मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 24 - अंतिम भाग jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 24 - अंतिम भाग

आंतिम.... दिवस.. .!
घटस्थापना.. लढ्याचा दिवस...
मोक्ष भाग २७
देवपाडा गाव ...



" कूकडू..कूंsss..कुकडू...कूंssss!"
गावात कोणाच्या तरी घराबाहेरच कोंबड आरवल..

सकाळचे सात वाजले होते..आजची सकाळ देवपाड गाववासियांसाठी एक विळक्षण विचीत्र अनुभव घेऊन येत उगवली होती.

बाकीच्या दिवसांप्रमाणे ह्या आज उगवलेल्या सकाळीच्या वातावरणात सुर्याचा प्रकाश नव्हता.
पुर्णत देवपाडागावच्या , नाही नाही नुस्त गावावरच नाही - तर पुर्णत पृथ्वीवरच म्हंणायला हव

वर आकाशात झाकोळून आल होत.
वर पाहता काळ्या जऊलधारी पाषाणी ढ़गांनी उभ्या आसमंताला काळ कवच घालून सुर्याचा प्रकाश अडवून धरलेल दिसत होता.

हळू हळू वेळ पुढे सरकत होती..

सकाळच्या सुर्याचा प्रकाशच नाही, तर ती शरीराला मिळणारी ड जीवनसत्वे कोठून मिळणार.
सकाळच्या पाव्हणे आठ वाजायच्या समयी सुद्धा गडद पांढरट धुक वातावरणात जसच्या तस उभ होत..हाड गोठवणारी थंडी पडली होती...त्वचेतून मांसात, मांसातून स्नायूमध्ये - आणी मग हाडांत घुसत होती.
देवाच्या सणावारीच्या दिवसाला हा काय अभद्र प्रकार घडत होता.? हे शुभ संकेत नव्हत! काहीतरी भयप्रद घडणार आहे त्याचीही शाश्वती लावून देणार एक संकेत होत.

एक झोपडीवजा घर दिसत होत. घराच्या चारही भिंती लाल मातीने सारवलेल्या होत्या...वर कौलारू त्रिकोणी छप्पर होत.. खाली मध्ये दोन झापांचा दरवाजा होता..आणी डाव्या हाताला..एक तीन सळ्यांची चौकोनी खिडकी होती..त्याच खिडकीच्या दोन झापा अलगद उघडल्या गेल्या.. त्या उघडलेल्या खिडकीत ..एक तीस वर्षीय स्त्रीच चेहरा आला.. ती तीचे सुटलेले केस बांधत खिडकीतून बाहेर पाहत होती.

तीच्या नजरेत कमाळीच आश्चर्य भरल होत.
आ - वासून ती समोरच्या गडद पांढ-या धुक्याला पाहत होती.

" अव , जरा ईकड या..!" तीने तीच्या धन्याला बोलावल. तो ही तिच्या मागून आला दोघेही खिडकीतून बाहेर पाहत होते.

" अव, सात वाजून गेलेत पावण आट व्हायले आलेत.. तरी अजुन सुर्य नाय उगवला आणि ही असली हाड गोठावणारी थंडी आण धुक पडलय..! "
त्या स्त्रीच्या वाक्यावर तिच्या नव -याने बैलासारखी मान हळवली.

" अव आज काय आहे माहिती हाई नव्ह तुम्हाला..! आज घटस्थापना हाये ..आज देवी बसणार हाईत..आण ह्या अश्या सणावराच्या शुभ दिवसाला .. हे अस...सूतक लागल्यावाणी पिताड धुक पडलाया.. काय म्हंणायचं ह्याला..!" त्या स्त्रीच्या वाक्यावर तिच्या नव-याने पुन्हा बैलासारखी मान हळवली. जणु त्याला तिच्या बोलण्यावर काही प्रतिउत्तर म्हंणून सुचल नसाव..
तसंही त्याची बॉडी माजलेली होती.. पैलवान वाटत होता ..बायकोचा नंदी नाही .

' ठक...ठक...!' दारावर थाप पडल्याचा आवाज आला.
दोघांच्याही नजरा दाराकडे वळल्या..
पाच सहा पावळ चालून दोघांनिही दार गाठल..
त्या पुरुषाने कडी-कोयंडा काडुन टाकल..
दोन्ही दाराच्या झापांचे हेंडल पकडून अलगद दरवाजा उघडला..
दरवाज्याबाहेर प्रसादराव -आणि त्यांच्या मागे गावातली सात- आठ मांणसे उभी होती.
थंडीपासून वाचण्यासाठी प्रसादरावांनी अंगावर ( शोलेमधल्या ठाकूरसारखी ) राखाडी रंगाची शाल गुंडाळली होती. ( पन त्यांचे दोन हात सलामत होते बर का !) गावक-यांनी सूद्धा सफेद कपड्याने कानांत थंड हवा जायला नको म्हंणून कानांना झाकल होत .
प्रसादराव त्या सर्वाँपूढे उभे होते

" परसाद दा तुम्ही!" तो पुरुष म्हंणाला. हा प्रश्ण नव्हत.

" व्हय मध्या मीच , कालची मिटिंग लक्षात आहे ना ? " त्या पुरुषाच नाव मध्या होत.

" व्हय की दादा संमध लक्षात हाई ! पन हे असल धुक पडलय , त्यात हाड गोठवणारी थंडी ....कस करायचं संमध..!" मध्या म्हंणाला.


प्रसादराव जरा पुढे सरसावले..आपला एक हात त्याच्या खांद्यावर ठेवल.. गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहिल..

" आर ह्यो धुका, ही थंडी नैसर्गिक न्हाई ! अनैसर्गिक हाई..! आपण आज घट बसवायला
नको- देवी आईची स्थापना करायला नको, म्हंणून
त्या वाड्यातून आपल्याला रोखण्यासाठी हे संकट पाठवलय- आर ..हे तर काहीच न्हाई ... जर आजच्या दिवशी आपण देवांना गावात आणल नाही- देवी आईचा गोंधळ घातला न्हाई, तर ह्यापेक्षा भयानक परस्थती उमटल.. ! ह्या धुक्यात सैतान वावरल, ह्या थंडीतच आपला - बायका- पोरांचा डोळ्यासमोर लचका तोडल..आण आपन काहीच करू शकणार न्हाई..! " प्रसादरावांचे बोल गावकरी
शांत उभे राहून ऐकत होते . काहींच्या छातीत
सुई टोचल्यासारख दुखत होत. भीती जाणवत होती..
मध्याच्या बायकोने तर साडीच पदरच तोंडात दाबल होत.

" म्हंणूनच आज आपली संमद्या गावाची परिक्षा
हाये..! आज नाही तर कधीच नाही , .
अरे गड्यांनो !" प्रसादरावांनी सर्व गावक-यांकडे पाहिल ..त्यांच्या नजरेत हिम्मत होती

" आज आताची ही वेळ एक एक सेकंद महत्वाचा हाये..! माझ दादा म्हंणायचा..एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव....प्रत्येक कार्यात परिक्षा असायलाच हवी, मग ती कामात असो ,की देवाच्या कार्यात ..तो विधाता सक्षम आपल्या सोबत असतो..
आणी जेव्हा तुम्ही त्या कामातून यश मिळवता..ते मिळाले यश म्हंणजेच देव खुश झाला अस समजायचं ..! " प्रसादरावांच्या वाक्यावर सर्वगावक-यांच्या चेह-यावर एक हास्याच तरळ उमटल..

" व्हय परसाद दा , बरोबर बोलताय तुम्ही..!
संमदी एकीण काम करू..! घट बी बसवू आण देवी आईला बी स्थापन करू..!" मध्या म्हंणाला.

त्याच्या त्या वाक्यावर प्रसादरावांनी त्याच्याकडे गर्वाने पाहिल..हळकेच त्याच खांद दाबल..


प्रसादरावांनी मागे सर्व गावक-यांकडे पाहिल..


" हे बघा ! सर्वाँनी टोळी - टोळींनी गावात पसरा....आण म्या सांगितलेल.. संमद्याना सांगा .! आण हो..देवाच कार्य हाई.... आप- आपल्या घरची चूल पेटवा ...चांगली..अंघोळ धवा...! आण सगळ्यांनी देवळात..या .! ह्या वेळेस देवळात देवीची मखार बनवायची..हाई..! " प्रसादराव म्हंणाले.

प्रसादरावांनी दोन गावकरी आपल्या सोबत घेतले आणि बाकीच्या गावक-यांनी दोन दोन जनांची टोळी बनवली आणि गावात पसरू लागले..

दरवाजा ठोठावू लागले.. प्रसादरावांनी सांगितलेले बोल आप-आपल्या साथीदाराला सांगू लागले..
पाहता- पाहता टोळींची संख्या वाढु लागली..
आठ जण होती- सोहळा झाली..- सोहळाची बत्तीस झाली..- बत्तीसचे चौसष्ट झाले..
नऊ - साडे नऊ वाजेपर्यंत पुर्ण गाव देवळात जमला होता.
प्रसादरावांच्या म्हंणन्यानुसार देवी -आईच्या दोन मुर्ती, पुजेच सर्व सामान आणल होत - पुजारी - -गोंधळ घालणारे, सगळेच्या सगळे सकाळीच आले होते.. म्हंणजेच प्रसादरावांनीच त्यांना सकाळीच बोलावून घेतल होत.

तरून मुल -मुली मखार बनवायला लागले होते.
मखारीच काम व्हायला ही आल होत.


काही बायका हार बनवायच्या कामाला लागल्या होत्या... तर काहींनी देऊळाच्या पटांगणात ..दगडांचा त्रिकोण बनवून ..आग पेटवली होती..त्यावर भांडी ठेवून नैवेद्य बनवायला घेतल होत.

बाजुलाच प्रसादरावांच काही बोलण सुरु होत.

" शामलाल, काल रात्री सांगितलेल काम झाल
का? " प्रसादरावांबाजुला एक हडकुला मांणूस उभा होता. वय जेमतेम साठीच्या आसपास असाव.

" जी .....जी..मालक..!" शामलाल हा (मृत) सुर्यकांतरावांच्या बंगल्यावरचा नोकर होता.
प्रसादराव सुद्धा त्याचे मालकच लागत होते.


शामलाल चालत मंदिरात गेला.- पुन्हा काहिवेळाने तो परत आला- त्यावेळेस त्याच्या हातात एक सोनेरी रंगाच मोठ ताट होत. आणी त्या ताटात सफेद राख होती.

" ही कसली राख आहे प्रसाद दा ?" एका गावक-याने विचारल..

" राख, नाही ही - अंगारा आहे अंगारा ..! महादेवाच्या समोर जळालेल्या अगरबत्यांची ही राख आहे..! जी पुजारी बाबांनी जपून ठेवली होती. वर वर जरी ही सफेद रंगाची राख दिसत असली तरी ह्यात
अखंड शक्तिचा ठेवा आहे..! त्या कालोख्या सैतानी ब्यादेंसाठी हा अंगारा मौत हाई मौत ! " सर्व गावकरी बायका त्या अंगा -याकडे पाहत होत्या.

" शामलाल- मध्या ! तुम्ही दोघेही ह्या अंगा-यातून
मंदिरापाशी एक गोल वर्तुळाकार आखा..! एक गोल वर्तुळ तैयार करा...!" प्रसादरावांनी सर्वाँकडे पाहिल. गंभीरपणे म्हंणाले.

" काही बी झाल तरी ह्या वर्तुळाबाहेर जाऊ नका! सर्वाँनी ह्या गोल वर्तुळातच राहा..! लक्षत ठेवा कोणीबी बाहेर जाऊ नका..!" प्रसादराव म्हंणाले.

आणी गावकरीही त्यांचे बोलण ऐकणार होते.

प्रसादरावांनी एक कटाक्ष आकाशात टाकला.. !
काळ्याशार पाषाण रुपी ढगांनी अद्याप आसमंताला कवच घातल होत. सुर्याचा तांबडसर प्रकाश बंद झाल होत. खालच धुक थोडस कमी झाल होत..पन थंडीमात्र अद्याप तशीच होती.

" हे महादेवा ,बाबांना लवकर इकड पाठवा आम्हाला त्यांची गरज आहे.!"
प्रसादरावांनी डोळे बंद करून दोन्ही हात कपाळाला जोडले..

तोच देऊळातली महादेवासमोर वर छ्ताला बांधळेली घंटा वाजली.

" टंगssss!"

प्रसादरावांनी उच्चार केलेला तो बाबा कोण?
........जो देवपाडा गावात येणार आहे?
आणी ह्याच बाबाने प्रसादरावांना काही काही विधी सांगितल्या आहेत ! नक्की हा बाबा आहे तरी कोण ? ...या पाहुयात ... पुढील भागात=>

xxxxxxxxxxxx
काहीवेळापुर्वी..

हॉस्पिटलची मागची बाजु दिसत होती.
हिरव्यागार झुडपांमधुन गेलेली ती वाट- पुढचा दोन झापांचा गेट होता जो आता उघडा होता.. त्या गेटपुढे पोलिसांची एक गाडी उभी होती.

गाडीबाहेर दोन हवालदार उभे होते.. एका हवालदाराने हातातली काठी सरल जमिनीवर टेकली होती..आणी तीच्या वरच्या मूठीवर हात ठेवून उभा होता. दूसरा हवालदार मात्र बिन काठीचा उभा होता.
दोघांच्याही जरा आंबट शौकीण गप्पा सुरु होत्या.


त्या दोघांच्या पुढे चाळीस पावळांवर दोन टू- स्टार सब इन्स्पेक्टर पाठमोरे उभे दिसत होते.

खाली ब्लॉकच्या फरशींची रंगीबेरंगी रांग होती.
त्यावर खडून एक मानवी आकृतीच आकार हात पाय वेडेवाकड्या अवस्थेत रेखाटला होता.

आनिशाच्या आई मीराबाई काळरात्री त्या खिडकीतून पडली नव्हती का? तीच्या प्रेताची ती आकृती होती.. !
आकृती पुढेच एक कैमरामैन लग्नातल्या नवरीचे फोटो काढ़ावा तसा त्या आकृतीचे फ्लश मारत वाकड्या तिक्ड्या एंगलने फोटो काढत होता.

कैमरामैनच्या जागेवरून उभ राहून वर पाहता दहाव्या मजल्यावर आनिशा खिडकीतल्या चौकटीवर हात ठेवून उभी राहीली होती.

पाणावळेल्या रडून रडून लाल झालेल्या डोळ्यांनी, त्या सफेद खडूने रेखाटलेल्या वाकड्या तिक्ड्या हाता -पायाच्या आकृतीकडे पाहत होती.


खोलीत काळ झालेल्या थरार नाट्याचे पडसाद जसेच्या तसे होते..

सोफ्यापुढचा टिपॉय फुटला होता- तिथेच काचांवर सुद्धा एक सफेद आकृती काढली होती..ती म्हंणजे श्रीसंथराव ..

ललिताबाईंच कलेवर मात्र तो एडका घेऊन गेला होता..त्या सैतानाने रात्रीतच म्हातारीच्या हाडा मांसाच शरीर चाटून पुसून मिटक्या मारून फस्तही करून टाकल होत..
आनिशा ची अवस्था जस पाण्यातून बाहेर पडलेल्या माश्याची श्वास न मिळाल्यावर तडफड करत हालचाल होते... तशी होत होती.

तिच्या भावानांना..तीचा तो आक्रोश शब्दांत मांडणे कोण्या लेखकाला जमणार नव्हत.. मुळीच जमणार नव्हत .


नियतीने तिला एका अश्या वळणावर आणुन ठेवल होत..जिथे सार जग निराशा, दु:ख, अ:सुख ह्या
भावनांत वावरात होत.

आकाशात पसरलेल्या काळ्याभोर ढगांनी तिच्या मनावर दुखाची छाया पसरली होती.
कोंदट वातावरणाने जिव गूदमरत होता.

आनिशाच्या जगण्याला आता काही अर्थच उरला नव्हता!
कालपर्यंत - आई- वडीलांच छ्त्र असलेली आनिशा एका रात्रीत पोरकी झाली होती.
एकंदरीत तिच्या आई- वडीलांच अंत हा नैसर्गिक असता तर तिला ते मान्य होत..हा मृत्यु
अर्थदायक होत.

पन काळ घडलेल ते मृत्यु नैसगिर्क नव्हत.
एकंदरीत पाहता ती हत्या होती- तिच्या डोळ्यांसमोर एका अनैसर्गिक -हिंस्त्र श्वापदाने तिच्या आपल्या मांणसाना मृत्युच्या घाटात खोल गहि-या दरीत ढ़कल्ल होत...आणि ती?

ती काहीच करू शकली नव्हती! आता तरी ती काय करू शकणार होती ?, ती एक सामान्य हाडा मांसाने बनलेली मानव होती . आणी समोर एक अमानवीय संकट होत. ज्यास हरवण सोप्प काम नव्हत.. मुळीच नव्हत.

आनिशाच्या जगण्याच्या सर्व इच्छाच मरून गेल्या होत्या. आता अश्या एकाकी- आयुष्याला काय अर्थ होता?

तिच्या पापण्यांची उघडझाप होत- नव्हती.
कारण त्या उघड्या पापण्यांमध्ये तिच्या आई- वडीलांसमवेत, आज्जीसमवेत घालवलेले सुखक्षण
तरळत होते.

त्या आठवणी तिला सुखावून जात होत्या..
ती खुद्दकन हसली..एकाच वेळेस झटकन दोन्ही पापण्या मिटल्या दोन्ही बंद डोळ्यांतून अश्रुच्या धारा बाहेर आल्या..

तीने हळुच एक पाऊल उचल्ल.. खिडकीवर ठेवल.. दुसरही उचल्ल आणि ती त्या फुटलेल्या काचेच्या खिडकीत उभी राहिली..
आता जिवनाला काही अर्थच उरला नव्हता.
ते कायमचंच एक कादंबरी समाप्त होते तस समाप्त केलेलेच बर.. होत.!

दहाव्या मजल्यावरच्या खिडकीत उभ राहून
तिने एक नजर खाली टाकली.. प्रथम उंच कड्याची भीति वाटली पन तिने डोळे गच्च मिटले- पापण्यांआड व्याघ्रकोपी अंधार झाला. हा अंधार आता तिला हवाहवासा वाटत होता..आणि तिने अलगद सर्वशरीर खिडकीतून खाली झोकून दिल..
आता काही सेकंद वेदणा जाणवेल ..शरीरात उच्च कळ जाणवेल..आणि मग सर्व दुखांतून मुक्ति मिळेल..!
पन हे काय ? बापरे ! विळक्षण अतर्कनीय प्रकार घडला.. होता.

हे काय चालू होत नक्की?


तीच सर्व शरीर खिडकीतून खाली झोकलेल्या अवस्थेत जसच्या तस हवेत स्थिरावल होत.. केस सर्वच्या सर्व खालच्या दिशेने झुकले होते...

अस वाटत होत की एका अद्यात- अदृश्य शक्तिने तिला मागून धरल असाव...आधार दिला असाव.

आणी तेच सत्य होत - आनिशाच्या मागे खोलीत समर्थ उभे होते ...त्यांच्या चेह-यावर मंदस्मितहास्य होत..!

डावा हात छातीशी आडवा धरला होता..आणी उजवा हात सरळ आनिशाच्या दिशेने होता..त्या हाताची मुठ बंद होती..
सामान्य नजरेला समर्थांची ही कृती आतिसामान्य वाटेल.

जस की आर्यंशला जाणवत होती.

पन मेनका, आणी गबलूला त्या दोघांच्या शरीरात असलेल्या शक्तिंमार्फत एक विशीष्ट प्रकारची दृष्टी प्राप्त झाली होती...ज्याने ते दोघेही त्या शक्तिंचा प्रवाह - आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होते.

समर्थांचा डावा हात छातीवर होता..आणी दूसरा उजवा हात आनिशाच्या दिशेने होता..

ज्या हाताच्या तळव्यातून एक लालसर प्रकाशित घुमटाप्रमाणे गोलसर शक्तिप्रवाह तैयार होऊन त्या शक्तिप्रवाहाची एक लालसर अदृश्य रेषा आनिशाच्या दिशेने जाऊन तिच्या कमरेभोवती लाल रंगाच्या चकाकत्या..लालसर दोरीने एक घेरा घातल्यासारखा दिसत होता...

ती पकड हो ती पकड आनिशाला जाणवली..
तीने झपकन डोळे उघडले..! सर्वप्रथम डोळ्यांवर विश्वासच बसला नाही- तोंड काहीतरी जादूई- आश्चर्यकारक दृष्य पाहिल्यासारख विस्फारल होत..
डोळे मोठे झाले होते...तिच्या नजरेसमोर खाली तीच
उंचाईची दरी होती..ज्या दरीत ती स्वत:ला झोकून देणार होती.

पन म्हंणतात तेच खर काळ आला होता , पन वेळ? वेळ आली नव्हती! देवाच्या रूपाने तो आला होता.. संकटमोचन करण्यासाठी... साक्षात भगवंताने त्यांस पाठवले होते..

" समर्थ , तिला ...वाचवा.. ..! "
आर्यंश म्हंणाला. त्याच्या त्या वाक्यावर समर्थांनी त्याच्याकडे पाहिल..व मंद स्मित हास्य करत मान होकारार्थी हळवली.

आनिशाच्या नजरेसमोर ती मागे- मागे जात आहे अस दिसत होत.. तीच सर्व शरीर अलगद हळु ..हळू.. खिडकीतून खाली झुकलेल्या अवस्थेत मागे मागे येत होत..आणी ते खिडकीतून अलगद फुग्यासारख तरंगत खाली जमिनीवर आल..

आनिशा ठिकठाक आपल्या पायांवर उभी होती.

" आनिशाssss..!" शेवटी तो क्षण आला.
आर्यंशच्या प्रेमभावनेचा उद्रेक झाला.. डोळ्यांतून आसव गाळत.. त्याने आनिशाला एक कडकडून मिठी मारली...

त्या एका मिठीने आनिशाचा सर्व थकवा, दु:ख , आक्रोश गळून पडल.

समर्थ मंदस्मित हास्य करत त्या दोघांकडे पाहत होते. आनिशाच्या गालात हसत होती. गबलू दात विचकत हसत भुवया उडवत होता.


आर्यंशने आनिशाला गच्च मिठित आवळून धरल होत.
डोळ्यांतून आसवे टचकन बाहेर आली होती.


" आनिशा ....तू..तू माझा एकदाही विचार केला नाहीस का ग!" बोलतांना आर्यंशचा कंठ दाटून आला होता.. अश्रुंच्या साचण्याने डोळ्यां समोरच थोडस काही दिसून देत नव्हते..तोंड लहान मुलासारख बारीक झाल होत

" आनिशा तु जर तुझ्या जिवाच काही बर वाईट केल असतस , तर....तर ... माझ काय झाल असतं..!
तुला माहीतीये.. माझ उभ आयुष्यात माझ्या आईशिवाय कोणीही नव्हत ..लहानपणीच ती गेली..
आणी मी कायमचंच पोरका झालो.. पन तू ..? जेव्हा तू मला भेटलीस मानो माझ सर्व आयुष्यच बदल्ल..!
नेहमी एकलकोंडा- कमी बोलणारा मी ...माझ्यात मला ....तुझ्या मुळे कमालीचा बदल जाणवू लागला... माझ्या आईनंतर मला कितीतरी लोक मिळाली पन सर्वाँच्या बोलण्यात मला कधीच आपूलकी जाणवली नाही .. त्यांच्या बोलण्यात फक्त स्व:ताच स्वार्थ दिसून यायचं..
पन तुझ्या बोलण्यात मात्र मला आपूलकी जाणवायची..अस वाटायचं की कोणितरी आपलच माणुस आहे.. मला माझ आयुष्यातल दुख समाप्त होऊन सुख परत मिळास अस वाटल ! ..आनिशा..!"
आर्यंशने तिचा हात हाती घेतला...

" तुझ्या आई- वडीलांचा , आज्जीचा , ज्या सैतानाने जिव घेतलाय -त्याचे दिवस आता भरले आहेत..! " अस म्हंणतच आर्यंशने मागे वळून पाहिल..

" हे बघ आपल्या मदतीला कोण आले आहेत.."
आनिशाने समर्थांकडे पाहिल.. साडे पाच फुट उंची.
अंगात फुल बाह्यांचा सदरा खाली सफेद शिवलेली पेंट- पायांत काळ्या चकचकीत चपला.

हा साधारणा वेश असणारा माणुस पन त्याच्या चेह-यावर पाहता एक कमालीच तेज दिसून येत होत.
काळे टपोरे डोळे..त्या डोळयांत पाहताच ते डोळे विशीष्ट प्रकारच्या लकाकीने चकाकून उठत होते.

कपाळामधोमध एक लाल टिळा लावला होता.
आणी ओठांवर एक मंद स्मित हास्य होत.

"समर्थ !" आर्यंशने पुढील वाक्य पुर्ण केल.

" समर्थ !" आनिशाच्या पाणावळेल्या डोळ्यांतून एक अश्रु बाहेर आला.
त्यातच तिच्या चेह -यावर हास्य उमटल..

समर्थांनी तिच्याकडे पाहून होकारार्थी मान हळवली.

" आनिशा! माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात कितीतरी संकटे येतात - आणि जातात. ते कायमस्वरूपी कधीच आपल्या समवेत राहत नाहीत.
पन जेव्हा ते येतात स्वत:च्या मनात विश्वासाची ढाल मजबुत करायची. सुख हे काहीक्षणांचंच असत .. आणी दुख कायमचंच म्हंणूनच दुखात सुखी रहायला शिक. जे गेले ...ते गेले....! हे जिवन आहे... ईथे कोणीही कायम राहणार नाही. साक्षात भगवंत श्री कृष्णही म्हंणतात.

' जो आला आहे तो वेळेनुसार जाणारच आहे '
म्हंणजेच लहानपणी जन्म झाल आणि म्हातार वयात मृत्यु.. होय! म्हंणूनच ..हा जो तुझ्या मातेने तुला तिच्या पोटी असहाय्य वेदना सहन करून जन्म दिला आहे.. त्याच सत्कर्मयोगे वय घालवूनी उपभोग घे..!
तुला माहीतीये , ईथे ह्या क्षणाला - तुझ्या आई-वडीलांचा , आत्मा ईथे उपस्थीत आहे ." गबलूने जरा भीतच चारही दिशेना पाहिल.. आणी मेनकाच्या मागे लपला .

" ..तुझ्या ह्या कृतीने , तुझ्या आई आणि वडीलांना फार दुख होत आहे.. ! "
समर्थांच्या वाक्यावर आनिशाच्या डोळ्यांतून अश्रुच्या धारा वाहू लागल्या..

समर्थांच्या देहात नसा- नसांत अखंड शक्तिचा स्तोत्र होता..त्यांच्या डोळ्यांसमोर ते त्रिकाळा पल्याड़ पाहू शकत होते.

त्यांना दिसत होत - श्रीसंथराव-मीराबाई- दोघांचाही शुभ्र प्रकाशाने उजळून निघालेल देहाचा आत्मा तिच्या
जवळ उभा होता.. परंतु निसर्गनियमांनुसार ते सजीव व्यक्तीस हात लावू शकत नव्हते आणि नाही सजीव व्यक्ती त्यांना पाहू, जाणवू शकत होता.

" हे दिव्य पुरुष समर्थ ! कृपया माझ्या मुलीला सांगा की पुन्हा कधीच आत्महत्येचा विचार करू नको ! आम्हाला तुला नेहमीचंच सुखात पहायचे आहे..!"

" आनिशा ! " समर्थांचा गंभीर आवाज.

" तुझे आईवडील म्हंणत आहेत , की पुन्हा कधीही हत्येचा विचार करू नकोस - त्यांना तुला सुखात पहायचे आहे .!"

" हो आई -बाबा !" मी कधीच हा असा वाईट विचार करणार नाही.. आई प्रॉमिस..!"
आनिशा आजुबाजुला पाहत म्हंनाली. तिच्या आई-वडीलांनी दोघांनिही एकदाच तिच्या डोक्यावर हात ठेवल...

तो मायेचा स्पर्श तिला जानवला..! तिच उर भरून आल..!

" समर्थ मला फक्त एकदा माझ्या
आई - वडीलांना शेवटच पाहता येईल का ? प्लीज!"
तिच्या त्या वाक्यावर श्रीसंथराव- मीराबाई दोघांनिही समर्थांकडे पाहिल.

तसे समर्थ गंभीर झाले..

" आनिशा - ह्या सृष्टीचे काही नियम आहेत..ज्या नियमांविरुद्ध जाण्याची मला परवानगी नाही..! " समर्थ म्हंणाले आणी तेव्हाच श्रीसंथराव मीराबाई दोघांनिही समर्थांकडे पाहुन हात जोडले..

" प्रस्तान करा , वाटेत कसलेही अडथले येणार नाहीत ." समर्थ म्हंणाले. आणी त्या दोघांच्याही पारदर्शक आत्म्याची आकृती चमचमत्या धुळीकणांत रूपांतरीत झाली..हवेत अलगद विरुन गेली..

". आनिशा तुझ्या आई - वडीलांचा आत्मा सुखात मोक्ष प्राप्तीच्या वाटेस निघुन गेला आहे . आता कसलीच चिंता करू नकोस, निवांत रहा ! आणी तुझ्या आई- वडीलांच्या हत्याला कारणीभुत असणा-या त्या हैवानांना नरकात धाडण्याच काम माझ आहे..! कारण..मी आलोय....!"

समर्थांच बोलून झाल होत.
त्यांच्या ह्या शब्दांत - त्या वाक्यांत काय जादू होती..?नुसत्या त्या शब्दांनीच आनिशाच दुख: निराशा सर्वकाही धुळेप्रमाणे फुंकर मारून त्यांनी तिच्या मनातून घालावल होत..! आता तिला कस हळक हलक..वाटत होत..
मग जरा उशीराने समर्थ पुन्हा म्हंणाले.

"आता काल रात्री काय काय घडल ते मला सविस्तर सांगा ..!"

समर्थांच्या वाक्यावर आनिशा - आर्यंश दोघांनिही आवंढ़ा गिळून एकमेकांकडे पाहिल..आणी सांगायला सुरुवात केली.

समर्थ एकाग्र होऊन ऐकत होते..गंभीर नजरेने पाहत मध्येच होकारार्थी मान हलवत होते.
गबलू-मेनका सुद्धा गंभीरपणे सर्वकाही ऐकत होते.
शेवटी काहीवेळातच सर्वकाही हकीकत सांगून झाली
होती.

मग जरा वेळाने पुन्हा समर्थ म्हंणाले.
" आनिशा ? "

" जी..समर्थ !"

" मगाशी डॉक्टर आले होते !"

" हो !" ती आश्चर्यकारक नजरेने समर्थांकडे पाहत होती.

तिच्या मनात प्रश्न आला.. समर्थांना कसे कळले असावे.

" तुझ्या आई -वडीलांच्या प्रेतांना दहण करण्या बद्दल बोलून गेले !" आनिशाने फक्त मान हळवली.

" डॉक्टरांना म्हंणाव, प्रेतांचे अंतसंस्कार आज नाही उद्या करायचं, आजचा दिवस प्रेत शवागारात राहतील.. !"

आनिशाने मान हळवली.. डॉक्टर तिच्या बाबांचे ओळखीचेच होते..तीने फोन काढल..डॉक्टरांना कॉल केल.. पाच - सहा मिनीटे बोलण सुरु होत मग ते मान्य झाले. प्रेत आजच दिवस शवागारातच राहणार होते.

" आर्य्ंश ? श्रीसंथरावांची गाडी काढ़.. ! आपण आताच देवपाडला निघतोय..!"
समर्थ म्हंणाले आणि आर्यंशने मान हलवली..व लागलीच दरवाज्यातून बाहेर पडला.

xxxxxxxxxx

सकाळचे (10:00 pm) दहा वाजले होते.
पन आकाशातल्या अंधारी ढ़गांचा अद्यापही घोळला रिकामा झाला नव्हता.. धुक अद्याप तसंच होत - थंडीही तशीच होती. सृष्टीच्या नियमांना त्या सैतानाने
धाब्यावर आणून सोडले होते .
हा वातावरणाचा बदललेला रुप सर्वाँसाठी अनपेक्षित,अतर्कनिय होता.

शामलाल- मध्या दोघांनिही अंगा -याच्या राखेने
महादेवाच्या देऊळाभोवती एक गोलवर्तुळार काढला होता.

आणी त्या राखेच्या रिंगणात गावची लोक आप- आपल्यास पुजेच नेमून दिलेल काम करण्यात व्यस्त होती.

मखर बनवून केव्हाचीच झाली होती- आता पुजा सुरु झाली होती.

मखारीच्या समोर खाली जमिनिवर देवी संतोषी मातेची सिंहराजच्या पाठीवर बसलेली मुर्ती होती.
आणी त्याच मुर्तीच्या पाठीमागे लागून मातेच अजुन एक अवतार होत.

काळी मातेची उभी मुर्ती दिसत होती. पुर्णत शरीर कालसर - सुटलेले केस - दोन्ही खांद्यांवरून खाली लोंबत होते.. डोळे वटारलेले भेदक होते, लालसर लालभडक रक्ताचीजीभ बाहेर काढलेली होती.. दोन्ही बाजुंना दोन- दोन मिळुन असे चार हात होते..सर्व शस्त्रधारी होते.. एका हाती त्रिशूळ, दुस-या हाती पाषाणी तळवार, तिस-या हाती विशिष्ट प्रकारची कू-हाड होती. चौथ्या हातात मात्र आसुराच छाटलेल मुंडक धरल होत..
अजुन ..गळ्यात आसुरांच वध करून त्यांचे मस्तक छाटून त्या मस्तकांची कवट्यांची माळ बनवून गळ्यात घातली होती.

" पुजा समाप्त sss!" पुजा-याने शेवटच मंत्र म्हंणून पुजा समाप्त केली.


" आता मातेची मुर्ती उचलून मखारीत ठेवा !
समई-विडा, फळ, तिला नैवेद्य दाखवा ..आणी तुमच्या गावातली पीडा घालव अशी मनोभावे विनंती करा..!"
पुजारीबाबा म्हंणाले.

काळवंडलेल्या त्या वातावरणात दुख: ,अस्वस्थता,मनावर एकप्रकारच दडपण जाणवत होत.
पन देवीच्या आगमनाने सर्वाँना एक धीर आला..
मना- मनात उर्जा संचारली बायका-पुरुष सर्वाँनी एक एक करत देवी आईच दर्शन घ्यायला सुरुवात केली..
आता वातावरणातल पांढर धुक पुर्ण नाहीस झाल होत. ही देवीची- त्या देवाची कृपा होती का? पुजारीबाबांच्या त्या मंत्रांनी , त्या निर्जीव मुर्तीच्या पार्थिवात जिव आला होता का? खरंच हे शक्य होत का ? असूही शकत ! देवाचे शुद्ध-मंत्रांवाटे आव्हान करून त्यांना त्या पार्थिवात स्थापन होण्याची विनंती केली होती..आणी देवी आई त्या पार्थिवात आली होती..हे वातावरणात झालेल्या बदलाने जाणवत होत.

गावकरांच्या मनावरच दडपन पुर्ण नाही! पन जरासे कमी झाले.

" देवी मातेची कृपा !"
पुजा-याने चारही दिशेना झालेला हा बदल पाहून हलकेच हात जोडले.

" बघा गावक-यांनो , देव बसल आण तो प्रेताड
धुका गायब झाला ! आता फक्सत " प्रसादरावांनी आकाशात पाहिल.. काळे ढ़ग अद्याप त्यांच आस्तित्व टिकवूण होते.

" ती वाड्यातली ब्याद राहीलीये !" प्रसादराव म्हंणाले आणि तोच देऊळापूढे एक गाडी येऊन थांबली.

पाच सेकंद इंजिनचा आवाज वातावरणात घुमला आणि हळूच बंद झाला. पन इंजिनच्या आवाजाने तेवढ्यावेळेत सर्व गावक-यांचे गाडीकडे लक्ष वेधळे होते..सर्वाँच्या नजरा मागे त्या गाडीकडे वळल्या होत्या.
निळ्या रंगाची मारुती फ्रॉन्कस उभी होती.

गाडीचा मागचा दरवाजा उघडला.. उघड्या दरवाज्यातून समर्थ बाहेर आले.

गावातल्या बायका ,पुरुष,लहान- मोठी पोर
सर्वच्या सर्वजण कुतूहलाने समर्थांकडेच पाहत होते.

त्यांच्या अंगावर एक फुल बाह्यांचा भगवा सदरा होता. खाली सफेद पेंट होती- पायांत काळ्या कोल्हापुरी स्टाईल चपला होत्या.

सर्वगावकरी एकटक समर्थांकडे पाहत होते.
त्यांच्या मागच्या सीटवरून मेनका- मग गबलू उतरला..पुढच्या ड्राईव्हसीटजवळून आर्यंश- आणि ड्राईव्हसीटबाजुने आनिशा उतरली..
समर्थ गर्दीपाशी पोहचले.

" बाबा..!" प्रसादराव समर्थां समोर आले..
त्यांनी समर्थांना हात जोडले. नाहीतर प्रसादराव समर्थांच्या पायांवर लोटांगणच घालणार होते..पन समर्थांना ते आवडत नसे..त्यांच्या म्हंनण्यानुसार लोटांगण घालाव ते आपल्या माता-पिता आणी त्या सदगुरुपाशीच घालाव..जो ह्या सृष्टीचा विधाता आहे..
आम्ही फक्त नाममात्र, त्याने सोपावळेल कर्तव्य पार पाडत आहोत.

" बाबा..! " प्रसादराव ज्या बाबांविषय बोलत होते ते आपले समर्थच बर का !


समर्थांचा अध्यात्मिक आणी तदविषयक गोष्टींचा फार दांडगा विश्वास होता .त्यांनी दूर दूर वेगवेगळ्या स्थळांतल्या भट,योगी लोकांच्या सेवेत दिवस काढले होते. समर्थांच्या चेह-यावर नेहमीचंच ते प्रखर तेज झळकत होते..त्यासहितच त्यांची शरीरयष्टी मध्यम धिप्पाड होती.

समर्थांच मन गंगेच्या शुद्ध गंगाजळासारख निर्मळ होत. गावातल्या सर्व मांणसांशी त्यांनी आपुलकीने बोलायला सुरूवात केली होती..लोकांच्या समस्या जाणुन समजुन घेतल्या होत्या.

गावात आलेल्या त्या अभद्र पिडेने कोणाच मुल,कोणाची मुलगी, मोठी मांणस सर्वाँचे निघृण बळी घेतले होते.

गावक-यांचे बोल ऐकून समर्थांचा त्या शक्तिविरुद्ध संताप उफाळून वर आला होता.
पन त्यांनी तो दाखवला नाही..वेळ आल्यावर त्याचा उद्रेक होणार होत हे विधिलिखित काळ्या पाषाणावरच्या दगडावरची रेष होती.

समर्थांनी गावक-यांना धीर दिला..
त्यांचे सदविचारी बोलणे, निर्मळ मन जो की त्यांना भेटे ..त्यांच्या व्यक्तीमहत्वाचा समोरच्या च्या मनावर
फारच प्रकर्षाने परिणाम होई.. समर्थांच्याबद्दल एवढ़ा विश्वास वाटू लागे.. की या मांणसाने आपले दु:ख जरी ऐकून घेतले तरी ते कमी होइल.
मेनका समर्थांकडेच पाहत होती .समर्थांचे बोलणे म्हंणजे अमृत आहे .. दु:ख धारी मांणसाला कस त्या दुखातून बाहेर काढ़ायच हे त्यांना चांगलंच ठावूक होत..

" आर्यंश बेटा.!"

" उस्मान काका ..!" आर्यंश म्हंणाला .

उस्मान काका आले आणि त्यांनी आर्यंशला मिठीच मारली.

" बेटा कसा आहेस..! तुला सांगतो , जेव्हा तुला त्या हवेलीत सोडून आलो त्याच दिवशी..!"
अस म्हंणतच उस्मान काकांनी त्या रात्री घडलेला तो थरार ..आर्यंश, आनिशा दोघांनाही ऐकवला..त्या दोघांचीही प्रतिक्रीया जराशी भीतीदायक होती..त्यात
संताप सुद्धा होता..

" आपण हे समर्थांना सांगूयात..!" आनिशा म्हंणाली.

" उनको मालुम हे बेटा!"
उस्मान काका म्हंणाले.

" काय?" आनिशा- आर्य्ंश दोघेही एकदाच उच्चारले.

जरा आश्चर्यकारक नजरेने उस्मानकाकांकडे पाहत होते.. कारण समर्थ तर आताच ईथे आले होते..मग त्यांना तुम्ही सांगितल कधी.. आनिशाने हा प्रश्ण सुद्धा विचारला..

" अरे बेटा , समर्थ के बारे में मुझे पुजारी बाबांनीच सांगितले होते ..! आणी आज सकाळी जेव्हा मी बाजारात भाजी विकायला घेऊन चाललो होतो.. तेव्हा खुप शबनम ( धुक) पडा था. अचानक मुझे उस शबनम के अंदर से उस लडकी की( उस्मान काकाने पाठमो-या मेनकाकडे बोट दाखवल..) आवाज में समर्थ समर्थ
ऐसे शब्द ऐकायला आले..! मैं दस -बीस सेकंद इस नामको आपने मुंह मै ही बोलत होतो..कारण मला राहून राहून वाटत होत की हा नाव मी ह्या अगोदरही ऐकला आहे..! आणी अचानक मला बाबांचे शब्द आठवले..आणि मी समर्थांपाशी पोहचलो..त्यांच्याशी थोडवेळ बोलून त्यांना ह्या गावातली परिस्थिती सांगितली..आणी काल रात्री जे हॉस्पिटमध्ये खून झाले...ते मला हवालदार साहेबांकडून आधीच कळल होत ..ते ही मी समर्थांना सांगितल. आणि !"
उस्मान काकांनी डोळे मोठे केले.

" तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत पन मी जस समर्थांना तुम्हा दोघांबद्दल बताया..यह अल्लाहा ..उनको क्या हुआ क्या मालुम..ते ताड..ताड घाईत असल्यासारख चालत..तिथून निघुन गेले...! आगे का मुझे कुछ मालुम नही, पर एक बात है ! समर्थ कोई आम इन्सान नही....वह फरीश्ता हे..और उन्हे उपरवालेनेही यहा भेजा हे..!"


आनिशा- आर्यंश दोघेही डोळे मोठे करून ऐक होते..ही माहीती फार अचंबित करणारी होती..

" आनिशा हे किती चमत्कारीक आहे? तुला कळतंय का? उस्मान काकांनी जेव्हा त्यांना हॉस्पिटल बद्दल सांगितल .. तेव्हा मला वाटत , त्यांना आधीच तू जिव देणार आहेस हे कळल होत..आणी म्हंणूनच समर्थ उस्मान काकांनी सांगितल्या प्रमाणे लागलीच हॉस्पिटलकडे जायला निघाले..! आणी तिथे सूद्धा एक चमत्कार घडला ,"

आर्यंश सांगू लागला

" मी हॉस्पिटलपासून जरा दुर .. रसत्याच्या दुस-या तर्फे, एका चहाच्या टपरीवर चहा पित होतो..चहा पिऊन झाल्यावर मी पुन्हा रस्ता क्रोस करून हॉस्पिटलच्या दिशेने येत होतो..की अचानक न जाणे मला काय झाल? माझ सर्व शरीर आखडल..अस वाटत होत..की जणू कोणीतरी माझ्यावर काळी जादू केलीये ...आणी मला मूठीत गच्च आवळून धरल आहे..! मी एकटक जसाच्या तसा रस्त्यावर उभ होतो..आणी समोरून एक काळी ट्रक वेगाने माझ्या दिशेनेच येत होती..मी समोर पाहिल..तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही, कारण ट्रकच्या ड्राइव्ह सीटवर कोणीच बसल नव्हत... पाहता पाहता ट्रक माझ्या जवळ आली ..वीस मीटर अंतरावर येऊन ठेपली.. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती..अस वाटत होत कोणीतरी मला गच्च आवळून धरल आहे..आणी त्याला माझा मृत्यु घडवून आणायच आहे...शेवटी मी डोळे बंद केले..आणी बंद डोळ्यांआड मला कानांवर तुझे शब्द ऐकू आले..
की कधीही जर तुला वाटलं की तू संकटात आहेस..तर एकच नाव घे.. स्वामी - समर्थ!... मी बंद डोळ्यांआड.. मन एकाग्र केले..आणी त्यांचा धावा केला..मनातल्या मनात एकच ..फक्त..एकच शब्द उच्चारला..श्री.. ! आणी माझ्या बंद पापण्यांवर एक तीव्र लालसर प्रकाश पडला..! कानांवर ओरडण्याचे, विव्हळ ,फ़ुत्कार, गुरगूरण्याचे आवाज पडत होते. जणू कोणतीतरी शक्ति माझ्या पुढ्यात एका भिंतीसारखी माझ कवच बनून उभी राहिली..होती.. मी डोळे उघडून पाहायचं ठरवल ,तर मला कानांवर एक आज्ञाधारक -हुकमती आवाज आला.

" डोळे उघडू नकोस.. तुझे सामान्य मन, मेंदू, द्रुष्टी
ते पाहू शकणार नाही. डोळे बंद ठेव..! तो आवाज
जरी आज्ञाधारकी, जरब बसवणा -यांमधला असला तरी माझ्या मनाला एक वेगळीच सुरक्षेची उर्जा प्रदान करत होता. काही मिनीटे तो ओरडण्याचा, गुरगूरण्याचा आवाज कानांवर पडतच होता..सर्वशरीराला कशानेतरी जखडून ठेवल्यासारख जाणवत होत..आपण कोणाच्यातरी पकडीत आहोत अस वाटत होत. बंद डोळ्यांच्या काळ्या पडद्यांवर फटाक्यांसारखे चित्र- विचीत्र रंगाचे प्रकाश समोर फुटत आहेत असा प्रकाश पडत होता.. फट,फट, फटाके फुटल्यासारखा तर कधी स्पेसशिप अचानक उडते तसा सुई..सुई.आवाज येत होता. चेह-यावर कधी उष्णतेची धग, तर कधी त्या मोर्गमधल्या थंड विषारी हवेची झुळुक जाणवत होती. मग अचानक एक विचीत्र आवाजात एक विव्हळ फुटली..! माझ सर्व शरीर त्या आवाजाने ..नसांवरून एक टोकदार खिळे फिरवाव तस शहारून ऊठल..आणी हळू हळू..माझ्या अंगावरची ती अमानवीय पकड सैल झाली..तो आवाज सर्वकाही शांत झाले.. आणी मग हळू आवाजात कानांवर काही शब्दे ऐकू आली.. डोळे उघड आर्यंश..! मी डोळे उघडले..समोर समर्थ आणी त्यांचे दोन सहकारी गबलू- मेनका उभे होते..समर्थांच्या चेह-याडे पाहताच त्यांच्या त्या व्यक्तिमहत्वा बद्दल कळून येत होत..हे सामान्य पुरुष नाहीत, अस मन ओरडून ओरडून सांगत होत..शेवटी तेच म्हंणाले..की मी तुझ्या मदतीसाठी आलो आहे आणि मग मी त्यांना दहाव्यामजल्यावरच्या खोलीत घेऊन आलो....

आणी पुढे काय काय घडल ते आपल्या सर्वाँना ठावूकच आहे..! "

आर्यंशची हकीकत फारच विलक्षण,भयप्रद होती. आर्यंश- आनिशा दोघांनाही समर्थांनी मृत्युच्या मुखातून बाहेर आणल..होत..! ह्या दोन्ही घटनेना पाहता...त्यांच्या शक्तिची प्रचिती येत होती...
सर्व घटनांना एक वेगळ रुप प्राप्त झाल होत..
काळपर्यंत त्या शक्तिविरोधात कस उभ रहायचं? कस लढ़ा द्यायचं? ह्या विचाराने त्या सर्वाँच्या पोटात गोळा उभा राहिला होता. पन समर्थांच्या आगमनाणे त्यांना एक आशेची किरण मिळाली होती.

...आपल्या कथेला आता हळुच एक वेगळ रुप प्राप्त होणार होत.

पन ती सैतानी शक्तिही कमी नव्हती, तीही अशी हातावर हात ठेवून गप्प बसणार नव्हती..! ..
Xxxxxxx

दूपारी
1:30 pm

दरवर्षी पाटील, मसणे,मिसाल, इत्यादी असे आडनाव असणा-या वेगवेगळ्या लोकांच्या घरी
आप - आपले देव बसले जायचे. परंतु ह्या वेळेसची परिस्थिती पाहता - देऊळातच एके ठिकानी देव बसवले होते.

देऊळाबाहेर पुढे एके बाजुला मखर बनवली
होती. त्यात संतोषी माता - आणी मागे काळी मातेची मुर्ती होती- देवीपुढे दोन समया तेवत होत्या..
बायकांनी गोडधोड बनवून देवी मातेला नैवेद्य दाखवल होत.

दूपारचा दिड वाजला होता.
धुक्याचा अंत झाला होता - पन आकाशातला जऊल तसूभरही कमी झाला नव्हता. चारही दिशेना अंधार पोतला होता . अशुभ, मळीन, दुखी भावना वातावरणात पाहता मनावर हावी होत होती..


समर्थ, मेनका, गबलू, आर्यंश- आनिशा , आणी शेवटला प्रसादराव , अशी सहाजन मिळून एका बाजुला उभी होती .

" आपल्याकडे वेळ फार कमी आहे- सर्वजन मी जे काही सांगतो ते निट लक्ष देऊन ऐका.!" समर्थांचा गंभीर आवाज .
" प्रसादराव मी सांगितलेली कृती तुमच्या लक्षात आहे ना ? संध्याकाळी साडे सात वाजले की देवी मातेची आरती करायची- साडे आठ वाजता गोंधळ घालायला घ्यायचं - !"

" पन बाबा तुम्ही म्हंणालात की हवेलीफ प्रवेश करायचं..!" प्रसादराव हळू आवाजात म्हंणाले.

" होय म्हंणालो होतो... पन ते धोक्याच ठरेल..!
म्हंणून त्याची काही अवश्यकता .....!"
प्रसादरावांनी फक्त होकारार्थी मान हळवली.

" आणि तुम्ही!" समर्थांनी आनिशा- आर्यंशकडे पाहिल.. " तुम्ही दोघेही इथेच असाल तए ह्या अंगा-याने आखलेल्या रिंगणाबाहेर कोणालाही जाऊ देऊ नका.! हा रिंगण म्हंणजे कवच आहे- ह्या कवचात सर्व सुरक्षित आहेत..! पन जर तुम्ही ह्या कवचापल्याड गेलात , तर मात्र ठावूक नाही.." समर्थांच्या ह्या वाक्यात धोक्याची सुचना होती. आनिशा- आर्यंश दोघांनिही आवंढा गिळला.



समर्थांना हात जोडून प्रसादराव, आनिशा- आर्यंश
जरा दुर गेले.

" कृनाल आम्ही दोघेही तुझ्या सोबत येणार आहोत बर का !" गबलू किन्नरी आवाजात म्हंणाला.

त्याच्या त्या वाक्यावर समर्थ हलकेच हसले.
मान होकारार्थी हलवली.

" समर्थ एक विचारू !" मेनका जरा गंभीरपणे म्हंणाली.

" हम्म बोल!"

" आपण ईथे आलो आहोत हे त्यांना कळाल असेल का ? आणी त्यांची ती विधी सुरु झाली असेल का? आणी झाली असेल , तर आपल्याला आता तिथे जायला हव ना? म्हंणजे त्यांना वेळीच रोखता येईल! "

" मेनका , असावधानतेने केलेली क्रिया नेहमीचंच धोक्याची असते. जस अपुर ज्ञान धोक्याच असतं!"

" म्हंणजे...?" गबलू डोक खांजलत म्हंणाला.

" म्हंणजे हे , की वेळ आल्यावर कळेलच!"
समर्थ हसले... गबलूला काही समजल नाहीच पन तरीही तो दात दाखवत हसलाच.

मेनका मात्र गंभीर होती. पन तिचा समर्थांवर विश्वास होता..समर्थांच्या प्रत्येक कृती मागे काहीतरी कारण असतंच हे तिला ठावूक होत.

दर लढ्या अगोदर समर्थ दोन- तीन तास ध्यानास्थ बसायचे हे ही तिला आणी गबलूला ठावूक होत..कारण ते देऊळाच्या पाय-या चढुन महादेवासमोर गेले...बाजूची एक चटई उचलून ती खाली मांडली आणि त्यावर ध्यानास्थ बसले..
आणी समर्थांच हे नेहमीचंच होत ...

xxxxxxxxxxxx

पंतांची हवेली ..

काळ्याभोर ढगांचा विषारी प्रकाश हवेलीवर पडला होता. त्या तीन मजली हवेलीत आता अघोरी कृत्य घडत होत..

हवेलीचा एक नी एक अंधारा कोपरा विषारी घातक अश्या रसायनांनी भरला होता.
हवेलीच्या सर्व दार- खिडक्या बंद झाल्या होत्या..
गेटवर उभे राहणारे पहारेकरी सूद्धा त्यांच्या नजरेला एका खिडकीत नहरपंतांचा प्रेताड आत्मा त्या दोघांकडे दात विचकत हसतांना दिसला होता.. तसे दोघे धुमठोकून पळाले होते.

त्यांची ती ..... बलवान शक्ति भीतीच्या शक्ति पुढे काय होती?

हवेलीचा सर्व एरीया सुनसान - शुकशुकाट पडला होता.
वाकड्या तिक्ड्या वाहणा-या अदृश्य हवेच्या झोतांवर पाने तिरडी सारखी झुळत झुलत उडत होती.

हवेली बाहेर बागेत असलेला झोपाळा आपल्या नांदात पुढे मागे होत झुळत होता..

तिस -या मजल्यावर

लाल खोली..

म्हंणायला काळ रात्रि बारा वाजल्यापासून रघुवीररावांची ती अघोरी विधी सुरु झाली होती.
अंगात खाली एका काळ धोतर सोडल ..तर
पुर्णत अंग उघड होत.. आणी उघड्या अंगावर हात- पाय , पोट सर्व त्वचेला .. लाल रक्त फासला होत..

.
रियाच्या प्रेताला फाडून ..तिच्या देहातल रक्त
बाहेर काढुन अंगाला फासल होत..!
तीच्या मांसाचा एक तुकडा हवनकूंडात भाजुन तोच स्वत:च्या तोंडाने खाल्ला होता..! स्वत:च्या लेकीला मारून , तिच मांस भक्षण केल होत..किती ती अघोरी चेष्टा ,? किती तो किळसवाणा प्रकार..

हवनकूंडातून निघणा-या लालभडक आगीच्या ज्वाळेवर इरुल ग्रंथ तरंगत होता...

ग्रंथाच्या दोन्हीबाजु उघडल्या जात पुर्णत ग्रंथाला पिवळसर प्रकाशाच आवरण होत.. भूर्ज पत्राची उघडलेली पाणे.. तपकिरी प्रकाश किरणे बाहेर फ़ेकत होती..

आणी भूर्जपत्रावर रेखाटलेले तमिळ भाषेतले मंत्र , ज्या ज्या मंत्रावर रघुवीररावांच्या डोळ्यांची लालसर बुभळांची नजर फिरत होती..ते मंत्र भूर्जपत्रावरून विलग होऊन थेट हवेत तरंगत होते.

मंत्र मनातल्या मनात वाचतांना रघुवीररावांच्या तोंडाची हालचाल होत होती. हलकासा पुटपुटल्यासारखा आवाज यायचा पन तमिळ भाषा समजत नव्हती.

प्रत्येक मंत्र पठण करून होताच शरीरात एक विचीत्र शक्ति संचारत होती.

रघुवीररावांच्या मागे उघडा दरवाजा होता त्या दरवाज्यातून म्हातारा जखोबा आत आला..


" जख्या, काय वार्ता आणले..?"
नरहरपंताचा आत्मा त्या खोलीतच होता.

" देव बसवलेत देवळात साल्यांनी, देवळाभोवती एक रिंगण काढलय त्यात लपून बसल्यात संमदी..
आण मालक ..म्या..सांगितलेल तो भट पन आलाय..
बर का ? आण गावात रातच्याला गोंधळ घालणार हाईत.. म्हंणे ! आणी मग.." जखोबा ..जरा थांबून म्हंणाला.

" ते तिघे ईथे येणार हाईत..!"

जखोबा एवढ बोलून थांबला. त्याने रघुवीररावांच्या पाठमो -या आकृतीकडे पाहिल.. तसे त्याचे डोळेच विस्फारले..

कारण रघुवीररावांच सर्व शरीर काळ निळ पडत चालल होत , आणी हात- पाठ पिलदार झाली होती.. ..! पाहणा -याला अस वाटेल जस की एक जिवंत दैत्य- राक्षस ध्यानास्थ समोर बसला आहे.

" मंग येऊ देत की संमद्यांना,एकेकाच मुंडक कापून तोरण बांधू वाड्याला ! बघतो कोणाची हिंम्मत होते वाड्यात यायची, हरामखोर!"
नरहरपंतांचा तारस्वरातला आवाज हवेली बाहेर घुमला.

xxxxxxxxxxxxx ...
पाहता - पाहता वेळ पुढे सरकू लागली.
घड्यालाचे काटे वेगाने फिरले..गेले

साडे सहा वाजायला आले होते..


काळ्याभोर ढगांआडून सुर्यदेव आजच्या दिवशी पृथ्वीवर प्रकाश न पाडताच आल्या पावले निघुन गेले होते.

होता नाही तेवढ़ा प्रकाशही संपुण गेला होता.
आता वातावरणात पुन्हा काजळी पसरू लागली होती.
धुक्याच भुत आणि थंडी पुन्हा डोक वर काढु लागली होती.
ह्या पृथ्वीच्या जिवांच्या रक्षणासाठी नेमून दिलेल्या रक्षकांमधले समर्थ कृणालही होते.
आणी त्यांच्या भाग्यात आलेल्या लढ्याची वेळ आली होती..

तब्बल चार-पाच तास समर्थ ध्यानास्थ बसले होते. आणि आता ते जेव्हा पुन्हा परत आले..
त्यांच्या चेह-यावरच तेज अजुनच तिप्पटीने झळकत होत. हीच तर ध्यानधारणेची खासियत होती..
मन चित्त ताळ्यावर राहत होते, शक्तिस्तोत्र वाढल जात होत.

समर्थ एकटे देऊळाच्या पाषाणी पायरीवर उभे होते . समर्थांच्या पूढे पायारीजवळ मेनका- गबलू आर्यंश- आनिशा , बाजुलाच प्रसादराव उभे होते.. आणी त्यांच्याही मागे देवपाडची सर्व गावकरी , पुरुष,बायका, लहान- मोठी मुल- वयस्क सर्व जमली होती.
मोठ्या आशेने ती गावकरी लोक समर्थांकडे पाहत होते.
समर्थांनी सर्वाँकडे गंभीर नजरेने पाहिल..
हळूच त्यांनी पाय-या उतरल्या..
समर्थ कधीच खोटी आषा दाखवत नसत ..
त्यांचा वर्तमान वेळेवर आणी स्वत:वर विश्वास होता.

ही वेळ धीराची होती..मन कठोर, दगडासारख पौलादी हव होत. आता भावनाहिंत होऊन चालणार नव्हत ..


समर्थांनी आनिशा- आर्यंश , प्रसादरावांकडे पाहत होकारार्थी मान हळवली..! जणू ते इशा-याने म्हंणाले असावे की सर्व क्रिया निट पार पाडा..

समर्थांच्या पुढे गावची तमाम लोक जमलेली..
काळ गोठला होता, वेळेच्या चक्रांना गंज लागली होती.. हळू हळू सेकंदाच्या काट्यागणीक मंदगतीन वेळ धावत होती..

गावाला त्या पिडेपासून मुक्ति मिळवूण देण्यासाठी समर्थ निघाले होते.

ह्या गावच्या हर एक माणसाच भविष्य ,जिवन समर्थांवर अवळंबून होत. ते ज्या लढ्यासाठी निघाले होते.. त्यात जर ते अपयशस्वि झाले तर पूर्णत गाव प्रेत बनून राहणार होता.

लहाण- लहान शेंबड्या, नागड्या पोरांपासून ते वयस्क मांणसांच्या स्थिर शुन्य, पाणावळेल्या नजरा समर्थांवर खिळल्या होत्या...

काळ्या पाषाणाच्या अंधा-या आसमनांत
सैतानाची विव्हळ फुटत होती..
आसुरी चमकेची वीज लकाकत होती.

तो प्रकाश उभ्या गावक-यांच्या काळसर आकृत्यांना उजळून टाकत होता.

समर्थ त्या गावक-यांच्या मधून चालत जाऊ लागले...होते.. आणी त्या सर्व गावक-यांनी हळू हळू पुढे होत.. समर्थांच्या अंगाला स्पर्श करायला सुरुवात केली..

समर्थ जसे जसे पुढे जात होते..
लोक जवळ येत होती..त्यांच्या अंगाला हळकेच स्पर्श करत होती..

" वाचवा आम्हाला... वाचवा...!"
प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघत होत.
त्या वाक्यात एक विनंती होती.. दयनीय विनवणी होती.

समर्थ सर्वगावक-यांकडे पाहत हळू हळू पुढे जात होते त्यांच्या मागून मेनका गबलू चालत होते.
त्या दोघांकडे पाहूनही लोक हात जोडत होते.

शेवटी समर्थांनी ती अंगा-याची वर्तुळाकार रेषा
ओलांडली.. आणी तेव्हाच आकाशात वीज कडाड़ली..

देवपाडा गावचा एक नी एक घराच छप्पर निळसर रंगाने उजळून निघाल.

हा दिवस -ही रात्र इतिहासात एका
विळक्षण घटनेची भागीदार होणार होती.
xxxxxxx
रघुवीररावांच्या मुखातून पुटपूटल्या जाणा-या दर मंत्राणी त्यांच्या देहात एक काळी शक्ति संचारली जात होती.

शरीराच्या मानवी सामान्य त्वचेच रंग आसुरी
दैत्याच्या चामडीसारखा काळपट डांबरी पडत चालला होता .- ते एक कवच होत .

499 पानांच इरुल ग्रंथ आणि त्यातले 666 मंत्र
आता शेवटच्या टप्प्यात आले होते.-


त्यासाठी त्यांनी तब्बल अठरा तास एकाच जागेवर बसून ती विधी सुरु ठेवली होती.
रघुवीरराव रावांचा प्रेताड आत्मा एका कालोख्या भिंतीजवळ उभा होता - त्यांच्या चेह-यावर लालसर अमानविय प्रकाश पडला होता.

आसुरी स्मित करत ते रघुवीररावांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत होते.

तोच अचानक त्यांच्या नाकाला कसलातरी वास तीव्र वासयेऊ लागला....!

एका अमानवीय शक्तिशाली दैवीक शुद्ध ,गंधाची एलर्जी असते . .

.त्या वासाची तीव्रता नरहरपंतांना नकोशी झाली होती .

क्षणात त्यांच्या चेह-यावर संताप पसरला..


" मालक ...मालक...!" म्हंणत भयभीत होत उघड्या दरवाज्यातून जखोब धावत आत आला..

" ती तिघजण आल्यात...तिघजण आल्यात..मालक ..हवेलीच्या गेटपाशी उभे आहेत..! "

" रघ्याची विधी पाच मिनिटात पुरी होइल..तो पर्यंत मी त्यांना अडवतो..! आणी तो परंत तू ईथेच थांब?" नरहरपंतांचा आत्मा जागेवरच लालसर धुळीकणे उडवत गायब झाल..

xxxxxxxxxx

हवेलीच्या अगडब्ंब दोन झापांच्या बंद गेटबाहेर
समर्थ कृणाल, गबलू , मेनका तिघेही उभे होते.

समर्थ सर्वात पुढे गेटजवळ उभे होते , आणी त्यांच्या जरा मागे डाव्या - उजव्या बाजुला गबलू, मेनका उभे होते..
तिघांच्याही डोक्यावरून...

काळसर ढ़गांच्यात निळसर वीज चकाकतांना दिसत होती.

गबलू जरा पूढे आला , गेटला उघडण्यासाठी त्याने हात वाढवले.. तोच समर्थांनी मध्ये त्याच हात धरल..

गबलूने समर्थांकडे पाहिल..

" थांब !" ते म्हंणाले.

त्यांनी खाली वाकून जमिनीवरची तपकीरी माती हातात घेतली..

तीच मुठ झाकली , हवेत धरली..आणी तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटले..आणी त्या मूठीतली माती गेटवर फेकली...

मातीच स्पर्श जस गेटला झाल.
त्या साधारणश्या काळ्या लोखंडातून गरम तव्यावर
पाण्याचे शिंतोडे उडताच जस फस्स आवाज होतो तसा आवाज होत लोखंड लाल रंगाने तापून उठल .
ता लोखंडातून गरम धगधगत्या उष्ण वाफा बाहेर येत होत्या...

आणी समर्थांनी खाली फेकलेली ती माती अक्षरक्ष आग लागून जलत होती..

गबलूचे डोळे विस्फारले होते ..भीतिने तोंड बारीक झाल होत..जर त्याने त्या गेटला हात लावल असत तर? त्याच काय झाल असत?

" हिहिहिहिहिहीहीहीही..!"
कोठूनतरी थिल्लर , थेर उडवल्याप्रमाणे काळोखातून हसण्याचा आवाज आला.
" गबलू? मेनका? सावध रहा ! आपण मानवी
क्षेत्र मागे सोडत आहोत. आता इथुन पुढे पावलो पावली धोका आहे लक्षात असूद्या..! शक्य होइल तेवढ माझ्या सोबतच राहा .! काही अभद्र दिसल तर मला सांगा, त्याने बोलावल तर जाऊ नका, मागुन हाक आली..तर मागे पाहू नका, हाकेला - ओ देऊ का..! कारण हे क्षेत्र धोक्याच आहे..! " समर्थ गंभीर होऊन बोलत होते. दोघांनी होकारार्थी माना हळवल्या..

तो हसण्याचा आवाज काळोखातून कानावर येतच होता.

" मला कमी समजतोस काय? थांब तुला आता दाखवतोच .. "
समर्थ तोंडात पुटपुटले...गबलू मेनका दोघांनी मात्र ते ऐकल होत.

ह्या अश्या वेळेला समर्थ नवीन शक्ति वापरत असत , जे पाहायला ह्या दोघांना मोठी गंम्मत वाटत असे.
कालोखातुन ते हसण्याच आवाज अद्याप येतच होत.त्या हास्याचा अर्थ असा होता की तुम्ही माझ्या शक्तिसमोर काहीच नाही, क्षुद्र आहात तुम्ही..!
समर्थांनी उजव्या हाताची मुठ बंद केली.
डावा हात छातीवर आडवा धरला. बंद डोळ्यांआड तोंडातून फक्त दोन शब्द उच्चारले.

" जा ...तोड..!" त्या शब्दासरशी , गबलू - मेनका दोघांच्याही चेह-यावर एक लालसर रंगाचा प्रकाश दोन सेकंदासाठी पडला होता ..आणी लागलीच गायब ही झाला होता..

समर्थांच्या तर्जनीतल्या नखांच्या खालच्या बाजुने एक लालसर रंगाचा लेझर सारखा उर्जास्तोत्र..

" सूईईई.." आवाज करत ..
आतिवेगाने बाहेर पडलेला आणी ता गेटच्या लोखंडावर आदळला होता.

गबलू- मेनका दोघांनिही ते पाहिल होत.
समर्थांनी हळुच गेटवर हात ठेवल आणि अलगद दोन्ही झाप पूढे ढकळली...

" कर्र्रर्रर्रर्र ...कुई..कुई...कुई..!" आवाज करत
गेट आतल्या दिशेने उघडल होत..

गबलू- मेनका दोघांनिही एकमेकांकडे हसून पाहिल. गेट उघडताच कालोखातून तो हास्याचा आवाज यायचा बंद झाला होता. आणि एक गुरगूरण्याचा आवाज येऊ लागला होता.

" मेनका ? कधीही कोणाला कमी समजू नये.. नाहीतर अशी फजिती होते बर..!" समर्थ जरा मोठ्याने म्हंणाले. जणू त्या अदृश्य शक्तिला डिवचत असावेत.

गेटमागे सोडत हे तिघे पुढे आले..
समोर एक S आकाराचा रंगीबेरंगी ब्लॉकच्या फरशीचा रस्ता होता ...तो रस्ता हवेलीच्या दरवाज्यापर्यंत घेऊन जात होता. रस्त्याच्या डाव्या बाजुला कट केलेल्या गवताची बाग होती.
बागेत एक गोलसर लाकडी टेबल होत- टेबलाला चार खुर्च्या जोडल्या होत्या.
आणी टेबलापुढे एक झोपाळा होता.
चित्ता शेवटच्या आंतिम टप्प्यात येऊन पेटत असतांना जस मंद धुर बाहेर येत असत..
तस पांढरट धुक बागेत वाहत होत...

आकाशात वीज चमकताच तो पांढरट धुका
निळसर विषारी वायुसारखा दिसत होता.

बागेला मागे सोडून हे तिघे पुढे आले..तेव्हा त्या झोपाल्यावर एक कालसर आकृती बसली होती.


" कुई...कुई..कुइं..कुई..कुईं!" त्या स्मशान शांततेत झोपाळा पुढे मागे हळू लागला..

समर्थ कृणाल- गबलू, मेनका तिघांनिही वळून बागेतल्या झोपाळ्यावर पाहिल..त्याचक्षणी नजरेतून काहीतरी सुटल..होत.

झोपाळ्यावरून त्याने आपल बस्तान हालवल होत..आता

झोपाळ्याची रिकामी फळी फक्त हळतांना दिसत होती . .. बिन आवाजाच्या विजांच फेसाळत्या निळसर प्रकाशात सफेद रंगाचा तो रिकामा झोपाळा आपो- आप हलतांना दिसत होता..

xxxxxxxxxxxx


वेळ साडे आठ... (8:30pm)

महाप्रसाद बनवला गेला होता..सर्वाँची जेवण ऊरकली होती.
देऊळाभोवती आखलेल्या अंगा -याच्या रिंगणात गावातली सर्व लोक जमली होती.
आता वेळ आईच्या गोंधळाची झाली होती.

देऊळाच्या मधोमध पटांगणात पाट मांडला होता..त्या पाटावर स्वच्छ लाल रंगाच कापड टाकल होत. कापडावर धान्याची रास ठेवून त्यावर तांब्याचा कलश - आणी कलशावर नारळ ठेवला होता. कलशावजवळ विड्याच्या पानावर तुळजाभवनी मातेची मुर्ती ठेवली होती.
पाटाभोवती उसाच्या पाच ताटांचा मखर करून त्यावर फुलमाळ अडकवली होती...मखारात देवीचा घट मांडला होता.

पुजा मांडलेल्या ह्या जागेला चौक म्हंणतात.
ह्या चौकासमोर अंगात अंगरखा, कपाळावर हळद कूंकवाचा मळवट, गळ्यात कवड्यांची माळ असे गोंधळी जमले होते. गोंधळी म्हंणजेच देवीचे उपासक होय!

संबळ , तुणतुणे हे वाद्य घेऊन गोंधळी देवीच्या गोंधळासाठी सज्ज झाले होते.

आणी तोच वातावरणात देवी आईच्या
नावाच जयघोष झाला.

" तुळजाभवानीआईचा ssss उदो ,उदो..!"
.
" रेणुकाआईचाsss उदो ...उदो!"
आनिशा- आर्यंश दोघांसहितच गाववाल्यांनी सुद्धा उदो उदो करत साद दिली.

तो आवाज कालोखातल्या शांततेत ..दूमदूमन ऊठला.
.. मशाली- दिवट्यांच्या प्रकाशात ..
गोंधळाला सुरुवात झाली.. संबळ ..तुणतुणे वाजु लागले.


xxxxxxxxxxx


समर्थ कृणाल ..गबलू- मेनका , तिघांच्याही कानांवर गोंधळ सुरु झाल्याचा आवाज येत होता.

"गोंधळ सुरु झालंय!" समर्थ म्हंणाले.आणी तोच
हिंस्त्र श्वापद गुरकावा , तसा आवाज आला..

" गुर्र्रर्र्र्रर्रर्रर्र..गर्रर्रर्र..!"
कालोखाच्या पिंज-यात न जाणे काय लपले होते?
जे ह्या तिघांना निळसर चकाकत्या नजरेने पाहत होत.

समर्थ कृणाल , मेनका ,गबलू तिघेही हवेलीच्या दरवाज्यापासून जेमतेम तीस पावळे दुर होते..
त्या तिघांपासून जरा पुढे वीस पावळांवर - बारा फुट उंचीवर हवेलीचा पहिला मजला होता..आणि त्या पहिल्या मजल्यावरची एक बाल्कनी दिसत होती..


त्या बाल्कनीतच नहरपंतांचा मृत प्रेताड आत्मा अवतरला .. !

त्या प्रेताच्या पुर्णत छातीपासून ते डोक्यातल्या गांधी टोपीपर्यंत लालसर रंगाचा अमानवीय प्रकाश पडला होता..
डोळ्यांतले घारे चिंचोळे डोळे चकाकत होते.
ह्या तिघांवर संतापाने खिळले होते.
त्यांच्या चेह-यावर संतापजनक भाव होते.
जणु त्यांना समर्थांची उपस्थिती आपल्या
ह्या जागेत आवडली नव्हती.

समर्थांच्या शक्तिने अमानविय लहरींची त्यांना चाहुल लावून दिली..तस समर्थांनी लागलीच वर पाहिल ...


लालसर फेसालत्या प्रकाशात ते ध्यान उभ होत.
उभट चेहरा , जाड भुवया, आणी त्यांखाली बारीकसे घारे चिंचोळे डोळे, आठच्या आकड्याच नाक होत, तोंड वाकड करून ते दात चावत कुत्सिकरीत्या समर्थांकडे पाहत होते.

त्यांच्या अंगावर सिल्कचा पांढरा सदरा, आणी त्यावर चौकलेटी कोट होता. आणी खाली पांढरट दोन झापांच धोतर होत. पायांत चामड्याच्या चपली होत्या.

" पंत?" समर्थ पुटपुटले.

त्या ध्यानाच्या कानांनी तो आवाज ऐकला.

" हो मीच ! " तारस्वरातला , खर्जातला आवाज.
गबलू मेनका दोघांनी सुद्धा वर पाहिल.

" हो मीच नरहरपंत, ह्या जागेचा , या हवेलीचा , , ईथे असलेल्या सर्वाँचा मालक... !माझ्या परवानगी शिवाय इथून झाडावरच सुकलेल पान ही खाली पडत ,नाही. आणी तू? माझ्या बिना परवानगीने ईथे आत आलास..? तुझी इतकी हिंम्मत कशी झाली- भटूरड्या..? तुला माहीती नाही मी कोण आहे, माझ्या शक्तिचा अंदाज नाही तुला, माझ्या नांदी लागू नकोस , नाहीतर तुझ वाटोळ करीन, मृत्युची भिक मागशील..!
मरण दे ..मरण दे म्ह्ंणून माझ्या हाता पाया पडशील.
म्हंणून आधीच सांगतो आहे.. माझ्या रस्त्यात येऊ नकोस, चालता हो इथून आल्या..पावळे मागे जा , निघ..निघ इथून.. ! " नरहरपंतांनी समर्थांना धमकीवजा चेतावणी दिली.

न जाणे समर्थांनी अश्या कित्येक धमक्या ऐकल्या होत्या..आणी गंमत म्हंणजे हे की त्यांना त्या किती ह्या ठावूक ही नव्हत्या.

" पंत !" समर्थांचा आवाज शांत सरळ होता.
" तुमच्या बोलण्यावरून तुमच रूबाब , गर्व, अहंकार, दिसून येत आहे..नक्कीच तुम्हाला अमरत्व प्राप्तीची भुक दिसतीये..! तुमच्या डोळ्यांत मला मरणानंतरही अतृप्त वासनेचा अंश दिसत आहे .
खैर ते सोडा...हे पहा पंत जे झाल ते झाल, तुम्ही जे पाप केले आहेत- ते सगळ तो परमार्थ विसरेल..फक्त तुम्ही मला स्वाधीन व्हा मी तुम्हाला मोक्ष मिळवून देइल..!"
समर्थांची हीच सवय खुप चांगली होती..की ते
वाईटाहून वाईट मांणसाला ही सुधारण्याची एक संधी देत असत !

त्यांच्या त्या वाक्यावर पंतांच्या चेह-यावर जरासे
प्रश्नार्थक, आश्चर्यकारक, भीतीमय भाव उमटले होते..पन तो अहंकार, गर्व होता तसंच होता.

पंतांना एवढ कळून तरी चुकले होतेच..हा माणुस काहीसाधारण आसामी नव्हेच ? त्यांच्या चेह-यावरच तेज पंतांना समर्थांच्या अखंड शक्तिची जाणिव करून देत होता.

" अरे ह्याट!" पंत उर्मट स्वरात म्हंणाले.

" ठरकी साला..! " मेनका दात खात हळुच पुटपुटली.

" काय..? काय...? वाकड करशील तू माझ .. मला मोक्ष मिळवून द्यायला तुझ्या सारखे छप्पन आले आणि असे मेलेले निघुन गेले." पंतांच्या वाक्यावर समर्थ जरासे हसले.

" काय करीन पहायचं तुला.?" समर्थ शांत स्वरात म्हंणाले.


पंत गर्व , अहंकाराच्या नशेत ते बुडाले होते.
पंतांना समर्थांची शक्ति ठावूक नव्हती.
समर्थांनी उजव्या हाताची मुठ बंद केली..
मग तीच मुठ कपाळावर ठेवली...
तोंडातून हळू स्वरात मंत्र पुटपुटले.

मग झटकन तो उजवा हात कपाळावरून काढत खाली आणला..वेगाने झटकला
त्याचक्षणाला त्या हाताच्या तळव्यातून निळसर ,लाल,पिवळ्या, आकाशी रंगाची एक विद्युत लहरींची एक चाबूकसारखी जाडजुड दोरी
' सटक..' आवाज करत बाहेर पडली..


समर्थांनी तीच दोरी पुन्हा एकदा झटकली..आणी थेट ती चकाकती विद्युत सप्तरंगी दोरी नरहरपंतांच्या आत्म्याच्या दिशेने सोडली...

त्या प्रकाशीत विद्युत लहरींच्या दोरीने
नरहरपंतांच्या गळ्याला सापासारखा विळखा घातला..

" अहंह्न्ह्ंर्घ्र्गरर्र्र्र्र !"
नरहरपंतांच सर्व आत्मा चलचळ काफू लागला होता.
ख-या अर्थाने त्या आत्म्याला आता समर्थांची शक्ति कळली होती..

आणी आता त्यांना भीती वाटत होती.
" काय करीन, काय करीन म्हंणत होतास ना ?"
गबलू मोठ्या ऐटीत बोलू लागला.
" तुझ्या आत्म्याची राख करीण, तुझी चांमडी लोळवेण आता मी ! "

" तू ?" मेनका पटकन म्हंणाली.

" गबलू- मेनका!" समर्थांचा मध्येच आवाज आला.
" तुम्ही दोघे जरा शांत रहाता का!"
दोघांनिही जीभ चावली.

समर्थांचा तो उजवा हात ज्या हाताच्या पंज्यातून विद्युत शक्ति स्तोत्राची एक रंगीबेरंगी प्रकाशीत जाडजुड दोरी निघाली होती तो तसंच वर धरलेला होता.

" बोला ? मोक्ष प्राप्ती हवी आहे ? की कायमचंच नरकात शिक्षा भोगर रहायचं आहे ?"
नरहरपंत चलचळ काफत होते.

" मला ...मला ... आधी सोड....मग ..सांगतो !"


" सोडू? कशाला ? पळायला !"
समर्थ म्हंणाले.

" नाही....मी नाही पळणार, वचन देतो मी !
बस्स मला सोड. मी मोक्ष प्राप्तीसाठी तैयार आहे .. !"

" अस म्हंणता , पंत ! बर ठीके ! सोडतो तुम्हाला.. !" समर्थांनी अस म्हंणतच ती शक्ति
पुन्हा माघारी घेतली.

" हिहिही..हिहिहिहिही..! "
शक्तिस्तोत्र माघारी घेताच नरहरपंत अर्ध-पुरुषी आणि अर्धे लहान मुलाच्या आवाजात हसले.

जागेवरच त्यांचा आत्मा काळ धुर उडवर नाहीसा झाला !

" समर्थ तो पळाला?" मेनका

" कृणाल त्याला सोडायलाच नको हव होत."
दोघेही टेंशनमध्ये येऊन म्हंणाले.
पन समर्थ मात्र गालात हसत होते.

" गबलू? मेनका? हे पंत तर फक्त ह्या खेळाचे बाहूले आहेत..! खरा सुत्रधार तर आत हवेलीत लपला आहे ..जो ह्या सर्वाँचा धनी आणि ह्या सर्वाँपेक्षा शक्तिशाली आहे. एकदा का सुत्रधार पकडला गेला..की मग ख-या अर्थाने विजय आहे..! "
समर्थ म्हंणाले.

आणि हवेलीच्या बंद दरवाज्याच्या दिशेने निघाले.

xxxxxxxxxxxx

" अहंम ...क्रव ,क्षुद्र्ंम ..तैस्य्ंम ..मृत्यंम्हं ..!"
रघुवीररावांचे काजळ घातळेले डोळे बंद होते .
तोंडातून जसा हा मंत्र बाहेर पडला , तसे आकाशात
विज कडाडली आवाज झाला..

" धडाड ..!"

समर्थ हवेलीच्या दरवाज्याजवळ उभे होते .
तोच हा विजेचा आवाज ऐकून त्यांच्या शरीरात ताठरता आली..चेह-यावर गंभीर भाव पसरले होते.

त्यांच्या बुद्धीला ह्या विजेचा आवाज एक सुचना देऊन गेला होता..नक्कीच कोणतीतरी प्राचीन , अघोरी ,तामसी, शक्ति कार्यरत होत होती.
ह्या पृथ्वीवर तिला आमंत्रण मिळत होत.

" याहीस्थें, आगमानाहें..काळी चंन्ड़किं, यदां, माहें..बवतूं भठ...स्वाहांssss!"
बसल्या बसल्या अस्व्थेतच रघुवीररावांच सर्वशरीर थरथरू लागल..

हात-पाय , डोक , सर्वच्या सर्व शरीर काफत थरथरत होत..

आकाशात विजांनी थैमान घातला होता.
विजांचा निळसर प्रकाश सर्वदिशा ऊजळून टाकत होता.

देऊळाबाहेर गोंधळाला जमलेले गावाकरी भयबीत
नजरेने दोन किलोमीटर अंतरावर , डोंगरावर असलेल्या पंतांच्या हवेलीकडे पाहत होते.
हवेलीच्या शेवटच्या तिस-या मजल्यावर काळभोर धुक्याचे ढग साचले होते आणि त्या काळ्या ढगांच्या धुक्यातून वाकड्या तिक्ड्या विजा लकाकत होत्या..

देवी आईचा गोंधळ थांबला होता ..भयबीत गोंधळी त्या हवेलीकडे भीत पाहत होते..सैतानाचा नंगानाच सुरु झाला होता.

" हो गोंधळी दादा, काय बी झाल तरी गोंधळ थांबू नका ! ही येळ आता..थांबायची नाय , बिल्कुल थांबायची नाय , करा सुरु .! " प्रसादराव म्हंणाले. आणी गोंधळाला पुन्हा सुरुवात झाली..

xxxxxxxxxx

समर्थांनी खाडकन हवेलीचा दरवाजा उघडला.
हॉलमध्ये एकही दिवा जळत नव्हता, सर्वदिशेना अंधार चिकटला होता. ही शांतता भयाण जिवघेणी होती.
हवेलीतल्या हॉलमध्ये प्रवेश करताच ..
समर्थांच्या कानांवर तो आवाज पडू लागला..
मोठ-मोठ्याने मंत्र पठण करण्याचा आवाज..
आणी समर्थांना हे सुद्धा कळाल की हे मंत्र
आंतिम टपप्यातले आहेत. कोणत्याही क्षणी हस्तकाला शक्ति प्राप्त होइल..

" विध्हिंम..पूर्णंहिंत्ं..बल्हिंंन अर्पिली...अहंम...अहंकार..सर्वंंहंम..शक्ति स्तोत्रे..देंहम..भट..भठ ..... स्वाहाssssssss..!" ...
रघुवीररावांच्यास मुखातून शेवटचा मंत्र बाहेर पडला..

समोर लालसर रंगाच्या आगीवर हवेत तरंगत असलेला इरूल ग्रंथ ,त्या ग्रंथाची दोन्ही कव्हर झपकन बंद झाली.. आणी त्या ग्रंथाच्या पृष्ठभागावर असणारा
तो अघोरी पंजा, आणी त्या अघोरी पंज्यावर असलेला तो निळसर माणिक हलू- हलू पेटू लागला .
जशी डीम लाईट पावर मिळताच लक्खपणे चकाकते तसा तो झपकन निळसर अघोरी प्रकाशकिरणे बाहेर फ़ेकत चकाकला...

त्या पंज्याच्या पाचही बोटांची अमानविय हालचाल झाली..त्या पृष्ठभागावरून तो पंज्या टूणकन उडी मारून बाहेर पडला.. पाच बोटांच्या धारधार स्टीलच्या नखांवर तुरु तुरु.. चालत..रघुवीररावांच्या उजव्या हाताच्या दिशेने आला आणि झपकन त्या पंज्याने रघुवीररावांच्या हातावर उडी घेतली..
गरम पेटलेली प्लास्टीकची पिशवी हातावर पडावी आणि तो जळणारा प्लास्टिक हाताच्या चामडीला चिटकावा तसा ती अघोरी अखंड अमानविय शक्ति
असलेला पंजा रघुवीररावांच्या हाताला चिकटला..

एक तीव्र सणक..हातातून मेंदूत घुसली..

" आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह अह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!
रघुवीर मुळाच्या देठापासून गुरासारखे ओरडले..
तो आवाज पुर्णत हवेलीत घुमला.. हॉलमध्ये उभ्या समर्थ, मेनका, गबलू तिघांच्या कानांवर पडला.

" आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह...अहह्ह्ह्ह्ह..!"
प्रथम ओरडण्याचा आवाज येत होता..

मग जशी जशी ती वेदना कमी झाली..
तो स्वर बदल्ला..

" हह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्झ्ह...ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ज!"
अघोरी , आसुरी हास्याचा आवाज येऊ लागला.
उभी हवेली त्या आवाजाने थरथरून ऊठली..
आकाशात विजांनी अक्षरक्ष रौद्ररूप धारण केल..निसर्ग हादरून उठला..

" समर्थ हा आवाज!"

" हस्तकाला शक्ति मिळाली आहे मेनका !"
समर्थांचा आवाज गंभीर होता.

ह्या परिस्थीतीचे गांभीर्य त्यांच्या नुसत्या आवाजाने कळुन येत होत..

" मग आता काय करायचं समर्थ! "

तिच्या त्या वाक्यावर ह्या अशा परिस्थीत सुद्धा समर्थ जरासे हसले व म्हंणाले.
" प्रयत्न !कारण हार मानणे माझ्या रक्तात नाही. एकवेळ लढुन हारेण, पन माघारी फिरणार नाही..! काय?"

समर्थांच्या वाक्यावर गबलू- मेनका दोघांच्या अंगात जोश निर्माण झाला.


xxxxxxxxxxx

रघुवीर जागेवर उभे राहीले..त्यांच नव रुप पाहू लागले.

त्यांना त्या अघोरी शक्तिमार्फत एक आसुरी दैत्याचा रुप मिळाल होत.

त्यांची उंची सामान्य मानवापेक्षा उंच .म्मसहाफुट उंच झाली होती- चेहरा विचीत्र रुपासहित अवतरला होता.. कपाळ जरास मोठ झाल होत.

बिन भुवयांचे डोळे निळसर कचकड्याचे काचेचे झाले होते.. त्यात कालसर मीरीचा ठीपका होता..
नाकाच हाड तुटल होत..त्या जागी फक्त दोन रिकामे होल होते.. काळसर ओठ होते.. तोंडातल्या दातांना कालसर कोलश्या सारखा रंग प्राप्त झाला होता ..
ज्या तोंडातून काळसर चिपचिपीत विषारी एसिड सारखी लाळ गलत होती. हनुवटी जराशी पूढे आली होती..
हात,पाय, पुर्णत देहयष्टी काळ्या पाषाणी दगडासारखी फुगली धिप्पाड झाली होती.
पोटावर सिक्स पैक उगवळे होते, हाताचे स्नायु फुगीर बळदंड झाले होते..पन ह्या सर्वाँत त्यांची चामडी काळी,चौकलेटी, झाडाला वाळवी लागल्यावर खापर निघते तशी पडली होती... घृणास्पद, गळीच्छ, अभद्र रुप त्यांना मिळाल होत . आणी त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर तो अघोरी पंजा होता..त्याची लांबसडक बोट आणि ती लोखंडी धारधार पातीची नख वाकडीतिकडी हळुहळू फिरत होती . .मागे असलेला तो माणिक निळसर प्रकाश किरणे फ़ेकत चकाकत होता.



" रघ्या..! " नरहरपंतांच आवाज आला.

तसे दैत्यात बदललेल्या रघुवीररावांनी
मागे वळून पाहिल..त्यांच ते रुप पाहून नरहरपंतांच्या ओठांवर आसुरी हास्य आल..

" वाह..असीम अखंड शक्ति..! पन मला ?माझ काय?" नरहरपंत म्हंणाले. त्यांचा वाटा अद्याप त्यांना मिळाला नव्हता

" मिळेल... लवकरच तुम्हाला तुमचा वाटा मिळेल..!" रघुवीररावांचा करडा आवाज आला.
" पन त्याआधी मला एक किशोरवयीन मुलगा आणि मुलीचा बळी हवाय ! त्या दोघांच्या रक्ताने ह्या अखंड अघोरी शक्तिच्या पंज्याला अंघोळ घालायचीये..मला..- कारण हा रक्त मगतोय ..रक्त मागतोय..हा!"
रघुवीररावांच्या दोन्ही बलदंड हातांना हळकेच एक
सरळ रेषेत भेग पडली आणि त्यातून झपदीशी तपकिरी रंगाचे पंख बाहेर आले..

" पंत? " रघुवीररावांनी नरहरपंतांकडे छद्मी हसत पाहत पाहिल..

" हवेलीत पाहूणे आलेत, त्यांच एडकाला सांगून स्वागत करा ,जरा वेळ त्याच्याकडून मेहमान नवाजी
करा.. मग मी येतोच आहे..!"

ऊजव्या बाजूला भिंत होती... रघुवीररावांनी थेट त्या भिंतीवर उडी घेतली- त्या अमानवीय ध्यानाच्या पौलादी शरीरयष्टीपुढे ती चुन्या मातीची भिंत काय चीज होती? भिंतीचा क्षणात भुगा झाला..आणी ते ध्यान पंखांवर उडत गावच्या दिशेने निघाल..


xxxxxxxxxxxxxx

11:30 pm...


देऊळात देवी आईच गोंधळ शेवटच्या टप्प्यात आल होत. पुरुष बायका -पोर, म्हातारी मांणस सर्वजन हात जोडून देवीआईकडे पाहत उभी होती.

आकाशातून विजांचा सुळसूलाहाट वाहत होता. नकारत्मकता, उदासीनता, मनावर असुखाची मलभ पसरवत होती.
आईदेवीचा घट जिथे बसवला होता.
त्या पुढे गोंधळी हातात पेटती दिवटी घेऊन उभा होता.

" शेवटच आव्हाण करतो आई तुझ, ह्या गावात ये, ह्या तुझ्या लेकरांना तुझी ..जाम गरज हाये..! कलियुगातला आसुर तुझ्या लेकरांच्या जिवावर ऊठलाय..आई.. आता गोंधळाला ये .आई...गोंधळाला ये ."

तोच...

संबळा- तुणतुणे वाजू लागले.. दिवटी नाचू लागली...


xxxxxxxxxxxx
पंतांची हवेली..

समर्थ हॉलमध्ये उभे होते... त्यांच्या आजुबाजुला सोफा ,टिपॉय, चेयर्स, नाना त-हेच्या वस्तू होत्या.
सर्व निर्जीव वस्तु होत्या- पन आज आता ह्याक्षणाला..
त्या वस्तूंच्यात जणू जिव आला होता.

हॉलमध्ये मधोमध हे तिघे उभे होते.
आणी ह्या सर्व निर्जीव वस्तु जणू ह्या तिघांना रोखून पाहत होत्या.

समर्थ एकाचजागेवर शांत उभे राहून डोळे आजुबाजूला फिरवत होते. अंधारात नजर जाताच काहीतरी वेगान जागा बदलत होत. पन समर्थांची दृष्टी
भ्रमित होणा-यांमधली नव्हती.

" कृणाल मला कसलीतरी आवाज येतोय !"
गबलूच्या सशासारख्या कानांना कसलातरी आवाज येत होता.

' चक..चक.चक..!' कोणीतरी नट बोल्ट फिरवून फिरवून काढ़ावा तसा आवाज होता तो.

" कसला आवाज येत आहे गबलू?"
मेनकाने विचारल.

" नट बोल्ट काढल्यासारखा !"
गबलूने जस हे वाक्य उच्चारल.

त्याचक्षणी सेकंदाच्या काट्यागणीक समर्थांचे डोळे विस्फारले..झटकन त्यांनी मान वर करून पाहिल..

ह्या तिघांच्या डोक्यावर बारा फुट उंचीवर काचेचा झुंबर लटकत होता..आणी त्या काचेच्या झुंबरावर ते काळ्या कावळ्यासारख झब्बा घातलेल ध्यान(एडका) बसल होत.

गोल चेह-याची.. पुर्णत त्वचा पांढरी फ़ट्ट,
पिवळेजर्द डोळे, त्यात - मीरीचा ठिपका, सश्यासारखे टोकदार कान, आणी ते बूता-यासारखे धारधार दात..

जबडा विचकत ते हसल...
आणी तो काळसर धुर उडवत गायब झाला..
जस तो गायब झाला..वर लटकलेला तो काचेचा झुंबर, सुटला..हवेतून मृत्यु खाली येऊ लागला..


गबलू- मेनका दोघांचे भीतिने डोळे
बाहेर आले..मणका थंड पडला..पाय रबराचे झाले.
वेळ - काळ गोठला , सर्वाँच्या हाळचाली मंदावल्या....

काचेचा तो झुंबर काचांच खळखल आवाज करत खाली आला.. (बाराफुट, अकरा फुट, दहाफुट ,नऊ फुट, सात फुट , सहा फुट ) पाहता झुंबराने अंतर गाठल आणि ह्या तिघांच्या डोक्यापासून चार फुट उंचीवर येऊन ठेपला..तोच

समर्थांच्या उजव्या हाताची हालचाल झाली..
हाताच्या तलव्यातून हजारो शक्तिस्तोत्र बाहेर
पडली..
लहान- लहान चमकीली तांबडसर निखा-याच्या धुळीकणांनी..
भगव्या रंगाचा एक गोलसर थाळीसारख्या आकाराचा प्रकाशीत कवच ह्या तिघांच्या डोक्यापासून दोन फुट उंचांवर तैयार झाला ..आणी वरून येणारा तो
अवाढव्य काचेचा झुंबरी राक्षस कवचावर आदळला..

झुंबराच्या काचांचा खळ- खळ आवाज होत..तो फुटला.. लहान - लहान काचा अवतीभवती भिरकावल्या गेल्या...

भगव्या वर्तुळाकार कवचावर अद्याप काही काचांचे मोठाले तुकडे उपस्थीत होते.. जे समर्थांनी
कवचासहित दुर भिरकावल्या.. ! पुढील भिंतीवर जाऊन कवच फुटला..आणी त्या काचा खाली पडल्या..

" तुम्ही दोघेही ठिक आहात?"

" मी पाहिल त्याला!" समर्थ बोलू लागले.
" एडका नामक सैतानी देव आहे हा- खुपच शक्तिशाली.. आहे.. या त्याला कैद करूयात ..!"
समर्थ आपली शोधक नजर अवतीभवती फिरवू लागले.

" शक्यतो माझ्याजवळ आसपासच रहा!"
समर्थ म्हंणाले.

अंधा-या कालोखात काळोख्या सावाल्यांची हालचाल होत होती. " आपन दुस-या मजल्यावर जाऊयात, चला ? " समर्थ म्हंणाले. पण हे काय ? मेनका गबलू दोघांचा होकार का येत नव्हता?
समर्थांनी मागे वळून पाहिल मागे गबलू मेनका दोघेही उस्प्थीत नव्हते!

" अरे देवा ! कुठे गेले हे ?" समर्थ काळजीच्या सुरात म्हंणाले.

" हीहिहिहिह..भटा !"

समर्थांच्या पुढून घोगरा , खर्जातला आवाज आला. त्यांनी वळून पुढे पाहिल.. समोर तो सैतान दात विचकत पिवळ्या डोळ्यांनी त्यांनाच पाहत होता.
तोच त्याने आपल्या धारधार पंज्यांनी समर्थांच्या छातीवर धक्का दिला..

समर्थ हवेत उडाले चार फुट मागे जाऊन भिंतीवर आदळले..

" हिहिहिहिही..हिहिहिही मला..मला पकडणार तू ?" ते ध्यान हाताच्या टाळ्या वाजवत जागेवर उड्या मारत होत.

समर्थांच्या पाठीला जराशी वेदनी होत होती...पन मार इतकाही लागला नव्हता.ते जमिनीचा आधार घेत जागेवर उभे राहिले.
पिवळ्या डोळ्यांनी ते समर्थांकडे कुतूहळाने पाहत होत. जस एक लहान मुल नव्या को-या खेलण्याला पाहत तस..
" तूझी हाड अशी खिळखिळी करतो , की मसाल्यात (रक्तात)बुडवून कट कट आवाज करत खाईन.! खिखिखिखिखी..!"

" अस म्हंणतोस ? " समर्थांचा आवाज मोठा होता. "ये मग !" आताचा आवाज हळूवार होता.
" यहह्हह्ह्ह्ह!" त्या ध्यानाने घशातून एक चित्कार काढला.

जागेवरूनच एक अमानवीय झेप ...
हवेतच त्याच्या खाकेतून दोन काळसर पंख
उघडले उजव्या हाताची धारधार पौलादी नख असलेली मुठ त्याने जराशी वर केली..

हवेतून ते वेगाने खाली आल...
खाली येताच दोन्ही पंख मिटले.. वर नेहलेला हात तिप्पट वेगाने खाली आणत समर्थांवर उगारण्यास पुढे आणला तोच समर्थांनी स्वत:ला वाचवल - ते खाली झुकले ..

धारधार पंज्याचा वार भिंतीवर झाला ...क्षणात भिंतीमध्ये एक खड्डा पडला.!

जर भिंतीजागी समर्थ असते तर? बापरे!
काळीजच बाहेर काढल असत त्या ध्यानाने..

समर्थ जरा दूर आले.
पुन्हा सावध पवित्रा घेतला..! समर्थांना कळून चुकल होत , हा एडका फार शक्तिशाली आहे...
आता ह्याच्याशी दोन हात करायचे असतील..
तर तेवढीच शक्ति आपल्याकडेही असायला हवी.


xxx xxxxxxxxx

एका रुंद गल्लीतून मेनका - गबलू दोघेही चालत निघाले होते. त्या दोघांचे पुढे समर्थांची फसवी आकृती चालत होती.

आजुबाजुला कालोखी अंधार होता..किरकिर आवाज कानांवर पडत होता..त्यात एक भयप्रद शांतता पसरली होती.

" कृणाल. तू एडका बद्दल सांगत होतास आणि अचानक ह्या गल्लीत का शिरलात , तुला कसली चाहूल लागली का ? " गबलूच्या वाक्यावर ..

" हा ..!" एक औपचारीक होकार आला.
पन तो आवाज दर वेळेसारखा ओळखीचा नव्हता..
आणी हे काय, नेहमीचंच ताठ चालणारे समर्थ असे म्हातारल्यासारखे मणका पाठ वाकवून का चालत होते. गबलूला हे ठावूक होत.. समर्थ कृणाल हे असे एका म्हाता -या मांणसासारखे चालत नसत.

" मेनका!" गबलूने आवज दिला.

" काय ?" ती म्हंणाली.

" हा कृनाल नाहीये..!" गबलूचा काफरा स्वर.

" कायssss?" तीने झटकन वळून समोर पाहिल.

×××××××××××



पुर्णत गावकरी हात जोडून उभे होते.
आईच गोंधळ शेवटच्या टप्प्यात आला..होता.
तपकीरी मातीवर सफेद रंगाची राख सरळ ओढलेली दिसत होती.

त्याच राखेबाहेर आकाशातून - दोन पक्ष्याच्या धारधार टोकदार पावळांचे पंजे आकाशातून जमिनिवर आले... ती सडलेली, कातडीची, धारधार नख असलेली बोटांची दोन पावळे जशी जमिनिवर आदळली.. खालची तपकीरी माती आणी ती अंगा-याची राख हवेत उडाली..

गावातल्या एका बाईला कसलीतरी चाहुल लागली म्हंणून तीने मागे वळून पाहिल..ते अभद्र,कूरूप, भयानक रुपाच ध्यान पाहून त्या बाईने दोन्ही हात कानांवर ठेवून एक किंकाळी फोडली..

" आssssssss...!"
अंगा-याच्या वर्तुळाकार कवचात उभ्या सर्व गावक-यांच्या माना एकाचक्षणी मागे वळल्या..


किंकाळ्याचा आवाज घुमू लागला..
भीतिचा बार फुटला गेला...

आनिशा- आर्यंश दोघांनिही एकमेकांकडे भयभीत नजरेने पाहिल..

" अरे माझ्या देवाssss!"
आनिशाच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला..

" थांबा गावक-यांनो , घाबरू नका !
ह्या रिंगणात आपण सर्व सेफ आहोत ,
कोणिही बाहेर जाऊ नका !" आर्यंश ओरडून म्हंणाल.

त्याच्या त्या वाक्यावर रघुवीरराव जे असुर राक्षसात बदल्ले होते.. ते खांदे हळवत हसले..

आणी त्यांनी झप आवाज करत आपले दोन्ही पंख उघडले..

आनिशा- आर्यंश, गावकरी सर्वच्या सर्व लोक
डोळे फाडून समोर पाहत होते. त्या सर्वाँसाठी हा फार मोठा अघोरी चमत्कार होता.

" झप...झप...झप..!" आवाज करत
ते दोन पंख वेगाने हळवू लागले.. त्या पंखाने खाली आखलेला अंगारा माती सहित हवेत उडाला..रिंगण पुसल होत.

निळसर कचकड्याचे डोळे दाखवत...
जबडा विचकत ते ध्यान सर्व गावक-यांकडे पाहून अक्राळविक्राळ आसुरी हास्य करत हसल..

" यह्हह्य्हौअह्हहह्य्य्यू!"
पक्ष्याच्या पावळासारखा तो नांग्यांचा पाय त्याने रिंगणा पुढे टाकला...

" आssssss.., पला..सैतान आला..पला..!"
बायका- पुरुष वयस्क जीव मूठीत घेऊन धाऊ लागल्या . जो तो पळ काढु लागला..जि मिळेल ती वाट पकडू लागला.

एक- दोन मांणस त्या सैतानाच्या हाती सापडले सुद्धा होते .

त्यांचे शरीर त्याने कापुस विलग कराव तस शरीराचे दोन भाग केले होते

" आनिशा , आनिशा..पळ..! मला वाटतंय तो आपल्याच दिशेने येत आहे !" आर्यंश म्हंणाला.

" नाही..मी तूला सोडून जाणार नाही..! "

" आनिशा , हे बघ विचार करू नकोस! जस्ट लिव.. फ़ास्ट..!"

" नो ..! मी नाही जाणार तुला सोडून..!"

" आनिशा !" त्याने आपल्या हाताच्या ओंजलीत
तिचा ह चेहरा धरला.

" तुला माझ्या पेक्षा चांगला जोडीदार मिळेल ना यार.! पन प्लीज जा तू, ही गाडीची चावी..घे!"
त्याने गाडीची चावी तिच्या हाती सोपवली..

" जा !" तो म्हंणाला.
आणि तोच तिने चावी दुर कुठे तरी फ़ेकली..
" अनु...? " तो तिच्यावर ओरडला.

" तुला हव तेवढ ओरड!" तिचा आवाज जड झाला होता. डोळ्यांत पाणी जमा झाल होत..

" तुला मारायचं असेल तर मार मला, पन तुला सोडून नाहीरे जाणार मी" तिने आपल्या नाजुक हात त्याच्या गालावर ठेवले

" आता तू ही मला सोडून गेलास तर आता माझ इथे कोण उरणार आहे रे...! मी ईथे एकट कोणासाठी जगू.. ? आणि तुझ्याशिवाय माझ्यात मनात कोणिही नाही.! "
तिच करून स्वर, तीचे ओळावलेले डोळे
आर्यंशला राहावलच नाही..त्याने गच्चकन तिला मीठी मारली.. त्याचाही नकळत हूंदका बाहेर पडला..

" माझ खुप प्रेम आहे रे तुझ्यावर ,मरायचं ना , तर एकत्रच मरू ! " ती त्याच्या छातीवर डोक ठेवून म्हंणाली.

" हिहिहिहिही!" अचानक त्या दोघांनाही मागून खर्जातला हास्याचा आवाज आला.
आर्यंशच्या- काळजात धस्स झाल.
दोघांचिही मीठी सुटली दोघांनिही वळून मागे पाहिल..

सामान्य मानवापेक्षा उंच सहाफुट उंच - चेहरा विचीत्र रुपासहित अवतरलेला.. कपाळ जरास मोठ झाल होत.

बिन भुवयांचे डोळे निळसर कचकड्याचे काचेचे झाले होते.. त्यात कालसर मीरीचा ठीपका होता..
नाकाच हाड तुटल होत..त्या जागी फक्त दोन रिकामे होल होते.. काळसर ओठ होते.. आणि तोंडातल्या दातांना कालसर कोलश्या सारखा रंग प्राप्त झाला होता .. तेच दात दाखवत रघुवीरराव दोघांकडे पाहून हसत होत. तोंडातून काळसर चिपचिपीत विषारी एसिड सारखी लाळ गलत होती. हनुवटी जराशी पूढे आली होती..
हात,पाय, पुर्णत देहयष्टी काळ्या पाषाणी दगडासारखी फुगली धिप्पाड झाली होती.
पोटावर सिक्स पैक उगवळे होते, हाताचे स्नायु फुगीर बळदंड झाले होते..पन ह्या सर्वाँत त्यांची चामडी काळी,चौकलेटी, झाडाला वाळवी लागल्यावर खापर निघते तशी पडली होती... घृणास्पद, गळीच्छ, अभद्र रुप त्यांना मिळाल होत . आणी त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर तो अघोरी पंजा होता..त्याची लांबसडक बोट आणि ती लोखंडी धारधार पातीची नख वाकडीतिकडी हळुहळू फिरत होती . .मागे असलेला तो माणिक निळसर प्रकाश किरणे फ़ेकत चकाकत होता.

" आनिशाsssss!" हळूवार घशातून रघुवीररावांनी तिला हाक दिली.

" अ..अ....अप्पा..! " ती काफ-या स्वरात म्हंणाली.

रघुवीररावांनी फक्त मान होकारार्थी हळवली.

" अप्पा..आम्हाला जाऊ द्या..! आम्ही..तुमच काय बिघडल आहे ओ अप्पा..! आई-बाबांनाही मारलत ना तुम्ही..! बाबा तर तुम्हाला सक्ख्या भावा पेक्षा जास्त मानायचे, आणि आई ? आई तर तुम्हाला भौ मानायची ना ? मग तुम्ही असे का वागलात अप्पा..?"

" शष्स्सस्स!" ऊजव्या हाताच एक लोखंडी धारधार पातीच बोट त्याने कालसर ओठांवर ठेवल ....शुश्कारला.
" प्रश्ण नाही करायचे , काय? कारण मला उत्तरे द्यायला आवडत नाही..!" त्याच उजव्या हाताची हालचाल झाली..
बाजुला आर्यंश उभा होता.. रघुवीररावांनी त्याची नरडी पकडली..त्याला जमिनीपासून तीन फुट वर उचल्ल..

" अप्पा..अप्पा सोडा..त्याला.., अप्पा..! मी तुमच्या पाया पडते..!"
आनिशा डोळ्यांतून पाणि काढत हात जोडत विनवणीच्या सुरात म्हंणाली.

" सोडू.. ह्याला...? " खर्जातला आवाज..
" बर सोडतो.! " अस म्हंणतच रघुवीररावांनी
आर्यंशला कापसाच्या पोत्यासारख दुर भिरकावल, तो अक्षरक्ष दहा फुट उंच हवेत मागे उडाला आणि थेट देऊळाच्या पाषाणी खांबावर जाऊन आदळला.. त्याच्या पाठीच्या मणक्याला मुका मार लागला..तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर..पडली..

" आर्यंशssssss " आनिशा ओरडली....


xxxxxxxxx


समर्थ ..x एडका.. युद्ध


" तू माझ्यासमोर मुंगी आहेस क्षुद्र मानवा मी हा असा तुला माझ्या हाताने चेंगरील, तुझी हाड नी हाड चावून खाईन मी- खारमा बनवेल मी तुझ्या मांसाचा..मसाला..मसाला हिहीहिहि!"
एडकाच्या खाकेतून पुन्हा तेच ते काळ्या पिसांचे दोन पंख बाहेर आले.

" झप!" आवाज करत त्याने जागेवरून उडी घेतली .. !
.

सर्व शरीर वर हवेत उड़त होत..
मग पुन्हा त्याने समर्थांवर झेप घेतली.
ह्यावेळेसची झेप जराशी वेगवान होती..
एडकाचे दोन्ही धारधार पंज्यांनी समर्थांच्या पुर्णत शरीराला धक्का दिला.. पुन्हा ते हवेत उडाले.. एका लाकडी टीपॉयवर जाऊन आदळले....

समर्थांच्या वजनाने टिपॉयचे पाय तुटले जात
टेबल जागीच तुटला होता....

समर्थांना ह्यावेळेस जरासा मुका मारला लागला होता.

एडका हवेतून हळुच खाली दोन पायांवर येऊन उभा राहिला.. खांदे हलवत हसू लागला...

" ए भटा, कशाला उगीचंच त्या दगडाची चाकरी करत बसला आहेस , त्यापेक्षा मला क्षरण ये..! माझा दास बनवेण मी तुला, ह्या अंधाराचा हस्तक हो..! तुला अखंड शक्ति देइल.. मी! " एडकाचे पंख मिटले...


" दास? आणी तुझा? ह्हहह्ह्ह्! "
समर्थ जरासे हसले - त्यांच्या पांढ-या शुभ्र दातांवर
लाल रक्त लागल होत.

" हसतोस काय? मूर्ख झाला का ? मती फिरली का तुझी.. येडा झालास..!"

" हो तुझे शब्द ऐकून वेडाच झालो मी, कारण.. " समर्थ जरासे थांबले त्यांनी भुवया ताणून एडकाकडे पाहिल व म्हंणाले.

" अरे मी तर भक्त आहे त्याचा, ज्याच नुस्त नाव जरी घेतल..- तरी स्वर्ग प्राप्ती होते ... ( समर्थांनी दात चावले- हातातले दोन्ही रुद्राक्ष कडे भगव्या विस्तवधारी लक्खप्रकाशाने पेटून ऊठले.) आणी जर त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली..तर तुझ्यासारख्या सैतानाच अंत होतो.! "

" याह्ह्ह्हर्घ्र्घ्ह्र्घ्ग्र्ह...!" पुन्हा एडकाने विचीत्र चित्कार केला....

झप आवाज करत पंख उघडले..


××××××××××××××××

" मेनका , हा कृणाल नाही ! " गबलू म्हंणाला.

" काय पन हे कस शक्य आहे ?"

" अंग तूच बघ..ना कृणाल ताठ चालतो- आणी हा बघ? कस म्हाता-या सारख पाठीत बाक असल्यासारख चालत आहे ..! " गबलूच्या वाक्यावर मेनकाने समोर पहिल

समोरची आकृती म्हाता-यासारखी पाठीत वाकून चालत होती. कपडे मळलेले होते.

" कृणाल थांब ?" मेनकाने डाव टाकला.
ती कधीच समर्थांना अशी अरेतूरे करणार नव्हती.
नावावरून तर ती बिल्कुलच बोलणार नव्हती.

" मागे बघ जरा? " तिच्या वाक्यावर तो आकार जागीच थांबला.

" अरे मागे बघ ना कृणाल?"
समोरून कसलेही प्रतिउत्तर येत नव्हते.
समर्थांना जर कधी तिने काही विचारल तर ते हूंकार तरी भरत प्रश्नाच उत्तर देतच असत.

मेनकाने कोट मध्ये हात घातला..तीचा तो काळ्या चामडीच्या नागाचा चाबूक बाहेर काढला.

समोरच्या त्या ध्यानाला तिची ती चाहूल लागली..होती.

तोच गर्रकन त्याची मान 360 च्या अंशात फिरली.. तो नरहरपंताच आत्म होता..

" कशी फसवली हिहिहिही..!"
त्या ध्यानाचे पुढचे हात ' कट,कट, आवाज करत मागे आणले.. मग खालचे पाय वाकडे झाले..

" थांब आलोच.. .!" दोन्ही हत बाहुल्यासारखे उलटे मेनकाच्या दिशेने फिरले होते..पुढच शरीर सरळ होत..आणी पाय उलटे होते..त्याच बाहुलीसारख्या अवस्थेत ते ध्यान मेनकाचे दिशेने धावल..

फट्ट आवाज करत मेनकाने हातातल्या चाबकाच चपराक त्या ध्यानाच्या पाठणावर बसवला..

" आहह्हहाह..र्घ्द्र्घ्र्ह..!" अंगाची लाही लाही..झाली..पाठणातून गरम धुर निघाल..
मार बसताच पंत आपल्या मुळ रूपात आले..

" गबलू, ह्या म्हाता -याला मुक्ति द्यायची की
जैलमध्ये ठेवायचं? "

मेनकाच्या वाक्यावर गबलू दात विचकत हसला..त्याने खांदे उडवले व म्हंणाला.

" मुक्ति तर म्हातारा घेणार नाही? मग..?"
गबलूने मेनकाकडे पाहिल. मग ती हळुच म्हंणाली.

" गो टू हेल..! " तीने हातातला चाबूक जागेवरच हासडला.. त्याकाळ्या चाबकाच्या दोरीतून निळ्सर प्रकाश किरणे बाहेर पडली..जात टोस्कूले सुळ्यासारखे पाषानी काटे बाहेर आले..

त्या चाबकाला पाहून नरहरपंत जागीच गार झाले त्यांचा आत्मा चल चल काफु लागला..

" फट!" आवाज करत तीने चाबकाची फटकी त्यांच्या दिशेने सोडली..निळसर रंगाने उजलून निघालेल्या चाबकाच्या जाडसर दोरीने त्या आत्म्याला जखडल..

" सो नरहरपंत ..." मेनकाने खिशातून फोन काढला.. " एक शेवटची सेल्फी घेऊयात ..!"
गबलूने भुवया उडवल्या दात विचकत हसला.
दोघांनिही दोन बोटांची पोज देत नरहरपंतांसोबत एक सेल्फी घेतली.. मग फोन खिशात ठेवला.

" सो ..पंत..! हैप्पी जर्नी..!"

: " एं..!" पंत न समजून म्हंणाले.

" अरे यार , ह्या म्हाता-याला इंग्लीश येत नाही सांगरे ह्याला..गबलू.."

" हिहिहिहिही..! हैप्पी जर्नी..- म्हंणजे तुमचा प्रवास सुखाचा होवो.." गबलू किन्नरी स्वरात सांगत होता.. त्याचा तो प्रवास सुखाचा होवो हे शब्द ऐकून पंतांच्या तोंडावर दात विचकणार हसू आल..त्या म्हाता-याला वाटल..ही दोघ त्याला स्वर्गत पाठवत आहेत पन तोच..

" आणी गो टू हेल..- म्हंणजे ..."
गबलू आणी मेनका दोघांनी एकमेकांकडे पाहिल..आणि पुन्हा पंतांकडे पाहत मोठ्या आवाजात ओरडून म्हंणाले.

" जा नरकातsssss "
मेनकाने हातातली चाबकाची दोरी पुन्हा आपल्या दिशेने खेचली.. ते पाषानी काटे पंतांच्या आत्म्याला फाडत आत घुसले..

" आर्घ्रर्घ्रर्घ्र्घ्र्घेघ.!" पंतांच्या तोंडुन चित्कार बाहेर पडला.
आणी जागेवरच त्यांच्या आत्म्याचा फुगा फुटावा तसा स्फोट झाला..
त्यांच्या अंत झालेल्या देहातून लालसर धुर बाहेर पडला. त्यांचा आत्मा आता नरकाच्या दिशेने प्रस्थान झाला होता - जिवंतपणी आणि मृत पिशाच्छ योनित केलेल्या पापांची शिक्षा आता त्यांना नरकात भोगावी लागणार होती.

xxxxzzxxxxxxxx

एडकाने चित्कार केला पन- तेवढ्यात पंतांची शेवटची आर्त किंकाळी पुर्णत हवेलीत घुमली-
एडकाच्या कानांवर पडली..

" बाबाsss...बाबाsss..!"
ते सैतान लहान लहान मुलासारख आक्रोश करू लागल.

समर्थांना कळून चुकले होते..मेनकाने पंतांचा आत्मा नरकात धाडला होता. तसंही अहंकारी आत्मे मोक्षाची इच्छा घेत नाही. समर्थांना मेनकावर खुप गर्व झाला होता.. तीने एक कामगीरी फत्त्ते केली होती.

" बघ तुझा पिता कायमचाच नरकवासी झाला ..आता तुझी पारी आहे!"

समर्थांच्या वाक्यावर एडकाने दात चावत त्यांच्याकडे पाहील.. ते..खूनशीपणे भुवया ताणत ..त्या पिवळ्याजर्द लुकलुकणा-या नजरेन त्यांच्याकडे पाहिल..


ती घृणास्पद काळीज चिरणारी नजर , चेह-यावर उफाळून आलेला सूडभावनाहिंत संताप
भयाणक दिसत होता तो सैतान काळजाच पानी पाणी करणारी नजर होती..ती सामान्य मानवाच्या नजरेला न पेलणार दृष्य ! पन समर्थ मात्र थंड नजरेने त्याच्याकडे पाहत होते..त्याच्या पुढील कृतीची वाट पाहत होते..

××××××××××××××
रोमहर्षक दृष्य सुरु...

' आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला...
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला..!

आर्यंशला असूरात बदललेल्या रघूवीररावांनी
देऊळाच्या पाषाणी खांबावर फेकल , त्याच्या पाठीवर मुका मार बसला , तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर पडली..

" आर्यंशsssss!" ती किंचाळली.. त्याच्या दिशेने जायला निघाली तोच रघुवीररावांनी आपल्या उजव्या पंज्याने तीचे केस पकडले..

" आह्स्स." ती विव्हळली..

" कुठे चालली..कुठे चाल्ली..! हं?"
असुर रघुवीररावांनी ड़ाव्या हाताच्या पंज्याची एक चापट तिच्या गालावर बसवली.. धाडदिशी ती जमिनीवर कोसळली..
' आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ….'

" आनिशा ssss..!" वेदनेने तळमळत गांडूळासारखा ..हातापायांवर रेंगाळत आर्यंश तिच्यापाशी पोहचला..

" आनिशाssss..! तू ठिक आहेस का ? आनिशा..!" तो एका हाताने तिच्या गालावर हलकेच हात मारत होता. तिची शुद्ध जराशी हरपल्यासारखी वाटत होती.


' गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं' '

" ये ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" असुर रघुवीररावांनी आर्यंशचे केस पंज्यात पकडले..

" आह्ह्ह्ह्ह्ह्ह!" तो विव्हळला..

" हिहिहिहिहिहीहीही!" ते निळसर कचकड्याचे डोळे दाखवत रघुवीरराव खर्जातल्या आवाजात हसले.
केस सोडून डाव्या हातात त्याचा गळा पकडला..
उजव्या हातात असलेला तो अघोरी पंजा..आणी त्याच्या लोखंडी नख्या त्याच्या छातीवर हळकेच दाबल्या..पन त्यांना धार इतकी होती..की त्या मांस फाडत आत घुसल्या...घळा घला..रक्त वाहू लागला..

" आह्ह्ह्ह्ह्ह्ह्हह्ह्ह्ह्ह!"

xxxxxxxxxxxxx

" अर्घ्र्घ्र्ह्र्हेह्र्घ्र...र्घ्र्गेह्ह...!" विचीत्र आवाजात चित्कारत एडकाने पंख झप आवाज करत फडफडले..आणी हवेत झेप घेतली..

समर्थ ह्या वेळेचीच तर वाट पाहत होते..त्यांनी
दोन्ही हातांच्या बंद मूठी एडकाच्या दिशेने धरल्या..
हातात असलेले दोन्ही चौकलेटी रंगाचे रुद्राक्ष ..
कडे... त्यातला एक नी एक रुद्राक्ष तपकीरी विस्तवासारखा चकाकून उठला..

ट्रिगर दाबताच हेमरने गोळीवर आघात कराआ आणि झटकन सुरसुरी पेटावी आणि धुरळा उडवत उधळलेल्या बैलासारखी गोळी बाहेर पडावी तसे ते रुद्राक्ष कडे

' सूव्यांगssss! 'आवाज करत समर्थांच्या हातातून बाहेर पडले.. गोल गोल तपकीरी गोळ्यासारखे भिंगत एडकाच्या दिशेने आले..आणी वेगाने त्याच्या दोन्ही पंखांतून आरपार झाले.

एडकाचे पंख फाटले ज्याने हवेतच त्याचा तोळ जाऊ लागला....आणी पुढील क्षणाला हवेतून तो सैतान थेट खाली कोसळला.. समर्थांनी हिच संधी साधली.. घनशोषक मंत्र उच्चारल..

त्यांच्या उज्व्या हातात घनकाराचा निळ्या रंगाचा क्यूब घनशोषक अवतरला....समोर सैतान दिसताच
घनशोषक कार्यरत झाला..त्या घनशोषकातून
तीव्र शक्तिशाळी निळसर प्रकाशाची किरण बाहेर पडली जात ती एडकाच्या अंगावर पडली...

" न्हाय..न्हाय...आये....अये..... वाचव..! मसाला ...मसाला..मसालाssssss.." आपल्या सर्वाँकडे पाहत त्याने जबडा विचकला.. बुता-यासारखे पातळसर धार धार दात बाहेर आले..दोन्ही हाताचे पंजे हवेत उगारले..
तोच वैक्युम क्लिनरने कचरा आत ओढ़ावा तसे
घनशोषक उर्जास्तोत्र प्रकाशाने एडकाला आपल्या आत खेचल... त्याच्या पुर्णत आकृतीला काळ्या धुरासहित घनशोषकाने आपल्यात सामावून घेतल..


" हुश्श्श्श !" समर्थांनी तोंडातून सुटकेचा श्वास बाहेर सोडला.

" कृणाल.., समर्थ !"
गबलू- मेनका दोघेही समर्थांपाशी आले.

" समर्थ मी!" मेनका सांगत होती. तोच मध्ये आवाज आला..

" ए ..! " सर्वाँनी वळून पहिल्यामजल्यावरच्या जिन्याच्या दिशेने पाहिल.

" तू?" समर्थ ईतकेच म्हंणाले. पहिल्या मजल्यावर वर जखोबा उभा होता..आणी त्याच्या पुढे निशाबाई उभ्या होत्या..त्याने बंदूकीची नळी निशाबाईंच्या मस्तकावर ठेवली होती.

" हो मीच !"

" हो तूच म्हाता- या, तसंही तुझे जोडीदार आता उरले नाहीयेत. " मेनका उर्मटपणे म्हंणाली.तिच्या त्या वाक्यावर जख्याने दात चावले.

" अंग ए भवाणे, तोंड बंद ठेव तुझ..! जास्त उलट बोलशील ना तर? "

" तर ? तर काय रे म्हाता -या ! हाता पायाच्या काड्या तुझ्या, तू काय मला धमकी देतोस रे..! तुझ असं तूनतुणा वाजवेल ना , की पुढच्या दिवशी तिरडीवर झोपलेला असशील "

मेनका - जखोबा दोघांची शाब्दीक चकमक सुरु होती. तोच समर्थांनी निषाबाईंकडे पाहिल..आणी हळुच डोळे मिटून त्यांना धीर दिला आणि मग त्याच थंड डोळ्यांनी..निषाबाईंच्या भ्यायलेल्या नजरेत पाहिल..


निषाबाईंचे भ्यायलेले अशक्त डोळे.. समर्थांनी थंड स्तब्ध नजरेने निषाबाईंच्या नजरेस दहा सेकंद शुन्य भाव आणत पाहिले...

आणि झटकन डोळे जरासे विस्फारले. त्यांचे बुभळ हळकेच हिरवट रंगाने चकाकले....त्याच बुभळांच्या चमकेची प्रतिमा निषाबाईंच्या डोळ्यांत ही उमटली..आणी त्या संमोहिंत झाल्या..

" हात पकडा त्याचा !" समर्थ करड्या आवाजात म्हंणाले. आणि तोच निषाबाईंनी यंत्रवत जखोबाचा
बंदूक धरलेला हात पकडला....

पकड इतकी मजबूत होती..की कट आवाज होत अंगठ्याच हाड मोडल

" आsssss..आई...!" वेदनेने म्हाता -या जख्याची विव्हल फुटली.

" तूझा दूसरा मालक कुठे आहे ? कुठे आहे तो..? सांग !" समर्थांचा आवाज वाढला, करडा, तापट, उर्मट झाला.

जख्याची भीतिने तणतनली होती..जिवाच्या भीतीपोटी तो काफ-या स्वरात म्हंणाला.

" म ..मालकांना नवी शक्ति भेटले..ते कुमार-कुमारी युगळांचा बळी घ्यायला गावात गेले आहेत".

" काय?"

समर्थांनी अस म्हंणतच - मेनका गबलूकडे पाहिल..

"आपल्याला गावात जायला हव ,मला माहितीये..ते कुमार आणि कुमारी कोण आहेत चला!"
समर्थ म्हंणाले.

आणि तोच धाड गोळी झाडल्याचा आवाज आला.

समर्थ, मेनका, गबलू तिघांनी जागेवरच थांबून पहिल्या मजल्यावर पाहिल...

पुन्हा तोच एकापाठोपाठ सहावेळा गोळया झाडल्या गेल्या..

" धाड1, धाड2, धाड3,धाड4,धाड5 , धाड6!"
वरच्या मजल्यावर काळ्या अंधारात बंदूकीच्या हेमरमधून ठिंणग्या उडत होत्या काळा अंधार उजळून निघत होता.

निषाबाईंवरच संमोहन तुटल होत...हातातल्या
बंदूकीने त्यांनी जख्यावर गोळ्या झाडल्या होत्या..
चाळण बनवली होती देहाची..
" जैसे त्याचे ..कर्म.. तैसे त्याची फळे...!
समर्थ वर पाहत म्हंणाले...आणी लागलीच हॉलमधून बाहेर पडले.

xxxxxxxxxxxxx
'गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ , हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ'

" आह्ह्हह्ह्ह्ह्ह!" आर्यंश उराच्या देठातून ओरडला..त्याची किंकाळी उभा आसमंत दणाणून गेली.

आनिशाच्या डोळ्यांपूढे अंधारी आली होती..
तरी सुद्धा कसतरी हातापायांवर चालत ती रघुवीररावां जवळ आली..

त्यांच्या एका चापटीने आनिशाचा जिव अर्धमेळा झाला होता.

" हिहिहिही आली का भिक मागायला परत हीहिहहिह्हीह..! " त्यांनी आपल्या पंज्याने आनिशाला हनूवटीला धरून हवेत उचल्ल..

" ए हरामखोर , तुझ्या मुलीच्या वयाची आहे ती
जराशी तरी दया दाखव, इतक्या खालच्या थराला कस जाऊ शकतोस तू? " आर्यंश ओरडला ...

" हिहिहिही" अचानकच हसता हसता असुर रघुवीरराव थांबले तोंड पाडला..डोळे खाली आणले. ...." माझ्या पोरीला. मी कव्हाचंच मारली.."
आर्यंशला हे वाक्य ऐकून जाम मोठा धक्का बसला..
डोळे, तोंड मोठे करून तो पुढे पाहत होता..तोच
असुर रघुवीररावानी डोक वर काढल... आणी जबडा एका साईडने थोड फाकवत कुत्सिक हसले.

" हिला आणी तुला पन मारणार !"
आनिशाच अर्धजिव देह ,रघुवीररावांनी अलगद दूर हिबाळून दिल..

देऊळासमोर मांडळेल्या आईदेवीच्या घटमखरापुढे येऊन आनिशा निपचित पडली..
तिच्या समोरच घट मांडला होता..
आणी तिथे दोन ताट ठेवली होती एका ताटात हळद आणी दुस-या ताटात लाल कूंकू ठेवल होत.

" तुझ आणि तिच बळी देणार मी, तुमच्या दोघांच्या रक्तातचा आभिषेक चढवून , माझ्या शक्तिला वाढवणार हिहिही..!"

उजव्या हाताचा तो पंजा, आणि ती धारधार नख रघुवीररावांनी थेट आर्यंशच्या पोटात घुसवली..
डोळे बारिक करून दातविचकत हसले..

" धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये …. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये..गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये"


आनिशाच्या समोर दहा पावळांवर मखारीत संतोशी मातेची आणी मागे काळी मातेची मुर्ती होती.
देवीसमोर दोन्ही बाजुंना समई तेवत होत्या..
काळी मातेचे वटारळेले डोळे- बाहेर आलेली जीभ..
अशी ती प्रलय,निर्माण ,विनाश शक्तिची देवी आनिशाकडे पाहत होती..

आकाशातल्या काळ्या ढगांत वेडीवाकडी फेसाळती निळ्सर विज कडाडली..
दोन्ही समईंची जळणारी वात फडफडली

एका अज्ञात हवेच्या झोक्यासहित आनिशाच्या डोक्यासमोर असलेला ताटातला लाल कूंकू उधळला..
आणी आनिशाच्या पुर्णत चेह-यावर पोतळा ..गेला..
तीच सर्व चेहरा लाल रंगा ने रंगला..

' सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा'

ज्वालामुखीच्या तोंडून आगिचा स्फोट झाला, कोठेतरी डोंगर दरड कोसळली, नदीला पूर आला..निसर्गाने अक्षरक्ष प्रलयंकारी रुप धारण केल.

.
" अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला "

महाकाळीच्या मुर्तीतून तांबडसर प्रकाशकिरणे बाहेर पडली आणि तीच किरण आनिशाच्या अंगावर पडली .. किरन तिच्या शरीरावर पडताच

विजेचा शॉक बसावा तस तिच शरीर झटके खात हळल..

तिच्या शरीरात गारवा भरला - अंगात हुडहुडी भरली..!

नसा- नसांत एक बदल जाणवू लागला..
हात-पाय गरम पडले सून्न झाले..

खालच्या पायाच्या अंगठ्यापासूनची कातडी काळ्या रंगात परावर्तित होऊ लागली आकाशात विजांचा कोहराम माजला..

चाबकाच्या सटक्यां सारख्या फट फट विजा बरसत होत्या ....निसर्गाचा हा रौद्र अवतर मातला होता..प्रलयंकारीची देवी ह्या कलियुगातल्या आसुराच वध करायला आली होती.

आनिशाच्या अवतीभवती गोलसर शुभ्र प्रकाशित
कवच तैयार झाल..

" आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला येsssss ये....sssssss

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

अंबाबाईचा ….. उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ….. उधं उधं उधं उधं उधं
सप्‍तशृंगी मातेचा ….. उधं उधं उधं उधं उध।
.

आनिशाच्या पुर्णत अंगावर काळा रंग पसरला..
हात- पाय, डोक, सर्वच्या सर्व शरीर काळसर निळ पडल..
खांद्यावरचे केस आपो- आपोआप..सुटले पुर्णत पाठिवर पसरले- त्यांच्या लांबच्या लांब जाड जटा झाल्या..

असुर रघुवीररावांनी आनिशाकडे पाहिल तर तिच्या जागेवर एक शुभ्र प्रकाश फेकणारा गोळा हवेत तरंगत होता..

त्यांनी उजव्या हाताच्या त्या पंज्याची लोखंडी धारधार नख आर्यंशच्या पोटातून बाहेर काढली त्याला जरा बाजुला फ़ेकल..

आणी त्या शुभ्र प्रकाशाने चकाकणा -या स्फटीकाच्या गोळयाच्या दिशेने येऊ लागले. त्यांची
तीन- चार पावळ चालून झाली होती की तोच तो स्फ्टीकाचा गोळा हवेतच फुटला..

असुर रघुवीररावांनी एक हात चेह-यावर धरला.
आणि तोच हात पुन्हा बाजूला काढुन समोर पाहिल.. आणी जस समोर पाहिल ... असुर रघुवीररावांची पळता भुई थोडी झाली.. जिव घशात आला..भीतिने पाऊळे मागे मागे जाऊ लागली..
उरात भयप्रद भाव उमटले...अखंड शक्तिचा धनी असलेला हा असुर थरथरू लागला..

समोर आनिशाच्या देहात महाकाली, प्रलयंकार ,
भयप्रद रूपाची धनी , असुराच नरसंहार करणारी..
असुरांच काळ म्हंणुन ओळखणारी माता महाकाळी अवतरली होती.

पुर्णत देहाची त्वचा काळी होती. डोक्यावरचे सुटलेले केस खाली जमिनीवर येत होते..
कपाळावर लाल मलवट भरला होता.. आणी त्याच कपाळावर मधोमध व्याघ्रकोपी क्रोधाच्या
ज्वालामुखाचा ठेवा असणारा त्रिनेत्र उघडला होता..
डोळे भेदक टपोरे होते...असुर रघुवीररावांना खाऊ की गिळू ह्या नजरेने पाहत होते..ती भेदक काजळ घातलेल्या डोळ्यांची नजर भयाण होती.


वासलेल्या तोंडातुन लालसर रक्ताने माखलेली लांब पाच इंच लांबीची जीभ बाहेर आली होती.

गळ्यात आसुरांच्या कापलेल्या धडांची माळ घातलेली , आणी काही सोनेचे दागिने होते.
हाता -पायांत सुद्धा सोन्याची आभुषणे होते ..

अंगावर एक काळ,सोनेरी रंग मिश्रित चोळी
आणी लेहंगा होता.. खालचा लेहंगा ढोप्यांपर्य्ंत येऊन संपत होता.
कमरेला सोन्याचा गोल पट्टा होता.
आणी कवट्याची माळ सुद्धा घातली होती.
हात चार होते.. उज्व्या बाजूला असलेल्या दोन हातात एक तळवार ,आणि त्रिशूळ पकडल होत..
तर डाव्या हातात एका असुराच धड कापलेल होत..आणी त्या धडाखाली दुस-या हाताने एक मोठ सोनेरी गोळसर ताट धरल होत...आणी त्या ताटात..
धडाच्या कापलेल्या गळ्यातून लालसर रंगाच्या रक्ताची धार टपकत होती.
पायांच्या बोटांना लाल रक्तासारखा रंग होता..

समर्थ, मेनका, गबलू- आणी निषाबाई
देऊळापाशी पोहचले.. आणी त्यांना मातेच हे चमत्कारीक दर्शन घडल..

" आनिशा..!" निशाबाई आश्चर्यचकित नजरेने समोर पाहत होत्या..

" अद्भूत ..लिला आहे 'परमेश्वराची!" समर्थांनी अस म्हंणतच हात जोडले.. मेनका- गबलू दोघांनीही डोळे मिटुन हात जोडले..

पाहता पाहता उभा गाव देऊळासमोर जमला होता. आश्चर्यकारक, नवल, आविश्वस्निय गोष्ट जो तो उभ्या डोळ्यांनी मातेच रूप पाहत होता..

" नाय..नाय... माझ्याजवल येऊ नको..!"
असुर रघुवीररावांचे पाऊल माघारी वळले..

ते हे विसरून गेले की आपल्याकडे सुद्धा शक्ति आहे..! पन त्यांना हे सुद्धा ठावूक होत की ह्या प्रलयंकारी भयप्रद रणचंडिकेसमोर आपली शक्ति शुन्य आहे.

" हं..हं...हं...हं...हं...हं..!"
माता काळी तोंडातून मोठ मोठे श्वास घेत होती.

" मला माफ कर , मी तुझ्या पाया पडतो काले...पन मला सोड.. एकदा जिवाची भिक दे मला काले..! "

" तूला...तुला....सोडू...हं ?" गडगडाटी आवाज
असुर रघुवीररावांची वाचाच बसली.

" चांडाला नराधमा ..माई- लेकीच्या जिवाची पर्वा न करणारा तू , तुला सोडू हं?"
असुर रघुवीररावांनी एक गिरकी घेतली.. त्यांच्या हातांमधून मोठ मोठाले तपकीरी पंख बाहेर पडले..
आणी त्यांनी जागेवरूनच एक झेप घेतली..
पन तोच माता कालीने हातातली तलवार त्यांच्या दिशेने फेकली..

गोल गोल भिंगत ती तलवार रघुवीररावांच्या दिशेने पोहचली आणि त्यांचा एक हात छाटला गेला.
एका पंखांवर त्याना उडता आल नाही ते जमिनीवर कोसळले..

अभद्र रुपाचा तो असुर जमिनीवर लुळा पांगळा होऊन पाठीवर पडला होता..

आनिशाच्या अंगात आलेली माता काळी ताड ताड चालत त्या असूरा जवळ आली.. चालतांना
तिच्या पावळांनी जमिनीवरची माती धुळ खडे हवेत उडत होते.
भुकंपाचे हादरे बसत होते.
माता काळीने आपला डावा पाय रघुवीर आसुराच्या छाताडावर ठेवला..

माता काळीचे विस्फारले वटारलेळे काळे डोळे
रागाने असुर रघुवीररावांना पाहत होते..
तोंडातून लालसर रंगाची जीभ बाहेर आली..होती..
भयाण रणचंडीकेच हे भयप्रद रूप पाहून अक्षरक्ष गाववाल्यांच्याही पायाखालची जमिन थरथरून ऊठली होती..

हा रौद्ररुपी स्ंताप होता..


असुर रघुवीररावांना आपला मृत्यु समोर दिसला.
केलेल्या पापाची होती नाही तेवढी सर्व पाप डोळ्यांसमोर तरळली.. स्वत:च्या लेकीचा घेतलेला तो अघोरी जिव ही दिसला..पन आता पश्चाताप करून काही उपयोग नव्हता..समोर ती होती..जिच्या हाती एकदा का असुर भेटला की त्याच डोक गळ्यात घातल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हत..

माता कालीने उजव्या हातातला तीन धारधार पातींचा त्रिशूळ वर नेहला..
जीभ बाहेर आलेली, डोळे वटारळेले..
वर नेहलेला त्रिशूळ वेगान खाली आल.. छाताडात घुसला..

" आर्घ्र्घ्र्ग्गर्घ्ग्र्ह्गेहेह्ह्र्ह.!"
उभा आसमंत त्या चित्काराने थरथरून ऊठला..
रघुवीररावांच्या नाका- कानांतून हिरवट पू बाहेर आल, कचकड्याच्या डोळ्यांच्या खोंबण्या फुटल्या..


माता काळीने हातातली तलवारीने त्यांच ते मूडक एका वाराने देहापासून विलग केल..
खाली पडलेल मुंडक तीने हातात घेतल..
पाहता पाहता तिच्या देहाची उंची वाढली..
अवाढव्य पंधरा फुट झाली.. मातेच्या डोक्यामागून सुर्यासारख तेजस्वी प्रकाश किरणे बाहेर येत होती.
तोंडातली जिभ बाहेर काढुन, ती सर्व गावक-यांकडे पाहत होती.

सर्व गावक-यांनी आप- आपले हात जोडले..
मनोभावे मातेला नमस्कार केला.. तोच डोळे दिपवणारा लक्ख प्रकाश पसरला.. सर्वाँचे डोळे दिपले..

काहीवेळाने जेव्हा सर्वाँनी डोळे उघडले तेव्हा माता काली गायब झाली होती.

पन सर्वाँसमोर असुर रघुवीररावांच बिन धडाच देह मात्र तसंच पडल होत. तोच त्या बिन धडाच्या देहातून वाफ बाहेर निघू लागली..

घाणेरडा, करपट , मांस जळाल्याचा घाण वास सुटला आणि धाड आवाज करत पुर्णत देह जागेवरच फुटल....नाश पावल..

" ए सैतान...मेला..रे ..! आपण सुटलो..!"
कोणतरी गावकरी मोठ्याने ओरडला..
आणी बाकीच्यांनीही त्याला दूजोरा दिल..

" ए....!" मोठ्याने ओरडत गावकरी नाचू लागले..

आकाशातले काळे ढग न जाणे कोठे विरुन गेले.. शुभ्र गोळसर कचकड्यासारख्या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरला..
सैतानाचा नाश झाला होता..
देवपाडा गाव आता सैतानाच्या पकडीतून सुटला होता.



कथेचा शेवट …
अनिशा आर्यंश दोघांनी पुढे जाऊन लग्न गाठ बांधली..
लग्नाला समर्थ उपस्थित होते..
अणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना आशीर्वाद देऊयात…


समाप्त: