Majha Hoshil Ka ? - 8 books and stories free download online pdf in Marathi

माझा होशील का ? - 8

भाग ८
संजना आणि सरीता ताई जायला निघाल्या.अंकीत तिला सोडायला घरी येत होता. पण संजना म्हणाली इथे जवळच तर आहे. जाऊ आम्ही परत तुला त्यासाठी उलटं यावं लागेल. आदित्य अजूनही त्याच्या मित्रांच्या गृप मध्ये होता. विणाताईं नी त्याला आवाज देऊन बोलवलं. तो आला पण काही ही न बोलता गुपचूप उभा राहिला. संजना कॅब बुक करत होती. विणाताईं आदित्य ला त्यांना सोडून यायला सांगतात. आदित्य काही बोलणार इतक्यात संजना च सांगते, " कॅब येईलच दोन मिनिटांत. "

कॅब येते .. दोघीही कॅब मध्ये बसतात. सरीता ताई त्यांना म्हणजे च विणाताईं ना हात दाखवतात. पण संजना मात्र त्यांना हात दाखवत नाही. कॅब निघते.

सरीता ताई, " संजू तू का हात नाही दाखवतात त्यांना. कसं वाटतं असेल त्यांना. "

संजना, " त्यात काय कसं वाटेल? त्या बोलल्या का तसं? तूच आपलाआपला काही तरी विचार करतेस. "

आईने मग तो विषय तिथेच संपवला.
घरी आल्यावर संजना फ्रेश होऊन आली.. नाईट ड्रेस घातल्यावर तिला जरा हलकं वाटलं. गॅलरी त येऊन बसली समोर रस्ता शांत पणे पसरला होता. दिवसभर गजबजलेला रस्ता आता किती शांत वाटत होता. आज आपला साखरपुडा झाला तरी आपल्याला का आनंद होत नाही आहे. तीने डोळे बंद केले. तीच्या डोळ्यासमोरून तीचा भूतकाळ तरळत होता. डोळे बंद केले की त्याचा चेहरा समोर यायचा. तिच्या बंद डोळ्यातून अश्रू तीच्या गालावर ओघळू लागले. तीने डोळे उघडले. समोरच्या रस्त्यावर ती शांतपणे बघत बसली.
ब्रेक चा जोरात आवाज आला . ती आवाजाच्या दिशेने बघू लागली. एक रिक्षाने बाईक वाक्याला कट मारली त्या बाईक वाल्याचा बॅलन्स गेल्यामुळे तो खाली पडला. रस्त्यावर कोणीच नव्हते. तीने पटकन लाच की घेतली आपला मोबाईल घेतला पाण्याची बॉटल घेतली आणि ती खाली आली. येता येताच तीने पोलीसांना फोन लावला. वॉचमन जागा होता पण तो आपली ड्यूटी सोडून रस्त्यावर येऊ शकत नव्हता. ती धावतच बाहेर गेली त्या मुलाला खूप लागलं होतं तो बहुतेक बेशुद्ध झाला होता.
हेल्मेट घातलं होतं तरी सुद्धा त्याला डोक्याला थोडसं लागलं होतं तीने आपल्या हातातले पाणी त्याच्या तोंडावर मारले. त्याने डोळे उघडले. तीने त्याचं डोकं उचललं त्याला पाणी प्यायला दिलं . पाणी पोटात गेल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. इतक्यात पोलीस पण आले त्यांच्या मागोमाग ॲम्ब्यूलन्स पण आली. तो थोडा सावरला होता. पोलीसांनी तिला सगळे विचारले. तीने जे बघितले ते सगळे सांगितले. त्याला पटकन ॲम्ब्यूलन्स मध्ये ठेवले आणि ॲम्ब्यूलन्स निघून गेली. पोलिसांनी तीचा नाव नंबर आणि पत्ता घेतला. गरज लागली तर पोलीस स्टेशन ला यावे लागेल असे सांगितले.
ती हो म्हणाली त्या मुलाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहे ते पण विचारले. पोलीसांचे सगळे सोपस्कार आटपून ती घरी आली. दरवाजा चा आवाजाने सरीता ताई जाग्या झाल्या होत्या त्या तीची वाट बघत बसल्या होत्या. दरवाजा खोलल्या खोलल्या त्या तिला म्हणाल्या", कुठे गेली होती स संजू? "
संजना, " अगं आई खाली गेले होते. समोरच्या रस्त्यावर एक ॲक्सिडेंट झाला. म्हणून खाली गेले होते. "

सरीता ताईं, " अगं कोणाला तरी सांगायचं होतसं ना? तू कशाला गेलीस? "

संजना, " कोणाला सांगत बसण्या पेक्षा पोलीसांना फोन केला. "

सरीता ताईं, " अगं तुला तर माहिती आहे ना पोलीसांना सांगितलं म्हणजे परत त्यांचे शंभर प्रश्न असतात. "

संजना, " आई पोलीसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून एखाद्या ला मरायला तसचं सोडून द्यायचं का? आपली गैरसोय होईल म्हणून तो मरतो आहे त्याला मरू द्यायचं का? मी मुलगी आहे म्हणून मी अपरात्री कोणाला मदत पण नाही करायची का❓
त्याची पण घरी कोणी तरी वाट बघत असेल ग आई. हाच विचार जर मी करत बसले की आता मी जर याची मदत केली तर पुढे जाऊन मला गैरसोयीचे होईल. म्हणून त्याची मदतच नको करायला. तर मग माझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे. "

सरीता ताईं, " माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. पण आता तुझं लग्नं ठरलं आहे म्हणून मी म्हटलं. "

संजना, " त्यावेळी मला त्या माणसाचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचे वाटले. माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? त्याचा ॲक्सिडेंट बघून त्याकडे दुर्लक्ष करून झोपून जाणे मला जमल नसतं. आयुष्यभर ती बोच माझ्या मनात राहीली असती. "

आईला पण तीचं म्हणणे पटले.

सरीता ताईं, " अगं पण मला सांगून तरी जायचं. "

संजना, " अगं तू झोपली होतीस तूला असं झोपेतून उठवून सगळं समजवत बसण्या इतका वेळ च नव्हता. आणि तुला अचानक असे सांगितले असते तर तूला परत काही झाले असते मग. "

सरीता ताईं, " कीती मोठी झाली गं माझी संजू. कीती समजूतदार पण झाली माझी लेक. "

संजना, " मग काय लेक कुणाची आहे. बरं आता झोपू या. उद्या उठायचं आहे ना. उद्या डबा नको बनवू. मी कॅन्टीन मध्ये खाईन. "

सरीता ताईं, " बरं बाई. "

दोघीही झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी ती आपल्या कामात बिझी झाली. दोन तीन दिवसांनी आदित्य चा तीला मॅसेज आला होता. ती ने तो मॅसेज बघितला. त्यांचे साखरपुड्याचे फोटो होते. ती फोटो बघू लागली. फोटो खूप छान आले होते.
तीने त्याला , " फोटो छान आले आहेत असा मॅसेज केला.

दोन दिवसांनी ती ऑफिस वरून घरी आली तर घरी विणाताईं आल्या होत्या.

संजना, " अरे काकी तुम्ही कधी आलात? "

विणाताईं, " अगं आताचं आले. "

संजना, " कशा आहात तुम्ही? "

विणाताईं, " मी मस्त आहे. तू कशी आहेस? "

संजना, " मी पण मस्त च आहे. "

विणाताईं, " साखरपुडा झाल्यानंतर आपलं बोलणे नाही झाले म्हणून आले सहजच भेटायला. "

सरीता ताईं नी, " त्यांना ज्यूस दिले. "

संजना ने बाहेरून नाश्ता मागवला.

विणाताईं, " सरीता ताईं लग्नाची खरेदी करायला कधी जाऊया. ? म्हणजे जितकं लवकर होईल तितकं बरं कारण नंतर मग ते ब्लाऊज वैगरे शिवून द्यायला टेलर वेळ लावतात आणि आपलं पण एक एक काम होऊन जाईल. "

सरीता ताईं, " हो ना खरेदी झाली की अर्ध काम होऊन जाईल. "

संजना, " ह्या शनिवारी संध्याकाळी जाऊया का? मला सुट्टी असते शनिवारी. रविवारी गेल मग कसं उशीर झाला की परत दुसऱ्या दिवशी ची तयारी वैगरे त्यामूळे मला शनिवारी बरं पडेल. अर्थात तुम्हाला चालत असेल तर. "

विणाताईं, " हो हो चालेल ना. खरेदी पण करू आणि बाहेर च डिनर करू. "

संजना, " ठिक आहे पण डिनर चे पैसे मी देणार".

सरीता ताईं, " संजना अगं काय बोलतेस. "

विणाताईं, " बरं बरं दे तू. असू दे सरीता ताईं. "

इतक्यात संजना ने मागवलेला नाश्ता आला. संजना ने नाश्ता काढून प्लेट मध्ये ठेवला. दाराची बेल वाजली.
कोण आहे बघायला संजना उठली. तर दारात एक पंचवीस वर्षांची मुलगी हातात सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन होती. तिच्या मागेच एक अठ्ठावीस वर्षांचा मुलगा होता.

संजना,"कोण पाहिजे आपल्या ला? "

हा भाग तुम्हाला कसा वाटला? ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED