मल्ल प्रेमयुद्ध - भाग 28 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 28

मल्ल प्रेमयुध्द






संध्याकाळ झाली होती. वीर स्वतः आज गुरांच्या गोठ्यात गेला. प्रत्येकवर त्याचा जीव होता. प्रत्येकाला त्याने वेगवेगळी नावं ठेवली होती त्याच्या आवडीची.... खरं तर हे सगळं रघुदादा बघायचा. रघुदादा गुरांना वैरण घालत होता, पाणी देत होता.
गोठा अगदी स्वच्छ... मुक्या प्राण्यांना बोलता यत नाय म्हणून घाणीत ठेवायचं का? असं वीर म्हणायचा. आठवड्यातून दोनदा तरी तो गोठ्यात जायचा, कारण आबासाहेबांच्या प्रगतीला या सगळ्यांची मदत झाली होती. अगदी नीटनेटकं सगळ्यांना व्यवस्थित जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, लाईटची सोय सगळं व्यवस्थित होतं. आज त्याची लाडकी गाई "निरा" तिच्याजवळ तो उभा राहिला. निराने त्याला बघितलं आण त्याच्या हाताला चाटायला लागली. वीरच्या डोळ्यात पाणी आलं.
"निरा तुला माहितीये माझ्या मनात साचलं की मी तुझ्या जवळ यतो, आईला सांगायची गरज पडत नाय कारण तिला सगळं समजत. "नीरा मी प्रेमापुढ हारलो... आज आबासाहेबांना म्हणू नाय शकलो की मला क्रांती बरोबर लग्न करायचंय की तिच्या वडिलांना सांगू शकलो नाय... कुस्ती नंतर आयुष्यात एक गोष्ट मनापासून आवडली व्हती, नीरा मला काय बी कळत नाय की आता मी काय करू? माझी हिम्मत होत नाय क्रांतीला फोन करायची काय करू मी? नीरा जोरात हंबरली, त्याचा हात चाटायला लागली, नीरा नाय तू म्हणतीस ते कळतय मला,... मी फोन केला पाहिजेत पण माझी तेवढी हिंमत नाही व्हत बघ... नीरा परत हंबरली. पाण्याची बादली उचलली आणि तिच्यासाठी बांधलेल्या छोट्या हौदात ओतली. नीरा पाणी प्यायली नाय, नीरा मला माहितीय मला जवा दुःख व्हतं तवा तू काय खात नायस की काही पीत नायस म्हणून मी तुझ्याकडे काय सांगायला येत नाय, तू सांग मी काय करू मी ? करू का क्रांती ला फोन ? पण मला लय वाईट वाटतय मी तिच्याशी काय बोलू? नीरा परत हंबरली. वीरने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुला कुरवाळले. तेवढ्यात रघुदादा आले.
"साहेब तुम्ही आलाय म्हंटल्यावर नीराच हंबरन सुरू होतंय नाही तर ती कुठे हाय नाय कळत बी नाय, काही नसतं बघा तीच... पण तुम्ही आला की तिच्या वेगळाच डौल असतो. चला नीरा धार काढायची यळ झाली. रख्माय येवढ्यात ईल. वीरच्या पाठोपाठ संग्राम आला. "वीर मला वाटलंच व्हतं, खोलीत नाइस म्हटल्यावर हितच असणार तू..." वीरने डोळे पुसले. "अरे लेका गड्या सारखा गडी अन रडतोस??? ते काय नाय तू का नाय स्पष्ट सांगितलं की तुला क्रांती बरोबर लग्न करायचं?"
" संग्राम दादा हे तर आबासाहेबांना सुद्धा माहित हाय, माझ्या मुळे क्रांतीला मागणी घातली आबांनी आणि आता तेच लग्न मोडत्यात कारण काय तिनं तिचं सर्वस्व सोडून द्यायचं माझ्याशी लग्न करायचय म्हणून..."
"वीर हे बघ हे आपल्या घरात पटणार नाय हे आधीपासनच आपल्याला माहीत व्हत तरीसुद्धा आबानी लग्न ठरवलं पण तिच्या घरच्यांनी हिम्मत बघ पोरीच्या आयुष्याचं मातेरं नको म्हणून चक्क लग्न मोडलं, आई आबासाहेबांच्या पोरा बरोबर ठरलेल लग्न मोडायला हिम्मत लागतिया अन ती तिच्या दादांनी दाखवली. आबासाहेब कोलमडल्यात, हे तुला काय सगळ्यांना माहित हाय पण त्यांचा हट्ट ते सोडणार नाय, पण एक सांगतो तुझ्या पुढे ते कायच बोलणार नायत, तू समजव त्यासनी त्यांनी पहिल्यापासन आपल्यावर सगळ्या गोष्टी लादल्या. तुला शिकायचं व्हत हे सुद्धा त्यांना माहीत व्हत पण त्यांच्या इच्छा तू पूर्ण करावयास म्हणून तू कुस्ती खेळवस असं त्यांना वाटलं... दादांचं काय चुकलं? दादांनी पण स्वप्न बघितलं होतं फक्त फरक इतकाच कि तू पोरग अन ती पोरगी हाय... वीर तुला क्रांतीशीच लग्न कराव लागणार हाय... घरात तुझ्याबद्दल आता दुसऱ्या पोरीची चर्चा सुरू झाली. वीर एकदम दचकला. "स्वप्नाली... उद्या भेटा क्रांतीला ... घरच्यांना काय करायचे ते करु देत? तुमचं लग्न झालं पाहिजे अन या समाजात ज्या पोरगा पोरगी अशा भावना हायत त्या पहिल्या मोडून काढल्या पाहिजेत. तुझ्या तेवढी हिंमत हाय फक्त इतकंच आबाचा शब्द तुला मोडावा लागणार हाय आणि तेवढी हिंमत, तेवढ धाडस तुला कराव लागणार.... जे मला जमलं नाय ते तु करायचं आणि ह्या सगळ्यासाठी माझा पाठिंबा तुला हाय तुला स्वप्नाली शी लग्न करायच की स्त्री पुरुष हा भेदभाव मोडकळीस आणून क्रांतीला तुझी बायको बनवायची???? हे तूला उद्याच्या उद्या ठरवावं लागणार हाय, दोन दिवसात क्रांती मुंबईला जाणारे आणि तुला सुद्धा मुंबईला गेल पाहिजे त्यासाठी तुला आधी क्रांतीला भेटाव लागल, उद्या तिच्याशी बोलावं लागल, तिला समजावे लागल, तवाच या सगळ्या गोष्टी व्हतील वीर, करियरची मनमानी केली आबांनी आयुष्याची नको करून घेऊस.... आबा वाईट हायत असं मला म्हणायचं नाय त्यांचं म्हणणं पण बरोबर हाय त्यांच्या बाजून.... पण वेळेनुसार परिस्थितीनुसार आता बदलायला पाहिजे त्यांनी सुद्धा आणि क्रांती सून म्हणून नक्कीच चांगली असल हे त्यांनाही माहिती आणि आपल्यालाही... पहिला तिला फोन कर आणि बोलून घे तिला मान्य नव्हत लग्न हे तितकच खरं असलं तरी आता ती तुझ्या प्रेमात पडायला लागली व्हती न... खरं तिला बराच त्रास व्हत असणार हाय, तू फोन कर... वीरने मान हलवली आणि संग्रामयामिठी मारली. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. संग्रामात मोठ्या भावासारखा वागत व्हता हे बघून त्याला इतकं बरं वाटत व्हत. संग्रामने त्याला बाजूला केलं. त्याचे डोळे पुसल. खांद्यावर हात ठवला आणि "फोन कर" म्हणाला.
वीर नदीवर जाऊन बसला. इकडे क्रांतीने दोन घास कसेबसे खाल्ले आणि आज जाऊन पडली आशाने दादांकड बघितलं. ज्या पोरीला लग्न नको व्हत, जो पोरगा लग्नासाठी नको व्हता त्याच्यासाठी ती धड जेवत नव्हती.
" आशा माझा निर्णय चुकला का? मला माहितीये माझ्या पोरीच्यासाठी लग्नापेक्षा कुस्ती महत्वाची हाय आण तिच्यासाठी मी हे केलय. माझी लेक जेवली नाय कारण तिला कळत नसलं निर्णय कोणता बरोबर हाय खरच वीररावांचं तिच्यावर प्रेम असल तर आबासाहेबांचा विरोध झटकून ते क्रांतीशी लग्न करत्याल आण तवा पण मी क्रांतीचा बाप म्हणून तिच्यामाग खंबीरपणे उभा राहीन आण एवढे लक्षात ठेव वीररावांना मी चांगला ओळखतो ते क्रांती शिवाय राहू शकत नायत ते आले तर नक्की तवा या दोन्ही पोरांच्या माग मी उभा राहीन." दादा म्हणाले.
" तुम्हाला वाटतं आबासाहेबांचा शब्द मोडून आपल्या पोरीकड यतील? का यत्याल त्याच्या मागे छप्पन पोरी फिरत्यात, आपली फक्त पोरगी बघितली व्हती म्हणून आणि वीररावांना ती पसंत पडली. म्हणून तिच्याशी जुळवून आलं. आबासाहेबांना नायतर त्यांच्या बरोबरच्या स्थळांची कमी नाय. वीरराव नाय येणार परत त्याचं लग्न एका चांगल्या सुसंस्कारी पोरीशी ठरवत्याल." आशा.
"म्हणजे आपल्या पोरी सुसंस्कारि नाय का? ठीक हाय बघू मी खोटे बोलतोय का तुझं खरं व्हतंय पण वीराला आला तर तू आडकाठी घालायची नायस जे करायचं ते मी करणार." आशा काहीच बोलली नाही.



वीर नदीवर बसला. बराच वेळ विचार केला क्रांतीला फोन केला. क्रांतीने दोन रिंग मध्येच फोन उचलला.
" हॅलो हा बोला..." क्रांती
" काय चालू हाय?"
"झोपत व्हते...जेवण झालं आणि पडली.
" लगीच... पैलवान अस नसत्यात बरं खाऊन लगीच पडणार." "आज जरा तब्येत बरी नाय म्हणून..."
"कारण देऊन चालत नाय जेवल्यावर बसाव नाय तर थोडसं चालावं... अन्नपचन झालं की बरं वाटत." क्रांतीने नुसता हुंकार दिला.
" दादा आले? वीर
" हो आल आण सगळं सांगितलं सुद्धा..." क्रांती
"मग त्यावर तुमचं काय म्हणणं हाय..?" वीर
"दादांनी घेतलेला निर्णय योग्यच असल..." क्रांती
"त्यावर तुला कायच बोलायचं नाय का? मी तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा इचार नाय करू शकत... मी लग्न करीन तर तुझ्याशी..."
"मी दादांच्या शब्दाच्या भायर नाय जाणार आणि आबासाहेबांच्या ही शब्दाचा मान राखायला पाहिजे त्यांची इच्छा नसताना मी त्यांची सून बनून त्या घरात नाय येणार संतुकडा सगळं पाठवल हाय.. अंगठी, दागिने ,साड्या सगळं माघारी दिलय. फक्त तुम्ही दिलल कानातल माझ्याकडं ठेवलंय. कारण ते कायम माझ्याबरोबर असत्यात."वीर मनोमन खुश झाला.

"क्रांती उद्या मला भेटायला येशील मला महत्त्वाचं बोलायच तुमच्याशी? क्रांतीने थोडा विचार करा केला.
" दादांशी बोलीन आण सांगीन तुम्हाला..."
" ठीक हायमी तुमच्या फोनची वाट बघतोय उद्या दुपारी एक वाजता घ्यायला यतो आण दादांची पाहिजे तर मी परमिशन काढतो . दादा मला नाय म्हणणार नायत..ठेवतो बाय...." क्रांती ने फोन कट केला आणि छातीशी घट्ट कवटाळून ठेवला.


क्रमशः
भाग्यशाली राऊत