१ तास भुताचा - भाग 24 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 24

सत्यकथेचे नाव: साई बाबांचा महिमा

🙏🏼नमस्कार वाचक मित्रांनो माझ नाव जयेश झोमटे ! मी तुम्हा सर्वांसमोर एक सत्यकथा घेऊन आलो आहे. ह्या अगोदर सद्धा
मी मोजक्याच सत्यकथा लिहिल्या आहेत,कारण त्या सत्य असून
त्यात तिखट मसाला अस काहीच नाही. ह्या कथेतली सर्व घटना सत्य घटनेवर आधारीत असुन, ह्या घटनेचे साक्षीदार मंदार जोशी आणि त्यांचा परिवार आहे. त्यांनी मला पुढीलप्रमाणे ही सत्य घटना सांगितली आहे. तीच सत्यकथित घटना मी(जयेश झोमटे) तुम्हा वाचकांसमोर मांडत आहे. कृपया ह्या सत्यकथेची उगीचंच,वाचल्यानंतर आक्षेपार्ह टिप्पणी करु नये! (आक्षेपार्ह टिप्पणीस प्रतिउत्तर मिळणार नाही) स्वनुभवकर्त्याने आपली ओळख नाव गाव सांगितलच आहे ! पन फोटो वगेरे आलिप्त ठेवावयास सांगितल आहे. धन्यवाद ! या पाहुयात काय घडलं आहे मंदार ह्यांच्या कुटूंबा समवेत.

.................
सन 2000

जनार्दन वाळकू जोशी वय चाळीस सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांच्या परिवारात बायको मेघलता वय पसत्तीस , मोठी मुलगी सुजाता वय सोहळा, आणि लहान मुलगा मंदार वय बारा असा सुखी परिवार होता.
जनार्दन रावांची शाळेतून पुन्हा बदली झाली होती. मुंबईतल्या एका खेड्यागावात एक मराठी शाळा होती तिथेच त्यांची बदली झाली होती.
राहण्यासाठी एक चांगला दुमजली बंगला मिळाला होता. प्रशस्त हॉल-
हॉलमध्येच सोफा,टिव्ही,फुलदाणी टेबलस, किचन , किचनच्या डाव्याबाजुला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता- किचनच्या उज्वया बाजुला सुद्धा एक रुम होती.

त्याकाळी मुल पंधरा वर्षाची झाली की स्व्त:ला मोठ समजु लागायची,म्हंणुनच सुजाताने आपल्यासाठी स्पेशल वरच्या मजल्यावर असलेल्या दोन खोल्यांमधली एक खोली स्व्त:हासाठी घेतली. मंदार सुद्धा तिच्यासोबतच झोपेल म्हंणुनच तिच्या ह्या निर्णयाला कोणिही विरोध केल नाही. त्या खोलीत दोन सिंगल बैड होते. एक चार फुट कपाट होता त्यात सुजाताने आपले व मंदारचे कपडे ठेवले.

"काय हो!" मेघलताबाईंनी जनार्दनरावांना आवाज दिला.
मेघलता बाई किचनमध्ये उभ्या होत्या. किचनमध्ये ओट्यावर गैसपेटलेली, खाली लाल सिलेंडर होता. भिंतीवर मांडणीत ताट,थाल्या,चमचे,टोपश्या अशा काही बाही वस्तु लावल्या होत्या.

"हं काय बोलतेस?" जनार्दन राव किचनमध्ये येत बोल्ले. बाजुलाच मंदार बाजारातून घेतलेली आईस्क्रीम खात उभा होता
"अहो ह्या बंगल्यात हे सर्व सामान कुणाच आहे. आपल तर नाही वाटत.?"
"हो आपल नाहीच आहे!" जनार्दन रावांनी मंदारकडे पाहिल.
"मंदार . जा पाहू.... तुझी ताई काय करते बघुन ये!"जनार्दनरावांच्या वाक्यावर मंदार आईस्क्रीम खातच जिन्याने वर जाऊ लागला.
परंतु जिन्यात एका पायरीवर चालताना पायातल बुट निघाल्याने तो ते पुन्हा घालू लागला. तेव्हाच मंदारच्या कानांवर खाली चालळेल संभाषण ऐकू आल.
"अंग मेघा ! हे सर्व सामान बंगल्यात राहणा-या पहिल्या मालकाच आहे ." जनार्दन रावांचा आवाज.
" अच्छा! पन त्यांनी हा सामान इथे का ठेवलं? नेहल का नाही? "मेघलता बाईंनी विचारल
"अंग नेहायला ते जिवंत तर असायला हवेत ना! दोन वर्षापुर्वीच ह्या बंगल्यात त्यांचा आणि त्यांच्या बायको व लहान मुलाचा खून झाला ना , आणि जवळच कोणी नातेवाईक नसल्याने हा बंगला सरकारी प्रॉपर्टीत जमा झाला.आणि आता तो आपल्याला रहायलाय मिळालाय. !"
" काय ? " मेघलताबाईंना जराशी भीतीच वाटली.खून झालेल्या घरात रहायचं,हा विचारच त्यांना करवत नव्हता.
"अहो पन आपण असं खून झालेल्या मेलेल्या मांणसांच्या घरात रहायचं का? त्यापेक्षा कुठे दुसरीकडे नसतो का रहायलो आपण!" मेघलता बाई म्हंणाल्या.
"तू गप्प बस्स ग जरा ! कोणत्या जमाण्यात राहतेस ! मेलेली मांणस काय उठुन येणार आहेत का !"
"साई...साई...साई ! शुभ -शुभ बोला जरा ! "मेघलताबाई म्हंणाल्या.त्या देवधर्मांवर विश्वास असलेल्या स्त्री होत्या. पन जनार्दनरावांनी शिक्षण घेतल्यापासुन देवाची पायरी चढली नव्हती.देव ही गोष्ट फ़क्त दगड आहे
हे त्यांच्या विज्ञानीबुद्धीला लागलेला एक गंजमय विचार होता.
"हे बघ मेघा ! इतकी भारी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही.
म्हंणुन आता हा विषय इथे सोड!"जनार्दनराव जरा रागात म्हंणाले. त्याकाळी स्त्रीया नव-याला आतासारख उलट बोलत नसत. म्हंणुनच मेघलताबाई गप्प बसल्या. दिवसभरात मेघलताबाईंनी पुर्णत बंगला पायाखाली घातला -तेव्हा त्यांना काही गोष्टी कळाल्या.की पुर्णत बंगल्याची बांधनी वास्तुशास्त्र उलट आहे! आणि बंगल्यात देवघर आस्तित्वात नाही.
ही अशी कशी मांणस? जी घरात देवच पुजत नाही?. घरात सर्व वस्तु होत्या- मग देवघर का नव्हत? जनार्दनरावांनी फ़क्त गैस-सिलेंडर, अन्न धान्य, सर्वांचे कपडे अन्य वस्तु तेवढ्या आणल्या होत्या. मेघलताबाईंनी आपल्याबरोबर देवाच एज फोटो आणल होत . संकटकाळी धाऊन येणारा श्री साईनाथऽऽऽऽऽऽ ! मेघलताबाईंचा शिर्डीच्या साईनाथावर खुप विश्वास होता. मनोभावे असीम श्रद्धा होती.
मेघलताबाईंनी साईनाथाचा फ़ोटो किचनमध्येच एकाबाजुला मांडला,त्या तसबीर समोद मंद वातीचा दिवा तेवत ठेवला. व रात्रफार झाल्याने झोपायला निघुन गेल्या. ह्या एवढ्या मोठ्या घरात, जोशी परिवारातल्या सदस्यांचा पाहिलाच दिवस संपला होता. रात्र सुरु झाली होती.दूस-या मजल्यावर सुजाता बरोबर तिच्याच खोलीत मंदार सुद्धा झोपला होता. त्यावेळेस अशे स्मार्टफोन्स आस्तित्वात नव्हते. त्याकाळची मुली-मुले रात्री भयपट-पुस्तके वाचत असत ! त्याकाळी भयकादंब-यांचे फेमस लेखक म्हंणजे नारायण धारप.
त्यांचीच एक कादंबरी सुजाता वाचत बसली होती. रात्रीचे बारा वाजले असावेत. बाहेर पसरलेल्या थंडाव्याशांततेत दूर कालोखात कोठेतरी
कुत्र्यांचा भेसुर रडण्याचा आवाज ऐकू येत होता. जणु आजुबाजुला वस्तीत कोणी मेल होत! झाडावर बसलेली घुबड कुणाला तरी पाहून घुत्कारत होती. कुत्र्यांचा भेसूर रडण्याचा आवाज काळिज फाडून आत घुसत होत. सुजाता भयकादंबरी वाचण्यात इतकी गुंतली होती.
की तिची जणु तंद्री लागली असावी. खोलीत निरव शांतता पसरली होती. आपल्या बैडवर सुजाता एक एक पान पलटवत पुस्तक वाचत होती.तिच्या बैडपासुन पुढे दहापावलांवर साडेचार फुट उंच मोठा कपाट होता. त्याच कपाटाच्या दोन्ही झापा हलक्याश्या कर्र,कर्र,कर्र आवाजात उघडायला सुरुवात झाली. शेवटी त्या कपाटाच्या दरवाज्यांच्या दोन्ही फळ्या अशाकाही उघडल्या- की त्या कपाटातला हळक्याश्या अंधाराची चिर त्यातुन दिसू लागली.
" हा कपाट? कस उघडला !" सुजाताने पुस्तक बाजुला ठेवल . ती उठली कपाटाच दार पुन्हा लावुन घेत बैडवर बसली. पुस्तक वाचू लागली.
पुन्हा काहिश्या दहा पंधरा मिनिटात तोच कर्रकर्रकर्रत कपाट उघडल.तो आवाज सुजाताने ऐकला होता. पुन्हा पुस्तक ठेऊन ती कपाटाशी पोहचली. दरवाजा लावुन घेतला, मनोमन विचार सुद्धा केला .
"कपाट बिघडल असेल!" ती बैडवर पडली. भिंतीवरच्या घड्याळात पाहिल. दिड वाजले होते-जरा जास्तच रात्र झाली होती.
पुस्तक बाजुला ठेऊन तीने , अंगावर चादर घेतली. डोळ्यांच्या बंद पापण्याआड काळसर पटलांवर विचित्र अशा रेखाव्या उमटत होत्या.
त्या अंधा-या पटलांवए दिवसभरातल्या काही काही चित्रफिती घुमत होत्या. अशीच एक सकाळची आठवण सुजाताच्या डोळ्यांसमोर आली. जुन्या घरातुन निघतावेळेस एक अंतयात्रा तिने पाहिली होती.मानवाच मन अगदी चंचल असत, एका लहान मुलासारख -ज्यात विचार करण्याच्या क्षमतेला बंधन नसत! ते विचार कसेही धावतात. सुजाताला सकाळी पाहिलेल्या त्या अंतयात्रेच विचार करुन मनात जराशी भीती वाटु लागली. तेव्हाच पुन्हा एकदा त्या नीरवशांततेत तोच कर्रकर्रकर्रत कपाटाचा दरवजा उघडला. सुजाताने फुललेल्या श्वासांनीच तो आवाज ऐकला..
अंथरुणावर पडल्या पडल्याच तीने त्या कपाटाकड़े पाहिल ! ह्यावेळेस तिच्या नजरेत कमालीची भीती दाटुन आली होती. कारण ह्यावेळेला कपाटाची झाप जरा जास्तच उघडली होती आणि त्या झापेतुन कपाटात काहीतरी अंग चोरुन दबा धरुन बसलेल दिसत होत. तीन चार फुट उंचीच ते अंगावर एक काळी हाफ पेंट सोडली तर कपड़े नव्हते, पुर्णत शरीर प्रेतासारख पांढर पडलेले होत. सुजाताची जणु मती बधीर झाली होती. पाठीच्या मणक्यातुन थंडगार भीतीची लाठ पसरली. आता जे वाचल त्याच्या मुळे भास तर होत नाहीत ना? साहजिकच प्रश्ण.पन डोळ्यांना दिसतय खोट कस मानाव.
"को..को.कोण आहे? " तीने हाक दिली.पन दबा धरुन बसलेल ते काय ? अमानवी ,अभद्र,अपरीचित,सुपरनॅचरल,काय होतं ते? त्याची हालचाल का होत नव्हती. सुजाता बैडवरुनच हलके हलके मान पुढे आणत कपाटात काय आहे हे पाहण्यासाठी पुढे झूकू लागली. तेवढयात कपाटाची दोन्ही दार खाडकन उघडली ,त्यातुन आतळ सामान , कोणि वेगान अतल्याबाजूने अंगावर फेकाव तस सुजाता-मंदार दोघांच्याही अंगावर फ़ेकल .
" आऽऽऽऽऽ" त्या अचानक घडलेल्या क्रियेने सुजाता भीतीने किंचाळली. तीचा आवाज ऐकून,जनार्दनराव-मेघलताबाई दोघेही धावत वर आले.
ते दोघे दरवाजा उघडून आत पाहतात तर काय? कपाटातले सर्व कपड़े अस्तव्यस्तपणे खोलीभर पसरले होते.
" काय झालं बाळा? अशी घाबरलीयेस का? आणि हे एवढे कपड़े खोलीभर का पडलेत" मेघलताबाईंनी सुजाताला काळजीच्या स्वरात विचारलं.
"आई !" अस म्हंणतच सुजाताने आपल्या आईला सर्वकाही सांगितल.
"काय भुत ?"जनार्दनरावांनी सुजाताच म्हंणन हसण्यावर नेहल.
" सुजाता हे काय आहे? " जनार्दनराव म्हंणाले. त्यांची नजर
टेबलावरच्या पुस्तकावर पडली.
"रात्री-अपरात्री हे असल काही वाचत जाशील तर असंच होईल!"जनार्दनरावांनी इतक काही मनावर घेतल नाही व ते निघुन गेले.
" आई खरंच सांगते मी त्या कपाटात काहीतरी होत ग?" सुजाता म्हंणाली. मेघलताबाईंनी तिला धीर दिला.
" संजु ! बाळ असं काही नसत बघ! तु ही भुतांची पुस्तक वाचण कमी कर आणि झोप पाहू आता."मेघलताबाईंनी आजुबाजुला पडलेले कपडे उचलून कपाटात ठेवले- तो पर्यंत मेघा गाढ झोपली होती. मेघलताबाई खोलीच दार लावून जिन्याने खाली आल्या. तेव्हा त्यांना देवांभोवती शेवटची घटका मोजत जळनारा दिवा दिसला. मेघलताबाईंनी लागलीच तेल शोधायला सुरुवात केली , तेल मिळताच त्या दिव्यापाशी पोहचल्या होत्याच की तेवढयात फुंकर मारल्यासारखा दिवा विझला. वातेतून हलकासा पांढरट धुर निघाला. दिवा विझतांना पाहण म्हंणजे-
" अपशकून. "मेघलताबाई स्वत:शीच म्हंटल्या .मग त्यांनी पुन्हा तेल ओतून दिवा पेटवला हात जोडले व झोपायला निघुन गेल्या.
जोशी परिवारास येऊन त्या बंगल्या अवघे चौवीस तासही उलटले नव्हते, की हा असा अक्ल्प्निय -अघोरी प्रकार घडला होता. जणु त्या बंगल्यात वावरणा-या क्लिष्ट शक्तिला ह्या कुटूंबास आपल्या इलाक्यात राहू द्यायचं नव्हत. दुस-या दिवशीपासुन सुद्धा काही-काही भास व्हायला सुरुवात झाली. मेघलताबाईंना किचनमध्ये काम करतावेळेस, वरच्या मजल्यावरसाफ-सफाई करतांना, घरात एकटे असतांना आपल्या पाठीमागे कोणितरी उभ असल्याची , कोणितरी चोरट्या नजरेने आपल्या लक्ष ठेवत असल्याची जाणीव व्हायची-पन मागे वळून पाहता कोणीच दिसत नसायचं. सुजाताला सुद्धा रात्री अपरात्री खोलीच्या दरवाज्या पलिकड़े कोणाच्यातरी जोरजोरात चालण्याचा पावलांचा आवाज ऐकू यायचा, कोणितरी दबक्या आवाजात हसल्याचा,विव्हळण्याचा -रडण्याचा स्वर ऐकू यायचा. त्या आवाजांनी सुजाता फार घाबरायची. मंदारला सुद्धा एकदोन वेळेस ती हिरव्या साडितली बाई दिसली होती. जी त्याला आपल्याकड़े बोलावत असायची. रात्री झोपताना त्याला त्याच्याच वयाचा एक मुलगा त्या कपाटात अंग चोरुन बसलेला दिसला होता. मंदारने जेव्हा मेघलताबाईंना हे सर्वकाही सांगितल तेव्हा -मात्र त्यांच्या संयम शक्तिचा अंत संपला. घरात येऊन महिना उलटला होता -आणि ह्या महिन्याभरात
दर दिवसाला काही ना काही अनाकलनीय भास-की आभा सत्य-असत्य घटना घडल्या होत्या. मेघलतबाईंना तर आता ही जाणिव झालीच होती,ह्या बंगल्यात काहीतरी मानवाच्य कल्पनाशक्ति बाहेरच दबा धरुन आहे! जे मानवी विचारांच्या आवाक्यात बसत नाही. हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाहीये, हे काहीतरी भलतच आहे! ह्यावर वेळीच उपचार केल नाही तर जिवावर बेतणार हे नक्कीच. मेघलताबाई एक आई होत्या आपल्या लेकरांना काही झाल तरी? हा विचारच त्यांचा जिवखात होता.
शेवटी त्यांनी ही सर्वबाब जनार्दनरावांच्या कानी घातली.दिवसभर शाळेत असल्याने ,मग कामावरुन आल्यावर जेवन करुन ते झोपून जायचे! त्यामुळेच जनार्दनरावांना तसला काही भलताच अनुभव अद्याप आला नव्हता. पन आपल्या पत्नी ,मुलांनी इतक्या सिरियसपणे ही बाब त्यांना सांगितली होती. की त्यांना सुद्धा विश्वास ठेवावंच लागल.
"ठिक आहे !मी दुसरीकड़े जागा शोधे पर्यंत काही दिवस आपण इथे राहुयात !" जनार्दनराव म्हंणाले.
त्यांच्या ह्या निर्णयावर मेघलताबाई, सुजाता ,मंदार सर्वांना खुप आनंद झाला. ह्या घरातुन कधी एकदाच बाहेर पडतो असं त्यांना झालं होत.
त्याच रात्री जेवन करुन सर्वजन झोपायला निघुन गेले .
रात्रीचे साडे अकरा वाजले होते. ब्ंगल्यातला पाहिलामजला -हॉल,किचन सर्वकाही निशांत पडल होत. दुस-या मजल्यावरचा जिना
कोरिडॉर अंधाराने गिळली होती. रातकिड्यांची किर्रकिर्र बाहेरुन ऐकू येत होती. वरच्या मजल्यावरच्या खोलीत सुजाता आपल्या बैडवर अंगावर चादर ओढून झोपली होती. तर बाजुच्या बैडवर टेबल लैम्पच्या उजेडात मंदार आपला शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करत बसला होता.
खुप रात्र झाली हे पाहून त्याने वही-पुस्तक पेन ,सर्वकाही दफ्तरात भरल
आणि झोपायची तैयारी करु लागला. बारा वर्षाचा मंदार एकटाच ह्या घडीला जागा होता. बंगल्यात घडणा-या विचित्र घटना पाहता हे मुळीच चांगल नव्हत. मंदारने दफ्तर बाजुला ठेवून-बैडवर अंग टाकल. बाहेर थंडी पहुडली होती. म्हंणुन त्याने चादर अंगावर घ्यायला खाली हात वाढवला इतक्यात .
" गुर्र्गुर्र..गुर्र्र!" कसलातरी विचित्र आवाज मंदारच्या कानी ऐकू आला. जस की कोणीतरी रागाने गुरगुरतय. लहानग्या मंदारच्या कानांनी तो आवाज टिपला. डाव्याबाजूने सुजाताताईच्या बैडच्या दिशेने तो गुरगुरता आवाज ऐकू येत होता. पांढरी चादर डोक्यावर पांघरुण सुजाता झोपली होती. ( त्या पांढ-या चादरीमूळे एक प्रेत झाक्ल्यासारख वाटत होत)
एका लइत तो गुरगुरण्यासारखा आवाज येतच होता. तेवढ्यात टेबल लैम्पचा प्रकाश कमी जास्त होत चरचरु लागला. अमानविय शक्तिंच्या आस्तित्वातपाशी विद्युत उपकरणांना गती प्राप्त होत नसते असं म्हंटल जात! तसंच काहीस तिथे उपस्थित नव्हत ना? बंगल्यात घडणा-या विचित्र घटनांना पाहता, तर ते खरच होत.
"त..त....ताई !" काफ-या आवाजात मंदारने आपल्या ताईला हाक दिली. त्या पांढ-या चादरीखालूनच सुजाताची मान कट आवाज करत मंदारच्या दिशेने वळली - लहानग्या मंदारची पाचावरधारण बसली-
छातीत कळ उठली.
"त..त..ताई..? उठ ना? ह्या लाईटला बघ ना काय होतंय? "
मंदारचा काफरा आवाज पुन्हा निघला . पांढ-या चादरीत झोपलेल्या सुजाताच शरीर कमरेइतक वेगान उठुन उभ राहील. ते दृष्य पाहून मंदारच्या छातित श्वास अडकला . ही कसली आपली ताई? हे काहीतरी भलतच आहे , हे समजण्या इतपत मंदार नक्कीच हुशार होता. दबक्या पावलाने तो बैडवरुन उतरला -दरवाजा उघडून बाहेर ल आला. अंधा-या जिन्याने धावत जीव मुठीत घेऊन त्याने आपल्या आई-वडिलांची खोली गाठली
" आई-बाबा! आई -बाबऽऽऽऽऽऽ" दोनतीन हाक , दारावरच्या थापांनी
लागलीच दरवाजा उघडला गेला.मंदारला असा भ्यायलेला पाहून त्या दोन्ही मायबापांच काळिज धडधडू लागल.
" काय रे काय झाल ? " जनार्दनरावांनी त्याला कवेत घेत विचारल.
" ब..ब..बाबा !ती..ती..ताई कशीतरीच वागतीये , तूम्ही बघा ना जरा ! "
मंदारने कसतरी आपल्या आई -वडिलांना हे वाक्य बोलून दाखवल.
मेघलताबाई-जनार्दनराव जिन्याच्या दिशेने धावले ,धाडधाड पाय-या चढ़त दुस-या मजल्यावर पोहचले. खोलीचा दरवाजा उघडाच होता.जनार्दनराव-मेघलताबाई दरवाज्यातून आत आल्या. समोर पाहतात तर काय? बैडवर कोणीच नव्हत.जनार्दनरावांनी पुर्णत खोली तपासली,बैडखाली सुद्धा पाहिल ! पन सुजाता कोठेच नव्हती.
"अहो कुठे गेली माझी सुजाता? हे पहा माझ्या मुलीला काही झालं ना तर बघाच तूम्ही! म्हंणत होते ना मी हा बंगला चांगला नाही म्हणून ."मेघलताबाई हळकेच मुसमुसत रडू लागल्या. जनार्दनरावांना सुद्धा आता भिती वाटु लागली होती.इतक्या रात्री बारावाजता मुलगी गेली तर गेली कुठे? तेवढ्यात पुन्हा गुरगुरण्याचा आवाज आला.जनार्दनराव -मेघलताबाई दोघांनी एकमेकांच्याचेह-याकड़े पाहिल.
" अहो कपाटातुन आवाज येतोय." मेघलताबाई म्हंणाल्या. जनार्दनरावांनी कपाट उघडायला हात वाढवले पण कपाट बंद होत.अशक्य कोटीतली गोष्ट! कपाट बंद आहे तर सुजाता आतघुसली कशी? आणि बाहेरुन कपाट बंद कस झाल? मंदार तर आधीच भ्यायला आहे? तो सुद्धा सुजाताला कपाटात बंद करण्याच वात्रटपणा करणार नाही!
" जा चावी घेऊन ये ?" जनार्दनराव म्हंणाले. मेघलरताबाईंनी खाली जाउन चावी आणली व येताना देवघरातुन साईनाथांचा फ़ोटो सोबत आणला. मनाला एकप्रकारे खात्रीच झाली होती ! की हे प्रकरण भलत्याच दिशेला चाललं आहे.
" ही घ्या चावी !" मेघलताबाई म्हंणाल्या. जनार्दनरावांनी चावी घेऊन कपाटाला लावली, दार उघड़ण्यासाठी कपाटाच्या झापा खेचल्या-परंतु दरवाजा उघडला नाही.
" ए हरामखोर !" त्या बंद कपाटातुन एक घोगरा,खर्जातला आवाज ऐकू आला. त्या आवाजाने जनार्दनराव-मेघलताबाई दोघांची पाचावर.धारण बसली.
" कपाटाला हात लावू नको रां××या! तुझी पोर पाहिजे असेल तर त्या भवानीला आधी तो फोटो बाहेर काढाला सांग? "जनार्दनरावांनी थथरत्या नजरेने मेघलताबाईंकड़े पाहील, खरच मेघलताबाईंनी छातीशी साईबाबांची तसबीर धरुन ठेवली होती. पन हे आतल्या सुजाताला कस कळल ? तीचा कोमळ स्त्रीमय आवाज असा पुरूषी का भासत होता.
नक्की त्या कपाटात काय दडल होत?
"बर ठेवतो आम्ही !"मेघलताबाईंनी इच्छेविरूद्ध तो साईबाबाचा फोटो खोलीतल्या दरवाजा बाहेर ठेवला. त्या मलिन अपवित्र वस्तुच्या संपर्कात आलेली ती पवित्र दैवी तस्बीर बाहेर जाताच-कपाटाच दार धाडदीशी उघडल.
"हिहिहिहिही,ह्ह्ह्ह्ह्,हिहिहिजी!" भयाण घोग-या हास्यचा आवाजा आला.कपाटातल्या फळीवर दोन पायांवर माकडासारख सुजाता बसली होती. डोक्यावरचे सुटलेले केस चेहरा झाकत होते. तोंडातुन विचित्र गुरगुरण्याचा आवाज येत होता.एक उडी घेत सुजाताने कपाटातुन थेट बैडवर उडी घेतली. तसे लाईटच्या उजेडात तीचा चेहरा दिसला.
चेह-याची कातडी जराशी घट्ट झाली होती, गालांवरचा मांस खाली गेला होता-डोळ्यांतली बुभळे खोल गेलेली, जराशी पांढरट दिसत होती.
त्या आई-वडिलांना कळून चुकलं होतं.ही आपली लेक नाही! हे काहीतरी भलतच हिडिस,पाश्वी,बाह्य सृष्टीतल तिच्या देहात घुसल आहे.तिला पछाडल.-झपाटल आहे.
"हिहिहिही,खिखिखिखी !हा ब्ंगला सोडून जाताय ? जा तूम्ही पन ही तुझी पोर मात्र मला राहूदे!" सुजाताच्या आतल ध्यान बोल्ल.
त्या ध्यानाचा घोगरा खर्जातला आवाज त्या दोघांच्य काळजाच पाणी पाणी करत होता.
" सुजाता बाळा तुला बर वाटत नाहीये का? काय होतंय!"
जनार्दनराव म्हंणाले.
ए गप्प,थेरड्या! मी तुझी लेक नाही ! आणि हा बंगला माझा आहे!
तूम्ही इथे रहायला कुणाच्या परवानगीने आलात ! हं? मा××××त !
चल निघुन इथून!" त्या ध्यानाने दम दिल.ह्या दोघांकड़े ऐकण्यावाचुन दुसरा मार्ग नव्हता. ना ते कोणी साधू संत होते की मंत्र फुकून आपल्या लेकीला वाचवतील? ही तर साधारनशी सामान्य दैनंदिन जीवन जगणार माणस होती- त्या सर्वांच्या आवाक्या पल्याडच हे कार्य होत.
पन त्याच सामान्य मानवाकड़े श्रद्धा होती देवावरची भक्ति होती ! मानव संकटकाळी नेहमीच प्रथम देवाचा धावा करतो ! आणि तो विधाता लागलीच आपल्या भक्तासाठी धावुन येतो. समोर घडणा-या विचित्र घटनेने त्या दोन्ही मायबापांच काळिज लेकीच्या काळजीने भरुन आल होत. काहीतरी दैविक चमत्कार घडावा अशी मेघलताबाई मनोमन प्रार्थना करत होत्या. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे ते ध्यान सुजाताच्या देहात शिरल्याने आनंद व्यक्त करत होत. त्या जणु वाटल आपल हेतू साध्य झालं आहे. आता आपल्याला कोण अडवणार.
"आईऽऽऽऽ!" खोलीच्या चौकटीत उभ्या मंदारने हाक दिली. त्याच्या हातात तो साईबाबांचा फोटो होता.ज्यावर सुजाताला झपाटलेल्या त्या ध्यानाची नजर पडली. तस ते घसाफाडुन चित्कारल.
" आऽऽऽऽऽऽऽऽ!" घाबरत बैडवरुन हातपाय घासत मागे जाऊन भिंतीला चिकटल.
" ए कारट्या तो फोटो फेकून दे ! फेक,फेक,फेक तो फोटो!"
दोन जिवंत मानवी देहांना न घाबरता ते ध्यान -त्या साधारणश्या काचेत असलेल्या कागदावरच्या त्या चित्राला घाबरत होत. काय विलक्षण ताकद होती त्या चित्रात? देवाच्या आस्तित्वाचा,निसीम भक्तीचा हा एक
पुरावा होता का? घसाफाटेस्तोवर सुजाता ओरडत होती. तिच्या आवाजाने तो बंगला दुमदूमून उठत होता. आजूबाजूला लोक वस्ती नव्हती म्हंणुन की काय नाहीतर लोक ऊठून घरात आली असतील.
"बाबा ताईला पकडा! आपण हा साईबाबांचा फोटो ताईच्या कपाळावर लावु." जनार्दनरावांनी कसतरी दोन्ही हातांनी सुजाताला घट्ट पकडून धरल-परंतु ती काहीकेल्या त्यांना ऐकत नव्हती.
" ए जवळ येऊ नको, ए कार्ट्या ,ए कार्ट्या !हट्ट!"सुजाताच्या तोंडून ते दलभद्री मोठ्याने केकाटत होत , हातपाय झाडत मंदारला पुढे येण्यापासून थांबवत होत. पण वेळीच मेघलताबाईंनी मंदारच्या हातुन साईनाथांची तसबीर घेतली आणि तीच पुढच काचेच भाग सुजाताच्या कपाळावर टेकवल . सह्स्त्र हजार दैविक शक्तिच्या धुळीकणांची शक्ति जणु त्या साईबाबांच्या तसबीरीतुन बाहेर पडली - तड,तड आवाज करत तसबीरीची काच फुटली , दैविक शक्तिचा अंधा-या शक्तिशी जणु युद्ध सुरु झाल होत . सुजाताच पुर्णत देह करंट बसल्यासारख तड़फडू लागल. हातापायांची विचित्र हालचाल होऊ लागली.
" आऽऽऽऽऽऽऽ!" शेवटच्याक्षणाला एक किंकाळी अगदी मोठ्याने तिच्या मुखातुन बाहेर पडली व समंध शरीर शांत झाल.
ते ध्यान सुजाताच्या देहातुन बाहेर पडल होत.
..

कथेचा...अंत

दुस-याच दिवशी जनार्दनरावांनी तो बंगला सोडला. काही दिवसांनी त्याच बंगल्याबाबत एक गोष्ट त्यांना समजली.
त्या बंगल्याचे मालक पैश्या वाले असून नास्तिक होते देवांवर विश्वास नव्हता. एकेदिवशी बंगल्यातकाही चोर घुसले- पैसा,दागीने, चोरुन शेवटी चोरांनी त्या बंगल्याच्या मालकाच,त्याच्या बायको, आणि मुलाचा झोपेतच गळा चिरुन खून केला होता. आणि तिन्ही प्रेत वरच्या मजल्यावर जिथे सुजाता राहत होति त्याच खोलीत कपाटात कोंबून ठेवली होती.
मानवाच्या मृत्यु नंतर आत्माही अमर असते! मरणौत्तर मानवाच्या काही इच्छा आकांशा मागे राहिल्या असतील तर आत्मा मुक्त होत नाही !! मफम जस काळाचे चक्र फिरतात तीच आत्मा पिशाच्छ योनित परावर्तित होऊन भटकते.मग तूम्ही तेरावा करा किंवा चौदावा मुक्ती असंभव आहे. म्हंणुनच मृत मानवाची इच्छा मरणाअगोदर पुर्ण करावी आणि मृताची आवडती कोणतीही वस्तु त्याने दिल्या शिवाय आपल्या समवेत ठेवू नये ती जलांत अर्पन करावी..

समाप्त# :

सदर कथेवर औडिओ,व्हिडिओ- इत्यादी उपक्रम राबवायचे असतील तर लेखकाशी चर्चा करावी-अन्यथा ऑनलाइन कारवाई केली जाईल.
🙏🏼😌...
(all rights reserved by..जयेश झोमटे......(जेय)
...