1 Taas Bhutacha - 13 books and stories free download online pdf in Marathi

१ तास भुताचा - भाग 13

फसगत भाग 4

काळ्या ढगांनी चंद्राला विलखा घातला होता,ज्याने निळ्या आकाशात आता ह्याक्षणी काजळरात पसरली गेलेली .वातावरणात थंडीचा जोर असा काही वाढला होता, की चौही दिशेना धुक्याच्या भारदस्त भिंतीच साकारल्या आहेत की काय अस्ं भासत होत. थंडी जास्त असल्याने थंड हवेमार्फत दुर कोठून तरी रानटी श्वापदाचा विव्हण्याचा आवाज येत होता. रातकिंड्यांची किरकीर ,नी घुबडाचा घुतकार रात्रीची स्मशान शांतता भंग करत होते.
त्या बागेपासुन दुर असलेल्या स्मशानभुमीत आज दुपारी जाळलेल्या प्रेताच्या चित्तेतली लाकड जळुन गेली होती. त्या जळुन गेलेल्या लाकडांच रुपांतर आता विस्तवात झालेला.रात्रीच्या थंड वा-याच्या झोतासरशी तो विस्तव निखा-यांसहित चमकुन उठत होता, जणु प्रेताचे
दोन ज्वालारहित कवटीच्या खोबणीतले डोळेच चमकावे.बागेतल्या
एका हिरव्या पानांच्या झाडाच्या नाजुक फांदीवर एक नाग फांदीला वेटोले घालुन फ़णा काढुन बसला होता. त्याची ती दोन भागांत विभागलेली जीभ क्षणाक्षणाला फिस्स..आवाजासरशी बाहेर येत होती.
फणा काढून तो नाग एकटक पुढे पाहत होता. समोर गाढ़ धुक पसरल होत.की अचानक त्या गाढ धुक्यातुन एक मानवीसदृश्य आकृती पळत आली.त्या आकृतीच्या अंगावर एक सफेद मळकट शर्ट होता, खाली एक काळी शिवलेली पेंट होती.आणि छातीशी त्याने काहीतरी धरुन ठेवल होत. काहीतरी चौकलेटी रंगाच एक फूट बाहूली येवढ मोठ, आणी ती बाहुलीच होती.मित्रांनो ती आकृती तो इसम दुसर कोणि नसुन
खुद्द धाऊ होता. त्या सैतानाच्या विळख्यातुन त्या लहान मुलाच्या आत्म्याने धाऊला सोड़वल होत. काहीवेळा साठीच.
परंतु पुढे काय होणार ह्यापासुन तर नियती सुद्धा अजाण होती.
त्या फांदीवर बसलेल्या सर्पाच्या नजरेस धाऊची आकृती वेगान धावत धावत पुढे पुढे जात पुन्हा एकदा धुक्यात विलीन होताना दिसली. उर फाटेस्तोवर धाऊ पळत होता. दहा-पंधरा मिनीटाच्या पळायन केलेल्या टप्प्यात खालची जमिन ओली असल्याने तो न जाणे कित्येकवेळा खाली कोसळला होता.ज्याने ती शर्ट पेंट मळली होती. इतक्या ऊशीर पळायन केल्याने धाऊला धाप लागली होती. पाठवाकवुन पोटावर हात ठेवुन तो
मोठ-मोठ्याने श्वास घेत होता.श्वास घेता-घेताच त्याला समोर साठ-सत्तर मीटर अंतरावर बागेचा गेट दिसला. तसे त्याने एकवेळ मागे पाहिल. गहिरा गुढ धुक अंधार मागे पसरला होता. पुढे तर कधी मागे पाहत पाहतच तो त्या गेटजवळ पोहचला.दोन झापांच्या गेटला कडी घातली होती, कुलूप वगेरे काही नव्हत.धाऊने पुन्हा एकवेळ खात्रीखातीर मागे वळुन पाहिल,मागे कोणीही नव्हत.होती ती फक्त विलक्षण कधीही न पाहिलेली शांतता.धाऊने हळूच आपला हात त्या कडीच्या दिशेने नेहायला सुरुवात केली. ओळ्या हाताचा स्पर्श विजेच्या बटनाला व्हावा आणि त्या विद्युतशक्तिचा संचार थेट हात-पाय मग मेंदूत
घुसाव नी रक्त रक्त नी गोठल जाव.सेम हुबे हुब त्याच प्रकारे धाऊच्या हाताचा स्पर्श ज्यासरशी त्या कडीवर झाला, त्याचक्षणी त्या कडीमधुन सापासारख्या निल्या रंगाच्या वाकड्या तिकड्या विद्युत किरणांनी धाऊच्या हातांवरुन थेट शरीरावर मार्गक्रमण केल,शरीरात अशाकाही झिणझिण्या नी वेदना झाल्या की त्या शब्दांत वर्णन करण असंभव आहे, इतक्या सर्व वेदना होऊन आवासलेल्या मुखातुन किंकाळी, किंवा आवाज मात्र निघत नव्हता. की तेवढ्यात पुढच्याक्षणाला धाऊच शरीर एका अमानविय झटक्याने हवेत दूर हिबाळल गेल आणी जमिनीचा स्पर्श होताच त्याची शुद्ध हरपली.बागेतल्या प्रत्येक झाडावर नी प्रत्येक कणा-कणांत त्या अमानविय शक्तिची हुकूमत होती.एकप्रकारे त्या बागेच्या दोन एकर जागेवर त्या अभद्र , अमंगळ शक्तिच वावर नी सावट होत.एकप्रकारे पिंजराच होता त्या अमंगळ शक्तिचा ती बाग,ज्याने शिकार कधीही त्या पिंज-यातुन मालकाच्या अज्ञेंशिवाय बाहेर पडू शकण असंभवच होत.सावज स्व्त च्या मर्जीने आत येऊ शकत होत, परंतु बाहेर जाण हे मात्र त्या अमंगळ, सैतानी रक्तपिपासु शक्तिच्या हाती होत.जिवघेणी रात्र सरता सरत नव्हती. चंद्राचा लपंडाव चालूच होता. झाडावर बसलेली टपो-या डोळ्यांची घुबड अंधारात डोळे वटारुन भेदक नजरेने काहीतरी पाहत होती.पन काय? चंद्राच्या आजुबाजुचे काळे ढग बाजुलासरले की बागेत मंतरलेला निळा प्रकाश पडत होता. खालचे बागेत गवतावरचे विँचु,काटे,सर्प त्या प्रकाशात चमकत होते.
भक्कास वातावरण पसरल होत चौही दिशेना.दुर कोठेतरी अपरात्रीतल्या भटक्या कुत्र्यांचा रडण्याचा भेसूर आवाज येत होता.
धाऊने हळूच आप्ल्या बंद पापण्यांमागुन डावी ×उजवीकडे डोळ्यांची हाळचाल केली.आणि खाडकन डोळे उघडून कबरेपर्यंतच्या भागापर्यंत शरीर वर उचल्ल बाकी पुढचे पाय सरळच होते.कपाळावर घामाचे ओघळ दिसुन येत होते, त्यातच त्याने एक कटाक्ष आजूबाजूला टाकला , धाऊ त्या आरामखोलीतल्या फरशीवर झोपलेल्या अवस्थेत होता.
धाऊने दोन्ही हाताने आपल्या शरीराला चाचपडल,आपण जिवंत आहोत.! हा विचार मनाला जरा सुखावून गेला.परंतु पुढच्याचक्षणाला
त्याच्या डोक्यात काहीवेळां अगोदर घडलेल्या प्रसंगाची चित्रफित उमटून गेली. आणि तो खाडकन जागेवर उभा राहीला.
" अर मी तर बागेत पडलो व्हूतो ? मंग इथ कस आलो.?"
धाऊने स्व्त:लाच प्रश्ण केला! आणि लागलीच त्याच्या मागुन एक आवाज आला.
" मी आणल!" एक चमत्कारीक हवेत गुंजणारा आवाज धाऊच्या कानांवर आला.त्या आवाजासरशी धाऊने लागलीच मागे वळून पाहिल, मागे पाहताच धाऊच्या डोळ्यांसमोर तो पांढ-या रंगाचे कपडे घातलेला आणि शरीरातुन तेज बाहेर येणारा मुलगा दिसला , ज्याने काहीक्षणापुर्वी धाऊचे प्राण वाचवलेले.
" को..को ..को..कोण आहेस तू?" धाऊच्या तोंडावाटे तुटके शब्द बाहेर पडले,आणी भीतीने ते मागे मागे सरकु लागले.
"घाबरु नका काका.... ! मी तुम्हाला काहीही करणार नाही!
जर मला तूम्हाला काही इजा पोहचवायची असती! तर मी तुम्हाला
त्या सैतानापासुन का वाचवल असत!" त्या चार भिंतींच्या खोलीत त्या मुलाचा आवाज चेंडू आपटल्या सारख इकडून तिक्डे उड्या मारावा तसे गुंजत घुमला. त्या मुलाचे हे बोल ऐकुन धाऊंची भीतीने मागे मागे सरणारी पावले थांबली. छातीतली धड धड थोडी कमी झाली.त्या शब्दांनी त्यांना थोडा धीर आला.
" पन माझी मदत का करतोस तु? आंणि मला हीथ कशापाई आणलय.? आण त्यो सैतान माझ्या माग कशापाई लागलय?"
धाऊच्या तोंडून एकापाठोपाठ प्रश्णांचा बार उडाला. तसे त्या मुलांने धाऊच्या दिशेने पावल वाढवली व धाऊच्या जवळ येऊन म्हणाला.
" काका तुमच्या सर्व प्रश्णांची उत्तरे आहेत माझ्याकडे! पन ती ऐकायची आणि पेलायची तैयार आहे का तुमची?" धाऊने त्या मुलाच्या ह्या वाक्यावर हळूच खाली पाहिल, जणु तो मनात हो नाहीचा विचार करत असावा , काहीवेळ खालीच पाहिल्यानंतर धाऊने हळूच वर पाहिल
व म्हणाला.
"हाय ...! तैय्यारी हाय माझी! अस भेडावाणी मरण्यापेक्षा, त्या सैतानाशी दोन हात करुन मेलेल बर! सांग तू? "
धाऊ एका नव्या जोशाने म्हणाले.त्यांच्या डोळ्यांत हे वाक्यउच्चारताक्षणी एक चमक उमटली. जी पाहून त्या मुलाच्या चेह-यावर एक मंद स्मितहास्य उमटल.
" वा काका खुप छान , मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती.!ऐका तर ?" काहीक्षण तो मुलगा हे वाक्य बोलून थांबला व पुढे म्हणाला.
"काका ! सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्णाच उत्तर देतो.
की मी तुमची मदत का करत आहे? ऐका तर ! काका मी कोणी मानव नसुन एक आत्मा आहे, एक अतृप्त आत्मा ! जो की मोक्षासाठी धडपडत आहे. आणि मला मुक्ती हवीये जी फक्त तुम्हीच देऊ शकता!
त्या मुलाच्या ह्या वाक्यावर धाऊने त्या मुलावर एक कटाक्ष टाकला, आणी मनात एक विचार सुद्धा येऊन गेला ," की आपण एका आत्म्याशी संवाद साधत आहोत" काहीक्षण तर त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास सुद्धा बसला नाही.एकवेळ कानांनी ऐकलेल खोट ठरु शकत ,परंतु डोळ्यांना दिसणार दृश्य कधी खोट ठरत नसत. नाही का?
" काका ! " पुन्हा त्या मुलाचा आवाज घुमला.मित्रांनो त्या मुलाचा आवाज फारच चमत्कारीक होता,जसे की पृथ्वीबाहेर अंतराळात घुमणारा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी हिंत आवाज येत असतो तसे त्याच्या शब्दांत तो आवाज येत होता.त्याच्या आवाजाने धाऊची विचारचक्राची तंद्री भग्न पावली.
" आं!" धाऊच्या मुखातुन एक हुंकार बाहेर आला.
" कसला विचार करताय काका?"
" नाय-नाय कसला नाय ! तू पुढ बोल?"
" बर ! तर तुमचा दुसरा प्रश्ण आहे! मला इथे का आणल? बरोबर? "
त्या मुलाने धाऊकडे पाहिल, त्या मुलाच्या ह्या वाक्यावर धाऊने फक्त होकारार्थी डोक हलवल. त्सा तो मुलगा एक दोन पावलें पुढे चालत चालत बोलू लागला.
" काका ! तुम्हाला इथ कोणी आणल?" पाठमो-या अवस्थेत तो मुलगा उच्चारला. त्या मुलाच्या ह्या वाक्यावर धाऊला आज सकाळी नाक्यावर
तो आफ्रिकन इसम भेटला होता, तेव्हापासुनची सर्व घटना आठवली
" मला एका काळ्या मांणसांन इथ कामावर आणल होत.!"
धाऊ पटकन म्हणाला.
" त्याचा चेहरा लक्षात आहेत तुमच्या?"
पाठमोरा उभा राहूनच तो मुलगा म्हणाला. त्याच्या वाक्यावर धाऊने हळूच डोळे मिटले, तसे त्या दोन अंधा-या डोळ्यांन आड धाऊला
त्या आफ्रिकन काळ्या मांणसांची एक कल्पनाशक्तिने छवी दिसुन आली.आणि त्या बंद डोळ्यांन आडच धाऊच्या कपाळावर क्षणार्धात
आठ्या जमा झाल्या. तसे त्या पाठमो-या मुलाच्या चेह-यावर एक मंद स्मित हास्य उमटल.धाऊने तो चेहरा पाहताच खाडकन डोळे उघडले.
" आ...आ.. आर..ह्यो..ह्यो..तर!"
धाऊचे शब्द तोंडात अटकल्या सारखे झाले होते, की तोच त्या मुलाने गिरकी घेतली व म्हणाला.
" काहीवेळा अगोदर पाहीलेल्या सैताना सारखा दिसतो ! बरोबर..ना?"
तो मुलगा मंदस्मित हास्य करत म्हणाला.आणि धाऊने फक्त एक आवंढा गिळुन होकारार्थी मान हळवली.



क्रमश: !

पुढील भाग लवकरच..🙏🏼😊

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED