आय ए एस अधिकारी Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आय ए एस अधिकारी

मनोगत
 
आय ए एस अधिकारी नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत असून ही माझी साहित्यविश्वातील एकाहत्तरावी पुस्तक आहे.
या पुस्तकातील कथानक थोडक्यात असं. अरुण नावाचा एक मुलगा. परिस्थितीनं मारलेला. त्याचे वडील गुराखी. ते मरण पावताच तो शहरात येतो. फुटपाथवर राहतो. त्यातच त्याचं वय होतं व त्याला शाळेत घेतलं जात नाही. परंतू जसं वय वाढतं. तसा सरकारचा सर्वे होतो, शाळाबाह्य विद्यार्थी शोधा. त्याच चक्करमध्ये शोधलं जातं अरुणला. अरुण शाळाबाह्य असतो.
अरुण आय ए एस अधिकारी बनतो. परंतू तो आय ए एस अधिकारी कसा बनतो? काय काय करतो? आय ए एस अधिकारी बनण्यासाठी? त्याचं स्वप्न कोणतं असत? त्याची स्वप्न साकार होतात का? तो काय काय करतो? त्याला आय ए एस अधिकारी बनविण्यात कोण कोण मदत करतो? इत्यादी प्रश्न अनुत्तरीतच आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं यात आहेत.
ही कादंबरी मी तमाम माझ्या वृद्ध असलेल्या मातापित्यांना व पुर्वजांना वाहण्यासाठी लिहिलेली असून या पुस्तकाच्या माध्यमातून एक बोधही दिलेला आहे. तो बोध कोणता? ते आपण शोधावं. बोध घ्यावा. तसेच नसेल तो बोध घेता येत तर फक्त आनंद मिळविण्यासाठी तरी ही पुस्तक वाचावी ही विनंती. तसेच ही पुस्तक वाचून झाल्यावर एक फोन अवश्य करावा. ही देखील विनंती.
 
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०
 
आय ए एस अधिकारी (कादंबरी)
 
ते पावसाळ्याचे दिवस होते. हिरासींग त्या पावसात भिजला होता. त्याला त्या पावसानं भिजल्यानंं अतिशय थंडी वाटत होती. अचानक पाऊस आल्यानं तो भिजला होता. तो गरीब असल्यानं त्याचेजवळ छत्रीही नव्हती. तसा पाऊस आला की तो दररोजच ओला होत असे.
तो दररोज गुरं चारायला जात असे. आजही तो गुरं चारायला गेला होता गावातील गुरं घेवून. तो लहानपणापासूनच गुरं चारण्याची कामं करीत असे. तोच त्याचा व्यवसाय होता नव्हे तर ते उदरनिर्वाहाचं साधन. त्याच्या मुलाचं नाव अरुण होतं.
सायंकाळ झाली होती. तसा तो दिवसभर थंडीत कुडकुडत होता. ती थंडी, तो पाऊस आणि तो थंड वारा झेलत हिरासींग आपले दिवस कसेबसे काढत होता.
सायंकाळ झाली होती, तसा तो रानातील ती गुरं घेवून घरी परतला. त्यातच तो घरी येताच लवकरच हातपाय धुवून तो आपल्या पत्नीच्या चुलीजवळ जावून बसला.
ते पावसाळ्याचे दिवस. त्यातच त्या पावसाळ्यात भिजलेलं ते इंधन. ते इंधन चुलीत लावल्यावर तिथं चूल पेटत नव्हती. केवळ धुळच निघत होता. परंतू ती त्याला लागत असलेली थंडी. ती थंडी एवढी जीवघेणी वाटत होती की आता चुलीजवळ बसल्यावर थोडं हायसं वाटत होतं. तसा हिरासींग फुंकणीनं चूल फुंकत होता.
तो त्या चुलीतून धूर जरी निघत असला तरी फुंकणीनं फुंकल्यावर जरासा विस्तव दिसत असे. तसेच त्या चुलीवरील अन्नाला विस्तवाचा आधार मिळताच ते अन्नही शिजत असे. आज असे दिवस काढत काढत तो आपले दिवस कंठत गेला.
ते पावसाचे दिवस. त्यातच तो पाऊस सतत पडत असल्यानं त्या कौलातून ते कौलं तुडवीत तो पाऊस हळूच आत यायचा आणि तो सर्वदूर पसरायचा. त्याच्या घराच्या वरच्या भागातून आतमध्ये येत असतांना संपुर्ण वाकळा (अंथरुण) ओल्या व्हायच्या. त्यावेळी हिरासींग आपल्या प्रारब्धावरच रडत असे मनातल्या मनात. कारण त्याचेवर जबाबदारी होती परिवाराची.
हिरासींग निरक्षर होता. त्याला एकही रुपया खर्च कसा करायचा ते कळत नसे. तो गुरं चारायचा. तसं त्याला त्याच्या निरक्षरपणानं किती त्रास होत होता हे त्यालाच ठाऊक होतं. त्यामुळं त्याला वाटत होतं की आपण काहीही करावं. परंतू आपण आपल्या मुलाला शिकवावं. जेणेकरुन आपल्याला निरक्षरपणाचा त्रास होणार नाही. तसंच आपण घर बांधावं हेही त्यानं आपल्या मनात ठरवून टाकलं होतं.
घर बांधणं सोपंं काम नव्हतं. त्यासाठी लागणारं इंधन पुष्कळ महाग होता. ते मट्रेलच केवळ महाग होतं असं नाही तर मजुरी देखील महागच होती. त्यामुळं तो कसा घर बांधेल. तो प्रश्नच होता त्याच्या मनात. परंतू ते शक्य नव्हतं. कारण ज्या पावसाळ्यात तो आपल्या घरावरील गळणारं छत सुधरवू शकत नव्हता. तोच माणूस कसा काय घर बांधू शकेल हाही एक प्रश्नच होता.
आपलं घर. आपल्या घराला कोणी वाईट म्हणत असतं. मी वाईट म्हणतांना पाहिलं आहे. कोणी म्हणतात की प्रत्येकाला दुस-याचा पती, दुस-याची पत्नी, दुस-याची मालमत्ता, दुस-याच्या घरचं जेवन, तसेच दुस-याची इमारत ह्या गोष्टी आपल्याला आवडतात. आपली पत्नी किंवा आपला पती कितीही चांगला असला तरी तो आपल्याला आवडत नाही. आपली इमारत कितीही चांगली असली तरी ती आपल्याला आवडत नाही तसंच आपल्या घरचं रोज चांगलं बनणारं जेवन कितीही चांगलं असलं तरी ते आपल्याला आवडत नाही.
आपण दुस-याच्या पतीला वा पत्नीला चांगलं म्हणत असतो आणि आपल्या घरच्या पती वा पत्नीला वाईट म्हणत असतो. जर आपण आपल्या घरच्या पत्नीला वाईट म्हटलं तर त्यामुळंं बराच मोठा फरक पडत असतो. त्यामुळं आपल्या घरची लक्ष्मी निराश होत असते. घरी पैसा येणं बंद होतं. कारण आपली पत्नी ही साक्षात लक्ष्मीचं रुप आहे आणि जर पतीला वाईट म्हटलं तर तो पती सतत वाईट म्हणत असल्यानं पुढे जावून वाईटच संगतीत लागतो. त्यामुळं त्याला दारु, जुगार, सट्टा, अफू, गांजा, चरस यांची सवय जडते. मग तो वाममार्गाला लागतो.
समजा स्रियांना नटणं आवडतं आणि अशावेळी त्या नटणा-या महिलेला जर म्हटलं की मोठा चांगलाच दिसते तुझा अवतार तर तिचा जमदग्नी अवतार झाल्याशिवाय राहात नाही. जमदग्नी याचा अर्थ अति राग येणे असा होतो. असं काही म्हटल्यास तिला ते आवडत नाही. ती आपली अशी खरडपट्टी काढते की आपण पुन्हा बोलण्याच्या तालातच राहात नाही. तिला तसं वाटतं. तीच गोष्ट घराबाबत आहे. घराबाबत सांगायचं झाल्यास आपलं घर......मग ते कितीही चांगलं असलं तरी त्याला चांगले म्हणणारे लोक अलीकडे दिसत नाहीत. ते दुस-याच्या घराला चांगलं म्हणतात. परंतू तसं म्हणणं चुकीचं आहे. कारण त्या आपल्या तसे म्हणण्यानं आपलं घर निराश होत असतं. ते पदोपदी शाप देत असतं. त्यामुळं आपल्या घरात आनंद दिसत नाही. आनंद राहात नाही. नेहमी चिडचीडतेची भावना वाढीस लागते. त्यातूनच कलह, सततची भांडणं उद्भवत असतात.
आपलं घर.......आपलं घर स्वर्गाहूनही सुंदर असतं. त्याला दोष देवू नये. ज्याप्रमाणे आपण आपल्या पत्नीला चांगले न म्हणता दुस-याच्या पत्नीला चांगले म्हटले तर तिला राग येतो. तसंच घराचंही आहे. आपण दुस-याच्या घराला चांगलं म्हटल्यास आपल्याही घराला राग येत असतो. तेच जेवणाबाबत आहे. म्हणतात की जेवन बनवितांना चांगलं मन ठेवून जेवन बनवावं. कारण त्यांचे भाव त्या जेवनात उतरतात. त्यामुळं जेवन अतीशय रुचकर लागत असतं. जर ते जेवन बनवितांना जेवन बनविणारा व्यक्ती आजारी असेल तर जेवन करणारेही व्यक्ती आजारी होवू शकतात हा निसर्गनियम नाही. ते शास्रीय कारण आहे. काही काही संसर्गजन्य रोगाचे जंतू ते जेवन बनवीत असतांना जेवणातून दुस-याच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. यातूनच असं सांगता येईल की जर जेवन बनविणारा व्यक्ती जर वेदना भोगणारा असेल, तर त्या वेदनेचे भावही जेवन बनवितांना त्या जेवनात उतरत असतात. म्हणूनच कधी कधी विवाहसमारंभातील जेवन सर्वच प्रकारचे मसाले टाकूनही सुग्रास व सात्वीक बनत नाही. कारण कधीकधी ते जेवन बनविणा-या व्यक्तीचं भांडण घरी वा इतर कोणाशी झालेलं असतं ही शक्यता नाकारता येत नाही. हाच वेदनादायी नियम लावून घरची लक्ष्मी समजणारी स्री जर रजस्वाला असेल, तर तिला काही ठिकाणी स्वयंपाक करु देत नाही. कारण रजस्व अवस्थेत तिला पिडा होत असते. ती वेदना जेवन बनवितांना त्या जेवनात उतरुन ते जेवन सुग्रास होण्याऐवजी ते जेवन विषाक्त होण्याची शक्यता असते. याच अनुषंगानं असंही मानलं जातं की गरोदरपणातही महिलांना जेवन बनवायला लावू नये किंवा जड कामे करायला लावू नये. कारण त्याचा परिणाम जेवनावर तर होतोच. प्रसंगी तिच्या पोटातील बाळावरही होतो. कारण जेव्हा एखादी महिला गरोदर असते. तेव्हा तिला गरोदर असतांना अतिशय वेदना होत असतात. अशा स्रिला जेवन बनवायला लावल्यास त्याच वेदनादायी अवस्थेत तेच वेदनादायी बनविलेलं अन्न तिच्याच पोटात गेल्यानंं तिच्याच पोटातील बाळाला तेच अन्न नाळ रुपातही मिळत असतं. त्याचा परिणाम तेच अन्न तिच्या पोटातील बाळानं प्राशन केल्यानं त्या गर्भावरही तेच परिणाम होत असतात. त्यामुळं काही जणांचं बाळ सुसंस्कारीत जन्म घेत नसतं.
पुर्वी संयुक्त कुटूंबपद्धती होती. त्यावेळी घरात भरपूर सदस्य होते. त्यावेळी घरात कामं करणारे भरपूर लोकं असायचे. त्यामुळं जर कुटूंबात कोणी गरोदर असेल किंवा कोणी आजारी असेल किंवा कोणी रजस्व अवस्थेत असेल, तर त्यांना जेवन बनवू देत नसत. कारण त्यांना वाटायचं की त्यामुळं अन्न दुषीत होतं. ते तशा अवस्थेत घरच्या सदस्यांना जेवन बनवू देत नसल्यानं व ते भाव अन्नात उतरु देत नसल्यानं त्यावेळचे लोकं सुसंस्कारीत असायचे. गावात येणा-या मुली विवाहाद्वारे आल्यानंतर त्या मुली मानमरातबाने वागायच्या. त्यांंच्या डोक्यावरील पदर अजिबात पडायचा नाही. तसेच वडीलधारी माणसांसमोर त्यांची मान झुकलेलीच राहायची.
अलीकडे काळ बदलला. त्यानुसार पाश्चात्य लोक देशात आले. त्यांच्या विचारसरणीची देवाणघेवाण झाली. त्यानुसारच संयुक्त कुटूंबपद्धती जावून त्याठिकाणी विभक्त कुटूंबपद्धती आली व काळ बदलला. मी माझी पत्नी व माझी मुलं एवढाच संसार सिमीत झाला. मग घरी एखादा आजारी पडल्यास वा कोणी रजस्व झाल्यास वा कोणी गरोदर असल्यास घरी वेगळं कोणी अन्न बनविणारा सदस्य उरला नाही. यातूननच समस्या निर्माण झाल्या. समस्या वाढायला लागल्या. लोकं आणखीनच आजारी राहू लागले. आणखीनच लोकं चिंतेत राहू लागले. तसेच डिप्रेशन अवस्थेत जावू लागले. तसेच गरोदर नंतर पैदा होणारी मुलं ही सात्वीक पैदा झाली नाही. ती पिढी ही वडीलधारी मंडळींचा अपमान करणारी पैदा झाली. आज त्याचा परिणाम समाजावरही होत असून समाजात अशीच मुलं त्याच विषयुक्त जेवनाच्या प्राशनानं तयार होत आहे. ती मुलं बाहेर समाजात गुन्हेगा-या करीत आहेत. कुठे बलात्कार करीत आहेत. तर कुठे भ्रष्टाचार करीत आहेत. मानमरातब तर आज अजिबात उरलेलाच नाही. कारण आजचं जेवन आजारी व्यक्ती, गरोदर व्यक्ती व रजस्व स्री बनवीत आहे.
विशेष म्हणजे दुस-याची पत्नी किंवा पती, दुस-याची इमारत आणि दुस-याच्या घरचं जेवन आपल्याला का आवडते ते कळत नाही. ते आवडूही नये. आपली पत्नी कितीही वाईट का असेना, ती आवडायला हवी. आपला पती कितीही वाईट असला तरी तो आवडायला हवा, आपल्या घरचं जेवन कितीही खराब झालं असलं तरी ते आवडायला हवं. कारण ते जेव्हा आवडायला लागतं, तेव्हाच घराला घरपण येत असतं. तसंच त्यासाठी विशेष सांगायचं म्हणजे आज पुन्हा एकदा संयुक्त कुटूंबपद्धती यावी. जेणेकरुन कुटूंबातील आजारी माणसाला, रजस्व स्रिला व गरोदर स्रिला स्वयंपाक बनवावा लागू नये की त्यातून विषयुक्त अन्नाची निर्मीती होईल व ते प्राशन करुन भावी पिढी बिघडेल.
घर हे घरपण देणारं असावं. ते स्वर्गाहूनही सुंदर असावं. त्यासाठी असं दुस-याचा पती, पत्नी, इमारत, अन्न याला चांगलं म्हणायला नको. आपल्याच वस्तूंना चांगलं म्हणावं. जेणेकरुन अशा आपल्या वागण्यातून लक्ष्मीमाता, अन्नपुर्णा आणि इतर देवता निराश होणार नाही. तसेच आपली उत्तरोत्तर भरभराट होईल. खरंच आपलं घर दुस-याच्या घरापेक्षा स्वर्गाहूनही सुंदर असतं असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र ते कसं बनवावं ते आपलं आपणच ठरवावं. कारण भविष्य आपल्याच हाती असतं. इतरांच्या नाही.
मकान बांधणे आहे असा ध्यास प्रत्येकांच्या मनात असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण मानव जन्म घेतला ना. मग एकतरी मकान बांधावं. मकान मोठं जरी नसलं तरी चांगलं असावं. त्यासाठी कोणी कर्ज काढत असतात आणि मकान बांधत असतात. हिरासींगचं घर असंच होतं. ते मोडकंतोडकं असलं आणि छत गळणारं असलं तरी त्याचं त्या घरावर निरतिशय प्रेम होतं. त्यातच तो घर बांधण्याची इच्छाही करीत होता.
ती गुरं.......ती गुरं चारतांना त्याला आनंद वाटत होता. तो आनंद तो सांगू शकत नव्हता. तो आनंद व्यक्त करणं ही त्याचेसाठी शरमेची गोष्ट होती. ती शरम करणं हा प्रारब्धाचा प्रश्न होता.
त्या गुरांच्या मागे फिरतांना पावसाळ्यात तो भिजतही होता. परंतू आनंदच वाटत होता त्याला. ती गुरंं आवडायची त्याला. तो मायेनं कुरवाळायचा त्यांना. त्यांचेसोबत वावरतांना त्याला ती थंडी वाजूनही थंडी वाटायची नाही. परंतू तसं घरी येताच थंडी वाटू लागायची व तो चुलीजवळ बसायचा.
गुरांसोबत वावरतांना त्याचे दिवस जात होते. तसं त्याच्या मनात ध्येय होतं घर बांधायचं. परंतू तो घर तरी कसं बांधणार! विचार होता. तशी आणखी एक आशा बाळगून होता तो. ती म्हणजे आपल्या एकुलत्या एक मुलाला शिकवणेे. उच्च शिक्षण देणे. आपण जरी शिकलो नाही, तरी आपण आपल्या मुलांना शिकवू असं त्याला वाटत होतं. अशीच आशा मनात ठेवत ठेवत एक दिवस त्याला अपघात झाला. अपघातच तो. कारण त्याला रानात गुरं चारतांना एका सापानं चावा घेतला. त्यातच तो मरण पावला. वैद्यकीय उपचाराचा विषय लक्षात न घेता त्यानं त्यावेळी मांत्रीकांकडे धाव घेतली होती.
हिरासींग मरण पावला. तसा त्या परिवाराचा घरचा मोठा आधार गेला. आत घर कसं चालवावं हेे काही कळत नव्हतं.
हिरासींगची पत्नी. तिचं नाव सखू होतं. सखूसमोर अतिशय मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न मोठा बिकट होता. कारण त्या दोघांचा मुलगा अरुण. त्यालाही शिकविण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. तसंच घरंही नव्हतं. घर बांधायची आशा मावळली होती..
पोट.......पोट काही मोठं नाही माणसाचं. ते अगदी लहान आहे माणसाचं. परंतू त्यासाठी किती किती प्रमाणात त्रास भोगावा लागतो. कोणकोणती कामं करावी लागतात. कोणाकोणाचा अपमान सहन करावा लागतो. हे साांगता येत नाही. पोट भरणं मोठं जिकीरीचं काम आहे. ते सहज सोपं काम नाही. असं पोट भरत असतांना मोठमोठ्या वेदना होत असतात.
पोट भरण्यासाठी लोकं काय काय करीत असतात ते शब्दात मांडणं कठीण आहे. कोणी अपार मेहनतीची कामं करीत असतात. कोणी चो-याही करीत असतात, कोणी डाकेही टाकत असतात.
पोटाचा प्रश्न सोडवितांना कधी कधी चांगली कामं मिळत असतात. परंतू कधीकधी कामाचा प्रकारही बदलतो. ही कामं कठीण असतात. कारखान्यात मेहनत करीत असतांंना सारखा मालकवर्ग सतत त्रास देत असतो. कधी एवढी मेहनत करुनही वेतन कापत असतो. कधी वेतन वाढवा म्हटल्यास कारखान्यातून कामावरुन काढून टाकले जाते. काचकंपनीत कामाला जातांना फार त्रेधातिरपीट उडते. तो गरम गरम काच हातावर झेलावा लागतो. समजा तो हातातून कधी सुटलाच तर आपली आफत होते. कारण असा काच सुटलाच तर तो शरीरअवयवावर येतो व त्याची शरीर अवयवाला दुखापत होवू शकते. शाळेतही मालक असणारा संस्थाचालक नित्यनेमानंं शिक्षकांना पैसा मागण्यासाठी नित्य त्रास देत असतो.
पोट एवढे महत्वाचे आहे की या पोटासाठी माणसं काय काय करु शकतात हा विचारच करता येत नाही. असं पोट भरीत असतांना माणसं जेव्हा उद्योगधंदे टाकतात. कधी कधी ते उद्योगधंदेही चालत नाहीत. शेवटी असे उद्योग बंद करावे लागतात.
पोट भरण्यासाठी लोकं इमारतीचीही कामं करीत असतात. परंतू असे इमारतीचे काम करीत असतांंना लोकं वरच्या माळ्यावरुन अधांतरी काम करीत असतात. ज्या मजल्यावर काम करीत असतांना खाली पडण्याचीही भिती असते. ती भितीच नाही तर कित्येक मााणसं पडूून मरतात. तरीही काम बंद करता येत नाही. काम करावंच लागतं.
शेती करणं हेही पोट भरण्याचं एक साधनच आहे. शेतकरी मंडळी आपलंच पोट नाही तर जनाचंही पोट भरण्यासाठी शेती व्यवसाय करीत असतात. ती शेती करीत असतांना काही लोकं सापांच्या दंशानं मरतात तर काही लोकं वीज पडून. कधी पावसात भिजावं लागतं तर कधी हिवाळ्यातील थंडीनंं गारठावं लागतंं. कधीकधी उन्हाळ्यातीलही तप्त ऊन अंगावर झेलावी लागते. तेही जिकीरीचंच काम आहे. परंतू पोटासाठी हा शेतकरी पाऊस, ऊन, वारा थंडी झेलत आपल्या शेतात राबत असतो.
ज्यांच्याजवळ शेती आहे, ती मंडळी शेती करतात. परंतू ज्यांच्याकडे शेती नाही अशी मंडळी शेती करीत नाहीत. ती मंडळी ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांंच्या शेतावर राबत असतात. ती मंडळी अशा शेतीवर राबत असतांना त्यांच्याकडील पशूधनाची सुरक्षाही करीत असतात. ती सुरक्षा करीत असतांना कधी त्यांच्या जिवावरही बेतत असते. रानात चारायला नेलेल्या पशूधनावर कधी लांडगे वा कधी कोल्हे, कधी वाघ वा कधी सिंह हमले करीत असतात. तेव्हा असे हमले झाल्यास त्यात त्या पशूधनांना वाचवितांना सुरक्षा रक्षकांच्या जीवावर बेतत असते. कधीकधी शेतात मजूर म्हणून काम करीत असतांना त्यांच्या पायांना गोम, विंचू, जळू सारखे प्राणी दंश करतात. त्यात वेदना होतातच. परंतू पोटासाठी हे सगळं सहन करावंच लागतं.
सर्वात मोठं काम पोटासाठी करणारे आमचे सुरक्षा सैनीक असलेले पोलीस. ते तर जिवावर उदार होवून गुंडाचा सामना करीत असतात. कधी कधी ही गुंड मंडळी केव्हा त्या पोलिसांचा जीव घेतील ते सांगणेही कठीण असते. तरीही केवळ पोटासाठी त्यांना राब राब राबावंच लागतं.
याहीपेक्षा मोठे असतात पोटासाठी देशाचे रक्षण करणारे सैनीक. हे सैनीक केेवळ पोटासाठी स्वतःच्या जिवावर उदार होवून स्वतः मरण पत्करतात. हेही पोटासाठी केलेलं कृत्यच असतं.
पोट ही अतिशय महत्वाची वस्तू असून केवळ पोटासाठी माणसंं त्रेधातिरपीट करीत असतात. पोटासाठी न्यायालयात अनेक मजली इमारतीच्या पाय-या चढणारे वकील पाहिले की वाटतं देवानं कशाला दिलं हे इंचीभर पोट. या पोटासाठी माणसं न्यायालयातही भांडत असतात वर्षानुवर्षे. तरीही न्याय मिळत नाही. कधी कधी पोटासाठी ख-याचं खोटं करतात वकील मंडळी. त्यांनाही तसं करणं आवडत नाहीच. त्यांना कोणते खटले खरेे आहेत आणि कोणते खटले खोटे असतात हेे माहीत असलं तरी. आजही पोट भागविण्यासाठी शिकार करणारी माणसं, पोटासाठी सट्टा लावणारी कित्येक माणसं न्यायालयात दिसतात आणि त्याच पोटाचा प्रश्न उपस्थीत करुन कित्येक पतीनं सोडलेल्या परितक्ताही न्यायालयात दिसतात. त्यांंनी पोट भरण्यासाठी खावटीचा दावाही केलेला असतो.
आज काही लोकांकडे पाहता काहींना पोट भरणं कठीण आहे. कारण कितीही मेहनत केली तरी त्यांच्याजवळ पै पै पैसा येत नाही. अन् काही काही लोकंं अशी असतात की त्यांचंं पोट मेहनत न करताही भरतं. कारण त्यांच्या मायबापानं पोट भरण्यासाठी भ्रष्टाचार करुन पैसा कमविलेला असतो. तो भ्रष्टाचारी पैसा पचवितांना त्रासच होत असतो. त्यातून कुणाला शर्करेचे, रक्तदाबाचे आजार होतात तर कुणाला कँन्सर सुद्धा होतो.
महत्वाचं म्हणजे पोट भरणंं ही मोठी महत्वाची गरज असून ते कसं भरायचं हा आपला आपला प्रश्न आहे. पोट दोन्हीही बाजूंनी भरता येेतंं. एक म्हणजे वाईट मार्गानं पैसा कमवून व दुसरं म्हणजे चांगल्या मार्गानं पैसा कमवून. परंंतू जो चांगल्या मार्गानं पैसा कमवतो. तो जास्त मेहनत करतो. त्याला आजार शिवत नाही. सुखाची झोपंही लागते. परंतू जो वाईट मार्गानं पैसा कमवतो, त्याला सुखाची झोप लागत नाही. ती मंडळी आजारानं त्रस्त असतात. त्यामुळं पोट जर चांगलं ठेेवायचं असेल तर भ्रष्टाचार न करता चांंगली मेहनत करुन पैसा कमवायला हवा. जेणेकरुन आपलं पोट चांगलं असेल, झोप चांगली लागेल व आजारही शिवणार नाही हे तेवढंच खरं आहे.
सखूचं आता पोट भरणं कठीण झालं होतं. पुर्वी तिचा पती गुरं का असेना, चारायला जात असल्यानं कमी का येईना, परंतू मिळकत येत असल्यानं कसंंतरी पोट भागत होतं. परंतू आता पोटाची आबाळ होत होती. त्यातच अरुणही लहान होता.
पोटाचा प्रश्न होता तिच्यासमोर. तो प्रश्न आ वासून उभा होता. त्यातच तिच्यासमोर तीन जबाबदा-या होत्या. पहिली म्हणजे आपलं पोट व आपल्या लेकराचं पोट सांभाळणं, दुसरी म्हणजे अरुणच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवणं व तिसरी म्हणजे तिचा पती हिरासींगनं पाहिलेलं स्वप्न. ते स्वप्न होतं स्वतःचं घर बांधणं. या तिन्ही जबाबदा-या आता तिच्यावर येवून पडल्या होत्या. काय करावं सुचत नव्हतं. तसं पाहता अरुणलाही शिकवणं भाग होतं.
त्या तीनही जबाबदा-या पार पाडत असतांना मुख्य प्रश्न होता पोट. तो पहिलाच प्रश्न बिकट होता. ती आपलं पोट पालवू शकत होती. परंतू लेकराचं पोट. तोही भरणं आवश्यक होतं. कसं भरावं हाही प्रश्न होता. तशी ती कामाला जातच असे. परंतू त्या कामावर दिवसभर काम करुन तिला फक्त दहा रुपये मिळत.
ते दहा रुपये. त्या दहा रुपयात किराणा, कपडे लत्ते तसेच इतर सर्व खर्च चालवावा लागत असे. तो खर्च काही केल्या भागत नव्हता. इंधन फुकट मिळायचं. भाजीपालाही फुकटच मिळायचा. परंतू किराणा माल मसाला. तो काही फुकट मिळत नसे. अशातच मुलाचं शिक्षण. सारखी आबाळ होत होती. तशी सखू कधीकधी एकवेळ उपाशी राहायची. कधी पाणी पिवून झोपी जायची. परंतू बाळाला अजूनही तिनं शाळेत घातलं नव्हतं. अशातच कोणीतरी सांगीतलं की तिनं शहरात जावं. शहरात चांगली कामं मिळतात. त्या कामाचा पैसाही जास्त मिळतो. त्यातून तिचं पोटंंही भागू शकतं व मुलाचं शिक्षणही.
अरुण आता दहा वर्षाचा झाला होता. त्याचं अजून नाव टाकलं नव्हतं. कारण तिला सर्वप्रथम पोटाचा प्रश्न सोडविणे भाग होते. तो पोटाचाच प्रश्न तिला सोडवता येत नसल्यानं ती अरुणच्या शिक्षणाचा प्रश्न कसा सोडविणार! शेवटी तो पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी तिनं निर्णय घेतला, आपण शहरात जायचं.
ते गळतं घर. परंतू ते घर गळत असलं तरी ते घर तिला आधार देत होतं. ते घर तिला सोडावंसं वाटत नव्हतं. परंतू काय करणार, त्या घरात तिचं भागत नव्हतं. पोट भरणंही कठीण झालं होतं. शेवटी तिनं कसेबसे पैसे जमवून तिनं घर सोडलं. ते घर विकलं व काही पैसे घेवून ती शहरात आली.
ते शहर...... त्या शहरातील त्या टोलेजंग इमारती त्या पाहून मन धास्तावत होतं. त्यातच आपण कुठं राहावं हा प्रश्न इथंही तिच्या मनात होता. तिनं पाहिलंं की या शहरात बरेचसे लोकं फुटपाथवर जीवन व्यथीत करतात. पोट भरता यावं म्हणून भीक मागतात. तिनं ते पाहताच विचार केला की आपणही फुटपाथवर राहावं. परंतू भीक मागू नये. मेहनत करावी. शेवटी तिनं तसा विचार करताच राहण्यासाठी फुटपाथचा आसरा घेतला. परंतू भीक मागाविशी वाटत नसल्यानं ती काम शोधत होती. तशी ती पोट भागविण्यासाठी मनात इच्छा नसतांनाही भीक मागत होती. कारण तिच्याजवळ यावेळी पोट भागविण्यासाठी कोणताच उपाय नव्हता. शेवटी ती तसा विचार करीत असताना पुन्हा तिनं पाहिलं की लोकं या रस्त्यावर कामासाठी उभे असतात. त्यांना काम मिळतं व पैसाही मिळतो. याच उद्देशानं आता ती भिक्षा मागता मागता कामासाठी फुटपाथवर उभी राहू लागली.
तो एक दिवस. त्या दिवशी सकाळी लवकर उठून भीक मागून पोट भरल्यावर ती कामासाठी रस्त्यावर उभी झाली. त्यातच तिला एका गृहस्थानं कामावर नेलं. ते काम उंच इमारतीवर मट्रेल चढविण्याचं होतं. सखू त्या कामाला गेली.
सखू त्या कामाला गेली खरी. परंतू तिला त्या कामाची सवय नसल्यानं सुरुवातीला तिला अडचण जात होती. काम करावंसंं वाटत नव्हतं. परंतू उपाय नव्हता. भिक्षा मागणं तिला आवडत नव्हतं आणि भिक्षा मागून खाणंही. शेवटी आज ती कामावर तर गेलीच आणि कसंबसं काम केल्यानंतर सायंकाळी तिला पैसे मिळताच ती फारच खुश झाली. ती तिच्या कामाची पहिली कमाई होती.
ते शहरातील एका दिवसाचे कमाईचे पैसे. गावच्या एका दिवसाच्या कमाईपेक्षा कितीतरी मोठे होते. एवढे पैसे एका दिवसाला तिला भिक्षेतूनही मिळाले नाहीत. ती तशी खुश झाली. सायंकाळी जेव्हा ती घरी आला, तेव्हा तिच्या चेह-यावर आनंद झळकत होता.
सखू आता रोजच त्या रस्त्यावर कामासाठी उभी राहात असे. तसं तिला रोजच काम मिळत नसे. परंतू ती नित्यनेमानं दररोजच त्या ठियावर उभी राहायची. जे पैसे आले, त्यात पोट भागवायची. बाकी पैसे शिल्लक पडायचे. ते गोळा करुन जवळ ठेवायची. आता तिचा पोटाचा प्रश्न मिटला होता. दोघांनाही अगदी पोटभर दोन्ही वेळेचं जेवण खावण मिळत होतं. आता तिच्यासमोर दुसरा प्रश्न होता, तो म्हणजे तिच्या मुलाच्या शिक्षणाचा. मुलगा अरुण आज बारा वर्षाचा झाला होता.
अरुण अकरा वर्षाचा झाला. त्यातच तिनं त्याचं नाव टाकायचं ठरवलं. तशी ती एका शाळेत गेली. तिथं तिनं आपल्या मुलाला दाखवलं व म्हटलं की याचं नाव टाकायचं आहे.
ते अरुणचं शाळेतील नाव. त्याचं वय झालेलं. त्यातच तो अरुण उंच धिप्पाड असल्यानं त्याचं नाव शाळेनं घेतलं नाही. त्यामुळं मनात इच्छा असूनही सखूला मुलाला शिकवता येत नव्हतं. शेवटी अशातच एक वर्ष निघून गेलं व अरुण बारा वर्षाचा झाला. त्यानं शाळेचं तोंड पाहिलं नाही. आता तो आई कामाला जाताच एक बोरी घेेवून तो कचरा वेचायला जात असे. दुपारी बोरी भरली की तो कचरा टिनटप्परच्या दुकानात विकूून तोही दोन पैसे कमवीत असे. अशाप्रकारे तो आईला मदत करीत असे. परंतू ते पैसेे आई रागावेल म्हणून तिला त्यानंं दाखवलेे नाही.
अरुण आज बारा वर्षाचा झाला होता. अशातच ती एक सकाळ उजाळली. त्या सकाळी सकाळी ती एका शाळेची चमू शाळाबाह्य विद्यार्थ्यांचाच सर्व्हे करायला आली होती. अचानक ती चमू अरुण जिथं राहात होता, तिथंही आली. त्याला पाहताच त्या चमूतील एकानं विचारलं,
"शाळेत जातोस का?"
"नाही."
"का बरं?"
"............." ते शब्द त्यावर तो बोललाच नाही. तोच दुसरा एक व्यक्ती म्हणाला,
"शाळा शिकायची आहे काय?"
"............." तो काहीच बोलला नाही. तोच बाजूलाच उभी असलेली त्याची आई म्हणाली,
"होय, त्याला शाळा शिकवायची आहे. परंतू त्याला शाळेतच घेतलं नाही. तुम्ही घ्याल काय आपल्या शाळेत?"
"होय. आम्ही घेवू त्याला आपल्या शाळेत. त्याचाच सर्व्हे चालला आहे हा."
"मग त्यासाठी काय करावं लागेल?"
"आम्ही फॉम भरतो आणि आमचा पत्ता देतो. तिथं पाठवाल याला शाळेत. तिथं पुस्तकंही आम्हीच देणार आणि दुपारचं एक वेळचं जेवणंही. तुम्हाला एक छदामही खर्च येणार नाही. हं, त्या फॉमवर सही करुन द्या म्हणजे झालं. शिवाय आम्ही त्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेशही देवू."
सखूला अगदी हायसं वाटलं. तिची शिक्षणाची अडचण पुर्ण झाली. तसं अरुणलाही शिकायचंच असल्यानं त्यालाही आनंद झालाच. कारण आता तो केवळ बाराच वर्षाचा झाला नव्हता तर समजदारही झाला होता.
अरुणच्या आईनं त्या फॉमवर सही केली. तसं त्याचं नाव शाळेत घातलं गेलं. आता तो नित्यनेमानं शाळेत जावू लागला. सुरुवातीला शाळेत गमत नव्हतं. परंतू नंतर त्याला सवय झाली व तो शिक्षणात आनंद शोधू लागला होता.
अरुण शाळेत जात होता. त्याला शाळेत पुस्तकं मिळाले होते. वह्या देखील मिळाल्या होत्या. त्यातच आता मध्यान्हं भोजनही मिळत होतं. तसा तो आनंदीच होता.
अरुण आता दिवसभर शाळेत जात असे. तसा सकाळी आणि सायंकाळी मिळणारा फावला वेळ तो कचरा गोळा करुन तो विकून पैसा गोळा करण्यात घालवत असे. अशाप्रकारे तो शाळेत जरी जात असला तरी भविष्याची तयारी आजपासूनच करीत होता. त्याला आता त्याच्या वयानुसार सहाव्या वर्गात प्रवेश मिळाला होता. तो सहाव्या वर्गात थेट पोहोचला होता. त्याला शिक्षणाचं काही एक समजत नसे. परंतू तरीही त्या अज्ञानावर मात करुन तो अतिशय मेहनत करीत होता शिक्षणासाठी. अल्पावधीतच त्याला अक्षरओळख झाली व तो पुस्तकातील अक्षरे भराभर वाचू लागला होता आणि गणितीय आकडेमोडही करु लागला होता.
अलीकडे शाळेत शिकवितांना विद्यार्थ्यांना मारता येत नाही. तसंच न मारता त्यांना चांगलं शिकवावं लागतं. जे शक्य होत नाही. तरीही आपला विद्यार्थी चांगला घडावा. म्हणून त्याला न मारता शिकवावं लागतं. तसं पाहता ती तारेवरची कसरतच असते.
आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आमच्यावर आमच्या गुरुजींचा धाक असायचा. गुरुजी आम्हाला शिक्षा करायचे. त्या शिक्षेत आम्हाला कोंबडा बनवणे, बाकावर उभे राहणे, अंगठे धरुन राहणे, कान पकडून उभे राहणे, तोंडावर बोट ठेवणे, भिंतीकडे तोंड करुन उभे राहणे, वर्गाबाहेर उभे राहणे, गुडघे टेकवणे, हात वर करुन उभे राहणे, कोणताही पाठ दहा वेळा वाचणे, शाळा सुटल्यावर थांबणे, वर्ग स्वच्छ करणे, उठबैठका काढणे, एवढंच नाही तर पाटीदप्तर घेवून घरी पाठवणे व मायबापाला आणल्याशिवाय वर्गात बसू न देणे. इत्यादी शिक्षा होत असत. तसंच कधीकधी मारही पडायचा. मायबाप शाळेत आणताना समस्या निर्माण व्हायच्या. कारण एकतर मायबाप शाळेत येत नसत आणि आलेच तर तेही मारायचे गुरुजीच्या नजरेसमोरच आणि शिक्षकांनाही मारायला सांगायचे. मग शिक्षकही मनमानीपणानं झोडपायचे. कोणीच अडवायचे नाही. त्यामुळे विशेष समस्या. असं करीत करीत आम्ही शिकलो. मार सहन केला, शिक्षकांचाही आणि मायबापाचाही. परंतू आज तसं होत नाही. आज मायबापाचाही धाक नाही आणि शिक्षकांचाही धाक नाही. सगळे आपल्या आपल्या परीनं वाह्यात असतात तरीही.
मुख्यतः आज मला सांगता येते की त्या शिक्षा होत्या, म्हणून आम्हीही चांगले संस्कार घडलो. आजही काही मुलं जे शिकलेले नाहीत, त्यांच्यामध्ये आजही संस्कार टिकून आहे. त्या शिक्षेतून आमच्यात जणू संस्काराचं बिजारोपनच झालं.
महत्वाचं म्हणजे बाकावर उभे राहण्यातून आम्ही मोठं स्वप्न कसं पाहावं ते शिकलो. कान पकडण्यातून आम्ही लक्षपूर्वक कोणतीही गोष्ट कशी ऐकायची ते शिकलो. तोंडावर बोट ठेवण्यातून पोकळ बोलणं कसं टाळायचं हे शिकलो. अंगठे धरुन उभं राहण्यातून आम्ही परिवर्तनशिलता शिकलो. भिंतीकडे तोंड करुन उभं राहण्यातून आम्ही आमच्या चुका कशा शोधाव्या हे शिकलो. त्यातच पाठ दहा वेळ वाचण्यातून आम्ही चुका वारंवार करुच नये हे शिकलो. वर्गाबाहेर उभे राहण्यातून जगाचं निरीक्षण करणं शिकलो. हात वर करुन उभे राहा यातून संयम शिकलो.
विशेष म्हणजे आपलं चुकलंच नाही तर कोणी आपल्याला काही म्हणेल काय, कोणीही काहीही म्हणणार नाही. आमचं त्या लहानग्या शिकत्या वयात काही चुकत होतं. म्हणून आम्हाला आमचे शिक्षक शिक्षा करायचे हे आता आम्हाला कळतं. आम्ही त्यांच्या मारण्याच्या वा शिक्षा करण्याच्या विरोधात कालही नव्हतो आणि आजही नाही.
आम्ही त्यांच्या शिक्षा करण्याच्या विरोधात कालही नव्हतो आणि आजही नाही. परंतू मग सरकारणं वा न्यायालयानं मारण्यावर वा शिक्षा करण्यावर बंदी का आणली? ती आणायला नको होती. तर त्याचं उत्तर आहे की जननसंख्या. पाश्चात्य विचार सरणीचा देशात प्रवेश झाला. त्याचबरोबर लोकांनी वाढत्या लोकसंख्येवर पर्याय काढण्यासाठी कुटूंब नियोजन आणलं. त्यामुळे त्यानंतर लोकांनी एक किंवा दोनच अपत्य ठेवली. ती अपत्य लाडाची होती. त्या अपत्याचा लाड करता करता लोकं हे विसरले की आपली मुलं बिघडत चालली आहेत. त्यातच शाळेची संख्याही वाढली. परंतू विद्यार्थी संख्या कमी झाली. या सर्व गोष्टीचा परिणाम शिक्षण व प्रगतीवर झाला. त्यामुळे आजची पिढी पाहिजे त्या प्रमाणात सक्षम दिसून येत नाही. ती अगदी भावूक स्वरुपाची दिसत आहे. त्यामुळे आज असं वाटायला लागलं आहे की पुर्वीच्या शिक्षा कामाच्याच होत्या. असं म्हणण्यात काहीच गैर नाही. कारण आज लोकं एवढे भावूक आहेत की ते आत्महत्या करायला लागले आहेत. त्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. शिक्षा बंद झाल्या. कारण त्या शिक्षा करतांना काही काही शिक्षक शिक्षण देतांना विद्यार्थ्यांना बेदम मारत असत. त्यातून विद्यार्थ्यांना ग॔भीर स्वरुपाची दुखापत व्हायची. म्हणून शिक्षा न करणे हा पर्याय त्यासाठी निवडला गेला व शिक्षा बंद झाल्या.
विशेष म्हणजे आज आपण विचार करायला पाहिजे की ज्या शिक्षा पुर्वी होत्या, त्या असाव्यात. त्याशिवाय सक्षम अशी पिढी तयार होणार नाही. आत्महत्याही थांबणार नाहीत. परंतू करण्यात येणा-या शिक्षा ह्या सौम्य असाव्यात म्हणजे झालं.
अरुण शाळा शिकत असतांना अशा प्रकारच्या शिक्षा नव्हत्या. तसं पाहता शाळेत रमणीय असं वातावरण मिळत होतं. त्यामुळे अरुणला त्या वाढत्या वयातही अभ्यासाची गोडी लागली आणि तो अभ्यास करु लागला.
सरकारच्या आदेशानुसार ती शाळा बाह्य विद्यार्थ्यांची मोहीम. ती मोहीम सरकार राबवीत होतं. त्या मोहिमेनं अरुणसारख्या शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा फायदा होत होता. तसं पाहता अरुणला शिक्षणाचं बाळकडू पिता येत होतं.
अरुण लवकरच लिहायला वाचायला शिकला. त्याचबरोबर आता तो सातवीच्या अभ्यासासाठी तयार झाला.
ते पास करण्याचं सरकारचं धोरण. मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होवू नये म्हणून सरकारनं नापास करण्याचा नियम बंद केला. त्याचा फायदाही अरुणला होणार होता. तशी सहावीची परिक्षा झाली. सहावीच्या परिक्षेत अरुणला कमी गुण होते. परंतू सरकारच्या पासच्या धोरणामुळे तो पास झाला होता.
अरुणला सरकारच्या योजनेनं वय झाल्यानंतरही शिकता येत होतं. त्याला समाधान होतं. तसा तो आपल्या शिक्षकाचा आदरही बाळगत होता. ऐकत होता. त्यातच त्याला शिकविणारे शिक्षक देवच वाटत होते. त्या शिक्षकांच्याच प्रयत्नाने तो घडत होता.
विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा? हा एक प्रश्नच आहे. आपल्याला वाटत असते की विद्यार्थी घडला पाहिजे. तो घडायलाच पाहिजे. ही प्रत्येक शिक्षकांची इच्छा असते. तसेच आपला मुलगा घडला पाहिजे ही प्रत्येक मायबापाची इच्छा असते. परंतू समाजाला तो घडला पाहिजे असे वाटत नाही. समाज तो मुलगा जर चांगला सुविचारी असेल, हुशार आणि होतकरु असेल तर आपण त्याचे पाय खेचत असतो. ही वास्तविकता आहे. आज पर्यायानं पाहता आपला मुलगा शिकला पाहिजे. पुढे गेला पाहिजे असं जे प्रत्येकाला वाटतं. ते शेजा-याला वाटत नाही. आपला मुलगा जर हुशार असेल तर तो मुलगा हुशार राहावा. आणखी हुशार व्हावा असं शेजा-याला कधीच वाटत नाही. ते त्या मुलाला हुशारीपासून अडवतात. हे झालं हुशार मुलांच्या बाबतीत. बदमाश मुलांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बदमाश आपल्या घरात जन्माला येवू नये असं लोकं मानत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास शिवाजी महाराज जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतू तो माझ्या घरात नाही तर तो दुस-याच्या घरात यावा असंच वाटतं. कारण आजच्या काळात लोकं हा विचार करतात की कोण करेल जास्तची मारामारी आणि कोण लढेल आजच्या औरंगजेब आणि अफजलखानाशी. कोण आजच्या काळात आपल्या स्व मुलाला संकटात पाडेल. कारण जिजामातेला माहीत होतं की खान धिप्पाड आहे. कपटीही आहे आणि तो शिवरायांना मारणारच आहे.
विचार आपला, समाजाचा की विद्यार्थी वर्गाचा. जेव्हा आपण आपला विचार करतो, तेव्हा आपल्यात स्वार्थच कूटकूट भरलेला असतो. त्यावेळी आपण आपली पावलं टाकतांना समाजाचा विचार करीत नाही. समाज काय म्हणेल, काय नाही याचीही आपण पर्वा करीत नाही. केवळ आणि केवळ आपण आपलाच विचार करुन भ्रष्टाचार करीत असतो.
आता समाजाची भुमिका पाहू. माणूस हा सामाजीक प्राणी आहे. तो समाजाचा विचार करीत नाही असे नाही. तर तो समाजात राहात असतांना समाजाचाही विचार करतो. परंतू समाजाचा विचार करीत असतांना माझा समाज पुढे जावा असं त्याला वाटत नाही. त्यासाठी तो प्रयत्नही करीत नाही. उलट समाज पुढे जावू नये म्हणून दूषणे देत बोलत असतो. यामुळे समाज निराश होतो व समाज योग्य दिशेतून न जाता भटकतो. त्याला दिशा सापडत नाही. तेव्हा समाजाची प्रगती होत नाही. हानी होते.
विद्यार्थी.......विद्यार्थी मात्र समाजजीवनाचा आरसा आहे. विद्यार्थी दृष्टीने विचार केल्यावर आपल्याला हे कळते की विद्यार्थी हा मातीचा गोळा असून त्या गोळ्याला आपण कसा आकार द्यायचा हे आपल्याला ठरवता येते. त्यानुसार त्याचे विचार प्रगल्भ होत असतात. विद्यार्थी हे मुळातच हुशार नसतात असे नाही. ते हुशार असतात. परंतू त्यांना योग्य असं वातावरण मिळत नाही. त्यामुळे ते वातावरण चांगलं न मिळाल्याने निराश होतात. त्यानंतर त्यांचं अभ्यासात मन लागत नाही व ते शाळा सोडतात.
विद्यार्थी......विद्यार्थी हा घटक उद्याचा उज्ज्वल देशाच्या भवितव्याचा घटक आहे. त्याला जर सन्मान मिळाला की तोच घटक उद्या देशालाही सन्मान मिळवून देवू शकतो. म्हणून त्याच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. ते संस्कार चांगले झाले तर उद्या तोच घटक जगही बदलवू शकतो. तशी ताकत त्याच्यात आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
आज देशाचा विचार करीत असतांना केवळ आपला विचार करुन चालत नाही तर समाजाचाही विचार करायला हवा. तोही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाचाही. त्याशिवाय मुख्य फलीत निघणार नाही. जेव्हा असा विचार देशातील प्रत्येक जण करेल, तेव्हाच देश सुजलाम सुफलाम बनेल यात शंका नाही. केवळ आपला स्वतःचा स्वार्थपणा साधून उपयोग नाही. त्याचबरोबर समाजाचाही विचार व्हायला हवा. समाजासाठीही आपले कार्य व्हायला हवे.
अरुण शिकत होता ती शाळा. ती शाळा आपल्या स्वतःसाठी शिकत होता. कारण त्याला वाटत होतं की त्यानं विपरीत परिस्थिती भोगली. परंतू कधीकधी त्याला वाटायचं की आपण ही शाळा समाजाचा विचार करुनही शिकावी. कारण शाळेतील शिक्षक हे एक समाजाचा घटकच आहेत. त्यांच्याचमुळं मला शाळा शिकता येत आहे.
अरुणचा तो विचार रांगडा विचार होता. त्यात सामाजीक हीत भरलं होतं. त्यात अहीत नव्हतंच. हळूहळू शिकता शिकता तो शालान्तही पास झाला.
अरुण दहावी पास झाला होता. तेही फुटपाथवर राहून. आता तो महाविद्यालयात गेला होता. कॉलेजच्या मित्रासोबत राहात होता. मात्र तरीही त्यानं आपला कचरा उचलून विकण्याचा धंदा बंद केला नव्हता. मात्र त्या धंद्यात थोडा बदल केला होता. तो आता कचरा उचलतांना आपले तोंड व चेहरा पुर्ण रुमालीनं झाकून उचलत असे. त्यात एक फायदाही होता. त्यात तो कोणाला ओळखूही येत नसे.
वाढतं वय. त्या वाढत्या वयात त्याला ते काम करायची लाज वाटत नव्हती. मात्र लाज वाटायची ती फुटपाथवर राहायची. त्याला वाटत होतं की एखाद्या दिवशी आपण एखाद्या महाविद्यालय मित्राच्या नजरेत पडलो तर.......ते आपल्याला काय म्हणतील. कारण आता त्याचे महाविद्यालयात मित्रही बनले होते. ते मित्र त्याचे चांगल्या घरातील होते. श्रीमंत होते.
त्याला कामाची शरम वाटत नव्हती. कारण त्याला वाटत असे की त्याच्या आईनं त्याच्यासोबत काबाडकष्ट केले आहेत. ती आई आजही त्याचेसाठी काबाडकष्ट करते. त्या आईला एक आधार देण्यासाठी तो ते काम करीत असे. मात्र आई रागावेल, म्हणून ते काम करीत असल्याची गोष्ट त्यानं अद्यापही आईला सांगीतली नाही.
कॉलेजला मुलं मुली होते. ते मुलं मुली त्याला घरी बोलावत होते. परंतू तो त्यांच्या घरी जात नव्हता. त्याला वाटत होतं की एखाद्या दिवशी त्यांच्या घरी गेल्यास आपल्यालाही एखाद्यावेळी त्यांना आपल्या घरी आणावं लागेल. याच एकमेव कारणातून तो त्यांच्या घरी जात नसे.
अरुणची कॉलेजशी गट्टी. तशी त्याची एक मैत्रीणही बनली होती त्या महाविद्यालयात. तिचं नाव सई होतं. सई दिसायला सुंदर होती. ती त्याला मदत करीत असे. ती त्याला कधी घरी चालायला विनवीत असे. परंतू तो जात नसे. एकदा तिनं त्याला म्हटलं की त्यानं तिला आपल्या घरी न्यावं. परंतू त्यानं आपली आई आपल्याला रागावणार असा बहाणा करुन ते टाळलं. तो तसा तर नेहमीच टाळत असे.
तो एकदाचा प्रसंग. आज सई त्याच्या मागेच लागली होती त्याच्या घरी यायला. परंतू आजही त्यानं तिला घरी आणायचंं टाळलं होतं. त्यामुळं तिला त्याचा अतीव राग आला होता. तिनं म्हटलं होतं की आता यापुढं माझ्याशी बोलायचं नाही. ती त्या दिवशीपासून त्याचेशी बोलत नव्हती.
सई बोलत नाही हे पाहून आता अरुणला पश्चाताप येत होता. त्याला सईची आठवण येत होती. कारण सई त्याला आवडत होती. परंतू आपलं घर नसल्यानं आपण तिला आणू शकलो नाही घरी असं त्याला वाटत होतं. त्यामुळं की काय, आज तो न राहवून आपल्या आईला म्हणाला,
"आई, आपण असं फुटपाथवर केव्हापर्यंत राहणार?"
"का बरं?"
"अगं आता मी कॉलेजला गेलोय. आता मला फार शरम वाटतेय. कोणी मित्र मला विचारतात. विचारतात की तुझं घर कुठं आहे. मला त्यांना तेव्हा काय उत्तर द्यावं हे कळत नाही."
"हो का."
"हो आई. आणखी एक सांगू. माझ्या मित्रमंडळींपैकी काही जण तर माझ्या घरीही येवू पाहतात. मग मी त्यांना काय उत्तर देत जावू?"
"सांगावी आपली वास्तविकता. म्हणावं की आम्ही फुटपाथवर राहातो. आपलं जे आहे ते. अगदी खरं खरं सांगावं. आपल्याजवळ काही उपाय आहे का?"
"हो आहे ना. आपण घर बांधावं म्हणतो."
"अरे पण त्यासाठी जागा?"
"ती घ्यावी आपण."
"पण त्यासाठी पैसा?"
"आई, मी देणार."
"म्हणजे?"
"तू कुठून आणणार बाळ?"
"अगं आई, तू जे काही मला खाऊला पैसे देत होती ना. त्याचा मी खावू खाल्ला नाही. जमवले भरपूर पैसे."
"अरे पण खावूचं सोड. प्लॉट म्हणजे लहानशी गोष्ट आहे का? अरे त्याला लाखो रुपये लागतात. ते कोठून आणशील?"
"आई, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. तू फक्त प्लॉट बघ."
"एवढे पैसे आणले कुठून. चोरी तर नाही ना केली?"
"आई तुझा विश्वास आहे ना माझ्यावर."
"होय, विश्वास तर आहे. परंतू एवढा पैसा!"
"होय आई, एवढा पैसा."
"परंतू खाऊचे तर एवढे पैसे गोळा होत नाहीत. बोल काय केलं तू?"
"ऐकायचं आहे तुला. तर ऐक मग."
"सांग बाळ कुठून आणलाय एवढा पैसा?"
तसा अरुण सांगू लागला आपली कर्मकहाणी. आपल्या जन्मदात्या आईला. तो म्हणाला,
"आई, हा पैसा मी मेहनतीनं कमवला."
"कोणती मेहनत केली तू?"
"आई, तू जेव्हा कामाला जात असे. तेव्हा मिही कचरा वेचायला जात असे. तो वेचून विकून टाकत असे. त्यातून आलेला पैसा हा मी खर्च केला नाही. तो गोळा केला. तोच पैसा आहे हा. दररोज दररोज गोळा केलेला."
अरुण बोलत होता. तसं आईला गहीवरुन येत होतं. क्षणातच तिचं मन तो ते बोल सांगत असतांना उचंबळून आलं व तिनं त्याला मिठी मारली.
 
*********************************************
 
ती पैशाची रास. त्यानं आपल्या आईसमोर उघडी करुन दाखवली होती. ती रक्कम लाखोच्या घरात होती. त्या रकमेचं त्या शहरात एक जागा विकत मिळू शकणार होती.
ती रात्र.......त्या रात्री आईनं स्वयंपाक बनवला. त्या रात्री ते दोघंही जण जेवन करुन झोपी गेले. तसा दुसरा दिवस उजळला.
तो दुसरा दिवस. अरुण घरातून बाहेर पडला होता नेहमीसारखा न सांगता. तसा तो कचरा वेचायलाच गेला असेल, असं आता तिला वाटत होतं. आजपर्यंत तिला त्या गोष्टीची कल्पना नसल्यानं तो कुठे जातोय आणि काय करतोय याची तिनं साधी कधीच शहानिशा केली नव्हती. परंतू आता त्यानं काल रात्री सांगितल्यानुसार खात्री पटली होती की तो कचरा वेचायलाच गेला असेल.
ते कचरा वेचण्याचं काम हे तुच्छतेचं काम नव्हतं. अतिशय अभिमानाचं काम होतं. स्वाभिमानाचं काम होतं ते. परंतू लोकं त्या कामाकडे तुच्छतेनं पाहात असत. त्या लोकांकडे अतिशय तुच्छतेनं पाहिलं जात असे. परंतू त्याच धंद्यात जास्त पैसा होता. कधीकधी हा कचरा वेचत असतांना तांंबे, पितळ तर कधी सोनंही सापडत असे. त्यातूनच अरुणजवळ त्या शहरात पुरेशी जागा घेण्याइतपत पैसा गोळा झाला होता.
अरुण बाहेर गेला होता. तसा त्याच्या आईच्या मनात विचार आला. 'आपला मुलगा लय होतकरु निघाला. आपल्या मुलानं तर कमालच केली. तो कष्टाचा निघाला. प्रसंगी मी पैसा गोळा केला नाही. कधी विचारही केला नाही की आपलंही घर असावं. परंतू आपल्या मुलानं याचा विचार केला. त्यानं ठरवलं की आपलंही एक घर असावं. स्वर्गासारखं सुंंदर. कदाचीत ते गळणारं घर त्याच्या लक्षात असावं.
सखूला तेे सगळं आठवत होतं. त्याचबरोबर तिला तिचा भुतकाळही आठवला. ते गळणारंं घर आणि दरवर्षी सुधारण्यासाठी ते दोघंही करीत असलेला आटापिटा. त्या दरवर्षी घरावर उड्या मारणा-या माकडाच्या माकडलिलांनी घरावरील कौलांचे नेहमी तुकडे होत असत. ते सुधारण्यासाठी दुकानातून दरवर्षी नवीन कौलं आणावी लागत. ती नवनवीन कौलं टाकली की परत ती माकडं त्या नवीन टाकलेल्या कौलावर उड्या मारत असत. त्यात पुुन्हा कौलं फुटत असत व पुन्हा अख्खा पावसाळा अंंगावर कौलारातून गळणारं पाणी झेलत काढावा लागायचा. त्यामुळं घर बांधायचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न होतं त्यांचं. परंतू ते स्वप्न पुुर्ण झालं नव्हतं. प्रसंगी स्वप्न पाहणारा हिरासींग मृत्यू पावला होेता. घर तर झालं नाही, उलट फुटपाथवर राहावं लागलंं होतं.
सखूू विचार करीत होती. तसं तिनं ठरवलं. आपण यानंतर असं फुटपाथवर राहायचं नाही. आपण याच शहरात एक जागा विकत घ्यायची. अशी जागा की जी आपली हक्काची आहे. आता तर पोराच्या पैशाचीही हिंमत आहे.
तिला स्वतःच्या घराचा विचार आला. तशी आज कामाला जायचीही तिची इच्छा झाली नाही. ती त्या दिवशी जागाच विकत घेण्यासाठी फिरली.
ते शहर. त्या शहरात अनेक सोसायट्या उघडल्या होत्या. अनेक सोसायट्या घर बनवूून विकत होते. काहीजण जागाही विकत होते. काही ठिकाणी हप्त्यानुसार जागा विकत मिळत होती. तशी त्या दिवशी तिनं जागेची पुर्ण चौकशी केली व शहराजवळच त्या शहराला लागूनच असलेल्या एका सोसायटीत तिनं जागा विकत घेतली.
ती जागा.........त्या जागेसाठी तिनं काही पैसे भरले व काही पैसे हप्त्यानुसार द्यायचे मंजूर करुन तिनं त्या जागेची बुकींंग केली व अशाप्रकारे तिनं जागा मिळवली. याची रितसर चिठ्ठी मिळवून ती घरी आली. आज ती बरीच आनंदात होती. सायंकाळी ती त्याच फुटपाथवरील घरी आली. तिनं स्वयंपाक बनवला. स्वयंपाकात तिनं आज शिरा बनवला होता.
तो शिरा.......बरेच दिवस झाले होतेे. तिनं हिरासींग मरण पावल्यानंतर कधीच घरी गोडधोड बनवलंं नव्हतं. मात्र आज तिनं स्वयंपाकात शिरा बनवला होता. त्याचं आश्चर्य अरुणलाही वाटलं. त्यानं काही प्रश्नही विचारले. परंतू त्याचं उत्तर तिनं दिलं नाही. ते उत्तर तिनं द्यायचं टाळलं. तसा गोड असलेला तो शिरा खावून ते त्याही रात्री झोपी गेले. मात्र आज सखू फार फार आनंदी होती.
आनंदी असलेली सखू. ती झोपी गेली होती त्या रात्री उद्याचा विचार करीत करीत. तिला पुरेशी झोप येत नव्हती. जागा तर झाली होती. परंतू घर........ते घर केव्हा होईल याचा विचार ती करीत होती. तसा घर बांधण्याच्या कामावर ती जात असल्यानं तिला त्याचा अनुभव होता. तसा तिला एक विचार आला. आपण झोपडं बांधून राहूया. परंतू दुुसरा विचार आला. आपण झोपडं बांधू नये. आपण चांगलं मजबूत घर बांधावं. ज्यावर माकडं उड्या मारणार नाही. ज्या घरात ऊन, वारा, पाऊस आणि थंडी प्रवेश करणार नाही. जे घर सर्व गोष्टीनं सुरक्षीत असेल.
ते तिचं स्वप्न. तसा दुसरा दिवस उजळला. त्या दिवशी तिनं जागेच्या ताब्याचं पत्र मिळवलं. त्यानंतर तिनं ते पत्र मिळवताच दोन तीन दिवस ती थांबली. त्यानंतर त्या जागेवर एक कमरा बांधण्यासाठी तिनं एक ठेकेदार पकडला. त्याला त्या एका कम-याचा ठेका देवून तिनं घर बांंधण्याचा श्रीगणेशा केला.
 
***********************************************
 
घर बांधणे आहे असा ध्यास प्रत्येकांच्या मनात असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण मानव जन्म घेतला ना. मग एकतरी घर बांधावं. घर मोठं जरी नसलं तरी चांगलं असावं. त्यासाठी कोणी कर्ज काढत असतात आणि घर बांधत असतात. घर बांधण्यासाठी कोणी चो-याही करतांना पाहिले. कोणी सर्रास चोरीही करीत असतात.
घर बांधणा-यांच्या गर्दीत हवसे, नवशे व गवसेही असतात. हौसेे म्हणजे हौशीनं घर बांधणं. याचाच अर्थ असा की ज्यांना घर बांधण्यात आनंद वाटत असतो असे. नवशे अर्थात असे की जे माझंं घर बनावं यासाठी देवाजवळ साकडे घालतात असे आणि गवसे म्हणजे ज्यांना घर बांंधायची इच्छा नसते, परंतू जवळ जो पैसा असतो. त्या पैशाचा वापर कुठे करायचा असा प्रश्न असतो त्यांच्या मनात. तो पैसा खर्च करण्यासाठी अशी मंडळी घर बांधत असतात. घर बांधण्यातून अशा लोकांचा पैसा खर्च होत नाही. उलट काही काळानं जशी जागेची किंमत वाढते. तशी त्यांच्या घराचिही किंमत वाढत असते.
घर बांधण्यासाठी सर्वात प्रथम पकडावा लागतो इंजिनीयर. हा इंजिनीयर कोणतेच काम करीत नाही. फक्त नकाशा बनवतो व त्याला डिग्रीची एक सांक्षांत्कीत प्रत लावून तो नकाशा पास करुन देतो. बदल्यात एकूण रकमेतून टक्केवारीनं पैसे घेतो. तो शिकलेला असतो. त्याला काळ्याचं पांढरं कसं करायचं व पांढ-याचं काळं कसं करायचं ते सर्व समजतं. असा इंजिनीयर जेव्हा घराचं बांधकाम रितसर आहे की नाही याची पाहणी करतो. तेव्हा जे बांधकाम अवैध असतं. तेही मोजत असतो व जे बांधकाम अवैध असेल, ते तोडायला लावतो. या तोडफोडीमध्ये मालकाचं अतोनात नुकसान होतं कधीकधी.
इंजिनीयरनंतर ते बांधकाम बिल्डरच्या हातात जातं. ह्या बिल्डरकडे मजुरांची रांग असते. सा-याच प्रकारचे मजूर असतात त्याचेकडे. हे मजूर निष्णांत असतात. ह्या मजूरांसमोर इंजिनीयरनं बनवलेला बिल्डरकरवी नकाशा मिळताच तो नकाशा त्यांच्या अगदी तोंडपाठ होतो.
मजूरांमध्येही काही घटक असतात. सर्वात मोठा मजूर म्हणजे ठेकेदार. या ठेकेदाराकडे अनेक मिस्री असतात. जसे. सेंट्रींगचे मिस्री. जुळाईचे मिस्री, प्लॉस्टरचे मिस्री, प्लॉयवुडचे मिस्री, इलेेक्ट्रीकचे मिस्री, नळलाईनचे मिस्री, पेंटींगचे मिस्री, टाईल्सफिटींगचे मिस्री, रेलिंगचे मिस्री, पी ओ पीचे मिस्री. इत्यादी स्वरुपाचे मिस्री. हे सर्व मिस्री ठेकेदाराचे आदेश काटेकोरपणे पाळत असतात. कारण त्यांचं काम थोडंसं जरी चुकलं की त्यांचे पैसे कापलेे जातात त्यांच्या पगारातून.
या मिस्रीनंतर त्यांच्यानंतरचा असतो सामान्य मजूरवर्ग. ज्यांना कल्पकता मुळातच समजत नाही आणि समजतही असते तरी त्यांच्या कल्पकतेचा या घर बांधण्याच्या धंद्यात काहीही उपयोग नसतो. ते फक्त राबराब राबत असतात. त्यांच्याबाबत ठेकेदाराच्या मनात कोणतीच दयामाया नसते.
जेही श्रीमंत वा शिकले सवरले लोकं असतात. ते असे, इंजिनीयर पकडून घर बांधण्याची कामं करीत असतात. घर बांधण्याला हे लोकं डोकेदुखी समजत असून कोण आपल्यामागं अशी डोकेदुखी लावेल, याचा विचार प्रत्येकजण करीत असतो. यामुळंच ते घराचं बांधकाम इंजिनीयर लावून करीत असतात. काही लोकं बिल्डरला देत असतात तर काही लोकं ठेकेदाराला. घर बांधण्याच्या शर्यतीत कोणीही आपल्या पाठीमागं डोकेदुखी लावत नाहीत. ही सत्य बाब आहे. या शर्यतीत काही लोकं असेही असतात की जे आपल्या मागं डोकेदुखी लागू नये म्हणून फ्लॅट विकत घेत असतात आणि त्या फ्लॅटमध्ये विनाडोकेदुखीनं अगदी स्वतंत्र्यपणे राहात असतात. परंतू अशी फ्लॅटमध्ये राहात असलेली मंडळी आपल्या घराच्या वरच्या मजल्याचं बांधकाम करु शकत नाही. कारण त्यांना जागाच सिमीत असते. असे फ्लॅट श्रीमंत लोकंच विकत घेत असतात. काही मात्र गरीब असतात आणि जे गरीब असतात. ते लहानशी का होईना, जागा विकत घेत असतात व त्यावर बांधकाम करीत असतात. त्यातच अशा गरिबांच्या वाट्याला ती मंडळी जास्त पुढे जावू नये म्हणून त्यांचे पाय ओढणारे शेजारी भरपूर असतात. ते विनाकारणच्या काड्या करीत असतात त्यांच्या घर बांधण्यात. त्यांनी परवानगी मागितली की नाही, ते घर वांद्यात तर नाही, तसेच त्यांचं बांधकाम कसं थांबवता येईल. यासाठीही ते प्रयत्न करत असतात. त्यांच्याबाबत सांगायचं झाल्यास नकटीच्या विवाहाला सतरा विघ्न अशी त्यांची अवस्था असते.
पर्यायाने सांगायचं झाल्यास घर बांधणे हे काम अति सोपे वाटत असले तरी ते सोपे काम नाही. त्यातच त्या कामात जबाबदारी असते. कधीकधी घर बांधकाम करताना कर्ज काढावं लागतं, त्यावेळी कर्जाचे हप्ते वेळीच चुकवता न आल्यानं कर्जदार दारात येतात. तकादा लावतात व तसे कर्जाचे हप्ते वेळीच न चुकविल्यास किंवा न चुकवता आल्यानं घर निलामी करतात. त्यामुळे ज्या घरासाठी आपण एवढी त्रेधातिरपीट केली, ते घर अगदी डोळ्यासमोर विकलं जातं आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातून जात असतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास घर बाधावं आपण, बांधकाम करु नये असं नाही. परंतू घर बांधकाम करताना सर्व बाबी विचारात घ्यायला हव्यात. जेणेकरून ते बांधल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही व ते व्यवस्थीत बांधता येईल. तसेच कोणीही आपल्या दारात कर्ज मागण्यासाठी येणार नाही याची खबरदारी घेतलेली बरी. तसेच ही देखील काळजी घ्यावी की कोणी ठेकेदार वा इंजिनियर आपल्याला चिंताग्रस्त करणार नाही.
सखू खुश होती. कारण तिला ती राहणार असलेल्या जागेचा अधिकार मिळाला होता. ती खुश होती. कारण तिला आता घरही बांधता येत होतं. अधिकार मिळताच सखूनं एक ठेकेदार पकडला व तिनं घर बांधायचा ठेका दिला.
सखूला जागेचा अधिकार तर मिळाला. परंतू तिला कुडाचं घर बांधायचं नव्हतं. तिला एक कमरा का असेना, परंतू स्लॅबचं घर बांधायचं होतं. त्या पद्धतीनं ठेकेदाराला बोलणी करुन तिनं त्याचा ठेका ठोकमध्ये ठेकेदाराला दिला.
"मला एक कमरा बांधायचाय. सांगा, किती घ्याल?"
ठेकेदाराला असं म्हणताच ठेकेदारानं तिला सगळं सांगीतलं आणि म्हटलं की मी एक कमरा बांधून देणार. परंतू त्यासाठी मला आधी अर्धे पैसे द्यावे लागणार. सखूनं त्यावर विचार केला व होकार देत त्याला अर्धे पैसे दिले.
सखूनं त्या ठेकेदाराला पैसे देताच त्यानं काम सुरु केलं. त्यातच ते काम मट्रेलसह असल्यानं ते बांधकाम करीत असतांना ठेकेदारानं फक्त चार पिल्लर टाकले व म्हटलं की एक कमरा बांधून झाला. त्यातच बांधकाम मट्रेलसह असल्यानं ते बांधकाम करतांना मट्रेलही व्यवस्थीत वापरले नाही. शेवटी आणिबाणीचा प्रसंग निर्माण झाला. त्यावर उत्तर देतांना ठेकेदारानं म्हटलं,
"आपण एक कमरा सांंगीतला होता. झाला एक कमरा बांधून."
"म्हणजे चारच पिल्लर का? त्या पिल्लरला लागून भिंती? त्या भिंतीही आपण बांधल्या नाहीत. तसेच स्लॅबही टाकली नाही आपण?"
"तुम्ही तशी बोलणीच केली नव्हती."
 
***********************************************
 
सखूनं घर बांधणे सुरु केले होते. त्यानंतर ते काम ठेकेदारानं घेतलं होतं. सखूनं एकच कमरा. परंतू तो स्लॅबचाच असावा अशा स्वरूपाचा ठेका दिला होता. ठेकेदारानंही तिला होकार दिला होता. सगळं काही ठीक चाललं होतं. अशातच ठेकेदारानं म्हटलं की तुमचं काम झालं.
ठेकेदाराचे ते शब्द. सखूनं आपल्या घराची पाहणी केली. त्या पाहणीनुसार तो एक कमरा नव्हताच. त्या ठेकेदारानं त्या कम-यासाठी चार पिल्लर तर उभे केले होते. परंतू त्या पिल्लराला विटांनी जोडलं नसल्याने तो भाग उघडाच होता. त्याला पुरेसं आच्छादन नव्हतं. स्लॅब झाली होती. परंतू बाजूला आच्छादन नसल्यामुळे त्याला एक कमरा म्हणता येत नव्हता.
सखूनं ते बांधकाम पाहिलं. तिच्या लक्षात ती गोष्ट आली. त्यानंतर ती म्हणाली,
"हे काय घर झालं. आपण चार पिल्लरं टाकली. परंतू विटा चारही बाजूनं भोवताल लावल्या नाहीत. तेव्हा आपण त्या विटा लावाव्यात व मला एक कमरा परिपूर्ण बनवून द्यावा."
तिचं ते बोलणं. त्यावर ठेकेदारानं म्हटलं,
"कसं बोलता आपण. आपण जे बोलले होते, त्यानुसार एक कमरा झाला. अन् आपला ठेकाही."
"होय, परंतू चारही बाजूंनी ज्या भिंती हव्यात. त्या कुठे आहेत? मी कमरा म्हटला होता एक. तो कुठाय?"
"कमराच बनला न् जी."
"मग त्याला विटा कुठाय अन् विटाच्या भिंती. विटाच्या भिंती नाही तर त्याला कमरा कसा काय म्हणता येईल बरे."
"विटा तुम्ही लावा गरज असेल तर. नाहीतर पोते लावा बाजूला. मला परवडलं नाही काम घ्यायला. वाटल्यास उरले पैसे नसेल द्यायचे तर नका देवू. परंतू आपलं जेवढं बोलणं झालं, तेवढं काम केलं आहे मी. मी आपल्या बोलण्यानुसार एक कमरा तयार करुन दिला आहे आपल्याला. आता आपण त्याला आडपडदा म्हणून पाट्या लावू शकता. पोते लावू शकता किंवा विटाही लावू शकता आणि विटा लावायच्या असतील तर त्याचे वेगळे पैसे पडतील. तसं ते काम मलाच दिलं पाहिजे असं नाही. आपण कोणालाही देवू शकता ते काम आणि माझे पैसे तेवढे द्या. त्यावर विचार करा." ठेकेदारानं म्हटलं व तो चालता झाला.
ठेकेदार निघून गेला होता. तसा सखूला विचार आला. 'आपला डाव फसला. आपण याला जेवढे यानं पैसे मागीतले. तेवढे पैसे दिले. ते पैसे जास्त दिले. त्याला एक कमरा बनवायला सांगीतला. तो तर बनवलाच नाही. उलट हा पैसे मागायला आला. वरुन कामंही पुर्ण झालं म्हणतो. फक्त चार पिल्लर टाकल्यानं व भिंती न बांधल्यास कमरा तयार होतो का? परंतू कोण सांगणार या मुर्खाला. हा म्हणतो कमरा बनला. आता काय करावं. जेवढं बांधकाम झालं, त्याहीपेक्षा जास्त पैसे दिले मी याला. तरीही हा म्हणतो की आणखी पैसे द्या. तेही द्यायचे असेल तर द्या, नाहीतर नाही. कसं करावं. पैसे द्यावे की नाही. काम तर पुर्ण झालं नाही.'
सखूचा तो विचार. तसं तिनं ठरवलं. 'कामच झालं नाही, मग पैसे कशाला द्यायचे. पैसे काय झाडाला लागतात. आता येवू दे त्याला. चांगलाच समाचार घ्यावा लागेल.'
सखूचा तो विचार. तसा तो ठेकेदार घरी आला. तो घरी येताच उरलेले पैसे मागू लागला. तशी ती म्हणाली,
"पैसे कसे द्यायचे तुम्हाला? तुम्ही माझे कोणते काम पुर्ण केले? माझं घरही पुर्ण केलं नाही तुम्ही?"
तिचं ते बोलणं. ते बोलणं अगदी खरं होतं. त्यामुळे तो काहीच बोलला नाही. तो पुरता निघून गेला. त्यानंतर पैसे समाप्त होताच सखूनं भिंती टाकायचा नाद सोडून दिला होता व त्यानंतर तिनं सिमेंटची पोती विकत घेतली. त्या पोत्यांना फाडून व त्या शिवून सखूनं त्या पोत्यांची चटई तयार केली व ती चटई दोन्हीही पिल्लरला बांधून तिनं त्याच्या भिंती तयार केल्या.
ते पावसाळ्याचे दिवस. ते पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात ढग गोळा झाले होते. त्यामुळे पाऊस धो धो कोसळत होता. त्यातच तो धो धो पडणारा पाऊस ती सिमेंटची बनविलेली ताडपत्री झेलत नव्हती. ती त्या पावसानं फाटली व त्यामुळे ते सर्व पावसाचं पाणी आतमध्ये प्रवेश करत होतं.
ती बनविलेली ताडपत्री फाटली होती. त्यामुळं समस्या निर्माण झाली होती. समस्या अशी होती की ते पाणी आत यायचं आणि त्या पाण्यानं ती ताडपत्री फाटली.
ती फाटलेली ताडपत्री पाहून सखूला विचार आला त्या ठेकेदाराचा व तिच्या तोंंडातून सहजच शब्द फुटले. 'बिचा-या मुदड्या, तुुझं कधी भलं होणार नाही.'
पावसाळा संपला होता. हिवाळा लागला होता. तसा हिवाळा लागताच थंडी सुुरु झाली होती. यावेळी कडक थंडी होती. ती अधीकच वाटत होती. त्यातच ती ताडपत्री फाटल्यानं ती थंडी अधीक वाटत होती.
तो बाहेरचा परीसर. जेव्हा ती शहरातील दाट वस्तीत रस्त्यावर राहात असे. ती फुटपाथवर जरी राहात असली तरी ते शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्यानं तिला ती थंडी वाटत नव्हती. परंतू तिनं आता जिथं घर बांधलं होतं. ते घर शहरातील उघड्या भागात असल्यानं तिथं अति थंडी वाटणे साहजीक होतं. शेवटी तिनं विचार केला. आपल्याला थंडी वाजते ना. ती थंडी जर रोखायची असेल तर आपण काड्या आणाव्या. त्या काड्यांंचा कुुळ बनवावा व जशी नारळाच्या झावळ्यांची भिंत तयार करतात. तशी भिंत तयार करावी.
आज तिनं जेे काही थोडे पैसे गोळा केले. त्या आधारावर तिनं काड्या आणल्या. काही वेळूही विकत आणले. त्या वेळवाळा दोन भागात विभाजीत केलं व त्या काड्यांपासून घराच्या चारही बाजूंच्या भिंती तयार केल्या.
भिंती......त्या भिंती तयार झाल्या होत्या. त्या भिंतींवर तिनं आतमधून मातीचा गिलावा दिला. त्यानंतर तिनं त्या भिंतीची रंगरंगोटी केली व तिला सजवलं. आता ते घर, घरासारखं वाटत होतं.
ते घर, घरासारखं बनताच अरुण आता आपल्या मित्रांना आपल्या घरी आणू शकत होता. कारण तोही आता शहरातील त्याच्या महाविद्यालयातील मुलांच्या रांगेत बसू शकत होता.
अरुणच्या आईनं अपार मेहनत करुन एक कमरा चांगल्याप्रकारे तयार केला होता. तो आपल्या मित्रांनाही आपल्या घरी आणू शकत होता. परंतू ती सई......त्याला सईला घरी आणायचे होते. त्यानं घरी नेत नाही म्हटल्यानं ती सई त्याचेशी बोलत नव्हती.
एक कमरा आता तयार झाला होता. परंतू सई ब-याच दिवसापासून बोलत नव्हती. कारण आपण तिला आपलं घर नसल्यानं आणू शकलो नसल्यानं ती बोलत नव्हती. परंतू आता आपण बोलायचं. तिनं जर म्हटलं तर आपण तिला घरी आणायचं त्यानं ठरवलं. तसा निश्चय करुन एक दिवस संधी साधून अरुण तिला म्हणाला,
"सई, एक काम आहे. जरा बोलशील का माझ्याशी?"
त्याचा तो प्रश्न. तिनं इकडं तिकडं पाहिलं. तिचा चेहरा रागावलेला होता. तसा तो म्हणाला,
"स्वारी सई, परंतू मला कळत नाही की तूू माझ्याशी का बोलत नाही. काय कारण आहे. या विषयावर बोलायचं आहे तू वेळ काढशील सवडीनं विचारविमर्श करण्यासाठी." तो म्हणाला. तसा तोही बोलला नाही हे पाहून सई म्हणाली,
"ठीक आहे. आता चलतोस. आता सवड आहे मला."
अरुणलाही वेळच होता. तसा तो तिच्याशी बोलण्यासाठी तयार झाला व तो तिला घेवून एका रेस्टॉरेंटमध्ये गेला. त्यातच त्या रेस्टॉरेंटमध्ये त्यांचं बोलणं सुरु झालं होतं.
ते रेस्टॉरेंट. त्यानं विचारलं. "सई काय घेणार गं?"
"कॉफी घेवूया."
अरुणनं कॉफीचा आर्डर दिला. तशी सई म्हणाली,
"अरुण, आज कशी काय आठवण झाली?"
"मी दररोजच आठवण करीत होतो तुझी. परंतू तूच बोलत नव्हती ना. माझीही हिंमत होत नव्हती तुझ्याशी बोलायची."
"मग आज कशी झाली बोलायची हिंमत?"
"आज विचार केला आणि हिंमतही केली मी की आज आपण सईशी बोलावं. शेवटी मी बोलका झालोय."
"छान केलंय. परंतू मला सांग की तू माझ्याशी का बोलत नव्हता?"
"अगं, तूच तर बोलायचं टाळलं. आठव तू. तू मला माझ्या घरी नेण्याविषयी हट्ट करीत होती. परंंतू मी नेवू शकत नाही म्हटल्यावर तू टाळलं होतं मला आणि टाळतही होती मला."
"मी टाळत होती!" ती आश्चर्यानं म्हणाली.
"हो तूच आणि एक सांगू. तू जेव्हा माझ्या घरी येतो म्हणाली. तेेव्हा माझं घरंच नव्हतं. मी तेव्हा फुटपाथवर राहात होतो."
"फुटपाथवर! म्हणजे?"
"रस्त्यावर. रस्त्यावर राहात होतो आम्ही. मी अगदी खरं खरं सांंगतोय."
"आणि आता?"
"आता जागा घेतली आम्ही. हक्काची जागा. याच शहरात राहतो आम्ही आणि एक कमराही बनवला आम्ही."
"मला नाही वाटत की तुला राहायला घर नव्हतं . तू फुटपाथवर राहात होता."
"सई, मी अगदी खरंच सांगतोय."
"माहीत आहे,अरुण, मला तुझ्यातील हा खरेपणाच आवडतोय. मला माहीत होतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. कदाचीत हेच असेल. म्हणूनच मी सत्य जाणून घेण्यासाठी तुझ्या घरी येतो म्हटलं."
"होय सई, ही सत्य गोष्ट आहे. जर तुला राग आला असेल तर क्षमा कर. मी सत्य सांगीतलं. तुला सत्य माहीत होणं गरजेचं होतं."
"हो का."
"होय."
"मला तूझं आताही तेच आवडलं."
ते तशा गोष्टी करीत होते. तशातच कॉफी आली. त्यांनी कॉफी प्राशन केली व ते तेथून निघाले.
सई त्या दिवशीपासून त्याचेशी बोलायला लागली होती. तो सत्य बोलल्यानं तिला तो आवडायला लागला होता. हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण होवू लागलं होतं.
सईला अरुण आवडत होता. त्यानं सांगीतलेली वास्तविकता त्याला मनाला भावली होती. ती वास्तविकता तिच्या विचाराला दुभंगू देत नव्हती. ती वास्तविकता रमणीय अशा स्वरुपाची होती.
आज तिचं निर्माण झालेलं अरुणवरचं प्रेम वाढत चाललं होतं. त्यातच तिचं त्याचे घरी येणं जाणंही सुरु होतं. ते येणं जाणं सुरु असल्यानं प्रेमही वाढणं साहजीक होतं.
आज त्या प्रेमाची आण बाण शान असलेली सई, तिच्या मनात त्याचेविषयी किंतू परंतू नव्हता. तिला आपली चूक कळून आली होती.
एकदा सई म्हणाली,
"अरे अरुण, याला भिंती का बरं टाकून घेत नाहीस."
"टाकणार. परंतू आता पैसे नाहीत." अरुण म्हणाला.
"पैसे हवे का?"
"होय. अगं भिंती जर बांधायच्या असल्या तर पैसे नको का आपल्याजवळ. पाहिजेत की नाही."
"होय, तेही बरोबरच आहे. पैसे लागतात तर."
"पैसे लागतातच. विटा, सिमेंट, रेती, गिट्टी आणि मजुरी याला पैसे लागतात ना."
"होय."
"तेवढा पैसा नाही आमच्याजवळ."
"मी देवू का थोडा?"
"तू देणार! कुठून देणार?"
"माझ्या वडीलांना मागून. माझे वडील देतात मला पैसे. ते विचारत नाहीत की कशाला लागतात पैसे ते."
"नको. नको मागूस आपल्या वडीलांना. मी स्वतःच गोळा करणार पैसे व बांधणार घर."
"ठीक आहे. मी नाही मागणार पैसे. तू स्वतःच बनव घर."
सईनं ऐकलेलं त्याचं उत्तर. तिला ते उत्तर ऐकून राग आला नाही. तिला अतिशय चांगलं वाटत होतं त्याबद्दल. त्याचा स्वाभिमान तिच्या आकर्षणाला जागृत करीत होता.
अरुण आताही कचरा वेचायला जात होता. त्याला त्याबद्दल आता बरं वाटत नव्हतं. तरीही तो करीत होता ते काम. आता त्या कामात त्यानं बदल करायचा विचार केला. त्यानं आता लोहा लोखंड विकण्याचा धंदा लावला. त्यासाठी त्यानं वजन काटा घेतला.
अरुणनं लोहालोखंडाचा धंदा लावला. तो धंदा लावण्याचा त्याचा उद्देश होता. त्याला त्या धंद्यातून पैसा कमवून घराच्या भिंती टाकायच्या होत्या.
धंदा लावला खरा. परंतू त्या धंद्याचा अनुभव नसल्यानं तो धंदा बंद करावा लागला. शेवटी तो पुन्हा कचरा वेचायचं काम करायला लागला.
तो पुन्हा ते काम करायला लागला. परंतू आता तो बारावी पास झाला असल्यानं व त्यानं उच्च शिक्षणासाठी फॉम भरला असल्यानं त्यानं ते काम बंद केलं व तो आपल्यासाठी नवीन काम शोधू लागला आणि शिक्षणही शिकू लागला.
आज शिक्षण ही काळाची गरज होती. त्याबरोबर काम करणं ही देखील काळाची गरज होती. त्यानं नवीन कामासाठी शोधाशोध केला. त्याचबरोबर तो एका कपड्याच्या दुकानात लागला.
अरुण एका कपड्याच्या दुकानात लागला. त्याचबरोबर त्याला पैसे मिळू लागले . तशी त्याची आईही काम करीतच होती. तसे दोघांचेही पैसे येत होते.
दोघांचेही पैसे येत होते. त्यातच त्या घराच्या भिंती बनवायला अरुण पैसे गोळा करीत होता. हळूहळू ते पैसे गोळा होताच त्यानं भिंती बांधायचा आर्डर दिला. त्यानुसार भिंती बांधल्या जावू लागल्या.
अरुणनं बांधलेल्या भिंतीनं त्यांचं थंडी, ऊन वा-यांपासून संरक्षण होवू लागलं. तसं घरंही चांगलं दिसू लागलं.
अरुणचं ते घर. ते घर नाही तर तो एक कमरा होता. परंतू तो कमरा त्यानं मेहनतीनं बनवला होता. त्यासाठी त्या सखूनं काबाडकष्ट केले होते. त्यासाठी ती कधी एकवेळ उपाशी राहून तिनं आपल्या मुलाचंं घराचं स्वप्न पुर्ण केले होते.
आज परिपुर्ण असलेला तो समाज. तो समाज तिला मदत करीत नव्हता कोणतीही. कारण आता त्यांच्यावर नियतीनं पाठ फिरवली होती. त्यांची परिस्थिती वाईट होती. कोणीच येत जात नसत त्यांच्या घरी. कारण ते गरीब होते.
अरुण शिकतच होता नवी उमेद घेवून. त्यातच त्याचं स्वप्न होतं मोठं घर बांधायचं. जेव्हा त्याला असे घराचे विचार यायचे. तेव्हा त्याला त्याचा बाप आठवायचा. त्याच्या बापाचेही स्वप्न होते घर बांधायचे. तसंच त्याला आठवत असे त्याचं बालपण. अरुण जेव्हा लहान होता, तेव्हा ते माकडं यायचे गावात आणि घरावर उड्या मारत असत. त्यात अक्षरशः कौलाचे तुकडे पडत असत. त्यातून थेंब थेंब टपकणारे पावसाचे पाणी पाहिले होते अरुणनं. अरुणनं ते भिजलेलं अंथरुण पाहिलं. त्यातच पाहिली त्यानं ती फुटपाथवरील जिंदगी. ती म्हणत असे की फुटपाथवर राहणा-या माणसा, आधी एक लहानसं का होईना, घर बांध.
अरुण आज शिकत होता उच्च शिक्षण. तो एकाच कम-यात राहात होता. परंतू उच्च शिक्षण शिकत होता तो. त्याचं स्वप्न होतं. स्वप्न उच्च होतंं. ते स्वप्न म्हणजे त्याला मोठं घर बांधायचं होतं. त्यासाठी तो छोटी मोठी नोकरी करीत होता. परंतू त्या छोट्या मोठ्या नोकरीवरुन त्याला घर बांधता येत नव्हतं. मात्र त्याची आई त्याच्यासाठी अपार मेहनत करीत होती. अपार मेहनत करुन शिकवत होती. त्याच्या सुखासाठी तिची ऐपत नसतांनाही तिनं घर बांधलं होतं. मग तो एक कमरा का असेना.
आज सखूनं एक कमरा बनवला होता. तिची जेवढी ऐपत होती तेवढ्या ऐपतीनं तिनं जीव ओतला होता. आज तिनं आपल्या लेेकराला त्याला महाविद्यालयात वाटणारी लाज वाचविण्यासाठी तिनं फुुटपाथवरुन त्याला स्वतःच्या जागेवर बसवले होते.
आज त्यांचा एक कमरा का होईना, त्या कम-याच्या रुपानं त्याचं एक घर बनलं होतं.
अरुणच्या मनात एक स्वप्न होतं. ते स्वप्न म्हणजे त्याला घर बांधायचं होतं. त्यासाठी त्याला उच्च शिक्षण शिकणं आवश्यक होतं. त्यासाठी तो आय ए एस ची तयारी करीत होता. त्यातच ती तयारी करीत असतांना वर्तमानपत्रही वाचत होता.
वर्तमानपत्र.......त्याची ऐपत नसल्यानं ते घरी येत नव्हतं. त्यामुळं तो जिथं ते वर्तमानपत्र येत असेल, तिथं तो वाचत होता. त्यात येणा-या माहितीची टिपणं काढत होता नव्हे तर त्यात येणारी माहिती यथायोग्य पद्धतीनं संग्रहीत करीत होता. त्याला शिकायचं होतं उच्च शिक्षण. म्हणूनच तो वर्तमानपत्र वाचत होता सर्वकष माहिती मिळविण्यासाठी.
वर्तमानपत्र देशाचा आरसा वाटत होता त्याला. त्याबद्दल त्याच्या मनामध्ये शांसकता नव्हती.
 
************************************************
 
वर्तमानपत्र तसं पाहता देशाचा आरसा आहे. कारण ते वर्तमानपत्र आपल्याला राजकीय घडामोडींची माहिती देत असते. कुठे पूर आला, कुठं भुकंप आला, कुठं महामारी आली आणि कुठं भुस्खलन झालं याची पुरेपूर माहिती देत असते. एखाद्या वेळेस मिडीया अर्थात दूरसंचार साधनं खोटी माहिती प्रसारीत करू शकतील, परंतू वर्तमानपत्र ती माहिती प्रसारीत करु शकत नाही. कारण सोशल मिडीया अर्थात दूरसंचार साधनांची माहिती टिकत नाही. परंतू वर्तमानपत्रातील दृश्य हे अनेक दिवसपर्यंत जतन करता येत असल्याने त्यातून खोट्या बातम्या प्रसवता येत नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास वर्तमानपत्र प्रेरणा देण्याचं काम करीत असतात.
सोशल मिडीया एक जबाबदार घटक. माहिती संप्रेषणाचं एक प्रभावी माध्यम. परंतू पारदर्शक माध्यम नाही. त्या मिडीयावरुन क्षणात माहिती मिळत असते. परंतू जी माहिती मिळते. त्यामध्ये तेलमीठ, मालमसाले टाकल्यागत रोचक मसाला घालून तो मुद्दा गाजवला जातो. त्यातच काही भाग असं प्रकरण गाजवत असतांना त्यात काही खोट्या गोष्टींचाही भरणा केला जातो. अशी मालमसाला टाकलेली बातमी फार काळ टिकत नाही. ती लवकरच कालबाह्य होते.
अलीकडे सोशल मिडीया विकलेली एक वास्तूच आहे. जसं जी वास्तू वा एखादी इमारत आपण खरेदी करतो. त्या वास्तू वा इमारतीचा उपभोग आपण आपल्या मतानुसार आपल्या आपल्या परीनं जसा घेत असतो. तसाच उपभोग काही राजकारणीही सोशल मिडीयाचा घेत असतात. ते अशा सोशल मिडीयाला विकतच घेवून टाकतात. ही वास्तवीकता आहे. आज अशाच प्रकारचं कार्य प्रत्येक राजकीय पक्ष करीत असलेला आपणास दिसत आहे.
वर्तमानपत्र मात्र तसं नाही. वर्तमानपत्रात सर्वच भाग जो छापून येतो. तो सत्य असतो. तो भाग बहुतेक स्वरुपात असत्य राहात नाही. तसंच सोशल मिडीयासारखाच हा भाग विकलाही जात नाही. परंतू हे जरी सत्य असलं तरी आजचं वर्तमानपत्र आपला दर्जा टिकवतांना दिसत नाही असं दिसतं. आजचं वर्तमानपत्र हे विकलं जातं असंही दिसतं आणि आजच्या वर्तमानपत्रावरुन असं दिसतं की ह्या वर्तमानपत्राला प्रत्यक्ष कोणीतरी राजकीय पक्षानं विकत घेतलेलं असावं. त्या पद्धतीने ते कार्य करीत असतात.
तसं पाहिल्यास वर्तमानपत्राला लोकशाहीचा पहिला स्तंभ मानण्यात येतो. तो लोकशाहीचा चवथा स्तंभच आहे. कारण त्या स्तंभातून न्याय मिळत असतो. असा न्याय की त्यातून लोकशाही जागृत राहू शकते. समजा एखाद्यावर अन्याय झाला आणि त्याला न्याय जर मागायचा असेल तर हा लोकशाहीचा चवथा स्तंभ काम करीत असतो आणि त्याला न्याय मिळतोही. परंतू काही काही आजच्या काळातील हेच लोकशाहीचे चवथे स्तंभ हे आपले कार्य बरोबर करीत नसल्याने आजच्या काळात या लोकशाहीच्या चवथ्या स्तंभावर सांशकता निर्माण झाली आहे. त्यामुळं विशेष सांगायचं म्हणजे ज्याला आपण लोकशाहीचा चवथा स्तंंभ समजतो. ज्याला आपण आपल्या स्वतःच्या संरक्षणाचा स्तंभ समजतो. त्या लोकशाहीच्या स्तंभानं काळजी घ्यायला हवी. त्यानं कोणाच्या दबावात न येता कार्य करावे. तसेच कोणाच्या दडपणात न येता सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावे. जेणेकरुन लोकांना या चवथ्या स्तंभावर विश्वास वाटेल व लोकांमध्ये शांसकता निर्माण होणार नाही. लोकांना तो देशाचा आरसा वाटावा असं कार्य वर्तमानपत्रानं करायला हवं. वर्तमानपत्रानं पारदर्शक असायला हवं त्याचबरोबर निर्भीडही हे तेवढंच खरं आहे.
आय ए एस बनण्यासाठी त्याला पुस्तकांची गरज होती. परंतू पुस्तक मिळवून अभ्यास करायचा कुुठून? हा प्रश्न त्याचेसमोर होता. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या होत्या. परंतू अरुणची नव्हती. त्यामुळं तो वर्तमानपत्र वाचत होता रस्त्यारस्त्यावर व ती पुस्तकांची गरज भागवत होता. दुधाची तहान ताकावरच भागवतात तशी.
आय ए एसची तयारी. बाकी मुलांनी शिकवण्या लावल्या होत्या. परंतू तेवढे पैसे नव्हतेच अरुणजवळ. त्यामुळं कशी तयारी करावी ते त्याला कळत नव्हतं. परंतू तो तरीही कधी वर्तमानपत्र वाचून तर कधी आपल्या आजुबाजुला असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुस्तका वाचून तयारी करीत होता. अशातच ती परिक्षा झाली व तो पास झाला.
अरुण आय ए एसची कठीण परिक्षा पास झाला होता. त्याला नोकरीही लागली होती. त्यातच त्याला मोठा बंगला व एक चारचाकी गाडीही मिळाली होती.
ते घर....... ज्या घराचं त्यानं स्वप्न पाहिलं होतं. ते घर मिळालं होतं त्याला. ते घर प्रशस्त होतं. परंतू ते घर त्याचं हक्काचं नव्हतं.
अरुणला नोकरी लागताच त्यानं जुनं घर सोडलं व तो आपल्या आईला घेवून या नव्या घरात आला. त्याचबरोबर त्याचं घराचं स्वप्न पुर्ण झाले. त्याच्या आईचीही इच्छ पुर्ण झाली. तिचं स्वप्न होतं की आपला मुलगा चांगला शिकावा व आपलं एक सुंंदर घर असावं.
आज अरुणची आई सुखात होती. कारण तिची इच्छा पुर्ण झाली होती. त्याचबरोबर तिला घरंही मिळालं होतं. तिचा मुलगा शिकला होता. त्याच शिक्षणानं त्यानं मोठी इमारत व चारचाकी गाडी मिळवली होती. त्याचबरोबर सर्व ऐषआराम.
अरुणची आई खुश होती. परंतू अरुण खुश नव्हता. त्याला घर मिळालं होतं. परंतू ते काही त्याचं हक्काचं घर नव्हतं. ते घर नोकरीसाठी मिळालं होतं व नोकरी संपताच ते घर परत करावं लागणार होतं. त्यामुळं त्याला ती आठवण येताच त्याला कसनुसं वाटत असे. शेवटी त्यानं ठरवलं. आपण हक्काचं घर बांधावं.
सई आजही येत असे त्याच्या घरी. सईनं त्याला बरीच मदत केली होती त्याच्या शिक्षणासाठी. तिनं त्याची आय ए एसची तयारी करुन घेतली होती. प्रसंगी ती आय ए एस झाली नाही. परंतू त्याच्या आय ए एस बनण्यात तिचाच मोलाचा वाटा होता. तिच्याच पुण्याईचा प्रताप म्हणजे तो आय ए एस झाला होता. ती त्याला नोट्स काढून देत असे व ते नोट्स लिहूनही देत असे. व्यतिरिक्त तिनं केलेली पैशाची मदत ही अतुलनीय होती. कधीकधी ती वाचनालयातून त्याला पुस्तक आणून देत होती. कारण त्याच्याजवळ वाचनालयात अभ्यास करण्यासाठी व तेथील शुल्क भरण्यासाठी पैसे नसायचे. परंतू ती त्या वाचनालयाची सदस्या होती. ती शुल्क रुपात पैसे भरुन त्या पैशानं ती वाचनालयाची पुस्तकं आणत असे व अरुणला देत असे. कधीकधी ती आपल्या घराकडील मुलांकडूनही अभ्यासासाठी त्याला पुस्तका आणून देत असे.
सईचं त्याचेवर निरतिशय प्रेम होतं. तो सईसोबत फिरतही असे. परंतू अद्यापही त्यानं तिच्याशी विवाह केला नव्हता. ती त्याचेसोबत फिरायला जात असे. परंतू त्यानं म्हटलं होतं की तो तिच्याशी विवाह करेल, परंतू त्याचं आय ए एस झाल्यावर. आज त्याचं आय ए एस झालं होतं. ते तिचेच उपकार होते. ते उपकार तो विसरु शकत नव्हता. त्याचा विश्वास होता तिच्यावर. तसं पाहता अगदी तसंच घडलं होतं. तिनंही अजूूनपर्यंत विवाह केला नव्हता.
सईनं अजूनपर्यंत विवाह केला नव्हता. ती तशी अविवाहीत असली तरी ती घरी येत होती अरुणच्या. तसं त्यानं म्हटल्यानुसार ती अजूनही अविवाहीतच होती. तसा तिनं विचार केला की आपण त्याच्याशी विवाह करावा. तसा एक दिवस तो उजळला असता जेव्हा ती त्याला भेटली. तेव्हा ती त्याला म्हणाली,
"आपण असं केव्हापर्यंत भेटत राहायचं. आता तुझं आय ए एस झालं. आतातरी आपण विवाह करायचा."
सईचं ते बोलणं. ती मनातून बोलून गेली. तसा तो म्हणाला,
"कोणता विवाह? कोणाशी विवाह? मी काही तुझ्या लायकीचा नाही."
"म्हणजे?"
"मी आय ए एस आहे. मला माझ्या लायकीच्याच मुलीशी विवाह करायचा आहे. तूझी लायकी आहे का माझ्याळी विवाह करायची?"
"मग आतापर्यंत जे होतंं, तो फक्त टाईमपास होता का?"
"हो, असंच समज." तो म्हणाला.
अरुणच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी. सईला त्याचा भयंकर राग आला. तिला जुनं सगळं आठवलं. वाटलं की अरुण लय बदलला. तो आय ए एस बनलाय ना. मग आय ए एस बनल्यावर मी कशी त्याच्या लायक असणार. त्याला आता आय ए एसच मुलगी लागणार
सईला सगळं आठवत होतं. तिनं त्याला केलेली मदतही आठवत होती. त्याचबरोबर आठवत होत्या त्या जुन्या आठवणी. ज्या जुुन्या आठवणीनं तिच्या मनातील राग अति तीव्र होत होता. तसे ते बोललेले शब्द. त्यावर तशी ती रागानंच म्हणाली,
"ते टाईमपास होतं ना. मग आजपासून बोलायचं नाही माझ्यासोबत. कधीच बोलायचं नाही."
असं म्हणत ती झटक्यानं निघाली. ती झपाझप पावलं टाकू लागली. मनात मात्र तिच्या अनंत विचार होते.
 
************************************************
 
सई घरी निघून गेली होती. त्यानं बोललेले शब्द तिच्या ह्रृदयाला बोचूून गेले होते. तिला त्याचा भयंकर राग आला होता. ती घरी आली, तशी अंथरुणात फार फार तीव्रतेनं रडत बसली. तिला त्या सर्व आठवणी आठवत होत्या. त्या आठवणीच तिच्या दुःखाला उजाळा देत होत्या. तिला आत्महत्याही करााविशी वाटत होती. त्याचबरोबर तिला आठवत होते ते तिच्या आईनं म्हटलेले शब्द. तिची आई नेहमी म्हणत असे की आता तरी तिनं विवाह करावा. तो काही तुुझ्यासोबत विवाह करणार नाही.
तिच्या आईचं बोलणंं अगदी खरंं झालं होतंं. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार ती झोपडपट्टीत राहणारी न फुटपाथवर राहणारी माणसं. अति गरीबीनं पिछाडलेली माणसं.........जेव्हा दिवस निघून जातात ना त्यांचे. त्यांचे चांगले दिवस येतात ना. तेव्हा ते जुनं सारंच विसरतात. त्या आठवणीही विसरतात. त्यामुळं अरुण कितीही सांगत असला की मी तुझ्याशी विवाह करणार. परंतू तो निव्वळ टाईमपास आहे. तसं वैगेरे काही नाही. तो काही विवाह करणार नाही आणि माझा त्यावर विश्वास नाही.
सईच्या आईनं म्हटलेल्या गोष्टी. त्या अगदी ख-या झाल्या होत्या. तिची आई अगदी खरं खरं सांगत आली होती आजपर्यंत. आज तिची वाणी अगदी खरी झाली होती.
सायंकाळ झाली होती. सईचं ओक्साबोक्सी रडून झालं होतं. त्यातच आता लई अंथरुणातून उठली. तिला अशक्त वाटत होतं. आपला फार मोठा अपघात गत काही दिवसापुर्वी झालेला असून आता आपण बरे झालो आहोत असं तिला वाटत होतं. तशी ती उठली. तिनं आपलेे डोळे पुसले व डोळ्यावर खूप पाणी मारलं. त्यानंतर तिनं ते डोळे टॉवेलनं पुसले व बाहेर पडली. तशी तिला बाहेर अंगणात तिची आई एका खुर्चीवर बसलेली दिसली. तशी ती आपल्या आईजवळ बसली. म्हणाली,
"आई, मला विवाह करायचाय."
सईचे ते शब्द. तसं तिच्या आईला ब-याच दिवसापासून माहीत होतं की आपली सई ब-याच दिवसापासून अरुणवर प्रेम करीत असून ती त्याचेळीच विवाह करणार आहे. तो आय ए एस ची तयारी करीत असून त्याला अभ्यासात व त्याची तयारी करवून घेण्यासाठी तीच मदत करीत आहे. ते माहीत असल्यामुळं सईची आई तिला म्हणाली,
"सई काय झालं? अशी उदास का? अन् तू तर त्या अरुणशी विवाह करणार होती ना. मग आता काय झालं? का, अरुणनं तुला काही म्हटलं का? का, अरुण विवाह करण्यासाठी तयार नाही का? का, अरुणनं तुला धोका दिला का?"
आईचे ते शब्द. तशी सई म्हणाली,
"आई, जावू दे त्या सर्व गोष्टी. तू माझा विवाह करुन दे म्हणजे झालं. मला एखादा भिकारी भेटला तरी चालेलं."
सई तिच्या मनातील गोष्ट बोलून गेली. तसं तिच्या आईनं बाकी संवाद न करता त्या गोष्टीवर विचार केला व रात्री त्या गोष्टी तिच्या बापाच्या कानावर टाकल्या व ते जोडपं सईचा विवाह करण्यासाठी तिच्यायोग्य वर शोधू लागले.
 
**********************************************
 
अरुणचं स्वप्न होतं. जणू ते दिव्य स्वप्न. अरुणचं तिला दिलेला नकार. त्या नकारानं तिला फार राग आला. त्या रागाचाच परिणाम की काय, सई दुस-याशी विवाह करायला तयार झाली.
अरुणला माहीत होतं की आपल्या नकार देण्यानं सईला राग येईल. सई निराश होईल व सई निराश झाली की ती दुस-यांसोबत विवाह करेल. परंतू त्या नकार दिलेल्या निर्णयानं तो निराश नव्हता. कारण त्याला कधी विवाहच करायचा नव्हता. कारण त्याला वाटत होतं की आपण जर विवाह केला तर आपलं ध्येय आपल्याला साकार करता येणार नाही. जे आपल्याला साकार करावे लागेल.
अरुणला घर बांधायचं होतं. त्यामुळे त्याला वाटत होतं की आपण जर विवाह केला तर आपण घर बांधू शकणार नाही. कारण आपण दुस-याच कामात व्यस्त होवू व आपण आपलं स्वतःचं घर बांधू शकणार नाही.
सईचे मायबाप राजकारणी होते. त्यांच्याजवळ खूप पैसा होता. त्याच पैशाच्या जोरावर त्यांची ठाकूरकी होती. त्यांना एकच मुलगी होती. तिही सई. ते केवळ दौ-यावरच राहात असत. मात्र आपली मुलगी काय करते, काय दिवे लावते याची कल्पना त्यांना नसायची. आईही सईवर जास्त लक्ष ठेवत नसे.
सईचा स्वभाव सुरुवातीला उधळपट्टी स्वरुपाचा होता. परंतू ज्यावेळी तिची अरुणची मुलाखत झाली आणि अरुणचा स्वभाव समजला. तसा तिचा स्वभाव बदलला. तो स्वभाव वाखाणण्याजोगा बनला होता. ती त्यानुसार वागत होती.
सईच्या वडीलाजवळ राजसत्ता उपलब्ध होती. सईदेखील त्याचाच जोर दाखवत होती. परंतू सईचे वडील राजसत्तेच्या जोरावर कोणाला दमदाटी देत असत.
अरुणनं पाहिलं की सई ही तिच्या वडीलाच्या राजकारणाच्या जोरावर उधळपट्टी करते. ते पाहताच त्यानं तिच्याशी मैत्री केली. तिला सुधारलंही त्यानं. परंतू तिनं विवाहाचा प्रस्ताव काढताच त्यानं नकार दिला. त्यात पहिलं कारण होतं घर बांधण्याचं ध्येय आणि दुसरं कारण होतं, ते म्हणजे तिच्या वडीलांचं राजकारण. कदाचीत त्याला वाटत होतं की जर सईशी विवाह केलाच तर आपल्याला दबावात येवून काम करावं लागेल. त्यातच राजकारणी मंडळी ही काही कोणाची नातेवाईक नसतात. त्याचा जवळचा नातेवाईक असतो पैसा. तो पैसाच त्यांना जवळचा वाटतो. नातेवाईक हा पराया असतो त्यांना. मग ती स्वतःची मुलगी वा पत्नी का असेना.
राजकारणी लोकंं अनेक विवाहही करीत असतात. त्यांना पत्नीचं प्रेम वाटत नाही. सईसारखी एकच मुलगी जरी तिच्या वडीलांना असली तरी त्यांना तिच्याबद्दल प्रेम असेलच असं नाही.
सई फक्त अरुणची मैत्रीण होती. एकेकाळी दोघांचंही प्रेम होतं एकमेकांवर. असं प्रत्येकालाच आज वाटत होतं. परंतू ते प्रेम एका झटक्यात तुटलं होतं. ते प्रेम सर्वांनाच माहीत होते. सईच्या वडीलांनाही. अरुण गरीब असल्याच्याही गोष्टी सईच्या वडीलांना माहीत होत्या. त्याच्या मुलीचं प्रेमही त्याला माहीत होतं. परंतू त्यांनी मुलीच्या प्रेमाला महत्व दिलं. विरोध केला नाही. त्यातच आपली मुलगी ज्याला चाहते, त्याचेशी विवाह व्हावा म्हणून सई करीत असलेल्या गोष्टींना तिच्या बाबांनी नकार न देता होकार दिला. त्यातच माहीत असूनही सई करीत असलेली अरुणला मदत तिनं नाकारली नाही.
अरुण शिकला होता भरपूर. ती सईचीच कृपा होती. परंतू विवाह करतांना राजसत्तेपेक्षा ज्ञानसत्ता श्रेष्ठ ठरली होती. सईला नकार देत अरुणनं तिच्याशी विवाह केला नव्हता. त्याला वाटत होतं की सई ही श्रीमंत राजकारणी माणसाशी मुलगी असल्यानं तिचा विवाह प्रसिद्ध उद्योगपतीशी व्हावा. आपल्यासारखी अशी आय ए एस मंडळी कितीतरी तिच्या वडीलांजवळ असतील. त्यासाठीही त्यानं नकार दिला होता.
अरुणचं तिच्याशी विवाह न करण्यामागे जे ध्येय होतं, ते ध्येय म्हणजे घर बांधणे. घर हे विवाहानंतरही बांधता आलं असतं. ते घर त्याला तिचे वडीलही बांधून देवू शकले असते. तसेच तो नोकरीला लागल्यानंतर त्याचेजवळ भरपूर पैसाही येणार होता. ज्या पैशातून तो शेकडो घरं उभारु शकत होता. परंतू त्यानं राजकारणी माणसाशी जवळीक ठेवू नये असा विचार करुन विवाह तोडला. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मात्र सईला वाटत होतं की राजकारणापेक्षा ज्ञान मोठी गोष्ट आहे. म्हणूनच ती त्याला आपल्या वडीलापेक्षा सक्षम बनवीत होती. तिला वाटत होतं की आपला विवाह हा त्याचेशीच व्हावा. जो अति शिकलेला असेल. राजकारणी लोकं काय, श्रीमंत असतात खरे. परंतू हे वैभव केव्हापर्यंत टिकतं. जेव्हापर्यंत सत्ता असते. सत्ता जाताच ते वैभव टिकत नाही. ते वैभव हे शाश्वत नसतं. पाच वर्ष जाताच, जेव्हा सत्ता बदलते, तेव्हा मात्र राजकारणाला महत्व उरत नाही. परंतू ज्ञानसत्तेचं तसं नाही. ह्या ज्ञानीवंताचे ज्ञान कोणीही चोरुन नेत नाही. ते ज्ञान चिरकाल टिकत असते. मग सत्ता असो वा नसो.
"माझं नशीब हसतं आहे की रडतं आहे हेच मला कळेना." सई आईला म्हणाली.
"काय झालं?"
"आई, मी विचार केला की मला माझा पती शिकलेला मिळावा. माझं लग्न त्या अरुणशी व्हावं. परंतू ते चूक ठरलं. मला वाटत होतंं की त्याला मदत केली, त्याला शिकवलं की तो माझ्याशी विवाह करेल. परंतू ते चूक ठरलं. त्यानं तर माझ्याशी विवाह केला नाही. उलट माझा अपमान केला. म्हटलं की तू माझ्या लायक नाही. मी टाईमपास केला. टाईमपास.....टाईमपास केलाय म्हणतोय तो. खरंच यावरुन तुला माझं नशीब खराब वाटत नाही काय? माझ्या नशिबातच नसेल तो कदाचीत. नाहीतर तो मिळाला असता मला."
" नाही तसं नाही. नशीब नसतेच मुळी. परंतू तू सांग, त्याचे हातपाय मोडावेत का?"
"नाही. आपण तसं करु नये. आपल्यात आणि पप्पात काय फरक उरेेल. नाही, ते जावू दे. मी दुस-याशी विवाह करेल. मग तो भिकारी अससा तरी चालेल मला." तिचं ते बोलणं. ती अति दुःखी अंतःकरणानं बोलत होती.
"मी अपयशी ठरली त्यात. तो जिंकला मी हारले."
"बाळ, तुला काहीच करायचं नाही ना. मग विसर त्याला. आपल्या तसाही तो रांंगेत बसत नाही. ऐकलं आहे तुझ्याच तोंडून की तो फुटपाथवर राहात होता. ही फुटपाथवर राहणारी माणसं तशीच असतात. जरी ती आज शिकली असली तरी. मला सांग स्वभाव बदलतो का? सापाला आपण कितीही दूध पाजलं तरी तो चावा घेणं सोडेल काय? नाही ना. मग तेच समज त्याच्या बाबतीत." सईची आई म्हणाली.
सई ते सर्व ऐकत होती. तिला ते सर्व समजत होते. तशी ती चूप बसली व विचार करु लागली.
 
************************************************
 
नशीब हसते आहे, तसेच रडतं आहे असे समजल्यास आतिशयोक्ती होईल. कारण काही लोकं म्हणतात की नशीब नसतंच मुळी. मग हसण्याचा कोणता प्रसंग आला. परंतू मला वाटते की ते खोटं आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात नशीब असतं. ते नशीब कमी अधीक प्रमाणात असतं. याचं एक उदाहरण देतो.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जन्म मरण ठरलेलं असतं. मरणाचं तर सांगू शकत नाही. परंतू जन्माबाबत सांगतोय. प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो. प्रत्येकच मनुष्य हा गरीबाच्या घरी जन्मास येत नाही वा प्रत्येकच व्यक्ती हा श्रीमंतांच्या घरी जन्मास येत नाही. तसाच प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो. मग विचार करा की असे का होते आणि याला काय म्हणावे? महत्वाचं म्हणजे यालाच नशीब म्हणता येईल.
नशीब.......नशीब हे सर्वांना सारखं मिळत नाही. असं जर झालं असतं तर प्रत्येकच व्यक्ती हा पंतप्रधान झाला असता व प्रत्येकच व्यक्ती हा राष्ट्रपती. परंतू असं होते का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. प्रत्येकाचा जन्म हा त्याच्या त्याच्या नशिबानुसार होत असतो व प्रत्येकाच्या नशिबात त्या त्या जन्मानुसार ते ते तत्व येत असतात. प्रत्येकाचे नशीबानुसार कर्मही ठरलेले असतात. सुख दुःखही याच नशीबानुसार मिळत असतात. कोणाच्या नशिबात जास्त सुख असतं तर कोणाच्या नशिबात अल्प सुख. यानुसार कोणी जन्मतःच मरण पावतो तर कोणी आयुष्याची कित्येक वर्ष झाली तरीही मरत नाही. कोणी साठ वर्षातच म्हातारा झाल्यासारखा वाटतो. त्याला धड चालता वा बोलता येत नाही. कोणी कोणी शंभर वर्षाचे असतात. परंतू अगदी ठणठणीत असतात. आवाजही कणखर असतो. जसे ऐतिहासीक पुस्तक लेखन करणारे बरेच जण आज शंभर वर्षाचे आहेत. परंतू अजूनही त्यांचा आवाज कणखर आहे.
नशीब........नशीब ही माणसाला मिळालेली उदात्त देणगी आहे. कोणी म्हणतात की आपल्याला नशीब घडवता येतं. नशीब आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार घडतं. परंतू असं मला वाटत नाही. कारण मला वाटतं की नशीबच आपल्या जीवनातील चांगले वाईट कर्म घडवतात. त्याही पुढे जावून लोकं म्हणतात की नशीब घडतं हे मागील जीवनातील चांगल्या वाईट कर्मानुसार. मागील जन्मात जर चांगलं कर्म केले तर या जन्मात त्याची चांगली फळं चाखायला मिळतात व मागील जन्मात जर वाईट कर्म केले तर त्याचे परिणामही या जन्मात वाईट रुपात मिळत असतात. त्यानुसार मागील जन्मातील वाईट कर्मानुसार या जन्मात वाईट व्यक्तीचा जन्म हा गरीबाच्या घरी व चांगल्या व्यक्तीचा जन्म हा चांगल्या व्यक्तीच्या घरी होत असतो. त्यानुसार कोणी गरीबाच्या घरी तर कोणी श्रीमंतांच्या घरी जन्म घेत असतो. कोणी म्हणतात की मागील कर्म हे कोणं पाहिलं, तसेेच मागील जन्म कोणं पाहिला, आता काही पुनर्जन्म होत नाही. त्यामुळं मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माचं मुल्यांकन करता येत नाही. परंतू इतरांंना काय वाटते माहीत नाही, मला तर वाटते की हा मिळालेला जन्म कदाचीत मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माचा परिणाम असू शकतो. त्यानुसार तो व्यक्ती कोणी श्रीमंतांच्या घरी वा कोणी गरिबांच्या घरी जन्म घेवू शकतो. परंतू काही लोकं मला असं सांगतात की आपण लेखक आहात आणि असा पुुनर्जन्म व पापपुण्य आणि नशिबावर विश्वास कसा करता? तर त्याचं उत्तर असं आहे की नशीब आणि पापपुण्य आणि पुनर्जन्म नाही तर प्रत्येकाचा जन्म हा गरीबांच्या घरीच नको व्हायला, प्रत्येकांचा जन्म हा श्रीमंताच्या घरीच व्हायला हवा. तसंच हे मी जे सांगीतलं, तर ते सत्यच व्हायला हवं.
आज नशीब असंच आहे. काहीशा पुनर्जन्मावर व काहीशा मागील जन्मातील पापपुण्याच्या कर्मावर आधारीत. काहींचंं नशीब हे वाईट असतं तर काहींचं नशीब हे चांगलं असतं. काही जणांचं नशीब हे रडत असतं तर काहींचं नशीब हे हसत असतं. काहींना सतत या जन्मात त्रास भोगावा लागतो तर काहींना या जन्मात सतत आनंद मिळत असतो. एवढा आनंद की तो मोजता येत नाही. मापताही येत नाही. तसेच असा आनंद भोगायला चांगले कर्म हवे असते. जे आपण चांगले कर्म करतो ना, तेच चांगले कर्म आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येत असतात. त्यानुसार आपला जन्म चांगल्या कुटूंबात होत असतो. अगदी आनंदातही होत असतो. हा आनंद चिरकाल टिकणाराही असतो. तसंच वाईट कर्म केल्यास वाईट कर्माचा परिणाम वाईटच होतो, वाईट कर्म केल्यास वाईट कर्मानंतर त्याचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा त्याला त्या पुढच्या जन्मात त्याचे गंभीर आणि वाईट परिणामही भोगावेच लागतात. त्यानुसार त्याचा जन्मही गरीबीत होतो व जीवनभर त्याला गरीबीच छळत असते.
वर म्हटल्यानुसार त्याचा अर्थ अंधश्रद्धा पाळणे वा त्यावर विश्वास करणे असा होत नाही. ती अंधश्रद्धा पाळूही नये. परंतू पाप पुण्याच्या कर्माची भिती नक्कीच ठेवावी. आपलाही पुनर्जन्म होत असेल, हेही लक्षात घ्यावे, जो आपण पाहिलेला नाही. तसेच त्या त्या जन्मात मागील जन्मातील पापपुण्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतात हेही लक्षात घ्यावे. आपल्याला जर पुढील जन्म आनंदात आणि मजेत घालवायचा असेल तर या जन्मात चांगले कर्म करावे. वाईट कर्म करु नये. जेणेकरुन पुढील जन्म चांगला मिळावा व त्याही जन्मात आनंद आणि सुख मिळवता यावं. मग त्या जन्मात प्रत्येकाचं नशीब रडू नये. ते हसावं. याचाच विचार करुन या जन्मात जगावं. या जन्मात आपल्या नशिबात जरी मागील जन्मातील चांगला वाईटपणा असेल तरी या जन्मात चांगले कर्म करावे. जेणेकरुन पुढील जन्मात त्याचे गोड फळ चाखायला मिळेल.
महत्वाचं सांगायचं म्हणजे पुनर्जन्म आहे किंवा नाही हे मला स्पष्ट स्वरुपात माहीत नाही. परंतू मला वाटते की पुनर्जन्म होत असावा व त्यानुसार प्रत्येकाला त्या त्या कर्मातील चांगले वाईट फळ या जन्मात मिळत असावीत व त्यानुसारच प्रत्येकाचा जन्म हा गरीब श्रीमंतांच्या घरी होत असावा ही सत्य बाब आहे. म्हणून कर्म चांगलेच करावे, वाईट करु नये. मग तो कोणताही जन्म असो, पुुनर्जन्म असो वा नसो. त्या कर्माचे मापदंड असो वा नसो.
महत्वाचं म्हणजे कर्माचं मुल्यांकन होतं. नाही होत असं नाही. या जन्मात नाही झालं तर पुढी जन्मात. म्हणून चांगलं कर्म करावं. मग तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास करा वा नका करु. हेे तेवढंच खरं आहे. हे सांगायला नको.
निसर्गात काही माणसं अशीही असतात की जे चक्रव्यूहात फसत असतात. त्यांना त्या चक्रव्युहात शिरण्याचा मार्ग तर माहीत असतो. परंतू निघण्याचा मार्ग.......निघण्याचा मार्ग माहीत नसतो. अभिमन्यूचं असंच झालं. त्यानं गर्भातून चक्रव्युहात शिरण्याचं ज्ञान तर प्राप्त केलं. परंतू त्यातून निघण्याचं ज्ञान प्राप्त न केल्यानं शेवटी तो वीरगतीस प्राप्त झाला. त्या ठिकाणी ज्ञान जिंकलं नाही. कारण ते ज्ञान अधुरं होतं. राजसत्ता जिंकली. अन् ज्ञानसत्ताही जिंकली. परंतू काही वेळेपुरती.
आजही तीच परिस्थीती आहे. लोकं म्हणतात की राजसत्ता ही ज्ञानसत्तेपेक्षा मोठी. कारण राजसत्तेत आजही काही कौरवांचेच प्रतिनिधी दिसतात. ते ज्ञानसत्तेला महत्व देतच नाहीत. ते राजसत्तेलाच मोठं समजतात. कारण राजकारणात आता उच्च शिकलेले कमी असून निम्म शिकलेल्यांचाच भरणा जास्त आहे. आज डॉक्टरेटही करायचे असल्यास राजसत्तेच्या जोरावर डॉक्टरेट मिळवली जाते. जसे. मुलगा जन्माला घालतांना किरायाचा गर्भ घेतला जातो तसा. आज राजसत्तेचा अभ्यास केल्यास असं नक्कीच दिसतंं की राजसत्तेत जे आहेत, ते अनाडी असूनही त्यांच्यासमोर असलेेलेे सुशिक्षीत, उच्च विद्या विभुषीत लोकं लोटांगण घालत असतात. जणू गुलाम असल्यासारखे. आज राजससत्तेतील लोकं निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतात आणि एकदा का निवडून आले की भ्रष्टाचारी मार्गाने घोटाळे करुन पैसा कमवतात. त्यानंतर ती मंडळी पैशाच्या भरवशावर शाळा, महाविद्यालय काढतात. त्या महाविद्यालयात चांगली उच्चभ्रू मंंडळी नोकरीला लावतात. अशी मंडळी ही नोकरीला लागली की ती मंडळी त्या राजसत्तेतील अनाडी माणसासमोर शेपूट हालविल्यागत वागत असतात. या ठिकाणी राजसत्ता श्रेष्ठ ठरते. मग त्या महाविद्यालयात कितीही उच्च शिक्षीत मंडळी असली तरी. यावेळी समजा त्या महाविद्यालयात एखाद्या उच्चशिक्षीत तरुणानं बंड करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला असं बेपत्ता केलं जातं की त्याला नंतर शोधणं कठीण होवून जातं.
राजसत्ता ज्ञानसत्तेपेक्षा मोठी नाही. ती कमजोर आहे. परंतू ती स्वतःला कमजोर समजत नाही. ती वागत असते आपल्याशी बालीश बहू बायकात बडबडल्यासारखी. उदाहरण द्यायचं झाल्यास महाभारताचं देता येईल. महाभारताचं जेव्हा युद्ध झालं, तेव्हा त्या युद्धादरम्यान कौरवांककडे पितामहा भिष्म, आचार्य द्रोण, महारथी कर्ण, कृपाचार्य यासारखे अनेक वीर होते. तसं पाहिल्यास ती राजसत्ताच होती. परंतू तरीही त्या राजसत्तेवर केवळ ज्ञानाच्या भरवशावर पांडवांनी त्या सर्व कौरवांना युद्धात हारवलं. कारण यात महत्वाचा एकच घटक होता. तो म्हणजे क्रिष्ण. क्रिष्ण ज्ञानवंत होता. म्हणून युद्ध जिंकता आलं. तसं पाहता यात ज्ञान परत एकदा जिंकलं.
यापुर्वी ज्ञान जिंकल्याचा पुरावा द्रोणाच्या रुपात मिळतो. तो म्हणजे द्रोणाचार्यचा विवाह झाल्यानंतरही ते गरीबच होते. आपली गरिबी दूर करण्यासाठी ते त्यांंच्या सोबत गुरुकूल आश्रमात शिकणा-या व एका नगरीचा राजा असलेल्या व त्यांचे मित्र बनलेल्या राजा ध्रृपदकडे गेलेे असता ध्रृपदनं चांगला मित्र असूनही गुरु द्रोण ज्ञानवंत असूनही त्यांचा अपमान केला व त्यांना हाकलून दिलं. यावेळी ज्ञान हारलं. परंतू त्याच ज्ञानाच्या भरवशावर द्रोणानं अर्जुनासारखे शिष्य तयार करुन राजा ध्रृपदला हारवले व त्यानंतर ज्ञानसत्ता मोठी की राजसत्ता हे सिद्ध करुन दाखवलं.
आज पुन्हा तोच काळ आला आहे. राजसत्ता मोठी वाटत आहे. ज्ञान लहान वाटत आहे. देशात अनेक ज्ञानी आहेत. कलावंत आहेत. कोणी प्रकाशझोतात आहेत. कोणी नाहीत. ती मंडळी फक्त कार्य करतात. प्रकाशझोतात येत नाहीत. प्रकाशझोतात येण्यासाठी प्रयत्नही करीत नाहीत. प्रकाशझोतात येणे हा काही त्यांचा उद्देेश नसतो. त्यांची नेहमीच हेळसांड होत असते राजसत्तेसमोर. राजसत्ता सदोदीत त्यांचा अपमानच करीत असते. परंतू राजसत्ता काही मोठी नाही. कारण अशा कितीतरी राजसत्ता होवून गेल्या की ज्या सत्तांची आपल्याला नावही माहीत नाहीत. परंतू ज्ञानसत्ता टिकल्या आहेत. काही पुस्तके लिहून तर काही शोधाच्या रुपाने. आजही त्याच ज्ञानाचा वापर करुन आजची मंडळी वाटचाल करीत असतात आणि आजही काही मंंडळी त्याच ज्ञानाचा उपयोग करुन भविष्यातील ध्येयधोरणं ठरवीत असतात.
महत्वाचं म्हणजे आजचा काळ पाहता आपल्याला राजसत्ता जरी मोठी वाटत असली तरी राजसत्ता मोठी नाही. ज्ञानसत्ता मोठी आहे. मग आपण त्या राजसत्तेसमोर आपल्या इवल्याशा स्वार्थासाठी लोटांगण का घालतो तेच कळत नाही. आपण जर खरंच ज्ञानवंत आहोत तर लोटांगण घालू नये. कारण हे विसरु नये की आजच्या राजसत्तेला पाच वर्षानंतर मुदत भरताच त्यांना ती परत मिळविण्यासाठी लोटांंगण घालावं लागतं ज्ञानसत्तेसमोर. पुन्हा आपली प्रतिष्ठा मिळविण्यासाठी नव्हे तर राजसत्ता मिळविण्यासाठी. परंतू ज्ञानसत्तेला झुकावं लागत नाही. ती तटस्थ असते. ती तटस्थ होती कालही आणि भविष्यातही असेल. हे निर्विवाद सत्य आहे.
ज्ञानसत्ता मोठीच आहे राजसत्तेपेक्षा. ज्ञानसत्तेनं राजसत्तेची मोठमोठी बुरुजं पाडली आहेत भुतकाळात. आपलं अस्तित्वही टिकवून ठेवले आहे एवढंच नाही तर आजही ती दिमाखानं सांगत आहे की ज्ञानसत्ता मोठी आहे. परंतू आजची काही मंडळी नेमकं तेच विसरली आहे. ते आपल्या स्वार्थापायी स्वतःला कमजोर समजून राजसत्तेला मोठं समजत आहेत. मोठं करीत आहेत आणि ज्ञानसत्तेला बदनाम करीत आहेत.
विशेष सांगायचं म्हणजे ज्ञानसत्ता काही कमजोर नाही. तिची बदनामी कोणीही करु नये. कारण आपल्याला माहीत नसेल की राजसत्ता जेव्हा सत्तेवर येते, तेव्हा हीच राजसत्ता ज्ञानसत्तेला हाताशी धरुन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ध्येयधोरणे आखत असते आणि त्यावेळी ज्ञानसत्ताही तिला सरळ रुपानं मदत करीत असते. त्यावेळी खरंच ज्ञानसत्ता मोठी ठरते.
वास्तवीक पाहता ज्ञानसत्ता व राजसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणालाच कनिष्ठ वा श्रेष्ठ समजता येत नाही. प्रत्येक सत्ता आपआपल्या परीनं मोठी असते. फरक एवढाच की ज्यावेळी यात स्वार्थ शिरतो, तेव्हा प्रत्येक सत्तेला वाटतं की मी मोठी. परंतू तसं काही नाही. दोन्ही गोष्टी असल्याशिवाय देश चालू शकणार नाही. देशाची प्रगती होणार नाही. अधोगती मात्र नक्कीच होवू शकते.
सईला नकार देताच सई अरुणच्या जीवनातून निघून गेली. तिचा विवाह एका निळकंठ नावाच्या व्यक्तीशी झाला. तो झालेला विवाह तिनं उजागर केला नाही. त्यानंतर ती नाईलाजानं जीवनात रमली.
निळकंठ हा स्वभावानं चांगला नव्हता. तो दररोज दारु ढोसत असे. त्यातच तो दारु प्यायला की नानावीध शिव्याही देत असे. त्यातच त्याला कोणी विरोध केलाच तर त्याच्याशी मारपीटही करीत असे. पर्यायानंं सांगायचं झाल्यास तो एक गुंडाच होता. खुन करणं हे त्याचेसाठी कठीण काम नव्हतं. त्यातच कधीकधी सई जेव्हा त्याचे मधात बोलत असे, तेव्हा त्याचा रुद्रावतार तिला दिसत होता. त्यावेळी तिला हमखास अरुणची आठवण येत होती. परंतू तिच्याजवळ उपाय नव्हता.
सई कुढत कुढत आपल्या प्रारब्धावर रडतरडत दिवस काढत होती. तिला ती चूक समोर दिसत होती. तिला पश्चातापही होत होता. परंतू आता पश्चाताप करुन काय उपयोग होता.
सई कधीकधी विचार करायची की जर तिनं अरुणची पुन्हा भेट घेतली असती आणि त्याला विनवणी केली असती तर तो तयार झालास असता विवाहाला. कदाचीत माफी मागीतली असती ....... परंतू आज त्या गोष्टीला बराच वेळ झाला होता.
 
************************************************
 
शिशीर नुकताच संपला होता. तसा वसंत सुरु झाला होता. झाडावर नवी कोरी पानं दिसायला लागली होती. बाहेरुन आलेले पोपट टिवटिव आवाज करीत या झाडावरुन त्या झाडावर उडत होते. नेमके ते आंब्याचे मोहोर खायला आले की काय, असे वाटत होते.
ते पोपट नव्हते तर ते त्या पोपटाची पिल्ले होती. चांगले गर्द हिरवेगार दिसत होते ते पोपट. ते पोपट त्या झाडाची पानं हिरवीगार असल्यानं व त्यांचाही रंग हिरवागार असल्यानं ते दिसत नव्हते. त्या हिरव्यागार पानात अगदी दडून बसत होते. परंतू पकडणारे त्यांचे शत्रू त्या आंब्याच्या बुंध्यावर असलेल्या ढोलीवर जाळं टाकून एका एका पोपटाला पकडत होते. तीच अवस्था सईच्या जीवनाची झाली होती. सईलाही पोपटासारखं जाळं लावून त्या निळकंंठ नामक पारध्यानं जाळं टाकून पकडून ठेवलं की काय, असं तिला वाटत होतं.
निळकंठचं दररोजचं दारु पिणं. तिला तंग करणा-या गोष्टी वाटत होत्या. तिला करमत नव्हतं निळकंठजवळ. कधीकधी वाटायचं की त्याला सोडून जावं. परंतू हिंमत होत नव्हती. अशातच तिला निळकंठपासून एक पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव ठेवलं सलील.
सलील लहानाचा मोठा होवू लागला होता. त्याला लहानाचं मोठा करतांना आनंद वाटत होता. त्याच्यामध्ये ती रमत असे. परंतू तिला जेव्हा निळकंठ त्रास देत असे. तेव्हा मात्र तिला अरुण आठवत असे आणि आठवत असत त्या अरुणच्या आठवणी. त्या आठवणी आल्याच की सईला कसंनुसं वाटत होतं. तिला करमत नव्हतं व केव्हा तो भेटतो आणि केव्हा नाही असं होवून जात होतं.
निळकंठ काही जास्त दिवस जगला नाही. एकदा त्यानं अती दारु प्यायल्यानं ती दारु काळजाला लागली व तो मरण पावला. त्याचबरोबर सई विधवा झाली व ती आता विधवेपणाचं आयुष्य जगत होती.
आता तिच्या जीवनात निरसता निर्माण झाली होती. परंतू आता तिच्यासमोर उपाय नव्हता. परंतू जगणं होतं तिला. तिला आता त्या इवल्या जिवास म्हणजे सलीलला मोठं करायचं होतं.
 
****************************************
 
सई गेली होती अरुणला सोडूून. अरुण तिला काहीबाही बोलला होता. त्याचा राग आला होता तिला. शेवटी तिनं विवाहही केला. परंतू इकडे अरुणला तिची सारखी आठवण येत असे. ती आठवण त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्या आठवणीनं त्याच्या मनात सतत उद्विग्नता राहात असे.
दररोज त्याच्या कार्यालयात पार्ट्या होत. त्या पार्ट्यामध्ये त्याचा विरंंगुळा होतच होता. परंतू घरी येताच घर खायला धावत होतं. घरी कधीच यावसं वाटत नव्हतंं. परंतू त्याची जी आई होती, तिच्यासाठी तो घरी येतच होता.
आज येणारी सईची आठवण. त्याला तो जिकडे पाहीन तिकडे सईच दिसत होती. त्यातच त्यानं सईसाठी का असेना, आपला विवाह केला नव्हता. तो अजूनही अविवाहीतच होता. घर बांधण्याचं स्वप्न पार धुळीला मिळालं होतं. ज्याचेसाठी त्यानं सईला सोडलं होतं. तसाच तो आता अती दारुच्या आहारी गेला होता. कारण त्याला येत असलेली सईची आठवण विसरावी. म्हणून तो रात्रीला दारुची नशा करीत होता. त्याला वाटत होतं की सईची येणारी आठवण जर समाप्त करायची असेल तर दारु प्यावी लागेल. म्हणून तो दारु पीत होता.
त्यालाही करमत नव्हतं मुळी. सईची सारखी आठवण यायची. तो आपलं मन रमविण्यासाठी कधी बाजारात तर कधी बगीच्यात जात असे. एकदा असेच बागेत फिरत असतांंना अचानक त्याची नजर सईवर पडली. सईचा चेहरा बदलला होता.
सई.......बापकट वेणी होती तिची. सिंगल पीस गाऊण घातला होता तिनं. काळे केसं थोडेसे कुरळे बनवले होते. तिच्याजवळ एक मुलगा होता. तो मुलगा फिरत होता. कदाचीत तो तिचाच मुलगा असावा. तसं त्यानं तिला स्पष्टपणे ओळखलं.
सईला ओळखताच तिला भेटायची त्याची इच्छा झाली. परंतू हिंमत होत नव्हती. तशी ती इच्छा तीव्र होत गेली व त्यानंतर हिंमत एकवटून तो तिच्याजवळ गेला. थोडा वेळ उभा राहिला. त्यानंतर बोलका झाला. म्हणाला,
"मैडम, आपण सई आहात काय?"
"होय. आपण?"
"मला नाही ओळखलं आपण?" त्यानं प्रश्न केला. तशी ती म्हणाली,
"नाही. ओळख सांगाल तर ओळखेल."
सई त्याला बोलली. परंतू त्याची हिंमत होत नव्हती. कारण त्यानं तिला ओळखलं नसलं तरी ती जुनी आठवण त्याच्या मनात होती. तशी ती म्हणाली,
"काय झालं मिस्टर. बोलत का नाही आहात. ओळख सांगा."
तिचे ते बोल. त्यातच आपण तिच्या बोलण्यावर उत्तर दिलं नाही तर आता इथं मार खायची पाळी निर्माण होईल असं त्याला वाटलं व तो पुरता बोलता झाला.
"मी अरुण."
"कोण अरुण?" तिनं ओळखूनही विचारलं. तसा तो म्हणाला.
"तो कॉलेजमधील अरुण. ज्याला तू आय ए एस बनवलं. परंतू मी तुला नकार दिला विवाहासाठी. त्याची फळ भोगतो आहे मी. मी माफीच्या लायक नाही. परंतू वाटल्यास मला माफ कर. मी एवढंच बोलायला आलो आहे तुझ्याकडे." तो म्हणाला. तशी त्याची मान खाली झुकलेली होती. तो त्यानंतर गप्प राहिला. तिही गप्प होती काही वेळ. तसा तोच म्हणाला,
"कशी आहेस?"
"बरी आहे आणि तू?"
"मिही बरा. परंतू तू बरी वाटत नाहीस."
"काय झालं मला?"
"काही नाही. परंतू बरंच काही झाल्यासारखं वाटतंय. आता खरं खरं सांग काय झालं तुझ्या जीवनात?"
"आधी तू सांग. तूू कसा आहेस?"
"मी बरा आहे."
"खोटं....... खोटंही नीट बोलता येत नाही तुला. अरे, तू आधीच सांगीतलं ना की तू बरंच भोगलं. मग बरा कसा? आता खरं खरं सांग अगदी. त्याशिवाय मलाही सत्य बाजू मांडता येणार नाही."
"काय सांगायचं खरं. मी बरंच भोगलं आहे. माहीत आहे तुला. मी दारुच्या आहारी गेलो आहे. आता मला दररोज दारु प्राशन केल्याशिवाय होत नाही. सारखी आजही तुझीच आठवण येते. स्वस्थ राहूच देत नाही तुझी आठवण. पण काय करु. आता पश्चाताप होतोय. परंतू आता पश्चाताप करुन काय उपयोग?"
"मी अभागी आहो सई लहानपणापासूनच. मी लहाणपणी माझ्या वडीलाला खोवलं. अनाथ झालो. आता तूला खोवलं. तू भाग्यवान आहेस. म्हणूनच सुखी आहेस."
"मी सुखी! कशाची सुखी. माझा तर पती मरण पावला. सारखा दारु पीत होता तो. त्यातच एक दिवस तो दारु ढोसून मरण पावला. मलाही मरावंसं वाटते. परंतू जगावं लागतं. कारण मला हा एक मुलगा आहे. सलील....... सलील याचं नाव. ह्या सलीलसाठीच जगावं लागतं मला. मलाही सारखं घर खायला धावतं. चिंताग्रस्त करतं माझं मन. माझं मन मला सांगत नाही की स्वस्थ जग."
"मलाही अगदी तसंच वाटतं. ज्या ध्येयासाठी मी तुझं मन तोडलं. ते ध्येयही पुर्ण झालं नाही."
"कोणतं ध्येय?"
"मला घर बांधायचं होतं. कारण आम्ही लहानपणापासूनच गळत्या घरात राहात होतो. ते आमचं राहातं घर. त्या घरावर सतत गावात येणारी माकडं उड्या मारायची. त्यातच ती माकडं घरावर उड्या मारायची.
आमचं कौलाचं घर होतं. त्या माकडांनी घरावर उड्या मारताच कौलं अक्षरशः फुटायची व आम्हाला त्याच गळत्या घरात पावसाळ्यातील पाऊस झेलत राहावं लागायचं.
माझे वडील मरण पावताच माझ्या आईला गावात कामं मिळत नव्हती. त्यातून पोट भरणंं कठीण जात होतं. अशातच कोणीतरी म्हणालं, 'शहरात जा. तिथं काम भरपूर मिळतात.' त्यानंतर आम्ही शहरात आलो.
हे शहर...... या शहरात आमच्या ओळखीचं नव्हतं. राहायला घर नव्हतं. त्यामुळं आम्ही फुटपाथवर राहिलो. मी कचरा गोळा करण्याचं काम केलं. माझ्या आईला भीक मागणं आावडत नव्हती. म्हणून ती याच शहरात कामाला लागली. त्यातच मी शिकेनासा.
मला शिक्षण शिकावंसं वाटायचंं. परंतू माझं वय झाल्यानं मला शाळेत घेतलं नाही. शेवटी मी कचरा वेचत फिरलो. कालांतरानं काही शिक्षक शाळाबाह्यच्या सर्वे करायला आले. त्यातील एकानं साांंगीतलंं की याला उद्यापासून शाळेला घेवून या. त्यानुसार त्यानंतर मी शाळेत यायला लागलो.
माहीत आहे सई, माझं थेट सहाव्या वर्गात नाव दाखल झालं शाळेत. त्यानंतर मी अपार मेहनत केली व अज्ञानावर मात केली. त्यानंतर तूू मिळाली व तुुझे उपकार झाले. तू मला अभ्यासात मदत केली व मी आय ए एस झालो.
मी आय ए एस झालो. मला घरदार मिळालं. गाडीही मिळाली. परंतू एक खंत अजूनही होती मनात. ती म्हणजे घर बांधणंं. मला घर होतं. परंतू ते घर मला नोकरी निमित्यानं दानात मिळालेलं होतं. ते माझं हक्काचं घर नव्हतं.
माझं ध्येय होतं की एकतरी हक्काचं आपलं स्वतःचंं घर असावं. त्यामुळंच मी तुला नकार दिला. मला वाटत होतं की जर मी विवाह केलाच तर मला माझं हक्काचं घर बनवता येणार नाही."
"मग बनलं का घर?" ती म्हणाली व तो ओशाळत म्हणाला,
"नाही, अजूनही नाही."
तो बोलत होता तिच्याशी. तशी ती म्हणाली,
"तू माझं मन तोडलं ना. मग कसं बनणार तुझं घर. कदाचीत तू माझ्याशी विवाह केला असता तर आज तुझं घरही बनलं असतं."
"होय, परंतू तुझ्याशी विवाह करण्यामागं केवळ एकच कारण नव्हतं."
"मग आणखी कोणते कारण होते?"
"दुसरं कारण होतं, ते म्हणजे तुझ्या बाबांचं राजकारण."
"म्हणजे? ते कसं कारणीभूत होतं आपल्या विवाहात?"
"अगं साधी गोष्ट आहे. राजकारणी लोकं सारखे दबाव टाकत असतात. त्यांनी माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडून कोणतीही कामे करवून घेतली असती."
"माझे बाबा तसे नाहीत."
"हे तू म्हणतेस. परंतू असं काही नसतं. राजकारण्यांना काही जात पात आणि नातेवाईक नसतात बरं. तुझे वडील हे तुझे असल्यानं तुला विश्वास वाटतो."
"नाही, असं नाही. माझे बाबा लय चांगले आहेत."
"परंतू भिती. माझ्या मनात होती ना ती भिती."
"हो का? परंतू मला तर सांगायची होती ना ही सर्व कारणं. अरे मी समजून घेतली असती ही कारणं. यावर काही उपाय काढला असता."
"होय. काढला असता आपण उपाय. परंतू मला वाटलं की असा कोणताच उपाय निघू शकणार नाही."
"का, तुझं प्रेम नव्हतं का माझ्यावर?"
"होतं. निरतीशय प्रेम करीत होतो मी तुझ्यावर. परंतू तिलांजली द्यावी लागली मला तुझ्या प्रेमाची. शिवाय गरीब श्रीमंत दरीही होती. मी फुटपाथवरुन आलो होतो वर आणि तू श्रीमंत होती."
"आम्ही कोणते श्रीमंत होतो आधीपासून. आम्हीही गरीबच होतो."
"म्हणजे?"
"होय, आम्हीही गरीबच होतो. माझे वडील साधी रिक्षा चालवीत होते. त्यावेळी मी लहान होते. आम्हाला खायलाही बरोबर मिळत नव्हतं. अशाही काळात माझे वडील लोकांची कामे करीत असायचे. त्यातच कोणीतरी म्हटलं माझ्या बाबांना की त्यांनी निवडणूकीला उभे राहावे."
"मग."
"मग काय, माझे बाबा उभे राहिले निवडणूकीला आणि आले निवडून. मग काय माझ्या वडीलांनी मागे वळून पाहिलंच नाही. ते लोकांची कामं करीत गेले आणि निवडून येत गेले. ते आमदार बनले, मोठमोठ्या पोष्ट त्यांनी मिळवल्या. आता ते कोणत्याही पदावर नाहीत. विरोधकांच्या नापसंतीनं ते उतरले आहेत पदावरुन. राजकारणात कोणीही शाश्वत नसतं. हे चालतच असतं.
ते पदावर नाहीत. परंतू लोकं आजही त्यांचा आदर करतात. आजही त्यांना गर्व नाही. ते लोकांची कामं करतात. आजही ते शांत आणि शालीन असतात."
"हो काय, मला माफ कर. मी चुकलोच निर्णय घ्यायला. परंतू एक सांग की आता तू कुठे असतेस?"
"म्हणजे?"
"मायबापाच्या घरी की सासरकडे?"
"का बरं?"
"अगं पती मरण पावले म्हणते ना. म्हणून विचारलं."
"हो का?"
"होय."
"मी आईवडीलांकडेच असते."
"का बरं?"
"त्यांचा मुलगा मरण पावताच ती मंडळी मला नेहमी टोमणे मारत होती. म्हणत होती की आमच्या मुलाला खाल्लं. त्यांनी म्हटलं की आता आमचा मुलगा जिवंत नाही. मग तुझा इथं राहून उपयोग काय? ती टोमणे. ती टोमणे ऐकून होत नव्हते. म्हणून मी सोडलं सासर. आता मायबापाकडे आहे."
"मायबापाकडे. कुढत कुढत दिवस काढावे लागतात नाही का?"
"नाही. आनंदातच आहे मी तिथंही."
"कशी? भाऊ भावजं बोलत असतील ना तुला?"
"नाही बोलत."
"का? का नाही बोलत?"
"अरे अरुण, किती बोलतोस. पुरे आता."
"बरं. परंतू या प्रश्नाचं उत्तर दे. नाहीतर मला रात्रभर झोपच नाही यायची."
"कोणता प्रश्न?"
"भाऊ भावजं बोलत नाही का तुला?"
"मी एकटीच आहे. भाऊ भावजं नाही मला."
तो शेवटचा प्रश्न त्या दिवशीचा. तशी सायंकाळ झाली होती. रात्र होत होती. घरी निघायची वेळ होत होती. तशी ती म्हणाली,
"आता निघायला हवं. सायंकाळ झाली आहे. आपण निघायला हवं."
"ठीक आहे. आता केव्हा भेटशील?" असं त्यानं म्हणताच ती चूप राहिली. तसा तो म्हणाला,
"आता भेटणार नाही का?"
"भेटेल."
"पण केव्हा?"
"मी फोन करेल. फोननंबर दे तुझा."
अरुणनं फोननंबर दिला. तिनंं तो घेतला व तशी ती चालती झाली.
आज सई घरी पोहोचली होती. तिला आजचा दिवस आनंदाचा वाटत होता. तिचा कॉलेजमित्र मिळाल्यामुळे तिच्या जीवनात एक दिवस का होईना, आनंद आला होता.
आज ती खुश होती. तसा तिच्याजवळ त्याचा फोन नंबर होता. वाटत होतं की आताच फोन करावा व बोलून टाकावं त्याचेशी. परंतू तसं करणं बरोबर नव्हतं.
अरुणचाही दिवस तिच्याशी बोलता बोलता आनंदात गेला होता. महाविद्यालयातील ती मुलगी भेटली होती त्याला. जिच्यावर त्याचं निरतिशय प्रेम होतं. परंंतू आता वेळ झाला होता. तिचा विवाह झाला होता. त्याच्याजवळही तिचा फोन नंबर होता. तोही फोन करु पाहात होता. परंतू त्याच्याही मनात विचार होता. तो विचार बरोबरच होता. कारण तिचा विवाह झाला होता.
दिवसामागून दिवस जात होते. तसे त्यांचे नेहमी फोनवर बोलणे होतच होते. त्यातच कधी गाठीभेटीही. कधी कधी ती त्याला एकटीच भेटायला येत आहे. ते कधी बागेत तर कधी रेस्टॉरेंटमध्ये भेटत असत. त्यातच त्या गाठीभेटीतून ते एकमेकांचे दुःख वाटून घेत असत. आज पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं होतं व आज पुन्हा एकदा त्यांना एकमेकांशी भेटायची हूरहूर लागलेली असायची.
असाच तो एक दिवस उजळला. अचानक सकाळी सकाळी तिचा फोन खणकला.
"हैल्लो, कोण?"
"मी........मी अरुण."
"बोल, कसा काय केला एवढ्या सकाळी फोन?"
"अगं, सहजच."
"सहज अन् एवढ्या सकाळी. आज एवढ्या सकाळीच तुला माझी आठवण आली तर."
"होय. बोलायचं होतं काही."
"बोल लवकर. बाथरुमला जायचंय. बोल लवकर काय ते."
"नाही. फोनवर बोलता येणं शक्य नाही. तुला भेटायचंय मला. सवड आहे का आज?"
"होय, का बरं?"
"आज मला सुट्टी आहे."
"म्हणून एवढा उतावीळ तर."
"उतावीळ नाही गं. एक काम आहे महत्वाचं."
"हो का?"
"होय, मग भेटशील ना."
"होय भेटेल."
" जरा लवकर ये."
"होय. येईल." ती म्हणाली. तसा त्यानं फोन बंद केला.
सायंकाळ झाली होती. तो आधीच त्या बगिच्यात आला होता. त्या बागेत येवून तो वाट पाहात होता तिच्या येण्याची. परंतू ती अजूनपर्यंत आली नव्हती. तसे सायंकाळच्या पाच वाजले व तिनं त्या बागेत प्रवेश घेतला.
आज ती एकटीच आली होती त्या बागेत. ती तिथं येताच इकडंतिकडं पाहू लागली. तिची नजर कोणालातरी शोधत होती. ते अरुणही पाहात होता. तसा अरुण तिच्याजवळ गेला. म्हणाला,
"कोणाला शोधत आहेस?"
"तुलाच की. केव्हा पोहोचलाय?"
"मगाशीच. किती वाट पाहिली मी."
"हो काय, अरे आम्ही बायांची जात. वेळ लागणारच."
"हो का? ठीक आहे, ठीक आहे." तो म्हणाला. तसे ते बोलत बसले. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली,
"बोल, कशाला बोलावलंय?"
"होत एक महत्त्वाचं काम."
"कोणतं?"
"माझा विचार आहे की आपण......"
"..........." तो थांबला. तशी ती म्हणाली,
"काय आपण? अरे बोल ना लवकर. काय ते बोल स्पष्टपणे."
"रागावणार तर नाही ना."
"नाही रागावणार. बोल. अगदी स्पष्टपणे बोल." ती म्हणाली.
"पाहा, तूही एकटीच आहे आणि मिही. तुलाही करमत नाही घरी आणि मलाही."
"मग."
"आपण विवाह करुया का?" त्यानं विचारलेला प्रश्न. त्यावर ती गप्प होती. तसा तो म्हणाला.
"बोल ना गं. काहीतरी बोल."
"हे बघ अरुण. मी तयार आहे. पण नीट विचार कर. मगच बोल. नाहीतर मागच्यासारखं व्हायचं."
"सई, यावेळी मी योग्य निर्णय घेतला. मला मागील प्रकरणाचा पश्चात्ताप आहे. मी फार मोठी चूक केली आहे. त्याचे परिणाम मी भोगलेही आहेत. आता यापुढे असं होणार नाही. "
"तरीपण आणखी विचार कर. नीट विचार कर." असं म्हणत ती म्हणाली,
"चल आपण आता निघूया."
ती रात्र.....त्या रात्री त्याला पुरेशी झोप लागली नाही. त्याचबरोबर तिलाही.
ती विचार करु लागली की आपण आज एकटे नाहीत. आपल्यावर जबाबदारी आहे मुलाची. आज मायबापही सोबतीला आहेत. सलील लहान आहे अजून. त्याला मायबाप कळत नाही आज. सासूसासरे तर मला आणि खुद्द त्यांचा नातू असलेल्या सलीलला जवळ घेत नाहीत. प्रेम दाखवत नाहीत पुरेसं. अशावेळी आपण काय करायला हवं.
उद्या हे मायबाप मरण पावतील. सासूसासरे आज सोबतीला नाहीत, त्याप्रमाणे उद्याही सोबतीला राहणार नाहीत. तेव्हा आपण एकटे होणार. सलीलला पोषयची जबाबदारी येणार. मग आपण कशी ती जबाबदारी पेलणार. सा-याच समस्या. आज अरुण म्हणतोय की मला विवाह करायचाय तुझ्याशी. त्याला माहीत आहे की मला एक लेकरु आहे. तरीही त्याचा विचार न करता तो विवाह करायला तयार आहे माझ्याशी. हं, एक महत्वाचं की माझ्या लेकराबाबत विचारायचं राहिलं त्याला. परंतू आपण होकार दिलाच नाही ना त्याला विवाह करण्याबद्दल. जेव्हा मी त्याला होकार देईल. तेव्हा सलीलचंही विचारुनच घ्यावं लागेल. त्याला विचार करायला तसा वेळ दिलाच मी. बघूया, विचार केल्यावर काय निर्णय येतो त्याचा. त्याचा होकार आल्याशिवाय आपण विवाहाचं नावही काढू नये.
सईचा तो विचार. तो विचार अगदी रास्त होता. बरीच रात्र झाली होती. बाजुला सलील झोपला होता. तिनं सलीलकडं पाहिलं. तसा सलीलच्या डोक्यावरुन हात फिरवत तिनं त्याला कुरवाळलं. विचार केला की उद्याला लवकर उठायचंय. आपण आज एकटे नाही सकाळी उशिरापर्यंत झोपायला. तसा विचार करताच ती लवकर झोपी गेली.
 
************************************************
 
सकाळ झाली होती. तसा पाखरांचा आवाज आसमंतात पसरला होता. तांबडं फुटलं होतं. सुर्य अजून उगवतिला होता. तशी तिला जाग आली. ती झपाट्यानं उठली.
सई अंथरुणातून बाहेर पडली. सलील मात्र अजून झोपलाच होता. तसं तिनं प्रातःविधी आटोपवला. कारण आजच तिची अरुणला भेटायची इच्छा होती. तिला वाटत होतं की अरुणशी ती केव्हा भेटते आणि केव्हा नाही. लवकरच प्रातःविधी उरकवताच तिनं अरुणला फोन लावला. म्हणाली,
"काय करतोस?"
"काही नाही. बसलोय."
"आज ड्युटीवर नाही जायचंय?"
"नाही."
"का बरं?"
"आज सुट्टी आहे. मी सुट्ट्या घेतल्या आहेत."
"बरं केलाय का विचार?"
"कशाचा?"
"कालच्या गोष्टीचा."
"कोणती गोष्ट?"
"विवाहाबद्दलची."
"कोणाचा विवाह?"
"ए, आता जास्त मस्करी करु नकोस बरं का?"
"मला खुलवून तर सांग थोडीशी."
"अरे, तू म्हटलं होतं ना मला की माझ्याशी विवाह कर म्हणून."
"हो ना, केलाय विचार. मी तयार आहे तुझ्याशी विवाह करायला."
"अन् सलील?"
"मला माहीत आहे की तो दत्तकच येणार तुझ्यासोबत."
"म्हणजे तू त्यालाही स्विकारायला तयार आहेस तर."
"हो ना. मग तो कुठं जाणार! तुझं लेकरु आहे ना तो. मग त्याला कुठं टाकणार आहेस तू?"
"ठीक. असं जर आहे तर मी तयार आहे तुझ्याशी विवाह करायला. परंतू मला हमी दे की तू माझ्या लेकराला जीवनभर सांभाळशील. बापाचं प्रेम देशील."
"त्यात काय हमी द्यायचं. अगं, ते तुझं लेकरु. मग विवाहानंतर लेकरु माझं नाही का होणार. अगं, ज्या गोष्टी घडणा-या आहेत, त्या नशिबात घडणारच आणि जो हमीपणा देतो, तो ती गोष्ट करेलच असे नाही. मी फक्त तुला हमखास सांगतोय की मी तुझ्यासह तुझ्या लेकरालाही सांभाळणार. ठीक आहे."
"ठीक आहे."
अरुण बोलून गेला. तसा तो बोलताच तिलाही आनंद वाटला. त्याचबरोबर तिचा होकार ऐकत तोही आनंदीत झाला होता.
अरुण बोलत होता तिच्याशी. तसा तो म्हणाला,
"अगं, आता केव्हा भेटशील?"
"सायंकाळी भेटूया का."
"तू म्हणशील तर."
"ठीक आहे. सायंकाळी."
तिनं म्हटलं . त्याचबरोबर त्यानं फोन बंद केला. तसा तो दुस-या कामाला निघून गेला.
सायंकाळ झाली होती. तसे ते दोघंही त्या बगीच्यात एकमेकांंना भेटायला आले होते. त्यांंचे संवाद चांगले रंगले होते. तो म्हणत होता.
"आपण विवाह करणार. परंतू आपण मायबापांना सांगीतलं नाही. माझं सोड. माझी आई म्हातारी आहे. मी माझ्या आईला समजावून सांगीन. परंतू तू. तू तुझ्या आईला कशी समजावून सांगशील?"
"मी सांगेल बरोबर. तू त्याची चिंता करु नकोस. मात्र तू आपलं पाहा. तूही आई पुरातन काळातील आहे. ती एकाएकी होकार देणार नाही."
"अगं, म्हातारी आहे ती."
"हो, म्हातारी आहे. परंतू म्हातारीच मंडळी जात, पात, वंश पाहतात म्हणून म्हणते."
"नाही म्हणणार. ती तर म्हणते की कोणत्याही जातीची व पंथाची मुलगी आणावी सून म्हणून घरात. डोळे दिपायच्या आधी सून घरात आण म्हणते ती."
"हो का."
"होय. परंतू एक गोष्ट आहे."
"कोणती?"
"माझी आई म्हातारी आहे. तिनं लय कष्ट केले आहे. तिला विवाहानंतर त्रास द्यायचा नाही."
"मी तशी दिसतेय का."
"अलीकडच्या काळात मुलांचे पाय पाळण्यात दिसत नाहीत."
"हो का."
"तशीही गाठ माझ्याशीच आहे. तू जर माझ्या आईची सेवा नाही केली तर मिही तुझ्या मुलाची सेवा नाही करणार."
"ठीक आहे. मी विवाहच नाही करत तुझ्याशी."
"ए, गंमत केली. परंतू विचारणं माझं काम आहे की नाही."
"होय. मिही गंमतच केली." ती म्हणाली. त्यांचे ते बोलणे न संपणारे होते. ते एकमेकांशी बोलतच होते. त्यांनी इतरही ब-याच गोष्टी केल्या. तशी ती शेवटी म्हणाली,
"विचार तू तुझ्या आईला व सांग मला. मिही विचारते आज घरी." ती बोलली व त्यानंतर तशी ती निघून गेली.
अरुण घरी गेला होता. त्यानंतर अरुणनं आपल्या आईला आपण आणत असलेल्या सुनेबद्दल सांगीतलं. तिला अगदी आनंद झाला होता. तसं पाहता ती अडाणी असली तरी जात, पात, वंश , पंथ पाहणारी नव्हतीच. तिला वाटत होतेे की तिचा मुलगा अरुण केव्हा केव्हा घरात सून आणतो आणि केव्हा नाही. तसं पाहता तिला त्याचे दोनाचे चार हात होण्याची वाट पाहायची होती. त्यासाठी ती जगत होती. त्याचबरोबर तिला आपलं हक्काचं घरही बनलेलं पाहायचं होतं.
सई घरी गेली होती. तिच्या घरी आज ती आणि तिची आई होती. तिचे बाबा बाहेर कुठंतरी कामाला गेले होते. आज तिला आईशी बोलायला व ती विवाहाची गोष्ट तिच्या आईच्या कानावर टाकायला नामी संधी उपलब्ध झाली होती. सईनं जेवन बनवलं. तसं जेवन घेवून ते जेवत असतांना सई म्हणाली,
"आई, मी विवाह करायचा ठरवलंय."
"कुणाशी?"
"त्या अरुणशी."
"पण त्यानं तर नकार दिला होता ना तुला."
"होय. परंतू आता तयार आहे तो."
"विचार कर. नाही तर तो पुन्हा नाही म्हणायचा."
"विचार केला आई मी. मलाही माझ्या मुलाचं भविष्य बघायचंय."
"ठीक आहे."
"परंतू आई, तू बाबांना सांग त्याबद्दल."
"सांगणार. नक्कीच सांगणार आणि सांगतो की ते नक्कीच तयारही होतील."
दोन दिवस झाले होते. सईचे बाबा घरी आले. त्यांना सईच्या म्हणण्यानुसार तिच्या आईनं तिची मनिषा सांगीतली. परंतू सुरुवातीला त्यांनी नकार दर्शवला. त्यांचं म्हणणं होतं की तो काही त्यांच्या बिरादरीतील नाही. त्यातच तो त्यांच्या रांगेतही बसत नाही. आपण श्रीमंत आणि तो आपल्या एवढा श्रीमंत नाही. परंतू तिची आई म्हणाली,
"आपण तरी कुठं होतो एवढे श्रीमंत. नशिबानं मदत केली, म्हणून आपण श्रीमंत बनलो. त्याचा अभिमान बाळगू नका. अरुण चांगला आहे. शिवाय आपल्याला एक नातू आहे. त्या नातवासह तो आपल्या मुलीला स्विकारायला तयार झाला ना. मग नकार कशाला दर्शवता उगाचंच. हो म्हणा. आपल्या मुलीकडं पाहा. कित्येक दिवसानंतर ती आता आनंदीत दिसते आहे."
सईची आई बोलून गेली खरी. ती गोष्ट तिच्या पतीच्या काळजात शिरली. त्यातच त्यांना ती गोष्ट पटली व त्यांनी होकार दिला. त्यानंतर त्या दोघांचाही विवाह झाला व सई सासरी राहायला आली. सोबत तिचा मुलगा सलीलही होता.
तिच्या बाबांनाही आनंद झाला. कारण त्यांनी अरुणचा स्वभाव पाहिला होता. त्यांना अरुण आवडत होता. त्यांना माहीत होतं की अरुणच तिला आनंदात ठेवू शकतो.
अरुण आणि सई दोघंही जण विवाहबंधनात गुंफले होते. परंतू अरुणचं ध्येय साकार झालं नव्हतं. त्याला आई जिवंत असतांनाच एक मोठं सिमेंट कॉक्रीटचं घर बांधायचं होतं. त्याशिवाय त्याच्या आईचे डोळे दिपणार नव्हते. तिच्या आत्म्यालाही शांती मिळणार नव्हती. हे सत्य होतं.
आज अरुणचा विवाह झाला होता. तो आनंदातच होता. परंतू अद्यापही त्याचं सिमेंंट कॉक्रीटचं घर तयार झालं नव्हतं. त्याला भरपूर पैसा लागत होता. तसा वेळही.
अरुणजवळ घर बांधायला पाहिजे तेवढा पैसा नव्हता. त्यातच त्याची कर्ज काढण्याचीही इच्छा नव्हती. तसं पाहता त्याला पुढे सास-याचंही घर राहायला मिळालं. परंतू हक्काचं घर नव्हतंच मुळी त्याचं. अशातच अरुणच्या आईला ह्रृदयविकाराचा झटका आला व तिला रुग्णालयात नेण्यापुर्वीच ती मरणही पावली. त्याचबरोबर तिची घर बांधायची इच्छाही मरण पावली होती. परंतू ती इच्छा अरुणच्या मनातून निघाली नाही. ती इच्छा अरुणच्या मनात आजही जिवंत होती आणि ती त्याला पदोपदी छळत होती.
 
***********************************************
 
अरुणचा विवाह झाला होता. त्यातच काही दिवसानं त्याची आई मरण पावली होती. परंतू घर बांधायचं स्वप्न अधूरं राहिलं होतं.
ती सई........सई साध्या विचाराची होती. परंतू तिला ऐषआराम आवडत होता. तिला पाहिजे त्या प्रमाणात चांगलं राहणंही आवडत होतं. त्यातच ती मेकअपही करीत असे.
तोही साधाच होता. साध्याच विचाराचा होता. परंतू त्याचा पेशा साधा नसल्यानं त्याला त्याच्या पेशानुसार आपलं राहणीमान ठेवणं आवश्यक होतं. त्या राहणीमानानुसार त्याचा पै पै पैसा खर्च होत होता. एवढा पैसा खर्च होत होता की त्याचं स्वप्न ते स्वप्नच उरत होतं. ते स्वप्न पुर्ण होणारं नव्हतं. त्यानुसार आपलं ध्येय केव्हा पुर्ण होईल याची शंका त्याला होती. त्यातच त्याला एक एक रुपयाही वाचवणं शक्य होत नव्हतं.
एकदाचा तो दिवस. त्या दिवशी सई स्वयंपाक करीत होती. आनंदाचा तो दिवस. कोणतातरी सण होता त्या दिवशी. पावसाचेही दिवस सुरु होते. आज पाऊस धो धो कोसळत होता. तशी त्याला बालपणाची आठवण आली. बालपणी तो पाऊस धो धो कोसळायचा. तसं त्याला ते घराचं स्वप्न आठवलं व तो सईला म्हणाला,
"सई, आपल्याला घर बांधायचं आहे, आपलं हक्काचं घर."
"हे एवढं मोठं आहे ना माझ्या वडीलांचं घर."
"हो आहे, माझाही एक कमरा आहे बांधलेला आणि मलाही राहायला सरकारी बंगला आहे. परंतू मला मी स्वतः बांधलेलं हक्काचं घर हवं. परंतू आपला असा ऐषआरामात पैसा जातो, त्यामुळं ते घर होवू शकत नाही. माझ्या आईचं स्वप्न होतं एकतरी घर बांधावं. परंतू ते घर, ती मरण पावली तरी झालेलं नाही. ते स्वप्न स्वप्नच उरलं अखेरचं."
"हो ना, मग बांधा ना घर. कोणं थांबवलं. कर्ज काढा आणि बांधा घर."
"नाही सई, मला कर्ज काढून घर बांधायचं नाही. मला घर बांधायचं आहे विना कर्जानं. स्वतः जमवलेल्या पैशानं."
"परंतू तो पैसा जमवायचा कसा?"
"आपल्याला तो पैसा जमवतांना काटकसर करावी लागेल. थोडीशी घरात ताणतुण. आतापासूनच घरासाठी पैसा गोळा करणं सुरु करावं लागेल. नाहीतर उद्या सलील मोठा होताच त्याला पैसा लागेल शिक्षणाला. मग घर होणार नाही."
"हं, बरोबरच."
"समजा मी जर घर बांधलं नाही आणि तुझ्याच वडीलाच्या घरात राहिलो शेवटपर्यंत तर लोकं सास-याच्या घरी जावई कुत्रा या म्हणीचा वापर करतील. ते तोंडावर बोलणार नाहीत. परंतू मागं दुषणं नक्कीच लावतील यात दुमत नाही."
"हं तेही बरोबरच."
"म्हणूनच मला माझं स्वतःचं हक्काचं घर हवं, जे माझ्या आईचं स्वप्न व माझं ध्येय आहे."
"मग ठीक आहे तर. आजपासून मिही काटकसर करते. माझी शान कमी करते. तुम्हीही थोडं पार्ट्या कमी करा."
"होय. मिही आता जास्त पार्ट्या करणार नाही."
तो दिवस. त्या दिवसापासून सई जास्त नटली नाही. त्यानंही पार्ट्या कमी केल्या. तसाच अनावश्यक खर्चही कमी केला. त्यामुळं की काय, आज त्याचेजवळ भरपूर पैसा उपलब्ध झाला.
अरुणजवळ घराला पुरेल एवढा पैसा गोळा झाला होता. तो पैसा पाहता त्याचं घर पुर्ण बांधून होणार होतं. अशातच अरुणनं आपल्या जुन्या घराच्या बाजुलाच त्याच सोसायटीत चांगली जागा विकत घेतली. जी त्याच्या घराला लागून होती. ती जागा तो सोडू शकत नव्हता. कारण ती जागा त्याच्या आईनं अतिशय मेहनत करुन विकत घेतली होती व अतिशय काबाडकष्टानं त्या जागेवर एक कमरा बनवला होता. तो कमरा आजही शाबूत होता. ती सलग झालेली जागा. त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी एक ठेकेदार पकडला.
त्यानं ते घर ठेकेदाराला देण्यापुर्वी इंजिनीयरकडून त्या घराचा नकाशा बनवला. तो नकाशा पास केला व घर बांधायला सुरुवात केली.
ते घर बांधणंं.........सटवाईच्या लग्नात सतरा विघ्न म्हणतात ना, त्याप्रमाणे होतं. सुरुवातीलाच जागेचा प्रश्न निर्माण झाला. जी जागा आपल्या घराच्या बाजुला त्यानं विकत घेतली. त्याच जागेच्या बाजूला एक व्यक्ती आपलं घर बांधून राहात होता. त्यानं त्या खाली जागेतील कितीतरी जागा दाबली होती व त्यावर बांधकामही केलं होतं. तसंच ती जागा सोसायटीतील ज्या माणसाची होती, त्यानं जागा तर विकली. परंतू ती जागा मोजमाप करुन दिली नाही. ती गोष्ट अरुण शिकला सवरला असतांनाही त्याला ते कळलं नसल्यानं त्यानंंही मोजमाप केलं नाही. तोच जागेचा वाद होता. अशातच बाजूच्या घरवाल्यानं त्याची कितीतरी जागा दाबून त्या जागेत आपलं बांधकाम केलं असल्यानंं ते बांधकाम तो पाडायला व जागा मोकळी करुन द्यायला तयार नव्हता.
अरुणनं ठेकेदाराला ॲडव्हॉंस म्हणून काही पैसे दिले होते. तसा तो, तो बांधकाम करेल, तेव्हाच त्याला जागा मोकळी करुन देणार असं त्यानं म्हटलं होतं. परंतू ती जागा त्यानं मोकळी करुन दिली नव्हती. त्यामुळं त्याला कित्येक वेळा तंबीही दिली होती, परंतू तरीही त्यानं जागा खाली करुन दिली नव्हती.
ॲडव्हॉंस दिलेला. त्यातच घर बांधायचं सामान आलेलंं. परंतू त्या जागा दाबणा-या माणसानं ती जागा द्यायला नकार दिला. अशावेळी विचार आला अरुणला. काय करावं सुचत नव्हतं. पैसा फसलेला होता. कोणी म्हणत होते की पोलीसस्टेशनला जर तक्रार टाकली तर त्याला बांधकाम करता येणार नाही, जेव्हापर्यंत प्रकरण शांत होणार नाही. त्यातच जमिनीचे दर वाढले असल्यानं अरुणही ती जागा सोडायला तयार नव्हता. कोणी म्हणत होते की त्या माणसाकडून त्या जागेचे पैसे घेवून घ्यावे व बांधकाम करावं. परंतू ज्यानं ती जागा दाबून घर बांधलं होतं, तो त्या जागेचे पैसेही द्यायला तयार नव्हता.
ती घर बांधायची भानगड. त्यातच ती नोकरी....... अतिशय वैतागून गेला होता तो. कधी वाटायचं की बेकारच आपण घर बांधायचं स्वप्न पाहिलं. परंंतू ते ध्येय होतं त्याचं. तो कसा मागं हटणार होता.
अरुणला तो व्यक्ती काही जागा देईना, शेवटी नाईलाजानं नुकसान झालं तरी चालेल, असा विचार करुन त्यानं ती तक्रार नाईलाजानं पोलीस स्टेशनला टाकली. पोलीसं आले. त्यांनी त्याला तंबी दिली. तशी अरुणलाही वाद करु नये, अशी तंबी दिली. परंतू त्यांच्या कृपेनं नाईलाजानं ती जागा मोकळी झाली.
अरुणनं जागेचंं मोजमाप केलं आणि बांधकाम सुुरु करणार. तोच त्याचा ठेकेदार म्हणाला,
"मी वादातील जागेचं काम करीत नाही."
ठेकेदारानं तसं म्हणताच त्याला फार मोठी समस्या निर्माण झाली. ॲडव्हॉंसही पैसा परत आला नाही. त्यामुळं आणखी समस्या. शेवटी दुसरा ठेकेदार शोधण्याचे प्रयत्न अरुणनं केले. परंतू कोणीही ती जागा वादातील आहे म्हणून बांंधकामाचा ठेका घ्यायला तयार होईना. शेवटी एक ठेकेदार मिळाला. हाच दुसरा ठेकेदार.
नवीन ठेकेदार. त्या ठेकेदारानंही ती जागा वादातील आहे असा विचार करुन त्या जागेचे जास्त पैसेे घेतले व ती जागा मोजून मापून त्या जागेवर बांधकाम सुरु केलं.
ती सोसायटी अगदी श्रीमंत माणसांची नव्हती. त्या सोसायटीत मजूर वर्ग होता. ते लोकं जास्त शिकलेले नव्हते. त्यांचे विचारही शिक्षणाचे महत्व जाणणारे नव्हते. दिवसभर काबाडकष्ट करुन सायंकाळी पैसा मिळवून त्यातील काही पैशाची दारु ढोसून आपला दिवस साजरा करणारे ते लोकं होते. त्यांचे विचारही अडाणी असून ते शिक्षणापेक्षा काबाडकष्टाला महत्व देत. ते कितीही मेहनत करीत असले तरी त्यांच्या पदरात त्यांनी केलेल्या कष्टानुसार त्यांना पैसे मिळत नव्हतेे. मेहनतीपेक्षा अतिशय अल्प पैसा त्यांना मिळत असे. घरी विश्वकोटीचं दारिद्रय असायचंं.
मुलं पैदा करायची त्यांना हौसच असायची. एक कड्यावर असायचं आणि एक पोटात. त्याच अवस्थेत एका बाळाला काखेत घेवून व वर डोक्यावर विटाचं वा रेतीचंं ओझं घेवून व हात सोडून त्या महिला काम करीत. त्यांंना काम करणं जमायचं नाही, तरीही ते काम करायचे. त्याच्या महिला एका बाळाला कडीवर घेवून व एक बाळ पोटात ठेवून व वर डोक्यावर ओझं घेवून चालतांना विचार यायचा की यांना या अवस्थेत काम करणं कसं जमत असावं.
मुलं. ..... मुलं एक नव्हती. अनेक मुलं असायची त्यांना. बालमजूर म्हणून कामाला लावू नये, म्हणून बालमजूरी प्रतिबंधक कायदा असतांनाही त्या सोसायटीतील लोकं आपल्या लहान लहान लेकरांना अगदी अल्प वयात कामाला नेत. त्यातच तीन चार वर्षाची मुलं आपल्या दुधपित्या भावाला वा बहिणीला सांभाळत आणि बाकीची आठदहा वर्षाची मुलं आपल्या मातापित्यांना बांधकामात मदत करायची. त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता. मोठमोठी वय झालेली ती मुलं अजूनही शाळेचा दरवाजा चढलेली नव्हती. मात्र त्या आईवडीलांसोबत राहतांना त्या इवल्या इवल्या मुलांना कोणत्या वस्तूला काय म्हणतात, हे कळत होतं. तसे ते नावही सांगत होते.
ती वस्ती अरुणच्या राहण्यालायक नव्हती. कारण अरुण एक आय ए एस ऑफीसर होता. तो खूप शिकलेला होता. त्यातच त्याला एकच सलील नावाचा मुलगा होता. दुसरं मूल त्यानं पैदा केलं नव्हतं तर त्यानं सलीललाच म्हणजे दुस-याच्या मुलाला आपला पुत्र मानले होते.
अरुणला तिथं घर बांधावंसंं वाटत नव्हतं. परंतू त्या नवीन जागेच्या बाजूची जागा ही त्याच्या आईनंं व त्यानं विकत घेतलेेली होती. तिही अशा परिस्थितीत की ज्यावेळी जागा घ्यायची त्यांची परिस्थिती नव्हती. ती एक आठवण होती त्याची. त्याच्या आईनं ती जागा विकत घेतांना अतिशय काबाडकष्ट केले होते. त्यानंंही कचरा वेचून पैसा गोळा केला होता.
बांधकाम सुरु होतं. त्यातच जी मंडळी काम करीत होती, ती मंडळी दारु पिवून काम करीत होती. ती मंडळी दारु पिण्याचंं कारणही सांगायची. म्हणायची की दारु पिवून काम केल्यानंं काम केल्यासारखंं वाटत नाही. कामाचा ताण कमी होतो. तसेच त्यांच्या महिलाही दारु पीत असत. परंतू त्या दारु पिण्यातून एक समस्या होती, ती म्हणजे एखाद्या वेळी हादसा तर होणार नाही.
पहिला मजला झाला होता. त्यातच त्या पहिल्या मजल्यावरुन एका मजूराचा एक लहान मुलगा खाली पडला. तो रेतीवर पडला, म्हणून बरे झाले. नाहीतर जीव जायची पाळी होती. त्यातच अरुणला भिती वाटली. मुलाला काहीही लागलं नाही. परंतू त्या मुलाला काही लागलं तर नाही, हे पाहण्याच्या चक्करमध्ये त्याची आई धावतच खाली आली. तसं खाली धावतपळत येताच तिच्या पायाला लागलं. तिचा पाय मुरगळला.
मजूराचा मुलगा खाली पडला खरा. परंतू त्याला पाच लेकरं असल्यानं त्या मजूराच्या चेह-यावर कोणतंच दुःख वाटत नव्हतं. तसंच त्याच्या चेह-यावर काही दुःखाचे लवलेश नव्हते.
ते घर....... त्या घराचंं बांधकाम करतांना आलेली सुरुवातीची अडचण की त्याचीच जागा असून बाजूच्या शेजारी माणसानं त्याला जागा देण्यास आणाकानी केली होती आणि आताचा प्रसंग म्हणजे तो मुलगा खाली पडण्याचा प्रसंग. फार विचित्र घडलं होतं. अशातच ठेकेदार त्या लोकांना दारु प्यायला मनाई करीत नव्हता.
ती मजूर मंडळी. लहान लहान मुलांना आणत होती कामावर. एक मुलगा पडूनही त्यांनी त्या मुलांना कामावर आणणं बंद केलं नव्हतं. 'आम्ही कुठं ठेवू जी लेकरं ' असे म्हणत ती मंडळी आपल्या लहान लहान लेकरांना कामावर आणत होती. तसंच 'काही घडल्यास आम्ही तुम्हाला दोष देणार नाही' असंंही ती माणसंं म्हणत होती. तसंच 'त्याही दिवशी आमची मुलगी खाली पडली तरी आम्ही तुम्हाला काहीही म्हटलं नाही' असंही त्यांनी म्हटलं होतं. ती मुलं जबरदस्तीनं जास्त जन्माला घातली गेल्यानं त्यांचं पोट पाणी जगविण्यासाठी त्यांना कामावर आणणं महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. त्यातच त्या मुलातून एखादा मुलगा दगावलाच तर त्यांना दुःख वाटूू शकत नव्हतं. कारण त्यांना भरपूर लेकरं होती जन्मास घातलेली. परंतू अरुणला वाटत होतंं की त्याच्यातील एक जरी दगावला तर त्याला त्यांच्या दगावल्यापणाचा संपुर्ण पैसा भरुन द्यावा लागेल. तो मनाई करीत होता त्यांना कामावर. त्यांनी त्या लेकरांना आणू नये म्हणून. परंतू ती इवली इवली तोंड पाहिली की त्यांची दयाही येत होती.
ज्याप्रमाणे त्या लहान मुलांच्या पडण्याची भिती होती. तशीच भिती होती त्या दारु पिवून काम करणा-यांची. परंतू सुदैवानं तसं काही घडलं नाही.
ढाचा तयार झालेला होता. आता प्लॉस्टर बाकी उरलं होतंं. प्लॉस्टर सुुरु होतं. त्यातच बाजूच्या त्या शेजारी माणसानं तो बांधकामाला पाणी टाकतो व ते पाणी माझ्या अंगणात येतं, म्हणून तो तोंड वाजवीत होता नव्हे तर भांडण करीत होता. त्याचंं पाणी येतं म्हणणं मनाला खटकत होतं.
घर बांधकाम असो किंवा सिमेंटचंं बांधकाम. ते बांधकाम करीत असतांना भिंतींना पाणी मारावं लागतं. त्याशिवाय भिंती पक्क्या होत नाहीत. परंतू शेजारी व्यक्ती त्या घराला पाणी मारु नको असेच म्हणत होता. तसं पाहता सिमेंटच्या बांधकामास पाणी न मारल्यास ते बांधकाम पक्कं होत नाही. या तत्वानुसार त्या घराला पाणी न मारल्यास बांधकाम कच्चं होईल व ते उद्या पडेल, याची भिती अरुणला होती. त्यातच पुन्हा घर बांधतांना शेजारील व्यक्ती गुंडांची धमकी देत असे. म्हणत असे की पाणी मारायचं नाही. नाहीतर माझे गुंड येतील व रात्री घरात घुसून मारतील. त्यामुळं आणखी एक भिती अरुणच्या मनात निर्माण झाली होती. त्या माणसाची सासूही अश्लील शब्दात बोलत होती. जे मनाला नव्हे तर सुशिक्षीत मनाला पटत नव्हतं. तसं पाहता तो भागच अरुणच्या राहण्यालायक नव्हता. परंतू अरुणची जिद्द त्याला ते घर बांधण्यास कारणीभूत ठरत होती.
गुंड.......गुंडांना पैसे दिल्यास ते केव्हाही येतात. तसा एकदाचा तो प्रसंग घडला. भर दुपारची वेळ होती. अरुण नोकरीवर ड्युटी बजावण्याकरिता गेलेला होता. अचानक भर दुपारीच शेजा-याचं सईसोबत भांडण झालं. भांडणात शेजा-यांनी भर दुपारी सईला गुंडांची धमकी दिली. म्हणाला की आज रात्रीच गुंडे आणतो आणि घरात शिरवतो.
शेजा-यांनी दिलेली सईला धमकी. त्यातच सई काही कमजोर नव्हती. तिही राजकारणात मुरलेल्या बापाची एक मुलगी होती. तिचीही तिच्या बापाप्रमाणे गुंडांशी ओळख होती. त्यातच त्या शेजा-यानं सईला धमकी दिलेली असल्यानं सईनं त्याला दाखविण्यासाठी एका गुंडाला मदतीसाठी बोलावलं व तो गुंडही एका फोनवर सईसाठी धावत आला.
तो गुुंड येताच त्या शेजा-याची घाबरगुंडी उडाली. त्याला वाटलं की आता आपली काही खैर नाही. हे गुंड आपल्याला मारतील. याच धाकानं त्यानं पोलीसांना फोन लावला व काही वेळातच पोलीस आले.
पोलीस आले. त्यांनी घराचा फोटो काढला. सईला व शेजा-यांना काही प्रश्न विचारले व म्हटलंं की आपण जास्त पाणी टाकू नका. नाहीतर बांधकाम थांबेल. त्यावर सई म्हणाली,
"साहेब, मला हे नेहमी नेहमी गुंडांच्या धमक्या देतात. म्हणतात की रात्री गुंड आणणार व घरात घुसून मारणार. तेव्हा मला यांच्यापासून भिती आहे. आजही अशीच धमकी ही मंडळी देत होती. त्यावर मीच फोन लावत होती तुम्हाला. परंतू यांंचा फोन लागला व तुम्ही आले."
पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा केली व गुन्हा कोणाचा असेल हे ठरवलं. त्यातच शेजारचे चार लोकं व सई एकटी. ती बरोबरीची लढाई नव्हतीच. बाजू शेजा-याचीच सबळ दिसली आणि गुन्हाही त्यांचाच दिसला. तशी वास्तवता होती ती.
ती वास्तविकता दिसताच पोलिसांनी त्यांना म्हटलं,
"तक्रार करायची आहे का? तक्रार अवश्य करा. परंतू एक लक्षात घ्या की ह्या तक्रारीवर त्यांचं जे नुकसान होईल. ते झालेलं नुकसान तर ही मंडळी सहन करतील. परंतू एक लक्षात घ्या. उद्या तुमचंही बांंधकाम होईल, त्यावेळी ही मंडळी जाणूनबुजून भांडण करतील व तुमचंही बांधकाम बंद करतील हे लक्षात घ्या."
पोलीस निघून गेले. परंतू शेजारी दबला होता थोडासा. तो टोमणे मारत होता कधीकधी. ते टोमणे ऐकून एकदा सई म्हणाली,
"हे टोमणे मारायची गरज नाही. टोमणे जर मारायचे असतील तर चाला पोलीस स्टेशनला. तुम्हीही दहा द्या आम्हीही देतो."
सईनं दाखवलेली तिची हिंमत.......त्यानंतर शेजा-याचं तोंड बंद झालं होतं.
सईनं शेजा-यांचं तोंड बंद केलंं. परंतू शेजारीच तो. तो वस्तीत राहात होता. त्यानं एक नवी चाल चालली. त्यानंतर त्यानंं विरोध करीत त्या घराचं बाहेरचं प्लॉस्टर होवू दिलं नव्हतं. अरुणच्या घरात आतमध्ये पाणी शिरावं व त्याला त्रास व्हावा या हेतूनं.
अलीकडे लोकं आपलं पाहात नाहीत. दुस-याच्या ताटात झाकून पाहात असतात. दुसरा काय करतो, काय खातो यातच त्यांचं जीवन जात असतं. त्यातच दुस-याच्या निंदा करण्यात ती मंडळी वेळ घालवीत असतात. परंतू अरुण त्या स्वभावाचा नव्हता. चाहे तर अरुण त्या शेजा-यांना धडा शिकवितांना एका फोनवर पोलिसांना बोलावू शकत होता. कारण तो आय ए एस अधिकारी असल्यानं सरकार तसंच त्या शहरातील पोलीस त्याच्या हातात होते. परंतू सईला व त्याला ते दाखवायची सवय नव्हती.
अरुण साध्या स्वभावाचा होता. तो कोणाच्या वाट्याला जात नव्हता. आज त्याच्या घराचं प्लॉस्टर झालं नव्हतं. शेजा-यानं त्याच्या घराचं प्लॉस्टर थांबवताच त्यानं असं लिक्वीड आणलं की ज्या लिक्वीडनं त्यानं बाहेरचं आतमध्ये येणारं पाणी थांबवलं होतं. मात्र काम बंद होवू दिलं नव्हतं.
आज त्याचं घर बांधून पुर्ण झालं होतं. अनेक अडथडे झेलीत त्याचं घर डौलात उभं होतं. त्यानं अगदी समोरच आपल्या आईचा फोटो लावला होता. वडीलाला त्यानं पाहिलं नव्हतं. म्हणून वडीलांचा फोटो त्याला लावता आला नाही. मात्र प्रत्यक्ष त्या घरात त्याचे आईवडीलच राहात असावेत असं त्याला वाटत असे. त्यानंतर त्यानं गावाकडल्या जागेत एक मंदीर बनवलं होतं.
ते घर बनलं होतं. त्याचबरोबर त्याच्या आईचं स्वप्न पुर्ण झालं होतं. त्याचबरोबर त्याचं ध्येयही साकार झालं होतं.
ते घर बनलं होतं. परंतू तो त्या घरात जास्त राहात नसे. मात्र वेळोवेळी तो या घराला भेट देत असे आणि जेव्हा भेट देत असे, तेव्हा त्याला प्रत्यक्ष त्याचे आईवडील भेटल्याचा भाष होत असे. जणू त्यांनीच आशिर्वाद देत ते घर त्याचेकडून बांधून घेतलं होतं. हे घर स्लॅबचं होतं आणि या घरात आता कोणता माकड उड्या मारीत नव्हता. त्यांचा त्रास नव्हता. मात्र अजूनही त्रास होताच. तो म्हणजे मानवरुपी माकडांचा. ही मानवरुपी माकडं मनात द्वेषपणा ठेवून छळत होते अजूनही अरुणला. तेव्हा असं वाटत असे की ती रानातील माकडं परवडली, परंतू ही मानवरुपी माकडं परवडणारी नाहीत. त्यावरही मात करुन तो येत होता या घराकडे. कारण ती फोटोत लटकलेली त्याची आई त्याला खुणावत होती की बाळा, पत्नी आणि मुलीची काळजी घेतोस, अवश्य घे. परंतू वर्षातून एकदा तरी माझी भेट घ्यायला ये.
ते घर...... ते घर जणू त्यानं आपल्या आईसाठीच बांधलं असावं असं वाटत होतं. कारण ते घर जरी अरुणनं बांधलेलं असलं तरी ते त्याच्या आईचं अस्तित्व म्हणून त्यानं बांधलं होतं. तो प्रत्यक्ष तिथे राहात नसून फक्त त्याची फोटोतील आईच तिथं राहात होती. बाकी कोणी नाही आणि ती आईही त्या घराच्या रुपानं पुत्र असावा तर असा राजपुत्र. ज्यानं मृत्यूनंतर का होईना, आपल्या आईसाठी घर बांधलं आहे ही गोष्ट खुणावत होती.
 
************************************************
 
आज अरुणला ते घर बांधण्याची आवश्यकता नव्हती. परंतू ते घर त्यानं आपल्या आईसाठी बांधलं होतं. आपल्या आईचं अस्तित्व कायमचं आठवणीत राहावं म्हणून ते घर होतं. ते घर म्हणजे आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलं होतं त्यानं.
अलीकडच्या तरुण तरुणांना ते घर म्हणजे एक चपराक होती. कारण अलीकडची मुलं ही शिकतात. मोठी होतात. मोठी झाली आणि त्यांना पंख फुटले की ते आपल्याच मनानंं एखादी मुलगी पाहून विवाह करतात. जी मुलगी शिकली तर असते. परंतू ती हे विसरते की ज्या माऊलीनं अतिशय कष्ट उपसून त्या बाळाला शिकवलं व लहानाचा मोठा केला. तिच्याचमुळं तो शिकला व मोठ्या नोकरीला लागला. तो मोठ्या नोकरीला लागला. म्हणून आपल्याला आवडला व आपण त्याचेशी विवाह बद्ध झाले. आपलं जे सुखी जीवन आहे. ही देण त्याची नसून त्याच्या मायबापाची आहे.
ती आजची मुलगी ते सारं विसरुन त्या सासूसास-याची सेवा करीत नाही. उलट ते अडाणी आहेत वा त्यांचा त्रास होतो, म्हणून त्यांना वृद्धाश्रमात टाकतात. नव्हे तर आमच्या घरी मानवाईक लोकं येतात व त्यांना त्यांचा त्रास होतो म्हणूून त्यांचा अधिवास म्हातारपणी एका कोंदट कुजक्या खोलीत असतो. ती मंडळी आईसाठी का घर बांधतील. जे साधी आपल्या आईचीच सेवा करु शकत नाहीत.
अरुणनं आपल्या आईचीच सेवा केली नाही तर तिच्या काबाडकष्टाचा परिणाम म्हणून त्यानं ते घर शेजारच्या माणसाशी अति प्रमाणात भांडण करु करु उभं केलं होतं. दुसरा मुलगा असता तर त्यानं तिथं शुल्लकचे वाद होतात, म्हणून विकून टाकलं असतं. त्याला भांडण करीत करीत बांधलं नसतं. तसंच ते घर बांधल्यानंंतर ते घर त्यानं किरायानं दिलं असतं.
आज ते घर अस्तित्वात होतं. जणू त्या घराच्या रुपानं त्याची आईच जीवंत होती. तिही सरस्वती रुपानं. ते घर त्यानं किरायानं दिलं नाही. मात्र त्यानं त्या घरात आपल्या आईचा एका कम-यात मोठा फोटो लावला होता. तसेच त्या वस्तीतील गोरगरीबांच्या मुलासाठी त्यानं त्या घरी एक वाचनालय बनवलं होतं. हेच ध्येय होतंं त्याचं आणि जणू त्याच्या आईचं स्वप्नही.
तो शासनाचे आभार मानत होता. कारण शासनानं जर शाळाबाह्यतेच्या योजना आणल्या नसत्या तर आज तो आय ए एस अधिकारी बनला नसता तर आजही तो फुटपाथवर कचराच वेचत राहिला असता एक भिकारी बनून.
त्याला सईनंही मदत केली होती. काल आय ए एस बनवितांना आणि आज घर बांधतांनाही तिनं त्याला मदतच केली होती. तिनं सासू जीवंंत असतांनाही तिची सेवा केली होती आणि आज मृत्यूनंतरही ती तिच्या सासूच्याच घरासाठी भांडली होेती.
सईचा सलील मोठा झाला होता. तो संस्कारी निघाला होता. तो अरुणचं रत्त नसला तरी त्याच्याच आईच्या वळणावर निघाला आहे असंही वाटत होतं.
आज अरुण म्हातारा झाला होता, त्याचबरोबर सईही. परंतू तरीही त्याला त्याच्या आईची आठवण येत असे आणि जेव्हा त्याला त्याच्या आईची आठवण येत असे. तेव्हा मुक्तपणे तो त्यानं बनवलेल्या घरी येवून राहात असे. कारण त्याच घरानं त्याच्या रुपानंं एक आय ए एस अधिकारी घडवला होता नव्हे तर आज तेच घर त्या ठिकाणी वाचनालयात येणा-या कित्येक मुलांना अभ्यासाची नांदी लावत होतं. त्या घरातील अरुण एकटाच नाही तर त्या घरातील वाचनालयात येणारी कित्येक मुलं कोणी आय ए एस तर कोणी आय पी एस अधिकारी बनले होते. तसेच बरेचजण चांगल्या हुद्द्यावर लागले होते. कारण त्या घरात एका आय ए एस बनविणा-या मातेचं अस्तित्व होतं. आशिर्वाद आणि बरंच काही..........ज्यातून प्रेरणा घेवून बरेच विद्यार्थी आपलं भविष्य घडवीत होते. आपल्या जीवनाचं सार्थक करीत होते. तसेच ते घर प्रत्येक घरच्या स्नुषांना खुणवीत होते की सासू सास-यासाठी घर नाही बांधलं तरी चालेल. परंतू त्यांची सेवा करा. वृद्धापकाळी त्यांची काळजी घ्या. त्यांंना वृद्धापकाळी वृद्धाश्रमातही टाकू नका. कारण वृद्धाश्रम त्यांच्यासाठी तुरुंग असतं आणि तेे त्यातील कैदी.
 
*********************************************************************************समाप्त**********