चूक Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चूक

मनोगत

ती तरुणपणातील चूक ही कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ती तरुणपणातील चूक ह्या कादंबरीतील मुख्य पात्र आहेत रोमा, अमृता आणि रुमानी. ही पात्रं जेव्हा तरुण असतात. तेव्हा त्या पात्रातील दोन पात्र काहीतरी चुका करीत असतात. त्याचा परिणाम हा होतो की ती पात्र त्याचं भोगमान भोगतात.
ही पात्रं नेमका कोणता परिणाम भोगतात? हे दर्शवणारी ही एक वेगळी कादंबरी आहे. या कादंबरी रुपानं मी लोकांना एक बोध दिला आहे.
ही कादंबरी आपण वाचावी. नेमका कोणता बोध आहे, ते ओळखावे व त्यानुसार तो बोध घ्यावा. जेणेकरून तुमचं कधीच अहीत होणार नाही. ही पुस्तक म्हणजे वाचकांसाठी एक बोध असून मी या पुस्तकातून वाचाल तर वाचाल हाच बोध दिला आहे. आपण ही पुस्तक वाचावी व प्रतिक्रिया म्हणून एक फोन अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे

ती तरुणपणातील चूक (कादंबरी)
अंकुश शिंगाडे







ते एक शहर होतं. त्या गावात एक अमृता नावाची मुलगी राहात होती आपल्या वडीलांसोबत. तिचे वडील साधारण शिक्षक होते. पुढे ते शिक्षणाधिकारी बनले होते. त्यांचं नाव दिपक होतं.
अमृता मायबापाची एकुलती एक मुलगी होती. पुढं शिक्षणाधिकारी बनल्यावर त्यांची इच्छा झाली की आपल्या मुलीनं विदेशात शिकावं. कारण विदेशात उत्तम पद्धतीनं शिकवतात. असं त्यांना वाटत होतं. यासाठीच त्यांनी तिला विदेशात टाकलं होतं. ती भारतीय असली तरी ती विदेशी लोकांसारखी राहात असे. कारण तिची मैत्रीण एक विदेशी होती. तिची मैत्री इंग्लंडमध्ये राहात असलेल्या रुमानीसोबत झाली होती.
रुमानी इंग्लंडमध्ये राहणारी व तिच्या महाविद्यालयात शिकणारी एक तिची मैत्रीण होती. तिचं रहनसहन पुर्णतः विदेशी होतं. ते अमृताला आवडत होतं. त्यातच अमृता तिचं रहनसहन पाहून त्यात वाहावत गेली.
या दोघींची आणखी एक मैत्रीण होती रोमा. रोमाची आई भारतीय होती आणि मायबाप इंग्लंडचे. तिच्यावर मायबापाचे उत्तम संस्कार होते. तसं पाहता तिघीही चांगल्या जीवलग मैत्रीणी होत्या, एक पान वाटून खाणा-या.
रोमा इंग्लंडची होती. ती जरी इंग्लंडची असली तरी तिच्यावर उत्तम संस्कार झाले होते मायबापाचे. त्याच संस्काराच्या जोरावर ती इंग्लंडमध्ये राहात असली तरी तिचं रहनसहन भारतीय लोकांसारखं होतं. ती विदेशी संस्कारात वाहावत गेली नव्हती.

****************************************

रावणदहन.........वाईट प्रवृत्तीचा नाश म्हणून दरवर्षी रावणदहन केलंं जातं आणि विजयादशमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतू आपण विचार करीत नाही की खरंच आपण रावणदहन करणारी माणसं ख-या प्रमाणात सात्वीक आहोत का? खरंच आपल्याला रावण दहनाचा अधिकार आहे का? जर आपण सात्वीक असेल असे आपल्या स्वतःला वाटत असेल, तर आपण रावणदहण अवश्य करावं. अन्यथा आपल्याला रावणदहनाचा अधिकार आहे का? यावर विचार करुन मगच रावणदहन करावं म्हणजे झालं.
आज चांगला व्यक्ती वा इमानदार व्यक्ती समाजाला चालत नाही. कारण समाजात आज वाईट व वाह्यात माणसं वावरत असलेले दिसून येत आहेत. सर्वत्र भ्रष्टाचार पसरलेला असून जे काही दोनचार लोकं आहेत. त्यांच्याच कर्तृत्वावर देशाच्या कारभाराची उलाढाल सुरु आहे. म्हणूनच देश आज उभा आहे. काही प्रमाणात विकासही करीत आहे.
वरील बाबींचा विचार करता असा विचार साहजीक मनात येईल की पुर्वी नव्हते काय समाजात वाईट प्रवृत्तीची लोकं? होती, परंतू त्याचे प्रमाण हे अत्यल्प होते.
समाजात दोन प्रवृत्तीचे लोकं असतात. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात चीत आणि पट. तशाच प्रवृत्तीलाही दोन बाजू असतात. त्यानुसार वाईट प्रवृत्तीची माणसं वाईट वागत असतांनाही त्यांना त्यांच्या वागण्यात वाईट दिसत नाही. त्यांना ते बरोबरच दिसतं. कारण त्यांचे विचार वाईट असतात. त्याचमुळे त्यांना समाजातील चांगली माणसंही आवडत नाहीत. त्यांना वाईटच माणसं आवडतात. मग कोणी त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगीतल्या, तरी त्या गोष्टी वाईटच वाटत असतात. ते चांगल्या गोष्टीचा विचारच करीत नाही. त्यामुळं त्यांना पटवून देण्यासाठी वारंवार चांगल्या गोष्टींची शिबीरं भरवली जातात. वक्तृत्वस्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेतल्या जातात. संस्कार, शिबीरं आयोजीत केली जातात. त्यातच कविसंमेलन आणि साहित्यसंमेलनंही. परंतू त्याही विचारपीठावरुन लोकं फक्त एका कानानं त्या चांगल्या गोष्टी ऐकतात आणि दुस-या कानानं त्या गोष्टी सोडून देतात. त्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करीत नाहीत वा त्या चांगल्या गोष्टी आत्मसात करीत नाहीत.
विजयादशमी......... हा सण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्यानं लोक रावण दहन करतात. याचा अर्थ रावण काय चांगला व्यक्ती नव्हता काय? तो चांगलाच व्यक्ती होता, तो प्रकांड पंडीत होता. त्याला वेदांचं पुरेपूर ज्ञान होतं. त्यातच त्यानं शेवटच्या समयी लक्ष्मणाला केलेला उपदेश वाखाणण्याजोगा होता. तसेच तो शूरवीरही होता. त्यानं सिंहासनात आपल्या विचार व ताकतीच्या भरवशावर नव ग्रहांनाही बांधून ठेवलं होतं. तरीही भारतात त्याचं दहन केलं जातं. कारण तो जरी चांगला असला तरी त्यांच्या अंगात असलेली जी दृष्ट प्रवृत्ती होती. खरं तर त्या दृष्ट प्रवृत्तीचं दहन केलं जातं, रावणाचा प्रतिकात्मक पुतळा बनवून. तो जाळला जातो, एक प्रकारचा संदेश देण्यासाठी. संदेश असा की वाईट प्रवृत्ती सोडा, नाहीतर मरणानंतर तुमचीही अशीच अवस्था होईल. परंतू लोकं काही ऐकायला तयार नाहीत. ते फक्त रावणाच्या प्रतिकात्मक रुपाला जाळतात. त्यापासून बोध घेत नाहीत.
पर्यायानं रावणाबद्दल एक बाजू सांगायची झाल्यास तो चांगला होता. तसंच दुसरी बाजू सांगीतली जाते की तो वाईट होता. ह्या दोन्ही गोष्टी विसंगत वाटतात. कारण जो चांगला असतो. तो वाईट नसतो आणि जो वाईट असतो. तो चांगला नसतोच. मग रावण जर वाईट होता तर तो चांगला कसा आणि तो जर चांगला होता तर वाईट कसा? महत्वाचं म्हणजे रावण वाईट नव्हता. त्यानं आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं सीतेला पळवलं. हा त्याचा वाईटपणा आहे काय? नाही. तो वाईटपणा नाही. परंतू त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या पूर्ण परीवाराला दावणीला लावले नव्हेतर आपल्या पूर्ण परीवाराचा अंत करुन घेतला. त्यांचा दोष नसतांना. ही वाईट गोष्ट आणि परीवारातील काही सदस्य त्यांच्या इगोपणामुळं रावणाच्या झाशात येवून लढून मरण पावले. त्या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार रावणच होता. म्हणून तो वाईट होता. प्रत्येक माणसात असलेल्या चांगल्या वाईट गोष्टीतंर्गत तसेच नाण्याच्या दोन्ही बाजू विचारात घेवून, त्यानं त्याच्या मुलीसमान असलेल्या सीतेला पळवलं, आपल्या बहिणीच्या प्रकरणाची शहानिशा न करता, म्हणून तो वाईट होता. तसेच रावण वाईट होता. कारण त्यानं बालीच्या राजमहालातील सुरक्षीत असलेला दशरथाचा राजमुकूट पळवला.
रावणाच्या वाईट वागण्याच्या अनेक गोष्टी दिसून येतात. त्यानं आपला भाऊ विभीषणाला लाथ मारुन बाहेर काढले. त्यात महत्वाचं म्हणजे मी म्हणतो तसं वाग. यातून हुकूमशाही तत्व दिसतं. ज्यानं त्याला इच्छीत वर दिले, त्याच शंकराला कैलासातून लंकेत नेवून गुलाम करण्यासाठी त्यानं कैलास पर्वतच उचलण्याचा प्रयत्न केला. यातून अहंकार दिसतो. सीतेला पळविण्यातून त्याचा उन्मादपणा दिसतो. दशरथाचा राजमुकूट पळविण्यातून चोरप्रवृत्ती दिसते. तसेच या सर्वच गोष्टीतून बोध न घेता, प्रत्यक्ष समुद्र ओलांंडून आलेला राम किती शूरवीर असेल, याचा अंदाज न लावता त्यानं शरणागती पत्करली नाही. यातून त्याचा इगो प्रॉब्लेम दिसतो. एवढं होवूनही त्यानं सर्वच आप्तांना मरायला लावले. यातून तो माणूसकीचा नव्हता हे दिसून येते. ते सर्वच मरण पावल्यावरही त्याला माहित होते की मिही मरणारच आहे. तरीही तो युद्धाला समोर गेला आणि मरण पावला. हे शूरवीराचं लक्षण आहे. त्याला वाटलं की मी जगून काय करु. लोकं काय म्हणतील? या सर्व विचारानं तो युद्धाला समोर गेला व मरण पावला. हे त्याचं बरोबर होतं. परंतू त्यावेळीही त्यानं आपल्या पत्नीचा मंदोदरीचा विचार केला नाही. यातून त्याचा अविचारीपणा दिसतो. मात्र मरतांना अंतिम समयी तिचा हात त्यानं विभीषणाच्या हातात दिला. म्हटलं की विभीषणा, हिच्याशी विवाह करुन हिला आपली पत्नी म्हणून इज्जतीनं वागव. त्यावेळी तिची काय इच्छा होती, हे रावणानं विचारात घेतली नाही. यातून त्याची पुरुषपणाची जिद्द दिसून येते.
महत्वाचं म्हणजे रावण तर गेला. त्याचे होते नव्हते, तेवढे झाले. लोकं त्याचे प्रतिकात्मक पुतळे जाळू लागले. कारण तसल्या वाईट प्रवृत्या समाजातून नष्ट व्हाव्यात. परंतू लोकांनी त्यापासून बोध घेतला का? नाही. ते रावण दहन करतात. परंतू आपल्यातील वाईट प्रवृत्या सोडत नाहीत. आजही समाजात असे इगो प्रॉब्लेम आहेत. मलाच श्रेष्ठ म्हणा, इतरांना नको, ही भावना आहे. आपल्यापेक्षा लाचार, गरीबांवर वर्चस्व गाजविण्याची रावणासारखी हुकूमशाही गाजविण्याची सवय आजही आहे.
आजही लोकं कित्येक गरीब, लाचार विभीषणाला लाथाच मारतांना दिसतात रावणासारख्या. तसेच आजही कित्येक माणसं आपल्याला मदत करणा-या लोकांची मदत विसरुन त्यांनाच शिव्याच हासडतात. जसा रावणानं कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. आजही कित्येक माणसं दशरथासारखे राजमुकूट चोरुन नेतात. त्यानं तर वालीच्या घरी चोरी केली. आजची माणसं आपल्याच स्वतःच्या घरी चोरी करतात. त्यानं आपल्या इगोसाठी आपल्या आप्तांना दावणीवर लावलं आणि आताची मंडळी आपल्या स्वार्थासाठी आपल्या आप्तांना दावणीवर लावतात. त्यानं आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीतेला पळवलं. आज आम्ही आपल्याच बहिणीवर बलत्कार करतो. त्यानं मरतांना आपली पत्नी विभीषणाच्या हाती दिली. तिचं संरक्षण व्हावं म्हणून आणि आपण जीवंतपणीच पैसा कमविण्या आपल्या पत्नीच्या देहाचा सौदा करतो.
महत्वाचं म्हणजं आपल्यात आज रामाचे नाहीतर रावणाचे पूर्णच गुण अगदी कुटकूट भरले आहेत. आपल्याला रावणदहनाचा अधिकार नाही. कारण आपण तसं वागतच नाही. रामासारखं कधीच बनण्याचा प्रयत्न करीत नाहीत. राम आदर्श होता. मर्यादा पुरुषोत्तम होता. त्याची मरणापर्यंत एकच भार्या होती. संकटं आली तरी. अन् आपण आपल्या पत्नीला दगा देवून अनेक पत्नी करतो. मग आपण खरंच रावणाचं दहन करायला लायक आहोत का? याचाच अर्थ नाही असा निघतो आणि आपण जर लायक नाही तर आपण रावणाचं दहन का कराव? मजा येते म्हणून की दृष्ट प्रवृत्ती संपावी म्हणून.
महत्वाचं म्हणजे आपल्याला रावणदहनाचा काहीच अधिकार नाही. अधिकार त्यांनाच आहे. जे चांगल्या गुणसंपन्नतेनं वागतात. आपल्यात रावणाचे वा रावण प्रवृत्तीचे, एकही गुण ठेवीत नाहीत. त्यामुळं विशेष सांगायचं म्हणजे जर आजपासून ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केली असेल की मी पुढील वर्षीपर्यंत रामासारखं बनेल. रावण प्रवृत्तीचे एकही गुण ठेवणार नाही वा आजपासून सात्वीक बनत आहे. त्यांनी त्यांनी रावण दहन स्वखुशीनं करावं आणि जे असा विचार करीत नसेल, त्यांनी कृपया रावणदहन करु नये वा ते दहन होत असतांना आपल्या उघड्या डोळ्यानंही पाहू नये म्हणजे झालं.
मैत्री.......मैत्री अशांशी करावी की जे मैत्री करण्याच्या लायक आहेत. विनाकारण, स्वार्थासाठी कुणाशीही मैत्री करु नये. अशी मैत्री केल्यास त्या मैत्रीतून आपल्यावर संकट ओढवू शकते किंवा आपण अशा मैत्रीतून स्वतःवर संकट ओढवून घेवू शकतो. याबाबतीत एक गोष्ट आहे. ती गोष्ट हंस आणि कावळ्याची आहे.
या कथेत हंस आणि कावळ्याची दाट मैत्री होती. हंस चांगल्या स्वभावाचा व प्रवृत्तीचा. त्यातच कावळा दृष्ट प्रवृत्तीचा. कावळ्याचा दृष्ट स्वभाव बदलविण्यासाठी हंसानं बराच प्रयत्न केला. परंतू कावळ्याचा स्वभाव काही बदलला नाही. एकदा असेच जेवण करण्यासाठी दोघंही मित्र गेले. त्यातच कावळ्याला एक प्रेत दिसलं. ते प्रेत त्या शेतक-याच्या शेळीच्या पिल्लाचं होतं. अचानक ती मरण पावली होती. ते शेतक-यालाही माहित नव्हतं. परंतू ते प्रेत खाण्याची सवय असलेला कावळा ते प्रेत खाण्यासाठी खाली उतरला. त्यावेळी हंसानं त्याला बरंच समजावलं. परंतू तो काही ऐकला नाही. शेवटी ते दोघंही खाली उतरले.
कावळा हूशार होता. तो त्या शेळीच्या पिल्लाचे मांस खात होता. त्यावेळी अचानक त्या शेतक-याचे लक्ष त्या शेळीच्या पिल्लाचे मांस खाणा-या कावळ्याकडे गेले. त्याच्याच बाजूला हा हंसही बसला होता. जो मांस खात नव्हता. परंतू शेतक-याला वाटलं की या दोघांनीही टोचून टोचूून माझ्या शेळीचे पिल्लू मारलेले आहे आणि आता मांस खात बसलेले आहेत. तेव्हा त्यानं एक काठी आणली व त्या काठीनं दोघांनाही मारण्याचा प्रयत्न केला. त्यात हुशार कावळा उडून गेला. त्यानं आपला मित्र असलेल्या हंसाचा विचार केला नाही. परंतू हंस उडू शकला नाही. त्यातच त्याचा जीव गेला. अशी मैत्री.........ती दृष्ट कावळ्याशी असल्यानं दृष्ट कावळा वाचला आणि चांगल्या स्वभावाचा हंस मरण पावला.
आज काळच तसा आहे. दृष्ट स्वभावाची माणसं चोहीकडे आहेत. त्यातच अशी दृष्ट प्रवृत्तीची माणसं टिकत आहेत, राजकारणात आणि सर्वच गोष्टीत अगदी काावळ्यासारखी आणि चांगली हंसासारख्या स्वभावाची माणसं मरत आहेत. त्यांना पद, प्रतिष्ठा सन्मानही मिळत नाही. त्यांच्यातील चांगल्या गुणांची कधीच प्रसंशा होत नाही. परंतू हे कालचक्र आहे. या कालचक्रात वेळ अशी येते की ती माणसं हंसासारखी मरत नाहीत. तर ती तरुन जातात आणि मरतात ती कावळ्यासारखी माणसं. अगदी दुर्गतीनं. त्यांना माहित असतं की माझी दुर्गती होणार आहे या माणसाशी मैत्री करुन. तरीही ते मैत्री तोडत नाहीत. कारण तेव्हा वेळ बरीच निघून गेलेली असते आणि मजबुरीनं राहावं लागतं त्यांना मैत्री शाबूत ठेवण्यासाठी. अशावेळी भरपूर नुकसान होत असतं. परंतू ते नुकसानही सहन करतात. याबाबतीतही एक कथा आहे. कथा जुनी आहे.
महाभारताचं युद्ध आपण ऐकलं. कथा महाभारतातील आहे. दुर्योधन आणि कर्ण एकमेकांचे चांगले मित्र. दोघंही एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. त्यातच एकमेकांसाठी झटत होते. एकमेकांना मदत करीत होते.
महाभारताचं युद्ध होणार होतं. त्यात कर्णालाही माहित होतं की आपण या युद्धात मरणार आहोत. आपलंही नुकसान होणार आहे. त्यातच आपल्या परिवाराचंही. आपला परिवारही उघड्यावर पडणार आहे. तरीही त्यानं दुर्योधनाशी असलेली मैत्री तोडली नाही. त्यातच युद्धादरम्यान अगदी दुर्गतीनं कर्ण मारला गेला.
महत्वाचं म्हणजे मैत्री ही चांगल्या लोकांशी करावी. मैत्री करतांना विचार करावा की आपलं पाऊल बरोबर तर आहे ना. वेडंवाकडं तर नाही ना. मैत्रीत सत्याची कास असावी. मैत्री जीवाला जीव देणारी असावी. कर्णानं केली तशी. परंतू मैत्री स्वार्थासाठी संपणारी नसावी. स्वार्थासाठी कुणीही मैत्री तोडून जावू नये कावळ्यासारखे. तर कर्णासारखे प्राण त्यागावे. मग ती मैत्री चांगल्या व्यक्तीशी असो वा नसो.
आज लोकं मैत्री करतात कर्णासारखी. परंतू जेव्हा कर्णासारखे प्राण देण्याची वेळ येते. तेव्हा ते कर्णासारखे वागत नाहीत. तर कावळ्यासारखे उठून पळतात. मग साहजीकच हंसासारख्या माणसाला नाईलाजानं मरण पत्करावं लागतं.
अलीकडे स्वार्थ तर एवढा वाढलेला आहे की अशा स्वार्थपिडीत काळात लोकं मैत्री तर करतात. परंतू आपली वेळ निघून गेली की त्या मैत्रीचा रंग बदलतो. ते मग सरड्यासारखे वागायला लागतात वेळी अवेळी. त्यावेळी ते मागील सर्व दिवस विसरतात की माझ्यावर मागील काळात काय घडलं होतं? मला कोणी मदत केली? माझा खरा मित्र कोण? ते सगळं विसरुन ते वेगळ्याच भावनेनं वागत असतात. त्यातच अशा स्वार्थपुर्ण वागण्यानं कधी त्यांचा फायदा होतो तर कधी नुकसानही.
विशेष सांगायचं म्हणजे अशा आपल्या वागण्यानं आपला फायदा जरी होत असेल तरी प्रत्यक्ष सृष्टी आपलं वागणं पाहात असते. ज्याला आपण विधाता वा परमेश्वर म्हणतो. तो न्याय करतो. तो असा न्याय करतो की आपले सगळे बरोबर असतांनाही असं काही घडतं की आपल्याला सावरायला वेळंही मिळत नाही. मग कर्णासारखीच आपली दुर्गती होते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे मैत्री अशी करा की ज्या मैत्रीतून काही अर्थ जरी निघत नसेल तरी चालेल. परंतू मैत्री चांगल्या लोकांशी करावी. परंतू चांगल्या लोकांशी मैत्री करतांना त्यांचा हंसासारखा जीव घेवू नये. त्यासाठी आपले विचारही चांगलेच ठेवावेत म्हणजे झालं. कारण तुमचे विचार जर त्या चांगल्या स्वभावाच्या माणसासारखे असतील तर तुम्हाला फलदायी फळ मिळेल आणि तुमचे विचार चांगले नसतील तर तुम्हीही त्या चांगल्या माणसांना बुडवाल आणि तुम्हीही बुडाल. तेव्हा मैत्री करतांना थोडा तरी विचार करावा म्हणजे झालं.

***********************************************

अमृता...... अशीच एक मुलगी. मायबापाच्या अगदी लाडालोभात वाढत असलेली. तिला एक भाऊही होता. भाऊ मोठा होता. त्यामुळं साहजीकच अमृताचा घरी लाड होता. त्यामुळं ती अगदी अल्लडपणे वागत होती. काही दिवसातच तो मरण पावला. त्यामुळं आता अमृता एकटीच होती.
अमृताचं अल्लडपणे वागणं पाहून तिची आई कधीकधी तिला रागवायची. परंतू तिचा बाप. तो कधीही रागवायचा नाही तिच्यावर. एखाद्यावेळी आपल्या पत्नीला रागवायचा.
अमृताला असं वागवणं. त्यातच तिचा राग आपल्या पत्नीवर काढणं. तसंच आपल्या स्वतःवरही. याचा परिणाम अमृतावर होवू लागला. त्याच गोष्टीचा परिपाक अमृता अगदी लहानपणापासूनच बिघडत चालली होती. तिचं ते अल्लड वय तिला स्वस्थ बसू देत नव्हतं.
मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. ते अगदी खरं आहे. कारण जी मुलं लहानपणी समजदारीनं वागतात. तीच मुले मोठ्यापणीही समजदारीनं वागत असतात आणि जी मुलं लहानपणापासून समजदारीनं वागत नसतात. ती मुलं मोठेपणीही समजदारी दाखवत नाहीत. परंतू या गोष्टीला कधी कधी अपवाद आहे. आजच्या काळात तर हे शक्य नाही. आज जी मुलं लहानपणी संस्कारी दिसतात. ती मुलं मोठेपणी संस्कारी दिसतीलच असे नाही. कारण ती मुलं मायबापाच्या अतीव लाडानं व त्यांच्या पैशानं वाया जात असतात. त्यामुळं आजच्या काळात मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. हे म्हणणं धांदात खोटं ठरत आहे. याबाबत एक प्रसंग सांगतो.
ती एक शाळा की ज्या शाळेतील मुलं जेव्हा लहान होती, तेव्हा ती फार मस्त्या करायची. त्यातच त्यांच्या शाळेत एक मुलगा होता. त्याचं नाव होतं अविनाश. तो मोरक्या होता बदमाश गँगचा. सकाळची शाळा असायची. त्यातच मधली सुटी व्हायची. त्यावेळी त्या शाळेला कुंपण नव्हतं. त्यामुळं मुलं खेळायला कुठंही जायचे. तशी शाळेच्या मागच्या भागात झाडी होती. इथे साप, विंचू नेहमी निघायचे. परंतू ती मुलं त्यांना त्या बालवयातही घाबरायची नाहीत. जणू ते त्यांच्या मायबापाचं रक्त असेल. ते मात्र अड्ड्यात जायचे. अगदी निर्भीडपणे न घाबरता.
अड्डा........त्यांचा अड्डा तिरंगा चित्रपटात जसं झाडाच्या आड दाखवला आहे. तसा त्यांचा अड्डा होता. तिथे गंमतगमतची त्यांची अवजारं असायची. त्या अवजारात चाकू, तलवारी, भाले होते. ते लाकडाचे बनवले असून त्याला वार्नीश लावलेलं होतं. तसेच बाणही होते त्यांचे. त्या बाणाच्या टोकावर बाभळीचे काटे टोचले होते त्यांनी. त्यावेळी ते गंमतगंमतचे युद्ध त्या मधल्या सुटीत खेळायचे. मग घंटा वाजली की ते सर्व विद्यार्थी वर्गात जात होते.
अविनाशचा मित्र होता एक. सुरज त्याचं नाव होतं. तसा तो हुशार होता. त्याला वाटत होतं की आपण अशा बदमाश गँगसोबत राहू नये. कारण उद्या ही गँग गुन्हेगारी प्रवृत्तीकडं वळेल. परंतू तरीही तो खेळ समजून त्या गँगसोबत राहातच होता.
वर्षामागून वर्ष गेले. काळ ओसरला. शाळेचं शिक्षण सुटलं. शालान्तपर्यंत काही मुलं होती सोबत. काही सोडून गेली होती. सा-या वर्गात दोन गट असतात. परंतू त्यांच्या वर्गात एकच गट होता. तो म्हणजे बदमाश गट. सर्वच मुलं त्या अड्ड्यात जात होते. चांगला गट म्हणायला नव्हताच. चांगल्या गटाचं हे लक्षण नव्हतंच.
जसजसा काळ ओसरला. तसतसा बदलत्या काळानुसार सर्वजण कामधंद्याला लागले. काही विद्यार्थी जास्त शिकले. ते नोकरीला लागले. परंतू त्या समद्या वर्गातून कोणीही बदमाश बनला नाही वा बदमाश गँगचा मोरक्याही बनला नाही. ते विद्यार्थी आजही चांगल्याच स्वभावाची निघाली होती.
कोणी काय विचार करतात ते मला माहित नाही. परंतू याबाबत मी नक्की म्हणेल की मुलांचे पाय पाळण्यात दिसत नाहीत.
मुलं घडतात. ते त्यांच्यावर येणा-या परिस्थितीवरुन. काही मुलांचे मायबाप हे अकाली मरण पावतात. त्यांना मग कोणीही मदत करीत नाहीत. ती मुलं वाईट मार्गाकडे लागू शकतात. जसे, कोरोनात झालेली अनाथ मुलं. या कोरोनामध्ये काही मुलांचे मायबाप दोघंही मरण पावले आहेत. तर काहींच्या घरी कोणी माय तर कोणी बाप गेलेला आहे. त्या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशी काळजी न घेतल्यास ती मुलं पुढे गुन्हेगारी जगताकडे वळणार नाहीत. हे आता काही सांगता येणे कठीण आहे.
मुलांची गुन्हेगारी जगताकडे जाण्याची वाटचाल ही अगदी नाजूक वयापासूनच सुरु होते. जेव्हा ते लहान असतात. याच वयात जपावं लागतं मुलांना. परंतू जपणार कसं? ज्या वयात जपावं लागतं. त्या वयात त्याचे मायबाप दोघंही अपघातात मरण पावलेले असतात. मग त्यांच्याकडे लक्ष देणार कोण? आजी आजोबा पाहिजे तेवढ्या प्रमाणात लक्ष देवू शकत नाहीत आणि बाकीची मंडळी म्हणजे आत्या वा मावश्या वा इतर नातेवाईकही पुरेसं लक्ष पुरवीत नाहीत. तेव्हा मुलांवर संस्कार कसे करावेत हाच अतिशय बिकट प्रश्न असतो. अलिकडे आणखी एक अतिशय बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे घटस्फोट.
आज मुलंमुली वयात आल्यावर तर विवाह करतात. परंतू दोघांचेही अलिकडच्या पाश्चात्य विचारसरणीच्या नादाला लागून वा त्याचा परिणाम झाल्यानं त्यांचे विचार हे जुळत नसल्यानं त्यांचं फारसं पटत नाहीत. ते मुलं तर पैदा करतात. परंतू त्यांचं पटत नसल्यानं ते एकमेकांकडून फारकत घेवून राहतात. त्यातच मुलंमुली कधी बापाकडं तर कधी आईकडं असतात. त्यातही ते वडील आणि ती आई दुसरा विवाह करते. त्यानंतर त्या घरात येणारा दुसरा व्यक्ती हा त्या मुलांना सांभाळेलच असं नाही. कारण ती त्यांची स्वतःची मुलं नसतात. सरतेशेवटी ती मुलं त्यांच्या आईवडीलांंचा तमाशा पाहून गुन्हेगारी वृत्तीकडं वळतात.
काही काही घरात पतीपत्नी बनलेले जोडपे एकमेकांना सोडून जात नाहीत. परंतू अगदी शुल्लक शुल्लक कारणावरुन भांडत असतात. त्याचाही परिणाम मुलांवर होतो. मुलं गुन्हेगारीकडं वळत असतात.
वरील सर्व प्रकारावरुन हे लक्षात येते की मुलं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची बनत नाहीत. ती बनवली जातात. त्याचे पाय पाळण्यात दिसत नाहीत. कारण तसं त्याच्या मस्तकावर लिहिलेलं नसतं. त्याचा विचार कोणीही करु नये. हं, एवढंच महत्वाचं की मुलांवर संस्कार हवेत. ते संस्कार मायबापच करु शकतात. आप्त नाहीत. त्यामुळं याचा विचार निदान मायबापानं तरी करावा. त्यांनी मुलांना पैदा केलं ना. मग मुलांच्या भविष्यासाठी तरी एकमेकांशी भांडू नये. एकमेकांना कधीच सोडून जावू नये. अन् जायचेच असेल तर मुलं पैदा करु नये. त्यातच समजा अकाली पती पत्नीपैकी एक मरण पावला तर दुसरा विवाह करु नये. कारण त्यामुळंही मुलं बिघडत असतात. त्यांचेवर संस्कार होत नाहीत. तसेच त्यामुळं त्यांचंच नाही तर देशाचंही भविष्य खराब होतं. हे तेवढंच खरं आहे.

**********************************************
अमृता अशाच स्वभावाची होती. अमृता लहानाची मोठी होत होती. तसा तिचा स्वभावही बदलत चालला होता. तिच्यात जिद्दीपणा येत होता आणि महत्वाकांक्षाही. तसं पाहता अमृतावर पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव पडला होता. लहानपणच ते. तिला काय माहित होते की त्याचा परिणाम काय होणार. त्यातच ती वाहवत चालली होती.
अमृताचा जन्म भारतातील होता. परंतू तिच्या वडीलांनी तिला शिकायला विदेशात पाठवलं होतं. कारण त्यांच्याजवळ भरपूर पैसा होता. त्याच पैशाचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग केला होता. तो पैसा आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरत होते ते. परंतू मुलगी चांगली शिकेल तेव्हा ना.
अमृता लंडनला शिकायला गेली खरी. ती तिथे तेथील वातावरणात रमली. तिची तिथे एका मुलीसोबत गट्टी जमली. तिची ती एक मैत्रीण होती. तिचं नाव होतं रुमानी. रुमानी ही लंडनला राहात असे. तिचे विचारही लंडनसारखेच होते. ती तोकडे कपडे घालायची. त्याचं कारणही तसंच होतं.
लंडनचं वातावरण मुळात दमट होतं. तिथं अंगावर कपडे वापरावेसे वाटायचे नाही. कारण शरीर सतत घामाच्या धारेनं चिंतातूर असायचं. त्यामुळं लोकं लंडनमध्ये कमी कपडे घालूनच राहात. परंतू तेच रुमानीचे संस्कार पडले अमृतावर. अमृताही तोकडेच कपडे घालायला लागली होती.
रुमानी शिकत होती ज्या शाळेत. त्याच शाळेत अमृताही शिकत होती. त्या शाळेत अनेक विद्यार्थी होते. त्यातील आणखी एक विद्यार्थीनी म्हणजे रोमा. तिही भारतीय होती.
रोमाची आई ही भारतीय होती. अन् तिचे वडील ब्रिटनचे. परंतू तिच्यावर तिच्या आईचे संस्कार झाले होते. भारत आमचा देश. संस्कारी देश होता. येथील संस्कृती महान होती.

**********************************************

भारत आमचा महान देश आहे. आमच्या भारताची संस्कृती महान आहे. कारण आजही येथील स्त्रिया शालीनतेनं वागत असतात. मात्र काही काही स्रिया याला अपवाद आहेत.
भारतीय संस्कृती पूर्वीपासूनच महान अशी असून त्याला महानतेचा वारसाही लाभलेला आहे. पुर्वी स्रिया एकत्र कुटुंबात राहायला पसंत करीत असत. त्या एकत्र कुटुंबात राहात असतांना अगदी डोक्यावर पदर घेवून राहात असत. त्यातच त्या वडीलधारी मंडळींचा आदर व सन्मान बाळगत असत. त्या घरात व घराबाहेरही सन्मानानं राहात असत. गावात फिरतानाही त्यांच्या डोक्यावर पल्लू राहायचा. कारण संस्कार. हे संस्कार त्यांच्यावर त्यांच्या आईवडीलांकडून आलेले असायचे. त्यामुळे ते अदबीने वागत असत.
पूर्वीच्या स्रिया नटायच्या नाही असे नाही. त्याही नटायच्या. त्या उटणे लावायच्या आणि त्यांचे उटणे स्वहाताने बनवलेले असायचे. ज्या उटण्यातून त्यांचं आरोग्य चांगलं राहायचं. परंतू आता जे उटणे स्रिया वापरतात. त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात नव्हे तर त्यातून आपल्या कातडीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कारण अलिकडील उटणे हे रसायनयुक्त आहे. त्या रसायनाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. तसेच त्या काळातील स्रिया मेहंदीही लावायच्या. त्या मेहंद्या लावतांना पुर्वी स्रिया हातावर चुन्याचे ठिपके लावायच्या. त्यातून तळहाताला कॅल्शीयम मिळायचं. तसेच त्या स्रिया पायालाही मेहंदी लावायच्या. त्यामुळं त्या तळपायांना असलेल्या दाबबिंदूवर थंडावा निर्माण होवून तो थंडावा मस्तकात जायचा व मस्तकातील मेंदूद्वारे शरीराच्या इतर अवयवात. त्यातून मनही शांत व्हायचं. राग, लोभ मनात राहायचा नाही. त्यातच शरीरअवयवात रक्ताभिसरणही व्हायचं. ती मेहंदी नैसर्गीक असल्यानं त्यातून वेगवेगळ्या आजाराला तिलांजली दिली जायची. त्यामुळं ना कोणाला हायब्लडप्रेशर राहायचा. ना कोणाला शर्करेचा आजार व्हायचा. ना कोणी ह्रृदयरोगानं मरायचं.
आज मात्र तसं नाही. आज लोकांना वेगवेगळ्या आजारानं ग्रासलं आहे. कोणाला कर्करोग होतो तर कोणाला ह्रृदयरोग. कोणाला पक्षाघाताचा आजार होतो तर कोणाला डोळ्यांचे. कारण अलिकडील पायाला लावली जाणारी मेहंदी ही कुत्रीम आहे. त्यात रसायनं असल्यानं ते रसायनं शरीरात जातात व शरीराला अपाय करीत असतात.
महत्वपूर्ण गोष्ट सांगायची म्हणजे भारतीय संस्कृती ही एक संस्कृती वाटत असली तरी तिचे दोन भाग होते. एक म्हणजे ग्रामीण संस्कृती आणि दुसरी बाजू म्हणजे शहरी संस्कृती. ग्रामीण संस्कृतीचा विचार करताना मुख्य गोष्ट ही सांगाविशी वाटेल की ग्रामीण भागात संस्कृती थोडीफार अस्तित्वात आहे. तेथील काही स्रिया आजही तोकडे कपडे वापरत नाहीत. परंतू शहरात पोशाख बदललेला आहे. शहरातील स्रिया अतिशय घट्ट कपडे परिधान करतात. ज्यामुळे शरीर अवयवात हवा खेळती राहात नाही. यातूनच आजार होतात. काहींना त्वचेचे आजार होतात. काहींना ह्रृदयरोग. ग्रामीण भागाचं ठीक आहे. तेथे हवा शुद्ध असते. परंतू आजच्या परिस्थितीत तेथेही घट्ट कपडे परिधान केल्याने व हवा शरीर अवयवात खेळती न राहिल्याने तेथेही आजारानं शिरकाव केलेला आहे. शहरात तर या आजाराचा स्तर जास्तच आहे. कारण शहरात सर्वच गोष्टीचं प्रदूषण आहे. शिवाय घट्ट पोशाख तर शहरात पाचवीला पुजलेला असतो. ज्यामुळे शरीर अवयवातील घाम बरोबर बाहेर पडत नाही.
मुळात अस्तित्वात असलेली, महान असलेली ही भारतीय संस्कृती.......या संस्कृतीला एके काळी जगात मान्यता मिळाली होती. या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विदेशी लोकं भारतात आले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला व जगाला सांगीतलं की भारतीय संस्कृती खरंच महान आहे. परंतू आज हीच कालसापेक्ष महान ठरलेली भारतीय संस्कृती नष्ट होवू पाहात आहे. त्याचं कारण म्हणजे आपण करीत असलेले पाश्चात्यांचे अंधानुकरण. आज आपण आपली काल महान असलेली संस्कृती विसरून गेलो आहोत आणि आज नव्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करु लागलो आहोत. जे आपण करायला नको. परंतू आपल्याला दुस-याला चांगलं म्हणण्याची सवय आहे. आपल्या घरच्या मंडळींना नाही. याच आपल्या सवयीमुळे आपण पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अनुकरण करतो. त्या संस्कृतीला महान समजतो. त्यामुळं महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावे. ते नका करु म्हणणार नाही. परंतू आपली संस्कृती विसरु नये. तिचा विसर पडू देवू नये. जी खरंच महान आहे. जिचा विदेशातही अभ्यास केला जातो. खरोखरच भारत महान आहे आणि भारतीय संस्कृतीही.......
रोमावर भारतीय संस्कार झाले होते. जरी तिचे वडील इंग्लंडचे असले तरी. तर रुमानी ही इःग्लंडची असल्यानं तिच्यावर इंग्लंडचे संस्कार झाले होते. तसे ते होणे साहजीकही होते. परंतू अमृता पुर्णतः भारतीय होती. त्यामुळं तिच्यावर भारतीय संस्कार होणे गरजेचे होते नव्हे तर ती भारतीय संस्कारानुसार वागायला हवी होती. परंतू तीच इंग्लंडच्या संस्कृतीचं अनुकरण करीत होती नव्हे तर इंग्लंडच्या संस्कृतीनुसार वागत होती. स्वतःला इंग्लंडचीच समजत होती.
अमृताचं रहनसहन हे इंग्लंडसारखंच होतं. तिचा पोशाख, तिचं खानपान तमाम भारतीयांना लाजविणारं होतं. ते तोकडे कपडे अगदी डोळ्यात भरत होते.
अमृता जेवनात भारतीय पदार्थ न वापरता पिज्जा बर्गर वापरत असे. तशीच ती त्या जेवनात जास्तीत जास्त मांसाचा वापर करीत असे. ती आता तिची सवयच झाली होती. जेवनानंतर ते शीतपेय पिणं हे आज तिच्या अंगवळणी पडलं होतं. त्यासोबतच ती कधी कधी वाईनही प्राशन करीत असे. जी आरोग्याला हानीकारक होती.
अमृताचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांना काळा पैसाही मिळत असे. तसा तिच्या वडीलांजवळ अमाप पैसा होता आणि ती आपल्या बापाची एकुलती एक लेक होती. तिला चांगलं शिकता यावं, म्हणून वडीलानं ती आणि तो भारतीय असूनही इंग्लंडला टाकलं होतं.
लहानपणापासूनच अगदी अल्लडपणानं वाढलेली अमृता ज्यावेळी इंग्लंडला गेली, तेव्हा तिला सावरायला संधीच मिळाली नाही. तिला इंग्लंडला शिकायला पाठवताच तिच्या वात्रट क्लुप्त्यांना वावच मिळाला. त्या क्लुप्त्या हळूहळू वाढत गेल्या. त्यामुळं तिला वाईट वाईट सवयीही लागत गेल्या व हळूहळू ती नशेच्या आधीन झाली.
*****************************

रोमा अमृताच्या वर्गात शिकणारी मुलगी. ती अमृताची जीवलग मैत्रीण होती. तिला वाटत होतं की अमृतानं बिघडू नये. ती भारतीय आहे. तिनं भारतीयांप्रमाणेच राहावं. येथील काही गोष्टी आपल्या अंगवळणी नाहीत. त्यामुळं या सवयी आपल्याला घातक ठरतील. हाच तिचा विचार. ती यामुळेच अमृताला समजावीत असे. परंतू असं रोमानं अमृताला समजवताच अमृता चिडत असे व ती रोमाशी भांडत असे व काही दिवस का असेना, अबोला धरत असे. त्यामुळं अमृताला समजावणं रोमाच्या जिव्हारी लागत होतं. अमृताचं असं वागणं पसंत न आल्यानं आता रोमा तिच्याशी अगदी कमी बोलत होती. तिला आता ती रोमा समजावीतही नव्हती.
अमृता महाविद्यालयात शिकत होती. त्या महाविद्यालयात इतर विद्यार्थीही होते. त्यातच अमृता एका महाविद्यालय तरुणांशी बोलणारी मुलगी. ती आता एका मुलांवर प्रेम करायला लागली होती. त्याचं नाव होतं जार्ज. जार्ज हा इंग्लंडचाच रहिवासी होता. तोही वाह्यात होता. त्याचेमध्येही स्वार्थ कुटकुट भरला होता.
अमृता जार्जसोबत फिरायची. त्याचेसोबत हाॅटेलात जायची. त्याचबरोबर तो खात असलेले पदार्थही खायची. तिला ते पदार्थ खाणं एक फॅशनच वाटायची.
भारतीय महानतेची संस्कृती विसरणारी ती मुलगी. परंतू स्वतःला पाश्चात्य समजून ती त्याप्रमाणे वागत होती नव्हे तर तिनं आपलं खानपानही बदलवलं होतं. परंतू त्याचे आपल्याला काळानुरुप गंभीर परिणाम भोगावे लागतील हे ती विसरुन गेली होती. रोमांच मात्र आपल्या मायबापानं शिकविलेले संस्कार आणि ती संस्कृती अद्यापही विसरली नव्हती.
सवयी.......सवयी माणसानं चांगल्या लावायला हव्यात. मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या का असेना, त्या चांगल्या सवयीचा फायदा आपल्याला जीवन जगताना होत असतो. तसेच माणसाला जीवन जगताना या सवयीची पदोपदी गरज पडते.
माणसाला चांगल्या सवयी या बालपणापासूनच असाव्यात. या सवयी मोठेपणी लावता येत नाही. कारण त्यावेळेस आपल्याला सवयी लावताना आपली स्वतःची स्वतःला लाज वाटत असते. आपलं बोलणं वागणं हे आपल्या चांगल्या वाईट सवयीवर अवलंबून असते. तसेच काही आजारही आपल्या सवयीवर अवलंबून असतात.
सवयीबाबत सांगताना एक गोष्ट आवर्जून मांडावीशी वाटते. ती म्हणजे चांगल्या सवयी या आपलं जीवन घडवतात आणि वाईट सवयी या आपलं जीवन बिघडवतात. उदाहरण द्यायचं झाल्यास महाभारतातील देता येईल. महाभारतात पांडवपुत्र युधिष्ठीर द्यूत खेळायची सवय होती. त्याला माहित होते की या द्यूत खेळण्यानं आपलं स्वतःचं नुकसानही होवू शकतं. परंतू सवयच ती. त्यामुळे तो दुर्योधनासोबत द्युत खेळला. त्याचा परिणाम हा झाला की त्याचं राज्य गेलं. व्यतिरिक्त चार भाऊ आणि पत्नीही. शिवाय त्यानं स्वतःलाही विकून टाकलं होतं. हे सवयीचं मोठं व मुर्तीमंत उदाहरण आहे.
आपला इतिहास आपल्याला शिकवतो की आपल्याला जडलेल्या वाईट सवयी त्रागा. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आपल्याला. परंतू आपण काही सवयी सुधारत नाही आणि सवलतीच्या आहारी जातो. ये सवयीनुसार कोणाला खर्रा खाण्याची सवय असते. कोणाला विडी ओढण्याची सवय असते. कुणाला तंबाखू खाण्याची सवय असते तर कुणाला दारु पिण्याची. इथे आपल्याला माहितही आहे की हे सर्व पदार्थ खाण्यानं कर्करोग होतो. त्तया तंबाखूच्रीया पुड्यांवरही तसंच लिहिलेलं असतं. तरीही आपण खातो. कारण ती आपली सवय. उलट आपण म्हणतो की जे तंबाखू खात नाहीत वा ज्यांना कोणते व्यसन नाही, त्यांना कर्करोग होत नाही काय? होतो. मग तुम्ही आम्हालाच का म्हणता. बरोबर आहे तेही म्हणणं. परंतू आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जी दिंडी ओढतो ना आणि त्याचा धूर वातावरणात सोडतो. त्यामुळे तो धूर आपल्या वातावरणात सोडल्यानं तो धूर हा वातावरणात मिसळतो. त्यातच तो इतर लोकांच्या शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी प्रत्येकाचं प्रतिकारशक्ती चांगली असतेच असे नाही. अशावेळी तो धूर त्या पेशीमध्ये जातो. जी कर्करोगाची पेशी असते. जी कित्येक वर्षापासून उपाशी असते. तो धूर म्हणजे तिचं खाद्य असतं. ते खाद्य मिळताच त्या पेशीची झपाट्याने वाढ होते व एका पेशीपासून अनेक पेशी अनियंत्रीतरित्या वाढतात. तिथे एक गाठ तयार होते व त्या गाठीवर काही दिवसानंतर नियंत्रण मिळवणं कठीण जातं. कर्करोग वाढीस लागतो व एक दिवस आपला मृत्यू होतो.
महत्वपूर्ण गोष्ट ही की हा कर्करोगच नाही तर असे अनेक आजार आहेत की जे इतरांना आपल्या चुकीच्या सवयीनं होत असतात. आपल्याला चुकीच्या सवयी असल्या तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यालाच नाही तर इतरांनाही भोगावे लागतात. जसा गव्हाबरोबर सोंडाही पिसला जातो तसा. म्हणून वाईट सवयी आपण त्यागल्याच पाहिजे. निदान आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी. इतरांमध्ये तुमचा आप्तपरिवारही येतो. तुमची मुलं आणि तुमची पत्नीही येत असते. जसं महाभारतात झालं. युधिष्ठिराने चार भाऊ आणि त्याची पत्नीही पिसल्या गेली त्याच्या वाईट सवयीमुळे.
महत्वाचं म्हणजे आपल्याला जर अशा वाईट सवयी असेल, तर त्या त्यागाव्या. आपल्यासाठी नाही तर आपल्या परिवारासाठी. कारण इतर लोकांच्या रांगेत आपला परिवारही येत असतो. लक्षात असू द्या की ह्या जगातील सर्वच लोकं आपले आप्त आहेत व इतिहासानुसार आपण एकाच आईची लेकरं आहोत.
अमृताला जडलेल्या वाईट सवयी या रोमाला आवडत नव्हत्या. त्यामुळे ती तिच्यापासून बरीच दूर निघून गेली होती. आता तिला समजविणारं कोणीच नव्हतं. कारण तिची ज्या रुमानीसोबत मैत्री होती. ती रुमानीही इंग्लंडच्या वातावरणात वाढलेली होती. तिला भारतीय संस्कृती माहित नव्हती आणि भारतीय स्वभावही.......
अमृताला नशेची सवय लागली होती. तिला लागलेली आशेची सवय आता तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच ती नशेच्या आहारी गेल्यानं तिचं अंग अंग सारखं दुखत राहायचं. हळूहळू ती आता निस्तेज दिसायला लागली होती. तिची कांती बिघडत चालली होती. तिला फारसं जेवनही धकत नव्हतं. तसं पाहता तिची प्रतिकारशक्तीही कमजोर झाली होती व वाटत होतं की तिला कोणत्यातरी आजारानं घेरलेलं असावं.
अमृता आपल्या मायबापाची एकुलती एक मुलगी होती. एक दिवस तिच्या मायबापानं ठरवलं की आपली लेक विदेशात कशी राहात असेल, ते पाहून यावं. तसं पाहता रोजच ती मायबापाला फोन करीत असे व रोजच ती व्हीडीओ काॅलवर बोलत असे. त्यामुळे मुलगी कितीही दूर असली तरी तिच्या मायबापाला त्याचं काहीच वाटत नसे. परंतू आज त्यांनी ठरवलं होतं की तिला भेटायला जावं. तेही तिला न सांगता.
मायबापाचा तो बेत. त्यांनी तो बेत तडीस न्यायचं ठरवलं. तसा तिच्या वडीलानं व्हिसा तयार केला व ते मायबाप इंग्लंडला पोहचले आणि पाहता पाहता ते तिचा पत्ता काढत काढत तिच्या घरीही.
ते जेव्हा तिच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची मुलगी अमृता ही नशेमध्ये चूर आहे. ती बारीकसारीक झालेली असून तिची कांतीही पाहाण्यासारखी नाही. मात्र जेव्हा ती मोबाईलवर बोलत असे, तेव्हा त्यांनी ती बारीकसारीक झाल्याची अवस्था दिसत असे. परंतू तिच्यावर अभ्यासाची चिंता असेल, याचा विचार करुन ते गप्प राहात. ती जेव्हा नशेत नसायची. तेव्हाच ती फोन करायची. त्यावेळी ती चांगली बोलायची. परंतू थोडीफार शंका आलीच होती त्यांना. म्हणूनच ते तिला न सांगता अकस्मात आले होते इंग्लंडला. त्यावेळी त्यांनी तिची वास्तविकता माहित झाली होती.
अमृताला तिच्या वडीलानं व आईनं पाहिलं होतं. त्यानुसार त्यांना माहित झालं की आपली मुलगी अमृता ही आज व्यसनाच्या आहारी गेलेली असून तिला आज परत जाग्यावर आणणे कठीण काम आहे.
अमृता ही व्यसनाच्या आहारी गेलेली होती. ते तिच्या वडीलानं पाहिलं. तसे तिचे वडीव म्हणाले,
"अमृता, काय झालं आणि तू आपली अवस्था कशी केली?"
वडीलांचं ते बोलणं. त्यावर ती नशेतच म्हणाली,
"मला बोलायची गरज नाही. हे सगळं तुमच्यामुळं झालं."
अमृता बोलून गेली खरी. परंतू ती तेवढी होशात नव्हती. ती काय बोलत आहे. ते काही कळत नव्हतं त्यांना. तशी त्यांना वाट पाहावी लागली तिची नशा उतरण्याची. ज्यावेळी तिची नशा उतरली. तेव्हा तिनं आपल्या आईबाबाला पाहिलं. तशी ती म्हणाली,
"आई, केव्हा आली?"
"आम्ही मगाशीच आलो. परंतू तू कुठे होती आतापर्यंत?"
".........." अमृता काहीच बोलली नाही. त्यावर तिच्या वडीलानं सरबत्ती सोडली. परंतू अमृता गप्प होती. कारण चूक तिची होती. त्यामुळं ती अमृता चूप होती. परंतू तिची प्रकृती बरी वाटत नव्हती. ती सारखी बारीक दिसत होती.
वडीलाच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या. तसे काही दिवस बरेही गेले होते. काही दिवस अमृताला बरं वाटलं. तसा एक दिवस तिला हलकासा खोकला जाणवायला लागला. व्यसन बंद झालं नव्हतं.ती लपूनचोरुन व्यसन करीतच होती. म्हणून की काय, तिला खोकला झाला होता. तशी तिची आई तिच्या वडीलाला म्हणाली,
"आपण अमृताला डंक्टरकडे दाखवायला हवं का?"
वडीलांनी होकारार्थी मान हलवली. परंतू ती म्हणाली,
"आई, मी स्वस्थ आहे. मला काहीही झालेलं नाही."
अमृता बोलली खरी. त्यातच मुलीच्या इच्छेपुढे आईचं काहीही चाललं नाही. शेवटी वडीलांनी ठरवलं, आपण आपल्या मुलीला घेवून जाव जबरदस्तीनं डॉक्टरकडे. डंक्टरच सांगतील तिला काय झालं ते.
विचारांचा अवकाश. तिच्या वडीलानं तिला डॉक्टरकडे नेलं जबरदस्तीनं. डॉक्टरांनी तिचा तपास केला. तपासाअंती सांगीतलं की तिला कर्करोग झालेला आहे आणि सोबतच एड्सही. आता वाचणं कठीण आहे.
डॉक्टरची ती तपासणी. तपासणी खरी होती. तिला कर्करोग झाला होता. कदाचित ती घरापासून दूर राहिल्यानं व तिच्यावर मायबापाचा आणि कोण्या आप्तांचा दबाव न राहिल्यानं ती आज कर्करोगाची शिकार झाली होती.
डॉक्टरनं तिला औषधी लिहून दिली. ती औषधी तिला अगदी तरुणपणातच सुरु झाली.
काही दिवस केवळ तिचे उपचारात गेले. त्यातच वडीलाच्या सुट्या संपत आल्या व त्यांनी तिच्या देखभालीसाठी आपल्या पत्नीला ठेवलं व ते आपल्या देशात चालून आले.
मुलीला झालेला कर्करोग. त्यातच उपचारासाठी लागणारा पैसा. तो पैसा पुरवितांना तिच्या वडीलाला नाकीनव येत होतं. कारण कर्करोग हा काही साधारण रोग नव्हता. कदाचित तो रोग दररोजचे निरनिराळे व्यसन केल्यानं, तसेच कच्चे मांस खाल्ल्यानं झाला होता.
अमृताचे वडील सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांना भरपूर वेतनही होतं. त्या वेतनात त्यांचा घरखर्च चालत होता. परंतू पैसे कमविण्याची इच्छा.......त्याच स्वार्थापायी अमृताच्या वडीलानं भ्रष्टाचार करुन पैसा कमवला होता. तो पैसा त्यानं मुलीसाठी खर्च केला होता. तो पैसे कमवितांना त्याला कितीतरी लोकांनी शापीत वाणी दिली होती. तोच शाप लागला होता त्यांना. त्यातच त्या शापाचाच परिणाम म्हणून त्यांच्या मुलीला वाईट व्यसन लागलं होतं. आज ते वाईट व्यसन अमृताच्या कर्करोगाच्या रुपानं रुपानं दिसत होतं.
अमृताच्या वडीलाचं नाव दिपक होतं. आईचं नाव सुधा होतं. दोघांचा संसार सुखाचा चालला होता. जेव्हापर्यंत दिपकचं प्रमोशन झालं नाही. तो सरकारी खात्यात शिक्षक या पदावर नोकरीला होता. दररोज तो आपल्या वेळेनुसार आपल्या नोकरीला जायचा व सायंकाळी वेळ झाली की परत यायचा. त्यानंतर उर्वरीत वेळ तो आपल्या पत्नीला व मुलीला द्यायचा.
अमृता जेव्हा पाच वर्षाची झाली. तेव्हा तिच्या वडीलानं एक मोठी परिक्षा दिली व त्यानुसार तो त्याचवेळी एका शहरात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत झाला.
तो शिक्षणाधिकारी बनला. त्यातच त्याचा दर्जा वाढला. त्याचं त्यावेळी वेतनही वाढलं. परंतू तो खुश नव्हता. वाढलेल्या दर्ज्यानुसार त्याची इच्छाशक्ती वाढली.
सुरुवातीला दिपक शिक्षणाधिकारी बनताच तो इमानदारच होता. परंतू त्याच्या कक्षात ज्या कोणत्या शाळा येत होत्या. त्या शाळेतील मालक अर्थात संस्थाचालक पाहिजे तेवढे इमानदार नव्हते. ते शिक्षकांकडून पैसे गोळा करायचे अनधिकृतपणे. त्यानुसार ते शाळेत जागा भरण्यासाठी शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेल्या दिपकला लाच म्हणून पैसे देवू लागले. तसे पैसे घ्यायचे मनात नसतांनाही तो संस्थाचालकांकडून पैसे घेवू लागला. तो पैसा.........तो पैसा शिक्षक संस्थाचालकाला आपलं मन मारुन देत होते.
तो पैसा शिक्षक संस्थाचालकांनी आपलं न मारून देत होते. त्यामुळं त्या पैशात प्रेम आणि आशिर्वाद नव्हता तर एक प्रकारचा शापच होता. असा पैसा दिपकही घेतल्यानंतर त्याचं नुकसानही झालं होतं. परंतू ते त्याला कळलं नव्हतं. तो पश्चाताप न करता आणखी असा पैसा घेत होता.
कर्करोग........ज्याला आपण कॅन्सरदेखील म्हणतो. हा रोग कच्चे मांस सेवनाचे केल्याने होतो. तसेच प्लास्टीक पिशव्यातील खाद्य खाल्ल्यानं तसेच कोल्ड्रींक्स प्राशन केल्यानं होतो. त्यातच वेळच्यावेळी जेवन न करणे, नकारात्मक विचार ठेवणे. दुस-याप्रती आकस बाळगणे याही गोष्टी कॅन्सरसाठी लागू आहेत.
लोकं कॅन्सरचे कारण जाणून न घेता त्यामागे अंधश्रद्धाही बाळगतात. म्हणतात की कॅन्सर हा आपण काही मागील जन्मी पाप केले असेल. म्हणून झाला. परंतू असे काहीही कारण यामागे नाही.
कॅन्सर हा प्रत्येकालाच असतो. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण कॅन्सर म्हणजे एक प्रकारची गाठ. जी गाठ अनियंत्रितरित्या वाढते. ती का वाढते? याचा विचार केला वा अभ्यास तर आपल्याला असे दिसून येईल की अशा गाठी तेव्हाच वाढतात. जेव्हा त्याला पोषक वातावरण मिळेल.
कॅन्सरबाबत सांगायचं झाल्यास प्रत्येक माणसात प्रत्येक ठिकाणी गाठी असतात. या गाठी अनियंत्रीत वाढायला लागल्या की कॅन्सर होतो. या गाठी वाढायला पोषक वातावरण कारणीभूत असते. जसे प्लाॅस्टीक भांड्यात जेवन करणे, थंड पेय पिणे. धुम्रपान करणे. नकारात्मक विचार करणे. या बाबींमुळे या गाठी वाढायला सुरुवात होते. त्या अनियंत्रितरित्या वाढतात. परंतू या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक शरीरातील गाठी कॅन्सरच्या नसतात.
प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकार कॅन्सरचे आज माहित आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. पेशीचे विभाजन. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.
बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.
मारक गाठी म्हणजे मॅलिग्नंट वा कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिका ग्रंथीमार्फत किंवा रक्तवाहिन्यामार्फत इतर अवयवांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात, त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये प्रक्षेपीत होतो, त्यावेळी दुसऱ्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ. फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरीत झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपीत फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.
कर्करोगाचे ऊतीवरुन काही प्रकार पडतात. शरीरातील उतीॅंवरून कर्करोगाचे तीन प्रकार केलेले आहेत.
संयोजी ऊतीना होणारा कर्करोग उती अर्बुद किंवा सारकोमा.
या प्रकारातील कर्करोग स्नायू, अस्थि आणि रक्तवाहिन्यामध्ये होतो. अपिस्तर उतींना होणारा कर्करोग ‘कार्सिनोमा’ अभिस्तर ऊती कर्करोग किंवा कर्क अर्बुद स्तने, बृहदांत्र आणि फुफ्फुस अशा अवयवांमध्ये होतो. ल्युकेमिया आणि लिंफोमा हा अस्थिमज्जेमधील रक्तपेशीना होणारा कर्करोग आहे. कधी कधी तो लसिका ग्रंथीमध्ये आढळतो.
आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्येही होतात. उदाहरणार्थ, डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींचा कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट, पौरुष ग्रंथी आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.
कर्करोगाचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
कार्सिनोमा कर्करोग, हा त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावतो.
सार्कोमा कर्करोग, हा कर्करोग, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारीत ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग आहे.
ल्यूकेमिया कर्करोग, हा कर्करोग रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये जसे. अस्थिमज्जेमध्ये उगम पावणारा कर्करोग आहे. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
लिंफोमा आणि मायलोमा कर्करोग, हा कर्करोग शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग आहे.
सेंट्रल नर्वस सिस्टिम कर्करोग, हा कर्करोग मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग आहे.
कर्करोग हा लवकर लक्षात येत नाही. क्ष किरण चिकित्सा किंवा प्रत्यक्ष पाहणीमधून लक्षात आलेली गाठ लक्षात येईपर्यंत बरीच वर्षे झालेली असतात . उतीच्या प्रकारानुसार कर्करोगाच्या गाठीच्या वाढीच्या वेगामध्ये फरक आहे. बिनाइन ट्यूमर हा कर्करोग शरीरातील एखाद्या ठिकाणची कर्करोगाची प्राथमीक अवस्था होय. काही तज्ज्ञांच्या मते ही कर्करोगपूर्व स्थिती आहे. एका ठिकाणी आणि आवरण असणाऱ्या बिनाइन ट्यूमरच्या गाठी आसपासच्या अवयवामध्ये सहसा पसरत नाहीत. पण अशा गाठी वाढण्याची आणि शेजारील अवयवामध्ये पसरण्याची शक्यता असल्याने त्या शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात. काही कर्करोग एकाच ठिकाणी तर काही कर्करोग ठरावीक भागात असतात. ठरावीक भागामध्ये असलेल्या गाठी पसरण्याची अधिक शक्यता असते. या पसरणाऱ्या गाठी मेटॅस्टॅटिक म्हणजे लसिकावाहिन्यामधून व रक्तवाहिन्यामधून शरीराच्या दूरवरच्या भागामध्ये नवीन गाठी निर्माण करतात.
कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारच्या उपचाराने कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज साठ टक्के कॅन्सर बरे होवू शकतात किंवा आटोक्यात राहू शकतात. चाळीस टक्के कॅन्सरांमध्ये उपचारानंतर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधीक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काही उपायामुळे कॅन्सरच्या धोक्याचे प्रमाण कमी होते. असे असले तरी डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीस कॅन्सर का झाला हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता धूम्रपानामुळे वाढते. पण धूम्रपानामुळे कॅन्सर नक्की होईलच असे नाही. आयुष्यात कधीही सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीस कदाचीत फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही कारणांच्या जवळपास कधीही नसलेल्या व्यक्तीस सुद्धा कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे.
कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णापासून तो दुसऱ्या रुग्णामध्ये संक्रमीत होत नाही. पण अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकासाठी वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. कधीकधी डोक्याला लागलेल्या टेंगळामुळे कॅन्सर होतो. कॅन्सर होण्यासाठीच्या कारणापासून आपण दूर राहू शकतो. तसेच आनुवंशिक कारणांनीही कधीकधी कॅन्सर होत असतो. पण बहुतेक कॅन्सर होण्यामागे पर्यावरणातील काही घटक कारणीभूत आहेत. आपले खाणे, पिणे, सिगरेट ओढणे, कॅन्सर कारकांचा संपर्क. उदाहरणार्थ, किरणोत्सर्ग आणि पर्यावरणातील काही विषारी पदार्थ. सिगरेट आणि अल्कोहोलमुळे चाळीस टक्के कॅन्सर झाल्याचे सिद्ध झाले आहे. तेहतीस टक्के कॅन्सर नको ते पदार्थ खाण्यात आल्याने आढळून आले आहे. तसेच काही कॅन्सर हे माता पित्याकडून आलेला जनुकीय वारसा, वय, लिंग, आणि वंश ही कॅन्सर उद्भवण्यामधील आणखी काही कारणे आहेत. या कारणापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही तरी, कॅन्सर उद्भवण्यामधील काही कारणापासून आपण दूर राहू शकतो. कॅन्सरच्या पर्यावरणीय घटकापासून दूर राहता येते. डॉक्टर यासाठी लागणारा सल्ला देऊ शकतात. अधून मधून कॅन्सरसाठीची तपासणी केल्यास कॅन्सरचे निदान लवकर होते. अशा चाचण्या लाभदायक आहेत की नाहीत हे डॉक्टर उत्तमपणे सांगू शकतो. कर्करोगाची शक्यता खालील कारणानी वाढते
तंबाखू कर्करोगामुळे होणाऱ्या तेहतीस टक्के कॅन्सरचे एक तृतीयांश मृत्यू तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. तंबाखू ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो, तेवढा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. दररोज दहा सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा दहा पटीनी अधिक असते. तसेच इतर लोकं जेव्हा विड्या ओढतात. तेव्हा तो धूर आपल्या शरीरात जावून आपल्याला कॅन्सर होत असतो. शिवाय धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठर, यकृत, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. धूर विरहीत तंबाखू ओढल्यास कर्करोगापूर्वी ऊतींमधील झालेले बदल बहुतेक वेळा सामान्य होतात. क्लोरीनयुक्त पाणी हेही वाढत्या कर्करोगांचे कारण आहे. मुळात कॅन्सरमध्ये अति तेलकट आहाराचा आणि मोठे आतडे, गर्भाशय व प्रोस्टेट कॅन्सरचा संबंध आहे असे काही प्रमाणात सिद्ध झाले आहे. तरीपण यावर झालेल्या संशोधनामधून हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. उदाहरणार्थ, तेलकट पदार्थ खाण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा संबंध निर्विवादपणे जोडता येत नाही.
आहारातील एकूण मेदाम्लाचे कर्करोगाशी सरळ संबंध जोडता आला नाही तरी आहारामधील जादा उष्मांकाचा स्तनांच्या कर्करोगाशी संबंध आहे असे आकडेवारी सांगते. अधीक उष्मांकाचे अन्न घेतल्यानंतर मासिकपाळी कमी वयात सुरू होते. नंतरच्या आयुष्यात अधिक मेदाम्लांचे सेवन केल्याने लठ्ठ्पणा येतो. लठ्ठ्पणामुळे शरीरातील स्त्री संप्रेरकाची, इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने स्तनांच्या कर्करोगाची शक्यता वाढते.
योग्य आहार घेतल्याने काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्वे, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. आहारामध्ये ताजी फळे पालेभाज्या, कोंड्यासह बनविलेला ब्रेड, कडधान्ये, पास्ता, तांदूळ आणि घेवडा यांचा समावेश आवश्यक.
अतिनील किरण आणि किरणोत्सार. अतिनील किरणामुळे त्वचेचा कर्करोग होतो. त्वचा तपकिरी किंवा काळी करण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम अतिनील किरण उपकरणे यामुळे त्वचेचे नुकसान होते. आणि त्वचेच्या कर्करोगाचा घोका वाढतो. अतिनील किरणामुळे होणाऱ्या त्वचा कर्करोगाच्या शक्यतेपासून संरक्षण करण्यासाठी काही उपाय करता येतात. जसे. त्वचा संरक्षक क्रीम वापरणे. अशा क्रीममध्ये त्वचा संरक्षक घटक पंधरा प्रतिशत किंवा त्याहून अधिक प्रभावी असावा. हे क्रीम दिवसातून दोनदा उघड्या त्वचेवर चोळतात. घाम आल्यानंतर आणि पोहून झाल्यानंतर क्रीम आणखी एकदा लावतात. तीव्र उन्हाळ्यात जेथे अतिनील किरणांची तीव्रता अधिक आहे. अशा ठिकाणी दर दोन तासानी सन स्क्रीन क्रीम लावल्यास फायदा होतो. समुद्र किनाऱ्यावर जेथे हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण कमी असते, तेथे अतिनील किरणांची तीव्रता अधिक असते. दिवसा दहा ते दुपारी चार पर्यंत सूर्यप्रकाशामध्ये उभे राहणे टाळावे. उन्हामध्ये केव्हा जावे यासाठीचा एक सोपा नियम म्हणजे स्वतःच्या लांबीपेक्षा सावली जेव्हा लहान असेल तेव्हा उन्हामध्ये उभे राहू नये. मोठ्या काठाची हॅट वापरावी. अधीक वेळ उन्हामध्ये उभे राहावयाचे असल्यास अंगभर पूर्ण कपडे घालून उन्हामध्ये जावे. अधूनमधून सावलीत उभे रहावे. डोळ्यावर अतिनील किरण प्रतिबंधक गॉगल घालावा. गोरेपणा कमी करण्यासाठी अतिनील किरण उपचार केंद्रामध्ये टॅनिंग सेंटर मध्ये जाणे टाळावे.
अति मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये तोंड, घसा, अन्ननलिका, स्वरयंत्र आणि यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासात केवळ एक औंस अंदाजे साठ मिली एवढे मद्य घेणाऱ्या व्यक्तीमध्ये स्तनांच्या कर्करोगाची शक्यता वाढल्याचे दिसून आले आहे. तुम्ही मुळीच अल्कोहोल घेत नसाल तर नव्याने अल्कोहोल घेण्याची सुरुवात करण्याचे कारण नाही.
किरणोत्सर्ग आयनीभवन करू शकणाऱ्या विकिरणामुळे उदा, क्ष किरणांच्या समवेत सतत काम करणे, किरणोत्सारी धातूंच्या संपर्कात येणे, अवकाश प्रवासाच्या वेळी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर किंवा आत येणे, ज्यामध्ये विश्वकिरणांच्या संपर्कात येणे किंवा अपघात यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जपानमध्ये अणुबॉम्ब स्फोटानंतर तीव्र किरणोत्सार झाला. ज्या व्यक्ती स्फोटातून वाचल्या, त्याना कॅन्सरला तोंड द्यावे लागले. क्ष किरण तपासणी करताना रुग्ण फार थोड्या वेळेपुरता आणि कमी क्षमतेच्या किरणोत्सारास सामोरे जातो. तसेच कॅन्सरवरील उपचाराचा भाग म्हणून ठरावीक तीव्रतेचा किरणोत्सार कॅन्सर गाठीवर सोडला जातो. त्याच्या परिणामांची आणि उपचाराची माहिती तज्ज्ञ डॉक्टर देऊ शकतात.
रसायने आणि कर्करोगकारक काही रसायने वापरल्यानेही कॅन्सर होत असतो. कीटकनाशके आणि धातू यांच्या संपर्कात आल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. ॲजबेस्टॉस, निकेल, कॅडमियम, युरेनियम, रॅडॉन, व्हिनिल क्लोराईड, बेंझिडिन, आणि बेंझीन ही रसायने कॅन्सरचे कारक असल्याचे माहित आहे. अशा रसायनांच्या संपर्कात काम करावे लागत असेल तर सुरक्षेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
संप्रेरक उपचार पद्धत एचआरटी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ऋतुनिवृत्तीनंतर काही स्त्रियामध्ये काही स्त्रियामध्ये चेहऱ्यावरून गरम वाफा गेल्यासारखे वाटणे किंवा गुप्त भाग कोरडा पडणे अशा तक्रारीवर ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे उपचार केले जातात. अशा उपचारानंतर मिळालेले कॅन्सरचे निष्कर्ष मिश्र स्वरूपाचे आहेत. ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे मिश्र उपचार घेतलेल्या स्त्रियामध्ये स्तनांच्या कर्करोगाचा धोका फक्त इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रियांहून वाढलेला दिसला. पण इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून आला. एच आर टी उपचार घेणाऱ्या स्त्रियानी आपापल्या डॉक्टरशी याबाबत बोलणे आवश्यक आहे.
काही ठरावीक सर्वेक्षणात डाय एथिल स्टिल्बेस्ट्रॉल डीईएस........ डाय एथिल स्टिल्बेसस्ट्रॉल हे एक कृत्रिम स्टेरॉईड संप्रेरक असून याचा चांगला परिणाम दिसून आला. गर्भारपणातील काही प्रॉब्लेम दूर करण्यासाठी हे वापरण्यात येते. पण डायएथिल स्टिल्बेस्ट्रॉलच्या वापराने गर्भाशयमुख आणि काही शरीराच्या गुप्त भागात काही अस्वाभाविक पेशी उत्पन्न झाल्याचे आढळले. याशिवाय डीईएस वापरणाऱ्या स्त्रियामध्ये एक विरळा गुप्तभागाचा आणि गर्भाशयमुखाचा कॅन्सर आढळला. डीईएस १९५० ते १९७१ पर्यंत वापरात होते. यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रियामध्ये स्तनाच्या कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. याचा वापर चालू असता ज्या स्त्रियांना मुली झाल्या, त्या मुलीमध्ये जन्मानंतर स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले. ज्या स्त्रियांना मुलगे झाले त्यामध्ये नेहमीपेक्षा लहान अंडकोश तयार होणे किंवा अंडकोश अंडपिशवीमध्ये न उतरणे अशा कॅन्सरला सामोरे जावे लागले. काही कर्करोग जसे. मेलॅनोमा, स्तन, बीजांड, प्रोस्टेट, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग, हे कर्करोग काही कुटुंबांमध्ये अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसले. हा प्रकार जनुकीय वारशाचा इतर कौटुंबिक वातावरणाचा किंवा खाण्यापिण्याच्या सवयीचा आहे की कसे यावर एकमत झालेले नाही. सामान्य पेशी विभाजनाच्या वेळी जनुकामध्ये आकस्मीक बदल होऊन कॅन्सर होतो. जनुकामधील बदल होण्यास जीवनशैली किंवा पर्यावरणातील काही कारणांचा सहभाग असावा. काही बदल मातापित्याकडून अपत्याकडे जनुकीय वारशाच्या स्वरूपात येत असावेत. जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल मुलामध्ये असले म्हणजे त्याला कॅन्सर होईलच असे नाही. फक्त त्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
अमृताची तपासणी झाली होती. त्यानुसार तिला कँन्सर आणि एड्सही झाला होता आणि आता तिची प्रकृती खराब होती. डॉक्टरांनी सांगीतलं होकं की तिनं कोणत्याही अशा वस्तू खावू नये. ज्या वस्तू शरीराला अपाय करणा-या आहेत.
अमृता काही दिवस विणा नशेनं राहिली. कारण ती तिची मजबूरी होती. तसं राहाणं तिला भाग होतं. कारण ती तशी राहिली नसती तर केव्हाचीच ती मरुन गेली असती. तिचं व्यसन काही दिवसासाठी का होईना, सुटलं होतं.
व्यसन करावंसं वाटत होतं. विणा व्यसनानं काही राहता येत नव्हतं. सारखी व्यसनाचीच आठवण येत होती. परंतू काय करणार. उपाय नव्हता.
काही दिवस बरे गेले. तिला सारखी व्यसनाचीच आठवण येत होती. राहावंसं वाटत नव्हतं. सुचत नव्हतं काय करावं ते. त्यातच एक दिवस तिनं व्यसन केलंच.
कँन्सरची गोष्ट. त्याला लागत आजार समजून अमृतानं तो आजार लपवून ठेवला. परंतू वारा येतो, तसे पान पडते. त्याप्रमाणे झालं. कँन्सर हा तिचा आजार तिच्यापासून लपला नाही. तो तिच्या महाविद्यालय मैत्रीणींनाही माहित झाली. त्यातच तिचा मित्र जार्जही तिच्यापासून दूर गैला आणि ती मैत्रीणही. जिचं नाव रुमानी होतं. परंतू रोमा तिची जीवलग मैत्रीण होती. तिनं आता तिच्याशी बोलणं सुरु केलं होतं. त्यामुळं खरी मैत्री व स्वार्थी मैत्री यामधील फरक तिला कळला होता. कधीकधी जेव्हा तिला त्या गतकाळातील आठवणी यायच्या. तेव्हा मात्र तिला स्वतःची जशी लाज वाटायची व मनातल्या मनात रडायची.
आता तिला स्वतःची लाज वाटत होती. तिला कळून चुकलं होतं की आपलं चुकलं. आपण रोमाचं ऐकायला हवं होतं. रोमाला आपण दूर सारलं आपल्या छंदासाठी. परंतू रोमानं आपल्याला दूर सारलं नाही. आपण भारतीय संस्कार विसरलो. परंतू रोमा नाही. जर मी रोमाच्या म्हणण्यानुसार वागले असतील तर मला कधीच कँन्सर झाला नसता. अमृताचा आजचा विचार बरोबर होता. परंतू आज ती वेळ निघून गेली होती.
अमृतानं एक दिवस धुम्रपान केलं. त्याचबरोबर त्या जंतूंना खाद्य मिळाल्यानं आज रात्रीच तिची प्रकृती बिघडली होती. तसं तिच्या आईनं तिला पुन्हा दवाखान्यात नेलं. तसं डॉक्टरांनी तिला तपासून औषधी देत सांगीतलं की आता जर ती व्यसन करेल, तर ती अजिबात जगू शकणारच नाही.
रोमा तिला स्वतःची काळजी घेण्याविषयी सांगत असे. तसं तिचं मन भरुन येत असे. कारण बाकीची सर्व मित्र मंडळी तिच्यापासून फारकत घेवून दूर राहात असत. तशी एक दिवस ती रोमाला म्हणाली,
"रोमा, मला एक आश्चर्य वाटतं की बाकीची माझ्या जवळची मित्र मंडळी माझ्या जवळ भटकत नाहीत. त्यांना अक्षरशः भिती वाटते. असं असतांना तू एकटीच माझ्याशी बोलतेस. जवळ असतेस अगदी माझ्या. सांग, तुला काहीच भिती वाटत नाही काय?"
"वाटते मलाही भिती वाटते. परंतू त्यासाठी मी तुझी हेळसांड करु काय, अगं मला माझ्या आईवडीलानं शिकवलं की कोणताही आजार हा कोणाला स्पर्श केल्यानं होत नाही. तो वाईट विचारानं होतो. मी जर तुझ्या गरजेच्या काळात तुझ्यापासून दूर गेली तर कदाचित मलाही कालांतरानं तो आजार होईल यात शंका नाही." रोमा बोलून गेली. तसं तिला आणखीनच भरुन आलं. ती रडू लागली. परंतू तिच्या रडण्यावर रोमा म्हणाली,
"रडू नकोस अमृता, रडण्यानं आजार वाढतो." तिनं धीर देत म्हटलं.
असं म्हणताच अमृता आणखी जोरात रडायला लागली. आता ती हुंदके देत रडत होती.
अमृताचं रडणं समजून घेत तिला रोमानं दिलेला धीर. अमृताला बळ देणारं दिसलं. ते बळ देणारच ठरलं. आता अमृता रोमाची प्रत्येक गोष्ट ऐकत असे आणि तिच्या मतानंच चालत असे. ती आता रोमाच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी कँन्सरवरील औषधी घेत असे.
रोमाच्या म्हणण्यानुसार अमृतानं आपलं व्यसन कायमचं बंद केलं होतं. ती आता व्यसन करीत नव्हती.
ती महाविद्यालयात यायची. सतत अभ्यासात गुंग असायची. तशी तिला रोमा मदत करायची. मात्र महाविद्यालयातील मुलं आता रोमाशीही बोलत नव्हती. तशी रोमाही त्या गोष्टीची तमा बाळगत नव्हती.
****************************************

तो कँन्सरचा उपचार अतिशय जीवघेणा असा उपचार वाटत होता. कर्करोगाची उपचार पद्धतीही जीवघेणीच होती. त्यावर उपचार करतांना क्ष किरणाद्वारे त्या कँन्सरच्या गाठीचा भाग जाळून टाकला जात असे. तशी ती गाठ जाळून टाकताच त्या जागेवर वेदना होत. या वेदना अतिशय तळपवणा-या राहात असत. कधी कधी हा भाग काही खाण्यात आल्यानं शुजायचा. त्यातच अमृता अति वेदनेनं तळपत असे. तशी ती तळपताच तिच्या आईलाही त्रास होत असे. कधीकधी महाविद्यालयातही तिला त्रास सुरु होई. तो त्रास सुरु होताच शाळेतील प्राध्यापकांनाही सांगायची हिंमत होत नसे. तिला लाज वाटायची. जरी ती गोष्ट प्राध्यापकांना माहित होती तरी. तेव्हा हळूच ती रोमाला सांगत असे व रोमा हळूच प्राध्यापकांना. तसा प्राध्यापकवर्ग तिला घरी जायची सुटी देत असे.
कर्करोगात अनेक प्रकारच्या तपासण्या कराव्या लागत असत. त्या तपासणीत पेशी तपासणी असे. यात उपचार पेशी तपासणीने करता येणे शक्य आहे. स्तनांचा कर्करोगही लवकर शोधता येतो. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग ओळखण्यासाठी त्यावरच्या पेशी काचपट्टीवर पसरवून विशेष परीक्षेसाठी पाठवता येतात. याला पॅप तपासणी असे म्हणतात. त्यात कॅन्सरपूर्व स्थिती स्पष्ट कळते. प्रसाराआधी या अवस्थेत किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून मोठा धोका टाळता येतो. रक्त तपासणीत विशिष्ट विषाणूंची चिन्हे दिसल्यास रंगाबद्दल पूर्वसूचना मिळते. तोंडामध्ये चट्टा आला असेल तर त्याचीही अशीच तपासणी करुन लवकर उपचार करता येतात. स्वयंतपासणीने स्तनाचा कर्करोग लवकर कळू शकतो. सोनोग्राफी हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. याने पोटातील कर्करोग लवकरात लवकर कळून येतो. इतर अवयवांच्या कर्करोगांसाठी मात्र लक्षणांवरून अनुमान करणे व त्वरित तज्ज्ञाकडे पाठवणे इतकेच शक्य आहे.
कर्करोगात रोगनिदान, पायरीचे निदान आणि उपचाराला प्रतिसाद मिळण्यासाठी अनेक वेळा निरनिराळया तपासण्या कराव्या लागतात. पेशीतपासणीत कर्करोगाच्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्या गाठीला तपासले जाते. नमुना घेण्यासाठी प्रत्यक्ष छोटा तुकडा काढून किंवा सुईने अंतर्गत गाठीचा नमुना घेणे यापैकी योग्य ते तंत्र वापरावे लागते. काही बाबतीत गाठ किंवा व्रण खरवडून किंवा झाडून पेशी घेतल्या जातात. प्रत्येक कर्करोगाप्रमाणे त्याचे योग्य तंत्र ठरलेले आहे. या पेशीतपासणीनंतर कर्करोगाचे प्राथमिक निदान, प्रकार, आक्रमकता याचा अंदाज येतो. चित्र तपासणीत सोनोग्राफी, क्ष-किरण, सीटीस्कॅन, एम.आर.आय, रक्तवाहिनी चित्र, इ. निरनिराळया चित्रण तंत्राने कर्करोगाच्या गाठींचे आणि प्रसारांचे नेमके चित्र कळू शकते. काहीवेळा पूर्ण शरीराचा स्कॅन पण करावा लागतो. रक्ततपासणीत रक्त तपासण्यांमध्ये रुग्णाची एकूण परिस्थिती कळण्यासाठी रुटीन किंवा विशेष तपासण्या केल्या जातात. याशिवाय कर्करोग विशिष्ट द्रव्ये शोधण्यासाठी काही खास तपासण्या केल्या जातात. यात एच.पी.व्ही. विषाणू, टयूमर मार्कर्स, इ. तपासण्या येतात. एंडोस्कोपी : एंडोस्कोपी म्हणजे नलिका दुर्बिणीने अंतर्भागाची तपासणी करणे. या तंत्राने स्वरयंत्र, श्वासनलिका, अन्ननलिका, जठर, मोठे आतडे, मूत्राशय, स्त्रीबिजांड,गर्भाशय, इ. अवयवांचे निरीक्षण करता येते. याशिवाय या नलिकेतून याच वेळी संशयित गाठीचा नमुनाही घेतला जातो.
ट्यूमर मार्कर........ निरनिराळया कर्करोगांमुळे रक्तात विशिष्ट द्रव्ये आढळतात. यांना टयूमर मार्कर असे म्हणतात.
मॅमोग्राफीही तपासणी स्तनाच्या कर्करोगासाठी वापरतात. यात स्तनातल्या रक्तवाहिन्यांचा फोटो काढून गाठीची शक्यता तपासतात.
कर्करोग पायरी किंवा अवस्था ठरवणे एकदा कर्करोगाचे निदान झाले की त्याचा प्रकार, टप्पा,पायरी, इत्यादी बाबी निश्चित कराव्या लागतात. यावरून उपचारांचा तपशील व यशाचा अंदाज करता येतो. हल्ली यासाठी टी.एन.एम. कोड वापरला जातो. टी (T) म्हणजे टयूमर म्हणजे गाठ. एन (N)म्हणजे नोड म्हणजे अवधाण. एम (M) म्हणजे मेटास्टासिस म्हणजे इतर अवयवात प्रसार. रक्ताचा कर्करोग सोडून बहुतेक कर्करोगांच्या निदानात या तीन बाबी विचारात घ्याव्या लागतात. कर्करोग पसरला नसल्यास शस्त्रक्रिया हा मुख्य उपाय ठरु शकतो. तो पसरला असल्यास मुख्यत: रासायनिक उपचार आणि किंवा किरणोपचार करावे लागतात.
कर्करोगाचा टप्पा ठरवण्यासाठी इतरही काही पध्दती प्रचलित आहेत. याचा अंदाज अर्थातच अनेक तपासण्यांनंतरच लागतो.
काही अपवाद वगळता कर्करोगाचे उपचार खर्चीक, दीर्घसूत्री, पीडादायक व ब-याच वेळा मर्यादित उपयोगाचे असतात. गर्भाशयाचे, स्तन व तोंडाचे कर्करोग प्राथमिक अवस्थेत शस्त्रक्रिया करून पूर्णपणे काढून टाकता येतात. यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
रससंस्थेचा कर्करोग (सुटयासुटया, रबरासारख्या गाठी येणे) उपचाराने बरा होण्याची शक्यता असते. यासाठी परिणामकारक औषधे निघाली आहेत.
रक्ताचा कर्करोगही उपचाराने बरा होऊ शकतो. स्वरयंत्र, स्तन, इत्यादींचे कर्करोगही लवकर शोधून काढून टाकता येतात किंवा किरणोत्सर्गी उपचार करून बरे करता येतात. कर्करोगाचे किरणोत्सर्ग हे एक कारण आहे आणि एक उपचारदेखील.
कर्करोगावरचे उपचार तीन प्रकारचे आहेत.
शस्त्रक्रिया करून काढून टाकणे व
किरणोत्सर्गी उपाययोजना.
कर्करोगविरोधी औषधे यापैकी एक किंवा जास्त उपाययोजना गरजेप्रमाणे केली जाते. कर्करोगाची शक्यता लक्षात घेऊन लवकर निदानासाठी डॉक्टरकडे पाठवणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो. कर्करोग उपचार ही बरीच गुंतागुंतीची गोष्ट असते. शस्त्रक्रिया असेल तर ती गाठ मुळापासून अवयवासहित काढण्याची गरज असते. अर्थात काही अवयव पूर्णपणे काढता येत नाहीत. रासायनीक उपचार हे शरीराच्या पेशींना देखील मारक व प्रतिकूल असतात. म्हणूनच शरीरातील इतर अवयवांचे व पेशींचे त्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. या उपचारानंतर शरीरावर दूरगामी आणि खोलवर परिणाम होतात. केस गळणे, भूक जाणे,थकवा, रक्तनिर्मिती थांबणे, प्रतिकारशक्ती थंडावणे त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतात. यासाठी पूरक उपचार, विश्रांती, इत्यादी उपायांनी शरीर सावरून धरावे लागते. काही आठवडयांनी हे परिणाम थांबतात व शरीर हळूहळू सावरते. रासायनिक उपचाराच्या अनेक फे-या कराव्या लागतात. किरणोपचार हा ही मुळात दाहक उपचार असतो. पेशींची वाढ थांबवण्यासाठी त्याचा वापर केला असतो. फक्त कर्करोगग्रस्त भागात त्याचा मारा करण्यासाठी आता आधुनिक यंत्रे आहेत. यात मुख्यत: दोन प्रकार आहेत.
(१) टेलिथेरपी म्हणजे किरणांचा दुरून मारा करणे.
(२) ब्रॅकिथेरपी म्हणजे जवळून मारा करणे.
कर्करोग शरीराच्या आत खोलवर आहे की वरवर यावर सर्व ठरते. खोल आजार असला तर टेलिथेरपी लागते. त्वचा, तोंड,हातापाय, इत्यादी भागात असेल तर ब्रॅकिथेरपी करता येते. ब्रॅकिथेरपीने इतर शरीराचे नुकसान कमीत कमी होते. किरणोपचाराचे देखील दुष्परिणाम असतातच. याशिवाय संप्रेरकांचा उपचार काही कर्करोगांमध्ये केला जातो. यात मुख्यत: स्तनांचा कर्करोग आणि प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग यांचा समावेश आहे.
कर्करोगाविरुध्द प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काही प्रयत्न सुरु आहेत. यात शरीराची प्रतिकारशक्ती त्या कर्करोगाविरुध्द वापरण्याचा प्रयत्न केला जातो.
लाक्षणिक उपचारात ब-याच वेळा कर्करोग निदान उशिरा झालेले असते. उपचारांनंतरही काही लाक्षणिक उपचार करावे लागतात. मूळ कर्करोग उपचाराशिवाय हे जे लाक्षणिक उपचार केले जातात. त्यांचा उपयोग रुग्णाचे जीवन सुसह्य करण्यासाठी केला जातो. रुग्णाचे उरलेले एकूण जीवन सुधारण्यासाठी याचा फार उपयोग होतो. वेदना, मळमळ, उलटी, जुलाब, रक्तस्त्राव,शय्याव्रण. फोड वा जखमा, थकवा, मानसिक नैराश्य, इत्यादी अनेक त्रास रुग्णाला होत असतात. हा त्रास काही प्रमाणात कमी करणे शक्य नसते. वरुन समाजही अशा रुग्णांना वाळीत टाकतो. हाही एक त्रासच असतो.
हल्ली कर्करोगावर काही घरगुती शुश्रुषेसाठी प्रशिक्षित आरोग्यसेवक उपलब्ध होऊ शकतात. यासाठी देशात काही ठिकाणी खास प्रशिक्षण संस्थाही सुरु झाल्या आहेत. याशिवाय कर्करोग रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी अनेक बाबतीत समुपदेशनाची गरज भासते. निदान, उपचार, आर्थीक बाबी, मदत निधी, रुग्णाची ने-आण, घरगुती उपचार,उपचारांचे दुष्परिणाम, एकूण यशापयश वगैरे अनेक बाबतीत सल्लामसलत लागते. ही मदत रुग्णालयाने उपलब्ध करायला पाहिजे.
कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यानुसार प्रत्येक अवयवात वेगवेगळा त्रास होत असतो.
तोंडातील कर्करोगात न भरून येणारा चट्टा, व्रण, गाठ, जबड्याखाली व नंतर मानेत टणक अवधाण. घशातील कर्करोगात गिळायला त्रास, घशात गाठ, व्रण, गळ्यातील मानेवर टणक अवधाण. स्वरयंत्रातील कर्करोगात आवाजात बदल, आवाज बसणे, स्वरयंत्राची आरशाने तपासणी करावी लागते. मानेत अवधाण गळते. श्वसनसंस्थेतील कर्करोगात सतत खोकला, कधीकधी खोकल्यातून रक्त पडते, क्ष-किरण चित्रात डाग दिसून येतो. अन्ननलिकेतील कर्करोगात गिळायला त्रास, अन्न छातीत अडकल्यासारखे वाटते. जठरातील कर्ररोगात भूक मंदावणे, जठरात अन्न जास्त वेळ राहिल्याने जडपणा, अर्धवट पचलेले किंवा न पचलेले अन्न उलटणे, पोटात हाताला गाठ लागणे, उलटीत कधीकधी रक्त. मोठे आतडे व गुदाशयातील कर्करोगात शौचातून कधी रक्तस्राव, शौचविसर्जनाच्या सवयीत बदल,बध्दकोष्ठ. स्तनातील कर्करोगात स्तनात टणक गाठ, न भरून येणारा व्रण, काखेत टणक अवधाण. गर्भाशयातील कर्करोगात अचानक रक्तस्राव, गुप्तमार्गाच्या तपासणीत गर्भाशयाच्या तोंडावर गाठ, खरखरीतपणा दिसणे, कधीकधी ओटीपोटात गोळा लागणे. रक्तातील कर्करोगात रक्तस्रावाची प्रवृत्ती, यकृत, पांथरी सुजणे, सतत जंतुदोषाचे आजार. विशेषकरून लहान वयात येणारा कर्करोग. स्त्रीबीजांडांतील कर्करोगात ओटीपोटात किंवा त्यावर गोळा तयार होणे. पुरुषबीजांडातील कर्करोगात अंडवृषण मोठे होणे, कठीण लागणारी सूज. पुरुषांच्या गुप्त मार्गातील कर्करोगात गुप्तमार्गावरच्या त्वचेला किंवा टोकाला खरबरीत गाठ येणे, मधूनमधून रक्तस्राव. मूत्राशयातील कर्करोगात अधूनमधून लघवीवाटे रक्तस्राव, खास नलिका घालून तपासणीत निश्चित निदान. प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगात लघवीत अडथळा, थेंबथेंब पूमिश्रित लघवी, इत्यादी, गुदद्वारातून बोट घालून तपासल्यावर कडक, टणक गाठ लागते. यकृतातील कर्करोगात कधीकधी यकृताचा आकार वाढतो. कधीकधी कावीळ व पांढरी विष्ठा. हाडातील कर्करोगात हाडावर टणक सूज. वेगाने वाढणारी, न दुखणारी, विशेषतः मांडीच्या हाडाच्या खालच्या टोकाशी आढळणारी वाढ. रसग्रंथीतील कर्करोगात ठिकठिकाणी सुटेसुटे रबरी गोळयासारखे अवधाण विशेषतः गळपट्टी,मानेतील अवधाण, ताप व वजन कमी होणे. इत्यादी प्रकारचा त्रास होत असतो.
अमृताला तशाच प्रकारचा त्रास होत होता. दर आठवड्याच्या तपासण्या आणि त्यावर उपचार करता करता नाकीनव येत होतं. त्यातच कँन्सरचा त्रास वेगळा, परंतू उपचाराचा त्रास जास्त होत होता.
त्या जराजर्जर वेदना व ती किरणोत्सरी कीरणं व त्या कीरणांचा मारा शोषतांना अतिशय वेदना. त्या वेदनेने ती सतत विव्हळत असे. तिला बरोबर बोलताही येत नसे व तिचा चेहराही बारीक झाला होता.
कँन्सर हा तिच्यासाठी जीवघेणा आजार होता. त्यातच त्या कँन्सरचा परिणाम म्हणून तिच्या डोक्यावरील केसंही गळले होते आणि तिचा चेहराही पाहण्यासारखा झाला होता. तरीही ती महाविद्यालयात जात होती.
रोमा तिची बेस्ट मैत्रीण होती. तिची मदत वाखाणण्याजोगी होती. तिच्या मदतीनं ती आज तेवढ्या वेदना होत असूनही ती तटस्थ उभी होती.

****************************************

एकदाचा तो दिवस. एकदा एक दिपकचा मित्र त्याला भेटायला आला. मित्र त्याचा दहावीचा सोबती होता. कोणीतरी त्याला सांगीतलं होतं की दिपक हा लाच घेतो. तसंच त्याला त्याची मुलगी अमृताही कँन्सरनं आजारी असल्याचं सांगीतलं होतं. तोही मोठ्या हुद्द्यावर होता. म्हणजेच आज मंत्री बनला होता. त्याचं नाव गौतम होतं.
गौतम मंत्री होता. राज्याचा कारभार त्याच्या हाती होता. तो जास्त शिकला होता. तसेच आपल्या शिक्षणाच्या भरवशावर त्याला कायद्याचा अभ्यासही होता.
गौतम शिकला होता. परंतू त्याला नोकरी लागली नाही. कारण तो गरीब होता. त्याच्या वडीलांकडे चांगल्या ठिकाणी डोनेशन म्हणून भरायला पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तो काही नोकरीला लागला नाही. शिवाय त्याचं ओळखीचं कोणी नसल्यानं त्याला वशिलाही नव्हता. परंतू तो लोकांची मदत करायचा. शेवटी कोणीतरी म्हटलं की त्यानं राजकारणात नशीब आजमवावं. म्हणून त्यानं राजकारणात नशीब आजमावलं व पहिल्याच प्रयत्नात तो निवडणूकीत निवडून आला. प्रथम नगरसेवक नंतर आमदार व हळूहळू करीत तो आज मंत्रीही बनला होता.
गौतम इमानदार होता. तो इमानदार असल्यानं आज तो मंत्री असूनही त्याचेकडे पाहिजे तेवढी संपत्ती नव्हती. तो इमानदार होता. म्हणून त्याला संपत्ती कमवता आली नाही. बाकीचे मंत्री रिक्षा चालवत होते पुर्वीच्या जीवनात. परंतू ते मंत्री बनताच त्यांनी रक्कड पैसा भ्रष्टाचार करुन कमवला होता. परंतू गौतमनं काहीच कमवलं नव्हतं. मात्र तो जनतेची कामं नित्यनेमानं करायचा. म्हणूनच आज सात वेळा तो निवडणूक जिंकला होता. त्यामुळं की काय, पक्षानं त्याला आपल्या मंत्रीमंडळात घेतलं होतं आणि आता तो एक जबाबदार मंत्री म्हणून काम करीत होता.
गौतमचं काम पाहून त्याची राज्यात चर्चाही होत असे. आजुबाजूच्या भागात त्याची इमानदार मंत्री म्हणून ओळख होती. तो पक्षाचे काम इमानदारीनं करीत असल्यानं आज त्याच्यामुळे त्याच्या पक्षाचीही अब्रू वाढली होती.
गौतमनं दिपकबद्दल ऐकलं होतं आपल्याच एका दहावीच्या मित्राकडून. त्याच्या मुलीला कँन्सर झाल्याचंही ऐकलं होतं त्यानं. त्यातच अगदी लहानपणापासून त्यानं दिपकची परिस्थिती पाहिली होती.
काल दिपक गरीब होता, हेही त्यानं जवळून पाहिलं होतं व आज दिपकजवळ सर्व काही आहे, हेही तो जवळून पाहात होता. त्याला माहित होतं की एवढी सर्व मालमत्ता दिपक केवळ आपल्या वेतनानं मिळवू शकत नाही. त्यानं काही ना काही भ्रष्टाचार केलेला असावा.
गौतमची शंका बरोबर होती. कारण दिपकनं अगदी तेच केलं होतं. तसा एक दिवस तो त्याला भेटायला आला. दोघात संवाद रंगला व बोलता बोलता मंत्री असलेला गौतम बोलून गेला.
"दिपक, तू भ्रष्टाचाराचे पैसे मिळवायला नको. हा पैसा लोकं तुम्हाला चांगल्या मनानं देत नाहीत, तर तो शाप देवून देतात. हा पैसा देतांना त्यांचं मन उदास असतं. माझ्याकडं बघ, मी मंत्री आहे या राज्याचा. मी चाहे तर कितीतरी प्रमाणात पैसे कमवू शकलो असतो भ्रष्टाचारानं. परंतू आजही मी असा पैसा कमवलेला नाही. तू पाहातच असशील की आज माझ्याकडे काहीच नाही. काल मी जसा होतो. तसाच आजही आहे. हं, मंत्री नक्की आहे. परंतू असा एकही रुपया मी कमवला नसल्यानं आज मला लोकंच हिरीरीनं उभं करतात. माझी अनामत रक्कमही भरतात आणि मला निवडून देतात. मी लोकांचे काम करतो.
माहित आहे दिपक, मी आज या माझ्या इमानदारीनंच सुखी आहे. आज माझा परिवारही सुखी आहे. त्यांना माझ्याकडून काहीही शिकायत नाही. आरोग्यसंपन्न आहेत. विधात्यानं त्यांना अगदी ठणठणीत ठेवलं आहे.
दिपक, मी जे बोलत आहे. त्याचं वाईट वाटून घेवू नकोस. माझा तुला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. परंतू मित्र म्हणून तुला समज देणं हे माझे कर्तव्य समजतो. मी असं ऐकलं आहे की तुझी मुलगी कँन्सर आजारानं त्रस्त आहे. माहित आहे हे कसं घडलं? कदाचित मी म्हणत नाही आणि मी म्हणूही नये. तसं मला म्हणण्याचा अधिकार नाही. कारण मी काही तुला पाहिलं नाही. परंतू एक लक्षात येते यावरुन की तू भ्रष्टाचार केलेला असेल, म्हणूनच हे असं तुझ्या मुलीवर संकट आलं. तू हा भ्रष्टाचार करणं सोड. इमानदार बन. कदाचीत याचाच परिणाम होईल तुझ्या मुलीवर. तुझी मुलगी कँन्सरपासून भयमुक्त होईल. माझं हे लक्षात ठेव. येतो आता."
मंत्री असलेला गौतम असं म्हणताच निघून गेला. त्याचा त्या दिपकला भयंकर राग आला होता. परंतू काय करणार. गौतम मंत्री होता. मोठ्या पदावर असलेला आणि तो एक साधारण शिक्षणाधिकारी. तीच गोष्ट त्याला गतवर्षी त्याच्या एका गरीब मित्रानंही समजवली होती. परंतू ते काही तो समजला नव्हता.
सुहास गौतम आणि दिपकचा मित्र होता. तिघंही एकाच वर्गात शिकलेले होते. परंतू सुहासचे मायबाप शिकले नसल्यानं व त्याला शिक्षणाचं महत्व समजत नसल्यानं सुहास काही जास्त शिकलेला नव्हता.
सुहासनंही दिपकच्या मुलीच्या कँन्सरबाबत ऐकलं होतं. त्यालाही अगदी वाईट वाटत होतं. त्याला वाटत होतं की दिपकची मुलगी सुधरावी.
दिपक हा मोठ्या हुद्यावर असून तो भ्रष्टाचार करतो हे त्यानं ऐकलं होतं. त्यानं त्याला सुधरविण्यासाठी बरेचसे प्रयत्नही केले होते. परंतू ते फोल ठरले होते. एकदा त्यानं त्याला गंमतीनं मेहटलं होतं की त्यानॉ त्याला आपल्या कार्यालयात एखादी शिपायाची नोकरी द्यावी. परंतू त्याला त्यानं नोकरी दिली नव्हती. तो बरेचदा दिपककडे गेला होता नोकरीसाठी. परंतू त्यानं त्याच्यावर प्रेम दाखवलं नव्हतं. तरीही त्याचं प्रेम होतं दिपकवर. त्यासोबतच त्याच्या परिवारावर. परंतू दिपक त्याचेवर प्रेम करीत नव्हता. त्याचं प्रेम होतं पैशावर. सुहाससारख्या गरीब मित्रावर त्याचं प्रेम नव्हतंच.
गतवर्षी आज गौतमनं बोललेली गोष्ट सिहाल दिपकला बोलून गेला होता. परंतू दिपकला त्याचा भयंकर राग आला होता. त्यानं त्याला आपल्या घरुन अक्षरशः हाकलून दिलं होतं. परंतू गौतम मंत्री असल्यानं त्याला हाकलून लावणं शक्य नव्हतं. शेवटी तो स्वतःच निघून गेला. त्यातच त्याला पुरेसा रागही आला होता.
सुहासची गोष्ट दिपक न ऐकल्यानं व त्याला दिपकच्या मुलीबद्दल आत्मीयता असल्यानं दिपकनं जरी त्याला त्याच्या कार्यालयातून हाकलून दिलं असलं तरी तो चूप बसला नाही. तो गौतमला भेटला. त्यानं दिपकबद्दल पुरेशी कल्पना गौतमला दिली आणि सांगीतलं की त्यानं दिपकला समजवावं. चांगल्या मार्गावर लावावं. जेणेकरुन त्याचा परिणाम होवून दिपक सुधरेल व त्याचाच परिणाम होवून त्याची मुलगीही कँन्सरपासून मुक्त होईल. त्यानुसार गौतमनं दिपकला समजावलं होतं. कारण दिपकला गौकमच समजवू शकतो हे सुहास हेरुन होता.
दोन तीन दिवस नुकतेच निघून गेले होते. तशी आज सुटी होती त्याला. ती सवड मिळताच दिपक घरी निवांत बसून विचार करायला लागला की मागील वर्षी सुहासनं सांगीतलेली गोष्ट व आज गौतमनं सांगीतलेली गोष्ट. यात तसूभरही अंतर नाही. गौतम चाहे तर भरपूर पैसा कमवू शकला असता. परंतू आजही तो इमानदारीनं जगतो. आजही तो सुखी आहे. तसाच तो सुहासही सुखी आहे. आज सुहास गरीब आहे. परंतू त्याचा परिवार सुखी आहे. आपणही इमानदारीनं जगायला हवं. आपणही कोणाकडून आजपासून पैसा कमवू नये. आपणही दानधर्म करायला हवे.
दिपकचा विचार..... . दिपक आजपासून सुधरला होता. त्यानं भ्रष्टाचार सोडला होता. त्यातच तो दानधर्मही करीत होता. आता त्याचेकडे संस्थाचालक आपली कामं घेवून येत. रक्कड पैशाची गोष्ट करीत. परंतू आता दिपक नियमात असलेल्याच गोष्टी करीत असे. भ्रष्टाचाराला थारा न देता तो मियमबाह्य गोष्टी करीत नसे. त्यामुळं आता तो संस्थाचालकांना अप्रिय वाटू लागला होता. ते आता त्याच्या विरोधात उघडपणे डावपेच खेळू लागले होते.
दिपक सुधरला होता. तो आता भ्रष्टाचार करीत नव्हता. त्याचा परिणाम की काय, आज दिपकची मुलगी अमृता हळूहळू सुधरायला लागली होती. ती आता कँन्सरवर मात करु पाहात होती. तिच्या वेदनाही कमी झाल्या होत्या.
अमृताच्या वेदना कमी होत चालल्या होत्या. त्यातच तिला कळलं की तिची मैत्रीण रुमानी अतिशय आजारी असून तिला एड्स नावाचा महाभयंकर आजार आहे. त्यातून डॉक्टरांनी सांगीतलं की ती आता वाचू शकत नाही.
रुमानीचं अमृतानं ऐकलं. तसं ऐकताक्षणी तिला वाईट वाटलं. परंतू क्षणातच तिला आठवलं की हीच रुमानी, काल आपल्याला कँन्सर झाल्याचं कळताच आपल्यापासून दूर निघून गेली होती. ती आपली जीवलग मैत्रीण होती. तरीही तिनं तिच्यासोबत असा धोका केला होता आणि तो जार्ज. आपला जीवलग मित्र होता तो. तोही आपल्याला कँन्सर झाल्याचं कळताच आपल्यापासून दूर गेला होता. अतिशय प्रेम करणारा तो. मिही प्रेम करीत होती त्याचेवर. परंतू त्यानं माझ्यावर प्रेम केलं नाही. प्रेम केलं ते स्वार्थानं. तेही माझ्यावर नाही तर माझ्या शरीरावर प्रेम केलं त्यानं.
ती विचारच करीत होती. तेवढ्यात तिथं रोमा आली. तशी ती रोमाला म्हणाली,
"रोमा, तुला माहित झालं का की रुमानीला एड्स झाला. ती वाचण्यापलीकडे आहे. माहित आहे. जेव्हा मला कँन्सर झाला, ते ऐकताच ती माझ्यापासून अगदी फटकून राहात असे. अन् तो जार्जही माझ्यापासून दूरच राहात असे. बघ, आता तिही तिच्या कर्माची फळं भोगत आहे."
रोमा आश्चर्यचकीत झाली होती. कारण अमृताच्या तोंडून आता कर्म आणि फळं या गोष्टी निघाल्या होत्या. ज्या गोष्टीला ती भाव देत नव्हती कँन्सर होण्यापुर्वी. परंतू आज तिच्या तोंडच्या गोष्टी ऐकून ती सुधारल्याची कल्पना येत होती. परंतू ती जशी बोलली होती. ते बोलणे रास्त नव्हते. तशी रोमा म्हणाली,
"अमृता, एक बोलते मी. रागावशील नको. अगं असं बोलायचं नसतं. तिही आपली एक मैत्रीणच आहे. तुला माहित आहे. वर विधाता देव जो लपलेला आहे ना, ज्याला आपण गॉड म्हणतो. कोणी देव म्हणतात. तर कोणाचा अल्ला असतो तो. तो आपली परिक्षा पाहात असतो. माणसाचे जेव्हा चांगले दिवस असतात ना. तेव्हा माणसाला गर्व असतो. तो गर्वात असतांना पशूप्रमाणे वागत असतो आणि जेव्हा तो दुःखात असतो. तेव्हा माणसासारखा. त्याला मग देव धर्म सारं कळतं.
अमृता, तुझं रुमानीबद्दल असं बोलणं बरोबर नाही. खरं तर तू तिला भेटायला जायला हवं होतं. तिला सांत्वना द्यायला हवी होती. परंतू तू तिच्याबद्दल उलटच बोलतांना दिसत आहेस. हे काही बरोबर नाही."
अमृतानं रोमाचं ऐकलं. तिला स्वतःच्या बोलण्याचं वाईट वाटलं. तशी ती म्हणाली,
"रोमा, मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली."
"ठीक आहे. ठीक आहे." रोमा म्हणाली. तशी अमृताही तिला म्हणाली.
"रोमा, आपण उद्या जावूया रुमानीला पाहायला. ठीक आहे."
"ठीक आहे." रोमा म्हणाली.
रोमानं अमृताचा पुरता निरोप घेतला व ती तेथून निघून गेली. ती चांगली होती. तिला वाटत होतं की माणसानं आपल्यात चांगूलपणा ठेवावा. म्हणजे आपल्याला चांगलं जीवन जगता येतं. तसा तिच्यात चांगूलपणा होता. ती स्वतः चांगलीच वागत होती. दुस-याप्रती ती आदर बाळगत होती. त्यांचा सन्मानही करीत होती. तिचे विचार चांगले होते. म्हणूनच ती स्वस्थ होती.
दुसरा दिवस उजळला. तशी रोमा अमृताकडे आली. तिनं अमृताला रुमानीकडे चालण्याविषयीची आठवण दिली. तशी रुमानीकडे जाण्यासाठी अमृताही तयार झाली.
रोमानं गाडी काढली. त्यावर अमृताला बसवून ती रुमानीकडे जावू लागली. अमृतालाही गाडी चालवता येत असे. परंतू ती कँन्सरनं अति कमजोर झाली होती. म्हणून ती आता गाडी चालवत नव्हती.
थोड्याच वेळात रुमानीचं घर आलं. त्यातच तिच्याकडे येतांना आज अमृतालाही अति हायसं वाटत होतं. कारण रोमानं तिचा ब्रेनवॉश केला होता.
ज्यावेळी त्या दोघी रुमानीकडे पोहोचल्या. तेव्हा रुमानी अंथरुणातच पहूडली होती. तिनं तिच्या पुढ्यात रोमा आणि अमृताला पाहिलं. तसं तिला अतिशय बरं वाटलं व तिला तिचा भूतकाळ आठवला. आठवलं की मी यांच्याशी कशी वागले.
ते महाविद्यालयीन जीवन. अमृताला जेव्हा कँन्सर झाला. तेव्हा रुमानी तिची खास मैत्रीण असतांना तिच्याकडून ती दूर गेली होती नव्हे तर मुलांनाही तिच्याशी ती बोलू देत नव्हती. त्यातच तिच्याशी बोलणा-या रोमाशीही तिनं मैत्री तोडली होती. त्यासोबतच तिच्या पूर्ण मैत्रीणींनीही मैत्री तोडली होती.
आज रोमा आणि अमृताला पाहताच तिला स्वतःची लाज तर वाटली. परंतू आनंदही तेवढाच वाटला. तशी रोमा म्हणाली,
"कशी आहेस?"
"बरी आहे."
ती बरी नव्हती. परंतू तरीही ती स्वतःला बरी समजत होती. तशी म्हणतही होती. तशी अमृता म्हणाली,
"जार्ज आला होता का?"
"नाव नको काढू त्या जार्जचं?"
"का? तो माझा मित्र होता म्हणून? त्यानं मला धोका दिला म्हणून? जावू दे. मी माफ केलं त्याला."
"अगं अमृता, त्यानं तुलाच धोका दिला नाही. त्यानं मलाही धोका दिला. त्याच्या कर्माचीच फळं भोगतो आहे मी."
अमृतासमोर रुमानी बोवून गेली खरी. परंतू तिला ती तसं का बरं बोलत आहे. ते कळत नव्हतं. तशी ती म्हणाली,
"म्हणजे? त्यानं तुला कसा काय धोका दिलाय? जरा आम्हालाही सांगशील?"
"अगं काय नाही केलं त्यानं. त्यानं माझ्या शरीराचा उपभोग तर घेतलाच. व्यतिरीक्त त्यानं मला ब्लैकमेल करुन मला इतर लोकांच्या स्वाधीन करुन पैसा कमवला आणि मला हा रोग देवून गेला. माहित आहे. त्याला माहित होताच तो माझ्या जवळ भटकलाच नाही. काही विचारपूसही केली नाही त्यानं."
"काळजी करु नकोस. होईल सगळं बरोबर. बघ बरं अमृता तेवढ्या मोठ्या कँन्सरच्या तडाख्यातून निघाली. तू आशा ठेव थोडीशी. तूही बाहेर निघशील. निश्चींत राहा." रोमा म्हणाली.
"नाही निघणार. मी जरा उशीर केला तपासणी करायला. मी मरणारच आहे. मला माहित आहे. माझ्या शरीरात विषाणू जास्त झाले आहेत."
"काही ही बोलू नकोस आणि तू घाबरु नकोस. चिंता करु नकोस. विचारही करु नकोस जास्तचा. वेळच्यावेळ औषधी घेत राहा म्हणजे झालं."
रोमा बोलून गेली खरी. परंतू तिचं दुःख तिलाच झेलावं लागणार होतं. ते दुःख काही रोमा स्वतः दूर करणार नव्हती. मात्र ती थोडीफार सांत्वना देवू शकत होती.
एड्स.......एड्स हा संक्रमीत आजार होता. कोण्या पुरुषाशी संबंध बनवतांना रुमानीच्या शरीरात तो आला होता. कदाचीत तो रोग ज्या मुलाला असेल, त्याच मुलाशी रुमानीचा संबंध होताच तो रोग रुमानीला झाला होता.
अलीकडे मुलं मुली वयात येतात. वयात येताबरोबर त्यांना प्रेम करावंसं वाटतं. त्यांना प्रेम हवंहवंसं वाटत. ते प्रेमाला एवढं महत्व देतात की त्या प्रेमानंतर पुढील आयुष्यात कोणकोणत्या समस्या येतात. ते त्यांना माहित नसतं.
नुकत्याच वयात येणा-या मुलामुलींचं वय कोवळं असतं. त्यांना सुरुवातीच्या काळात प्रेमाचा अनुभवही नसतो. त्यातच प्रेमातून काय काय होवू शकतं हेही त्यांना माहित नसतं. म्हणूनच ते प्रेम करीत असतात. प्रेमातून उद्भवणा-या समस्या पुढीलप्रमाणे असू शकतात.
१) प्रेमातून आजार वाढीस लागणे.
वयात येणारी मुलंमुली प्रेम करि लागतात. त्यांना शरीरसंबंधांचं आकर्षण असतं. त्यातच ते संबंध बनवतात. परंतू या संबंधातून त्यांना माहित नसतं काय होतं ते. ते गंभीर आजाराचे शिकार होवू शकतात. जसे एच आय व्ही वा एड्स. कँन्सर वा कोरोना. विषमज्वर किंवा इतर संसर्गजन्य रोग.
२) अकाली शरीरसंबंधातून उद्भवणा-या समस्या.
मुलं मुली एकमेकांवर वयात येणा-या वयात प्रेम करतात. त्यातच ते आपलं वय परिपक्व होवू न देता, तसेच मायबापांचं न ऐकता विवाह करतात. त्यातच ते अशा अपरीपक्व वयात शरीरसंबंध करुन संतती पैदा करतात. परंतू यामध्ये त्यांचं वय हे परीपक्व नसल्यानं पुढे एकतर त्यांच्या संततीला समस्या निर्माण होतात वा त्यांना समस्या निर्माण होतात व ते गंभीर आजाराचे शिकार होवू शकतात. म्हणून मुलांनी तरुण अवश्य व्हावं. परंतू आपण तरुण झालो असं समजून प्रेम करु नये. थोडा विचार करावा.
३) मुलं वा मुलीचं स्वार्थप्रेम
वयात येणारी काही मुलं मुली हे प्रेम स्वार्थासाठीही करीत असतात. त्यांना एकमेकांशी विवाह करायचा नसतो. त्यांना फक्त प्रेम आपली हवस भागविण्यासाठी आवश्यक असतं. ते विवाहाचं आमीष तर देतात. परंतू ज्यावेळी अशी विवाहाची वेळ येते. तेव्हा ते स्पष्टपणे नकारच देत असतात. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मुलींना दिवस गेलेले असतात आणि मुलगा बेपत्ता झालेला असतो. असं मुलींच्या आयुष्यात बरेचदा घडते.
४) आपल्या मायबापाची बदनामी होते़ बदनामीतून मायबापाची आत्महत्या.
वयात येणा-या मुलांना सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मायबापाची बदनामी करु नये. कारण आपले मायबाप आपल्याला लहानाचे मोठे करतात. त्यांची इच्छा असते की मी माझ्या मुलीचा वा मुलाचा विवाह राजरोषपणे करुन देईल. परंतू तसं घडत नाही आपण जेव्हा पळून जातो तेव्हा. त्यातच त्यांना ते वाईट वाटतं. त्यांची बदनामीही होते व त्यातील काही तर बदनामीच्या धाकानं आत्महत्याही करतात.
५) आपल्या आत्महत्येला जबाबदार आपणच.
कधीकधी आपल्या आत्महत्येला आपणच जबाबदार असतो. कारण आपण वयात येताच जेव्हा प्रेम करु लागतो. तेव्हा आपल्याला माहित नसते की कोण कोणाला, केव्हा धोका देईल. परंतू आपल्याला धोका मिळत असतो कोण्या एका पक्षाकडून. मग काय आपल्याला तो प्रेमभंग सहन होत नाही. तोच पक्ष आपल्यासाठी सर्वस्व वाटू लागतो. जीवन जगावंसं वाटत नाही व त्यातूनच आपल्या आत्महत्या घडतात.
६) अकाली मुलं पैदा करणे.
आपण प्रेम करु लागतो वयात येत असतांना. मग आपण शरीरसंबंधही बनवतो. कोणत्याही प्रकारचा विचार न करता. त्यातच आपल्याला दिवस जातात. तो मात्र आमीष देत असतो विवाहाचं. अशातच दिवसं निघून जातात आणि असे दिवस निघून जातात की आपल्या पोटात असलेल्या बाळाचा गर्भपातही करता येत नाही. तो मात्र पळून जातो. अशावेळी आपल्यासमोर मोठा विचार उभा राहतो. काय करावं? शेवटी यावर काहीतरी उपाय काढला जातो. तो उपाय म्हणजे आपली दिलेवरी करणे व ते बाळ एकतर मारुन टाकणे स्वहाताने किंवा कोणाला दत्तक म्हणून दान देणे. आज बरीचशी बाळं कच-याच्या ढिगा-यावर अशीच दिसली आहेत. कुत्रे कुरतडत असलेली. त्या मातांना अशा गोष्टी कशा सहन होतात ते कळत नाही. कळतं, परंतू त्याची मजबुरी असते. म्हणूनच ती बाळं कच-याच्या ढिगा-यावर बेवारस पडलेली दिसतात कुत्री कुरतडतांना.
७)अशी मुलं पालन करण्याचा प्रश्न.
अशी मुलं जर पैदा झालीच आणि आपली त्याला मारुन टाकण्याची हिंमत झाली नाही आणि ती मुलं जर कोणी दत्तक घेतली नाही तर आपल्यापुढं मोठा बिकट प्रश्न निर्माण होत असतो. हा निर्माण झालेला प्रश्नही आपल्याला सोडवता येत नाही. तसेच त्या मुलांना राजरोषपणे वाढवताही येत नाही. शेवटी आपलं स्नतःचं मुल असतानाही व आपली इच्छा नसतांताही ते मुल अनाथालयांना दत्तक द्यावं लागतं.
८)मुलींना विवाहाचं आमीष दाखवून वा प्रेम करण्याचं नाटक करुन वेश्याव्यवसायाला लावणे.
मुले प्रेम करतात. चांगल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. परंतू काही मुलं अशीही असतात यातील की जी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना वेश्यालयात विकून टाकतात वा वेश्याव्यवसायाला लावत असतात जबरदस्तीनं. तेथून पुढे कधीच परत येता येत नाही.
महत्वाचं म्हणजे हा विषय मोठा गंभीर असून सध्या वयात येणा-या मुलामुलींना सांभाळण्याची गरज आहे. त्यांना जर सांभाळलं नाही तर त्या मुलामुलींच्या आयुष्यात वरील स्वरुपाच्या गंभीर समस्या उभ्या राहात असतात. अलीकडे तर मुलामुलींचे स्वभावच बदलले आहेत. ती मुलं मायबापांनाच अक्कल शिकवायला लागले आहेत. ती मुलं मायबापाचं मुळीच ऐकत नसून ती मुलं चक्कं 'तुला काय समजते यातील' असं म्हणत आईचं तोंड बंद करतात. अलीकडे स्मार्टफोनचा काळ आलेला असून मुलांना कसं रोखावं हा प्रश्न प्रत्येक मायबापांसमोर निर्माण झालेला आहे.
नीती नियमानुसार व निसर्ग चक्रानुसार मुलंमुली वयात येतात. परंतू मुलं मुली वयात आल्यानंतर ते ज्या दिशेनं पाऊल टाकतात. त्यातील फक्त एकच प्रतिशत पाऊल चांगलं पडतं. बाकी नव्यानव प्रतिशत पावलं ही धोक्याची असून ती पावलं धोक्याची घंटा देत असतात. म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मुलांनो, वयात आल्यावर अवश्य प्रेम करा. प्रेम करायला मनाई नाही. परंतू जरा हुशार होवून. कारण आपल्याला अनुभव नाही. बाहेेरचं जग हे एवढं वाईट आहे की त्या जगात आपला श्वास गुदमरतो. आपण जगत असतांना पदोपदी मरत असतो. म्हणून वयात अवश्य या. प्रेमही करा.परंतू सावधान राहून. तुमची सावधानता हेच तुमच्या चांगल्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
रुमानीचं अगदी तसंच झालं होतं. जार्जनं तिचा फायदा घेतला होता. तिच्यात शरीरसंबंधांचं आकर्षण निर्माण करुन त्यानं तिच्या शरीराचा फायदा घेतला होता. व्यतिरीक्त आपली हवस पुर्ण करता करता त्यानं तिच्या शरीराचा फासदा,इतरांनाही घ्यायला लावला होता. ज्यातून आज तिला एड्स सारखा महाभयंकर आजार झाला होता.
रुमानीतं वजन घटलं होतं. त्यातच आता ती पाहिजे तेवढी सशक्त नव्हती. ती आता बारीकही झाली होती, नव्हे तर आता तिच्यात हाडांचा साफळा राहिला होता.
रोमा आणि रोमाच्या समजावून सांगण्यावरुन अमृताही रुमानीला भेटायला जात असत. बाकी मुलं मात्र कोणीच तिकडं फिरकत नसत. तशी रोमा आपल्या महाविद्यालयात मुलामुलींना सांगायची. रुमानी आपली मैत्रीण आहे. तिला भेटायला जा. ती आता मरणाच्या दारातच आहे. त्यामुळं तिच्याच या सांगण्यावरुन आज महाविद्यालयीन मुलंही रुमानीला भेटायला जावू लागली. तिची विचारपूल करु लागली. ते पाहून रुमानीलाही अगदी हायसं वाटू लागलं होतं.
रुमानीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिला आता उभं राहणंही जमत नव्हतं. डॉक्टरांनी तर आशा सोडून दिल्या होत्या. जणू तिनं आता अंथरुणच पकडलं होतं.

***********************************************

एड्स......तोही एक आजारच आहे.
या आजारात आपली प्रतिकारशक्ती पुर्णतः हळूहळू नेस्तनाबूत होत असते. ह्या आजारात विषाणू हा आपल्या थेट पेशीविभाजनावरच हल्ला करीत असतो. त्यामुळं नवीन पेशी तयार होवू शकत नाहीत. त्यामुळं हळूहळू आपली प्रतिकारक क्षमता नष्ट होते. ही प्रतिकारक क्षमता नष्ट झाल्यानं आपल्या शरीरात इतर रोग जोर पकडत असतात. जसे सर्दी, खोकला वा इतर आजार. त्यामुळं हळूहळू व्यक्ती खंगत जावून शेवटी मरणाच्या दारात पोहोचतो व मरण पावतो. कारण हा रोग शरीरात असतांना इतर व्याधी शरीराला जडल्यास त्या आजारावर आपण विजयच मिळवू शकत नाही वा इतर आजारातून बरे होवू शकत नाही. त्यामुळं हा आजार जरी नसला तरी या आजाराला आजार मानावंच लागेल.
एड्स रोगाची प्राथमीक अवस्था म्हणजे एच आय व्ही. हा आजार एखाद्याला जरी झाला तरी तो आठ ते दहा वर्ष जीवंत राहू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त काळही तो जीवंत राहतो. या आजारात शरीरात आजाराचे कोणतेच लक्षण दिसत नाहीत.
एड्सला काही तज्ञ मंडळी आजार मानत नाहीत. परंतू हा आजार म्हणजे एक महामारीच आहे. हा आजार होण्याची मुख्यतः तीन कारणं आहेत. पहिलं म्हणजे असुरक्षीत संबंध करणे. असुरक्षीत संबंध म्हणजे सहवास करतांना निरोध न लावणे वा इतर प्रकारची सुरक्षा न वापरणे. दुसरं म्हणजे असुरक्षीत रक्तपुरवठा होणे. याचाच अर्थ असा की रोग्यांना रक्तपुरवठा करतांना सुया या पुर्णतः जंतूनाशक झालेल्या न वापरणे आणि तिसरं म्हणजे इंजेक्शन देतांना सुरक्षा न घेणे. म्हणजे डॉक्टर जर इंजेक्शन देत असेल तर नवी सुई प्रयोगात न आणता जुनीच सुई प्रयोगात आणून ती सुई पुर्णतः निर्जंतूक न करणे. यात जर ती सुई एखाद्या एड्सग्रस्त व्यक्तीला टोचली व तीच सुई निर्जंतूक व्यक्तीला टोचली तर त्यात लागलेले जंतू हे सुईद्वारा निरोगी माणसाच्या शरीरात आपोआपच प्रवेश करीत असतात. या तीन कारणांनी एड्स होत असतो. याशिवाय इतरही कारणं आहेत. जसे दाढी करतांना नवीन ब्लेड न वापरणे. यामध्ये जुनी ब्लेड वापरतांना एखाद्या एच आय व्ही ग्रस्त माणसाला ब्लेड लागून त्या ब्लेडवर लागलेले रक्त तसंच राहिल्यानं व तीच ब्लेड निर्जंतूक माणसाला लागल्यानं त्या ब्लेडवर रक्ताद्वारे लागलेले जंतू त्या माणसाच्या शरीरात जातात व त्याला एड्स हा रोग होतो.
हा रोग सर्वात प्रथम आफ्रीका खंडात झाला. तिथे विशेष प्रकारच्या माकडाला हा रोग झाला होता. त्या माकडापासून हा रोग आफ्रिकेमध्ये मनुष्यप्राण्यांमध्ये पसरला. त्यानंतर हा रोग पुर्ण जगात पसरला.
एड्स हा एच आय व्ही नावाचा विषाणू आहे. जो बारा आठवड्यात रक्ततपासणी केल्यास लक्षात येते. या रोगात सर्वप्रथम व्यक्तीची भूक मंदावत असते.
एड्सचा धोका जास्तीत जास्त नशेची इंजेक्शनं घेणा-या व्यक्तीत, वेश्यालयात जाणा-या व्यक्तीस, एच आय व्ही संक्रमीत माता पित्यांनी मुलं पैदा केल्यास त्या बाळास, विना तपासणी केलेले रक्त रक्तग्राहीने घेतल्यास अशा लोकांना जास्त असतो. या रोगात गळ्यात किंवा बाजूला गाठी येतात. ज्याला आपण ट्राँन्सील म्हणतो. कित्येक आठवडे हगवण लागते. कित्येक आठवडे खोकला असतो. वजन कमी होत जाते. तोंडात सतत छाले येत असतात. त्वचेवर सारखी खाजवत असते. अशी जर लक्षणं शरीरात किंवा एखाद्या व्यक्तीस दिसत असतील तर त्याची एच आय व्ही तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
काही लोकं म्हणतात की एड्स हा स्पर्शाने होतो. परंतू एड्स हा स्पर्शाने कधीच होत नाही. हा रोग एकतेर जेवन केल्यानेही होत नाही. एकाच माठातील पाणी पिल्याने होत नाही वा वापरल्याने होत नाही. एकच अंथरुण वापल्याने होत नाही. एकाच कम-यात राहिल्याने वा निवास केल्याने होत नाही. हात मिळविल्याने होत नाही. हस्तादोलन वा आलिंगण केल्याने होत नाही. एकच शौचालय वा स्नानघर वापरल्याने होत नाही. मुलांसोबत खेळल्याने होत नाही. तसेच हा रोग रोग डास चावल्याने वा इतर कोणतेही किटक चावल्याने होत नाही.
अलीकडे एड्स या रोगाला संक्रमीत आजार समजून लोकं एड्स झालेल्या रुग्णाला वाळीत टाकल्यासारखे पाहात असतात. ज्या घरी एड्स झालेला व्यक्ती असतो. त्या घराशी कोणीही संपर्क ठेवत नाहीत. परंतू ते चूक आहे. असे जर झाले तर ज्या घरी एड्स झालेला असेल. त्या घरात न्युनगंड निर्माण होवून त्या घरची इतर मंडळी त्यांना तो आजार होण्यापुर्वीच मानसिकतेनं मरण पावत असतात.
एड्सबाबत आणखी एक संभ्रम म्हणजे हा रोग असुरक्षीत संबंध बनविल्याने होते. त्यामुळे एड्स झालेल्या घराकडे वा रुग्णाकडे हीनतेच्या दृष्टीने पाहिल्या जाते. परंतू असे नाही. एड्स हा असुरक्षीत यौन संबंधाव्यतिरीक्त इतरही कारणांनी होतो. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून कोणीही एड्सबाबत आपल्या मनात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही वा आपल्या किंवा इतरांच्या विचारानं त्या व्यक्तीला वा परिवाराला वाळीत टाकण्याची गरज नाही. हं, वास्तविकता अशी आहे की एड्स ही महामारी आहे. परंतू घाबरण्याचे कारण नाही. कारण आपण मानव आहोत. ए्स जरी महामारी असली तरी आपल्याजवळ त्याही आजाराचा उपाय आहे. हे तेवढंच सत्य आपण मानायला हवं. महत्वाचं म्हणजे एड्स किंवा कोणताही आजार होवू नये यासाठी स्वतः खबरदारी घ्यावी. रोग आपल्याला शिवणार नाही आणि झालाच तर तो एक नशिबाचा भाग समजून त्याचेशी लढावं. औषधे उपचार नियमीत करावे. बाकी विधात्याच्या हातात सोडावं. पोटभर जेवावं आणि आनंदीत राहाव, सदैव. त्यानंतरच आपण कोणत्याही आजारावर मात करु शकतो. जर आपण तसं केलं नाही तर साधारण वाटणारा सर्दी, खोकलाही आपल्यासाठी जीवघेणा ठरु शकतो.

************************************************

रुमानी झोपूनच राहात असे. कारण तिला बरं वाटत नव्हतं. त्यातच तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्या प्रकृतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा दिसून येत नव्हती. तसेच ती प्रकृती सुधारण्याची उमेदही करता येत नव्हती.
अमृताचा कँन्सर वा रुमानीचा एड्स म्हणजे तरुणपणातील ती एक चूकच होती. ती चूक नजरचुकीने नाहीतर जाणूनबुजून केलेली चूकच होती.
ते तरुणपण. त्या तरुणपणात मुले कोणाचंच ऐकत नाहीत व आपल्या पायावर धोंडा घालतात. त्यांना कळत नाही की आमच्या मायबापानं तरुणपणातच किती पावसाळे उन्हाळे झेललेले आहे. तसेच आमच्या जेष्ठांनाही तरुणपणाबाबत दांडगा अनुभव आहे. त्यांचं ऐकायला हवं. त्यांचा सल्ला मानायला हवा. परंतू मुले जशी तरुण होतात. ते कोणाचं ऐकत नाहीत. ते आपल्याच मनानं वागतात आणि मग स्वमुलींशी विवाह केल्यासारख्या चुका करुन बसतात.
उदाहरण द्यायचं झाल्यास बादशहा शहाजहानचं देता येईल. म्हणतात की त्यानं आपली मुलगी जहाँआराशी विवाह केला होता. त्याचं कारण म्हणजे मुमताज. जहाँआरा ही मुमताजची दुसरी मुलगी असून ती हुबेहूब आपल्या आईसारखी म्हणजे मुमताजसारखीच दिसत होती. ती त्यावेळी सतरा वर्षाची होती.
शहाजहानचं मुमताजवर निरतिशय प्रेम होतं. ती मरण पावताच तो वेड्यासारखा झाला होता. ज्यावेळी निकाहवेळी काजीनं विचारलं की त्याचा मुलीशी होणारा विवाह हा बेकायदेशीर आहे. तेव्हा तो म्हणाला होता की आपण स्वतः लावलेल्या झाडाची फळं खात नाहीत का? त्यावर काजी काहीही न बोलता त्यांनी तो निकाह कायद्यात बसत नसतांनाही तो निकाह लावून दिला. यावेळी जहाँआरानंही विरोध केला नाही. कारण तिलाही तिच्या वडीलांची होत असलेली वेड्यागत अवस्था बघाविशी वाटत नव्हती.
शहाजहानला आठ पत्नी होत्या. मुमताजनंतर त्यानं पाच पत्नी केल्या होत्या. त्यात त्याची मुलगी व त्याची साळी फरजाना देखील होती. मुमताज महल शहाजहानच्या सेनेत असलेल्या सुभेदार शेरखानची पत्नी होती. परंतू ती सुंदर असल्याने व तिच्यावर शहाजहान मोहीत झाल्याने त्यानं शेरखानची हत्या केली व मुमताजला त्यानं आपली पत्नी बनवलं होतं.
ती एक चूकच होती शहाजहानची. ज्या गोष्टीचा इतिहास कधीच पुसला जावू शकत नाही. अशीच चूक आज तरुण मुलं करुन घेतात आणि मग जीवनभर पश्चाताप करीत असतात.
आजचं जग तसंच आहे. मुलं तरुण झाले आणि दोन पैसे कमावू लागले की त्यांना वाटते, आपण आपली जबाबदारी पेलवू शकतो. संसार करणं म्हणजे काही कसरत नाही. साधी भोळी पद्धत आहे. परंतू संसार करणं ही काही साधी भोळी पद्धत नाही. त्या वाटेवर मोठमोठे काटे असतात बोचणारे. जे काटे कधीच आपल्याला दिसत नाहीत. आजही आपण पाहतो की हे काटे कधी घटस्फोटाच्या रुपानं बोचतात तर कधी मुलीच्या पळून जाण्याच्या रुपानं. या संसारचक्रात कधी कधी पती असणा-या पुरुषांचं चुकतं तर कधी पत्नी असणा-या स्रीचं. पती असणारा पुरुष आपला पुरुषी हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्याची पत्नी ऐकत नसेल तर तो तिला यमसदनी पाठविण्यासही मागपुढं पाहात नाही घटस्फोट दूरच राहिला. तीच गोष्ट त्याची पत्नी असणारी स्री देखील करीत असते. तिही तो पती तिचं ऐकत नसेल आणि तिला हक्क जर गाजवता येत नसेल तर तिही त्याची हत्याच करीत असते. ही आजच्या काळातील वास्तविकता आहे.
आज काळच बदलला आहे. आजच्या काळात पतीला पुरुषपण गाजवता येत नाही. पुर्वीचा काळ गेला. पुर्वीच्या काळात पतीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पत्न्या वागत असत. त्या त्यांच्या शब्दांच्या बाहेर नसत. त्यामुळं घटस्फोटाचं प्रमाणंही अत्यल्प असे. परंतू आता काळ बदलला आहे. या बदलत्या काळानुसार स्रिया पाश्चात्यांचं अनुकरण करीत शिकत आहेत. नोकरीला लागून आत्मनिर्भर होत आहेत. त्यानुसार आपला जोडीदारही निवडत आहेत. असे असतांना एक पत्नी असलेल्या स्रीला वाटतं की मी कशाला ऐकू, पुरुषपणाचे लाड कशाला करु. त्यांचं ते बरोबर असतं. परंतू नोकरी करणारा व तिचा पती असणारा पुरुष ते ऐकेलच असे नाही. तेव्हा त्याचं ऐकत नाही ती. मग वादविवाद होतात. यातूनच एकमेकांचे घटस्फोट वा एकमेकांना संपविण्याचे प्रयत्न चालतात.
महत्वाचं म्हणजे आजचं तरुणपण. मुलमुली शिकत तर आहेत उच्च शिक्षण. त्यातच ते आपल्या मतानं विवाहही करीत आहेत. परंतू अशा संसारचक्रात वळणावरची पाऊलवाट चालत असतांना जर जेव्हा असा पुरुषपणाचा हक्क वा स्रीपणाचा अधिकार गाजवता येत नाही त्यांना. तेव्हा मात्र काटे बोचणारी इजा होते. हेच काटे असतात संसारचक्राचे. कदाचीत तरुणपणात विचार न करतांना मायबापाची अवज्ञा करुन वा आप्तांच्या मतानुसार विवाह केल्यास, निर्णय घेतल्यास ही वेळ येते. ही वेळ टाळता येत नाही. तसेच या वेळेतून एकमेकांची आत्महत्या, एकमेकांचे खुन, घटस्फोट, सारखी सततची भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतात. या गोष्टी होणे म्हणजे बोचणारी काटेच असतात. जर तोच विवाह आपल्या मायबापाच्या मतानुसार केला किंवा आप्तांच्या मतानुसार केला तर असे अतिप्रसंग वा काटे बोचत नाहीत. कारण असे प्रसंग उद्भवल्यास आपली वडीलधारी मंडळी ते सर्व प्रसंग सांभाळून घेत असतात. क्वचीत प्रसंगी घटस्फोट होईल. परंतू खुन, आत्महत्या टाळता येतात.
महत्वाचं म्हणजे विवाह करतांना किंवा तरुणपणातील विवाहाचे निर्णय घेतांना थोडाफार विचार करावा. कोणतीही शुल्लक वाटणारी चूक करु नये. कारण आपल्याला ती चूक शुल्लकशी वाटते. परंतू ती चूक शुल्लकशी नसते. तिच्यात फार मोठा अर्थ असतो. तीच शुल्लकशी चूक पुढे मोठी चूक बनते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. महत्वाचं म्हणजे तरुणपणात विवाहाचा निर्णय अवश्य घ्या. परंतू तो घेतांना इतरांचे मत अवश्य विचारात घ्या. ज्यातून तुमच्या पुढील आयुष्यात सांसरीक बाबतीत कोणतेच संकट उद्भवणार नाहीत आणि तुमची आत्महत्या वा तुमचा खुन होणार नाही. ही तरुणपणातील चूक तुमच्या आयुष्यात मोठी जखम बनू नये म्हणजे झालं.
आज अमृतानं आणि रुमानीनं केलेली तरुणपणातील चूक आज त्यांची सत्वपरिक्षा घेत होती. अमृताचा कँन्सर बरा होत चालला होता. परंतू रुमानीचा एड्स.......तो काही सुधरण्याची चिन्हं दिसत नव्हती. मात्र रोमा नित्यनेमानं तिला भेट देत असे.
ते हिवाळ्याचे दिवस होते. यावर्षी रुमानीचे मायबाप चिंतेत होते. रुमानी रात्रभर तळपत होती. तिला आता होश नव्हताच. तिनं आता अन्नपाणी सोडलं होतं. आता ती वाचणार नाहीच असं वाटत होतं. तशी रुमानीची आई तिला फळांचा ज्युस चमचनं पाजून देत असे. परंतू त्या तेवढ्याशा ज्युसनं तिचं पोट भरत जरी नसलं तरी ती तेवढंही ज्युस पीत नव्हती.
तसा तो दिवस उजळला. आज रुमानीची आई सकाळीच उठली होती. तिनं रुमानीचंं अंथरुण स्वच्छ केलं होतं. त्यातच आज रुमानी अचानक बळ लावून उठून बसली होती. असं वाटत होतं तिला पाहून की ती आता सुधारणार. परंतू थोड्याच वेळाचा अवकाश. रुमानी अंथरुणात झोपली. तिनं इकडंतिकडं पाहिलं व क्षणार्धात डोळे फिरवले व डोळ्याची पाती लनते न लवते. तोच तिनं आपल्या हातपायाची हालचाल केली व क्षणार्धात गतप्राण झाली.
रुमानी मरण पावली होती. तसं तिच्या आईला माहित होताच तिनंही हंबरडा फोडला होता. थोड्याच वेळात रोमा व अमृताही तिथे आल्या. त्याही आपल्या मैत्रीणीजवळ बसून रडू लागल्या. एकंदरीत पुर्ण वातावरण अश्रूनं भरुन गेलं होतं.
ते अश्रूचे लोट थांबता थांबत नव्हते. कारण ती तरुण मुलगी होती. उपवर असलेली. तिचं वय झालं होतं विवाहाचं. परंतू अद्यापही विवाह झाला नव्हता. ज्या वयात विवाह व्हायला पाहिजे होता. त्या वयात तिनं केवळ आणि केवळ यातना आणि वेदना शोषल्या होत्या.
काही वेळातच रुमानीची प्रेतयात्रा निघाली. ती स्मशानात गेली. ते प्रेत स्मशानात मातीच्या स्वाधीन झालं. तशी दुस-या दिवशी तिची राख पाण्यात गेली. ती गेली, संपली, सगळं काही झालं तिचं. परंतू तिच्या आठवणी आजही रोमाला येत होत्या.
रुमानी संपली होती. त्या त्रिकुटातील एकजण आज या जगातून निघून गेली होती. आता दोघ्याच जणी वाचल्या होत्या.
अमृता कँन्सरपासून पुर्णतः बरी झाली होती. ती आता पुर्णपणे स्वस्थ होती. तिला ती सुधरण्याचा आनंद होता. परंतू एक दुःख होतं ते म्हणजे तिची मैत्रीण रोमा गेल्याचं.
अमृता सुधरली होती. परंतू तिची शरीरयष्टी पुर्णतः बिघडली होती. ती सुकल्या काडीसारखी दिसत होती. तिला सुधारायला कितीतरी पैसा लागला होता.
तिचा ज्याप्रमाणे कँन्सर बरा झाला होता. तशा तिच्या सवयीतही सुधारणा झाली होती. आता ती कधीही पिज्जा, बर्गर खात नसे. ना ती आता प्लॉस्टीक पिशवीतील पदार्थ खात असे. ना कधी कच्चे मांस ना ही कधी कोल्ड्रींक सारखे शीतपेय पीत असे. आता तिचा पोशाखही बदलला होता. ती आता घट्ट कपडे घालत नसे. तसेच अर्धनग्न अंगप्रदर्शन करणारे कपडे तिनं केव्हाच बदलवले होते. हा तिच्यात बदल केवळ रोमानं केला होता नव्हे तर करवून घेतला होता. आज तिला भारतीय संस्कृती पुर्णतः समजली होती नव्हे तर ती आता भारतीय संस्कृतीप्रमाणे वागत होती. ती आता वडीलधारी मंडळींच्या आज्ञेत वागत होती नव्हे तर आता तिनं विदेशही सोडायचं निश्चीत केलं होतं.
ते शेवटचं वर्ष होतं त्यांचं शिक्षणाचं. त्या शेवटच्या वर्षी अतिशय अभ्यास करीत होत्या त्या दोघीही. कारण या वर्षीच्या टक्केवारीनुसार त्यांचं करीअर बनणार होतं. तशी परिक्षा झाली. निकाल लागला. रोमाला कमी टक्केवारी मिळाली व अमृताला जास्त टक्केवारी होती. तसं महाविद्यालयात कँम्प आलं आणि कँम्पमध्ये अमृताची निवड झाली नोकरीसाठी.
अमृताची जशी निवड झाली. तसा अमृताचा इंटरव्यू घेतला गेला. इंटरव्यूत तिनं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली व नंतर तिला वेतनाविषयी विचारण्यात आलं की किती वेतन घेणार. परंतू ती म्हणाली,
"मला माझ्या देशातच नोकरी करायची आहे."
"का? तिथं वेतन कमी मिळतं. इथे जास्त आहे."
"नको मला जास्त वेतन. मला शालीन संस्कृती हवी. जी शालीन संस्कृती भारतात म्हणजे माझ्या देशात आहे. तिथं अंगप्रदर्शन नाही. कच्चं मांस खाल्लं जात नाही. कोल्ड्रींक्स प्राशन केलं जात नाही. प्लॉस्टीकचा वापर केला जात नाही. एवढंच नाही तर आमच्या भारतातील मुलं पिज्जा, बर्गर कमी प्रमाणात खातात. म्हणूनच तिथं कँन्सरचं प्रमाण कमी आहे. एड्सचं प्रमाणही अत्यल्प आहे. एवढंच नाही तर कोरोनासारखे आजारही आमच्या देशात पाय पसरत नाहीत. विशेष म्हणजे मी या देशात येवून या देशातील संस्कृतीच्या नादाला लागून माझ्या या देशातील मित्रमंडळींच्या रहनसहनाने मी राहण्याचा प्रयत्न केला. तरुणपणात ज्या गोष्टी मी करायला हव्या नव्हत्या, त्या गोष्टी मी केल्या. त्याचे परिणामही भोगले आहे मी. कदाचीत मला माझी मैत्रीण रोमा....... ती जर सोबतीला नसती तर मी आज तुमच्यासमोर जीवंत दिसली नसती.
मला जायचं आहे माझ्या देशात. माझ्या देशातील तरुणांना धडे द्यायचे आहे की विदेशी संस्कृतीचा अट्टाहास सोडा. आपलीच संस्कृती चांगली आहे. सुजलाम सुफलाम आहे आणि आरोग्यपुर्ण. येथील संस्कृतीसारखी गलिच्छ नाही. तिथं पुर्ण मिष्ठान्न भाजून वा शिजवून तयार करतात आणि इथे कच्चेच खाल्ले जातात मिष्ठान्न. हाच फरक आहे येथील संस्कृतीत आणि आमच्यात. परंतू येथील संस्कृतीचं येथील संस्कृतीलायक बरोबर आहे. आमच्या संस्कृतीचं आमच्या संस्कृतीलायक बरोबर आहे. परंतू आज आमच्याही देशातील लोकं येथील संस्कृतीनुसार वागतात. ज्यातून गंभीर आजार आज आमच्या भारतातही होत आहेत. मला तेच करायचे आहे भारतात जावून. माझ्या भारतीयांना हेच समजावून सांगायचे आहे आणि विदेशी संस्कृतीच्या हव्यासापासून परावृत्त करायचे आहे. जेणेकरुन त्यांचं आरोग्य चांगलं सुदृढ होईल.
हं, तुम्हाला घ्यायचंच असेल तर माझी मैत्रीण रोमाला घ्या. तिच या जागेसाठी योग्य आहे. कारण मला त्याच मुलीनं कँन्सरपासून वाचवलं. ती जर नसती तर आज मी इथेही नसते."
ती इंटरव्यू.........त्या इंटरव्यूत अमृता बोलून गेली खरी. त्या इंटरव्यूतील सर्व इंटरव्यूकर्ते भारावून गेले होते. ते प्रसंशा करीत होते तिची. त्यातच तिनं सांगीतल्यानुसार रोमाचीही.
इंटरव्यू संपला होता. तशी ती बाहेर आली. तिची वाट रोमा पाहात होती. क्षणातच ती म्हणाली,
"कसा झाला इंटरव्ह्यू ?"
अमृता काहीच बोलली नाही. तसं थोड्या वेळातच तिच्या नावाचा पुकारा झाला. ती आत गेली. तसा मैनेजर म्हणाला,
"काय नाव आपलं?"
"रोमा."
"आपण आमच्या प्रोजेक्टसाठी सिलेक्ट झाला आहात. आपण उद्यापासून वा आपल्याला सवड भेटेल तेव्हापासून आमची कंपनी जाईंड करा."
रोमानं ते ऐकलं. तिला काहीच कळत नव्हतं की विणा इंटरव्ह्यूनं तिची निवड झालीच कशी. ती आश्चर्य करीतच त्या इंटरव्ह्यूमधून बाहेर पडली होती.
रोमा बाहेर आली होती. ती अमृताला भेटली. तसं तिनं इंटरव्ह्यूबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. परंतू अमृतानं तिला सांगीतलं नाही की ती तिच्याबद्दल रास्त गोष्टी बोलून गेलेली आहे. तसा दोघांनीही एकमेकींचा निरोप घेतला.
आज रोमा आपल्याच देशात एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर विराजमान झाली होती. तिनं आपल्या प्रयासानं कंपनीला उच्चस्तरावर पोहोचवलं होतं. तशीच अमृताही आपल्या देशात पोहोचली होती. कँन्सरवर तिनं मात केली होती. तिनं आपल्या आयुष्यात नोकरी केली नाही. तर आपल्या देशाचा गौरव वाढविण्यासाठी देशसेवा केली. तिनं कित्येक लोकांना कँन्सरपासून भयमुक्त केलं होतं नव्हे तर निःशुल्क कँन्सरवर उपचार करणारं रुग्णालय काढलं होतं. आज ती त्याच रुग्णालयात सेवा देत होती.
अमृताचं हे कार्य पाहताच देशानं तिचा गौरव केला होता. तिला देशातील एक मोठा पुरस्कार प्रदान केला होता. तो पुरस्कार स्विकारतांना तिचे डोळे भरुन आले होते.
रोमा आणि अमृता चांगल्या जीवलग मैत्रीणी बनल्या होत्या. त्या नेहमी फोनवर बोलत होत्या. कधीकधी रोमा आपल्या देशातून अमृताला भेटायला येत असे. कधी अमृताला रोमाला भेटायला तिच्या देशात जात असे. त्यातच त्या एकमेकींना भेटतांना त्या जुन्या महाविद्यालयातील आठवणी काढत असत. त्यातच त्यांना रुमानीचीही आठवण येत असे व अमृता स्वतः म्हणत असे की काश! तरुणपणात मी आणि रुमानीनं ती चूक केली नसती तर.........तर आज मिही सशक्त असती आणि रुमानीही आज जीवंत असती. तिचं ते बरोबर होतं. कारण त्याच तरुणपणातील अल्लड वागण्यानं अमृताला कँन्सर व रुमानीला एड्स झाला होता. तसंच त्या शिक्षणाच्या वयात आणि त्या उमेदीच्या काळात रुमानी एड्सनं या जगाचा निरोप घेवून चालती झाली होती.
आज रुमानी जगात नव्हती. परंतू तिची आठवण जगात होती. ती अमृता आणि रोमाच्या ह्रृदयात होती. ते महाविद्यालयही विसरलं होतं रुमानीला काळाच्या ओघात. परंतू रोमा आणि अमृता तिला विसरल्या नव्हत्या. कारण ती त्यांची बेस्ट फ्रेंड होती. ती बेस्ट फ्रेंड आज त्या तरुणपणातील चुकांनी हिरावून घेतली होती.
महत्वाचं म्हणजे आज शिक्षणाचं वय.........आज शिक्षणाचं वय. या वयात मायबाप मुलांच्या भविष्यासाठी व त्यांना घडविण्यासाठी त्यांना शहरात शिक्षणासाठी टाकतात. तिथे ती मुलं एकटी राहतात. त्यांच्यावर कोणाचं लक्ष नसतं. मायबाप कधी कधी मोबाईलद्वारे संवाद साधतात. त्यांना प्रत्यक्ष पाहायला जात नाही. ते काय खातात, काय पितात, कोणासोबत फिरतात की घरीच राहतात. या गोष्टीचीही शहानिशा होत नाही.
मुले मोठी झाली की ती महाविद्यालयात जातात. त्यातच त्यांना सांसरीक आणि जागतीक अनुभव नसल्यानं ती मुलं महाविद्यालयात हवालदील झाल्यागत वागतात. ती कोणाच्या तरी प्रेमात पडतात. ती ज्यांच्या प्रेमात पडतात. ती व्यक्ती कशी आहे? कशी नाही? याची साधी शहानिशाही करीत नाही. त्यातच ती मुलं फसतात. ती एवढी फसतात की त्यातून कँन्सरसारखे आणि एड्स होण्यासारखे धोके निर्माण होतात. कधीकधी ती व्यक्ती वेश्यावस्तीशी संबंध ठेवतात. त्यातच त्या व्यक्ती सुंदर मुलींना वेश्यावस्तीतही जबरदस्तीनं विकायला मागंपुढं पाहात नाहीत.
महत्वाचं म्हणजे मायबापापासून दूर असणारी ही मुलं कधी कधी नशेच्या आहारीही जातात. या मुलांना जेव्हा मायबाप भेटायला जातात. तेही त्यांना फोन करुनच. त्यावेळी ते मायबाप भेटायला येत आहेत. असं समजून मुलं सावधान होतात. परंतू ते परत गेले की त्यांचं नेहमीचं कार्य पुन्हा सुरु होते. त्यातूनच मोठमोठे संभाव्य धोके या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात येतात. तेव्हा या मुलींना वा मुलांना कसं दूर ठेवावं हा विचार मायबापांना येतो.
मायबाप हे मुलांचं भविष्य पाहात असतात. तसं भविष्य पाहात असतांना मुलं कशी वागतात कशी नाही याची चिंता मायबापांना असते. परंतू त्यांना मुलांवर विश्वास ठेवून त्यांच्या भविष्यासाठी त्यांना आपल्यापासून दूरच ठेवावे लागते. त्यातच अशा मुलांवर कोणतंच बंधन नसल्यानं ती मुलं आपली स्वतःची संस्कृती बिघडविल्यासारखी वागत असतात.
आज स्पर्धेचा काळ आहे. अशावेळी मुलं स्पर्धेत टिकावी म्हणून मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी ठेवावं लागतं. परंतू त्यात मुलांचं भवितव्य जर खराब होत असेल वा ती मुलं आपलं स्वतःचं भवितव्य जर खराब करीत असतील तर त्याला दोषी तीच मुलं असतात. ते त्यांनी स्वतः समजून घ्यायला हवं.
महत्वाचं म्हणजे मुलांनी स्वतः समजून घ्यायला हवं की आपल्या मायबापानं आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला बाहेरगावी शिक्षणासाठी टाकलेलं आहे. त्यामुळं त्यांनी उमगून वागायला हवं. असं वागतांना एक एक पाऊूल फुकून टाकायला हवं. जेणेकरुन त्यांचं स्वतःचं भवितव्य खराब होणार नाही. कारण तेच वय त्यांच्या उमेदीचं वय असतं. ते वय पुन्हा कधीच परत येत नाही. मौजमस्तीसाठी तर अख्खं जीवनच पडलेलं असतं.
कधीकधी मुलं नोकरी निमित्यानं बाहेरगावी जातात. भरपूर पैसाही येत असतो त्या काळात. पैशाची काही कमी नसते. या पैशाचा उपयोग त्यांनी रास्त गोष्टीसाठी करणे गरजेचे असते. परंतू मुलं त्या पैशाचा उपयोग रास्त गोष्टीसाठी न करता वाईट गोष्टीसाठी त्या पैशाचा वापर करीत असतात. तेही काही बरोबर ठरत नाही. कारण त्यातूनही मुलं फसतात. करीअर उध्वस्त होतं. उदाहरण द्यायचं झाल्यास एका तरुणाचं देतो.
एक तरुण सरकारी नोकरीवर होता. त्याला भरपूर वेतन मिळत होतं. अशातच तो एका मुलीच्या प्रेमात पडला. जी एक वेश्या होती. तिनं त्याचे,अश्लील फोटो काढले व आता ती त्याला ब्लैकमेल करुन पैसा कमवीत होती. पुढं त्याचा त्या ब्लैकमेल पणानं विवाहही होवू शकला नाही. कारण त्याला त्याची नोकरी जाण्याची भिती होती. शिवाय वेतनाचा पैसाही त्याला पुरत नव्हता. कारण तो सर्व पैसा तिलाच द्यावा लागत होता. जीवनभर त्याला तसं राहतांना नाकीनव येत होतं. कधी आत्महत्याही कराविशी वाटत असे. परंतू मायबापाचा विचार होता त्यांना आणि त्यालाही हिंमत लागत होती.
हीच वास्तविकता आहे आजची. तेव्हा मुलांना मायबाप त्यांच्या करीअरसाठी आपल्यापासून दूर ठेवतात. त्यांनाही वाटते की आपल्या मुलांचं भविष्य चांगलं बनावं. परंतू नादान नुकत्याच वयात येणा-या मुलांना कोण सांगेल. त्यांना जीवनाचा अनुभव नसतो. तो अनुभव तेव्हाच येतो त्यांना, जेव्हा ती चांगली फसतात. ज्यातून ती बाहेर निघू शकत नाहीत. तेव्हा मात्र ती वेळ निघून गेलेली असते.
महत्वाचं म्हणजे मुलांनी मायबापाचा विचार करावा व उत्तमप्रकारे वागावं. कोणाच्याही दबावात येवून वा त्यांच्या चापलूस गोष्टीच्या नादी लागून आपलं करीअर खराब करु नये. कारण आपण जरी चांगले असलो तरी आपलं वाईट करणारे भुंगे आजुबाजुला भटकत असतात. ते आपलं केव्हा केव्हा वाईट होते त्याची वाट पाहातच असतात.
विशेष म्हणजे आपण आपलं करीअर पाहावं. आपलं भविष्य पाहावं. मायबापानं आपल्याला आपल्यापासून दूर ठेवलं शिक्षणासाठी. तसेच आता आपल्यावर मायबापाचं लक्ष नाही, म्हणून आपण काहीही करु नये. त्यानं आपलंच नुकसान होतं. तेव्हा आपलं नुकसान होवू नये म्हणून आपण स्वतः त्याचा विचार करुन आपण स्वतः जरी एकटे राहात असलो तरी चांगलं वागावं. आपलं चांगलं वागणं वा वाईट वागणं हे आपल्या मायबापाला वा आपल्या इतर आप्तांना वा कोणाला दिसत नाहीत. ते आपल्यालाच दिसतं. त्यामुळं आपण जर चांगले वागलो, तर भविष्य आपलंच चांगलं बनतं. इतरांचं नाही. याचा आपणच विचार करावा. परंतू आपण याचा विचार करीत नसल्यानं आपलंच नुकसान होतं. महत्वाचं म्हणजे आपण स्वतः आपल्या स्वतःच्या आयुष्याचे व भवितव्याचे मालक असून आपलं स्वतःचं आयुष्य आपण उत्तम बनवावं म्हणजे झालं. असं जर बनवता येत नसेल तर आपला जीवंत राहून काही उपयोग नाही. जन्म घेवूनही काही उपयोग नाही. उगाचंच आपलं आयुष्य खराब करुन मायबापांना त्रास देवू नये म्हणजे झालं.
आज रुमानीचं तेच झालं होतं. ती अकाली मरण पावली होती. तिचे व्यसन काही तिची आई पाहायला येत नव्हती. परंतू तिच्या वाईट वागण्यानं तिला हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. त्या हालअपेष्टा तिला भोगायला भाग पाडलं विधात्यानं. परंतू ती तरीही वाचली नाही या धरणीवर. ती जगातून निघून गेली. परंतू पुत्रीविरहाचा त्रास तिच्या मायबापांना झाला. तो एवढा झाला की ती मुलगी एकुलती एक असल्यानं तिचे मायबाप अक्षरशः वेडे झाले होते.
अमृताही मायबापापासून दूरच होती. तिच्यावर तर मायबापाचं लक्षच नव्हतं. त्यातच तसं लक्ष नसल्यानं व कोणाचं बंधन नसल्यानं अमृता बिघडत गेली. त्याचा परिणाम तिलाही भोगावाच लागला. त्याचा त्रास तिच्याही मायबापाला झाला. तिचंही आयुष्य संपता संपता वाचलं होतं.
आज दिपक निवृत्त झाला होता शिक्षणाधिकारी पदावरुन. त्यानं अर्ध्या आयुष्यातून का होईना, बोध घेतला होता. त्यानं भ्रष्टाचार करणं बंद केलं होतं. तसा तो सुधरला होता. तसा त्याचाही आयुष्याचा काळ चांगला गेला होता. त्याचा परिवार सुखी झाला होता. त्याच्या त्या चांगल्या वागण्साबरोबरच त्याची मुलगी अमृताही आज अगदी ठणठणीत बरी झाली होती. आज तीच अमृता जगातील कित्येक कँन्सरपिडीत लोकांची धात्री बनली होती. तिच्या उत्तम मार्गदर्शनातून कित्येक कँन्सरपिडीत लोकं दुरुस्त झाले होते नव्हे तर ते तिचे उपकारच मानत होते. तिचे कार्य आज उत्तमपद्धतीनं सुरु होते. त्याचं कारण होतं तिचं जीवन. तिच्या जगण्यातून ते सगळं साकार झालं होतं. जणू विधात्यानं तिला कँन्सरपिडीतांसाठी कार्य करण्यासाठी जणू जीवंत ठेवलं होतं.

************************************************************************************************