माझा होशील का ? - 5 Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

माझा होशील का ? - 5

आईने तीला उद्या आदित्य कडे जायची आठवण करून दिली. "काय गं आई कशाला सारखं सारखं आठवण करून देते स उद्या जायचे आहे ना बघू उद्या च उद्या. " संजना आळस देत म्हणाली.
त्याच विचारात ती उठून आपलं आवरु लागली. छान भारीतला मरुन कलरचा सलवार सूट तीने उद्या साठी काढला. पण आईने तो रिजेक्ट केला. आई तिला म्हणाली की, तू साडीच नेस. तीने बेबी पिंक कलरची नेटची साडी काढली. आई तिला सांगत होती की काठा पदराची साडी नेस.
संजना, " नऊवारी च नेसू का ग आई. ", संजना वैतागून म्हणाली.
आईने मग तीचा विषय च सोडून दिला. संजनाचा खरतर मूड चं नव्हता.आदित्य चा असा निरसपणा बघून तीचा मूडच गेला होता.
आई तर खूप च उत्साही होती. तीने तीची मोती कलरची गोल्डन बॉर्डर ची साडी काढून ठेवली होती. त्यावर मोत्यांचा सेट काढून ठेवला .तीने अंकीत ला एकदा रीमायंडर कॉल लावला. संध्याकाळी ६ वाजता निघायचे ठरले. का माहिती नाही पण संजना ला कसला उत्साह च वाटत नव्हता. त्याची आठवण आली आणि तिचे डोळे भरून आले. देव बीव ती काही मानतच नव्हती. त्या दिवसापासून तीचा देवावरचा विश्वास च उडाला होता.
आई तिला जेवायला बोलवण्या साठी आली. आईने तीच्या डोळ्यात पाणी बघितले आणि आई घाई घाईघाईने तीच्या जवळ आली. आईने तीचे डोळे पुसले. आई तिला म्हणाली, " संजू रडण्याने काही बदल थोडीशी होणार आहे. "
संजनाने डोळे पुसले आणि स्वताशी च म्हणाली, " मागचं सगळे विसरून आता पुढचं लाईफ आपल्या पद्धतीने जगायचं. "
ती आईला घेऊन जेवायला गेली. दोघी जणी शांतपणे जेवल्या. कोणी कोणाशी च काही बोलले नाही.
संजना झोपायला निघून गेली. दुसऱ्या दिवशी ची सकाळी ती प्रसन्न मनाने उठली. आणि आपली कामं आवरु लागली. संध्याकाळच्या तयारीला लागली. सगळं तीने आधीच काढून ठेवली.

अंकीत त्याची गाडी घेऊन येणार होता. आईला तर जेवण पण गेल नाही. संध्याकाळी दोघी तयार होऊन बसल्या. १० १५ मिनिटांतच अंकित आला. आणि सगळे आदित्य च्या घरी जायला निघाले.आदित्य च्या घरी पोहोचले. घर मोठ होतं ..बंगला होता. छान प्रशस्त, हवेशीर होतं. आदित्य ची आई, पप्पा , आदित्य ला एक बहिण पण होती. तीचं नाव अनया होतं. पण ती शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. ती काही आली नव्हती. आणि आदित्य असे सगळे हजर होते. नेहमी प्रमाणे च आदित्य च्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.
तो असाच असेल का? की, फक्त आपल्या समोर असा वागत असेल. घराचे इंटिरियर खूप च छान होते. नोकरमाणासं येऊन खायला प्यायला ठेवून जात होती. आदित्य च्या आईने पुढे बोलायला सुरुवात केली.

आदित्य ची आई, " मी काय म्हणते सरीता ताईं पुढच्या आठवड्यात आपण साखरपुडा करू.. पुढच्या महिन्यात लग्न करु. तुम्हाला कस वाटतय. "

सरीता ताईं, " अंकीत तुला काय वाटते. संजना तुला काय वाटते ते सांग. "

अंकीत, " मला वाटते बरोबर आहे. चांगल्या कामाला उशीर कशाला? "

संजना, " तुम्ही म्हणाल तसं. "

आदित्य ची आई नोकराला पेढे आणायला सांगते . साखरपुड्याचा मुहूर्त मी गुरुजींना काढायला सांगितला होता. तुम्हाला यापैकी कुठला मुहूर्त योग्य वाटतो तो ठरवू. "
आदित्य ची आई गुरुजींनी सांगितलेल्या तारखांची चिठ्ठी सरीता ताईं कडे देतात. सरीता ताईं अंकीत आणि संजना मिळून त्यातली एक तारीख फिक्स करतात.

अंकित, " २७ तारीख योग्य वाटतेय आम्हाला. तुम्हाला चालेल का? "

वीणा ताई, " हो हो चालेल. "

सरीता ताईं, " ते देण्या घेण्याचे कसे करायचे? "

विणा ताईं, " लग्नाचा खर्च आम्ही करु साखरपुड्याचा तुम्ही करा."

सरीता ताईं, " साखरपुड्याचा खर्च आम्ही करूच पण लग्नाच्या हॉलचे पैसै तरी भरतो आम्ही. "

विणा ताईं, " तुम्हाला सोयीच होईल आणि तुमची इच्छा असेल तसं करा. अमुक च रक्कम आम्हांला द्या असा काही आमचा आग्रह नाही. कॅटरिंग च काय ते आम्ही बघूच. "

सरीता ताईं, " ठिक आहे. काही वाटलं तर फोनवर आपलं बोलणं होतच राहिल. "

विणा ताई, " हो हो होईलच बोलणं. "

सरीता ताईं, " येऊ का आम्ही ? "

विणा ताईं, " ते साडी खरेदी करण्यासाठी आणि अंगठीच माप देण्यासाठी संजना ला एकदा यावं लागेल. तुला जमेल तेव्हा जाऊ. "

संजना, "बुधवारी थोडं काम कमी असतं तर बुधवारी संध्याकाळी ६ वाजता जमेल मला. "

विणा ताईं आदित्य ला विचारतात. ,"आदित्य तुला जमेल ना रे बुधवारी "

आदित्य अचानक विचारलेल्या या प्रश्नाने गोंधळून जातो.

आदित्य, " मी ... माझं काय काम आहे? साडी तलं मला काही कळत नाही. मी कशाला येऊ. "

सगळे आदित्य कडे बघू लागतात.

विणा ताईं, " अरे आदित्य तू कशाला टेन्शन घेतोस साड्यांचे काय ते आम्ही बघू दोघी जणी. पण तू असायला हवा आहे स. "

आदित्य, " बरं मी बघतो आणि सांगतो. "

अंकीत च्या गाडीत बसून सगळे निघतात. अंकित गाडी मध्ये बोलला की, " चला आता लग्नाच्या तयारीला लागायला हवं. "

सरीता ताईं, " हो ना किती गडबड होईल . "

संजना, " आई तू आता साखरपुडा आणि लग्नाचं उगीचच टेन्शन घेऊ नकोस आणि मला पण देऊ नकोस. "

सरीता ताईं, " शनिवारी संध्याकाळी आपण साडी घ्यायला जाऊ या. "

संजना, " अगं पण साडी तर ते लोक घेतात ना? "

सरीता ताईं, " हो ते साखरपुड्याची साडी घेतीलच. पण इथून नेसून जायला साडी घेऊया ना. "

संजना, " अगं पण इतक्या साड्या आहेत त्यातलीच एक नेसेन. "

सरीता ताईं, " नको गं आपण घेऊया एक साडी. "

संजना, " बरं बाई घेऊया आणि तुझ्यासाठी पण एक घेऊया. "

अंकित, " चला मॅडम घर आलं. "

संजना, " तू पण चल ना घरी जेऊन च जा. "

अंकित , " नको नंतर येईन. "

संजना, " बरं बरं चल आम्ही येतो बाय"

अंकित, " चल काकी येतो मी. "

सरीता ताई, " थॅंक्यू तु आलास. "

अंकित, " अगं थॅंक्यू कशाला म्हणतेस काकू. संजना माझी पण बहीण आहे ना. "

सरीता ताई, " हो रे. असाच तिची पाठिशी रहा कायम
"

अंकित, " हो ग राहिनच नेहमी. चला बाय"

अंकीत ने त्यांना बिल्डिंग च्या गेट मध्ये सोडलं आणि निघून गेला.
दोघी घरी आल्या चेंज वैगरे करून निवांत बसल्या. आई खूप खुश होती. आईला असं किती वर्षांनी तीने खुश बघितले होते. ती बारावी ला होती तेव्हा तिचा बाबा एका
ॲक्सिडेंट मध्ये गेला. तेव्हापासून आई कधीच इतकी खुश दिसली नव्हती. पण आज ती खूपच खूष होती. साखर पुड्याची तयारी करायला लागायला हवं .
तीने ऑनलाईन जवळपासचा हॉल वैगरे मिळतो का ते बघितले. सुदैवाने त्या तारखेला तिच्या घराजवळचा एक हॉल मिळाला साखर पुड्यासाठी. तीने आईला सांगितले की, तीने तो हॉल बुक केला.
आईला तिचं खूप कौतुक वाटलं.ती आईला म्हणाली, " आता कॅटरिंग बुक केलं की अर्ध काम झालं. मग फक्त आदित्य साठी अंगठी खरेदी करायची आहे तेवढच राहील.
"हो गं किती पटकन केलास तू हॉल बुक. मला तर बाई इतकं टेन्शन आलं होतं. ", सरीता ताई तिला म्हणाल्या.

हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा.हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका.