प्रवास Ankush Shingade द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रवास

प्रवास (कादंबरी)
            अंकुश शिंगाडे 

          ते दिवसामागून दिवस जात होते. शंकरची तिरुपती बालाजीला जायची इच्छा होती. परंतु त्याला योगच येत नव्हता. अशातच तो कोणालाही विनवीत होता की ते जर तिरुपती बालाजीला जात असतील तर त्यांनी तसं सांगावं. तोही तिरुपती बालाजीला जाणार. 
         शंकरला तिरुपती बालाजीला जाण्यापुर्वी तिरुपती बालाजीची पुसटशी माहिती होती. तिरुपती बालाजी.........हे आंध्रप्रदेशातील एक स्थान आहे. या स्थानी प्रत्यक्ष विष्णू भगवान निवास करतात असं भावीकांचं म्हणणं होतं. तसंच काही लोकांचं म्हणणं होतं की तिरुपती बालाजी हा पैसे वाल्यांचा देव आहे. तिथं फक्त पैसाच चालतो. ज्याच्याजवळ पैसा जास्त. तोच तिरुपती बालाजीला जावू शकतो. तसं पाहता तिरुपतीला जाणं हे अवघडच काम आहे. 
          शंकर कधीच तिरुपतीला गेला नव्हता. त्यामुळंच त्याला ते जाणं अवघडच वाटत होतं. तसा तो शिमल्यापर्यंत गेला होता. त्यानं नागद्वारच्याही कित्येक यात्रा केल्या होत्या आणि महादेवाच्या तर यात्रा एवढ्या घडल्या होत्या की त्या त्यानं मोजल्याही नव्हत्या. नागद्वार कठीण होतं. तसा शंकर विचार करीत होता. तिरुपती बालाजी........नागद्वार एवढा कठीण तर नसेल आणि असेलही. परंतु आपण तिथं गेल्याशिवाय आपल्याला कसं कळेल. 
          नागद्वार........नागद्वार हे पवित्र असं ठिकाण होतं. पुर्वी नागद्वारला जाणारा व्यक्ती परत येईलच याची शाश्वती नसायची. कारण तेथील वातावरण. तेथील जंगलात हिंस्र श्वापदं असायची. त्या हिंस्र श्वापदात वाघ, सिंह, अस्वल लांडगे यासारखे प्राणी असायचे की जे प्राणी माणसाचा फडशाच पाडायचे. त्यातच त्या ठिकाणच्या वाटा एवढ्या बिकट असायच्या की माणसाचा पाय घसरला की माणूस एकदम खाईत. त्यातच कधी भुस्खलन झालंच तरही माणसं मरायची. 
          नागद्वार........माणसं नागद्वारला जातात. एक प्रकारची उर्जा घेवून. तिथं असलेल्या पाषाणी मुर्तीत ती माणसं देव शोधतात. त्या पाषाणी मुर्तीलाच देव संबोधून माणसं आपलं मनोरंजन करुन घेतात. तसं पाहता तो निसर्ग एवढा रमणीय आहे की त्या ठिकाणी ढगं आपल्या हाताजवळून जात असतात. त्यानंतर तिथं एवढं धुकं पसरतं की जवळपासचाही माणूस डोळ्याला दिसत नाही. तेथील वातावरण एवढं आल्हाददायक आहे की माणसाचं मन प्रफुल्लीत होवून जातं. त्या वातावरणात शुद्ध ऑक्सीजन असल्यानं तो शुद्ध ऑक्सीजन आपल्या शरीरात जातो. तो ऑक्सीजन आपल्या शरीरातील नसांद्वारे रक्तात मिसळतो व तो ऑक्सीजन आपल्या शरीरातील रक्तात मिसळला की बस आपलं मन अगदी ताजतवानं झाल्याशिवाय राहात नाही. तसं पाहता पुर्वीची माणसं तशी हुशारच होती. हे शुद्ध ऑक्सीजन आपल्या पिढीला मिळावं ही त्यांची भावना असेलच असं वाटतं.  कदाचीत आपली येणारी पिढी ही एवढी सुसंस्कृत असेल की ती पाषाणाला देव मानणार नाही. परंतु तरीही त्यांनी फिरायला जायला हवं व या शुद्ध ऑक्सीजनचा प्रवाह त्यांच्या शरीरात जायला हवा. म्हणूनच त्यांनी या पाषाणातही देव व भक्तीभाव निर्माण केला. त्यामुळंच की काय, आज कित्येक लोकं, काही भावीक म्हणून तर काही फिरायला म्हणून नागद्वारला जात असतात. 
           शंकरचं असंच झालं. तो सुशिक्षीत होता. देव मानत नव्हता. तसा तो पाषाणात देव शोधत नव्हता. तो अशा पर्वतीय भागात प्रवास करायचा. त्याचं कारण म्हणजे शुद्ध ऑक्सीजन मिळवणं. तो शुद्ध ऑक्सीजन घेण्यासाठीच तिथं जायचा. तसंच त्याला वाटायचं की तो पर्वतीय भाग चढल्यानं व उतरल्यानं अंगाची सर्वीसींग होते. असा भाग उतरल्यानं अंगातील सर्व नसानसा मोकळ्या होतात व त्याचबरोबर अंगातील नसा मोकळ्या झाल्यानं रोग निर्मीती होत नाही. याच एकमेव कारणानं तो दरवर्षी नागद्वारला जात होता. आपल्या शरीरातील रोगांवर ताबा ठेवण्यासाठी नव्हे तर आपले रोग आपल्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी. 

**********************************************

         तिरुपती बालाजीची कल्पना त्याला फार सतावत होती. त्याला ते स्थळ पाहावसं वाटत होतं. त्याचं आकर्षण होतं त्याच्या जीवनात. का वाटत होतं त्याला तिरुपती बालाजीला जायला. तेच कळत नव्हतं. तसं पाहता तो प्रसंग आलाच. शंकर जिथं राहात होता. त्याच्याच घराजवळ एक सुरज नावाचा मुलगा आला होता. तो शंकरला वडीलांसमान चाहात होता. त्याची बरीच ओळख होती. त्याच्या ओळखीचं एक संघटन होतं. त्या संघटनात काही नावाजलेले लोकं होते. ज्यांच्या तिरुपती बालाजीच्या यात्रा चाळीसच्याही वर झाल्या होत्या. तसं पाहता सुरजची तिकीट बनली होती  व ते सर्व रेल्वेनं तिरुपतीला जाणार होते. तसं सुरज कधीकधी शंकरच्या घरी बसायचा व तो आपल्या तिरुपतीच्या प्रवासाबाबत शंकरला सांगायचा. त्यावेळेस शंकरचीही इच्छा व्हायची तिरुपतीला जायची व तो म्हणायचा, 
          "सुरज, माझ्यासाठीही बुक करणं, तिरुपतीचीही  तिकीट काढायला सांग. तुझ्या मित्रांना सांग ना त्याबद्दल."
           त्यावर सुरज म्हणायचा, 
           "तुम्ही चिंता करु नका. तुम्ही एक साधी तिकीट काढा. माझ्याच बर्थवर बसजा आणि तिरुपतीला चालजा."
          सुरजचं ते म्हणणं. परंतु ते म्हणणं काही शंकरला विश्वासाचं वाटत नव्हतं. पटतही नव्हतंच. म्हणून की काय, तो याहीवेळेस निराश होता. मात्र त्याला मनोमन वाटत होतं की आपण तिरुपतीला जावं. तसा तो सुरजला फोर्स करीत असता सुरज पुन्हा म्हणायचा, 
           "तुम्ही चिंता करु नका. मी आता पाहून येतो. मग आपण जेव्हा केव्हा जावू. तेव्हा माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईलच."
            सुरजचे ते बोल. तसं बोलताच शंकर चूप बसला होता. आपल्या मनात एक प्रकारची इच्छा डांबून. 
           सुरजची रेल्वेमध्ये बुकींग झाली होती. त्याची तिकीटही कन्फर्म झाली होती. परंतु त्याच्या घरी किरकोळ स्वरुपाची पती पत्नीची भांडणं सुरु होती. कारण सुरज नेहमी फिरायला जायचा. परंतु तो काही आपल्या पत्नीला फिरवायला न्यायचा नाही. त्याचं कारणही तसंच होतं. मित्र मित्र जेव्हा फिरायला जायचे. तेव्हा ते आपल्या पत्नीला फिरवायला न्यायचे नाहीत. त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे मित्रमंडळ जेव्हा फिरायला जायचे. तेव्हा नजरचुकीनं काही गोष्टी करायचे. ज्या गोष्टी परीवाराला पटायच्या नाहीत. म्हणूनच मित्रमंडळ परीवाराला सोबत नेत  नसत. म्हणूनच सुरजही आपल्या पत्नीला नेणार नव्हता. तशी सुरजची पत्नी म्हणत होती, 
           "तुम्ही नेहमी नेहमी फिरायला जाता. परंतु मला नेत नाही. आता तुम्ही जायचंच नाही. मला जर न्यायचं असेल तर जा. नाहीतर जावू नका."
            सुरजच्या पत्नीचं असं म्हणणं. तसं ते किरकोळच स्वरुपाचं भांडणं. तशी त्याची इच्छाच नव्हती तिरुपती बालाजीला जायची. तसा तो शंकरला सांगत होता. मात्र तारीख बुकींग झाली होती. तिकीटा काढल्या होत्या  अशातच त्या तारखेच्या आधीचा दिवस उजळला. रात्रीचे सात आठ वाजले होते. तसा सुरजचा फोन आला. 
            "हैलो, मी सुरज बोलतोय."
            "बोल. कशासाठी फोन केलाय?"
            "तुमची इच्छा होती ना तिरुपतीला जाण्याची."
            "होय."
            "मग उद्या जाल का माझ्या जागेवर."
            "म्हणजे? तू जाणार नाहीस का?"
            "नाही. मला एक महत्वाचं काम आलं आहे."
            शंकरला आलेला तो फोन. तसं पाहता तो फोन येताच शंकर विचारात पडला. तोच सुरजचा आवाज आला.
           "बोला. जायचं असेल तर लवकर सांगा. नाहीतर दुस-याला तयार करावं लागेल."
           सुरजचं ते बोलणं. तशी मनात इच्छा होतीच. तसा विचार करायलाही वेळ मिळाला नाही व सुरजनं दुसऱ्याला तयार करावं लागेल असं म्हणताच शंकरनं ताबडतोब होकार दिला व तो तिरुपती बालाजीला जाण्यासाठी तयार झाला. 
         सुरजच्या म्हणण्यानुसार शंकर तयार झाला होता तिरुपती बालाजीला जाण्यासाठी. तसा तो तयार होताच सुरजनं फोन कापला व शंकर गंभीर विचारात गढला. शंकर विचार करु लागला. 
           'उद्या आपल्याला जायचंय. नवीन लोकं आहेत. एकपण ओळखीचा नाही. कसं करावं.' तोच तो गंभीर विचार. परंतु पाहून घेवू.  ओळखी करु. असा विचार करुन तो चूप बसला. तसा दुसरा दिवस उजळला. 
          शंकर सकाळीच उठला. त्यानं भराभर अंघोळ केली व ती अंघोळ करुन त्यानं तिरुपतीला जाण्याची तयारी केली. तसा तो तयारीस लागला असता सुरज घरी आला. म्हणाला,
          "तयारी झाली काय?"
          "होय."
          "बरं, आता मी दिड वाजता येईल. दिड वाजता तयार राहाल."
          "ठीक आहे." शंकरनं आवंढा गिळला. तसा तो म्हणाला. 
            "बरं तू का बरं स्थगीत केलं जाण्याचं?"
            "मला खाजगी महत्वाचं काम आलं आहे. त्या कामाच्यानं मला स्थगीत करावी लागली यात्रा." सुरजनं आपल्याबद्दल सांगीतलं. तसा शंकर गप्प झाला व सुरज आल्यापावली परत निघून गेला. 
          ते पावसाचे दिवस होते. आदल्या दिवशी धो धो पाऊस येवून गेला होता. तसा शंकरला एक फोन आला. 
           "हैलो, कुठे आहेस?"
           "घरी."
           "काय करतोस?"
           "काही नाही. बसलो आहे. बोला."
          "का बरं?"
          "सुटी आहे. रविवार आहे."
          "मग अशा सुटीच्या दिवशी फिरायला जावं कुठंतरी."
           "जात आहे ना."
           "कुठं?"
           "तिरुपती बालाजीला."
           "तिरुपती बालाजीला आणि आता?"
           "का बरं?"
           "अहो तिरुपती बालाजी म्हणजे साक्षात विष्णू भगवान. ते या काळात पाताळात असतात."
           "म्हणजे?"
           "अहो ते पृथ्वीवर नसतातच."
          त्या गृहस्थानं आपलं आध्यात्मीक ज्ञान पाजळवलं. तसं शंकरनं विचारलं, 
           "मग आता पृथ्वीवर कोण असतं?"
           "आता महादेव. श्रावण आहे ना. मग श्रावण संपला की गणेश भगवान येतील पृथ्वीवर. त्यानंतर पृथ्वीवर नवदुर्गा येतील. त्यानंतर लक्ष्मी व त्यानंतर कार्तीक व मग विष्णू. विष्णू तिथं मिळणारच नाहीत तुम्हाला."
         "मग कोण मिळेल? अन् हे सर्व कुठं लिहिलं आहे?"
         "पुराणात. पुराणात लिहिलं आहे हे सर्व. म्हटलं आहे की विष्णू पृथ्वीवर आठ महिने निवास करतात आणि चार महिने बाकीचे सर्व देव. तेच या पृथ्वीतलावर सृष्टीचक्र चालवतात. ते या चार महिन्यात पृथ्वीवर नसतात. तेव्हा येथील कारभार प्रत्यक्ष महादेव चालवतात."
          "हे सर्व बरोबर आहे. परंतु महाराष्ट्रात क्रिष्ण जन्माष्टमीचा काळ हा भाद्रपद सांगीतला आहे व तुमच्या म्हणण्यानुसार भाद्रपदमध्ये विष्णू भगवान पृथ्वीवर नसतात आणि खरं सांगायचं झाल्यास क्रिष्णाला तुमचं पुराणात विष्णूचा अवतार मानतो. मग  विष्णू आता पृथ्वीवर नाहीत. ते पाताळात आहे म्हणणं तुम्हाला तरी संयुक्तिक वाटते काय?"
           "तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु मला ते म्हणणं संयुक्तिक वाटते. आता प्रत्येकाचा विचार करण्याचा प्रकार वेगळा आहे. बरं ते जावू द्या. तुम्ही या फिरुन म्हणजे झालं."
           "ठीक आहे."
           "तुमची यात्रा शुभ होवो."
          "धन्यवाद."
           शंकरनं धन्यवाद म्हटलं. तसा पलीकडील माणसानं फोन बंद केला.
           शंकरनं तिरुपती बालाजीला जायची तयारी केली होती व तो सुरजच्या येण्याची वाट पाहात बसला होता. तसा काही वेळानं सुरज आलाच. कारण त्यालाच शंकरला नेवून द्यायचे होते व तोच त्या शंकरची ओळख बाकी सहलवरील लोकांशी करुन देणार होता. अशातच सुरज म्हणाला, 
          "लवकर चाला. आपल्याला वेळ होतोय."
           सुरजनं तसं म्हणताच शंकर तयार होताच. सुरजनं गाडी सुरु केली व शंकर सुरजच्या गाडीवर बसून तिरुपतीच्या रस्त्याने निघाला. तशी तिरुपती बालाजीला जाणा-या मित्रांना भेटण्याची हुरहूर शंकरच्या मनात लागून होतीच.
           ती पाण्याची टाकी. ते भेटण्याचं ठिकाण. अतिशय रमणीय होतं ते ठिकाण. तिथं साध्या वेषात आलेला राजेश. अतिशय साधा वाटत होता तो. त्यानं शर्ट तर घातला होता. परंतु पायात नाईट पँट वापरला होता. त्यावरुन असं वाटत होतं की तो फिरायला चालला आहे की व्यायाम करायला. एवढ्यातच तिथं विनोद हजर झाला. तो सुरजला म्हणाला, 
         "तू चालत नाही काय?"
         "नाही. मी येत नाही. माझ्या बदल्यात माझे काकाजी येत आहेत."
         "अबे यार, तू येत आहे असं वाटलं. म्हणूनच मी तयारी केली बरं का? नाही तर मी आलोच नसतो. कारण माझी प्रकृती बरी नव्हतीच."
           विनोद बोलून गेला खरा. तसं पाहता त्याचेकडे पाहिल्यावर त्याची प्रकृती बरी वाटतच नव्हती. तसा काही वेळ निघून गेला. काही वेळाचा अवकाश. रत्नेश आला. 
           रत्नेश.......त्याचेकडे पाहिल्यावर तो एक लहानसा व्यक्ती वाटत होता. ज्याच्याच्यानं मच्छरही मरणार नाही असा. सडपातळ बांध्याचा. तो पदार्थ शाखेत नोकरीला होता. त्याचा तिथं जास्तीत जास्त प्रमाणात मानमरातब होता. कारण ती शाखा सरकारी हुद्द्याची होती. 
            रत्नेश बारीक आहे. परंतु मोठा जोर आहे त्याला. कोणीतरी म्हणालं. तसं शंकरला ते समजलं नाही. त्यामुळंच त्यानं विचारलं.
             "याचा अर्थ?"
             "याचा अर्थ असा की त्याची जी बॅग आहे. ती सगळ्यात जड आहे.  "
             शंकरला तेही समजलं नाही. तसा परत तो म्हणाला, 
            "म्हणजे? असं काय असतं त्या बॅगमध्ये?"
            "विचारुच नका." कोणीतरी पुष्टी केली. मात्र शंकरला ते समजलंच नव्हतं व त्याला संपूर्ण बाब समजून घ्यायची होती. त्यानंच समाधान होणार होतं. तसं चिकीत्सक बाबीनं तो म्हणाला,
            "परंतु सांगाल तर. असं काय असतं त्या बॅगमध्ये?"
             "काय असतं ते विचारु नका. काय नसतं ते विचारा."
             "अर्थात?"
             तसे सगळेजण हासले. तसा एकजण म्हणाला, 
             "अहो, आपल्या प्रवासात जेवढे जणं असतील ना. त्या सर्वांपेक्षा जास्त जड या रत्नेशचीच बॅग असते."
             "परंतु मला कळलंच नाही की त्या बॅगमध्ये असं काय असतं ते. मग मी कसं समजू की ती बॅग जड आहे."
             "उचलून पाहा आणि पुष्टी करा."
             शंकरनं ते शब्द ऐकले. तसं जास्तच कुतूहल निर्माण झालं होतं. तशी संधी तो शोधतच होता. रत्नेशनं बॅग ठेवली होती व तो कुठंतरी गेला होता. तशी संधी पाहून त्यानं ती बॅग उचलून पाहिली. खरोखरच ती बॅग जडच होती. ती एवढी जड होती की ती नाकापेक्षा मोती जड झाल्यासारखी वाटत होती. 
            ती जड बॅग. शंकर विचार करीत होता त्या जड बॅगबद्दल. काय असेल हिच्यात की ही बॅग एवढी जड आहे. त्यानं बॅग उचलून पाहिली व ती खाली ठेवली. परंतु ते कुतूहल कायम होतं बॅगबद्दल. त्या बॅगमध्ये काय असेल?
         रत्नेश आला होता. त्यानं बॅग उचलली. वेळ होत आला होता. तसा राजेशनं रिक्षा थांबवला. त्यानं भावटाव केला व तो रत्नेशला म्हणाला,
            "रिक्षा येणार आहे की यालाच ठरवू."
            ते बोलणं रत्नेशनं ऐकलं. तसा रत्नेश म्हणाला, 
           "येणार आहे रिक्षा. मी फोन केला आहे."
           "अरे पण केव्हा येणार आहे? वेळ बराच झाला आहे ना."
            "येत आहे, म्हणत आहे."
            "मग याला पाठवू का?"
            "होय."
            रत्नेशनं होकार देताच राजेशनं थांबविलेला रिक्षा पाठवून दिला व तोही रत्नेशबरोबर रिक्षाची वाट पाहात बसला. परंतु रिक्षा काही आला नव्हता. काही वेळाचा अवकाश. काही वेळानं रिक्षा आला. त्यात शंकरसह सगळे बसून रेल्वे स्थळावर रवाना झाले. ते सर्व मित्रच दिलदार स्वभावाचे होते. वाटल्यास त्यांच्या दिलदारपणाची कल्पना रस्त्यातच आली. असे दोन प्रसंग घडले.
          तो रेल्वे स्टेशनचा रस्ता. रस्त्यावर त्यांचा रिक्षा थांबला व त्या रिक्षातील काही मित्रांनी काही वस्तू विकत घेतल्या. तोच एक भिकारी त्या रिक्षाजवळ आला व त्यानं आपला हात पसरला. त्याची फक्त एक दोन रुपयाचीच अपेक्षा होती. परंतु त्या रिक्षातील राजेशनं त्या भिका-याला एक दोन रुपये देण्याऐवजी अख्खं पाकीटच त्याला दान म्हणून दिलं. ज्या पाकीटाची प्रवासात जास्त गरज होती. तसाच दुसरा प्रसंग घडला. दुसरा प्रसंग होता. एक व्यक्ती रेल्वेस्टेशनवर असतांना असाच भिक्षा मागायला आला. तेव्हा त्यानं भिक्षा मागतांना म्हटलं,
          "मला फार भूक लागली आहे. जरा खाण्यासाठी पैसे द्या."
           त्यानं तसं म्हणताच विनोद नावाच्या एका मित्रानं खिशातील वीस रुपये त्याला काढून दिले. ते शंकरला रुचले नाही. कारण त्यानं यापुर्वी एक अनुभव घेतला होता. काही भिकारी लोकं पैसे तर मागत होते. परंतु ते पैसे खाण्यासाठी वापरत नसत. तर ते पैसे तेच भिकारी दारु पिण्यासाठी वापरत असत. त्यातच शंकर म्हणाला, 
           "नाही आहेत पैसे. काम करीत जा. काम करायला काय जातं? चांगला हट्टा कट्टा आहेस ना."
            "काम मिळत नाही बाबूजी."
            त्याचं बरोबर होतं. अलीकडे भिकारी माणसांना कोणीही काम देत नाही आणि भिकारी माणसंही आज आळशी झाली आहेत. तेही जास्त काम करीत नाहीत. तसेच ते जी भिक्षा मागतात. त्यात दारु पितात ही सत्य बाब आहे. परंतु याबाबत न बोललेलं बरं. विनोदनं त्या भिका-याला पैसे दिले. तो त्याचा महाराणा होता. त्याचं म्हणणं होतं की तो देव रुपात आला आहे. असं बोलू नये. 
            म्हणतात की दान रुपात पैसे दिल्यानं आपल्या जवळचा पैसा वाढतो. ते बरोबरच असेल. कारण राजेश व विनोद हे आजमितीस गर्भश्रीमंत होते. तसे बाकीचे नव्हते. शंकर तर तेवढा गर्भश्रीमंत नव्हताच. राजेशनं आणि विनोदनं केलेली कृती ही उल्लेखनीय कृती होती. तसं पाहता बाकीच्यांनी त्यांना पैसे दिले नाहीत. कारण त्यांच्याजवळ तेवढा पैसा नसेलच. 
           ते रेल्वेस्टेशन. गाडी तब्बल एक तास उशीराची होती. गाडी उशीरा चालत होती. तसं एक तास बाकी असल्यानं त्या सर्वांनी त्याचा फायदा घेतला व नंतर वेळ येताच ते रेल्वे थांबण्याच्या जागेवर गेले. तशी रेल्वे आली व ते सर्वजण रेल्वेत बसले. 
          या प्रवासात राजेश, राजू, सचीन, राहूल, शंकर, रत्नेश, राकेश, संदिप, शिवा व विनोद असे दहा जण होते. ते सर्व रेल्वेस्थानकावर एकत्र आले होते. या प्रवासाचा मोरक्या होता राजेश. तो अतिशय सौम्य व सुंदर स्वभावाचा होता. त्याला राग येत नसेल असं वाटत होतं. तसे प्रवासात काही असेही प्रसंग घडले होते. परंतु राजेशला राग आला नव्हता. 
           राजेश केवळ सौम्य स्वभावाचाच नव्हता तर तो एक मदत करणारा गृहस्थ होता. त्यानं कितीतरी लोकांना मदत केली होती आणि कितीतरी लोकांचे भविष्य बनवून दिले होते. त्याला पाच भाऊ होते व त्या पाचही भावांचं भविष्य स्थिर करुन दिलं होतं राजेशनं. प्रवासात फक्त त्याचाच हुकूम चालत होता. कोणीतरी म्हणालं होतं की या राजेशनं जवळपास शंभर लोकांना तिरुपतीला नेलंय आणि खुद्द राजेश सांगत होता की त्यानं जवळपास दिडशे लोकांना तिरुपतीला नेलं. तसं पाहता तो राजेश दिलदार आणि मदत करणाराच दिसत होता. 
           ती रेल्वे. त्या रेल्वेत रिझर्वेशन एकाच डब्यात मिळालं नव्हतं. तसे वेगवेगळे डबे होते. तसं पाहता बाकीची मंडळी जुनी असल्यानं ती एकाच डब्यात होती व राहूल आणि शंकर नवीन असल्यानं ते वेगळ्या डब्यात बसले होते. संदीपनं म्हटलं होतं की त्याच डब्यात बसा. टिसी आल्यावर त्यानं तपासणी केल्यानंतर तुम्ही परत या. 
           शंकर व राहूल नवीन होता. तसं पाहता शिवा व राकेशही नवीन होता. परंतु राकेश व शिवा काही कामानिमित्त त्या एकाच डब्यात बसले होते. त्या सर्वांना एक खाजगी काम होतं.
             शंकर हा एका शाळेत शिक्षक होता. त्याला काही काही गोष्टी पटत नव्हत्या. त्याला प्रवास करायला आवडायचं. तो हवामान बदल म्हणून प्रवासाला जायचा. परंतु जास्त प्रमाणात धार्मीकता बाळगायचा नाही. तसं पाहता तो चिकीत्सक बुद्धिमत्तेचा होता. एकदा त्याच्या शाळेत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवला होता. तो उपक्रम त्याला चांगला वाटला नाही.
            सरकारनं मेरी माटी मेरा देश या अंतर्गत उपक्रम राबवले. त्यात वसुधानंदन, पंचप्राण प्रतिज्ञा, सैनिकांना वंदन करणे, वेषभुषा, प्रश्नमंजूषा, तसेच निबंध व रांगोळी या सर्व स्पर्धा घेतल्या होत्या. यात दोन उपक्रम जर सोडले तर बाकी उपक्रम शंकरला छान वाटले. आता दोन उपक्रम कोणते? असा प्रश्न वाचकांच्या मनात उद्भवला असेलच.  पहिला उपक्रम होता वसुधानंदन व दुसरा उपक्रम होता पंचप्राण प्रतिज्ञा. आता या नावावरुन आपल्याला कळणारच नाही.
           वसुधानंदन याचा अर्थ झाडं लावणे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ओली माती गोळा करणे. त्या मातीत एक रोपटं लावणे अनिवार्य. तसंच ते रोपटं जमीनीत पुरणेही अनिवार्य. वाटल्यास ते रोपटं हातात घेवून आम्ही मातीमध्ये झाडाचं रोपटं लावलं असा युक्तीवाद दाखवणे. हा सरकारचा उपक्रम होता. उद्देश होता इतर भागातील माती गोळा करुन दिल्लीतील या रोपटे लावण्याच्या जागी टाकणे, यालाच मेरी माटी मेरा देश हे नाव दिलं गेलं होतं. हा उपक्रम प्रत्येक शाळेतील वर्गखोल्यातून राबविण्यात आला. उपक्रम चांगला असल्यानं प्रत्येकांनी यात भाग घेतला व मोठ्या प्रमाणावर आपले फोटो काढून दिमाखानं ते व्हायरलही केले. यात सांगायचं म्हणजे काहींनी वास्तवीक स्वरुपात उपक्रम केला. परंतु त्यांना फोटो काढण्याची गरज उरली नाही. अशा शिक्षकांना प्रामाणिकच म्हणता येईल. त्यांना दाखविण्याची गरज नव्हती आणि दाखवूही नये. परंतु दाखवायला सरकारनं यासाठी सांगीतलं होतं की काहीजणं उपक्रम करतच नाही ही वास्तविकता आहे. 
          मुळात यामध्ये हेच सांगायचं आहे की हे व्हिडीओ जर बारकाईने पाहिले आणि त्याचं निरीक्षण केलं तर असं आढळून येते की काही शाळेतील शिक्षकांनी उपक्रम तर घ्यायचाच. परंतु झाडं कुठून आणायची? वेळेवर झाडं आणता येत नाही. असं गृहीत धरुन फक्त उपक्रम राबविण्यासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर केला व मातीत त्या फांद्या रोवल्या. त्या रोवलेल्या फांद्या आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात देवून त्या विद्यार्थ्यासह आपला फोटो काढला व तो फोटो व्हायरल करुन आम्ही उपक्रम राबवला हे सिद्ध केलं व शेकडो झाडांच्या फांद्यांची कत्तल करुन टाकली. 
          वसुधानंदन उपक्रम. एक चांगला उपक्रम. परंतु तो उपक्रम अशा प्रकारे राबविण्यानं शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कोणता बोध दिला. झाडं आपले मित्र असून वेळप्रसंगी त्याच्या फांद्या तोडून उपक्रम राबविणे व झाडाची कत्तल करायची. हा बोध द्यायचा की झाडं लावण्यासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर करायचा की झाडं पर्यावरणाचे रक्षक असल्यानं ओरीजनल झाडं लावायची. हा उपक्रम चांगला. परंतु ज्या वर्गखोल्यातून शिक्षक शिकवतो की झाडाला जीव असतो. त्याच्या फांद्या तोडल्यास त्याला इजा होते आणि उपक्रम राबवितांना जेव्हा एखादा शिक्षक त्याच झाडाच्या फांद्या तोडून जर उपक्रम राबवीत असेल तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने कोणता बोध द्यावा? त्यामुळंच असे उपक्रम न राबविलेले बरे असे शंकरला वाटत होते. 
          उपक्रम राबवितांना दुसरा उपक्रम होता पंचप्राण. मातीचे दिवे बनवायचे व त्यातील एक दिवा हातात घ्यायचा आणि प्रतिज्ञा घ्यायची. या उपक्रमात दिवा जाळणे गरजेचे नव्हते. तरीही हा उपक्रम राबवितांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातात दिवे दिले व एक हात पुढे करुन त्या जळत्या दिव्यासोबत प्रतिज्ञा म्हणायला लावली. ती प्रतिज्ञा होती. भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर बनविणे. गुलामीची मानसिकता दूर करणे. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणे. भारताची एकात्मता बलशाली करणे. देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगणे. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करणे. 
         हाही उपक्रम चांगलाच होता. परंतु बिनधास्तपणे विद्यार्थ्यांना ही प्रतिज्ञा घेताच आली नाही. ते विद्यार्थी भीतभीतच प्रतिज्ञा घेत असल्याचं दिसलं. ती भीती होती, कदाचीत दिवा माझ्या हातावर पडणार तर नाही. तीच भीती होती विद्यार्थी मनात. दिवा पडणार तर नाही आमच्या अंगावर. अतिशय जीव घेणी प्रतिज्ञा होती ती. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी प्रतिज्ञा. जणू जीवघेणा खेळच. त्यातच समजा एखाद्या विद्यार्थ्यांच्या हातून एखादा दिवा नजरचुकीनं विद्यार्थ्यांच्या अंगावर पडलाच तर विपरीत व्हायचं. याबाबतीत एक प्रसंग शंकरवर बेतला होता गत काही वर्षापुर्वी. तसं पाहता कोणतेही प्रसंग सांगून येत नाहीत वा संकट कधीही सांगून येत नाही. 
          शंकर सुरुवातीला एका शाळेत शिकवीत होता. त्या शाळेत दर शुक्रवारी सरस्वती पुजन व्हायचं. आरती व्हायची व आरतीनंतर प्रसाद वितरण. मुलं लहान होती. त्यांनाही आनंदच वाटायचा. परंतु त्यातच ती लहान असल्यानं तेवढीच वात्रटही होती. परंतु एक दिवस दुर्घटना होता होता राहिली. आरती सुरु असतांना एका विद्यार्थ्यानं त्या आरतीच्या ताटाला खालून हात मारला. त्यातच आरतीचं ताट खाली पडलं आणि पडतांना त्या ताटातील दिव्याचं तेल आरती करणा-या मुलीच्या अंगावर. त्यानंतर तिचे कपडे तेलानं भरले होते. बरं झालं की प्रसंग केवळ तेलानं कपडे भिजण्यावरच निभावला. जर त्या दिव्यातून तेलाची जळती वात त्या विद्यार्थीनीच्या कपड्यावर पडली असती तर अनर्थ झाला असता. असा अनर्थ. म्हणूनच शंकरला वाटत होतं की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. ते काही विद्यार्थ्यांचे शत्रू नसतात. तसंच आजच्या काळात खेळीमेळीचं वातावरण त्यांना द्यावं लागतं. अशा वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षक पाहू शकत नाहीत. जिथं आपण आपल्या घरच्या दोन मुलांवर पुरेपूर लक्ष पुरवू शकत नाही. तिथं एका वर्गात दोनपेक्षा जास्त मुलं असतात. संपुर्ण मुलांकडे एक शिक्षक कसा लक्ष देईल? ती तसं पाहता तारेवरची कसरतच असते. अशावेळेस हानी होवू शकते. हे नाकारता येत नाही. निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, रांगोळी स्पर्धा चांगल्या स्पर्धा आहेत. त्याला उपक्रमाची जोड दिली. ती एक चांगली गोष्ट आहे. परंतु अशा उपक्रमात वसुधानंदन व पंचप्राण असे उपक्रम नसावेत की जे उपक्रम विद्यार्थी वर्गासाठी जीवघेण्या स्वरुपाचे ठरु शकतील. जे शिक्षकांनाही बाधक व मारक ठरु शकतील. शिक्षकांना काय, त्यांना शासनाचा धाक असतो. म्हणूनच ते असे उपक्रम राबवणारच. कारण ते शासनाचे नोकर आहेत. परंतु त्यांच्याही अस्मीतेचा विचार करुन शिक्षकांना गुलामीचे बंधन टाकू नये. ज्या पंचप्राण प्रतिज्ञेतच गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्याचा उल्लेख आहे. तसेच २०४७ पर्यंत भारतास आत्मनिर्भर व विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न आहे. पर्यायानं सांगायचं म्हणजे शिक्षकांनाही सन्मान असावा. त्याच्यावर ते सरकारी नोकर असल्यानं कोणतेही बंधन टाकू नये. कारण शिक्षक असा घटक आहे की तोच भारताला बलशाली बनवू शकतो व तेवढाच आत्मनिर्भरही. म्हणूनच शंकर म्हणत असे की शिक्षक वाचेल तर देशच नाहीतर जगंही वाचेल यात शंका नाही.
          ती रेल्वेगाडी हळूहळू चालायला लागली होती. काही वेळातच तिनं वेग पकडला. तसं पाहता शंकरला वाटत होतं की ती गाडी थांबत थांबत जाईल. परंतु तसं काहीच घडलं नाही.  ती गाडी अशी वेगानं चालली की ती कुठेच थांबली नाही.
            शंकर बाहेर पाहात होता. त्याला झाडंच पळतांना वाटत होती. काही नद्या दुथडी भरुन वाहतांना दिसल्या. काही ठिकाणी जलाशय दिसले. तर काही ठिकाणी बागा. काही ठिकाणी पर्वराजीही. तसा तो बाहेर पाहात असतांना एक व्यक्ती म्हणाला, 
           "भाऊ, तुमची सीट कोणती आहे?"
           "तुम्ही बसला आहात तीच माझी सीट आहे."
           "तुम्ही असं कराल काय."
           "काय, बोला."
           "पलीकडे आमची सीट आहे. तिथं बसाल काय."
            ते त्या व्यक्तीचं बोलणं. ते बोलणं राहूल व शंकर ऐकत होता. तसा शंकर गप्प होता. तोच राहूल बोलला. 
            "आमच्या चार सीटा आहेत. आम्ही निर्णय घेवू शकत नाही. आमचे सोबती आहेत तिकडं. तेच सांगतील याबद्दल." 
             राहूल बोलून गेला. परंतु शंकर अजूनही मौनच बाळगून होता. तसा तो दयाळू होता. त्यानं त्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव पाहिले. त्याला लहानसं कमीतकमी सहा महिण्याचं लेकरु होतं. पत्नीही सोबत होती. बहुतेक ते मध्यप्रदेशातील होते. तेही तिरुपती बालाजीला जात होते. तसे ते भाव पाहून शंकर म्हणाला, 
           "ठीक आहे. पाहून घेवू."
            शंकरनं होकार तर दिला. परंतु त्याच्यासोबत एकदा घडलेला प्रसंग त्याला आठवत होता. शंकरचा नवनवीन विवाह झाला होता आणि पत्नीला घेवून तो शिर्डीला निघाला होता. रिझर्वेशन केलं होतं. परंतु तो त्याचा त्यानं केलेला पहिलाच प्रवास होता रिझर्वेशन डब्यातील. रिझर्वेशन डब्यात प्रवास कसा करावा? याची कल्पनाच नव्हती त्याला. तसा तो आपल्या बर्थवर बसला नव्हता तर तो हवा खाण्यासाठी व बाहेरचं सौंदर्य पाहण्यासाठी खिडकीजवळ व दुस-याच्याच सीटवर बसला होता. त्यातच एक नवीन जोडपं तिथं आलं. त्यांचं रिझर्वेशन नव्हतं. परंतु तिकीट होती. त्यांनी काही वेळ गोष्टी केल्या व नंतर जेवनखावण केलं व त्यानंतर ते शंकरच्या सीटवरच झोपी गेले. त्यानंतर शंकरनंही जेवन केलं व गाडीतूनच रात्रीच्या अंधाराची मजा घेत घेत ते पती पत्नी दोघंही बसले. अशातच काही वेळाचा अवकाश. काही वेळानं दोन गृहस्थ आले व त्यांनी शंकर ज्या जागेवर बसला होता. त्या सीटवर आपला हक्क सांगून ती सीट खाली करवली. त्यानंतर शंकर त्या नवीन जोडप्यांना उठवायला लागला. परंतु जे झोपेत असतील, ते उठतील. जे झोपेचे सोंग घेवून असतील, ते कसे उठतील! इथंही तसंच झालं. त्या गृहस्थानं आपल्या पत्नीलाही सांगीतलं असेल की उठायचं नाही. त्यामुळंच की काय, ते दोघंही जण उठले नाही. शेवटी दयाळू स्वभावाच्या शंकरनं आपलं सामान गुंडाळलं व त्यानं सीट सोडून तो गाडीच्या दरवाज्याजवळ येवून बसला. स्वतःच्या बर्थचं रिझर्वेशन असूनदेखील. 
           हीच भीती होती शंकरला की आपली सीट यावेळेसही तर जाणार नाही. 
           शंकर मनातल्या मनात विचार करीत होता. तोच राहूल म्हणाला, 
          "आपल्याला इथं करमत नाही. आपण पलीकडे जावू. मित्र आहेत तिथं. तिथंच करमेल आपल्याला."
             तसं पाहता तिथं ते दोघंच बसल्यानं करमत नव्हतंच. तोच शंकर व राहूल आपल्या मित्राच्याच कम्फार्टमेंटमध्ये परत आले. आता त्याला चांगलं करमतही होतं व चांगलं मनोरंजन देखील होत होतं.
           रात्र झाली. तसं सर्वांनी आपापलं जेवन केलं. सर्वांनी आपले आपले जेवनाचे डबे उघडले. तसं पाहता तो काळ असा होता की टमाटर महाग असूनही एकानं त्याची चटणी बनवून आणली होती. तर दुस-यानं पनीरची भुरजी आणली होती. बाकीच्यांनी वेगवेगळे जिनस आणले होते. ते सर्व पदार्थ एकाच ठिकाणी ठेवण्यात आले व त्यावर खमंग ताव मारण्यात आला.  
           जेवन झालं होतं. जेवन झाल्यानंतर संदीप म्हणाला, 
            "तुम्ही तिकडं जावून झोपा. नाहीतर कोणी झोपलं तर मग आपल्याला विचार येईल. प्रवास लांबचा आहे."
           तरीही शंकर म्हणाला, 
           "सीटा तर भरपूर खाली आहेत."
            "त्या सीटा विजयवाड्याला भरतील." संदीप बोलला. तसा शंकर आपली बर्थ शोधून तिथं झोपायला गेला. 
            संदीपचं बरोबरच होतं. कारण जसं विजयवाडा आलं. तशी ती रेल्वे भरली. आता रेल्वेतील एकही सीट खाली नव्हती. 
           विजयवाडा आलं होतं. शंकर झोपलाच होता. तोच एका व्यक्तीनं त्याला उठवलं. म्हटलं,
            "ओ महाशय, उठा. ही आमची सीट आहे."
             शंकर उठला. तसं त्यानं विचारलं, 
            "किती नंबर आहे तुमचा?
            "चौदा."
            "ही पंधरा क्रमांकाची सीट आहे."
            "नाही. ह्याच सीटचा चौदा क्रमांक आहे."
            "बरोबर तपासून पाहा."
            "तपासलं. हाच चौदा नंबर."
            "बरं. पंधरा नंबर कुठं आहे?"
           "पंधरा इथं आहे."
            तो बसला होता. त्या जागेवर अंगुलीनिर्देश करुन तो म्हणाला.
            "ठीक आहे. खाली करा ती बर्थ. मी जातो तिथं."
             तो विचार करु लागला. थोड्याच वेळाचा अवकाश. तोच तो म्हणाला, 
             "झोपा तिथंच."
             तो वेडा वाटत होता शंकरला. परंतु तो वेडा नव्हता. तो त्यांच्या परीवाराला झोपविण्यासाठी बनवबुद्धू करीत होता शंकरला. त्याला वाटत होतं की मी असे म्हणेल तर त्याला कदाचीत सीट मिळेल परीवाराला झोपवायला. परंतु त्याचा प्रयत्न फसला. कारण शंकरनं पंधरा नंबर असलेली सीट त्यालाच शोधून मागीतली होती. तसं पाहता शंकर ज्या सीटवर बसला होता. ती सीट पंधराच नंबरची होती. 
          तो व्यक्ती नंतर स्वगत बोलून गेला की ही सीट पंधराच नंबरची आहे. चौदा क्रमांक खालीच आहे. 
           शंकर पुन्हा झोपी गेला. तो थेट दुस-या दिवशीच उठला. जेव्हा त्यानं कुजबुज ऐकली की तिरुपती बालाजी आलं. 
           सकाळ झाली होती. सकाळचे सात वाजले होते. तशी शंकरनं मोबाईलवर घड्याळ पाहिली आणि तो उठला. 
          स्टेशन जवळ आलं होतं. शंकर व त्याच्या मित्रांना उतरण्याची घाई झाली होती. परंतु गाडीला सिग्नल मिळत नव्हता. म्हणूनच की काय, गाडी थांबा घेत घेत चालत होती. तसं एकदाचं स्टेशन आलं व ते सर्व मित्रमंडळ त्या तिरुपतीच्या स्थानावर उतरले.
            ते तिरुपतीचं स्थान. त्या स्थानावर उतरताच सगळेजण विष्णू नामक धर्मशाळेत गेले. तिथं आधीच मथुरेवरुन एक जोडपं येवून विराजमान झालं होतं. तसं राजेशनं सांगीतलं. 'हे आपले मायबाप. हे मथुरेला राहतात. मागील वेळेस हे तिरुपतीला आले होते. हे बरेच फिरले. परंतु यांना लोकांनी बरोबर मार्गदर्शन केलं नाही. त्यामुळंच शेवटी थकून ते परत फिरले. ते आम्हाला आमच्या परतीच्या प्रवासात गाडीत भेटले. आम्ही जेव्हा विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगीतलं की आम्ही खुप  फिरलो. परंतु आम्हाला लोकांनी बरोबर सांगीतलं नसल्यानं आम्ही दर्शन न करताच परत फिरलो. त्यावर आम्ही ठरवलं. ठरवलं की आपण पुढल्या प्रवासात यांना दर्शन करुन देवू तिरुपतीचं. तसं आश्वासनच दिलं होतं यांना आम्ही. आम्ही तसा यांच्याशी संपर्क सुरु ठेवला व आता जसे तिरुपतीला आलो. तसं यांनाही बोलावलं. आता आपलं एकच काम. आपण यांना सोबत घेवून जावू व आपल्याबरोबर यांचंही दर्शन घडवून आणू.'
            राजेशनं म्हटलेले शब्द. तसं पाहता राजेश हा सर्वांचा पालकच होता. म्हणूनच की काय, त्याच्या शब्दाला कोणीच नकार देवू शकत नव्हता. तसा सर्वांनी होकार दिला व सर्वजण त्यांना घेवून तिरुमलाला निघाले. जे ठिकाण तिरुपतीवरुन जवळपास पंचवीस किमी अंतरावर होतं. जिथं तिरुपती बालाजी विराजमान होता. 
          शंकरला एक कोडं पडलं होतं की या बालाजीला तिरुपती बालाजी का म्हणत असावे. तो तर तिरुमलाला आहे. मग त्याला तिरुमला बालाजी का म्हणत नाही. त्याला पडलेला प्रश्न. तसा तो इतरांना त्याबद्दल विचारु लागला. परंतु ते कारण कोणालाच माहीत नव्हतं की काय? कोणीच त्याचं उत्तर देत नव्हतं.  तसा तो गुगलवर शोधतही होता. परंतु त्याला त्याबद्दल कोणतीच माहिती सापडत नव्हती. तद्नंतर त्यानं त्या गोष्टीचा नादच सोडून दिला. 
           बालाजी....... हा हिंदू देव विष्णूचा अवतार मानला जातो. बालाजीचे मुख्य स्थान तिरुमला येथे आहे. वराहपुराणात भगवान वेंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांची कथा आहे.  बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची दोन मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधीक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन  धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो.  मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुरीतील आहे.
         तिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला श्री   मलय म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. एका लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान २००० वर्षे जुणे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथील पहिली वेदी बांधली. तमिळ संगम साहित्यात इसपूर्व ५०० ते इस २०० मध्ये या स्थानाचा उल्लेख आहे. चोळ व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळ राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय  राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनीही मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर  म्हैसूर  व गदवल  संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या.  ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथील हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरु होती. प्रशासकास विचरणकर्ता असेही म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमला. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानमचे विश्वस्त पाहतात.
          तिरुमला रांगा मध्ये एकूण सात डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने वीस किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु अकरा किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास पन्नास हजार दर्शनार्थी असतात.
         तिरुपतीत श्री पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुचानूर अलमेलुमंगपुरम तिरुपती शहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे. असे म्हणतात की या मंदिराचे दर्शन केल्याशिवाय तिरुपतीचे दर्शन पुर्ण होत नाही. हे मंदिर भगवान वेंकटेश्वराची पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान वेंकटेश्वर, विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचा अंशअवतार मानला जातो. पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत. त्यानंतर वकुला देवी मंदिर, मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून, तिच्या नावाचे एक मंदिर सुमारे तिनशे वर्षांपूर्वी  पेरूरुबांडा टेकडीवर बांधले गेले आहे, पेरूर हे गाव तिरुमला टेकड्यांपासून सत्तावीस किलोमीटर आणि तिरुपतीपासून दहा किमी अंतरावर वकुला देवीचे मंदिर आहे, वकुला देवी भगवान वेंकटेश्वराची पालक आई आहेत. तिरुमलातील एका पौराणिक कथेनुसार द्वापर युगात्, भगवान श्रीकृष्णाची पालक आई यशोदा होती, श्रीकृष्णाचा जेव्हा विवाह झाला. तेव्हा त्या विवाहात त्यांनी आपली पालक आई यशोदेला बोलवलं नव्हतं. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी वचन दिले की, कलियुगात मी श्रीनिवास म्हणून अवतार घेईन, तेव्हा मी तुला शेषाद्री येथे भेटणार आहे. तुला वकुलादेवी म्हणून ओळखले जाईल आणि तेथे श्री वराहस्वामींची पूजा करावी लागेल. त्या अवतारात तुझी इच्छा पूर्ण होईल. मग तू माझ्या आणि पद्मावतीच्या विवाहास उपस्थीत राहशील. हा विवाह कल्याण विवाह म्हणून प्रसिद्ध होईल.  
           इथे वरदराज मंदिर सुद्धा आहे. वरदराज स्वामी विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुमाला वेंकटेश्वर मंदिरातील वरदराजा मंदिर आहे. मंदिर प्रवेश करताना मंदिर वेंदिवाकिलीच्या (चांदीच्या प्रवेशद्वाराच्या) डावीकडे, विमानप्रदक्षिणामध्ये आहे. स्वामी पश्चिमेला तोंड देऊन बसलेले आहेत. योग नरसिंह मंदिर, हे एक उप-मंदिर आहे, सिंह विष्णूचा चौथा अवतार आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर ईसवी १३३० ते १३६० दरम्यान बांधले गेले आहे आणि मंदिरात प्रवेश करताना वेंदिवाकिली (चांदीच्या प्रवेशद्वारा)च्या उजवीकडे, विमानप्रदक्षिणम येथे आहे. देवता पश्चिम दिशेने बसून-ध्यान ध्यानात आहे.
             तिरुमला ही एक पर्वतरांग आहे. हा शेषाचलम पर्वतरांगेचा एक भाग आहे. जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक स्थान या स्थळाला मानले जाते. वैष्णव परंपरेनुसार हे मंदिर १०८ दिव्य देशम मधील एक आहे.
            आंध्र प्रदेशातील तिरुपतीपासून २२ किमी अंतरावर असलेल्या तिरुमला टेकड्यांवर भगवान वेंकटेश्वर बालाजीचे एक विशाल मंदिर आहे. दक्षिण भारतातील तिरुमला येथील तिरुपती  बालाजीचे  मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुपती बालाजी हे मुख्य मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर  जिल्ह्यात तिरुपतीच्या शेषाचलम डोंगरावर वेंकटाद्रीच्या सातव्या शिखरावर आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. हे मंदीर समुद्रसपाटीपासून ३२०० फूट उंचीवर असलेले तिरुमला टेकड्यांवर बांधलेले श्री वेंकटेश्वर मंदिर सर्वात मोठे आकर्षण आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय द्राविडी शैली वास्तुकलेचे आणि कलाकुसरचे अप्रतिम उदाहरण आहे. तिरुपती शहर हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राजधानी हैदराबादपासून ७४० किंमी अंतरावर आहे. येथून ३६ किमी अंतरावर श्री कालाहस्ती नावाचे दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. तिरुपती शब्दाचा अर्थ तिरु म्हणजे श्री (Shri). श्रीपती म्हणजे तिरुपती (विष्णू). शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे  मंदिर आहे.  या डोंगरास तिरुमला असे म्हणतात.  तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. हे ठिकाण रेल्वे व महामार्गाने चेन्नई  व बंगळूर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे.
          भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. असे मानले जाते की भगवान विष्णू काही काळ स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर राहिले. हा तलाव तिरुमलाजवळ आहे. तिरुमला तिरुपतीच्या सभोवतालच्या टेकड्यांना आदिशेषनागाच्या सात फण्यासदृश डोंगर आहेत. त्यांना 'सप्तगिरी' म्हणतात. वेंकटेश्वराचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर आहे, वेंकटाद्री नावानेही ही टेकडी प्रसिद्ध आहे. हे संगम साहित्य हे तमिळ भाषेच्या प्रारंभीच्या साहित्यांपैकी एक आहे. त्यात तिरुपतीला तिरुवेंकटतन असे म्हटले आहे. श्री स्वामी पुष्करणी मंदिर हे पवित्र जलकुंडाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे मंदिर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात द्राविडी पद्धतीने बांधलेले आहे. तिरुमला पर्वतरांगा ह्या शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहे. ह्या पर्वतरांगा समुद्रसपाटीपासून ८५३ मीटर उंचावर आहेत. ह्या पर्वतरांगेची सात शिखरे ही आदिशेषाची सातिशीरे आहेत असे लोक म्हणतात. शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री व वेंकटाद्री अशी ह्या सात शिखरांची नावे आहेत. हे देऊळ वेंकटाद्री ह्या शिखरावर आहे. म्हणूनच ह्या देवळाला ‘सातव्या शिखरावरचे मंदिर असे म्हटले जाते. इथं एक गरुड टेकडी आहे. या टेकडीवर नैसर्गिक दगडापासून ही मूर्ती घडली असं म्हटलं जातं. शास्त्रे-पुराणे, स्थळे, माहात्म्ये, स्तोत्रे, कहाण्या, लक्ष्मीकृपा यांत सर्वच ठिकाणी बालाजी देवाचा उल्लेख आहे. दुसऱ्या निरीक्षणानुसार मानलं जातं की अकराव्या शतकात श्री रामानुज तिरुपतीच्या या सातव्या टेकडीवर चढले. ते  श्रीनिवासांच्यासमोर हजर झाले. तेव्हा त्यांनी रामानुजांना आशिर्वाद दिला. कारण श्रीनिवास हे वेंकटेश्वराचेच रुप होते. असे मानले जाते की परमेश्वराचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते वयाची १२० वर्षे जगले. तसंच असं मानलं जातं की वैकुंठ एकादशीनिमित्त लोक येथे भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येतात. तिथे आल्यानंतर त्यांचे सर्व पाप धुऊन जातात. येथे आलेल्याला जन्म-मृत्यूच्या बंधनांतून मुक्ती मिळते. वेंकटेश्वराची मूर्ती काळ्या दगडाची (शाळिग्रामची) असून चतुर्भुज (चार हाताच्या) विष्णूचे रूप आहे. खालचा उजवा हात वरमुद्रेत तर डावा हात कमरेवर आहे. तो गोल पद्मासनावर उभा आहे. लक्ष्मीदेवी (श्रीदेवी) डाव्या बाजूला तर पद्मावतीदेवी (भूदेवी) उजव्या बाजूला उभी असते. मूर्तीला पूर्ण विधिवत स्नान (अभिषेक) करून नंतर सफेद लाल रंगाचे रामानंदी तिलक वा ऊर्ध्व पुंड्र लावतात.  वेंकटेश्वराच्या मूर्तीच्या हनुवटीला चंदनाचा वा शुद्ध कापराचा लेप लावतात. साडी धोती नेसवतात. मूल्यवान हिऱ्याच्या किरीट मुकुटासह सर्व दागिने व कानात रत्नजडित सोन्याचे दागिने घालतात. छातीवर भूदेवीची व आणि श्रीदेवीची सोन्याची प्रतीमा असते. वरचे दोन हात खांद्यावर आहेत, ते सुदर्शन चक्र आणि पांचजन्य शंख ठेवण्यासाठी कोरलेले आहेत. व्यंकटेश्वराला विविध रंगांचे पुष्पहार तसेच तुळशीहार घातले जातात, पद्मावतीदेवीच्या मूर्तीला दुधाचा व चंदनाचा अभिषेक करुन नंतर मौल्यवान हिऱ्याचा किरीट मुकुट, सुवर्णरत्नांचे दागिने, साडी, विविध रंगांची पुष्पे वङङ पद्महार घालतात. वेंकटेश्वराच्यामूर्तीच्या  छातीवर उजव्या बाजूला त्रिकोणी आकाराचे चिन्ह असते. ते भृगु ऋषींचे पादचिन्ह आहे. वेंकटेश्वर स्वामीच्या म्हणजेच बालाजीच्या मूर्तीचा जो पाठीमागचा भाग आहे, तो नेहमी पाण्याने ओला असतो. ह्या मूर्तीकडे लक्ष देऊन कान लावून ऐकल्यास मूर्तीमधून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो, असे सांगितले जाते. मंदिराच्या दाराजवळील उजव्या बाजूला एक छडी ठेवलेली असते. असे म्हणतात की ह्या छडीचा उपयोग देवांच्या बालरुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीवर जखम झाली होती. तेव्हापासून त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावायची सुरवात झाली. गर्भगृहात बघितले की ही मूर्ती गर्भगृहाच्या मध्यभागी आहे. पण बाहेरुन बघितल्यास देवांची मूर्ती ही उजव्या बाजूला स्थानापन्न असल्याचे दिसते. देवांच्या मूर्तीला वाहिलेली सर्व फुले व तुळशीची पाने प्रसाद म्हणून भक्तांना न देता मागील बाजूस असलेल्या विहिरीत टाकून दिली जातात. दर गुरुवारी देवांच्या मूर्तीवर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो. जेव्हा हा लेप काढतात तेव्हा मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली दिसून येतात. 
           स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती. म्हणतात की एकदा सरस्वती नदीकाठी सर्व ऋषी एकत्र आले. त्यांनी चर्चा केली की ब्रम्हा, विष्णू व महेश यापैकी श्रेष्ठ कोण असावेत. परंतु ठरवायचं कसं? परीक्षा तर घ्यावीच लागेल. परंतु घेणार कोण? तोच भृगू ऋषी उभे झाले व त्यांनी ते आव्हान स्विकारलं.
          भृगू ऋषी साक्षात ब्रम्हाचे पुत्र होते. त्यांचा विवाह खुद्द दक्षाची मुलगी ख्यातीशी झाला होता. ती तर दानव व देवाच्या युद्धात मृत झालेल्या दानवांना जीवंत करीत असे. ते पाहून श्रीहरी विष्णूने तिचं मस्तकच कापलं होतं. पुढं योगसाधनेनं भृगू ऋषीनं तिला जीवंत तर केलं आणि तशी  नदीपाशी जीवसृष्टीची निर्मीती केली. परंतु त्यांनी त्यापुर्वी श्रीहरीविष्णूंना शाप दिला की तुला धरणीवर वेगवेगळ्या रुपात जन्म घ्यावा लागेल व वेगवेगळ्या रुपात पीडा सहन कराव्या लागतील. 
         आव्हानांनंतर भृगू शंकराकडे गेले. परंतु तिथं त्याला रुद्रगणांनी अडवलं. त्यांचा अपमान केला व त्यांना हाकलून दिलं. त्यावेळेस त्यांनी शाप दिला की भगवान शंकराची लिंग रुपात पुजा होईल व अर्धनारी रुपात घ्यावं लागेल. त्यानंतर ते परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हाकडे गेले होते. परंतु ब्रम्हानं त्याला आपलाच पुत्र समजून बसायलाही सांगीतलं नाही. त्यामुळंच त्यानं ब्रम्हालाही शाप दिला की पृथ्वीवर त्याला कोणीच महत्व देणार नाही. त्यानंतर ते विष्णूकडे गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की विष्णू शेषावर झोपलेले असून त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही. त्याचं कारण ते झोपलेले नसून झोपण्याचं नाटक करीत आहेत. त्याच गोष्टीचा राग आला भृगूंना. तसा राग होताच. कारण ब्रम्हा व महादेवाचे तो गेला असतांना त्यांच्याकडे भृगूचा अपमानच झाला होता. त्यातच राग अनावर होवून त्यांनी विष्णूच्या छातीवर जोरात लाथ मारली. तसे विष्णू उठले. त्यांनी पाहिलं की आपल्या पुढ्यात प्रत्यक्ष भृगू ऋषी आहेत. त्यानंतर त्यांनी भृगूंना पाहताच ते म्हणाले, 
          "तुमच्या पायाला जास्त लागलं तर नाही."
           भृगू आश्चर्यात पडले. त्यांना वाटलं की मी एवढं मारुन देखील हे विष्णू माझ्याशी एवढे नम्र कसे काय वागत आहेत. परंतु तरीही त्यांनी मौनव्रत धारण केलं. त्यानंतर विष्णूनं त्यांचा आदरसत्कार केला. ते कृत्य विष्णूनं केलं. कारण त्यानंतर भृगू ऋषीच्या पायाला असलेला तिसरा डोळा त्याच्या विष्णूला पायानं मारण्याने नष्ट झाला होता. जो डोळा विष्णूला नष्ट करायचा होता.  परंतु ते कृत्य विष्णूची पत्नी लक्ष्मी पाहात होती. तिला भृगूचा रागच आला. तशी ती विष्णूचा म्हणाली, की त्यांनी भृगूला दंडीत करावं. परंतु विष्णूनं ते ऐकलं नाही व त्यांना काही न म्हणता  रवाना केलं. ते पाहून विष्णू व माता लक्ष्मी यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं व लक्ष्मी तेथून निघून गेली. ती पृथ्वीवर आली व पृथ्वीवरच एके ठिकाणी अज्ञात स्वरुपात राहू लागली. त्यानंतर तिचा शोध घेत घेत विष्णूही पृथ्वीवर आले व त्यांनी राहण्यासाठी तिरुमला पर्वताचा आसरा घेतला. तो पर्वत की ज्या ठिकाणी मुंग्यांचं राज्य होतं. या मुंग्यांच्या वारुळात विष्णू राहू लागले. त्यानंतर त्यांना शोधायला महादेव व ब्रम्हा पृथ्वीवर आले. तेही गाय व वासराच्या रुपात राहू लागले.

**********************************************************

          आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. श्री वेंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील संकटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला अशी मान्यता आहे. म्हणूनच ह्या जागेला कलियुगातील वैकुंठ म्हणतात, तर भगवान श्री वेंकटेश्वरांना कलियुगातील प्रत्यक्ष देवता असे संबोधले जाते. ह्याच देवळाला तिरुमला मंदिर किंवा तिरुपती मंदिर किंवा तिरुपती बालाजी मंदिर असेही म्हटले जाते आणि श्री वेंकटेश्वरांना भक्त बालाजी, गोविंदा आणि श्रीनिवास अशीही संबोधने देतात.
            हे देऊळ श्री स्वामी पुष्करणी ह्या पवित्र जलकुंडाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे देऊळ इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात द्राविडी पद्धतीने बांधलेले आहे आणि ह्या देवळातील गर्भगृहाला  आनंदनिलायम  असे म्हणतात. ह्या ठिकाणी दर वर्षी जो ब्रह्मोस्तव साजरा केला जातो, त्यावेळी देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यायला जवळजवळ ५,००,००० लोक येतात.
            द्वापार युगात आदिशेष हे पृथ्वीवर शेषाचलम पर्वताच्या रुपात निवास करुन होते. वायुदेवाशी एका स्पर्धेत पराभव झाल्यामुळे त्यांना पर्वताच्या रुपात पृथ्वीवर राहावे लागले. पुराणात तिरुमला क्षेत्राला आदिवराह क्षेत्र असे म्हटलेले आहे. हिरण्याक्ष नावाच्या असुराचा वध केल्यानंतर आदिवराहांनी ह्या ठिकाणी निवास करण्याचा निर्णय घेतला. 
           भगवान विष्णू पृथ्वीवर आले असता ते श्रीनिवास म्हणून राहू लागले. तसेच ते लक्ष्मीदेवींचा शोध घेता घेता ध्यानस्थ झाले. ज्यावेळेस लक्ष्मी देवींना भगवान विष्णू ह्यांची स्थिती समजली आणि त्यांनी महादेव व ब्रह्मदेव ह्यांची प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी व महादेवांनी गाय व वासराचे रुप धारण केले आणि लक्ष्मीदेवींनी त्यांना तिरुमलाचा राजा चोल यांच्याकडे त्या गायीला व वासराला सुपूर्त केले व चोल राजांनी त्या गाई वासराला एका चरवायाला दिले. तो चरवाहा ती गाय रोज चरायला नेई. तेव्हा ती गाय वारुळात निवास करणा-या श्रीनिवासांना दूध देत असे.
          ती गाय रोज श्रीनिवास रुपातील विष्णूला दूध पाजत असे. त्यासाठी ती त्या वारुळाजवळ उभी राहात असे. तेव्हा तिच्या स्तरातून दूध आपोआपच स्रवत असे. त्यानंतर त्या गाईचं दूध त्या चरवायाला मिळत नसे. त्यामुळंच ते दूध पाजणं एकदा त्या  गवळ्याने बघितले. त्याला त्या गोष्टीचा भयंकर राग आला आणि त्याने काठीने गाईला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीनिवासांच्या शरीरावर वळ उठले. ह्यामुळे श्रीनिवास क्रोधीत झाले आणि त्यांनी राजा चोल ह्याला राक्षस बनण्याचा शाप दिला. कारण धर्मानुसार नोकराच्या चुकीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मालकाची असते. राजाने श्रीनिवासांची माफी मागितली तेव्हा श्रीनिवास त्याला म्हणाले की, पुढील जन्मी त्याला आकाशराजाचा जन्म मिळेल आणि तेव्हा त्याने त्याच्या मुलीचा, पद्मावतीचा विवाह श्रीनिवास ह्यांच्याशी करुन द्यायचा. त्यानंतर श्रीनिवास त्यांच्या मातेकडे वकुला देवी ह्यांच्याकडे गेले आणि त्यांनी काही काळ तिरुमला पर्वतावर वास्तव्य केले.
           शाप मिळाल्यानंतर चोल राजाने आकाशराजा म्हणून जन्म घेतला आणि एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव पद्मावती असे ठेवले. ह्या कन्येचा जन्म पद्मपुष्करिणीमध्ये झाला होता. ह्यानंतर श्रीनिवासांनी पद्मावतीशी विवाह केला. परंतु पद्यावतीच्या विवाहाचा प्रस्ताव आकाशराजाला पाठवला असता त्यानं विवाहासाठी भरपूर पैसे मागीतले. हिरे जवाहरही मागीतले. परंतु ते काही श्रीनिवासजवळ नव्हते. म्हणून की काय, त्यानं आपला विवाह करतांना कुबेराला कर्ज मागितलं व म्हटलं की ते कुबेराचं कर्ज तो कलियुगाच्या शेवटपर्यंत चुकविणार. 
          कुबेरानं श्रीनिवासला कर्ज दिलं. त्यानंतर पद्यावतीचा विवाह श्रीनिवासशी पार पडला. परंतु त्यानंतर झालेलं श्रीनिवासवर कर्ज. त्या कर्जाचा प्रश्न निर्माण झाला. त्यानुसार आज तो विचार करु लागला. कुबेराचं कर्ज चुकवायचं कसं? तो मदत मागू लागला. तशी त्याला जो कोणी मदत करीत असे. त्याला भरभरुन पैसा आडका मिळत असे.
         श्रीनिवासचा पद्यावतीशी विवाह झाला होता. तो खुश होता. त्याच्यावर पद्मावती प्रसन्न होती. त्यानुसार तो व्यक्ती श्रीमंत बनत असे. मग आख्यायीकाच पडली की तिरुपती बालाजीला पैसे वा दागिने दान केल्यास तो माणूस श्रीमंत बनतो. त्याचेवर लक्ष्मीमाता प्रसन्न होते. त्यानुसार लोकं स्वार्थापोटी तिरुपती बालाजीला दागदागीणे व पैसा दान देवू लागले. म्हणतात की काही काळाने जेव्हा लक्ष्मी देवींना श्रीनिवास ह्यांच्या विवाहाविषयी कळले. तेव्हा त्या तिरुमला पर्वतावर त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या.
असे म्हणतात की पद्मावती व लक्ष्मीदेवींनी श्रीनिवासांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी त्यांना समर्पक  उत्तर दिले. ते ऐकून लक्ष्मीमाता व पद्यावतीही प्रसन्न झाल्या. त्यानंतर श्रीनिवासरुपी विष्णूनं आपलं रुपांतर एका दगडाच्या मूर्तीमध्ये केले. आजही ती मुर्ती तिरुमला इथं साक्षात जीवंत वाटते. तसा अनुभव येतो. म्हणतात की आजही त्या मुर्तीला स्पर्श करुन पाहिलं असता ते पाषाणरुपी शरीर मेणासारखं दाबलं जातं व नंतर पुर्ववत होतं. 
           श्रीनिवासचं झालेलं एका मुर्तीमध्ये रुपांतरण बघून ब्रह्मदेव व महादेव तिथे प्रकट झाले व त्यांनी असे होण्याचे कारण विचारले. तेव्हा दोन्ही देवींनी सांगितले की देवांनी मानवाला कलीयुगातील संकटांपासून तारण्यासाठी इथे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्यानंतर देवींनी सुद्धा देवांबरोबर इथे राहण्यासाठी मूर्ती स्वरुपात तिरुमला पर्वतावर राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच लक्ष्मीदेवी देवांच्या डाव्या बाजूला तर पद्मावती देवांच्या उजव्या बाजूला स्थानापन्न आहेत.
            तिरुपती बालाजी मंदिराचे काही चमत्कारही आहेत.
           १) वेंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवर जे केस आहेत. ते खरे केस आहेत. असे म्हणतात की हे केस कधीही गुंतत नाहीत आणि नेहमी मऊ मुलायम राहतात.
           २) वेंकटेश्वर स्वामी म्हणजेच श्री बालाजी ह्यांच्या मूर्तीचा जो पाठीमागचा भाग आहे. तो नेहमी पाण्याने ओला असतो. ह्या मूर्तीकडे लक्ष देऊन कान लावून ऐकल्यास मूर्तीमधून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.
          ३) मंदिराच्या दाराजवळील उजव्या बाजूला एक छडी ठेवलेली असते. असे म्हणतात की ह्या छडीचा उपयोग देवांच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीवर जखम झाली होती. ह्या कारणाने त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावण्याची सुरवात झाली.
           ४) साधारणपणे आपण गर्भगृहात बघतो. तेव्हा आपल्याला वाटते की गर्भगृहाच्या केंद्रस्थानी मूर्ती आहे. पण खरं तर बाहेरुन बघितल्यास देवांची मूर्ती ही उजव्या बाजूला स्थानापन्न आहे असे दिसते.
             ५)देवांच्या मूर्तीला वाहिलेली सर्व फुले व तुळशीची पाने प्रसाद म्हणून भक्तांना न देता मागील बाजूस असलेल्या विहिरीत ती टाकून दिली जातात. इतर ठिकाणी मात्र देवाला वाहिलेले हार व फुले दर्शनाला येणाऱ्यांना प्रसाद म्हणून दिले जातात.
            ६) दर गुरुवारी देवांच्या मूर्तीवर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो. जेव्हा हा लेप काढतात, तेव्हा मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली दिसून येतात.
            ७) मंदिरातले पुजारी जेव्हा जेव्हा पूजा करतात. तेव्हा देवाला वाहिलेली सर्व फुले मागील बाजूस असलेल्या विहिरीत वेळोवेळी टाकून देत असतात. पण एकदाही त्या टाकून दिलेल्या फुलांकडे बघत नाहीत. ती फुले बघणे चांगले नसते असे म्हणतात.
            ८) १८व्या शतकात हे मंदिर तब्बल १२ वर्ष बंद ठेवले होते. कारण एका राजाने १२ लोकांना मृत्युदंड देऊन मंदिराच्या भिंतींवर फाशी दिली होती. असे म्हणतात की हे बघून तेव्हा स्वयं वेंकटेश्वर स्वामी तिथे प्रकट झाले होते. त्यानंतर मंदीर पुन्हा  पुर्ववत सुरु  झाले होते. 
           ९) ह्या मंदिरात एक नंदादीप आहे. जो सतत तेवत असतो. हा दिवा गेली अनेक वर्ष अखंड तेवतो आहे. कोणालाही नेमके आठवत नाही की नेमका केव्हापासून हा दिवा मंदिरात प्रज्वलित करण्यात आला आहे. तसंच त्या दिव्यात कोणीच तेल टाकत नाही. तरीही नंदादीप जळतो.
           १०) देवाच्या मूर्तीला पंचाई कर्पुरम लावले जाते. हे कापरापासून बनवले जाते. असे म्हणतात की हा लेप जर साध्या दगडाला लावला तर तो दगड भंगतो. पण ह्या पंचाई कर्पूरमचा देवाच्या मूर्तीवर कुठलाही परिणाम होत नाही.
           असे हे भारतातील सर्वात वैभवशाली असलेले देवस्थान अतिशय निसर्गरम्य स्थानी वसलेले आहे. तिकडे गेल्यानंतर भक्तांचा ‘गोविंदा हरी गोविंदा, वेंकटरमणा गोविंदा’ हा जप ऐकून, देवाची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटते. देवाचे शांत रुप पाहून आपलेही मन शांत होते.
           तिरुपती बालाजीला लोकं केस कापतात नव्हे तर दान करतात. यामागेही एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ती अशी की ज्यावेळेस चरवायानं गाईला श्रीनिवासला दूध पाजतांना पाहिलं. तेव्हा त्याला तिचा भयंकर राग आला व रागाच्या भरात त्यानं त्या गाईच्या मस्तकावर प्रहार केला. परंतु तो प्रहार श्रीनिवास रुपातील विष्णूनं आपल्याच अंगावर झेलला. परंतु तो प्रहार आपल्या अंगावर झेलत असतांना तो प्रहार त्याच्या मस्तकावर लागला. तसं भराभरा रक्त वाहू लागलं. ते रक्त काही थांबत नव्हतं. ते पाहून त्याची आई नीलादेवीनं आपल्या डोक्यातील केसाचा एक पुंजका कापला व तो पुंजका त्या मस्तकावरील घावावर लावला. तो लावताच त्या घावातून स्रवणारं रक्त थांबलं. त्याच कारणानं आजतागायत तिरुपती बालाजीला केस दान करण्याची प्रथा आहे. कारण तिरुपती बालाजी हेच श्रीनिवास आहेत असं लोकांचं म्हणणं आहे.
             भारतात भक्तीभाव आणि श्रद्धेला अजिबात तोटा नाही. देशातील हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनाला जात असतात. आपल्या देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे. देशातील शेकडो मंदिरे प्राचीन असून, स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना आहेत. तसेच अनेक मंदिरे प्रचंड श्रीमंत आहेत. यातील एक प्रमुख नाव म्हणजे आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर. या मंदिराची भव्यता आणि दिव्यता अचंबित तसेच स्तिमित करणारी आहे. देशातील अनेक मंदिरात विविध प्राचीन प्रथा, परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत. त्या देशभरात प्रसिद्ध आहेत. तिरुपती बालाजी मंदिरात केसाचे दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. केवळ पुरुष नाही, तर स्त्रियाही केसांचे दान करतात. तिरुपती बालाजी मंदिरात येऊन केसाचे दान केल्यास लक्ष्मी मातेची कृपा होते, असे सांगितले जाते. हजारो भाविक आपल्या इच्छा, आकांक्षा घेऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात आणि केसाचे दान करतात. भाविक जेवढे केस दान करतात, त्यापेक्षा १० पट अधिक तिरुपती बालाजी परत देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, या प्रथेमागे एक कथा असल्याचे सांगितले जाते. प्राचीन कथेनुसार, बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्याचा पर्वत बनला होता. तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे. अनेकदा असे घडले. एक दिवस गाईच्या मालकाने ते पाहिले तो क्रोधीत झाला. जवळच पडलेली एक कुऱ्हाड घेतली आणि गाईवर उगारली. मात्र, बालाजी देवतेला तो घाव लागला आणि त्यावेळी काही केसही तुटले. यानंतर नीला देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला घाव झाला. नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचा घाव भरला. या कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले की, केस हा शारिरीक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरला. जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून केस  अर्पण करेल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले. केसांचे दान करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणे असे मानले जाते. चुकीच्या गोष्टींचा त्याग करून सत्कर्माच्या मार्गाला लागलेल्या माणसावर लक्ष्मी देवीचे विशेष कृपाशिर्वाद राहतात. लक्ष्मी देवी सुख, समृद्धी, वैभव, संपन्नता देऊन भरभराट देते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते. तिरुपती बालाजी मंदिरात दररोज जवळपास सुमारे २० हजार भाविक केस दान करतात व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवतात असं मानलं जातं. म्हणतात की तिरुपती बालाजीचे डोळे सदैव झाकून ठेवले जातात. कारण असं म्हटलं जातं की त्यांच्या डोळ्यातून ब्रम्हांड उर्जा किरणं निघतात. जे बाकी लोकांच्या डोळ्यांना अपाय करु शकतात. तसे ते डोळे दर गुरुवारला उघडे केले जातात. कारण याच दिवशी देवांचे डोळे हे लहान असतात. ज्या डोळ्यातून गुरुवारी तेवढी ब्रम्हांडीय उर्जा किरणं बाहेर पडत नाहीत व भक्त त्या डोळ्यात सहज पाहू शकतात.
             बालाजी हा तिरुमलाला होता. तरीही त्याला तिरुमलाचा बालाजी म्हणत नव्हते तर त्याला तिरुपतीचंच नाव होतं. हे माहीत झालं होतं. तरीही शंकरनं त्या प्रश्नांचा पिच्छा सोडला नव्हता. तो प्रश्न त्याला सतावतच होता. ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता त्याला एक माहिती मिळाली. तिरुमला ही एक डोंगररांग होती आणि इथं एक गाव होतं की ये तिरुपतीला लागणा-या सर्वच वस्तू या गावातूनच येत असत. त्या गावात कोणालाच जाता येत नसे व इतर गावचे प्रसाद, भोगावस्तू तिरुपतीला वाहल्या जात नव्हत्या. 
         सकाळ झाली होती. तसं ते सर्व मित्रमंडळींचं बि-हाड विष्णू नावाच्या धर्मशाळेत उतरलं. या धर्मशाळेत सर्वांनी दांतवण केलं. त्यानंतर सगळेजण नाश्ता करायला निघून गेले. त्या नाश्त्यात त्यांना तेथीलच पदार्थ खायला मिळालीत. त्यांना आपल्या भागातील काहीही त्या ठिकाणी मिळालं नाही. त्यांनी आपला भाग केव्हाच सोडला होता. 
           त्यांच्या जेवणात इडली, डोसा, मसाले भात, साधा भात असे पदार्थ. उपमा खायचा असल्यास त्यांना भाताचाच बनवून खावं लागतं. शंकरनं ते पाहिलं. तसं त्याला वाटलं की इथं पाऊस जास्त पडत असावा. परंतु त्याचं तिथं वास्तव्य पाच दिवस होतं. परंतु ना तिथं पाऊस आला होता ना काही पावसाचे थेंब. त्यामुळंच उकाडा सहज जाणवत होता. त्यानं तिथं नंतर तशी चौकशीही केली. परंतु त्यावर उत्तर नाही असंच मिळालं होतं. 
             दोसा इडली हे तेथील प्रमुख पदार्थ. तांदळाचे सगळे जिनस. तांदूळच कदाचीत स्वस्त. तांदूळच स्वस्त का? तांदूळ पीकत नाही. तसं तांदळाला पिकवायला भरपूर पाणी लागतं. तरीही तांदूळच स्वस्त कसा?  सहज कोणीही म्हणेल. तोही प्रश्न शंकरला पडला. तसं त्यानं एका जणाला विचारताच तो म्हणाला,
         "इथं तांदूळच स्वस्त आहे. कारण इतर भागाकडून येणा-या नद्या.  या नद्या आंध्रप्रदेशात दुथडी भरुन वाहात असतात. त्या नद्यांना भरपूर पाणी असतं. तसं तिरुपती बालाजीच्या कृपेनं जगतो आहोत आम्ही. अर्धा आंध्रप्रदेश तिरुपती बालाजीला येत असलेल्या दानाने पोचला जातो. दरवर्षी हजारो बजारो  लोकं येतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात. काही विदेशातूनही लोकं येतात. गर्भश्रीमंत लोकं येतात. असं दान टाकून जातात की आपण कल्पनाच करु शकत नाही. अन् स्वतःचं नावही जाहीर करीत नाहीत. मागं तर एक ट्रक आला होता साखरेच्या पोत्यानं भरुन. गच्च भरला होता तो ट्रक. ट्रक मालक आला व त्यानं त्या ट्रकची चाबीच कोणाला न सांगता हुंडीमध्ये टाकून दिली. तो कोण होता? कोण नाही?  हेही माहिती पडलं नाही. सगळा काळा पैसा आहे साहेब. कोणाला दान देण्यापेक्षा तिरुपतीलाच दान द्यायचं असा विचार करतात लोकं. हं, आपल्या आप्तांना आपल्याजवळचा काही पैसा दिलाच तर ते चौकशी करतात. आपल्याच लोकांना फसविण्याचे षडयंत्र करतात. मात्र तिरुपती कोणालाच फसवत नाही आणि अशा संपत्तीचं मोजमापही करीत नाही. म्हणूनच लोकं सढळ हातानं दान देतात साहेब. आता राहिला प्रश्न तांदळाचा. तर आमच्याकडे नद्यांना बांध घालून त्यातील पाणी इतर भागाला पुरवलं जातं. त्या पाण्यानं इथं धान जास्त पिकतो साहेब."
             त्या माणसानं शंकरला सांगीतलेल्या गोष्टी. सत्य परिस्थिती काय होती माहीत नाही. परंतु त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आंध्रप्रदेशाला धानाचा प्रदेश म्हणत असावेत असे वाटत होते नव्हे तर धानाचं कोठार. 
         आंध्रप्रदेशात पाऊस कमी पडतो असं त्या गृहस्थानं शंकरला सांगीतलं. ते खरं होतं की नाही ते माहीत नाही. परंतु शंकरच्या मनात एक विचार तरळून गेला पर्यावरणाचा.  त्याला पर्यावरणावर विचार करीत होता. पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण काय करायला हवे. कारण अलीकडे जो पाऊस पडत नव्हता. तो पर्यावरणाचाच परीणाम होता. त्याचा तो विचार.  तो विचार होता पर्यावरणाचे रक्षण. 

**********************************************************

          पर्यावरणाचे आपण रक्षण करावे. असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. ती गोष्ट आपण लहान मुलांना सांगीतलेली बरी असं आपल्याला वाटेल. मोठ्यांना सांगण्याची गरज नाही असंही आपल्याला वाटेल. परंतु तसं नाही. आज लहान मुलंच नाही तर मोठी मंडळीही पर्यावरण दुषीत करीत असतात नव्हे तर प्रदुषण करीत असतात यात शंका नाही. 
           पर्यावरणाचे आपण रक्षण केले पाहिजे. ते स्वच्छ ठेवले पाहिजे. त्यासाठी आपण पर्यावरणात होणारे प्रदूषण थांबवले पाहिजे. त्यासाठी आपण प्लॉस्टीकचा वापर करु नये. तो थांबवला पाहिजे. प्लॉस्टीक जाळू नये. तो जळाल्याने हवेत धुर पसरतो. ज्या धुरात कार्बन मोनोक्साॅईड असतो. जो कार्बन मोनोक्साॅईड आपल्या शरीराला घातक असतो.  तशीच महत्वाची गोष्ट अशी की आपण आपला परीसर स्वच्छ ठेवावा. परीसर स्वच्छ ठेवला नाही तर जो अस्वच्छ कचरा असतो जमीनीवर पसरलेला. त्यातून वेगवेगळ्या रोगाचे जंतू वातावरणात प्रवाहीत होत असतात. त्यातून व प्रदुषणातून  श्वसनाचे आजार होतात. तसेच निरनिराळ्या आजारांनाही चालना मिळते. ज्यातून माणसांचा मृत्यू संभवतो. प्राणीमात्राचाही मृत्यू संभवतो. म्हणूनच आपण पर्यावरण प्रदूषण थांबवलं पाहिजे आणि त्याचे रक्षणही केले पाहिजे. त्यात आपलेच हित दडलेले आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पर्यावरणाचे आपण रक्षण करावे असं आपण नेहमी म्हणतो. लोकांना ज्ञान पाजतो आणि स्वतः असे बोलून स्वतःला एक फार मोठा पर्यावरणाचा दूतच समजतो. परंतु आपलं वास्तवात जगणं आणि वागणं तसं नसतं. शासनाचे निर्देश असूनही आपण सतत प्लाॅस्टिकचा वापर करीत असतो. प्लॉस्टीक जाळत असतो आणि पर्यावरण दुषीत करीत असतो. तसाच आपल्या आणि इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत असतो. हे आपले असे वागणे बरोबर नाही. ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. परंतु आपण ते प्रत्यक्षात लक्षात ठेवतो का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. 
           पर्यावरण स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे. जर पर्यावरण स्वच्छ ठेवलं नाही तर जो वातावरणात धूर पसरतो. तो वातावरणातील धूर हा अतिशय जीवघेणा ठरु शकतो. तो एवढा जीवघेणा ठरतो की त्यातून आपल्याला जगणंच असह्य होवून जातं. कारण या वातावरणात ऑक्सीजनची जाडसर परत आहे. ज्याला ओझोनचा थर म्हणतात. हा थर या प्रदुषीतपणामुळं कमी होतो, अर्थात त्याची जाडी कमी होते वा त्या थराला छिद्रही पडू शकते आणि तशी जाडी कमी झाली वा छिद्र पडलंच तर सुर्याची अतिनील किरणं थेट पृथ्वीवर पोहोचू शकतात व पृथ्वीवर उष्णतामान कितीतरी पटीनं वाढू शकते. जर असं उष्णतामान पृथ्वीवर कितीतरी प्रमाणात वाढलं तर उद्या या पृथ्वीतलावरील जीवजंतू तर नष्ट होईलच. व्यतिरिक्त जीवसृष्टीही नष्ट होवू शकते. यात शंका नाही. 
          गत काही दिवसापुर्वी  सरकारनं आव्हान केलं होतं आणि स्वच्छतेचा उपक्रम राबवला होता. हे सर्वांच्या लक्षात आहे की नाही हे माहीत नाही. त्यावेळेस प्रत्येक नेत्यांनीच आपल्या आपल्या हातात झाडू पकडून आपापला परीसर स्वच्छ केला होता. त्याही गोष्टीला लोकं विसरले असतीलच असं वाटते. कारण चांगल्या गोष्टी हे कोणीच जास्त दिवस लक्षात ठेवत नाहीत. परंतु त्याचा फायदा असा झाला होता की पर्यावरण स्वच्छ झालं होतं नव्हे मध्यंतरीचा काळ हा सुकाळ स्वरुपाचा राहिला. तसं पाहता आजही त्यांचीच सरकार आहे व आजही हे सरकार स्वच्छता मुल्यांची जोपासना करीत आहे. परंतु काही काही लोकं चांगल्या गोष्टीलाही विरोध करतात. 
          मुळात सरकारच्या सर्वच गोष्टी पाळायची गरज नाही. त्याची आपण तरी शहानिशा करावी. ज्या हिताच्या आहेत. त्या गोष्टींचा आपण स्विकार करावा. काही गोष्टी सोडल्या तरी चालेल, परंतु स्वच्छता मुल्य तरी पाळावे. कारण याच एकमेव मुल्यातून आपण आपला देश वाचवू शकतो. आपला देशच नाही तर आपलं जगही वाचवू शकतो. अन् वाचवू शकतो आपण आपली जीवसृष्टी. ज्या जीवसृष्टीनं आपण जगू शकतो. आपल्या गरजा भागवू शकतो. 
          महत्वाचं म्हणजे आपली जीवसृष्टी वाचेल तर आपण वाचू. आपण वाचू तर आपलं पर्यावरणही वाचेल अर्थात जीवसृष्टी वाचेल. यात शंका नाही. दोन्हीही घटक परस्परांवर अवलंबूनच आहेत. मग दोघंही वाचणं आजतरी गरजेचे आहे. तेव्हाच दोघांचाही बचाव करता येईल. परंतु आपण तसा विचार करीत नाही. आपण विचार करतो स्वतःला वाचविण्याचा. पर्यावरण वा जीवसृष्टीला वाचविण्याचा विचारच करीत नाही. आपण प्लॉस्टीक जाळतो. वातावरणात धूर पसरवतो. धुम्रपान करतो. जागोजागी थुंकतो. झाडं तोडतो. प्राणीमात्रांची हत्या करतो. डोंगर पोखरतो. एकंदरीत सांगायचं झाल्यास पर्यावरण नष्ट करतो. ज्याचा परीणाम असा झाला आहे की आज पाऊस बरोबर पडत नाही. काही भागात तुरळक पडतो. काही भागात अजिबात पाऊस पडत नाही. जंगलं नसल्यानं जंगलातील श्वापदं नष्ट होत आहेत. बिचारे भुकबळीनं मरत आहेत. माणसांनाही काही काही भागात प्यायला पाणी मिळत नाही. पाणी विकत घ्यावं लागतं. आज पाणी प्यायला विकत तरी मिळतं. तसं पाहता भविष्यातील याच परीणामाचा विचार करता आज काही प्रमाणात आपल्याला जे मिळतं. उद्या ते मिळेलच असं नाही. आज थोडंसं अन्न आणि पाणी तरी जगात आहे. ज्या भागात नाही, तिकडं पाठवता तरी येतं. उद्या जगात पाणीही नसेल आणि अन्नही. हे सर्व वातावरणाच्या प्रदुषणानं घडेल यात शंका नाही. म्हणूनच याची गरज आपण आजच लक्षात घ्यावी आणि ती आपली भावी पिढी लक्षात घ्यावी की ज्याचे आपण काही काळानं वंशज बनणार आहोत. त्या भावी पिढीच्या कल्याणासाठी तरी आपण आपलं पर्यावरण वाचवावं. त्याचं रक्षण करावं. प्रदुषण करु नये. एक झाडं तोडलं तर दोन झाडं लावावीत. नाहीतर उद्या आपली पिढी जेव्हा या प्रदुषणानं मरेल वा अन्न पाण्याविना तडपून मरेल, तेव्हा तीच पिढी आपल्याला शिव्या हासडेल व म्हणेल की आमच्या पुराण्या पिढीनं आमच्यासाठीच काहीच केलं नाही. त्यांनी जर पर्यावरणाचं रक्षण केलं असतं तर आज ही वेळच आली नसती आणि त्याच पिढीचा शाप आपल्याला असेल. उःशापाला जागाच नसेल. कारण कोणीच जीवंत असणार नाही. म्हणूनच त्याच आपल्या भावी पिढीसाठी आपण पर्यावरण रक्षण केलं पाहिजे. त्याचं जतनही केलंच पाहिजे. झाडं जगवली पाहिजे. प्लॉस्टीक जाळू नये. परीसरात कचरा करु नये. तसाच मोबाईलचाही कमी वापर करावा म्हणजे झालं. 
           शंकरच्या तो मनातील विचार. तो विचार रास्त होता. आज त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आंध्रप्रदेशात पाऊस पडत नव्हता. हीच परिस्थिती सगळीकडं होती. तसं पाहता काही ठिकाणी जो पाऊस येत होता. त्यामुळंच या भागातील नद्या दुथडी भरुन वाहात होत्या. ज्याचं पाणी अख्खं आंध्रप्रदेशाला मिळत होतं. ज्या नद्यांमध्ये गोदावरी व कृष्णा या नद्यांचा समावेश होता. 
          गोदावरी व कृष्णा या नद्या म्हणजे आंध्रप्रदेशाला एक वरदानच होतं. तरीही पाणी तिथं महाग होतं. आम्हाला तशी बाहेरचं पाणी पिण्याला मनाईच होती. सगळेजणं फिल्टरच्याच बाटला वापरत होते. त्यांच्या मते बाहेरचं पाणी पिण्यानं प्रकृती खराब होते. म्हणूनच प्रवासात असतांना फिल्टरचं पाणी घेतलेलं बरं.
           भाग 2 

            दुपार झाली होती. सर्वांनी नाश्ता केला व ते विष्णू धर्मशाळेत आले. तसं शंकरनं त्यांना काय नाश्ता केला व किती रुपये लागले अशी विचारणा केली. तसं सर्वांनी एकच उत्तर दिलं. ते उत्तर म्हणजे तिथं फक्त तांदळापासून बनविलेले पदार्थ असतात व ते पदार्थ आपल्या भागातील पदार्थापेक्षा स्वस्त असतात असं सांगीतलं. 
          दुपार झाली. तसा राजेश म्हणाला, "आपण पास काढूया व वेळ बुक करुया.''
            सर्वांनी आपआपलं आधारकार्ड दाखवून आपली वेळ बुकींग केली. तशो ती वेळ सकाळी चार वाजताची मिळाली. त्यावर राजेश पुन्हा म्हणाला, 
         "आपण आताच जावूया. तिथं रुम करुया व जेवनखावण करुन आराम करुया."
            राजेशचं ते म्हणणं. तसे सर्वजण तयार झाले व त्याचेमागोमाग ते निघाले. ते मुख्यरस्त्यावर आले. तशी त्यांनी गाडी ठरवली व गाडी ठरवून ते तिरुमलाला रवाना झाले. 
            गाडी तिरुमलासाठी रवाना झाली होती. तशी ती चेकपोष्टची जागा आली, ज्या ठिकाणी सर्वांच्या बॅगा चेक झाल्या. प्लॉस्टीकच्या बाटला फेकून द्याव्या लागल्या. त्यातच त्यांच्याजवळ असलेले खर्रे देखील फेकून देण्यात आले. त्यानंतर गाडी परत तिरुमलाला रवाना झाली. ती नागमोडी वळणे घेत तिरुमलाला पोहोचली. तसं तिरुमला आलं व तिरुमला येताच सर्वजण उतरले. 
          सर्व मित्रमंडळ गाडीतून उतरले होते. त्यानंतर त्यांनी असा देखावा पाहिला की जो देखावा कितीतरी प्रमाणात चांगला होता. 
           ते तिरुमला स्थळ. ते तिरुमला स्थान खरं तर फारच छान होतं. तसं पाहता त्या स्थानाला उत्तमपणे सजवलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. त्याचं कारण म्हणजे तिरुपती स्थानावर इतर भक्त मंडळींकडून येत असलेला पैसा. हा पैसा एवढा येत होता की ज्या पैशानं त्या स्थळाची सजावट नक्कीच करता येईल. तसं सत्य समोर येतच होतं. 
           शंकर व मित्रमंडळ त्या गाडीतून उतरले होते व ती मंडळी चालायला लागली होती. ती मंडळी थोड्याच वेळात त्या सभामंडपात आली. ज्या सभामंडपात लॉकरची सोय होती. तिथं लगतच केस कर्तन करणारे बरेच लोकं बसले होते. ते एवढ्या सपाट्यानं डोक्यावरचे केस काढत होते. ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. महिलाही आपल्या डोक्यावरचे केस काढत होत्या. त्यांच्या डोक्यावरचे केस महिलाच काढत होत्या आणि माणसाच्या डोक्यावरील केस माणसं. माणसं डोक्यावरील केस काढायचे. दाढ्या काढायचे व काहीजणं मिशाही. परंतु या ठिकाणी एक विशेष होतं की मिशा बरेचसे लोकं कर्तन करीत नव्हते. 
          केस कर्तन करणारी मंडळी केसं काढत असत. त्यातच ते केसं त्या नालीत पडायचे. ज्या नालीवर टाईल्स लावण्यात आल्या होत्या. त्यात पडणारे केसं पाणी पडताच भर्रकन निघून जात होते. त्या नाल्या साफ व तेवढ्याच स्वच्छ होत्या. कोणीतरी म्हणत होते की हे केसं काढणारे लोकं पगारी आहेत. परंतु ते लोकं जे आपले केसं काढत होते. ते पुरेसे पैसे देत होते व ते पुरेसे पैसे मागत आहेत. 
          पगारी केस कर्तनवाले. परंतु तेही पैसे मागत होते. एका एका व्यक्तीकडून जवळपास वीस रुपये.  असे कितीतरी लोकं पैसे देत होते. कोणी कोणी शंभर रुपयेही देत होते तर कोणी पन्नास रुपये. ही लुट होती की सेवा ते कळत नव्हतं. परंतु शंकरला वाटत होतं की ती लुट नाही तर ती एक प्रकारची सेवाच आहे. कारण ते जरी शंभर रुपये घेत असले तरी त्या किरकोळ रुपयात ते दाढी व केसकर्तन करुन देत होते. 
         शंकर ते पाहात होता. तसा त्याच्या मनात विचार आला की हे केसं ही मंडळी काय करीत असतील? तसं त्यानं त्याबद्दल त्याच परीसरातील एका व्यक्तीला विचारलं, 
          "भाऊ, या केसाचं लोकं काय करतात? यातून पैसा कमवीत असतील बरे. ही तर लुटच झाली म्हणावी."
           त्यावर तो व्यक्ती म्हणाला, 
          "केस......... त्या केसांना विदेशात मोठी मागणी आहे. ते केस विदेशात पंचवीस ते तीस हजार रुपये किलो भावात जात असते तर त्याची किंमत भारतात अडीच ते तीन हजार किलो आहे. पुरुषांच्या कमी लांबीच्या केसापासून काही जिनसा बनवीत असतात. पांढ-या केसांना वा पांढरट केसांना तेवढी मागणी नाही. मात्र महिलांच्या केसांना फार मागणी आहे. ते केसं तर सोन्याच्या भावानं विकल्या जात असतात. परंतु हा पैसा कोण्या एकाच माणसाच्या घरी जात नाही तर तो पैसा ट्रस्ट मध्ये गोळा होतो. ज्या पैशातून आमच्याच राज्याचा विकास होतो. ही धार्मिकता आणि हा आमचा त्या धार्मिकतेतून निर्माण झालेला उद्योग. हा तुम्हाला जरी आमचा बेबनावपणा वा ही आमची लुट वाटत  असली  तरी ही आम्ही लुट करीत नाही. ह्यावर आमचं पोट अवलंबून  आहे. हा आमच्या पोटाचाच  प्रश्न  आहे. तसं तुम्हाला हळूहळूच समजेलच त्याबद्दल."
          "परंतु मी तर ऐकलं आहे की  या तिरुपती बालाजीला लुटलुट लुटतात?"
           "चुकीचं ऐकलं आहे आपण?"
          "म्हणजे?"
          "अहो, या बालाजीचं दर्शन घेण्यासाठी जात असतांना कोणाला एवढासाही खर्च नाही. तो भक्त जर स्वेच्छेने दान देईल, तेच दान आम्ही घेतो. त्याचीही आम्ही पावतीच देतो रितसर. एक एक रुपयाचा हिशोब असतो इथं. हं, ज्याला दानच द्यायचं आहे आणि ज्याच्याजवळ काळा पैसा आहे. तो काळा पैसा आम्ही गुप्तदान म्हणून स्विकारतो. तोही हुंडीच्या रुपात. ज्या हुंडीत गुप्त स्वरुपात कोणी कोणी भरपूर पैसा टाकतात. कोणी मौलवान दागीनेही टाकतात. तसं पाहता ते दान बाकी ठिकाणच्या मंदीरासारखं दबावानं घेतलं जात नाही. इतर मंदिरात तर अमूक गोष्टीसाठी एवढा पैसा व तमूक गोष्टीसाठी तेवढा पैसा मागीतला जातो. या मंदिराबद्दल सांगतांना मी एवढंच म्हणेल की प्रत्येकांनी या मंदीरात कमीतकमी शंभर तरी रुपये दान करायला हवेत. मी म्हणतो म्हणून नाही तर त्यांचा खर्च वाचतो म्हणून."
          "खर्च वाचतो. तो कसा काय?" शंकरनं प्रश्न केला. 
           "होय, खर्चच वाचतो. हे बघा बाकी मंदिरात अगरबत्ती, हार, नारळ बेलफुल, पेढे यांचा खर्च जवळपास सहाशे ते सातशे रुपये असतो. शिवाय त्याचा परीसरात कचराही होतो. त्यावर माशा बसतात. आजार वाढतो. दुर्गंधीही पसरते. तसं इथं नाही. इथं कोणत्याही स्वरुपाचा हार लागत नाही. बेलफुल, नारळ अजिबात लागत नाही. एवढंच नाही तर साधं प्लॉस्टीकही चालत नाही. खाली हातानं जा व खाली हातानं जा. एवढंच नाही तर तुमचा साधा मोबाईलही चालत नाही. सामानही चालत नाही. यात तुमचा कितीतरी पैसा वाचतो. खरं तर यात तुमचा एवढा पैसा जर वाचत असेल  तर तो वाचणारा पैसा तुम्ही दान दिलेला बरा नाही काय?"
          "होय, तेही बरोबरच." शंकर म्हणाला. तसा आणखी तो म्हणाला, 
         "मला सांगा, इथं तर गरीब, श्रीमंत असा भेदभाव आहे. त्याबद्दल सांगा बरं."
          "म्हणजे? मला नाही समजलं?"
           "म्हणजे दर्शन रांग. दर्शन रांगेसाठी कितीतरी पैसा मोजावा लागतो. जशी पाचशेची रांग, तीनशेची रांग व अकरा हजार पाचशेची रांग. हा काय प्रकार आहे? ही लुट नाही काय?"
           "नाही. दर्शन रांगेसाठी अजिबात पैसा नाही. परंतु ज्याला जास्तच गडबड आहे. ज्याच्याजवळ पैसाच मावत नाही. तो देतो पैसा. परंतु हे सर्व देवाला दिसतं. देव त्यांना पावत नाही राव. खरा देव त्याच भक्तांना पावन होतो. जो त्याला भेटायला जात असतांना रांगेत जातो. त्याचे सर्व नियम पाळतो. रांगेचा भाव करुन देवाचे नियम मोडत नाही."
           "बरोबर आहे आपलं म्हणणं."
           "माहीत आहे. अशा दर्शन रांगेसाठी पैसा मोजल्यानं अशा व्यक्तीला देवाचं दर्शन होतं हे ठीक आहे. परंतु ख-या देवाचं नाही. देवाच्या मुर्तीचं दर्शन होतं. प्रत्यक्ष देवाचं नाही. देवाच्या नियमाबद्दल सांगायचं झाल्यास एवढंच सांगतो की जर श्रद्धा असली ना मनात तर देव तुम्ही जरी सक्षम नसले ना. तरीही तो देव तुम्हाला भेटायला घरी येतो. जसा पुंडलीकाच्या घरी गेला. तुम्हाला भेटायला यायची गरज नाही. एवढी ताकद आहे देवात. म्हणूनच देवाचेही नियम पाळायची गरज आहे."
          त्या माणसाचं ते बोलणं. तसा अंतर्मनानं शंकर ऐकत होता. तसा तो व्यक्ती म्हणाला, 
         "साहेब, इथं फक्त महत्व आहे त्या केसाचं. जे आपण दान करतो. त्या दानाचं महत्व पैशापेक्षाही कितीतरी मोठं असतं. जे भक्त दानात पैसा देवू शकत नाहीत. ते केसं दान देवू शकतात. कारण एका पुरुषांच्या  केसाचे मुल्य विदेशी मुल्यांकनानुसार जवळपास पाच ते दहा हजार असू शकतं आणि महिलाचे पैसे जवळपास वीस ते पंचवीस हजार. या पैशातून समिती भक्तांसाठी सोईसुविधा करते. त्यांच्या जेवणाखावण्याची व्यवस्था करते. परीसरात स्वच्छता ठेवते. अन्नधान्याच्या सोई करते. अर्धा आंध्रप्रदेश पोषते. या ठिकाणी सर्वच लोकं नोकरीवर आहेत. ज्याला वेतन हिच समिती देते तुमच्याच केसं व पैसे दान देण्याच्या पैशातून. खरं तर तुम्ही सेवा करीत आहात. पोटं जगवीत आहात काही लोकांचे. एक आधार बनत आहात आम्हा लोकांचा."
         "बरं एक विचारु का?"
         "विचारा."
         "मी असं ऐकलं आहे की येथील पंडीत लोकं बरेच श्रीमंत आहेत. त्यांच्या हातातील पाचही बोटात अंगठ्या आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणतात. हे खरं आहे काय?"
          शंकरचा तो प्रश्न. तसा तो व्यक्ती गलपटला. त्यावर शंकर म्हणाला, 
         "काय झालं? गलपटला काय?"
          तो व्यक्ती थोडा गप्प राहिला. तसं त्या व्यक्तीनं एक दिर्घ श्वास गिळला व नंतर म्हणाला,
          "नाही. तसं नाही. येथील पंडीतही पगारी आहेत. त्यांना जास्त वेतन आहे. कारण सा-याच गोष्टी त्यांच्याच हातात असतात. त्यातील बरेचजण कमेटीत आहेत. अन् असेलही त्यांच्याजवळ पैसा. कारण लोभ कोणं सोडलाय. जेव्हा हुंडीतील पैसा व सोना मोजला जातोय. तो कॅमे-याच्या नजरेतून मोजला जातो. परंतु एखादा असतोच अतिहुशार की जो अशाच कॅमेऱ्याची नजर चुकवून एखादा दागीणा गायब करु शकतो आणि हं, कमेटी तरी किती जणांकडे लक्ष देईल हो? त्याबद्दल न बोललेलं बरं. तुम्हीही बोलू नका की हो हे लक्षात घ्या." तो म्हणाला आणि तद्नंतर तो ताबडतोब तेथून निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा शंकरला भेटलाच नाही.
          त्या व्यक्तीचं ते बोलणं. ते बोलणं पाहून शंकरला सत्यता माहीत झाली व कळलं की तिरुपती बालाजी हा काही श्रीमंताचा देव नाही तर तो गोरगरीबाचाही देव आहे. फक्त जाण्यायेण्याचाच पैसा लागतो. ना अगरबत्ती लागत, ना कापूर. ना हार लागत, ना कोणतं बेलफुल. ना पेढा लागत ना कोणतं काही. व्यतिरिक्त जेवनही मिळत असतं, तेही फुकट. कारण त्याला त्याच मंदिरात सायंकाळी जेवनही मिळालं होतं. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार शंकरला दानाचं महत्व माहीत झालं होतं. त्या दानानं अर्धा आंध्रप्रदेश पोषला जात होता. ते केसं दान देणं वा ते पैसे दान देणं एक सेवाच आहे आंध्रप्रदेशातील त्या वंचीत शोषीत लोकांना मदत करणारी कृतीच आहे असंही त्याला माहीत झालं होतं. त्यामुळंच त्यानं ठरवलं. आपण पैसे तर दानात देवू शकत नाही. आपण पाहिजे तेवढे श्रीमंत नाही वा आपली तशी काळी कमाई नाही. तसे पैसे वा दागदागीने दान द्यायची आपली हिंमतही नाही. मात्र आपण आपले केसं नक्कीच दान देवू शकतो. 
          शंकरनं तसं ठरवताच त्यानं केसकर्तन केलं व केसं दान दिले. त्यातच इतरांनीही आपलं मुंडन केलं. त्यानंतर त्यांनी व शंकरनं तिथं काही वस्रही विकत घेतलीत. ज्या वस्र विकत घेण्यातून आंध्रप्रदेशातील लोकांचा लाभच होणार होता. 
          सर्वांची अंघोळ झाली होती. तशा तयाऱ्याही सर्वांच्याच झाल्या होत्या. आता कमीतकमी पाच वाजले होते. तसा राजेश म्हणाला, 
           "गड्यांनो, आता आपण निघुयात. आता मंदिर पाच किमी अंतरापर्यंत आहे. आपल्याला वेळ होईल. तसं रस्त्यावर जेवणही करुया."
          राजेशनं बोललेले शब्द. तसं सर्वांना आधारकार्ड धरायला सांगीतलं व सर्वजण रस्त्यानं चालायला लागले. तसं चालता चालता रस्त्यावर एक दुकान लागलं. ते दुकान पाहता त्या दुकानात सर्वांनी चहा घेतला व ते मुख्य रस्त्यावर आले. इथं एक सुंदर देखावा होता. तिथं फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरु होता. या ठिकाणी शंकर थोडा उशीराच आला. तसं कोणीतरी विचारलं,
           "आधारकार्ड आणलं का?"
            आधारकार्ड ही अलीकडील काळातील एक महत्वाची गोष्ट झाली आहे. आधारकार्ड नसेल तर कोणाला कुठेही प्रवास करता येत नाही. तसाच कोणताही व्यवहार करता येत नाही. आधारकार्ड एका व्यक्तीचा एकच असतो.  हाताचे ठसे मागीतले जातात. समजा एखाद्या व्यक्तीनं जरी आधारकार्ड डुप्लिकेट बनविण्याचा प्रयत्न जरी केला तरी आधारकार्ड डुप्लिकेट बनत नाही. कारण संगणकावर हाताचे ठसे दाखवूनच देतात की संबंधीत व्यक्ती कोण आहे? 
          आधारकार्डला सर्व गोष्टी आज जुळल्या आहेत. कोणी म्हणतात की आधारकार्ड अनिवार्य करु नये. तसंच आधारकार्ड नसेल तर काम अडू नये. म्हणतात की न्यायालयाचाही तसाच निकाल आहे. परंतु आजच्या काळात आधारकार्ड नसेल तर सर्वांचं अडतं. कारण आधारकार्ड ही आजची तरी मोबाईल सेवेसारखी अत्यंत महत्वाची गरज झाली आहे. 
           आधारकार्ड कृषीशी, शैक्षणीकतेशी, जोडलेला आहे. तसंच आधारकार्डला बँकसेवा जोडलेली आहे. इन्कमटॅक्स जोडलं आहे. त्यावरुन कोणाजवळ किती पैसा गोळा आहे हे सारं कळतं. यावर इन्कमटॅक्स किती बसवायचा हेही सरकारला कळत असतं व सरकार त्यावर इन्कमटॅक्स बसवतं. आता कोणाला खरंच किती प्रमाणात पैशाची गरज आहे. अतिरीक्त पैसा किती आहे हे सारं कळतं. तशीच कोणाजवळ किती प्रमाणात मालमत्ता आहे? हेही आधारकार्डच्या माध्यमातून कळत असते. आधारकार्डच्या माध्यमातून पांढरा पैसा दिसतो, तसंच काळ्या पैशाचंही मोजमाप करता येतं. पर्यायानं सांगायचं झाल्यास देशात किती प्रमाणात पैसा आहे आणि तो कोणाकोणाजवळ आहे हेही एका क्लीकवर आधारकार्डच्या माध्यमातून कळत असतं. त्यामुळंच कोणालाच पैसा काळा करता येत नाही वा लपवता येत नाही. 
           गुन्हेगारी जगतात ओळखपत्र म्हणून आधारकार्डचा वापर होतो. एखाद्यानं जरी गुन्हा केला असेल तरी त्याला आधारकार्ड मागीतलं जातं व त्या कार्डावरुन त्यानं प्रत्यक्षात किती गुन्हे केले आहेत हेही ठरवलं जातं. 
           आधारकार्डद्वारे किती गाड्या कोणाजवळ आहेत. हेही कळतं. तसंच आधारकार्डद्वारे कोणता व्यक्ती कुठं आहे हेही माहीत होवू शकतं. जे काम मोबाईल करु शकतं. तेच काम आधारकार्ड देखील करु शकतं. 
          आधारकार्ड योजना........आधारकार्ड योजना आली, ती आणली गेली. हे एक चांगले पाऊल ठरले. त्या योजनेबद्दल काही लोकांच्या मनात संभ्रम आहेत. कोणी म्हणतात की ती योजना जनता पक्षानं आणली आणि कोणी म्हणतात की ती योजना कॉंग्रेस पक्षानं आणली. यात  एवढंच म्हणता येईल की ही योजना कॉंग्रेसनं आणली. त्यावेळेस ती ऐच्छिक स्वरुपाची होती वा तेवढ्या स्वरुपात अनिवार्य नव्हती. परंतु जसजसा काळ बदलला. तसतशी ती अनिवार्य वाटू लागली व ती योजना जनता पक्षानं अतिशय प्रामाणिकपणानं गरीब व सामान्य लोकांच्या फायद्यासाठी कार्यान्वीत केली असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 
           आता आधारकार्डच्या भारतातील जन्माची कथा अशी. केंद्र सरकारच्या नियोजन मंडळांतर्गत जानेवारी २००९ मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. २९ सप्टेंबर  २०१० ला आधार योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले व ते देशातील पहिले आधार गाव ठरले.  पंतप्रधान  मनमोहनसिंग, संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि यूआयडीएआयचे तत्कालीन चेअरमन नंदन निलेकणी त्या वेळी उपस्थीत होते. त्यावेळेस आधार क्रमांक नोंदणी व या क्रमाकांच्या विविध योजना तसेच खात्यामध्ये वापर करण्यासाठी प्राधिकरणाने ३५ राज्ये-केंद्रशासीत प्रदेश तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, सार्वजनिक बँका,  एल.आय.सी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या सर्व मुख्य संस्थाबरोबर करार केले. विविध बँकखाते व मंत्रालयानी टप्याटप्याने त्यांच्या योजना किंवा कार्यक्रमांसाठी ओळखपत्र म्हणून व त्याचा दाखला म्हणून आधार कार्ड वापरण्यास परवानगी दिली आहे. १५ फेबुवारी २०१६ पर्यंत सुमारे ९७.६९ कोटी आधार क्रमांक किंवा कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. म्हणजे साधारणत: ७५.८% लोकापर्यंत ही योजना पोहचली आहे, भारतीय आर्थीक पाहणी अहवाल २०१५-१६ नुसार ६ थेट लाभ हस्तातंर योजनांमध्ये आधार योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, एलपीजी सबसिडी वितरणात ५४.९६% , मनानरेगा योजनेत ५४.१०%, जन धन योजनेत ४२.४५%, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ३८.९६%, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता योजनेत २४.३१% व कामगार भविष्यनिर्वाह निधी योजनेत १७.५५% माहिती आधार क्रमांकाशी जोडली गेली आहे. जनधन -आधार -मोबाइल या त्रिसूत्रीमधला आधार हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.
            यात मी एवढंच म्हणेल की ही योजना कॉंग्रेसनं आणली. त्यावेळेस ती ऐच्छिक स्वरुपाची नव्हती वा तेवढ्या स्वरुपात अनिवार्य नव्हती. परंतु जसजसा काळ बदलला. तसतशी ती अनिवार्य वाटू लागली व ती योजना जनता पक्षानं अतिशय प्रामाणिकपणानं गरीब व सामान्य लोकांच्या फायद्यासाठी कार्यान्वीत केली असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.           
           महत्वाचं सांगायचं झाल्यास आधार योजना ही लोककल्याणकारी योजना बनलेली आहे. या योजनेंतर्गत कुणालाही आता आपला पैसा वा मालमत्ता लपवता येत नाही. ती मालमत्ता वा तो पैसा आपोआपच दिसून येतो. तरीही काही लोकं हा पैसा दाबून ठेवतात. तो थेट विदेशी बँकेत स्थलांतरीत करतात. कसा करतात ते त्यांनाच माहीत. शिवाय महत्वाचा धोका म्हणजे आधार योजनेंतर्गत माहीत झालेला लोकांचा पैसा हा दिसत असल्यानं तो चोरुनही घेवू शकतात हा संभाव्य धोका टाळता येत नाही.
         विशेष म्हणजे आधार योजना ही चांगली आहे. तशीच ती चांगल्या साठीच आहे. चांगली वापरली तर......जर तिचा गैरवापर झाला तर ती गैरव्यवहारासाठी गैरफायद्याचीही ठरु शकते हेही लक्षात घेण्याची गरज आहे हेही तेवढंच खरं. त्यामुळंच या योजनेचा शक्य तेवढ्या प्रमाणात वापर चांगलाच करावा. इमानदारीनं टॅक्स भरावा व इमानदारीनं वागावं. जेणेकरुन आपल्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही. हेही तेवढंच खरं.  त्यातच आपलंही भलं आहे आणि इतरांचेही भलं आहे. त्याचबरोबर देशाचंही भलं आहे. नाहीतर ही योजना जरी चांगली असली तरी फसवी ठरु शकते. एवढंच सांगणं आहे.

 **********************************************************

             आधारकार्ड........सर्वांनी आधारकार्ड आणलं होतं. मात्र शिवाला सांगूनही शिवानं आधारकार्ड आणलं नव्हतं. तसा तो आधारकार्ड आणण्यासाठी माघारी गेला. त्याला बराच वेळ लागला. तसा तो या प्रवासात नवीनच होता. ते पाहून रत्नेश त्याच्या मागावर गेला. त्यानंतर काही वेळानं दोघंही सोबत सोबत आले व सर्वजण चालायला लागले. 
         तो रस्ता व त्या रस्त्यातील ते मनोहारी दृश्य सर्वांचं लक्ष आकर्षीत करीत होतं. त्याच रस्त्यानं जातांना एक भजनसंध्या दिसली. ते बोल तेलगू भाषेतील असल्यानं ते भजन समजत नव्हतं. मात्र ते भजनच असेल असा अंदाज शंकरनं लावला. ते मित्र तसे पुढे सरकत होते. तसं वराह मंदिर आलं. ज्या मंदिरात वराह अवतारातील श्रीहरी विष्णू होते. ज्या विष्णूनं वराह अवतार घेवून पृथ्वी वाचवली होती व त्याच विष्णूनं हिरण्याक्ष या राक्षसवीराला याच अवतारात येवून ठार केलं होतं. 
         सर्व मित्रमंडळ वराह मंदिरात रांगेत लागलं व त्यांनी रांगेनुसार श्रीहरी विष्णूचं दर्शनही घेतलं. त्यानंतर ते सर्वजण जेवनकक्षाकडे गेले. तिथं भात व वरणावर ताव मारला व त्यानंतर ते सर्वजण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी मंदिराच्या गर्भगृहाकडे निघाले. 
         ते गर्भगृह.........जवळपास तीन चार किमी होतं. टॅक्सीनं गेल्यास एका किमीचे वीस रुपये. तसंच त्या ठिकाणी तिकीटाही होत्या. पाचशे रुपयेवाली रांग, तिनशे रुपये वाली रांग. 
           शंकर तिनशे रुपयेच्या रांगेजवळ आला होता. त्यांनी तिकीट पाहिली. त्यानंतर भाकीत काढलं की तुमच्या तिकीटावर सकाळी चारची वेळ आहे. तुम्ही सकाळी चारला याल.
            तिकीट रांगेचा पैसा. तसं मित्रमंडळ चौकशी करीतच होतं. त्यावर एक उपाय काढल्या गेला. तोही विचारुनच की आता जर दर्शन करायचं असेल तर काय करावं लागेल. तसे सर्वजण सक्रीय होवून आपापलं मत देवू लागले.
            सर्वांचं मत त्यावर एकत्र आलं होतं. सर्वांनी ठरवलं आता संबंधीत रात्र गेली तरी चालेल  परंतु आज दर्शन करुनच घ्यायचं. तसं पाहता दुस-या दिवशी दर्शन करण्यात एक अडचण होती. सकाळीच चारच्या दर्शनासाठी दोन वाजता उठणं होतं. त्यानंतर अंघोळ करणं होतं व लगबगीनं दर्शनरांगेसाठी येणं होतं. ही सर्व दगदगच होती. त्यामुळंच की काय, आजच दर्शन घ्यायचं सर्वांनी ठरवताच सर्वजण दर्शनरांगेकडे चालू लागले. तसं त्या दर्शनरांगेचं शेवटचं स्थान आलं. जिथं पास बनल्या. 
         ते पास बनविण्याचं स्थान. त्या ठिकाणी पास बनल्या व पासवर दर्शनाची वेळ टाकण्यात आली. ती साडे अकराची होती. त्यानंतर सर्वजण एका सभागृहात गेले. तेथील दरवाजा बंद होता. तिथं तब्बल साडे अकरा पर्यंत लोकं थांबले होते. त्यानंतर साडे अकराला दरवाजा उघडला व सर्वजण त्या दरवाज्यातून आतमध्ये गेले. तद्नंतर एका तासातच सर्वांचं दर्शन झालं होतं. 
         ती रात्र होती. परंतु तिथं अगदी तो दिवसच वाटत होता. रांग हळूहळू सरकत होती. अशातच शंकरच्या मागं एक म्हातारा व्यक्ती उभा होता. शंकरला वाटलं की तो म्हातारा आहे. त्यानं उभं राहाणं जमत नाही. त्यामुळंच की काय, त्यानं त्याला आपल्या समोर करु पाहिलं. परंतु त्यावर तो माणूस खेकसला व त्याला नागद्वारची आठवण झाली. त्यानं पाहिलं की नागद्वारच्या यात्रेत लाखो जीव जातात. परंतु कोणाच्याच चेह-यावर राग वा लोभ दिसत नाही. एक सेवाभाव दिसतो. मात्र या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात लोभ नव्हता. परंतु राग तेवढाच कुटकूट भरलेला दिसला.
           शंकर रांगेत चालत होता. तसं त्या सर्वांना तिरुपतीच्या त्या बालाजीचं दर्शन झालं आणि त्या सर्वांना अनुभवास आला. तो पहाडात लपलेला आणि दगडाचा असला तरी साक्षात जीवंत वाटत असलेला तो बालाजी. तो बालाजी सर्वांना जीवंतच वाटत होता. असं वाटत होतं की तो बालाजी आपल्याकडं जणू चालून येत आहे. तसा भाष होत होता. तिथं दोन लामणदिवे सतत जळत असलेले दिसले. 
           शंकरनं त्याला मन भरुन पाहिलं. त्यानंतर तो बाहेर आला. तोच  त्याला दर्शन रांगेत लागण्यापुर्वीचा प्रसंग आठवला. रत्नेशला राजेश भाचाच म्हणत होता. रत्नेश व शिवाची इच्छा आजच दर्शन करायची होती. मात्र काही मंडळी सकाळी चारला दर्शन करु म्हणत होते. ते निवांत व शांतपणे झोपणार होते.
            दर्शन झालं होतं. मनात ठाणलं म्हणून दर्शन झालं होतं. नाहीतर सकाळ झाली असती आणि कदाचीत दुपारही उजळली असती दर्शनाला. कारण झोप. झोप एकदाची लागल्यावर उठणं कठीण झालं असतं व सर्वजण पहाटे चारला उठण्याऐवजी सकाळी सातला उठले असते. 
         दर्शन झालं होतं. दर्शन होताच सर्वजण दर्शन रांगेतून बाहेर आले. तेव्हा त्यांनी पाहिलं की काही लोकं नोटांचे बंडलं घेवून ते बंडलं हुंडीमध्ये टाकत होते. काही जण आपल्या गळ्यातील सोनं नाणं. काहीजण अंगठ्याही टाकत होते. त्यानुसार शंकरच्या गटातील काही लोकांनी आपल्या बोटातल्या अंगठ्याही त्या हुंडीत टाकल्या. त्यानंतर सर्वजण बाहेर आले. कुपन दाखवून लाडूही घेतले. पुढं सर्वजण बाहेर आले असता शिवा दिसत नव्हता. तो गायब झाला होता. त्यानंतर त्याला शोधायला मित्रांना पाठवण्यात आले. कारण तो नवीनच होता. 
          मित्रमंडळींनी शिवाला सर्वत्र शोधलं. परंतु शिवा काही मिळाला नाही. ते पाहून सर्वांनी शिवाला शोधण्यासाठी ते मित्रमंडळ जिथं थांबलं होतं. तिथं रवाना झाले. तेव्हा शिवा तिथं झोपलेल्या अवस्थेत सापडला. तशीच त्याच्या चेहर्‍यावर कोणतीच चिंता दिसली नाही.
          शिवा सापडला होता. तसं मित्रमंडळ परत आलं ते ज्या स्थानावर थांबले होते तिथं. रात्रीचे तीन वाजले होते. तसं कोणीतरी म्हणालं, 'आपण तिरुपती स्थानावर जायचं.' शेवटी त्यांनी निर्णय घेतला. 'आपण तिरुपती स्थानावर जायचं. तिथं आपल्याला चांगली झोप घेता येईल. इथं तेवढी चांगली झोप घेता येणार नाही.' 
            तो निर्णय. तो निर्णय घेताच त्यांनी गाडी ठरवली व ते तिरुपतीला आले. तिथं आल्यावर ते श्रीनिवास धर्मशाळेमध्ये आले. तेथे वातानुकूलीत कमरे पाहिले. ते न मिळाल्यानं त्यांनी तिथंच सभागृहात अंग टाकलं. त्यानंतर अंग टाकताच झोप केव्हा लागली तेही कळलं नाही.
           सकाळी सर्वजण उठले होते. ते सर्वजण चहा नाश्ता करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर शंकर उठला. त्यानं प्रातःविधी नुकताच आटोपवला. तोच विनोद म्हणाला, "आपण असं झोपण्यापेक्षा लॉज करुया."
          त्याचा तो प्रश्न. त्या प्रश्नाला रत्नेशनं दुजोरा दिला व तत्क्षणीच त्यांनी श्रीनिवासचं संभागृह सोडलं आणि ते कमरा बुक करण्यासाठी फिरले. तद्नंतर त्यांनी एक प्रशस्त कमरा शोधला. 
            तो कमरा......अगदी प्रशस्त होता. त्या कमऱ्यात एक टिव्हीही होता. एसीही होता एक. परंतु ना टिव्हीवर चॅनल बरोबर होते. ना तेथील एसी काम करीत होता. नुसता नावापुरताच लावला होता तो एसी. तसाच तेथील मॅनेजर दोन गाद्या वेगळ्या देईल. असं म्हणत होता. परंतु वेळ निघून गेली तरी गाद्या अजूनपर्यंत आल्या नव्हत्या. तसं पाहता त्या गाद्यांसाठी त्रागाच करावा लागला. अर्थात सतरा वेळा टोकावे लागले. 
           पलंगावर गाद्या होत्या. परंतु जागा कमी पडत होती. म्हणूनच दोन गाद्या वेगळ्या स्वरुपात मागाव्या लागल्या होत्या. त्या कमऱ्यात एसी नव्हता. परंतु त्या मित्रमंडळींसाठी तो कमरा म्हणजे आनंदाची पर्वणीच होता. तो कमरा बुक करताच त्या मित्रमंडळींनी त्या कमऱ्यात एवढी मौजमजा केली की शब्दात मांडणे कठीण आहे. 
           त्यांनी अख्खा दिवस मौजमजा करण्यात घालवला होता. तशी रात्र झाली. रात्रीला जेवन घ्यायचं होतं. सर्वांनी जेवन हॉटेलात करायचं ठरवलं. तसं पाहता तिथं एकच हॉटेल होतं की जिथं ते मित्रमंडळ राहात होतं, त्या ठिकाणचं जेवन मिळत होतं. बाकी हॉटेलातील जेवन त्याच भागातील होतं. ते बरोबर लागणार नव्हतं. त्याचा आश्वाद त्यांनी त्यापुर्वी बरेच वेळा घेतलेला होता. त्यामुळंच ते महाराष्ट्रीयन असलेल्या हॉटेलात जेवन करणार होते. 
          रात्रीचे नव वाजले होते. तसं कोणीतरी म्हणालं, 
         "अरे लवकर चाला. ते हॉटेल दहा वाजता बंद होते. मग आपल्याला जेवन मिळणार नाही."
             मग काय, तसं म्हणताच सर्वजण त्या हॉटेलच्या दिशेनं निघाले व त्या हॉटेलातील खमंग जेवनावर त्यांना ताव मारता आला. जेवनातील वेगवेगळे जिनस व गव्हाच्या पोळ्या तसेच महाराष्ट्रीयन भाज्या चाखून मन तृप्त झालं होतं. 
          जेवन झालं होतं. तसं मित्रमंडळींनी त्या जेवनाचा खमंग आस्वाद घेतला व ते बाहेर पडले. त्यानंतर ते मित्रमंडळ शतपावली करीत चालत होते. तसं ते मित्रमंडळ रस्त्यावरही मौजमजा करीत चालत होतं. तोच रत्नेशला एक व्यक्ती पुलाच्या पारावर झोपलेला आढळला. त्याला वाटलं की हा पुलाच्या पारावर झोपलेला व्यक्ती झोपेत कड पालटत असतांना पुलाच्या खाली पडला तर.......तर कदाचीत तो मरुन जाईल. असं वाटताच त्यानं वात्रटपणानं त्याचा एक पाय पकडला व तो पाय खेचत म्हणाला, 
          "ऊठ, पडशील नाही का पुलाच्या खाली. पुलाच्या पारावर झोपते. समजत नाही का?"
           गाढ झोपलेला व्यक्ती. त्याला गाढ झोप लागली होती. त्याला रत्नेशनं उठवताच तो आगबबूला झाला. त्यातच त्याला रत्नेशचा भयंकर राग आला. परंतु त्यानं पाहिलं की तिथं भरपूर लोकं आहेत. म्हणूनच तो गप्प राहिला व तो तेथून काहीतरी म्हणत निघून गेला. तसं पाहता त्यांना मराठी येत नव्हतीच आणि या मित्रमंडळींना तिकडील भाषा येत नव्हती. तो व्यक्ती उठला तर खरा. परंतु तो काहीतरी बडबडत गेला होता. जणू तो रत्नेशला त्याच्या भाषेत शिव्याच हासडत होता. 
           सर्वजण मौज करीत करीत आपल्या कमऱ्यात आले होते. त्यानंतरही त्यांना झोपायला बराच वेळ लागला. कितीतरी वेळ ते गोष्टी करीत होते. खोडकरपणाही करीत होते. काही वेळाचा अवकाश. एसी काम करीत नसल्यानं शिवा खाली टाकलेल्या गादीवर येवून झोपला. ज्या खाली टाकलेल्या गादीवर शंकर आधीच येवून झोपला होता. तसं मित्रमंडळ काही क्षणातच झोपेच्या आहारी गेलं होतं. परंतु रात्रीच्या त्या चिरशांततेत कोणीतरी आपल्या घोरण्यानं ती शांतता भंग करीत होतं. तसं निदर्शनास येत होतं. शंकर मात्र गाढ झोपलेला होता. त्यालाही दुषणे देत काहीजण बोलतच होते.
           सकाळ झाली होती. तसे काही मित्र लवकर उठले होते. राजेश व राजू लवकर उठून बाहेर फिरायला गेले होते. काहीजण ब्रश करीत होते. अशातच शंकर उठला. रात्री सर्वजण उशिरा झोपल्यानं अजुनही ते झोपलेलेच होते. परंतु परतीची गाडी तीन वाजता असल्यानं तो कमरा सकाळी आठ वाजताच सोडणं भाग होतं. नाहीतर वेळ झाला असता व गाडी सुटली असती. मग फार मोठी पंचायत झाली असती. तेच हेरुन शंकर उठला. 
           शंकर उठला तेव्हा सकाळचे सात वाजले होते. त्याला ती गाडीची वेळ आठवली. तसं एका तासात सर्व आटोपवणं भाग होतं. त्यानं जवळपास असलेला मोबाईल पाहिला. त्यात सात वाजल्याचे निदर्शनास आले. तसं त्यानं सर्वांना जोरजोरात आवाज देवून उठवलं. सर्वजण हळूहळू उठले. त्यांनी प्रातःविधी आटोपवला. परंतु अजुनही राकेश व शिवा उठायचाच होता. शिवा सर्वात शेवटी उठला व त्यानंही लगबगीनं अंघोळ व प्रातःविधी आटोपवला व सर्वजणांनी कमरा सोडला व ते तेथून निघाले. तोपर्यंत दहा वाजले होते.
         तो दहाचा काटा. तो काटा खुणावत होता की तुम्हाला वेळ बराच होणार आहे. तसं पाहता त्यांनी बसस्टॉपच्या जवळपासच कमरा बुक केला होता. तसे ते पायी चालत होते. तसं बसस्टॉप जवळपासच असल्यानं लवकरच बसस्टॉप आलं. त्यानंतर ते गाडीत बसले व गाडी कालाहस्तीसाठी रवाना झाली.
            गाडी कालाहस्तीला पोहोचली होती. तसं शंकरला कालाहस्तीचं आकर्षण वाटत होतं. कालाहस्ती म्हणजे नेमकं काय? वैगेरे गोष्टी त्याच्या मनात आव धरुन होत्या. 
          गुटूर.........गुटूर नावाचं ते ठिकाण. त्या ठिकाणाहून गाडी होती. जातांना गाडी तिरुपती स्टेशनावर थांबली होती. परंतु येतांना तिरुपतीवरुन रिझर्वेशन मिळालं नव्हतं. ते रिझर्वेशन गुटूरवरुन मिळालं होतं. त्यामुळंच गुटूरला जाणं भाग होतं. गुटूरला जातांना रस्त्यात कालाहस्ती नामक एक स्थळ लागत होतं. त्यामुळंच सर्वांनी ठरवलं की कालाहस्तीला स्टॉप घ्यायचा. परंतु जास्त थांबायचं नाही. कारण वेळ बराच झाला आहे. 
            सर्वजण कालाहस्तीला उतरले व त्यांनी सामानाची व मोबाईलची विल्हेवाट लावली. कारण मोबाईल व सामान आतमध्ये नेता येत नव्हतं.
            कालाहस्ती.......कालाहस्तीचं मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुपती शहरापासून जवळपास काही किमी वर आहे. या ठिकाणी एक शिवमंदिर आहे. हे मंदिर स्वर्णामुखी नदी काठावर वसलेलं आहे असे लोकं म्हणतात. हे मंदिर कालाहस्ती नावानं प्रसिद्ध आहे. 
          दक्षिण भारतात शिवलिंगाला पंचतंत्र लिंग मानलं जातं. कालाहस्ती इथं वायुतत्व लिंग आहे. म्हणतात की या स्वर्णामुखी नदीत पाणी कमी प्रमाणात असतं. 
           कालहस्तीला श्रीकालहस्ती असंही म्हणतात. श्री अर्थात मकडी, काला अर्थात साप व हस्ती अर्थात हत्ती असंही नामाभिधान आहे व ही कथा यावरच आधारीत आहे. याच ठिकाणी राहू केतूदोषाची पुजा करुन राहू व केतू दोष दूर केला जातो. याची दुसरी कथा पुढीलप्रमाणे सांगता येईल. म्हणतात की फणेश व नील नावाचे दोन भीलकुमार होते. त्यांनी शिकारीदरम्यान पहाडावर एक शिवलिंग पाहिलं. नील त्या लिंगाचे रक्षण करण्यासाठी तिथंच थांबला व फणेश  घरी परत आला. नीलने पुर्ण रात्र त्या लिंगाचे रक्षण यासाठी केले की त्याला वाटलं कोणी जंगली जनावर येवून ते लिंग नष्ट करेल. सकाळ होताच नील पुन्हा वनात गेला. त्यानं हातात धनुष्य आणला व केसात फुले आणली. तोंडात पाणी भरुन आणलं व एका हातात मांस आणलं. त्यानंतर त्यानं आपल्या तोंडातून भगवान शिवाच्या लिंगावर पाणी टाकून त्याला अंघोळ घातली. त्याचे दोन्ही हात खाली नसल्यानं आपल्या पायानं त्या लिंगाच्या सभोवतालची जागा स्वच्छ केली. त्यानंतर केसात गुंफलेली फुलं त्या लिंगावर टाकली. लगेच भोग म्हणून मांसाचा तुकडाही त्या लिंगावर अर्पण केला. 
          तो दिवस तसाच निघून गेला. तसा दुसरा दिवस उजळला. या दिवशी पुन्हा नील जंगलात गेला. या दिवशी काही पुजारी नील जंगलात जाताच तिथं आले. त्यांनी मांसाचा तुकडा हलवला व जागा स्वच्छ केली. तसा हा क्रम दररोज चालायला लागला. नील दररोज यायचा. साहित्य आणायचा व ते साहित्य लिंगावर चढवायचा व पुजारी यायचे. ते साहित्य फेकून द्यायचे व जागा स्वच्छ करुन जायचे. तसा तो एकदाचा दिवस उजळला. त्या दिवशी पुजारी लपून राहिले. त्यांना माहीत करुन घ्यायचं होतं की इथं मांसाचा तुकडा कोण आणतो. तसंच मंदिर दुषीत कोण करतं.
          काही वेळाचा अवकाश. जेव्हा नील जंगलातून परत आला. तेव्हा त्यानं पाहिलं की त्या लिंगाला डोळे आलेले आहेत व ते डोळे उघडलेले आहेत. तसंच एका डोळ्यातून रक्तही निघत आहे. त्यातच नीलला समजलं की कोणीतरी लिंगाला क्षतिग्रस्त केलं आहे. त्यानंतर त्यानं आपल्या बाणावर प्रत्यंचा चढवली व तो शत्रूचा शोध घेवू लागला. त्याला कोणीही दिसलं नाही. ते पाहून त्यानं परत जंगलातून जडीबुटी आणली व त्यानं लिंगाच्या डोळ्याला लावून त्याचा उपचार केला. परंतु लिंगाच्या नव्हे तर प्रत्यक्षात देवाच्या डोळ्यातून निघणारी रक्तधारा बंद झाली नाही. ते पाहून त्याला पुर्वजांनी सांगीतलेल्या गोष्टी आठवल्या. माणसाचे घाव माणसाचे चामडे लावल्यास भरतात. ते आठवताच नीलनं आपल्या जवळील बाणाच्या साहाय्यानं आपला एक डोळा काढला व तो घावावर लावला. त्यानंतर त्या लिंगाच्या एका डोळ्यातून रक्त वाहाणं बंद झालं. 
           ही वास्तविकताच होती. ही वास्तविकताच जंगलात लपलेले पुजारी पाहात होते. तेही आश्चर्यचकीत झाले होते. तोच मुर्तीच्या दुस-याही डोळ्यातून रक्तधारा वाहायला लागली. त्यानंतर नीलनं त्या डोळ्यावर आपल्या पायाचा अंगठा लावला. जेणेकरुन आंधळं झाल्यावर त्याला लिंगाचा डोळा समजू यावा. त्यानंतर त्यानं आपला दुसरा डोळाही काढला व तो त्या लिंगाच्या दुसऱ्या डोळ्यावर लावला. जसा नीलनं आपला दुसरा डोळा लिंगाच्या डोळ्यावर लावला. तसा त्या ठिकाणी तेजोमय प्रकाशपुंज तयार झाला. तो भाग प्रकाशमान झाला. भगवान शिव स्वतः तिथं प्रकट झाले. त्यांनी स्वयं नीलची परीक्षाच घेतली होती. भगवान शिवाने प्रत्यक्षात प्रकट होवून नीलचे हात पकडले. त्यानंतर त्यांना त्यांनी शिवलोकात नेलं. त्यांनी नीलचं नावही बदलवलं व त्याचं नवीन नाव ठेवलं. सेकण्णप्प. 
           सेकण्णप्पने भगवान शिवाला जरी मांस चढवलं असलं तरी त्याची भक्ती ही अपार होती. त्यामुळंच की काय, जंगलातील भीलही त्याचा भक्त बनला होता. 
           कैलासगीरी.......स्वर्णामुखी नदीजवळ एक पहाड आहे. या पहाडाला कैलासगीरी म्हणतात. म्हणतात की नंदीश्वरनं कैलासचे तीन शिखर पृथ्वीवर स्थापीत केले. त्यातील एक शिखर म्हणजेच ही पहाडी आहे. याच पहाडीच्या खाली श्रीकालहस्तीश्वराचं मंदिर आहे आणि ते मंदिर भव्यदिव्य स्वरुपाचं आहे. मंदिराच्या दर्शनी भागात तीच लिंगाची मुर्ती आहे. ज्या लिंगाच्या मुर्तीच्या डोळ्यावर नीलनं आपले स्वतःचे नेत्र लावले होते. ते वायुतत्व लिंग आहे. म्हणतात की या लिंगाला पुजारी देखील स्पर्श करीत नाहीत. मुर्तीच्या जवळच स्वर्णपट्ट आहे. याच ठिकाणी हारफुले चढवली जातात. या मुर्तीवर मकडी, हत्ती आणि साप यांची पदचिन्हं दिसतात. तसंच असंही म्हटलं जातं की सर्वात प्रथम मकडी, साप व हत्तीनं भगवान शिवाची आराधना केली होती. त्याचीही एक कथा या मंदिराच्या कथानकाशी जुळलेली आहे. श्रीचा अर्थ मकडी, काला चा अर्थ साप व हस्तीचा अर्थ हत्ती असा होतो. म्हणतात की श्रेष्ठ कोण यावरुन या तिघांमध्ये स्पर्धा लागली होती. त्यांनी या लिंगाला लपेटून तपश्चर्या केली नव्हे तर भगवान शिवाची आराधना केली. त्यामुळंच या लिंगावर त्यांचे पदचिन्हं उमटलेले दिसतात. भगवान शिवानं त्यांना दर्शन दिलं व म्हटलं की कलियुगात हे स्थळ त्यांच्याच नावानं प्रसिद्ध पावेल. त्याच तथ्यावरुन या स्थळाला श्रीकालहस्ती असे नाव आहे. 
           मंदिराच्या आग्नेय कोनात पहाड कापून एक सभामंडप बनवला आहे. ज्याचं नाव मणिगण्णियगट्टम आहे. म्हणतात की या नावाची एक भक्त झाली होती. तिच्याच नावावरुन या सभामंडपाचं नाव मणिगण्णियगट्टम पडलं. तिच्या कानात भगवान शिवानं तारकामंत्र फुंकला होता. मंदिराच्या जवळच एक पहाड आहे. या पहाडावर अर्जुनानं तपश्चर्या केली होती. इथंच भगवान शिवानं पाशुपतास्र अर्जुनाला दिलं होतं. तिथंच एक शिवलिंग आहे. म्हणतात की ते शिवलिंग अर्जुनानं बनवलं आहे. त्याच शिवलिंगाचं पुढं कण्णप्पनं पुजन केलं. म्हणूनच या स्थानाला कण्णप्पेश्वर म्हटलं जातं. याच ठिकाणी एक लहानशी कण्णप्प भीलची मुर्तीही आहे. पहाडातून उतरताना एक सरोवर लागतं. म्हणतात की नील याच सरोवरातून तोंडात पाणी भरुन आणायचा व त्याच पाण्यानं लिंगाचा अभिषेक करायचा. त्यामुळंच या सरोवरातील पाण्याला पवित्र तीर्थ मानलं गेलं आहे. याच पहाडीच्या पाठीमागं एक वस्ती आहे. या वस्तीत एक मंदिर आहे. हे मंदिर दुर्गामंदीर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर एका शक्तीपीठापैकी एक आहे.
            गाडी कालाहस्तीला थांबली. तसे सर्वजण भराभर गाडीच्या खाली उतरले. वेळ होवू नये म्हणून सर्वांना सुचना देण्यात आल्या की कुणीही जास्त वेळ लावू नये. लवकर लवकर दर्शन करुन परत यावं. दर्शनाला रांग जास्त मोठी असल्यास दुरुनच नमस्कार करावा व परत यावं. गाडी सापडायला हवी. 
          परतीच्या प्रवासाची गाडी तीन वाजता होती. ती वेळेवरच येणार होती. त्यामुळंच ती सुचना  त्या सुचनेची अंमलबजावणी करायची होती. न केल्यास तोच व्यक्ती जबाबदार राहणार होता. सर्वांनी होकार दिला व सर्वजण भराभर दर्शनासाठी चालायला लागले. मोबाईलला आत नेल्यास प्रवेश नव्हता. त्यामुळंच तो आधीच बाहेर ठेवला होता. त्यामुळं वेळ पाहायला पुरेसा पर्यायही नव्हता. त्यामुळं वेळ होवू नये म्हणून काही जणांनी भराभर दर्शन केलं. ज्यात शंकर, रत्नेश, राकेश, राहूल आणि इतर काही मंडळी होती. ते बिचारे वेळ लागू नये व आपण स्वतः जबाबदार ठरु नये म्हणून भराभर दर्शन करुन बाहेर पडले. त्यातच रत्नेशनं वेळ लागू नये म्हणून सर्वांना बाहेरुनच दर्शन करायला भाग पाडलं व काहीजणांना बाहेर काढलं. रत्नेशबरोबर काही मित्र बाहेर निघाले. ते मंदिराच्या दरवाज्याजवळ वाट पाहू लागले आपल्या बाकीच्या मित्रांची. तसा अर्धा तास झाला. 
         अर्धा तास वाट पाहण्यात निघून गेला. मित्रमंडळ कुठं अडकलं होतं.  याचा थांगपत्ता नव्हता. ते पाहून व वेळेचं भान लक्षात घेवून रत्नेश शंकरला म्हणाला,
           "जरा, जावून पाहा. ते कुठे लटकले तर........"
            रत्नेश स्पष्टवादी व्यक्ती होता. स्पष्टवादी व्यक्तीमत्वाचा होता. त्याला खोट्या गोष्टी आवडत नव्हत्या. तो नियमानं चालणारा व्यक्ती होता. रत्नेशनं तसं म्हणताच शंकर त्यांना पाहायला आतमध्ये गर्भगृहात गेला. परंतु मित्रमंडळाची चमू त्याला दिसली नाही. तसा तो परत आला. त्यानंतर काही वेळ अजून वाट पाहिली. आता तब्बल एक तास झाला होता. तशी ती बाहेर निघालेली मंडळी चिंताग्रस्त झाली होती. कारण वेळ होत होता. गाडी सापडेल की नाही ही चिंता होती. कारण गाडी सुटून गेल्यावर रिझर्वेशनचा सवाल होता. शिवाय दुसरी गाडी करायची झाल्यास तिच्यात गैरसोय होणारच होती. व्यतिरीक्त वेळही वाया जाणार होता. तसं पाहता गाडी सुटल्यास बरेच प्रश्न उपस्थीत राहणार होते. अशातच ती गाडी पकडण्याचं ठिकाण कालहस्तीपासून बरंच लांब होतं. या सर्व प्रश्नांचा विचार करुन शंकर दुसऱ्यांदा त्या मित्रमंडळाला पाहायला मंदिरात गेला. तेव्हा ते मित्रमंडळ जेवन करण्यासाठी जेवणाच्या रांगेत बसलेले आढळले. त्यांनी तसं जेवन करण्याचा निर्णय वेळेवर घेतला होता. जो निर्णय रत्नेश व शंकरला माहीत नव्हता. ज्यात राकेश व राहूलही समाविष्ट नव्हता. 
          जेवणाचा त्या मित्रमंडळींचा निर्णय. त्यातील काहीजण शंकरला जेवन करण्यासाठी खुणावत होते. परंतु शंकर जेवणार कसा? कारण बाहेर रत्नेशसह बरीच मंडळी होती. तसं जेवन करणं म्हणजेच रत्नेशसह बाकी मंडळींना धोका देण्यासारखं होतं. शंकरला वाटत होतं की या मंडळींनी रत्नेशसह बाकी मित्रांना धोका दिलाय.  त्यांनी वेळेवर निर्णय बदलला व ते जेवन करायला बसले. परंतु आपण तसं करायचं नाही. आपण बाहेर यायचं. 
           शंकरनं बाकी जेवन करायला बोलावणा-या मित्राचं काहीएक ऐकलं नाही व तो बाहेर आला. त्यानं रत्नेश आणि बाकी मित्रांना ती बाब सांगीतली. ती बाब ऐकताच रत्नेशचं डोकं घुमलं. त्याला भयंकर राग आला आणि का येणार नाही तो राग? रत्नेशसह दर्शन व्यवस्थीत न झालेल्या बाकी मित्रांनाही राग आला व रागाच्या भरात रत्नेश आत गेला. त्याला अतिशय चीड आली होती व तो एवढा भडकला होता की तो आतमध्ये जावून आपल्याच जेवायला बसलेल्या मंडळींची चांगलीच खरडपट्टी काढून आला.
            काही वेळाचा अवकाश. मित्रमंडळ खमंग जेवन करुन बाहेर आलं. त्यानंतर अगदी लगबगीनं ते चालायला लागले. कारण वेळ बराच झाला होता. सगळेजण मुकाट्यानं चालायला लागले. कोणी कोणी सफाई द्यायला लागले. परंतु वेळेसमोर सफाई कशी चालणार? 
           सर्वांनी लगबगीनं ऑटो पकडला. एसटी स्टँडवर आले. एसटी लागूनच होती. ताबडतोब ते एसटीत बसले. तशी एसटी सुरु झाली. 
             एस टी सुरु झाली होती. ती भरधाव चालायला लागली होती. काही वेळ असाच गेला. छाती वेळेसमोर धडधडत होती. सर्वजण मोबाईलवर गाडीचा वेळच पाहात होते. रत्नेशसह बाकीजण संकेत देत होते. गाडी पंधरा मिनीट लेट आहे. काहीवेळातच संकेत प्राप्त होत होते. गाडी वेळेनुसार राईट टाईम धावत आहे. जसजसे गाडी वेळेवर धावण्याचे संकेत मिळायचे. तसतशी छाती धडधडायची आणि ती लेट धावत आहे असं म्हणताच थोडा सुस्कारा लाभायचा. 
          गाडीचा असा लपंडाव खेळ. वेळेसमोर माणसाचं चालत नाही. ती नैसर्गिक असते. माणसं चुका करतात. त्याला त्या वेळेची किंमत कळत नाही. ती किंमत मुळात लक्षात घेतली पाहिजे. वेळ बहुमुल्य असतो. जो वेळेची कदर करतो. काळही त्यांनाच मदत करतो. जो वेळेची कदर करीत नाही. काळही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करीत नाही. बरं झालं की या ठिकाणी त्या मित्रमंडळींचं दैव बलवत्तर होतं म्हणून. नाहीतर त्यांना गाडीच सापडली नसती. ते जेव्हा रेल्वेस्टेशनवर पोहोचले. तेव्हा फक्त गाडीला दहाच मिनीट वेळ होता. फक्त दहाच मिनिटात गाडी स्टेशनवर आली. जर दहा मिनीटे मित्रमंडळांना वेळ झाला असता तर ती गाडी त्यांना सोडून निघून गेली असती व त्यांना नंतर पश्चातापाशिवाय पर्यायच उरला नसता. 
           वेळ.......वेळ एवढी महत्वाची असते की वेळेसाठी प्रसंगी जेवनखावण सोडावंच लागतं. बरं झालं की या प्रवासात वेळेवर ऑटो मिळाला. वेळेवर बस मिळाली. तिही लवकर लवकर भरधाव चालली . तिच्यात काही प्रॉब्लेम आले नाही. ना ऑटो पकडण्यात प्रॉब्लेम आले. म्हणूनच गाडी सापडली. जर ऑटोत किंवा बसमध्ये दहा मिनीट जर प्रॉब्लेम आले असते, तर चित्र काही वेगळेच असते हे नाकारता येत नाही. वेळ ही पाळायलाच हवी. जो वेळ पाहत नसेल तर तीच वेळ त्याला केव्हा धोके देईल व त्याच्या समोर केव्हा संकट उत्पन्न करेल ते सांगता येत नाही. म्हणतात ना की जो वेळ पाहत नाही. त्याचा कार्यभागच बुडतो.
         वेळ ही प्रत्येकांनी पाळायलाच हवी. जो वेळ पाळत  नसेल, त्याला वेळ ही नक्कीच कधी ना कधी धोके अवश्य देत असते. मग ती त्या माणसातील चांगल्या वाईट गुणांचा विचारही करीत नाही. 
          आपण भारतात राहतो. या देशाला नवरत्न खाणच म्हटलं आहे. याचं कारण आहे या देशातील लोकांत असलेला चपळपणा व या देशातील लोकांमध्ये असलेलं बुद्धीचातुर्य. तसं पाहता भारतीय लोकं वेळ काटेकोरपणे पाळतात असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. काही लोकं असेच इमानदार आहेत की जे वेळेला अतिशय महत्व देतात. परंतु आजचा काळ पाहता बरेचसे असे भारतीय आढळून येत आहेत की जे अजिबात वेळ पाहत नाहीत. त्यातच त्यांना वेळ होतो व हीच वेळ त्यांच्यावर स्वार होवून त्यांचा अपघात घडवून आणते. आज भारतात एखादं वर्तमानपत्र उघडलं की हमखास बातमी दिसते. अमूक अमूक ठिकाणी अपघात झाला. कसा झाला? त्याचं कारण असतं त्यांनी न पाळलेली वेळ.  आपणही तशी वेळ पाळत नाही. कुठं जायचंच असल्यास हमखास उशिरा निघतो. मग वेळ झाला म्हणून लगबगीनं निघतो. त्यावेळेस आपल्याजवळ गाडी असेल तर आपली गाडी एवढी वेगात असते की समोरुन एखादं वाहन आलंच तर आपल्या गाडीचे अचानक ब्रेक लागत नाहीत. मग आपला अपघात होतो. त्यावेळेस आपण तो दोष आपल्या स्वतःला देत नाही. दुसऱ्यांना देतो.  विचार करीत नाही की जर मी थोडा लवकर निघालो असतो, तर माझा अपघातच झाला नसता. 
         महत्वपुर्ण गोष्ट सांगायची झाल्यास आपण वेळ पाळलीच पाहिजे. मग तो कार्यक्रम किरकोळच का असेना, परंतु यातूनच आपल्याला वेळ पाळायची सवय पडते. आपण जर वेळ पाळत असेल तर ते पाहून तीच सवय आपल्या पाल्यांनाही लागते. म्हणूनच आपण वेळ पाळायला हवी. ती केवळ वेळच पाळू नये तर तिचं काटेकोर पालनही करायला हवं. वेळ पाळण्यासाठी दिरंगाई करु नये. 
           वेळेसमोर माणसाचं काहीच चालत नाही. ती नैसर्गिक बनावटीची असते. माणसं चुका करतात. कारण त्याला वेळेची किंमत कळत नाही म्हणून. ती किंमत मुळात लक्षात घेतली पाहिजे. वेळ बहुमुल्य असतो. जो वेळेची कदर करतो. ती वेळंही त्यांनाच मदत करते. जो वेळेची कदर करीत नाही. काळही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करीत नाही. कधी कधी एखाद्या वेळेस फावतं. कारण या ठिकाणी त्या मित्रमंडळींचं दैव बलवत्तर असतं. नाहीतर त्यांना ती वेळ रस्ताच दाखवत असते. 
          वेळ....... वेळ एवढी महत्वाची असते की वेळेसाठी प्रसंगी जेवनखावण सोडावंच लागतं. कधी वेळ झालाच तर प्रवासात वेळेवर ऑटो मिळत नाही. वेळेवर बस मिळत नाही. कधी रेल्वे निघून जाते. कधी बाहेरगावची गाडी पकडायची असल्यास आपल्याच गाडीत प्रॉब्लेम येतो  कधी पंचरच होते आपली गाडी. अन् वेळ पाहून थोडे लवकर निघालो तर तिच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. ही वास्तविकताच आहे. कधी कधी  ऑटो पकडण्यातही प्रॉब्लेम येत असतो. म्हणूनच वेळेला महत्त्व देवून वेळ पाळायलाच हवी. जर ऑटोत किंवा बसमध्ये दहा मिनीट जर प्रॉब्लेम आले, तर चित्र काही वेगळेच असते हे नाकारता येत नाही. कदाचीत आपल्याला कार्यक्रमात जायलाही उशीर होवू शकतो आणि वेळ जर पाळली नाही तर एखाद्या नोकरीसाठी असलेला पेपर देता येत नाही वा इंटरव्ह्यूही देता येत नाही व आपण जीवनभरासाठी कामधंद्यालाही मुकू शकतो. 
          विशेष सांगायचं झाल्यास वेळ जर पाळली नाही तर क्षणात मृत्यू येवू  शकतो आणि क्षणातच जीवनही लाभू शकते. हेही तेवढंच खरं आहे. म्हणून काही का होईना, वेळ ही पाळायलाच हवी. तिला टाळून वा तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. जर आपण तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास एक दिवस तिही आपल्याकडे दुर्लक्ष करते आणि मग जे व्हायचं ते होते. ते पाहायलाही आपण य धरेवर नसतो. मग बाकीची मंडळी पश्चाताप करीत असतात की त्यानं जर वेळ पाळली असती तर बरे झाले असते.
              ते दहा मिनीटं......ते दहा मिनीटं महत्वाचे होते. ते दहा मिनीटं जर वाचले नसते तर गाडीच सापडली नसती. 
              दहा मिनीटाचा अवधी निघून गेला. त्यानंतर गाडीचा सायरन वाजला व गाडी आली. ती रेल्वेफलाटावर थांबली. भराभर सगळं मित्रमंडळ गाडीत चढलं. त्यांनी आपआपल्या जागा शोधल्या. त्या घेतल्या व ते मौजमजा करीत बसले. शंकरही आपल्या सीटवर बसला होता. अशातच शंकरला त्थाचा शिमला प्रवास आठवला. शिमल्याला असतांना गाडी आठ वाजताची आहे हे मित्रमंडळ विसरुन गेलं होतं. ते सामानाची खरेदी करण्यात मश्गुल होते. तशी ती शेवटचीच गाडी होती आठ वाजताची. त्या मित्रमंडळाचा सोलनला मुक्काम होता. सोलन ते शिमला जवळपास पंचवीस किमी होतं. अशातच गाडीची शिटी ऐकायला आली व मित्रमंडळ धावायला लागलं. त्यांनी तिकीटाही काढल्या नाहीत. तसे ते चढायला लागले. अशातच गाडीही सुरु झाली होती. त्यात एक चढता चढता एक मुलगी चांगलीच पडली होती. तिला बरंच लागलं होतं व शंकरचाही पाय रेल्वेच्या रुळात दबता दबता वाचला होता. बरं झालं नशीब बलवत्तर होतं म्हणून. नाहीतर शंकर आज अपंग दिसला असता. तेव्हापासून शंकर वेळ अगदी काटेकोर पाळत होता. त्यात दिरंगाई दाखवत नव्हता. 
            गाडी चालू झाली होती. सर्वजण आपली आपली जागा घेवून मौज करीत होते. तसा शंकरही आपल्या जागेवर बसला होता. तो मित्रांशी बोलत होता. त्या बोलण्यात त्याचा वेळ जात होता. तशी रात्र झाली. 
          शंकर दुपारी जेवला नव्हता. त्याला भुक फार लागली होती. परंतु त्याची इच्छा होती मित्रांसोबत जेवन करण्याची. त्याचे मित्र त्याला जेवन करुन टाक म्हणत होते. परंतु तो जेवेल तेव्हा ना. तो मित्रांसोबतच जेवायला बसला. 
          आता जेवन करणार तोच राजेशनं आपल्या बाची आठवण काढली. त्यातच रत्नेशलाही त्याच्या वडीलाची आठवण आली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा तरळल्या. रत्नेश म्हणत होता की तो जेव्हा लहान होता, तेव्हाच त्याचे वडील मरण पावले. त्याला मिळालेली नोकरी म्हणजेच त्याच्या वडीलाचीच देण आहे. कारण ती नोकरी त्याचे वडील मरण पावताच त्यांच्याच जागेवर लागली होती. तसं त्यांना पाहून शंकरलाही आपला बा आठवला. बिचारा शेतात राबतांना रक्ताचं पाणी करीत होता. शंकर शिक्षणच घेत होता. त्याच अल्पशः वयात त्याचाही बा त्याला सोडून गेला होता. परंतु शंकरनं हिंमत सोडली नव्हती. तो शिकतच होता चिकाटीनं. कारण त्याची आई त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभी होती. ते दिवस आठवत होते त्याला. ज्या आठवणीच्या प्रत्येक दिवशी दुःखाचेच पाट वाहात होते. आज शंकर एक शिक्षक बनला असला तरी त्याच्या शिक्षक बनण्यात वडीलांचा तर हात होताच. तसा जास्तीत जास्त त्याच्या आईचा व वडील भाटव्याचा हात होता. ते जर नसते तर आज शंकर शिक्षकही बनला नसता. 

**********************************************************

          गाडी चालत होती व प्लेटा सुटकेसवर ठेवल्या होत्या. सुटकेस हालत होती. अशातच राकेशची प्लेट खाली पडली व बिचाऱ्याला उपाशी पोटीच झोपावे लागले. जो राकेश सकाळीही जेवला नव्हता. राकेशचे हे हाल पाहून रत्नेश म्हणाला, 
          'मला रबडी खायचीय.' 
           तशी रबडी आली. रबडी खावून होताच सर्वजण आपल्या आपल्या बर्थवर झोपायला गेले. तसा शंकरही आपल्या बर्थवर झोपायला गेला.
           सकाळ झाली होती. तसं सर्व मित्रमंडळ झोपेतून जागं झालं होतं. शंकरही झोपेतून जागा झाला होता. तसं कोणीतरी म्हणालं, 
          'बल्लारपूर आलंय.'
          बल्लारपूर.........पेपर मिल. हे स्थान विदर्भातील. बल्लारपूर येताच नागपूर आल्याचा भास होत होता. प्रवास संपणार होता. बस त्या प्रवास संपण्याला काहीच तास बाकी होते. गाडी बल्लारपूरला थांबली. त्यानंतर गाडी सुरु झाली. तिनं वेग घेतला. तसं वर्धा केव्हा गेलं ते कळलंच नाही. अशातच सात वाजले व नागपूर आलं. गाडी थोडी हळूवार झाली. गाडीला सिग्नल होताच. तशी गाडी रेल्वे फलाटावर थांबली. सर्वजण खाली उतरले. मग एकामागोमाग एक असे त्या रेल्वेस्टेशनवरुन बाहेर पडण्यासाठी चालू लागले. काही वेळातच ते मित्रमंडळ रेल्वेस्टेशनवरुन बाहेर आलं आणि त्यांनी आपल्या आपल्या घराचा रस्ता पकडला. 
         तो प्रवास पुरता संपला होता. पण त्या प्रवासाच्या कडू गोड आठवणी अजुनही सर्वांच्या लक्षात होत्या. त्या आठवणी आठवल्या की वाटायचं अजुनही तिरुपतीला जावं. एकटं नाही तर सर्व मित्रमंडळींना सोबत घेवून. कारण त्या मित्रमंडळींच्या वागण्यातून कधी काळी कारल्याचा कडूपणा जाणवलाही असेल. परंतु पाहिजे त्या प्रमाणात ऊसाचा गोडवाही त्या प्रवासाला लाभला होता. त्यामुळंच की काय, तो प्रवास केल्यासारखा वाटला नाही. 
           बाहेर पाऊस पडत होता. तसं पावसातच ते मित्रमंडळ घरी आलं. तसा पाऊस त्यांनी चारपाच दिवस अजिबात पाहिलाच नव्हता. 
         आज प्रत्येकाला वाटत होतं. भेटावं. एखादा प्रसंग पाहून प्रवास करावा आणि दुःखाच्या क्षणाचे थोड्याशा सुखात रुपांतरण करावं. परंतु ना आज तशी वेळ येत होती, ना कुणाला तसा योग येत नव्हता. सगळं विधात्याच्या हातात होतं. तोच जणू तशा प्रवासाला जुळवून आणणारा सुत्रधार होता नव्हे तर त्यानंच हा तिरुपती बालाजीच्या प्रवासाचा योग जुळवून आणला होता. हे विसरता येणार नाही.

************************************************************************************समाप्त ******