खौफ की रात - भाग १६ jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग १६

□□□□□□□□□□□□□□□□□

सीजन 1
....
// भाग 1६

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

कथा सुरु ...


सावकाराच्या दुमजली वाड्याबाहेर एक सफेद रंगाची एम्बुलेंस ऊभी होती , एम्बूलेंसच निळ्या रंगाच टिम-टिमत चमकत होत..

सायरनचा चालू असलेला आवाज तो विशिष्ट प्रकारचा ( वावा,वावा,वा) मनभेदरवुन टाकणारा आवाज नी निळा प्रकाश गोल-गोल फिरत होत ,

तो निळा प्रकाश सावकाराच्या दुमजली वाड्याच्या दगडीभिंतीवरुन थय थय नाचत होता..

सावकाराच्या दुमजली वाड्यावर ,त्या खिडकीत उभ्या असलेल्या सावकाराच्या आईच्या मेलेल्या मृत अतृप्त आत्म्याच्या पांढ-या फट्ट चेह-यावर ती निळसर प्रकाश पडत होता.

सावकाराच्या आईची काहीतरी अतृप्त इच्छा मागे राहीली होती,

की तीच ते हिरव्या साडीतल,पांढ-या फट्ट चेह-याच ,डोळ्यांखाली काली वर्तुळ उमटलेल, नी पिवळ्याजर्द डोळ्यांच अमानविय भुतयोनीत भटकणारा आत्मा अद्याप मुक्त झालेल नव्हत, म्ह्ंणूच तर ती अतृप्त भयानक आत्मा अशी दिसुण येत होती.

त्या म्हातारीच लक्ष, ती थंड नजर एकटक खाली वाड्याच्या दरवाज्याच्या चौकटीवर खिळल होती...

कारण त्या चौकटीत ती मांजर सुद्धा आपले डोळे छोठे करुन कधी त्या अभद्ररुपाकडे पाहत होती, तर कधी दरवाज्याकडे पाहत होती.

सावकाराच्या वाड्यातल्या दारातुन दोन सफेद कपडे घातलेले वॉर्डबॉय बाहेर पडले होते.

त्या दोघांच्याही हातात एक स्ट्रेचर होता. स्ट्रेचरवर पांढरा फडका टाकून
सावकाराच्या आईच प्रेत बाहेर आणल जात होत.

प्रेताची अंतयात्रा काढली तर उशीर होणार होता म्हंणूनच प्रेत कब्रस्तानात लवकरात लवकर घेऊन जाण्यासाठी एम्बुलेंस महत्वाची ठरणार होती.

ते दोन वॉर्डबॉय दरवाज्यातुन बाहेर पडले मग त्यांच्या मागोमाग सावकार ,तोंडावर पदर ठेवून हूंदके देणारी त्याची बायको, गावातले पुरुष,महिला मंडळी बाहेर पडले.

गावातल्या काही लोकांनी पुढे येऊन एम्बुलेंसच मागच दार उघडल मग वॉर्डबॉयने प्रेत स्ट्रेचरसहित आत ठेवल...

तसे प्रेताच नातेवाईक म्हंणजेच सावकार एम्बुलंस मध्ये चढला, त्याच्या सोबत त्याचे पाळलेले कुत्रे गुंडे सुद्धा बसले.

सावकाराची बायको मात्र जाणार नव्हती, कही रीतिरिवाज होते.

सावकाराच्या वाड्यातल्या खिडकीतून पिवळ्याजर्द चरचरणा-या बल्बच्या प्रकाशात सावकाराच्या आईच मृत प्रेतआत्मा त्या पांढ-या स्ट्रेचरवर ठेवलेल्या स्व्त:च्या मृत शरीराकडे पाहून डोळे वटारुन हसत होत,

पांढ-याफट्ट चेह-यावर एक आसुरी हास्य उमटलेल. जे त्या चेह-यावर पाहताच भयानक काळजाचा ठोका चुकत होता.

तिच ते दात विचकत हसताक्षणी तोंडातले अनुकचीदार पिवळ्या दातांच दर्शन घडत होत.

खाली ऊभी राहून ती मांजर त्या सामान्य मणुष्याच्या डोळ्यांना न दिसणा-या ह्या दृश्यास पाहून मोठ-मोठ्याने गुर-गूरत होती. जणु तिथे जमलेल्या त्या माणसांना ती सुचित करत होती , गळाफाडून सांगत होती

." की ते पाहा , खिडकीत पाहा काय विचित्र,उभ आहे! "

परंतु त्या बिचा-या मुक प्राण्याच कोण ऐकेल ? तिची भाषा मांणसाला थोडीना समजत होती..

सावकार, त्याची गुंड मंडळी एम्बुलेंस मध्ये बसली तसा

एका वॉर्डबॉयने लागलीच दरवाजा बंद केला. आणि आपल्या साथीदार समवेत ड्राईव्ह सीटबाजुला जाऊन बसला ,

दुस-या वॉर्डबॉयने काळ्या रंगाची चावी पिळून लागलीच गाडी सुरु केली.

" भुर्र्र्र्र !" एम्बुलेंसचा इंजिनचा आवाज झाला..

पुढच्याचक्षणाला गाडी धुर ऊडवत निघुन सुद्धा गेली होती.

गाडी निघुन गेली तसे, त्या मांजरीने खिडकीत पाहिल .परंतु खिडकीत आता ह्या क्षणी कोणीही उभ नव्हत.

ती तीन सळ्यांची खिडकी, नी आतला खोलीत जळणारा पिवळाजर्द बल्बचा प्रकाश नाहीसा झाला होता.

तिथे होत ते फक्त एक अंधकार ज्यात ज जाणे काय लपून बसल असेल? एक मोठ गुढ घेऊन.!

क्रमश :
□□□□□□□□□□□□□□□□