नवरात्र महोत्सव निमीत्याने Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवरात्र महोत्सव निमीत्याने

नवरात्र निमीत्याने........

मंदीर........आज कुलूप बंद नाही. कारण आता कोरोना व्हायरस नाही. परंतु कोणतातरी व्हायरल आहे की आजही बऱ्याच लोकांच्या प्रकृत्या ठीक नाहीत.
गणपती उत्सव गेला आता नवरात्र आला. गणपती थंड गेला. त्याचं कारण म्हणजे महागाई. तसाच नवरात्रही जाईलच असं सांगता येत नाही. महत्वाचं म्हणजे कोरोना व्हायरस आला आणि सर्वांना त्रासदायक ठरला होता. या व्हायरसनं भल्याभल्यांची वाट लावलेली होती. आज कोरोना नाही. परंतु आताही रोजगार बंदच आहेत.
कोरोना येण्यापुर्वी बहुतःश मंदीरातील पुजा-यांच्या व ट्रष्ट वाल्यांच्या बोटात दोन दोन सोन्याच्या अंगठ्या दिसायच्या. तसेच अंगावर जाडजाड सोन्याच्या साखळ्या. आज कोरोना गेल्यानंतर तसं दिसत नाही. आता मंदीर सुरु आहेत तरी. पोटाचा प्रश्न त्यांच्याहीपुढं निर्माण झाला आहे. जगायचे कसे हाच प्रश्न.
पुर्वी देव्यांच्या नावावर व्यापार होत होता. लोकं लुटत होते. देव्यांना बदनाम केलं जात होतं. त्या मंदीरात एवढं महाग आहे. खरंच देव्या काय खात होत्या काय?नाही. तर ह्या देव्यांच्या नावावर मंदीरातील पुजारी व्यापार करीत होते. म्हणूनच दोन दोन बोटात सोन्याच्या अंगठ्या व गळ्यात सोनसाखळ्या दिसायच्या. त्यातच त्या भावीक स्थळावरील लोकं किरायाची खोली देतांना अक्षरशः महागडी देत होते. जणू या देशातील गरीबांनी दर्शनालाच जावू नये.
आज मात्र चित्र वेगळं आहे. कारण देव्या रुष्ट झाल्या आहेत. कोरोनाच्या आगमनानं जनजीवन प्रभावीत झालेलं असून आजही मंदीरं खुली करण्यात आली तरी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून झालेली नाही. त्यातच आज राष्ट्रवादीत अजित पवार व शरद पवार वाद चव्हाट्यावर आला आहे. वाद एवढा शिगेला पोहोचला की इथे काय करावं हे शरद पवार साहेबांना कळत नाही. म्हणून काही लोकं न्यायालयाची वाट धरणार काय? असं चित्र आहे.
नवरात्रोत्सव........या नवरात्रात लोकांची धुमधाम असायची. लोकं नटूनथटून देव्यांच्या मंदीरात जात होते नव्हे तर त्या देवीच्या नावानं गरबा खेळून मनोरंजन करीत होते. तसेच काही लोकं आपलं दुकान थाटून चार पैसेही कमवीत होते. काही काम न करणारे लोकं नवही दिवस देवीच्या मंदीरात जावून आपले नव दिवस भरपेट खावून अन्नाची गरज भागवीत होते. काही मंदीर चालक तसेच पुजा करणारी मंदीराधीश माणसं या मंदीरात येणा-या दानावर आपला वर्षभराचा चरितार्थ चालवत होते. काहींनी हा धंदाच बनवला होता. या देव्या काल कोरोनात मात्र कुलूपात बंद असल्यानं मंदीरावर अवलंबून असलेले पुजारी, कर्मचारी तसेच काही दुकानदार यावर संक्रांत आली होती नव्हे तर या उत्सवानिमित्य नटणं थटणं बंद असल्यानं महिलांना कंटाळवाणं वाटत होतं. नव्हे तर या गरबाच्या नावानं या भोळ्याभाबड्या मुलींना फसविणारे महाभाग आता दिसत नव्हते. आज तसं नाही. आज पुन्हा नव्यानं नवरात्र आला आहे व लोकांच्या मनात आज नवा उत्साह आहे.
नवरात्र हा खरा तर देवीचा. दरवर्षी नवरात्रात देव्या दगडाच्या जरी असल्या तरी त्या साक्षात पृथ्वीवर येतात असे काही लोकं मानतात. मग असे असतांना व देव्या साक्षात अस्तित्वात असतांना काल कोरोना कसा शिरजोर झाला. ते कळत नाही. त्यातच या नवरात्रात गरबा खेळणा-या कित्येक भोळ्याभाबड्या मुलींच्या भावना देवीनं का ऐकल्या नाही ते कळत नाही. तसेच ह्याच देव्या आजपर्यंत पुजाविधी करणा-या पुजा-यांवर तसेच ती पुजा करुन घेणा-या कर्मचा-यांवर का रुसली तेही कळत नाही. याचं कारण तसंच आहे.
आज आमचा समाज बळजबरीनं व आपल्याच मनानं काही कृत्य करीत असतो. काही मुली नटूनथटून ज्या नवरात्र निमित्यानं गरबा खेळायला मंदीरात येतात. अशा मुलींना फुस लावून पळवून लावणारे लोकं देव्या आपल्या उघड्या डोळ्यानं पाहात असतात. ते देव्यांना सहन होत नाही. काही मुलींवर बलत्कार होतांना देवी प्रत्यक्ष डोळ्याने पाहते. तेही तिला सहन होत नाही. एवढंच नाही तर देवीच्या या मंदीरातच काही महाभाग हे प्रत्यक्ष स्रीयांना जाळतात. बलत्कार करुन जाळतात. म्हणूनच आज असे प्रकार घडू नये म्हणून काल कोरोना आला व मंदीरं बंद पडली होती. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होवू नये. आज तेच पाहून लोकांनी सुधरावं. देवीनं कोरोना आणून आपले डोळे उघडले. त्यापासून आपण बोध घ्यायला हवा.
हे विश्व म्हणजे देव्यांचा गाभारा असतांना या विश्वात आजही स्रिया हुंड्यासाठी छळल्या जातात. आजही लोभामुळं पुत्र बापाची हत्या करतो तर रागामुळं बाप पुत्राची. माणुसकी राहिलेली नाही. ती मेलेली आहे. खरं तर या देव्यांना मंदीर पुजारी आणि ट्रष्ट वाल्यांनी गुलाम केलेलं आहे. कारण जो जास्त पैसा दान म्हणून देईल. तो तेवढा श्रीमंत आणि सतत नापिकीनं त्रस्त असणारा शेतकरीही जेव्हा मंदीरात आशा घेवून जातो आणि या देवीस फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून देवीला पाच रुपयाची वस्तू वाहतो. तरीही त्याची आत्महत्या. कारण देवी श्रीमंतांची गुलाम आहे असेच वाटते. देव्या या आत्महत्या वाचवत नाही. कारण पाप बरेच वाढले आहेत. म्हणूनच गरीबांनाच वर नेणे सुरु आहे. पृथ्वीवरील ओझं कमी करण्यासाठी. कारण गरीबांजवळ मोठमोठ्या रुग्णालयात उपचार करायला पैसे नसतात.
देव्याही आज कंटाळल्या आहेत असे करतांना. कारण आज पुजारी तसेच मंदीर ट्रस्ट मालकाच्या गुलाम असल्यासारखी वागणूक देव्यांना मिळत आहे. आज पैशाच्या भुकेल्या देव्या जरी नसल्या तरी या देव्यांच्या नावावर लोकांचा व्यापार करणे सुरु आहे. 'तुम्ही नागपूरवरुन आले. जरा जास्त दान टाका." "तुम्ही शंभरचा हार घ्या. दहाचा काय घेता राव." "साहेब ही पुजा सातशे रुपयाची आहे. ह्यानं हे होईल. त्यानं ते होईल." असे म्हणून लुटणारी मंडळी पाहून देव्याही कंटाळल्या आहेत. त्यामुळं देव्यांना कुठंतरी सुरक्षा हवी आहे. त्यातच कामाचं सततचं ओझं असल्यानं देव्यांना आराम नाही. म्हणूनच काल या नवरात्रात देव्यांनी आराम करायचं ठरवलं होतं व देव्या कुलूपात बंद होत्या. त्यामुळं त्यांना आपण आराम करु दिला. त्यांच्या आरामात विघ्न वा व्यत्यय आणला नाही. आज त्यांचा आराम झाला व पुन्हा नव्यानं देव्या कार्य करु लागल्या आहेत. काल तसा संदेश आज कुलूपात बंद ठेवून कोरोना देत होता. कोरोनामुळंच देव्याही आनंदीत झाल्या की काय असे चित्र दिसत होते नव्हे तर या चित्रामधूनच ज्यांनी कोणी देव्यांना गुलाम मानलं. त्यांना काल कोरोना आणून देव्यांनी धडा शिकविला आहे असच चित्रं दिसलं. हे मंदीर बंद असल्यानं पुजारी व ट्रष्ट कंगाल झालेत. .तेव्हा आजतरी कोरोनाच्या रुपानं त्यांनी बोध घ्यायला हवा. जेणेकरुन कोणावरच संक्रांत निर्माण होणार नाही नव्हे तर जेवढं पचते तेवढंच भाविकांना लुटावं. जास्त अतिरेक केल्यास काल कोरोना आला. उद्या अजून कोणता रोग येईल. त्यातच काल केवळ उपासमार झाली. उद्या मात्र महामारी निर्माण होवून कोणतेच औषध त्या महामारीवर चालणार नाही व अख्खी पिढी गारद होईल गव्हासोबत सोंडा पिसल्यागत.........हाच संदेश देव्यांनी कोरोना काळात पदोपदी दिलाय एखाद्या वेड्यासारखा.
आज कोरोना नाही. परंतु महागाई आहे. महागाईवर सरकारचं नियंत्रण नाही. शिवाय खाजगीकरण आकार घेत आहे. सरकारी नोकऱ्या संपल्यात गोळा आहेत. अन् मोदी साहेब गरबा गीत लिहिण्यात व्यस्त आहेत. लोकांच्या अपेक्षा भंग होत आहेत. परंतु हे असंच जर सुरु राहिलं तर उद्या कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार येवू शकतो हे नाकारता येत नाही. तो आजार असेल मानसिकतेचा. मानसिकता एवढी खराब होवू शकते की हाताला काम नसल्यानं देशात चोऱ्या, मारामारी, लुटमार, खुन व आत्महत्या वाढू शकतात. मुलगा बापाची ओळख विसरु शकते अन् बाप मुलाची. फक्त आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न आकार घेवू शकतो हे तेवढंच खरं आणि लोकं दोष देव्यांना देवू शकतात हेही तेवढंच खरं. जरी मानवनिर्मित हे पाप असलं तरी. म्हणूनच वेळीच सावधान झालेलं बरं. देवीच्या दरबारात सर्व खपेल. मात्र पाप खपणार नाही. ती शिक्षा देईलच देईल. तेव्हा वेळीच सावध झालेलं बरं व सरकारनं सावधगीरीनं कार्य केलेलं बरं. नाहीतर सगळं नेस्तनाबूत होईल व सरकारही नेस्तनाबूत होईल. देवी या पापात आडवी येणार नाही व कोणाचंही तो जास्त सेवा करतो. म्हणून संरक्षण करणार नाही. हेच नवरात्र निमीत्याने सांगणे आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०