पितृपक्ष Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पितृपक्ष

पितृपक्ष;मायबापाची सेवा जीवंतपणीच करावी, मरणानंतर नाही

अलिकडे मुल जन्माला येतात. ती मुलं मायबाप लहानाची मोठी करीत असतात. त्यांना त्यांच्या पायावर उभे करीत असतात आणि ती जेव्हा मोठी होतात. तेव्हा तीच मुलं त्या मायबापाची सेवा करीत नाहीत. त्यांना फक्त मायबापाचा पैसा चालतो. परंतु मायबाप चालत नाही. याबाबत एक उदाहरण देतो. एक व्यक्ती असाच की ज्याला नोकरी होती. त्याला दोन मुलं होती. त्यानं आपला एक मुलगा व दुसऱ्या मुलाची पत्नी म्हणजे एक सुन नोकरीवर लावली होती. त्याला पेन्शन पंचवीस हजार रुपये मिळत होती. त्याचा एक मुलगा काही दिवसापुर्वी मरण पावला होता. दुसरा नोकरीवर असणारा मुलगा जीवंत होता. त्यानं बापाला आपल्या घरी चाल म्हटलं होतं. परंतु बाप गेला नाही. बाप विचार करु लागला होता. कसं जावं या मुलाकडे. तसा विचार करताच त्यानं चक्कं नकार दिला होता. कारण मरण पावलेला मुलगा जेव्हा जीवंत होता, तेव्हा त्याच्या दुसर्‍या मुलानं बापाला चाल म्हटलं नाही. तो मरण पावलेल्या मुलाकडंच राहिला. मग आता मुलगा नाही. परंतु नातवंड आणि सुन आहेत. ते एकाकी पडलेले आहेत. त्यांना सोडून जाणं म्हाताऱ्या बापाला आवडलं नाही. तसा एक वेळा तो आपल्या मुलाकडे चार दिवसासाठी गेला असता त्या मुलानं त्याला थुंकण्यावरुन त्रास दिला होता व त्याच्या पत्नीनंही उलट उत्तर दिलं होतं. म्हणूनच त्या मुलाकडे म्हाताऱ्या बापाची जायची इच्छा झाली नाही.
दुसराही मुलगाही नोकरीवर होता. तोही विचार करु लागला. आपला भाऊ जीवंत नाही. मग आपल्या बापाला मिळणारी पेन्शन पंचवीस हजार रुपये पुर्णतः आपल्या वहिणीला मिळेल. तसं पाहता तिही नोकरीवर होती. परंतु आपल्या बापाच्या पैशाबाबत तसा विचार त्याच्या मनात येताच तो आपल्या बापाला म्हणाला,
"तुम्ही नाही चालत तर मला तुमच्या पेन्शनमधील दहा हजार रुपये मला द्यावे."
ते मुलाचं बोलणं. तसं बापानं विचारलं,
"कशासाठी हवेत तुला दहा हजार रुपये?"
"जर तुम्ही आजारी पडले तर.......तर मी कुठून खर्च करणार?"
मुलानं बापाला ब्लॅकमेल केलं व फुकटचे दहा हजार बापाकडून महिण्याला तो वसूल करु लागला व उरलेल्या पंधरा हजारात म्हातारा बाप सुनेला पैसा न मागता वीजबिल व घरची इतर कामं करु लागला.
मुलं अशी असतात की मायबाप जीवंत असतांना बापाची सेवा करीत नाहीत. त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या पेन्शनवरही डाव असतो त्यांचा.
मायबाप त्याग करतात मुलांना मोठं करतांना असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण बापाला जन्म देणे हा महिलांचा त्यागच असतो. ती महिला.......जी आई असते. तिला माहीत असते की मी जेव्हा बाळाला जन्म देईल, तेव्हा कदाचीत मलाही मृत्यू येवू शकतो. तरीही ती आपल्या बापाला जन्म देण्याचं धाडस करते विंचवीसारखी वा मधमाशीसारखी. मधमाश्या प्रणय हवेतच होतो. ती जेव्हा हवेत प्रणय करते. तेव्हा कधीकधी उडता उडता ती थकते व मरण पावते. विंचवी जेव्हा बाळाला जन्म देते. तेव्हा तिचीच पिल्लं तिचे अवयव खावून तिला मारुन टाकतात. तशीच आपली आईही. आपली आई ही एक महिलाच असते की जी आपल्या जन्माच्या वेळी मरुही शकते. परंतु ती आपल्या जीवनाचा त्याग करते आणि आपल्याला जन्म देते. आपला जन्म झाला की बाप आपले कर्तव्य करतो. तो आपल्याला वस्र घेवून देतो. पुस्तकं घेवून देतो. आपल्या सर्व गरजा पुरवतो. आपल्यासाठी ते जेव्हा खाऊ आणतात, तेव्हा आपल्याला तो आवडला तर पुर्ण खावून ते आपल्याला देतात. स्वतः खात नाहीत व आपल्या स्वतःच्या खाऊ खाण्याच्या इच्छा मारतात. बदल्यात काय देतो आपण. त्यांच्या म्हातारपणात त्यांना आधार देण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात टाकतो. त्यांचा फुटका चष्मा सुधारून देत नाहीत. त्यांना आधार म्हणून मिळणारी पेन्शनवरही आपलाच हक्कं दाखवतो व हिसकावून घेतो जबरदस्तीनं. अन् ते मरण पावताच त्यांच्या नावानं पितृपक्ष साजरा करतो. मग कावळ्यानं अन्न खाल्यास आपल्याला आनंद वाटतो. कारण आपण आपल्या मायबापाच्या मरणानंतर कावळ्यालाच आपला बाप समजतो. अन् कावळाही ते अन्न खातो. कारण त्यात असे पक्वान असतात की जे कावळ्याला आवडतात.
महत्वपुर्ण गोष्ट अशी की जीवंतपणी आपण आपल्या बापाला काहीच देत नाही व मेल्यावर पितृपक्ष पुजन करुन त्या पात्रात वेगवेगळे प्रकार टाकतो नव्हे तर अमूक अमूक वस्तू त्याच्या जीवंतपणी त्याला आवडत होत्या असं म्हणून वा तशी कल्पना करीत आपण त्या वस्तू बनवतो. कोणी मायबाप मरताच तिसरा दिवस, दहावा दिवस, तेरवी चौदावी, अकरमासे, जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करतात. मात्र त्याच मायबापाला जीवंतपणी काहीही देत नाहीत. प्रचंड त्रास देतात. त्यांच्या झोपण्याचे कमरे वेगळे ठेवतात. कारण कोणी आपल्या घरी आल्यावर त्यांना घाण वास येवू नये म्हणून. कारण म्हातारपणात व्यक्ती हा सतत आजारी देखील असतो व आजारपणात माणसाच्या शरीराचा वास येतोच.
विशेष सांगायचं म्हणजे जो व्यक्ती जीवंतपणी मायबापाची सेवा करीत नाही. त्या व्यक्तीनं जर पितृपक्ष साजरा जरी केला व त्यातच त्या कावळ्यानं कितीही अन्न जरी प्राशन केलं वा आपण त्यांच्या जीवंतपणी त्यांची सेवा न करता त्यांच्या मरणानंतर कितीही त्यांच्यासाठी सुग्रास अन्न बनवलं वा कितीही जयंत्या, पुण्यतिथ्या, अकरणासे, दहावे, चौदाव्या, तेरव्या वा तिसरे दिवसं कितीही साजरे केले, तरी त्याचा उपयोग आहे काय? तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. ते पापच होईल व पितृदोष लागेलच आणि कोणताही पुजारी कितीही सांगत असेल की अमूक अमूक केल्यानं वा दान दिल्यानं आपली पितृदोषातून मुक्तता होते. तर ते सर्व थोतांड आहे यात शंका नाही. पितृदोषातून जर आपली स्वतःची मुक्तता करायची असेल तर आपल्या मातापित्यांची जिवंतपणीच सेवा करावी. मरणानंतर कोणताच विधी आपली पितृदोषातून मुक्ती करु शकत नाही. मग कितीही पुजाऱ्यांना दान दिलं तरी वा कितीही त्यांच्यासाठी सुग्रास अन्न बनवलं तरी वा कितीही त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या तरी.
महत्वाचं सांगायचं म्हणजे पितृपक्ष त्यांनीच साजरा करावा. ज्यांनी आपल्या मायबापाची जीवंतपणी सेवा केलो. मरणानंतर कितीही चांगल्या पद्धतीनं पितृपक्ष साजरा जरी केला तरी त्याचा काहीही उपयोग नाही हे तेवढंच सत्य आहे. कारण मरणानंतर पितृपक्ष साजरा करणे वा अकरमास, जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करणे वा पुजाऱ्यांना वस्तू दान देणं. ह्या गोष्टी आपल्या समाधानासाठी असतात. आपल्या पितृदोषाच्या निवारणासाठी नाही. म्हणूनच मायबापाची सेवा ही जीवंतपणीच करावी, मरणानंतर नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०