मल्ल प्रेमयुद्ध - भाग 21 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 21

मल्ल- प्रेमयुद्ध


सगळे गणपती पुळेला पोहचले.
"आधी दर्शन घेऊ अन मग जेवायला हॉटेल बघू" ऋषी संग्रामला म्हणाला. ऋषी सतत चिनुच्या मागेपुढे करत होता. ऋषी इंजिनिअरिंग च्या 2nd इयरला होता.
चिनुच्या लक्षात आले होते. की ऋषी बोलायचा प्रयत्न करतोय. ती त्याच्यासोबत बोलायला लागली.
"ऋषी तू घाबरतोय का माझ्याशी बोलायला?" चिनू
"घाबरत नाही बाई तुझी बहीण रेसलर आहे बाबा...आणि तुला बोललेलं आवडतंय की नाही म्हणून बोलयाला घाबरत होतो." ऋषीने जे आहे ते सांगितले. चिनू हसली.
"अरे त्यात घाबरायला काय??? आपण बोलू शकतो. ऋषी तू काय करतोस? म्हणजे मी ऐकलंय की तू इंजिनीअरिंग च्या 2nd इयर ला हायस पण???" चिनू
" मेकॅनिकला आहे.. " ऋषी
"अच्छा..." चिनू
"आम्ही तुला चिनूच म्हणायचं का???" ऋषी
"हो मला आवडेल असही मला सगळे चिनूच म्हणतात... पण माझं नाव चिन्मयी हाय..." चिनू
"ओके चिन्मयी... मस्त नाव आहे. तू काय करतेस?" ऋषी
"मी...2nd इयरला कॉमर्स..." चिनू
"बर... पुढे काय करणार...?" ऋषी
"यार मी एवढा विचार न्हाय करत वेळ आल्यावर बघू... पण तुला सांगू माझं जास्त मन न्हाय अभ्यासात रमत अन मी तेवढी हुशारपण न्हाय... मला ना मस्त वेगळा व्यवसाय करायचाय... ते जाऊदे ना बाबा आपण इकडे फिरायला आलोय ना मग... एन्जॉय करू.. बघ सगळे लांब गेले." चिनू भरभर पुढं गेली.
"कसली भारी हाय ही राव... मला आवडली." ऋषी स्वतःशीच हसला.
ऋषी एकदम स्मार्ट, गोरा, केस करली, लाडाकोडात वाढलेला मुलगा अभ्यासात हुशार.. आणि करियर बाबतीत ठाम, कॉलेजमध्ये त्याच्या बऱ्याच तोकडी कपडे घालून मुली मागेपुढे करायच्या अन त्यालाही ते आवडायचं पण त्याला टाईमपास म्हणून लग्न करायचं नव्हतं. त्याला खरं प्रेम हवं होतं.

स्वप्ना वीरच्या मागेमागे करत होती. सगळे मंदिरात पोहचले. वीर क्रांतीच्या सोबत राहायचा प्रयत्न करत होता. संग्राम आणि तेजश्री जोडीने पाय पडले. मनातून तेजश्रीने गणपती बाप्पाला नवस केला " बाळाच्या रूपाने आयुष्यात सुख येऊदे त्यासाठी मी काहीही करायला तयार हाय..." तीने गणपतीबाप्पा समोर मनोभावे हात जोडले. संग्रामने सुद्धा तीच इच्छा बोलून आशीर्वाद मागितला. तिथल्या पुजारी काकांनी दोघांना आशीर्वाद म्हणून श्रीफळ दिले ते श्रीफळ तेजश्रीने ओटीत घेतले. दओघे पिढी झाले. "काका ही आमची नवीन जोडी होईल याना पण बाप्पाचा आशीर्वाद मिळुद्या." संग्राम अस म्हणून बाजूला सरकला. पण तिघे पुढे आले. वीर, क्रांती आणि स्वप्नाली तिघांनी हात जोडले. काकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसले. वीरला त्यांचा प्रश्न समजला त्याने क्रांतीच्या खांद्यावर हात ठेवला.
"ताई तु जरा बाजूला व्हती का? ह्या दोघांना जोडीनं आशीर्वाद घेऊंडे मग तू पुढे ये..." काका म्हणाले तशी स्वप्नाली मागे सरकली. तिला प्रचंड राग आला. पुजारांकडे हातातले पूजेचे ताट दिले. पुजाऱ्यांनी तिला आणि वीरला आशीर्वाद दिला. दोघे बाहेर पडले. वीर तिने लावलेल्या कपाळावरच्या कुंकुवाकडे बघत होता.
"काय झालं काय लागलंय का तोंडाला?" क्रांतीने चेहऱ्यावर हेत फिरवला.
"नाय कपाळावरच्या ठसठशीत कुंकुवाने तुम्ही अजूनच देखण्या दिसताय." क्रांतीला काय बोलावं कळेना.
"एक विचारू?" क्रांती
"जर स्वप्नाताईंना तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे तर तुम्ही का नाई म्हणता?"
"क्रांती मी तुमास्नी कालच सांगितलं की माझं प्रेम तिच्यावर असत तर मी कधीच लग्न करून मोकळा झालो असतो तिच्याशी... पण मी तिच्या योग्यतेचा न्हाई... तीन माझ्याशी लग्न करून नोकरी सोडावी अस मला न्हाय वाटत" वीर
"मंजी मला पुढे खेळायला बंधी येणार का?"
"न्हाय अस न्हाय व्हनार... आम्ही कायम तुमच्या बरोबर असू..." वीर
"मला डाउट वाटतोय विचारु?" क्रांती
"हा...विचारलेल्या गोष्टी बऱ्या असत्यात नंतर अडचणी नकोत..." वीर
"तुम्हाला मी हरवलं म्हणून तुम्ही बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न करताय का?" क्रांतीने हा प्रश्न विचारल्यावर विद थोडा गडबडला तेवढ्यात मागून पळत ऋषी आला.
"अरे दादा तुमच्या लक्षात तरी आहे का रे आम्ही मागे आहोत किती लांब आलाय तुम्ही चला मागे हॉटेलमध्ये थांबलेत सगळे." वीरला क्रांतीच्या प्रश्नच उत्तर द्यायला मिळाल नाही सगळे भरभर हॉटेलच्या दिशेने गेले.


जेवण झाल्यानंतर सगळे पुन्हा गाडीत बसायला लागले यावेळी स्वप्नाने स्वतः बसायच्या आधी बऱ्यापैकी सगळ्यांना बसून दिल. आता संतू ड्राईव्ह करत होता. त्याच्या शेजारी रत्ना बसली. बसली म्हणजे संग्रामने आग्रहाने तिला त्याच्या जवळ बसायला सांगितलं. मध्ये संग्राम तेजश्रीसोबत बसला त्याच्या बाजूला चिनू, ऋषी बसले. मागे स्वप्ना, वीर आणि क्रांती बसली. वीरशेजारी मुद्दाम स्वप्न बसली. क्रांतीला एकटीला बसावे लागले.
"ताई... ताई आग इकडे बस की??? वहिनींना बसू दे दादा शेजारी.." स्वप्ना ए एकूण न ऐकल्यासारखे केले. तेजश्रीने मागे पाहिले. स्वप्नाकडे बघून हाताने थम दाखवला. दोघींच्या मनासारखं झालं होतं. स्वप्नाने मुद्दाम झोपायचे नाटक केले आणि मस्त वीरच्या खांद्यावर रेलून झोपली. त्याने क्रांतीकडे बघितलं. त्याला काय बोलावे सुचत नव्हते. क्रांतीला त्याची अवस्था बघून हसू येत होतं.


तेजश्री आणि संग्रामला छान झोप लागली होती.
"चिनू उद्या जाणार का?" ऋषि
" हो जावं तर लागणार ना?" चिनू
"फोन करशील?" ऋषी
"का?" चिनू
"यार...का काय? आता आपण मित्र झालो ना?" ऋषी
"हो का? चिनू हळूच गालात हसत होती.
ऋषी शांत बसला. ताईचा नंबर घे अजून माझ्याकडे फोन नाय. चिनूने त्याला नंबर सांगितला. ऋषीचा आनंद गगनात मावत नव्हता. चिनूला सुद्धा पहिल्यांदा आकर्षक वाटत होते, ऋषीसोबत राहायला आवडत होते. त्याच्याशी गप्पा माराव्या वाटत होत्या.
" मी पुणेला जाणार आहे चिनू..."
"वा मस्त छान स्वप्न हायत रे..."
"हो पण कायम तिथे जॉबसाठी राहावं लागलं तर अवघड आहे."
"एवढं लांब न्हाय पण तुला जर शहरात आवडत असेल तर तू जा.."
"तुला आवडत शहर???"
"हो मला आवडत थोडी जगली मी गावाकडं माझं एकच स्वप्न हाय लग्नानंतर आयुष्य शहरात असावं... अस न्हाय की गावाचा कंटाळा आलाय पण दोन्ही जीवन जागून बघायला पाहिजे असं वाटत." चिनू

स्वप्नाला जाग आली तवा वीर क्रांती शेजारी व्हता आणि ती ऋषीच्या खांद्यावर झोपली होती.
"ऋषी तू कधी आलास इथे? इथेतर वीर ... वीर आणि क्रांतीला एकत्र बघून स्वप्नाला काय कळायचं कळाल. यावेळी ही प्लॅन फसला.

आज सगळे गावाला निघणार होते. सकाळ होऊन सगळ्यांनी आवराआवर केली. नाश्त्याला बसल्यावर आत्यांनि त्यांच्या भावासाठी बऱ्याच गोष्टी भरल्या होत्या त्या दाखवल्या.
नाष्टा झाल्यानंतर क्रांती आणि रत्नाला हातामध्ये साड्या दिल्या. वीरला पुन्हा स्वप्नाली एकांतात गाठून भेटली.
"वीर एकदा माझा विचार तू करावास अस मला वाटतंय, तुझ्या योग्य ती मुलगी नाही अरे." स्वप्नाली बोलत होती पण एक शब्द वीर तिच्याशी बोलत नव्हता.
"मी लवकरच आबांना भेटायला येणार आहे. ते माझ्या शब्दाला नक्की मन देतील आणि मला शेवटपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे." वीर काहीही प्रतिक्रिया न देता निघून गेला.
स्वप्न संग्रामला आणि तेजश्रीला सुद्धा बाय करायला बाहेर गेली न्हाय. शेवटी तेजश्री तिच्याकडे गेली.

"वहिनी काय उपयोग झाला. मला वाटलं की तुम्ही काही कराल पण झालं उलटंच...असुद्या मी लवकरच येणार गावी तेव्हा आबासाहेबांना शेवटचं विचारून बघणार."
"स्वप्नाली आम्हाला तुमच्या भावना समजत्यात पण इथं झालं ते तिकडं व्हाणार न्हाय तुम्ही या लवकर मग बाकीच्यांना कस पटवायकग ते बघू...तुम्ही काळजी नका करू... येते मी..." तेजश्री तिथून निघाली. संपूर्ण प्रवासात ती एकदाही क्रांतीशी बोलली नाही.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत