा तुम्हाला देते."


"आम्हाला हवं तसं म्हणजे?"


"तुम्ही जेव्हा तुमची सगळी कागदपत्रं जमा करता त्यात तुम्ही नोकरी, तुला मिळणारा पगार हे सगळं दाखवावे लागतं. त्यात तुमचे दोघांचे फोटो पण द्यावे लागतात."


"ते कशासाठी?" पंकजने आश्चर्याने विचारलं.


"तुम्हाला साजेसे बाळ ते तुम्हाला देता यावं यासाठी तो फोटो काराला लागतो. तुमचंच बाळ आहे असं बघताक्षणी वाटावं असं बाळ जेव्हा कारा च्या नजरेस येतं तेव्हा ते तुम्हाला कळवतात."


"किती दिवस लागतात या सगळ्याला?"


"वर्ष दोन वर्ष पण लागू शकतात. कारण काराकडे वेटींग लिस्ट खूप असते. त्यामुळे तुम्ही कारा वर कधी रजीस्टर करता त्यानुसार तुमचा नंबर लागतो."


"बापरे! इतके दिवस काय करायचं?"


"लोकल ॲडाॅप्शन सेंटर तुमच्या मदतीला असते.या काळात ती संस्था तुमच्या संपर्कात असते. आपल्याकडे काराचं लक्ष असतं.आपण त्यांच्याकडे बाळ दत्तक हवं म्हणून रजीस्टर केलंय हे कारा विसरत नाही.त्या लोकल ॲडाॅप्शन सेंटर तर्फे आपल्याकडे लक्ष देते."


"मला हे रजीस्टर करतांना मदत करशील? "


"अरे! का नाही करणार? कधी करायचं ते सांग?"


" तू सांग तसा मी वेळ काढतो."


" ठीक आहे. एकदोन दिवसांत कळवतो.काळजी करू नकोस. थोडी वाट बघावी लागेल पण तुमच्या घरी लवकरच बाळ येईल."


" तुझ्या तोंडात साखर पडो. माधवी बघ किती रमली आहे तुझ्या बाळाबरोबर खेळण्यात. रोज माधवी मी ऑफीसमध्ये गेल्यावर दिवस भर आपल्याच कोषात असते. म्हणून कधी कधी फार वाईट वाटत़ं."


"नको मनाला त्रास करून घेऊ. होईल सगळं व्यवस्थित.

ठीक आहे. निघतो आम्ही. फार वेळ झाला."


इकडे माधवी सर्वस्व विसरून बाळामध्ये रमली होती. तेवढ्या वेळात रेवती ने सगळ्यांसाठी दोसे, सांबार आणि चटणी केली. सगळ्यांचं खाणं आटोपलं होतं. राजेश आणि पंकज समोर खाण्याची डिश ठेऊन रेवती म्हणाली,


"तुम्ही दोघं कामाचं बोलणं झालं असेल तर खायला घ्या."


"माधवी खाऊन घे मग निघू फार उशीर झाला आहे."

पंकज माधवीला म्हणाला.


माधवीने नाखुशीने बाळाला रोहिणी जवळ दिलं आणि खाण्यासाठी दोस्याची प्लेट हातात घेतली.

माधवीचं खाण्यात लक्षच नव्हतं तिचं सारखं लक्ष त्या बाळाकडे जात होतं.तिची अवस्था पंकजच्या लक्षात आली. त्याने हळूच माधवीच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं

"माधवी. मी समजू शकतो तुझी मन:स्थिती.लवकर का.निघायला उशीर होईल."

माधवीने मानेनेच हो म्हणत खायला सुरुवात केली.

—-----------------------------------------------

कारावर नाव रजीस्टर केल्यावर का होईल? बाळ कधी येईल बघू पुढील भागात.