भुताटकी गाव Ankush Shingade द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भुताटकी गाव

मनोगत

भुताटकी गाव नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देत असतांना एका लेखकाला जसा आनंद होतो. तसा मलाही होत आहे. ही पुस्तक अंधश्रद्धा मांडून लिहिली असली तरी या पुस्तकरुपानं समाजप्रबोधनही आहे. ते आपल्याला पुस्तक वाचन केल्यानंतर कळेलच.
ही पुस्तक लिहिण्याची प्रेरणा एका महाविद्यालयात शिकणा-या मुलाची. त्यानं माझी भुताटकी व वासना नावाच्या पुस्तका वाचल्या व म्हटलं की अलीकडे अशा हॉरर कथानकाच्या पुस्तकाच पाहायला मिळत नाहीत. तुमच्या दोन्ही पुस्तका यावर आधारीत असून मला आवडलेल्या आहेत. आपण हॉरर लेखन करावं सर.
त्याचं बोलणं मनाशी लावत मी तिसरी त्याच विषयावर लिहिलेली ही पुस्तक भुताटकी गाव असून जशी माझ्या भुताटकी व वासना या पुस्तकाला आपण दाद दिली. तशीच दाद याही पुस्तकाला द्याल असा विश्वास वाटतो.
यातील कथानक थोडक्यात असं. ते एक गाव की ज्या गावात तंत्रमंत्र करुन त्या गावात राहणारा एक व्यक्ती सुंदर गावोगावच्या मुलींचं अपहरण करायचा. त्यांना वेश्यालयात विकायचा. त्यातच या कथेतील नायकाचीही पत्नी त्यानं तशीच गायब केली होती. जो देशाचा माजी सैनिक आहे. याच कथानकावर आधारीत ही पुस्तक असून तो नायक या सर्व प्रकाराशी भांडतो. आता प्रश्न हे आहेत की त्या नायकाची पत्नी मिळते का? तो नायक या सर्व गायब झालेल्या मुलींना शोधतो का? का, खरंच तंत्रमंत्रानं मुली गायब होतात का आणि शेवटी नायकाचं काय होते? ही सर्व प्रश्न. परंतू त्याची उकल मी सांगत नाही. त्यासाठी तुम्हाला ती पुस्तक वाचावी लागेल. तेव्हाच उत्तरे मिळतील.
आपण ही पुस्तक वाचावी व कशी वाटली म्हणून एकतरी फोन करावा ही विनंती. मी अपेक्षा करतो की आपला एक फोन माझ्या लिहिण्याच्या आशा पल्लवीत करणारा असेल. नाहीतर उगाच फोन करायचा म्हणजे करायचा. असा फोन चुकूनही करु नका. त्यापेक्षा तसा फोन कोणीही करु नये. कारण तुमच्या एका फोननं लेखक घडतो. त्याच्या हातून अनेक पुस्तकांची निर्मीती होते व ती निर्मीती कधीतरी देशाचा विकास करण्यास सहाय्यक ठरते.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०


भुताटकी गाव(कादंबरी)
अंकुश शिंगाडे नागपूर

त्या दोघांचही प्रेम होतं एकमेकांवर. ते एकमेकांवर निरतिशय प्रेम करीत होते. परंतू त्यांचं प्रेम अधुरं राहिलं होतं. कारण आज ती या जगात नव्हती. तिला काळानं नाही तर भुतानं अलगत मारुन टाकलं होतं.
गोपाल त्या भुताचं नाव. तो जेव्हा जीवंत होता. तेव्हा तो सुंदर सुंदर मुलींवर प्रेम करायचा. त्यातच तो पाहायला सुंदर असल्यानं चांगल्या चांगल्या मुली फसत असत त्याच्या जाळ्यात. एकदा असाच तो रस्त्यानं गाडी चालवत जात असतांना त्याला पुढे बाईक चालवत येणारी सुंदर तरुणी दिसली. मग काय, बापूसाहेबाची नजर त्या मुलीकडं पडली. त्यातच पुढं एक ट्रेलर येत होतं. ते दिसलंच नाही त्याला व धाडकन त्या ट्रेलरनं त्याला ठोकर दिली. अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्या अपघातात तो मरण पावला.
गोपाल असाच मुलींवर प्रेम करणारा व्यक्ती. स्वभावानं थोडासा वात्रट. परंतू या वात्रट स्वभावानंच त्याचा जीव घेतला होता. त्याला आपला असा जीव जाईल हे काही वाटत नव्हतं. परंतू त्याचं दुर्दैव असं की तो मरुन गेला होता.
गोपाल मरुन गेला. परंतू त्याचे विचार काही मरुन गेले नव्हते. त्याचे विचार तसेच होते. तशीच त्याची इच्छाही तशीच राहिली होती. ती तशी इच्छा राहिल्यानं तो भूत बनला होता आणि आता तो भूत बनून आपल्या इच्छा पूर्ण करीत होता नव्हे तर तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांना परेशान करीत होता. अशा परेशानीत लोकांना त्याच्या भुताचा बंदोबस्त कसा लावायचा. ते सुचत नव्हते.
गोपालचं भूत........ते सतवत असतांना लोकांनी पाहिलं नाही. कारण ते भूत एखाद्या सुंदर मुलीला एकटंतिकटं पाहात असे व तिचा अपघात घडवून आणत असे. त्यातच तिच्या मृत झाल्यावर ते भूत आपली वासना त्या मेलेल्या शरीराच्या मृत आत्म्याकडून पूर्ण करीत असे असे लोकांचे म्हणणे होते.
गोपालचं ते गाव. गजबजलेलं गाव होतं ते. त्या गावात बरेच गावकरी राहात होते. परंतू आता गोपालच्या भुताच्या छळण्यानं गावात महिलांना विशेषतः सुंदर सुंदर मुलींना गावात एकटंतिकटं फिरणं कठीण झालं होतं. त्यातच त्या भुताच्या तरुण मुलीही शिकार झाल्या होत्या. लोकांनी त्या भुताचा बंदोबस्त लावण्यासाठी बरीचशी तांत्रीक मंडळी कामाला लावली. परंतू त्या भुताचा काही बंदोबस्त न लागल्यानं लोकांमध्ये भीती निर्माण झाली. ती भीती एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली की त्या भीतीनं एकएक करीत लोकांनी गाव सोडलं व तो संपूर्ण परीसर आता उदासवाणा झाला.
ते रामपूर नावाचं गाव. गाव पुर्वी गजबजलेलं असलं तरी आज गावात कोणी राहात नव्हतं. गावात कोणी राहात नसल्यानं गाव सुनसान झालं होतं. त्यातच गोपालच्या भुताला आता सुगीचे दिवस आले होते.
ते गाव.........त्या गावात माणसं राहात नसल्यानं गोपालच्याच भुताला निश्चींतपणे राहता येत होतं. आता त्याला रोखणारं कोणीही नव्हतं.
गावात कोणीही राहात नसलं आणि गोपालच्या भुताला भक्ष्य मिळत नसलं तरी ते भूत भक्ष्य शोधतच होतं. असे कितीतरी भक्ष्य त्यानं शोधले होते आणि त्यांचा बेवारस बळीही घेतलेला होता. मग त्या गावातील मुलीच नाही तर कित्येक आजुबाजूच्या गावातील मुलीही होत्या.
त्या गावातूनच एक रस्ता जायचा. तो रस्ता दिवसा वाहात असायचा आणि रात्री भुताच्या भीतीनं अगदी सुनसान असायचा. रात्री कोणीही त्या रस्त्यानं जात नसत. त्यातच आज अचानक वेळ आली होती त्या रस्त्यानं जायची त्या परीवारावर. जो परीवार भूत खेत मानत नव्हता.
नवीन रामपूर गाव. ते गाव उंचावर वसलेलं होतं. परंतू त्या गावक-यांनी गाव वसविण्यापुर्वी विचारच नाही केला की आपल्याला त्याच गावातून जावं लागेल. कारण तो एकच रस्ता होता शहरात जायचा.
गावात काही आजारही यायचे. त्यातच त्या किरकोळ आजारावर गावातीलच लोकं उपचार करुन टाकायचे. शहरात जायचे नाहीत. गाव तेवढं सुशिक्षीत नव्हतंच. मात्र त्यांना ज्ञान होतं जडीबुटीचं. ते जड्याबुट्यांनी मोठमोठे आजार परतून लावत असत. त्यामुळं मोठमोठ्या,आजारावर रुग्णालयाची गरज वाटायची नाही. त्यातच अख्खं गाव देवादिकाला मानणारं असल्यानं गावातील लोकं डॉक्टरकडं कमी जात असत.
मुरली त्याचं नाव. मुरली सुशिक्षीत होता. शिक्षणावर नोकरी न लागल्यानं तो सैन्यामध्ये नोकरीला लागला होता. नुकताच विवाह झाला होता त्याचा.
त्याचा विवाह तो मिलीटरीत असतांना झाला नाही तर नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर झाला. आता नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली होती त्यानं. तो बार्डरवर कित्येकदा एकटाच राहिला होता जंगलात. तो भूत मानणारा नव्हता.
त्यानं नोकरीतून निवृत्त होताच विवाह केला होता आणि आता तो आपल्याच स्थानीक गावी राहायला आला होता. तसा तोही रामपूर गावातच राहणारा होता.
मुरलीचा तो विवाह. नवीनच विवाह होता तो. तसे त्याच्या विवाहाला जास्त दिवस झाले नव्हते. तसं एक दिवस त्याच्या पत्नीच्या पोटात अचानक दुखायला लागलं. तसे त्या दुखण्यावर गावचे डॉक्टर तपासून झाले. परंतू काहीच उपाय निघाला नाही. ते पाहून त्यानं ठरवलं की आपण आपल्या पत्नीला जवळच्या शहरातील रुग्णालयात न्यायचं.
रुग्णालय. ते मोठं रुग्णालय शहरात होतं आणि त्या रुग्णालयात रस्ता त्याच भुताच्या पाडावापासून जात होता. मुरलीच्या पत्नीची तब्येत खराब झाली होती. तिच्या पोटात दुखत होते. त्यासाठी तिला शहरातील रुग्णालयात नेणे आवश्यक होते. तसं मुरलीनं आपल्या पत्नीला त्या भयाण रात्री नेणं सुरु केलं.
मुरलीनं आपल्या पत्नीला शहराच्या रुग्णालयात नेण्याचं निश्चीत करताच त्याचे बाबा म्हणाले,
"वेडा झालास गी काय, त्या शहराचा रस्ता माहिताय, त्या भुताच्या पाडावरुनच जाते."
"बाबा, मग काय झालं व्हय."
"आरं, तेथं भूत हाय. ते भूत गोपालचं हाय."
"आरं बाबा, भूत ऊत काहीही नसते."
"आरं बाबा, तुले कसं सांगू?"
"बाबा, आतं त्या भूतापरस तब्येत महत्वाची."
लेकराची जिद्द. त्या जिद्दीपुढे मायबापाचं काहीही चाललं नाही. तसं पाहता मिलिटरीतून निवृत्त होताच त्याला भरपूर पैसा मिळाला होता. त्या पैशात त्यानं गाडी घेतलीच होती. तसं त्यानं गाडीत आपल्या पत्नीला भरलं व तो निघाला शहरातील रुग्णालयात आपल्या पत्नीच्या उपचारार्थ.
****************************************

तो रस्ता मुळात सुनसान होता. तसं पाहता त्या गोपालच्या भूताला नामी संधी चालून आली होती. ते पतीपत्नी त्या रस्त्यानं निघाले होते. थोडं अंतर गाडीनं पार करताच त्यांना समस्या जाणवायला लागली. गाडीच्या समोरुनच दोन सावल्या गेल्या व त्या सावल्याच्या चक्करमध्ये गाडीचा तोल बिघडला होता.
गाडी पुढे जाताच मुरलीनं आपल्या पत्नीला विचारलं,
"तुनं, काही पाहिलं का?"
"नाही, मला काहीच दिसलं नाही."
तो चूप बसला. तसा त्याला विचित्र आवाज आला. त्यातच त्या गाडीसमोर एक अंधूक आकृती आली. तिचे केसं मोकळे होते. तिचा रंग काळा होता. केस मोकळे असून ती एका स्रीची आकृती होती.
ते विचित्र आवाज, ती अंधूक आकृती पाहून मुरलीनं आपली गाडी थांबवली व म्हणाला,
"अगं, तुला अंधूक आकृती दिसली का? एक बाई, केसं मोकळे सोडलेली."
"नाही."
"तो विचित्र आवाज?"
"नाही."
त्याची पत्नी बोलत होती. ती घाबरलेलीही वाटत नव्हती. तशी त्यानं थांबवलेली गाडी सुरु केली. परंतू ती सुरु झाली नाही. तसा तो घाबरला.
तो सैन्यातील मुलगा. तरणेबाज व हिंमतवान गडी. त्यातच त्यानं युद्ध करतांना बार्डरवर कित्येक जंगलं पाहिले होते. कित्येक ठिकाणी एकटं राहण्याचा प्रसंगही आला होता. परंतू कधीच आजपर्यंत आपल्या आयुष्यात अशा अंधूक आकृत्या पाहिल्या नव्हत्या वा कधीच असे विचित्र आवाजही ऐकले नव्हते. त्यामुळं घाबरणं साहजीकच होतं.
तो अतिशय घाबरला होता. तोच त्यानं आपल्या पत्नीकडं पाहिलं. पत्नीच्या पोटात दुखणं बंद झालं होतं. कारण त्यानं दुखण्याबद्दल विचारताच तिनं त्याला पोटात दुखत नाही असं उत्तर दिलं.
मुरली सुरु करु लागला गाडी. परंतू गाडी काही सुरु होत नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. तसा तो गाडीच्या खाली उतरला. त्यानं गाडीच्या समोरचं टप्पर उघडलं. त्यात धुर निघाल्यासारखं वाटलं. ते धुर थोड्या वेळानं बंद झालं.
तसा तो गाडीत बसला. गाडी सुरु झाली होती. तसं त्यानं डावीकडं पाहिलं. तिथं त्याची पत्नी होती. परंतू तिनं आपले केसं मोकळे सोडले होते. ते केसं तिच्या चेह-याच्या समोर होते. तसा मुरली म्हणाला,
"असे केसं मोकळे का सोडलेय?"
"............" ती काहीच बोलली नाही. तसं त्यानं तिचे केसं सवारण्याचा प्रयत्न केला. परंतू काय आश्चर्य. तिचा चेहरा भयंकर होता. तिची सुंदरता अदृश्य झाली होती. तिच्या चेह-यावर केसं आले होते. जणू तो शैतानी चेहरा वाटत होता.
मुरली घाबरला होता. कारण त्याच्या पत्नीतही ते भूत शिरलं होतं. तशी गाडी सुरुच होती.
गाडी सुरु झाली होती. तो चालवत होता. मनात तसं भय होतंच. कारण त्याच्या पत्नीला प्रेतात्म्यानं वेढलं होतं. तशी गाडी सुरु असतांनाच त्याच्या पत्नीनं गाडीचा दरवाजा अचानक उघडला व गाडीचा दरवाजा लाव. असं मुरलीनं म्हटलं तरी पत्नीनं गाडीचा दरवाजा लावलाच नाही व तो दरवाजा न लावता ती त्या चालत्या गाडीतून सावकाशरित्या खाली उतरली. त्यातच मुरलीनं ताबडतोब गाडी थांबवली.
त्याची पत्नी चालत होती. तसा विचित्र आवाजही येत होता. तसा तो तिला आवाज देत होता. परंतू ती आवाज ऐकण्याच्या मुडमध्ये नव्हती. ती चालत होती ती स्मशानी वाट आणि मुरलीही चालत होता ती स्मशानी वाट. त्याला काहीच समजत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं.
ती गर्द झाडी खुणावत होती त्याला की तू घरी परत जा. तिचा नाद सोडून दे. ती आता तुझी राहिलेली नाही. ती प्रेतात्म्याची झाली आहे. परंतू ती त्याची पत्नी होती. तो कसा काय तिला सोडणार. शेवटी तो तिच्या मागं धावतच राहिला.
तो स्मशानी रस्ता........अचानक स्मशान आलं. त्यातच तिथं मुदडे जळत होते. मुरलीच्या पत्नीनं त्या मुदडेघाटात प्रवेश केला. तसा तोही. त्यातच त्या मुदडेघाटात एक इमारत त्याला दिसली. त्या इमारतीत त्याच्या पत्नीनं प्रवेश केला होता. तसा तोही त्याच्या पत्नीच्या मागंच होता.
मुरलीची पत्नी स्मशानघाटात असलेल्या एका इमारतीत शिरली. तसा तोही त्या इमारतीत शिरणार. तोच दरवाजा बंद झाला व त्या बंद दरवाज्याच्या इमारतीत त्याच्या पत्नीच्या शरीराचा उपभोग ती भूतं घेवू लागले आणि तो त्या इमारतीच्या बंद दरवाज्यातून तिच्या शरीराचा उपभोग घेतांना पाहू लागला. तसा तो लाचार होता. कारण त्या भूतासमोर त्याची शक्ती चालत नव्हती.
रात्रभर त्याची पत्नी त्या भुताच्या तावडीत होती. तसा बराच वेळ झाला होता. तो फार थकला होता. त्यातच त्याला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. तशी सकाळ झाली. सकाळ होताच त्याचे डोळे उघडले. परंतू सकाळ होताच त्याची पत्नी तिथंं नव्हती. ती कोठे गेली हे कळायला मार्ग नव्हता. कारण रात्री जी इमारत पाहिली होती त्यानं. ती तिथं मुळात नव्हती. तसं तिथं स्मशानही नव्हतं.
मुरली सकाळ होताच उठला होता. तसं त्याला अती आश्चर्य वाटत होतं. कारण तिथं ती इमारतही नव्हती. तसं तिथं ते स्मशानही नव्हतं. तशी त्याची पत्नीही.
त्याची पत्नी गायब झाली होती. ती गायब होताच तो तिला शोधू लागला. परंतू ती त्याला काही मिळालीच नव्हती. त्यामुळं तो हारला व गाडी सुरु करुन तो गावात परत आला.
गावात येताच त्यानं घडलेली पूर्ण हकीकत गावात कथन केली. तसं गावातील प्रत्येक व्यक्ती बोलायला लागला की ते कृत्य त्या भुतानंच केलेलं आहे. परंतू मुरलीला तसं वाटतच नव्हतं. त्याला वाटत होतं की त्याच्या पत्नीला कोणीतरी नक्कीच अपहरण करुन नेलं असावं. तसा तो विचार करु लागला.
विचार करता करता त्याला आठवला तो रात्रीचा देखावा. त्या रात्रीच्या देखाव्यानुसार त्याला ते स्मशान आठवलं. त्यातच त्याच्या पत्नीचा तो विद्रूप चेहरा. तशी ती इमारत. ते जळत असलेले मुदडे. सकाळी उठून तिथं काहीच नव्हतं. तसा तो विचार करु लागला की हे,असं का घडलं. जर हे कृत्य माणसाचं आहे तर तो देखावा कोणी निर्माण केला असेल.
सुगंधा तिचं नाव होतं. ती सुंदर होती. तसं आजपर्यंत त्यानं कोणत्याच स्रीकडे पाहिलं नव्हतं. त्यामुळं ती आवडली होती त्याला. परंतू काय करणार ती नियतीची चक्कर. त्यातच त्याची पत्नी नियतीनुसार गायब झाली होती. ती कोणं केली हेही काही लक्षात येत नव्हते. तसेच गावातील सर्व लोकं ते गोपालच्या भूताचं काम आहे असं म्हणत होते. परंतू तो त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हता.
सुगंधाची त्याला सारखी आठनण येत होती. तसा तिचा शोध घ्यायला तो दररोज रात्री अपरात्री त्या ठिकाणी जायचा. परंतू त्या ठिकाणी आता ना तो देखावा दिसायचा ना काही. त्यातच तो परेशान व्हायचा.
चारपाच दिवस झाले होते. सुगंधाचा बराच शोध घेतला होता. परंतू सुगंधा काही दिसलीच नाही. ती कुठं गेली याचा पत्ताही नव्हता तिथं. त्यातच चार पाच दिवस होताच त्यानं ती तक्रार पोलिस स्टेशनला टाकली व स्थळ सांगीतलं. परंतू स्थळ सांगताच पोलिस म्हणाले की तेथील नाद सोडून द्या. कारण तेथे अशा ब-याच घटना घडलेल्या असून तेथे सुंदर सुंदर मुली गायब झालेल्या आहेत.
मुरलीनं म्हटलं,
"सायेब, गुन्हा नोंदवून घ्या."
मुरलीच्या बोलण्यानुसार गुन्हा नोंदवून घेतला गेला. तसा मुरली रोजच त्या रस्त्यानं जात येत राहिला. परंतू छडा काही केल्या लागत नव्हता.
****************************************

ते गाव भुताटकी बनलं होतं. दरवेळी अमावश्या आली की कोण्या घरची कोणती मुलगी गायब होईल याचा पत्ता लागत नव्हता. लोकांनी गावंही बदलवून पाहिलं. परंतू सारखं असंच घडत होतं गावात. तसं ब-याच मांत्रीकांनाही आणून पाहिलं. परंतू काहीच उपयोग झाला नव्हता. मुली गायब कशा होतात? हा प्रश्न होता. तो प्रश्न तसाच उपस्थीत होता.
दिवसामागून दिवस जात होते. शहरातील एक भानूदास नावाचा एक मांत्रीक गावात आला. हा सात्वीक माणूस होता. तो परोपकार करीत असे. त्यातच तो लोकांवर दया दाखवीत असे. तो गावात येताच गावक-यांनी आपली कैफियत त्याचेपुढे मांडली. तसं त्यानं गावक-यांना आश्वासन दिलं की तो त्या भूताला अलगद पकडणार आणि गावक-यांच्या स्वाधीन करणार.
लोकांनी मांत्रीकावर विश्वास ठेवला व त्याला गावात राहायला जागा दिली होती. मांत्रीक राहायला आला होता गावात. त्या मांत्रीकानं वचन दिलं होतं गावक-यांना की तो त्या गावातून हाकलून देईल भूताला. परंतू तो आल्यापासून ते गाव पुर्णतः बिघडलं होतं त्या गावात घरोघरी भूतं अंगात यायला लागली होती. प्रत्येक घरच्या माणसं कोणाच्या सावलीत आले की काय, असे वाटत होते. मांत्रीकाला याचा जाब विचारताच मांत्रीक सांगत असे की भूतांना सुचना मिळाली आहे. त्याचा कर्दनकाळ गावातच आहे. म्हणून ती भूतं गावाला सताततात. परंतू काळजी करु नका. लवकरच ही भूतं पळतील गावातून व गावाला पूर्ण स्वरुपात राहत मिळेल.
बरेच दिवस होवून गेले होते. ना भूतं जात होती गावातून ना मांत्रीक काही करीत होता. मुरलीला तर ते थोतांडच वाटत होतं. याशिवाय एखादा संत आला असता तर बरं झालं असतं. असं मुरलीला वाटत होतं किंवा एखादा मानसोपचार तज्ञ आला असता तर.........परंतू गाव ते ऐकायला तयार नव्हतं. गावाचा सॉतावर वा मानसोपचार तज्ञांवर काहीएक विश्वास नव्हता.
पोलिसही हतबल ठरले होते त्या भूतांसमोर. मात्र त्या मांत्रीकाची रोजची चांदी होती. त्याला बदल्यात नेहमीच कोंबडेे, बकरे व पैसे आडके मिळायचे. एखाद्याला भूतबाधा झाल्यास तो थोोडंसं काही करुन द्यायचा. ज्यामुळं थोडासा आराम पडत असे. त्यातच लोकांचा मांत्रीकावरील विश्वास गहन होत गेला व मांत्रीक गावात रुळावला. त्याला वाटायला लागलं की शहरापेक्षा गावात कमाई जास्त आहे. कारण गावातील लोकांना सगजच मुर्ख बनवता येतं.
त्याचे तसे विचार करणे बरोबर होते. कारण तो गावातील लोकांना मुर्खच बनवीत होता. त्या मांत्रीकाचं नाव भानुदास असल्यानं तोच आपल्या गावातील भुतांना एखाद्या दिवशी नक्कीच हाकलून देईल व गाव भूतमुक्त होईल असं गावाला वाटत होतं.
भानुदास हा मांत्रीकच होता. त्याला थोडीशी तांत्रीक विद्या येत होती. त्याचाच फायदा तो पैसा कमविण्यासाठी करीत होता. त्याचे दोन व्यवसाय होते. पहिला व्यवसाय म्हणजे,उघडं पुस्तक होतं की ज्या विद्येच्या द्वारे तो गावातील छळणा-या भुतांना वशमध्ये करुन त्यांना वठणीवर आणणे. त्यासाठी तो स्मशानात जायचा. तिथं तंत्रानं भूतांना ताब्यात घ्यायचा व त्यानंतर तो त्या भूतांपासून हवी ती कामं करुन घ्यायचा. गावात आल्यानंतर त्यानंच ही भूतबाधा संपूर्ण गावाला लावली होती. त्यामुळंच आज ते गाव पूर्णतः भूतबाधाधारीत झालं होतं. ज्यातून त्याला भरपूर पैसा मिळत होता. तसंच दुसरंही काम होतं. ते काम म्हणजे बंद पुस्तक.
बंद पुस्तक याचा अर्थ वेश्याव्यवसाय. तो शहरातील राहणारा असून त्याचे वेश्याव्यवसायाशी संबंध जुळले होते. तो अशाच प्रकारच्या गावातून सुंदर सुंदर मुली तांत्रीक शक्तीच्या भुलथापा देवून वा तसा दिखावा निर्माण करुन गायब करायचा व त्या सुंदर मुलींचा शहरात सौदा करायचा व त्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडायचा. अशा कितीतरी सुंदर मुली त्यानं गावातून गायब केल्या होत्या व त्यांना वेश्याव्यवसायाला लावले होते. परंतू ही गोष्ट अजुनही कोणाच्या लक्षात आली नव्हती. गाव मात्र तो एक मांत्रीक असल्यानं व तो गावाचं भलं करीत असल्यानं त्याला देवच समजत होते.
****************************************

दर महिण्यात अमावश्या यायची. अमावश्या आली की गावातील माणसं बाया भूतांना अंगात आणून थयथय नाचायची. ते पाहतांना इतर माणसांना थरकाप सुटायचा. परंतू तंत्रविद्या जाणणा-या त्या मांत्रीकाला काहीच वाटायचं नाही. तो ती विद्या शिकल्यानं भूतंही त्याला छळायची नाहीत. ती अंगात येणारी भूतं त्याच्यासमोर अगदी मान घालून डोलत बसायची. एखादंच अंगात असणारं भूत बोलायचं. म्हणायचं,
"मी अमूक अमूक आहे. अमूक झाडानं असं केल्यानं मला राग आला व मी याला धरलं."
सर्व गाव गोपालला दोष देत होतं. म्हणत होतं की त्या गोपालमुळंच गावावर अवखळा आली. कारण त्याला अपघात झाला होता हे गावाला माहित होतं. त्यामुळं त्याची इच्छा पूर्ण झाली नाही हेही गावाला माहित होतं. तो खट्याळ होता हेही गावाला माहित होतं. तो सुंदर सुंदर मुलींना छळत होता हेही गावाला माहित होतं आणि हेेही गावाला माहित होतं की त्यानं कित्येक गावातील मुलींच्या जीवन्या खराब केल्या. त्यामुळं तो अपघात नव्हता तर तो अपघात गावातीलच काही लोकांनी घडवून आणला. हे मात्र गावाला माहित नव्हतं. परंतू तेच भूत गावाला छळतंय असा समज गावक-यांचा होता.
अमावश्या नित्यनेमानं येत असे. अमावश्या आली की गाववातील भूतं डोलत. संपूर्ण जत्रात भरल्यासारखी राहात असे गावात. त्यात ते भूतं बोलत व प्रत्येक भूताला ते कोणाचं भूत आहे हे विचारल्यास ते भूत गोपालचंच नाव सांगत असे. एक भूत तर म्हणालं होतं की मला झाड माझ्यासमोर मुत्रक्रिडा करतांना दिसला. मला ते आवडलं नाही. म्हणून मी याला धरलं.
गोपाल गावातील खोडकर व्यक्ती. तो छळत होता तरुणींना. परंतू त्याचा उद्देश संपूर्ण गावाला छळणं नव्हतं. ती क्रिया तेवढी भयंकर नव्हती. परंतू त्याच्या नावाचा बनाव करुन आज जे काही घडत होोतं गावासोबत. ते चित्र मात्र महाभयंकर होतं. त्यातून गाव केव्हा सुटेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
ते गाव.......त्या गावात जसा गोपाल राहात होता. तसाच सुशील नावाचा व्यक्तीही पुर्वी राहात होता. तो सरपंचाचा मुलगा होता. तो गावच्या मुलींना छळायचा. ज्याप्रमाणे गोपाल मुलींना छळायचा. ते छळणं जसं गावाला माहित झालं. तसा गावक-यांनी निर्णय घेतला आणि त्याला चांगला चोप दिला. त्यातच तो शहरात राहायला गेला. नन्हे तर गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार सुशीलच्या मायबापानं त्याला शहरात हाकलून दिलं. परंतू जातांना त्यानं धमकी दिली की तो गावाला पाहूनच घेणार.
सुशिलचे माता पिताही काही चांगल्या स्वभावाचे नव्हते. ते मुलांला मदतच करीत असायचे. त्याच्या प्रत्येक कृत्यांना हवा देत असायचे. परंतू ते मुखीया असल्यानं मुलाचं छळण्याचं कृत्य त्यांना त्यात काही समस्या जरी नसली तरी गावक-यांपुढं त्यांना चांगल्या स्वभावाचा बनाव करावा लागला व ते चांगल्या स्वभावाचे आहेत. असं गावक-यांना वाटावं म्हणून त्यांनी हाकलून दिलं त्याला शहरात.
मुखीया चांगल्या स्वभावाचा आहे. असं गावक-यांचं म्हणणं व मानणं होतं तेव्हापासून. परंतू तोच खरी सुत्र हालवीत होता. सुशिल शहरात गेला. तशी त्याची ओळख त्या वेश्याव्यवसायाच्या मोरक्याशी झाली. त्यातच सुशिलनं त्या मोरक्याला आपल्या गावातील स्थिती सांगीतली व गावातील गोपालबद्दलही माहिती दिली.
गोपालही तसा खोडकरच होता. तोही सुशिलसारखाच मुलींना छळायचा. त्यामुळं ज्या गोष्टीला गाव मानत नव्हतं. ज्या गोष्टीतून सुशिलला हाकलून देण्यापर्यंतची मजल गावानं मारली होती. तीच कृती गावात होत असल्यानं गान परेशानच होतं. त्याचाच फायदा सुशिलनं घेण्याचं ठरवलं. ती गोष्ट सुशिलनं वेश्याअड्ड्यातील मोरक्याला सांगताच त्या मोरक्यानं एक योजना तयार केली. त्या योजनेनुसार गोपालचा खुन करायचा व गावात सुंदर मुलींना गोपालचं भूत छळतंय असा बनाव करायचा. तसं वातावरण निर्माण करायचं नव्हे तर या गावात भूतबाधा लागलेली आहे असं ते वातावरण. त्यातच एक दिवस गावाच्या भल्यासाठी आपण मांत्रीकही गावात आणला असा बनाव तयार करायचा. मात्र याच दिखाव्यातून गावातील मुली गायब करायच्या व हे कृत्य गावात असणारं गोपालचं भूतच करीत आहे असा बनाव करायचा.
ठरल्याप्रमाणं गावातील योजना वेश्याव्यवसायातील मोरक्यानं तयार केली. त्याला सुशिलनं मदत केली आणि ठरल्याप्रमाणं गोपालचा खुन करण्यात आला. आता गावातील मुलींना गायब करणं अगदी सोपं झालं होतं. त्या गायब होतच होत्या आणि त्या गायब करण्यामागं सुशिलचं भूत आहे असा बनाव निर्माण केला जात होता. तसं मुखीयानं गावात गोपालचं भूत छळतंय म्हणून गावाचं पुनर्वसनही घडवून आणलं. तरी मुली गायब होतात हे पाहून त्यानं मांत्रीक योजनाही अंमलात आणली. यातूनच मुरलीचीही पत्नी गायब झाली होती. या योजनेत पोलिसही हतबल ठरले होते. कारण त्यांनाही वाटत होतं की गावातील मुली कदाचित गोपालचंच भूत गायब करतंय.
ती अमावश्येची रात्र. अर्धी रात्र उलटली होती. तशी लोकांची गर्दी कमी झाली होती. संपूर्ण गाव गाढ झोपलं होतं. तसा भानुदास उठला. त्यानं आपलं अघोरी सामान घेतलं व तो स्मशानाची वाट चालू लागला.
आजुबाजूला घुबडाचा घुत्कार ऐकू येत होता. कुत्री भू भू भूंकत होती. परंतू त्याकडे भानुदासची नजर नव्हती. तो चालला होता एकटाच.
आज त्याला स्मशान गाठणं गरजेचं होतं. कारण उद्याला त्याला एका मुलीची आर्डर होती. त्या वेश्यालयात एक व्यक्ती असाही आला होता की ज्यानं एका मुलीची मागणी घातली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तो भुताचा सहारा घेत होता. आज ते भूतच आपली इच्छा पूर्ण करु शकतं असं भानुदासला वाटत होतं.
भानुदास स्मशानात पोहोचला होता. तसं त्या स्मशानात आज एक प्रेत जळत होतं. ते प्रेत त्याच गावातील होतं.
भानुदासनं आपल्या पोथलीतील सामान काढलं व त्यातील एका छडीनं त्या जळत्या प्रेताभोवती एक रेघ ओढली. तसं त्यानं एका गाडग्यातील पाणी त्या जळत्या शरणावर टाकलं. तसा चण्णं आवाज आला. त्यातून एक अंधूक आकृती उभी राहिली. तसा भानूदास म्हणाला,
"उठ शैताना, माझं काम फत्ते कर."
शैतान उठला होता. तसा भानुदास शैतानाला म्हणाला,
"हे शैताना, मला गावातील एक सुंदर मुलगी हवी आहे. बोल आणशिल मुलगी?"
तसं म्हणताच त्या अंधूक आकृतीनं मानेनं नकार दर्शवला. तसा भानुदास पुन्हा म्हणाला,
"का बरं शैताना, काही कमी पडलं का तुला?"
त्या अंधूक आकृतीनं हळूच मान हलवली. तसा भानुदास म्हणाला,
"काय हवंय. कोंबडा की बकरा?"
त्या बोलण्यावर ती अंधूक आकृती काहीही बोलली नाही. तसा भानुदास म्हणाला,
"शैताना, मी तुझ्यासाठी खाऊ आणला आहे. तुला आवडणारा. बोल खाशील?"
अंधूक आकृती काहीच बोलली नाही. तशा पुरचूंडीतून भानुदासनं धानाच्या लाह्या काढल्या व त्या स्मशानात जळत्या प्रेतात टाकून तो म्हणाला,
"खा शैताना आन् माझं काम फक्ते कर."
असं म्हणताच ती अंधूक आकृती वाकली व तिनं त्या लाह्या खाण्याचा बनाव केला. त्यानंतर ती उभी झाली. तशी त्या आकृदीनं मान हलवली. तसा भानुदास म्हणाला,
"मला ती मुलगी इथंच पाहिजे. स्मशानातच समजलं."
त्या अंधूक आकृतीनं तसं म्हणताच होकार दर्शवला. तशी ती अंधूक आकृती अंतर्धान पावली. ती कुठे गेली ते कळलंच नाही.

****************************************

थोड्या वेळाचा अवकाश. एक सुंदर गावातील मुलगी त्या स्मशानात आली होती. कोमल नाव होतं तिचं. ती सुंदर होती व तिचं अजून लग्नही झालं नव्हतं.
कोमल गावातील एका सुरजभान नावाच्या गरीब बापाची मुलगी. ती एकुलती एक होती. परंतू सुंदर होती. ती अचानक उठली. तेव्हा तिचे मायबापही झोपलेले होते. ती उठली व तिनं हळूच घराचा दरवाजा उघडला व ती स्मशानाची वाट चालू लागली. त्याचबरोबर कुत्री फारच भुंकायला लागली होती.
कुत्री गावात भुंकत होती. तसं गावातील लोकांना वाटत होतं की शैतान आलाय. तो शैतान कोणाला तरी नक्कीच उचलून नेणार. कारण दरवेळी जेव्हा कुत्री जास्त भुंकायची, तेव्हा कोणीतरी गायब झालेलंच असायचं. आजही तेच घडत होतं व कुत्री सारखी भुंकत होती.
कोमल स्मशानाची वाट चालत होती. तेच घुबडाचे आवाज परंतू त्याकडे तिचं लक्ष नव्हतं. कारण तिच्यामध्ये शैतान शिरला होता.
कोमल चालत होती ती स्मशानाची वाट. तसा लख्खं प्रकाश पडला. परंतू कोमलचं त्याकडेही लक्ष गेलं नाही. तसं स्मशान आलं.
भानुदासनं पाहिलं की आपल्या पुढ्यात एक गावातील मुलगी असून ती मुलगी त्या शैतानानंच भानुदाससाठी आणलेली आहे. तसा भानुदास अतिशय आनंदी झाला. तसा तो म्हणाला,
"अभुनंदन शैताना, तू अगदी चांगलं काम केलं. मी आता हिला शहरात विकून सकाळपर्यंत परत येतो.सकाळी तुला कोंबडं नैवेद्य म्हणून चढवणार."
ते शब्द. ते शब्द त्या अंधूक आकृतीनं,ऐकले. तशी त्या शैतानानं मान हलवली. त्याबरोबर भानुदासनं आपलं सामान आवरलं व तो आपल्या गाडीत बसला. तिलाही बसण्यास लावलं व गाडी सुरु करुन तो शहराची वाट चालू लागला. त्याची गाडी भरधाव होती. कारण त्याला कोणत्याही परिस्थीतीत सकाळी दिवस निघण्यापुर्वीच गाव गाठायचं होतं. तसा त्यानं गाडी चालवता चालवताच कोणालातरी फोन केला.
लवकरच तो शहरात पोहोचला. त्याचबरोबर त्या शहरात त्या वेश्येच्या अड्ड्यावर. तिथं त्या मुलीला सोपवून तो लवकरच माघारी फिरला. कारण त्याला गाव गाठायचं होतं.
सकाळ झाली होती. कोंबडं आरवायला लागलं होतं. तोच तो घरीही पोहोचला होता त्यातच सकाळच्या पहाटेला थकल्यामुळं तो लवकरच झोपी गेला होता.
सकाळ झाली होती. तसा भानुदास उठला. तसा तो बाहेर पडला. तसं त्यानं पाहिलं की बाहेर एका वडाच्या झाडाखाली लोकाची गर्दी आहे व लोकं काहीतरी पुटपुटत आहेत.
भानुदासला जशी लोकांची गर्दी दिसू लागली. तसा तो त्या गर्दीजवळ गेला. म्हणाला,
"काय झालं?"
भानुदासनं तसं विचारताच लोकं सांगू लागले.
"काल भूतानं कहरच केला. "
"काय झालं?"
"काल भूतानं कोमलला अचानक गायब केलं?"
"म्हणजे?"
"कोमल घरी नाही. ती कुठं गेली ते माहित नाही. बराच शोधाशोध घेतला. परंतू ती मिळाली नाही."
"हा तर कहरच झाला तर........" अनभिज्ञतेनं भानुदास बोलत होता.
भानुदासला सर्व माहिती होतं. परंतू तो सांगणार कसा? तिला गायब करण्यात त्याचाच हात असून त्याचे त्याला भरपूर पैसे मिळाले होते. त्यानं अशा कितीतरी लोकांच्या मुली गायब केल्या होत्या.
हीही घटना पोलिसस्टेशनला गेली. परंतू ती घटना नोंद केल्याशिवाय त्यांना काहीही मिळाले नाही. मात्र लोकांच्या मतानुसार कोमलला गोपालच्याच भूतानं गायब केलं होतं.
दिवसामागून दिवस जात होते. दरवेळी अमावश्या यायची व दरवेळी अमावश्येला भानुदास स्मशानात जायचा. आपल्या तांत्रीक शक्तीनं भूतांना बांधायचा नव्हे तर त्याच तांत्रीक शक्तीच्या भरवश्यावर तो आपलं जीवनयापनन करायचा. परंतू त्याचा मार्ग रास्त नव्हता. तो वाईट मार्ग होता. त्यात सुशिललाही पैसे मिळत होते.
आज सुशिल व भानुदास त्या वेश्यावस्तीचे मोठे दलाल बनले गोते. सुशिल अड्डा चालवत होता. तसेच भानुदास आपल्या तंंत्रशक्तीच्या भरवशावर त्याला मुली पुरवीत होता. त्या मुलीमध्ये काही कुवा-या मुली होत्या तर काही नवविवाहिता.
मुलींच्या जिंदग्या खराब होतात. कोण्या बापाच्या त्या एकुलत्या एक मुली असतील तर त्यांचा शाप लागतो. या गोष्टींशी त्यांना काही घेणं नव्हतं. तसेच वाईट गोष्टीचा परिणैम वाईट होतो असंही त्यांना वाटत नव्हतं.
अमावश्येची रात्र नेहमीच येत असे. परंतू ती अमावश्येची रात्र आलीच की लोकांना थरकाप सुटायचा. ज्यांच्या घरी मुली असत किंवा नववधू असत. त्यांना तर विशेष भीती वाटायची. त्यांना संबंध रात्र जागरणही करावंसं वाटायचं. परंतू त्या अमावश्येच्या रात्री गाढ झोप यायची. ती गाढ झोप केव्हा आली ते कळायचं नाही. विशेष म्हणजे जेव्हा सकाळ व्हायची, तेव्हा कळायचं की अमूक अमूक घरची सुन गायब आहे वा अमूक अमूक घरची मुलगी गायब आहे.
सुशिलही परेशान होता त्या अपहरणानं. त्याला वाटायचं की अपहरण हे कोणी भूत प्रेत करीत नसून ते कोणाचं तरी षडयंत्रच असावं. ज्याला पोलिसांचीही सोबत असावी. नाहीतर आजपर्यंत या भूताचा सोक्षमोक्ष लागला असता. कारण पोलिस प्रशासनही त्या गोष्टीकडं लक्ष देत नव्हतं.
ती अमावश्येची रात्र. त्या गावक-यांच्या घरात ती अमावश्येची रात्र भीती अन् वेदना घेवून यायची. कुण्याही घरची मुलगी गायब झाली की अख्ख्या गावाला दुःख व्हाययचं. गावात मांत्रीक होता. परंतू तो तात्पुरता जसा रोगावर डॉक्टर असतो. तसा होता. तो तात्पुरता त्यावर उपाय काढायचा. परंतू जी मुलगी त्याच्या मनात भरत असे. तिला मात्र तो त्या शैतानाला सांगून रात्रभ-यात गायब करीत असे. कुणाला पत्ताही लागू देत नसे. काही मुली तर तो स्वतः हवससाठी वापरत असे. परंतू त्याचं ते कृत्य अजुनही नजरेआडच होतं. कुणाला त्याचा थांगपत्ताही नव्हता. अन् थांगपत्ता लागणार कसा? त्याचा जनकच मुळात तोच होता.
मुरली आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेतच होता. परंतू ती पत्नी गावात असेल तेेव्हा ना. तो तर आज जणू पत्नीसाठी वेडापीसाच झाला होता. त्याचं कोण्या कामावर लक्ष लागत नव्हतं. ना खाण्यात लक्ष होतं.
मुरलीनं कित्येक रात्री बार्डरवर काढल्या होत्या. कित्येक रात्री अन्नापाण्यावाचून व उपासातापासात काढल्या होत्या. परंतू आता जी मनाची मनस्थिती होती. ती आतापर्यंत कधीच आली नव्हती. तसा तो फारच दुःखी होता. त्याला पत्नीची राहू राहू आठवण येत होती. काय करावं सुचत नव्हतं. तसं कधीकधी मरणाला जवळ करावंसं वाटे त्याला. परंतू तो विचार करायचा की जर आपण मरण पावलो, तर कधीच आपण आपल्या पत्नीचा सुगंधाचा शोध लावू शकणार नाही. तसेच गावच्या मुलींचेही जीव वाचवू शकणार नाही.
तो एकदाचा दिवस. त्यानं ठरवलं की आपण या गोष्टीचा छडा लावायचा. आपण या षडयंत्रात प्रत्यक्ष भूत जरी असला तरी त्याचेशी दोन हात करायचे आणि त्याला जाब विचारायचा की आम्ही तुझं काय बिघडवलं. कदाचित काहीतरी मार्ग तर सापडेल.
मनाचा निर्धार पक्का करुन मुरलीनं तो निर्धार अंमलात आणायचे ठरवले. तसा तो रात्र रात्र जागणाराच होता. बार्डरवर कित्येकदा शत्रूंचा शोध घेवून त्यानं कित्येक बार्डरवरील घुसखोरांना यमसदनी पोहोचवले होते.
मनाचा निर्धार पक्का करुन तो रात्र रात्र त्या भुताटकी रस्त्यावर पाळत ठेवू लागला. त्यानं आता तो भुताटकी रस्ता पुरेपूर न्याहाळला होता. तशी त्या रस्त्यावर रात्र न् रात्र पाळतही ठेवली होती. परंतू आजपर्यंत कोणीच रात्रीला त्या रस्त्यावरुन प्रवास केला नाही. तशातच अमावश्या रात्र आली.
ती अमावश्येची रात्र. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. तसा तो,घरातू बाहेर पडला. आपण भूत पकडायचाच. हा निर्धार मनात होता. कदाचित याच रस्त्यावर आढळेल आपल्याला भूत. हाही विचार मनात होता. कारण त्याची पत्नी याच रस्त्यानं गायब झाली होती.
मुरली ज्यावेळी घरातून बाहेर निघाला, तेव्हा घरातील आईवडीलानं त्याला टोकलं. म्हटलं,
"वेडा, होवू नकोस. तिचा नाद सोड. प्रसंगी दुसरा विवाह करु तुझा. ती या जगात नाही."
त्यावर त्यानं म्हटलं,
"ती याच जगात आहे. अगदी जीवंत आहे आणि सुखरुप आहे. मी शोधणारच तिला. माझा विश्वास आहे."
असे म्हणत तो निघाला. त्या अंधा-या रात्री. एकटाच चालत चालत डुलत डुलत. हातात एक दारुची नीप घेवून. कारण दारु त्याचेसाठी अशी वस्तू होती की जी त्याला हिंमत देत होती.
ती अंधारी रात्र. बाहेर काळाकुट्ट अंधार. काहीच दिसेनासं होतं. तरीही तो पत्नीच्या शोधासाठी चालत होता ती वाट. ती वाट जंगलाची होती. किरकिर आवाज येत होता जंगलातून. त्यातच त्या हिंस्र श्वापदाची डरकाळी. परंतू तो कोणालाच घाबरणारा नव्हता. असे कितीतरी आवाज ऐकले होते त्यानं आपल्या आयुष्यात. कितीतरी हिंस्र प्राणीही पाहिले होते आपल्या आयुष्यात. तसं पाहता दारुही पोटात होती. त्यामुळं भीतीचा नामोनिशाण नव्हता.
ती अमावश्येची काळी रात्र. पिकांवर अळी किडे पाडणारी रात्र. सर्व सृष्टीचं मीलन आणी प्रजनन करणारी ही रात्र. ज्या रात्री कुठेच चंद्र दिसत नसतो ती रात्र. जणू ती रात्र पोटात भीतीचा गोळा आणत असते. घरी लग्नाला विरोध होता मुरलीच्या. तरीही मुरलीनं विवाह केला होता सुगंधाशी. कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं. तसं पाहता प्रेमाखातर त्यानं सैन्यातून स्वेच्छानिवृत्तीही स्विकारली होती.
तो चालत होता तो भुताटकी रस्ता. दारु पोटात होती. परंतू त्याला ते सगळं आठवत होतं. ती त्याची पत्नी व त्या पत्नीसोबत घालविलेले प्रेमाचे क्षण. सारं काही आठवत होतं त्याला. परंतू काय करणार. काही उपयोग नव्हता. कारण ती आता त्याचेजवळ नव्हती.
तो चा त होता तो रस्ता. तसा थोड्याच वेळात करकर आवाज कानी आला. तसं त्यानं इकडं तिकडं पाहिलं. परंतू कोणीच त्याला दिसलं नाही. तसा तो घाबरला. त्याच्या अंगातून घामाच्या,धारा वाहायला लागल्या. त्याचबरोबर एक मण्यार त्याच्या समोरुनच सळसळ करीत निघून गेली. तोच तो भानावर आला. तसा वारा सुरु झाला.
वारा सुरु झाला. तोही सोसाट्याचा. त्या वा-याचा कर्णकर्कश आवाज. त्या आवाजानं आसमंत ढवळून निघाला. तो भयानक आवाज त्याच्या कानाला बधीर करीत होता. तसा मधूनच टिवटिव टिवटिव पक्ष्यांचा आवाज कानी येवू लागला.
अर्धी रात्र उलटली होती. तसं त्याला आठवलं की तिथं एक गणेश मंदिर होतं.
मुरली गणेश मंदिराच्या दिशेनं चालायला लागला. तोच त्याला आठवलं की या देवांना भूतं घाबरतात. ते त्या परीसरातही येत नाहीत. तोच त्यानं मंदिराचा आधार घेण्याचा विचार केला.
गाव बरंच दूर गेलं होतं. तरीही कुत्री ओरडण्याचा आवाज येतच होता. ती कुत्री अगदी सुर लावून ओरडत होती. तसा वातावरणात एकाएकी गारवा निर्माण झाला. पाऊस येण्याची चिन्ह दिसू लागली.
तो आवाज. तसा सोसाट्याचा वा-याचा आवाज, त्यातच गारवा आणि आता पाऊस.सगळं विलक्षण होतं. सगळी भीतीच भीती. श्वासाची गती वाढली होती. ह्रृदयाचे ठोके वाजत होते. नक्की काय घडणार हे काही कळत नव्हतं. घशाला कोरड पडली होती. परंतू सोबतीला दारु असल्यानं ती जाणवत नव्हती. परंतू आपलं आता काही खरं नाही असं त्याला वाटत होतं. तरीही आता प्रसंगाला तोंड देणं गरजेचं होतं. कारण त्याच्या डोळ्यासमोर सुगंधाचा निरागस चेहरा होता. तिच्या आठवणीनं डोळ्यात पाणी तराळत होतं. तशातच मागून कोणीतरी येवूनन त्याचा गळा आवळल्याचा भाष त्याला झाला. तसं त्यानं मागं वळून पाहिलं. परंतू मागं कोणीच नव्हतं.
मागं कोणीच नव्हतं. आजुबाजूलाही कोणीच नव्हतं. परंतू गळा आवळत होता कोणीतरी आणि छातीवर दाबही येत होता. त्यामुळं कोणीतरी आपला गळा आवळून जीव घेतोय असं त्याला वाटत होतं. तरीही सगळी ताकद एकवटून तो चा त होता त्या मंदिराच्या दिशेनं. कारण त्याला माहित होतं की ते मंदिरच त्याला वाचविणार. तसं मंदिर सापडलं व मुरलीला थोजं हायसं वाटलं. गळा आवळणारीही व्यक्ती नाहीशी झाली. ह्रृदयावरचा दाब सैल झाला व त्यानं सुटकेचा निःश्वास सोडला. तसं त्याला आठवलं की मंदिराकील गणेशाची महती आहे. त्यानंच त्याला वाचवलं होतं.
मुरली नास्कीक स्वभावाचा होता. तो देवाला व भूताला मानत नव्हता आजपर्यंत. परंतू आज त्यानं एकाचवेळी भूत आणि देव अनुभवला होता. देवानं त्याला वाचवलं होतं. तर भूतानं त्याला गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.
ते गणेश मंदिर. त्या मंदिराची मोठी आख्यायीका होती. त्या मंदिरातील गणेश नवसाला पावतोय असं जो तो सांगत असे. परंतू त्याची महती काही दूरच. त्याचीही हद्द ठरलेली असेल. तो गणेश अष्टविनायकापैकी एक होता.
मुरलीला आठवलं की त्याच्या विदर्भात अष्टविनायक आहेत. परंतू त्या विनायकाकडं कुणाचं जास्त लक्ष जात नाही. सगळी मंडळी पुण्याच्या परीसरात असलेल्या गणपती अष्टविनायकाच्याच दर्शनाला जातात. परंतू हा तर गणेश विदर्भातीलच. अष्टविनायकामधील एक. लोकं रात्रीला इथं जंगलात येत नाहीत. परंतू आज या मंदिरातील गणेशानंच त्याला जीव वाचवला होता. त्यानं विदर्भाबद्दल ऐकलं होतं. कारण तो विदर्भ रहिवाशीच होता. त्याला हळूहळू आता विदर्भातील अष्टविनायक आठवत होते व त्यांचा इतिहासही आठवत होता. दरवर्षी गणपती मोसमात गणपती बसत होते हेही त्याला आठवत होते आणि अख्खं गाव गणपती दर्शनाला जात होतं. हेही त्याला आठवत होतं.वतो विचार करीत होता विदर्भातील अष्टविनायकाचा. ते विदर्भातील अष्टविनायक असे होते.
गणपती सगळीकडंच बसत. त्यातील पुुण्याचे गणपती विशेष प्रसिद्ध होते. कारण त्यांचा गाजावाजा होत असे. परंतू विदर्भातही अष्टविनायक होते. परंतू ते तेवढ्या स्वरुपात प्रसिद्ध नव्हते. कारण त्याची तेवढी महती लोकांनी अनुभवली नव्हती. आता त्यानं गणपतीची महती अनुभवल्यानं विदर्भातही अष्टविनायक आहेत. असं त्याला वाटत होतं.

****************************************
विदर्भातील अष्टविनायक
१) नागपूरचा टेकडी गणेश
महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेलं शहर म्हणून नागपूरची ओळख असून इथे एका टेकडी भागात एक गणपती आहे. त्याला गणेश टेकडी असं नाव दिलंं आहे.
हे टेकडी मंदिर नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्टेशनजवळ असून ते नागपूरातील सर्वात मोठे गणपती मंदिर आहे. याला प्राचीन वारसाही लाभलेला आहे. या मंदिराचं बांधकाम अर्वाचीन असून राजे भोसले यांनी अठराव्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. तशी मुुर्ती बरीच प्राचीन आहे. हा गणेश नवसाला पावतो असेही म्हटले जाते.
२)आदास्याचा विघ्नेश
आदासा हे नागपूर जिल्ह्यातील व सावनेर तालुक्यातील एक गाव. हे ठिकाण नागपूरपासून अंदाजे चाळीस किमीच्या अंतरावर असून पाटनसावंगी या रेल्वेस्थनकापासून बारा किमी अंतरावर आहे. हे मंदिर उंच टेकडीवर असून ही मुर्ती नृत्यगणेशाची आहे असं मानलं जातं. या गणेशाची एक आख्यायीकाही आहे. म्हटले जाते की ही गणेशमुर्ती उजव्या सोंडेची असून महापाप, संकट, शत्रू याची तारणहार आहे.
पुर्वी या तीनही गोष्टींनी जगाला त्राही त्राही करुन सोडले होते. तेव्हा सर्व देवांनी शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रगट झाले. त्याने वरील तीनही दानवाचा नाश केला. ज्या ठिकाणी महागाई, संकट व शत्रू या नावाच्या तीनही दानवाचा नाश झाला, तिथे मुद्दल मुनींनी गणेशाची स्थापना केली. इथे दरवर्षी ममाघ शुद्ध चतुर्थीला मोठी यात्रा भरते.
विदर्भातील अष्टविनायकापैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर असून ती महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेशमुर्ती आहे. ही उंची जवळपास सहा मीटर असून हे बांधकाम हेमाडपंथी वाटते.
३)कळंबचा चिंतामणी
विदर्भातील अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथे आहे. ते गाव यवतमाळ पासून अंदाजे तेवीस किमी अंतरावर असून या गणेशाला चिंतामणी असं नाव आहे. हा गणेश पस्तीस फुट खोलात असून मंदिराच्या प्रवेशद्वारातून पाय-या उतरुन खाली जावं लागतं. खाली उतरल्यावर एक कुंड लागते. याला गणेशकुंड म्हणतात. म्हटलं जातं की या कुंडातून दर बारा वर्षांनी आपोआप पाणी बाहेर येतं. हे कुंड अंकुशानं स्वतः गणपतीनं तयार केलं. तसेच याची स्थापना प्रत्यक्ष देवराज इंद्र यांनी केल्याचे वर्णन पुराणात आहेत.
यामागं एक लोककथाही आहे. म्हणतात की ब्रम्हदेवानं एक लावण्यवती स्री निर्माण केली. तिला आपली मुलगी मानली. तिचं नाव अहिल्या ठेवलं. ती सुंदर होती. त्यामुळं तिच्यावर देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग, मानव सारे मोहित झाले होते. तिचा विवाह करायचे ब्रम्हदेवानं जाहिर केलं. परंतू एक अट ठेवली. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करुन पहिला येईल. त्याला ती देण्यात येईल. अटीनुसार सर्व निघाले पृथ्वीप्रदक्षिणा करायला. ही अट महर्षी गौतमाच्या कानी आली. त्यांनी प्रसूत होणा-या गाईलाच प्रदक्षिणा मारली व शास्राप्रमाणे ब्रम्हदेवाला अहिल्येची मागणी घातली. ब्रम्हदेवानं शास्र शिरोधार्य मानून गौतमाला आपली कन्या दिली.
पृथ्वीप्रदक्षिणा आटोपून देवराज इंद्र प्रथम परत आला. त्यांना अहिल्या विवाहाची बातमी कळली. परंतू आता विवाह झाला होेता. अहिल्याशी आता विवाह करता येत नव्हता. काय करावे. इंद्र विचार करु लागला. शेवटी त्यानं मुनी गौतमाचं रुप धारण करुन अहिल्येशी समागम केला.
अहिल्येशी असा दुराचार करणे हे मुनी गौतमाला माहित झाले. त्यांनी त्यास महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने त्यावर मुनीवर गौतमाची क्षमा मागीतली. त्यावर गौतमानं माफी देत गणेश षडाक्षर मंत्राचा त्यास जाप करण्यास सांगीतले. तसेच विदर्भात या कळंब जवळ जावून तपश्चर्या करण्यास सांगीतले.
इंद्राच्या तपश्चर्येनं गणेश प्रसन्न झाले व ते प्रगट झाले. त्यांनी इंद्राची कैफियत ऐकली व आपल्याजवळच्या अंकुशानं त्यांनी एक कुंड निर्माण केले. तेच गणेश कुंड होय. याच कुंडात स्नान करुन इंद्र रोगमुक्त झाले होते. स्नान झाल्यावर इंद्रानं इथे गणेशमुर्तीची स्थापना केली. गणेश अभिषेकासाठी त्यांनी स्वर्गातून गंगेला पाचारण केले व तिला आदेश दिला की तिनं दर बारा वर्षांनी येवून गणेशाच्या पायाला स्पर्श करावा. त्यानुसार दर बारा वर्षांनी गंगा या कुंडातून बाहेर येते व गणेशाच्या पायाला स्पर्श करुन निघून जाते.
इथे गणेशाची एकमात्र दक्षीणाभिमुख मुर्ती असून गणेशाच्या प्रवेशद्वाराजवळील सभामंडपाची निर्मीती प्रत्यक्ष बालगंधर्वानं केलेली असल्याचं मानलं जातं.
४)रामटेकचा अष्टदशभुज
हे मंदिर रामटेकच्या तेलीपु-यात आहे. रामटेक हे नागपूरपासून अंदाजे छेचाळीस किमी अंतरावर असून या मंदिरातील मुर्तीला अठरा हात आहेत. या मुर्तीची उंची एक मीटर असून हातात अंकु, पाश, त्रिशूळ आहे. ही मुर्ती अंदाजे अकरा बाराच्या शतकातील आहे असे मानले जाते.
५)वरदविनायक
हे मंदिर भद्रावतीजवळ असून भद्रावतीहून तीन किमीच्या अंतरावर आहे. हेही मंदिर टेकडीवर असून ह्या टेकडीवर असलेली गणेशाची मुर्ती भव्यदिव्य आहे. ही मुर्ती विहिरीसारख्या खोल गाभा-यात आहे. हेही मंदिर हेमांडपंथी आहे. तसेच मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील वाटते. मुर्ती मात्र त्याहूनही प्राचीन आहे.
६)भृशुंड गणपती
विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेेलं हे मंदिर. भंडा-यावरुन अवघ्या तीन किमी अंतरावर आहे हे मंदिर. या मंदिरात असलेली मुर्ती ही लाल रंगाच्या दगडात कोरलेली असून ही मुषकारुढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश व मोदक आहे.
७)सिद्धीविनायक
विदर्भातील सिद्धीविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला केळझरचा गणपती विशेष प्रसिद्ध आहे. येथील गणपतीही उजव्या सोंडेचा असून मुर्ती चार फुट उंच आहे. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा असेही म्हणतात. तसेच या स्थानाला महीभारत कालीन परंपरा लाभलेली आहे असेेही मानले जाते. हा गणेश वर्धा जिल्ह्यात असून विदर्भातील अष्टविननायकात या गणेशाचा तिसरा क्रमांक लागतो.
८)सर्वतोभद्र
पवनीचा सर्वतोभद्र हा गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून पवनी नावाच्या पुरातन शहरात हा गणेश वसलेला आहे. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगेचं पात्र आहे. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे. या गणेशाला गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणा-या भट यांच्या घरासमोर जे चार स्तंभ आहेत. त्या चारही स्तंभावर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. तर कर्णछेदावर पाचवी प्रतिमा आहे. अशा प्रकारचा सर्वतोभद्र गणपती विलक्षण असा गणपती समजला जावून त्याला विदर्भातील अष्टविनायकात स्थान मिळाले आहे.
वरील प्रकारचे आठही गणपती विदर्भात असून त्याला अष्टविनायक संबोधतात. त्या त्या भागातील हे गणेश आपआपले स्थान टिकवून आहेत. ते नवसाला पावतात असेही म्हटले जाते. याही स्थानावर देश विदेशातून भरपूर पर्यटक दर्शनासाठी येत असून बाराही महिने या ठिकाणची मंदिरं दर्शनासाठी खुली आहेत.
हळूहळू गणपतीचा इतिहास व गणपती त्याच्या डोळ्यासमोरुन तरळून गेले. आता थोडी भीतीही कमी झाली होती. तशी झोप सतावायला लागली होती.
त्याला झोप सतावत होती आणि आता तो झोपणार. तोच त्याच्या चेह-यावर कशाचा तरी उजेड पडला. तसा तो उठून बसला. तोच त्यानं पाहिलं की त्या निर्जन रस्त्यानं एवढ्या रात्री कोणीही जात नसतांना एक कार रस्त्यानं धावत आहे. ज्या गाडीचे दोन्ही लाईट सुरु असून ते दूरुन का होईना, आपल्या चेह-यावर येत आहेत.
तो प्रकार त्य्ला विचीत्र असाच वाटला. तसा संशयास्पदही वाटला. त्याला वाटलं की एवढ्या रात्री या रस्त्यानं कोणीही जात नसतांना अचानक ही एक गाडी कशी काय जात असेल! कदाचित हा आपण जसे सुगंधाला घेवून या रस्त्यानं आलो होतो. तशातील तर प्रकार नाही. त्याचा विचार बरोबर होता. परंतू तो सुगंधाच्या पोटात दुखणं असल्यानं जात होता आणि ती गाडी आपल्या स्वार्थानं वाईट काम करण्यासाठी जात होती. मात्र मुरलीच्या पोटात दारुची नशा असल्यानं त्यानं त्या गोष्टीकडे कानाडोळा केला व तो लवकरच झोपी गेला. कशाचीही चिंंता न करता.
ती रात्र तशी जीवघेणी वाटत होती त्याला. परंतू त्या रात्रीनं त्याला अंधारात ठेवलं नाही. त्याची भीती गायब करुन त्या रात्रीनं त्याला उजेडच दाखवला होता. तसा तो झोपी गेला होता त्या गणपतीच्या मंदिरात. जो गणपती अष्टविनायकाचं स्थान होतं.
तो झोपी गेला. तशी मध्यरात्र झाली व त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला गणपतीबाप्पानं दर्शन दिलं तसंच दर्शन जेष्ठागौरीनंही दिलं होतं. तो पाहात होता ते स्वप्न. ज्या स्वप्नात पुण्यातील अष्टविनायक आले होते.

****************************************

गणपती अष्टविनायक गणपतीचे स्थान म्हणून पुर्णपणे पुणे आणि रायगड जिल्ह्याला स्थान दिलं जातं आणि त्यांचाच समावेश मुख्यतः अष्टविनायकात केला जातो. ते गणपती असे.
१)मोरगावचा मयुरेश्वर
अष्टविनायकापैकी मोरगावचा मयुरेश्वर हा पहिला गणपती आहे. मोरगाव हे गाव मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील एक गाव असून गाणपत्य संप्रदायाचे ते एक गाव असून थोर देशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पुजेचा वसा घेतला होता. म्हटलं जाकं की हा गणेश स्वयंभू प्रगट झालेला असून प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता नावाची आरती समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रचली.
हे मंदिर चांगल्या प्रकारे सजवलेले असून मंदिरात अनेक प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे. श्री मोरेश्वरांच्या बेंबीत व डोळ्यात हिरे बसवलेले असून या मंदिराच्या भोवती बुरुजसृश बांधकाम आहे. हे ठिकाण बारामती तालुक्यात असून बारामतीवरुन पसतीस किमी अंतरावर आहे. महाराष्टाचे कुलदैवत जेजूरीचा खंडोबा येथून सतरा किमी अंतरावर अाहे. मोरगावचं मंदिर बांधकाम आदिलशाही सुभेदार गोळे याने बांधलेले आहे असे या गावचे लोकं म्हणतात.
२)थेऊरचा चिंतामणी
हा गणपती दुस-या क्रमांकावर असून हा गणपती पुणे जिल्ह्यातच हवेली तालुक्यात आहे. हे ठिकाण कदंब वृक्षाखाली असून हा गणपती भक्तांच्या चिंतेचं हरण करतो. म्हणूनच याला चिंतामणी म्हणतात. प्राचीन इतिहास पाहता पेशवे हे थेऊरच्याच गणपतीचे भक्त समजले जातात. कारण थेऊरचा विस्तारच मुळात माधवराव पेशव्यांनी केला असं म्हटलं जातं. त्यांचं निधन थेऊरलाच झालेलं असून त्यांच्यासोबत सती गेलेली रमाबाई हिचीही समाधी,इथे आहे.
३)सिद्धटेकचा सिद्धीविनायक
हा तिस-या क्रमांकाचा गणपती असून उजवीकडे सोंड असणारा हा एकमेव अष्टविनायक होय. हे ठिकाण भीमा नदीवर आहे. तसेच हे ठिकाण स्वयंभू आहे असे म्हटले जाते. याचा गाभारा लांबी रुंदीने प्रशस्त असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. मंदिरात पितळी मखर असून चंद्र, सुर्य व गरुडाच्या प्रतिमा आहेत. हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालूक्यात आहे आणि दौंडपासून अवघ्या एकोणवीस किमी अंतरावर आहे.
४) रांजनगावचा महागणपती
हा अष्टविनायकापैकी चौथा गणपती असून याला महागणपती असेही म्हणतात. हा देखील गणपती स्वयंभू आहे,असं मानलं जातं. पुणे अहमदनगर मार्गावर शिरुर तालुक्यात हे ठिकाण असून सर्वशक्तीमान गणपती असे या गणपतीला मानले जाते. हा गणपती उजव्या सोंडेचा असून त्याला कमळाचे आसन असून त्याचाही जिर्णोद्धार माधवराव पेशव्यांनीच केला.
५)ओझरचा विघ्नहर
हा पाचव्या क्रमांकाचा गणपती असून याला सर्वीत श्रीमंत गणपती मानण्यात येतो. त्याच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा,आहे. हा भक्तांच्या वेदनेचे व संकटांचे हरण करतो. म्हणून याला विघ्नेश्वर असंही म्हणतात. हे ठिकाण कुकडी नदी तिरावर असून जागृत देवस्थान आहे असे मानले जाते. थोरल्या बाजीराव पेशव्याचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असं मानलं जातं.
६)लेण्यांद्रीचा गिरीजात्मक
हा सहाव्या क्रमांकाचा गणपती असून कुकडी नदीच्या परीसरात जुन्नरच्या लेण्याच्या समुदायात हा गणपती असून डोंगरावर वसलेला आहे. हा देखील गणपती स्वयंभू आहे असे मानले जाते. हा गणपती दगडामध्येच कोरलेला असून ही गणेशाची मुर्ती अगदी प्रसन्न मुद्रेत दिसते.
याही मंदिराचा जिर्णोद्धार पेशवेकाळात झालेला असून मंदिरात दगडी खांब आहेत. त्यावर हत्ती, वाघ व सिंह कोरलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी चारशे पाय-या आहेत.
हा गणपती जुन्नरपासून सात किमी अंतरावर असून पुण्यावरुन सत्यान्नव किमी अंतरावर हा गणपती आहे.
७) महडचा वरदविनायक
हा सातव्या क्रमांकाचा गणपती असून या स्थानाला मठ असे देखील म्हणतात. हे मंदिर साधे कौलारु असून मंदिराला घुमट आहे. तसाच सोनेरी कळसही आहे. कळसावर नागप्रतिमा आहे. हा गणपती रायगड जिल्ह्यात असून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आहे.
८)पालीचा बल्लाळेश्वर
हा आठव्या क्रमांकाचा गणपती असून हेही स्वयंभू स्थानच आहे. मंदिर पुर्वाभिमुख असून गणपतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कपाळ मोठे,आहे. डोळ्यात हिरे आहेत. तसेच मंदिर चिरेबंद असून मंदिरात मोठमोठ्या घंटा आहेत. त्या घंटा चिमाजी अप्पाने अर्पण केलेल्या,आहेत. हे स्थान रायगड जिल्ह्याती सुधागड तालूक्याातील आहे. येथे जवळूनच अंबा नदीही वाहते. या गणेशाला सुधागड किल्ल्याची भव्य पाश्वभुमी लाभलेली आहे. हे स्थान खोपोलीपासून अडतीस किमी अंतरावर असून पालीला जाणे सोपे आहे.
हे आठ गणपती. यातील बरेचसे गणपती स्वयंभू असल्याने या अष्टविनायकाला महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि जगातही फार मोठे स्थान आहे. दरवर्षी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात व दर्शन घेवून आनंद व्यक्त करतात. तसेच ज्यांची अगाढ श्रद्धा आहे या गणपतीवर. त्यांच्या नवसालाही पावतात हे गणपती. मात्र ज्यांची श्रद्धा नाही, त्यांनी एक पर्यटक म्हणून एकवेळा तरी वरील गणपतीचं नव्हे तर अष्टविनायकाचं दर्शन घेतलेलं बरं.
जेष्ठा गौरी........जेष्ठा गौरीचं पुजन घरोघरी करतात. गौरीला महालक्ष्मी असंही म्हणतात. गौरी म्हणजे पार्वती. ती महादेवाची पत्नी. जेष्ठा गौरी म्हणून पुजली जाते.
भाद्रपद महिण्याच्या शुद्धपक्षात अनुराधा नक्षत्रात हा सण मोठ्या उत्सवात पार पडतो.
गौरी म्हणजे पार्वती असे समजून तिचं पुजन जेष्ठा नक्षत्रावर केलं जातं. त्यातच मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते. जेष्ठा नक्षत्रावर पुजन होते. म्हणून हिला जेष्ठागौरी सुद्धा म्हटलं जातं.
जेष्ठागौरीला गणेशाची आई मानण्यात येवून गणेशाच्या आईच्या स्वरुपात तिचं पुजन केलं जातं. तिचा इतिहास असा की एकदा असूरांच्या त्रासाला कंटाळून स्रिया माता पार्वतीकडे गेल्या असता आपलं सौभाग्य अक्षय करण्याची विनंती माता पार्वतीला केली. त्यानुसार तिनं असूरांचा संहार केला. त्यानुसार सर्व स्रियांना व त्यांच्या पतींना या गौरी रुपातील पार्वतीनं सुखी केलं. तेव्हापासून स्रिया महालक्ष्मी जेष्ठा गौरीचं पुजन करु लागल्या.
महालक्ष्मीचं पुजन हे सर्व जाती जमातीतील लोकं करतात. शेती हा प्रमुख व्यवसाय असणा-या स्रिया धान्याची राशी मांडून पुजा करतात. काही मात्र काही वनस्पतीच्या फांद्याच ठेवून पुजा करतात. या पुजेनुसार सखी पार्वतीसह त्यांच्या मुलांचीही पुजा केली जाते.
पुजेमध्ये सर्व प्रकारचं जीनस ठेवलं जातं. त्यातच गौरीला आवडती असणारी आंबील विशेषतः सर्व घरी बनवली जाते. एका केळीच्या पानावर भोग म्हणून हे सर्व साहित्य सजवलं जातं.
पहिल्या दिवशी गौरीची स्थापना होते. तसेच दुस-या दिवशी जेवन व तिस-या दिवशी गौरीचं विसर्जन होतं. कोणी म्हणतात की गौरीपुजा ही अडीच दिवसाची असते. तिस-या दिवशी रितीनुसार विसर्जन होत असून या तिस-या दिवशी गौरीच्या चेह-यावर उदासीनता दिसून येते असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं पुढील वर्षीचं आमंत्रण देवून गौरीचं विसर्जन केलं जातं. यामध्ये कायम स्वरुपाच्या मुर्ती असतील तर त्या मुर्तीचं विसर्जन होत नाही. गौरीचं विसर्जन केल्यावर थोडीशी वाळू घरी आणतात. ती वाळू घरभर शिंपतात. शेतीत शिंपतात. त्याचा अर्थ असा की ही वाळू घर परीसरात टाकल्याने घरात सुखसमृद्धी नांदते. तसेच शेतमालाचे किटकापासून रक्षण होते.
या गौरीची वेगवेगळ्या प्रांतात पुजा केली जाते. दक्षिण भारतात गौरीची पिठाची प्रतिमा बनवतात. तिची मिरवणूक काढतात. कोकणात तेरड्याच्या फांदीची महालक्ष्मी म्हणून पुजा करतात. तेथे हिला मासोळ्यांचा नैवेद्य लावतात.
जेष्ठा गौरी ही माता लक्ष्मीची मोठी बहिण असून तिची उत्पत्ती समुद्रमंथनातून विषाची निर्मीती झाल्यानंतर झाली असे म्हणतात. देवीचे वाहन कावळा असून ती नेहमी कमळावर विराजमान असते. पिंपळ वृक्ष हे तिचं निवासस्थान आहे. ती पाप, आळस, दुःख व कुरुपता दूर करण्याचं कार्य करते.
मुख्यतः माहेरची ओढ लावणारा सण म्हणून याची ख्याती असून गणपतीच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसातच गौराईचं आगमण होत असते. म्हटलं जातं की ह्या महालक्ष्म्या तीन दिवस माहेराला येतात आणि येतांना सुखसमृद्धी भरभराट घेवून येतात.
ग्रामीण भागात विशेष मजा असते या सणाची. सर्व स्रीया नदीवर जातात. तिथे गाणे म्हणतात. काहीजण फुगड्याही खेळतात.
या सणाला बत्तीस प्रकारच्या भाज्या करण्याची पद्धत असून काही ठिकाणी सोळा भाज्याही बनवल्या जातात.
लोकं दरवर्षी महालक्ष्म्या स्थापन करीत असून जेवनही ठेवतात. त्यातच दोन महिण्यानंतर का होईना, चांगल्या चांगल्या भाज्या आपल्याला खायला मिळणार व आनंदही वाटतो म्हणून लोकं खूप खातात. त्यातच अन्नविष तयार होवून प्रकृती बिघडते. त्यामुळं खातांना थोडं सांभाळून खावं. कारण आपण चांगलं जेवन आहे असं समजून भरपेट खाल्लं तर उद्या आपलेच पोट खराब झाल्या शिवाय राहात नाही. तसेच भाज्याही बरोबर खाव्यात. कारण सर्वच भाज्या पोटाला सहन होत नाहीत. विष होतं. असं जर घडलं तर उद्या समस्या आपल्याचमुळं आपल्याला येतात. आनंदाच्या वातावरणाची निर्मीती दुःखदायी वातावरणात होते. दोष आपलाच असतो आणि तो विनाकारण जेष्ठा गौरीला आपण देत असतो. जिचा काहीच दोष राहात नाही.

***************************************

स्वप्न संपलं होतं. तशी खाड्कन मुरलीला जाग आली. नशाही थोडी उतरली होती. तसा तो खाड्कन उठला. त्याला रात्रीचं सगळं आठवत होतं. तो गळा दाबणारा व न दिसणारा व्यक्ती आणि त्यातच त्याला गवसलेलं मंदिर. तशातच त्या भयाण रात्री मुख्य रस्त्यानं जात असलेली चारचाकी गाडी आणि त्या गाडीचे चेह-यावर पडलेला लाईटाचा प्रकाश. सारं आता आठवत होतं. चो रात्री दारुच्या नशेत जरी असला तरी ती दारु त्या गळा दाबण्याच्या प्रकारानं पूर्ण उतरली होती. त्यामुळंच त्याला ती गाडी स्पष्ट दिसली होती.
ती रात्रीची नशा. त्याला विचारच करु देत नव्हती. त्यामुळं को रात्री लवकरच झोपी गेला होता. परंतू आता सकाळी उठल्यावर तो विचार करु लागला होता की तो कोण असावा. ज्यानं या रस्त्यानं बिनधास्त गाडी चालवली. कदाचित तो षडयंत्रकारी तर नसावा. असे विचार मनात येत होते.
मुरली पत्नी गेल्यापासून दारुडा बनला होता. तो सतत दारुच्या नशेत राहात असे. त्यामुळं लोकंही त्याच्या बोलण्याकडं विशेष लक्ष देत नसत. त्याला बेवडा म्हणून सोडून देत. तो दारुच्या नशेत गावात फिरत असे आणि गावात कुठंही झोपत असे. त्याला गावात कुठंही फिरायला व कुठंही झोपायला मनाई नव्हती.
सकाळचे नव वाजले होते. तसा तो आल्यापावली गावात परत जायला निघाला होता. रात्री जेवन न केल्यानं भुकंही फार लागली होती. पोटात कावळेही ओरडत होते. तसा तो हळूहळू चालत गावात पोहोचला.
गावात पोहोचताच त्याला माहित झालं की गावातील एक मुलगी शकुंतला गायब आहे. कोणं गायब केली हे काहीही कळायला मार्ग नाही. त्यातच मुरली विचार करु लागला की रात्रीची ती गाडी कदाचित मुलगी गायब करणारी तर गाडी नसावी. कारण ज्या रस्त्याने कोणताही माणूस एवढ्या रात्री जावू शकत नाही. अतिशय भीती वाटते. त्या रस्त्यानं ती गाडी गेलीच कशी? यावरुन त्याला षडयंत्राची कल्पना येत होती.
भानुदास दर अमावश्येला आपला कारनामा करीत होता. भुताच्या नावावर मुलींचं अपहरण करणंं हा त्याचा धंदा होता. तसा तो दरवेळी अमावश्या येण्याची वाट पाहात होता आतापर्यंत. परंतू आता त्याचा धंदाही वाढलेला होता आणि वेश्याव्यवसायाला भरपूर मुलीही लागत होत्या.
वाढता धंदा आणि वेश्याव्यवसायाला लागणा-या मुलींची वानवा लक्षात घेता तो आजुबाजूचेही गाव फिरु लागला. त्यातच एखादी चांगली मुलगी नजरेस पडलीच तर तिला संमोहित करुन तो तिला ऐनप्रकारेन गायब करुन तिला वेश्याव्यवसायासाठी विकत होता. परंतू ते कृत्य तरी केव्हापर्यंत करणार. नशीब जेव्हा फुटायचं असेल, तेव्हा फुटतंच. मुरलीचंही तसंच झालं होतं. तेच भानुदासचंही होणार होतं.
मुरलीला आता त्याच्या पत्नीचा विरह सहन करावा लागत होता. तशी भानुदासला मुली अपहरण करायची सवयच पडली होती. त्यामुळं की काय, तो आता अमावश्येची वाट पाहात नव्हता. रोजच तो मुलींचं अपहरण करायचा. तशा रोजच कोणत्या ना कोणत्या गावातील मुली गायब होत होत्या. ते पाहून सर्व गावची गावं त्याच्या पाळतीवर होते. परंतू भानुदासही काही कमी नव्हता. तो अगदी तंत्रमंत्र जाणत असल्यानं त्या तंत्रमंत्रांच्या जोरावर तो मुली गायब करीत होता. त्यातच त्याला त्याचं ते स्मशानातील भूत मदत करीत होतं.
भानुदास आता दररोजच रात्री उठायचा. गाडीनं गावोगाव फिरायचा तो रात्री. अन् ज्या गावी चिता जळत दिसली. त्या गावी त्या चितेजवळ थांबायचा. तसा आपल्या पोथलीतील एक काडी काढून त्या जळत्या चितेभोवती गोल फाडायचा. तसा त्या चितेत तो पाणी टाकायचा. ते पाणी टाकल्यानंतर त्या चितेत तो हळदकुंकू टाकायचा. त्यानंतर आपल्या स्वतःभोवती एक गोल फाडून तो सर्वात शेवटी त्या चितेत धानाच्या लाह्या टाकायचा. परंतू ते टाकत असतांना काहीतरी मंत्र नक्की पुटपुटायचा. तसा मंत्र पुटपुटून झाल्यावर व धानाच्या लाह्या टाकून झाल्यावर तो त्या चितेला म्हणायचा,
"हे शैताना, उठ. असा झोपू नकोस. मला आजच एका सुंदर मुलीची गरज आहे. तेव्हा ती सुंदर मुलगी लवकरच मला गवसू दे. तू आताच्या आता जा व त्या सुंदर मुलीला घेवून ये लवकर."
त्या चितेशी तसं बोलताच त्या चितेतून अक्राळ विक्राळ करीत एक भूत उभं व्हायचं. तसा प्रचंड आवाज व्हायचा. तसा भानुदास म्हणायचा,
"हे शैताना, असा ओरडू नकोस. तूझ्या ओरडण्यानं गाव जागं होईल व माझ्या कामात विघ्न उत्पन्न होईल."
तो बोलायचा त्या शैतानाशी. तोच ते भूत त्यातं गुलाम असल्याागत चूप राहायचं. तसा भानुदास म्हणायचा,
"जा शैताना, लवकर जा. अन् लवकर आण एखादी सुंदर मुलगी. मी तुला उद्याच कोंबडा देणार. तुला लालच कोंबडा आवडतो ना. मग लालच कोंबडा देणार."
त्याचे बोललेले शब्द. शैतान गुलामासारखा निघायचा आणि थोड्याच वेळात त्या त्या गावातील मुलगी त्या चितेजवळ अगदी डोळे झाकून यायची. तिच्यात शैतान शिरलेलं असायचं.
आज त्याचं नशीब फुटणार होतं की काय, कुणास ठाऊक. त्याला रात्री झोपेतून उठतांना मुरलीनं पाहिलं आणि गाडी सुरु करुन कुठंतरी जातांना पाहिलं. तसा तो आजही पिवूनच होता. त्यामुळं आज तो काहीही करु शकला नाही. मात्र शंकेची पाल त्याच्या मनात चुकली. कदाचित हाच तांत्रीक मुली अपहरण तर करीत नाही. यावर पाळत ठेवायला हवी. दारु सोडायला हवी. कारण दारु पिवून या माणसाशी आपण लढू शकणार नाही. परंतू आपण दारु सोडली तरी त्यासाठी दारु पिण्याचं नाटक करायला हवं. तेव्हाच कोणाला आपल्यावर शंका येणार नाही. आपण याला रंगेहाथ पकडायला हवं. त्यासाठी काहीही कोणाजवळ बोलायला नको. फक्त पाहात राहावं आणि संधी मिळाली की आपण याला पकडावं.
मुरलीनं विचार केला तसा. तशी त्यानं त्या दिवसापासून दारु सोडली. त्यासाठी मनावर नियंत्रण आणलं. परंतू गावक-यांना दाखवलं की तो दारु पितोय.
मुरली रस्त्यावर झोपू लागला होता त्याची पत्नी गेली तेव्हापासूनच. त्याची बुद्धी काबूत नव्हती त्याच्या. परंतू आता त्याला अर्ध्या रात्री भानुदास उठून गाडीनं कुठेतरी जातांना दिसताच त्याची बुद्धी भानावर आली होती.
तो रोजच दिवसा झोपू लागला होता आणि रात्री जागू लागला होता तो. तसा संधीची वाटही पाहू लागला होता तो.
मुरली दररोजच अर्ध्या रात्री भानुदासला उठून बाहेर जातांना पाहू लागला होता. तशातच तो संधी शोधू लागला होता की भानुदास दररोज जातोय कुठे? आज त्याला नामी संधी चालून आली होती.
मुरली आज त्या भानुदासच्या गाडीत मागं लपून बसला होता. तसा आज नेहमीप्रमाणे मध्यरात्री भानुदास उठला व तो भरकन गाडीत बसला. घाईघाईनं जाण्याच्या चक्करमध्ये त्यानं गाडीचा मागचा भाग तपासला नाही. नाहीतर त्याला मुरली दिसला असता.
ती अंधारी रात्र. गाडी चालत होती भानुदासची. तसा तिचा वेगही प्रचंड होता. तसा मुरली पाहातच होता ते त्याचं कृत्य. तसं स्मशान आलं. त्या स्मशानात गाडी थोडी दुरच थांबली. ते सर्व मुरली पाहात होता.
मुरलीनं पाहिलं की भानुदास गाडीतून उतरत आहे. त्यानं आपली पोतली काढली आहे व तो त्या जळत्या चितेकडे जात आहे.
मुरली गाडीतून ते सर्व पाहात होता. तसा भानुदास चितेजवळ गेला. तिथं त्यानं आपल्या भोवती एक वर्तूळ काढवं. त्यानंतर त्यानं त्या चितेभोवतीही एक वर्तूळ काढलं. त्यानंतर त्यानं बाटलमधील पाणी घेतलं. ते पाणी त्या चितेवर शिंपडलं. तसा त्या चितेच्या ज्वाळेतून धूर निघू लागला. तसं त्यानं त्या जळत्या चितेत काहीतरी फेकलं. त्याचबरोबर त्या चितेतून अक्राळविक्राळ एक आकृती उभी झाली. तसा कडकड आवाजही आला. तसा भानुदास त्या अक्राळविक्राळ आकृतीला म्हणाला,
"असा आवाज नको करुस. गाव जागेल व माझ्या कार्यात बाधा उत्पन्न होईल."
मुरलीनं पाहिलं की ती आकृती अगदी गुलामासारखी भानुदासचं बोलणं ऐकत आहे आणि त्याच्या हो ला हो मिरवीत आहे. तसा भानुदास त्या आकृतीला जोरात म्हणाला,
"माझं एक काम आहे. करशिल."
".........." ती आकृती काहीही बोलली नाही. तसा भानुदास म्हणाला,
"मला एका सुंदर मुलीची गरज आहे. बोोल आणशिल?"
"..........." ती आकृती काहीच बोलतांना दिसली नाही. परंतू भानुदास बोलतांना दिसला. तो पुन्हा म्हणाला,
"मी उद्या तुला कोंबडा देईल लालवाला. तुला आवडतो ना लाल कोंबडा."
".........." ती आकृती काहीच बोलली नाही. तसा भानुदासच म्हणाला,
"जा आता, लवकर जा. अन् लवकर परत ये. अन् लवकरच एक सुंदर मुलगी घेवून ये."
भानुदास बोलताबरोबर की आकृती अंतर्धान पावली. तसा भानुदासही चुप बसला एकटक चितेकडे पाहात. मुरली ते सगळं पाहात होता. तोच थोड्याच वेळाचा अवकाश.......एक सुंदर मुलगी तिथे उपस्थीत झाली. त्याचबरोबर भानुदास त्या आकृतीला धन्यवाद देवू लागला.
मुरलीला अतिशय भीती वाटत होती. कदाचित या मुलीचा चितेमध्ये बळी तर देत नाही. परंतू तसं काही घडलं नाही. भानुदास उठला. त्यानं मुलीला गाडीत बसण्यास सांगीतले. तशी मुलगी गाडीत बसली व भानुदासनं गाडी सुरु करुन ती गाडी भरधाव चालवली. थोड्याच वेळानं ती गाडी मुख्य रस्त्याला लागली व क्षणातच ते त्याचं जुनं गाव आलं आणि तो जुना रस्ता. ज्या गावात तो पुर्वी राहात होता. तो रस्ता की ज्या रस्त्यानं त्याची पत्नीही गायब झाली होती.
गाडी भरधाव सुरु होती. तसे लाईट दिसू लागले होते. वाटत होते की शहर आलं असावं. तसं थोड्याच वेळात शहर आलं होतं.
ते शहर. त्या शहरातील तसे रस्ते मुरलीनं पाहिलेलेच होते.रस्ते त्याच्या ओळखीचेच होते. तसं पाहता ती गाडी त्या रात्रीच्या अंधारात वेश्यावस्तीत वळली व वेश्यावस्तीचा रस्ता चालू लागली.
थोड्याच वेळात गाडी त्या वेश्यावस्तीतच थांबली. तसा भानुदास बाहेर आला. त्यानं गाडीचा दुसरा दरवाजाही उघडला. तशी ती मुलगी गाडीतून बाहेर निघाली व तिथं आलेल्या माणसासोबत जावू लागली. मुरलीनं गाडीतूनच त्या माणसाला पाहिलं. तसं त्यानं त्या अंधा-या रात्री विजेरी खांबांच्या उजेडातही त्या माणसाला ओळखलं नाही. परंतू त्याला कळलं होतं की हा भानुदासच मुलींना आपल्या तंत्रविद्येच्या माध्यमातून गायब करतो व इथे आणून या वेश्यावस्तीत विकतो. त्यानंच आपली पत्नीही कदाचित विकली असावी.
भानुदासनं ती मुलगी जाण्यापुर्वी त्या माणसाकडून पैसे घेतले होते. ते पाहून तर मुरलीचा पक्काच विश्वास बसला होता. तो तसं पाहता त्याला रंगेहाथ तिथं पकडूही शकत होता. परंतू त्याला शंका होती की आपण इथं एकाला पकडण्याऐवजी याच्या पूर्ण गँगलाच पकडावं. म्हणून तो आताही चूप बसला होता.
भानुदासनं गाडी सुरु केली. तशी ती गाडी सकाळी पहाट होण्यापुर्वीच त्याच्या गावी परत आली. तसा भानुदासनं गाडी पार्क केली व तो थकला असल्यानं लवकरच घरात जावून झोपला होता.
थोड्या वेळानं मुरलीही गाडीतून उतरला. तसं त्यानं पाहिलं की बाहेर कुत्रीही जास्त जोरात ओरडत आहेत. तो लवकरच बाहेर पडला आणि तोही मंदिराच्या पारावर झोपी गेला.
दिवसामागून दिवस जात होते. भानुदासचं अघोरी कृत्य सुरुच होतं. तशातच मुरलीलाही आलेली मुली विकण्याची शंका त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. भानुदास रोजच गाडी घेवून जात होता आणि रोजच मुरली पाहात होता ते भानुदासचं वागणं. परंतू तो काहीच करु शकत नव्हता. तसेच रोजच आजुबाजूच्या परीसरातील मुलीही गायब होत होत्या.
मुरली तशातच काही लोकांना सांगत होता की गावच्या मुली हा भानुदासच गायब करतो. परंतू त्याच्या बोलण्यावर कोणीच विश्वास करीत नव्हता. परंतू गावातील एक असाही व्यक्ती होता की ज्यानं मुरलीच्या बोलण्यावर विश्वास केला. तो व्यक्ती म्हणजे कोमलचा बाप. कोमलच्या बापाला नक्कीच वाटत होतं की हे कारस्थान मुरलीच्या सांगण्यानुसार भानुदासचंच असावं. त्याचं नाव नंदलाल होतं.
नंदलाल एक दिवस मुरलीजवळ आला. म्हणाला,
"मुरली, तू म्हणतोस ते खरं हाये का?"
"काय म्हटलं मी?"
"ते भानुदासची गोष्ट. तू म्हणतोस नं की भानुदास पोरी गायब करतो."
"हो, त्यानंच माझ्यासमोर एक मुलगी गायब केली."
"खरी गोष्ट हाय का बाबा?"
"हो, अगदी शंभर टक्के खरी गोष्ट आहे."
"माई बी पोरगी कोमल अशीच गायब झाली बाबा. माई लाडाची पोरगी." असं म्हणत त्याला रडू आलं होतं. तसा तो परत म्हणाला,
"आतं का करता येईन का हा चोर पकडला जाईन?"
"बाबा, मी सांगतोय लोकांना की त्यानंच लोकांच्या पोरी गायब केल्या. माझ्यासमोर एक मुलगी गायब केली. परंतू ती गोष्ट लोकं ऐकायला तयार नाहीत. काय करु?"
जन्म मृत्यूचं हे जीवनचक्र. त्यातच चांगले कर्म आपल्या हातून घडले तर माणूसाला चांगल्या पदाची प्राप्ती होते आणि चांगले कर्म नाही घडले तर कर्म वाईटच बनत जातं. यालाच पाप असं म्हटलं जातं. लोकं असे म्हणतात की काही नद्यांमध्ये आंघोळ केल्यास वा त्याचे पाणी प्राशन केल्यास आपली सगळी पापं धुवून जातात. परंतू त्यात सत्यत्व नाही. परंतू लोकं मनाचा तसा समज करुन घेवून आपल्या पुरखांच्या अस्थी या चांगल्या नदीत विसर्जीत करतात. त्यातच असं मानलं जातं की ह्या नद्या त्या अस्थीच्या माध्यमातून हळूहळू त्या माणसांचं पाप नष्ट करीत असते. तसेच त्या शरीराच्या आत्म्यालाही नवीन मार्ग मिळत असतो.
काही काही धर्मात तर नदीच्या किना-यावर प्रेतं जाळली जातात व राख नदीतच शिरवली जाते.
स्मशानघाट........स्मशानघाटात मुदडे जाळली जातात. मान्यता आहे की तिथं भूत प्रेताचा निवास असतो. ही भूतं अमावश्या पौर्णीमेला जास्त सक्रीय होत असतात. म्हणतात की ज्यावेळी रात्रीचा चंद्र ददिसतो, तेव्हापासून तर सुर्योदय होण्यापर्यंतचा काळ जातकांनी स्मशानघाटातून जावू नये. कारण भूतं लगट करीत असतात.
म्हणतात की या भुतांवर शिव भगवान व माता काली वर्चस्व गाजवत असते. म्हणतात की रात्री कधीही निघू नये स्मशान फिरायला. कारण या शैतानी शक्त्या रात्रीही जास्त सक्रीय होत असतात. ज्या शक्त्या भावना कमजोर असलेल्या व्यक्तींना छळत असतात.
जगात दोन शक्त्या निवास करीत असतात. पहिली म्हणजे सकारात्मक शक्तीव दुसरी नकारात्मक शक्ती. पहिली शक्ती ही माणसाच्या शरीरावर हावी होत नाही. परंतू दुसरी शक्ती शरीरावर हावी होते. जी व्यक्ती भावनेने कमजोर होते.
म्हटलं जातं की कोणत्याही प्रेताचा दाहसंस्कार हा लनकर करु नये. कारण मृत्यूदेवता यम ही एखाद्यावेळी चुकीच्या माणसाला नेते व नंतर चूक लक्षात आली की त्या जीवाला परत देते. अशावेळी ती आत्मा परत येतांना जर शरीर जळलं असेल तर तिला शरीरात शिरायला जागाच नसते व त्या आत्म्याचे भूत बनते. तसेच अशीही मान्यता आहे की गर्भवती स्रियांनी अंतिम संस्काराला उपस्थीत राहू नये.
इथे कृष्णपक्ष, दक्षिणायन तसेच रात्रीला झालेले मृत्यू दोषपुर्ण मानले जातात. त्यातच असशवव जाळतांना जाळण्याआधी दानधर्म करण्याची व जेवनाची प्रथा काही समाजात आहे.
महत्वपूर्ण वस्तूस्थिती ही की भूताबाबत आपल्याकडे भ्रामक कल्पना आहेेत. परंतू भूताबाबत असं म्हणता येईल की माणसं इथे कित्येक निरपराध कोंबडे बकरे कापतात. मुक्या निरपराध प्राण्यांचा बळी देतात. परंतू ना ते प्राणी मेल्यावर विटाळ होत ना त्यांची भूतं बनून ते आपल्याला छळत. व
परंतू एखादा माणूस मरण पावला तर त्याचा आपल्याला विटाळ होतो, नव्हे तर त्या माणसांचं भूतंही बनत असते.
स्मशानभुमीचं दाह संस्काराच्या दृष्टीनं अतिशय महत्व आहे. स्मशानभुमी जर नसती तर जिकडे तिकडे दुर्गंध पसरला असता व राहाणं कठीण झालं असतं.
अंत्यसंस्कार..........प्रत्येक पृथ्वीवरील मानव मरण पावला तर त्याच्या प्रेताच्या विल्हेवाटीसाठी विशिष्ट अशी सोय केली जाते. त्याला अंत्यसंस्कार असे म्हणतात. ते प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळं असतं. हिंदूधर्मात माती देणे किंवा प्रेताला अग्नीच्या स्वाधीन करणे ही गोष्ट केली जाते. मुस्लीमांमध्ये कबर तयार केली जाते. परंतू पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची वेगळी पद्धती आहे. दे लोकं प्रेताला अग्नी वा दफन करीत नाहीत. तर ते त्या मृत व्यक्तीच्या शरीराला एकांतात नेतात व तेथे ते शरीर गिधाडांना खाण्यासाठी सोडतात. या प्रथेला दोखमेनाशिनी असं म्हणतात. त्यांच्या स्मशानभुमीला टॉवर ऑफ साईलेन्स असंही म्हटलं जातं. त्या लोकांच्या मते असं केल्यानं ख-या रुपानं मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळते.
अलिकडे याही प्रथेवर बंधन आले आहे. कारण गिधाडांची संख्या इलिकडे कमी झालेली असून गिधाडंही अलिकडे अर्धवटच मांस खातात. त्यामुळं बाकीच्या उरलेल्या भागाची दुर्गंधी येते. तसेच आजुबाजूला ती दुर्गंधी पसरत असल्यानं लोकं या प्रथेला विरोध करतात.
स्मशानभुमीला व प्रेताला तांत्रीकदृष्टीनं आणि अंधश्रद्धेच्या दृष्टीनं जास्त महत्व आहे. मेहणतात की स्मशानभुमीतून परत येतांना काही शिक्के मागे फेकल्यास संकट टळतं. तसेच तांब्याचा शिक्का उशाखाली ठेवून झोपल्यास व दुस-या दिवशी स्मशानभुमीत तो शिक्का फेकल्यास आपली असाध्य रोगाच्या आजारापासून मुक्ती होते. परंतू संकटानं आणि रोगानं काही कोणाला सोडलेलं नाही. ती आपली अंधश्रद्धा आहे.
आपलं शरीर आप तेज वायू आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतानं बनलेलं असून या पंचमहाभूताचं आपल्या शरीरात विशेष महत्व आहे. त्याच अनुषंगानं आपल्या शरीरात अग्नी तत्वालाही विशेष महत्व आहे. ज्याप्रमाणे अग्नीचा वापर प्रेत जाळण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे अग्नीचा वापर विवाह करण्यासाठीही होतो. तसेच अग्नीचा वापर स्वयंपाक करण्यासाठी होतो. समजा एखाद्यानं चितेतील अग्नीला सात फे-या मारुन विवाह केला तर विवाह होणार नाही काय? होवू शकतो. तसं एकदा मुरारी बापूजी नावाच्या व्यक्तीनं केलंही होतं. परंतू वाईट प्रतिक्रिया आल्या. कारण विवाह प्रसंगी जो अग्नी प्रज्वलीत केला जातो. त्याला योजक म्हणतात व चितेच्या अग्नीला क्रव्याद म्हणतात. म्हणतात की मंगलगान कार्य स्मशानात केलं जात नाही. कारण स्मशान हे जीवनाचा अंत आहे व विवाह म्हणजे जीवनाचा शेवट.
विवाहप्रसंंगी अग्नीतून सकारात्मक उर्जा पार पडत असून स्मशानातून नकारात्मक उर्जा पार पडते. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा दुःखी अंतकरणातून येतो. तर विवाह समारंभात आनंदी अंतकरणातून. स्मशानात केवळ आणििि केवळ दुःखी होवून माणूस येतो आणि दुःखी होवूनच बाहेर पडतो. म्हणून आनंदाचासोहळा तिथे विशेषतः टाळला जातो. तसेच त्याठिकाणी अशुद्ध हवाही चालत असते. समजा तिथं स्वयंपाक केला तर होवू शकत नाही काय? होवू शकतो. सिंधूताई सपकाळनं स्मशानभुमीत राहून त्या विस्तवावर पोळ्या भाजल्या होत्या. कारण तिला पर्याय नव्हता. तसंच राजा असलेला हरिश्चंद्र हा स्मशानातच राहिल्याची उदाहरणे आहेत.
एकंदरीत सांगायचं झाल्यास स्मशानभूमी ही पवित्र वस्तू आहे. तिथे दुःखी माणूस येतो व दुःखी होवूनच जातो. परंतू त्यानंतर सुखच सुख मिळत असतं.
ही स्मशानभुमी पवित्र वस्तू जरी असली तरी ती विवाहा समारंभासाठी लायक नाही. विवाहात आनंद व्यक्त होतो. जीवनाची खरी सुरुवात होते. परंतू त्यानंतरचं जीवन दुखमय असतं. त्यामुळं विवाह ही दुःख आणणारी गोष्ट असून स्मशानभुमी ही सर्व दुःखाचा अंत करणारी अशी पवित्र वस्तू आहे.
स्मशानघाटात महिलांना जायला बंदी आहे. कारण तिथं नकारात्मक उर्जा असते. म्हणतात की ती उर्जा महिलांच्या शरीरात सहजच शिरु शकते. कारण महिलांचं ह्रृदय कोमल असतं. त्यातच त्या भावनाशिल असल्यानं ही नकारात्मक उर्जा त्यांना आजारीही करु शकते. तसं पाहता महिलांचं मन हे कोमल आणि कमजोर असल्यानं त्या स्मशानभुमीतच रडत बसतात. ज्यामुळं प्रेतात्माही दुःखी होवू शकते व त्या प्रेताम्याला मोक्ष मिळत नाही. तो प्रेतात्मा पृथ्वीवरच राहतो असे मानले जाते.
असे मानले जाते की स्रियांच्या शरीरात या मृत आत्मा लवकर प्रवेश करतात. म्हणून स्रियांना स्मशानघाटात येण्यास बंदी आहे. परंतू हे जरी खरं असलं तरी पुर्वी महिला सती जात असत. त्या आपल्या पतीच्या चितेवर स्वखुशीनं जळत होत्या असं म्हटलं जातं. याला सती जाणे म्हणत. ही सती जाणे बाब स्वखुशीची नव्हती. यामध्ये ती महिला ती चितेवर असतांना तिच्या जीवंत शरीराला अग्नीचा चटका लागताच ती ओरडायची. ती त्या अग्नीज्वाळ्तून बाहेर येण्याचा प्रयत्न करायची. त्यासाठी ती ओरडायची.यावेळी स्मशानात सर्व महिलांनी ते दृश्य पाहून त्यांच्या अंतकरणात हालचाल होवून त्यांनी आंदोलन करु नये म्हणून स्मशानात महिला प्रवेशावर बंदी घातली गेली होती.
****************************************

महिला भावनाशिल असतात व त्यांच्या शरीरात अशा दुषीत आत्मा लवकर प्रवेश करतात. याचाच फायदा घेत भानुदास सुंदर मुलींच्या अंगात भूत टाकून नव्हे तर त्यांना संमोहित करुन तो त्यांचा वापर देह व्यवसायासाठी करीत होता. आश्चर्य या गोष्टीचं होतं की तो कधी त्या मुलीला पाहात नसे. कधी बोलत नसे वा कधी भेटत नसे. तरीही त्या मुली स्मशानात केवळ त्या शैतानाच्या बोलविण्यावर येत होत्या.
स्मशानात महिलांना प्रवेश नव्हता. त्या रात्री चंद्र निघाल्यानंतर स्मशानात अजिबात येतच नव्हत्या. ते सकाळी सुर्योदय होईपर्यंत. परंतू त्या आपल्या शेतीच्या कामाला जातच असत. तेव्हाच या दृष्ट शैतानाची वाईट नजर त्यांच्यावर जात होती व कावळा फांदीवर बसल्यागत भानुदास तिथं आलाच तर तो शैतान त्या मुलीला गावातूून अलगद उचलून आणत असे आणि त्या मुलींना भानुदासच्या स्वाधीन करीत असे.
आज मुरलीच्या म्हणण्यानुसार काही लोक भानुदासवर देखरेख ठेवून होते. त्यातच एक दिवस असाही उजळला की त्या दिवशी त्या दिवशी ते मंदिराच्या भिंतीआड लपून बसले. तशी मध्यरात्र झाली आणि या मध्यरात्री भिंतीआड लपून बसलेल्या लोकांना भानुदास गाडी काढतांना दिसला व मुरलीनं जे त्यांना सांगीतलं होतं, ती गोष्ट काहीशी सत्य असल्यासारखी जाणवली.
भीती ही गोष्ट धोक्याची स्पष्ट जाणीव देणारी असते व त्या बद्दलची मानवी मनात निर्माण होणा-या शारीरिक हानीची, धोक्याची वा इजा होणारी संकल्पना व अनुभवास येणारी भावना.
एखाद्या वस्तू व प्रसंगा पासून व्यक्तीला कमी धोका असताना किवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल व प्रसंगाबद्दल सातत्याने व प्रमाणाबाहेर वाटणारी अनामिक संकल्पना म्हणजेच भीती होय. भीती ही एक मानसिकता किवा भावना आहे. ती वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. ब-याच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभावीक असते. उदाहरणार्थ एखाद्यावेळी भूत पाहिल्यावर अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी कारणे घडल्यास आपल्या मनात भीती निर्माण होते. परंतु जर ही भीती ब-याच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्या प्रसंगावर मार्ग निघाला नाही तर मात्र हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते. तसेच त्या भीतीतून मानसिक रोगही होवू शकतो. ही झाली माणसाची भीती. भीती ही मानवप्राण्यांप्रमाणे प्राण्यांनाही भीती असते. धोकादायक परिस्थितीत उपाय मानून भीतीचा उपयोग होत असतो. परंतू असा उपयोग करण्याकरीता भीतीची प्रतिक्रिया लवकर व्हावी लागते. दररोजच्या जीवनात आपणाला आधी खरोखरच भीतीचा लवलेश नसतानाही क्षणार्धात एखादा धोका उत्पन्न झाल्याबरोबर आपण तीव्र भीती अनुभवू लागतो. भीतीचे हे मूल्य लक्षात घेता भीती ही केवळ मानवातच अनुभवाला येणारी भावना नसून, मानवेतर प्राण्यातही भिती अनुभवास येते. हा अनुभव तेव्हा कळतो. जेव्हा एखाद्या बेडकावर पाय पडत असतांना ते बेडूक चटकन उड्या मारतो व आपला बचाव करतो. एखादा साप माणसं दिसताच फुसकारतो.
भीतीचा व्यक्तीच्या स्वत:च्या विचारावर, त्याच्या स्वभावावर आणि दैनंदिन कामं तसेच नोकरीवर, सामाजीक व्यवहार, कुटूंब, वैवाहिक स्थिती व नातेसंबंधावर, तसेच इतर सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. त्यामुळे मानवी मनावर काही लक्षणे दिसून येतात. सतत मनात भीतीची भावना निर्माण होणे, एक प्रकारचे दडपण जाणवणे, वारंवार भीती निर्माण होणाऱ्या प्रसंगांना दुर्लक्षित करणे, समाजापासून दुर जाणे इत्यादी गोष्टी तसेच ठराविक परिस्थितीमध्ये घाम फुटणे, हदयात धडकी भरणे, रक्तदाब वाढणे, इत्यादी लक्षणे दिसणे ही भीती उत्पन्न करणारीन
बाब आहे. ही लक्षणे दिसू लागताच माणसाला सावध होण्याची गरज आहे. काही ठराविक व्यक्तिमत्त्वाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक दिसून येते.
भीती..........याच भीती तत्वावर भानुदास राज्य करीत होता अख्ख्या गावात. जो त्याच्या वाट्यावा जाईल. त्याला भीती दाखवत होता. त्यामुळं गाव त्याच्या विरोधात जात नव्हतं.
भानुदास हा रात्रीला आपली गाडी काढून कुठंतरी जातो हे लक्षात आल्यावर लोकांनी त्याचेवर पाळत ठेवणे सुरु केले होते. त्यातच मुरलीनंही त्याच्या जाण्याचा रस्ता लोकांना सांगतला होता. त्यामुळं आता लोकांच्या मनात त्याचेबद्दल बेत शिजत होता व ते योजना बनवीत होते.
आजची ती रात्र होती. त्या रात्री भानुदास एक सुंदर मुलगी मिळविण्यासाठी चालला होता. तो स्मशानघाट फिरत होता. ज्या स्मशानघाटात जळती चिता मिळेल. आज तो बराच फिरला. परंतू तशी जळती चिता असणारं स्मशानघाट सापडत नव्हतं. तसं आज मोठ्या मुश्किलीनं त्याला जळत्या चितेचं स्मशानघाट सापडलं. त्याचबरोबर त्यानं आपली पिशवी काढली व मंत्र म्हणून तिथं शैतान निर्माण केला व शैतानाला आदेश दिला की त्यानं जावं व त्याला एक गावातून सुंदर मुलगी आणून द्यावी.
नेहमीप्रमाणे शैतानानं त्याला एक सुंदर मुलगी आणून दिली व तो ती मुलगी घेवून शहराकडे निघाला. शहरात जातांना त्याच रस्त्यानं निघाला. जो नेहमीचा शहरात जायचा एकमेव रस्ता होता. ज्या रस्त्यावर त्या गावक-यांचं पुर्वीचं गाव होतं.
भानुदास त्या रस्त्यानं निघाला खरा. परंतू त्याला काय माहित होते की आपलं नशीब आज फुटणार आहे. आज त्याचं नशीब फुटणार होतं आणि नशीबही वाईट कामाला किती सोबत करेल.
मुरलीसोबत गावक-यांनी योजना आखली होती. त्या योजनेनुसार तो ज्या रस्त्याने जातो. त्या रस्त्यानं पाळत ठेवायची. तसं पाहता गावकरी तो ज्या रस्त्याने जीतो. तिथं गुपचूप लपून बसले. काहींनी मोठमोठे दगड ठेवले मुख्य रस्त्यावर. जेणेकरुन गाडी पुढे जाणार नाही. काही दगड बाजूला ठेवले. ते यासाठी की त्यानं जर मागे गाडी घेण्याचा प्रयत्न केला तर तो फसेल. योजनेनुसार त्याची गाडी येताच मागेही दगड ठेवायचे. तसंच योजनेनुसार काही मागे, काही पुढे, काही डावीकडे तर काही उजवीकडे लपून बसायचं. जेणेकरुन त्याची कोंडी होईल व तो पळून जाणार नाही. जसं शिकार करतांना एखाद्या सावजाला पकडतो तसं. सर्व गनीमी कावा वापरला होता त्यात. योजना मुरलीनंच बनवली होती. कारण बार्डरवर शत्रूला पकडतांना सैन्यात ते गनीमी कावाच वापरत होते. शिवाय त्याची रचना कशी करायची तेही मुरलीला माहित असल्यानं त्यानं ती योजना व्यवस्थीत आखली होती.
ठरल्याप्रमाणे भानुदासनं त्या मुलीला गाडीत बसवलं व त्या भयाण रात्री आपली गाडी सुरु करुन भानुदास चालू लागला ती भयाण वाट. त्या भयाण रात्री त्याच्या गाडीच्या दोन लाईटाच्या उजेडासह काहीच दिसत नव्हतं.
गाडी भरधाव वेगानं चालत होतं. आज तसं पाहता बराच वेळ झाला होता. बराच वेळ फिरुनही आणि बरेच स्मशानघाट फिरुनही त्याला आज जळती चिता मिळाली नव्हती. त्यामुळं बराच वेळ झाला होता. तसं गावक-यांना माहित होवू नये म्हणून त्याला शहरातून परतही यायचं होतं. त्यामुळं त्याची गाडी भरधाव वेगात होती. त्याला काय माहित होते की आपल्या वाईट कामाचे दिवस भरले आहेत आणि शैतान वैगेरे कोणीही संकटात मदत करीत नाहीत.
गाडी भरधाव वेगात होती. तशी गावची माणसं त्या मुख्य रस्त्याच्या आजुबाजूला दबा धरुनच बसले होते. ते त्याच्या येण्याची वाटच पाहात होते. ते चिडले होते. कारण कोणाच्या सुंदर बहिणी तर कोणाच्या सुंदर बायकाही गावातून गायब झाल्या होत्या.
मुरलीनं सांगीतलं होतं गावक-यांना की भानुदासच मुलींना गायब करतो. परंतू त्यांचा तसा विश्वास नव्हताच मुरलीवर. तरीही एक परियंती म्हणून आज ते त्या वाटेवर दबा धरुन बसले होते. कदाचित तो मुली गायब करणारा व्यक्ती भानुदास असू शकतो असं त्यांना वाटत होतं.

****************************************

सुरुवातीला मुरलीनंं योजना बनवली. तेव्हा मुरलीवर कोणी विश्वासच ठेवला नाही. त्यावर मुरलीनं स्वतः पाहिल्याचं कबूल करताच गावातील काही लोकं तयार झाले. त्यातच काही लोकं घाबरु लागले. म्हणू लागले की तो एक तांत्रीक आहे. तो आपल्यावर जादू करेल व आपल्याला बंदिस्त करेल. परंतू त्यावर मुरली म्हणाला की असं काहीही घडणार नाही. ती शक्ती क्षणीक असते. असं जर झालं असतं, तर या लोकांनी आपल्याकडून पैसा कमवला नसता. त्यांनी त्या स्मशानघाटातील शैतानालाच पैसा मागीतला असता वा निर्माण केला असता. आपल्याला मागीतला असता काय आणि शेवटी आपलं नशीब. आपल्या नशीबात जे व्हायचं ते होईलच. त्यासाठी पहिलंच असं घाबरण्याची गरज नाही. तरीही लोकं भीतीनं तयार झाली नाहीत. तेव्हा मुरली म्हणाला की तुम्ही नाहीही आले तरी मी माझं काम करणारच आहे. हं, एक खंत वाटतेय की हे काम एकट्याचं नाही. त्याची ताकद मोठी आहे. तरीही लोकंं तयार झाले नाहीत. तेव्हा पुन्हा मुरली म्हणाला,
"हे बघा, आज कोणाच्या बायका, कोणाच्या मुली आणि कोणाच्या बहिणी गायब झाल्या आहेत. तसेच हे कार्य दररोजच सुरु आहे. त्याची हिंमत वाढली आहे व त्याच्या हिंमतीनुसार तो ते कार्य अतिशय जोमानं करीत असून आज कोणत्या ना कोणत्या गावातून मुली गायब होत आहेत. याचा छडा जेव्हापर्यंत लागणार नाही. तेव्हापर्यंत मुली गायब होणार. लक्षात ठेवा की काल तुमच्या बहिणी गायब झाल्या, मुली व बायका गायब झाल्यात. नसेल झाल्या तर कदाचित नाही होणार असं काही सांगता येत नाही. हे लक्षात घ्या की आज ज्या ज्या मुली गायब होत आहेत. त्या मुलीत कोणाची बहिण आहे, कोणाची पत्नी आहे आणि कोणाची मुलगीही. हा जर कार्यक्रम आपण इथंच थांबवला नाही तर आज एखादीच मुलगी गायब होते. तेही लपूनछपून. उद्या तो बिनधास्तपणे आपल्या समोर आपल्याच घरातून घरात घुसून आपल्या उघड्या डोळ्यासमोर आपल्या मुली, बहिणी व आपल्या बाायका उचलून घेवून जाईल व आपण काहीही करु शकणार नाही. बघा विचार करा माझ्या बोलण्यावर."
मुरलीनं बोललेले शब्द. गावक-यांच्या काळजाला भिडले ते शब्द. तसं काही गावक-यांना वाटायला लागलं की काल आपल्याच बहिणी आपल्याच मुली अन् आपल्याच बायका गायब झाल्या. काही जणांना वाटत होतं की उद्या आपलीच बायका पोरी व बहिणी गायब होतील. मुरलीचं म्हणणं बरोबर आहे. आज आपण हातावर हात धरुन बसलो तर उद्या आपलंच नुकसान आहे. त्यामुळं आजच ह्या प्रकरणाचा छडा लावला तर काय बिघडतं. चोर सापडेल नाही तर नाही सापडणार. तो भानुदास चोर असेल, नसेल. तो नंतरचा प्रश्न आहे. एकच रात्र आपली वाया जाईल ना. परंतू जर तो चोर निघाला तर........तर उद्यापासून हे मुली अपहरण करण्याचे प्रकरण तर कायमचं बंद होईल.
लोकांचा विचार.......तो विचार लोकांनी कार्यान्वीत आणण्याचं ठरवलं होतं. कारण त्यांच्या भविष्याचा तो प्रश्न होता. तसे गावातील लोक तयार झाले.
गावातील लोक तयार होताच एकानं प्रश्न केला.
"हा मुली गायब करुन नेतो कुठे?"
त्या प्रश्नावर सगळे हसले. तसा तो म्हणाला,
"तो मुलींची बळी देतो की काय असं मला म्हणायचं होतं."
"तो काहीही करो मुलींचं, तुला काय?"
"नाही सहजच विचारलं."
तसा मुरली म्हणाला,
"तो मुलीला कुंटणखाण्यात विकतोय."
"कुंटनखाणं म्हणजे?" एकजण त्याला न समजल्यामुळं म्हणाला.
"अरे कुंटनखाणं म्हणजे वेश्यावस्ती."
"बापरे, म्हणजे यानं आपल्या गावातील मुली वेश्यालयात विकल्या तर.........."
"हो, वेश्यालयातच विकल्या. म्हणजे आपल्या गावच्या मुलींना त्यानं वेश्या बनवलंय आणि पैसा कमवलाय. हे कार्य त्याचं तो गावात येण्यापुर्वीपासूनच सुरु आहे. आपण त्यात लक्ष घातलं नाही म्हणून हे सगळं सर्रासपणे सुरु आहे आणि माहित आहे, आपल्यावा वाटते की गावात शैतानच शिरला. तो शैतानच गावातील मुली गायब करतोय. त्यासाठीच आपण गाव सोडलंय. परंतू गाव सोडलं तरीही हा क
मुली गायब होण्याचा कार्यक्रम थांबला का? नाही ना."
सर्वजण त्याच्या बोलण्यानं तयार झाले. त्यांच्यात नवा उत्साह निर्माण झाला. तसा मुरली म्हणाला,
"मला तर वीटतं की यामागे आपल्याच गावातील कोण्या बड्या हस्तीचा हात असू शकतो. तेव्हा ही गोष्ट आपण कोणालाच सांगू नये. आपल्या सरपंचालाही नाही, समजलं."
सर्वांनी त्याला स्पष्टपणे होकार दिला. जसं तो त्या गावक-यांमधून बार्डरवरचे सैन्य तयार करीत होता. काहींनी फक्त मानाच डोलावल्या होत्या.
योजना तयार होताच ती कार्यान्वीत करण्यासाठी आज ते निघाले होते त्या मुख्य रस्त्यावर दबा धरुन बसण्यासाठी. परंतू त्याची इतर काही गावक-यांना किंचीतही माहिती नव्हती. तसेच सरपंचालाही माहिती नव्हती. त्याचबरोबर त्या भानुदासलाही. ते सर्वजण अनभिज्ञ होते.
गावातील ती निवडक मंडळी जेव्हा निघाली. तेव्हा गाव संपुर्णतः गाढ झोपी गेलं होतं. कुत्री जोरजोरात भुंकत होती. तसं भानुदासला वाटलं की गावची कुत्री ती. अमावश्येची रात्र आहे म्हणून भुंकत असतील कुत्री. त्यात काय, त्यानं बाहेर निघूनही पाहिलं नाही. तसं पाहता गाव चालत होतं ती वाट. ज्या वाटेनं काळाकुट्ट अंधार पसरला होता. तरीही त्यांनी इवलासा टार्च वापरला नाही. कारण त्यांना वाटत होतं की इवलासा लाईट जरी गावात एखाद्यानं पाहिला की अख्खं गाव जागं होईल व आपली योजना फिसकटेल.
योजनेनुसार अतिशय शिस्तप्रिय पद्धतीनं ते चालले होते. तसं पाहता जंगलातून किरकिर असा आवाज येत होता. रस्त्यानं काजवेही चमकत होते. तसे काही प्राण्यांचे व पक्षांचे आवाज येत होते. वाटत होतं की हे प्राणी पक्षी ओरडत असल्यानं दिवस आहे की काय. परंतू ती रात्र होती. दिवस नव्हता.
थोड्या वेळाचा,अवकाश. नियोजीत स्थळ आलं. तसा मुरली म्हणाला,
"बस इथंच. इथंच आपण दबा धरुन बसायचं. कोणाला दिसणार नाही असं आणि तो आला गाडी घेवून की चढाई करायची एकाचवेळी त्याचेवर. त्याचेवर चढाई करताच काही जणांनी गाडीचं निरीक्षण करायचं. जेणेकरुन त्यानं चोरुन आणलेली मुलगी सापडेल. तसं पाहता विचार करा की या रस्त्यानं एवढ्या भयाण रात्री एकही गाडी जात नसतांना व भूत आहे अशी गावात भीती असतांना त्यानं गाडी का आणावी."
मुरलीचे प्रत्येक बोल गावक-यांना पटत होते. कारण त्यात तर्कसंगतता होती. विचार होता व भावनाही तेवढ्यात होत्या. त्यानं आपली पत्नी हारवली होेती आपल्या जीवनातून. आज त्याला त्याच भानुदासमुळं एकाकी जीवन जगण्याची वेळ आली होती.
गावकरी त्या भयाण जंगलात दबा धरुन बसले होते. तसा थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात लोकांनी पाहिलं की त्या काळ्याकुट्ट अंधारात अचा क प्रकाश पडलेला असून समोरुन एक गाडी भरधाव वेगानं येत आहे. त्या गाडीच्या आजुबाजूला काळाकुट्ट अंधार असून समोर लाईटामुळं प्रकाश पसरलेला आहे.
गावकरी तसे चूप होते. तशी थोड्याच वेळात ती गाडी जवळ आली. तशी ती थांबली. कारण पुढे रस्त्यावर दगड टाकलेले असल्यानं गतीमध्ये अवरोध झाला.
भानुदासनं गाडी थांबवली. त्यातच भानुदासनं विचार केला की ही दगडं या भयाण रात्री कोणी टाकली असावी. तसा तो खाली उतरला. ती दगडं सरकविण्यासाठी.
गाडीचे लाईट सुरुच होते. भानुदास गाडी पुढे काढण्यासाठी दगड सरकवीतच होता. तोच गावातील काही माणसं चेह-याला दुपट्टा बांधून व चेहरा झाकून पुढं आली. ती त्या भानुदासच्या पुढं गुपचूप उभी राहिली. तसा भानुदासनं दगड सरकवणं बमद केलं व तो उभा राहिला. त्याचबरोबर ती चेह-याला कापड बांधलेली माणसं त्याच्या गोलाकार उभी राहिली. तसा भानुदास घाबरला व घाबरत घाबरतच घाबरत्या स्वरात म्हणाला,
"कोण? कोण आहा तुम्ही?"
सर्वजण चूप होते. तसा मुरली बोलला,
"भूतं........आम्ही जंगलची भूतं आहोत. तूच उठवलंस नं आम्हाला अन् आमचा भोग नाही दिला अजून."
भानुदास तसा घाबरलाच होता. परंतू घाबरत्या स्वरात म्हणाला,
"त्यात काय एवढं. उद्या सकाळ झाली की देतोच."
"भानुदास, आम्ही तुझ्या आश्वासनाचे बळी पडणार नाही आज. अशा पुष्कळ सकाळ गेल्यात. परंतू आमचा भोग आम्हाला मिळाला नाही."
भानुदासला वाटलं. आपलं चुुकलंच कदाचित. आपण कोंबडा, बकरा तर देतो म्हटलं भूतांना. परंतू दिला नाही. त्यामुळंच ती उभी झाली असावीत. तसा तो म्हणाला,
"नाही. आम्हाला आताच पाहिजे. नाहीतर तुलाच खाणार आज."
"अरे पण थोडा वेळ द्या ना."
तसा तो भूतरुपातील मुरली विचार करु लागला. त्यानं ग
योजनेनुसार गावक-यांना इशारा केला व गावाती एका व्यक्तीनं त्याचा आवाज रेकॉर्ड केला. तसा मुरली म्हणाला,
"बोल केव्हा देणार आमचा भाव आम्हाला?"
"बस उद्याच."
मुरली बोलत होता. तेवढ्यात एका व्यक्तीनं गाडीत बसलेली ती एक मुलगी बाहेर आणली. तिला मुरलीजवळ आणली. तसा भूतरुपातील मुरली म्हणाला,
"ही कोण आणखी?"
"तुला माहित नाही शैताना, ही कोण ते? ही देखील एका गावची मुलगी आणि तुमच्यासारख्याच एका शैतानानं ती आणून दिली. हं, मला सर्वजण माफ करा. कारण मी तुमचा भाव द्यायला विसरलोच. परंतू उद्या नक्कीच देईल बरं का? मला वेळ बराच झालाय. तेव्हा जावू द्या लवकर. नाहीतर उद्या गावक-यांना मी रंगेहाथ सापडेल."
"बरं, जावू देतो. परंतू एका अटीवर."
"कोणती अट?"
"तू या आम्ही मिळवून दिलेल्या मुलींचं काय करतोस ते सांग."
"का बरं? नाही सांगीतलं तर........."
"तर आम्ही तुला खाणार. आम्ही तसेही अतृप्त आहोत. आम्हाला माणसाचं रक्त बरेच दिवस झाले मिळाले नाही."
"बरं सांगतो, सांगतो."
असं म्हणत भानुदास सांगू लागला. ती मुलींची कहाणी.
"मी या मुलींना शहरात विकून टाकतो."
"कुठे?"
"कुठे म्हणजे? वेश्यालयात."
"का बरं?"
"अरे शैताना, तुम्हाला काय करायचंय. एवढ्या गोष्टीचं."
"काही करायचं नाही. फक्त ऐकायचं आहे. सांग. सांग लवकर. नाहीतर खाणार तुला. संबंधच खाणार."
"अरे शैतानांनो, पैसा मिळतो ना."
"पैसा! पुष्कळ कमवला असशिल पैसा? हो की नाही?"
"नाही."
"का बरं?"
"वाटेकरी आहेत ना."
"हो का? वाटेकरी आहेत का? बोल कोण कोण वाटेकरी आहेत?"
"नाही, नाही. वाटेकरी नाहीतच कोणी."
"हो का? मग आता कोण बोललं वाटेकरी आहेत म्हणून?"
"अं, निघालं सहज तोंडातून."
"असं कसं निघतं? बोल सांगतोस का खावू तुला? लवकर सांग."
भानुदास तसाही घाबरला होता. तसा भूत रुपातील मुरली त्याला खाण्याची धमकी देत असल्यानं तो अगदी पोपटासारखा बोलत होता. तसा भानुदास म्हणाला,
"आपल्या गावचा सरपंचाचा मुलगा."
"कोणता मुलगा? नाव काय त्याचं?"
"सुशिल. सुशिल नाव आहे त्याचं."
"आणखी कोण कोण आहेत?"
"पोलिस आहेत. आम्ही गावचं पोलिस स्टेशन बांधलं आहे."
"का बरं?"
"समजा गावचं कोणी जर पोलिस स्टेशनला गेलं तर त्यांनी कोणतीच कायदेशीर कारवाईी करु नये म्हणून आम्ही त्यांना पैसे देतो. बदल्यात ते आमच्यावर गुन्हा नोंदवत नाहीत."
भानुदासनं आपलं षडयंत्र अख्ख्या गावातील काही लोकांसमोर उघडं केलं. त्याला काय माहित होतं की ते लोकं शैतान वैगेरे काही नसून ते गावातीलच लोकं आहेत. शैतानानं त्याला खाण्याची भीती दाखवताच आपली पुस्तकच खुली केली. त्याचबरोबर मुरलीसोबत असलेल्या त्या संपूर्ण लोकांनी त्याला दोरीनं बांधलं व त्याच्याच गाडीत टाकून त्याला गावात आणलं व त्याला गावातीलच एका बंद कम-यात बंदिस्त केलं. त्यासोबतच त्यानं आणलेल्या मुलीला होश नसल्यानं तिला एक जोरात थापट मारली. त्याबरोबर ती भानावर आली व 'मी कुठे आहे' म्हणत ती आरडाओरड करु लागली. परंतू मुरलीनं घडलेला सर्व प्रकार तिला समजावून सांगीतला. तो तिला पटला व रितीरीवाजासारखी तिला बहिण मानत त्या गावानं तिचं जीवन तर वाचवलं. व्यतिरीक्त तिला रितसर तिच्या घरीही नेवून दिलं. त्याचबरोबर तिचे व्यथीत झालेले मायबापही निश्चींत झाले होते. अशाप्रकारे आज मुरलीसह गावानं एका मांत्रीकाच्या तावडीतूनच नाही तर अख्खं तिचं जीवन उध्वस्त होण्यापासून वाचवलं होतं.

****************************************

भानुदासला गावानं बंदी बनवलं खरं. परंतू त्या षडयंत्राचा मुख्य मोरक्या अजुनही हातात लागायचा होता. त्याला कसं पकडायचं हा त्या गावक-यांच्या पाठीमागं प्रश्न होता. तसा मुरलीसमोरही प्रश्न होता. काय करावं सुचत नव्हतं. अशातच भानुदास स्वतःच्या सुटकेसाठी मंत्र जपत होता. परंतू ना आता त्याचं शैतान ऐकत होतं. ना त्याचे मंत्र चालत होते. जणू त्याच्या मंत्राचा प्रभावच संपला होता. तो तर बंदी होता. परंतू सुशिलचं काय? तोच तर खरा मोरक्या. कसं पकडायचं त्याला? प्रश्न होता. तसं महाभारताचं दृश्य मुरलीसमोर तरळून गेलं.
महाभारतात त्यानं दुरदर्शनला पाहिलं होतं की शिशूपाल आणि जरासंध मित्र होते. शिशुपाल मरण पावल्यानंतर व सर्व द्वारकेचे शत्रू समाप्त झाल्यानंतर ज्यावेळी क्रिष्ण जरासंधाचा वध करायला निघाला. तेव्हा तो भीमसोबत निघाला आणि जरासंधाला आव्हान केलं त्यानं या भीम सोबत लढावं. आपण भानुदासच्या रुपात शिशूपालाला बंदी बनवलं आहे. तेव्हा याचाच वापर करुन आपण सुशिलला सुंदर मुलगी तयार आहे अशी सुपारी द्यायची आणि त्याला भानुदासच्याच घरी बोलवायचं. बदल्यात भानुदासला त्यानं जर काम केलं आणि सुशिलला बोलावलं आणि पकडून दिलं तर त्याला जीवंत सोडू वा त्यानं तशी मदत केली नाही तर त्याला आपण मारुन टाकू अशी तंबी द्यायची.
तो विचार त्यानं गावक-यांच्या समोर बोलून दाखवला. जे त्यांचा त्याची योजना कार्यान्वीत करण्यात समावेश होता. तसा गावक-यांनीही मुरलीवर विश्वास केला होता. कारण त्यानं जे गावक-यांना सांगीतलं होतं. ती गोष्ट आज अगदी खरी झाली होती.
गावक-यांनी त्याला समर्थन दिलं. परंतू आता अशी मुलगी आणायची कुठू? मुरलीसमोर प्रश्न पडला. तसा गावातील एक व्यक्ती म्हणाला,
"आपण ज्या मुलीला सोडवलं. तीच मुलगी या योजनेत वापरली तर........!"
"बरोबर. तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण तीच मुलगी वापरावी. परंतू आपण तर तिला सोडून दिलं. आता ती आणि तिचा परीवार कसा तयार होणार!"
"आपण विचारुन तर पाहू." गावातील एकजण म्हणाला.
"ठीक आहे." मुरलीनं म्हटलं.
आज रात्री गावानं योजना तयार केली. तसं कोणीतरी म्हणालं,
"आता वेळ कशाला दवडता. आजच भानुदासला धमकवा आणि तयार करा आपली योजना कार्यान्वीत करण्यासाठी. कदाचित आपल्या प्रयत्नांना यश येईल व आपण पुढे फसणा-या मुलींना वाचवू शकू. नाहीतर सुशिल एकच भानुदास नाही तर आणखी अनेक भानुदासांना तयार करुन त्यांच्याकडून मुली मागवेल व आपला वेश्याव्यवसायाचा धंदा सुरुच ठेवेल."
तो व्यक्ती बोलून गेला खरा. तशी गावक-यानी त्याच्या बोलण्याला पुष्टीही दिली. तसं गाव त्याच अंधा-या रात्री ती योजना कार्यान्वीत करण्यासाठी भानुदासला जिथं ठेवलं होतं. तिथे गेले. तसा मुरली अतिशय प्र्मानं भानुदासला म्हणाला,
"भानुदास, आम्हाला तुला बंदी ठेवू इच्छीत नाही. कारण तुही आता या गावचा घटक आहेस. गावाचं भलं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. या धंद्यात तू एकटा नसशिल की तुझ्याकडूनच तो सुशिल वेश्याव्यवसायासाठी मुली घेत असेल. जरा विचार कर. प्रकरण गावातील आहे. गावच्या गावातच दाबून टाकू. जर तू मदत केली तर आणि जर तू मदत केली नाही तर तुला मारुनच टाकू अाणि तुझं प्रेत गावात नष्ट करुन टाक. ना हाक ना बोंब. तुझ्या मृत्यूचा कोणीही साक्षीदार सापडणार नाही. आता बोल, तुला जगायचं की मरायचं की मदत करायची.
भानुदास घाबरला होता. तसा तो म्हणाला,
"मला मारु नका. आपण जे म्हणाल, ते मी करील."
भानुदास तयार झाला. कारण त्याला वाटत होतं की त्या गावातील लोकं त्याला मारुन टाकतील. आपल्याला शैतानही मदत करणार नाही. तसा प्रत्यय त्याला यापूर्वी आला होता. कारण यापूर्वी त्यानं शैतानाचा मदतीसाठी धावा केला असता शैतान काही धावून आला नव्हता. म्हणूनच तो घाबरत होता. त्याला वाटत होतं की आपण जर गावातील लोकांना मदत केली नाही तर अख्खं गाव आपल्याला मारुन टाकेल. त्यामुळे तो तयार झाला.
भानुदासनं होकार देताच मुलीचा प्रश्न आला. गावक-यांनी भानुदासला सोडलं व ते त्या मुलीच्या वडीलांच्या घरी गेले. तिच्या वडीलांनी ते बोलले. परंतू वडील म्हणाले की मी माझी मुलगी या कामासाठी देणार नाही. कदाचित माझ्या मुलीला धोका होवू शकतो. त्यावर ते बोलणं मुलीनं ऐकताच ती मुलगी स्वतः बोलली,
"बाबा, मी जीवंत परत आले म्हणून. जर ही देवासारखी मंडळी भेटली नसती तर कदाचित मी आज तुम्हाला दुसरीही नसती. मी तुम्हाला दिसत आहे, हे यांचेच उपकार आहेत आणि यांना मदत करण्यात काय गैर आहे. ही मंडळी तर चांगल्याच गोष्टीसाठी मदत मागवतात ना. आता तुम्ही काहीही म्हणा, मी यांच्या मदतीला धावून जाईल." मुलीनं आश्वासन दिलं. त्याचबरोबर वडिलही तयार झाले.
भानुदास व ती मुलगी तयार होताच मुरलीनं योजना आखली. आता ती कार्यान्वीत करणे तेवढे बाकी होते. त्यासाठी तो योजना आखत होता.
मुरलीनं योजना आखली व योजनेनुसार ठरलं की भानुदासनं सुशिलला फोन करून सांगावं की एक सुंदर मुलगी त्याच्याजवळ तयार असून तो ती त्याला आणून देवू शकत नाही. त्यामुळं त्यानं तेवढा वेळ काढून गावाला यावं व मुलगी घेवून जावी.
भानुदासच्या म्हणण्यानुसार सुशिल मुलगी न्यायला येईल. तसा तो आल्यावर लपून ते सगळं बोलणं मुरली व गावकरी ऐकणार व ते संभाषण रेकॉर्ड करून त्याला ताब्यात घेणार. तसं संभाषण सुरु होण्यापूर्वी भानुदास त्याला मुलगी दाखवणार व तो मोल भाव करणार.
योजनेनुसार सर्व तयार झालं होतं. भानुदास व ती मुलगी देखील तयार होती. चोर गावातच पकडायचा होता. सर्व काही तयार होतं. तसा भानुदासनं सुशिलला फोन केला.
"हल्लो, सुशिल मी भानुदास बोलतोय."
"बोल, काय झालं. दोन तीन दिवसापासून का आला नाहीस?"
"अरे मला थोडं बरं नाही. येणारच होतो."
"बर, यावेळी तू मला आणला नाहीस आणि काय झालं तुला?"
"काही नाही. पाय खुप दु:खतायत. चालणंही मुश्किल आहे. तेव्हा तू येते का माल न्यायला?"
"नको रे असा त्रास देवू. मी येवू शकत नाही तिकडं. जमलं तर तूच येशिल."
"अरे, असा काय करतोस येणं जरा."
"अरे नाही जमत राजा. तूच आणून देशील."
"वेळ होईल ना."
"अं, होईल तर होईल, त्यात काय एवढं. अरे माझ्याकडे मुलींची काहीच कमी नाही. अर्धे, मी सोय करीन कुठून तरी. तू काळजी घे व पुर्णपणे सुधारणा झाल्यावर ये माल घेवून."
सुशिल बोलला व येण्याचं टाळलं. सुशिल आला नाही. त्यानं येण्याचं टाळलं. तशी योजना फसली. सुशिलला रंगेहात पडण्याची योजना फसली होती. त्यामुळे मुरलीच्या मनात निराशा निर्माण झाली होती. काय करावं सुचत नव्हतं.
योजना फसली होती. काय करावं सुचत नव्हतं. तशी दुसरी योजना आखायचा बेत मुरलीनं तयार केला. त्यानुसार यो तसा बेत आखू लागला.
मुरली योजना आखत होता आणि प्रत्येक वेळी त्याची योजना फसली होती. त्यामुळे तो हताश झाला होता. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी ती अखेरची योजना बनवली. त्यानुसार ठरलं की भानुदासनं मुलीला घेवून सुशिलकडे जायचं. सौदा करायचा. त्यानंतर आपण ग्राहक बनून जायचं.
मुरलीनं यावेळी एक चांगली योजना तयार केली होती. परंतू या योजनेत जबाबदार होती. ही योजना फसली तर मुरली आणि गावक-यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी होणार होती. कारण मुलीचा सौदा होताच ती मुलगी गायब होवू शकत होती. मुख्य म्हणजे ही योजना त्या मुलीच्या जीवावर बेतले अशी होती. तिचा दोष नसतानाही ती फसली जाणार होती.
मुरलीनं त्या मुलीला त्या योजनेबाबत सांगताच ती मुलगी किंचितसा न घाबरता तयार झाली. या योजनेत वेळ पाळणे आवश्यक होते.वेळ न जुळल्यास दगा होणार होता. परंतू मुरलीनं त्याकडे लक्ष न देता अत्यंत साहसाचं पवित्रा टाकणं सुरु केलं. त्या मुलीचे नाव रुख्मा होतं.
मुरलीनं योजना तयार कायद्यानुसार भानुदास त्या मुलीला घेवून अर्ध्या रात्री शहराकडे निघाला. तसे त्याच्या पाठीमागं मुरली आणि गावकरीही. परंतू ऐनवेळी भानुदासनं मुरलीनं दगाबाजी केली. त्या भीषण जंगलात तो अचानक गायब झाला. त्यावेळी त्यानं तंदुरुस्तीचे वापर केला. आता मात्र सर्वांना समस्या निर्माण झाली होती की भानुदासला बोलायचं कसं? तसं मुलीला आठवलं. तो जेव्हा मागीलवेळी भानुदासच्या गाडीच्या मागं बसून गेला तेव्हा तो वेश्यावस्तीत गेला होता. ती व्यावसायीक त्याला आठवली आणि ठरलं की आपण वेश्यावस्तीत जायचं. भानुदासच्याही पहिलं पोहोचायचं. परंतू एक ग्राहक म्हणून जायचं.
मुरली लवकरच वेश्यावस्तीत पोहोचला. त्यासोबत इतर गावातील काही माणसं. ते सर्व सजून धजून आले होते. तसे वेषांतर करुनही. तशी ती अंधारी रात्र होती. सगळीकडील लोकं सामसूम झोपले होतै. मात्र वेश्यावस्ती आताही जागीच होती. त्या वस्तीतील माणसं आणि बायाही जाग्याच असलेल्या वाटत होत्या. एरवी तिथंच रात्रीला दिवस म्हणतात की काय असंच सारखं जाणवत होतं.
वेषांतर केलेली ती गावातील अडाणी माणसं ती माणसं त्या वेश्यावस्तीत देहाचा सौदा करीतच होती. तेवढ्यात एक गाडी वेश्यावस्तीत आली. तसं वेषांतर केलेल्या मुरलीनं ओळखलं. ती गाडी भानुदासची आहे. ज्या भानुदासनं आपल्यावा चकमा दिलाय. तसं त्या भानुदासच्या गाडीच्या चकम्यावरुन जाणवतच होतं की भानुदास पलटलेला आहे. त्यानं दगाबाजी केलेली आहे.
भानुदास गाडीतून उतरला. तसं त्यानं थोड्याच वेळात रुख्मालाही गाडीतून उतरवलं. तसा तो चालायला लागला. त्यातच ती रुख्माही त्याचीच पत्नी असल्यागत त्याच्याच पाठीमागं चालत होती. तसं मुरलीचं लक्ष होतंच तिच्याकडं. त्यानं ओळखलंही होतं तिला. तसा तो त्या वेश्यावस्तीतील प्रमुखाला म्हणाला,
"ही नवीन येणारी मुलगी कोण? मला हिच मुलगी हवी." मुरलीचं ते बोलणं. तसा तो मोरक्या म्हणाला,
"ही आपल्याला देता येणार नाही. ही आमच्या साहेबाला लागते."
"म्हणजे?"
"अहो, येथील नियमच आहे की जी ही नवीन मुलगी इथं येते. तिला पहिल्यांदा आमचे साहेब इस्तेमाल करतात. मगच बाकीचे."
"मी याचे जास्त पैसे देणार आपल्याला."
"नाही. आपल्या पैशाची गरज नाही आम्हाला."
ती मुलगी रुख्मा. ती मुलगी गावक-यांना मदत करण्यासाठी आपल्या जीवावर खेळून आली होती या वेश्यालयात. ज्या वेश्यालयात सुख नव्हतंच. तसा मुरली विचार करीत होता की आपण जर आज हिला या वेश्यालयाच्या तावडीतून सोडवलं नाही तर उद्या हिची जिंदगी बरबाद होणार. तसे ते ब-या बोलानं ऐकत नव्हते की ती मुलगी रुख्मा त्याला देणार.
भानुदासला त्या वेश्यालयातील एका माणसानं पैसे दिले व तिला वेश्यालयाला सोपवून भानुदास निघून गेला.
मुरली व गाववाले तिथंच होते. गाववाले एकेका कम-यात वेश्येचा सौदा करुन गेले होते. ते प्रतिक्षा करीत होते मुरलीच्या इशा-याची. ज्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवराय सुटून विशालगडावर गेले. तेव्हा त्यांनी विशालगडावर पोहोचताच तोफेचा आवाज केला. तसाच आवाज गावकरी ऐकायला त्रस्त होते. ते सर्व मुरलीच्या तालमीत तयार झाले होते आणि आता ते लढण्यासाठी आले होते वेश्यालयातील गुंडांसोबत.
ज्यावेळी मुरलीनं गावक-यांना सांगीतलं की भानुदास हा बदमाश असून तोच मुली वेश्यालयात विकतो. तेव्हा त्या मुलींचा वाचवता यावा म्हणून काही गावकरी तयार झाले. त्यातच काही तरुणही होते. मुरली हा सैन्यातील सेनानायक होता. तसा तो लवकरच निवृत्त झाला होता. त्यानं नोकरी सोडली होती. परंतू गुण काही सोडले नव्हते. या नवीन तयार झालेल्या गावातील मुलांना सर्वप्रथम मुरलीनं असं प्रशिक्षीत केलं की ते कुठेही अडकतील, तरी त्यांची हार होणार नाही. त्याच तालमीत तयार झालेले ते गावकरी आज वेश्यावस्तीशी लढायला आले होते. त्यांना वाटत होतं की मुरली इशारा देईल व आपण अग्नीनं पेटून उठू.

****************************************

त्या वेश्यावस्तीतील ती माणसं. त्या माणसांच्या हातात चाकू व तलवारी होत्या. कारण त्यांना माहित होतं की या वेश्यावस्तीत रात्रीच्या वेळी कोणीही गुंड येतात. कोणता व्यक्ती कशाही अवस्थेत येतो. त्यामुळं त्यांनी स्वसरक्षणार्थ चाकू व तलवारी ठेवलेल्या होत्या. परंतू मुरलीही काही कमजोर नव्हता. तोही सैन्यातील एक प्रशिक्षीत सेनानायक होता. आता ब-या बोलानं ते वेश्यावस्तीतील गुंड ऐकत नाही म्हणून मुरलीनं एका गुंडाच्या हातातील तलवार अतिशय शिताफीनं घेतली व ती एका गुंडाच्या मानेला लावत तो म्हणाला,
"आता बोलव तुझ्या मोरक्याला. म्हणावं की ही मुलगी ब-या बोलानं देतोस की चांगल्या मनानं."
मुरलीचा तो अवतार. तो अवतार पाहून तो गुंड पळाला. तसा तो आपल्या धन्याजवळ गेला. त्याला हकीकत सांगीतली. तसा मुख्य माणूस त्या वेश्यावस्तीत आला. त्यानं येताबरोबर जो व्यक्ती मुरलीच्या हातात होता. त्याला आवताव न पाहता गोळी झाडली आणि दुसरी गोळी तो मुरलीवर झाडणार तोच मुरलीनं एक उंच उडी घेतली व तो त्या मोरक्याजवळ गेला. त्याची बंधूक हातात घेत तीही त्याच्या मानेवर लावली व जोरात गरजला. जसा सिंह गरजतो तसा.
"बोला हिजड्यांनो, कोणाकोणात ताकद आहे. आज ब-या बोलानं ऐका. नाहीतर एकेकाता मुदडा पाडीन."
मुरली बोलतच होता. तोच सर्व गुंड मुरलीसभोवताल उभे झाले. त्यांच्याही हातात बंधूकाच होत्या. ती मंडळी त्या बंधूका मुरलीवर रोखून होती. तोच मुरली म्हणाला,
"चालवा बंधूका. वाट कोणाची बघता. अरे मी तर मरणारच. परंतू तुमच्या या मोरक्याला तर संपवूनच मरणार. बोला, याला संपवू की तुम्ही बंधूका फेकता."
तसा मोरक्या म्हणाला,
"अरे, फेका त्या बंधूका. माझा जीव घेता की काय?"
बाहेरचा असा मुरलीचा ओरडण्याचा आवाज. तो आवाज प्रखर असल्यानं सा-या वेश्या घाबरल्या. तसं बाहेर काय चाललंय हे पाहण्यासाठी त्या बाहेर आल्या. त्यासोबतच ती गावातील माणसंही. जी मुरलीसोबतच आली होती. वेश्यावस्तीशी लढायला.
ते मोरक्याचं बोलणं. सर्वांनी बंधूका फेकल्या. त्या बंधूका त्या गावातील माणसांनी गोळा केल्या. त्याचबरोबर त्या बंधूका गावातील त्या माणसांनी अग्नी प्रज्वलीत करुन अग्नीच्या स्वाधीन केल्या. तसे मुरलीचे डोळे अग्नीकडे गेले व थोड्याच वेळात त्या बंधूका निकामी झाल्या होत्या.
चित्रपटाला शोभेल असा तो थरार. ती रुख्माही तो थरार पाहातच होती. ती अगदी भयभीत झाली होती. कारण तिनं तसे प्रसंग कधी पाहिलेच नव्हते.
मुरलीचे डोळे अग्नीकडे आहेत हे पाहून त्याच्या तावडीत असलेल्या मोरक्यानं पायाच्या मोज्यातून चाकू काढला व तो मुरलीच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. तोच मुरली सावध झाला. त्याला शिवरायाची आठवण झाली. ज्यावेळी अफजलखानानं त्यांच्या पोटावर कट्यारीनं वार केला होता. तेव्हा तो वार निसटला होता. त्यानंतर शिवरायांनी वाघनखे खानाच्या पोटात टाकून त्या वाघनख्यानं खानाचा कोथळाच बाहेर काढला होता व खान ध्वस्त झाला होता.
ती कहाणी अगदी चित्रपटासारखी घडत होती. तसा शिवराय मुरलीला आठवताच त्यानं तो वार तर हुकवला. परंतू तो वार हुकविल्यानंतर त्या मोरक्याच्या मानेवरच त्या बंधूकीचा वार केला व मोरक्या जागच्या जागी गतप्राण झाला.
वेश्यावस्तीतील मोरक्या मरण पावला होता. तसं ते दृश्य इतर वेश्यावस्तीतील गुंडांनी पीहिलं व त्यांनी पळ काढला. मात्र ते गुंड पोलिस स्टेशनला गेले व पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केली व पोलिसस्टेशन बांधून टाकलं असल्यामुळं पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत मुरली व त्याच्या साथीदारांना अटक केली.
अटक रात्रीच झाली होती. ती अटक जशी मुरलीला झाली होती. तशी त्या वेश्यांनाही. त्या संपुर्ण वेश्यांना पोलिसांनी कालकोठडीच्या आत ठेवलं. परंतू हे काही क्षणच घडलं. त्यानंतर त्यांची सुटका करुन पुन्हा वेश्यालय सुरु झालं होतं.
मुरलीनं खुन केला होता. त्याचबरोबर त्याला अटकही झाली होती. तशी एके सकाळी ती बातमी हा हा म्हणता वर्तमानपत्रात आली. ती बातमी शहराला माहित झाली. त्याचबरोबर राज्यालाही. त्याचबरोबर पुन्हा वेश्यालय सुरु झालं. मुरलीचा हाही प्रयत्न फसला. परंतू या प्रयत्नाचा फायदा नक्कीच झाला.
ती वेश्यालयातील खुनाची बातमी जशी शहराला माहित झाली. तशी गावालाही माहित झाली होती. त्या बातमीत अगदी स्पष्ट लिहिलं होतं की गावातील मुली गायब होत असल्यानं चिडून गेलेल्या गावातील नवयुवकानं वेश्यालयात मुलींचा शोध घेतला व वेश्यालयात मुली आढळताच त्यांची सुटका करण्यासाठी त्यानं वेश्यालयात खुन केला. तसं मुरलीनं वर्तमानपत्रवाल्यांना बयाणच दिलं हेतं.
ती बातमी हळूहळू गावात पसरली. तसं त्या बातमीत मुरलीलाही अटक केल्याचं वर्णन होतं. तसंच गावातील काही तरुणांनाही. त्यातूनच अख्खं गाव चिडलं. त्यांनी पोलिसस्टेशनला घेराव टाकला. त्याचबरोबर ज्या ज्या गावातून मुली गायब झाल्या होत्या. त्या त्या गावानंही पोलिसस्टेशनला घेराव टाकला. तसा दिवसेंदिवस जमाव वाढत गेला व हळूहळू हे लोण राज्यात वाढलं व पुढे देशात. मुरलीला अटक केल्याचा व गावतरुणांना अटक केल्याचा निषेध होवू लागला. दररोजच वरितमानपत्रवाले मुरली व त्याचे मित्रांचे बयाण नोंदवत होते. एरदा त्यांनी पोलिस अकार्सक्षम असल्यानं आम्हाला शस्र हातात घ्यावं लागलं व त्यातूनच खुन झाला असंही बयाण दिलं. तेही छापून आलं. त्यामुळं जनमत चिघळलं व पोलिसांवरच्या अकार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्हं उभं राहिलं.
देशात ठिकठिकाणी आंदोलनं होवू लागली. नारे लावले जावू लागले. 'वेश्यालय बंद करो. गाववालों को छोड दो' वैगेरे नारे. त्यातच पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला व तपासात एक सीडीही सापडली. त्या सीडीनुसार पोलिसांनी भानुदासलाही अटक केली. पुन्हा वेश्यावस्तीची शहानिशा करण्यात आली व शहानिशा झाल्यावर त्या वेश्यांना मोकळं करण्यात आलं. त्या वेश्या आपल्या आपल्या घरी सुखरुप परतल्या. तशी रुख्माही. मात्र अजुनही सुगंधा सापडली नव्हती. चौकशीअंती माहिती पडलं की सुगंधा वेश्यावस्तीतील मोरक्याचं ऐकत नसल्यानं तिचा मोरक्यानं जीव घेतला होता. त्यातच तिला स्वतःच जाळून तिनं स्वदहन केल्याचं सिद्ध केलं होतं.
ती गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे जरासंधाला ठार करुन जरासंधाच्या तावडीतून क्रिष्णानं वेश्यांची मुक्तता केली होती व जरालंधाच्या त्रासापासून त्या वेश्यांना वाचवले होते.परंतू ते द्वापरयुग होते. मात्र आज या कलियुगातही तोच क्रिष्ण मुरली बनून आला होता व त्यानं आपल्या कलात्मकतेनं आपला जीव पणाला लावून या वेश्यांना वाचवलं होतं सुशील नावाच्या जरासंधाच्या अत्याचारापासून. मात्र पोलिसांचं अभय असल्यानं आजही भानुदास नामक शिशूपाल जीवंत होता. तो कालकोठडीत तंत्र मंत्राचे धडे गिरवीत होता. कारण त्याचं तंत्रमंत्र आज विज्ञानयुगात निष्फळ ठरले होते.
प्रकरण न्यायालयात गेलं. ते न्यायाधीशासमोर तपासलं गेलं. तशी मुरलीला दोन वर्षाची शिक्षा झाली. त्याच्या साथीदाराची निर्दोष मुक्तता झाली. तर भानुदासला दुहेरी जन्मठेप. कारण त्यानंच तंत्रामंत्रानं कित्येक गावच्या भोळ्याभाबड्या मुलींचं अपहरण केलं होतं नव्हे तर त्यांची इच्छा नसतांनाही त्यांना वेश्येच्या धंद्याला लावून त्यांचं करीअर नव्हे तर जीवन उध्वस्त केलं होतं.

****************************************

दोन वर्ष झाले होते. मुरली तुरुंगातून सुटला होता. सर्व गावक-यांच्या मुली मिळाल्या होत्या. त्याला तसाही आनंद झाला होता. परंतू त्याला विशेष असं दुःखंही होतं. ते म्हणजे त्याची पत्नी सुगंधा त्याला मिळाली नव्हती. ती तर केव्हाच देवाघरी निघून गेली होती. जे मुरलीला कळलंही नव्हतं. आज जेव्हा कळलं, तेव्हा वेळ निघून गेली होती.
काही दिवस असेच गेले. रुख्माला माहित झालं की मुरली तुरुंगातून सुटलाय. तेव्हा ती ताबडतोब त्याला भेटायला आली. कारण त्याच्याचमिळं तिचं जीवन वाचलं होतं. ती भेटायला आल्यावर तिला जेव्हा कळलं की सर्व गावक-सांच्या गायब झालेल्या मुली मिळाल्या. मात्र सुगंधा त्याची पत्नी मिळाली नाही. तेव्हा तिला अतिशय वाईट वाटलं व ती मुरलीशी विवाह करायला तयार झाली.
तिनं तसा प्रस्ताव ठेवताच तुचा विवाह मुरलीशी झाला. आता रुख्माचा मुरलीशी विवाह झाला होता. ती संसारात सुखी होती. तशी ती त्यालाही खुशच ठेवीत होती. ती त्याला सुगंधाची आठवण येवू द्यायची नाही. तरीही कधीकधी सुगंधाची त्याला आठवण येतच असे. परंतू जेव्हा त्याला आठवण येत असे सुगंधाची. तेव्हा हळूच ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत असे. तसा तो मागं वळून पाहात असे. तेव्हा त्याला रुख्मा दिसत असे व तो ती सुगंधाची आठवण विसरुन रुख्माशी गोष्टी करीत असे. तेव्हा त्याला वाटत असे की जणू सुगंधाच त्याचेसोबत बोलत आहे की काय?

************************************************************************************************

आज सुगंधा जगात नव्हती. परंतू ती जीवंत असल्याचा भाष होत होता त्याला. तिचा स्पर्श त्याला अजूनही आठवत होता. त्यानं जे काही केलं होतं, ते सुगंधासाठीच केलं होतं. परंतू सुगंधा त्याला मिळाली नाही. जणू क्रिष्णाला राधा मिळाली नाही तशी.
आज आठवण यायची त्याला सुगंधाची. परंतू त्याला वाईट वाटायचं. कारण त्याच्या पुढ्यात रुख्मा असायची. त्याला वाटत होतं की जर आपण अशीच सुगंधाची आठवण करीत राहिलो तर उद्या रुख्मालाही वाईट वाटेल. परंतू ती आठवण काही केल्या जात नव्हती. तसे दिवसामागून दिवस जात होते.
दिवसामागून दिवस जात होते. त्यातच रुख्मा काही दिवस जाताच गरोदर राहिली. तिला एक कन्या झाली. घरी मोठा आनंदी आनंद झाला व मुलीचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आला.
मुलीचे नामकरण. कोणी कोणतं नाव तर कोणी कोणतं नाव घेत होतं. तसा मुरली मधातच बोलला,
"आपण हिचं नाव सुगंधा ठेवूया का?"
ते सुगंधा नाव. सर्वांचं एकमत झालं व सर्वानुमते तिचं नाव सुगंधा ठेवण्यात आलं.
मुरली सुगंधा झाल्यापासून दरवर्षी गणपती मांडत असे. त्याचं कारणही तसंच होतं. त्याच गणपतीनं त्याला मार्ग दाखवला आहे असं त्याला वाटत होतं. तो जुन्या गावातील त्या भुताटकी रस्त्यात रात्री चालत असतांना त्याच गणपती मंदिरात लपून बसला असतांना त्याला एक गाडी त्या भुताटकी रस्त्यावरुन जातांना दिसली होती. त्यामुळं की काय, त्याला शंका आली होती की कोणीतरी व्यक्ती आपल्या गावातून मुली चोरुन नेतोय. त्याचाच छडा लावण्यासाठी तो रात्री भानुदासच्या गाडीत लपून निघून गेला होता भानुदासचे कारनामे पाहायला आणि त्याच गणपतीनं त्याला मार्ग दाखवला आहे व भानुदासची चोरी पकडून दिली आहे असंही त्याला वाटत होतं.
आज ते गाव भुताटकी नव्हतं. तिथे ना आज कोणी मांत्रीक होता, ना कोणी तंत्रसाधना करणारा जीव होता. तसं गाव पुर्णतः भयमुक्त झालं होतं. कारण आता गावची मंडळीही उच्च शिक्षण घ्यायला लागली होती.
गाव जरी शिकत असलं आणि गावानं उच्च शिक्षण जरी घेतलं होतं तरी गावात अजुनही थोडी अंधश्रद्धा होती. जर एखाद्यावेळी रात्री एखादं घुबड ओरडलं तर अपशकून मानण्यात येत असे आणि कुत्रं जरी रात्रीला ओरडत असलं वा मांजर कुणाला आडवी गेली असली तरी त्याचाही अपशकून होत असे. लोकं सुशिक्षीत झाले असले तरी अंधश्रद्धामुक्त झाले नव्हते.
तरण्याताठ मुली गावात आज शिकल्या होत्या. त्या उच्च शिक्षण शिकल्या असल्यानं आज गावात भुतांचा थरार नव्हता. जो थरार त्यांनी गावात पुर्वी अनुभवला होता. गावात पुर्वी जेवढा भुतांचा थरार होता. त्यापेक्षा अतिशय कमी त्यांना आज भुतांची भीती वाटत होती. जरी मुरलीनं पुर्वी भानुदासनं एका भुताकरवी गायब केलेल्या एका मुलीची गोष्ट सांगीतली होती तरीही. त्यामुळं आज जरी मुली गायब होत नसल्या तरी कदाचित एखाद्यावेळी आपल्या मुली ही भुतं बदल्याच्या भावनेनं गायब तर करणार नाही असं गावाला किंचीतही वाटत नव्हतं.
तंत्रामंत्रालाही तेवढं स्थान नव्हतं. त्या गोष्टी निव्वळ थोतांड आहेत. असं गाव आज मानू लागलं होतं. त्यामुळं गावात जरी आज अंधश्रद्धा असली तरी तंत्रमंत्रांना त्यांनी तिलांजली दिली होती. एवढं मात्र खरं की ज्याप्रमाणे देव असतो. तशीच भूतंही असतात असं गावाला आजही वाटत होतं. परंतू भूतं काही करतात यावर लोकांचा विश्वासच नव्हता. कारण जरी मुरलीनं तो भानुदासच्या गाडीत भुतांचा थरार अनुभवला असला तरी आजही मुरली लोकांना मार्गदर्शन करीत असे. म्हणत असे की भूत ही निव्वळ आपल्या मनाची संकल्पना आहे. भूत वैगेरे काहीही नसतं. भूत जर असतं तर आज भानुदास तुरुंगात नसता. त्यानं आपल्या गावावर आजही अधिराज्य केलं असतं. आज त्यानं सर्वात प्रथम माझाच बळी घेतला असता. त्यामुळं गाव त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होतं.
मुरली सांगायचा की अशा तंत्रमंत्र जादूटोण्यावर विश्वास ठेवू नका व स्वतःची फसगत करु नका. तंत्र मंत्र काहीही नसतं. कारण तंत्र मंत्र करणारा व्यक्ती हा तंत्रमंत्र करुन पैसा कमवू शकत नाही. त्याला पैसा जर कमवायचा असेल तर तो आपल्याला मुर्ख बनवूनच पैसा कमवतो. तंत्रानं ना मंत्रानं पैशाची जी उत्पत्ती त्यानं करायला पाहिजे. ती त्याला करता येत नाही.
वेश्यावस्तीतून त्यानं मुली सोडवल्या होत्या. तसं वेश्यावस्तीत त्यांना दररोज इंजेक्शन दिलं जायचं. त्या इंजेक्शनानं त्यांना मानसिक रुग्ण बनवलं गेलं होतं. ज्यावेळी त्यांची वेश्यावस्तीतून मुक्तता केली गेली. तेव्हा त्यांच्यावर निःशुल्क मानसोपचार तज्ञानं उपचार केला. आज त्या चांगल्या धडधाकट बनून आपल्या संसाराला लागल्या होत्या.
गावात कधी एखादे वेळी मृत्यू पावत असत. तेव्हाही गाव दहशतीत नसायचं. परंतू भुंकणारी कुत्री वा ओरडणारं घुबड आढळलं की शैतान येतो असं गाव समजत असे. तेव्हा मुरली त्यांचं भय घालविण्यासाठी आपल्या काही मित्रासमवेत स्मशानात जात असे. त्यानुसार आज गाव भयमुक्त झालं होतं.
तो रस्ता मुळातच भुतावळा नव्हता. परंतू काही काळ त्याला भुताटकी मानण्यात आला. त्यातच गोपालचं भूत सतावतोय म्हणून त्या रस्त्यानं जी वर्दळ नसायची ती वर्दळ आज दिसत असे. आज तो रस्ता मोठा झाला होता व त्या रस्त्यानं मोठमोठी वाहनं रात्री बेरात्री चालत असत.
गाव मोठं झालं होतं. गावात नवीन लोकं राहायला आले होते. मोठमोठे उद्योगधंदे उभे झाले होते. त्यातच गावात उच्च दर्जाचे महाविद्यालयही उभे झाले होते. तसं गाव त्या मुळ गावापर्यंत आलं होतं.
ते गणपती मंदिर........मुरलीनं ज्यावेळी वेश्यालयातून सर्व मुलींची मुक्तता केली. त्याचवेळी त्यानं या गणपती मंदिराचाही लोकवर्गणीतून जिर्णोद्धार केला होता. आज ते मंदिर भव्यदिव्य बनलं होतं. दरवर्षी जेव्हा गणेशोत्सव यायचा. तेव्हा या मंदिराला सजवण्यात येत असे व घरच्या गणपतीपाठोपाठ याही ठिकाणी दहा दिवस उत्सव मनवला जाई व दहा दिवस या गणपतीला भोग चढवला जाई. एवढं मात्र निश्चीत की मुरलीला हा गणपती आजही जीवंत वाटत होता. तेवढी एक अंधश्रद्धा आज मुरलीच्या मनात होती.
भानुदासची उमरकैद संपली होती. तसा तो आज गावात राहायला आला होता. परंतू मुरलीच्या म्हणण्यानुसार त्याला लोकांनी वाळीत टाकलं नाही. त्यानंही तंत्रमंत्र साधना सोडवी होती. तसं पाहता त्याचेजवळ जोही पैसा होता. त्या पैशात त्यानं एक लहानशी शेती विकत घेतली होती. तो आता शेती करीत होता. तसेच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच करीत असे. तसं पाहता आज गावात राहतांना त्याला वैषमता वाटत होती. आपल्या कर्मफळावर आज त्याला पश्चाताप येत होता. गाव एवढं चांगलं असतांना आपण गावाशी प्रामाणीक वागलो नाही. जणू त्याला तसंच वाटत होतं.
दिवसामागून दिवस जात होते. मुरली लोकांची अंधश्रद्धा आपल्या वाणीनं दूर करीत होता. त्यातच एक दिवस एक आजुबाजूच्या गावातील शिष्टमंडळ मुरलीला भेटायला आलं. त्या शिष्टमंडळापैकी एकजण म्हणाला,
"आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो आहे. आमची विनंती मान्य कराल काय?"
ते शिष्टमंडळ बोलून गेलं. तसा मुरली म्हणाला,
"बोला, कशाची विनंती करताय?"
"तुम्ही निवडणूकीला आमच्या पक्षाकडून उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. आम्हाला वाटते की आमच्या पक्षात तुमच्यासारखी मेहनती व इमानदार माणसं असावीत."
शिष्टमंडळ बोलत होतं. तसं मुरलीलाही आश्चर्य वाटत होतं. कधी त्यानं या गोष्टीचा विचारच त्यानं केला नव्हता. असं काही घडत असल्याचं चित्र त्याला जाणवत होतं. तसा तो विचार करु लागला तसा त्या शिष्टमंंडळातील एकजण म्हणाला,
"कशाचा विचार करताय? अहो, ज्यावेळी तुम्ही गावच्या मुली सोडवल्याय. तेव्हाही असा आणि एवढा विचार केला नसेल. ही नामी संधी आली आहे आपल्यासमोर. हो म्हणा. बाकी सगळं पाहून घेवू आम्ही."
"हे बघा, ती गोष्ट एखाद्याच्या जीवनमरणाची होती आणि ही राजकारणाची गोष्ट आहे."
"हो, परंतू तिथंही जीव जाण्याची भीती होती ना. इथं तशी नाही."
"बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतू इथं डाग लागण्याची भीती आहे."
"कसला डाग? अहो, इमानदारीनं राजकारण करायचं. म्हणजे डाग लागतच नाही म्हणून समजा."
मुरलीला ते बोलणं समजलं. परंतू तरीही तो म्हणाला,
"तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतू निगान विचार तर करायला नको का?"
"होय. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. विचार करायलाच हवा. कोणत्याही गोष्टीचा. परंतू नीट विचार करा व हो म्हणा. आम्ही येतो परत."
शिष्टमंडळ असं म्हणून निघून गेलं. तसा मुरली विचार करु लागला.
राजकारण.........राजकारण समाजकार्याइतकं सोपं नाही. समाजकार्यात बदनामीची भीती नसते. परंतू राजकारणात भीती असते बदनामीची. इथं भलीभली माणसं विनाकारण बदनाम होतात. तसं समाजकार्यात नाही. काय करावं. संधी तर नामी चालून आली. अशी संधी कोणाला येत नाही. साधी पक्षाची तिकीट मिळवायची असेल तर लाखो रुपये मोजावे लागतात. त्यातच वशिलाही हवा असतो पक्षाची तिकीट मिळवायला आणि ही माणसं तर आपल्या घरी आली. काय करावं. नशीब आजमानं का की सोडून द्यावं. परंतू अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही.
मुरली विचार करु लागला. तसं त्याला वाटलं की आपण आपलं नशीब आजमवावं. इमानदारीचं राजकारण करावं. डाग लागू द्यायचा नाही.
मुरलीनं तसंच ठरवलं. त्यानुसार त्यानं त्या पक्षातील लोकांना होकाराचा निरोप दिला. तसा मुरली राजरारणाच्या निवडणूकीत सक्रीय होवून निवडणूकीला उभा राहिला.
मुरली निवडणूकीला उभा राहिला. तसा त्यानं प्रचाराचा नारळ गणपती मंदिरात चढवला व मनोमन म्हटलं, 'माझ्या हातून जनतेची सेवा होवू दे.' तसा तो उभा झाला.
मुरली उभा झाला होता निवडणूकीत. तसा त्याला निवडणूकीत जास्त प्रचारही करावा लागला नाही. कारण त्याचा प्रचार करणारी ती माणसं होती गावोगावची. जी मुरलीला ओळखत होती. ज्या माणसांच्या मुली, बहिणी व बायका मुरलीनं अगदी जीवावर उदार होवून वेश्यावस्तीतून सोडवल्या होत्या. त्याच माणसांनी मुरलीचा प्रचार केला होता. तशी निवडणूक संपली व मुरली इतरांची जमानत जप्त करीत एकतर्फी निवडून आला.
मुरली निवडणूकीत जिंकला होता. तसं त्याच्या मताधिक्सावरुन त्याला एक खातंही मिळालं होतं व तो त्या संपूर्ण गावातील आमदारच नाही तर मंत्री म्हणून काम करु लागला होता.
मुरली निवडणूकीत निवडून आला. राज्याच्या मंत्रीपदाची सुत्रे हातात घेतली. परंतू कधी गर्व केला नाही. सर्व दीनदलित दुबळ्यांची सेवाच केली. मोठमोठे रस्ते बांधले. उद्योगधंदे उभारले. त्यातच लोकांना रोजगार दिले. त्यानं शाळा महाविद्यालयही उभारले होते गावागावात. तसेच मुख्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचेही काम केले होते.
मुरलीनं अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले होते. त्यासाठी शिक्षणावर भर दिला होता. त्यामुळं पुर्वी गावात शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. लोकं शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या अंगाखांद्यावर बसवून नद्या पार करुन शिक्षणासाठी आणायचे. कोणी होड्यातून आणायचे. परंतू मुरलीनं त्या नद्यांवर मोठमोठे पूल बांधले होते. आज ना कोणाला मुलांना शिकवायला नद्या मुलांना अंगाखांद्यावर बसवून पार कराव्या लागत ना कोणाला मुलांना नावेत बसवून पार कराव्या लागत. प्रत्येकांची मुले शिकली पाहिजे हे एकच ध्येय मुरलीच्या मनात होतं. ज्याचं बिजारोपण त्या स्मशानातील भूतानंच केलं होतं. त्याला वाटत होतं की जर मुलं शिकली. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं तरच त्यांच्या मनातील भीती जाईल. ती मुलं अंधश्रद्धा मानणार नाहीत व आपोआपच स्मशानातही भूतं नाचतात. कोणाच्या अंगात भूत येतात. कोणाला जादूटोणा, तंत्रमंत्र येतं ही संकल्पना मागे पडेल.
मुरलीच्या या विचारानं मुलं शिकत होती. त्यांची भूत संकल्पना केव्हातीच मागं पडली होती. आता गावातीलही मुलांना भूताबाबत भीती वाटत नव्हती. तसेच स्मशानातही भूतं असतात. ती नाचतात, कोणाच्या अंगात येते वा ती लगट करतात असे वाटत नव्हते. तिही आता विज्ञानवादी दृष्टीकोण मनात बाळगून शिकत होती नव्हे तर त्यांनी अंतर्मनातून जणू अंधश्रद्धेचाच नायनाट केला होता.

********************************************************************************समाप्त *********