1 Taas Bhutacha - 14 books and stories free download online pdf in Marathi

१ तास भुताचा - भाग 14

End beginning...1

फसगत भाग 5

वाचक मित्रांनो 66 मिलियन वर्षांपुर्वी!ज्यावेळेस ड़ायनॉसोर वेगवेगळे विचित्र प्रकारचे प्राणी ह्या पृथ्वी तळावर आस्तित्वात होते. परंतु एकेदिवशी अंतराळातुन एक उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने झेपावला,आणी त्या उल्कपिंडाच्या महाभयंकर आघाताने त्या सर्व प्राण्यांच अंत झाल.वाचक मित्रांनो निसर्ग हे अमर आहे! त्याने आपली उतपत्ती इतपतच थांबवली नाही.पुढे-पुढे जाऊन भुतळावर मानवाची उतपत्ती झाली.आंणि गुहेत राहाणा-या माणवाने चाकाचा , प्राण्यांचा,आगीचा विविध प्रकारचे शोध लावले,पुढे जाऊन त्याने गुहा सोडली मातीतल्या घरात राहू लागला.मग ज्यासरशी त्याला बुद्धिला आली तसे त्याने आपल्या मनात चांगले सकारात्मक विचार निर्माण व्हावे ह्या साठी देवाचा शोध लावला.देवाचा शोध लावुन त्याने सत्याला पृथ्वीवर आणल, मग रोज सकाळ -संध्याकाळ तो त्या देवाची पुजा-अर्चना करु लागला.आणि हा युग म्हंणजेच सतीयुग! मित्रांनो मनुष्य हा प्राणि इतक्यातच थांबला नाही! त्याच्या जिज्ञासु बुध्दीने. प्रकाशाच्या पलिकडे कालोखात वसलेल्या सत्याला मारुन पुरणा-या असत्याच्या सीमेचा शोध लावला, सैतानाचा शोध लावला. नरक, पाताळ, कालोखी दुनियेतल्या रक्तपिपासु ,मांस भक्षण करणा-या अभद्र देवतांचा,काळ्या जादू टोना शक्तिंचा शोध लावला.काळांतराने त्याने ह्या दोन्ही देवांमधला फरक ही ओळखला.की हा सत्याचा देव आपली फक्त आणि फक्त परिक्षा घेऊ शकतो, आपल्याला हव ते देऊ शकत नाही. पण ! पण हा दुसरा कालोखाचा सैतानी देव आपल्याला हव ते देऊ शकतो , मेहनत न करता , हव ते देऊ शकतो.सुखाच जीवन , मोठ्ठ घर , भरभराटी पैसा आणि त्या बदल्यात त्याला काय द्याव लागेल तर?रक्त ,मांस ,बळी, तो मानवाचा? की प्राण्याचा? जे असेल ते. कलियूगाची उत्तपत्ती त्याचक्षणी झाली, ज्यावेळेस मानवाने सैतानाला, पिशाच्चाला पुजायला सुरुवात केली.जो मणुष्य ह्या सैतानाची पुजा करत असे,त्याला लागलीच काली जादू धन-दौलत, ऐश्वर्याचा उपभोग मिळत असे. त्यासाठी काहीकजण तर आपल्या आत्म्याचा सौदा सुद्धा त्या सैतानाशी करत.आज देशांत विविध प्रांतात गुप्तहेरपणे इल्युमिनाती संघटनेची करोडो-अब्जावधीने सैतानाला पुजणारी उपासक आहेत.
मोठ मोठे सिनेतारके/तारका सुद्धा ह्या संघटनेत सामील आहेत.मध्यरात्रीच्या सुमारास घनदाट जंगलात, गुहेत, हिमालयात, कब्रस्तानात, समुद्राच्या अंतर्गत गुहेत, मुर्दाघरात, मोठ-मोठाल्या बिल्डींगच्या फ्लैटसमध्ये, काळे कपडे घालुन ह्या सैतानाच्या उपासकांची रात्री अपरात्री पुजा सुरु होते, ज्यापासुन आजतागायत हे फक्त ऐकीव आहे,परंतू आजपर्यंत ऐकीव स्वरुपा विना ना कोणि ह्या उपासनेला पाहील आहे! आणी जो कोणी पाहिल तो पुन्हा कधीही मनुष्यवस्तीत दिसत नाही. वुडू बाग सुद्धा त्यातलीच एक होती.तो आफ्रिकन माणूसच तो सैतान आहे, हे समजताच धाऊच्या कानसुळ्या गरम झालेल्या, भयाने छाती धडधडू लागलेली. बाजुलाच एक गोल चौकलेटी रंगाचा मडका होता.मडक्यावर एक गोल थाली होती आणि त्यावर एक ग्लास होता. धाऊने ग्लास उचलुन, थाली बाजुला काढून मडक्यात ग्लास बुडवुन पाणी बाहेर काढल, आणी सुखलेल्या गळ्यात ते पाणि ओतल.पोटात पाणी जाताच त्यांना थोड बर वाटु लागल. ग्लास पुन्हा मडक्यावर ठेवून त्यांनी त्या मुलाकडे पाहिल व म्हणाले.
" पन त्यो हे समध कशापाई करतुया,आण त्यान मला इथ कशापाई आणलय?" धाऊच्या वाक्यावर त्या लहान मुलाने एकवेळ हळूच मंद स्मित हास्य करत त्यांच्याकडे पाहील मग हळूच भिंतीकडे आपली नजर वळवली.त्यासरशी धाऊने सुद्धा तिकडे पाहील. सफेद भिंतीवर एक कोळ्याच जाळ होत .आणि त्या जाळ्याभोवती एक काळ्या रंगाचा लहान कीटक फे-या घालत होता. परंतु तो कोळी मात्र एकटक जाळ्यावर शांत जागेवर बसला होता.की तेवढ्यात न जाणे कोठून एक हवेचा झोत आला आणि तो कीटक त्या जाळ्यात अडकला, तो कीटक जाळ्यात अडकताच, येवढ़वेळ शांत बसलेल्या कोळ्याने आपल्या शरीराची हाळचाल केली आणी तोंडावाटे जाळ सोड़त त्याला गुंडाळू लागला.हे दृश्य पाहून त्या मुलाने हळूच धाऊकडे पाहिल व म्हणाला.
"काका ! तो काला माणुस आपल्या देशातला नाही! तो आफ्रिकन देशातला आहे. आफ्रिकन देशात ह्या कलियुगात सुद्धा आसत्तित्त्वात असलेली एक काळ्या जादूची वुडू विद्या आहे!"
" वुडू?" धाऊ न समजल्या सारखे हाव-भाव करत म्हणाले. त्यांच्या ह्या
वाक्यावर त्या मुलाने फक्त होकारार्थी मान हलवली व पुढे बोलू लागला.
" होय वुडु! भारतात ज्याप्रकारे जादूxटोणा ,करणी चेटूक केल जात, सेमहुबेहुब त्याचप्रकारे वुडू सुद्धा जादू टोण्याचीच विज्ञा आहे.पन भारतात जादू टोण्याची विद्या काहीक जणांनाच अवगत आहे, बाकीचे मांत्रीक तांत्रीक सर्व पैशांसाठी नाटक करत असतात. परंतु आफ्रिकन देशात तसं नाही, त्या देशांत वुडू काळ्या जादूचा साक्षात एक समाज आहे.ज्यात काळ्या जादूचे परिवार आहेत.आणि ही विज्ञा खरी आहे." तो मुलगा हळूच त्या कोळ्याच्या जाळ्या जवळ गेला व त्या जाळ्या अडकलेल्या कीटकाला त्या जाळ्यातुन मुक्त केल व म्हणाला.
" काका तो आफ्रीकन सुद्धा ह्याच वुडु धर्मातला आहे. परंतु आफ्रीकन देशात काही बंधनांमुळे तो आपली शक्ति वापरु शकत नाही.आणि म्हणूणच तो इकडे भारतात आला आहे ! का माहीतीये ?" त्या मुलाने धाउंकडे पाहिल, तसे धाऊनी फक्त होकारार्थी का असा इशारा करत मान हळवली .
" कारण वुडू हा समाज कधीही आपल्या काळ्या शक्तिचा वाईट उपयोग करत नाही! आपल्या शक्तिने ते कोणालाही इजा पोहचवत नाही! परंतु काही माणस अशी असतात! की ज्यांना आपल्या शक्तिचा गर्व,अहंकार असतो, वासनेची, पैशांची लाळसा असते! जसे की तो काळा आफ्रिकन माणुस! त्याने आपल्या वुडू काळ्या जादूच्या शक्तिमार्फत एका भयंकर, अभद्र, अमंगळ, गौनब खोबेखेन नामक
नरकातल्या मृत्युच्या देवतेशी एक सौदा केला आहे."
" कसला सौदा ?" धाऊ पटकन म्हणाले.
" दोन हजार मानवी बळींचा सौदा!"
" काय दोन हजार बळी!" धाऊच्या तोंडाचा आ वासला गेला, एक लहान मुलगा आपल्याला ही तर्क-वितर्काच्या पल्याडच्या गोष्टी सांगत आहे,ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
" हो काका! आणि ती दोन हजाराची नोट आहे ना तुमच्या खिशव्यात !"
धाऊच्या मनात एकवेळ प्रश्ण आला,आपन तर ह्या मुलाला नोटी बदल काही सांगितल नव्हत मग ह्याला कस कळाल.
" ती नोट ज्या ज्या वेळेस एका नव्या मनुष्याच्या हाती जाते, त्या त्या वेळेस एक नवा बळी मिलत जातो, आणी आज पर्यंत ती नोट कधीही सुट्टि झालेली नाहीये!" धाऊने हळूच खिश्यात हात घातला, आणी ती नोट बाहेर काढली, सकाळी पाहिलेली ती कर,करीत गुलाबी नोट आता ह्याक्षणी मातीने मळली होती, नोटेवर थोड्याफार फाटलेल्या खुणा होत्या. धाऊच्या हातून ती नोट हवेतुन गोल गोल फिरत खाली परशीवर पडली.धाऊने हळूच खाली परशीवर पडलेल्या त्या नोटकडे एक कटाक्ष टाकला व एक भय आवंढा गिळुन पुन्हा त्या मुलाकडे पाहिल.
" घाबरु नका काका ,आज का जर त्या आफ्रिकन वुडू मांत्रीकाला शेवटचा बळी मिळाला, तर ह्या पृथ्वीतळावर साक्षात सैतानाचा नंगानाच माजेल, आकाशातुन पाण्याचा नाही, तर रक्ताचा पाऊस पडेल, खाली मातीचा चिखल नाही, तर मानवाच्या रक्तमांस हाडांपासुन बनलेला चिखल साचेल. कलियूगात थरथराट माजेल रात्र होताच सैतान बाहेर पडतील..आणी जर का त्या सैतानाने सुर्याच्या किरणांना ही ह्या पृथ्वी वर येण्यापासुन रोखल तर दिवसाच्या चौवीस तासांत ह्या पृथ्वीवरच्या एक नी एक मनुष्याच्या नरडीचा घोट घ्यायला तो मागे पुढे पाहणार नाही.आणि जर का ह्या अखंड भूतळावरचा प्रकाशच नाहीसा झाला तर आकाशात ह्या पांढ-या शुभ्र ढगांना नेहमी काजळी फासलेली असेल, लहान-मोठ्या -थोर सर्वांच्या नंग्या अवस्थेतली पांढरीफट्ट प्रेत रस्त्यावर कुजुन पडलेली असतील, त्यांना कधीही अग्नी मिळनार नाही.
ही सृष्टीवरच्या झाडांची,चांगली हवा दुर्गंधीत परावर्तीत होईल. सर्वकाही भक्कास होऊन जाईल. " धाउंच्या कानांत त्या मुलाचे एक नी एक शब्द तव्यातले गरम शिसे ओतल्या सारखे आत जात होते. एक नी शब्द त्या कल्पनाशक्तिने डोळ्यांसमोर येऊन अंगावर स्नायु ताठरले होते, शरीरावचा एक नी एक केस उभा राहिला होता. भीतीने गर्भगळीत झाले होते ते .की तोच आकाशात दोन ढगांच घर्षण झाल आणि एक भयंकर कानठळ्या बसवणारा धडाड धम आवाज झाला.त्या आवाजाने धाऊच्या छातीत धस्स झाल, जणु खुद्द तो सैतान धाउंंच्या ह्या भित्रटपणावर खिदिखीदी हसत आहे.
तस म्हणायला धाऊच ह्या जगात कोणिही नव्हत.मग तो ह्या पृथ्वीसाठी,पृथ्वीवरच्या मानवजातीसाठी लढा देणार होता का ? आणि कशासाठी तो असंच दुस-या साठी स्व्त:च प्राण पणाला लावणार होता?शेवटी त्याला स्व्त:च्या जिवाची पर्वा नव्हती का? अशी कित्येक प्रश्न पुढ्यात होती , आणि त्यांचा सोक्षमोक्ष जाणुन घ्यायच असेल तर या पाहूयात पुढे.आकाशात कालपट ढगांनी थैमान घालायला सुरुवात केलेली. त्या कालपट ढगांन आड तो पांढराशुभ्र चंद्र न जाणे कोठे गडप झाला होता, की भीतीपोटी लपुन बसला होता हे त्या परमार्थासच ठावुक. काळ्या ढगांची दाटी जशी जशी आणखी वाढत होती. खाली जमिनीवर अंधकार प्रकाशाला गिळंकृत करत येत होता. रस्त्यावर पेटलेले,स्मशानभूमीतले,कब्रस्तानातले दिवे तडतड करत फुटत होते.रस्त्यांवरची भटकी कुत्री मान वए करुन आकाशात पाहत
हेळ काढून रडत,विव्हळत,भुंकत होती. वातावरणात सकारत्मकेतचा
गुण जाऊन नकारात्मकता पसरु लागलेली. घों-घों करत वारा वाहू लागलेला आजूबाजूला असलेली झाडांची पान वर उधळू लागलेली.
" मग ह्या सैतानाला थांबवण्याच काय मार्ग हाय का नाय?"
धाऊ प्रश्णार्थक नजरेने त्या मुलाकडे पाहत म्हणाले.धाउंच्या ह्या वाक्यावर तो मुलगा थोडासा हसला ,व म्हणाला.
" जगात असंख्य रोग आहेत, मग त्या रोगांवर कोठे ना कोठेतरी उपाय असतोच ना! मानवाला काही इजा झाली , की तो डॉक्टरकडे जातो!
घरातला काही सामान संपल, की तो किराणा दुकानात जातो!
आणी जर का त्याच्या वर कधी काही भयंकर आतीप्रस्ंग ओढावलाच तर तो !" आपल पुढील वाक्य तो मुलगा पुर्ण करणार की तोच मध्येच धाऊ म्हणाले.
" देवा कड जातु!" धाउंच्या ह्या वाक्यावर तो मुलगा पुन्हा स्मित हास्य देत हसला.
" होय काका! अगदी बरोबर म्हंटलात तुम्ही! तोच एक आहे जो तुम्हाला
ह्या जागेतुन सुखरुप बाहेर काढेन! आणि मला मुक्ती ही मिळवुन देईन!"
"आर पर माझ्याकड देवाच काय साधन नाय हाय!" धाऊ जरा निराशेच्या स्वरात उच्चारले. त्यांचा तो निराशेने कोमजलेला चेहरा पाहुन तो मुलगा म्हणाला .
"अहो साधन कशासाठी काका? माझी आई म्हणायची ,की देवावर
जर तुमची मनापासुन अखंड श्रद्धा असेल! तर दगडात सुद्धा देव शोधला जातो. तुम्ही पुर्णत मनाने त्याला हाक मारा तो नक्कीच येईन!"
" खर हाई बघ पोरा तुझ्या आईच! पर आई वरण आठवल !तुझ आई-बाप हाय कुठ ? आण तुझ नाव काय? आण तुझ्या सोबत हे कस्ं झाल. "
धाउंच्या ह्या वाक्यावर तो पांढ-या फट्ट चेह-याचा मुलगा काहीक्षण खाली जमिनीकडे पाहतच राहिला,व काहीवेळाने सांगू लागला.
"काका माझ नाव विग्यान! माझ्या माता-पित्याचा दोन महिन्या अगोदरच एका कार एक्सीडंटने मृत्यु झाल.आणी माझ्या माता-पित्यांच कोणिही नातेवाईक नसल्याने माझ सांभाळ एका अनाथ आश्रमाकडे सोपावल गेल.मी लहानपणापासुन अभ्यासात हुशार आणि स्वभावाने चांगला असल्याने आश्रमात लवकरच सर्वांशी गट्टी जमवली.अशातच एकेदिवशी मी आमच्या आश्रमातल्या डिसोझा मेमच्या
समवेत बाजारात आलो होतो.त्यावेळेस डिसोझा मेमच लक्ष नसताना ह्या आफ्रिकन मांणसाने मला फुस्स लावून इकडे पळवुन आणल.आणि त्याच रात्री माझ सैतानाला बळी दिल.परंतु मी लहान असल्याने माझ्या आत्म्यावर त्या सैतानाला हक्क प्रस्थापित करता आला नाही.आणी माझा आत्मा ह्या बागेत सुटकेसाठी भटकू लागला, की कोणीतरी येईण आणि मला ह्या आत्मायोनीतुन सुटका करुन देईल.व आज तो दिवस उजाडला मी तुम्हाला पाहिल आणि माझ्या मनाने मला संकेत दिला, की तुम्हीच ते आहात जे मला ह्या आत्मायोनीतुन मुक्त करु शकता . ज्याने मला पुढील जन्म घेण्याची गती मिळेल.
त्या लहान मुलाने इतक सांगुन आपले शब्द थांबवले,!
" कधी-कधी ह्यो भगवंत ले कठोर बनतो बघ पोरा ! " धाउंचे डोळे पाणावळे, त्यांनी एक आवंढा गिळला,व पुढे बोलू लागले.
"गरीबांचीच परिक्षा घेतू. आता माझ बी तुझ्या सारखच हाई ! कुटुंबात बायकोशिवाय कोण बी नव्हत.ती एकलीच अशी होती.की जिच्यामुल माह्या घराले घरपन होत.पन तिला कोरोना झाला नी त्यातच ती दगावली
,आयुष्यभराची नाळ अशीच आठ दिवसात तुटली.शेवटच्या येळेस्नी ह्यो परमार्थ इतका कठोर झाला की तिचा त्योंड बी बघाला नाय भेटल."
धाउंच्या पाणावलेल्या डोळ्यांतुन नकळत एक अश्रु निघाला जो त्यांनी पाठ वळवुन पुसला व त्या मुलाकडे हसत पाहत म्हणाले.
" पन पोरा! तुला मुक्ती मिळवुन देणार म्या! माझा जिव गेला तरी चालल
पर आज त्या सैतानाचा अंत निश्चित हाय." धाउंच्या ह्या शब्दांना एक हिम्मत रुपी धार होती, जी करु शकते का त्या सैतानाचा अंत ?

पाहुयात पुढे काय होइल.!"

क्रमश :

माफी असावी भाग लेट येत असतील..तर सद्या मला बर वाटत नाहीये..! 🤧🤒🤕! ...परंतु मी सुद्धा एक वाचक आहे स्व्त:चे वाचक अशे वाट पाहत असतील असं विचार करुन खुप वाईट वाटत आणी हो पुढील भाग आंतिम..

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED