१ तास भुताचा - भाग 19 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 19

भाग 19

स्वामी समर्थ ...
नमस्कार वाचकांनो ! सादर केलेली कथा मुळतत्वाने पाहता एक सत्यघटना आहे.परंतु कथेत गाव, पात्र, आणी नाव यांची वाच्यता केली जाऊ शकत नाही.क्षमा असावी !🙏🏼.

कमलेश्वर (बदलेल नाव). एक साधारण पन्नाशीच्या आसपास असलेले इसम, ते विद्युतपुरवठा करणा-या यंत्रणेत कामाला होते. म्हणजेच एकंदरीत वायरमेन होते असंच समजा.त्यांची कामावर नाईट पाळी असायची .रोज रात्रि त्यांना आपली सायकल घेऊन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्युतयंत्रणेच्या ऑफिस मध्ये जाव लागायच.जर कधी रात्रि अपरात्रि कोणती केस आलीच , तर त्यांना तिथे वायरमैन म्हणून जाव लागायच. काम म्हंणजेच कोणती वायर वगेरे तुटली असली तर ती जोडने इत्यादी.परंतु खर सांगायच झाल .तर
पावसाळ्याचा महिना सोडला तर, काम काही केल्या येत नव्हत.
मग काय झोपा काढायच्या बस्स! कमलेश्वरराव हे स्वामी समर्थांचे खुप मोठे भक्त होते. जैसे तुकोबाला विठूचा लळा होता, तैसे कमलेशरावांना स्वामींचा लळा होता. उठता बसता स्वामींच्या नावांचा ठसा त्यांच्या मुखात वसला होता. कमलेश्वररावांच्या धर्मपत्नीला लताबाईंना मात्र त्यांचा हा स्वभाव काही आवडत नसायचा, पाहावा तेव्हा घरी असल्यावर स्वामी , स्वामी ते मुखातुन बोलत असत,.एकप्रकारे लताबाईंना स्वामी आवडतच नव्हते. कमलेश्वर रावांच्या ह्या स्वभावावर लता बाईंना जरी राग येत असला.तरी सुद्धा त्यांचा आपल्या धन्यावर खुप जिव होता.
एकेदिवशी कमलेश्वरराव असेच कामावर जाण्यासाठी निघालेले.
" अहो! मी काय म्हंणते? "
लता बाई जरा काळजीच्या सुरात उच्चारल्या .
" काय ग ! बोल ना?"
" आज कामाला जायलाच हवं का ? "
लता बाईंनी कमलेश्वररावांच्या हाती डब्बा दिला.
" अंग जायला तर लागेलच ना ! नाहीतर खाणार काय..! "
" अहो तसं नाही! पन आज अमावास्या आहे ना! "
" लता ! त्या भुतांच्या मालिका जरा कमी पाहत जा पाहू !पाहिलंस ना काहीही विचार येतायेत मनात ! हा हा हा!"
कमलेश्वरराव ह्या वाक्यावर जरासे हसले , नी सोबत विजेरी, डब्बा घेऊन डोक्याला शाल गुंडाळून बाहेर पडले. लता बाई एकटक दरवाज्यात उभ राहून त्यांच्या सायकल ढ़कलत घेऊन जाणा-या आकृतीकडे कालोखात नाहीस्या होईन पर्यंत पाहत राहिल्या,की तेवढ्यात लता बाईंना काहीतरी आठवल.की बोलता-बोलता हे रोजच्या सवयीनुसार आज मात्र स्वामी समर्थांच्या तसबीरीला पाया पडायचे विसरले, आणी त्यांचा स्वामी समर्थांचा लॉकिट ही तसबीरी समोरच राहीला. मनात कशी सर्रकन भीती दाटुन आली.डोक्यात अमावास्या असल्याने नाना त-हेचे विचार भुंग्या सारखे घों-घों करु लागले.कधी नव्हे ते आज लताबाईंनी धन्याच्या काळजीपोटी स्वामी समर्थांच्या तसबीरी समोर उभ राहून हात जोडले व पुर्णत नेक मनाने भावना प्रगट केल्या.
" मी तुम्हाला किती ही वाईट बोलत असेल. पन माझे धनी मात्र तुम्हाला खुप मानतात ! आज माझ्या मनात जे वाईट विचार येतायेत तसं काहीच
घडू देऊ नका. !" नकळत लताबाईंचे दोन्ही हात जोडले गेले व एक अश्रु डोळ्यांतुन खाली टीपकला.नी त्या अश्रुसहित स्वामींच्या तसबीरीवरचा भगव्या रंगाचा फुल खाली पडला .
आज थंडी जरा जास्तच पडलेली, इतकी की हातापायांसहित रक्तमांस हाड गोठली जात होती. दहा बारा मिनिट चालून कमलेश्वरराव आप्ल्या साईकलीवर स्वार झाले.सायकलचे पाइंडल मारत मारत ते टॉर्च च्या उजेड़ात अंधार कापू लागले. धुक तर इतक पसरल होत, की ती सायकल जणू धुक्याच्या नदीतुन चालत आहे की काय अस वाटत होत.
सायकल थोड-थोड अंतर कापत होती,पाच मिनीट झाले असतील. कमलेश्वररावांच्या नजरेस पुढे सायकल पासुन ठिक वीस मीटर अंतरावर कोणीतरी पाठमोर खाली मान घालुन सफेद कपडे घातलेल चालताना दिसल. रस्त्यात कोणि वाटसरु दिसल-भेटल की आपले कमलेश्वरराव स्व्तहून लिफ्ट देत.मांणसाची रीत चांगली अजुन काय! आज ही कमलेश्वररावांनीच हाच विचार केला, नी सायकलचे पाइंडल जोर-जोरात मारत त्या इसमाजवळ पोहचण्याचा प्रयत्न करु लागले.
परंतु आश्चर्यकारक बाब ही होती, की त्या माणसाजवळ कमलेश्वरराव पोहचतच नव्हते. त्या दोघांच अंतर काही केल्या कापता कापत नव्हत.
दोन झाली, तीन मिनीटे झाली, परंतु त्या मांणसाजवळ काहीकेल्या साईकल पोहचत नव्हती.शेवटी न राहवुन कमलेश्वररावांनी त्या पुढील इसमास आवाज द्यायला तोंड उघडल नी पुढच्याक्षणाला त्यांच तोंड आ वासल गेल, जिभेवर आलेले शब्द, जिभेवरच राहीले.कारण त्या इसमाचे पाय उलटे पांढरेफट्ट चुना पोतल्यासारखे होते. हे काहीतरी वेगळ्या मितीतल अक्ल्प्नीय मानवाच्या विचार क्षमते पल्याड आहे. जिथे मानवाची विज्ञानाची कल्पना पोहचत नाही तिथले आहे.त्यांना कल्पना आली होती.त्यांनी लागलीचआपली सायकल जागेवरच थांबवली आणि ते एकटक पुढे पाहू लागले. सायकल थांबताच ते पांढ-या कपडयातल ध्यान ही थांबल.
" हिहिही, हिहीहिही! काय रे थांबलास का? "
एक पाश्वी हास्य नी खोल खर्जातला आवाज त्या थंडीत घुमला .तो आवाज ऐकुन कमलेश्वररावांच्या अंगावर सर्र्कन काटा उभा राहीला, नी नकळत हात गळ्याजवळ गेला.गळ्यात लॉकिट नव्हतच , त्यांच्या आता ल्क्षात आल , घाईघाईत पाया पडायच आणि लॉकिट घ्यायच विसरले होते ते.
" स्स्स्स! डब्यात माशे हाईत काय! दे मला दे..! हिहिह्हिही..!हिहिही.."
भयंकर घोगरा खोल खर्जातला आवाज चौहीदिशेना घुमला नी त्या अमानविय दैत्याने कमलेश्वररावांकडे वळून पाहिल.
पांढरट सुरकुतलेली एका म्हाता-या सारखी त्वचा, नी खोल गेलेले पिवळेजर्द काजव्या सारखे चमकणारे अलैकीक डोळे. कालपट रंगाचे ओठ नी डोक्यावर टक्कल.
" को..को..कोण आहेस तु?" कमलेश्वररावांच्या मुखातुन वाचा बसलेल्या अवस्थेतला आवाज निघाला .
" तुला काय करायचय रे माxxxत ! ती मासळी दे न्हाईतर तुलाच खाईल
इथ. ! हिहिहिही, खिखिखिखी."
एक भयंकर हास्य त्या ध्यानाच्या मुखातुन निघाल, कमलेश्वररावांनी हेंन्डलला लावलेली पिशवी काढली आणि थेट त्या आकाराच्या दिशेने फेकली. सेक्ंदाच्या काट्याक्षणीच पिशवी फाटल्याचा नी डब्बा उघडल्याचा आवाज झाला. कमलेश्वररावांनी आपली सायकल फिरवली.नी सायकलवर बसुन असाकाही वेग पकडला.
" अरे ए ..कुठे पळतो थांब ! तुझ्या तर !"
एक खोल खर्जातला आवाज कमलेश्वरावांच्या पाठीमागुन आला. क्षणार्धात त्यांच्या सायकल जवळून काहीतरी अफाट वेगाने काहीतरी पुढे गेल्याचा भास त्यांना झाला.नी त्यांच्या नजरेला ठिक पन्नास मीटर अंतरावर तीच भयान अमानवीय सैतानी पांढरट कपड़यांची हाडकुली आकृती दिसली.कमलेश्वररावांच्या मनात भीती घर करु लागली.
आता सुटका नाही मृत्यु अटळ आहे, सायकलवरच्या पाईंडलवचा वेग कमी होऊ लागला, वाचण्याची आशा निराशावर येऊन ठेपली.की तोच आकाशात एक विजेचा बार फुटला, एकावर एक ढग घासले गेले चंदेरी रंगाचा लक्ख प्रकाश झाला, नी कमलेश्वरावांच्या दोन्ही कानांवर गडगडाटी आत्मविदारक बळ देणारा आवाज आला.
" अरे ए माणसा! अरे खेळ सुरु होण्या अगोदरच हार मानतोस का!
अरे अंगात बळ साचव नी मार पाईंडल! भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी " कमलेश्वररावांच्या कानांवर शेवटचा जो वाक्य रुपी आवाज आला, त्या आवाजात अशी काही आत्मविश्वास निर्माण करण्याच्या लहरी होत्या की शरीरात न जाणे अशी काही चेतातंतुमध्ये लहर धावून आली, की पाईंडलवरचे पाय अक्षरक्ष अमानवीय वेगाने फिरु लागले.
कमलेश्वरावांच्या मागुन कसलातरी तेज येत होता ,ज्या प्रकाशाला पाहून
वाटेत उभी राहीलेली ती अमानवीय ब्याद कमलेश्वरावांच्या आकृतीच्या मागे पाहत पाहत भीतीने बारा वाजल्यागत पाठी पाठीमागे सरकु लागली. अफाटवेगाने कमलेश्वरांनी ती सायकल त्या आकाराला हवेत सफेद रंगाच्या राखाडीत परावर्तीत करुन पुढे नेली.नी थांबले ते थेट घरीच.घरी येताच ते बेशुध्द झाले, दुस-या दिवशी त्यांना शुद्ध आली.
त्यांनी रात्री घडलेला प्रकार आपप्या पत्नीला कळवला. लताबाईंनी सुद्धा रात्री आपन स्वामींना केलेली विनंती त्यांना कळवली.
दोघांनाही कळाल होत, की देव आला होता .
कमलेश्वररावांच्या भक्तीप्रेमावर प्रसन्न होऊन तो आला होता.
ज्याच्या आवाजात जरी जरब असली तरी आपल्या भक्तासाठी
आपुलकीची ,मायेची थाप आहे .

" भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे! "