भाग २३ मोक्ष
महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
कथा सुरु..
रात्री 11 pm..
मृत्युधारी अंधा-या रात्रीचा खेळ सुरु झाला होता.
आकाशातिल काळया ढगांनी चंद्राला झाकून टाकल होत.
'किरकिकिर .. ' आवाज करत रातकिडे ओरडत होते.
बाहेर पडू नका बाहेर धोका आहे असं ओरडून सांगत होते.
हॉस्पिटलची मागची बाजू दिसत होती.
मोठ मोठाल्या शुभ्र ट्यूबलाईटस पेटलेल्या खांबाची एक रांग पुढे गेलेली दिसत होती..
त्या खांबल्यांचा उजेड खाली जमिनीवर बसवलेल्या रंगीबेरंगी ब्लॉकच्या लाद्यांवर पडला होता - त्याच लाद्यांची लांबच्या लांब रांग पूढे गेलेली दिसत होती.
पूढे जाऊन धुक्यात हरवत होती.
त्या ब्लॉकच्या लादीच्या दोन्ही तर्फे साडे तीन फुट उंचीच कट केलेल गवत होत.
ही एक सरळमार्गी वाट होती-जी हॉस्पिटलच्या मागच्या गेटला जाऊन मिळायची- मागच्या गेटमधुन
पुढे सुनसान हाईवे लागायचा ..जिथून मेलेल्या मांणसाना घेऊण जाणारी एम्बुलेंस जात असायची.
दिवसा हॉस्पिटमध्ये येणारी काही मांणस हमखास ह्या वाटेवर फे-या मारतांना दिसायची- दिवसा मांणसांच्या संनिध्यात , सोबतीला अशणारी ही वाट- मनाला सुखावून जायची !
हिथल सौंदर्यच तस होत..
पन जस जस अंधार पडायला सुरुवात व्हायची तसे मांणसाचा वावर कमी व्हायला लागायचं, दिवसा मांणसांनी गजबलेली, सौंदर्यवान दिसणारी ही वाट रात्री भक्कास वाटायची..
रात्री एकल्या मांणसाला इथून जायला - पोटात गोळा यायचा -
तसंही हॉस्पिटलमध्ये मुर्दाघरात बेवारस लाश पडलेल्या असायच्या - त्या बेवारस मयतांना जाळण्यासाठी हॉस्पिटलने मागे एक सेपरेट स्मशान बनवल होत - तिथे दिवसाला एक नी एक मईत जळायचंच - असा एक ही दिवस गेला नव्हता की
तिथल स्मशानात मयताची शेकोटी पेटली नसेल.
त्याच स्मशानात एक चित्ता जळुन गेली होती ,
चित्तेतली लाकडांची धगधगती विस्तव तेवढी शिल्लक होती.
हवा आली की ती धगधगती विस्तव अजुनच लालभडक निखारे उडवत गरम होत होती.
त्या निखा-या पासून पुढे चाळीस मीटर अंतरावर
हॉस्पिटलची पिवळी भिंत दिसत होती.
त्या भिंतींजवळ उभ राहून वर पाहता -
हॉस्पिटलचे लाईटसने उजळले पंधरा- मजले दिसत होते.
सर्वमजल्यांच्या लाईटस पेटल्या होत्या -
काचेच्या खिडक्यांमधुन पिवळ्या बल्बचा - तर कुठून पांढ-या शुभ्र ट्यूबचा प्रकाश दिसत होता.
रात्र झाली तसे हॉस्पिटलचे प्रवेश्द्वार दरवाजे बंद झाले होते. प्रवेशद्वार दरवाज्यांबाहेर सेक्युरीटी गार्ड हातात शस्त्र घेऊन पहारा देत होते.
हॉस्पिटल मध्ये
दिवसा लोकांच्या वावराणे हॉस्पिटल गजबजलेल असायचं-
लोकांच्या बोलण्याचा, त्यांच्या चपला बुटांचा- चालण्याचा आवाज यायचा..लोकांच्या वावराने शांतता डिवचली जायची..
पन आता रात्र झाली होती.
दहाव्या मजल्यावरची ती सरळ रेषेतली कोरिड़ॉर
सुनसान , सामसूम पडली होती.
कोरिड़ॉर मध्ये दोन्ही बाजुंना पेशंटरूम दिसत होत्या. - त्या पेशंटरूमध्ये रुग्णांचे एक दोन नातेवाईक बसलेले ,कुठे झोपलेले दिसत होते.
कोरिड़ॉर बाहेर एक लाकडी वुडन सोफा दिसत होता !
त्या सोफ्यावर आर्यंशचा बसल्या बसल्याच डोळा लागला होता.
त्याच्या डाव्या हातापासून तीन - पावलांवर
एक अर्ध लाकडी आणी अर्ध काचेच द्वार होत.
त्या काचेतून आतल्या खोलीतल दृष्य दिसत होत..
रुग्णाच्या खाटेवर ललिताबाईंना झोपवल होत.
आणी त्या खाटेच्या उजव्या बाजुला दोन खुर्च्या होत्या.
एका खुर्चीवर आनिशा बसली होती- ललिताबाईंकडे पाहत होती. दुस-या खुर्चीवर
मीराबाई बसल्या होत्या- तर श्रीसंथराव हाताची घडीघालून जागेवर उभे होते.
आनिशा आपल्या आज्जीकडे पाहत होती.
ललिताबाईंचा चेहरा जरासा ओढला होता - मांस जरास हाडांना चिटकल्यासारख वाटत होत..
तोंडाचा आ- वासला होता , आणी त्याच तोंडावर
ऑक्सिजन मास्क लावल होत.
त्या पारदर्शक मास्कवर म्हातारीच्या तोंडातून श्वास बाहेर पडताच सफेद वाफ दिसायची.
(म्हातारीची अशी अवस्था पाहून ती उद्याच दिवस पाहते की नाही हे ठरवण सुद्धा कठीण काम होत)
" बाबा डॉक्टर म्हंणाले की आज्जी तर ठिक आहे ! मग हा ऑक्सिजन मास्क का लावल आहे ? "
" नाही बाळा डॉक्टरांनी लावल नाहीये. एक्च्युईली, मीच सांगितल की आजच्या दिवस आईना ऑक्सिजन मास्क लावा म्हंणून! " श्रीसंथराव म्हंणाले.
" अच्छा ! " आनिशा हळू स्वरात इतकेच म्हंणाली.
तिने पुन्हा मळूल चेह-याने आपल्या
आज्जीकडे पाहिल- तिला तिच्या आज्जीचीही अवस्था बिल्कुल पाहावत नव्हती! ती लवकरात लवकर बरी व्हाव , अस तिला वाटत होत.
अचानक तिला डॉक्टरांच सकाळचं बोलण आठवल.
" ललिताबाईंना कसलीतरी भीतीमय चिंता सतावत आहे , म्हंणूनच त्यांच खाण्या ,पिण्यावर लक्ष नाहीये - आणी जर असंच सुरु राहिल, तर परिणाम गंभीर होतील!"
" बाबा!" तिने आपल्या वडीलांकडे पाहिल. "आज्जीला अशी कोणती चिंता सतावत आहे? तुम्हाला माहीती आहे ना? मग सांगा ना आम्हाला. "
तीने तिच्या वडीलांकडे पाहिल.
मीराबाई सुद्धा श्रीसंथरावांकडेच पाहत होत्या.
श्रीसंथरावांच्या चेह-यावर गंभीर भाव पसरले होते...आता त्यांना खर काय ते सांगावच लागणार होत.
XXXXXXXXX
एका झाडाखाली समर्थ ध्यानास्थ बसलेले दिसत होते. आजूबाजूचं परिसर जंगलीच होत. जिकडे पाहाव तिकडे झाडांच्या काळ्या आकृत्या उभ्या दिसत होत्या.
रात्रीचा प्रहार असल्याने हलकीशी थंडी अंगाला झोंबत होती. दूरून थंड हवेमार्फत कानांवर श्वापदांचा ओरडण्याचा , विव्हळमय आवाज ऐकू येत होता.
समर्थांच्या बंद डोळ्यांआड- काळ्या पटलांवर
चित्र- विचीत्र रंगाचे तरंग उठत होते.
कधी रंगीबेरंगी धुळीकन चमकत होती तर कधी गोल गोल भिंगणा-या चक-या दिसत होत्या, तर कधी लाल -पिवळ्या,निळ्या,आकाशी रंगाचा बार फुटत होता..
समर्थांच्या कपालावर लाल रंगाचा टिळा लावला होता - तो टिळा तांबडसर प्रकाशाने चकाकला.
आणि अचानक काळ्या पटलांवरच्या पडद्यांवर चित्रपट गृहातल्या पडद्यासारखी दृष्य दिसू लागली..
एक सीमेंटचा रस्ता , रस्त्याबाजुलाच एक फला दिसत होता - पांढरट फळ्यावर काळ्या अक्षरात देवपाडा गाव नाव लिहीत होत.
ते दृष्य झटकन बदल्ल..
दुसर दृष्य आल..
एक पुर्णत पाषाणाच मंदिर -मंदिरात शंकराची एक काळ्या रंगाची पाषाणी .. उभी मुर्ती दिसत होती- मुर्तीपुढे दिवा तेवत होता.
ते दृष्य बदल्ल ..
रात्रीच्या अंधारात सामसूम पडलेल गाव दिसू लागल.
मग गावातल्या घरांना वेगाने मागे सोडत
दिव्य दृष्टि एका हवेलीच्या गेटपाशी आली.
एक दोन झापांच गेट दिसत होत..गेट पल्याड दोन पहारेकरी हातात काठ्या घेऊन उभे होते.
मग दिव्य द्रुष्टीने हवेलीकडे पाहिल..
तीन मजली असंख्य खोल्यांची हवेली होती.
दिव्यदृष्टिची नजर तिस-या मजल्यावर एका खोलिवर पडली.. खिडकीची झडप उघडी होती.
खिडकीच्या आत काळभोर विषारीसर्पाच्या काळ्या कातडीचा अंधार भरला होता - त्या अंधारात पाहता समर्थांच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या..
भुवया ताणल्या गेल्या - त्या अंधारात कोणाचीतरी अमानवीय उपस्थिती जाणवत होती.
आणी ती पुढील शक्ति अंधारात उभी राहून समर्थांना पाहत होती-
त्या शक्तिचे पिवळसर हळदीसारखे डोळे- त्यात काळसर ठिपका अंधारात झटकन चकाकला..
आणी पुढच्याक्षणी खिडकीची उघडलेली झाप धाडकन आपटत बंद झाली.
समर्थांचे श्वास जरासे वाढले होते- छाती वर खाली होत होती.
समर्थांपासून तीस पावलांवर एक शेकोटी पेटली होती- त्या शेकोटी पुढे मेनका - गबलू दोघेही बसले होते.
" गबलू , समर्थ काय करत असतील?"
" काय माहीती, कृणालशीच बोलूयात का?"
" हो, चल !"
मेनका गबलू दोघेही जळणारी शेकोटी मागे सोडून.. पुढे चालत येत समर्थांच्या ध्यानास्थ बसलेल्या जागेजवळ आले.
" समर्थ !" मेनकाने हलूच हाक मारली.
तिच्या त्या वाक्यावर समर्थांनी हळुच डोळे उघडले.
" मी कधीपासून पाहत आहे , आपण भ्रतांर वरून आलो आहोत, तेव्हापासून तुम्ही ध्यानास्थच बसले आहात ! नक्की कसल शोध घेताय ध्यानास्थ बसून !"
मेनकाच्या प्रश्नावर समर्थ मंद स्मित करत हसले.
त्यांनी होकारार्थी मान हळवत तिघांनाही खाली बसायची खूण केली.
गबलू- मेनका दोघेही जमिनिवर बसले.
जमिनिवर बसतांना दोघांनिही आप - आपली पापणी लवली आणि ती पुन्हा उघडली..तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर शेकोटीतल्या अगिचा तांबडसर प्रकाश पडला.
दोघांनिही आश्चर्यकारक नजरेने एकमेकांकडे पाहील, कारण काहीवेळा अगोदर त्यांनी ही शेकोटीजवळची जागा सोडली होती. आणी ते दोघे पुन्हा त्याच जागेवर आले होते.
एक चमत्कारच म्हंणायल हव ह्यास.
समर्थ शेकोटीभोवती खाली मांडी घालून बसले होते.
आणी ध्यानास्थाखाली बसलेला तो झाड मागे होत.
हा छोठासा चमत्कार समर्थांचाच होता - हे त्या दोघांनाही कळून चुकल होत.
समर्थांनी आपला उजवा हात सरळ धरला..
" घनशोषकंम्हंहंहं... प्रगटंम्म्ं..!"
हाताच्या तळव्यावर ह्ळकासा निळसर रंगाचा निमुळता प्रकाश तैयार होत होता - मग हळू हळू तो प्रकाश वाढत गेला.. आणी त्या प्रकाशाला आकार येऊ लागल.. ! तो घनाकाराचा एक रुबिक क्यूब होता.
फरक इतकाच की त्या रुबिक क्यूबवर सामान्य रुबिक क्यूब प्रमाणे चारही बाजुंनी वेगवेगळे रंग नसुन फक्त फिकट निळसर प्रकाशित रंग होते.
" कृणाल हे काय आहे ?" गबलूने दात काढत विचारल.
" हा आहे घनशोषक उर्फ आत्माशोषक ! ह्या घन आत्मशोषकात जेव्हा पन्नास आत्मे कैद होतिल. तेव्हा येहूधीचे तिन्ही देह ज्या -ज्या रहस्यमयी स्थळांवर आहेत , त्या स्थळांच मार्ग आपल्याला कळेल - आपण दोन आत्मे बंदीस्त केले आहेत ..!
आता उर्वरित अठ्ठेचाळीस आत्मे , पिशाच्छ, राक्षस ह्यांची कैद बाकी आहे."
समर्थांच्या वाक्यावर गबलूने दात काढत होकारार्थी मान हळवली.
" पन समर्थ , त्या सैतानी मजुराने आपल्याला जे देवपाड गाव सांगितलं, ते कस शोधायचं ?
आता पृथ्वीवर एकाच नावाची कितीतरी गाव अशनणार ना!" मेनका.
" त्यासाठीच तर मी ध्यानास्थ बसलो होतो ! आम्ही
आमच्या दिव्यदृष्टिने देवपाडा नावाच्या चार गावांमध्ये प्रवेश केला - प्रथम तीन गावांमध्ये कसलेही अमानवीय अंश दिसले नाहीत - परंतु चौथ्या वेळेस मात्र आम्हाला ते दिसल आहे! "
समर्थांच्या डोळ्यांसमोरून काहीवेळा अगोदर पाहिलेल ते दृष्य जसच्या तस दिसल.
" उद्या सकाळीच आपण सर्व त्या गावी जाण्यासाठी निघणार आहोत !"
"उड्या सकाळी?" गबलू.
.." हो गबलू, उद्या सकाळीच ! कारण उद्याच दिवस वाममार्गी अनुयांईसाठी खुपच शुभ आहे ."
" समर्थ ! ते कस ?" मेनकाने विचारल.
" उद्यापासून ठिक दहा दिवस - घटस्थापना आहे. स्वर्गातल्या देवांची मणुष्य वस्तीत स्थापना केली जाईल.- मग सर्व भुताखेतांना पृथ्वीवर यायची खुळेआम परवानगी मिळेल. ज्याप्रकारे मणुष्यांसाठी नवरात्र असते तसंच वाममार्गी अनुयाईंसाठी ही काळीनवरात्री असते ." गबलू मेनका दोघेही समर्थांच बोलण लक्ष देऊन ऐकत होते.
" उद्या संध्याकाळी पौर्णिमेचा शुभ्र चंद्र उगवणारा आहे - आणि मला वाटत, भ्रतांर वरून त्या म्हाता-या मांणसाणे त्या पेटा-यामधुन जी वस्तू चोरलीये ..तिचा उद्याच कोणत्यातरी भयंकर विधीसाठी वापर केला .. जाणार आहे . !"
समर्थांनी मेनका - गबलू दोघांकडे एक कटाक्ष टाकला.
" माझ्या दिव्य दृष्टीने मी तिथे पोहचलो होतो. शत्रु कोण आहे ? हे पाहण्याच मी प्रयत्न केल ,परंतु त्याने त्याच्या शक्तिने संपर्क धुडकाऊन लावल . मी पुन्हा दिव्य दृष्टीमार्फत तिथे पोहचण्याच प्रयत्न केल तर
संपर्क होऊ शकल नाही. ह्यावरून समजत - की समोर उभा शत्रु ताकदवर आहे , आणि आता तो सावध ही झाला आहे. उद्याचा दिवस आपल्यासाठी खुप खास आहे - लढ़ा होणार हे नक्कीच आहे, विधिलिखित आहे. ह्यावेळेस समोरच्या शक्तिची
ताकद ? ते किती आहेत? त्या शक्तिची प्रजात काय आहे ? ह्या सर्वाँपासून आपण अनभिज्ञ आहोत." समर्थांनी गबलू- मेनका त्या दोघांकडे गंभीर नजरेने पाहिल.
" उद्याच्या लढ़ाईमध्ये सामील व्हायचं की नाही , हे तुम्हा दोघांवर आहे ! नकार असेल तरी न घाबरता सांगा "
" समर्थ"
मेनकाने प्रथम समर्थांकडे पाहिल..मग गबलूकडे व पूढे म्हंणाली
" तुम्ही सोबत असतांना कसली भीति! आणी जरी समोरच्या शत्रु बद्दल आपल्याला माहीती नसेल, तरी ते आपण शोधुन काढु..! कारण, जर उगम आहे ..तर अंत ही आहेच !" मेनका म्हंणाली.
एकसेकंद तिच्या डोळ्यांत समर्थांना एक विशीष्ट प्रकारची उच्च शक्तिहिंत लकाकीमय लहरी दिसल्या.
समर्थांना एकसेकंदच ती लकाकी दिसली आणि पून्हा ते डोळे सामान्य झाले होते.
समर्थांनी तिच्या त्या वाक्यावर फक्त हलकस स्मितहास्य करत होकारार्थी मान हळवली..गबलूही दात विचकत हसला.
xxxxxxx...
हॉस्पिटल
श्रीसंथरावांनी आनिषा- मीराबाई दोघींनाही
ललिताबाईंच्या चिंतेच कारण सांगितल होत.
" बाळा , मी जे काही सांगितलं , ते कसलही बनाव- खोटी माहीती नाही. पन सत्य हेच आहे की माझ्या वडीलांचा आत्मा एका अतृप्त इच्छेने हवेलीत गेली तीस वर्ष भटकत आहे . ह्या तीस वर्षातल्या दर पितृपक्ष अमावास्याला माझ्या वडीलांसाठी दाखवलेल नैवेद्य कावळा ग्रहण करतच नाही! न जाणे बाबांची काय इच्छा मागे राहिली असावी देवच जाणो !" श्रीसंथरावांच्या वाक्यावर आनिषाचा विश्वास ठेवण जरास जड जाणार होत.
कारण ह्या विज्ञानायुगातले विचार ह्या असल्या गोष्टींना थरा देत नव्हते..जो पर्यंत डोळ्यांनी पाहिल जात नाही तो पर्यंत तरी ते सत्य आहे मानण चुकीचंच , मूर्खपणाच!
" बाबा आर यु शूअर ?" आनिषा...
"बाळा मी म्हंटल होत ना , ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत ! कारण ह्या गोष्टीला काही अर्थच नाहीये ! कारण आता विज्ञानवादी युग आहे -
तंत्रज्ञानावर माणूस विश्वास ठेवतो , ह्या जादूटोणा तंत्रमंत्रावर नाही !" श्रीसंथरावांच्या वाक्यावर मीराबाई आनिषा दोघिही गप्प उभ्या होत्या.
ह्यावर त्या काय म्हंणनार होत्या?
शहरात राहणारी मांणस ती, त्यांच्यासाठी हे सगळ खोट होत- पन श्रीसंथरावांनी काहीतरी अनुभव घेतला होता ना ? म्हंणूनच त्यांच ह्या गोष्टीवर विश्वास होत.
" आनिषा मीरा! " श्रीसंथरावांनी शांतता मोडली.
" मला वाटत , आपण हा विषय ईथेच थांबूयात आणि थोडी विश्रांती घेऊयात ! हंम्म ?" श्रीसंथरावांनी
मायेने आनिषाच्या डोक्यावरून हात फिरवला.
तेवढ्यात आनिषाला न जाणे काय झाल तीने आपल्या वडीलांना लहान मुलीसारखी मिठी मारली..
छातीवर डोक ठेवून ती तशीच आपल्या बाबांना
मिठी मारून राहिली होती.
श्रीसंथरावांनी पुन्हा तिच्या डोक्यावर हाट ठेवल आणि हळकेच मायेने गोंजरू लागले.
मीराबाईंच्या डोळ्यांतून बाप-लेकीच हे प्रेम पाहूण चटकन डोळ्यांतून अश्रु बाहेर आले.
xxxxxx
काहीवेळा अगोदर
10:00 pm
देवपाडा गाव ग्रामपंचायत ऑफिस..
ग्रामपंचायत ऑफिस बाहेर गावातली चाळीस -पन्नास मांणसे जमली होती.
उजेडासाठी लाईट ट्यूब पेटल्या होत्या - तर कुणी हातात मशाली पेटून घेतल्या होत्या.
गावात घडणा-या हत्याकांडांना रोखण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आजही मीटिंग भरवली होती.
गावात घुसलेल्या ब्यादेने सरपंच - उपसरपंच दोघांचा काटा काढला होता.
आता गावातल्या ग्रामपंचायतीतले जे सदस्य होते अशी मांणस, लोकांसमोर उभी होती.
एकूण तीन जण लोकांसमोर उभे होते.
पहिला सोमनाथ ठाकुर वय एकोणचाळीस, दुसरा जिवन सातपुते वय एक्केचाळीस, शिलाराम सारवे वय पन्नास हा दोघांपेक्षा जास्त वयाचा होता. .
" हे पाहा गावक-यांनो गावात , काही दिवसांपासून एकूण सातच्या वर खून झालेत. आपल्याला जर खूनांचा सत्र थांबवायचं असेल , तर उद्यापासून आप - आपल्या घरातच बसा ."
शिलाराम सारवे म्हंणत होते.
" अहो ओ सारवे भौ उद्यापासून घरात बसलो तर मंग देवी आईची नवरात्री कशी साजरी होइल- घटस्थापना कशी होइल.?"
एक गावकरी म्हंणाला.
" हे बघा गावक-यांनो, सद्या ते भुत की? राक्षस ? की चेटकीण? जे काही आहे ते खुळेआम फिरत आहे ! आपण जो पर्यंत त्यावर तोडक काढत नाही तो पर्यंत गावात असं खुळेआम फिरण धोक्याच आहे. आणी देवी बसवल्या तर लोक घराबाहेर पडतील..आणी हे धोक्याच आहे." सोमनाथ ठाकुर म्हंणाले.
" पन ठाकुर भौ, हा देवांचा अपनाम होइल की!!"
दूसरा गावकरी.
त्याच्या त्या वाक्यावर सातपुते बोलू लागले.
" हे पहा आम्ही समजू शकतो ! पन ह्या वर्षी आपल्याला नवरात्री साजरी करता येणार न्हाई ! आणी नाही घट बसवता येतील. समजुन घ्या तुम्ही सगळे, ते जे हत्यांकांड माजवतय ते एक सैतान आहे ..त्याला आपण कस थांबवू शकतो - आता तर आपल्याकडे मंदिरातले पुजारी बाबा पन नाही आहेत...की ह्यावर काही तोडगा काढत आल असत...पन त्यांचही त्या ध्यानानेच जिव घेतल. हे पहा आम्ही पोलिसांशी बोलतो , ह्या समस्येवर काय तरी मार्ग काढतो.."
" एक मिनिट !" मध्येच एक आवाज आला.
सर्वाँनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिल.
" परसाद दा !" गावक-यांच्या तोंडून आवाज बाहेर पडला.
प्रसाद उर्फ परसाद हे उपसरपंच सुर्यकांतरावांचे लहान भौ होते. कालच त्यांनी त्यांच्या भावाच्या चित्तेला आग्नि दिली होती.
डोक्यावर मुंज केलेल दिसत होत.
प्रसाद राव त्या तिन्ही सदस्यांसमोर आले , एक रागिट कटाक्ष त्यांनी त्या तिघांवर टाकला...आणी सर्व गावक-यांकडे पाहिल.
" गावक-यांनो!" आवाज भारदस्त होता- गुंजणारा होता.
त्यांनी एक धारधार जळजळीत कटाक्ष त्या तिन्ही सदस्यांकडे टाकला.. आणी मांडीवर हात मारल..आणी त्याच हाताची तर्जनी तिघांकडे दाखवत बोलू लागले.
" अरे असा भ्याडावाणी किती दिवस लपून रहाणार आपण! खूनी कोण आहे? हे आपल्याला चांगलच ठाऊक आहे - पन कायद्याच्या नजरेने पाहिल तर कायदा ह्या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत. मग कोणत्या हक्काने तुम्ही सरकारकडून मदत मागणार आहात. आणी समजा सरकार तैयार झालाच मदत करायला तर काय त्या पोलिसांच्या बंदुकीन मारणार हाईत का सैतानाला, हं?"
प्रसादरावांच्या वाक्यावर ते तिन्ही ग्रामपंचायत सदस्य खाली मान घालून उभे राहिले होते.
" अरे सरकारकडून गावच्या विकासासाठी दिलेला पैसा खाणारे , भेंXXXXत स्वार्थी लोक तुम्ही गावचा काय भल पाहणार! आताच्या आता माझ्या नजरेखालून चालते व्हा इथून नाहीतर इथंच तुमची आई झxxxतो , निघा...निघा..मादxxxत साले ."
प्रसादरावांनी पायातली चप्पल काढली.
तोच त्या तिघांनाही लागलीच तिथून काढता पाय घेतला. संतप्त जमावाने त्यांच्या पाठणात काही रट्टे सुद्धा लगावले.
" परसाद दा , आता आपल्यालाच काहीतरी कराव लागल , काय तो एकदाच सोक्षमोक्ष लागून जाऊ द्या !" एक गावकरी म्हंणाला.
" हो..हो ..हो..!" त्या गावक-याच्या वाक्यावर बाकीच्या गव्क-यांचा होकार आला.
पुर्णत गावक-यांनी प्रसादरावांना घेरा घातला होता. एक महत्वाची मीटिंग आता ख-या अर्थाने सुरु झाली होती.
" हे बघा गावक-यांनो ही बाब काय साधुसूधी नाय , म्हंणून मी एका बाबाला आपल्या गावातली ही परिस्थिती सांगितली.. ! त्यावर त्यांनी मला हा एक उपाय सांगितलं आहे ! ." प्रसादराव म्हंणाले.
" परसाद दा ! काय उपाय आहे? तुम्ही फक्सत सांगा, संमदा गाव तुमच्या सोबत आहे तुम्हाला मदत कराला."
दुसरा गावकरी.
बाकिच्या गावक-यांनी माना जोर जोरात हलवल्या.
" हे बघा उद्या देव बसवायचंच, आणी देवीआईची मुर्ती बी स्थापन करायची, पन !" प्रसादराव थांबले - डोळे मोठे करत सर्वाँकडे पाहत म्हंणाले.
ह्यावेळेस मखरात देवी आईची एकच मुर्ती न्हाई पुजायची..तर देवीआईच्या मागे काळीमातेच रुप असलेली उभी मुर्ती भी ठेवायची- .कारण काळी मातेच रुप सगळ्यात शक्तिशाली आहे - ती असुर,राक्षस, पिशाच्छ, सैतान, कोणाला बी घाबरत नाय. आणि हा , रात्री साडे आठ वाजता गोंधळ घालायला घ्यायचं - रात्री बारावाजेपर्य्ंत गोंधळ घालायचं- अक्ख गाव गोंधळाला जमवा - बायका, पोर,पोरी संमधी , कोणाला बी एकट सोडू नका.
आणी जस साडे नऊ वाजतील. ..आपण चाळीस-पन्नास पुरुष लोक मिळुन पंतांच्या वाड्यावर धाड टाकायची, संमदाच्या संमदा वाडा खालून ते तिस-या मजल्याच्या टेरीसपर्यंत हूंदडून काढ़ायचा ! जर ती ब्याद तिथ असल तर तिला जाळुन खाक करु संमदी."
प्रसादराव न थांबता म्हंणाले. त्यांच्या उरात प्रतिशोधाची भावना धगधगत होती.
" पन परसाद दा ?ती ललिताबाई एवढी वर पर्यंत पोहचलेली आहे - ती आपल्याला असं हवेलीत प्रवेश करून देईल का ? आम्ही पुजारीबाबांच्या सोबत गेलो होतो की..तव्हा तिने भेटायचं टाळल की आमच्याशी!"
गावक-याच्या वाक्यावर ..प्रसादराव जरासे हसले.
" अरे तुम्हाला काहीच माहीती नाही का म्हंजी!"
" काय?" गावक-यांनी न समजून विचारल.
" अरे ती म्हातारी सकाळी चक्कर येऊन पडली , तिला काय झालं? कस झालं काय माहीती नाही ! पन म्हातारी हॉस्पिटल मध्ये एडमिट आहे -"
प्रसादरावांच्या वाक्यावर गावक-यांची प्रतिक्रिया
फारच आश्चर्यकारक होती कारण त्यांना हे आताच कळाल होतं.
" हे बघा ते सोडा ! पुजाच सामान ,देवी आईच्या मुर्त्या, गोंधळ घालणारी मांणस संमदच्या संमद म्या बघून ठेवल आहे .. फक्त उद्याच दिवस तुम्ही तेवढ माझी साथ द्या ! देवी आईची कृपा असल , तर उद्याची रात त्या सैतानाची अखेरची रात ठरल बघा !"
प्रसादराव म्हंणाले.
त्यांच्या त्या वाक्यावर सर्व संतप्त गावक-यांनी
" हो " असा मोठ्याने उच्चार करत घोषणाच दिली..
तसे प्रसादरावांनी गर्वाने मान ताठ करून सर्व गावक-यांकडे पाहिल..
xxxxxxx
पंतांची हवेली.
हॉलमध्ये बाजुलाच किचन होत.
किचनमध्ये गंगू मोलकरीण उभी होती.
स्टाईलीश किचनच्या ओट्यावर जेवण बनवलेली चार पाच भांडी दिसत होती.
" आज संमदी बाहेर गेली की काय?
कोणीच कस दिसत नाही !" गंगू पंतांच्या हवेलीत दहा वर्षांपासून काम करत होती. सर्वाँच्या आवडी-निवडी स्वभाव तिला चांगलंच ठावूक होत. हवेलीत जेवणाच्या वेळेस सर्व उपस्थीत असायचे हे ही तिला चांगलंच ठावूक होत.
जर कधी हवेलीतली मांणस कोणत्या कार्यक्रमाला बाहेर जाणार असतील, आणी बाहेरूनच जेवून येणार असतील - तर निशाबाई तिला तसं सांगून ठेवत असत. की आजच जेवण बनवायची काही गरज नाही.
गंगूच्या घरी सुद्धा कावकाव होत म्हंणूनच ती घरी गेली होती.
निषाबाईंना तस कालरात्रीच तिने सांगितल होत. कावकावच सकाळच जेवन निषाबाई- मीराबाई दोन्ही सुनांनी केल होत.
पन संध्याकाळच जेवण बनवण्यासाठी मात्र ग्ंगु येणार होती- आणी आली ही होती.
नेहमीचं हवेलीतल कोणी ना कोणीतरी हॉलमध्ये दिसायचंच, पन आज? हवेली भक्कास वाटत होती.एक निर्जीव ,अनोळखी शांततेचा वावर जाणवत होता.
गंगूने जेवण बनवल होत. किचनमध्ये ती एकटीच उभी होती.
" वहिनींनी पन मला काही सांगितलं नाही ! की कुठ बाहेर जाणार आहेत? दर वेळेस सांगतात मग आज का नाही सांगितल ?" गंगू स्वत:शीच म्हंणाली.
तोच पहिल्या मजल्यावरच्या जिन्यावरून रघुवीरराव खाली येतांना तिला दिसले.
" रघुदादा ? "
रघुवीरराव चालत किचन जवळ आले.
" गंगू ...दोन ताट जेवण वाढ!"
गंगू राहिली मोलकरीण, तिने गपगुमान ताट वाढायला घेतली...काहीवेळातच वरण-भात-दोन भाज्या, चपाती, अशी दोन ताट वाढुन झाली.
ती ताट रघुवीररावांनी हातात उचल्ली.
" दादा एक विचारू !" नजर खाली ठेवत ती हळू आवाजात म्हंणाली.
" हं बोल ना !" रघुवीरराव नाटकी आवाजात म्हंणाले.
" वहिनी, रियाताई , बाईसाहेब संमदी दिसत नाही आहेत- कुठ गेलीत संमदी? नाही म्हंणजे वहिनी कुठ बी जाताना मला सांगून जातात म्हंणून म्हंटल."
" आहेत , ईथेच आहेत सर्व , रिया - निशा माझ्या खोलीत आहेत ! "
औपचारीक उत्तर देत रघुवीर निघुन सुद्धा गेले.
गंगू पुन्हा त्यांना पुन्हा थांबवून प्रश्ण विचारू शकत नव्हती. आपन जरी ह्या घरात खुप वर्ष काम केल असलं तरी ती आपली पायरी ओळखून होती.
पन रघुवीररावांच्या उत्तराने गंगूच मन भरल नव्हत.
मनात शंकेची पाळ वेगाने चुकचुककत होती.
काहीतरी अभद्र आपल्या नजरेआड घड़त आहे.
तिच्या मनात हे अभद्र विचार येत होते.
तिने रघुवीररावांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहिल. ते अद्याप जिना चढत वर जात होते.
मनात एक विचार आला- त्यांच पिच्छा कराव!
एकदा मनाची खात्री पटवून घ्यावी- की ते खर बोलत आहेत ना?.
इतकी वर्ष तिने ह्या हवेलीत काम केल होत - की निषाबाईंशी तिची चांगली ओळख जमली होती.
ह्या हवेलीतली सर्व मांणस तिच्यासाठी आपल्या घरातल्या मांणसांसारखी होती.त्यांच्या जिवावर जर काही संकट ओढावल असेल तर? मीठ खाल्ल होत तर इमानदारी सुद्धा दाखवायलाच हवी होती!
शेवटी तीने हाच पर्याय निवडला !
ती किचनमधून बाहेर आली- जिन्यापाशी पोहचली.
जिन्याखाली उभ राहून वर पाहिल , तेवढ्यातच रघुवीरराव नजरेआड झाले होते.
चोर पावलांनी ती जिन्याच्या पाय-या चढली-
तस तिला दिसल की रघुवीरराव पहिल्या मजल्यावर जात नाही आहेत -
ते दुस-या मजल्यावर घेऊन जाणा-या जिन्यावर चढले .
" दादांची खोलीतर पहिल्या मजल्यावर आहे ? मंग , दूस- या मजल्यावर का जात असतील?" तिच्या मनात संशयी प्रश्ण आला.
हळू हळू जिन्याच्या पाय-या चढत ती रघुवीररावांच पाठलाग करत होती.
पायांचा आवाज व्हायला नको ह्याची पुरेपुरे काळजी घेत होती..ईतकंच नाही तर तिने पायांतले पैंजण सुद्धा जिन्यावरच काढून ठेवले होते
पाहता पाहता दूसरा मजला आला, रघुवीर ईथेही थांबले नाहीत- ते तिस-या मजल्याच्या दिशेने निघाले.
गंगूच्या मनातल संशय आता आधिक गडद झाल होत. नक्कीच काहीतरी गडबड आहे !
रघूवीरराव तिस-या मजल्यावर पोहचले.
जिन्या पासून पूढे एक दहा - पावलांची सरळ वाट होती आणि मग एक उजव्या बाजुला वळण होत ..
रघुवीररावांनी उजव्या बाजुला वळण घेतल..आता एक कॉरिडोर लागली.. दोन्ही तर्फे बंद रूम्स होत्या.
गंगूने कधीतरी हा तिसरा मजला पहिला होता.
आता तर आठवण ही धुसर झाली होती.
गंगू त्या वळणाच्या भिंतीआड लपून रघुवीररावांना त्या कॉरिडोर मधून सरळ जातांना पाहत होती
रघुवीरराव कॉरिडोरच्या शेवटच्या रूमजवळ पोहचले. (तीच ती नरहरपंतांची खोली)
दरवाज्याच्या कडीवर हात ठेवून..गंगू जिथे लपली होती, त्यांनी त्या वळणाकडे पाहिल.
गंगूने सावधानता बाळगत लागलीच मान मागे घेतली होती.
रघुवीरराव कुत्सिक हसले...डोळे वटारून
त्या वाटेकडे पाहिल.. मान स्वत:शीच होकारार्थी हळवली.
" कुई..कुई..कुई..!" आवाज करत रघुवीररावांनी कडी खोल्ली. ..तिस-या मजल्यावरच्या शांत वातावरणात तो आवाज छातीत धस्स होत घुमला.
मग दरवाजा लोटल्याचा आवाज आला.
गंगू दबक्या पावळांनी त्या खोलीजवळ आली.
समोरचा दरवाजा आतून लावला नव्हता , लावायचे विसरले होते? की मुद्दामून लावला नव्हता ?
समोरचा दरवाजा जरासा उघडा होता - त्याच्या फटीतून आतली खोली दिसत होती.
नरहरपंतांच्या पेंटिंगसमोर रघुवीरराव पाठमोरे उभे होते.
" ए रघ्या , ती बाई तुझ पाठलाग करते !"
रघुवीररावांच्या कानांवर घोगरा आवाज पडला.
तिरकस नजरेने त्यांनी दरवाज्याकडे पाहिल..
दरवाज्याच्या फटीतून गंगूचा एक डोळा त्यांना दिसला.
" हम्म माहीतीये! येउदे तिला तिचा काळ आलाय. !" ते हळूच पुटपुटले.
" मंग मारू का मिच तिला हिहिहिहिहिह!"
" नाही ! ईथे नको , आत येऊदेत, मीच म्हढ पाडतो मंग तिच फिहिही.. ! "
नरहरपंतांच्या पेंटिंगबाजुलाच एक दोरी होती.
रघुवीररावांनी दोन्ही ताट बाजुच्या टेबलावर ठेवली.
आणी ती दोरी दोन्ही हातांत पकडून जोर लावत खेचली..
तस वरची पेंटिंग रघुवीररावांच्या दिशेने हलकीशी झुकली.. रघुवीररावांनी पेंटिंग भिंतीमधुन काढली ..खाली ठेवली.. ..
पुन्हा जोर लावून दोरी ओढली..क्षणात ते बाजू झाले , पेंटिंगच्या जागेतून हळकेच गुप्तमार्गी शिड्यांचा जिना "खड ,खड" आवाज करत बाहेर आला.
गंगू आश्चर्यकारक नजरेने ते पाहत होती.
तिच्या सामान्य बुद्धीसाठी हा एक चमत्कारच होता.
रघुवीरराव शिड्यांवर चढले ..व आत निघून गेले.
गंगू दरवाज्याबाहेरच उभी होती. आत जाव की नाही हा विचार ती करत असावी?
हळुच तीने दोन झापांचा दरवाजा उघडला..
खोलीत प्रवेश केला - दरवाज्याच्या दोन्ही झापांमागे काळसर अंधार दिसत होत -
दरवाजा माग सोडत दोन पावळ चालत ती पुढे आली..
आता तिच्या दारामागे असलेल्या उघड्या झापा रिकाम्या नव्हत्या ...कारण दरवाज्याच्या एका झापे जवळ नरहरपंतांच प्रेत उभ होत.
त्यांच्या चेह-यावर लालसर रंगाचा रक्ताळलेला प्रकाश पडला होता.
दात विचकत हसत ते ध्यान एकटक गंगूच्या पाठमो-या आकृतीला पूढे पुढे जातांना पाहत होत.
मध्येच डोक हो हो करत हळवत होत .
गंगूला त्यांच आस्तित्व जाणवत होत - ती अजाण होती, पुढच्या मृत्युपासून ही ती अजाण होती..तिला हे ठावूक ही नव्हती की आपल आयुष्य आता क्षणभरापूरतच आहे.
गंगू त्या शिड्यांवर चढली- आत आली.
समोर डोळे दिपवणार अंधार होता - वाट अनोळखी होती. अंधारकोठडीसारखी होती. दोन्ही हातांनी ती चाचपडत पुढे पुढे जात होती.. ...
ती एक गल्ली होती- दोन्ही साईडला एक भींत होती.आणी त्या भिंतीतून ही वाट पुढे गेली होती. एकावेळेस एकच माणुस चालत जाईल एढीशी वाट
दहा -पावळ अंधारात चालत ती पुढे आली .
आता समोर उजव्या बाजूला एक वळण होत. तिने ते वळण घेतल.
आता समोर एक उघड्या दरवाज्याची चौकट दिसत होती.
त्या चौकटीतुन लाल रंगाने उजळलेली खोली दिसत होती.
गंगू चोरपावळांनी चालत त्या खोलीतल्या दाराच्या चौकटीत आली.
तस तिला समोर एक जळणार हवनकूंड दिसल. पन त्यातली आग मात्र सामान्य नव्हती- लालसर रंगाची रक्ताळलेली आग होती ती- हवनकूंडाच्या चारही दिशेंना , बुक्का वाहिलेल लिंबू,बिबवे, हाड, बक-याची कवटी काय काय चेटकू सामग्री मांडली होती.
भिंतींवर सैतानाच्या चित्र- विचीत्र हिडिस- अभद्र आकृत्या रेखाटल्या होत्या.
त्या सर्वाँकडे पाहता जणु जिवंत असल्याचा भास होत होता.
खेडेगावात राहणारी गंगू तिला हे चेटूक विधी कळणार नाही होय? तिला लागलीच कळून चुकल होत! ही जागा धोक्याची आहे, ईथे करणी केली जात आहे. वामपंथी अनुयायांच्या विधीचा हा एक मैदान आहे, ही जागा त्यांची आहे जिथे सामान्य मानवाला थरा नाही.
त्या पेटत्या हवनकूंडाच्या डाव्या बाजूला अजुन एक बंद दरवाजा होता.
त्या बंद दरवाज्याला पाहून तिची उत्सुकता चालवली गेली- नक्कीच ह्या दरवाज्यामागे कोणितरी असाव?
ती त्या दरवाज्यापाशी आली..तिने अलगद दरवाजा उघडला.
" निषावहिनी- रिया ताई !"
समोर त्या दहा x दहा च्या खोलीत रिया निषाबाई
दोघिंच्या तोंडात बोल कोंबून - त्यांचे हात पाय बांधून ठेवले होते .
खोलीच्या चारही भिंती काळ्या पडल्या होत्या - जणु कोळश्याने रेघोट्या मारल्या असाव्या.
खोलीतून घाणेरडा , कुजकट, मुत्र,विष्ठेचा ओकारी युक्त वास येत होता.
नाकावर साडीचा पदर ठेवून ती खोलीत आत आली..
त्या दोघिही गंगूला मानेने नाही- नाही अस करत कसलतरी संकेत देत होत्या , पन गंगूने ते ओळखल नाही.
ती चालत त्या दोघिंजवळ आली.
" वहिनी , रिया ताई , थांबा हं- मी खोलते तुम्हाला."
" उन्म .उन्म..उम्म..!" रिया - निषाबाई दोघीही गंगूला डोक नाही नाही करत मागे पाहायला सांगत होत्या.
गंगूच्या खांद्यांमागून एक मानवी आकृती हळूच चालत पुढे पुढे येऊ लागली - त्या आकृतीच्या हातात एक कू-हाड होती.
रिया - निषाबाई दोघिंचेही डोळे विस्फारले.
कारण कू-हाड असलेला हात वर गेला होता.
गंगूने ते पाहिल..की दोघिही डोळे वटारून आपल्या मागेच पाहत आहेत.
तस तीने गर्रकन वळून मागे पाहील..
त्याचक्षणाला हवेत गेलेली कू-हाड खाली ..आली..ग्ंगुच्या विस्फारलेल्या डोळ्यांना कू-हाडीची चकचकती पात बरोबर डोळ्यांमधोमध येतांना दिसली..
" ठक..!" आवाज होत कू-हाडीच पात गंगूच्या कपाळात रूतल.. काम तमाम झाल होत.
रक्ताची एक पिचकारी निघाली ..रिया-निषाबाई दोघांच्या विस्फारलेल्या डोळ्यांच्या थोबाडावर बसली..
गंगूच प्रेत पाठीवर पडल होत ,निर्जीव डोक सरल निशा - रियाबाईंच्या पायांजवळ पडल होत - ते निर्जिव विस्फारलेले डोळे त्या दोघिंकडेच पाहत होते.
कपाळावर कू-हाडीची पात जशीच्या तशी रूतली होती- त्यातून बुडबूड करत रक्ताचा झिलवा वाहत होता.
बाहेर येणार रक्त निषा- रियाबाईंच्या पायाखाली निघुन गेल होत.
दोघिंच्याही घशात श्वास अडकला होता.
डोळे चेंडू एवढे मोठे झाले होते . आताच त्यांनी खून पाहिला होता - स्वत:च्या उघड्या डोळ्यांनी प्रथमच ख-या आयुष्यात एक खून पाहिला होता.
मईत- मूडदा पडतांना पाहिला होता.दोघी माय लेकींची वाचाच बसली होती. तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हत.
अचानक एक कोल्हापुरी चपलेचा पाय आला- गंगूच्या नाकावर बसला - आणी कपाळावरची कू-हाड खच्च आवाज करत मागे खेचली गेली.
गंगुच्या कपाळातून फव्वा-यासारख लालसर रक्त रिया-निषाबाईंच्या अंगावर उडाल. लालसर रक्ताचा आभिषेक झाला.
"आssssss..आsssss..!"
बेंबीच्या देठापासून , निषा-रियाबाईंच्या आर्तकिंकाळ्या बाहेर पडू लागल्या.
" हिहिहिहिहिही, हिखिखिखिखिखी हीह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह हहजजजजज्जज्ज्ज!"
त्या लालसर रक्ताळलेल्या हवनकूंडासमोर रघुवीर
रिया- निषाबाईंच्या किंकाळ्यांवए अघोरी नृत्य करत थिरकत नाचत होते.
भिंतीवर त्यांची काळी सावली भयानक भयंकर दिसत होती.
त्यांच्या तोंडुन निघणारा हास्याचा आवाज , एक असुर हसावा असा निघत होता..
XXXXXXXXXXX
खाडकन आर्यंशने डोळे उघडले.
हॉस्पिटलच्या कॉरीडॉर मध्ये तो लाकडी वुडन सोफ्यावर झोपला होता.
डोळे उघडताच त्याला समोर पसरलेली कोरिड़ॉर दिसली - कॉरिडॉर मध्ये त्याच्याशिवाय मानवी अंश नव्हता. मानवी?
हळुच त्याची नजर कोरिड़ॉरच्या शेवटला पडली तिथे -एक माणुस उभा दिसला. अंगावर एक भगव्या रंगाचा कुर्ता होता- खाली दोन झापांच धोतर होत.
चेहरा प्रेताड पडला होता - शुन्यातली ती मेलेली थंडगार नजर सुर्यांशलाच पाहत होती.
तो माणुस हुबेहूब पुजारीबाबांसारखा दिसत होता . आर्यंशनी जस त्यांच्याकडे पाहिल , त्या दोघांची नजरा नजर होताच त्यांनी एक हात वर केला ..हाताची बोट हलवून आर्यंशला आपल्याकडे बोलावल- आणी हळुच हाट खाली घेऊन जात ते पाठमोरे वळले चालत पुढे जाऊ लागले...
आर्यंश ही यंत्रगत हालचाल करत जागेवरून ऊठला.
xxxxx:
11:30 मिनिटे
हॉस्पिटल ....
खाटेवर ललिताबाई अर्धबेशुद्ध अवस्थेत झोपल्या होत्या.
खाटेबाजुलाच एक खुर्ची होती- त्या खुर्चीवर आनिषा बसली होती- बसल्या , बसल्याच तिलाही झोप लागली होती.
खाटेपासून डाव्या बाजुला एक सोफा होता - त्या सोफ्यावर श्रीसंथराव , त्यांच्याबाजुला मीराबाई दोघेही डोळे बंद करून जागेवरच डोळा लागून झोपल्या होत्या.
रात्रीची गुढमय शांतता पसरली होती.
पंधरा मजल्याचा हॉस्पिटल कंकाळासारख स्तब्ध उभ होत.
आनिषाच्या मागे एक चौकोनी पारदर्शक काचेची खिडकी होती.
खिडकीतून मागची बाजू दिसत होती-
हिरव्यागार झुडपांची वाट हॉस्पिटलच्या मागच्या गेटपासून तीस पावळांवर येऊन संपत होती-
गेटबाजुला एक विजेचा खांब सुद्धा होता.
खांबावर एक शुभ्र ट्यूब लाईट पेटली होती- तीचा प्रकाश गेटवर आणि पुढच्या काळ्या हाइवेवर पडला होता.
दोन लोखंडी गजांचे दहा फुट उंच - आणी दहा फुट रुंद गेट होत ते , गेटपासून पुढे हाईवेचा धुक्याने वेढलेला काळा पाषाणी रस्ता दिसत होता.
आनिषाच्या बंद डोळ्यांआडुन बुभळ डाविकडून - उजवीकडे फिरली आणि खाडकन (तीने आपल्या सर्वाँकडे पाहत) डोळे उघडले.
तिच्या उजव्या हाताला खोली बाहेर पड़ायचा दरवाजा होता - खालच भाग लाकडी आणी वरच काचेच अस तो दरवाजा होता..
त्याच दरवाज्यातून आर्यंशच पूढे चालत जातांना दिसला.
आनिषाने मान हळकेच दरवाज्याच्या दिशेने वळवली. तिच्या नजरेतून काहीतरी सुटल .
मनाला जाणिव झाली की नक्कीच कोणीतरी आताच दरवाज्याजवळून चालत गेलं.
तिने एक कटाक्ष समोर टाकला , तीचे आई- वडील गहि-या निद्रेत होते. त्यांना न उठवणच तिने बर समजल !
ती खुर्चीतून हळकेच वर ऊठली - दबक्या पावलांनी चालत दरवाज्यापाशी आली- कडी उघडून हलकेच दरवाजा उघडला .
आर्यंश जिथे झोपला होता - प्रथम तिने तिथे पाहिल, परंतू सोफा रिकामा होता.
" हा कुठे गेला असेल ? मगाशी इथून कोणी गेल्याचा भास झाला तो ? आर्यंश तर नसेल ना ?"
आनिषा स्वत:शीच म्हंणाली.
तीने दरवाजा हळुच आपल्या मागे लावून घेतला.
आर्यंश ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने जाऊ लागली.
xxxxxxxx
एखादा यंत्रमानव हात -पाय स्थिर खाली सोडून एका विशिष्ट पद्धतीने चालावा तसा आर्यंश चालत होता.
त्याच्या दहा - पावलांपूढे ते जे काही वाईट × चांगली मृत आत्मा होती.
आर्यंशच्या पुढे ती पाठमोरी चालत होती.
न जाणे किती उशीर झाल असेल, आर्यंश त्या आकृतीच्या मागे संमोहिंतासारखा चालत होता.
त्याने दहाव्या मजल्यावरच्या कॉरीडॉर मधुन , उजव्या बाजुला वळण घेतल. समोर वीस पावलांवर बंद दरवाज्याची लिफ्ट दिसत होती.
लिफ्टच्या थोड पूढे डाव्या बाजुला शिड्या होत्या.. त्या शिड्यांबाजुलाच पुजारीबाबांच प्रेत थांबल होत- आर्यंश आला हे पाहताच त्या प्रेताने पुन्हा हात वर केल आणि आर्यंशला आपल्या मागे येण्याचा इशारा केला.
ते प्रेत जिन्याच्या पाय-यांवर चढल.
आर्यंशच स्वत :च्या देहावर नियंत्रण नव्हत , संमोहिंताच्या आमळा खाली तो वावरत होता.
पाहता पाहता दहाव्या मजल्यावरच्या जिन्यापासून त्याने अजुन पाच जिने चढले..आणी पंधराव्या मजल्यावर आला .
हा हॉस्पिटलचा शेवटचा मजला होता.
ह्या मजल्यावर पोस्टमॉर्टम रूम- आणी मोर्ग रूम होती.
मेलेल्या मांणसांना झोपण्यासाठी एक मोठी अलमारी होती.
प्रत्येक प्रेताच्या बिछान्यावर आकडे लिहीले होते.
मोर्ग रूम बाजुलाच पोस्टमॉर्टम रूम होती.
दोन्ही रूमच्या दरवाज्यापुढे स्ट्रेचर उभे होते. डाव्या बाजुच्या भिंतीवर दोन काचेच्या मोठ्या खिडक्या होत्या.
पुजारीबाबांचा प्रेत पुढच्या खिडकीपाशी येऊन थांबल.
आर्यंशही हळूच त्या पुढच्या खिडकी मागे असलेल्या खिडकीपाशी थांबला.
आर्यंशचा चेहरा बाहूलीसारखा दिसत होता.
त्यावर कसलेच भाव नव्हते - डोळ्यांत ओळख नव्हती. कारण तो संमोहिंत झाला होता ना!
अचानक डोक्यात हलकीशी सनक आली..
" आहह!" एक हलकासा उसासा सोडत त्याने डोक पकडल. संमोहिंत चक्र काढून घेतल होत..आर्यंशला त्याच्या देहाच नियंत्रक पुन्हा मिळाल होत.
डोक जड झाल होत, दुखत होत..
पन ती वेदना पाच - सहा सेकंद टिकली , मग सर्वकाही ठिक झाल.
डोळे उघडून त्याने आजूबाजूला पाहिल..
जागा अनोळखी होती... आपण ईथे कधी, कस? केव्हा आलो हा प्रश्ण मनात येणे साहजिकच होत!
बाजुला असलेल्या काचेच्या खिडकीतून
हलकासा चंद्राचा कवडसा प्रकाश आत येत होता.
पुढे ही एक खिडकी होती- त्या खिडकीतूनही प्रकाश आत येत होता - आणी त्या आकृतीवर पडला होता.
आर्यंशची नजर समोर गेली- ती पाठमोरी आकृती ,तो भगवा फुल बाह्यांचा कुर्ता, खाली दोन झापांच पांढरट धोतर! हे कपडे ती आकृती जराशी ओळखीशी वाटत होती ..मग जशी ओळख पटली अंगावर कसा सर्रकन काटा आला.
भीति पायाच्या तळव्यापासून थेट मेंदूत शिरली
हात-पायाना कंपने येऊ लागली, डोळ्यांसमोरच दृष्य फीकट दिसू लागल- समोरची आकृती गोल गोल भिंगू लागली.
त्यासहितच आजुबाजूच्या भिंती, खिडक्या सुद्धा डोळ्यांभोवताली गोल गोल भिंगत होत्या- त्याला चक्कर येत होती.
" घाबरू नकोस !" जरासा घोगरा आवाज आला. कानांच्या पडद्यांवर धडक बसवणारा आवाज.
पुजारीबाबांचा मृत्यु होण्या अगोदर आवाज
स्थिर , ह्ळका हळूवार होता - त्यात घोगरेपणा नव्हता. पन आता ते जिवंत थोडी ना होते? समोर उभ ते देह नव्हत- एक प्रेतआत्मा होती, एक स्पिरीट होती, तिला एक भौतिक आकार नव्हता- रचना नव्हती...मिळाल होत ते सर्व निसर्गाच्या नियमांविरुद्ध होत.
पन जिवंतपणी पुण्याच काम केल होत - म्हंणून त्यांच्या धन्याच्या कृपेने हा एक चांगला अंश त्याच्या मृत्युपश्चात ही आत्म्यात शिल्लक होता..की ते पुर्णत पिशाच्छ रुपात बदल्ले नव्हते.
" घाबरू नकोस , तुला काहीतरी सांगायचं आहे..मला . मदत करायला आलो आहे मी तुझी! मदत केल्याशिवाय मला मोक्ष प्राप्ती नाही."
" मोक्ष !..मदत? आणी माझी? "
आर्यंश न समजून म्हंणाला.
××××××××××××××××
गडद लालसर रक्ताचीआग ओकणारा हवनकूंड जळत होता-
रघुवीरराव त्याच हवनकूंडासमोर मांडी घालून दोन्ही हात ढोप्यांवर ठेवून ताठ बसले होते .
हवनकूंडाच्या बाजूला एक उघड्या दाराची चौकट दिसत होती- जिथे रिया - आणी निशाबाईंना बांधल होत.
दोघिही प्रचंड भ्यायल्या होत्या - कारण काहीवेळा अगोदरच त्यांच्या डोळ्यांसमोर थेट प्रक्षेपणार्थ खून घडला होता .
गंगूच्या रक्ताचा त्या दोघिंच्या अवतीभवती एक गोलसर रिंगण तैयार झाल होत.- त्या लालभडक रक्ताळलेल्या रगताला पाहून रियाची हाळत गंभीर झाली होती.
त्या दोघिही थरथरत्या विस्फारलेल्या नजरेंनी
रघूवीरउर्फ त्या तांत्रिक चांडाळाला त्या हवनकूंडासमोर बसलेले पाहत होते.
हवनकूंडासमोर हळकस कालसर धुराचा स्फोट झाला. त्या काळ्या धुरातून म्हातारा जखोबा बाहेर आला.
त्याने छातीशी तो खोका अद्याप तसाच पकडला होता.
" जख्या , झालं का काम ?" रघुवीरराव..
" जी..जी ..मालक!" खवचट हसत जखोबा रघुवीररावांजवळ आला.
" तुम्ही सांगितलं त्याच जागेवर खोदल , तिथ एक सोन्याचा पेटारा भेटला - त्यात हे खोक होत."
" मग पेटारा का नाय आणला म्हाता-या ?
विकुन आलास की काय तिकडे... तरी म्हंटल ..बारा कसे वाजले तुला ?"
" नाय.. नाय.. . मालक ! मीठ खाल्लंय तुमच गद्दारी कशी करल ..!"
" ए रघ्या!" नरहरपंतांचा खर्जातला आवाज.
एका भिंतीपाशी त्यांच प्रेत ताठ उभ होत , तोंडावर तोच लाल प्रकाश पडला होता..
" माझा विश्वासू माणुस आहे तो ! गद्दारी शक्य नाय!" एका कोप-यात नरहपंतांचा आत्मा उभा होता.
जखोबाचा खरा धनी तर वाममार्गी नरहरपंत होते.
जखोबा हा त्यांच्या ताळावर नाचणारा क्प्टी,कुत्रा होता..भुक म्हंटल की भुंकणार बस म्हंटल की बसणार.
" जी ...मालक ! तुम्हाला काय तरी सांगायचं!"
जखोबा गंभीर होत सांगू लागला...त्याने समर्थ कृणाल, मेनका, गबलू- ह्या तिघांचे वर्णन ऐकवले
तिथे झालेला लढ़ा ऐकवला, त्यांच्या शक्ति सांगितल्या..
जखोबाची सर्व हकीकत ऐकतांना नरहरपंत रघुवीरराव दोघांच्या चेह-यावर काळजीपूर्वक भाव उमटले होते.
कोण्यातरी उच्च शक्तिच्या धन्याने त्यांच्या मार्गात अडथळ्याची दस्तक दिली होती.
" रघ्या , सावध रहायला हव! मगाशीच मला कोण्याच्या वाड्याभोवताली कोण्या अद्यात शक्तिच्या वावराची चाहुल लागली होती. कोणितरी दिव्य दृष्टी मार्फत ईथे आल होत. कोणितरी आपल्या मार्गात हस्तक्षेप करू इच्छीत आहे !" नरहरपंत..
" पंत! मला वाटतंय त्यांना कळलंय, आणी हे हरामxxxर उद्याच्या दिवशी नक्कीच आपल्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील!"
" मग आता ?" जखोबा मध्येच म्हंणाला.
" आता एकच मार्ग आहे ! ही सैतानी शक्ति
जागृत करावी लागेल !"
रघुवीररावांनी जखोबाने भ्रतांरवरून आणलेल्या त्या खोक्याकडे पाहिल.
XXXXXxxx
" मोक्ष - मदत?" आर्यंश म्हंणाला.
" होय मुला !" अस म्हंणतच पुजारीबाबांच पाठमोर प्रेत आर्यंशच्या दिशेने वळल.
त्यांच्या बाजुच्या खिडकीतून चंद्राचा प्रकाश आत येत होता -चंद्राच्या निळसर प्रकाश किरणांनी त्यांच्या देहावरची कातडी,पीठासारखी दिसत होती..
हातापायांची नखे काळसर वाढलेली होती.
त्या पिठासारख्या थंड पांढ-या कातडीवर काळ्या रक्ताच्या वाकड्या तिक्ड्या नसा उमटल्या होत्या...
चेहरा निस्तेज पांढराफ़ट्ट पडला होता.
डोळ्यांची गोलसर टपोरी बुभळे चंदेरी रंगाने चकाकत होती.
समोर आपण पाहतोय ते काय आहे?
आर्यंशने लहानपणी भुताखेतांचे चित्रपट पाहिले होते...त्यातलंच हे एक रंगरंगोटी केलेल ध्यान होत का?
पन टिव्हीवर पाहिलेल्या ते आकार फसवे होते..
आणी समोर उभ सत्य वास्तव होत...ज्याला नाकारुन चालणार नव्हत.
आर्यंशला पहिल्या दिवशी स्टेशनवर भेटलेला तो चहावाला त्याच्या तोंडून ऐकलेली पंतांच्या वाड्याची अर्धवट हकीकत आठवली - त्याक्षणाला त्याने त्या हकीकतीवर अविश्वास धाकवला होता ! पन आता ?
उघड्या डोळ्यांनी जो पर्यंत मानव हे अभद्र ध्यान ती शक्ति पाहत नाही, ती भीती अनुभवत नाही..तो पर्यंत मानव अजाण - अनभिज्ञ असतो - ही एक उर्जा जगावेगळी आस्तित्वात आह्व ह्यावर त्याचा विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा प्रचिती येते..आणी तेच आर्यंश सोबत घडत होत.
" तु..तुम्ही तर त्या ..दिवशी गेटपुढे!"
" मरण पावलो होतो , पन ते नैसर्गिक मरण नव्हत! हत्या होती ती , त्या नराधमांनी काळ्या जादूमार्फत माझ मृत्यु घडवू आणल होत."
आर्यंश स्तब्ध उभा सर्वकाही ऐकत होता.
काळी जादू आस्तित्वात आहे ? ह्यावर त्याच विश्वास बसत नव्हत - परंतु सांगणारा खुद्द एक आत्मा होता.
मोक्ष प्राप्तीच्या सीमेवर उभा भटकणारा आत्मा.
" पन, कोणी मारल तुम्हाला ? कोण होते ते लोक! "
" ते सर्व हवेलीतच आहेत."
"काय.... को.. कोण आहेत ती लोक..!"
आर्यंशच्या मनातली भीति कमी होऊन आता उत्सुकता निर्माण झाली होती.
XXXXXXXXX
श्रीसंथराव - मीराबाई दोघेही गाढ झोपेत होते.
ललिताबाईंना एडमिट केलेल्या रूम मध्ये एक हलकीशी निळ्या रंगाची ट्यूब पेटली होती- त्या ट्युबचा प्रकाश जेमतेम होता.
ललिताबाईंना झोपवलेल्या खाटेच्या दोन्ही तर्फे पत्र्याचे दोन टेबल होते .
ललिताबाईंच्या डाव्या हाताला -ऑक्सीजन सिलेंडर होत.
खाटेवर डोळे बंद करून शांत झोपलेल्या
ललिताबाईंच्या उजव्या बाजुला एक रिकामी खुर्ची आणि त्याही पुढे काचेची खिडकी होती.
ललिताबाईंच्या कपाळासमोरून खिडकीकडे पाहता - हॉस्पिटलच धुक्यात बुडालेले गेट- आणी विद्युत खांब दिसत होता.
खांबावर पेटलेल्या शुभ्र ट्यूबचा प्रकाश -
खाली पडला होता - त्या शुभ्र प्रकाशाने धुक्याला पांढरट कापडासारख गडद रंग प्राप्त झाल होत.
बाहेर सुनसान शांततेत रातकीड्यांची किरकिर वाजत होती. गडद काल्याभोर अंधारात सैतान फिरत होता.
दोन झापांच ते उभ्या दैत्यासारख दहा फुट उंचीच गेट हळूच कर्रर्रर्रर्रsssss बिजाग-यांच भयाण आवाज करत उघडल.
उघडलेल्या गेटमधुन धुक्याच्या लाटा आत आल्या..
आणी त्याच धुक्यातून काहीतरी काळसर शेवाळासारख सापासारख सळसळत , तर कधी
" हिस्स..फिस्स..हिस्स..फिस्स.. !" असा सापासारख
फुत्कार सोडत आत आल.
त्याच वेग अमानवीय होत..
डोळ्यांची पापणी लवताच ते वीस मीटर अंतर एकासेकंदात कापत होत.
सळसळ आवाज करत धुक्यातून सापासारख वाकड तिकड फिरत ते भिंतीवर चढल.
पाळीसारख चिकटल भरा-भरा भिंतीवर चढु लागल.
पाच सेकंदारत दहाव्या मजल्यावर पोहचल...आणी एका खिडकीपाशी येऊण थांबल..!
ती खिडकी ललिताबाईंना एडमीट केलेल्या रूमची होती.
xxxxxxxxxxx..
आर्यंशच्या वाक्यावर पुजारीबाबांच्या प्रेताड चेह-यावरचे डोळे विस्फारले..
ते चांदीचे रूपयाएवढे चकाकते डोळे डावीकडून- उजवीकडे फिरू लागले.
त्या प्रेतआत्म्याला कसलीतरी चाहूल लागत होती.. जे त्यांच्यासाठी धोक होता.. त्यांच्यासाठीच नाहीतर सर्वाँसाठीच..
" वह आ रहा है..!" पुजारीबाबा खवखवत्या आवाजात हळूवारपणे म्हंणाले.
" तो येतोय....तो येतोय....त्याच आगमण होत आहे ..! " आर्यंशच्या दहा पावलांपूढे उज्व्या हाताच्या भिंतीवर मोर्गरूमचा दरवाजा होता.
कर्र्रर्कर्रकर्रकर्रकर्र्र
तेल न मिळालेल्या बिजाग-यांचा भयानक भयंकर आवाज होत - हळूवार दरवाज्याची एक झाप उघडली.
पुजारीबाबांचा आत्मा त्या उघडलेल्या दरवाज्याआत घुसला.
आर्यंशही चालत त्या दरवाज्या आत घुसला.
" बाबा ...! आताच तुम्ही म्हंणालात ना ? की आमची मदत करायला आला आहात म्हंणून मग मला सांगा ना , की कोण आहेत ती मांणस ?"
पुजारीबाबांचा आत्मा पाठमोरा उभा होता.
त्यांच्या पुढे शव ठेवले जाणा-या थंड पेट्यांच एक कपाटाच होत.
प्रत्येक पेटीवर नंबर लिहीलेले दिसत होते ...आणी त्या सर्वाँमध्ये प्रेत झोपली होती
त्यातलीच एक पेटी हळुच बाहेर आली- .
आत पांढरीशुभ्र ट्यूब पेटली होती- आणी हळुच पांढर शुभ्र वाफाळत थंड वाफेच धुरही बाहेर आल होत...
विस्फारलेल्या डोळ्यांनी आर्यंश पाहत होता.
" चांगूलपणाच मुखवट लावून करतोय पाठीमागून वार ... नाव त्याच देवासारख पन वागण मात्र सैतानाच... आपुलकी दया,प्रेम ,भावना सर्वआहे तया पुढे व्यर्थ- आपूल्याच मांणसाचा जिव घ्यायला आलाय तो ..सैतान ! " पुजारीबाबांची मान हळूच थोडीशी मागे वळली- ते तिरकस चंदेरी बुभळांनी आर्यंशकडे पाहत म्हंणाले.
" आठव मुला तोच आहे ह्या खेळाचा सुत्रधार ..
होय तोच..!"
आर्यंशच्या डोक्यातली विचारचक्रे वेगाने फिरू लागली.. चांगूलपणाच मुखवट लावून करतोय मागून वार..! त्याच्या डोळ्यांसमोर जखोबाचा चेहरा आला,
पन त्याच्या वागण्यात खोट्यापणा नव्हता ,तो स्वत:च उर्मटरागीट स्वभाव खुळेआम दाखवत होता.. मग त्याच्या डोळ्यांसमोर रिया-निषाबाई - आनिशा, ललिताबाई सर्वाँचे चेहरे आले..सर्वाँच बोलण, वागण, सुस्वभाव डोळ्यांभोवती फिरले...परंतु ताळमेल बसत नव्हत ,सर्वाँच वागण,बोलण, हातवारे आपुलकी खर वाटत होत - पन अचानक रघुवीररावांचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला - त्यांच ते हसण, बोलण , एका टीव्हीवरचा खलनायक पात्र जस मालिकेत- चित्रपटात
चांगूलपणाच मुखवटमय चेहरा लावून आपल वाईट स्वभाव लपवत असतो ...तसा होता. नाव त्याच देवासारख पन वागण मात्र सैतानाच ... रघुवीररावांच नाव देवाच नव्हत का?
" रघुवीरराव ... सुत्रधार ..!" आर्यंशचे डोळे आश्चर्यचकित होत विस्फारले . एक गुढ रहस्य त्याला कळाल होत..
पुजारीबाबांच्या प्रत्येक कोडमय श्ब्दाच्या विखुरलेल्या रेषा रघुवीरनावावर येऊन ठेपत होत्या...जुळत होत्या..
धाड आवाज करत ती शवागारातली उघडलेली
पेटी बंद झाली.
त्या अचानक आलेल्या आवाजाने आर्यंश जरासा दचकलाच.. त्याने समोर पाहिल.. तर पुजारीबाबांच प्रेतआत्मा तिथे उपस्थीत नव्हता.
परंतू पेटी बंद झाली तेव्हा कानांवर एक शब्द ऐकू आला होता .." होय तोच...sss!"..
अचानक त्याच्या मागून काहीतरी चालत आल..ती हवा ....ती अमानवीय हवा वेगाने त्याच्या पाठमो-या आकृती जवळ आली....
आणी...
हिहिहिहिहिहिही... खेळ ….खल्लास..
xxxxxxxxx
क्रमश : ..
xxxxxXXXXXX