Chandrayaan books and stories free download online pdf in Marathi

चांद्रयान

चांद्रयान विषयी मनोगत 

           चांद्रयान ही माझी ८१ वी पुस्तक असून ५३ वी कादंबरी आहे. या कादंबरीविषयी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. या कादंबरीतील पात्र म्हणजे एक सुजीत नावाचा मुलगा. मुलाचा जन्म आदिवासी भागात. त्याच्या वडीलानं आत्महत्या केली होती सुक्या दुष्काळामुळं आणि त्याच काळात चांद्रयान मोहीम राबविण्यात आली होती देशात. 
          मुळात चांद्रयान मोहीम एक यशस्वी मोहीम होती. देशाला महाशक्ती बनविणारी मोहीम होती. परंतु सुजीत नावाचं पात्र विचार करीत होतं की ह्या चांद्रयान प्रकल्पाला पैसा लावण्यापेक्षा जर त्याच पैशाचा वापर शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केला तर.........तसेच देशातील इतर तमाम समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर केला तर........तसा विचार करीत असतांना त्यानं पावले उचलली. त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी. परंतु खरंच त्या प्रयत्नात तो यशस्वी झाला का की त्याला त्यानं पुढं टाकलेली पावलं मागं करावी लागली. हेच दाखविणारी माझी ही कादंबरी आहे. आपण वाचावी व मनमुराद आनंद घ्यावा. तशीच ही कादंबरी आपल्याला कशी वाटली तेही सांगावे ही विनंती. 
                         
                                  आपला नम्र 
                  अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०



चांद्रयान (कादंबरी)
                  अंकुश शिंगाडे 

          सुजीत आज मोठा झाला होता. तो नेता बनला होता. त्याच्याच नेतृत्वात रस्ते बांधकाम पार पडलं होतं. गावात आता नदीवर पूलही बनला होता. गावात शिक्षणाच्या सोई झाल्या होत्या. तसंच आता देशात सर्व प्रकारचं शिक्षण निःशुल्क झालं होतं. गावातून आता कित्येक शास्रज्ञ बनत होते. कलावंतही निघत होते. गावात राबविलेल्या सर्व योजना यशस्वी ठरल्या होत्या. तसंच गावच नाहीतर आता शहरंही उजळून निघालं होतं व आता देशच नाही तर जगही देशाचे नाव घेत होते. त्याचबरोबर सुजीतचंही नाव घेत होते. कारण सुजीत आता देशाचे नेतृत्व करीत होता. 
             सुजीतला त्याचं आता बालपण आठवत होतं. बालपणात भोगलेल्या यातना आठवत होत्या. तसं पाहता बालपणातच झालेली त्याची शिक्षणाची आबाळ आठवत होती. ते शिक्षण त्याला शिकता येत नव्हतं. त्याला पावसाळा आठवत होता व पावसाळ्यात पडलेल्या दुष्काळानं त्याचा आत्महत्या केलेला बापही आठवत होता आणि आठवत होता तो घोषीत झालेला आत्महत्याग्रस्त गाव.  ज्या गावात त्या दुष्काळग्रस्त वर्षात सात आत्महत्या झाल्या होत्या. तसंच आठवत होतं ते चांद्रयान. जे माणसानं आपला देश महाशक्तीचा आहे म्हणून इतर देशाला दाखविण्यासाठी पाठवलं होतं. ज्या चांद्रयान मिशनचा परिणाम म्हणून गोविंदपूरला सुका दुष्काळ पडला होता. तर नागपुरात ओला दुष्काळ. अनेकांचे त्या ओल्या दुष्काळानं संसार उध्वस्त झाले होते. तसं पाहता नागपूर शहर असल्यानं व पैसे जास्त असल्यानं त्यांनी ओल्या दुष्काळाची कळ शोषली. परंतु गोविंदपूर........जे आदिवासी गाव होतं. त्याचे तर बाराच वाजले होते. 
            पाऊस येतो. कधी कमी येतो. तर कधी जास्त प्रमाणात येतो. कधी रौद्र रुप दाखवतो तर कधी सौम्य प्रमाणात येतो. कधी कधी तर येतच नाही. असाच पाऊस गोविंदपूरला न आल्यानं दुष्काळानं सात आत्महत्या घडल्या आणि असाच पाऊस दोन दिवसापुर्वी नागपूर शहरात आला होता व त्या पावसानं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यातच अनेकांची दुकानं बुडाली होती. त्या दुकानातील माल  बुडाला होता व अनन्वीत नुकसान झालं होतं. 
           नुकसान पाहता प्रशासनानं संयम दाखवून सहानुभूती मिळविण्यासाठी काहींना मदत केली. काही दुकानदारांना आश्वासन दिलं की ते पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देणार. परंतु लोभ एवढा की त्या दुकानदारांनी म्हटलं होतं. पन्नास हजारांनी काय होतं?
          नुकसान.......तसं पाहता दुकानदार वा लोकांनी नुकसानभरपाई सरकार वा प्रशासनाला मागूच नये. कारण पाऊस येणं वा आणणं हे प्रशासनाचं काम नाही वा त्याला आणणं हा बदल मानवनिर्मित नाही की प्रशासनाचा दोष दिसून येईल. तो दोष निसर्गाचा आहे. मग त्याच्या रौद्र रुप धारण केल्यानं जर नुकसान होत असेल तर त्याची नुकसानभरपाई प्रशासन वा सरकारनं का बरं करावी? तरीही प्रशासनाकडून एक सहानुभूती म्हणून जी काही मदत झाली. त्याचा स्विकार लोकांनी करायला हवा होता. उलट सुलट उत्तरे द्यायला नको होती व म्हणायला नको होतं की पन्नास हजारानं काय होणार. आणखी जास्त पाहिजे. 
           आपला भारत देश. सुजलाम सुफलाम आहे आपला भारत देश. हा देश वैविध्य अशा विविधतेने नटलेला आहे. इथं मोठमोठे डोंगर आहेत. मैदानी प्रदेश आहेत. पर्वतरांगेच्या शृंखला आहेत. मोठमोठ्या नद्या आहेत. एवढंच नाही तर काही भागात पिकपाणीही बरोबर पिकतं. त्यातच देश स्वावलंबी आहे व कुणासमोर भीक मागत नाही. तसेच या देशातील लोकं सहनशील आहेत. ते एवढे सहनशील आहेत की उन, वारा पाऊस आधीपासूनच सहन करतात. असे असतांना दोन दिवसापूर्वी पाऊस आला. त्यात नुकसान झालं. त्यात ना प्रशासनाचा दोष ना कोणत्या माणसाचा. तरीही प्रशासनाला दोषी धरुन मदत मागितली असली तरी खरा दोष हा निसर्गाचा आहे व त्याचबरोबर दोष आहे माणसांचा की माणसानं आपली घरे सुरक्षीत अशा ठिकाणी का बांधली नाहीत किंवा आपलं सामान सुरक्षीत अशा ठिकाणी का ठेवलं नाही? हा प्रश्न आहे. तरीही ही मदत देणे याचा अर्थ एखाद्या विवाहीत दांपत्यानं आपला संसार सुखाचा सुरु करावा म्हणून तिला जी मदत केली जाते, ती देणे होय. त्यात अशी मदत देत असतांना जास्त लोभ करायला नको आणि मदत मागायचीच असेल तर ती निसर्गाला मागावी. म्हणावं की बाबारे,  तू असं रौद्ररूप दाखवीत जावू नकोस. आम्हाला त्रास होतोय. परंतु यावर निसर्ग तरी ऐकणार आहे का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. आता यात कोणी अंधश्रद्धाही आणतात. म्हणतात की मागील महिन्यात याच तेवीस तारखेला चांद्रयान चंद्रावर पोहोचला आणि आज त्याच तारखेला म्हणजेच तेवीस सप्टेंबरला पावसानं आपलं रौद्ररूप दाखवलं. कदाचीत ते बरोबरही असू शकतं. कारण निसर्ग अशी एक शक्ती आहे की ज्या शक्तीसमोर माणसाची हार होते. चंद्र, सुर्य, आकाशगंगा, आकाश, ग्रहतारे, झाड, पर्वत, जमीन, प्राणी आणि पाऊसपाणीही. हे निसर्गातील घटक. या घटकांशी छेड काढणं कदाचीत निसर्गालाही आवडत नसेलच. झाडं तोडल्यानं पाऊस येत नाही. जमीनीवर सिमेंटीकरण केल्यानं त्या भागात पाऊस येत नाही. पर्वत पोखरल्यानं वा पर्वताची छेड काढल्यानं भुस्खलन होतं. जमीनीला पाण्यासाठी कुपनलिका वा विहिरीचे गड्डे केल्यानं भुकंप होतो. तसाच जमिनीखालून कोळसा काढत असतांना तो कोळसा काढल्यानंतर जी पोकळी तयार होते. ती कोसळून पर्वतरांग अर्थात घडीचे पर्वत तयार होतात. याचाच अर्थ असा की जर या निसर्गाला एक मानव संबोधलं गेलं आणि त्याला गड्डे करुन वा सिमेंटीकरण करुन त्याच्या शरीराला गुदगुल्या करणं वा त्याची छेड काढणं याला जर आपण आपलं सौंदर्य मानत असलो तर ते निसर्गाला खपेलच असं नाही. अशातच ते न खपल्यानं निसर्ग आपलं रौद्ररूप दाखवणारच. जसं चांद्रयान चंद्रावर तेवीस तारखेला भारतानं पाठवला म्हणजेच निसर्गाचा घटक असलेल्या चंद्राची छेड काढली हे काही निसर्गाला खपले नसावे. म्हणूनच तब्बल एक महिण्यानंतर म्हणजेच तेवीसच तारखेला त्या निसर्गानं प्रायोगिक तत्त्वावर नागपूरात आपलं रौद्ररूप दाखवलं असावं व इशारा दिला असावा की जर तुम्ही आता सुधारले नाही तर मी संपुर्ण सृष्टीच नष्ट करणार. 
          माणसाला काय आहे. माणसे नवनवे शोध लावतात. कशासाठी? तर आपल्या सुखासाठी. जे निसर्गाला पसंत नाही. माणसानं आपली घरे बांधण्यासाठी कापलेलं लाकुडही निसर्गाला पसंत नाही. माणसानं पिण्यासाठी पाणी मिळवीत असतांना खोदलेली विहिरही निसर्गाला पसंत नाही. तसंच अलिकडील बाजारात आणलेला मोबाईलही निसर्गाला मंजूर नाही. त्याला वाटते की मी सृष्टी जन्मास घातली ना. मग मीच त्यांचं पालनपोषण आपल्या पद्धतीनं करणार आहे. तुमच्या पद्धतीनं नाही. तुम्ही त्यात हस्तक्षेप करु नये. परंतु माणूस त्यात हस्तक्षेप करीत असल्यानं कधी कधी निसर्ग असंच आपलं रौद्ररूप दाखवीत असतो व चेतावणी देत असतो की सावधान, तुम्ही माझ्या जन्मास घातलेल्या घटकांच्या वाट्याला जाल तर.......मी संपुर्ण संसारच मिटवून टाकेल. तरीही मानवजात त्याचं काही ऐकत नाही. त्यानं दगडालाही जीव फोडला आणि आता माणूसही जीवंत कसा करता येईल याचा शोध लावत आहे आणि हे जेव्हा घडेल व मेलेला माणूस जेव्हा जीवंत करण्याचं कसब माणसाला जेव्हा ज्ञात होईल. तेव्हा काही काळातच हा निसर्ग हिरवागार राहणार नाही तर ही सृष्टी पुर्णच नष्ट होईल. ना प्राणी जीवंत दिसणार. ना कोणते जीव, ना झाडं आणि ना इवलंसं रोपटंही. फक्त नि फक्त जीवंत राहिल येथील जमीन व त्या जमीनीवर असलेले दगडधोंडे, पर्वत, मैदान व पठारी प्रदेश आणि संपुर्ण पाणी पसरलेलं असणार पृथ्वीवर. तसंच आकाशात चंद्र, सुर्य असणारच. जसे आज दिसतात तसे. परंतु त्यांना छेडणारा वा गुदगुल्या करणारा मानव नसणारच. हे सत्य आहे. 
            नागपुरात महापूर आला होता व बऱ्याच लोकांना नुकसानभरपाई मिळाली होती व गंगेच्या धारेत जसे सर्वजण हात धुतात. तसा हात साऱ्यांनीच धुतला होता. तसं पाहता जे खरंच लाभार्थी होते, त्यातील बऱ्याच जणांना  नुकसानभरपाई मिळाली नव्हती व जे लाभार्थी नव्हते. त्यांना नुकसानभरपाई मिळाली होती. कारण त्यातील काहीजण राजकारण्यांचे कार्यकर्ते होते. काहीजणांनी सर्वेक्षकांशी भांडण केल्यामुळं त्यांचं नाव लाभार्थी यादीत आलं होतं. 
            नुकसानभरपाई....... कोणाला द्यावी? असा प्रश्न विचारल्यास नुकसानभरपाई ही त्या लोकांना द्यावी की जे खरंच लाभार्थी आहेत व ज्या घटकांमुळं नुकसान झालं, तो घटक त्यात बसतो काय? नुकसानभरपाई ही त्सुनामी, भुकंप, अवर्षण यांमुळं होणाऱ्या नुकसानांना द्यावी. महामारी वा महापूर या घटकांमुळं होणाऱ्या नुकसानांना नुकसानभरपाई देवू नये असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
            दि. तेवीस तारखेला नागपुरात नागनदीला महापूर आला व त्या महापुरानं जनजीवन विस्कळीत झालं. कुणाच्या घरात पाणी गेलं तर कुणाच्या दुकानात पाणी गेलं व प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर महापुरातून काही लोकंही मरुन गेले व सरकारनं त्यांना सरकारी मदत जाहीर केली. 
           सरकारी मदतीबाबत विचार केल्यास मागील काही वर्षात असाच नागनदीला पूर आला व त्या पुरात जे नागनदीच्या किनाऱ्यालगत राहात होते. त्यांना नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर केली. त्यानंतर त्या मदतीत असं आढळलं की ज्यांच्या घरात पाणी शिरलं नव्हतं. त्यांनाही मदत मिळाली होती व ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं. त्यांना मदत मिळाली नव्हती. त्याचं कारण होतं त्या परीवाराचं घरी नसणं. 
          आजच्या काळात आपलं घर चालवता यावं म्हणून पती पत्नी दोघंही कामाला जात असतात. अशावेळेस येणारे सर्वेक्षक हे दुपारी येत असतात. ते पंचनामा करीत असतात आणि पंचनाम्यात कोणालाही त्या घराबाबत न विचारता वा त्या घरकुलाचं नाव न लिहिता जे दिवसभर घरी राहतात. त्यांच्याच घराचं सर्वेक्षण करतात व बाकीच्या घरांना सोडून देतात. यामुळे ज्याला मदत मिळायची, त्याला मदत मिळत नाही व ज्याला खरोखरच मदतीची आवश्यकता नसते. त्याला मदत मिळते. दि. तेवीस तारखेला झालेल्या महापुराचा सर्व्हे नागपुरात करण्यात आला. त्यातही गत महापुरात जसा सर्व्हे करण्यात आला. तसाच सर्व्हे यावेळेसही केल्या गेला व जे हजर होते. त्यांची नावं लिहिण्यात आली व जे हजर नव्हते. त्यांची नावं लिहिण्यात आली नाहीत. त्यातच जो सर्व्हे झाला. तोही बरोबर केल्या गेला नाही. कारण ज्यांच्या घरात पाणीच शिरलं नाही व नुकसान झालं नाही. त्याचं नाव यादीत लिहिलं गेलं. कारण ते नाव लिहिण्यासाठी सर्वेक्षकाबरोबर काही लोकांनी भांडणं केली व सर्वेक्षकाला ते नाव लिहिण्यासाठी बाध्य करण्यात आलं. यात काही कार्यकर्त्यांनीही आपली नावे त्या यादीत शिरवली असेलच यात शंका नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास हा सर्व्हे नुकसानभरपाईच्या अनुषंगाने बरोबर झालाच नाही. 
            महापूर........ केवळ नागपूरच्या नागनदीतच नाही तर देशातील अनेक नद्यात येत असतो व त्या महापुरात ज्या लोकांचं नुकसान होत असतं. त्यांना सरकार नुकसानभरपाई देत असतं. ही नुकसानभरपाई जनतेच्या करस्वरुपात मिळणाऱ्या पैशातून पुर्ण होत असते. परंतु यात ज्याला खरंच मदतीची आवश्यकता असते. अशांना ती मदत मिळत नाही व भलत्याच माणसांना ती मदत मिळते व यात जनतेचाच कर स्वरुपात देशाच्या विकासासाठी दिला जाणारा पैसा खर्च होत असतो. असं बऱ्याच ठिकाणी होत असते. 
           नुकसानभरपाई का द्यावी सरकारनं. तसं पाहता पुरात नुकसान होणाऱ्यांना नुकसानभरपाई देवूच नये. कारण जनता जो काही करस्वरुपात पैसा भरते. तो पैसा त्यांच्या नुकसानभरपाईसाठी भरत नाही तर देशाच्या विकासासाठी भरीत असते. तसं पाहता अशा नुकसानभरपाई मागणाऱ्यांनी आपली घरं बांधण्यापुर्वीच विचार करावा की ती घरं नदीच्या किनाऱ्यावर बांधूच नये आणि बांधलीच तर घरात पाणी शिरल्यास वा नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मागू नये. कारण त्यात दोष आपलाच असतो. आपला दोष हा की ती घरं आपण किनाऱ्यावर बांधली. तसेच मागील काही वर्षात नद्यांना महापूर येवून ते पाणी घरात शिरल्यावर मदतही घेतली. परंतु त्यानंतरही ती मंडळी सुधारली नाही व त्यांनी आपली घरं नदीकिनारच्या ठिकाणांहून दूर नेली नाही. यात दोष कोणाचा? दोष त्यांचाच नाही का की त्यांनी आपलं घर बदलवावं. हं, नुकसानभरपाई त्यांना द्यावी की ज्या भागात भुकंप झाला वा पावसाच्या अवर्षणानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं.
           नुकसानभरपाई त्यांनाच का? महापूरवाल्यांना का नाही? तर महापूर हा नदीला येत असतो. यात त्यांचं नुकसान होते, जे नदीकिनारी राहतात. यावर उपाय करता येतो. उपाय हा की आपली घरं ही नदी किनाऱ्यालगत न बांधणे. बांधल्यास त्यात बांधणाराच दोषी असतो. त्यांनी तिथंच घरं का बांधावी? नदीच्या थोडीशी दूर बांधावी त्यांनी आपली घरं आणि ती बांधताही येतात. परंतु भुकंप हा अशा ठिकाणी येतो की त्या ठिकाणाचा अंदाज घेता येत नाही. तो कुठेही येवू शकतो. त्यामुळंच त्यातून घडणाऱ्या गोष्टी या अकस्मात घडत असतात. तो वेळीच येत असल्यानं सावधान व्हायला वेळच मिळत नाही. म्हणूनच या भुकंपामुळे ज्या ज्या  लोकांची हानी होते, त्याला त्याला नुकसानभरपाई मिळायला हवी. तशीच नुकसानभरपाई शेतकऱ्यांपैकी अल्पभुमीधारकांना द्यायला हवी. कारण पाऊस हा कधी येतो व कधी नाही. त्यात शेतकऱ्यांना कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी सुक्या दुष्काळाचा. त्यात ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर शेती आहे. त्याच्यापुढं तेवढी समस्या उद्भवत नाही. कारण तो दुसऱ्या मालानं झालेलं नुकसान भरुन काढू शकतो. तसंच त्सुनामी आलेल्या भागातही नुकसानभरपाई  द्यावी. कारण तिही अकस्मातच येत असते.
          महत्वाचं सांगायचं झाल्यास नुकसानभरपाई द्यावी. देवू नये असं म्हणणं नाही. परंतु जर ती योग्यरित्या दिली तर देशाचा नव्हे तर जनतेचा पैसा विनाकारण खर्च होणार नाही व देशाचं नुकसान होणार नाही. कारण एक एक रुपया हा देशविकासासाठी महत्वाचा असतो. ज्यातून देशाला महाशक्तीही बनवता येवू शकते. जर असाच नुकसानभरपाईत जे लाभार्थी नाहीत, त्यांच्यासाठी आपण आपल्या देशाचा पैसा खर्च करीत राहिलो तर देशाचा उद्या विकास करायला पुरेसा पैसा राहणार नाही व त्यातून देशाचा विकास खुंटेल. त्यानंतर देशाला कधीही महाशक्ती बनवता येणार नाही. देशाला महाशक्ती बनविण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहील यात शंका नाही. हं, महापुराची नुकसानभरपाई सर्वच लोकं मागतात. ज्यांच्या घरात पाणी जात नाही व ज्यांचं नुकसान होत नाही तेही. कारण वाहत्या गंगेत कोणीही हात धुतात. परंतु कोणीच विचार करीत नाही की आपण करीत असलेलं कर्म आपल्या देशाचा विकास करण्यास अडसर ठरणार आहे. 
          
 ************************************************************************************************

             शहरात नुकसानभरपाई मिळत होती. नुकसान होत नसलं तरीही. परंतु ग्रामीण, आदिवासी भागात नुकसानभरपाई सोडा, साध्या प्राथमिक गरजा पुर्ण होत नव्हत्या. दुय्यम गरजा वेगळ्याच. अशीच परिस्थिती होती त्या आदिवांसी भागांची. तशी गोविंदपूर गावचीही परिस्थिती काहीशी अशीच होती. 
            गोविंदपूर गाव. त्या गावातही पावसाळा सुरु होता. परंतु पाऊस येत नव्हता. अर्धा पावसाळा संपून गेला होता. परंतु पाऊस आला नव्हता  लोकं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकत होते. परंतु पाऊस येत नव्हता. ती पिंडीवर पाणी टाकण्याची प्रक्रिया एक गावातील लहान मुलगा पाहात होता. त्याला ती अंधश्रद्धाच वाटत होती. परंतु ना तो काही म्हणत होता ना तो  काही म्हणू शकत होता. कारण त्याला काही समजत नव्हतं. एरवी तो लहान होता वयानं. त्याचं नाव सुजीत कुमार नाव होतं.
           लोकं पावसावर अवलंबून होते. कारण तो पाऊस अख्ख्या गावाला पोषत होता. त्या पावसावर शेतीही अवलंबून होती. दरवर्षी पाऊस पडायचा. परंतु पाऊस यावर्षीच जणू रुसला होता असंच वाटत होतं. त्यासाठीच साकडे चालले होते गावकऱ्यांचे. 
         मागचं वर्ष.........मागचं वर्ष आनंदात गेलं होतं. कारण त्यावर्षी बर्‍यापैकी पाऊस झाला होता. परंतु यावर्षी? यावर्षी पावसाचा पत्ताच नव्हता. ना आकाशात ढगं होते. ना कोणतीच वीजही कडाडत होती. त्यामुळंच की काय, गावकरी लोकं शंकराच्या पिंडीवर पाणी टाकत होते व गावात उरलंसुरलंही पाणी नष्ट करीत होते. तसं काहीजण आपल्या गावात गावपुजा झाली नाही. त्याचा कोप होय असेही म्हणत होते. 
           गावपुजा........दरवर्षी गावात गावपुजा व्हायची. गावात एक मंदिर होतं देवीचं. गाव न चुकता त्या देवीला बकरा, कोंबडा शक्तीनुसार बळी म्हणून देत होते. तसं केल्यानं देवी आपलं कल्याण करते. असे गावातील लोकं म्हणत असत. परंतु तो देवादेवीचा दिवस यायचा होता. 
           ती गावपुजा गावातील लोकं त्यांच्या शेतात पेरणी झाल्यानंतर त्या पिकांचं जतन व्हावं म्हणून देत असत. त्या गावपुजेत देवीवर कोंबड्या बकऱ्याच्या रक्ताचा अभिषेक करीत असत. बदल्यात ती देवी त्या गावावर कोणती विपदा आणत नव्हती व गावही सुसंपन्न स्थितीत राहून आपल्या शेतात भरघोष पीक घेत असे. यावर्षी मात्र पाऊस पडला नसल्यानं ना धानाची लावणी झाली होती. ना शेतात कोणती पेरणी झाली होती. त्यामुळंच की काय, गावातील देवपुजाही रखडली होती व गावातील लोकांच्या मनात देवपुजेविषयी प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं. 

***********************************************

            गोविंदपूर........त्या गावाचं नाव गोविंदपूर होतं. ते गोविंदपूर म्हणजे साक्षात त्या गावावर गोविंदाची अर्थात साक्षात विष्णू भगवानाची कृपा आहे असं गावाला वाटत होतं. कारण गाव तसं पाहता सुसंपन्न होतं. 
           गोविंदपूर हे जंगलाने वेढलेलं गाव होतं. ते गाव आदिवासीच गाव होतं. कारण गावात भरपूर जंगल होतं. त्या जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होते. गावातील ती झाडं मोठमोठी होती. तसं पाहता त्या झाडानं गावात भरपूर प्रमाणात पाऊस पडत होता. त्या पावसानं शेतीही भरपूर पिकत होती. परंतु गावावर यावर्षी अवकळा आली होती.  ती अवकळा पाहता यावर्षी गावात पाऊस नव्हता. त्याचं कारण कदाचीत लाकुडकटाई होतं. 
          गावाला लगत असलेल्या जंगलात सागवानी लाकुड होतं आणि ते लाकुड उत्तम प्रतीचं आणि किमतीचं होतं. ती झाडं मोठमोठी झाल्यानं त्याला कापायला बऱ्याच वर्षांपासून जंगलकटाई करणारे लोक परवानगी मागत होते. परंतु तशी परवानगी न मिळत असल्यानं तो लाकुडकटाईचा प्रस्ताव धुळखात पडला होता.
           सरकारनं त्या लाकुड कटाईवर यावर्षीच निर्णय दिला होता व त्याच आदेशानं लाकुड कटाई कंत्राटदारानं पुर्ण जंगल साफ केलं होतं. एकही झाड झुडूप ठेवलं नव्हतं. 
            सुजीतच्या बाबाचे नाव भाऊराव होते  भाऊराव नित्यनेमानं आपल्या शेतावर जात असे. त्याच्याकडे शेतजमीन होती. परंतु तिही थोडीथोटकी होती. त्यावरच भाऊराव आपला व आपल्या परीवाराचा कसातरी उदरनिर्वाह करीत होता. शेती तशी पिकत होती. परंतु खाऊनपिवून काही उरत नव्हतं. त्यामुळंच की काय, शेतीच्या उत्पन्नातून कोणताही एक जास्तीचा पैसा शिल्लक राहात नव्हता. 
         कंत्राटदारांनी जंगल साफ केलं होतं. तो पुर्ण परीसरच मोकळा झाला होता. ना आता त्या जंगलात राहणारे प्राणी होते. ना कोणत्या पक्षाला राहायला एवढीशी जागा होती. पक्षांनी आपली जागा सोडली होती व प्राण्यांनीही आपला अधिवास सोडला होता व ते कितीतरी दूर निघून गेले होते. ती जागा मोकळी झाली होती. 
          कंत्राटदारानं सर्व झाडं तोडली होती. कारण ती झाडं बाजूला होती. परंतु भाऊरावच्या शेतातील बाभळीचं झाडं अजूनही शाबूत होतं.
            पाऊस.......पाऊस कधी येतो, कधी नाही. कधी जास्त येतो. कधी काहीच येत नाही. म्हणतात की पाऊस हा झाडांवर अवलंबून असतो. 
           खरंच पाऊस हा झाडांवर अवलंबून तरी असतो का? तर याचं उत्तर होय असंही देता येईल. नाही असंही देता येणार नाही. होय असं द्यायचं झाल्यास सुर्याच्या उष्णतेपासून जी पाण्याची वाफ होते. ती पाण्याची वाफ वर आकाशात जाते. ती एवढी वर जाते की ती वर जावून थंड होते. ती थंड झालेली वाफ........त्या वाफेतून बाष्पाचे पुंजके तयार होतात. ते बाष्पयुक्त पुंजके वाहायला लागतात व जिथं डोंगरं असतात व जिथं झाडं असतात. तिथं ते अडतात व त्या ठिकाणी पाऊस पडतो. हे बाष्पयुक्त पुंजके तिथंच थंड होतात असं नाही. तर ते त्या डोंगराच्या पुढेही वाहात असतात. ते पुढंही पावसाच्या रुपानं पडतात. म्हणूनच जिथं डोंगरं वा पर्वत असतात. त्या परिसरात पाऊस अतिप्रचंड पडतो. महत्वपुर्ण गोष्ट ही की पाऊस पडण्यात डोंगराचा संबंध येतो. झाडांचा नाही. मग झाडांचा पावसाशी संबंध का जोडण्यात येतो? त्याचा तर पावसाशी संबंध नाही. बरोबर आहे. झाडाचा पावसाशी दुरदुरचा संबंध दिसत नाही. मग असे असतांना जिथं डोंगर वा पर्वत नसतं,  तिथं पाऊस कसा काय पडत असेल?  असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही.
            आपण पाहिलं आहे की काही ठिकाणी पर्वत वा डोंगर नसतं, तरीही तिथं पाऊस पडतो. त्याचं कारण म्हणजे वातावरणातील  हवेचा दाब. तो वाढला वा कमीजास्त झाला की विजा कडाडतात. गडगडाट ऐकायला येतात. ही वीज झाडांवरच जास्त पडते. त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण असतं झाडांचं श्वास घेणं. झाडं श्वास घेतांना कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सीजन वातावरणात सोडतात. परंतु कधीकधी हीच झाडं हवेतील ऑक्सीजन शोषून घेतात व कार्बनडाय ऑक्साईड हवेत सोडतात.  त्यातच ही झाडं जेव्हा ऑक्सीजन हवेत प्रवाहीत करतात. तेव्हा या ऑक्सीजनचा हवेतील अतिप्रमाणातील हेलिअमशी संपर्क येवून तो जळतो व फट् असा आवाज येवून वीज निर्माण होत असते. यातूनच पाण्याची निर्मीती होते. जर अति प्रमाणात झाडं असली तर अति प्रमाणात ऑक्सीजन प्रवाहीत होवू शकतो व याच अति प्रमाणातील ऑक्सीजनचा हेलीअमशी संयोग होवू शकतो व अति प्रमाणात पाण्याची निर्मीती होवू शकते. म्हणूनच अति प्रमाणात झाडं असायला हवीत. हा फट् आवाज येणे म्हणजे गडगडाट होय. 
           पाऊस झाडांपासून येतो. याचं सोपं उदाहरण म्हणजे वातावरणातील हेलीअम अर्थात हायड्रोजन. हा जेव्हा झाडापासून प्रवाहीत होणाऱ्या ऑक्सीजनशी संयोग पावतो. तेव्हा फट् असा आवाज येतो. हा गडगडाट होय व तो ऑक्सीजनसोबत संयोग पावतांना लख्खं प्रकाश निर्माण होतो. हीच वीज होय आणि तो संयोग पावल्यावर पाणी तयार होतं. हाच पाऊस होय. महत्वाचं म्हणजे झाडांना आपण आपले मित्र मानतो. का मानतो? कारण झाडं आपल्याला वरील प्रकारे पाऊस देतात. फळ, फुल देतात. सावलीही देतात. इमारती लाकूड देतात, अन्नधान्य देतात व इतर बरंच काही देतात. ज्याचा विचारही आपण करु शकत नाही. ते पाऊसही देतात. परंतु आपण त्यांना तोडतो. जंगलं नष्ट करतो. कारण आपल्याला राहायला जागा नसते. आपल्याला आपलं पोट भरायला शेत नसते. म्हणूनच आपण जंगलही तोडून साफ करतो. परंतु त्याचा परिणाम होतो, तो आपल्या पावसावर होतो. पाऊस पडत नसल्यानं सुका दुष्काळ निर्माण होतो. पाऊस पडत नसल्यानं पीक होत नाही. सतत मोडी होतात. पाऊस पडत नसल्यानं अख्खं पीक करपतं. घरात खायला दाणाही नसतो. उपाशी पोटी राहावं लागतं. हं, जबाबदारी ज्याच्यावर असते, तो राहतोही एकवेळ उपाशी. परंतु त्यावर अवलंबून असणारे घटक म्हणजे त्याची मुलं बाळं जेव्हा उपाशी असतात. तेव्हा विचार येतो. तो विचार एवढा भयंकर असतो की त्याची परियंतीच सांगता येत नाही. कर्जावर कर्ज वाढतं. सावकार वा बँका त्रास देतात. मग कर्जाचा डोंगर एवढा वाढतो की अचानक विचार आल्यानं ती जबाबदारीची पावलं कोणताही वेळेवर निर्णय घेवू शकत नाहीत. ती पावलं अचानक त्या झाडाकडं वळतात. जे आपल्या शेतात डौलानं उभं असतं. ते काटेरी झाड आपल्या काही कामाचं नाही, म्हणूनच आपण त्याला तोडलेले नसते. ज्याला बाभळीचं झाड म्हणतात. बाकी हिरवीगार सर्व झाडं आपणच तोडलेली असतात. ती चोपडी असतात म्हणून. यात जे वाचलं असतं. ज्याचं काही काम नसतं. जे पाऊस पाडत नाही. तेच झाड आपण निवडतो. अचानक जबाबदारीची आपली पावलं त्याच झाडाकडं वळतात. त्या झाडावर दोराचं एक टोक टाकतात आणि दुसरं टोक आपल्या गळ्यात. मग तो दोर आवरला जातो. त्यानंतर काय घडतं ते सर्वांनाच माहीत आहे. 
            विशेष सांगायचं म्हणजे झाडं आपली मित्र आहेत असे आपण बरेचदा म्हणतो. परंतु आपण त्यांच्याकडे मित्रत्वाच्या भावनेनं पाहतो का? याचं उत्तर नाही असंच आहे. आपणच त्यांच्याशी विश्वासघात करतो हे सत्य आहे. आज चांद्रयान पाठवून चंद्रावर मानव जाणार व वस्ती करणार असा संकेत चांद्रयानानं दिलेला आहे. कारण आज पृथ्वीवर  निर्वासीताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण पृथ्वीवरचं पाणी संपत आलं आहे. म्हणूनच चंद्रावर पाणी शोधण्यासाठी आपण चांद्रयान पाठवलं आहे. भविष्यात आपली योजना आहे की पृथ्वीतलावरील पाणी पुर्णतः संपल्यास आपण चंद्रावर वस्ती करण्यासाठी जावू. परंतु ते पाणी संपण्यापुर्वी आपण त्यावर उपाययोजना केली तर.......तर कदाचीत पृथ्वीतलावरील पाणीच संपणार नाही व आपले चंद्रावर जाण्याचे स्वप्न ते स्वप्नच राहील. 
         महत्वाचं म्हणजे ते स्वप्न, स्वप्नच  राहायला हवं. पृथ्वीवरील पाणी संपूच नये. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जेवढी झाडं आपण तोडतो आपल्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी. त्याच्या द्वितीय प्रमाणात आपण झाडं लावली पाहिजेत. प्रत्येक गावात वा शहरात विपूल प्रमाणात झाडं दिसायला हवीत. ज्याच्यातून प्रवाहीत होणा-या ऑक्सीजनचा वातावरणातील हायड्रोजनशी संयोग होवून पावसाची निर्मीती होईल. हे जेव्हा आपण करु. तेव्हाच पाऊस पडेल. अन्नधान्य पिकेल. आपल्याला भरघोस प्रमाणात अन्नधान्य मिळेल व कोणीही उपासमार झेलणार नाही आणि मग अचानक जबाबदारीची वा इतर कोणतीच पावलं बाभळीच्या झाडाकडं वळणार नाही व कोणीच त्या झाडाला दोर बांधून आत्महत्याही करणार नाही हे तेवढंच खरं आहे यात शंका नाही.
            गावात पाऊस पडत नव्हता. साकडं घातलं गेलं. पिंडीवर पाणी टाकलं. गावपुजा केली गेली. परंतु पाऊस पडलाच नाही. कारण पाऊस हा झाडांवर अवलंबून होता. कंत्राटदारांनी गावातील जंगल तोडल्यानं गावात झाडं राहिली नव्हती. त्यामुळंच गावात काही घरामध्ये उपासमार व्हायला लागली. अशातच सुजीतच्या बाबांची पावलं त्याच्याच शेतातील एकमेव असलेल्या बाभळीच्या पायाकडं वळली व त्यानं एक दिवस कोणालाही न सांगता त्याच बाभळीच्या झाडावर दोराचं एक टोक बांधलं व दुसरं टोक आपल्या गळ्यात. त्यातच भाऊराव मरण पावला होता. 

************************************************

           भाऊराव मरण पावताच घर सुनंसुनं झालं होतं. सुजीत अनाथ झाला होता. तसं पाहता ते त्याचं बालवयच होतं की ज्या बालवयात मरण समजत नव्हतं. आपण अनाथ झालो आहे हेही समजत नव्हतं. 
         सुजीत आपल्या मायबापाचा एकुलता एक मुलगा होता. तसा त्याचा बाप मरण पावताच सुजीत अनाथ झाला होता. परंतु त्याच्या आशा अनाथ झाल्या नव्हत्या. तो वडील असतांनाही हुशारच होता आणि आता वडील नसतांनाही हुशारच होता. त्यातच तो अगदी बालवयापासूनच चिकीत्सक बुद्धीमत्तेचा होता. त्याच्या बालमनाला काही प्रश्न नेहमी पडत. जेव्हा तो त्या प्रश्नांचा चिकीत्सक अभ्यास करायचा नव्हे तर निरीक्षण करायचा. पाण्यात दगड मारताच पाण्यात तरंग का निर्माण होतात? लाजाळूच्या पानांना हात लावल्यावर ती पानं आपली पर्ण का मिटतात? पैसा वा वाणी नामक किड्याला हात लावताच ते का बरं आपलं शरीर आंकृचन करुन घेतात? तसंच गांडूळ का बरं दोन्ही भागातून चालतो? लहानशी मुंगी कशी काय आपल्या वजनापेक्षा कितीतरी जास्त पट सामान वाहून नेते? ते प्रश्न त्याला आश्चर्य करणारे वाटत असत. तसा तो हळूहळू शिकत होता आणि त्याची आई त्याला शिकवीत होती. 
          शेती पिकत नव्हती. त्यातच घरी होणारी उपासमार पाहून भाऊराव बाभळीच्या झाडावर अधाशीपणानं फाशीवर लटकला. तो गेल्यानंतर तर चांगलंच डोंगर कोसळलं होतं दुःखाचं. कारण जवळ पैसा नव्हता आणि अन्न? घरात खायला अन्नही नव्हतं. त्यातच गावात कोणतीच कामं उरली नसल्यानं आणि यावर्षी पाऊस न पडल्यानं कामंही नव्हती. काय करावं सुचेनासं झालं होतं. तसंच ब-याचशा गावकऱ्यांपुढं प्रश्न होता की आपली लेकरं बाळं कशी पोषावी. 
          गावात आलेला हा भयंकर प्रमाणाचा सुका दुष्काळ गावाची वाट लावत होता. गावकऱ्यांच्या मनात मोठा विचार होता. याची माहिती सरकारलाही होती. परंतु सरकारही कोणतीच पावलं उचलत नव्हतं. अशातच कळलं की देशानं चंद्रावर चांद्रयान पाठवलं.
          चांद्रयान.........भारतानं अवकाशात पाठवलेलं यान होतं. ते यान पाठवतांना मोठी काटकसर येथील शास्रज्ञांनी केली होती. चांद्रयान यानावर कोटीच्या घरात खर्च झाला होता. तसा पैसा जनतेचाच लागला होता. त्या जनतेचा, जी जनता आजही काबाडकष्ट झेलत होती. ती जनता, ज्या जनतेच्या शेतात दुष्काळ पडला होता. कुठे ओला दुष्काळ होता तर कुठं सुका दुष्काळ होता.
            लोकं म्हणत होते, चांद्रयान मोहीम देशाची परिस्थिती सुधारु शकते काय? त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे जनतेची गरीबी. चांद्रयान मोहीम काही जनतेची गरीबी दूर करु शकणार नव्हते. तसंच लोकं म्हणत होते की देश महाशक्ती बनलाय. कारण देशानं चंद्रावर चांद्रयान पाठवलं व आदित्य एल १ देखील पाठवलं. परंतु सुजीत विचार करीत होता की देशात जर सर्वसामान्य लोकांसाठी सोयी नाहीत. मग देश महाशक्ती तरी कसा? तो प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला होता व तोच प्रश्न त्याला सतावत होता. तो विचार करीत होता.
            आपला देश. विकसीत असा देश. या देशानं नुकतेच आदित्य एल १ सुर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवला. तसं त्यापूर्वीच म्हणजे दि.२३ ऑगष्टला चांद्रयानानं चंद्रावर पाऊल ठेवलं. तेही कठीणात कठीण असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर. त्यानं जिथं पाऊल ठेवलं. त्या जागेला नंतर शिवशक्ती केंद्र असं नाव दिल्या गेलं आणि भारत जगातील एक महाशक्ती बनला असं घोषीत करण्यात आलं. 
         खरंच भारताचा, या चांद्रयानावरुन विचार केल्यास भारत खऱ्या अर्थानं महाशक्ती बनला आहे काय? तर याचं उत्तर नाही असंच येईल. जरी भारतानं चंद्रावर चांद्रयान उतरवलं असलं तरी आणि सुर्याचा अभ्यास करण्यासाठी सुर्ययान अंतराळात पाठवला असला तरी. त्याचं कारणही तसंच आहे. 
           आज भारतानं अगदी पहिल्या रांगेत बसून चंद्रावर चांद्रयान पाठवलं व चांद्रयानाची मोहीम यशस्वी केली व विज्ञान क्षेत्रात भारत यशस्वी झाला. परंतु असे असले तरी आज भारत खऱ्या अर्थानं महाशक्ती नाही. त्याचं कारण म्हणजे भारताला आज सतावत असलेल्या विविध समस्या. आज भारताला वेगवेगळ्या समस्या सतावत आहेत. त्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीनं देश त्रस्त आहे. बेरोजगार रडत आहेत. त्यातच सुशिक्षीत बेकारांची संख्या वाढत आहे. आज चांगले चांगले डॉक्टर, इंजिनिअर व वकील सुद्धा निव्वळ खाली आहेत व त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. आज एक साधारण मजूर तरी आपल्या पोटापुरतंच नाही तर त्यापेक्षाही कितीतरी जास्त पैसा कमवतो. परंतु आजच्या या सुशिक्षीत झालेल्या वकील, डॉक्टर, इंजिनिअरचे डिप्लोमे घेतलेल्या लोकांच्या हाताला काम नाही. ते निव्वळ बेकारीचे जीणे जगत आहेत व मिळेल ते काम करीत आहेत. काय करणार. पोटासाठी वा पोट भरण्यासाठी तर करावेच लागणार. वकीलाला तर त्यांचा कोट घेण्यापुरतेही पैसे मिळत नाही. काहींच्या आत्महत्याही झाल्या आहेत. घडत आहेत. तसं यात एका बेकारानं तर नोकरीसाठी प्रयत्न केला. परंतु नोकरी न मिळाल्यानं आपण घेतलेल्या शिक्षणाचा काही उपयोग नाही म्हणून त्यानं आपल्या सर्व पदव्या फाडून टाकल्या. जाळूनही टाकल्या व आता तो इमारतीच्या बांधकामाचा मिस्री म्हणून काम करीत आहे. बिचारा एम फिल झाला होता. 
            बांधकाम मिस्री. इमारतीचं बांधकाम करायला शाळेत जावून शिक्षण घेणाऱ्या शिक्षणाची गरज नाही. ते शिक्षण गरजेचं नाही. तर अनुभव गरजेचा आहे. एखादा अडाणी असलेला व्यक्तीही ते काम करु शकतो. तसंच नोकरी व्यतिरिक्त दुकान चालवणं वा इतर चहाटपऱ्या टाकणं वा पानठेले चालवणं देखील साधारण कमी शिकलेला व्यक्तीही करु शकतो. त्याला उच्च शिक्षणाची गरज नाही. उच्च शिक्षण घेतल्यावर तसं काम केल्यास हिनता वाटते. तसं पाहता आज उच्च शिक्षणालाही काही महत्व नसल्याचं दिसतं. कारण कमी शिकलेला व्यक्ती हा आपली कंपनी काढून मौजमस्ती करतो आणि जास्त शिकलेला व्यक्ती हा त्या कंपनीत काम करतो व मालकाचा सतत अपमान सहन करतो. तसेच उच्च शिकलेले व्यक्ती आज रिक्षा चालवतांना दिसतात. मग उच्च शिक्षणाचा उपयोग काय? काहीच उपयोग नाही असं दिसतं. तेव्हा असं वाटतं की जेवढं कामाचं शिक्षण असेल, तेवढंच घ्यावं. फुकट शिक्षणाला पैसा लावू नये व शिकूही नये असंही वाटतं. कर्ज काढून तर शिकूच नये असं वाटतं. 
           आज देशात काही काही महाभाग असे आहेत की जे देशात शिकलेले भरपूर आहेत. परंतु हाताला काम नाही. कोणतेही अप्रतिष्ठेचे काम करायला लाज वाटते. म्हणून ते घरीच बसलेले आहेत. ते हाताला काम नाही व फुटपाथवर काम करायला लाज वाटते. म्हणून देशात काम करीत नाही तर विदेशात कामासाठी संधी शोधत असतात व तशी संधी उपलब्ध झाल्यास ते विदेशात जातात व तिथंच स्थिरावतात. ही वास्तविकताच आहे. 
          एकीकडे ही सुशिक्षीत बेकारांची हालत गंभीर आहे. तर दुसरीकडे राहात असलेल्या आदिवासी लोकांना शिक्षणच नाही. ते आदिवासी आहेत की जे अजिबात शिकलेले नाहीत व शिकत नाहीत. एकीकडं देशानं चंद्रावर चांद्रयान पाठवलं असतांना व सुर्याला तो गवसणी घालायची स्वप्न पाहात असतांना दुसरीकडे याच देशात असेही लोकं राहतात की ज्या लोकांच्या घरी आजही शिक्षणाच्या वाटा पोहचत नाही व बिचाऱ्यांची इच्छा असूनही शिकता येत नाही. त्याचं कारण आहे. त्या भागात नसलेल्या शिक्षणाच्या सोयी. देशानं चंद्रावर चांद्रयान तर पाठवला. परंतु त्या लोकांसाठी शिक्षणाच्या सोयी केल्या का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. शिक्षण घ्यायचं झाल्यास नद्या व जंगलं पार करुन जावं लागतं. बिचाऱ्यांना शिक्षण शिकायला जातांना हिंस्र श्वापदांची भीती वाटते. तर कधी नदीवरचे ओंडके पार करतांना पाय घसरुन पाण्यात पडण्याची व बुडून मरण्याची भीती वाटते. आज अशी बरीच गावं आहेत की त्या गावात अजूनही रस्ते नसल्यानं बस जात नाही वा वाहतूक होत नाही. आज अशी बरीच गावं आहेत की ज्या ठिकाणी अजिबात वीज नाही व अंधारात जेवन बनवावं लागू नये म्हणून दिवसाच जेवन बनवलं जातं. एवढंच नाही तर आजही देशात अशी अनेक गावं आहेत की ज्या गावात शौचालयाच्या सोयी नाहीत व रात्री कुणाला शौचाला लागल्यास एकटं बाहेर पडता येत नाही. कारण हिंस्र श्वापदाची भीती. कोण केव्हा शिकार होईल याचा नेम नसतो. जिथं सरकार शहरात राहात असलेल्याच सुशिक्षीत बेकारांना कामासाठी न्याय देवू शकत नाही. तिथं या शिक्षणापासून वंचीत असलेल्या व कोसो दूर असलेल्या आदिवासी लोकांना काय न्याय देवू शकेल? यावर प्रश्नचिन्हंच उभं राहातं. मग खरंच खऱ्या अर्थानं विचार केला की चंद्रावर चांद्रयान पाठवून देश महाशक्ती झाला, तर तसं म्हणणं आतिशयोक्ती नाही का? ही गोष्ट म्हणजे आपलीच आपणच पाठ थोपटणं झालं. 
           महाशक्तीबाबत सांगतांना आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आजही स्री आणि अस्पृश्यांना गौण स्थान आहे. शहर थोडं सुधारलं आहे व तिथं भेदभाव असला तरी तो लपला आहे. परंतु आज कित्येक गावं अशी आहेत की जिथं अस्पृश्यांना राहता येत नाही. राहायचे असेल तर भीत भीतच राहावं लागतं. सतत अत्याचार सहन करावा लागतो. कधी चकमकही होते व भेदभाव आणि विटाळानं जीवंही गमवावा लागतो. तरी न्याय मिळत नाही. हाच का महाशक्तीचा देश? यातही काही काही घटना उघडकीस येतात, काही काही लपतातच. तसंच स्रियांचंही आहे. तिला तर काही काही ग्रामीण भागात पायातील चप्पलच समजली जाते. तिला आजही काही काही मंदिरात मंदिरप्रवेश नाही. आजही तिच्या अल्पवयात तिचा विवाह लावला जातो. अन् आजही तिला रात्री अपरात्री बिनधास्त फिरता येत नाही. आजही तिला छळलं जातं अन् आजही तिच्यावर बलात्कार होतात अगदी बिनधास्त. आजही तिच्या पती निधनानंतर तिला पांढरी साडी जबरदस्तीनं परीधान करायला लावली जाते. बांगड्या फोडल्या जातात. जोडवे, मंगळसुत्र काढली जातात. अन् आजही भांगातील कुंकू पुसावं लागतं तिला. ते सगळं करण्याची इच्छा नसतांना. हाच का महाशक्तीचा देश की या देशात गरीब श्रीमंत दरीतील अंतर वाढत आहे. अन् हाच का महाशक्तीचा देश की जिथं महागाई सतत वाढते. एकीकडं नेत्यांची चांदी तर दुसरीकडं सतत नापिकी व नापिकीनं आत्महत्या. खरंच असं देशात सुरु असतांना देश महाशक्ती तरी कसा बनेल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. 
            देशही महाशक्ती बनू शकतो. तो चंद्रावर चांद्रयान पाठवून नाही वा सुर्याचा अभ्यास करण्यासाठी सुर्ययान पाठवून नाही. तर देशातील ही श्रीमंत गरीबांची दरी कमी करुन. देशातील रोजच होत असलेल्या शेतकरी वा सुशिक्षीत बेरोजगारांच्या आत्महत्या दूर करुन. स्री अत्याचाराची शृंखला बंद करुन व अस्पृश्यांना पुरेपूर न्याय देवून. तसंच त्या कोसो दूर असलेल्या जंगलात पाहाडात राहात असलेल्या आदिवासीसाठी रस्ते बांधून. त्यांच्यासाठी निःशुल्क शिक्षणाच्या सोयी त्याच गावात करुन. त्यांच्यासाठी शौचालयाच्या योजना राबवून. तसेच वीज व पाणी त्यातच आरोग्य प्रत्येक जीवाच्या घरी पोहोचवून. परंतु आपण ते न करता चांद्रयान मोहीम राबवतो. सुर्ययान मिशन राबवतो व आपला देश महाशक्ती बनला असं सांगतो. परंतु ते सर्व थोतांड आहे. कारण देशातील सर्वसामान्य जनता जेव्हापर्यंत सुखी समृद्ध होणार नाही. सुखी समृद्ध जीवन जगणार नाही. तेव्हापर्यंत देश महाशक्ती बनणार नाही व महाशक्ती देशाचा दर्जा त्याला मिळणार नाही. म्हणूनच आधी देशातील या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकासाठी सोयी करायला हव्यात. मगच चांद्रयान सुर्ययान मिशन राबवायला हवं. जेणेकरुन या प्रकल्पासाठी लागणारा पैसा देशातील या सर्वसामान्य लोकांसाठी सोयी करण्यासाठी कामात येईल. हे तेवढंच खरं.
          भारतानं २३ ऑगस्टला चंद्रावर चांद्रयान पाठवलं होतं आणि देशाला जागतीक महाशक्तीच्या रांगेत नेवून बसवलं होतं. तसंच आदित्य एल २ सप्टेंबरला पाठवला होता. मग तर देश विज्ञान क्षेत्रात आघाडीवर गेलं होतं आणि या प्रकल्पाला तब्बल ३७८ करोड रुपये एवढा खर्च आला होता. 
           देशात सुका दुष्काळ पडला होता. लोकं उपाशी होते व लोकांवर कर्जावर कर्ज चढत होतं. अशातच लोकं उपासमारीनं आत्महत्याही करीत होते. अशातच भारतानं चांद्रयान पाठवलं आणि आता आदित्य एल १ पाठवला होता व स्वतःला विकसीत राष्ट्राच्या यादीत सहभागी केलं होतं. याचाच अर्थ असा होता की भारत विकासाच्या स्तरात आघाडीवर जात होता व महाशक्ती बनला होता. परंतु हे काही लोकांना पाहणं बरं वाटत नव्हतं असंच दिसत होतं. कारण याबाबत काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की चांद्रयान आणि आदित्य एलवर जो कोटी रुपये खर्च होतो. तो करायला नको. तो खर्च करण्यापेक्षा, तो पैसा देशातील नागरीकांसाठी सोईसुविधा करण्यासाठी वापरावा. देशातील महागाई कमी करावी. रस्ते बांधावे.  शिक्षणाच्या सोई कराव्या. 
          हे नागरीकांचं म्हणणं. हे म्हणणं देश बढ रहा है या गोष्टीला फाटा देणारं होतं. कारण चांद्रयान मिशन वा सुर्ययान मिशन राबवून देश विकसीत होत नव्हता तर देश विकसीत होणार होता त्या लोकांच्या सर्व प्रकारच्या सोई करण्यानं. जे आदिवासी होते व जे विकासाच्या क्षेत्रापासून कित्येक किमी दूर होते. लोकांना वाटत होतं की देशातील  काही लोकं एकीकडे जर उपाशी राहात असेल, चिखलात राहात असेल, त्यांना शिक्षण नसेल, ती जनता अशिक्षीत असेल, त्यांना पिण्याचं पाणी बरोबर मिळत नसेल, तर या चांद्रयान मिशनची उपयोगीता काय? अन् हो, चांद्रयान मिशन राबवलं आणि चंद्रावर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झालीच आणि तिथं माणसं राहायला गेलीच, तर कोणती माणसं तिथं राहायला जाणार? गरीब जावू शकतील काय? ती अजिबात जावू शकणार नाहीत. तो फायदा आणि त्या सुविधा फक्त नि फक्त धनिकांना मिळू शकतील. मग चांद्रयानावर या गरिबांच्या कर रुपातील पैसा का बरं वाया घालवायचा? असं मत एकीकडे विस्तारीत होत होतं. समजा त्या स्थानाचा वापर अंतराळाच्या प्रवासासाठी झालाही, तरी ती बाब गरीबांच्या वस्तीत रस्ते निर्माण करुन देवू शकत नव्हती वा गरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या सोई उपलब्ध करुन देवू शकत नव्हती. 
          आज सत्य परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीचा विचार केलाच तर असं आढळून येतं की आज बराचसा असा आदिवासी भाग आहे की ज्या ठिकाणी आजही बरोबर रस्ते नाहीत. ज्या मुलांची शिक्षण शिकायची आस आहे, ती मुलं नदी पार करीत असतांना एका लाकडाच्या ओंडक्यावरुन पार करतात. ही जीवघेणी कसरत असते. त्यातच एखाद्याचा तोल गेलाच तर सरळ नदीत आणि नदीच्या पाण्याला ओढ असल्यानं सरळ मृत्यूच्या दाढेत असे प्रसंग रोजच घडत असतात. एवढे करुनही समजा ती मुलं सातवी शिकली आणि पास झालीही. तरी त्या मुलांना उच्च शिक्षणाच्या सोई जवळपास उपलब्ध नाहीत आणि आहेत तर त्यासाठी बरंच लांब जावं लागतं. ते परवडणारं नसतं. लोकं मुलींना अशा दुरवर ठिकाणी शिकायला मुलींना पाठवायला तयार नसतात. शिवाय एखाद्यानं पाठवलंही.  तरी ते शिक्षण परवडण्यासारखं नाही. कारण उच्च शिक्षण शिकतो म्हटल्यास त्यांच्याजवळ पैसा नसतो. कारण उच्चशिक्षणाला पैसा लागतो. 
          चांद्रयान मोहीम....... या मोहिमेला कोटीच्या घरात पैसा लागतो. या लोकांचं म्हणणं बरोबर होतं. ते म्हणत होते की चांद्रयान मोहिमेला हा जो पैसा लागतो, तो लावण्याऐवजी तोच पैसा आमच्यावर उच्च शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. महत्वपुर्ण गोष्ट ही की आम्हाला उच्च शिक्षण निःशुल्क शिकता यावं नव्हे तर शिक्षण निःशुल्क करावं. मग ते कोणतंही शिक्षण असो. आम्हालाही वाटतं की आम्हीही डॉक्टर, इंजिनिअर बनावं. आम्हालाही वाटतं की कायद्याचा अभ्यास करावा आणि आम्हालाही वाटतं की एखादा पदवीधर बनावं आणि देशाची सेवा करावी. परंतु आम्ही पदवीधर बनणार कसे? कारण दहावीनंतर आम्हाला शिक्षण निःशुल्क नाही आणि जो काही पैसा लागतो, तेवढा पैसा आमच्याजवळ नाही. आमचीही शिकायची इच्छा असते. परंतु या पैशाअभावी दाबावी लागते मनातल्या मनात. मग वय होतं व वय झाल्यावर शिकायची इच्छा असूनही मन मारुन विवाह करावा लागतो व संसारात रमावं लागतं. त्यानंतर आपण शिकलो नाही. मुलं तरी शिकली पाहिजे असा विचार करुन मुलांना जेव्हा शिकवायला जातो, तेव्हाही परिस्थितीच आडवी येते व शिक्षण निःशुल्क नसल्यानं मुलांनाही जबरदस्तीनं अडाणीच ठेवावं लागतं. त्यातच आपल्या मुलांचं आपल्यासारखंच वय वाढत जातं व त्यांचाही विवाह करुन द्यावा लागतो व त्यांची संसारात रमायची इच्छा नसूनही त्यांना संसारात पाडावं लागतं. हे सर्व शिक्षण निःशुल्क नसल्यानं घडतं. हे सर्व एकच पिढी नाही तर पिढीजात घडत येत असलेलं वास्तव्य आहे.
          अशी बरीचशी आदिवासी गावं आहेत की त्या गावात शिक्षण शिकायची इच्छा नसतांनाही अशा बऱ्याचशा लोकांना मधातच अधुरं शिक्षण सोडावं लागतं. कशासाठी? तर त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी रस्ते नाहीत म्हणून. कशासाठी? तर त्यांच्या घरी शिक्षणाला पैसा नाही म्हणून. खरं तर सरकारनं त्या ठिकाणी रस्ते बनवायला हवेत चांद्रयान मोहिमेसाठी खर्च न करता व आदित्य एल मोहिमेसाठी खर्च न करता असं या आदिवासी लोकांचं म्हणणं. परंतु सरकार त्या गोष्टी विचारात घेत नाही. कारण त्या सरकारला देशाचा विकास करायचा आहे. मग देशातील काही मंडळी उपाशी राहिली तरी चालेल. ती मंडळी शिकली नाही तरी चालेल. ते सरकार देशातील मुठभर शिक्षण घेणा-या लोकांची गणणा करुन साक्षरता ठरवतात. तळागाळातील लोकांचं शिक्षण विचारात घेत नाही. ते शिको का न शिको. श्रीमंतांची मुलं शिकतात ना. त्यांचा विकास होतो ना. मग तोच खरा विकास. याचाच अर्थ असा की घरातील लोकं उपाशी ठेवा व बाहेरच्याला चोरी शिवा होय.
         विशेष सांगायचं झाल्यास चांद्रयान मोहीम देशाची परिस्थीती सुधारु शकते काय? याचं उत्तर नाही असंच देता येईल. कारण चांद्रयान मोहीम कितीही यशस्वी झाली तरी ती काही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन देवू शकत नाही. त्यांना श्रीमंत करु शकत नाही. त्यांना शिक्षण घ्यायला जाण्यासाठी रस्ते बनवू शकत नाही. हं, भविष्याचा वेध घेण्यासाठी नक्कीच ती मोहीम यशस्वी होईल. ते भविष्य, जे श्रीमंतांच्या आयुष्यात असतं. गरीब, आदिवासी, शेतमजूर वा शेतकरी यांच्या आयुष्यात नसतं हे तेवढंच खरं आहे.

************************************************

             चांद्रयान मिशन......... भारतानं अखेर चांद्रयान मिशनमध्ये यशस्वीता मिळवलीच व यशस्वीपणानं आपलं चांद्रयान चंद्रावर उतरवलंच. दि. २३/०८/२०२३ ला भारताच्या चांद्रयान तीन या यानानं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणानं पाऊल ठेवून जगाच्या इतिहासात आपलं नाव कोरलेलं होतं.
            चंद्रावर जाण्याचे प्रयत्न यापुर्वी अमेरीका व रशियानं केलेले होते. यापुर्वी अमेरिकेनं चंद्रावर नील आम्रस्टॉंग व आल्ड्रीनला पाठवून चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.
              चंद्रावर रशियानं लुना २ हे यान १३ सप्टेंबर १९५९ ला पाठवून चंद्रावर जाण्याला सुरुवात केली होती. म्हणतात की हे यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं होतं. त्यानंतर अमेरिकेनं आपले अपोलो यान अंतराळात सोडले. यात अपोलो ११ या यानाला यश प्राप्त झालं व अमेरिकेनं १६ जुलै १९६९ मध्ये आपली तीन माणसं चंद्रावर पाठवली. ज्यात नील आर्मस्ट्राँग, कर्नल मायकल कॉलीन्स व लुना मॉड्यूलचे पायलट बझ ऑल्ड्रींग हे होते. यात चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापुर्वीच लुना मॉड्यूलचा संपर्क तुटला व कॉलीन्स हे चंद्राच्या कक्षेतच भ्रमंती करीत राहिले. पुढं त्यांना यानाला जोडून ते यान प्रशांत महासागरात यशस्वीरित्या उतरवलं गेलं. त्यानंतर अपोलो १२ हे अंतराळयान १४ नोव्हेंबर १९६९ ला पाठवलं गेलं. ज्या यानावर वीज कोसळली. परंतु त्याचा जास्त परिणाम त्या यानावर झाला नाही व ते अभियान यशस्वी ठरलं. ज्यात कॉन रोड व ॲलन बीन्स यांचा समावेश होता व ते चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले होते. त्यानंतर अपोलो १३ ह्या यानात स्फोट झाल्यानं ते रद्द करुन अपोलो १४ हे मिशन राबविण्यात आलं. हे यान १४ जानेवारी १९७१ ला चंद्रावर गेलं. या यानात ॲलन शेफर्ड व एड् जार मिशेल होते. त्यानंतर अपोलो १५ मिशन राबविण्यात आलं. ती तारीख होती १५ जुलै १९७१. ज्यात डेव्हीड स्कॉट व जेम्स अर्विन होते. या मिशनमध्ये जेम्स अर्विन मरण पावले. त्यानंतर अपोलो १६ हे यान दि. १६ एप्रिल १९७२ ला चंद्रावर झेपावलं. ज्यात जॉन यंग व चार्ल्स ड्यूक हे होते. त्यानंतर अपोलो १७ हे यान चंद्रावर पाठवण्यात आलं. यात युजीन सर्नन व हॅरीसन श्मिट होते. 
          सन १९७२ पर्यंत नासानं आपल्या अपोलो मिशनद्वारे तब्बल बारा लोकांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं. ज्यामधून ते चंद्रावर चालले. ज्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला व ज्यांनी चंद्रावरील खडक व माती आणली. ज्यात एक व्यक्ती मरण पावला. परंतु नासानं १९७२ नंतर या मिशनद्वारे यशस्वीरित्या चंद्रावर पाऊल ठेवूनही व चंद्राचा अभ्यास करुनही त्या मोहिमेला तिलांजली का दिली असावी? असा प्रश्न सर्वांना पडतो. त्याचं कारण म्हणजे अशा मोहिमांना येणारा खर्च. हा खर्च करोडो आणि अब्जोच्या घरात असतो. तसं पाहिल्यास साध्य काय होतं? तर त्याचं उत्तर काहीच नाही असंच सांगता येईल. एकट्या अपोलो मोहिमेत अमेरिकेला १९७२ पर्यंत तब्बल २० अब्ज डॉलर एवढा खर्च आला होता व तो खर्च अमेरिकन जनतेला परवडण्यासारखा नव्हता. त्यानंतर काही देशानं नक्कीच प्रयत्न करण्याचे प्रयत्न केले. परंतु तो खर्च परवडणारा नसल्यानं त्यांनी ते प्रयत्न सोडून दिले  परंतु भारतानं ते प्रयत्न करण्याचं ध्येय आखलं व यातूनच चांद्रयानची निर्मीती झाली. 
         चांद्रयान एक व दोन यशस्वी झाले नाही. चांद्रयान दोन तर चंद्राच्या कक्षेत जावून गडबडलं. परंतु भारताची निष्ठा आणि ध्येय संपलं नव्हतं. त्याच्यातच सुधारणा करुन भारतानं चांद्रयान तीन पाठवलं. जे यान दि. २३ ऑगस्टला चंद्रावर यशस्वीरित्या आणि तेही चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरलं. त्यातच भारत चंद्रावर यान उतरविणारा चवथा व चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यान उतरविणारा जगातील पहिला देश ठरला. कारण चंद्राचा दक्षिण ध्रृव हा विवर अर्थात दगड व पर्वतशृंखलांनी भरलेला होता. तेथे सपाट पृष्ठभाग नव्हता. सपाट भागावर कोणतीही गाडी उभी करता येत होती. परंतु डोंगराळ भागात ती उभी करणं कठीण कार्य होतं. ते कार्य भारतानं करुन दाखवलं. कठीणात कठीण कार्य. म्हणूनच भारत हा दक्षिण ध्रृवावर यान  उतरविणारा पहिला देश ठरला. हाच दिवस पुढं राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषीत झाला.     
          भारत हा विद्वानांचा देश आहे. या देशात विद्वानांची काही कमी नाही. तसेच विद्वान कोणत्या गोष्टी करण्यासाठी कमी पडत नाहीत. असे असतांनाच त्यांनी चांद्रयान यशस्वी करुन दाखवलं. चक्क चंद्रावर यान उतरवलं. तेही त्या ठिकाणी की जिथं कोणत्याच देशांनी आपलं यान उतरविण्याची हिंमत केली नाही. 
         आता चांद्रयान मिशन पुर्ण झालं होतं. आता भारत चक्क सुर्यालाच गवसणी घालू पाहात होता. सुर्याला गवसणी घालण्यासाठी भारतानं चक्क आदित्य एल १ हे यान तयार केलं होतं. कदाचीत ते यान दि. २ सप्टेंबर २०२३ ला याचवर्षी उडाण भरणार होतं. ते पृथ्वीपासून पंधरा लाख किमी अंतरावर जावून सुर्याचा अभ्यास करणार होतं. याआधी अमेरिकेतील नासा या अंतराळ अभ्यास संस्थेने सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आपलं यान पाठवलं होतं आणि आता भारत त्याच पावलावर पाऊल ठेवून आपलं यान पाठवणार होतं. या प्रकल्पाला अंदाजे ३७८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत होता. यावरुन वाटत होतं की भारत आज महाशक्ती बनायला चाललाय. त्याचं कारण म्हणजे या देशात असलेले विद्वान. जे विद्वान काल होते. आज होते आणि उद्याही राहणार होतेच. हे चांद्रयान वा आदित्य एल म्हणजे  भारताला विद्वानांची देणगी होती याचं प्रमाणक होतं. 
          भारत विद्वांनांची खाण आहे. परंतु याबाबत महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण अभिमान बाळगावा की आपण अशा देशात राहतो. ज्या देशात विद्वानांची खाण आहे. तसा आपल्याला अभिमान आहेच. परंतु अलिकडे हा आपला अभिमान टिकेल की नाही ही शंका वाटते. कारण आपल्या देशात शिकणारे लोकं उच्चशिक्षीत झाले की ते आपल्या देशात राहात नाहीत. ते परदेशात धाव घेतात. म्हणतात की या देशात त्यांच्या बुद्धीला वाव नाही. तसा वाव विदेशात आहे. विदेशात बुद्धीला चालना तर मिळतेच. व्यतिरिक्त जास्त प्रमाणात पैसाही मिळतो. त्यांचं तसं पाहता एका अर्थानं बरोबरच आहे. म्हणूनच भारताला विनंती आहे की त्यांनी आपल्याच देशात विद्वानांचा सन्मान राखावा. त्यांना कार्यकुशलतेच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. जेणेकरुन ते विदेशात जाणार नाहीत. तसंच विद्वांनांनीही हे लक्षात घ्यावं की ज्या देशात त्यांनी जन्म घेतला. वाढवलं. शिक्षण दिलं. त्या देशाला त्यांनी विसरुन विदेशात तुटपुंज्या पैशासाठी जावू नये. एकंदरीत सांगायचं झाल्यास ती अतिशय शरमेची बाब आहे. आपला देश चांगला आहे. महाशक्ती बनणार आहे आणि त्याला आपल्याला महाशक्ती बनण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. ते आपले आद्य कर्तव्यही आहे. म्हणूनच भारतात राहावं. विदेशात नाही. भारताला आपलं समजावं, विदेशाला नाही.
             भारतात शिक्षण निःशुल्क नव्हतं. लोकांचं म्हणणं होतं की शिक्षण आधी निःशुल्क करावं. मगच चांद्रयान आणि सुर्ययान पाठवावा. शिक्षणानं आधी संपुर्ण देशात साक्षरता निर्माण करावी. मगच चांद्रयान वा सुर्ययान मिशन राबवावं. परंतु देशात सर्वदूरपर्यंत अंधार असतांना जर देश चांद्रयान सुर्ययान मिशन राबवत असेल तर ते बरोबर नाही. 

************************************************

          शिक्षण निःशुल्क असावं असं आपण म्हणतो. परंतु शिक्षण निःशुल्क आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आज साधं प्राथमिक शिक्षण शिकायचं झाल्यास त्यालाही पैसे मोजावे लागतात. कारण आज प्राथमिक वर्गाच्या शाळेत संस्थाचालकाची मक्तेदारी आहे. तो संस्थाचालक जो एक खाजगी व्यक्ती आहे. ज्याला सरकार सर्वप्रकारच्या शिक्षणाच्या सुविधेसाठी पैसा देते व तो पैसा असा संस्थाचालक आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खर्च न करता, त्यांच्यासाठी सोईसुविधा न करता, त्यातील काहीच भाग विद्यार्थ्यासाठी खर्च करतो. बाकीचा पैसा हा आपल्या स्वतःच्या विकासासाठी खर्च करतो. हा झाला प्राथमीक भाग. जेव्हा विद्यार्थी दहावी पास होतात. तेव्हा तर शिक्षणाची कल्पनाच न केलेली बरी. कारण दहावीनंतर जे शिक्षण आहे. ते शिक्षण निःशुल्क नाही. त्या शिक्षणात पै पै पैसाच मोजावा लागतो. कारण जे महाविद्यालय आहे, ते महाविद्यालय सरकारी नाहीत. सरकार त्यांनाही अनुदान देतं. परंतु ते अनुदान पुरेपुर स्वरुपात महाविद्यालयातील संस्थाचालक विद्यार्थ्यासाठी खर्च करीत नाहीत, तर स्वतःसाठीच खर्च करतात. हे सत्य आहे. यातही काही काही महाविद्यालयात खर्च हा अनुदान स्वरुपात महाविद्यालयांना मिळतो. परंतु तरीही ब-याचशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचा पैसा खेचलाच जातो. भरमसाट शुल्क मागीतलं जातं विद्यार्थ्यांना. जो पैसा विद्यार्थ्यांच्या पालकाजवळ नसतो. अशातच शिक्षण पैशाअभावी अर्धवट सोडावं लागतं. ही शोकांतिकाच आहे. हं, शिष्यवृत्ती असते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी. परंतु तिही तोकडीच पडते. 
           काही काही महाविद्यालयात अनुदान तरी मिळतं. तरीही विद्यार्थ्यांकडून पैसा हा शुल्क स्वरुपात आकारण्यात येतो. परंतु ते शुल्क तेवढं नसतं. म्हणूनच काहीच मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेता येतं. परंतु काही काही असे अभ्यासक्रम आहेत की जे पैशाविणा घेताच येत नाही. जसे. वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रीकीय शिक्षण. असे शिक्षण निःशुल्क घ्यायचे झाल्यास त्याला टक्केवारी लागते. जी टक्केवारी गरिबांच्या मुलांना शक्यतोवर मिळू शकत नाही. कारण त्यांना शिक्षण शिकण्यासाठीच पैसा उपलब्ध नसतो.  मग साधनं कुठून मिळणार? हं, शासकीय महाविद्यालयात असलेल्या सोयीचाही लाभ धनिकांनाच मिळतो. कारण त्यांच्याकडे उच्चतम टक्केवारी प्राप्त करण्यासाठी पर्याय असतो व तीच मुलं सहज ती टक्केवारीचाही प्राप्त करीत असतात. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास सांगेन की साध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला एका व्यक्तीनं वर्षाला पंचवीस लाख पुर्ण अभ्यासक्रमाला सव्वा करोड रुपये खर्च केला. खरंच एवढा पैसा गरीब व्यक्ती देवू शकतो काय? शिवाय शिकवणी वर्गाचे शुल्क आठ लाख. त्यातच जाण्यायेण्याचा खर्च  वेगळाच. कपडे वेगळेच. श्रीमंत लोकं आपल्या मुलाला टक्केवारी मिळावी म्हणून शिकवणी लावून टक्केवारी वाढवून देवू शकतात. ज्यातून त्यांची टक्केवारी सहज वाढू शकते. परंतु गरीबांची मुलं हुशार असूनही पैसे नसल्यानं शिकवणी वर्ग लावू शकत नाहीत. मग ती कशी काय टक्केवारी मिळवणार व कशी काय डॉक्टर, इंजिनिअरच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळवणार? ही शोकांतिकाच आहे. त्यामुळंच शासकीय योजनांचा लाभ धनिकांनाच मिळणार ही सत्य गोष्ट आहे व यात जाणूनबुजून गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 
           सुजीतला तसंच वाटत होतं. तो विचार करीतच होता. त्याच्या मनात काही प्रश्न पडले होते. शिक्षणावर एवढा खर्च. मग गरिबांच्या मुलांमध्ये उच्चतम शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी शिकू नये काय? त्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण घेण्याचा अधिकार नाही काय? त्यांच्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात काय सोई आहेत का? या प्रश्नांची उत्तरं आज उपलब्ध नाहीत. कारण शिक्षण हे निःशुल्क नाही. हं, बरीचशी श्रीमंतांची मुलं शिक्षणासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेवू शकतात आणि बरीचशी श्रीमंतांची मुलं शासकीय योजनेच्या लाभापासून वंचीत राहिलीच तर ती पैसे असल्यानं पैशानं तरी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेवू शकतात. परंतु समजा एखाद्या शेतकऱ्याच्या वा मजूराच्या मुलाला जर उच्चशिक्षण घ्यायचं असेल किंवा तंत्रज्ञ वा डॉक्टर बनायचं असेल वा वकील, प्राध्यापक बनायचं असेल तर तो बनू शकत नाही. इच्छा मनात असल्या तरी........ आदिवासींची तर गोष्टच वेगळी आहे. कारण त्यांना शिक्षण का घ्यावं? तेच अजून कळलेलं नाही. अल्पसंख्याकांचे हाल तर बघण्यासारखेच आहेत. त्यांना केवळ मुलं पैदा करा. त्यांना कसंतरी लहानाचं मोठं करा व त्यांचा आपल्याचसारखा विवाह करुन द्या आणि संसारात पाडा एवढंच माहीत आहे. त्यांना कितीही शिक्षण निःशुल्क दिलं तरी ते शिकणार नाहीत. शिकतही नाहीत. मग शुल्क असलेलं शिक्षण का शिकतील? हाही प्रश्न पडतो. तरीही एखाद्याची शिक्षण शिकायची इच्छा झालीच तर तो आजच्या शिक्षण पद्धतीनुसार शिकू शकत नाही. कारण आजच्या शिक्षण पद्धतीतील टक्केवारी त्याला परवडत नाही. ती मिळवता येत नाही व मिळविण्याला मर्यादा पडतात. तसेच आजच्या शिक्षणाला असलेलं शुल्कही त्याला परवडणारं नाही. त्या शुल्कामुळंही त्याच्या शिक्षणाला मर्यादा पडतात. 
            आज देश एकीकडे विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. देश चंद्रावर गेला असून सुर्यावरही जाण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिक्षणाच्या कक्षेत मागे आहे. सर्वांना शिक्षण घेता येत नाही. कारण शिक्षण निःशुल्क नाही. मुठभर श्रीमंतांची मुलं शिकली आणि त्यांनी चांद्रयान बनवून ते चंद्रावर पाठवलं म्हणजे देशाचा विकास होत नाही. तशीच देशातील मुठभर माणसं शिकली वा डॉक्टर, इंजिनिअर बनली म्हणजे शिक्षण पुर्ण झालं वा देशाचा विकास झाला असं म्हणता येत नाही. त्यासाठी तळागाळातील मुलं शिकायला हवीत. ती मुलं विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जायला हवीत. तेव्हाच देशाचा खरा विकास झाला असं म्हणता येईल. तसेच देश महाशक्तीही बनला असं म्हणता येईल. त्यासाठी शिक्षण हे निःशुल्क असायला हवं. कोणत्याही शिक्षणाला पैसा लागायला नको. मग ते शिक्षण महाविद्यालयीन का असेना वा डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील प्राध्यापकाचं का असेना. म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. प्यायल्यावर माणसं गुरगुरतात. परंतु ज्यांना ते मुळात पैशाअभावी प्यायलाच मिळत नाही. त्यांचं काय? त्यांनी काय करावं? ते पिण्यासाठी त्यांनी कुठून पैसा आणावा? अन् ते मिळविण्यासाठी काय करायला हवं? असे अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं या विकसीत देशाजवळ नाहीत. कारण या देशात शिक्षण निःशुल्क नाही. ते जेव्हा होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं शेतमजूर, आदिवासी, गरीब शेतकरी, ग्रामीण मुलं या सर्वच मुलांना उच्च शिक्षण घेता येईल. मग कोणी आपोआपच डॉक्टर, इंजिनिअर, वकील वा प्राध्यापकही बनू शकतील वा देशातील महत्वाची पदं शिक्षणानं मिळवू शकतील यात शंका नाही. ती मुलं शिक्षण निःशुल्क असल्यानं शिक्षण हे कसं वाघिणीचं दूध आहे हे ओळखतील व गुरगुरायलाही लागतील. तेव्हाच खऱ्या अर्थानं देशाचा सर्वतोपरीनं विकास झाला असं म्हणता येईल. तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही. जरी चांद्रयान आकाशात झेपावला तरी वा चंद्रावर उतरला असला तरी वा आदित्य एल १ अंतराळात झेपावणार असला तरी.
            महत्वाचं म्हणजे देशाचा खऱ्या अर्थानं विकास मोजायचा असेल तर त्या देशातील साक्षरता मोजणं तेवढंच गरजेचं आहे. त्या देशात किती लोकं कोणत्या स्तरापर्यंत शिकलेले आहेत. किती लोक उच्चशिक्षीत आहेत आणि किती लोकं तंत्रज्ञ आहेत हेही पाहणं गरजेचं आहे. चांद्रयान वा सुर्ययान अंतराळात पाठवून ती साक्षरता तपासता येणार नाही वा तिचे मोजमाप करता येणार नाही. अन् ही साक्षरता साध्य करायची असेल तर संपुर्ण शिक्षण हे निःशुल्क व्हायला हवं. मग ते उच्चशिक्षण का असेना.
             शिक्षण आणि साक्षरता ह्या परस्पर नाण्याच्या दोन बाजूच. परंतु हे तेव्हा साध्य होतं, जर गुरु चांगला असेल तर.........बरेचसे गुरु असे असतात की जे आदिवासी भागात जायलाच पाहात नाहीत. ते मुख्यालयाच्या ठिकाणी राहायलाही पाहात नाही. गावातीलच काही हुशार मुलांना शिकवायला लावतात व आपण तालुक्याच्या ठिकाणी बिनधास्त दारु पित ऐषआराम करतात. काही शिक्षक तर ऑनलाईन कामात एवढे व्यस्त असतात की त्यांना पुरेसा वेळच मिळत नाही शिकवायला. अशातच साक्षरता ढेपाळते. शिक्षणाचा अंधार पडतो विद्यार्थ्यांच्या जीवनात. शिवाय साक्षरता आणि शिक्षणही निःशुल्क नसल्यानं विद्यार्थी शिक्षण शिकायला मागंपुढंच पाहात असतात. 
          गुरु.........गुरु चांगला असावा. त्यात गुण असावे, नसावे हे काही सांगणे नाही व तसं म्हणताही येत नाही. परंतु गुरु चांगला असावा. 
          गुरु हा चांगल्या व्यक्तींचाही असतो व वाईट व्यक्तींचाही असतो. वाईट गुरुपासून वाईट शिकता येते व चांगल्या गुरुपासून चांगलं शिकता येते. जसा चांगल्या कामासाठी गुरु लागतो. तसा वाईट कामासाठीही गुरु लागतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या खुनाबाबत देता येईल. जसा एखादा खुन करायचा असेल आणि त्याचा अनुभव नसेल वा त्याचा गुरु नसेल तर तो करताच येत नाही. आता यामध्ये खुन करणे हे वाईट काम झालं. परंतु तोही नियोजन बद्धपद्धतीनं करावा लागतो आणि त्यासाठीही गुरु असेल तर तो चांगला करता येईल यात शंका नाही. 
          जसा खुन करणे ही गोष्ट जरी वाईट असली तरी त्याला गुरु लागतो, तसा गुरु चांगल्या कामालाही लागतो. माणसानं गुरु चांगल्या गोष्टीसाठी व चांगल्या कामासाठीच करावा. 
         चांगल्या कार्यासाठी गुरुही चांगलाच असावा. जर तो चांगला नसेल तर चांगले कार्य घडत नाही. वाईटच कार्य घडते. जसा गुरु,  तसे कार्य घडत असते. गुरुबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास द्रोणाचार्यचं देता येईल व परशुरामाचंही देता येईल. कारण परशुराम हे शुरवीर असल्यामुळेच त्यांचे शिष्य असलेले कर्ण वा भीष्म वा द्रोणाचार्य जगात गाजलेले शिष्य ठरले. जे कुणाही समोर शरण गेले नाही व ज्यांनी मोठमोठे पराक्रम गाजवले. तेच घडलं द्रोणाचार्यच्या बाबतीत. द्रोणाचार्यनंही शिकवलेल्या पाच पांडवांनी कधीच कुणासमोर हार मानली नाही. आता कोणी म्हणतील  की द्रोणाचार्यनं तर पाच पांडवांनाच नाही तर दुर्योधन दुःशासनसह कौरवांनी शिक्षण दिलं. मग ते का बरं बलवान निघाले नाहीत.  तर याबद्दलही सांगता येईल की तेही बलवानच होते. परंतु त्यांच्यामध्ये अधर्म होता. 
          महत्वाचं म्हणजे याबद्दल सांगतांना हे सांगता येईल की गुरु हा फक्त ज्ञान देतो. तो चांगल्या विचारांचा असेल तर तो चांगलं ज्ञान देतो. तो जर वाईट असेल तर वाईट ज्ञान देतो. परंतु त्या ज्ञानाचा वापर आपण कसा करायचा,  हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं. आपण गुरूकडून वाईट ज्ञान जरी घेतलं असेल. परंतु त्याचा सदुपयोग आपण जर चांगल्या कामासाठी केला तर चांगलं कार्य घडेल. जसं भक्त प्रल्हादाला राक्षसकुलातील गुरुंनी वाईट विचारांचे ज्ञान दिले तरीही प्रल्हादानं त्या ज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला. तसंच द्रोणाचार्यनं राज्यातील कौरव व पांडवांना सर्व ज्ञान दिलं. चांगलंच ज्ञान दिलं. तरीही त्याचा वापर कौरवांनी अधर्मासाठी केला व पांडवांनी धर्म राखण्यासाठी.   
         ज्ञान हे कधीही चांगलं वा वाईट नसतं. त्या ज्ञानाचा वापर आपण कसा करतो. यावर त्या ज्ञानाची उपयोगीता अवलंबून असते. ज्ञानाचा उपयोग हा वाईट पद्धतीनेही करता येते व चांगल्या पद्धतीनेही तेवढाच करता येतो. जर त्याचा वापर धर्मासाठी केला तर ते ज्ञान कधीच हारत नाही आणि अधर्मासाठी केला तर ज्ञान हे विफल होतं. 
         ज्ञान हे बदनाम नाही. परंतु काही लोकं हे ज्ञानालाही बदनाम करतात त्याचा वापर हा वाईट कामासाठी करुन. त्यातच त्या गुरुंनाही बदनाम करतात, जो ज्ञान देतो. गुरु द्रोणाचार्यनं सर्वांना ज्ञान दिलं. समान ज्ञान दिलं. चांगलं पारंगत केलं. परंतु त्यांच्यापासून घडलेला शिष्यपरीवार हा चांगलाही घडला की ज्यांनी धर्म सोडला नाही आणि वाईटही घडला की ज्यांनी धर्म सोडला व अधर्म मनात बाळगला व जे अधर्मानं वागले. 
          ज्ञान हे जर धर्माला धरुन असेल तर ते प्रभावी ठरत नाही. याचं उदाहरण म्हणजे ज्या परशुरामानं एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली. त्यांनी भविष्याला व कर्णाला शिकवलं नव्हे तर त्यांचे गुरु बनले. परंतु भिष्म अधर्माला धरुन असल्यानं ते प्रत्येकवेळेस पराभूत झाले. एवढ्या मोठ्या गुरुचे शिष्य असतांना. जे गुरु कधीच पराभूत झाले नव्हते. मात्र भिष्म अधर्माचा धरुन राहिल्यानं त्यांना अर्जुन, प्रदुम्न व श्रीखंडीनं पराभूत केलं. तेच घडलं कर्णासोबत. कर्णानंही अधर्माला मदत केल्यानं तोही प्रत्येक वेळेस अर्जुनाकडून पराभूत झाला. महाभारताचंच युद्ध नाही तर विराट युद्धाच्या वेळेसही. विराट युद्ध वेळेस कर्णासोबत विशाल सेना होती आणि अर्जुन एकटा होता तरीही. 
           महत्वपुर्ण गोष्ट आणि वस्तुस्थिती ही की ज्ञान हे ज्ञान असतं. ज्ञानाला दोन बाजू असतात. त्या ज्ञानाचा वापर आपण कसा करतो? यावर भवितव्य अवलंबून असतं. जसं मोबाईलचं उदाहरण घेवू. मोबाईल एक ज्ञानच आहे की एका क्लीकवर सर्व माहिती एका सेकंदात मिळते. मोबाईलचा वापर आपण चांगल्या कामासाठीही करु शकतो आणि वाईट कामासाठीही करु शकतो. परंतु यात आपण जर वाईट कामासाठी त्याचा वापर केला तर आपले वाईटच होईल व चांगल्या कामासाठी केला तर आपले चांगलेच होईल. तेच गुरुचंही आहे. चांगला गुरु हा कधीच वाईट शिकवीत नाही. तो चांगलेच ज्ञान देतो. परंतु आपण त्यानं दिलेल्या ज्ञानावर विचार न करता त्यानं दिलेल्या ज्ञानाचा वापर वाईट कामासाठी करतो,  त्यात अधर्म आणतो. मग त्यात आपलं वाईट होतं. मग त्याचा दोष आपण गुरुंना देतो की माझ्या गुरुनं मला वाईट ज्ञान दिलं. तसंच असं म्हणत आपण आपल्या गुरुंना बदनाम करतो. परंतु तसं म्हणतांना आपण त्या गुरुंचे परीश्रम लक्षात घेत नाही. त्यांची आपल्याप्रती असलेली निष्ठा वा भावना लक्षात घेत नाही. यासाठीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती बनताच शिक्षकांना सन्मान मिळावा म्हणून आपला जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांचा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून संपुर्ण भारतात साजरा केला जातो. 
            विशेष सांगायचं झाल्यास कोणताही गुरु हा वाईट ज्ञान प्रसवत नाही. शिकवीतही नाही. खुन कसा करावा हे सांगत नाही वा चोरी कर म्हणत नाही. तो आपले अनुभव सांगतो, जे त्यानं भोगलेले असते. तुम्ही तसं करु नका. कारण त्याचे भोगवाद वाईट असतात. यासाठीच तो आपले अनुभव सांगत असेलही कदाचीत. परंतु आपण त्या गोष्टीतील बरेवाईटपणा न शोधून त्यानं तसं केलं ना, मग मलाही तसं करु दे असं म्हणत असतो व अधर्म पकडतो. अधर्मानं वागण्याचा विचार करतो व वागतोही. त्यानंतर आपलं वाईट होतं आणि ते वाईट झाल्यास त्याचा दोष गुरुंना देतो. तसा दोष आजपासून तरी कोणीही देवू नये म्हणजे झालं. 
           शिक्षकदिन........ या दिवशी शिक्षकांना सन्मानही मिळतो. परंतु ह्या शिक्षकांना सन्मान मिळत असला तरी शिक्षण सर्वदूरपर्यंत पोहोचले तरी काय? त्याचं उत्तर नाही असंच येईल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन. हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. तेव्हा सर्वांना एकच सांगणं असेल की त्यांनी या दिवसाची आठवण म्हणून या दिवशीपासून अशी प्रतिज्ञा घ्यावी की आजपासून मी मला मिळालेल्या ज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठीच करीन. तसंच गुरुंनाही सांगणं आहे की त्यांनी विद्या शिकवितांना त्या चांगल्या कामासाठी अन् चांगल्या विद्या शिकवावं. वाईट ज्ञान वा विद्या शिकवू नये. जेणेकरुन या शिक्षकदिनाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल व प्रत्येकाला शिक्षकदिन मनापासून वाटेल हे तेवढंच खरं आहे. परंतु सर्व शिक्षक तसं करीत नाहीत. काही शिक्षक याला अपवाद असतात. ते ऐषआरामात व्यस्त असतात वा द्रोणाचार्यसारखेही काही शिक्षक असतात. द्रोणाचार्यनं जसं राजपरीवारातीलच लोकांना शिकवलं. इतरांना नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास कर्ण व एकलव्याचं देता येईल. त्यांची इच्छा असतांनाही त्यांना द्रोणाचार्यनं शिकवलं नाही. कारण त्याच्यावर राजपरीवारीक बंधन होतं. आताही तेच घडत आहे. चांद्रयान वा सुर्ययान मोहिमेत हिस्सा घेणारे शास्रज्ञ हे गरीब, आदिवासी वस्तीतून आलेले नसतीलही. कारण त्यांच्यात कल्पकता असली तरी त्यांच्यात शिक्षण निःशुल्क नसल्यानं तेवढं शिक्षण घ्यायची कुवत नसते. प्रसंगी त्यांचा गुरु हा त्यांची एकलव्यासारखी शिक्षण शिकायची कुवत असतांनाही द्रोणाचार्यसारखाच असतो. जो केवळ श्रीमंतांनाच शिकवू शकतो. त्यांनाच शास्रज्ञ बनवू शकतो व त्यांनाच चांद्रयान वा सुर्ययान प्रकल्पाची निर्मीती करायला लावू शकतो आणि समजा काही आदिवासी मुलं जर अशी एकलव्यासारखी आपली प्रतिभा दाखवत असेल आणि चांद्रयान वा सुर्ययानाची निर्मीती करु पाहात असतील तर त्यांचा अंगठा ही कापला जावू शकतो.

************************************************

           सुजीतचे बाबा आत्महत्या करुन मरण पावले होते. तशी त्याच्या शिक्षणाची आबाळ होणार होती. कारण आता घरी कामं करायला व पोट भागवायला कोणीच नव्हतं. 
         सुजीत आदिवासी भागात राहात होता. तो भाग तसं पाहता डोंगराळ नव्हता. कारण डोंगर त्यांच्या अधिवासापासून बरंच लांब होतं. परंतु जंगल लागून होतं. 
         दरवर्षी चांगला पाऊस पडायचा तिथं. परंतु ज्यावेळेस त्याचे बाबा आत्महत्या करुन मरण पावले. त्यावेळेस निसर्गाचा प्रकोप झाला होता. झाडं जाणूनबुजून तोडली गेल्यानं निसर्गानं आपलं रौद्ररूप दाखवलं होतं. त्यातच त्यावर्षी पाऊस आला नाही. त्यामुळंच आत्महत्या. तब्बल अख्ख्या गावात उपासमारीच्या दणक्यानंतर सात आत्महत्या झाल्या होत्या त्यावर्षी व ते गाव आत्महत्याग्रस्त गाव म्हणून जाहीर झालं होतं. गावाला आत्महत्याग्रस्त गाव म्हणून मदतही मिळाली होती. 
          गाव जंगलाला आधी लागून असल्यानं ते गाव आदिवासी गाव म्हणून घोषीत होतं. त्या गावातही जायला यायला नीट रस्ते नव्हते. सडकाही नव्हत्या. शेतजमीन ही डोंगराच्या पायथ्याशी आहे. असे लोकं म्हणत असत. तसंच गावात शिक्षणाच्या सोई नव्हत्या. त्यामुळं गावातील मुलांना शिक्षण शिकण्यासाठी दूर गावात पायी पायी पायपीट करीत जावं लागायचं. तेच हाल होते सुजीतचे. 
           गावात एक नदी होती. त्या नदीवरही पुल तसा नव्हताच. एक ओंडका असायचा. तो पावसाळ्यात वाहून गेलेला असायचा. त्यामुळंच तिथं ओंडका टाकेपर्यंत गावातील मुलं शाळेत जातांना त्याच नदीतून पोहत पोहत जात असत. पावसाळ्यात नदीला पूर असायचा. तेव्हा तो पूर  पूर्ण ओसरेपर्यंत शाळा बंद असायची.     
          पावसाच्या पाण्यात ओंडका वाहून गेलेला असायचा. तेव्हा मात्र बरीच आबाळ व्हायची. गावात शाळा नव्हती. त्यामुळंच शिक्षण मिळायचंच नाही त्या गावातील लोकांना. तसंच गाव जंगलातच असल्यानं गावात हिंस्र श्वापद शिरायचे. ते हिंस्र श्वापद गावाच्या पाचवीलाच पुजलेले असायचे. 
            गावातील जंगल व त्याही परीसरातील भाग लाकुडकटाईनं नष्ट झाला होता. आज तो भाग मैदान बनला होता. परंतु त्या मैदानी भागात अजुनही कोणत्याच सोयी झाल्या नव्हत्या ना नदीवर पूल बनला होता. त्यामुळंच की काय, आजही नदीवरुन पायपीट करुन शिक्षणासाठी ती लेकरं जात होती. 
         चांद्रयान मोहीम यशस्वी झाली होती. ते बहुतेक निसर्गाशीच खेळणं होतं असे काही गावातील काही लोकं म्हणत होते. म्हणूनच पावसानं याचवर्षी अचानक दडी मारली व आत्महत्या घडल्या असंही गाव म्हणत होतं.
            चंद्र वा सुर्य हे निसर्गाचे घटकच. त्या घटकांना पुर्वी देव मानल्या जात होतं. परंतु मानवानं चंद्र कोण आणि सुर्य कोण? हे सिद्ध केलं होतं. ती एक वैज्ञानिक बाजू होती. त्याचा पावसाशी कोणताच संबंध नव्हता. पाऊस हा जंगलतोड झाल्यानं येत नव्हता. जंगलतोडीचाच पावसावर परिणाम झाला होता. परंतु लोकं चांद्रयान व सुर्ययानालाच दोष देत होते. म्हणत होते की या देशानं चक्क देव असलेल्या सुर्य, चंद्रावर यान पाठवलं. त्यामुळंच चंद्र व सुर्य कोपले व  पाऊस येत नाही.
          सुजीत मोठा होत होता. तसं पाहता त्याला शिक्षणाची अतीशय आवड होती. त्याला शिक्षण शिकतांना मोठी कसरत करावी लागली होती. तो गावातून भल्या पहाटेच निघत असे व मित्रासमवेत तो सकाळीच शिक्षणासाठी शेजारच्या शाळेत निघत असे. जी शाळा जवळपास चार ते पाच मैल अंतरावर होती. पुर्वी याच वाटेनं जातांना वाघ सिंहासारख्या हिंस्र श्वापदाची भीती असायची. आता मात्र ती भीती नव्हती. शाळेत जात असतांना वर्षाचे आठ महिने चांगले जायचे. परंतु वर्षाचे आठ महिने जाताच जेव्हा पावसाळा लागायचा. तेव्हा मात्र त्याच्यासमोर समस्या थयथय नाचत असायच्या. त्या समस्या तेव्हा अधिक तीव्र व्हायच्या. जेव्हा पावसाळ्यात गावच्या नदीला तीव्र पाणी असायचं. मग तर शाळाच बुडायची. 
          सुजीतचे बाबा मरण पावले असले तरी शाळेत जायची त्याची आवड काही कमी झाली नाही.  गावची मुलं काही जास्त शिकत नव्हती. तसं पाहता त्यांना शाळेत जायची आवडही नव्हती. गावच्या नदीला पूर येताच ते चक्क घरी राहायचे. परंतु सुजीत घरी राहायचा नाही. तो नदीला पूर जरी असला तरी नावेत बसून नदी पार करीत असे व एकटाच तो शाळेत जात असे. त्याची ही शाळेत जायची तीव्र इच्छा पाहून नावाडीही त्याला नदी पार करुन शाळेत सोडून देवू लागला. 
          शाळा पहिली ते सातवीपर्यंत ठीक होती. त्या काळात शाळा चार पाच मैलावर का असेना, तो कसातरी चार महिने नदी पार करुन जात होता नव्हे तर बाकी महिने धावत पळत जात होता. त्या वर्गात शिकतांना त्याला पैसेही लागत नव्हते. तसं पाहता ते शिक्षण निःशुल्क होतं. परंतु जसा तो सातवी पास झाला व आठवीत गेला. तशी आणखी एक समस्या निर्माण झाली. ती म्हणजे शाळा. गावच्या चार पाच मैलावर आता सातवीपर्यंत शाळा होती. शिवाय आठवीचा वर्गच नव्हता. तसं पाहता त्याला काय करावं सुचत नव्हतं. 
           शाळा.......तिही आठवीपर्यंत. बाकीची मुलं आठवीपर्यंतच शिकत होती. त्यानंतर ती आपली शाळा सोडून देत होती. परंतु सुजीतला शिकायचे होते. काय करावं सुचत नव्हतं. अशातच गावातील कोणीतरी सांगीतलं, 'शिकायचं असेल तर तुला परीश्रम करावेच लागतील. तुला तालुक्यातील शाळेत शिकायला जावंच लागेल. तिथं वसतिगृहाची सोय आहे. वाटल्यास तू जा तिथं आणि वसतीगृहात नाव टाकून शिक्षण घे.'
            त्या व्यक्तीचं ते बोलणं. तसा सल्लाही दिला होता त्या व्यक्तीनं. त्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार चालायचं असं सुजीतनं ठरवलं व त्यानं आपल्या आईशी त्यावर बोलायचं ठरवलं. 
            आईशी त्या विषयावर बोलायचं. त्या विषयावर बोलायचं कसं. तो विचार करु लागला. तशी त्याची आई अज्ञानीच होती. तिला शिक्षणाचा गंध नव्हता. परंतु तिला मुलगा शिकावा असं वाटत होतं. परंतु तिच्याहीसमोर उपाय नव्हताच. तिलाही काही सुचत नव्हतंच. त्यामुळंच ती चूप होती. मुलगा शिको वा न शिको तिला फरक पडत नव्हता. परंतु त्याला शिकायचं होतं. त्यामुळं त्याला रात्र केव्हा होते व आपण त्याविषयी केव्हा केव्हा विचारविमर्श करतो असं त्याला होवून गेलं होतं. 
           सातवी पास होताच त्याची इच्छा होती की आपण शिकायला हवं. आठवीत नाव टाकायला हवं. त्यासाठीच तो रात्र उजाडण्याची वाट पाहात होता. कारण आता आई नव्हतीच. ती कामावर गेली होती. 
            रात्र झाली. तशी त्याची आई कामावरुन आली. तिनं हातपाय धुतले व ती जेवन बनविण्यात गुंतली. अशातच सुजीतही तिच्या चुलीजवळ बसला. तशी त्याच्या आईनं कणीक काढली व तिला पोळ्या बनविण्यासाठी मळणं सुरु केलं. तोच संधी साधून तो म्हणाला, 
           "आई मला शिकायचंय."
           आईनं ती आपल्या मुलाची कणव ऐकली. तसा तिला विचार आला. मुलगा शिकणार. त्याला तशी शिकायची आवड आहे. परंतु शिकणार कसा? गावात एकही शाळा नाही की जिथं शिकवता येईल आणि तालुक्याशिवाय शिकण्याला तरणोपाय नाही  काय करावं? कसं शिकवावं? मुलगा तर शिकतो म्हणतोय. 
          मुलाची शिकण्याची इच्छा. मुलानं आईला विचारलेलं. शिकण्याची इच्छा व्यक्त केलेली. तसं त्यावर बोलणं वा उत्तर देणं भाग होतं. त्यामुळं ती म्हणाली,
          "शिक. परंतु कसा शिकणार बाळ? बाजूच्या गावात शाळा नाही. तालुक्यातील शाळेशिवाय पर्याय नाही. अन् तालुक्यातील शाळेत नाव जरी टाकलं तरी जाण्यायेण्याची सोयही नाही. तिथं आपले कोणी नातेवाईकही नाही की तुला ठेवता येईल. मग कसं शिकता येईल तुला?"
            आईचा तो प्रश्न. तसा तो म्हणाला, 
            "आई शोधल्यावर मार्ग सापडतो. मी करीन मेहनत. तालुक्यातील शाळेत शिकीन. मी गावातील एका माणसाला विचारलं. त्यावर तो म्हणाला."
            "काय म्हणाला तो?"
            "तो म्हणाला की तालुक्यातील शाळेत जर शिकायचं असेल तर तिथं राहण्यासाठी वसतीगृहाची सोय असते. त्या वसतीगृहात जेवन खावण मिळतं. शिवाय राहताही येतं. आपण तसं विचारु तिथं. त्याची चौकशी करु."
           आईनं ते ऐकलं. तशी ती विचार करु लागली की जर मुलगा वसतीगृहात गेला तर ती गावला एकटीच राहणार. तिला करमणार नाही. मग ती बाकीचे दिवस कसे काढणार? तरीही तिनं दुसरा विचार केला.जर मुलाला शिकायची इच्छाच आहे तर आपण त्याच्यात आडकाठी होवू नये. शिकवावं आपल्या मुलाला. आपला मुलगा शिकेल तर आपल्याच मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल. आपण प्रसंगी एकटेपणाचा विरह सहन करु. तिनं विचार केला. तशी ती म्हणाली,
           "ठीक आहे तर......."
           आईनं शिक्षणासाठी होकार दिला होता. तो शिक्षणासाठी दिलेला होकार त्याला आनंदाची पर्वणीच वाटली. त्याच्या मनात आनंद अगदी उड्या मारत होता.
           रात्री त्यांनी जेवन केलं. तशी सकाळ झाली व सकाळीच लवकर लवकर तयारी करुन त्याची आई मुलाच्या शिक्षणासाठी तालुक्याला गेली व ती आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी हिरीरीनं विचारपूस केली. विचारांती तिला समजलं की तिथं वसतीगृहाची सोय असून ती तिच्या लेकराला तिथं व्यवस्थीत टाकू शकते व शिकवूही शकते.
             सुजीतच्या आईचं नाव सुमन होतं. सुमननं आपल्या मुलाला तालुक्यातील शाळेत टाकलं व त्याचबरोबर तालुक्यातील वसतीगृहात. तसा सुजीत त्या तालुक्यातील वसतीगृहात शिकू लागला होता. 
          सुजीत आठवी नववी शिकला. आठवा नववा वर्ग चांगला गेला. कारण ती शाळेची परीक्षा होती. परंतु आता तो दहावीत गेला होता. ती शाळेची परीक्षा नव्हती तर ती एक बोर्डाची परीक्षा होती व ती शाळेत होणार नव्हती तर ती बाहेरच्या शाळेत अर्थातच केंद्रावर होणार होती. त्यामुळं भय ते होतंच. अशातच तिही परीक्षा आटोपली व सुजीत चांगल्या गुणानं पास झाला. त्यानंतर आईला फार आनंद  झाला व तिला तिच्यावर बेतलेले ते जुने दिवस आठवले. ज्यावेळेस सुजीत आठवीत गेला होता व त्याला तालुक्यातील शाळेत टाकलं होतं. तेव्हा तो तालुक्यातच वसतीगृहात राहात असल्यानं तिला एकटंच घरी राहावं लागत होतं. तिला जवळचं असं कुणीच नव्हतं. त्यामुळंच ती एकटीच असल्यानं तिला घरी करमतही नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. सारखी त्याचीच आठवण येत होती. परंतु तिही हिंमत हारली नाही. हिंमत धरुन ती एकटीच राहिली गावाकडं आणि त्या घरात. ज्या गावात तिचं तेच एक घर होतं. आज ती आनंदात होती, कारण सुजीत दहावी पास झाला होता व तिनं भोगलेल्या सर्व कष्टाचं चीज झालं होतं.
            सुजीत अकरावीला गेला होता. त्यानं चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. परंतु यावेळेस काही त्याचा नंबर वसतीगृहात लागला नाही. तसं पाहता महाविद्यालयात प्रवेशही निःशुल्क मिळाला नव्हता. त्याला पैसा पडला होता. 
           सुजीतचा वसतीगृहात नंबर न लागल्यानं सुजीत निराश झाला. आता काय करावं असा विचार त्याच्या मनात आला. तसं पाहता त्याच्या मनात शिक्षणाची आस होती. परंतु त्याचेजवळ पुरेसा पैसा नव्हता. आता विचार आला की काय करावं? शिक्षण शिकायचं आहे तर काही ना काही करावंच लागेल. अशातच त्यानं ती गोष्ट आईसमोर बोलून दाखवली. तशी आईनं हिंमत दिली. म्हणाली, 
           "शिक. पैशाची चिंता करु नकोस."
            आईनं बोललेले बाळाला शब्द. ते शब्द नव्हते तर ते एक वचन  होतं. त्या शब्दानं सुजीत पुरता भारावला. त्याच्या मनात नवा उत्साह संचारला. पैसे लागतील तेव्हा लागतील. परंतु त्याची आई जे शब्द बोलली होती. ते शब्द अगदी महत्वाचे होते. 
           सुजीतची आई ते शब्द बोलताच भारावलेल्या सुजीतनं महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यानं झोपडपट्टीत एक लहानसा कमरा घेतला व तो तिथं राहू लागला. त्यानंतर तो दिवसभर महाविद्यालयात जात होता व रात्रीला खानावळीत काम करु लागला होता. ज्या खानावळीत त्याला जेवन मिळायचं आणि थोडेफार पैसेही खानावळीतील मालक कबूल झाला होता. 
            एकदोन महिने उलटले होते. खानावळी मालक काम फार घ्यायचा. परंतु पैसे द्यायचा नाही. म्हणायचा की त्यानं ते पैसे गोळा ठेवावे. तो मालक ते पैसे एकाचवेळेस देणार. परंतु सुजीतला शिक्षणाला पैसे लागत होते. त्यामुळं त्याला पैसे मागणे भाग होते. अशातच त्यानं दोन महिने वाट पाहिली व त्यानंतर पैसे मागीतले. परंतु खानावळी मालकाचं तेच धोरण. शेवटी तो पैसे मागत राहिला. परंतु तो पैसे मागत जरी असला तरी त्याला खानावळीतील मालकानं पैसे दिले नाही. उलट तो म्हणत होता की त्याचं जेवन जास्त आहे. ते जेवन एवढं आहे की त्या जेवनातच त्याचे सर्व पैसे कापले.  वाटल्यास तो ते काम सोडून जावू शकतो. 
           सुजीतचं ते तरुणाईचं वय. त्याला भूक फार लागत होती. त्यामुळंच तो पोटभर जेवण करीत होता तो आणि खानावळीतील मालक तो कामावर लागतांना पोटभर जेवन व पैसे देईल असे कबूल झाला होता.
          खानावळीतील मालकानं पैशासाठी केलेली भणभण. ती भणभण ऐकून सुजीतचं डोकं खराब झालं होतं. ती तळपायाची आग मस्तकात गेली होती. परंतु उपाय नव्हता. कारण तो प्रारब्धाचा दोष होता. त्यामुळंच त्या खानावळीतील मालकाच्या वागण्याचा व वर्तणुकीचा त्याला एवढा राग आला की त्याला तिथं काम करणं बरं वाटलं नाही व त्यानं त्यानंतर ती खानावळच सोडून दिली. 
           सुजीतनं रागात येवून राग पचवता न आल्यानं खानावळ सोडली. तसं पाहता अस्मितेसाठी ती खानावळ सोडणं भाग होतं. कारण त्यात ते जेवन व सोबत पैसे देण्याचं वचन न पाळलं गेल्यानं त्यात सुजीतचा अपमानच झाला होता. त्यातच त्यानं खानावळ सोडली. परंतु या गोष्टीनं त्याचं बरंच नुकसान झालं. आता ना जेवन निःशुल्क मिळायचं ना काही नाश्ता. उलट आता जेवणासाठी त्याला जवळचे पैसे लागत होते. तसं पाहता त्याची आई पैसे देत होती त्याच्या खर्चासाठी. परंतु तेही पैसे तुटपुंजेच होते. ते पैसे पुरत नव्हते.
           सुजीतला पैशाची भासणारी अडचण. ती लक्षात घेता सुजीत पैशासाठी वणवण भटकत होता. दिवसभर महाविद्यालयात जायचा व सायंकाळी घरी आल्यावर कामासाठी फिरायचा. परंतु काम काही मिळत नव्हतं. अशातच एका खानावळीतच एक काम नशीबानं आलंच. त्या मालकाचं म्हणणं होतं की तो पैसे देणार नाही. परंतु जेवन पोटभर देईल व राहायलाही देईल. तसं पाहता तिथंच राहावं लागेल ही अट खानावळीतील मालकाची होती. 
          खानावळी मालकाची विचित्र अट. ती अट पाहता खानावळीतील मालकाची तशी अट असली तरी पोट आणि पैशासमोर सुजीत चूप बसला. त्याचं कारण होतं वाचला जाणारा पैसा. तो जर खानावळीत राहिला असता तर स्वतंत्र्य अशा कमऱ्यासाठी लागणारा पैसा वाचणार होता. तो वाचणारा पैसा त्याच्या शिक्षणाच्या कामात येणार होता. शिवाय जेवनही तिथं पोटभर मिळणार होतं, त्यामुळं त्याचा जेवणासाठीही  लागणारा पैसा हा वाचणार होता. त्यामुळंच त्यानं अशा गोष्टी अटी असल्या तरी होणारा लाभ पाहून ताबडतोब होकार दिला. कारण त्याला त्या गोष्टीची तशी अतिशय गरजच होती. आता खानावळीतील मालकाशी तशा स्वरुपाचं बोलणं होताच त्यानं लवकरच तो कमरा सोडला व तो आपलं सर्व सामान घेवून खानावळीत राहायला आला. त्यानंतर तिथंच राहून तो ज्ञानाचे धडे गिरवू लागला होता.
            ती खानावळ...... सुजीत तिथं राहू लागताच तो तिथं काम करु लागला. तो महाविद्यालयातून यायचा व हातपाय धुवून कामावर लागायचा. त्यानंतर ते काम रात्री अकरापर्यंत चालायचं. अकरा वाजता दुकान बंद व्हायचं. त्यानंतर सुजीत जेवन करायचा व तो झोपी जाईपर्यंत त्याला बारा वाजायचे. त्यानंतर सकाळी पाचलाच उठावं लागायचं. 
          सकाळी पाचला उठताच हातपाय धुवून टेबल लावून टेबल पुसून नाश्ता बनवावा लागायचा. त्यानंतर पुन्हा महाविद्यालयात जाण्याचा वेळ होईपर्यंत त्याला काम करावं लागायचं. त्यानंतर धावतपळत त्याला अंघोळ व जेवन करावं लागायचं. तसंच जेवन झालं की धावतपळत महाविद्यालयात जावं लागायचं. 
           ते धावपळीचं जीवन. ते जीवन जगतांना धावपळ होत होती. पुरेसा वेळच मिळायचा नाही. त्यामुळंच ते जीवन व ते काम त्याला कटकटीचं वाटत होतं. त्यामुळं त्याला ते सोडावं वाटत होतं. परंतु आता उपाय नव्हता. कारण आता किरायाच्या रूमचा व जेवनाचा पैसा वाचत होता. जी त्याची आता मजबूरी बनली होती. 
          कसंबसं अकरावीचं वर्ष पार झालं. आता बारावीचं वर्ष होतं. त्यातच त्यावर्षी बोर्डाची परीक्षा होती. ती परीक्षा पाहता यावर्षी जोरदार अभ्यास करणं भाग होतं. परंतु तो तर या खानावळीत होता. दिवसभर राबत होता तो. त्याला अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. उपाय काही निघत नव्हता. अशातच तो दुकानावरचे गिऱ्हाईक सांभाळता सांभाळता अभ्यास करु लागला. सोबतच तो महाविद्यालयात नियमीत जायचा व शिकविणाऱ्या प्राध्यापकाचं लक्षपूर्वक ऐकायचा. तोच अभ्यास........त्याच अभ्यासाच्या भरवशावर तो बारावी पास झाला. 
           सुजीत बारावी पास झाला होता. ना त्यानं शिकवणी वर्ग लावला होता, ना त्यानं कोणाकडून मार्गदर्शन घेतलं होतं. फक्त महाविद्यालयातील तासिका नियमीत केल्या होत्या. त्याच अभ्यासाच्या जोरावर तो बारावी पास झाला होता. आता त्यानं खानावळीत असतांनाच पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. 
          तो पदवीधराचा अभ्यासक्रम. त्याच पदवीधराच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेताच त्यानं ती खानावळ सोडली. कारण त्याला तेव्हापर्यंत उमग येवून गेली होती. आता खानावळीत काम करणं त्याला लाजीरवाणी गोष्ट वाटत होती. कारण कधीकधी जेव्हा अनवधानानं त्याचे मित्र खानावळीत येत. ते त्याला टेबल पुसतांना पाहात. तेव्हा त्याला लाज वाटायची. कधी मुलीही येत. त्या मुली त्याला काहीबाही बोलून जात. तेव्हा वाटायचं की आपण हे काम करायला नको. ती लाजीरवाणी गोष्ट पाहता त्यानं पुढे ती खानावळीतील नोकरी सोडून दिली. 
         तो पदवीधराचा अभ्यासक्रम. तसं आता त्याला तो अभ्यासक्रम शिकत असतांना नियमीत महाविद्यालयात जावं लागत नव्हतं. त्यामुळंच की काय, तो आता गावाकडं आईजवळ राहू लागला. आईसोबत गावात कामंही करु लागला. आईला कामात मदत करु लागला. तसाच तो आपल्याच शेतात राबू लागला.
         आजपर्यंत मुक्ताबटईनं असलेली शेती. आता त्यानं शेती करण्यासाठी आपल्या ताब्यात घेतली होती व  आता तो शेती करु लागला होता. शेतीत त्याला आवड निर्माण झाली होती. आतापर्यंत जणू ओसाड पडली होती ती शेती. त्यानं उपयोगात आणली होती. आजपर्यंत त्याच्या आईनं त्या शेतीला ठेक्या बटईनं देवून सांभाळून घेतलं होतं व आपला संसार सांभाळून घेतला होता. परंतु यावर्षी पहिल्यांदाच त्यानं शेती आपल्या ताब्यात घेतली व त्यानं शेती केली होती. ती शेती त्यानं ताब्यात घेताच त्यानं त्यावर झाडं लावली. 
          झाडं हळूहळू मोठी होवू लागली होती व त्याचबरोबर त्याचं शिक्षणही पुर्ण होवू लागलं होतं. तुरळक येणारा पाऊस त्याच्या झाडांना मोठं करु लागला होता. तसं पाहता त्याचा अभ्यासक्रम पुर्ण होताच त्यानं नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. जो अभ्यासक्रम शेती व्यवसायावर आधारीत होता. आज त्याचा शेतीवरील अभ्यासक्रमही पुर्ण झाला होता. 

************************************************

           देश विकसीत झाला होता. त्याचबरोबर देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते. शहरात मोठमोठ्या सरकारचा विस्तार होवू लागला होता. त्याचबरोबर उडाणपुलंही बनू लागले होते. तशीच शहरात मेट्रो सुविधा निवास करु लागली होती. अनेक तालुके मेट्रोला जोडले जावू लागले होते. परंतु त्याचं ते गोविंदपूर गाव....... ते गाव अद्यापही सुधारणेच्या कक्षेबाहेर होतं. त्या गावात आजही एवढे अधिवास होवूनही ना एसटी पोहोचली होती ना एखादी शाळा. ती शाळा का पोहोचली नव्हती? याचं कारण सुजीतलाही कळत नव्हतं.  त्याचं कारण होतं तेथील नेत्यांचं राजकारण. ते नेते गावात फक्त मतदानाच्या वेळेस येत. लोकांना भुलथापा देत व त्यांच्याकडून मतदान काढून घेत. प्रसंगी या गरीब लोकांना त्यांच्या हातात एक नवी कोरी नोट टिकवून देत. तेवढ्याच रकमेत खुश होवून व एक दिवसाची दारु पिवून ते लोकं चूप बसत असत. त्यानंतर ही मंडळी येणाऱ्या निवडणुकीपर्यंत म्हणजेच पाच वर्षपर्यंत गावातच भटकत नसत. कदाचीत त्यांना त्या गावात यायची एलर्जी असायची. 
         मतदान.......त्यांच्या मतावर जगणारी ही नेतेमंडळी. ती मतदानापुरती यायची व मतदान संपलं की पाच वर्षापर्यंत भटकायची नाही. 
          गोविंदपूर ते गाव. त्या गावात आजही शेती पिकत नव्हती. कारण पाऊस. पाऊस आता तुरळक स्वरुपात पडत होता. पाऊस न येण्यानं शेतीला मुबलक पाणी मिळत नसल्यानं लोकांची संख्याही गावात रोडावली होती. 
          सुजीत पदवीधर झाला होता. त्याचबरोबर त्यानं कृषीचं शिक्षणही घेतलं होतं. ते शिक्षण पाहता त्याला गावासाठी काही करावंसं वाटत होतं. तसं गावातील काही आबालवृद्ध त्यांच्या काळातील परिस्थितीचं वर्णन करायचे. म्हणायचे की गाव जंगलाला लागून होतं. गावात भरपूर पाऊस पडायचा. आता जंगल नाही व पाऊसही नाही. 
          सुजीत विचार करायचा आपल्या गावाबद्दल. गावाचा विकास का झाला नाही त्याचा. त्याचं गावावर प्रेम होतं. तो विचार करीत असतांना त्याला शहर आठवलं. तो शहराचा झालेला विकास आठवला. शहरातील मेट्रो सुविधा आठवली व आठवला तो तालुका. जो मेट्रोवाहिणीनं शहराला जोडला होता. तशाच आठवल्या त्या रुंद झालेल्या सडका. शहरात व शहरालगत सडकांचंही रुंदीकरण झालं होतं. परंतु त्याच्या गावात अद्यापही एक साधी डांबरीकरणाची सडक बनली नव्हती. एवढ्या वर्षाच्या दिर्घ कालावधीनंतर गावात एक फक्त दगडाची सडक बनली होती. ना पिण्याच्या पाण्याची सोय गावात होती ना कोणत्या सोयी. 
         सुजीत एकमात्र गावात शिकलेला तरुण होता. त्यानं विचार केला आपल्या गावच्या विकासाचा. तशी बरीचशी गावं गोविंदपूर सारखी होती की ज्या गावात गोविंदपूर सारखाच विकास झाला नव्हता. त्यानं संविधानाचाही अभ्यास केला होता. संविधानाचं महत्व त्याला कळून चुकलं होतं. त्यानं ठरवलं, आपण निवडणुकीत उभं राहावं. परंतु आपल्याला निवडणुकीत निवडून देणार कोण? ना आपल्याजवळ पैसा आहे, ना आपल्याजवळ कार्यकर्त्याची फौज. कसे निवडून येणार. तरीही आपण उभं राहून पाहावं. नशीब आजमावून पाहावं. 
         ती पहिली वेळ. ती पहिली वेळ होती त्याची निवडणुकीला उभे राहायची. तसा तो उभा राहिला. परंतु त्याला या निवडणुकीत अपयश आलं. कारण लोकांना त्यांच्या गोष्टीचं कुतूहल वाटत नव्हतं. त्यांना सवय होती दारु आणि पाचशे रुपयाच्या नोटांची. ते आपला विकास पाहात नव्हते तर ते फक्त एका वेळेची दारु व पाचशे रुपयाची नोट पाहात होते. उद्याचं कोणं पाहिलं. आजचा दिवस गोड व्हावा म्हणजे झालं असं त्याचं मत होतं. 
            सुजीत निवडणुकीत उभा राहिला होता. त्यानं प्रयत्न केला होता. परंतु अपयश आलं होतं. त्याला फक्त अपयश आलं होतं. परंतु तो उमेद हारला नव्हता. तसा तो विचार करु लागला होता व आपल्या अपयशाची कारणं शोधू लागला होता. 
          सुजीत विचार करु लागला. तसं त्याला आठवलं की आपण लोकांना संविधानाचं महत्व निवडणुकीवेळेस समजावून सांगीतलं. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण लोकं हे अडाणी आहेत.  यांना मतदान आणि संविधान कुतूहल आहे. त्याबद्दल कुतूहल वाटतं यांना. आता आपण यांना संविधानाचं महत्व समजावून सांगण्याऐवजी गावचा विकास कसा करावा त्याकडे विशेष लक्ष द्यावं. तसंच इतरही गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावं. त्यासाठी आपल्यात असलेल्या गुणांचा उपयोग करावा व आपण मिळविलेल्या शिक्षणाचाही वापर करावा. 
          सुजीत गावाच्या विकासाचा विचार करु लागला. विकासाअंती त्याला लक्षात आलं की पुर्वी गावात जंगल होतं. तेव्हा गावात पाणी पडत होतं. परंतु आपल्या लहाणपणी गावातील जंगल तोडलं गेलं. तेव्हापासूनच गावात बरोबर पाऊस पडत नाही. मनात तसा विचार येताच तो त्यानं भुतकाळात त्याच्या गावाबद्दल सरकारनं जी चूक केली, त्या चुकीचा तो विचार करु लागला व विचार करु लागला की आपण आपल्या गावातील लोकांना झाडाचं महत्व लक्षात आणून द्यावं. त्यांना झाडं लावायला लावावी. जेणेकरुन गावात पाऊस पडेल. 
           तो गावातील लोकांना झाडाचं महत्व सांगू लागला होता. तसं आपल्या शेतातच झाडं लावायला सांगू लागला होता. अशी झाडं लावायला सांगत होता की ज्या झाडापासून दोनचार रुपयेच नाही तर कित्येक रुपयाचा नफा मिळवता येईल. 
           सुजीतनं गावाला सांगीतलेलं झाडाचं महत्व. त्या झाडांपासून पाऊस येतो असं सांगताच काही लोकांनी त्याचं ऐकलं व झाडं लावली. तशीच ती झाडं आजुबाजूच्याही गावच्या लोकांनी लावली व एक नवी क्रांती झाली. त्या क्रांतीनुसार आता गावागावात पाऊस येवू लागला व सुजीतनं सांगीतलेला उपाय गावातील लोकांना पटला. त्याचबरोबर त्यांना त्याच झाडांपासून भरघोस उत्पादनही मिळू लागलं. 
          सुजीतनं सांगीतलेला उपाय लक्षात घेता लोकांना जसा फायदा झाला. त्याच गोष्टीचा फायदा घेवून सुजीतनं लोकांना निवडणुकीचं महत्व व संविधानाचं महत्वही समजावून सांगायला सुरुवात केली. तसं ते हळूहळू लोकांना पटायला लागलं. तसा सुजीत पुन्हा निवडणुकीत उभा राहिला व तो गावातील निवडणुकीत भरघोस मतानं निवडूनही आला. 
          गावानं झाडं लावली होती व त्या गावात पाऊस पडत होता. शेती पिकू लागली होती. गावानं पावसाचं महत्व ओळखलं होतं. तसं गावानं झाडाचंही महत्व ओळखलं होतं. गावात उंच उंच झाडं डोलू लागली होती. तो भाग जंगलमय बनला होता. तसं संविधानाचंही महत्व लोकांना पटलं होतं व मतदानाचंही महत्व पटलं होतं. 
          ते मतदानाचं महत्व लोकांना तेव्हा पटलं. जेव्हा निवडणुकीत निवडून येताच सुजीतनं सरकारी योजना गावात आणल्या. त्याचबरोबर गावात सडका निर्माण केल्या. ज्या सडका बऱ्याच वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर गावाला पाहायला मिळाल्या होत्या. ते कुतूहल वाटत होतं गावाला व गावानं सुजीतवर विश्वास करणं सुरु केलं होतं. 

************************************************

           शेती........शेती आमची माऊली आहे. तिला आपल्या आईगत जपायला हवं. परंतु आपण तिला तसं जप्त नाही व तिला त्रास देत असतो. 
         शेती आपली माऊली. आपण तिला त्रास देतो. असं म्हटल्यास कोणी म्हणेल की लेखक महाशय असं का बोलतात?  आपण खरंच शेतीला त्रास तरी देतो काय? तर याचं उत्तर होय असंच आहे आणि ते खरंही आहे. आपण त्रासच देत असतो शेतीला. 
          शेतीला गृहीत धरुन आपण कोणता बरे त्रास देतोय? याचं उत्तर देतांना मी एवढंच म्हणेल की आपण आपल्याला भरघोस उत्पादन यावं म्हणून शेतीत रोपांवर किटकनाशक फवारतो. त्यातच रासायनिक सल्फेटांची मात्रा टाकतो. ते रासायनिक सल्फेट, ज्यानं आपली शेतीमाऊली वांझ होते. तिची प्रतिकारशक्ती घसरते. ती प्रतिकारशक्ती एवढी घसरते की ती आपल्याला त्यानंतर उत्पादन देत नाही. अर्थातच मग आपण आपल्या शेतीत कितीही रासायनिक सल्फेट टाकलं, तरीही पीकपाणी होत नाही. हीच पद्धत शेतीला दुखदायक ठरते. कारण या पद्धतीनं शेतीच्या कोशिका मृत पावतात एखाद्या स्रीच्या अभ्रक जन्माला घालणाऱ्या प्रक्रियेसारखी.
           *खरंच शेती ही देखील वांझ होते का?*
           शेती ही देखील वांझ होते. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या स्रीचं उदाहरण देता येईल. काही काही स्रियांना मुलं नसतात. त्याचं कारण म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. त्यांचं सेवन करणे वा त्याचा वापर करणे. ज्याप्रमाणे एखादी स्री तिला मुल नको म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेते. त्यानंतर जेव्हा तिला मुल हवं असतं.  तेव्हा तिला ते होत नाही. याचं कारण म्हणजे त्या गर्भनिरोधक गोळ्या. त्या गोळ्यांचा भरणा शरीरात जास्त प्रमाणात झाल्यास तिला मुल होत नाही. आता लोकं म्हणतील की हेही खोटं आहे. सर्वच स्रिया काही गर्भनिरोधक गोळ्या खात नाहीत. तरीही त्यांना मुल होत नाही. त्याचं कारण काय? याचंही उत्तर म्हणजे त्या स्रिया जरी गर्भनिरोधक गोळ्या खात नसतील कदाचीत. तरी त्या असे अन्नपदार्थ खात असतात की जे सल्फेटयुक्त असतात. जे शेतीतून मिळत असतं. यातही कोणी म्हणतील की ठीक आहे. आता स्रिया सल्फेटयुक्त अन्न खातात. म्हणूनच आपण असं म्हणू शकता. परंतु पुर्वी तर सल्फेटयुक्त अन्न नव्हतं. मग पुर्वीही स्रिया वांझ असायच्या. त्या का बरं वांझ असायच्या? त्याचं कारण हेच आहे. त्या स्रियांना जरी सल्फेटयुक्त अन्न जमिनीतून मिळत नव्हतं. तरी त्यांच्या शरीरात सल्फेटयुक्त क्षार पाण्यातून व हवेतून वा एकंदरीत वातावरणातून जायचं. त्यामुळंच त्या वांझ असायच्या नव्हे तर त्यांचं शरीर वांझ बनायचं. यावरही कोणी म्हणतील की असं होवूच शकत नाही. तर त्यावरही सांगता येईल की असं होवू शकतं. याबाबत आणखी एक उदाहरण देता येईल. 
           वातावरणात विविध रोगाचे जंतू असतात. परंतु सर्वांनाच तो आजार होत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमात सगळेच लोकं जेवन करतात. परंतु पोटदुखी ही एखाद्यालाच होते. प्रत्येकाला होत नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे प्रत्येकाच्या शरीराची रचना. प्रत्येक व्यक्ती हा जसा पाहायला वेगवेगळा आहे. तशीच त्याच्या शरीराची रचनाही वेगवेगळी आहे. त्या शरीर रचनेनुसार प्रत्येक जीवाच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वेगवेगळी आहे. काहींना आजार लवकर शिवतो. काहींना वेळ लागतो तर काहींना अजिबात शिवत नाही. त्यानुसार प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात आजारी पडतो. काही पडत नाहीत. तीच गोष्ट वांझपणामध्येही येते. वातावरणातील किंवा पाण्यातील असलेले सल्फेट हे प्रत्येकांच्या शरीरात जातात. परंतु त्याचा परिणाम काहींवर होतो तर काहींवर होत नाही. त्यानुसार मुल जन्माची प्रक्रिया घडत असते. अगदी तीच स्थिती शेतीमाऊलीबद्दलही आहे. तीच पद्धत शेतीमाऊलीलाही लागू आहे. काही ठिकाणची शेतजमीन ही पिकाऊ आहे. काही ठिकाणची पिकाऊ नाही. ती बंजर अर्थातच कमीअधिक प्रमाणात वांझ आहे. त्यातच आपण घातक अशा रसायनांचा त्या जमीनीवर फवारा करतो. ज्यामुळं त्या रसायनाचा त्या जमीनीच्या पोटावर परिणाम होतो व ती पुर्ण स्वरुपात वांझ बनते. त्यामुळंच अशा जमीनीवर कितीही प्रयोग केले तरी तिचा पोत सुधारत नाही.याचाच अर्थ कितीही पैसा शेतकऱ्यांनी अशा जमीनीवर खर्च केला तरी उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात येत नाही व शेतकरी राजाला वाटते की आपली जमीन पीकत नाही. मग शेतजमीन पीकत नसल्यानं कधीकाळी आत्महत्येची वेळ येते व आत्महत्या घडतेच. असे होवू नये म्हणून आधी आपली शेतजमीन सुधारण्याची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. 
           *शेतजमीन सुधारणे म्हणजे नेमके काय?*
            शेतजमीन सुधारणे म्हणजे त्या जमीनीत रोपे लावली असता त्यात सल्फेट टाकणे नाही तर त्यात शेणखत वा कंपोस्ट खत टाकणे होय. तसंच त्यात गांडूळखत टाकणे होय. तसंच जमीनीत रोपे लावण्यापुर्वी जमीनीला शेतकऱ्यांनी आधी तयार करायला हवं. 
         शेतजमीन आधी तयार करायला हवी. परंतु आता ते शक्य तरी आहे का? कारण आता शेतजमीनीत टाकायला आम्हाला शेणखत मिळत नाही. लेंडीखत मिळत नाही. याचं कारण आम्ही ट्रॅक्टरने शेती करतो. आम्ही आमच्या शेताला शेणखत देणारी गाईबैलं कसायांना विकली. ती परवडत नाही म्हणून. तशाच आम्ही आमच्या घरच्या बकऱ्याही कसायाला विकल्या. आम्हाला त्यांचं मांस खाता यावं म्हणून. त्यांच्या मांसावर आम्ही आमची होळी व पोळा साजरा केला. आता आम्हाला मोठ्या स्वरुपात पोळा साजरा करायला जीवंत बैलं दिसत नाहीत. लाकडाचे नंदीबैल वापरुन आम्हाला आमचा पोळा साजरा करावा लागतो.  तुरळक स्वरुपात काही ठिकाणी जीवंत बैलं दिसतात. पुढं तेही दिसणार नाहीत. ही सत्य गोष्ट आहे. त्यावरुन सांगता येईल की आज शेती करणं घाट्याचा व्यवसाय झाला आहे. 
          शेतीबद्दल सांगतांना शेतीची अवस्था आज अतिशय दयनीय झाली आहे. शेतीच्या आजच्या अवस्था पाहता आज कोणीही शेती करायला पाहात नाही. कारण ती परवडत नाही. त्यामुळंच शेतीचा सन्मान घसरला आहे आणि शेती करणाऱ्या लोकांचाही. आज शेतीला सन्मान मिळत नाही व शेती करणाऱ्या लोकांनाही सन्मान मिळत नाही. शेती पिकत नसल्यानं शेती करणाऱ्या मुलांना अडाणी समजलं जातं. त्यांच्याशी विवाह करायला कोणत्याच मुली पुढं येत नाही व कोणतीच मुलगी विवाह करीत नाही हे खरं आहे व हीच वस्तुस्थितीही आहे. याच अवस्थेमुळं शेतीवर आज भुमाफियांचे भुखंड थाटले गेले आहेत. शेती कमी होत आहे व भुखंड वाढत आहेत. याचाच अर्थ असा की सुपीक पिकणारी जमीन कमी होत आहे व ओसाड जमीन वाढत आहे. ही स्थिती अशीच सुरु राहिली तर उद्या देशातील शेती करणारी मंडळी निर्माणच होणार नाही व देशातील या शेतकरी मुलांना विवाहासाठी मुली न मिळत असल्यानं   देशात बलात्कार वाढतील. शेती करणारी मंडळी नसल्यानं व कित्येक एकराच्या शेत्या ओसाड पडल्यानं अन्नधान्य पीकणार नाही. त्यातच देशात अन्नधान्याचा तुटवडा भाषेल. परिणामी चोऱ्याही वाढतील. एकंदरीत सांगायचं झाल्यास देशात साऱ्याच समस्यांना तोंड फुटेल. साऱ्याच समस्या देशवासीयांना सतावतील. त्यामुळं यावर उपाय एकच. शेतीलाही सरकारनं सन्मान द्यावा. 
          विशेष सांगायचं म्हणजे शेती आपली आई आहे. तिला आपल्या स्वआईगत जपावं. सरकारी नोकऱ्या त्याच क्षेत्रात निर्माण कराव्यात. जो शेती करेल,  त्याला सरकारनंच वेतन द्यावं. एसीच्या हवेत बंद कमऱ्यात बसणाऱ्यांना वेतन देण्यापेक्षा ती गोष्ट कितीतरी चांगली होईल यात शंका नाही. तसेच तिचा पोत सुधारण्यासाठी तिच्यात सेंद्रिय खतांची निर्मीती करावी. जो गाईबैलं वा शेळ्या, मेंढ्या पाळेल, त्याला बक्षीस द्यावी. त्यांच्या हत्येवर प्रतिबंध लावावा. जो हत्या करेल, त्यांना कडक शिक्षा द्याव्यात. म्हणजेच शेणखत वा लेंडीखताची आपोआप निर्मीती होईल. याचा फायदा शेतीला  निश्चीतच होईल. शेती भरपूर पीकेल. शेतीलाही भाव येईल. शेती करायला लोकं पुढं येतील. शेतकऱ्यांच्या समस्या चुटकीसरशी सुटतील. शेतकऱ्यांच्या मुलांनाही विवाहासाठी मुली मिळतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही. तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक माणसानं झाडं लावावीत. जेणेकरुन शेतीसाठी लागणारा पाऊस पडेल आणि ज्या भागात झाडं असूनही पाऊस पडणार नाही. अशाठिकाणी नदीजोड वा कालवेजोड प्रकल्प राबवावा. म्हणजे निश्चीतच शेतीचेही महत्व वाढेल व जो तो शेती करायला धजेल. पुढं येईल व शेती करेल. यातूनच देशाचा विकास होईल. त्याचबरोबर आपलाही विकास होईल हे तेवढंच खरं आहे. 

**********************************************************

         शेती.......शेतीला सुजीतनं विशेष महत्व दिलं. त्या शेतीला सुपीक बनविण्यासाठी त्यानं गावातच सेंद्रिय खताच्या योजना आखल्या. त्यानं गावातच गांडूळखत प्रकल्पही उभा केला. तसंच गावाला बैल, गाय, शेळी, मेंढ्यांपासून खत निर्माण होतं व ते खत शेतीला  खुप फायदेशीर असतं हे माहीत झाल्यानं व त्यापासूनच भरपूर उत्पन्न येतं हे माहीत झाल्यानं लोकं शेळ्या, मेंढ्या, बैल, गाई, म्हशी आता कसायांना विकत नसत. त्याचं गोधन बनवत. त्यांना आपल्या प्राणापेक्षाही जास्त जप्त असत. आता रासायनिक खताला लोकांनी बाय बाय केलं होतं व ते आता कंपोस्ट खत व सेंद्रिय खत वापरु लागले होते. त्याचा पहिला प्रयोग त्यानं आपल्या शेतातच केला. 
          सुजीतजवळ जी शेती होती. त्या शेतीतून त्याचे वडील सोयाबीन, कापसासारखी नगदी पीकं घेत असत. कधी त्या शेतीत शेंगदाण्याची पीक ते घेत असत. परंतु सुजीतनं लोकांना उपदेश केला की ज्याचेजवळ शेती आहे. त्यांनी आपल्या शेतीच्या काही भागात तरी उंच वाढणारी झाडं लावावीत. ज्यातून उत्पादन तर मिळेल. व्यतिरीक्त पावसाचं प्रमाणही वाढेल. त्याचं ऐकून बऱ्याच लोकांनी एक प्रयोग म्हणून की काय, आपल्या शेतीत उंच वाढणारी झाडं लावण्यास प्रारंभ केला. याचा फायदा हा झाला की त्या लोकांच्या शेतीतून उंच वाढणाऱ्या या झाडातून उत्पादन तर मिळत होतं. व्यतिरीक्त पाऊसही चांगला पडत होता. त्यामुळंच बाकीची पीकही अल्प प्रमाणात का होईना, घेता येत होती.
            सुजीतनं शेतकरी दृष्टिकोणातून क्रांती केली होती. सुजीतनं केलेला प्रयत्न आणि तोच प्रयोग बाकीच्या गावातील शेतकरीही करीत होते. आता बाकी गावही हळूहळू सुधारत चालली होती. मात्र तो खुश नव्हता. कारण शेती पीकत असली तरी अद्यापही शेतीला पाहिजे त्या प्रमाणात किंमत नव्हती. शेतीला जसा भाव नव्हता. तीच गत शेतकरी वर्गाचीही होती. शेतकऱ्यांच्या मुलांची हालत खस्ता होती. शेती एक साधारण न शिकलेला तरुणही चांगल्या प्रकारे करु शकतो. असं बाकी लोकांना वाटत होतं. शेती पिकत होती. परंतु शेतकरी वर्गाची अजुनही हेळसांड सुरु होती. 
          सुजीत शिकला होता. तो पाहात होता ते सारे प्रकार. कशी शेतकऱ्यांची बाजारपेठेत हेळसांड केली जाते. कसं त्याला नागवले जाते. कसं त्याला नाचवलं जातं. वैगेरे गोष्टी तो अनुभवत होता. त्याच्यापुढं तेच शल्य होतं. तोही आधी गरीबच होता  परंतु जेव्हापासून त्यानं आपल्या शेतीत फळझाडं लावली होती. ती फळझाडं उत्पादन देवू लागताच त्याचं जीवनमान उंचावलं होतं. 
          सुजीतनं आपल्या शेतीत लावलेली ही फळझाडं. सुजीतनं पाहिलं की त्या फळझाडाला कधी किडे लागतात व फुल गळून पडतं. कधी त्या फळझाडावरची फुलं गळून पडतात व मोठं नुकसान होतं. कधी माकडं येतात व फळाचं नुकसान होतं. हे पाहताच तो त्या फुलाला फुल पकडण्यापुर्वीच त्या फुलाला वेष्टन घालत असे. असे वेष्टन ते फळ झाडापासून विलग होईपर्यंत राहात असे. शिवाय अशा वेष्टनानं झाडाच्या फळाला कोणताच किडा शिवत नसे. फळं अगदी मोठमोठी होत असत. शिवाय माकडांनाही ते फुल वेष्ठनात असल्यानं खाता येत नव्हतं. त्यामुळं तेही जास्त झाडावर धूम करीत नसत. शिवाय तो झाडाच्या बुंध्यावर चुनखडीचं लेपन करायचा. त्यामुळं ते लेपन करताच झाडाच्या बुंध्यावर खोडकिडे लागत नसत. शिवाय तो शेणखताची एवढी मात्रा झाडाला देत असे की फळं मोठमोठी होत असत. ती फळं पाहिली की त्या फळांना विशेष मागणीही होती. 
         शेतकरी वर्गाला आता सुगीचे दिवस आले होते. त्यांच्या शेतात फळं जास्त पिकत असत. परंतु एक समस्या निर्माण झाली होती. ती म्हणजे काही काही शेतकरी लोकांच्या शेतीत जंगली प्राणी येत. ते प्राणी फळांची नासधूस करत. त्या प्राण्यांना फळं खायला मिळत नसल्यानं ते फळं झाडापासून तोडून जमीनीवर फेकत. शिवाय माणसं नसली की त्या प्राण्यांची चांदी असायची. त्यावर उपाय म्हणून सुजीतनं उंच वाढणारी औषधी झाडं लावायची शिफारस केली व काही शेतकऱ्यांनी ती लावलीही. ती झाडं थोडी कडवट असल्यानं माकडं वा जंगली प्राणी ते खात नसत वा त्याची नासधूसही करीत नसत. आता एकंदरीत सांगायचं झाल्यास शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं होतं. तरीही एक शल्य होतं. ते म्हणजे इज्जत. शेतकऱ्यांना अजुनही मानाचं स्थान मिळत नव्हतं. तेच शल्य त्याला दिवसेंदिवस सतावत होतं.
            सुजीत हळूहळू मोठा झाला होता. त्याचं वय वाढत चाललं होतं. परंतु त्याचा काही विवाह जुळत नव्हता. तो शिकलाही होता. परंतु त्याचा विवाह जुळत नव्हता. कारण तो एक शेतकरी होता. शेतीत काम करीत होता. 
           शेतकऱ्यांना त्यावेळेस किंमतच नव्हती. म्हणूनच त्यांना मुली मिळत नव्हत्या. जरी आज शेतीत जास्त पीकत असलं तरी आणि शेतीला भाव आले असले तरी. 
           शेतकरी मुलं तसं पाहता शिकत होती. परंतु ती काही शेतीवर काम करीत नव्हती. शिकून झाल्यावर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करायची किंवा शहरात एखादा कामधंदा पाहायची. परंतु शेती करण्यासाठी शेतीवर फिरकत नसत. शेतीला ते तुच्छ समजत असत. शेती करणं अडाणी लोकांचं काम आहे असे समजून अशी शिकलेली तरणीताठ मुलं शहरात कोणतंही तुच्छ काम करायची. प्रसंगी दुसऱ्याच्या हाताखाली राबून रोजमजूरी करायची. परंतु आपल्या ज्ञानाचा वापर करुन शेतीला प्रगत दिवस आणत नव्हते. 
          ती तरणीताठ मुलं प्रसंगी रोजमजूरी करायची. परंतु शेतीवर काम करायची नाहीत. कारण मध्यंतरीचा काळ असाच गेला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्याचं कारण म्हणजे शेती पिकत नव्हती. आज तोच दृष्टिकोन मनात बाळगून शेतकरी आत्महत्या करतात व त्यानंतर आपल्याला वैधव्याचं जीवन काढावं लागतं, म्हणून शेतकरी तरण्याताठ मुलांना विवाहाला मुली मिळत नव्हत्या. विवाहयोग्य वर निवडतांना त्या तर सर्रासपणे म्हणायच्या की शेती असावी, परंतु तो शेतीवर राबणारा नसावा. 
          सुजीत विचार करायचा की शेतकऱ्यांच्या मुलांचा यात कोणता दोष की त्याला विवाह करायला मुली मिळत नाही. मुली नापसंत करतात त्याला. तो कितीही शिकली असला आणि शेती करीत असला तरी शेती हे काम अडाणी लोकांचं आहे असं मानतात. त्यांचंही बरोबरच होतं. कारण शेती मध्यंतरीच्या काळात पिकत नसल्यानं शेतकरी आत्महत्या करीत होते व वैधव्याचं जीवन अखेरपर्यंत काढावं लागायचं शेतकरी स्रियांना. एवढंच नाही तर या शेतकरी मुलांना कधी साप चावेल व ते मरतील याचा नेम नसायचा. कधी एखाद्या वेळेस पावसाळ्यात वीज पडेल व ते मरतील याचा नेम नसायचा आणि कधी शेतीतील एखादं झाडं उन्मळून पडेल याचा नेम नसायचा. त्यामुळंच त्यातूनही वैधव्याचं जीवन वाट्याला यायचं. ही परिस्थिती आपल्या वाट्याला येवू नये म्हणून कोणत्याही मुली शेतकरी वर्गाशी विवाह करायला नकार देत. सुजीतचीही अशीच गत होती. तो एवढा शिकला असला तरी.......
            सुजीतचं वय वाढत चाललं होतं. त्याला वाटत होतं की आपलाही विवाह व्हावा. आपल्यालाही एखादी सुसंस्कृत शिकलेली मुलगी मिळावी. परंतु ते त्याचे विचार होते. ते त्याचे विचार त्याच्या मनातच अंकुरीत असत व मनातच कोमेजूनही जात असत.
              चांद्रयान भाग २

               सुजीत शिकलेला होता. त्याला एक सरकारी नोकरी आली होती. त्या सरकारी नोकरीत फार सुख होतं.  एसीच्या हवेत बसून त्याला फक्त कारभार पाहायचा होता. शिवाय नोकरीत वरुन छत्र मिळणार होतं. त्यासोबतच पेन्शन आणि भत्तेही. शिवाय वेतनाची पाहायचीच चिंता नव्हती. ते अती प्रमाणात मिळणार होतं. परंतु ते तेवढं सुख असुनही सुजीतनं ते धिडकारलं. त्यानं सरकारी नोकरी करण्याऐवजी शेती करणं पसंत केलं. पावसात उभं राहणं व कधी विजेचा लपंडाव झेलणं पसंत केलं. त्यासोबतच त्यानं पावसाचाही लपंडाव पसंत केला. 
           सुजीतनं शेती करणं का पसंत केली?  त्याचं कारण होतं शेतीला किंमत मिळवून देणं. त्याला वाटत होतं की नोकरीत असतांना जरी वेतन जास्त असेल, तरी त्या वेतनानुसार आपल्याला सरकारी नोकरीत गुलामासारखंच जीवन जगावं लागणार हे त्याला माहीत होतं. म्हणूनच त्यानं सरकारी नोकरी धरली नव्हती. 
             सुजीतला विवाह करायचा होता.  परंतु त्यासाठी त्याला मुली मिळत नव्हत्या. यायच्या त्याही कमी शिकलेल्या की जिला त्याच्या शिक्षणाची गोडी वाटणार नाही. तसं पाहता त्याच्या बिरादरीत त्याच्या एवढ्या शिकलेल्या मुली नव्हत्याच. तसं त्याचं वय होत चाललं होतं व त्याला त्याच्या विवाहाची चिंता सतावत होती. 
         विवाहाची चिंता त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. तसं त्याला एक स्थळ आलं. मुलगी पाहायला देखणी नव्हती. परंतु तिही जास्त शिकलेली होती आणि त्याला संसार चालविण्यासाठी शिकलेल्याच मुलीची आवश्यकता होती. जर देखणी व सालस मुलगी पाहायची झाल्यास आपण शेतकरी असून आपल्याला चांगली शिकलेली मुलगी मिळणारच नाही हे त्याला माहीत होतं. म्हणून ती कशीही पाहायला का असेना, परंतु शिकलेली असल्याकारणानं त्यानं त्या मुलीला पसंत केलं व पसंतीनुसार त्यानं विवाहासाठी होकार दिला व तिनंही होकार दिला. तिनं होकार यासाठी दिला की ती जास्त शिकली असल्यानं व तिच्याही समाजात तेवढे शिकले नसल्यानं व सुजीत जास्त शिकलेला असल्यानं,  त्यातच कधी काळी जावई शिकले असल्यानं नोकरीला लागेलच ही अपेक्षा बाळगून तिच्या बापानं तिच्या विवाहासाठी होकार दिला होता. अशातच त्यांचा विवाह सोहळ्याविषयी होकार पार पडला. परंतु मधातच कोणीतरी कुरघोडी केली व तो विवाह सोहळा जो होणार होता,  तो तुटला. 
           सुजीतचा विवाह थाटामाटात पार पडणार होता. परंतु तो विवाहच न झाल्याने तो संसारात व्यस्त झाला नाही. परंतु त्याच्या समोर ध्येय होतं. शेतीला सुगीचे दिवस आणायचे कसे? त्याच ध्येयाचा विचार तो सदोदीत करीत होता. त्यावर उपाय शोधत होता. परंतु त्याला त्यावर काही उपायच सापडत नव्हता. त्यानं कित्येक प्रयोग त्यावर केले होते. शेतीचं बागायतीपणही केलं होतं. परंतु शेतीला पाहिजे त्या प्रमाणात मानमरातब मिळत नव्हता. आता शेती पिकतही होती आणि आत्महत्याही बंद झाल्या होत्या. तरीही शेतीला भाव आला नव्हता.
            निवडणूक निःपक्ष व निःशुल्क व्हावी. अर्थात कमी पैशात व्हावी व दोनच पार्ट्या उभ्या राहायला हव्यात. इतर पार्ट्या नकोतच. असं त्याचं मत होतं. त्यानं पाहिलं होतं की अलीकडच्या निवडणूकीत लाखोच नाही तर करोडो रुपयाचा धुव्वा उडवला जातो. सरकार तर निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी पैसा लावत असते. व्यतिरिक्त निवडणूक लढणारे लोकप्रतिनिधीही पाण्यासारखा पैसा निवडणुकीसाठी खर्च करीत असतात. त्याचं कारणही तसंच आहे. कारण निवडणूक म्हटली तर त्याला पैसे खर्च केल्याशिवाय पर्यायच नाही. लोकं दारु अन् पाचशे रुपयाच्या नोटेला महत्व देतात. म्हणतात की ह्या नेत्यांना आताच लुटा. मग हे सापडणार नाहीत. तसं सांगायचं झाल्यास तेही मानणं काही चूक नाही. बरोबरच आहे. कारण हे नेते पाच वर्षपर्यंत कधीच आपल्या मतदारसंघात भटकतच नाही. 
         भारतीय संविधान........हे सशक्त असं संविधान आहे. या देशात, या देशातील लोकांपैकी प्रत्येक व्यक्ती नाही तर प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य बहाल झालं आहे. त्यानुसार प्रत्येकालाच निवडणुकीत उभे राहण्याचा व आपलं नशीब आजमाविण्याचा अधिकार आहे. त्यामुळंच ते निवडणुकीत उभे राहून मतदान मागू शकतात. प्रसंगी मतदान मागतांना त्यात साम, दाम, दंड भेद याच नीतीचा वापर करतात. ती निवडणूक म्हटली तर ते सगळं आलंच. मग वरील बळाचा वापर करीत असतांना लोकं जो पैसा वापरतात. तो पैसा काढण्यासाठी नेतेमंडळी योजना तर आणतात. परंतु त्या योजना राबविल्या जातात कागदावर. प्रत्यक्षात त्या योजना राबविल्या जात नाहीत. यातूनच पुर्वीच्या काळात काही काही योजना प्रत्यक्षात दिसल्याच नाही. त्या योजना कागदावरच आल्या व कागदावरच संपल्या आणि त्या योजनांसाठी खर्च म्हणून आकारण्यात आलेला नीधी हा नेत्यांच्या घरात गेला. जो नीधी जनतेच्या विकासासाठी खर्च व्हायला हवा होता. काही नीधी हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरात गेला. 
           सरकारी कर्मचारी आज सुखी आहेत. खुश आहेत. त्यांना व नेत्यांना पेन्शन आहे. कारण नेतेमंडळी ह्या ज्या योजना आणतात. त्या योजना नेतेमंडळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणतात व त्या योजना सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत कार्यान्वीत करण्यात येतात. यात नेत्यांना मोलाची मदत सरकारी कर्मचाऱ्यांची होते व तेच जबाबदार धरले जातात सर्व योजनांचे. मग हे सरकारी कर्मचारी अशा योजना कागदावरच आणतात. कागदावरच राबवतात व काही प्रमाणात मलाई आम्हालाही खायला मिळते. म्हणूनच नेतेमंडळी तेरी भी चूप व मेरी भी चूप हेच धोरण राबवीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या तालावर नाचत असतात. त्यातच ते स्वतःलाही पेन्शन व आपल्यालाही पेन्शन लागू करुन अगदी आनंदानं चार भींतींच्या आत एसीच्या हवेत जीवन जगत असतात. त्यांची घरं जर पाहिली तर मोठमोठी असतात. 
           विशेष सांगायचं झाल्यास सरकारी कर्मचारी व नेतेमंडळी हे जनतेचे सेवक असतात. त्यांना कशाला हवी पेन्शन? अन् पेन्शन द्यायची झाल्यास अल्प द्यावी. खरी पेन्शन अल्पभुमीधारक शेतकरी व शेतमजूरांना द्यावी की बिचारे उन्हातान्हात राबत असतात, आपल्या शेतात, साप, विंचू नाही, तर इतर किड्यांना सामना करीत. वीजेच्या लपंडावांचा त्यांना सामना करावा लागतो. कधी वीज पडेल व कधी जीव जाईल याचा नेम नसतो. कधी साप चावून मरण येतं, तर कधी एखादा शेतातील किडा चावून मरण येतं. पावलोपावली त्यांच्यासमोर मृत्यू असतो. कधी एखादं हिंस्र श्वापदही त्यांचा जीव घेत असतो. शेतकऱ्यांचं व शेतमजूरांचं हे शेतात राबणं एखाद्या युद्धापेक्षाही कमी नाही. युद्धात जसा सैनिकांच्या पावलोपावली मृत्यू थयथय नाचत असतो. कधी कुठून वा कोणाकडून गोळी येईल व ती केव्हा मस्तकात जाईल व केव्हा आपल्या मस्तकाचे दोन तुकडे करेल याचा नेम नसतो. तीच गत शेतकरी, शेतमजूर वा इतर मजूरांची आहे. इतर मजूरांच्या बाबतीतही तेच हाल आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करणारा मजूर उंच इमारतीवरुन केव्हा पडून मरण पावेल याचा नेम नाही. 
           मजूर, शेतकरी आणि शेतमजूर हे जसं मरण दररोज अनुभवत असतात. तसं मरण सरकारी कर्मचारी व नेतेमंडळी अनुभवत नाहीत. तरीही त्यांना पेन्शन असते व शेतकरी व मजूरांना पेन्शन नसते ही शोकांतिकाच आहे. जरी सरकारी कर्मचारी व नेतेमंडळी असलं मरण दररोज अनुभवत नसले तरी आणि ते भयमुक्त अशा चार भींतीत एसीच्या हवेत राहात असले तरी. तसंच त्यांचं वेतनही जरा जास्तच असतं. 
            शेतकरी व मजुरांना वेतन नाही. परंतु पेन्शन अवश्य द्यायला हवी. कारण ते राब राब राबून देशाच्या विकासात मोलाची मदतच करीत असतात. जसं शेतकरी व शेतमजूर शेतात राबून देशाला पोषत असतात आणि मजूर देशाच्या विकासात हातभार लावत असतात. जसे चांद्रयान मोहिमा यशस्वी झाल्यात हे सर्वांना दिसलं. परंतु त्या मोहिमेत कोण कोण राबले असतील? हे काही देशाला दिसले नाही. नाव झालं कॅप्टनचं. परंतु एकट्या कॅप्टननं युद्ध जिंकलं जात नाही. युद्ध जिंकलं जातं इतर सैनिकांच्या हातभारानं. 
              पूर्वीही युद्ध होत. सैनिकांच्या माध्यमातून युद्ध जिंकलं जायचं. नाव व्हायचं सेनापती वा राजाचं. तशीच गत आज चांद्रयानाबाबतीत आहे. सामान्य मजूर की ज्यांनी चांद्रयान बनवला असेल. तोही देशाचा आधारस्तंभच आहे हे विसरुन  चालणार नाही. असे बरेच क्षेत्र आहेत की ज्यात मजूर राबतात. परंतु त्यांना काहीच मिळत नाही. नाव प्रमुखाचं होतं. त्याचाच उदोउदो होतो. मजूरांना काहीच मिळत नाही.
          निवडणुकीत एवढे सर्व उमेदवार उभे राहतात. त्याचं कारण आहे त्यांना मिळत असलेल्या सरकारी सुविधा. पेन्शन अन् इतर मार्गानं मिळत असलेले पैसे. हवं तर याला घोटाळा वा भ्रष्टाचार म्हणता येईल. याच मार्गाने बराचसा पैसा कमवता येवू शकतो. त्या सुविधांचा लाभ असल्यानं आज प्रत्येक व्यक्ती निवडणुकीत उभा राहतो व निवडणुक झाली की निवडून आल्यावर बक्कळ पैसा कमवतो की तो ठेवायलाही जागा नसते. तसेच हे सरकारी कर्मचारी. हे सरकारी कर्मचारी जेव्हा नोकरीवर लागतात. तेव्हा ते गरीब असतात व त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो व ते जेव्हा निवृत्त होतात. तेव्हा मात्र ते मालामाल झालेले असतात. ह्या पैशाचं मोजमाप जर केलं तर हा पैसा कुठून आला याचा जाब विचारला असता त्याचं उत्तरच नसतं. त्यातच अशा पैशाचं खऱ्या अर्थानं मुल्यमापन जर केलं गेलं तर काही योजना कागदावरच राबवल्या गेल्या हे निदर्शनास येते. 
          महत्वाचं सांगायचं झाल्यास सरकारी कर्मचारी वा नेतेमंडळींना सुविधा द्याव्यात. पेन्शनही द्यावी. परंतु त्याचबरोबर तशा सुविधा व पेन्शन शेतकरी, शेतमजूर व मजुरांनाही द्यावी. संपुर्ण शेती सरकारनं आपल्या ताब्यात घ्यावी. त्यावर शेतीत राबणाऱ्या माणसांची नियुक्ती करावी. त्यांना वेतनही द्यावं व त्यानंतर थकत्या वयात त्यांनाही आधार म्हणून पेन्शन द्यावी. कारण तेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. तेही महत्वाचे घटक आहेत. ते आहेत म्हणूनच देश आहे. ते जर नसते तर देशही नसता हे तेवढंच महत्वाचं आहे. 
            सुजीतसमोर ध्येय होतं. ते ध्येय म्हणजे त्याला सन्मान मिळवून द्यायचा होता शेतकऱ्यांना. म्हणूनच तो निवडणूक लढवीत होता. तसं त्यानं सर्वांचे डोळे उघडले होते. 
          निवडणूक जवळ आली होती. तसं सुजीतच्या नेतृत्वात नवपरीवर्तन पॅनल पुढं सरसावलं होतं व सुजीतसह त्याचे बरेचसे साथीदार निवडणुकीला उभे राहिले होते. ते तरुण होते व ते शेतकऱ्यांच्या हितासाठी उभे राहिले होते. 
          निवडणूक आली होती व प्रत्येक पक्षातील लोकांनी प्रचार करण्यासाठी याही गावाचा आधार घेतला होता. सत्ताधारी पक्ष आणि गैरसत्ताधारी पक्ष अर्थात आजपर्यंत विरोधात उभा राहणारा व कधीकाळी सत्ता मिळवलेला व सत्ता मिळवूनही त्या गावांसाठी काहीच न केलेला पक्ष गावात मत मागण्यासाठी येत होता. सभा घेत होता आणि लोकांना आपण केलेल्या कामाची पावती देत होता. जी कामं त्यांनी तालुका व शहराच्या स्तरावर केलेली होती. परंतु ना त्यांनी गोविंदपूरचा विकास केला होता ना त्यांनी गोविंदपूरच्या आसपासचा. तो भाग पुर्वी जंगलं तोडूनही व तो भाग मैदानी भागात येवूनही त्या गावाचा विकास केला नव्हता. 
           गावची मंडळी सुजीतनं आपल्या बोलण्यातून हुशार केली होती. त्यानं गावच्या लोकांचे डोळे उघडले होते. म्हटलं होतं की जर का ते लोकं गावात आले आणि विकासाचा पाढा वाचलाच तर त्यांना त्यांनी आतापर्यंत गावासाठी काय केलं याचा जाब विचारावा. हं,  आपल्याला मिळत असलेली दारु आणि पाचशे रुपयाची नोट घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु मत टाकतांना जे आतापर्यंत केलं नाही ते करावं. अर्थातच नवपरीवर्तन या नव्या पिढीच्या तरुण पॅनलला द्यावं. हं,  विकासाच्या बाता करणारे बरेचसे राजकीय लोकं इथं येतील व ते आपण अमुक केलं आपण तमूक केलं अशा बतावण्याही करतील. परंतु त्या बतावण्यावर गावच्या लोकांनी भुरळून जावू नये. 
           आजमितीस गावचे लोकं येत होते व ते लोकं गावच्या विकासाच्या गोष्टी करीत होते. परंतु त्यांना आता काही तरुण लोकं जाब विचारत होते की त्यांनी आतापर्यंत काय केलं? ज्यांनी सत्ता हातात मिळूनही आतापर्यंत काहीच केलं नाही. उलट निवडणूक आटोपताच पाच वर्षपर्यंत कोणताच पक्ष गावात भरकटला नाही. याचं कारण काय? अशा गोष्टी आज गावातील तरुण करीत होते. 
            निवडणूक आटोपली होती व सुजीतच्या नेतृत्वातील नवपरीवर्तन पॅनल यशस्वीरित्या निवडणुकीत निवडून आला होता. जास्त फरक नव्हता. कारण काही गद्दार लोकांनी पैसे व दारुच्या बाटला घेवून मतदान बाकी पक्षांना टाकलं होतं. तरीही सुजीतचं नवपरीवर्तन पॅनल पुढं सरसावलं होतं. आता एकच ध्येय होतं. ते ध्येय म्हणजे गावचा विकास. आपआपल्या गावचा अगदी झपाट्यानं विकास करा असं सुजीतचं म्हणणं होतं. जर गावाला त्यांचा विकास दिसेल तर पुढं गावही गावाच्या विकासासाठी आपल्याच पॅनलला भरभरुन मतदान देईल. 
           सुजीतचं म्हणणं बरोबर होतं. नवपरीवर्तन पॅनलला काही सरकारमध्ये जागा मिळाली नाही. कारण त्यांचे उमेदवार पाहिजे त्या प्रमाणात काही जास्त निवडून आले नव्हते. परंतु त्यांना जोही फंड मिळत होता. तो त्या फंडाचा वापर त्यांनी गावाच्या विकासासाठी केला होता. आज गावंची गावं विकास पावली होती. गावात आता चांगल्या सडका आल्या होत्या. तशाच शाळाही आल्या होत्या. तसं पाहता गावात आता मोठमोठ्या इमारती आकार घेवू लागल्या होत्या. त्यातच अवघ्या पाच वर्षात गोविंदपूरच नाही तर त्याच्या आसपासच्या गावाचा चेहरामोहरा बदलला होता व त्याच आजुबाजूच्या गावच्या लोकांना नवपरीवर्तन पॅनलचं काम दिसू लागलं होतं. हीच पावती होती की ते पॅनल पुढं कधीच पडणार नव्हतं. 
           पाच वर्ष अशीच जनतेची सेवा करता करता व गावचा विकास करता करता कशी निघून गेली ते कळलंच नाही. तशी दुसरी निवडणूक आली व दुसऱ्या निवडणूकीत सुजीतनं पुर्ण राज्यभर आपले उमेदवार उभे केले. आता नवपरीवर्तन पॅनल काही गोविंदपूर व गोविंदपूरच्या आजूबाजूच्या गावापुरतं मर्यादीत राहिलं नव्हतं. त्या पाच वर्षाच्या गोविंदपूर आणि आजूबाजूच्या गावाच्या विकासाचा आराखडा आता संबंध राज्यात पसरला होता. लोकं नवपरीवर्तन पॅनलला ओळखायला लागले होते. त्याचं कारण होतं ते गोविंदपूर आणि त्या गोविंदपूरच्या लगतच असलेला तो आदिवासी भाग. आज त्याच आदिवासी भागाचा चेहरामोहराच बदलल्यानं लोकं आश्चर्यचकीत झाल्यागत वाटत होते. तशी त्या आदिवासी भागाची राज्यभर चर्चा होताच नवपरीवर्तन पॅनलनं हळूहळूच पाय पसरण्यास सुरुवात केली. तशी राज्याची निवडणूक आली. 
            ती राज्याची निवडणूक. त्या निवडणूकीत सुजीतनं नवपरीवर्तन पॅनलच्या नावानं आपले आपले उमेदवार घोषीत केले. तशी निवडणूक चुरशीची झाली व गोविंदपूरच्या आणि त्याच्याच आजुबाजूच्या गावाच्या विकासाच्या आधारावर आज सुजीतचाच पक्ष निवडणूकीत बाजी मारुन गेला व आतापर्यंत एवढ्या वर्षात कधी न होणारं परीवर्तन राज्यानं अनुभवलं. तसा सुजीत राज्याचा मुख्यमंत्री बनला. 
          सुजीत राज्याचा मुख्यमंत्री बनला होता. आता त्याचं काम वाढलं होतं. तो मुख्यमंत्री बनला होता. तशी त्याची जबाबदारीही फार वाढली होती. त्याच्यासमोर मोठमोठे आव्हान होते. पहिलं आव्हान त्याच आदिवासी क्षेत्राचं होतं. ज्या क्षेत्राचा वापर आजपर्यंत कित्येक राजकीय पक्षांनी मतदानासाठी आणि निवडून येण्यासाठी निवडणूकीपुरता घेतला होता. परंतु त्यांनी निवडणूक होताच त्याच आदिवासी गावाकडे गोविंदपूरसारखी आतापर्यंत पाठ फिरवली होती. दुसरं आव्हान होतं शेतकरी सन्मान. त्याला शेतकऱ्यांना सन्मान मिळवून द्यायचा होता आणि तिसरं आव्हान होतं देशातील शिक्षण तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवणं. तसंच ते शिक्षण निःशुल्क करणं. मग ते महाविद्यालयातील कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण का असेना. सुजीतला वाटत होतं की कोणत्याही शिक्षणापासून कोणताही हुशार विद्यार्थी वंचीत राहायला नको. यासाठीच त्याच्यासमोर शिक्षणाच्या निःशुल्कीकरणाचं आव्हान होतं. त्याचबरोबर बरेचसे आव्हान होते की जे राज्याच्या हितासाठी स्विकारावेच लागत होते. 
          सुजीतनं निवडून येताच आपल्या पक्षांतर्गत आदिवासी बहुल क्षेत्राचा आधी विकास करण्यास प्रारंभ केला. परंतु शिक्षण निःशुल्क करायचं कसं? हे आव्हान त्याचेसमोर होतं. त्यातच शिक्षण निःशुल्क केल्यास तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार होता. शिवाय आतापर्यंत ज्या कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे महाविद्यालय होते. त्यांच्याकडून ते काढून घेणे अगत्याचे होते. परंतु ते निघणार कसे? कारण जर ते काढले असते तर त्यातून ते न्यायालयात जाण्याचा धोका होता. त्याचाही ताण राज्याच्या तिजोरीवर पडणार होता. शिवाय त्याला केंद्राचा विरोधही होणार होता व ती गोष्ट परवडण्यासारखी नव्हती. 
          राजसत्तेवर सुजीत येताच त्यानं शिक्षण निःशुल्क केलं व मोठमोठी महाविद्यालय उघडण्यास प्रारंभ केला. त्या महाविद्यालयात त्यांनी मोठमोठ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या व त्याचा फटका शिक्षण सम्राटांना बसला व त्यांच्या खाजगी महाविद्यालयात आता मुलं मिळेनाशी झाली. परंतु तरीही त्यांनी आपलं महाविद्यालय सुरु ठेवलं होतं. कारण त्यांना अनुदान सरकारच देत होतं.
             सुजीतनं हळूहळूच शिक्षण सम्राटांची शिक्षणावरील पकड ढिली केली. त्यानंतर त्यानं काही दिवसातच खाजगी महाविद्यालयाला देण्यात येणारं अनुदान बंद केलं. आता शिक्षण सम्राट रस्त्यावर आले होते. ते आंदोलनं करीत होते. परंतु त्यांच्या आंदोलनाचा सुजीतच्या सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. तसं पाहता महाविद्यालयातील शिक्षण हे निःशुल्क असून दर्जेदार शिक्षण मिळत असल्यानं लोकांची ओरड नव्हती. त्यामुळंच शिक्षणसम्राटांना शेवटी चूप बसावं लागलं. 
           खाजगीत आता अनुदान नव्हतं. तरीही महाविद्यालय सुरुच होते. परंतु आता मुलं जास्त नव्हती त्या महाविद्यालयात. कारण दर्जेदार व तेही निःशुल्क शिक्षण मिळतं, म्हणून मुलं सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेत होती.
            खाजगी महाविद्यालय हे आता धुकधुकीवर जीवंत होतं. खाजगी संस्थाचालकांना पैसे मिळत होते. परंतु तिथं प्रवेश घेणारे जास्त नसल्यानं ती महाविद्यालयं बंद होण्याच्या परिस्थितीत होते. तरीपण ते सुरु होते व त्यांनी सरकारी महाविद्यालय बंद करावी अशी हाक लावली होती. तसंच तिथं काहीच शिकवीत नाही अशी ते बदनामी करीत होते.
          लोकं आनंदात होते. कारण आता सामान्य लोकांमधूनही ज्यांच्याजवळ कुवत होती. परंतु पैसा नव्हता. अशी मुलंही आता मोठमोठ्या पदव्या पटकावीत होते व ते पदव्या घेवून देशाची सेवा करीत होते. 
             सुजीतनं महाविद्यालयातील मुलांचं शिक्षण निःशुल्क केल्यानं हे सगळं घडलं होतं. संस्थाचालक जे शिरजोर झाले होते. त्या संस्थाचालकांची मग्रुरी एका झटक्यात सुजीतनं उतरवली होती. परंतु आता सुजीतनं सरकारी महाविद्यालय काढल्यानंतर त्याला जो पैसा लागला होता. तो पैसा गोळा करण्यासाठी आमदारांचा फंडही कमी केला होता. त्यामुळंच सगळं राजकारण चिघळलं होतं. तसेच सर्वच आमदार जे आजपर्यंत जनतेच्या पैशावर मजा मारत होते. ते आता दुःखीकष्टी झाले होते.  मात्र त्याच्या पार्टीचे जे आमदार बनले होते. त्याचं वेतन कमी जरी झालं असलं तरी ते खुश होते. त्यांच्यासमोर  कोणतीच समस्या नव्हती. आता सुजीतसमोर एकच ध्येय उरलं होतं. ते म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीचं स्वरूप बदलवणं. ते स्वरूप बदलविण्यासाठी संपूर्ण देशाची सत्ता हाती घेणं आवश्यक होतं. ती सत्ता जेव्हापर्यंत हातात येणार नव्हती. तेव्हापर्यंत त्याला कोणत्याच शेतकऱ्यांना सुखी करता येणार नव्हतं. 
         
**********************************************************

            पाच वर्ष असेच निघून गेले होते. ते निघून जाताच पुन्हा निवडणूक येवून ठेपली. आता सुजीतचं सरकार निवडून येईलच याची शाश्वती नव्हती. चिन्हं तशीच दिसत होती. विरोधक असंतुष्ट होते. कारण विरोधकांचे मासीक वेतन कमी केल्यानं ते असंतुष्ट राहणारच होते. शिवाय महाविद्यालय निःशुल्क केल्यानं त्यांचे धाबेही दणाणले होते. त्यामुळंच त्यांचा विरोध होणं साहजीकच होतं. आजही विरोधक असंतुष्ट असल्यानं त्याचा फटका त्याला पडत होता. 
            निवडणूक आली होती. तसं निवडणुकीला त्याला सामोरे जावं लागलं. परंतु सुजीतनं हार मानली नव्हती. तशी जनता आपल्या कामावर  खुश आहे याचा प्रत्यय त्याला आला होता. तेच अव्हेरून त्यानं या निवडणुकीत पाय पसरले व आपलं परीवर्तन पॅनल नव्या दमानं त्यानं देशाची निवडणूक लढविण्यासाठी उभं केलं. 
         सुजीतनं आपल्या नवपरीवर्तन पॅनलचे उमेदवार अख्ख्या देशात उभे केले. तसंच त्यानं आपल्या पॅनलचे नशीब आजमावलं. 
           निवडणूक आली. तसे निवडणूकीत नवे रंग भरले गेले व त्याच नवीन रंगानुसार मतदारांना आकर्षीत करण्यासाठी मतदारांना प्रलोभन देण्यात आलं. फैरीवर फैरी झाडल्या जावू लागल्या. त्याचा परिणाम हा झाला की त्या फैरीनुसार जेव्हा संपूर्ण निवडणूक संपली व निकाल लागला. तेव्हा सर्वच पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुजीतचं नवपरीवर्तन पॅनल भरघोष मतानं देशात निवडून आलं होतं. 
          सुजीतचं नवपरीवर्तन पॅनल निवडून येताच त्यानं सर्वात पहिलं काम केलं. ते म्हणजे त्यानं खासदार व आमदारांचे वेतन कमी केले व पेंशन बंद करुन टाकली कायमची. त्यानंतर त्यानं सरकारी नोकरीत असलेल्या लोकांचे वेतन कमी करुन टाकले. शिवाय हळूहळू त्यांच्यात खाजगीकरण आणलं. देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून नवनव्या योजना आखल्या. त्यानं सडका बनवल्या. सडकांचं रुंदीकरण केलं व आवश्यकता जिथे होती, तिथं पूल बांधले. काही ठिकाणी उडाणपुलही बांधले. तसेच जे कोणते आदिवासी भाग होते. त्या भागाला मुख्य प्रवाहात आणलं. शिवाय त्यानं आता संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेत बदल केला. आजच्या त्या पुर्णच शिक्षणव्यवस्था बदलवल्या. त्या सर्व शिक्षणव्यवस्था निःशुल्क करुन टाकल्या. पुर्णच महाविद्यालये सरकारी मालकीची करुन टाकली व त्या महाविद्यालयात कोणताच संस्थाचालक ठेवला नाही. मात्र हे सर्व करुनही तो खुश नव्हता. कारण त्याला शेतकऱ्यांना सुखी करायचे होते. ते तेवढं कार्य अजून त्याच्या हातून घडले नव्हते. 
            शिक्षणाच्या या प्रवाहात काम करीत असतांना शिक्षण हे  निःशुल्क केल्यानं सर्व देशच सुखी झाला होता. कारण लोकांनी आजपर्यंत आपल्या मुलांना शिकवायला पै पै पैसा मोजला होता. तो पैसा आता काही लागत नव्हता. 
           शिक्षणाची गंगा आज गरीबांच्या घराघरात पोहोचली होती. आज तो आदिवासी समाज, जो दऱ्याखोऱ्यात राहात होता. तोही सुखी झाला होता. मात्र शेतकरी सुखी व्हायचे बाकी होते. अशातच दुसरी निवडणूक आली. 
            निवडणुकीचा बिगुल वाजला. तो वाजताच सर्व पक्ष एकजूट होवून सुजीतच्या विरोधात पुढं सरसावले होते. विचार करीत होते त्याला निवडणुकीत पाडायचा. परंतु त्याचं कार्य बोलत होतं. त्यानं केलेल्या चांगल्या कार्यानं आज निवडणूक संपताच पुन्हा तोच निवडून आला होता. जरी विरोधकांनी जनतेला प्रलोभन दिलं तरी आणि कितीही त्याच्या विरोधात जनतेला सांगीतलं असलं तरी. आज तो पुन्हा निवडणूकीत विजयी झाला होता. आता त्याच्यासमोर जे ध्येय होतं, शेतकऱ्यांना सुखी करण्याचं. ते ध्येय यावेळेस त्याला साकार करायचं होतं. यावेळेस निवडणूक झाली व सुजीत निवडून आला आणि यावेळेस त्यानं शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी नवीनच पवित्रा उचलला. तो कोणतंही कार्य करतांना आपल्या निवडणुकीवर परिणाम होईल. आपण कदाचीत निवडून येणार नाही याचा विचार करीत नव्हता. यावेळेसही त्यानं तेच केलं. संसदेत त्यानं एक बिल मांडलं. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांच्या जमीनी आपल्या हातात घ्यायचा विचार त्यानं केला. तशी योजना तयार केली व ठरवलं की शेतकरी वर्गाच्या सर्व जमीनी सरकारनं ताब्यात घ्यायच्या व त्याच जमीनीवर शेतकऱ्यांना नोकरीवर ठेवायचं. बदल्यात वेतन द्यायचं. वेतन चांगलं द्यायचं. शिवाय जे राबतील, त्यांना पेन्शन द्यायची. 
             ते बिल........ते बिल संसदेत पास झालं. सुरुवातीला ही योजना ऐच्छिक स्वरुपाची होती. लोकांना स्वेच्छेनं जमीनी मागितल्या होत्या. परंतु ते बिल पास झालं तरीही लोकांनी आपल्या जमिनी सरकारला दिल्या नव्हत्या. मात्र शेती परवडत नाही असे सगळेच म्हणत होते. परंतु सुजीत म्हणत होता की जर शेती परवडत नाही तर ज्यांना ती परवडत नाही. त्यांनी तरी आपल्या जमीनी सरकारला द्याव्या. बदल्यात सरकार वेतन देईल. शिवाय पेन्शनही देईल. परंतु त्या विचारावर कोणीच अंमल करीत नव्हतं. ते मात्र शेती परवडत नाही असं म्हणत होते. तसं पाहता शेती परवडत नसल्यानं काही लोकं आत्महत्याही करीत होते आणि विरोधक सुजीतच्या सरकारविरोधात ओरडत होते. म्हणत होते की होपलेस सरकार. सरकारला आत्महत्याही रोखता येत नाही.
             देशात घडणाऱ्या आत्महत्या. त्यावर तोडगा काढणे गरजेचे होते. शेवटी सुजीतच्या सरकारनं तसा कायदाच केला. सर्व जमीनी त्या सरकारनं आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्याच जमीनीवर सरकारनं शेतकरी वर्गाला नोकरीवर ठेवलं. पेन्शन देणार असल्याचं आश्वासन दिलं. 
            आता त्या जमीनीवर सरकारचं नियंत्रण होतं. सरकार शेती करणाऱ्या लोकांना वेतन देत होतं आणि ज्यानं शेती केली व वयाची पासष्ट वर्ष शेतीत घालवली. त्याला पेन्शनही देणं सुरु केलं होतं. आता आत्महत्येवर तोडगा निघाला होता. आत्महत्या थांबल्या होत्या. परंतु या गोष्टीनं शेतकरी नाराज झाला होता. परंतु मजूर सुखी झाला होता. कारण त्याला कुठंही काम करणं होतंच. तो यासाठी सुखी झाला होता. कारण त्याला वेतनही मिळत होतं आणि पेन्शनही.

**********************************************

              आज शेतकऱ्यांची हालत अगदी दयनीय आहे. बरेचसे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचं कारण म्हणजे शेती न पिकणे. शेतीत पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन न झाल्यानं जी बिकट परिस्थिती निर्माण होते. ती सहन न झाल्यानं शेतकरी आत्महत्या करीत असतात. कारण शेती पिकवायला पैसा लागतो. बियाणे घ्यायला व ते रुजवायला पै पै पैसा लागतोच. एवढंच नाही तर ते बियाणे अंकुरीत झाले की त्या अंकूराची पुढे रोपे होईपर्यंत आणि पुढं त्याला फुल लागेपर्यंत पैसा लागतो आणि अशावेळेस एखाद्या वेळेस ओला दुष्काळ वा सुका दुष्काळ पडला की बस. शेतकरी हवालदिल होतो. कारण उभी रोपं कोलमडून पडलेली असतात. त्यातच शेतकरी आत्महत्या घडत असतात. यावर उपाय एकच. सरकारनं एक कायदा करावा. सर्व जमीनी आपल्या ताब्यात घ्याव्या. त्यावर शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात. त्यांना वेतनही द्यावं व वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना पेन्शनही द्यावी. तेव्हाच शेतकऱ्यांची हालत सुधारेल व कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतीही चांगली पिकेल व शेतकरी वर्गही खुश राहील व कोणाचीच कुरकुर राहणार नाही. ही सत्य बाब आहे.
           शेती करणं काही सोपी गोष्ट नाही. ती परवडणारीही गोष्ट नाही. कारण शेती करायला कठोर परिश्रम लागतात आणि ती परवडत नाही. कारण तिला पोषायला पैसा लागतो. जेव्हा  सुक्या किंवा ओल्या दुष्काळानं शेती बुडते वा शेतीचं नुकसान होतं. तेव्हा त्या शेतीला उभारी देण्यासाठी वा लावायला पैसा लागतो. तो पैसा शेतकऱ्यांजवळ नसल्यानं तो जगेल कसा? त्यातच शेती जर नाही केली दोन वर्ष, तर ती शेती ओसाड बनते. मग तिला पुन्हा उभारी द्यायला जास्त पैसा लागतो. म्हणूनच शेती करणं हे नुकसानदायक काम आहे. तरीही शेतकरी शेती करीत असतात. 
            शेती करणं वाईट नाही. परंतु बरीचशी मंडळी म्हणतात की शेती करणं वाईट आहे. ती परवडणारी गोष्ट नाही. त्यांचंही कदाचीत बरोबरच आहे. कारण शेतकरी माणसाला रोजच मरणाला समोर जावं लागतं. त्यांच्या पावलोपावली मृत्यू थयथय नाचत असतो. कधी वीजेच्या पडण्यानं त्याचा मृत्यू होतो तर कधी एखादा साप चावून. कधी एखाद्या हिंस्र जनावरांची त्याला शिकार व्हावी लागते तर कधी अकस्मात निर्माण झालेल्या सुक्या ओल्या दुष्काळाचा आघात सहन न झाल्यानं मृत्यू होतो. आत्महत्या तर आता नेहमीच्याच ठरलेल्या आहेत. 
          आता कोणी म्हणतील की शेती करणं वाईट गोष्ट नाही असं का म्हणावं कोणी? तर त्याचं उत्तर असं देता येईल की ज्याला शेती कराविशी वाटत नसेल आणि त्याला जर म्हटलं की बाबा रे तू शेती करीत नाही तर ती शेती सरकारला दानात दे. तर तो देणार नाही. बदल्यात त्याला सरकारी नोकरी दिली तरी. हं, अनुकंपातही शेती शेतकऱ्यांकडून जबरीनं हिसकावून घ्यावी लागते. आता यात सांगायचं म्हणजे शेती जर परवडत नाही तर शेतकरी आपली शेती कुणी मागीतल्यास स्वखुशीनं सोडतो का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. जर सरकारनं म्हटलं की आम्ही तुम्हा शेतकऱ्यांना वेतन देणार. पेन्शनही देणार. तरी कोणी सरकारला शेती स्वखुशीने व सहजासहजी देणार नाही. याचाच अर्थ असा की शेतकरी वर्गाला शेती करणं परवडत असावी. म्हणूनच कोणताच शेतकरी असे पाऊल उचलू शकत नाही. ही सत्यता आहे. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे बरेचसे शेतकरी शेतीला आपली माय वा माऊली समजतात. जसा आपण आपल्या आईचा सौदा करीत नाही. तसा शेतकरी आपल्या शेतीचाही सौदा करीत नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही लोकांना शेती ही दुभत्या म्हशीसारखी असते. ते दिमाखानं शेती करतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. शेतीचं व्यवस्थापन शास्र त्यांना कळतं व ते आपल्या शेतीत अस्सल उत्पादन घेतात की त्या उत्पादनावर निसर्गनिर्मीत कोणत्याही संकटांचा परिणाम होत नाही. ते अतिशय कठीण परिस्थितीतही लाभातच राहतात. लाभाचीच शेती करतात. 
            शेती परवडते. परंतु कोणाला? ज्याच्याकडे कितीतरी एकर कास्तकारी आहे व जो आपल्या नोकराच्या भरवशावर स्वतः उपस्थीत राहून मेहनत करुन घेतो. ज्याला काहीच करावं लागत नाही. फक्त देखरेख ठेवावी लागते नोकरांवर व नोकरांना राबवून घ्यावं लागतं गुलामागत. ते राबवून घेतात. तसेच ते आपल्या शेतीत वर्षभर पिकं काढत असतात. एक पीक बुडलं तरी चालेल. परंतु दुसरं पीक उत्पादन देत असतं. त्यांनाच शेती परवडत असते. मात्र अल्पभूधारकांना शेती परवडत नाही. 
           शेती ही महत्वपुर्ण गोष्ट आहे.  शेती जर नसेल तर कोणताच व्यक्ती पोट भरु शकणार नाही. कारण शेतीतूनच निघालेल्या उत्पादनावर लोकं आपलं पोट जगवत असतात. त्यामुळंच शेती करणं ही आजच्या काळात गरजेची बाब झालेली आहे.    
            शेती.......शेती शेतकऱ्यांनी करावी. कारण त्यांनी जर ती केली नाही तर उभा संसार नेस्तनाबूत होईल.  या देशातच नाही तर जगातही शेती केली गेली नाही तर जगातही कोणीच जगणार नाही. निसर्ग विराण होईल. म्हणूनच ती मग परवडत असो वा नसो. शेतकरी बांधव शेती करीत असतात. निसर्ग चक्राचा फेराही ते झेलत असतात. 
          महत्वाचं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांनी शेती करावी व त्याला ती परवडावी. तसं पाहता शेतकरी शेती करतात. कारण ती एक समाजसेवाच आहे. जी कोणी करीत नाही. करु शकत नाही. ती समाजसेवा शेतकरीच करीत असतात. त्यांना तशी ती समाजसेवा करणं आवडत असते. बदल्यात काय मिळतं त्यांना? तुटपुंजे पैसे. त्यांच्या मालाला तर रितसर भावही मिळत नाही. तरीही ते शेतकरी सर्व संकट सहन करुन शेती परवडत नसली तरी शेती करीत असतात. ज्यावेळेस त्यांना शेतात माल लावणीची वेळ येते. तेव्हा बी, बियाणे व खते यासारख्या सर्वच वस्तू महाग होतात आणि जेव्हा त्याचं पीक निघतं, तेव्हा सर्वच वस्तू स्वस्त होतात. त्यातच एखाद्याला शेतकऱ्यानं म्हटलं की अमूक वस्तू अमूक किमतीची आहे तर आपण एवढी महाग का? असं म्हणत भाव करतात आणि शेतकरीही तसा भाव टाव करुन आपलं उत्पादन स्वस्त भावात देतात. त्या शेतकऱ्यानं आपल्यासाठी एवढी मेहनत केलेली असतांनाही. तिथंच जर आपण एखाद्या मोठ्या हॉटेलात वा बारमध्ये गेलो तर तिथं कोणताच भाव करीत नाही. उलट तेथील वेटर पगारी असूनही त्याला टिप्स देतो. इथं दारुचे दर जरी कितीही वाढवले तरी तिथं आपण भाव करीत नाही. ती सर्रास आपल्याला घेणं जमते. त्यातून पोषक पदार्थ मिळत नसले तरी आणि ती दारु हानीकारक असली तरी आणि ज्या वस्तूतून शेतकरी आपल्याला पोषक तत्व देतो. त्या वस्तूचा आपण भाव करतो. ही लाजीरवाणी गोष्ट आहे 
           शेती आम्हाला परवडत नाही.  ही बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड आहे. कारण तो जे शोषतो. ते कोणीच शोषत नाही. तरीही ते शेतकरी शेतीसाठी सगळं सहन करतात. कारण ती त्यांची आई आहे आणि आईचा ते सौदा करीत नाही. त्यामुळंच आपणही त्यांच्याप्रती वागतांना तीच भुमिका ठेवावी. आपणही जसे दुसऱ्यांच्या आईला आई मानतो. तशीच आई शेतकऱ्यांच्या या शेतीलाही मानावं व भावटाव न करता त्यांच्याकडून वस्तू विकत घ्याव्यात. जेणेकरुन त्यांनाही शेती परवडेल. नाहीतर प्रत्येक शेतकरी आपली शेती विकेल व शानमध्ये राहून आपला संसार करेल. त्यात आपलंच नुकसान होईल. त्यात आपल्यावरच नाही तर आपल्याच देशावर भीक मागायची पाळी येईल हे नाकारता येत नाही. कारण शेतीच नसेल तर अन्नधान्य मिळणार कुठून? 
         शेती परवडावी. कारण ती एक समाजसेवाच आहे. ज्या समाजसेवेतून काहीच मिळत नसलं तरी शेतकरी ती समाजसेवा करतो. कुरकुर करीत नाही आणि ज्याला कुरकुर करायची सवय आहे त्यांनी शेतीच करु नये. त्यानं सरकारला शेती दान करावी. बदल्यात एक सरकारी नोकरी मागून घ्यावी. म्हणजे आलेशान चार भींतीत कुलरच्या हवेत मरतपर्यंत सुख भोगता येईल. सरकारनंही ती द्यावी. परंतु सरकार ती देणार नाही. कारण ही गोष्ट बरेचसे शेतकरी करतील व सरकारवरच संकट निर्माण होईल. ही सत्यता देखील नाकारता येत नाही. हे तेवढंच खरं आहे. 
            अलिकडे लोकांना शेतीचं महत्व कळेनासं झालंय. त्याचं कारण म्हणजे  शेतीचं होत असलेलं नुकसान. लोकांना मात्र शेतीशी व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. ते शेती करणाऱ्या लोकांना कधीच मदत करणार नाहीत. उलट त्यांना त्रास देतात. उलट त्यांना मदत करतात की जे व्यापार करतात. लोकं थेट माल शेतकऱ्यांकडून घेत नाहीत. ते व्यापाऱ्यांकडून घेतात. जो शेतकऱ्यांकडून कमी दामात म्हणजेच अतिशय लाजिरवाण्या भावात माल विकत घेतो. त्याला साफ करायला मजूर लावतो. स्वतः अंगानं काम करीत नाही. फक्त हुकूम चालवतो आणि तो माल स्वच्छ व साफसुथरा झाल्यावर जास्त दामात विकतो आणि आपण मुर्खासारखे शेतकऱ्यांना दोन पैसे न देता व्यापाऱ्यांकडून तोच माल विकत घेतो. जो कोणतीच मेहनत करीत नाही वा कोणतीच संकटं झेलीत नाही. आपल्याला असा व्यापारी चालतो. कारण आपल्याला ओरीजनल प्रत खायची सवयच नाही. सर्व  अन्नपदार्थातील भेसळ खाण्याची सवय आहे.
          व्यापारी शेतकऱ्यांकडून माल तर विकत घेतात. परंतु तो माल चमकावा म्हणून त्याच मालावर रसायनांच्या प्रक्रिया करतात. जी रसायनं शरीराला घातक असतात. आपल्याला ते माहीतही असतं. तरीही आपण व्यापाऱ्यांकडूनच माल घेतो. 
             आजचं जगंच व्यापारी झालं आहे. आपल्या जवळ वेळ नाही की आपण अन्नधान्य साफ करु सवडीनं. साधी फळं विलायचीनं पिकवता येतात नैसर्गिक पद्धतीनं. परंतु ती प्रक्रिया आपल्याला माहीत नाही. आपण घरी फळंच पिकवायला पाहात नाही. आपल्याला पिकलेली फळं हवी असतात. मग ती कुत्रीमपद्धतीनं पिकविली असली तरी चालते. त्यात घातक रसायनं टाकलेली असली तरी चालते आणि ती रसायनं आपल्या शरीराला घातक ठरली तरी आपल्याला चालते. आजचे लोकं तर असे आहेत की त्यांना राम कथा ऐकायला वेळ आहे. परंतु शेतकऱ्यांकडून अन्नधान्य विकत घेवून ते स्वच्छ करुन खायला वेळ नाही. कारण आजचा काळ हा अल्प श्रमात जास्त काही मिळायला हवं असा आहे. तसंच आज लोकांना  भपकेबाजपणा आवडतो. तांदूळ वा गव्हावरची चमक लोकांना आवडते. परंतु ती चमक का आहे? याचा कोणीही विचारच करीत नाही. रामकथेचंही उदाहरण देतो. लोकं रामकथा ऐकतात आणि त्या रामकथेनं मनोरंजन करुन घेतात. त्या रामकथेचं आयोजन करण्यासाठी पैसेही मोजतात. परंतु तो रामकथा सांगणारा कसा आहे? त्याचं वागणं कसं आहे? याचा विचार करीत नाही. खरंच रामकथा सांगणारे व्यक्ती रामाचे दोनचार गुण तरी अंगी बाळगतात का? राम वनवासात गेले,  तेव्हा त्यांनी आपल्या रथाचाही त्याग केला होता नव्हे तर पादत्राणेही त्यागली होती. ते पैदल चालत होते आणि आमच्या घराकडे जे रामकथा सांगतात. ते थोडेसेही पैदल चालत नाहीत. त्यांना गाडी हवी असते. शिवाय त्यांना पायात घालायला चप्पल हवी असते तिही महागडी. आपल्याला फक्त तो कथा सांगतो साधी. तरीही आपण त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्याच्या चरणी एवढा पैसा अर्पण करतो की जो मोजताही येत नाही. काश! तोच पैसा आपण त्या रामकथा ऐकण्यात खर्च न करता तो शेतकऱ्यांना दिला तर त्यांच्या घरी एका सांजची चूल तरी पेटू शकते किंवा तो पैसा त्याच्या लेकरांना चड्डी घेण्याच्या कामात तरी येवू शकतो  किंवा तो पैसा एखाद्या शेतकऱ्यांच्या पोरीच्या वैवाहिक कार्यात कामात येतो. बिचारीला आत्महत्या तर करावी लागणार नाही किंवा तो त्याच्या लेकरांच्या शिक्षणाच्या कामात येवू शकतो. परंतु आपण तसं करीत नाहीत. एवढंच नाही तर आपण आपल्या दरवाजावर येणारे वेषधारी लोकं.......कधी कोणाचे रुप घेवून येतात व आपण त्यांना देव त्यांच्या रुपात घरी आला असं समजून त्यांना भरपूर पैसे देतो. कधी पीठ व कधी धनधान्यही. जे ते धनधान्य विकून संध्याकाळी दारु पितात. मात्र आपल्याला ते चालतं. परंतु आपल्याला उपाशी पोटी खळ्यात मरत असलेला व स्वतःच्या गळ्याभोवती कर्जापोटी गळफास लावत असलेला शेतकरी चालत नाही. तो धडधाकट असूनही त्याला आपण दुषणं देत नाही. परंतु दुषणं आपण शेतकऱ्यांना देतो. त्यांना काहीबाही बोलतो. कारण तो शेतकरी असल्यानं ऊन, पाऊस अवर्षणच नाही तर आपलं बोलणंही सहन करतो. सहनशिलता हा गुण त्याच्यात असतो म्हणून. 
           निसर्गाबाबत सांगतांना एवढंच म्हणता येईल की निसर्ग हा शेतकऱ्यांवर आधीपासूनच अन्यायच करीत आला आहे. पुर्वीही सतत पाऊस यायचा की त्यात शेतीचं अतोनात नुकसान व्हायचं. पुर्वीही गारा पडायच्या आणि त्या गारात उभी पिके कोलमडून पडायची. अन् आताही काही निसर्गानं सोडलेलं नाही. जेव्हा आवश्यकता असते. तेव्हा पाऊस नसतो. मग कितीही ड्रमभर शिवपिंडीवर पाणी ओता. अन् जेव्हा आवश्यकता नसते,  तेव्हा अतोनात पाऊस येतो. ही वास्तविकता आहे निसर्गाची. यात जे नुकसान होतं. ते कधीच भरुन निघत नाही. शेतकऱ्यांचं हे नुकसान दरवर्षीच होत असतं. निसर्गचक्रानं शेतीत एवढं नुकसान होतं की प्रसंगी शेतकऱ्यांना आपली बैलं, ज्या बैलांना स्वलेकरागत वाढवलेलं असतं, आपली बैलगाडी, आपली घरंदारं विकावी लागतात. काही काही तर शेतकरी असेही आहेत की त्यांनी स्वलेकरंही विकलेली आहेत शेतीसाठी लागणारे पैसे उभे करण्यासाठी. परंतु ती प्रकरणं उजेडात आलेली नाहीत. हं, आपली भार्या ते विकू शकले नाहीत. तेव्हा विचार आला व अशाच विचारात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. परंतु कर्ज काही फिटलं नाही. आज शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच जर सुरु राहिली तर तो दिवस दूर नाही की तो आपली भार्याही विकेल. कारण शेती हा एक प्रकारचा जुगाराचा खेळ आहे. नशीब चांगलं असलं की पिकतं. नाहीतर कितीही मेहनत करा. पालथ्या घड्यावर पाणीच. 
          आज शेतकरी सुखी नाही. सुखी आहेत व्यापारी, फेरीवाले आणि मंदिरातील पुजारीदेखील. साधा हातठेला आणि पानठेला जरी लावला तरी तो बसल्या बसल्या जागेवरुनच कितीतरी पैसा कमवू शकतो. तसाच पुजारी.......पुजारीही बसल्याच जागेवरुन कितीतरी पैसा कमवतो. कारण लोकं मंदिरात श्रद्धेनं पैसा दान करतातच. देवाला पैसा हवा नसतो आणि देव काही खात नाही हे माहीत असूनही. इथं धार्मीक आस्थेच्या नावावर कितीतरी पैसा दान दिला जातो. कितीतरी मंदीरं विनाकारण बांधली जातात. परंतु तसा पैसा खर्च न करता जर तोच पैसा गरीब शेतकऱ्यांसाठी गोळा केला व तो पैसा अशा कर्जव्याप्त शेतकऱ्यांना दान जर दिल्या गेला वा गरीब लोकांना दिल्या गेला तर बिचाऱ्यांच्या आत्महत्या तरी वाचतील. ते आत्महत्या करणार नाहीत. परंतु कोण सांगणार? कारण धार्मीकता जोपासणे हा श्रद्धेचा विषय आहे. तो ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. ते ज्याचं त्याचं मत आहे. कोणाकडून शेतकरी आत्महत्या दाखवून भावनिकतेनं पैसा काढता येत नाही. कारण पैसा हा त्यांचा असतो. तो त्यांनी कमविलेला असतो. ते तो पैसा मंदिरात दान देवो वा एखाद्या साधू नसून साधूचा आवेश आणणाऱ्या लोकांना देवो. तो त्यांचा स्वतःचा पैसा असतो. त्यावर कोणीच काही बोलू शकत नाही. कारण असे बोलणे हे लोकांना डिवचण्यासारखे असते. त्यांच्या मनातल्या धार्मीक भावनांना छेडल्यासारखे असते.
          आज शेतकऱ्यांची ही वास्तवीकता तरी नजरेतून लपत नाही. परंतु तरीही त्याला दान देण्यासाठी कोणी तयार होत नाहीत. आजचे साधू जरी संधीसाधू असले तरी त्याला दान देतांना पोत्याने पैसा ओतला जातो. कारण तो चमत्कार दाखवतो व आपला त्यावर सहजच विश्वास बसतो. त्यानंतर आजच्या साधूंची वास्तविकता नजरेतून लपते नव्हेतर लपवली जाते. 
           आजच्या कोणत्याही साधूचं बालपण जर पाहिलं तर तो पुर्वी गरीब होता असंच दिसतं आणि तोच साधू नंतर कितीतरी कोट्यधीश झाला हेही दिसतं. कुठून येतो हा पैसा? हा पैसा  आपण दिलेल्या दानातूनच येतो आणि त्या त्या पैशाचा ते वापर कसा करतात हेही आपल्याला माहीत आहे. आज आसाराम सारखे कित्येक साधू नाबालीग मुलींनाच वासनेचे शिकार बनवतात आणि रामरहिमच्या तर मालकीच्या जागेवरच मानवाचे कंकाल सापडतात. तेच घडतं राधेमॉंबद्दल. तरीही आपले डोळे उघडत नाहीत आणि आपण म्हणतो की तो चमत्कारी होता. त्याला आपण आपला गुरु बनवतो. अशा व्याभीचारी, बलात्कारी संतांना. कारण ते चमत्कार करतात असं आपलं मानणं असतं. 
            महत्वाचं सांगायचं झाल्यास खरा चमत्कार तर शेतकरी करतो की जो आपल्या शेतात साधं बी पेरतो आणि चमत्कार करुन त्या बियांना लहानाचं मोठं करतो व ते आपल्याला खायला देतो. आपलं पोट भरणं आणि त्यासाठी अन्न निर्माण करणं ही गोष्ट काही एखाद्या चमत्कारापेक्षा लहान नाही. तरीही आपण त्या शेतकऱ्यांना चमत्कारी मानत नाही. ना त्यांना एक छदामही दान देत. ना त्यांचं जीवन बनवत. उलट पदोपदी त्यांना त्रास देतो. त्यांच्या मालाचा भावटाव करुन.  ही वास्तविकताच आहे. जणू शेतकरी जगूच नये असं आपल्याला वाटत असावं हेच यातून दिसतं. 
            विशेष सांगायचं म्हणजे शेतकरी जगायला हवा. असं वाटत असेल तर दान महत्वपूर्ण. त्याला जगविण्यासाठी. त्याची काळजी घ्यावी. त्याच्या आत्महत्या घडणार नाहीत यासाठी. तो नसेल तर आपलं जगणं व्यर्थ आहे असं समजावं. हं, मंदिरात वा एखाद्या संधी साधूला दान देता ना. खुशाल द्यावे. परंतु त्याचबरोबर शेतकरी वर्गालाही विसरु नये. त्यांच्याही नावानं काही ना काही फंड उभारावा. त्यालाही आपले कर्तव्य समजावे. त्यांच्या आत्महत्या घडू देवू नये. त्यांनाही फुल ना फुलाची पाकळी दान द्यावे. त्यांच्याही उत्थानासाठी कार्य करावे. जेणेकरुन तोही सुखानं राहील. कर्जमुक्त होईल. आत्महत्या करणार नाही. आनंदानं धनधान्य पिकवेल व आपलंच नाही तर देशातील सर्वच लोकांचं पोट भरेल हे तेवढंच खरं आहे. मग तो आनंदी तर आपणही आनंदी राहू. तो आनंद एखाद्या दिव्य चमत्कारापेक्षाही मोठा असेल ही सत्यता नाकारता येत नाही.
             सुजीतच्या सरकारनं शेतकरी आत्महत्या थांबवल्या होत्या. जरी त्याच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या जमीनी आपल्या ताब्यात घेतल्या असल्या तरी. त्यांना नोकरी दिली होती तिही त्यांच्याच शेतात. आता ते वेतन कमवीत होते व त्यांच्या नोकरी करण्याच्या वेळाही ठरलेल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यानं सरकारी तिजोरीवर जास्त ताण पडत होता. सुजीत विचार करीत होता की जर देशाचा कर वाढवला तर त्याचाही त्रास लोकांना होईल. देशातील महागाई वाढेल. तसं सुजीतचं सरकार विचार करु लागलं.
           विचारांती त्याला समजल की लोकं अंधश्रद्धेनं गुरफटलेले असून लोकं जास्तीत जास्त विश्वास देवावर ठेवतात. त्यातच ते बुवाबाजीवर विश्वास ठेवतात. चमत्कारावर विश्वास ठेवून जगतात. शिवाय देव चमत्कार करीत नसला तरी येथील लोकांना देव चमत्कार करीत असल्यासारखा वाटतो. त्यामुळंच या लोकांपैकी कोणी कितीही गरीब असला तरी तो धार्मीक स्थळावर जास्त दान करतो. आपण अशाच धार्मीक स्थळांचं सरकारीकरण करावं. म्हणजे तेथील पैसा आपल्याला मिळवता येईल व तो पैसा देशाच्या कामी येईल. विचारांती त्याच्या सरकारनं आदेश काढला. आदेश असा होता,
            "आजपासून धार्मीक स्थळं लोकांना पुजेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्या स्थळाचे दर्शन करतांना कोणाला मनाई करु नये वा कोणत्याही स्वरुपाचा अडकाव करु नये. तसंच या स्थळावर असलेली ट्रस्टी नष्ट करण्यात येत असून त्या ट्रष्टीचा कारभार स्वयं सरकार आपल्या हातात घेत आहे."
          सरकारनं ट्रष्टी नष्ट केली होती व त्याही जागी सरकारनं आपले स्वयंसेवक नियुक्त केले होते. तसं पाहता ही हुकूमशाहीच होती सरकारची. परंतु सरकार त्या जागेवर सरकारी उमेदवार नियुक्त करीत नसल्यानं लोकांना सरकारी नोकऱ्याही मिळत नव्हत्या व सरकार जबाबदार नव्हतं त्या गोष्टीत. सरकारी नोकऱ्या फक्त शेती व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी होत्या वा काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांसाठीच होत्या. ज्याच्यातून देशाच्या विकासासाठी उत्पादीत माल निघत होता. तसंच त्या नोकरीवर अगदी सामान्य लोकंही लागत होते. 
           वेतन कमी होतं. परंतु सर्वांचं घर चालत होतं. सरकारी कामकाज करणारी यंत्रणा ही खाजगी स्वरुपाची होती. परंतु त्यावर सरकारचा वचक होता. असा वचक ठेवणारा व्यक्ती हा सरकारचा नोकर होता. तो फक्त कामाचा आढावा घेत असे. चांगलं काम करणाऱ्यांना नोकरीवर ठेवत असे व बाकीच्यांना काढून टाकत असे. असा धाक असल्यानं तेही लोकं इमानीइतबारे व्यवस्थीत काम करीत असत. कारण त्यांनाही देवानं पोट रुपात वीतभर खळगी दिली होती. ती भरण्यासाठीच त्यांना काम करावं लागत होतं. 
             देश सुधारत चालला होता. परंतु परीवर्तन काही लोकांना आवडत नव्हतं. सुजीतनं ज्या गोष्टी पुर्वी सरकारी होत्या. त्या गोष्टीत खाजगीकरण आणलं होतं व ज्या गोष्टी खाजगी स्वरुपाच्या होत्या. त्या गोष्टी सरकारी केल्या होत्या. शिवाय हे सर्व करीत असतांना त्याला जनतेचा रोष सहन करावा लागला होता. त्यानं सुधारणा चांगल्या गोष्टीसाठी केल्या होत्या. शेतकऱ्यांना सरकारी नोकऱ्या दिल्या होत्या. परंतु त्या सुधारणा करीत असतांना शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या होत्या. तसाच मंदिरातील पैसा देशसेवेच्या कार्यात उपयोगात आणण्यासाठी त्यानं त्यातील ट्रष्टीपणा काढून टाकला होता. त्यानं  शाळा महाविद्यालयेच नाही तर सर्व शिक्षण निःशुल्क करुन टाकलं होतं.
           ती मंदिरं.......त्या मंदिरात लोकं जास्तीत जास्त प्रमाणात जात येत होते. त्याचा फायदा झाला होता. मंदिराबाबत लोकांची श्रद्धा जास्त असल्यानं जास्त स्वरुपात दान येत होता. केवळ  मंदिरंच नाही तर इतर धार्मीक स्थळातूनही जास्त पैसा संकलीत होत होता. जो देशाच्या कामी येत होता. 
          देशहिताच्या दृष्टीकोनातून सुजीतनं चांगलं कार्य केलं होतं. हे कार्य करीत असतांना त्यानं कधीच मागं वळून पाहिलं नव्हतं. तसा त्याला वेळच भेटला नव्हता. त्यामुळंच तो आजही अविवाहितच होता. परंतु तो जरी अविवाहित राहिला असला तरी तरी आता शेतकऱ्यांच्या मुलाची किंमत वाढली होती. आता त्यांनाही शेतीतच सरकारी नोकरी हमखास मिळत असल्यानं त्यांना हमखास विवाह करण्यासाठी मुली मिळत होत्या. 
             सुजीत नेता होता. त्याची देशसेवा वेगळ्या स्वरुपाची होती. ती देशसेवा वेगळ्या स्वरुपाची असल्यानं जगात त्याचं नाव झालं होतं. लोकं त्याचीच डुप्लिकेट मारत होते नव्हे तर मंदिर वा धार्मीक स्तरातून देशात प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो. म्हणून त्यांनी या देशात नाही तर इतर देशातही आपला पैसा लावून मंदिरं स्थापन केली होती व तो येणारा पैसा ते आपल्या देशात नेत होते. त्या पैशाचा वापर ते आपल्या देशातील मुलांच्या निःशुल्क शिक्षणासाठी करीत होते. कारण त्यांना सुजीतनं दाखवून दिलं होतं की शिक्षण जर निःशुल्क असलं तर सर्वच स्तरातील मुलं शिकू शकतात. बुद्धी केवळ श्रीमंतांजवळच नाही तर गरीब मुलांजवळही असते. 
            सुजीतच्या या निःशुल्क शिक्षणपद्धतीनं सारे मुलं शिकत होते. त्या शिक्षण पद्धतीनं सर्वच स्तरातील मुलं शिकत होती. तशीच ती शिकून सवरुन देशाच्या विविध कामात पडत होती. 
             देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर होता. आता सुजीतच्या सरकारजवळ भरपूर पैसा गोळा झाला होता. त्यामुळंच त्याला जगच नाही तर सारं विश्व पादाक्रांत करता येणार होतं. मात्र त्यानं चांद्रयान मोहिम राबवल्या नाही आणि सुर्यमोहिमाही राबवल्या नाहीत. कारण त्यात पैसे खर्च करण्यापेक्षा तोच पैसा देशाचा विकास करण्याच्या कामी लावला व देशाला महाशक्ती बनवले. तसं पाहता त्याच्या सर्वच कडू गोड अनुभवानं सर्वच लोकं सुखी होते. परंतु तो........तो दुःखी होता. कारण तो शेतकरी असल्यानं त्याला विवाहासाठी मुलगी मिळाली नव्हती व त्याचा विवाहच झाला नव्हता.
              सुजीतच्या सरकारनं सारे विधायक कामे केलेली होते. त्यानं केलेली विधायक कामं विरोधकांच्या डोळ्यात खुपत होती. त्यातच ते सामान्य माणसांना भडकवीत होते. अन् सामान्य माणसांपैकीच काही माणसं भडकतही होते. परंतु काही माणसं मात्र भडकत नव्हते व निवडणूक आली की ते सुजीतच्या नवपरीवर्तन पॅनलला निवडणूकीत भरघोष मतानं निवडून देत असत. त्यामुळंच विरोधक निराश होत. विरोधकाचा निराशपणा व त्यांचे कमी झालेले वेतन हे त्यांना खलत होते व ते त्याला हटविण्याचे डाव रचत होते. 
          निवडणूक.........निवडणूकीत सुजीतला पाडता येत नाही हे गृहीत धरुन शेवटी विरोधकांनी एकदा त्याला संपविण्याचाच डाव रचला. तरीही त्याचेजवळ अंगरक्षक राहात. 
           ते अंगरक्षक सुजीतचे संरक्षण करायचे काम करीत. त्याच्या शरीराला जपत असत. परंतु त्यांच्याही मनात खदखद होतीच. अशातच अंगरक्षकांच्या माध्यमातून डाव रचला जावू लागला.
            सुजीत एक आदिवासी परीवारातील होता. त्यानं लहाणपणी अगदी हलाखीचं जीवन पाहिलं होतं. त्यानं त्या यातना भोगल्या होत्या. त्यानं गावात रस्ते नसलेले पाहिले होते. त्यानं शिक्षणाच्या सोयी पाहिल्या नव्हत्या. त्यानं चांद्रयान ऐकलं होतं. ते चांद्रयान चंद्रावर पोहोचत आहे म्हणून त्याच्या बाईनं त्याला सुटी दिली होती खास टिव्हीवर कार्यक्रम पाहायला. परंतु त्याला तो कार्यक्रम पाहता आला नाही. त्याचं कारण होतं गावात नसलेली वीज. टिव्ही कुठून असणार. तरीही बाईनं सुटी दिली होती. कारण तसा सरकारचा आदेशच होता. गावात रस्ता तर नव्हताच. व्यतिरिक्त गावात अद्यापही वीज नव्हती. अभ्यास करायचा झाल्यास दिवसाच अभ्यास करावा लागायचा. 
          सुजीतनं आज देशाचा सर्वच भाग सुधरवला व देशाचा खऱ्या अर्थानं विकास केला होता. आज  गावागावात सडका नाही तर वीजेचे जाळे पसरले होते.
           सुजीतला तसा राजकारणात व पदावर काम करीत असतांना पुरेसा वेळ मिळत नव्हता. परंतु तरीही वेळात वेळ काढून तो विचार करीत बसायचा. आजही तो विचार करीतच होता. त्याला त्याचं बालपण आठवत होतं. त्या बालपणात एकदाचा त्याला पाऊस आठवत होता. त्या पावसात तो पुर्णतः शाळेतच अडकला होता. पावसात खेळायचा नाद काही पुर्ण झाला नव्हता. कारण तो शाळेतच होता आणि पाऊस सारखा येत होता. त्यादिवशी पाऊस एवढा धोधो पडला होता की गावच्या ओढ्याला पाणी आलं होतं. त्यामुळंच त्याची जिथं शाळा होती. त्या गावात गुरंही बांधायची सोय नव्हती. पाऊस जात नव्हता व ओढ्याला पाणी असल्यानं सुजीत एकटाच शाळेत अडकला होता व त्या दिवशी तो एका शिक्षकाच्या घरी मुक्कामाला होता. त्या शिक्षकालाही राहायला जागा नसल्यानं तो शाळेतच राहात होता. तशी गावात गुरंही बांधायची सोय नसल्यानं व पाऊस येत असल्यानं गाववाल्यानं गावच्या शाळेतच गुरं बांधली होती. त्यातच त्या शिक्षकानं दिवस बुडायच्या आतच स्वतः स्वयंपाक करुन त्याला खाऊ घातलं होतं. कारण वीजेचा प्रश्न होता. सकाळी जेव्हा शिक्षक झोपेतून उठले, तेव्हा सुजीतही उठला होता. त्यानं पाहिलं की त्याचा शिक्षक गुरंढोरं बाहेर काढत आहे व त्याचं शेण फेकत आहे. त्याला तेव्हा आश्चर्य वाटलं व आश्चर्यानं त्यानं प्रश्न केला. 
          "गुरुजी, आपलं काम शिकवाचं हाये, अन् आपण शेण फेकता."
           सुजीतचा भोळाभाबडा प्रश्न. तसं त्याच्या शिक्षकानं उत्तर दिलं. 
          "आता शिक्षकाला सर्वच कामं करावी लागतात. अगदी शेण फेकण्यापासून."
            "का?"
           "जर ती कामं नाही केली तर मला ही मंडळी शाळेतच टिकू देणार नाही. हे आपली मुलं शाळेतच पाठवणार नाही. म्हणूनच यांच्या गावी राहायचं असेल तर यांचंच बनून राहावं लागतं."
           शिक्षक बोलून गेले. परंतु ते त्यावेळेस काय बोलत आहेत हे काही सुजीतला कळलं नाही. आतातर सुजीतला कळत होतं. कारण आज शिक्षकांना बरीच कामं होती आणि ती कामं तरी कोण करणार होते. 
           सुजीतला रात्रीचा तो अंधार खलत होता. त्याला वाटत होतं की रात्रीच्या या अंधारात समजा शौचाला लागलीच तर या परगावी शिक्षकाला उठवायचं कसं? कारण जंगली श्वापदांची भीती होती. गावालाच जंगल लागून असल्यानं रात्रीच्या अंधारात ते हिंस्र श्वापदं मोकाट हिंडत असत व हिंडतांना त्यांना जर कोणी मनुष्यप्राणी दिसलाच तर ते त्यांचेवरही हमला करीत असत. तसं पाहता ते रात्रीला जागलीच राहात. कारण ती हिंस्र श्वापदं गावालगतच बांधलेल्या गुरांवर हमला करीत. ह्या हमल्याला प्रतिउत्तर म्हणून गावातील लोकं जागे राहात. ते दररोज दररोज शाळेत गुरं बांधत नसत. त्यांना शिक्षकांची आदरयुक्त भीती वाटायची. तसं पाहता ते शिक्षकांचा सन्मानच करीत. मात्र पावसाळ्याच्या दिवसात गुरांना पाऊस लागू नये म्हणून ते आपली गुरं शाळेतच बांधत व शाळेत हिंस्र श्वापदांनी गुरांवर व शिक्षकांवर हल्ला करु नये म्हणून ते जागत राहात. जेव्हा पहाट व्हायची व कोंबडा आरवायचा. तेव्हा ती मंडळी झोपी जात. ते एवढे गाढ झोपेत असत की आपली गुरं शाळेत बांधलेली आहेत. याचंही त्यांना भान नसायचं. परंतु शिक्षकाला शाळा भरवायची असे. त्यामुळंच शिक्षक स्वतः पुढाकार घेवून गाय बैलाचं शेण शाळेतून उचलत असे. 
         मुळचा आदिवासी भाग. त्या आदिवासी भागात रस्ते नीट नव्हतेच. विकास हा कवडीचाही नव्हताच. शिवाय रस्ते नसल्यानं चिखल तुडवत दिवस कापावा लागायचा. पावसाळ्यात तर हाल बेहाल राहायचे. पावसाळ्यात आजुबाजूला गवत उगवायचं. त्या गवतात सरपटणारे विषारी प्राणी सैरावैरा फिरायचे. ते कोणाच्या वाट्याला जात नसत. मात्र कोणाचा जर त्याच्या अंगावर पायच पडला तर ते चावा घेत. अशातच कितीतरी लोकांचा या परीसरात जीव गेला होता. 
            शिक्षक हे शिकलेले असायचे. मुळात गाव हे अडाणी होतं. परंतु ते गाव शिकलेल्या या शिक्षकाचा फारच आदर करीत असे. शिक्षकाची प्रतिमा चांगलीच होती. त्याला इमानदार समजलं जात असे.
            देशाचा विकास करीत असतांना जेव्हा सुजीतसमोर शाळेच्या वर्गखोल्याचा प्रश्न आला. तेव्हा मात्र त्याला स्वतःचीच खंत वाटत होती. त्याचं कारण होतं. त्यानं एका शाळेला दिलेली भेट. 
           सुजीत असा व्यक्ती होता की जो वेषांतर करुन आपल्या देशाचा कारभार पाहायला रस्त्यावरही अगदी भिकारी अवस्थेत उभा राहात असे. कधी गिऱ्हाईकांसोबत गोलगप्पे खात असे व मनमोकळेपणानं वार्तालाप करीत असे. त्यातून त्याला देशाची परिस्थिती माहीत होत होती. त्यामुळंच त्याला देशवासीयांची इच्छा काय आहे हेही माहीत पडत असे व त्यानंतर तो त्यानुसार धोरणं आखत असे. असाच तो एकदा एका शाळेत गेला. आताचे शिक्षक शाळेत काय शिकवतात हे पाहायला. परंतु सुजीत जेव्हा शाळेत गेला, तेव्हा त्यानं काही प्रश्न शिक्षकांना विचारले. 
            "आपल्या शाळेतील बरेचसे शिक्षक दिसत नाहीत. ते कुठं गेले?"
             "सर काही शिक्षक जनगणणेसाठी गेले. काही शिक्षक मिटींगला गेले व काही शिक्षक हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी सर्वे करायला गेले."
             "आपण या शाळेत एकचजण शिकवीत दिसत आहात. हे दुसरे शिक्षक संगणकावर बसून काय करीत आहेत?"
             "सर ते ऑनलाईन काम करतात. ऑनलाईन काम करणं गरजेचं म्हणून ते बसलेले आहेत."
             "हे असे दिवसभरच बसतात का?"
             "होय."
            "का बरं?"
            "सर इकडं नेट नसतो. त्यामुळं तासनतास त्या शिक्षकाला संगणकावर बसावंच लागतं."
             "का बरं? शाळेत बाबू नाही का?"
             "नाही सर. बाबूही नाही अन् शिपाही देखील नाही."
             "मग शिपायाची कामं अन् बाबूची कामं?"
             "ती सारी कामं शिक्षकालाच करावी लागतात."
             "मग विद्यार्थी शिकतात का?"
             "........"
            तो सुजीतचा प्रश्न. त्या प्रश्नावर ते शिक्षक चूप बसले. त्यानंतर सुजीतनं पुन्हा प्रश्न केलाच नाही. त्याला कळून चुकलं की विद्यार्थी मागे का पडतात. 
           शाळा व त्या शाळेतील बरेचसे शिक्षक आपल्या कामात उद्योगी राहतात. त्या शाळेतील बरेचसे शिक्षक गायब आहेत व शाळेत दोनच शिक्षक असून एक शिक्षक वर्ग पाहात आहे व दुसरे शिक्षक संगणकावर बसलेले आहे. सुजीत जसा शाळेत गेला होता. तसं त्यानं बाकीचे शिक्षक कुठं गेले याची विचारणा केली होती. तेव्हा शिक्षकांनी ते मिटींगला गेले आहेत हे सांगीतलं होतं. ही मिटींग वर्षभर चालत असते का? असं विचारताच होय असंच उत्तर मिळालं होतं. त्यानंतर त्यानं विचारलं होतं की त्या शाळेत एकच शिक्षक शिकवतो व दुसरा संगणकावर काय करतो. त्यावरही उत्तर मिळालं की तो सध्या ऑनलाईन काळ आहे व या काळात ऑनलाईनच कामं करावी लागतात. कधी नेट राहात नाही. त्यामुळंच सतत संगणकावरच बसून राहावं लागतं. शाळेत शिपाही नाही का?असं विचारल्यावर उत्तर मिळालं की सर्व कामे शिक्षकालाच करावी लागतात. त्याला कळलं की आजचा शिक्षक असा उद्योगी आहे. त्याला इतर कामं भरपूर आहेत. त्यामानानं शिकविण्याचे काम कमी आहे. शाळेत सतत त्याला उद्योगात गुंतून राहावं लागतं व रेकॉर्ड अद्ययावत ठेवावा लागतो. कारण तो तसा न ठेवल्यास कारवाई होवू शकते. शिक्षक असेच फालतुच्या उद्योगात व्यस्त असतात. त्यामुळंच विद्यार्थी मागं पडत असतात.
           अलिकडे विद्यार्थी मागं पडतात. याचं उत्तर होय असंही देता येईल आणि नाही असंही देता येईल. होय, यासाठी की बरेच विद्यार्थी शाळा शिकत नाहीत. ते मधातच शाळा सोडतात आणि नाही यासाठी म्हणता येईल की बरेच विद्यार्थी यशाच्या शिखरावरही जात असतात.
             अलिकडे शिक्षकाला बैल म्हटलं गेलं तर वावगं ठरत नाही. कारण शिक्षकाला घाण्याला जुंपलेल्या घाण्यागत रिकामं ठेवलं जात नाही. त्याला वारंवार कोणत्या ना कोणत्या कामात जुंपलं जातं. त्याचं कारण हे न कळेनासं आहे. 
          शिक्षकांनाच शासन अशी कामं का सांगतो? तर याचं उत्तर आहे. शिक्षक हा इमानदार व मेहनती प्राणी आहे. तो सतत काम करीत असतो. त्याला काम करणं आवडतं. त्याला कुणाचं नुकसान करणं आवडत नाही. ना विद्यार्थ्यांचं नुकसान करणं आवडत. ना शासनाचं.  म्हणूनच तो इमानीइतबारे कोणतीही अपेक्षा न करता कामे करीत असतो. परंतु तो तरी कुठपर्यंत विना स्वार्थानं कामे करणार.  त्यालाही परीवार आहे आणि पोटंही आहे. तसं पाहता तो परीवार व ते पोट तेवढंच महत्वाचं आहे. 
          शिक्षकांचं काम आहे शिकवणं. लहानच नाही तर मोठ्याही व्यक्तीला शिकविण्याचं काम हा शिक्षकच करीत असतो. कधी निवडणूकीचं काम करतो. कधी मतदार यादीचं काम करतो. कधी जनगणना करतो. कधी शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करतो तर कधी हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी योजना राबवतो. 
           शिक्षक केवळ एवढंच काम करीत नाहीत तर काल जेव्हा कोरोनाचं संकट देशाला भेडसावत होतं. तेव्हा अशा कठीण काळातही या शिक्षकाने अगदी आपल्या प्रकृतीची काळजी न करता आपल्या ड्युटीचाच एक भाग समजून नाक्यानाक्यावर पोलिसांची ड्युटी केली. त्यानंतर सुटकेचा श्वास सोडला. काही तर यात मरणही पावले. 
           मुळात कोरोना राहो की एखाद्या गंभीर रोगाची साथ. शिक्षकांना आपल्या नोकरीचा भाग म्हणून ड्युटी करावीच लागते. अगदी त्याला सांगीतलं की दहनस्थळावर रात्रभर एकट्यानं जागली करावी. तरी ती तो करणारच भीती न बाळगता. असा हा शिक्षक. परंतु खरं तर त्याच्या कामाच्या कार्यानुसार त्या शिक्षकांना तेवढा सन्मान मिळत नाही ही शोकांतिकाच आहे. त्याच्यावर आजच्या काळात कोणीही ताशेरेच ओढत असतात. तो आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत नाही असेही म्हणतात. 
            शिक्षकाबद्दल सांगायचं झाल्यास शासन त्याचेबाबत उदासीन भुमिका घेत असतं. त्याला बैलच समजत असतं शासन. एवढी कामं त्याच्या पाठीमागं असतात की विचारता सोय नाही. सध्या ऑनलाईनच्या काळात तर शिकवणं कमी करा आणि रेकॉर्ड जास्त ठेवा अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे.  शिक्षकाला केवळ आणि केवळ त्रासच दिला जातो. प्राथमिक शाळेची अवस्था तर यापेक्षा बिकट आहे. 
          प्राथमिक शाळेत पटसंख्या कमी असेल तर चपराशी नसतो. मग झाडण्यापासून तर टेबल पुसण्यापर्यंतची सर्व कामं शिक्षकालाच करावी लागतात. शिवाय बाबू नसल्यानं बाबूचीही कामं शिक्षकालाच करावी लागतात. शासन वेतन देतं. परंतु ते वेतन शिकविण्याचं नसतं तर ते वेतन बाबू बना, चपराशी बना. भाट बना. भंगी बना. यासाठी असतं. असं म्हटल्यास कुणाला राग येईल जे शिक्षक असतील. परंतु त्यात तसूभरही असत्यता नाही. भंगी बना याचा अर्थ हागणदारी मुक्त गावाच्या योजना कार्यान्वीत करा. भाट बना याचा अर्थ घरोघरी जावून भाटासारखे  ओरडा. जन्मकुंडल्या विचारा. नावं विचारा. ते आठवणीत राहात नाहीत. म्हणून लिहून ठेवा. याचाच अर्थ असा की पुर्वी भाट जे काम करायचे. तेच काम आता शिक्षकांना करावे लागत आहेत. शिक्षकांच्या पाठीमागं सर्वेक्षणाचं काम आलं आहे. मग ते सर्वेक्षण शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं असो वा कोणत्याही स्वरुपाचं. ते शिक्षकांना करणं आलंच. याचाही परिणाम विद्यार्थ्यांना शिकविण्यावर होत असतो. 
             शिक्षकांच्या पाठीमागं शासनानं बरीच कामं लावून ठेवलेली आहेत. त्याला तसूभरही सवड मिळत नाही. शाळेच्या कामाव्यतिरिक्त त्याला बाहेरचीच कामं जास्त आहेत. तरी तो त्रास सहन करुन शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवीत असतो. कारण तो आपल्या मुलांसारखा आपल्या विद्यार्थ्यावर प्रेम करतो. त्या विद्यार्थ्यांना बोलकं करतो. बोलणं शिकवतो. वाचणं शिकवतो. त्याला शौचालयाच्या सवयी लावतो. एवढं करुनही शासन त्याची कदर करीत नाही. पालक त्यांना चांगले म्हणत नाही. यातही विद्यार्थ्यावर संस्कार करीत असतांना तो विद्यार्थ्यांना प्रेमानं छड्याही मारतो. त्या छड्या त्याला सुधरविण्यासाठी असतात. परंतु यात समजा एखाद्या विद्यार्थ्याला लागलंच तर पालक आपले तुणतुणे हावलत शाळेत येतात व शिक्षकांना अपशब्द बोलून मोकळे होतात. ते शिक्षकांचा एवढा अपमान करतात की त्याबद्दल न सांगीतलेलं बरं. 
           सरकारी शाळेत तर शिक्षकांना वेतन जास्त प्रमाणात असतं. तेथील पालकांनी बोललेलं एकदाचं खपूनही जाईल. परंतु खाजगी शाळेत शिक्षकांना अतिशय अल्प वेतनात काम करावं लागतं. त्यातच पालक वर्ग आपल्या मुलांना शिकविण्याचं शुल्क भरीत असल्यानं त्यांची ओरड जास्त असते. ते पालक आपल्या मुलांना उच्च स्तरावर नेवू पाहतात. ते मुलांचे पैसे भरतात आणि त्याबदल्यात शंभर प्रतिशत निकालाची अपेक्षा करतात. परंतु यात ते विचार करीत नाहीत की काल आपण या मुलांएवढेच होतो. तेव्हा आपण किती प्रतिशत गुण मिळवले होते. उदाहरण द्यायचं झाल्यास त्याच विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा दहावीत असतील. तेव्हा त्यां दोघांच्याही दहावीत मिळालेल्या गुणांची बेरीजही शंभर प्रतिशत येत नसेल. परंतु मुलांकडून अपेक्षा बाळगून त्यानं शंभर प्रतिशत गुण मिळवावे ही अपेक्षा केली जाते. याच दृष्टीकोनातून शिक्षकांवर ताशेरे ओढले जातात. त्यानं जीव ओतून शिकवावं ही माफक अपेक्षा केली जाते. तो शिक्षक शिकवतोही जीव ओतून. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांचा बुद्यांक.  तो लायक नसतो की त्याला शंभर प्रतिशत गुण पडतील. त्यात त्याला कमी गुण पडतात. मग भ्रमनिराश होतो व त्याचा परिणाम हा होतो की ते पालक विद्यार्थ्यावर ओरडतात. यातून विद्यार्थी निराश होतो व तो मरण पावतो आत्महत्या करुन. 
         आज शिक्षकांकडून जशा शासनाच्या अपेक्षा आहेत की सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे. ते टिकलं पाहिजे व त्याला दर्जेदार शिक्षणही मिळालं पाहिजे. पालकांनाही अगदी तसंच वाटतं. ते अपेक्षा करतात. कराव्या अपेक्षा. अपेक्षांनीच योजना कार्यान्वीत होतात. परंतु ते हा विचार करीत नाहीत की शिक्षकांवर कामाचा ताण किती आहे? शिक्षकांना कामं किती आहेत? त्याला कोणती कामं आहेत? अलिकडे तर कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत. तिथं तर शिक्षकांचे हाल विचारताच येत नाहीत. तेथील शिक्षकांना अतिशय कमी वेतन मिळतं. जे वेतन त्यांचं घर वा परीवार चालेल, एवढंही नसतं. तरीपण तेथील शिक्षक हिरीरीनं शिकवतात व आपल्या शाळेतील मुलांना मेधावी बनवतात. तरीपण त्यांचं कौतुक केलं जात नाही ना त्यांचं वेतन वाढवलं जात. आज अशीच परिस्थिती सगळीकडं आहे. आदिवासी भागात तर चित्र वेगळं आहे. तिथं शिक्षकांना  गावकऱ्यांनी गोठ्यात बांधलेली जनावरं बाहेर काढावी लागतात व त्याचा शेणपोयटाही करावा लागतो. 
          विशेष सांगायचं म्हणजे मुलं शिकविणं काही खेळ नाही वा जादूची कांडीही नाही की जी फिरवली व मुले शिकली. दररोज रटवून घेतला जातो सराव. तरीही मुलं घडत नाहीत. जे थोडेसे बुद्यांकानं चांगले असतात. तेच घडतात. बाकी सर्व ढेपाळतात. मोठी मुलं थोडीशी समजदार झालेली असतात. त्यांना लिहिता वाचता तरी येते. परंतु लहान मुलांना शिकविणं तारेवरची कसरतच असते. ते बरेचदा शिकतच नाहीत. कितीही सराव करुन घेतला तरीही. ती दोन चार वर्ष तशीच राहात असतात.
            महत्वाचं म्हणजे मुलं शिकू शकतात. त्यांना पुर्ण स्वरुपात शिक्षकांनी वेळ दिला तर......परंतु शासन त्यांना तसा वेळ देवू देत नाही. कधी त्यांच्या मागं मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण आणतं. तर कधी कोणत्याही स्वरुपाचं सर्वेक्षण आणतं. कधी जनगणणा आणतं तर कधी निवडणूक ड्युटी. त्यातच बऱ्याच सुट्ट्याही येतात की ज्यात विद्यार्थी डिस्टर्ब होतात. कधी लागोपाठ सुट्ट्या आल्या की मुलं गावी जातात. मग मुलं शाळेत हजर राहात नाही. अशावेळेस जो अभ्यासक्रम शिकवला जातो. तो अभ्यासक्रम अशा गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याआडून जातो व विद्यार्थी मागं राहतात. कधी वेतनासाठी शासनाशी भांडण करावं लागतं तर कधी संस्थाचालकाशी. ही भांडणं कधी वेतनासाठी असतात तर कधी हक्कासाठी. हक्कं डावलला म्हणून. यातही शिक्षक डिस्टर्ब होतात व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो व विद्यार्थी मागं पडतात. 
           विद्यार्थी मागं पडत नाहीत. पडू शकत नाहीत. परंतु ते पडतात. त्याचं कारण म्हणजे शिक्षकांना मिळत असलेली वागणूक. अशी अपमानास्पद वागणूक कधी शासनाकडून कधी पालकांकडून तर कधी संस्थाचालकांकडून मिळत असते. कधी त्याला घाण्याला जुंपलेल्या बैलागत वागवलं जाते. तर कधी त्याला एखाद्या गुलामागत वागवलं जाते. त्यांचे हक्क डावलले जातात. वेतनकपात केली जाते वा वेतन कमी  दिलं जाते. त्यामुळंच शिक्षक निराश होतात. एवढे निराश होतात की त्यांचं विद्यार्थ्यांना शिकविण्यात मन लागत नाही. तरीही शिक्षक शिकवितात. कारण ते समजदार आहेत. इमानदार आहेत. ते जाणतात की आपलं नुकसान झालं तरी चालेल. परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको. कारण आपल्या भांडणात त्या निरागस निष्पाप विद्यार्थ्यांचा दोष नाही. परंतु अशा हक्क डावलण्यातून वा अशा शासनाच्या, पालकांच्या व संस्थाचालकांच्या बेताल वागण्यातून जो परिणाम शिक्षकांवर होतो. त्या परिणामाचा परिणाम शिक्षकांवरही होतो हे न सांगीतलेलं बरं. म्हणूनच विद्यार्थी मागं पडतात हे तेवढंच खरं आहे. म्हणून शासनांनं एवढी कामं शिक्षकांवर लादू नयेत की त्याचा परिणाम दुष्परिणामांत बदलेल. तसंच संस्थाचालकानंही चांगलं वागावं. त्याचबरोबर पालकांनीही आपली भुमिका सुधरवावी. जेणेकरुन विद्यार्थी शिकतील. ते अभ्यासात मागं पडणार नाहीत व पुढे जावून ते आपलं, आपल्या पालकांचं, संबंधीत यंत्रणेचं व आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील हेही तेवढंच खरं आहे.
             सुजीतला जेव्हा माहीत झालं की शिक्षकाला असे फालतुचे कामं असल्यानं शिक्षकाला शाळेत शिकवायला वेळ मिळत नसेल. म्हणूनच ते विद्यार्थ्यांना शिकवीत नसतील. म्हणूनच विद्यार्थी मागं पडत असावेत. असे लक्षात येताच त्यानं प्रत्येक शाळेत दोन वेगळ्याच नियुक्त्या केल्या. एक बाबू व दुसरा शिपाही. आता शिक्षकाला ऑनलाईन कामासाठी संगणकावर बसावं लागत नव्हतं. ना शाळेतील कोणतीही कामं शिक्षकांना करावी लागत होती. ऑनलाईन कामं बाबू करीत होता व साफसफाई शिपाही. त्यातच जनगणना वा इतर प्रकारची कामं, जी कामं शिक्षक करीत होते. ती कामं सुशिक्षीत बेरोजगार मंडळी करीत होती. 
            त्यानं देशाच्या सर्वोच्च पदावर बसताच जे शिक्षण निःशुल्क केलं होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी त्यानं काही शाळांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान जे प्रश्न समोर आले. ते सोडवून त्यानं शाळेची प्रत वाढवली होती. आज विद्यार्थीही मागे पडत नव्हते. त्यामुळंच देशाचा विकास होत चालला होता.
            आज सुजीतला एक फोन आला होता. फोन विरोधकांचा नव्हता तर कोण्यातरी एका मातब्बर विचारवंतांचा होता. असंच वाटत होतं.  तो अतिशय निर्भीडपणानं बोलत होता. तो म्हणत होता.
           "आपण आपल्या देशाच्या इतिहास चुकीचा शिकवतो."
           "कसा काय?"
           "साहेब, चवथीच्या पाठ्यपुस्तकात मदारी मेहतरचा इतिहास आहे. साहेब, मदारी मेहतरबाबत सांगायचं म्हणजे मदारी मेहतर झालाच नाही."
            "मग पाठ्यपुस्तकात काही खोटं लिहिलं आहे काय?"
             "होय. पाठ्यपुस्तकात अगदी खोटं लिहिलेलं आहे."
             "पाठ्यपुस्तक लिहिणारी माणसं खोटारडी असतात का?"
             "होय साहेब, ती बावळटच असतात."
             "मग मदारी मेहतर काय झालाच नाही काय?"
            "होय साहेब, मदारी मेहतर झालाच नाही. ते कपोलकल्पीत पात्र आहे. बनविलेलं पात्र आहे. त्याचा पुरावा नाही. आपल्या देशात आपण चुकीचा इतिहास शिकवतो. तो दुरुस्त करायला हवा."
           सुजीत विचार करु लागला. एका विचारवंताचा फोन. सुजीतची त्यानं किंचीतही भीती न बाळगता तो बोलला. तसा सुजीत विचार करु लागला. विचार करु लागला की मदारी मेहतर  अस्तित्वात आहेत वा नाहीत याबाबत त्या व्यक्तीच्या मनात शंका कुशंका का? तो विचार करीत होता मनातल्या मनात. 
           सध्याचा काळ हा वादातीत काळ आहे. वाद किरकोळच गोष्टीवरुन उभे होतात. ज्यांना काही माहीत साहीत नसतं. ते उगाचंच वाद करीत असतात. शिवाय अशाच वादातीत विषयावरुन इतिहासाला कलाटणी देवून मी किती हुशार असे दाखवत असतात लोकं. तसं पाहता  चिकीत्सक बुद्धीमत्ता ठेवणं चांगलं लक्षण आहे. परंतु यावरुन दुसऱ्याला दोष देणं चुकीचं पाऊल आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास पृथ्वीचं देवू. गॅलिलिओनं पृथ्वी गोल आहे सांगीतलं. ते न पटल्यानं त्याला फाशी दिली. कोणतीही शहानिशा न करता. लोकांचं म्हणणं होतं की पृथ्वी सपाट आहे. परंतु पृथ्वी गोल आहे हे नंतर सिद्ध झालं. तसंच चंद्र, सुर्यालाही देव मानण्यात आलं. परंतु नंतर कळलं की चंद्र, सुर्य काही देव नाहीत. चंद्र दगडाचा गोळा आहे व सुर्य आगीचा गोळा आहे. हे तिन्ही घटक अस्तित्वात आहे. म्हणूनच त्याची समस्या निस्तारता आली व सिद्ध करता आलं की चंद्र हा दगडाचा गोळा व सुर्य हा आगीचा गोळा आणि पृथ्वी गोलच आहे. सपाट नाही. परंतु जे आता अस्तित्वात नाही. त्याबद्दल ते अस्तित्वात होते नव्हते असं कसं सांगता येईल?
          आमचा समाज काहीसा असाच आहे. इतिहासाची चिरफाड करणारा. आता पृथ्वी वा चंद्र, सुर्य हा इतिहासाचा भाग नाही. तो भुगोलाचा भाग आहे. परंतु जो इतिहासाचा भाग आहे. त्याबद्दल बरीच मते मतांतरे आहेत. जसे मदारी मेहतर झालाच नाही. संभाजीचे तुकडे गणपत नावाच्या महार जातीच्या व्यक्तीनं गोळा केलेच नाही व अग्नी दिलाच नाही. शिवरायाच्या समाधीच्या बाजूला महाराणी पुतळाबाईची समाधीच नाही. ती श्वानाचीच आहे. संभाजीला दोन पत्नी झाल्याच नाही. त्याला पुरावे काय? राम व क्रिष्ण वा इतर देव झालेच नाही. ते सर्व थोतांड आहे. हे तर ठीक आहे, जर आजमितीला महाराणी येसूबाईची समाधी सापडली नसती तर पुढं चालून ह्याच समाजानं महाराणी येसूबाईही झालीच नाही असंही म्हटलं असतं. 
            वरील सर्व गोष्टीवर आज वादंग निर्माण झाले आहेत. ते अस्तित्वात नव्हते असं मांडलं जात आहे व जो अस्तित्वात होते असं सांगतो. त्याला पुरावे काय? असं विचारलं जातं. परंतु ते अस्तित्वात नव्हते याचे प्रमाण कोणीही सहपुरावे  देत नाहीत. 
          मदारी मेहतर, राम कृष्ण वा इतर बरेच लोकं झाले किंवा झाले नाही झाले. ते काही मला माहीत नाही. तसेच मी काही ते त्याकाळात झाले होते. या ठाम मताचाही नाही. कारण मी त्यावेळेस नव्हतोच. परंतु ते झाले होते व त्यांचं अस्तित्व होतं असा विचार करायला काय हरकत आहे?  तसं पाहता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. राहू शकतात. 
          तो रायगडाचा पायथा. त्या पायथ्यावर एक चबुतरा आहे. त्याला मदारी मेहतर मोर्चा वा मदारी मेहतर असं नाव दिलं गेलं आहे. काही लोकं म्हणतात की ते बांधकाम त्यावेळचं नाही. ते अलीकडील काळातील असून मदारी मेहतर हे पात्र एक मिथ्या पात्र आहे. त्याचा पुरावा नाही असं सांगीतलं जातं. 
          मदारी मेहतरबाबत विचार मांडतांना एक ऐतिहासिक प्रसंगही आहे. शहानिशा नाही. मदारी मेहतर हा व्यक्ती अलिकडील काळातील. दि ५ मार्च १६६६ ला पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज त्या तहातील अटीप्रमाणे आग्र्याला निघाले. आग्र्यात जातांना त्यांनी काही व्यक्तींना सोबत नेलं. परंतु ते तिथं गेल्यानंतर ते तिथं कैदेत पडले. तसा उल्लेख इतिहासात आहे. परंतु त्यांनी संभाजी व्यतिरिक्त कोणाकोणाला सोबत नेलं होतं याचा उल्लेख पुस्तकात नाही. मात्र त्या स्थळी कैदेत पडल्यानंतर हिरोजी व मदारी मेहतर यांनी शिवाजी महाराजांची सेवा केलेली आहे अशी मराठीच्या पाठ्यपुस्तकात नोंद आहे. परंतु समकालीन विचारवंतांमध्ये वाद आहे की तो व्यक्ती इतिहासाच्या पानात झालाच नाही. कारण तशी नोंद नाही व जे काही रायगडावर मदारी मेहतर मोर्च्याच्या रुपात बांधकाम आहे. ते अलिकडील काळातील आहे. तसंच सांगीतलं जातं की मदारी मेहतरबाबत पहिला उल्लेख १९१७ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ यांनी जे त्रैमासिक काढलं होतं, त्यात होता. त्यात सादुल्लाचाही उल्लेख होता की जो मदारी मेहतर यांचा मुलगा होता. या भारत इतिहास संशोधक मंडळानंही आपल्या त्रैमासीकात तसं छापतांना पुरावा दिला नव्हता. 
           मदारी मेहतरबाबत सांगायचं झाल्यास एवढंच सांगता येईल की तो व्यक्ती झाला असेलच. तसं पाहता तो काळ असा होता की त्या काळात चाकरीत वा सेवा करायला कित्येक अस्पृश्य वा आदिवासी लोकांनाच कामाला लावत असत. विटाळ आणि भेदभावाच्या समस्येत समाज पिचला जात होता. हा अस्पृश्य समाज वा आदिवासी समाज एवढा त्या राजा महाराजांच्या नजरेसमोर महान नव्हता की त्याचे नाव ते ऐतिहासिक नोंदवहीत ठेवतील. मदारी मेहतरच नाही तर अशी बरीच मंडळी आदिवासी व अस्पृश्य मंडळी आहेत की ज्यांच्या कार्याची सोडा, केवळ अस्तित्वाचीही इतिहासात नोंद सापडणारच नाही.
          शिवाजी महाराज हे परीवर्तनवादी व नव विचारांचे होते की जे भेदभाव मानत नसत. ते सर्व जाती व धर्मांना सहिष्णुतेनं वागवत. त्यांच्या या सहिष्णूतेपणामुळेच कोणी म्हणतात की त्यांची हत्याही झाली. जिथं शिवरायांनाच इतिहासात महान मानलं नाही, एवढं मोठं स्वराज्य स्थापन केल्यानंतरही. तिथं मदारी मेहतर कोण? शिवाय तो एक मुसलमान. इथं  नेतोजी पालकर मुसलमान बनल्यानंतर तो स्वधर्मात आला याचे उल्लेख आहेत व ते उल्लेख येथील समाज मानतो. कारण ते उच्चवर्णीय होते म्हणून. परंतु मदारी मेहतरचं साधं अस्तित्वच मानायला तयार नाहीत. कारण तो अस्पृश्य होता म्हणून. हे सत्य नाकारता येत नाही. तसं पाहता इथं अस्पृश्य समाजाच्या बऱ्याच गोष्टी मिटवल्या गेल्या आहेत. जसे, म्हणतात की सम्राट अशोकानं कितीतरी शेकडो प्रमाणात या देशात विहारं बांधली होती. तसे उल्लेख सापडतात. मग ती कुठे गेली? कुठे गेली याची शहानिशा केल्यास ती पाडली गेली जाणूनबुजून व इतिहास लपवला गेला विहारांचा, जाणूनबुजून. काही गौतम बुद्धाच्या मुर्तींचं विद्रूपीकरण केलं गेलं. यावरुन मदारी मेहतरचं काय झालं असेल ते ठरवता येतं. शिवाय हिरोजींना औरंगजेबानं सोडून दिलं म्हणतात. त्यावर एक हास्यास्पद प्रश्न केला जातो की त्याला औरंगजेबानं सोडून कसं दिलं असेल? शिवरायांचा राग काढला नसेल का त्याचेवर. यातही सांगायचं झाल्यास लोकंच  म्हणतात की औरंगजेब लहरी स्वभावाचा होता. मग त्यानं हिरोजींना आपल्या लहरी स्वभावानं सोडलं नसेल कशावरुन? विचार करायला भाग पाडणारा प्रश्न असा की जो औरंगजेब शिवरायांचा शत्रू होता. कोणाच्या बापाचंही ऐकत नव्हता,  एवढा क्रूर होता तो. असे इतिहास म्हणतो. तोच औरंगजेब रायगडावर शरणागती पत्करलेल्या महाराणी येसूबाई व तिच्या परीवाराला जीवे मारत नाही. ती तर ताब्यात होती ना औरंगजेबाच्या. ती तर शत्रू होती ना औरंगजेबाची. चाहे तर तो तिच्यासोबत नाही तर तिच्या परीवाराबाबतही काहीही करु शकत होता. परंतु नाही, त्यानं तसं केलं नाही. उलट त्यानं पुढे छत्रपती बनलेल्या शाहूवर प्रेम केले. त्याला शिक्षण दिले. तद्नंतर तो मरण पावताच छत्रपती शाहूंना सोडण्यात आलं व छत्रपती शाहूनं आपल्यातील तलवारबाजीच्या कौशल्यानं राज्य हातात घेतलं व तो राजा बनला. हे तलवारबाजीचं कौशल्य, छत्रपती शाहू महाराजांना जन्मतःच होतं काय? नाही, ती औरंगजेबाच्या कैदेत मिळाली. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत पडले. त्यावेळेस आग्र्याच्या कैदेतून सुटण्यासाठी त्यांनी आजारपणाचं सोंग केलं व आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी औरंगजेबाला मिठाई वाटायला सांगीतली. त्यानंतर औरंगजेबानं ती वाटलीही. मग ती मिठाई शिवरायांचा आजार बरा व्हावा म्हणून का वाटली असावी औरंगजेबानं. त्याचं कारण कळेनासं आहे. याठिकाणीही औरंगजेबशिवाजीमहाराज आग्र्याच्या कैदेत असतांना शिवरायांची हत्या करु शकले असते. परंतु त्यानं तसं केलं नाही. त्याचं कारण होतं.  त्यावेळेसशिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे बनायचेच होते. हं, त्यानं संभाजी महाराजाची क्रुर हत्या केली. त्याचं कारण होतं संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी केलेली कुचराई. संभाजी जेव्हा दिलेरखानाला जावून मिळाले होते. तेव्हा औरंगजेब खुश होता. तेव्हा त्याचा संभाजी महाराजावर विश्वास होता. परंतु संभाजी जेव्हा औरंगजेबाच्या छावणीतून परत मायदेशात आले. तेच खटकलं होतं औरंगजेबाला. त्यानंतरही संभाजी महाराज गादीवर बसताच त्यांनी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले. त्यामुळंच औरंगजेब चिडला. त्यानं संभाजीला पकडायचं ठरवलं. पकडल्यानंतर त्यांना धर्म बदलवायला सांगीतलं. तशीही संभाजी महाराजांबद्दल चीड होतीच त्यांच्या मनात. संभाजी महाराजांनी धर्म न बदलविल्यामुळं त्यांची त्यानं हत्या केली. 
           इतिहासात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या इतिहासाची पानं पालटवताच बरेचसे सत्य बाहेर पडू शकते. परंतु ते सत्य बाहेर पडू नये याची काळजी आजही समाज घेतो व चिकीत्सक बुद्धिमत्तेच्या विचारांना नागविण्याचं कामंही असे काही धुरंधर करतात की जे तो इतिहास पडताळून पाहात नाहीत. स्वतः काहीच करीत नाहीत व जो करतो,  त्यानं तसं करु नये. म्हणून त्याला दोष देतात. त्यालाही करु देत नाहीत. ही वास्तविकताच आहे. त्यात त्यांना वाटते की अमूक अमूक व्यक्तीनं इतिहासाची पानं उलटवता कामा नये. नाहीतर आमचंच अस्तित्व धोक्यात येईल. इथं तर गणपत नावाच्या पहलवानानं संभाजीच्या शवाचे तुकडे गोळा केले व त्या शवाला अग्नी दिला. हा पराक्रम सर्व वढू गावानं केला. त्यानंतर त्या संपुर्ण वढू गावातील लोकांना औरंगजेबानं अनन्वीत यातना दिल्या असतील. गणपतचे तर हालहाल केले असतील कैदेत. परंतु हे सत्य कोण जाणणार. कारण त्याला पुरावा थोडाच आहे. आता यावरही वाद आहेत. जिथं राम, कृष्णासारखं व्यक्तीमत्व झालेच नाही असे म्हणतात काही लोकं. तिथं मदारी मेहतरचं अस्तित्व नाकारणं सहज, सरळ व साधी सोपी गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवं. जिथं शिवरायाच्या पत्नीची समाधी होती. त्याच रायगडावर एका श्वानाचा पुतळा बसवून ती श्वानाची समाधी आहे हे मानतात लोकं. ज्या महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि ज्या काही इतर तत्सम लोकांनी देश घडवला. त्याच लोकांवर आजच्या काळात आगपागड केली जाते. तो समाज आज मदारी मेहतरबाबत वा राम क्रिष्णाबाबत काय म्हणेल? तोच समाज पुढं जावून शिवाजी वा तत्सम नेते की ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. तेही झालेच नाही असे म्हणेल व त्यांच्या अस्तित्वावर पुढे जावून प्रश्नचिन्हंच उभे ठाकतील. या त्यांच्या बोलण्यातून आज मदारी मेहतर व राम क्रिष्णासारख्या देवांच्या अस्तित्वाची हत्या होत आहे. उद्या जावून हेच लोकं महात्मा गांधी, भगतसिंग, महात्मा फुले, संत तुकाराम, शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, आगरकर, राजा राम मोहन राय व खुद्द स्वामी विवेकानंद आणि इतर अनेक देशभक्तांच्या अस्तित्वाची हत्या करतील व त्यांच्या समाधीवर एखादा रायगडावर बसवलेल्या श्वानाच्या पुतळ्यासारखा एखाद्या प्राण्याचा पुतळा बसवतील व सांगतील की ही समाधी त्यांची नाही. तर ती समाधी त्या प्राण्यांची आहे. 
           आज मदारी मेहतर अस्तित्वात नाही. आपण त्यावेळेस नव्हतो की आपण त्यांना पाहू. मात्र त्यांच्या अस्तित्वाबाबत कोणीतरी संभ्रम निर्माण केला आहे. आज सनातनी समाज खुद्द संभ्रमात आहे. तशीच त्यांच्याच संभ्रमाला पुष्टी जोडून अस्पृश्य समाजही त्यांच्या हो ला हो मिरवीत आहे. याचाच अर्थ असा की त्यांचं अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न होत आहे. यावरुन खरंच मदारी मेहतर हे व्यक्तीमत्व शिवाजी महाराजांच्या काळात अस्तित्वात होतं की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सांगतांना एवढंच सांगता येईल की मदारी मेहतर हे व्यक्तीमत्व झालं असेलच व ज्याला शंका असेल, त्यानं ते कसं झालं नाही ते सप्रमाण सिद्ध करावं. तसंच राम, कृष्ण यांचंही अस्तित्व झालं नाही हे सिद्ध करावं. याबाबत एवढंच म्हणता येईल की ज्यांना आपल्या खापरपणजोबांचा इतिहास वा नाव माहीत नाही. ते शोधायला लागले मदारी मेहतरसारख्या दुसऱ्यांच्या बापाचे अस्तित्व. खरं तर त्यांनी मदारी मेहतर व राम क्रिष्णाचं अस्तित्व शोधण्याऐवजी आपल्या खापरपणजोबा वा आपल्या संपुर्ण वंशाची वंशावळ जर शोधली तर ती त्यांच्या कामात तरी पडेल. मदारी मेहतरचा इतिहास कामात पडणार नाही वा शिवराय वा तत्सम लोकांच्या  काळात कोण कोण होते व कोण कोण नाही? हे काही कामात पडणार नाही. 
          महत्वाचं सांगायचं म्हणजे चिकीत्सक बुद्धी जर आपल्याकडे आहे तर त्याचा वापर चांगल्या गोष्टी शोधण्यासाठी करावा. कुणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं उठविण्यासाठी नाही. कारण ते महान होते की त्या काळात झाले. ज्यांनी आपलं नाव व्हावं वा चालावं, म्हणून कार्य केलं नाही. अगदी जीवावर उदार होऊन कार्य केलं. प्राणाची पर्वा केली नाही तर बलिदान दिलं. त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाकारणं हे त्यांनी केलेल्या कार्याचीही हत्या करणं होय. याचाच अर्थ असा की त्यांनी उगाचच बलिदान दिलं. हे बलिदान आपण विसरलेले आहोत. आपण ते बलिदान कसे विसरलो? हाही प्रश्न विचार करायला लावणाराच आहे. होवू शकते की मदारी मेहतर हे अस्पृश्य समाजातून प्रतिनिधित्व करीत असल्यानं त्यांचं अस्तित्व इतिहासात नोंद झालेलं नसेल. याला जबाबदार होता त्यावेळचा विटाळ व भेदभाव. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसेच इतिहास लिहिणारे हातंही अस्पृश्य समाजातील नव्हतेच हेही विसरुन चालणार नाही. मग तो मदारी मेहतर असो वा आदिवासी असो वा इतर कोणीही असो. मदारी मेहतरबाबत इतिहासात उल्लेख कसा करतील? ज्यांनी सम्राट अशोकांनी बांधलेले शेकडो विहार नष्ट केले. ते खरंच मदारी मेहतरसारख्या अस्पृश्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीमत्वाचं अस्तित्व तरी मान्य करतील काय? अशांना मदारी मेहतर कपोलकल्पितच पात्र वाटणारच. 
            विशेष सांगायचं झाल्यास मदारी मेहतर झाला असेलच. ते कपोलकल्पित पात्र नसेलच. तसे  बरेचसे अस्पृश्य आदिवासी समाजाचे पात्र असे असतील की जे इतिहासात झाले. परंतु त्यांच्या अस्तित्वाची नोंद जाणूनबुजून इतिहासात केली गेली नसेल. आजही असे अस्पृश्य आदिवासी समाजातील बरेच पात्र आहेत की ज्याचा उल्लेख इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात नाही. जसे कोंढाणा काबीज करतांना तानाजी पडल्यानंतर व मावळे गडावरुन पळून जात असतांना सुर्याजीनं त्यांना परत फिरवलं. त्यावेळेस कामी आलेला एक अस्पृश्य व्यक्ती. त्याचीही इतिहासात नोंद नाही. पुढं सन १६९३ मध्ये याच परीवारातील नावजी बलकवडेनं कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून घेतला व तानाजी मरणाचा बदला घेतला.
            अस्पृश्य आदिवासीचं वर्णन करतांना एवढंच सांगता येईल की तानाजीनं रात्रीच्या वेळेस कोंढाण्यावर आडवाटेनं दोन माणसं पाठवली होती. जे दुर्लभ कडा चढून गेले होते. ज्यांनी द्रोणगिरी कड्यावरून मावळ्यांना चढण्यासाठी दोर खाली टाकला होता व त्या दोरावरुन तब्बल तिनशे मावळे गडावरुन चढून गेले होते. यात गडावर आधी चढणाऱ्या दोन लोकांचा उल्लेखच नाही. यशवंती नावाच्या घोरपडीचा उल्लेख आहे की जी एक प्राणी होती. जिला तानाजीनं शिकवून पाठवलं असं म्हटलं जातं. म्हटलं जातं की तानाजीनं यशवंतीला आज्ञा केली की तू जर परत आलीस तर मी तुला कापून खाईन. तिला स्थान आहे इतिहासाच्या पुस्तकात. परंतु माणसाला इतिहासाच्या पुस्तकात स्थान नाही. आता विचार येतो की दुर्लभ कडा चढणारी माणसं ही आदिवासी किंवा अस्पृश्य समाजातीलच राहू शकतात. कारण तोच समाज त्यावेळेस दऱ्याखोऱ्यात राहात होता व त्यांनाच कडा कसा चढावा? याचीही इत्यंभूत माहिती होती. यशवंती घोरपडीबाबत सांगतांना विचार करण्यालायक बाब ही की खरंच असं होवू शकते काय? प्राणी एवढं ऐकू शकतात? कार्य करु शकतात? त्यातही ती घोरपड? अन् माणसं कामंच करु शकत नाहीत? कारण ती अस्पृश्य अन् आदिवासी? ती चढून जाणारी दोन माणसं. त्यांचा साधा उल्लेख नाही. याचं कारण म्हणजे त्या काळातील लेखन अस्पृश्यानं केलं नाही. उच्च समाजातील लोकांनी केलं. त्यांनाच लेखनीचा अधिकार होता. तसंच इतिहासात त्याही अस्पृश्य विरांगणेचा उल्लेख नाही. जी राणी लक्ष्मीबाईनं झाशीचा किल्ला सोडल्यानंतर कामी आलेली होती व जिचे नाव झलकारीबाई होतं व ती अस्पृश्य होती. 
          महत्वाची गोष्ट अशी की ऐतिहासिक व्यक्ती राम असो, क्रिष्ण असो वा मदारी मेहतर असो. कोणीही असो. ती प्राणी नाही वा वस्तू नाही की त्याचं अस्तित्व मान्य करु नये. त्या व्यक्तीमत्वाच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. परंतु आपण ते न करता त्यांच्या अस्तित्वावरच टीका करतो. त्यांना अपशब्द बोलतो वा त्यांचं अस्तित्व नाकारतो नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची हत्याच करतो असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्याबाबत सांगायचं झाल्यास त्या व्यक्ती त्यावेळेस झाल्या असेलच याबाबतही शंका नाही. मग इतरांना शंका असली तरी चालेल. कारण ही प्रत्येकाची विचारसरणी आहे. व्यक्ती तेवढ्या प्रकृती व प्रकृती तेवढेच विचारही. यात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते हे विसरुन चालणार नाहीच. लोकं आज मदारी मेहतर झाला नाही असं म्हणतात. वाद करतात. उद्या भविष्यात हेच लोकं शिवाजी महाराजही झाले नाही असे म्हणतील यात शंका नाही. शिवाय इतर महापुरुषही झाले नाही असेच म्हणतील.
             सुजीतचे विचार रास्त होते. न्यायप्रिय होते व विकसीत राष्ट्राचे स्वप्न पाहणारे होते. त्याला कुणी केलेल्या शंका आवडत होत्या. त्याला वाटत होते की जर कुणी शंका कुशंका व्यक्तच केली नाही तर नवे विचार कसे विकसीत होतील आणि नवे विचार विकसीत झाले नाही तर नवनिर्मीती तरी कशी होईल. त्याला विरोधक आवडत होते. कारण विरोधक असल्याशिवाय आपल्या हातून चांगलं कार्य घडत नाही. असं त्याचं म्हणणं होतं. शिवाय मानणंही होतं.
            सुजीतला वाटत होतं की देशात अशीच अंधश्रद्धा वाढीस लागत आहे सण उत्सवाची. सण उत्सव साजरे करावे आपली एक परंपरा आहे म्हणून. परंतु त्यातून नवश करणे व नवश करुन तो पुर्ण करण्यासाठी नाना तऱ्हेची सोंग करणे त्याला आवडत नव्हते. त्याचं कारण होतं नवश करुन देवाला कोंबडा, बकरा चढवणं. 
          सुजीतनं देवादिकासमोर कोंबडे, बकरे बळी देतांना पाहिले होते. बिचारे तडफडत असत, बळी जेव्हा त्यांचा घेण्यात येत असे. त्यालाही वाटायचं की यात आपलाच जर बळी घेतला तर........खरंच देव खातो तरी काय? कोबड्या बकऱ्याचा एखादा लहानसा तुकडा तरी. तर त्याचं उत्तर नाही असंच होतं. देव काहीच खात नव्हता. तरीही लोकं त्या देवाच्या अंगावर कोंबड्याच्या वा बकऱ्याच्या रक्ताचा शिडकाव करीत. तसंच लोकं इतरही सण साजरे करीत. त्या सणातही तसाच विभित्स प्रकार करीत. 
          नेहमीप्रमाणे अलिकडेही  गणेशोत्सव, नवरात्रोत्सव  व दिवाळी दसऱ्यासह इतरही उत्सव साजरे होत. त्यात काही लोकं तोकडे वस्र परिधान करणारे घटक हे सुजीतनं पाहिलं होतं. ज्यातून कुसंस्कार निर्माण होत होते. लोकं अशा उत्सवात भक्तीभाव स्वरुपाची गाणी न लावता विभित्स स्वरुपाची गाणी लावत होते. त्यातूनही कुसंस्कार वाढत होते. ते सुजीतला पसंत नव्हते.
            अलिकडे सण उत्सव साजरे करण्याला महत्व आलं आहे. लोकं मोठ्या धुमधडाक्यात असे उत्सव साजरे करतात. तेही तोकडे कपडे घालून व शांताबाईच्या गाण्यावर. जी चांगली गोष्ट नाही.
              आपण सण साजरे करतो. कशासाठी? तर आपल्यात संस्कार रुजावे. ते वाढावे यासाठी. जर ते रुजत नसतील. तसेच त्यातून केवळ कुसंस्कार वाढीस लागणार असतील तर असे सण साजरे करुन काय उपयोग? ते साजरे नाही केले तरी चालेल.
            पोळा आला, तशी मार्बतही आली व गेलीही. त्या गोष्टीला आज आठ दिवसही होत नाही तर गणपती आला व विराजमान झाला. मार्बतीच्या दिवशी सर्वांनी मार्बती हाकलल्या. कोणी इथे पीडा घेवून जा गे मार्बत म्हटलं तर कोणी मच्छर आणि रोगराईला घेवून जा गे मार्बत म्हटलं. कोणी निंदा नालस्ती घेवून जा गे मार्बत म्हटलं तर कोणी शत्रुला घेवून जा गे मार्बत म्हटलं. परंतु मार्बतीनं ते सगळं केलं का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. 
          मार्बत........नागपुरातील एक प्रसिद्ध प्रकार. दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला मार्बत हाकलली जाते आणि मोठा उत्सव पाळण्यात येतो. तसंच त्या मार्बतीला हाकलत असतांना समाजात ज्या काही वाईट गोष्टी वावरत असतात. त्या गोष्टींना आपण मार्बतीला घेवून जायला लावतो आणि आपला विश्वासही बसतो मार्बतीवर. कारण मार्बतीनं ते सगळं नेलेलं असतं. उदाहरण द्यायचं झाल्यास मच्छराचं देवू. म्हणतात की मोंगशे मांगशे घेवून जा गे मार्बत आणि हे केव्हा म्हणतात. जेव्हा श्रावण संपतो व पावसाचा जोर ओसरतो. त्यातच पाऊस कमी झाला की परीसरातील पाण्याचे डबके आटू लागतात व त्या गढूळ पाण्यात अंडी टाकून नवीन डासाची निर्मीती होत नाही. पर्यायानं डास पोळ्यानंतर कमी होतात. यात जरी मार्बतीला मच्छर घेवून जायला सांगीतलं नाही, तरी साहजीकपणानं मच्छर कमी होणारच. परंतु लोकांना वाटते की मार्बतीला आपण सांगीतलं की डासांना घेवून जा. म्हणूनच मार्बतीनं डासांना नेलं. दुसरा एक भाग असा आहे की मार्बतीला आपण मुंग्या न्यायला सांगतो. त्या मुंग्यांबाबत मार्बतीला सांगा वा नको सांगा, त्या मार्बतीनंतर जाणारच. याचाच अर्थ असा की मार्बतीनं त्या मुंग्या नेल्या. परंतु त्या मुंग्याही मार्बत नेत नाही. तर पोळ्यानंतर पाऊस कमी झाल्यानं मुंग्यांच्या वारुळात गेलेलं पाणी सुकतं. ती वारुळं मोकळी होतात व मुंग्या वारुळात परत जात असतात. जिथं आजपर्यंत खाली असलेल्या वारुळात नागोबा ठाण मांडून असतो. मुंग्या आपल्या घरी परतल्यावर तो आपली जागा सोडतो. म्हणूनच आपल्याला नागपंचमीला वारुळात नागोबा दिसतो. इतर वेळेस नाही. कारण पाऊस सुरु होताच मुंग्या माकोडे जे वारुळात राहतात. ते आपलं वारुळ पाण्यानं भरुन आपलं नुकसान होवू नये व आपली यातायात होवू नये म्हणून वारुळ रिकामे करीत असतात. 
            मार्बतीला लोकं हेही म्हणतात की निंदा नालस्ती घेवून जा गे मार्बत व शत्रुत्व घेवून जा म्हणण्याऐवजी शत्रूला घेवून जा गे मार्बत म्हणतो. परंतु मार्बत ना शत्रुला नेत ना शत्रुत्वाला. ना निंदा नेत. ना निंदा करणाऱ्या व्यक्तीला. तेवढा वेळ नसतो मार्बतीजवळ. तेव्हा आपला भ्रमनिराश होतो. त्यातच मार्बतीनं कधीही निंदा नालस्त्या घेवून गेलेल्या पाहिल्या नाहीत. कारण मार्बत हाकलणे हा अंधश्रद्धेचाच एक प्रकार आहे. मार्बतीचा उत्सव करणं काही वाईट नाही. परंतु आज अशाच प्रकारच्या अंधश्रद्धेचं पेव आलेलं आहे. 
             सण साजरे करावेत. काल लोकं क्रिष्ण जन्माष्टमी, काजळतीज, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा असे वर्षभर सण साजरे करायचे. कशासाठी? तर आनंद मिळविण्यासाठी. जीवनात जगत असतांना जे काही दुःख यायचं. त्या दुःखावर विरजण म्हणून आपले पूर्वज सण साजरे करत. परंतु आज आपल्याच काही ढोंगी व स्वार्थपिडीत लोकांनी त्यात अंधश्रद्धा शिरवली. त्याचं कारण होतं की आपल्या भावी पिढीनं असंच दुःखावर विरजण म्हणून हे सणं साजरे करावे. जेणेकरुन त्यांना जीवन आनंदानं जगता येईल. परंतु आपण त्याला अंधश्रद्धेचं रुप दिलं. आपण आपले विचार मात्र बदलले नाहीत व वाईट विचार ठेवले. त्यातून आपलंच नुकसान झालं. मग आपण असे सण साजरे करीत असतांना देवाला नवश करीत बसलो. 'मी क्रिष्ण मांडीन, देवा मला पाव.' 'मी फुलोरा करीन, देवा मला पाव.' 'हे गणपतीबाप्पा, मी तुला दरवर्षी मांडीन. तू मला पाव.' 
           आपलं असं वागणं. त्यात देवाला साकडं. वैज्ञानीक कारणं तर कधी जाणूनच घेतली नाही. ना त्यानुसार वागलो आणि हे सणं साजरे करतांना अंधश्रद्धेनं वागलो अन् पाश्चात्यीकरणही वापरलं. जे एक ना धड व भाराभर चिंध्यांसारखं दिसत आहे. याचाच अर्थ असा की नवश म्हणून मांडल्या जाणाऱ्या या गणपतीबाप्पाजवळ कालपर्यंत तमाशे व्हायचे व त्या तमाशातून शिकवण मिळायची. रात्रभर चालायचा सिनेमा. सावकार कसा बरबाद होतो? हे दाखवलं जायचं तमाशातून. लोकांचं मनोरंजनही व्हायचं. त्यातच नाचगाणी करणारी मंडळी ही काल तमाशात महिलांचा वेष धारण करतांना त्या महिलेनं पुर्ण अंग झाकलेलं असायचं. 
           काल सिनेमेही लागायचे गणपतीजवळ. तीन तास सिनेमा पाहिला की जा आपआपल्या घरी. लोकांचं यामुळं मनोरंजन, तेही उत्कृष्टपणे. मग काळ बदलला व बदलत्या काळानुसार हे गणपतीजवळ तमाशे करणे वा सिनेमे दाखवणे बंद झाले. कारण देण्यात आलं की रात्रीला लोकं केवळ तमाशा पाहात नाहीत तर तमाशाच करतात. सिनेमे पाहात नाहीत तर सिनेमेच करतात. अर्थात वाईट कामं करतात. म्हणूनच त्यावर बंदी आणण्यात आली व त्याजागी दुसरे कार्यक्रम आखले जावू लागले. 
            नवरात्रातही आनंदासाठी तमाशे, गरबा आणि इतर गोष्टीची रेलचेल  होती. गरबा खेळतांना मुली साध्या व पुर्ण वेषात यायच्या. लाली नसायची ओठांवर. परंतु आज तसं नाही. आज त्याची जागा लाली काजळ व विभीत्सकारी तोकड्या कपड्यांनी घेतलेली आहे. जी त्या मुलींसाठीच घातक आहे. 
          आजही कालसारखाच उत्सव पार पडतो. परंतु आज दुसरेच कार्यक्रम असतात. जे लोकांमध्ये कुसंस्कार भरतात. आता हे दुसरे कार्यक्रम कोणते तर नाचगाण्याचं वर्णन करता येईल. नाचगाणे म्हणजे स्वतः एखाद्या चित्रपटाच्या गाण्यावर नाचणे. अर्थात आपल्यातील कला लोकांना दाखवणे. याचा परिणाम हा झाला की मुली तोकडे कपडे घालून स्टेजवर नाचायला लागल्या आणि त्यांना तेथीलच तरुणाई वाकड्या नजरेनं पाहू लागली. त्यातूनच बलात्काराचे प्रमाण वाढले. तसंच उत्सवस्थळी भक्तीभावाचे वा धार्मीक गाणे लावण्याऐवजी शिलाकी जवानी,  शांताबाई, झिंग झिंग झिंगाट ही गाणी वाजू लागली. का? अशा उत्सवस्थळी अशी गाणी शोभतात तरी का? अशी गाणी लावल्यानं काय साध्य झालं? काय साध्य केलं? तरीही अशी गाणी व तोकडे कपडे घालतात लोकं व सबंध उत्सवाचा नाश करुन करुन टाकतात. यासाठीच पुर्वीच्या लोकांनी लोकं असे वागू नयेत म्हणून त्यात कदाचीत अंधश्रद्धा शिरवल्या असतील. 
          महत्वाचं सांगायचं म्हणजे या अशा तोकड्या कपड्यानं व तसे अश्लीलता निर्माण करणारे गाणे लावल्यानं भक्तीभावाचे तीन तेरा नव अठरा वाजतात. म्हातारी मंडळीही आपल्या तोकड्या कपड्यात नाचणाऱ्या नातीणीला पाहून हसतात. फोटो काढतात. परंतु तिला काही बोलू शकत नाही. वागण्याचे बोध देवू शकत नाही. कारण त्यांना माहीत आहे की आपण जर बोललो तर आपले लेकरु आताच घराबाहेर काढते. 
            हेच संस्कार आज सणासुदीला सतत पेरले जात आहेत. अख्खी पिढीच्या पिढी बरबाद होत आहे अशा प्रकारच्या मुलांच्या वागण्यातून. खरं तर सण उत्सव हे संस्कार करणारे असावेत. त्यातून संस्कार घडवता यावेत. त्याचा वापर तशाच स्वरुपाने करावा. टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव लोकांना एकत्र आणण्यासाठी व एकात्मता टिकविण्यासाठी केला. त्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. त्यातच दहा दिवस बसणाऱ्या या कार्यक्रमातून स्वातंत्र्याचे बीज पेरले जात होते. त्याचा फायदाही झाला. लोकांमध्ये एकत्रीपणाची भावना वाढली व लोकं पुढे स्वातंत्र्यासाठी पेटून उठले. आज तसं नाही. कोणीही अशा गणेशोत्सवात संस्काराचा बीजारोपण करतांना दिसत नाही. कोणी कोणाला ऐकत नाही. फक्त नि फक्त धागडधिंगा. याचसाठी गणेशोत्सव का? असे म्हणण्याची वेळ आली आहे. 
           विशेष म्हणजे आपण सण साजरे करावे. परंतु त्यातून व्याभीचार, परनिंदा, शत्रुत्व, बेकारी वाढू नये. कुसंस्कार तर अजिबातच वाढू नये. लोकांनी असे सण साजरे करावे. या सर्व सण साजरे करण्यातून संस्कार वाढावे. संस्कार पेरता यावे. ते आपण पेरायला हवे. केवळ निंदा नालस्ती घेवून जा गे मार्बत म्हटल्यानं निंदा जाणार नाही. जेव्हापर्यंत आपण स्वतः परनिंदा सोडणार नाही वा आपण स्वतः तसे वागणार नाही. 
            आपण अशा उत्सवात शिलाकी जवानी हे गाणे वाजवू नये. शांताबाईला कायमचा नमस्कार करावा. झिंग झिंग झिंगाट खपून देवू नये. तसंच तोकडे कपडे घालू नये व कोणी घालत असतील तर त्याचा विरोध करावा. त्याला प्रवेशच देवू नये. त्यातूनच कुसंस्कार निर्माण होतात व ते वाढीस लागतात. म्हणूनच काळजी घेतलेली बरी. कारण आपले अशाच तोकड्या कपड्यातून उत्सवाच्या निमित्यानं पडणारे हेच तोकडे पाऊल आपल्या घराचीही भविष्यात बरबादी करणारे ठरते. जे पाऊल आपलीच नाही तर आपल्या देशाचीही बदनामी करु शकते. अशा बदनामीला आपणच जबाबदार असतो. मग कोणीच धावून येत नाही. तो गणपती बाप्पाही नाही. ना क्रिष्ण येत, ना एखादी दुर्गादेवी येत. म्हणूनच गणेशोत्सव वा इतर सण आपण अवश्य साजरे करावे. परंतु ते अगदी साजेशा वेषभुषेत आणि साजेशा भक्तीभाव वातावरणात साजरे करावे. शिला की जवानी वा शांताबाई वा झिंग झिंग झिंगाट हे गाणे लावून नाही. आपण सुधरावे. इतरांनाही सुधारावे. अशा सण उत्सवातून निंदा नालस्ती वा वाईट गोष्टींना दूर पळवावे. तरच सणांचा उद्देश साध्य होईल. सण साजरे करणे म्हणजे केवळ मौजमस्ती करणे नव्हे. ते चांगले साजरे करावे. जेणेकरुन त्यातून संस्कार पेरता येतील. संस्कार वाढवता येतील व तेच संस्कार पुढं जावून आपल्याच नाही तर देशहिताच्याही कामात येतील यात शंका नाही. चांगले विचार आपल्यात रुजतील. निंदा दूर पळतील. मग कोणालाच निंदा नालस्ती घेवून जा गे मार्बत म्हणण्याची वेळ येणार नाही.

**********************************************************

         सुजीत देश चालविण्याबरोबरच सुधारणाही करु पाहात होता. त्यानं उत्सव साजरे करीत असतांना तोकडे कपडे घालण्यावर बंदी घातली होती. वेषभुषेच्या बद्दल समाजात जनजागृती केली जात होती. तसंच लोकांना संस्कारक्षम बनविण्यासाठी त्यानं अशा उत्सवात विभीत्स स्वरुपाची गाणी लावण्याला व लावून वाजविण्यालाही बंदी घातली घातली होती. त्याचे हे पाऊल एक रास्त पाऊल होते. ते पाऊल लोकांना संस्कारक्षम बनविण्याचे पाऊल होते.
           तो लोकांना संस्कारक्षम बनवू पाहात होता. काही लोकं सुधारले होते. त्यांना सुधारणा आवडत होत्या. परंतु काही लोकं सुधारायला तयार नव्हते. तरीही तो प्रयत्न करीत होता. त्यानं देश चालवता चालवता आपल्या हातातील अधिकाराच्या भरवशावर बालविवाह थांबवले होते. महिलांना मंदिरप्रवेश खुला केला होता. पती निधनानंतर पांढरी साडी वापरण्याची प्रथा बंद केली होती. हातातील बांगड्या फोडणे, भागातील कुंकू पुसणे, गळ्यात मंगळसूत्राचं बंधन घालणे, विधवेची छेड काढणे या प्रथा  बंद केल्या होत्या. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्यानं सुधारणा केल्या होत्या नव्हे तर तो सुधारणा करीत होता. 
          सुजीत केवळ देशच सुधरवीत होता असे नाही. तो केवळ राजकीय सुधारणाच करीत होता असे नाही तर तो शैक्षणिक सामाजिक सुधारणाही करीत होता. शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षण निःशुल्क देवून शैक्षणिक सुधारणा केली होती तर बालविवाह थांबवून सामाजिक सुधारणाही केली होती. पशूधन वाढविण्यासही त्यानं प्राधान्य दिलं होतं. आता बकरी पालन होत होतं. मेंढीपालन होत होतं. त्यांची हत्या बंद केली होती. बकरीचा वापर लेंडी खत व दुधासाठी केल्या जात होता व मेंढीचा वापर लोकर व लेंडीखतासाठी होत होत होता. लोकं बकऱ्या आणि मेंढ्या आवर्जून पाळत. आपल्या लेकरासारखं त्यांना वाढवत. त्यांचा कळप शेतात बसवत व त्यांच्या लेंड्यांचा उपयोग शेतीसाठी करुन घेत. 
           सुजीतनं देशात सुधारणा घडवल्या होत्या. आता देश याच सुधारणेनंही पुढं जात होता. देश पाश्चिमात्याच्या विचारांचा अंगीकार करीत होता. परंतु तोकडे कपडे घालून नाही.
          सुजीत करीत असलेल्या सुधारणा काही लोकांना पटत होत्या तर काही लोकांना पटत नव्हत्या. त्यातच काही लोकं त्याच्या विरोधात कुरघोडी करीत होते. त्यातच काही विरोधकांनी डाव रचला. त्यांनी त्याच्याच अंगरक्षकांना प्रलोभन दिलं व तो एक दिवस उजळला. 
           एक दिवस सुजीत आपल्या घराच्या दरवाजाबाहेर पडला. त्यानं घराच्या दरवाजाबाहेर पडण्यापुर्वी विचार केला की आपलं कोण काय करु शकते. आपण तर चांगलं काम केलं आहे. आपल्या चांगल्या कामाची पावती म्हणून देवही आपल्याला मृत्यू देणार नाही. परंतु त्याला काय माहीत होतं की त्याचा आज काळच आला आहे व तो काळ आज त्याला संपविणार आहे. 
           सुजीतनं अहंभाव मनात आणून आपल्याला कोण काय करणार याचा विचार केला. आज त्यानं चिलखत घातलं नव्हतं व तो घराच्या बाहेर पडला. तेच हेरलं त्याच्या एका अंगरक्षकानं. त्याच्या मनात राग होताच. तो राग म्हणजे त्याचा बाप आत्महत्या करुन मरण पावला होता. गौरव नाव होतं त्याचं. 
           गौरव लहान होता, तेव्हाच त्याचा बाप मरण पावला. त्याचं कारण होतं त्याच्या वडीलाची गेलेली शेती. त्याचे वडील गावातील सावकार होते. त्यांनी गावातील अनेकांच्या जमीनी हडपल्या होत्या व तो श्रीमंत बनले होता. त्यानं अनेकांना छळलं होतं व त्याच्यामुळं कित्येक लोकांच्या जमीनी गेल्यानं त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. असे बरेच सावकार होते की त्यांच्या जाचानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. परंतु ज्यावेळेस सुजीतच्या नवपरीवर्तन पॅनलचं सरकार सत्तेवर आलं. तेव्हा त्या सरकारनं शेती सुधारणा कायद्यातंर्गत सावकारासह सर्व शेतकऱ्यांकडून जमीनीचे हक्क काढून घेतले व ते आपल्या ताब्यात घेऊन त्यावर सरकारी सेवक म्हणून शेती करणाऱ्यांची नियुक्ती केली. सरकार त्यांना सरकारी खजिन्यातून पैसा देत असे. परंतु ती गोष्ट व आपली शेती गेलेली गोष्ट गौरवच्या बापाला सहन झाली नाही व त्यानं आत्महत्या केली होती. 
           सुजीतच्या निर्णयानं व शेती सुधारणा कायद्यानं शेतकरी आत्महत्या तर थांबल्या होत्या. परंतु त्यानं सावकार हवालदिल झाले होते. कारण ते बसून खात व आतापर्यंत शेतकऱ्यांवर अत्याचार करीत. आता मात्र काम करावं लागायचं. त्यातच गौरवचा बाप मरण पावताच त्याच्या मनात चीड निर्माण झाली व तो बदल्याची वाट पाहू लागला. 
            वडील मरण पावताच तो विचार करु लागला. बदला कसा घेता येईल? सुजीतला कसे समाप्त करता येईल? तसा विचारांती त्याला कळलं की सुजीतच्या कार्यालयात एक अंगरक्षकाची जागा खाली आहे. आपण तिथं नोकरी पत्करावी व एक दिवस संधी साधून मारुन टाकावे सुजीतला. 
            गौरव सुजीतच्या कार्यालयात नोकरीवर लागला. विश्वास जिंकत गेला व हळूहळूच तो सुजीतचा खास अंगरक्षक बनला. त्याला काय माहीत होते की ज्या अंगरक्षकावर आपण विश्वास दाखवला आहे. तोच आपला कर्दनकाळ ठरणार आहे एक दिवस. परंतु झाले असेच. 
          सुजीत जेव्हा घरात राहायचा. तेव्हा तिथं एकटाच राहायचा. तिथं कोणी फिरकायचाही नाही. अंगरक्षकही त्या दरवाजाबाहेर राहायचे. परंतु तो जेव्हा बाहेर निघायचा. तेव्हा सर्व अंगरक्षक त्याच्या सोबत असायचे. असाच तो दिवस. दिवस मंगळवार होता. सुजीत बाहेर पडला चिलखत न घालता. अशातच काळ गौरवच्या रुपात त्याचेवर चालून आला. 
          गौरवनं सुजीतला पाहिलं. त्यानं त्याच्या डोळ्यात पाहिलं. डोक्यात कुविचार शिरवले. तो विचार करु लागला त्याला मारायचा. तसा विचार करताच तो सपासप गोळ्या झाडू लागला बंदुकीतून. 
           तो बंदुकीचा आवाज. तसा तिथं तो अंगरक्षक एकटाच होता. बाकी कोणी नव्हतं. तरीही तो बंदुकीचा आवाज ऐकून सारे धावतच आले. त्यांनी सपासप गोळ्या चालविणाऱ्या गौरवला पाहिलं. क्षणातच त्याला पकडलं व अटक केली. 
          सुजीतला गोळ्या लागल्या होत्या. तरीही तो जीवंत होता. त्याचेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु गोळ्या एवढ्या लागल्या होत्या की तो वाचणार नव्हताच. तसं त्यानं एका सेवकाला बोलावलं व त्यानं त्याला मारणाऱ्या गौरवला बोलावलं व कारण विचारलं. तसं गौरवनं आपण हे का केलं? याची माहिती सांगीतली. म्हणाला, 
          "यांनी जो काही शेती सुधारणा कायदा आणला. त्यात माझ्या वडीलाला मानसीक धक्का बसला व माझ्या वडीलानं आत्महत्या केली."
          प्रकरणाची ताबडतोब शहानिशा केली गेली तर कळलं की तो एका सावकाराचा मुलगा असून त्याच्या बापानं कित्येक लोकांच्या जमीनी हडपल्या होत्या. कित्येकांना आत्महत्या करायला भाग पाडलं होतं व कित्येकांना बेघर केलं होतं. तो गावचा एक गुंडाच होता. परंतु साहेबाना सुधारणा कायदा आणल्यानंतर त्याच्या ताब्यातील हडपलेली संपुर्ण शेती गेली व त्याचा आघात सहन न झाल्यानं त्यानं आत्महत्या केली होती. परंतु त्याच्या आत्महत्येवर लोकं हरहळले नव्हते तर ते आनंदच व्यक्त करीत होते. त्याच्यातील बरेचजण नवपरीवर्तन पॅनलचे सदस्य बनले होते. 
           ती माहिती सर्वांना कळली होती. तशी ती माहिती नवपरीवर्तन पॅनलच्या सदस्यांनाही कळली. तेव्हा नवपरीवर्तन पॅनलचा एक सदस्य त्याच्यावर बंधूक रोखत म्हणाला, 
         "तुला कळतंय की तुझा बाप आत्महत्या करुन मरण पावलाय आणि या साहेबांच्या सुधारणा कायद्यानं मरण पावलाय असं वाटत असेल तुला. परंतु तुला माहीत नाही की आमचेही बाप असेच आत्महत्या करुन मरण पावलेत. कशानं? तर कर्जानं. तुझ्याच बापाकडून होत असलेला अत्याचार सहन न झाल्यानं आमचेही मायबापही मरण पावले आत्महत्या करुन. तशीच शेती न पिकत असल्यानं व तुझ्या बापाचं व्याजावर व्याज चढत गेल्यानं आमचीही शेती गेली होती तुझ्याच बापाच्या घशात. अशा कितीतरी आत्महत्या घडल्या आमच्या बापांच्या तुझ्याच बापाच्या हातून. परंतु आम्ही कधीच तुझ्या बापाला मारण्याचा विचारच केला नाही ना मारले व ना बदला घेतला. तू अशा माणसाला मारलं आहेस की जो देव होता. ज्यानं देशाची पुर्ण परिस्थितीच बदलवली. सुधारणा केली. नवपरीवर्तन आणलं. देश विकासावर नेला. चंद्र सुर्यावर यान पाठवणं बंद केलं व त्या पैशात देशात सुधारणा केल्या व देश महाशक्ती  बनवलाय. महिलांसाठीही स्वातंत्र्य आणलं. शिक्षण निःशुल्क केलं. गुंडाराज संपवला. आदिवासी भागात रस्ते, वीज पोहोचवली. एवढंच नाही तर शेतकरी आत्महत्या थांबवल्या. अजून काय हवंय तुला? अरे निर्लज्जा, तू फक्त आपल्या एका बापाचा अंत पाहिलास. परंतु हे पाहिले नाही की या माणसानं कितीतरी माणसांचे जीव वाचवले. माहीत आहे, मला जर बंधन नसतं तर तुझ्या शरीराला छिन्नविछिन्न करुन टाकलं असतं मी."
          त्याचं बोलणं संपलं होतं. तसा गौरवच्या बोलण्यानंतर व सफाईनंतर सुजीत सर्वांना म्हणाला, 
           "या नवयुवकाला माझ्या खुनात अडकवू नये. याची निर्दोष मुक्तता करावी. हेच माझं अंतिम बोलणं आहे."
             सुजीतचे ते शेवटचे शब्द. तेच त्याचे अंतिम शब्द ठरले. त्यानंतर त्यानं आपले कायमचे डोळे मिटले व तद्नंतर त्यानं आपले डोळे उघडलेच नाही. 
            सुजीत मरण पावताच सुजीतच्या आज्ञेनुसार गौरवला सोडून देण्यात आले. आता तो सुजीतच्या पायावर नतमस्तक झाला होता. रडत होता. अश्रू निघत होते डोळ्यातून व ते अश्रू सुजीतच्या पायावर टपकत होते. जणू त्या पश्चातापाच्या अश्रुनं त्यानं साहेबांना श्रद्धांजली वाहिली होती. 
         सुजीत आज मरण पावला होता. परंतु मरतांनाही त्यानं एक अनमोल सुधारणा केली होती. ती म्हणजे त्यानं गौरवचे ह्रृदयपरीवर्तन केले होते. त्याच्या मनातून त्याचेबद्दलचा असलेला द्वेष काढला होता. आता त्याचे मनात सुजीतबद्दल द्वेष नव्हता.
             सुजीत मरण पावला होता. सत्ता परीवर्तन झाली होती. त्यानंतर सुजीतचा लोकांनी संसदेत पुतळा उभा केला होता आणि त्या पुतळ्याखाली लिहिलं होतं. सुधारणा घडविणारा पुतळा. 
            आज शेतकरी वर्ग सुखी झाला होता. तसंच शेतीला सन्मानही तेवढाच मिळत होता. परंतु सुजीतनं जीवनभर विवाह केला नव्हता आपला. कारण तो शेतकरी होता. त्याला ऐन उमेदीच्या काळात तो शेतकरी बनल्यानं विवाहासाठी मुली मिळाल्या नसल्यानं त्याला विवाह करता आला नव्हता व नंतर विवाह करण्यासाठी सवडच मिळाली नव्हती. परंतु त्यानं केलेल्या सुधारणेनं आज सर्व शेतकऱ्यांना विवाह करण्यासाठी मुली मिळत होत्या. कारण शेती करणं ही सरकारी नोकरी होती. सन्मानाची नोकरी होती आणि तेवढीच नफ्याचीही. 
           आज सुजीत जगात नव्हता. परंतु त्याच्या सुधारणा जगात होत्या. त्याचं शिक्षणविषयक धोरण जगात होतं नव्हे तर त्याचे सुधारणा कायदे जगात होते. आज महिला सुखी होत्या. त्या सर्वच स्तरावर सुखी झाल्या होत्या. 
          गौरव एक खुन करुनही मोकळा सुटला होता. परंतु तो पश्चातापाच्या अग्नीत जळत होता. त्याला पदोपदी विचार येत होता की आपण जे बदल्याच्या भावनेनं पाऊल उचललं. ते योग्य नव्हतंच. कधी ती आठवण एवढी तीव्र व्हायची की त्यात शिशीरच भरायचा व शिशिरात जशी पर्णगळती होते. तशीच त्याची अश्रूगळती व्हायची. ते अश्रू पावसाळ्याच्या थेंबासारखे झरझर टपकत राहायचे. थांबायचे नाहीत. ते अश्रू जणू सुजीतला श्रद्धांजलीच वाहण्यासाठी असायचे. इतर गोष्टीसाठी नाही.
             सुजीतनं आज चांद्रयान पाठवलं नव्हतं. ना चांद्रयान चंद्रावर उतरवलं होतं. ना चांद्रयानावर देशातील करोडो लोकांच्या घामाचा कर रुपात मिळणारा पैसा वाया घालवला होता. तो पैसा देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी वापरला होता. त्यानं तो पैसा देशातील तळागाळातील लोकांच्या सुखसोयीसाठी वापरला होता. त्यानं सुधारणा नक्कीच केल्या होत्या. ह्या सुधारणा करण्यासाठी चांद्रयान महत्वाचं नव्हतं. महत्वाचं होतं तळागाळातील लोकांना म्हणजेच देशातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांना अन्न, वस्र निवाऱ्याची सोय करुन देणं. त्यांना शहराशी जोडणं. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं. त्यांना शिक्षणाच्याही सोयी उपलब्ध करुन देणं........इतकंच नाही तर त्यांच्या घरादारात वीज पोहोचवणं. रस्ते बांधणं व उद्योग उभारणं. सुजीतनं तेच केलं होतं. त्यानं शहर वा तालुक्यातीलच नाही तर अगदी देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी केल्या होत्या. 
          आज देश खऱ्या अर्थानं महाशक्ती बनला होता. कारण देश स्वावलंबी बनला होता. देशातील अगदी कानाकोपऱ्यातील जनता सुखी होती. त्यांनाही शिक्षण निःशुल्क मिळत होतं. मग ते कोणत्याही स्वरुपाचं शिक्षण का असेना. त्यांना अन्न, वस्र, निवारा तोही उत्तम प्रतीचा मिळत होता. प्रत्येकांच्या घराघरात वीज पोहोचलेली होती. रस्ते बांधकाम केल्यानं प्रत्येक जण शहर व तालुक्याला येवू जावू शकत होता. श्रम वाचले होते. आवश्यक वस्तू नेवून शकत होते. त्यानं गरीब, आदिवासी लोकांनाही शहराच्या प्रवाहात आणले होते. रहदारीची साधनं वाढली होती नव्हे तर ती त्यानं वाढवली होती. 
          हाच खरा विकास होता देशाचा अन् त्या तमाम नागरीकांचा. त्यानं आधीच ठरवलं होतं की चांद्रयान मिशन राबवून काही देश महाशक्ती बनणार नाही. देशाला महाशक्ती बनवायला अन्न, वस्र व निवारा यासारख्या प्राथमिक गरजांची गरज आहे. जेव्हा देशातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या सर्व गरजा पुर्ण होतील. तेव्हाच देश खऱ्या अर्थानं महाशक्ती बनेल. चांद्रयान पाठवून नाही. 
           आज सुजीत नव्हता. परंतु सुजीतनं या तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सोयी जगात होत्या. त्यामुळंच प्रत्येकांच्या मुखात सुजीतचं नाव होतं व लोकं म्हणत असत की असा कार्यशील व्यक्ती पुन्हा कधी होणार नाही. 

************************************************

          सुजीतनं देशात सुधारणा करण्यासाठी व देशाला महाशक्ती बनविण्यासाठी काही कायदेही बदलवले होते. त्यानं कायद्यात काही तरतुदी केल्या होत्या. आता दरवर्षी डिसेबर महिना यायचा. तसा जानेवारीही. समदं साल निघून जायचं. शिशिर यायचा. झाडाची पानं झाडून निघून जायचा. त्यानंतर वसंत यायचा व झाडावर पालवी देवून निघून जायचा. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा यायचा. आपलं काम करुन निघून जायचा. पाऊस, ऊन व थंडी यायची. तेही आपले काम करुन निघून जायचे. परंतु कोणी कोणाला काहीही विचारायचे नाहीत. ते आपली कामं करीत राहायचे. तशी दरवर्षी निवडणूक यायची. निवडणुकीत मतदारांना आकर्षीत करण्यासाठी निवडणुकीत उभे राहणारे लोकं आपआपल्या परीनं प्रचार करायचे. परंतु आता निवडणूक आली की लोकं आधीच विचारायचे. काय करणार आहात? लेखी निवेदन मागायचे. त्यानंतर एखाद्याला निवडून दिल्यावर त्यानंतर कामं केली नाहीत तर त्याला वेळीच पदावरुन खाली उतरंवायचे व बदल्यात त्याची पुर्ण संपत्ती जप्त करायचे. तशी तरतूद सुजीतनं कायद्यात करुन ठेवली होती. त्यामुळंच की काय धाकानं का होईना. प्रत्येकच निवडणुकीत भाग घेणारा वा निवडणूक लढविणारा उमेदवार निवडून येताच देशाची सेवा करायचा. जी सेवा देशाला महाशक्ती बनविण्यासाठी नाही तर जो देश महाशक्ती बनला होता. ती महाशक्ती टिकविण्यासाठी होती. 
          आज सुजीत जगात नव्हता. परंतु त्यानं देशाला खऱ्या अर्थानं महाशक्ती बनवलं होतं व तीच देशाची महाशक्ती आता लोकं टिकवीत होते. सुजीतची आठवण मनात ठेवून. आज सुजीत जीवंत नसला तरी प्रत्येक माणसाच्या ह्रृदयात तो जीवंत होता. अगदी लोकांच्या नसानसात व श्वासातही. कारण त्यानं जो बदल केला होता व देशाला पालटवलं होतं. तो बदल वाखाणण्याजोगा होता. 
          सुजीत आज जगात नव्हता. परंतु त्याचा तो वेगळाच इतिहास बनला होता. त्यानं इतिहासालाच कलाटणी दिली होती. त्यानं वेगळाच इतिहास बनवला होता. जो इतिहास आज पाठ्यपुस्तकातही समाविष्ट झाला होता. शिक्षक शिकवीत होते तो इतिहास आणि शिकवीत होते राजकारण. निवडणूक कशी असावी? कशी घ्यावी? कसा उमेदवार निवडावा? उमेदवारानं निवडून आल्यावर कामे न केल्यास काय करावे? इत्यादी प्रश्नांचे सर्व पाठ शाळेत शिकवले जात होते. जे पाठ शिकून विद्यार्थीही देशाचा विकास कसा करावा याचा बोध घेत होते नव्हे तर देशाच्या राजकारणाचं बाळकडू अगदी अल्प वयातच शिकत होते. तसंच देशाची महाशक्ती टिकविण्याचंही दूध अगदी बालवयातच पीत होते. त्यामुळंच आज सुजीत जरी नसला तरी देशाची महाशक्ती टिकून होती. कारण त्याचा भाग्यविधाता सुजीत नावाचा कोणीतरी पुर्वज झाला होता. जो याच देशातील महाशक्तीचा शिल्पकार होता आणि त्यानंच कोण्या एकेकाळी या देशाला महाशक्ती बनवले होते. 

**********************************************************************************समाप्त********

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED