Kouff ki Raat - 15 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग १५

भाग 15

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..


बाळ्या आपल्या गाडीभोवती उभा होता .

आंधळ्या मांणसाला जस डोळ्यांन समोर
अंधार दिसावा - न प्रकाश ,किंवा , कोणतच दृष्य त्यास दिसत नसावे ,तसा अंधार आजुबाजुला पसरला होता.

चमत्कारीक अंधार होता हा!

बाळ्याच्या मागे दहापावळांवर कब्रस्तानाच कंपाउंड होत.

ती दगड बांधकाम केलेली काळ्या रंगाची भिंत अंधाराने गिळून टाकली होतीं .

समोरून पाहता बाळ्याच्या मागे काळ्या रंगाच एक अंधार वर्तूल तैयार झालेल दिसत होत - ज्या अंधारातून न जाणे काय बाहेर येइल..

पाठीत धारधार नख घुसवेल, की मागुनच त्या खोळ अंधा-या गर्तेत खेचून घेईल?

बाळ्याच सर्व लक्ष पुढे होत हेच बर , नाहीतर त्या अंधारात पाहता त्याची बोबडीच वळली असती.

कब्रस्ताना बाहेर बाळ्या एकटाच उभा होता. त्याच्या पुढे वीस पावलांवर हायवे आणि मग पुढे घनदाट कालोखी जंगल होत.

त्या कालोखात पाहताच भीतिने अशी काही गाळण उडत होती की त्याच्या तोंडातुन राम -राम शब्द बाहेर पडत होते,

कब्रस्ताना बाजुला जराही आवाज झाला की मनात कस धस्स होत-होत... आणि त्याची ती भेदरलेली, विस्फारलेली नजर आवाजाच्या दिशेंचा कानोसा घेत होती.

घाबरल्या मुळे त्याला आभास म्हंणा की आणखी काही

अंधारात वेगवेगळ्या आकाराच्या मोठ्या मोठ्या सावल्या इकडून तिकडे फे-या मारतांना दिसुन येत होत्या,

हवेसारख्या त्या आकृत्या काळ्या, तर पांढ-या होत्या.

हाईवेवरून जातांना कब्रस्ताना बाहेर अपघातात मृत झालेल्या मांणसांच्या भटक्या रूह होत्या त्या , ज्या मुक्तिसाठी तळमळत फिरत होत्या..

कब्रस्तानातुन कसलातरी कुदल, फावड्याने माती खणताना ज्याप्रकारे खच, खच,खच आवाज होतो,

तसा आवाज बाहेर येत होता.
बाळ्याच्या कानांवर पडत होता.


या पाहूयात कब्रस्तानात काय घडत आहे.

कब्रस्तानाआत चौही दिशेना हवेत पांढरट रंगाच्या धुक्याची वाकडी तिकडी काया चेटकीणीसारखी फिरत होती.

गारव्याची हवा त्याला जोड म्हंणून त्याच्या समवेत फिरत होती.

वर हवेत फिरणा-या धुक्याखाली


पांडूबूवा एका कब्रेजवळ खड्डा खणत होता.

सावकाराच्या मृत आईच्या प्रेताला दफनकरण्यासाठी त्याने पाच फुट उंच असा खड्डा खणला होता,

त्या खड्डयातुन त्याच्या डोक्याला गुंडाळलेल सफेद कापड डोक काय ते दिसत होत.

पांडूबुवा खड्डयात उतरुन माती खणत होता,आणी त्या कुदलमधून माती खणतावेळेस हलके हकके खच,खच आवाज बाहेर पडत होता.

पुर्णत स्मशानात घुमत होता.


" हुश्श ..! झाल एकदाच..!"

पांडूबुवाने कपाळावर जमा झालेला घाम हाताने पुसून हे वाक्य उच्चारल.

पांडूबुवाच्या पाठीमागे खड्डयातुन थोड वर कब्रस्तानातल्या हिरव्या गवतावर एक कब्रस्तानातलीच eternal साइलेंस नावाची मूर्ती होती.

( मूर्ती रचना पुढीलप्रमाणे.)
मूर्ती दहा फुट उंच असुन ऊभी होती, मूर्तीच्या पुर्णत शरीरावर एक सफेद कपडा कोरला होता ,ज्या कपडयाने मूर्तीच सर्व शरीर झाकल गेल होत,

हा तस म्हणायला चेह-यावरचा काही भाग म्हंणजेच टोकदार नाक, खालची हनुवटी दिसत होती.

बाकी चेह-याचा आतला भाग डोळे, भुवया ,तोंड सर्व काही अंधाराने झाकल होत.

ह्या मूर्तीबदल असं म्हंटल जात, की ह्या मूर्तीच्या डोळ्यांत जो कोणी मणुष्य डोळे घालुन पाहतो,

त्याला आपल्या मरणाच दर्शन घडत.

हे कितपत खर आहे आणि कितपत नाही, हे त्यालाच ठावुक ज्याने ते अनुभवल असाव.

मसनात लाकड तोडणारा पांडू बुवा आज पाहिल्यांदाच कब्रस्तानात प्रेतासाठी खड्डा खणत होता.

ज्याकारणाने त्याला धाप लागलेली, हात पाय जाम थकले होते,

छाती जोरजोरांच्या श्वासासहित वर खाली होत होती.

खड्डयातच पाठ टेकवून तो काहीक्षण दमखात बसला होता.

अपेक्षा म्हणा की भीती म्हणा परंतु पांडूबुवाने फार कमी वेळात प्रेतासाठी खड्डा खणला होता.


काम कस फटाफट झालेल, शरीरातुन घाम निघत होता.

पांडूबुवा एकटक पाठटेकून खड्डयात पाठमोरा बसला होता.

खड्डयावर हिरव्यागार गवतावर ती दहा फुट उंच मूर्ती उभी होती.

एकटक निर्जीव अवस्थेतला तो पुतळाच जणू उभा होता .

ह्या अश्या व्क्ताला ह्या अश्या झपाटलेल्या जागेत न जाणे काय होइल ? कोणीच सांगू शकत नाही.

पांढरट धुक्याला दुधासारख रंग आला होता -पन शुद्ध नाही !

अशुध्द फाटक्या दुधासारखा पिवळाभडक..

कब्रस्तानातल दृष्य आता अंधूक-अंधुक दिसायला सुरुवात झाली होती.

खोल आत गर्तेत असलेल्या मध्येभागी समुद्रातल वातावरण जस काहीक्षणात रौद्र अवतार धारण करतो, जोराच्या विजा कडाडतात, आकाश काळ्या ढगांनी भरुन येत, लाटांच्या उसळ्या मारायला सुरुवात होते तस्ंच काहीस ह्या कब्रस्तानात घडत होत.

हळूवारपणे कब्रस्तानात सफेद रंगाच धुक मेलेल्या ,मृतांच्या कबरांभोवती फिरु लागल होत.

वातावरण बदलायला सुरुवात झालेली.
सैतानाने आपला खेळ मांडायला घेतला होता. अआपल खर रुप दाखवायला सुरुवात केली होती.

कब्रस्तानातल गारठा आणि धुक तीव्र पटीने वाढत चाललं होत.

थंडी अशी काही पडायला सुरुवात झालेली, की शवागारात उभे आहोत की काय असं वाटत होत.

पांडूबूवाच्या शरीराला थंडीने विळखा घातला , तस त्याच शरीर कड , कडू लागल.

" आर बापरे देवा ! ह्या थंडीला काय खूळ भरलं ?"
पांडूबुवा दोन्ही हाताची पाचबोट विशिष्ट प्रकारे चोळत म्हणाला.

व आप्ल्या जागेवर ऊठून उभा राहिला.

सर्व प्रथम त्याने कुदल खड्डयातुन बाहेर फ़ेकली , मग खड्डयातुन कसा-बसा बाहेर पडला.

हाता पायाला माती लागली होती, ती झटकत त्याने हळूच कूदल उचल्ली आणि झटकन समोर पाहील .

की तोच अचानक त्याच्या सर्वं अंगावरुन एक भीतीजनक काटा उभा राहीला डोळे वटारले गेले, तोंड वासल गेल, कारण समोर कारण समोर काहीवेळापुर्वी स्वत:च्या डोळ्यांनी पाहीली असलेली ती दहा फुटी निर्जीव मूर्ती तिथे आपल्या जागेवर उपस्थीत नव्हती.

काय विळक्षण गोष्ट ? किती वेगळा प्रकार ?

पांडूबुवाच्या मनात वेग-वेगळे विचार आले.

त्या अडाणी मांणसाला सुद्धा विचार करण्याची
परवानगी होतीच! मग ते विचार अंधश्रद्धे जोडलेले ही का नाही असो !



आताच काहीवेळापुर्वी पाहिलेली साडे सात फुट उंच ती मूर्ती अस अचानक गेली कुठे? आपल्या शिवाय कब्रस्तानात दूसर तिसर कोणीच नाही मग ती मुर्ती गेली तर गेली कुठे?

जर का कोणी त्या मूर्तीला जागेवरुन हळवल असत तर आवाज आला नसता का?

मग आवाज न येता मूर्ती गेली कुठे?


जागेवरच थांबुन पांडूबुवा विचार करत बसला होता .....

ह्या श्रापीत जागेतून लवकरात लवकर बाहेर पडाव हा विचार त्याच्या मनातून निघुन गेला होता !
...... उत्सुकता असावी पन इतकीही नाही की जिवावर बेतेल..!

भाबडा भोल्या स्व्भावाचा पांडूबुवा सपशेल फसला होता..त्या शक्तिने मांडलेल्या खेळातली पहिली

चाळ यशस्वी झाली होती.

.....

क्रमश :
□□□□□□□□□□□□□□□

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED