Mall Premyuddh - 20 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 20

मल्ल - प्रेमयुद्ध

"तुमच्यात काय बिनसलंय का?" आत्याने क्रांतीला जवळ घेऊन प्रश्न विचारला.

"न्हाय आत्या..." क्रांती
"एवढ्या वर्षांचा अनुभव हाय अमास्नी वीरच्या तोंडाकड बघूनच समजल आम्हाला... जर झाल असलं काय तर गैरसमज असत्यात कारण वीर शरीरानं रांगडा असला तरी मनानं लई मऊ हाय..." आत्या म्हणल्यावर क्रांतीला काय सांगावे हा मोठा प्रश्न पडला.

"मला म्हाइत हाय तुम्हाला सांगता येत न्हाई पण एक सांगू?
आमच्या स्वप्नामुळं जर काय बाय इचार येत असतील तर तुम्ही चुकताय... त्यात तिची चुक न्हाय ... चूक आमची व्हती. आम्ही त्यांना लहानपणापासून चिडवायचो त्याचा परिणाम वीर वर न्हाय पण स्वप्नावर झाला. ती वीरची स्वप्न बघायला लागली. तिच्या मनात वीरशिवाय कोणाचा इचार येत नव्हता. पण ध्यानात न मनात तुमचं लग्न ठरलं तवापासन पोरगी गप गप झाली. ना कोणाशी नीट बोलत ना कोणाचं ऐकत." आत्या बोलत होत्या अन क्रांती सगळं शांतपणे ऐकत होती.
"पण अस का झालं तुम्ही आबासाहेबांबर बोलला नव्हता का?" क्रांती
"अग वीरच्या मनात नसताना त्यांना कोणताच निर्णय घ्यायचा नव्हता त्यांना मग आम्ही न्हाय जबरदस्ती करू शकलो. अन जर पोराच्या मनात नसलं तर त्या संसाराला अर्थ काय ना? बरोबर हाय स्वप्न लई शिकली आणि हट्टी हाय त्यांचं जमलं असत अस मला अन आमच्या ह्यांना पण न्हाय वाटलं. क्रांती स्वप्नाली आयुष्यभर डोक्यावर पदर घेऊन राहणारी पोरगी न्हाय ग... आम्ही समजावलं न न्हाय ऐकत पण क्रांती त्यामुळं तुमच्या नात्यावर परिणाम व्हावा अस मला न्हाय वाटत. खरंतर म्हणून आम्ही तुमास्नी बोलावलं की तुमचं प्रेम बघून ती वीर पासन लांब जाईल.... पण तुम्ही नीटसं बोलत सुद्धा न्हाय. काय झालंय का तुमच्यात?" आत्या हे क्रांतीला कशासाठी सांगत होत्या हे कळायला वेळ लागत होता पण तिला हा प्रश्न अनपेक्षित होता.

"न्हाय आत्या अजून नीट आम्ही एकमेकांना ओळखत न्हाय... म्हणून बोलताना थोडं अवघडल्यासारख व्हतंय..." क्रांती
"एक सांगू का क्रांती... तुम्हाला वाटत असेल आम्ही तुम्हाला हे सगळं का सांगतोय आम्ही आमच्या पोरीला धाकटी न्हाय ठेवू शकत का? का ती आमचं ऐकत न्हाय? तर अस मुळीच न्हाय... प्रेमात आंधळं असतं हे मी तुमास्नी सांगायची गरज न्हाय. तीन आमचं ऐकलं सुद्धा पण तिला अजून अपेक्षा हाय वीरकडून, तीच स्वप्न मोठाली हायत अन तिला वीर थोड्या वेळातच आवडणासा व्हइल म्हणूनच आत्ता तिला त्रास झालेला चाललं... आम्ही आमच्या पोरीला चांगलं वळकतो. तिला जस समजलं वीरचं लग्न ठरलं ती तिकडे तुमच्या साखरपुड्याला यायला न्हाय म्हणाली पण हट्ट धरला की वीरला इकडे बोलवायचं पण तुम्हाला आम्ही बोलावलं. क्रांती तिला काळात न्हाई ती ज्याच्यावर प्रेम करती तो तिच्या योग्यतेचा न्हाय... तुम्ही कराल ना मदत आमची... तिला यातन व्यवस्थित भायर काढायला?" आत्या बराचवेळ बोलत होत्या. क्रांतीला काय उत्तर द्याव हेच समजत नव्हतं एका आईच ऐकावं की स्वतःच नाहीतरी तिला हे लग्न करायचं नव्हतं. वीरबरोबर लगेच प्रेम ते ही स्वप्नालीसाठी... तिला आत्याच्या डोळ्यात अपेक्षा दिसत होती. "आत्यांना सांगावं का की हे लग्न माझ्याही मनाविरुद्ध ठरलंय, मलाही हे लग्न करायचं न्हाई...न्हाई नको..."

"क्रांती कसला इचार करती..? तू करशील ना मदत...?"आत्या
"व्हय आत्या नक्की करीन..." क्रांतीच्या ह्या वाक्यांन आत्यांना धीर आला. एवढी मोठी बाई पोरीच्या हट्टापायी खचली होती. तिला बर वाईट कळत नव्हतं. वीर चांगला मुलगा आहे का? हा प्रश्न क्रांतीला पडला. खरंतर स्वप्नालीचे शिक्षण चांगलं होत वीरच्या मानाने मग आत्याला सख्खा भाचा जावई म्हणून का नको होता? क्रांतीने ठरवलं की या सगळ्याची उत्तर शोधून काढायची. त्यासाठी वीरशी प्रेमानं वागायला लागलं तरी चाललं.

इथला आज दुसराच दिवस होता. आत्यासोबत क्रांतीचे चांगले जमले व्हते. तेजश्री स्वप्नाली बरोबर बोलत होती.
"स्वप्ना मी तुझ्या बरोबर हाय सांग काय करायचं?"
"आज आपण गणपतीपुळेला गणपतीबाप्पाच्या दर्शनाला जाऊ, एक काम कर काही झालं तरी वीरच्या बाजूला येताजाता मीच बसले पाहिजे. अन तिथे उतरल्यावर सुद्धा त्याच्यासोबत मीच राहायला पाहिजे यात माझी मदत करा ताई..." स्वप्ना म्हणाली
"का नाय करणार मला माहित हाय तुझ्याएवढं प्रेम कोणीच करू शकणार न्हाय भाऊजींवर..." तेजश्री
"पण हे त्याला कळत नाय ना...हा मोठा प्रॉब्लेम ..." स्वप्नाली
"तू नको काळजी करू चला आवर मंजी लवकरच निघू.." तेजश्री बाहेर लढताना चिनू दारामागे लपून राहायली. ती गेल्यानंतर लगेच रत्नाला आणि क्रांतीला त्यांचा प्लॅन सांगितला. "खरं तर मी अस ऐकायला नको व्हत पण काय करणार... शेवटी दाजी अन तायडीच्या प्रेमाचा प्रश्न हाय..." क्रांतीने टककन चिनुकडे बघितलं...

"क्रांती काय करायचं ठरवलंयस?" रत्ना
"माझ्यासाठी न्हाय पण आत्यांसाठी मला वीरकडे जावंच लागणार अन या दोघींचा प्लॅन मी होऊन देणार न्हाय..." क्रांती
"हे भारी ठरवलंयस त्या निमित्ताने तुला वीरचा स्वभाव अन त्याचा खरं प्रेम कळल." रत्ना


सगळे आवरून तयार होते. इंडेवरमध्ये सगळे ऍडजस्ट होऊन बसून बघत होते पण एवढं बसत नव्हते मग मामांची स्कारपियो घेतली. मागे चिनू, ऋषी, संतू अन रत्ना बसले. मध्ये तेजश्री, संग्राम बसले. पुढे वीर ड्रायव्हिंग सीटवर बसला. वीर क्रांतीला म्हणणार पुणे ब त्या आधीच स्वप्न त्याच्या शेजारी जाऊन बसली. तेवढ्यात संग्राम म्हणाला.
"स्वप्न आग तू मग ये आमच्या शेजारी बसायला क्रांतीला पुढं बसुदे..." संग्राम
"आता बसली ना ती बसू द्या... क्रांती ये माग.." क्रांतीला तेजश्रीचा हेतू समजला ती काही न बोलता तेजश्रीच्या बाजूला बसली. स्वप्नालीच्या डोळ्यात जिंकल्याच भाव होते. हे वीरच्या लक्षात आले. वीरने चावी लावली आणि अचानकच ओरडला. "आ... आ..." वीर
"काय झालं सगळे काळजीबे वीरकडे बघायला लागले."
" अरे हाताला चमक भरली... लई भरून आलाय..." वीर कळवळून बोलला.संग्राम गाडीतून उतरला.
" उतर तू बघू मला हात." वीर उतरला त्याने खाली उतरून संग्रामला हात दाखवला आणि त्याला डोळा मारला. संग्रामला समजायचे ते समजले. सगळे डोकावून त्या दोघांकडे बघत होते.
"अरे बापरे हे एवढा सुजलाय हात अन तू आत्ता दाखवतो. तू अजिबात ड्रायव्हिंग करू नको आधी माग बस आपण दवाखान्यात दाखवू मग निघू..." संग्राम
"दादा मी गोळी घेतली तू ड्राइव्ह कर मी बसतो माग..." वीर मग बसला अन चिनुकडे बघितलं. चिनू हसली. करण चिनूने आधीच स्वप्नाली आणि तेजश्रीचा प्लॅन वीरला सांगितलं होता. स्वप्नाली उतरायला लागली.
"अग बसली तर बस आता कशाला उतरती..." संग्रामने आग्रहाने तिला पुढे बसवले. तेजश्रीला संग्रामचा राग आला. वीर क्रांतीच्या शेजारी जाऊन बसला. उगाचच स्वतःच्या हाताने हात दाबू लागला.
"बघू कुठं सुजलाय...? क्रांती. वीरने मनगट दाखवले. क्रांतीने तिच्या हलक्या हाताने त्याचा हात दाबू लागली होती.
मग वीरला आणि काय हवं होतं आणखी...

तुझं रुसणं, माझं मनावन...तुझं रागावणं, माझं हसणं...
असे न बोलता, नजरेने खेळ चालू होते...
तेंव्हा फक्त तू माझा, नि मी तुझी होते…

ज्याला कळायचं होत त्याला समजल होत. स्वप्नाली चिडून तेजश्रीकडे बघत होती.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED