Kouff ki Raat - 20 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग २०

खौफ की रात



□□□□□□□□□□□□□□□□□

सीजन 1
....

लेखक :जयेश झोमटे..

//// भाग 20

लेखक -जयेश झोमटे

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद



रामपूर हायवेवरुन मृत शववाहीका (एम्बुलेंस) अगदी अफाट वेगाने सायरन वाजवत कोहराम कब्रस्तानच्या दिशेने निघाली होती.


इंजीनचा खरखरता आवाज आणि एम्बुलेंसचा सायरन " वाव वाव वाव) करत वाजत होता.

आजुबाजुला असलेली स्मशान शांतता मोड़त होता.
रसत्यावर पसरलेल्या धुक्याला फाडत ती शववाहिका सावकाराच्या आईच प्रेत घेऊन निघाली होती.

सावकार रुग्णवाहीके मागे स्ट्रेचरवर ठेवलेल्या आपल्या मातेच्या प्रेताबाजुला , बसला होता.
त्याचे पाळलेले गुंडे सुद्धा तिथे हजर होते.

अचानक सावकाराच्या एका
पाळलेल्या गुंड्याचा फोन वाजू लागला.

तसं त्या टकल्याने आपल्या वरच्या खिशातुन फोन बाहेर काढला.

फोन बटनांच होत.
हिरव बटन दाबत त्याने फोन उचल्ल व कानाला लावल.
.

" हेल्लो !"
फोन ऊचलून कानाला लावताच तो गुंड उच्चारला.

" ए पम्या , मी बाल्या बोलतोय !"
फोनमधुन बाल्याचा काफरा आवाज आला.

" बाल्या तुज्या आवाजाला काय झाल रे ? संमद ठिक आहे का तिथ ." पम्याने विचारल.

" अरे तुझ ठिक गेल तेल लावायला सावकारासनी म्हणाव खड्डा खणून झालंय..! तुम्ही या
लगेच, इथ भीतिन मराची वेळ आली माझ्याव ."
बाल्याच्या आवाजात भीतिची कंपन जाणवत होती.


त्याच्या त्या वाक्यावर टकल्या पम्याने
डोक हळवत " ठिक हाई ठिक हाई , मी सावकारास कळवतो , तो पर्यंत तू तिथच थांब आणि टेंशन नको घिऊ बाल्या , दोन मिनिटातच पोहचतो बघ आम्ही !"

दोन्ही कडून फोन ठेवल गेल .

" सावकार !" पम्याने सावकाराला आवाज दिला.

स्ट्रेचरवर पांढ-या कापडात म्हातारीच म्हढ झाकल होत -

आणी त्याच स्ट्रेचर बाजुला सावकार बसला होता.

पम्याचा आवाज ऐकून त्याने खांद्यामागून तिरकस नजर पम्यावर टाकली.

" काय रे ?" सावकार म्हंणाला.

" बाल्याचा फोन होता , म्हंणतो खड्डा खणून झालंय !" पम्याने कळवल.

" हंम्म ठीके!" सावकाराने पुढे पाहतच म्हंणल.

" जी !" पम्या म्हंणाला. - हातातला फोन खिशात ठेवून तो बाजुलाच उभा राहीला.

त्याच्या बाजुला अजुन चार -पाच त्याच्यासारखेच सावकाराचे गुंड उभे होते.

सगळ्यांचे थोबाड काळे निळे पडलेले, दात मावा-खावून पिवळे, लाल, तपकीरी नाना त-हेचे झाले होते.

शरीर यष्टी गेंड्यासारखी माजलेली होती.
सावकार ह्या सर्वाँनी पैसे देऊन पोसत होता - सावकारासाठी हे सगळेजण काहीही करायला तैयार होते.

अगदी जिव देण्यासाठीही.

×××××××××××××


जय माता दी ढ़ाबा ...



सहा फुट उंच , अंगात काळे कपडे , खांद्यांवर लोंबणारे काळे केस, खप्पड चेहरा - डोळे जरासे बारीक गिधाडासारखे , तोंडावर पिशाच्छ प्रमाणे एक केस उगवलेला नव्हता - त्या खप्पड चेह-याचा रंग काळा होता- जबड्याखालची हनुवटी जराशी बाहेर आलेली होती.

जी हस्तांना अजुनच बाहेर यायची.

असा हा एंडरटेकर सारखा दिसणारा अण्णा जाम खवळला होता.

त्याच्या धंद्यात आजतागायत कोणिही त्याला
फसवल नव्हत - कोणि गि-हाईक पैसे न देता फुकटच खाऊन जाईल अस कधीही घडल नव्हत.

तसंही पैश्यासाठी तो हवरटलेला होता.
एक-एक पईचा हिशोब तो ठेवायचा , तसं हे सर्व पाहता साहजिकच आहे .


पन हा पैश्यासाठी हवरट असलेला माणुस , पैश्यांसाठी काय करेल काही सांगता येत का? नाही ना !

हा अण्णा त्याच्या ढ़ाब्यावर पदार्थांमध्ये एक्सपाईर झालेल्या डेटचा तेल वापरायचा- हा एक्सपाईर झालेला डेटचा तेल कमी किंमतीत मिळायचा - ज्याचा त्याला डबल नफा व्हायचा - त्यासहितच ख-या तांदळांमध्ये अर्धे तांदूळ हे प्लास्टिकचे असायचे !

अश्या कित्येकतरी काळ्या गोष्टी
त्याच्या ढ़ाब्यावर चालत होत्या.

जर कोणी गि-हाईकाने उलट जाब विचारलंच तर त्याला धमकावल जायचं - जीवे मारण्याची धमकी मिळायची. कोणि पोलिसात धाव घेतलीच , तर पोलिसांना (लाच) पैसे देऊन प्रकरण मिटवल जायचं!

असो कथेकडे वळूयात.


एक चार चाकी राखाडी रंगाची जुन्या स्टाईलची जीप दिसत होती, जीपला छप्पर नव्हत.

जीपमध्ये ड्राइव्ह सीटवर खुद्द अण्णा बसला होता.

बाजुच्या सीटवर त्याने एक मोठी एम-24 स्नाईपर बंदूक ठेवली होती-जिला 6X स्कोप जोडल होत.


" एवढ राग बर नाय अण्णा!"
जय-या हळु आवाजात नजर जमिनिवर ठेवत म्हंणाला.

जणु तो अण्णा ला घाबरत असावा..

" राग नाय हा , बदला हाई बदला - माझ्याच ताटात खाऊन ,माझ्याच छाताडावर लात मारून पळालेत ते हरामखोर , आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नाय माझ्या केसांना सुद्धा हात लावायची, अक्ख्या आयुष्यात माझा इतका अपमान झाला नाही तेवढ़ा त्या कालच्या पोरांनी केलाय" अण्णाने बाजूची बंदूक उचल्ली..

" एकेकाच्या डोक्यात गोळी घालून नाय मेंदू बाहेर काढला ना .. आणि तोच मेंदू इथल्या कुत्र्याना खायला घातला- ना तए नाव नाय सांगणार अण्णा त्रिपाठी!"

अण्णाने जिपची चावी पिळली.
'खरखर' विशिष्ट प्रकारचा इंजिनचा आवाज होत जीप सुरु झाली.

" लक्ष ठेव ढाब्यावर !"
अण्णा एवढच म्हंणाला.

गाडीच गियर टाकताच अण्णाने एक्सीलेटरवर दाब दिल तसे चाके फिरू लागली, मागची लालसर लाईट दाखवत गाडी!

काहीवेळा अगोदर त्या तिघांची - टू-व्हीलर ज्या दिशेने जंगलात गेली होती- त्याच दिशेने जीप सुद्धा जंगलात घुसली.

xxxxxxxxxx


क्रमश :


थरार सुरsss एके रात्रीचा..




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED