खौफ की रात - भाग २१ jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग २१


महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!


superfan...


....

..
□□□□□□□□□□□□□□□□□

सीजन 1
....

लेखक :जयेश झोमटे..

/// भाग 21

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद

कथा सुरु





काहीवेळा अगोदर जेव्हा बाल्या फोनवर बोलत होता.


पांडूबुवा एकटक खांद्यावर कुदळ घेऊन ,पुढे पाठमोरा फोनवर बोलत बसलेल्या बाल्याकडे पाहत होता.

की अचानक त्याच्या कानांवर एक ओळखीचा आवाज ऐकू आला.


" अव..! कुठ हायसा तुम्ही.!"

आवाज मागुन आला होता. काहीसा घोगरा खोल खर्जातला आवाज, जणु ते जे काही बोलत होत.
त्याला त्या आवाजाची नक्कल करता येत नव्हती.
पन थोडीशी सावजाला जाळ्यात ओढता येईल एवढी तरी जमली होती.


आवाज आला तसा पांडूने मागे वळुन पाहिल, तस त्याच्या नजरेस आपली आंधळी बायको हातात काठी घेऊन , तीच जमिनीवर टेकत धुक्यात कब्रस्तानाच्या आत - खोलात जाताना दिसली.

तिला तिथे पाहून एकक्षण त्याला धक्काच बसला, पोटात भीतिने , खड्डा आला.

पन बायकोच्या प्रेमापोटी त्याने तिला लागलीच आवाज देण्यासाठी तोंड उघडल - परंतु तितक्यात ती पांढरट धुक्यात वेगाने खेचली गेली - जस की पांडूच्या बायकोच शरीर धुक्यापासूनच तैयार झालेल.

आपल्या बायकोच्या चिंतेने पांडूच मन कासावीस झाल. मागचा पुढचा विचार न करता तो कब्रस्तानाच्या उघड्या गेटमधुन आत घुसला .

वेगाने पाय आपटत - तो त्याची बायको जिथून नाहीशी झाली त्या जागेवर आला- जागेवर उभ राहून त्याने एक लोटांगण घालफ नजर चारही दिशेना फिरवली..

मोठ मोठ्या कबरी पांडूला पाहत होत्या.
धुक त्याच्या वागण्यावर खिखिखी करत हसत होत - कारण पांडू सपशेल फसला होता.

" ए ईठे ?.. ए ईठे..?"
त्याने आपल्या बायकोच नाव घेत तिला दोन वेळा मोठ्याने हाक मारली.

भलेही ती पाहू शकत नव्हती-पन आवाज ऐकून ती प्रतिउत्तर देइल , ह्या हेतूने त्याने आवाज दिला होता.

परंतू पांडूची बायको तिथे उपस्थित होती कुठे!
तिच रूप घेऊन काहीतरी भलतच आल होत - ज्याने पांडूला आपल्या भ्रम जाळात फसवल होत.

पहिल्या हाकेल कसलंच प्रतिउत्तर आल नाही हे पाहता , घाबरलेल्या पांडूबुवाने पुन्हा हाक दिली..

" ए ईठे? !"
तिथे वाहणारा थंड धुका पांडूचा आवाज आपल्या सोबत वाहत नेहत होता.

पांडूची धड़धडणारी छाती भीतिदायक पाश्वर्य संगीत उतपन्न करीत होती.

काळजी ह्या भावनेच्या आहारी जाऊन पांडूच डोक बधीर झाल होत ! नाहीतरी त्याच्या डोक्यात हे प्रश्ण यायला हवे होते ना !

आपली आंधळी बायको- गावातून एवढ लांब कशी येऊ शकते ?भलेही ती आपल्या घरात निसंकोचपने वावरू शकते, कारण तिला त्या घरात सवय झालेली आहे - पन आजतागायत ती गावातून ईथे ह्या कब्रस्तानात कधी आली होती? कधीच नाही , मग रस्ता माहीत नसतांना , कोणिही सोबत नसतांना एक आंधळा, डोळ्यांनी न दिसणारा अपंग माणुस इथे येऊच कस शकतो ? ही गोष्ट न पटणारी होती , हिला काही अर्थच नव्हता !

परंतु चिंता, काळजी, प्रेम ह्या भावना कधी - कधी हुशारी येऊ देतच नाहीत!

भावनेच्या आहारी गेलेला माणुस अक्षरक्ष कासाविस होतो , वेड्यासारखा वागतो ! विचारचक्राना गती मिळत नाही, मग येते ती बधीरता , मूर्खता , म्हंणूनच नेहमी थंड डोक्याने विचार कराव.

" ए ईठे, कुठ हाई तू? "
पांडूने मोठ्या म्हंणाला.

त्या हाकेवर आजुबाजुहून कसलच प्रतिऊत्तर येत नव्हत, हे पाहून पांडूला एकवेळ वाटल सुद्धा की आपण पाहिल ते नक्की खर होत ना ? की डोळ्यांना झालेला भास होत ? की ह्या कब्रस्तानाबद्दल ऐकलेल्या वाईट घटनांची एक छोठीशी झळक त्याला पाहायला मिळाली होती !

पांडूची नजर जराशी समोर गेली- चाळीस मीटर अंतरावर पुढे धुक्यात कोणितरी स्त्री उभी होती- अंगावर हिरव पातळ नेसलेली नऊवारी साडी, आणी लाल रंगाचा ब्लाऊज होता .

पांडूला तिचा चेहरा हुबेहूब आपल्या बायको सारखा दिसला - त्याला वाटलं सुद्धा हे असेल की ती आपली बायकोच आहे !

पन किती वेगळी.

पांडूची बायको आंधळी असल्याने नेहमीचीच अंथरूणात झोपलेली असायची- म्हंणूनच तीचा पाठीचा मनका जरासा वाकला होता - चालतांना ती जराशी म्हातारी सारखी वाकून चालायची- पन ही समोरची बहूरूप्या ईठा, अगदी ताठ उभी होती !
चेहरा पिठाच्या बाहुलीसारखा पांढराफट्ट पडला होता..ते वटारले डोळे पांडूला पाहत होते..

कोण म्हंणेल ही आंधळी आहे ?

पांडूने जस त्या बहूरूपी ईठ्याच्या आकृती कडे पाहील , तस त्या ध्यानाने पटकन गिरकी घेतली- आणि डोक - पुढे झुकवत वेगाने चालत जाऊ लागली. -त्या आकृतीचा चालण्याचा वेग जरा जास्तच होता.


" ए ईठा थांब , अंग कुठ चाललीस थांब !"
पांडू सुद्धा तिच्या मागे धावला - दहा पावळ चालून होताच धुक्यात विरून गेला.

बाल्याच फोनवर बोलून झाल होत -

" पांडू !"
फोन खिशात ठेवून त्याने मागे वळत असताना पांडूला..आवाज दिला.

पन मागे पांडू होता कुठे ? तो तर गेला ना आता,
कस गेला पाहिल ना आपण?

त्या श्रापीत कब्रस्तानातल्या अघोरी शक्तिने
आपल्या भ्रमित खेळात पांडूची बोली लावली होती..
रात्रीच्या अंधारात मृत्युचा खेळ सूरू झाला होता..
कब्रस्तान एक मृत्यूच मैदान होत - आणी त्यावर खेळाडू उतरले होते.. मानव विरूद्ध सैतान..

पन प्रतिस्पर्ध कोण आहे ? हे त्या खेळाडुंना ठावूक नव्हत.

" आईशप्पथ , कुठ गेला हा पांड्या! "
बाल्या रडकूंडीला येत म्हंणाला.

मग हळुच त्याची नजर कब्रस्तानातल्या उघड्या गेटवर गेली......ssssssss

उहू....उहू....उहू.....

झाडावर बसलेल घुबड घुत्कारल...



क्रमश :

पाहुयात पुढिल भागांत

पांडूची बायको तर आंधळी होती ना?
मग ती येवढ्या लांब एकटी कशी आली? आणि त्याने पाहीलेली ती स्त्री नक्की त्याची धर्म पत्नीच होती का? की आणखी काही होत? जे पांडूच्या बायकोच भ्रमिष्ट फसव,रुप घेऊन आल होत? पांडूला हे समजल नाही किंवा कळल नाही का? इतका बायकोच्या प्रेमात बुडाला होता का तो?
..
पांडू वाचणार का? की त्याचा नाहक बळी जाईल..!
तो मेला तर त्याच्या आंधळ्या बायकोला कोण सांभाळेल..?

बाल्याला कब्रस्तानाच उघड गेट दिसत आहे ? तो आत जाईल का?

अशी कित्येक तरी प्रश्ण हळू हळू सुटणार आहेत..

कथेचे भाग 16 व्या भागांपासून आपोआप प्रेमियम मध्ये समाविष्ट होणार आहेत - संपुर्णत कथा - आणी कथेचा अपलोड झालेला नवा भाग लगेचच - ताबडतोब वाचण्यासाठी तुम्ही सब्क्रीपशन घेऊन माझे सूपरफेन होऊ शकता- किंवा पाच कॉईन्स देऊनही कथेचे भाग ताबड तोब वाचु शकता

..धन्यवाद .