खौफ की रात - भाग १७ jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग १७












लेखक -जयेश झोमटे

खौफ की रात १७
महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..



कथा सुरु


मनाला न पटणारी एक रह्स्यमय विचीत्र घटना
जेव्हा घडते, तेव्हा मन लागलीच ते मानायला तैयार होत नाही की असं काही घडल आहे !

जो पर्य्ंत त्या रहस्याच गुढ उकळत नाही तो पर्यंत मानवी मन तिथेच घुटमळत , त्या रहस्याची उकळ करण्याच प्रयत्न करत .
ज्यास आपण एकप्रकारे जिज्ञासा म्हंणूयात .
सावकाराच्या आईच प्रेत गाडण्यासाठी , जो खड्डा खणला जात होता, तो पांडु खणत होता.

खड्डा खणन्यासाठी त्याने दोन हजार रूपये घेतले होते.

त्याची रोजच्या दिवसाची मुजोरी तीनशे ते चारशे रुपये इतकी होती.

आणी आज त्याला खड्डा खणन्यासाठी मिळालेली रक्कम , ही कित्येकतरी पटीने जास्त होती..

त्यातच काम खुपच कमी वेळाच होत, आणी कमी वेळातच ईतके पैसे मिळत आहेत ही गोष्ट त्याच्यासाठी खुप मोठी होती.


पांडू कोहराम कब्रस्तानात आला होता, खड्डा खणून झाल तस तो बाहेर आला...

परंतु काहीवेळा अगोदर त्याने कब्रस्तानात एक मुर्ती पाहिली होती , जी मुर्ती आता अचानकच गायब झाली होती.

त्या मुर्तीचरुप तिचा चेहरा , आकार, सर्वकाही पांडूच्या मनात तंतोतंत रेखाटल गेलेल, कारण ती मुर्तीच तशी भयानक होती.

परंतु गोंधळात टाकणारी बाब अशी , की मुर्ती गेली कुठे? आणी कशी गेली? कोणी घेऊन गेल होत का? मग मुर्ती हळवण्याचा आवाज कसा आला नाही? सात फुट उंचीची ती मुर्ती अशी हलकी- फुलकी थोडी ना असेल? जेमतेम चार - पाच तगडे गडी असतील तरच ती जागेवरून हळवली जाऊ शकते !

मुर्ती ज्या ठिकाणी होती- पांडु तिथेच उभा होता..

मुर्ती उभी होती त्या ठिकाणी, खालच गवत भुईसपाट झाल होत - आणी गवतांच रंग काळसर होता, किती विचीत्र गोष्ट!

गवत दबल आहे हे पाहता एकच अर्थ निघत होत की कोणीतरी मुर्ती हळवली होती- किंवा स्वत:हून त्या मुर्तीने हाळचाल केली होती? छे शक्यच नाही ! पन जर तसं असेल तर?
पांडू न जाणे कित्येक उशीर एकाच जागेवर उभ राहून त्या मुर्ती खाली चेंबून काळ्या झालेल्या गवताला पाहत होता.

आजुबाजुला सर्व गवत हिरव होत - हिरव्या रंगाच होत - मग हे गवत अस काळ्या रंगाच का होत? काळा रंग तर अशुभ आहे ना ?

पांडुची जणु त्या काळ्या रंगाकडे पाहता ,
तंद्री लागली होती-
त्याचे डोळे हळु हळु विस्फारू लागले , तोंडाचा - आ - वासला , पन चेह-यावर मात्र शून्यभाव होते.

कोण्या खेळण्यातल्या बाहुल्याचा चेहरा
जस दिसावा - तसा चेहरा पांडूचा झाला होता.
त्याच्या विस्फारलेल्या नजरेत
त्या हिरव्या गवताला चिकटलेला काळा रंग
हळकेच एका आम्ळीयुक्त द्रवात बदल्ला, चिपचिपीत झाला , त्यात वेडीवाकडी हालचाल होऊ लागली..

एक विशिष्ट प्रकारचा आकार त्यात उमटू लागला ,एक अळी, कृमीच्या देहाची जशी वाकडी तिकडी हालचाल व्हावी तस त्या द्रवाची होऊ लागली ...

जणु काहीतरी आकार घेत होत ? आणी ते बाहेर पडणार होत ?


पांडूचा चेहरा पाहता -पाहता
बाहुलीसारखा पांढ-या फट्ट झाला , आ- वासलेल्या तोंडातून लाल टपकू लागली होती.

त्या आम्ळीयुक्त काळ्या चिपचिपीत द्रवास आकार प्राप्त होऊ लागल, एक पंज्या , काळ्या रंगाचा धारधार पंज्या ,

मग आली ती पाच सुळ्यासारखी धारधार लांबसडक बोट-एका वाराने हाड मांसाचा खिम्मा होइल अशी धार असलेली , सैतानी पंजाच जणु तिथे अवतरला होता.

पांडूच्या चेह-यावर अचानक लालसर रंगाचा प्रकाश पसरला , विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये लालसर रंगाचा एक बिंदू चमकतांना दिसत होता .


त्या काळसर सैतानी पंज्याच बोट वाकडीतिकडी हळली, आणी जमिनीवर खाडकन सर्व बोट उभी राहीली, जणु ती कोणत्याही क्षणी आता पांडूवर झेप घेऊन त्याचा फडशा पाडणार होती.

रक्ताचा पाट वाहणार होता.
हिरव्या गवताला लाल रगताने भिजवल जाणार होत..
" ए पांडू ? !"
अचानकच तीनचार हाक आल्या...

" ए पांडू? ए पांड्या?"

तिस-या हाकेला चमत्कार झाला ..

पांडूच्या कानांवर बाळयाची हाक ऐकू आली, क्षणार्धात त्याचा चेह-यावरचा लाल रंग नाहीसा झाला , हावभाव पुर्ववत झाले , डोळे- तोंड सर्वकाही सामान्य नीट झाले !

शरीरावरच गेलेल संतूळन- क्रिया पुन्हा पुर्ववत आल...

बाल्याच आवाज येताच पांडूची तंद्री भंग पावली, आणी त्याचक्षणाला डोक्यात एक तीव्र सनक गेली-वीस सेक्ंदांसाठी डोक अस काही दुखल की शब्दांत वर्णन करने नाही .

त्या शक्तिचा चढलेला अमळ उतरला होता हे त्याचेच पडसाद होते...एक विषारी वारसा पांडूच्या देहातून बाहेर पडला होता..

वेळीच आलेल्या बाळ्याच्या हाकेने तो मुर्तीचा विचार पार विसरुन गेला होता..

" जी मालक ..आलोच !"

अस म्हंणतक्ष पांडूने एकवेळ समोर पाहिल, कबस्तानात सर्वदिशेला आर्तधुक्या वेढ़ा घातला होता, आणी एक विलक्षण अशी स्मशान शांतता तिथे पसरली होती .

पांडूबुवाने खाली पडलेली कुदळ हाती घेतली,
कब्रस्तानाच्या दरवाज्याच्या दिशेने निघुन गेला.

इकडे काही मीटर अंतरावर गडद धुक वाहतांना दिसत होत,

तेच धुक अचानक कमी झाल आणि त्या कमी झालेल्या धुक्यात समोर तीच ती मूर्ती उभी दिसली.

पांढरट रंगाची ती मुर्ती आगा संपुर्णत काळ्या रंगात परावर्तीत झाली होती, त्या अमान विय अघोरी शक्तिचा विषारी वारसा त्या मुर्तीत घुसला होता..

त्या मुर्तीत कोरलेल्या लहानश्या डोळ्यांना जणू सजीवता प्राप्त झाली होती?

कारण ते डोळे हळकेच निखा-यांसहित तापलेल्या विस्तवासरखे चमकले होते,

आणी ते तांबरट रंगाचे विस्तवधारी चकाकते डोळे डोळ् पुढे पुढे जाणा-या पांडू कडेच पाहत होते..

त्या मूर्तीजवळून लाटांप्रमाणे धूक वाहत होत,

ज्या धुक्यात ती काळ्या रंगात परावर्तीत झालेली मुर्ती नाहीशी होत -होती ,तर कधी दिसत होती.


पांडूबुवा कब्रस्तानातुन बाहेर आला,
त्याच्या डोळ्यांसमोर गाडीला टेकून दोन्ही हाताच्या घड्या घालुन उभा असलेला पाठमोरा बाळ्या दिसत होता.

त्याला पाहूनच पांडूबुवाने त्याच्याकडे पाहतच आपली पाऊल वाढवली.

क्रमश :
□□□□□□□□□□□□


काय घडणार आहे पुढे ?
कथा अगदी मंद गतीने पुढे सरकत आहे ना?
प्रत्येक भागत एक थरार , एक सापळा रचतांना दिसत आहे ! ...ही रात्र , एका रात्रीत न जाणे किती विलक्षण घटना घडवून आणणार आहे , हे त्या रात्रीसच ठावूक