Majha Hoshil Ka ? - 1 books and stories free download online pdf in Marathi

माझा होशील का ? - 1

आई सकाळ पासून च संजना च्या मागे लागली होती उद्या संध्याकाळी तिला बघायला मुलगा येणार होता. पण संजना ला अजिबात वेळ नव्हता. संजना
संजना ची आई सरीता "अगं संजना काम काय आयुष्य भर संपणार आहे का? म्हणून लग्नाचं किती दिवस टाळशील. "

संजना , " आई आयुष्य पडलयं ह्या सगळ्या गोष्टी करायला. तुला माहीत आहे ना मला लग्नात काहीही इंटरेस्ट नाही आहे. "

सरीता ताई, " संजना अगं मी असे पर्यंत तुझं सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटत गं मला. आणि जुन्या गोष्टी आठवून काही फायदा आहे का आता? "
. आईने नकळत तिच्या जखमेवर ची खपली काढल्यामुळे ती खूप दु:खी झाली. पण आई आपल्या काळजी पोटी हे सगळं बोलत आहे हे तिला कळत होते. पण कुठेतरी तीचं मन दुखावले गेले होते.
तीने तिचे अश्रू लपवण्यासाठी गॉगल घातला आणि ती ऑफिस साठी निघून गेली. आईला पण वाटले आपण उगीचच तो विषय काढला.
ती तो विषय विसरायला बघत होती. पण काही ना काही होऊन तो विषय परत तिच्या समोर यायचा. पण आता तीने हा विषय डोक्यातून काढून टाकायचा निश्चित केले.

ती ऑफिस ला आली . कामात बिझी झाली तसं ती घरातल्या सगळ्या गोष्टी विसरून गेली . संध्याकाळ कधी झाली तिला कळलचं नाही. सगळे निघाले. तसं तीने पण आपलं काम आवरलं . घरी जाताना मुद्दाम तीने आज आईच्या आवडीची सिताफळ बासुंदी घेतली. संजना ला आईची काळजी कळत होती. आई तीची वाटच बघत होती. सकाळी ती गेल्या पासून आईच्या मनाला रुखरुख लागली होती.
बेल वाजल्या बरोबर लगेच आईने दरवाजा उघडला. संजना चा हसरा चेहरा बघून आई थोडी रिलॅक्स झाली. संजना ने आईच्या हातात सिताफळ बासुंदी दिली.
संजना, " आई आज पुरी बनवूया का ❓ मी तुला मदत करते. आज आपण दोघींनी मिळून स्वयंपाक करुया. मी चेंज करून येते. "
आई विचार करू लागली. तीला संजना ची ही रिॲक्शन वेगळीच वाटली पण जाऊ दे , आता तिचा मुड खराब नाही करायचा .
संजना चेंज करुन आली तिने ऑनलाईन छोले मागवले. आईने पुरी चे पीठ मळता मळता आईच्या आणि तीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. दोघीही जेवायला बसल्या.

संजना , " आई"

आई, " काय गं संजना? "

संजना, " आई तुला खरचं वाटतं का गं मी त्या मुलाला भेटायला हवं. "

आई, " हो बाळा, मला खरचं वाटतं की, आता तू तुझ्या आयुष्याचा विचार करायला हवा. ."

संजना, " ठिक आहे आई . तू म्हणतेस म्हणून नाहितर मला काही च इंटरेस्ट नाही आहे. "

आई, " संजना मी असेपर्यंत तुझं सगळं नीट व्हावं असं वाटतं आहे. नंतर तू एकटी पडशील. आईची काळजी तुला आई झाल्या शिवाय नाही कळणार. "..

संजना, " ठिक आहे . उद्या च येणार आहेत का ती लोकं. मुलगा काय करतो? काही सांगशील की नाही? "

आई, " त्याचं नावं आदित्य . खूप मोठी लोकं आहेत ती. त्याचा स्वतःच बिझनेस आहे. "

संजना, " बघुया आता उद्या च कळेल काय ते? "

दोघीही आपलं जेवण आटपून झोपायला गेल्या. पण दोघींना ही झोप येत नव्हती. आई विचार करत बसली होती. उद्या चा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडू दे याचा.

संजना पण उद्या चाच विचार करत होती. काय होईल उद्या? तीला हा बघण्याचा कार्यक्रम च आवडायचा नाही.
इतकं शिक्षण घेऊन पण लोकं मुलींना च का बघायला येतात. इंटरव्ह्यू घेतल्या सारखे प्रश्न विचारत राहतात.
जाऊ दे बघू उद्या च उद्या.

दुसऱ्या दिवशी ती जरा लवकरच ऑफिस ला पोहचली .
ती भराभर आपली कामं हाता वेगळी करत होती. लंच ब्रेक झाला तरी ती कामातच होती. पटापट खाऊन परत ती कामाला लागली. संध्याकाळी जरा लवकरच ती घरी निघाली. आईने तिच्या आवडीचे चीज सॅण्डविच बनवले होते. पाहुण्यांसाठी समोसे, थंडा, अजूनही बरेच स्नॅक्स आणले होते तीने येताना.
एक छानशी फ्लोरल प्रिंट ची साडी ती नेसली. त्यावर साजेसा पण हलका मेकअप तीने केला. केसांचा साईड भांग पाडुन क्लचर लावले होते. संजना २५ वर्षांची एक सुंदर तरुणी गोरी पान स्ट्रेटनींग केलेले केसांचा लेयर कट केलेला होता. थोडेसे ब्लाॅन्ड कलर मध्ये हायलाईट केलेले होते. एका गालावर पडणारी खळी तिच्या सौंदर्यात जास्तच भर घालत होती. आईने सगळे टेबलवर मांडून ठेवले. तिची मावशी आणि तीचे मिस्टर,
तीचे काका आणि काकी पण येणार होते. काकांचा मुलगा
अंकीत पण येणार होता.तीची सगळी तयारी झाली आहे की नाही ते बघायला आई आली.आईने तिच्या कानाच्या मागे काजळाचे तीट लावले. ती खूप सुंदर दिसत होती.
७ वाजले तसे मावशी आणि काका आले. त्यांच्या पाठोपाठ च काका काकी आले. त्यांना असं वाटत होते की, आपण जर हिच्या लग़्नात जास्त इंटरेस्ट दाखवला तर परत हिच्या लग्नाची झंझट आपल्या गळ्यात पडेल. त्यामुळे ते फक्त फॉरमॅलिटी म्हणून आले होते. पण अंकित चे आई वडील जरी ह्यला फॉरमॅलिटी समजत असले तरी अंकीत तसा नव्हता त्याचं आणि संजनाची बॉंडींग खूप चांगले होते. तो तिला आपली सख्खी बहिण च समजायचा.
थोड्या वेळाने अंकित पण आला. आईने तशी त्यांना मुलाबद्दल थोडीफार माहिती दिली च होती. मुलाकडचे लोक आले आईच्या ऑफिस मधली एक मैत्रीण होती. रजनी तिच्या घरी एक फंक्शन होते तीथे संजना आणि तिची आई दोघी गेल्या होत्या. तेव्हा संजना ला त्या मुलाच्या आईने बघीतले आणि त्यांना ती खूप आवडली. म्हणून मग रजनी मावशी ला मध्यस्थ करून त्यांनी मागणे घातले.
मुला केले लोकं यायची वेळ झाली. तसं संजना ला एक अनामिक हुरहुर लागली. तिला हे सगळं आवडत नव्हतं. तीला असं वाटायचं. ह्या एका भेटीत काय आयुष्याचे निर्णय होतात का? आयुष्य भर आपल्या ला एकत्र राहायचे असते तेव्हा इतक्य लवकर घेतलेले निर्णय चुकतात का? तिला खरतर लग्नच करायचं नव्हतं. पण आई सारखी मागे लागली होती. तिला असं वाटतं होतं की लग्न झालं की संजना साठी असणारी तिची जबाबदारी संपेल. आपल्या वर असणारी जबाबदारी तिला दुसऱ्या वर सोपवायची होती. मला जोडीदार मिळाला म्हणजे ती एक प्रकारे सगळ्या जबाबदारी तून मुक्त होणर होती.
त्यातून हे स्थळ म्हणजे तिला आकाश च ठेंगणे झाल्यासारखं वाटत होते. तिच्या आनंदा साठी का होईना संजना हे स्थळ बघायला तयार झाली होती. ती ह्या विचारात हरवून च गेली होती इतक्यात पाहुणे मंडळी आली. आईने तिला आतच थांबायला सांगितले होते.
सगळे येऊन बसले. थोडीशी ओळख परेड झाली. आईला तर मुलगा पसंत पडला. आईने संजना ला बोलवले. संजना जरी माॅडर्न असली तरी तिच्या मनात धडधडत होते.
संजना ज्यूस चा ट्रे घेऊन आली. तीने सगळ्यांना ज्यूस दिला. ती एका बाजूला उभी राहिली. आदित्य च्या आईने तिला आदित्य ची ओळख करून दिली. दोघांनी एकमेकांना हाय हेलो केले. आदित्य दिसायला खूप हॅन्डसम होता. गोरा पान किंचीत ब्राऊन कलरचे डोळे, केसांचा छान असा हेअरकट होता. क्लीन शेव, व्यायामाने कमावलेले पिळदार शरीर. व्हाईट कलरचे शर्ट, ब्लॅक कलरची ट्राऊझर त्याला शोभून दिसत होती.नाही म्हणण्यासारखे त्या मुलामध्ये काही च नव्हते.

हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED