१ तास भुताचा - भाग 25 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 25

चेटकीन....

सन: 1901

आकाशात काळसर ढगां आडून , गोलसर चंद्रखाली पृथ्वीकडे पाहत होता. त्या अवाढव्य झाडाच्या काळसर आकृतीची छाया त्या तपकिरी मातिवर पडली होती. त्या झाडाचा जाडजुड खोड अंधारात बुडाला होता जस एक पायघोल कपडे घातलेला सैतान जणु उभा भासत होता. रातकिड्यांची किरकिर वाजत होती. थंडीचा महिना असल्याने गारठा व धुक पसरल होत. त्या बारीकश्या झोपडी भोवती गावातली काही सात आठ मांणस उभी होती प्रत्येकाच्या अंगावर एक हाफ सदरा, पांढरट धोतर होत. त्या झोपडीतुन बायकांच्या रडण्याचा शोकहिंत आवाज येत होता. जणु सुतक लागल होत घराला.
त्या झोपडीच्या दरवाज्यातुन पुढे बारा फुट लांबीच्या हॉलमध्ये, शेणाने सारवलेल्या भुवईवर एका पांढरट चादरीवर, शंभर वर्ष जगलेल्या नथुबाई म्हातारीच प्रेत -मईत झोपवल होत. मयताच्या पिंजारलेल्या सफेद केसाच्या डोक्यामागे एक टिवळी पेटत ठेवली होती- त्या टिवळीतल्या तेलावर खरपूस लालसर रंगाची , वाकडी तिकडी ज्योत हळत होती. म्हातारीच्या मयतावर पायांपासुन ते गळ्यापर्यंत सफेद कापड टाकल होत. त्याच कापडातुन तीच्या पायाचे अंगठे बाहे आले होते:-त्या अंगठ्यांना काळसर रंगाचा दौरा बांधला होता.मयताच्या सुरकुतलेल्या गालांना हाड मांस, चिकटलेला दिसत होत. डोळे अगदी खोल गेले होते.कानातल्या टोचल्या जाणा-या लहानसर छिद्रांच्यात बारीकश्या अगरबत्तीच्या काड्या अडकवल्या होत्या. कपाळावर चार चांदण्यांच हिरव गोंदवण भडकपणे रखाटल होत. त्याच कपाळावर एक गोळसर लाल रक्ताचा टिळा- लावला होता. सुरकुतलेल्या चेह-यावरची चामडी पांढरीफट्ट पडली होती. डोळ्यांच्या जागी गोळसर काळी वर्तुळे उमटली होती- काहीवेळापुर्वी उमटली नव्हती,काहीवेळाने उमटली होती. जणु त्या मयतात काही बदल होत होत. म्हातारीच्या मयताच्या डाव्या -उज्वया , बाजुला दोन्ही तर्फे काळसर साड्या -मैचिंग घातलेल्या गो-या चिट्टया कमनीय बांध्याच्या छोक-या डोक्यावरून हिजाब ओढल्यासारख्या रडत होत्या. डोक्यावरुन काळसर पदर घेऊन रडणा-या त्या छोक-यांच्या हातांची बोट जणू चंद्राच्या सफेद प्रकाशासारखी चमकुन उठत होती, पन त्याच हातांची नख मात्र महिनाभर वाढवल्यासारखी मोठी आणि विषासारखी काळसर पडली होती. त्या दहा फुट खोलीत बारा काळ्या साडया घातलेल्या बायका रडत होत्या. त्यांच्या मुसमुसण्यांचा तो आवाज खोलीत घुमत होता.आणि मधोमध पेटलेल्या त्या टिवळीच्या प्रकाशात ते प्रेत झोपल होत. बाहेरुन रातकिड्यांची किर्रकीर्र आणि कुत्र्यांचा भेसुर रडण्याचा आवाज येत होता. त्या झोपडीच्या आजुबाजुला साठ सत्तर मीटर अंतरापर्यंत वस्ती नव्हती, पन थोड पुढे गाव होत-ह्याचा अर्थ ती झोपडीच गावातून बाहेर होती. झोपडीच्या बाहेर अंगणात -साठ आठ मांणस उभी होती. त्यातल्याच काहिंचा हा संवाद.
" काय र मेली म्हातारी !" पहिला माणुस.
" व्हय रे ! शंभर पेक्षा जास्त जगली असल बघ! तोंडाला मांस चिकटलय समध" दुसरा माणुस.
" अर म्या तर ऐकुन हाई की चेटकीण जात हाय म्हातारीची, तोंड बघीतल ना कस पांढरफटूक पडलंय, अस वाटतय - जिती व्हील का काय वापीस ." पाहिला माणुस.
" अर चेटकीण हाई ते खरंच ये रे! पन जिती व्हील का काय माहीत नाय ! पन मयताभोवताली ज्या गो-या चिट्टया पोरी बसल्यात न त्या पन चेटकीणीच हाईत ना व्ह.!" दुसरा माणुस.
"हा म्या पाहिल्या ना ! माल हाईत एक एक , भरलेली हाईत संमध्या-एक भेटली तर रात्रीच काम व्होइल."त्या मांणसाने कसतरीच ओठांवरुन जिभ फिरवली व हसला.
"ए बाबा काय बी नक बोलू फाडून खातील त्या !"
त्या दोघांच्या चर्चासूरु असतांना. एक घोड्याच्या पावलांचा आवाज येऊ लागला. अंधा-या रात्रीत,काळ्या रंगाचा तो घोडा आणि घोड्यावर बसलेला तो पायघोळ वस्त्र परिधान केलेला माणुस. ज्याच्या पायांपासुन ते डोक्यापर्यंत एक काल वस्त्र होत. त्याच्या एका हातात एक पातळसर साडेचार फुट लांबीची धारधार कू-हाड होती. त्याच्या येण्याने अंधार जणु गडद झाला होता. तबडक तबडक आवाज करत तो घोडा झोपडी जवळ आला.घोड्यावरुन ती साडेसहा फुट दैत्यासारखी आकृती कू-हाड घेऊन खाली उतरली. तो काळसर रंगाचा घोडा झोपडीपासुन दुर जाऊन उभा राहिला. तसे त्या दैत्याने अंगणात उभ्या मांणसांकडे पाहिल.
" त्यांना काही करु नकोस!" एक किन्नरी स्वरातला आवाज. त्या झोपडीच्या मुख्य द्वाराच्या चौकटीत एक काळसर साडी घातलेला किन्नर आला.
" माणस असली .तरी माझ्या आईच्या वळखीतली हाईत ती! "त्या काळसर साडीतल्या किन्नर तृतीयपंथी अक्काच्या वाक्यावर त्या दैत्याच्या तोंडून श्वास घेतल्याचे व सोडल्याचे आवाज फ़क्त येत होते.
" हा....हा....हा..." त्याच्या हातातल्या कू-हाडीवरुन बाहेर आलेल्या हाताची प्रेताड चामडी दिसत होती. कोण म्हंणेल हा जिवंत आहे?
" ए बाबांनो !" अक्काचा नेहमीच स्वर." अपली नथुअक्का वारली हाये , आण तूम्ही सर्व जे तिच्या मयताला जमलां,त्यावरुन अक्कावरच पीरिम मला दिसतंय "बोलतांना अक्काच्या डोळ्यांतुन टचकन अश्रु बाहेर आल.
"तूम्ही सर्व आता घरला जा ! आता नथुअक्काच्या मयताची पुढची क्रिया मांणसांच्या उपस्थितीत व्हऊ शकत नाय!" अक्काने अस म्हंणतच दोन्ही हातांची टाळी वाजवली.
"बर अक्का येतो म आम्ही!" त्या सर्वांनी अक्काला हात जोडले व एक एक करत खाली मान घालून शोकव्यक्त करत निघुन गेले.
अंधा-या रात्री काव-काव करत एक दलभद्री कावळा पंख फडफडवत उडत आला, व त्या झोपडीच्या दारातुन आत शिरला. मयताच्या डोक्यामागे जलणा-या टिवळी बाजुला येऊन दोन पायांवर येऊन उभ राहिला.
"काव,काव,क्यांव,क्यांव!" अस ओरडू लागला.
"ए नथे, ए नथे उठ!" त्या कावळ्याच्या चोचीची हालचाल झाली तो भसाडा आवाज त्या कावळ्याच्या तोंडून बाहेर पडला. आजूबाजूला बसलेल्या बायका रड़ायच्या थांबल्या होत्या. बाहेरची कुत्री केकाटत होती.
" व्हऊ,व्हाऊ, व्हाऊ, व्हाव, व्हाव!" तो विचित्र ह्दयात धडकी भरवणारा आवाज.
"ए नथे , ए नथे - ऊठ!" पुन्हा एकदा त्या कावळ्याने साद घातली.तसा त्या मयताच्या चेह-यावर बारीकशी हालचाल झाली. डोळ्यांची बुभळ बंद पापण्यांआड हळली गेली. नाकातुन एक मोठा श्वास घेत त्या प्रेताने सोडला.कानांच्या पाकळ्या हळल्या.
"म्ह्म्ह, हहहहह्हा" नाकातुन श्वास सोडत खाडकन नथुअक्काच्या प्रेताने आपले नागासारखे डोळे उघडले.
" हिहिहिहिहिहीह, ए नथे, ए नथे "तो कावळा ओरडला हसला तेवढ्यात त्या कावळ्याला त्या नथुअक्काच्या वाढलेल्या नखांच्या हाताने पकडल.
" ए नथे,ए नथे सोड मला! ए थेरडे सोड रांऽऽऽचे, मला मला खावु नको, नको खावु नाहीतर मरशाल.."
" चबक, कट,कट "असा आवाज झाला,त्या कावळ्याच डोक नथु अक्काने कच्च चावत तोडल होत.ते डोक कच्च खातांना तिच्याकाळसर दातांच्या तोंडात लालसर, रक्त व कावळ्याचे डोळे मेंदू घाण वास सुटला होता.
अक्काने बाजुला उभ राहूनच नकारार्थी मान हळवली.
" कालदृष्टी !" तीने दरवाज्यात उभ्या त्या दैत्याला हाक दिली.
" हे प्रेत वाईट हाई! हिला माराव लागल.नाहीतर ही अवदसा सुर्या उगवायच्या अगूदर संमध्याना गिळून टाकिल." कालद्रुष्टीने फ़क्त मान हळवली, त्याचा चेहरा दिसत नव्हता. पन अक्काला त्याच्या डोक्यावरच्या कापडाची हालचाल होतांना दिसली. कालदृष्टीच्यदेहातुन थंड वाफ बाहेर येताना जाणवत होती.
काहीवेळाने:
" ए सोड, सोड मला ! " नथुअक्काच्या प्रेताला कालदृष्टी दैत्य एका साखळी दंडाने बांधत होत. त्या कालदृष्टीने त्या प्रेताच्या संपूर्णत देहावर
साखळ दंडाने विळखा घातला. व त्याला खेचत खेचत बाहेर आणल.
कालदृष्टीने पुन्हा एकदा घोड्यावर बस्तान मांडल. अक्काने आपल्या हातात एक पेटती मशाल घेतली ! व दुस-या बाजूने एक स्त्री गळ्यात
पेटा-यावाल्याकडे असतो तसं वाद्य घेतल, व तो भयान पाश्वर्य संगीत (व्हू,व्हू,व्हू,व्हू,) असा वाजवत नथुअक्काच्या प्रेताची अंधा-या रात्री अंतयात्रा निघाली.
साखळ दंड हातात धरुन त्या प्रेताला कालद्रुष्टी आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. अक्का त्याला मशाळीच्या उजेडात वाट दाखवू लागली
व ती दूसरी स्त्री, पेटा-यावाला नाचतो तो स्वर त्या वाद्यातुन उत्पन्न करत होती.
"व्हूऊ,व्हूऊ, बु,बू,बू,बू,बू, "

एक जक्खड मानवी देहात वावरणा-या चेटकीणीच निधन झाल्यावर तिची अंतयात्रा अशी निघते. ( काल्पनिक कथा)

समाप्त: