खौफ की रात - भाग १९ jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग १९

खौफ की रात भाग १९


1




□□□□□□□□□□□□□□□□□

सीजन 1
....


//// भाग 19


महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..




जंगलातलाच भाग होता हा ! आजुबाजुला जिकडे पाहाव तिकडे मोठ मोठाल्या झाडांच्या बाहुल्या उभ्या होत्या. झाडांच्या खोडाखाली तीन फुट वाढलेली झुडपे सुद्धा दिसत होती .

अश्याच एका झाडाच्या झुडपाखाली, एक काळ्या रंगाचा दहा सेमी लांबीचा उंदीर, दोन पायांवर बसुन एक रानटी फळ दातांनी कुरतडत खात होता.

कोणत्या तरी झाडावरच तुटून खाली पडलेल रानटी फळ होत ते, भुक लागल्याने त्या मुक्या जिवाने
ते खायला घेतल होत.

सपाट उतरणी सारख डोक, मण्यासारखे काळे डोळे आणि तोंडातले ते धार-धार दात , लांब शेपटी वाकडी तिकडी उभी होती.

डोक्यावर मोठाले कान होते !

रातकिड्यांची ' किरकिर ' संथपणे वाजत होती.

जंगली भाग असल्याने, तिथे पसरलेली ती
स्मशान शांतता एक रहस्य उदरात घेऊन वावरत होती - तिथे उभ असलेल प्रत्येक झाड एक गुढ आपल्या खोडात घेऊन उभ होत.

काळ्या पिंजारलेल्या अंधाराला कसलेच बंधन
उरले नव्हते , बेभान होऊन तो आजुबाजुला थयथयत नंगानाच माजवत फिरत होता.

अमुश्याच्या ह्या अभद्र रातिला न जाणे किती रक्ताचा सडा ह्या भुमीला अर्पण होणार होत ? हे त्या नियतीलाच ठावूक !

त्या काळ्या उंदराच्या खांद्या मागे काळसर अंधार दिसत होत -

फळ खाण्यात गुंतलेला तो उंदीर , आपल्या धारधार दातांनी रानटी फळाचा लचका तोडण्यात व्यस्थ होता -

तोच त्याच्या मागे असलेल्या अंधारातून हळकेच , अगदी हळुवार सावधगिरी बाळगत एक फणाधारी किंग कोब्रा प्रजातीच्या सापाच डोक पूढे पुढे येताना दिसू लागल-

पिवळसर फणाधारी, मण्यासारखे चकाकते, डोळे, आणि हळकेच हा जबडा वासला गेला, जो त्या उंदाराच घास घेणार होता!

आपल्या खाण्यात गुंतळेला तो उंदीर अचानक मध्येच खायच थांबला , त्याच्या त्या मोठाल्या कानांना कसलीतरी चाहुल लागली , आणि त्याने गर्रकन वळून मागे पाहील , तोच त्या क्षणाला त्या कोब्राने आपल्या डोक्याची वेगाने हालचाल केली , तो पिवळसर फणा, ते टोकदार दात - दोन भागांत विभागलेली जिभ - पूर्णत फणाच त्या उंदारावर झेपावला .

' फससस ' एक फुत्कारण्याचा आवाज झाला..

परंतु त्या सर्पाच वेग कमी पडल, अगदी चतुराईने त्या उंदराने , आपल्या लहानसर पावलांनी
बाजुला उडी घेतली.... तसा त्या कोबराच फणा जमिनीवर आपटला-

" फससस !" पुन्हा नव्याने तो कोब्रा फणा वासून उभा राहिला-

जेमतेम बारा फुट लांबीचा तो कोब्रा असावा , कारण तीन फुट उंच फना काढून तो त्या उंदराला जागेवरच उभ राहून , पुढे पुढे जातांना दोन क्षण पाहत होता.

लहानसर पावलांनी कधी समोर येणा-या काट्या, फांद्या - ह्यांवरून त्या चुकवत उडी मारत - तर कधी जमिनीवरून तुरु,तुरु, धावत तो उंदीर वेगाने त्या सर्पापासून दूर जात होता .

उंदराच्या आजुबाजुला मोठ मोठाली झाडे, झुडपे, जमिनीवर झाडांची -सुकून खाली पडलेली पाने दिसत होती...

त्या उंदराने धावता - धावताच मागे वळुन पाहिल.

मागून तो बारा फुट लांबीचा - काळसर्प , त्या उंदराचा घास घेण्यासाठी- त्याची ती बाराफुट दैत्यासारखी काया घेऊन वेगाने वाकड-तिकड शरीर हळवत पुढे पुढे येत होता..

त्या किंग कोब्राचा फणा तसंच तीन फुट उंच शेपटीवर उभ होत आणि तसंच तो पुढे पुढे येत होता.
(किती भयानक नाही ? )

' चि.चि..च ची ची ची '
जिवाच्या भयाने तो मुका जीव तोंडातून आवाज काढु लागला ! जर सामान्य मानवाला त्याची भाषा कळत असती - तर त्या विशिष्ट भाषेच अर्थ काय झाल असत.

' वाचवा! ' हो असंच काहीस ते अर्थ असाव.
नाहीतरी त्या उंदराच्या मागे काळ लागला होता ना ?
जर तो उंदीर त्या सर्पाच्या कचाट्यात सापडला तर मृत्यु निश्चिंत होत .

काळ्या रंगाची ती जाडसर तेरा फुट लांबीची
शेपटी, आणि त्यांवर बांगडीसारखे पांढरे पट्टे , अशी ती लांबसडक शेपटी - वाकडीतिकडी सरपटत वेगाने त्या उंदराच अंतर कापत होती.

खाली जमिनीवर पडलेल्या झाडाचा सुकलेल्या
पानांचा थर - त्या शेपटीच्या वजनाने चर्र , चर्र करत वाजत होता.

रात्रीच्या अंधारात हा भक्ष- भक्षकाचा खेळ सुरु होता.

' ची..ची..ची.. ' आवाज करत त्या उंदराने मागे वळून पाहिल ..

तसा त्याचक्षणी त्याला त्याच्या दोन काळसर मण्यांसारख्या डोळ्यांमध्ये - त्या किंग कोब्राच आसुरी भुकेने आसुसळेला जबडा दिसला - जो की फक्त चार हात लांब होता - बस्स ..


" फस्स !"
आवाज करत त्याने पुन्हा आपला फणा , उंदरावर मारला , परंतु ह्यावेळेस सुद्धा त्या उंदराने डाव्या बाजुला उडी घेतली- लहानसर पावळांनी वेगाने धावू लागली- जरा पुढेच जमिनीवर एक झाड तुटून पड़ल होत. त्या झाडाच्या खोडावर उंदराने उडी मारली- आणि त्या खोडावरून वेगाने धावू लागला...

आजुबाजुची हिरवी झाडे,हिरवी झुडपे, वेगाने मागे मागे जात होती, खाली जमिनीवर पडलेली चार पाच पाने , किंग कोब्राच्या शेपटीने वर उडली होती.

धावता धावता जमिनीवर तुटून पड़लेल्या त्या झाडाच्या खोडावरून उंदराने वेगाने उडी मारली...

तसा मागून वेगाने येणा-या त्या किंग-कोब्राने सुद्धा आपल फणा त्या उंदराच्या दिशेने नेहला..

वातावरणातला वेळ मंदावला होता- 0:25x स्पीड़ने भक्ष-आणि -भक्षक हवेत स्थिरावले होते ..

पुढे त्या सर्पाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तो उंदीर हवेत सुटकेसाठी झेपावला होता - तर त्याच्या मागे , भक्षक किंग कोब्राने मृत्युची झेप त्या उंदरावर घातली होती.

हवेतच त्या किंग कोब्रा सर्पाचा तो जबडा वासला, ते वरचे धारधार दुधासारखे विषारी चकचकीत दोन दात , आणी ती काळ्या रंगाची ती जिभ बाहेर आली होती.

उंदरापासून फक्त पाच इंच लांब तो सर्प येऊन ठेपला होता , कोणत्याही क्षणी तो कोब्रा त्या उंदराचा घास घेणार होता. तो मुका जिव , जिवास मुकणार होता..

परंतू नियतीच्या मनात काही वेगळच होत -
नियतीची खेळी कोणत्या क्षणी, कशी बदलेल कोणीच सांगू शकत नाही, त्याचंच हा एक नमुना पाहुयात.

त्या उंदराचा घास घेण्यासाठी त्या कोब्राने आपल्या मुखाचा आ- वासला ...

..


तेवढ्यात तोच अचानक वेगाने
' भुर्र...भुर्र्म्म्ं...!"
अचानकच वातावरणात गाडीच्या इंजिनचा आवाज घुमला -दोन पेटत्या हेडलाईटचा प्रकाश त्या कोब्राच्या डोक्यावर पडला आणि एका मानवी हाताने त्याच हवेतच डोक पकडल आणि वेगाने त्याला सरपटत नेहल...

इकडे तो उंदीर सुखरूप हवेतून खाली आला, दोन पावळांवर जमिनीवर उभ राहून त्याने मागे पाहिल..

तर त्याला मागून एक टू-व्हीलर जंगलातल्या कचच्या रस्त्यावरून वेगाने पुढे-पुढे जाताना दिसली..

त्या टू-व्हीलरवर तीन सीट बसले होते.
आणी ते तिघे कोण होते ? ते सांगायला नकोच नाही का ?
टू- व्हीलरवर ड्राईव्हसीटवर निळ्या बसला होता - दोन्ही हातांनी स्टेरिंग पकडून त्याच सर्व लक्ष , गाडीच्या हेडलाईटने उजळलेल्या जंगलातल्या लालसर रस्त्यावर होत.

त्याच्या मागे अमोल बसला होता -आणि शेवटला सोपान बसलेला .

" निळ्या !" तिस-या सीटवर बसलेला सोपानचा आवाज.

" काय ?" निळ्याने लक्ष पुढे ठेवत विचारल.

" मगाशी त्या खड्ड्यात गाडी ऊडली तेव्हा माझ्या हाताला काहीतरी गुळगुळीत लागल रे !"
सोपान म्हंणाला.

" तू आधी खिशातून हात काढ , फाटक्या खिश्याच्या .! पाकिट घरी ठेवून आला तर आला, आता आतमधी पन घालायच पन विसरला का !"
निळ्या एकदम खेकसला...

" हा हा हा..हा हा हा !"
निळ्याच्या मागे बसलेला अमोल दात काढत हसू लागला.

सोपानच्या हातात किंग कोब्राच डोक पकडल होत- जे सोपानच्या हाताला अगदी गुळगुळीत लागत होत-

" अरे निळ्या माझे दोन्ही हात बाहेर आहेत रे ,
केळ पकडल्यासारख वाटतय मला , निट दिसत नाहीये पन आहे काय!"

सोपान नशेने अंधुक झालेल्या नजरेने हातात पकडलेल्या कोब्राकडे पाहत होता.

" अरे भाई माझे डोळे घुबडासारखे आहेत , रात्री पन लांबच बघतो मी , दे तुझा हात दाखव ! केळ असल तर दोघ खाऊ ."

खर तर अमोलला सुद्धा निट काही दिसत नव्हत.

नशेने डोळ्यांसमोर थोडस ब्लर दृश्य दिसत होत.

" दोघ हा , दोघ हा ! मला नाही देणार हा, थांबू का गाडी, थांबू !"

निळ्या रागा रागातच म्हंणाला.

" अरे भाई कूल यार तुला कधी विसरेल का मी , तिघ खाऊ आपन हा ! दे सोपान केळ दे..!" अमोल जरास तिरकसपणे मागे पाहत म्हंणाला...
मग अमोल त्याने एक हात हळुच मागे नेहल..

" घे !" म्हंणत, त्याने हातातला कोब्रा अमोलकडे सोपावला .

एक दोन वेळा डोळे मिचकाऊन हातातल्या मुठीत पकडलेल्या पिवळसर खवल्यांच्या त्या कोब्राकडे पाहत अमोलने मान झटकली.

" अरे हे तर लेय बारीक केळ आहे रे !"
अमोल...

" अरे आपण जंगलातून चाललो आहोत ना , मग गावठी केल असेल , तू साल्टी काढ आणि तीन ,तुकडे कर , तिघे खाऊ ..!"

सोपान.

" हो हो !"

बैलासारखी मान हळवत गालात हसत अमोलने होकार दर्शवला.

एका हातात कोब्राच डोक पकडलेल आणि दुस-या हाताने तो केल्याची साळ काढ़ावी तस त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता.

" अरे ही केल्याची साळ काय फेविक्वीक्ने चिपकवले का ? निघतच नाहीये !"

" काय बोलतो , बघू !"
निळ्याने गाडीच्या पुढच्या साईड मिरर मध्ये पाहिल..

आणी त्याच वेळेस अमोलने हळुच आपला हात
थोडासा पुढे केला- त्याचवेळेस निळ्याची आणि त्या कोब्राची नजर झाली..

त्या किंग कोब्राला पाहून निळ्याच्या
कानांतून गरम हवा बाहेर पडली- डोळे चेंडू एवढे मोठे झाले - तोंडाचा मोठा आ वासला..

भीतिने वासलेल्या तोंडातून ओरडण्यासाठी आवाज सुद्धा बाहेर येईना अशी त्याची गत झाली.

" ए निळ्या ! बघितला का ? खराब आहे हे केळ !"

निळ्या एकदम पुतळ्यासारखा झाला होता.
शरीर काठी झाल होत.... दोन्ही डोळे नाकासमोर आले होते.

अमोलने निळ्याकडे पाहिल..तसा त्याला त्याचा भीतीने पांढरा पडलेला चेहरा दिसला..

" आर बोल की , अस तुझ्या बापासारख डोळ वटारून काय बघतोय हाताकड, काय साप पकडलय का मी हातात !"

अमोलने सुद्धा पुन्हा हळुच आपल्या हाताकडे
पाहिल.. ह्यावेळेस त्याने जस आपल्या हाताकडे पाहिल...

त्याचवेळेस त्याच्या डोळ्यांसमोर ब्लर जरास कमी झाल आणि त्याला आपल्या हातात असलेला तो कोब्रा दिसला..

तशी झटकन त्याची नजर परत आली..
मेंदू कसा लगेच फ्रेश झाला.

भीतिने त्याच मांजर झाल..

हात थरथर काफू लागले..

" अरे दे ना केळा, अरे दे ना !"

" सो..सो..सो..प्पान , तो..तो....ती..ककी..केळा नाय !
कि...की..किंग कोब्रा हाई !"

अमोलच्या तोंडून भीतीने शब्दच फुटत नव्हते .


" काय ? " अस म्हंणतच सोपानने निट डोळे मिचकावत अमोलच्या हातात पाहिल..

तेव्हाच त्याच क्षणाला त्या कोब्राने मान वळवून
सोपानकडे पाहून फुत्कार सोडला..

" फुससससस !"

जे पाहून भीतिने झटक्यात सोपानच्या तोंडून एक मोठी..किंचाळी बाहेर पडली.
" आआआआआआआआ!" सोपानची किंकाळी..

" आआआआआआ !" अमोल सुद्धा किंचाळला..

निळ्या मात्र एकटक त्या कोब्राकडे पुतळा होऊन पाहत होता.

ज्याने गाडीची स्टेरिंग सरळ ती सरळच राहिली होती. आणि पुढे एक उजव्या बाजुला वळण होत..आणि त्या वळणावर समोर एक झाड होत...ज्या झाडाने दिशेने गाडी वेगाने चालली होती.

अमोल - सोपान दोघेही मोठ्याने किंचाळत होते..तर निळ्या डोळे फाडून त्या कोब्राकडे पाहत होता...

ह्या तिघांचही लक्ष समोर नव्हत..
तोच त्या किंग कोब्राने मान वळवून समोर पाहिल..
आणी त्याच बारीकस तोंड मोठ झाल कारण गाडी वेगाने पुढे वळणावर असलेल्या झाडावर कोणत्याही क्षणी आदळणार होती..

त्या कोब्राला सुद्धा न जाणे कोठून अक्क्ल
आली? की त्याने अमोलच्या हातातून हिसका देत आपल डोक सोडवून घेतल..

आणी सर्रकन शेपटी वाकडीतिकडी हळवत जंगलात निघुन गेला.. .

" वाचलो ...वाचलो... आपण !"
तिघेही एकदाच भानावर आले..

सर्वप्रथम सोपानने पुढे पाहिल..

" आsssssssss!" तो पुन्हा किंचाळला..


"आता काय झाल ?गेला की तो "
सोप्पानने अमोलच्या एक कानाखाली वाजवली तस त्याच लक्ष पुढे गेल..

" आsssssss!" तो ही किंचाळला..

" अरे काय झाल ?गेला की तो, कशाला वरडताय आता ? " निळ्या म्हंणाला.

तस ह्यावेळेस अमोलने त्याच्या कानाखाली मारली तस त्यानेही पुढे पाहिल..

"आssssssssss! "

एकसाथ तिघेही ओरडले..

आणी गाडी अगदी मंद गतीने त्या झाडावर जाऊन आदळली..

" धडाम...!" गाडीचा एक टायर हवेत उडताना दिसला..


क्रमश :...



.









.