Majha Hoshil Ka ? - 6 books and stories free download online pdf in Marathi

माझा होशील का ? - 6

भाग ६
तू पण ना आई छोट्या छोट्या गोष्टींचे किती टेन्शन घेतात. मला माहिती होत तू टेन्शन घेशील ते. म्हणून च लगेच बुक करून टाकला हॉल. संजना आईला म्हणाली.

सरीता ताई, " उद्या विणा ताईंना कळवते. "

संजना, " ठिक आहे. कळव मावशी आणि काकीला पण कळवायला हवं. ."त्यांना पण आताच सांग . "

सरीता ताई, " हो हो सांगते. "

संजना, " अजून काही असतं का ग आई? म्हणजे साखर पुड्यासाठी अजून काही आणायचे असल्यास ते साग. म्हणजे मी ते आधीच मागवून घेईन. "

सरीता ताई, " ठिक आहे मी भटजींना विचारून सांगते. "

संजना, " बरं गुड नाईट आई. "

सरीता ताई, " गुड नाईट बेटा.

संजना झोपायला गेली खरी पण तिला काही झोप येत नव्हती. त्यांचं लग्नं ठरले होते पण आदित्य ने एक फोन तर राहुचदे पण साधा मॅसेज पण नाही केला. कदाचित अबोल लोक असेच असतील . लग्न झाल की आपण त्याला बोलतं करु.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे तिचं रुटीन चालू झाले.तीने आदित्य ला गुडमॉर्निंग चा मॅसेज केला पण त्यावर त्याने काहीच रिप्लाय नाही दिला.
तिने मोबाईल ठेवला आणि ती तिच्या ऑफिस ला जायच्या तयारी ला लागली. थोड्यावेळाने ती तिच्या ऑफिस साठी निघून गेली. सरीता ताई नी मग आदित्य च्या आईला फोनवरून हॉल बुक झाल्याचे कळवले. आणि हॉलचे फोटो पण पाठवले.

संजना पटापट आपलं काम उरकत होती. सकाळ पासून खूप काम होतं ऑफिस मध्ये त्यामुळे तिला जरा पण वेळ मिळाला नाही. थ़ोडी निवांत झाल्यावर तीने लंच ब्रेक मध्ये तीने फोन बघितला. तर फोनमध्ये आदित्य चा मॅसेज दिसला. तिच्या गुडमॉर्निंग ला रिप्लाय दिला होता.
ती मनोमन थोडीशी सुनावणी. त्याला काही तरी नॉर्मल मॅसेज करावा असे तिला वाटले. पण तीने तो मोह टाळला.
लगेचच त्याला मॅसेज करणे तिला बरोबर वाटले नाही. परत एकदा ती तिच्या कामात बिझी झाली.
तीला असं वाटतं होत की त्याचा काही फोन वैगरे येईल. पण तसं काही झालं नाही.
संध्याकाळी ती घरी आली. आई तिला म्हणाली, की साडी खरेदी ला कधी जायचं? "

संजना, " जाऊ ग आई नंतर. "
आई जरा हिरमुसली पण थोड्याच वेळात संजना साठी कोल्ड कॉफी बनवून घेऊन आली. लोकांना गरम पेय प्यायल्याने बरं वाटायचं. हिला थंड पेयाने बरं वाटायचं. कोल्ड कॉफी तिचा विक पॉईंट होता.

आईच्या तहातात कोल्ड कॉफी बघूनच संजना फ्रेश झाली. आईला चांगलच ठाऊक असतं आपल्या मुलांना कसं फ्रेश करायचं ते.

संजना, " आई तुला कसं कळलं गं मला कोल्ड कॉफी हवी आहे ते? माझ्या मनात ल कसं ओळखतेस ग आई. "

सरीता ताई, " आई आहे मी तुझी. म्हणून कळतं मला. "

मायलेकी दोघीजणी मग गप्पा मारत बसल्या.

"आदित्य खूप अदबशीर आहे ना ? "सरीता ताई संजना ला म्हणाल्या.

संजना, " हो हो जरा जास्तच शिस्तीचा वाटतो तो? "

सरीता ताई, "पण स्वभावाने चांगला वाटला मला. "

संजना, " स्वभाव लगेच नाही कळत ग. "

सरीता ताई, " अगं मी काय गप्पा मारत राहिले, जेवण बनवायचं राहीले आहे. "

संजना, " अगं राहू दे ना आई. मी मागे आपल्या साठी काहीतरी. "

सरीता ताई, " अगं नको नको मी बनवते मस्त गरमागरम.. जेवण बनवता बनवता गप्पा मारुया. "

संजना, " चालेल. तसं करुया. "

मग सरीता ताई स्वयंपाक करत होत्या. संजना त्यांना मदत करु लागली तर त्या म्हणाल्या, " राहू दे गं करते मी. "

संजना, " का गं करते मी पटकन होईल ना. "

सरीता ताई, " आता तुझ्या घरी गेलीस की करायचं लागेल . "

संजना, " तरी मी मनात म्हणतच होते. अजून हा डायलॉग कशी नाही बोलली स."

दोघीही हसायला लागल्या. आई सतत आपल्या मुलीला जाणीव करून देत असते. सासरी तुला कोणी बस म्हणणार नाही. तिकडच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात लागतात. वधू परीक्षा ही एका दिवसाची नसून अख्खं आयुष्य वधू परीक्षेचं प्रॅक्टिकल चालूच असत. एकदा का सासरी गेले की तुमच्या प्रत्येक कृती कडे सगळ्यांच लक्ष असतं . सासरी गेल्यावर मुलीच्या मनाची तयारी असायला हवी म्हणून बहुतेक आई हे डायलॉग मारत असते.

आपण गेल्यावर आई एकटी पडेल म्हणून तीला खूप वाईट वाटायचं. तसं सरीता ताईंचं रुटीन खूप बिझी होते. त्यांनी स्वतः ला वाचनात इतर कामात बिझी ठेवले होते. पण मुलगी च ती काळजी वाटत बसायची तिला. आपल्या ला एक भाऊ हवा होता असं तिला नेहमी वाटायचं. पण असो आता काय करणारं. तरी बरं आताची टेक्नॉलॉजी खूप पुढारलेली आहे. विडीयो कॉल वरुन लांब असणाऱ्या माणसाला प्रत्यक्षात बघत बोलता येते. आईला रोज विडीयो कॉल करायचे ती मनोमन ठरवते.
_______ __________ ________ _________ _____ _
आज बुधवार होता. आदित्य च्या आईबरोबर तीला शॉपिंग ला जायचं होतं.

विणा ताईंचा संजना ला कॉल येतो.

विणा ताईं, " हॅलो, संजना मी विणा बोलतेय आदित्य ची मम्मा. "

संजना, " हा बोला काकी. "

विणा ताई, " संध्याकाळी ६ वाजता साडी खरेदी करायला जायचं आहे ना. त्यासाठी कॉल केला होता."

संजना, " बरं कुठे यायचं आहे? "

विणा ताईं, " दादर ला जाऊया का? मी गाडी पाठवते. "

संजना, " नको मी कॅब करून येईन. तुम्ही मला ॲड्रेस सांगा मी येईन. "

विणा ताईं, " बरं बरं मी तुला ॲड्रेस सेंड करते. "

संजना, " ओकै. बाय "

विणा ताईं, " बाय"

सरीता ताई,"काय गं संजू कोणाचा कॉल होता? "

संजना, " आदित्य च्या मम्मा चा कॉल होता. संध्याकाळी साडी खरेदी करण्यासाठी जायचं आहे ना म्हणून केला होता कॉल. "

सरीता ताई, " अगं मग त्यांना आई किंवा मम्मा म्हणायचं ना. "

संजना, " कशाला आई किंवा मम्मा म्हणण्यानुसार त्या काय माझी आई थोडीच होणार आहेत. सासुबाई च राहणार आहेत. उगीचच खोटं खोटं मला नाही वागता येत
काकी च बरं आहे. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. "
सरीता ताई, " अगं किती ग परखड बोलतेस तू. "

संजना, " आई मी परखड नाही प्रॅक्टिकल बोलते. "

संजना ऑफिस ला निघून गेली. संध्याकाळी लवकर निघायच होतं तर आता तिला काम आटपाव लागणार होते.

ऑफिस ला आल्यावर ती भराभर आपलं काम आवरू लागली. साडेपाच वाजताच तीने आपले सर्व काम आवरले. बरोबर ६ वाजता ती विणा ताईं नी सांगितलेल्या ॲड्रेस वर पोहचली. विणा ताईं तीची वाटच बघत होत्या.

संजना, " उशीर झाला का मला? तुम्हाला वाट नाही ना बघायला लागली. "

विणा ताईं, " नाही बघायला लागली. मी पण तुझ्या थोड आधी आले. पानेरी मध्ये जाऊया का ❓ "
्औ

संजना, " हौ चालेल. "

विणा ताईं आणि ती दोघी दुकानात गेल्या. दुकानदाराला विणा ताईं नी आपले बजेट त्याला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी संजना ला त्याने वेगवेगळे पॅटर्न च्या साड्या दाखवत होते.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED